Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेणार !

धर्मपरंपरा जपण्याचा श्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांचा निर्धार !
धर्मपरंपरा जपणार्‍या श्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशी येथील ग्रामस्थ महिलांचे अभिनंदन ! या ग्रामस्थ महिलांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदु महिलांनी घ्यावा !

डावीकडून श्री. अभय वर्तक, सौ. नंदिनी सुर्वे, कु. प्रतिक्षा कोरगांवकर (बोलतांना) आणि अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर
श्री शनिशिंगणापूर, ९ एप्रिल - गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांना दर्शनासाठी मोकळा केला आहे. त्यानंतर अनेक महिला आणि भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी श्री शनिदेवाचे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. असे असले, तरी शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
श्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील महिलांनी देवस्थानच्या निर्णयाविषयी सांगितले की, बाहेरगावच्या महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले, तरी आम्ही आमची धर्मपरंपरा कायम पाळू आणि खालूनच दर्शन घेऊ. श्री शनिशिंगणापूर गावासह सोनई, बेल्हेकरवाडी, खरवंडी, पानसवाडी, वडाळा, घोडेगाव, नेवासे, चांदा, उंबरे, ब्राह्मणी, करजगाव, रस्तापूर, राहुरी या गावांतील एकाही महिलेने श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेतले.

महिलांनी शनीच्या समोर जाऊ नये ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हरिद्वार - महिलांसाठी शनीची पूजा निषिद्ध आहे. शनीची पूजा केल्याने अनिष्ट होऊ शकते. त्यामुळे त्यांनी शनीच्या समोर जाऊ नये, असे मत ज्योतिष आणि द्वारका या पिठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. शंकराचार्य पुढे म्हणाले की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे; परंतु धर्माच्या क्षेत्रात ज्या मर्यादा आणि परंपरा त्यांच्या संदर्भात आहेत, त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे; कारण त्यातच त्यांचे हित आहे. मंदिरात देवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला स्पर्श करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा अधिकार केवळ त्या मंदिरातील पुजार्‍यांना असतो. इतर सर्वजण लांबूनच दर्शन घेतात.


एड्स जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालिसाच का ? कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही ? - मुंबई उच्च न्यायालय

     नागपूर महानगरपालिकेने एड्सविषयीच्या जनजागृतीसाठी कस्तुरचंद पार्क मैदानात हनुमान चालिसा कथनाचे आयोजन केले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना हनुमान चालिसाच का ?, कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही ? हनुमान चालिसा आणि एड्स जनजागृतीचा काय संबंध ? फक्त हिंदूंनाच एड्सची लागण होते का ? भारत फक्त हिंदूंसाठीच का ? केवळ हनुमान चालिसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार का?, या शब्दात न्यायलयाने खडसावले. त्यानंतर आयोजकांनी दोन्ही कार्यक्रमांचे वेगवेगळे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालिसा पठण आणि एड्स जनजागृती कार्यक्रम यांमध्ये तासाभराचे अंतर ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.


गोवा मुक्तीसाठी लढलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांना ५४ वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळणार !

      वर्ष १९५४-१९५५ या कालावधीत गोव्याला पोर्तुगिजांच्या जोखडातूनमुक्त करण्यासाठी गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतलेल्या जम्मू-काश्मीरमधील स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीच्या ५४ वर्षांनंतर स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे केंद्रशासनाकडून मिळणारे निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळणार आहे. राज्यपाल एन्.एन्. व्होरा यांनी दोन मासांच्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात पुढाकार घेऊन स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्ती वेतन देण्याविषयी जम्मू-काश्मिरच्या शासनाकडून प्रलंबित असलेले कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले.

डॉ. तोगाडिया यांनी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपला भाग पाडावे !

      भारत स्वतंत्र झाला तेव्हा ८६ टक्के हिंदू होते. आज हे प्रमाण ७९ टक्क्यांवर आले आहे. ही चिंताजनक परिस्थिती पालटण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे लागेल. त्यासाठी राजसत्ता मिळवावी लागेल, देशाच्या घटनेत पालट करण्यासह कायदेही पालटावे लागतील. स्वकेंद्रित झालेल्या हिंदु समाजाला समाजकेंद्रित बनवल्यास ही परिस्थिती पालटेल अन्यथा एक वेळ अशी येईल की, हिंदूंवर स्वत:च्याच देशात अल्पसंख्यांक म्हणून रहाण्याची पाळी येईल, असे विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले. (हिंदूंना स्वकेंद्रित न ठेवता व्यापक बनवायचे असेल, तर त्यांचा केवळ बाह्य विकास न करता आंतरिक विकास व्हायला हवा. त्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन साधना करण्यास उद्युक्त करणे आवश्यक आहे ! - संपादक)

रणरागिणी शाखा धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी महालक्ष्मीच्या मंदिरातील गर्भगृहाच्या बाहेर आधुनिकतावादी महिलांना रोखणार ! - कु. प्रतिक्षा कोरगावकर, 'रणरागिणी'शाखा, राज्य संघटक

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या 'रणरागिणी' शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ !
२२५ हून अधिक रणरागिणींची उपस्थिती
मार्गदर्शन ऐकतांना महिला

कार्यक्रमाला आरंभ करतांना डावीकडून श्री. सुनील घनवट, पू.(कु.) स्वाती खाडये,
सौ. वैशाली क्षीरसागर आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर
कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) - कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेड आणि अवनी या दोन संघटना येत आहेत. आम्ही धर्मपरंपरेचे रक्षणासाठी आई महालक्ष्मीच्या मंदिरातील गर्भगृहात आधुनिकतावादी महिलांना प्रवेश मिळू देणार नाही, ही घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत.

गोव्यात प्रतिबंधित 'पीस टी.व्ही.'चे सर्रास प्रक्षेपण करणार्‍या केबल चालकांवर कारवाई करा ! - श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांची मागणी

श्री. प्रमोद मुतालिक यांच्याकडून दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना नोटीस
प्रतिबंधित वाहिनी बंद करा, असे जर प्रशासनाला सांगावे लागत असेल, तर प्रशासन नावाचा खर्चिक डोलारा हवा कशाला ? प्रतिबंधित वाहिनी चालू असल्याविषयी अनभिज्ञ असणे, हे राष्ट्रासाठी धोकादायक !

पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) - केंद्रशासनाने प्रतिबंधित केलेली 'पीस टी.व्ही.' वाहिनी प्रदर्शित करणारे केबलचालक आणि वितरक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारी नोटीस श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना त्यांच्या अधिवक्त्यांद्वारे पाठवली आहे.
काँग्रेस शासनातील तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री मनिष तिवारी यांनी वर्ष २०१२ मध्ये लोकसभेत दिलेल्या उत्तरात देशात २४ वाहिन्यांवर बंदी आहे, असे सांगितले होते. देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे कार्य करणार्‍या या वाहिन्यांच्या प्रसारणासंदर्भात गोव्यातील अनेक नागरिकांच्या श्रीराम सेनेकडे तक्रारी केल्या आहेत. शासनाने नेमलेली जिल्हा प्रसिद्धीमाध्यम देखरेख समिती (मिडिया मॉनिटरिंग कमिटी) या संबंधी कोणतीही कारवाई करत नाही, असे लक्षात आल्यामुळे श्री. मुतालिक यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नोटिसीची प्रत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पाठवून या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

... अन्यथा भारतमाता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकांची मुंडकी छाटली असती ! - योगऋषी रामदेवबाबा

पूर्वीपासून देशातील जनतेला राष्ट्रभक्ती शिकवली असती, तर भारतमाता की जय म्हणा, असे 
सांगावे लागले नसते, तसेच अशी घोषणा देण्यास नकार देणार्‍यास जनतेनेच धडा शिकवला असता ! 
     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही, असे म्हटल्यानंतर आता एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे नाव न घेता रामदेवबाबा म्हणाले, मान कापली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे जर कुणी म्हणत असेल, तर मला त्यांना सांगायचे आहे की, आम्ही कायद्याचा आणि राज्यघटनेचा आदर करतो अन्यथा सहस्रावधीच काय; पण लाखो मुंडकी आम्ही छाटू शकतो. अशा प्रकारे बोलण्याची लोकांना लाज वाटायला हवी. प्रत्येकाने मातृभूमीचा आदर केला पाहिजे.

मुसलमानांनी मुसलमानेतरांची हिंसा करणे कुराणला मान्य !

कुराणमधील शिक्षांची माहिती देणार्‍या इमामाचा व्हिडिओ सार्वजनिक !
     नॉर्वे (युरोप) देशातील एका दूरचित्रवाणीवर झालेल्या कार्यक्रमात इमाम मुल्ला करेकर या धर्मगुरूंचा, मुसलमानेतरांसाठी कुराणमध्ये उल्लेख केलेल्या शिक्षांची माहिती देणारा व्हिडिओ सार्वजनिक झाला आहे. यामध्ये मुसलमानांनी मुसलमानेतरांची हिंसा करणे, हे कुराणला धरून आहे; जे इस्लामचा सन्मान करत नाहीत, त्यांना मारणे, हा मुसलमानांचा अधिकार आहे, असे करेकर या धर्मगुरूंनी म्हटल्याचे दिसत आहे.

गोवा शासनाने मांडवीतील कॅसिनोंचा कालावधी १ वर्षाने वाढवला !

कॅसिनोंना पाठीशी घालणारे गोवा शासन ! उद्या महसूल मिळवणे, पर्यटन आदी 
कारणांखाली वेश्याव्यवसायही कायदेशीर केल्यास आश्‍चर्य नाही !
     मांडवीतील कॅसिनो जहाजांच्या अनुज्ञप्तीचा कालावधी आणखी १ वर्षाने वाढवण्याचा तसेच काही महिने बंद असलेल्या पाचव्या रॉयल कॅसिनोच्या अनुज्ञप्तीचेही नूतनीकरण करण्याचा निर्णय ३१ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या गोव्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी १४ ऑगस्ट २०१३ मध्ये राज्यशासनाने ३१ मार्च २०१६ नंतर कॅसिनो जहाजे मांडवी नदीतून न हटवल्यास कॅसिनोंच्या अनुज्ञप्त्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आता हा निर्णय पालटला.

गुढीपाडव्याविषयीच्या धर्मद्रोह्यांच्या विषारी प्रचाराला बळी पडू नका ! - ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून तिसरे पू. मोहनबुवा रामदासी,
चौथे ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा आणि अन्य मान्यवर
        सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) - ब्राह्मणांनी कट रचून छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला. यानंतर गुढीपाडव्याचा सण आनंदोत्सव म्हणून ब्राह्मण साजरा करू लागले, असा विषारी प्रचार आताचे धर्मद्रोही करत आहेत. या विषारी प्रचाराला सुज्ञ शंभुभक्तांनी बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

जेएन्यू प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी विद्यापीठ कायदेशीर सल्ला घेणार !

देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना १ मासानंतरही काहीच शिक्षा न करणार्‍या विद्यापिठातून 
भावी पिढी देशद्रोही निपजल्यास नवल नाही ! अशा विद्यार्थ्यांना थेट घरचा रस्ता दाखवा ! 
     येथील जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) आवारात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांच्या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा देण्यात यावी, यासंदर्भात विद्यापिठाने कायदेशीर सल्ला मागितला आहे. ९ फेब्रुवारी या दिवशी जेएन्यूच्या आवारात एका कार्यक्रमात कन्हैया कुमार, अनिर्बन भट्टाचार्य आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी पाकच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
        वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

(म्हणे) श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभारा प्रवेशासाठी १३ एप्रिलपासून लढा देणार !

 • हिंदूंनो, पुरोगामी आणि नास्तिकवादी यांच्याकडून करण्यात येणारे धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रभावी संघटन उभारा !
 • अशा नास्तिकवादी आणि पुरोगामी महिलांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी जिल्हा बंदी कारवाई करावी, अशी देवीभक्तांची अपेक्षा आहे !
 • तृप्ती देसाई यांचा धर्मावर आघात करण्याचा आणखी एक डाव !
        कोल्हापूर, ९ एप्रिल - श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळणे, हा केवळ प्रारंभ आहे. हा लढा चालू रहाणार असून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश मिळावा, याकरता १३ एप्रिलपासून लढा देणार आहोत.

महाराष्ट्र आणि बेळगाव येथे गुढीपाडवा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

 • हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 • ठिकठिकाणी पदफेरी अन् शोभायात्रा यांचे आयोजन
 • लक्ष वेधून घेणार्‍या पारंपरिक आणि ऐतिहासिक वेशभूषा 
बेळगाव
     येथे चेलवद हट्टी आणि सुरते येथे गुढी उभारण्यात आली. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

जातीय राजकारणासाठी निर्मिलेला काल्पनिक शत्रू म्हणजे ब्राह्मण ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे

        पुणे, ९ एप्रिल (वार्ता.) - आज अस्मितेची विस्मृती झाली आहे. जातीय राजकारणाला फोडणी देण्याकरता एक काल्पनिक शत्रू निर्माण केला गेला. तो म्हणजे ब्राह्मण. खोटे बोला; पण रेटून बोला या तत्त्वानुसार ब्राह्मणांनी इतरांना शिक्षण नाकारल्याचे आरोप केले जातात; पण वस्तूस्थिती तशी नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतिहासकार म्हणून डाव्या विचारांच्या मंडळींना नेमण्यात आले आणि त्यांनी खोटा इतिहास पसरवला. ब्राह्मण समाजावर टीका करणारे अनेक लेख व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरवले जात असतात; पण विरोधकांच्या आरोपांवर ब्राह्मण समाज विचार करून खोडून काढत नाही आणि त्यांना प्रत्युत्तरही देत नाही. ब्राह्मण समाजाची विचार करण्याची शक्ती क्षीण होत चालली आहे. ते व्यक्तच होत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले जाते, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

सनातन संकुल (पनवेल) येथे गुढीपाडव्यानिमित्त बालसाधकांची प्रभातफेरी !

     पनवेल - येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर देवद येथील सनातन संकुलातील बालसाधकांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच बालसाधकांनी सात्त्विक वेशभूषा परिधान केली होती. या वेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्र आणि धर्म जागृतीपर घोषणाही दिल्या. देवद येथील शिवमंदिरापासून ही फेरी आरंभण्यात आली आणि सनातनच्या आश्रमात फेरीचा समारोप झाला. या वेळी प.पू. पांडे महाराज यांनीही बालसाधकांना मार्गदर्शन केले. पुढील वर्षी आणखी मोठी प्रभातफेरी काढण्याचे बालसाधकांनी ठरवले. श्रीमती अंजली भोसले, सनातन संकुलातील आेंकार ओशिवराचे अध्यक्ष श्री. सचिन पाटील, श्री. प्रमोद बेंद्रे आणि आधुनिक वैद्य दीपक जोशी यांनी या फेरीचे आयोजन केले होते.

मालेगावात धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

प्रसारमाध्यमांनी वृत्त दडपले !
मालेगाव - ५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ८ एप्रिल या दिवशी संतप्त धर्मांधांनी मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. धर्मांधांनी पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली. या घटनेमुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. (दादरी हत्याकांड असो अथवा देहलीमधील चर्च आणि ख्रिस्ती शाळांवर झालेली आक्रमणे असोत, अशा बातम्यांना ऊठसूट प्रसिद्धी देऊन त्यांना धार्मिक रंग देणारी प्रसारमाध्यमे मालेगावची शाळा आणि तेथील पोलिसांवरील आक्रमणाच्या घटनेची साधी दखलही घेत नाहीत, हे लक्षात घ्या ! आक्रमण करणार्‍याची जात अथवा धर्म कोणता ? यांवरून प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्या बनत असतील, तर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी प्रसिद्धीमाध्यमे 'धर्मांध'च होत ! - संपादक)

श्री तुळजाभवानी देवस्थानची २६५ एकर भूमी हडपणार्‍या दोषींवर कारवाई करा ! आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
      महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानमध्ये सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. या घोटाळ्यातील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा राज्यात प्रखर आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी ५ एप्रिलला एका आंदोलनाद्वारे शासनाला दिली.
१. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे.
२. मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून अंदाजे शेकडो कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लूट केलेली आहे.

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु धर्मजागृती सभेच्या 
प्रचारार्थ तासगाव येथे आज वाहनफेरी 
पत्रकार परिषदेत डावीकडून सचिन पवार,
अभिजित घुले, डॉ. मानसिंग शिंदे आणि सौ. वैशाली राजहंस
          तासगाव (जिल्हा सांगली), ९ एप्रिल (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. ही सभा तासगाव येथील चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते ९ एप्रिल या दिवशी तासगाव येथील विष्णु मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस, बजरंग दलाचे सहसमन्वयक श्री. अभिजित घुले, श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख आणि गोल्ला समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सचिन पवार उपस्थित होते.

महिलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात ४ याचिका प्रविष्ट

     मुंबई, ९ एप्रिल - मंदिर प्रवेश हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे आणि मंदिर प्रवेश करणार्‍या महिलांना संरक्षण देणे, हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात ४ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत; परंतु न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. (यापूर्वी प्रवेशासाठीची याचिका तात्काळ सुनावणीसाठी घेणार्‍या न्यायालयाचे त्याच्या विरोधातील याचिकेवरील भूमिका जनतेला चक्रावणारी वाटू शकते. - संपादक) मुख्य न्यायमूर्ती डी.एच्. वाघेला आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनाक यांच्या खंडपिठासमोर ७ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीत सदर याचिकेवरील सुनावणी ११ एप्रिल या दिवशी ठेवली आहे. यापैकी एक याचिका अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा प्रदेश प्रवक्ता श्री. दिलीप अलोनी यांनी दाखल केली आहे.

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे 'इदगाह' पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा आदेश

हिंदु विधीज्ञ परिषदेचे यश !
हिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
मुंबई, ९ एप्रिल (वार्ता.) - हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त श्री. धर्मराज चंदेल यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इदगाह पशूवधगृहाच्या प्रदूषणामुळे ते बंद करण्यात यावे, यासाठी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ष २०१४ मध्ये याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेचा परिणाम म्हणून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा 'इदगाह' पशूवधगृह बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला.
या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी श्री. धर्मराज चंदेल यांच्या वतीने युक्तीवाद केला.
या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य-सचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहून काय कारवाई केली, याची माहिती देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ६ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मंडळाचे सदस्य सचिव श्री. अंबलगन हे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढील सूत्रे आहेत.

(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्तोम बंद न केल्यास जनता मुडदे पाडील !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
मुडदे पाडण्याची भाषा करणे राज्यघटनेत बसते का ? प्रकाश आंबेडकरांची ही सहिष्णुता आहे का ?
प्रकाश आंबेडकर यांची मुक्ताफळे !
     नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर ३ एप्रिल या दिवशी आयोजित जातिअंत परिषदेच्या निमित्ताने समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे. शासन आणि कायदा त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळेच आंदोलन करणार्‍यांना वेगवेगळी लेबले लावून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असेच स्तोम देशात चालू ठेवून सत्ता चालवल्यास येणार्‍या काळात जनता त्यांचे मुडदे पाडल्याशिवाय रहाणार नाही, अशी मुक्ताफळे भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी उधळली.

धारावीत गोमांस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या 
प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता !
       मुंबई - देशात गोमांस बंदी असूनही गाय, बैल, तसेच म्हशीचे मांस देशाबाहेर तस्करी करणारे जाळे मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. गोमांस बंदी असूनही देशातल्या विविध ठिकाणांहून हे मांस रेल्वेने मुंबईतील धारावी येथे आणण्यात येत होते. धारावीतून समुद्रमार्गे पूर्वेकडील देशांना हे मांस पाठवण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६.५ टन मांस आणि अवयव सापडले असून त्यांची किंमत १५ लक्ष रुपये इतकी आहे. मांस तस्करीचे एक मोठे जाळे देशात कार्यरत असून त्यातील एक टोक पोलिसांना सापडले आहे. पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या पथकाने धारावीतील ६० फूट मार्ग जवळील एका गोदामात धाड टाकली. त्या वेळी पोलिसांना ६.५ टन गाय-बैल यांचे मांस आढळून आले. पोलिसांनी गोदामचा मालक शमशाद आझाद कुरेशी, अश्रफअली मियाँ, मोहम्मद सरताज कुरेशी यांना कह्यात घेतले.

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचा चौथरा महिलांना दर्शनासाठी खुला करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची शक्यता

       श्री शनिशिंगणापूर, ९ एप्रिल - गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांसह सर्वांना दर्शनासाठी खुला केला आहे. या निर्णयाला राजकीय कंगोरे आहेत, असे म्हटले जात आहे. देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळामध्ये बहुतांश विश्‍वस्त माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर यापूर्वी कधीही या विषयात लक्ष न घातलेले श्रीरामपूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे श्री शनिशिंगणापूरमध्ये महिलांना घेऊन प्रवेश करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाता आले नाही, तर त्यांनाच धक्काबुक्की केली होती. एकूणच या प्रकरणात स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने पाहिले जात होते आणि त्याप्रमाणेच भूमिका अन् निर्णय घेतले जात होते. ८ एप्रिल या दिवशीही त्याच पद्धतीने निर्णय झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.

गरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी !

     बरेली (उत्तरप्रदेश) - केंद्रीय हज समितीकडून काढण्यात आलेल्या नव्या सूचनेनुसार हज यात्रेमध्ये ४ मास पूर्ण झालेल्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही. जर अशा महिलेने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवासाला आरंभ केला, तरी अर्ध्या प्रवासातून त्या महिलेला परत पाठवण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बरेली हज सेवा समितीचे नजीम बेग यांनी दिली आहे. केंद्रीय हज सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-उर-रहमान यांनी हा आदेश दिला असल्याचे बेग यांनी सांगितले. (मंदिरात महिलांनी प्रवेश करण्यावरून आकांडतांडव करणार्‍या संघटना यावर तोंड उघडणार आहेत का ? - संपादक)हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Malegaonme dharmandhone ek pathshalame todphod evam aagjani kar policepar pathrav kiya.
Kya yah sahishnuta hai ? Ab Ispar secularwadi moun kyu ?

जागो ! : मालेगाव में धर्मांधों ने एक पाठशाला में तोडफोड एवं आगजनी कर पुलिस पर पथराव किया.
क्या यह सहिष्णुता है ? अब इस पर सेक्युलरवादी मौन क्यों ?

पुरोगामी याला सहिष्णुता म्हणणार का ?

फलक प्रसिद्धीकरता
पुरोगामी याला सहिष्णुता म्हणणार का ?
मालेगावमध्ये धर्मांधांनी ८ एप्रिल या दिवशी एका प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली, तसेच पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली.

महिलांनी शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर चढून शनिदेवाची पूजा न करण्यामागील शास्त्र

श्री. श्री. भट
     शनिशिंगणापूर येथे महिलांनी चौथर्‍यावर चढून शनिदेवाची पूजा करण्याचा विषय सध्या माध्यमातून गाजत आहे. 
१. प्रत्येक स्थळाचे नियम पाळणे, हे समाजहिताच्या 
दृष्टीने प्रत्येकाला बंधनकारक असते !
     एखाद्या स्त्रीने शनिशिंगणापूरच्या शनिदेवांची पूजा स्वतः करण्याचा आग्रह धरणे, यात काही तथ्य नाही. यामागे भाव तर नाहीच, उलट हट्ट आणि समाजात फूट पाडणे हे आहे. येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे त्या त्या क्षेत्राचे नियम, रूढी आणि परंपरा पाळल्याच पाहिजेत, उदा. ताजमहाल हे काही प्रार्थनास्थळ नाही. ती शासकीय मालकीची जागा आहे; पण तेथे पादत्राणे काढून अनवाणी प्रवेश करावा लागतो. परदेशी प्रेक्षकांसाठी बुटांवर अनावरण घालावे लागते. गुरुद्वारात डोक्यावर टोपी, रूमाल किंवा पदर घ्यावा लागतो. हे नियम पाळायचे नसतील, तर सामाजिक स्थळी व्यक्तीने हट्टाने जाऊ नये. इतरांचे हक्क, अधिकार, मते तुडवणे म्हणजे लोकशाही नव्हे. मला नमाज पढायचा आहे, असे म्हणून एखाद्या स्त्रीने मशिदीत जाऊन तिचे काय होते ते पहावे.

संभाजी महाराज यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठानची मूकपदयात्रा !

        सांगली, ९ एप्रिल (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांना श्रद्धांजली म्हणून ८ एप्रिल या दिवशी मूकपदयात्रा काढण्यात आली. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा मारुती चौकातून प्रारंभ करण्यात आली. अग्रभागी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेली गाडी होती. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन ही यात्रा परत मारुती चौकात आली. शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

मराठ्यांनो, जात, पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न अडकता धर्मरक्षणासाठी पुढे या !

श्री. विजय पाटील
       एकदा एका नातेवाइकाशी माझा पुढील संवाद झाला. 
१. मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला ! 
नातेवाईक : ब्राह्मणांमुळेच बहुजन समाजावर अन्याय झाला. आपला मराठा समाज मागे राहिला. आज सर्व महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मणच आहेत. 
मी : गेली ६५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य आहे ना ? मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली ? ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे ! मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का ? मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला.
नातेवाईक : अफझलखानाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण होते. संभाजीराजांना ब्राह्मणी मनुवादामध्ये लिहिल्याप्रमाणे मारले गेले. ब्राह्मणांनीच औरंगजेबाला तसे सांगितले. त्यांनी राजांचे शीर भाल्याला लटकवून उत्सव साजरा केला. त्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, तो ब्राह्मणांनीच चालू केला. (असे सांगून ते ब्राह्मणांना शिवी देत होते.)

ओवैसींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करा ! - आमदार डॉ. नीलम गोर्‍हे

       मुंबई, ९ एप्रिल - वारंवार गंभीर आणि प्रक्षोभक विधाने करून समाजात तेढ निर्माण करणार्‍या खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा आणि ओवैसी यांनी परत परत अशी प्रक्षोभक विधाने करू नयेत म्हणून त्यांच्या विरोधात प्रतिबंधक स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नुकतीच विधान परिषदेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली. लातूरमध्ये उद्गीर येथे १४ मार्च या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाच्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी यांनी गंभीर विधाने केली. इशरतजहाँ, हिमायत बेग हे दोघे अतिरेकी नसून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, भारतमाता की जय म्हणणार नाही, मोदी शासनाच्या काळात हिंसाचार आणि जेवढ्या दंगली झाल्या तेवढ्या कधीही झाल्या नाहीत, हिंदुस्थान ही कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशी अनेक प्रक्षोभक विधाने त्यांनी केली आहेत. त्यांच्या या विधानांविषयी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोर्‍हे यांनी केली.

राज्यकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याचे फलित म्हणजे सर्व ठिकाणी आढळणारा धर्मांधांचा उद्दामपणा !

श्री. शिवाजी वटकर
     १७.३.२०१६ या दिवशी मी मुंबई ते पनवेल असा लोकल रेल्वेने प्रवास करत होतो. डब्यामध्ये फार गर्दी होती. मी उभा राहून प्रवास करत होतो. थोड्या वेळाने एका कोपर्‍यात जागा झाली. तेवढ्यात त्या जागेसमोर बसलेल्या एका धर्मांधाने तेथे पाय ठेवले आणि तो आरामात भ्रमणभाषवर बोलत राहिला. मी जवळ गेल्यावरही तो पाय खाली घेत नव्हता. नंतर माझ्या सांगण्यानुसार त्याने पाय खाली घेतले. ती जागा रज-तमाने माखल्याने मला तेथे बसावेसे वाटत नव्हते. शेवटी निरुपाय म्हणून मी तेथे बसलो.
     नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सभ्यता राखावी, अशी अपेक्षा आहे; मात्र सभ्यता आणि नीतीनियम धाब्यावर बसवून धर्मांध नेहमीच कायदाबाह्य वागत असल्याचे सर्वत्र दिसते. रेल्वे आस्थापनाने ठिकठिकाणी आसनावर पाय ठेवू नये, प्रवाशांनी थुंकू नये, टपावरून प्रवास करू नये आदी सूचना लिहिलेल्या आहेत. तरीही धर्मांधांचा उद्दामपणा चालूच आहे.

जिहादी आतंकवादास खतपाणी घालणार्‍या भारतातील उर्दू नियतकालिकांचा राष्ट्रद्रोही चेहरा उघड !

 • राष्ट्रप्रेमींनो, सामना, सनातन प्रभात, ऑर्गनायझर या राष्ट्रवादी नियतकालिकांना राष्ट्रद्रोही म्हणणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी वस्तुत: राष्ट्रद्रोही असणार्‍या उर्दू नियतकालिकांच्या विरोधात ब्र ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
 • जिहादी आतंकवादाविषयी दुटप्पी भूमिका घेणार्‍या अशा नियतकालिकांच्या विरोधात शासन कठोर कारवाई का करत नाही ?
इंडिया पॉलिसी फाउंडेशन या राष्ट्रप्रेमी संघटनेकडून उर्दू नियतकालिकांच्या वृत्तांचे भाषांतर !
   देहली - जिहादी आतंकवादाच्या संदर्भात भारतातील उर्दू नियतकालिके दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच यातून त्यांचा राष्ट्रद्रोही तोंडवळाही (चेहराही) उघड झाला असल्याचे इंडिया पॉलिसी फाउंडेशन या देहलीस्थित संघटनेने घेतलेल्या उर्दू नियतकालिकांच्या वृत्तांच्या आढाव्यातून लक्षात येते.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व

     हिंदु धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे कुणीही व्यक्ती थेट देवाशी एकरूप होऊ शकते. ख्रिस्ती वा मुसलमानात पाद्री किंवा मुल्ला-मौलवी हे मध्यस्थ असतात. ते आपल्यासाठी देवाचा पुत्र किंवा प्रेषित देवाला साकडे घालतात. तसे हिंदु धर्मात नाही. 
- श्री. श्री. भट, ३/६, एव्हरेस्ट सोसायटी, डोंबिवली (प.) (संदर्भ : धनुर्धारी, मार्च २०१६)

राज्यकर्त्यांनी धर्माविषयी अभ्यास करून मत व्यक्त करणे अपेक्षित !

    कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही. आतंकवादाला धर्माशी जोडू नका. आतंकवादाला आसरा आणि पाठिंबा देणार्‍यांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. भारत आतंकवादासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी 
     आतंकवादी स्वतः धर्मासाठी जिहाद करत आहोत, असे सांगतात, तसेच स्वतःच्या संघटनेचे नावही धर्माच्या आधारे ठेवतात. देशाने आतंकवादाच्या समोर झुकता कामा नये, हे ठिकच आहे, तरीही मागील ४० वर्षांत जिहादी आतंकवादामुळे झालेली हानीही मोठीच आहे, हे विसरता येत नाही !

ममताबानोंच्या बंगाल राज्यात दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असलेला पूल सात वर्षांत एक चतुर्थांशच झाला !

     उत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ बांधकाम चालू असलेला पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाले. वर्ष २००९ मध्ये या पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाला होता. हा पूल १६४ कोटी रुपयांत १८ मासांत पूर्ण होण्याचे लक्ष्य देण्यात आले होते; मात्र त्याचे ७ वर्षांत केवळ २५ टक्के एवढेच काम होऊ शकले.

राजकारण्यांना बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले हे संतवचन ज्ञात नाही का ?

     प्राथमिक शिक्षण हे मराठी किंवा कोकणी म्हणजेच मातृभाषेतूनच हवे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले होते. यावर माध्यमप्रश्‍नी नुसत्या तोंडाच्या वाफा नको, तर भाजप नेत्यांकडून कृतीची अपेक्षा आहे, असे मत भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.

शासन जेएन्यूतील एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी ३ लक्ष ५० सहस्र रुपये अनुदान देते !

     देहलीतील जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) वसतीगृहाचे मासिक भाडे केवळ २० रुपये, तर वार्षिक शिक्षण शुल्क २२० रुपये आहे. एका विद्यार्थ्यामागे शासन प्रत्येक वर्षी ३ लक्ष ५० सहस्र रुपये अनुदान देते. एवढे पैसे वाया घालवून आम्ही निकृष्ट मानसिकता असणारी (कन्हैया कुमार सारखी) भावी पिढी निर्माण करत आहोत.- कॅप्टन एस्.बी. त्यागी न्यायालयाला हिंदु धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ? इस्लाम, ख्रिस्ती इत्यादींविषयी ते बोलत का नाही ?

     शनिशिंगणापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च २०१६ या दिवशी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशात ज्या ठिकाणी पुरूषांना प्रवेश मिळतो, त्या ठिकाणी महिलांनाही प्रवेश मिळायला हवा, असे म्हटले.

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !


सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थपर्वातील अध्यात्मप्रसाराच्या कार्यास स्थानिक नागरिक, हिंदुत्ववादी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     उज्जैन येथील सिंहस्थपर्व पूर्वसिद्धतेसाठी ५ - ६ साधक गेले २ मास (महिने) सतत सेवारत आहेत. फ्लेक्स प्रदर्शन लावणे; सात्त्विक वस्तूंचे वितरण; मेळाक्षेत्रात जागा उपलब्ध करून घेणे आणि त्यावर तंबू उभारण्याचे नियोजन अन् त्यांसाठी साहित्याची जमवाजमव; सिंहस्थ कार्यालयाच्या विविध अनुमती, उदा. भिंत रंगवण्याची, फ्लेक्स लावण्याची अनुमती मिळवणे; जिज्ञासू, हिंदुत्ववादी किंवा धर्माभिमानी यांच्याशी संपर्क करणेे इत्यादी सेवा चालू आहेत. या सेवा करतांना ईश्‍वरच हे कार्य करत आहे, याची अनुभूती साधकांना येत आहे. श्री गुरुकृपेने प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते, स्थानिक व्यापारी आणि नागरिक यांच्याकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद अन् प्रसारकार्याला होत असलेले साहाय्य येथे देत आहोत.
१. सिंहस्थपर्व मेळा कार्यालय आणि उज्जैन नगरपालिका यांच्याकडून मिळत असलेले सहकार्य
१ अ. उज्जैन नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी कार्तिक मेळ्यात प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देणे : उज्जैन येथे शासनाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिक मासात (डिसेंबर २०१५ मध्ये) क्षिप्रा नदीच्या काठी कार्तिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यासाठी जागा उपलब्ध करण्यापासून अनेक गोष्टींमध्ये शासनाकडून अनुमती घ्यावी लागते. अनेक मोठेे व्यापारी एक-दीड मास (महिने) आधी पैसे देऊन जागा आरक्षित करतात. आम्हाला मेळ्याविषयी कळले, तेव्हा तो आरंभ होण्यास थोडेच दिवस होते. आम्ही प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य सांगितल्यावर त्यांनी लगेच वरिष्ठांशी बोलून आम्हाला अनुमती दिली. नगर पालिका स्वतः लावत असलेल्या प्रदर्शनाच्या जवळ त्यांनी ही जागा दिली. त्यासमवेत आसंदी-पटल, वीज इत्यादी सर्व विनामूल्य उपलब्ध करून दिले. शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेने कार्तिक मेळ्यामध्ये अध्यात्माचे ज्ञान देणारे अत्यंत सुंदर प्रदर्शन लावून प्रशासनाला सहकार्य केले, यासाठी संस्थेचे आभार व्यक्त केले.

घरातील सर्वांवर साधनेचे संस्कार करणार्‍या, प्रेमळ आणि सेवेची तळमळ असलेल्या श्रीमती सुधा नामदेव लोंढे (वय ७५ वर्षे) !

श्रीमती सुधा लोंढे
      संगममाहुली, सातारा येथे रहाणार्‍या श्रीमती सुधा नामदेव लोंढे यांची १०.४.२०१६ या दिवशी पंच्याहत्तरी आहे. त्यानिमित्त त्यांच्या दोन नाती आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. प्रेमभाव
१ अ. साधकाला काहीतरी खायला दिल्याविना न पाठवणे : आजीमध्येे पहिल्यापासूनच पुष्कळ प्रेमभाव आहे. घरी आलेल्या प्रत्येक साधकाला काहीतरी खायला दिल्याविना ती पाठवत नाही. साधक हे घरातीलच आहेत, असा तिचा भाव असतो. ती साधकांना स्वतःच घरातील खाऊचा डबा दाखवून ठेवते आणि त्यातील खाऊ घेण्यास सांगते.
१ आ. स्वतःच्या दुखण्याकडे लक्ष न देता इतरांचा विचार करणे : तिला पायदुखीचा तीव्र त्रास आहे. आम्ही तिचे पाय चेपून देऊ लागलो की, ती आम्हाला थांबवून आमची कामे करण्यास सांगते. प्रत्येक मासाला (महिन्याला) ती सर्व नातेवाइकांना स्वतःहून संपर्क करून त्यांची विचारपूस करते.

संतांप्रती भाव आणि साधकांप्रती प्रेमभाव असलेलेे उज्जैन नगरपालिकेचे सभापती श्री. सोनू गेहलोत !

     श्री. सोनू गेहलोत यांच्याशी सनातनच्या एका हितचिंतकांच्या माध्यमातून परिचय झाला. त्यांना कार्तिक मेळ्याच्या उद्घाटनासाठीही निमंत्रित केले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे कार्य जाणून ते प्रभावित झाले होते. पुढे सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी त्यांची भेट व्हावी; म्हणून त्यांची वेळ मागण्यासाठी साधक गेले होते. तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले, संतांनी आम्हाला भेटायला यायला नको. आम्ही संतांना भेटायला येतो. एकदा सेवेसाठी त्यांना भेटायला साधक त्यांच्या घरी गेले असता कार्यालयीन साहाय्यकाने त्यांच्या घराच्या बाहेर भेटीसाठी असलेल्या जागी साधकांना बसवले. श्री. सोनूजी घरी आले असता त्यांनी लगेच सर्व साधकांना घरात बोलावले आणि त्यांच्या कन्येला सांगून सर्वांना चहा दिला. - श्री. निषाद देशमुख

उज्जैन येथे सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करणे या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद !

     उज्जैन येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत. उज्जैनमध्ये आतापर्यंत शासकीय माधव महाविद्यालय, चामुण्डामाता मंदिर, महाकाल मंदिर, स्नान मार्ग या ठिकाणच्या भिंतींवर साधकांनी धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहिली आहे. महामार्ग, पुलावरचे रस्ते अशा अन्य ठिकाणच्या भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहिण्याची सेवा चालू आहे. त्या वेळी साधकांना समाजातून मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहोत.
उज्जैन येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि रंगवण्यात आलेल्या भिंती
१. तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगून भिंतीवर आध्यात्मिक 
माहिती लिहिणार्‍या साधकांना फळविक्रेत्याने केळी अर्पणात देणे
     साधक दिवसा भिंत रंगवतांना एक फळवाला तिकडून चालला होता. त्याने साधकांशी संभाषण केले. साधकांनी त्यांना कार्य सांगून सेवा म्हणून भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहीत आहोत, असे सांगितल्यावर फळवाल्याने तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगितले आणि रंगकाम करणार्‍या साधकांना खायला केळी अर्पण दिली. (धर्मकार्यात खारीचा वाटा उचलणारे असे धर्माभिमानी हीच खरी सनातन धर्माची आणि भारताची शक्ती आहे. - संपादक)
२. साधक लिहित असलेल्या लिखाणाविषयी एका व्यक्तीने दर्शवलेली जिज्ञासा !
     माधव महाविद्यालय येथील भिंतीवर साधक अक्षरांत रंग भरत होते. तीनपैकी दीड वाक्यात रंग भरले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याला ६.३.२०१६ या दिवसापासून आरंभ झाल्याच्या संदर्भात कु. नंदिता वर्मा यांना जाणवलेली सूत्रे, श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान आणि आलेल्या अनुभूती

प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष करण्यापूर्वी जाणवलेली 
सूत्रे, श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान आणि आलेल्या अनुभूती 
कु. नंदिता वर्मा
 १. जाणवलेली सूत्रे
अ. सर्व देवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असल्याचे सूक्ष्मातून दिसले.
आ. या प्रसंगी देवतांनी शंखनाद केल्यानंतर त्यातून ॐचा सूक्ष्म-नाद मला सूक्ष्मातून ऐकू आला. नंतर ॐचा सूक्ष्म-नाद संपूर्ण ब्रह्मांडात पसरला.
२. श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान
अ. महर्षींनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या नावामागे श्री लावणे (परात्पर गुरु श्रीजयंत बाळाजी आठवले असे नाव लिहिण्यास सांगणे), हे त्यांना यश-कीर्ती-समृद्धी भरभरून प्राप्त होणार आहे, याचे प्रतीक आहे.

पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत आम्ही रहाणार, असे महर्षींनी प्रथमच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले की, नाडी तिचे मूळ स्थान सोडून कुठेही जात नाही. आमच्या घराण्यातील इतक्या वर्षांच्या परंपरेमध्ये नाडी स्थान सोडून कुठेही गेलेली नाही.
१. पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत आम्ही रहाणार, असे महर्षींनी प्रथमच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगणे, याचे दर्शक म्हणून त्यांनी प्रत्यक्ष सप्तर्षींचा प्राण असणारी नाडी जवळ ठेवण्यास देणे आणि असे नाडीच्या इतिहासात प्रथमच होणे
    पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, नाडी कुठेही गेली, तर ती केवळ महर्षींच्या आज्ञेने नाडीवाचकाबरोबरच जाते. इतर कुणा नवख्या माणसाकडे नाडी कधीही जात नाही; परंतु येथे मात्र प्रथमच असे झाले आहे की, महर्षींनी मला सांगितले, आम्ही परम गुरुजींकडून आलेल्या या कार्तिकपुत्रीबरोबर (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याबरोबर) आता रहाणार; म्हणून मी या २ - ३ नाड्या तुमच्याजवळ ठेवण्यासाठी देत आहे.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
२. काही काळाने महर्षि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी नाड्यांद्वारे 
बोलू लागतील, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगणे
     काही काळाने महर्षि या नाड्यांद्वारे कार्तिकपुत्रीशी बोलू लागतील. त्यांचे विचार तिला कळू लागतील. (खरंच, बर्‍याच वेळा असे होते की, नाडीत पुढे लिहून येणारे विचार आधीच माझ्या मनात येतात. - सौ. गाडगीळ) तसेच नाड्यांतील चैतन्यही तिच्या शरिरातील ७२,००० (बहात्तर सहस्र) नाड्यांमध्ये महर्षि प्रवाहित करतील, असे सांगून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी २ - ३ नाड्या आमच्याजवळ ठेवण्यास दिल्या.
३. सप्तर्षीं जीवनाडीच्या जवळ सतत तुपाचा दिवा तेवत ठेवणे
     आम्ही कुठेही गेलो, तरी ज्या ठिकाणी रहातो, त्या ठिकाणी या नाड्यांजवळ तुपाचा दिवा सतत तेवत ठेवतो;

प.पू. डॉक्टरांना आता सर्वत्र प्रसिद्धी मिळण्यास प्रारंभ होणार !, याविषयी महर्षींनी दिलेले देवलोकातील संवादाचे एक उदाहरण

परात्पर गुरु डॉ. आठवले
महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६५मध्ये देवलोकात प.पू. डॉक्टरांविषयी 
शिव आणि पार्वती यांच्यात सुरू असलेल्या संवादाविषयी सांगणे
     देवलोकात पार्वती शिवाला विचारते - हे देवा, या पृथ्वीवर अनेक सिद्ध, संत आणि महात्मे आहेत. या सर्वांना सोडून तुम्ही परम गुरुजींविषयी इतके बोलण्याचे, लिहिण्याचे कारण काय ? यावर शिव पार्वतीला सांगतात - हे देवी, इतर सर्व महान असले, तरी सध्या ते पृथ्वीवर सर्वत्र त्यांच्याच नावाचे अवडंबर माजवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु परम गुरुजी एकमेव असे आहेत की, ज्यांचे असे नाही. त्यांना स्वतःच्या नावापेक्षा देवाचे नाव सर्वत्र व्हायला हवे, असे वाटते आणि म्हणूनच आम्हालाही वाटते की, आता परम गुरुजींचे नाव सर्वत्र व्हावे. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (११.३.२०१६, सायं. ६.२३)
जयघोषाची कु. रजनी कुर्‍हे यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

कु. रजनी कुर्‍हे
१. सगळ्यांना आनंदवार्ता मिळणार असल्याचे श्रीकृष्णाने सांगणे आणि दुपारी कार्यक्रम असल्याचे कळल्यावर आनंदवार्तेची पूर्वसूचना मिळाली, असे वाटणे : ६.३.२०१६ या दिवशी खोलीतील श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसले. श्रीकृष्णाला याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, आज पुष्कळ महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्यांना आनंदवार्ता मिळणार आहे. नंतर मी हा विचार विसरून गेले. त्या दिवशी दुपारी कार्यक्रम असल्याचे कळले, तेव्हा या आनंदवार्तेची पूर्वसूचना मिळाली, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.
२. सूक्ष्म-परीक्षण
२ अ. दुपारी २.२० ते ३ या 
कालावधीत केलेले सूक्ष्म-परीक्षण
२ अ १. सर्व देवता पुष्पवृष्टीसाठी उभ्या असणे : ब्रह्मांडात सर्व देवता पुष्पवृष्टीसाठी उभ्या असलेल्या दिसल्या. आजपासून प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला प्रारंभ होणार असल्याने सर्व देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणार असल्याचे जाणवले.

भावी पिढीमध्ये सुसंस्काराचे बीज पेरणार्‍या सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत या ग्रंथाचे समाजात मोठ्या प्रमाणात वितरण होण्यासाठी प्रयत्न करा !

     सनातन संस्थेच्या बालसंस्कार ग्रंथमालिकेत लवकरच बालकांमध्ये सात्त्विक अक्षरे रेखाटण्याच्या माध्यमातून सुसंस्काराचे बीजरोपण करणारा सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. उन्हाळी सुटीनंतर शाळा चालू होईपर्यंत हा ग्रंथ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या ग्रंथाची वैशिष्ट्ये आणि या ग्रंथांच्या प्रसारासाठी करावयाचे प्रयत्न येथे दिले आहेत. 

१. ग्रंथाची वैशिष्ट्ये
१ अ. अक्षरयोगाची अनुभूती देणार्‍या सात्त्विक अक्षरांची पद्धती शिकवणारा ग्रंथ : लिखाण करतांना त्यातील अक्षरे सात्त्विक असल्यास त्याचा लिहिणार्‍या आणि वाचणार्‍या दोघांनाही लाभ होतो. अक्षरांत सात्त्विकता येण्यासाठी ते सुंदर दिसण्यासह त्यात देवतेचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमताही असणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करून सनातनच्या साधकांनी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोगांद्वारे शोधून काढलेली आणि अक्षरयोगाची अनुभूती देणारी सात्त्विक अक्षरे काढण्याची पद्धती शिकवणारा, हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषासंदर्भात साधकांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

       ६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले. काहींना पूर्वसूचना मिळाल्या. काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. - संकलक

अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवरील सनातन पंचांगांच्या ५ लक्ष डाऊनलोड्सचा टप्पा पूर्ण !

टीप १ - १ डिसेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

विविध औषधी गुणधर्मांनी युक्त अशा सनातन 
दंतमंजनामुळे होणारे लाभ लक्षात घ्या आणि दातांचे 
आरोग्य राखण्यासाठी ते वापरण्यास आजपासूनच आरंभ करा !
        आतापर्यंत सनातन संस्थेने विविध नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्यातीलच एक उत्पादन म्हणजे सनातन दंतमंजन !
१. दंतमंजनाचे महत्त्व
       हिरड्यांना सूज आणि रक्तस्राव यांपासून वाचवणारे, मुखाची दुर्गंधी रोखणारे, तसेच अरुची (तोंडाची चव जाणे) नष्ट करणारे सनातन दंतमंजन वापरल्याने आतापर्यंत अनेक वाचक, हितचिंतक, तसेच साधक यांना विविध लाभ झाले आहेत.

कल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

 • श्रीरामनवमीच्या दिवशी (१५ एप्रिल २०१६) श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती मिळावी !
 • महाराष्ट्रात लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी !
 • कर्नाटक शासनाने अर्थसंकल्पात केवळ अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचा विरोध व्हावा यांसाठी
॥ राष्ट्रीय हिंदू आंदोलन ॥
रविवार, १० एप्रिल २०१६, सायं. ५ वाजता
स्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कोळसेवाडी रिक्शा स्टँडजवळ, गणपती मंदिरासमोर, कल्याण (पूर्व).
संपर्क : ८१०८६०३१३१ / ९८२१६६६१५०
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
        मागील चार मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

रामनाथी आश्रमात रुग्ण साधकांना तैलमर्दन (तेलाने मालिश) करू इच्छिणारे सक्षम स्त्री-पुरुष साधक हवेत !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये 'पंचकर्म चिकित्सा विभागा'त रुग्ण साधकांना तैलमर्दन करण्यासाठी स्त्री-पुरुष साधकांची आवश्यकता आहे. या अंतर्गत प्रतिदिन १ - २ घंट्यांच्या अंतराने थोडा वेळ विश्रांती घेऊन दिवसभरात ७ - ८ घंटे सेवा उपलब्ध आहे. तैलमर्दनाचा अनुभव नसणार्‍या साधकांना 'ही सेवा कशी करावी ?', तेही शिकवण्यात येईल. जे सक्षम साधक पूर्णवेळ किंवा न्यूनतम १ मास (महिना) आश्रमात राहून ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना ८४५१००६०८१ या भ्रमणभाषवर संपर्क करावा.

पदप्रतिष्ठेच्या छोट्या स्वार्थासाठी 'हिंदु राष्ट्र-स्थापने'च्या मोठ्या ध्येयाचा विसर पडणारे हिंदुत्ववादी !

धर्मप्रेमी हिंदू वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून एकत्र येतात. एखादी संघटना मोठी होऊ लागली की, त्या संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा जागृत होतात आणि संघटनेत पदे, मानसन्मान, अधिकार या सूत्रांवरून गट-तट निर्माण होतात. काही वेळा ही पदे, मानसन्मान, अधिकार यांचा त्या सदस्यांनाही व्यक्तीगत स्तरावर काही लाभ होणार नसतो; पण केवळ अहंपोटी त्याला चिकटून राहिल्याने अपेक्षित कार्यही होत नाही अथवा संघटनेत फूट पडण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होते. वस्तूतः प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे सर्वोच्च ध्येय 'भारताला हिंदु राष्ट्र बनवणे' हेच असते; पण केवळ अहंकारापोटी निर्माण झालेल्या पदे, मानसन्मान, अधिकार आदी विचारांमुळे त्यांना सर्वोच्च ध्येयाचाही विसर पडतो. हिंदुत्ववाद्यांचे विशाल संघटन उभे करायचे असेल, तर प्रथम हिंदुत्ववाद्यांना अशा छोट्या-छोट्या स्वार्थांचा त्याग करावे लागेल. हा त्याग प्रत्येक हिंदुत्ववाद्याने केला, तर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास विलंब लागणार नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : 'लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील', यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.

'गुरु मिळाले' असे म्हणू नये. 'गुरु दिले गेले', असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)
निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. 'देवाने आपल्याला निवडावे', याऐवजी 'मतदारांनी आपल्याला निवडावे', अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून जनतेची कल्पनातीत सेवा होऊ शकेल. देवावर श्रद्धा नसणारे पुजारी आणि महंत हिंदु धर्माला लांछनास्पद आहेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

भारतीय शासनाची सहनशीलता !

संपादकीय 
     अपमान, अपमान आणि अपमान ! भारतीय शासनाचीच जर पाककडून वारंवार होणार्‍या भारताच्या अपमानाविषयीची सहनशीलता संपत नाही, तर भारतीय जनतातरी काय करणार ? पठाणकोट आक्रमणाच्या अन्वेषणासाठी भारतात आलेले पाकचे शिष्टमंडळ अलीकडेच माघारी गेले. त्यांनी भारतीय भूमीत असतांना कोणत्या वर्तनाचा देखावा केला आणि पाकमध्ये परतल्यावर कोणत्या पद्धतीने अन्वेषणाचा अहवाल सिद्ध केला, हे सर्वांनाच ठाऊक आहे. हे पथक जेव्हा भारतीय प्रदेशात आले,
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn