Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज मत्स्य जयंती


कोटी कोटी प्रणाम !

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. पद्माकर होनप यांचा आज वाढदिवस !


तृप्ती देसाई यांच्यासह अनेक महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेतले

हिंदूंच्या धर्मश्रद्धेचा झालेला हा अवमान विसरू नका !
हा पुरोगाम्यांच्या अधोगतीकडे जाणार्‍या वाटचालीचा विजय !
      शनिशिंगणापूर - गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक श्री शनिदेवाच्या चौथर्‍याखालून करावा, असा श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाचा प्रस्ताव श्री शनिशिंगणापूर ग्रामस्थांनी ७ एप्रिल या दिवशी अमान्य केला होता. देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलत गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजेच ८ एप्रिल या दिवशी तालुक्यातील ३०० हून अधिक युवकांनी रूढीपरंपरेनुसार श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला. सदर युवकांनी गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी कावडीने आणून चौथर्‍यावर जाऊनच अभिषेक केला.
     ग्रामस्थांनी श्री शनिदेवाला चौथर्‍यावर चढून जलाभिषेक केल्यानंतर, तसेच शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी चौथर्‍यावर सर्वांना प्रवेश देण्याचे घोषित केले. त्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, भूमाता महिला संघटनेच्या प्रियांका जगताप, पुष्पक केवाडकर यांच्यासह अनेक महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेतले. (पुरोगाम्यांची वेगाने अधोगतीकडे घौडदौड ! संपादक) यासह अनेक पुरुषांनीही श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेतले.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यास सर्वांनाच अनुमतीश्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा निर्णय
     शनिशिंगणापूर - येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर सर्वांनाच प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर पुरुष आणि महिला यांना दर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे आणि इतर सर्व विश्‍वस्त यांनी एकमताने हा निर्णय घेतला. गुढीपाडव्यानिमित्त ग्रामस्थानी चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला. त्यानंतर विश्‍वस्तांनी हा निर्णय घोषित केला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, या निर्णयामुळे स्त्री-पुरुष समानता येईल. (स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये देवाने कोणत्याही स्तरावर समानता निर्माण केलेली नसतांना अशी विधाने हास्यास्पद ठरतात ! - संपादक)
विश्‍वस्तांच्या निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थांकडून पोलिसांकडे तक्रार
     श्री शनिशिंगणापूर - जलाभिषेकाची परंपरा जोपासणार्‍या ग्रामस्थांच्या कृतीनंतर शनिशिंगणापूर विश्‍वस्तांनी चौथर्‍यावर सर्वांना प्रवेश असल्याची भूमिका मांडली. या निर्णयाने श्रद्धाळू ग्रामस्थ दुखावल्याने त्यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये विश्‍वस्तांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. विश्‍वस्तांनी ग्रामस्थांच्या भावना विचारात न घेता हा निर्णय घेतला आहे.

देवस्थानचा विरोध डावलून युवकांनी केला गंगाजलाभिषेक !

धर्मपरंपरा जपणार्‍या श्री शनिशिंगणापूर युवकांचे अभिनंदन !
      शनिशिंगणापूर - श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांचा विरोध डावलत गुढीपाडव्याच्या दिवशी ३०० हून अधिक युवकांनी रूढीपरंपरेनुसार श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला.
१. गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक करण्याची परंपरा ४०० वर्षांपासून चालू आहे.
२. ८ एप्रिल या दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावातून युवकांनी कावडीने गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी आणले. सकाळी ११ ते १२ या वेळेत श्री शनिदेवाला हा गंगाजलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री शनिदेवाची प्रथेप्रमाणे होणारी आरती झाली.
३. श्री शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी सांगितले की, गुढीपाडव्याची ही परंपरा प्राचीन आहे. आम्ही परंपरा पाळली असून येथे कोणतीही चुकीची कृती केलेली नाही. त्यामुळे कोणीही विरोध करण्याचा प्रश्‍न येत नाही.

शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी घाईघाईत घेतलेला निर्णय दुर्दैवी ! - हिंदु जनजागृती समिती

प्राचीन परंपरा मोडून शनिदेवाच्या चौथर्‍यावर सर्वांना प्रवेश देण्याचे प्रकरण !
     मुंबई - शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून तसेच तेथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी न चढण्याची शेकडो वर्षांची प्राचीन धर्मपरंपरा आहे. २०११ या वर्षापासून देवस्थानच्या विश्‍वस्तांनी चौथर्‍यावर चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी स्त्री-पुरुषांना चौथर्‍यावर चढण्यास बंदी घातली होती. असे असले, तरी प्रतिवर्षी एक दिवस कावड यात्रेच्या गंगाजलाने शनैश्‍वराला अभिषेक करून यात्रेचा समारोप करण्याची परंपरा तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाप्रमाणे आजची नसून शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे ही वर्षातील एक दिवसाची प्राचीन परंपरा चालू ठेवून चौथर्‍यावर सर्वांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्‍वस्तांनी घेणे अपेक्षित असतांना भूमाता ब्रिगेडसारख्या नव्या धर्मद्रोही परंपरा निर्माण करू पहाणार्‍यांच्या भयाने मंदिराची प्राचीन परंपरा मोडण्याचा निर्णय घेणे, हा अत्यंत घाईघाईत घेतला गेलेला दुर्दैवी निर्णय आहे, असे म्हणत हिंदु जनजागृती समितीने या निर्णयाविषयी खेद व्यक्त केला आहे.
समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, १. उच्च न्यायालयात या संदर्भातील निकालाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल झालेली असतांना इतक्या घाईने निर्णय घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती.
२. हिंदु मंदिरांच्या धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यास शासन आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे, हे या घटनेतून सिद्ध होते.
३. शासनाने आज कावड यात्रेच्या संदर्भात प्राचीन परंपरांचे रक्षण करणे अपेक्षित होते.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

काश्मीरमध्ये धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करून पोलिसांच्या कह्यातील आतंकवाद्याचे शव कह्यात घेतले !

धर्मांधांपासून शवाचे रक्षण न करू शकणारे पोलीस आतंकवाद्यांच्या 
आक्रमणापासून जनतेचे रक्षण कधीतरी करू शकतील का ?
      नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाने ७ एप्रिल या दिवशी २ आतंकवाद्यांना ठार मारले होते. त्यानंतर धर्मांधांच्या जमावाने पोलिसांवर आक्रमण करून या आतंकवाद्यांचे शव कह्यात घेतले, तसेच पोलिसांची गाडी पेटवून दिली.
     या आतंकवाद्यांपैकी वसीम मल्ला मागील वर्षी पोलिसांची नोकरी सोडून हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला होता. (एन्आयटीमध्ये राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या काश्मिरी पोलिसांपैकी काहींनी ते पाकिस्तानी असल्याचे सांगत आम्ही तुम्हाला भारत झिंदाबाद म्हणू देणार नाही, असे म्हटले होते. असे पोलीस आतंकवादी होत असल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक)
     त्याच काश्मीर पोलिसांतील तो मागील वर्षी ६ एप्रिलला अमशीपुरा येथे ३ पोलिसांना ठार मारण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. नसीर पंडित हा मागील वर्षी २७ मार्चला पीडीपीचे मंत्री अल्ताफ बुखारी यांच्या घरातून २ एके-४७ बंदुका घेऊन फरार झाला होता. या दोघांना शोपियाँच्या वेहिल या गावात पोलिसांनी ठार केले. त्यानंतर वसीमचे शव पोलीस घेऊन जात असतांना जमावाने पोलिसांवर आक्रमण करून शव कह्यात घेतले. त्याच्या दफनाला सहस्रावधी नागरिक उपस्थित होते.

श्रीनगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर देशद्रोह्यांनी पुन्हा फडकवले पाक आणि इसिस यांचे झेंडे !

पाकचे झेंडे फडकवणार्‍यांना एवढ्या मासांत रोखू न 
शकणारे राज्यकर्ते आतंकवाद्यांना कसे रोखणार ?
      श्रीनगर - येथील जामिया मशिदीजवळ शुक्रवारच्या नमाजानंतर देशद्रोह्यांनी पाक आणि इसिस यांचे झेंडे फडकवले. गेल्या अनेक मासांपासून देशद्रोह्यांकडून ही कृती केली जात आहे; मात्र ते कायमस्वरूपी रोखण्यात भाजप-पीडीपी शासन अपयशी ठरले आहे. या वेळी देशद्रोही आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जण घायाळ झाले. देशद्रोह्यांनी या वेळी पोलिसांवर दगडफेक केली. त्यावर पोलिसांनी लाठीमार केला.

www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !


श्रीरामनवमीला श्रीरामजन्मभूमीवर पूजेसाठी हिंदूंना विशेष अनुमती द्या ! - समस्त हिंदूंची मागणी

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अभय वर्तक
पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांद्वारे ४८ सहस्र २४० स्वाक्षर्‍यांचे निवेदन सादर
      मुंबई - भगवान श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशातील अयोध्या हे प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे सर्वदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अहलाबाद उच्च न्यायालयानेही ऐतिहासिक निवाडा देतांना सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा धुडकावून लावत सदर स्थळ रामजन्मभूमी आहे, त्या जागी श्रीरामलल्ला विराजमान आहेत. श्रीराम मंदिर तोडून विवादास्पद वास्तू उभारण्यात आली आहे, असे स्पष्टपणे सांगितले. असे असतांना दुर्दैवाने श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार नाकारला जात आहे. तरी केंद्रशासनाने विशेषाधिकार वापरून १५ एप्रिल २०१६ या श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामजन्मस्थळी पूजा करण्याची अनुमती हिंदूंना द्यावी, अशी मागणी ४८ सहस्र २४० सह्यांच्या माध्यमांतून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन सहस्रावधी स्वाक्षरांची सूचीसह पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना देण्यात आले.

धर्मपरंपरा मोडणार्‍या धर्मद्रोही महिलांना रोखणार ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या 
रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ ! 
श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर
(उजवीकडून पहिल्या), पू. (कु.) स्वाती खाडये (उजवीकडून पाचव्या) आणि अन्य मान्यवर
     कोल्हापूर - केवळ ईश्‍वरी कृपेने आतापर्यंत आम्ही भूमाता ब्रिगेडला शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्‍वर येथे पराजित करू शकलो. आता कोल्हापूरच्या भूमीत आपल्याला भूमाताच्या ब्रिगेड आणि अवनी या दोन संघटनांना पराजित करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. आम्ही धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी आई महालक्ष्मीच्या मंदिरातील गर्भगृहात आधुनिकतावादी महिलांना प्रवेश मिळू देणार नाही, ही घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. १३ एप्रिलला तृप्ती देसाई कोल्हापूरच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी येणार आहेत. धर्मविरोधी महिला जर ५ सहस्र संख्येने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू, असे म्हणत असतील, तर ५० सहस्रच्या संख्येने उभे राहून त्यांना गर्भगृहाच्या बाहेरच रोखण्यासाठी आम्ही महिला भाविकांचे कडे उभारणार आहोत. धर्मपरंपरा मोडणार्‍या धर्मद्रोही महिलांना रणरागिणी आता रोखणार आहेत, अशी चेतावणी रणरागिणी शाखेच्या राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी दिली.
     गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने खरे मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

म्यानमारच्या माजी राष्ट्रपतींनी घेतला बौद्ध संन्यास ?

     रंंगून (म्यानमार) - म्यानमारमध्ये सत्तापरिवर्तन होऊन नॅशनल लीग फॉर डेमॉक्रेसी या पक्षाचे नेते हतिन क्याव लोकशाही पद्धतीने म्यानमारचे राष्ट्रपती बनले. त्यानंतर म्यानमारचे माजी राष्ट्रपती जनरल थेन सेन यांनी बौद्ध संन्यास स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. (कुठे वयापरत्वे चालणे-बोलणे शक्य नसतांनाही शेवटपर्यंत पदाला चिकटून रहाणारे भारतातील राजकारणी, तर कुठे संन्यास घेणारे म्यानमारचे माजी राष्ट्रपती थेन सेन ! - संपादक) म्यानमारच्या सूचना मंत्रालयाने फेसबूकवर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये सेन यांनी विधीवत् संन्यास घेतल्याचे म्हटले आहे. सेन यांनी मुंडन करून भगवे वस्त्र धारण केल्याचे छायाचित्रही या पोस्टवर उपलब्ध आहे.

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांनी पाकमध्ये जावे ! - इंद्रेश कुमार

    नवी देहली - देशविरोधी घोषणा देत आहेत, त्यांना पाकिस्तानविषयी प्रेम आहे. देश सोडण्याचे वक्तव्य करत आहेत, त्यांनी पाकिस्तानला निघून जावे; कारण त्यांना भारताविषयी राग असून पाकविषयी प्रेम आहे. असदुद्दीन ओवेसी यांना हिंदीत भारतमाता की जय म्हणणे चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी पारसी भाषेत मादरे वतन हिंदुस्तान म्हणावे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपूजा दिनोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार !

आंध्र शासनाने दिला शासकीय आदेश
  • गोरक्षा आणि गोपूजा यांसाठी प्रोत्साहन देण्यात येणार ! 
  • ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊन्डेशनने केली होती मागणी
    भाग्यनगर (हैद्राबाद) - श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपूजा दिनोत्सव म्हणून साजरी करण्यात यावी, असा आदेश आंध्रप्रदेश शासनाने नुकताच दिला. ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन या संघटनेचे डॉ. गझल श्रीनिवास आणि डॉ. प्रकाशराव वेलागापुडी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मागील वर्षी नोव्हेंबर मासात आंध्रप्रदेशचे धर्मादाय प्रकरणांचे मंत्री श्री. माणिक्यला राव यांची भेट घेऊन त्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोपूजा दिनोत्सव म्हणून जाहीर करा, या आशयाचे निवेदन सादर केले होते.
१. श्रीकृष्ण आणि गाय यांचे अतूट नाते होते. श्रीकृष्णाला गोविंद म्हणजेच गायींचे समाधान करणारा आणि गोपाल म्हणजे गायींचे रक्षण करणारा म्हणून ओळखले जाते. गायीची महती वेद, पुराणापासून, तर महात्मा गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी सांगितली आहे. त्यामुळे येत्या श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून वरील निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे शासनाला करण्यात आली होती.

पतिव्रता असणार्‍या आणि प्रतिकूल परिस्थितीतही विठ्ठलाच्या अनुसंधानात रहाणार्‍या नागपूर येथील श्रीमती ताराबाई शिरसाठ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती ताराबाई शिरसाठ (डावीकडे) यांचा
सत्कार करतांना सौ. नंदा खंडागळे
नागपूर - येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सनातनच्या साधिका सौ. नंदा खंडागळे यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई शिरसाठ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ४ एप्रिल या दिवशी सौ. नम्रता शास्त्री यांनी घोषित केले. त्या वेळी आजींचे कुटुंबीय, सनातनचे साधक उपस्थित होते. त्या सर्वांचीच पुष्कळ भावजागृती झाली. सौ. नंदा खंडागळे यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
या वेळी सौ. नम्रता शास्त्री म्हणाल्या, यजमान रागावले किंवा त्यांनी मारले, तरीही पती हाच परमेश्‍वर मानून शिरसाटआजींनी त्यांचे सर्व ऐकले. आयुष्यभर तीव्र प्रारब्धावर विठ्ठलभक्ती करत मात केली.
कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
१. आईच्या सत्काराचा क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. देवच आम्हाकडून या महान आईची सेवा करून घेत आहे, असे आजींचा मोठा मुलगा श्री. शिवाजी शिरसाठ, सून सौ. लक्ष्मी शिरसाठ आणि नातू श्री. अनिकेत शिरसाठ यांनी सांगितले.
२. आम्हालाही आता आध्यात्मिक पातळी, सेवा, नामजप यांचे महत्त्व कळले. आम्हीही सेवा करण्याचा प्रयत्न करू, असे आजींचा मधला मुलगा श्री. मदन शिरसाठ यांनी सांगितले.
३. जीवनात कितीही संकटे आली, तरी सासूबाई कधीही डगमगल्या नाहीत. घरी जेवणासाठी येणार्‍यांचे त्या यथायोग्य स्वागत करायच्या. त्यांची देवावर पुष्कळ श्रद्धा आहे., असे आजींचे जावई श्री. नरेश खंडागळे यांनी सांगितले.


उज्जैन सिंहस्थपर्वाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या प्रदर्शनस्थळी गुढीपूजन !

      उज्जैन - सनातनकडून सिंहस्थ पर्वामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या ठिकाणी साधूसंतांच्या वंदनीय उपस्थितीत गुढीपूजनाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
संतांनी दिलेले आशीर्वचन
१. श्रीलक्ष्मण चैतन्यजी महाराज : या कुंभमेळ्यात आपल्याला साधूसंतानी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करायची आहे, तसेच शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायचा आहे.
२. श्रीजितेंद्रानंदजी महाराज : आपण महाकालेश्‍वराच्या चरणांशी आलो आहोत. आपण समाजाला जागृत करण्याचे कष्ट घ्यायचे आणि श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कर्मफळाची अपेक्षा ठेवायची नाही.
३. श्रीराजेश्‍वरानंदजी महाराज : रुढीपरंपराचे पालन करणे समाजाला शिकवण्यासाठी आवश्यकच आहे; पण त्याबरोबरच साधकाने व्यक्तीगत साधनेचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. आपल्यातील रामतत्त्व जागृत केल्यानेच खर्‍या अर्थाने गुढीपाडवा साजरा होईल.

संतांना गंगा नदीत फेका, असे म्हणणार्‍यांना संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत ! - मनोज खाडये

बसुर्ते, जिल्हा बेळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा
बेळगाव, ८ एप्रिल - देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्यापेक्षा संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या, अशी कृतघ्नपणाची भाषा करणार्‍या बिहारमधील पप्पू यादव या खासदाराला या देशातील संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत, अशा शब्दांत संतद्वेष्ट्या खासदारांना श्री. मनोज खाडये यांनी खडसवले. १३ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन बसुर्ते येथील धर्माभिमानी युवकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. अलका पाटील याही उपस्थित होत्या.
बसुर्ते या गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे दायित्व घेऊन केवळ ४ दिवसांत प्रसार करून ४०० हून अधिक धर्माभिमानी नागरिकांना एकत्रित केले. सभेची सर्व व्यवस्था याच युवकांनी पुढाकार घेऊन केली. सनातन संस्थेच्या सौ. अलका पाटील यांचा सत्कार बसुर्ते ग्रामपंचायत सदस्या सौ. शीतल सुर्वे यांनी, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार

मूठभर पुरोगामी महिलांऐवजी लक्षावधी श्रद्धाळू महिलांच्या धार्मिक भावनांचा कधी विचार केला जाणार ? - कु. प्रतिक्षा कोरगावकर

       कोल्हापूर - नियम मोडणार्‍या, अट्टाहासाने श्रद्धेचे भंजन करणार्‍या भूमाता ब्रिगेड, अवनी संघटना अथवा तत्सम संघटना, महिला यांची संख्या अतिशय अल्प आहे. याउलट देवावर श्रद्धा असणार्‍या, धर्मपरंपरा जपणार्‍या भाविकांची संख्या लक्षावधी आहे. मूठभर पुरोगामी महिलांऐवजी लक्षावधी श्रद्धाळू महिलांच्या धार्मिक भावनांचा कधी विचार केला जाणार, असा प्रश्‍न रणरागिणी शाखेच्या राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखच्या वतीने धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर धर्मपरंपरा रक्षण चळवळीस शुभारंभ करण्यात आला. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद कोल्हापूर येथील हिंदू एकताच्या कार्यालयात ७ एप्रिल या दिवशी पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे, तसेच सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये या उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेत झालेली काही प्रश्‍नोत्तरे
१. कोल्हापूर जिल्हातील विविध महिला संघटनांनी १५ एप्रिलला ५ सहस्र महिला श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करणार आहेत. या संदर्भात तुमची भूमिका काय ?
कु. प्रतिक्षा कोरगावकर - आम्ही धर्मपरंपरा जपली गेली पाहिजेत, या विचारांचे आहोत. त्यामुळे आम्हाला या गोष्टीला सनदशीर मार्गाने विरोध करू. मुळात मंदिरात प्रवेश नाही, अशी अत्यंत संभ्रम निर्माण करणारी भूमिका मांडली गेली.

मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद हा काँग्रेसचा ढोंगीपणा ! - भाजप

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे खरे स्वरूप ! याविषयी आघाडीच्या नेत्यांना काय म्हणायचे आहे ?
श्री शनिशिंगणापूर येथील महिला प्रवेशाचे प्रकरण
     नगर, ८ एप्रिल - राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना मंदिरामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश देण्याविषयीचे सूत्र कधी पुढे आले नाही; परंतु शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे शासन सत्तेत येताच अशी सूत्रे उकरून काढण्यात येतात. त्यामुळे सध्या चालू असलेला महिलांच्या मंदिरप्रवेशाचा वाद हा काँग्रेसचा ढोंगीपणा आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे केली. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार दिलीप गांधी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

भाविक महिलांना भाडोत्री म्हणणार्‍या दृष्ट प्रवृत्तींचा निषेध ! - श्रीपूजक मंडळ

      कोल्हापूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून केवळ प्रसिद्धीसाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आंदोलन करण्यासाठी आलेल्या एका संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना काही मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांनी मंदिराच्या परंपरा मोडण्यापासून परावृत्त केले. या भाविक महिलांना श्रीपूजकांच्या भाडोत्री गुंड म्हणणार्‍या प्रवृत्तीचा श्रीपूजक मंडळ तीव्र निषेध करत आहे. हा केवळ त्या भाविक महिलांचाच नाही, तर करवीर निवासिनीच्या समस्त भाविकांचा अपमान आहे, असे श्रीपूजक मंडळ मानते, असे प्रसिद्धीपत्रक श्री करवीर निवासीनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये जिहाद्यांवर टीका करणार्‍या विद्यार्थ्याची अल्लाहु अकबरच्या घोषणा देत हत्या

बांगलादेशमधील असहिष्णुता !
     ढाका (बांगलादेश) - जिहाद्यांवर टीका करणारा नझीमुद्दीन समद या २८ वर्षीय विद्यार्थ्याची जुन्या ढाक्यामधील सूत्रपूर भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी अल्लाहु अकबरच्या घोषणा देत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. समद याच्यावर प्रथम वार करून नंतर तो ठार झाल्याची खात्री करण्यासाठी आतंकवाद्यांनी त्याच्यावर गोळीबारही केला. समद जगन्नाथ विद्यापिठात कायद्याचे शिक्षण घेत होता. विद्यापिठामधील वर्ग संपल्यानंतर तो त्याच्या मित्रासमवेत घरी जात असतांना त्यास आतंकवाद्यांनी लक्ष्य केले. मूळचा सिल्हेट येथील रहिवासी असलेला समद येथील बंगबंधू जातीय जुबो परिषदेचा माहिती आणि संशोधन विभागाचा सचिव होता. जिहाद्यांचा टीकाकार असलेल्या समद याने धर्मनिरपेक्षतेच्या विचाराचा प्रसार करण्याकरता फेसबूकचा आधार घेतला होता. आक्रमण होण्याच्या एकच दिवस आधी त्याने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून धर्मनिरपेक्ष विचारवंत, ब्लॉगर्स आणि हिंदू यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते मुस्लिम खान टेकेदार यांनी नरोत्तम सिंह बाघेल या हिंदूला मारहाण करून त्यांच्या तोंडावर लघवी केली !

दादरी प्रकरणी आकांडतांडव करणारे पुरोगामी आणि समाजवादी या घटनेवर मात्र तोंड उघडणार 
नाहीत; कारण तसे करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात कृती करणे, असेच त्यांना वाटते ! 
समाजवादी पक्षाचे नेते मुस्लिम खान टेकेदार यांचे क्रौर्य !
     आग्रा - उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे आग्रा शहराध्यक्ष मुस्लिम खान टेकेदार यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह ५ एप्रिलच्या रात्री नरोत्तम सिंह बाघेल या गरीब व्यक्तीला मारहाण करून त्यांच्या तोंडावर लघवी केली. शहरातील एतमादपूर येथे ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी बाघेल यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून टेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
१. पीडित नरोत्तम सिंह बाघेल म्हणाले, मी मार्गाने जात होतो. त्या वेळी मुस्लिम खान टेकेदार यांचे वडील हाजी पुन्नी यांना मी जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी मला शिवीगाळ केली, तसेच टेकेदार अन् अन्य लोकांना बोलावून मला मारहाण केली. याशिवाय मुस्लिम खान, अस्लम, मुवीन आणि अन्य लोकांनी माझ्या तोंडावर लघवी केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कागदपत्रे गहाळ !

विधानसभेत विरोधकांचा शासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने हाणून पाडला !
    मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) मालेगाव बॉम्बस्फोटातील कागदपत्रे न्यायालयातून गहाळ झाल्याचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी शासनाला विधानसभेत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातूनच कागदपत्रे गहाळ होत असतील, तर न्याय कोणाकडून मिळणार, असा प्रश्‍न काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभेत विचारला; मात्र सत्ताधारी पक्षाने विरोधकांचा हा डाव हाणून पाडला.

श्रीरामनवमीला रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती देण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीची एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी या नावाने स्वाक्षरी मोहीम !

नालासोपारा येथे रेल्वे स्थानकाच्या बाहेर मेगाफोनद्वारे घोषणा करून स्वाक्षरी मोहीम राबवतांना हिंदुत्ववादी
मुंबईत केवळ ५ दिवसांत ५४ सहस्र १८६ नागरिकांकडून निवेदनावर स्वाक्षर्‍या !
मुंबई - श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग (अलाहाबाद) उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि इथे श्रीराम मंदिर होते, असा निर्णय देऊन श्रीरामजन्मभूमीवर शिक्कामोर्तब केले आहे. ज्या स्थळासाठी श्रीरामभक्त करसेवकांनी रक्त सांडले, ते स्थळ न्यायालयाकडून श्रीरामजन्मभूमी आहे, हे स्पष्ट होऊनही तेथील मुख्य स्थानावर हिंदूंना पूजा करण्यास कोणतीही अनुमती नाही. यामुळे श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती द्यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतात स्वाक्षरी मोहीम चालू करण्यात आली असून येत्या ८ दिवसांत विविध ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबई शहरात केवळ ५ दिवसांत ५४ सहस्र १८६ नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून सहभाग घेतला.

कल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • श्रीरामनवमीच्या दिवशी (१५ एप्रिल २०१६) श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती मिळावी !
  • महाराष्ट्रात लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी !
  • कर्नाटक शासनाने अर्थसंकल्पात केवळ अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचा विरोध व्हावा यांसाठी
॥ राष्ट्रीय हिंदू आंदोलन ॥
रविवार, १० एप्रिल २०१६, सायं. ५ वाजता
स्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कोळसेवाडी रिक्शा स्टँडजवळ, गणपती मंदिरासमोर, कल्याण (पूर्व).
संपर्क : ८१०८६०३१३१ / ९८२१६६६१५०
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

मध्यप्रदेशात पाण्याच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी व्यक्तींची नियुक्ती !

     तिकमगड (मध्यप्रदेश) - शहरात मागील ३ वर्षांपासून पाण्याची भीषण समस्या असून येथे ४ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्यावरून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहेत. त्याचबरोबर तिकमगड जिल्ह्याला उत्तरप्रदेशची सीमा लागून असल्यामुळे त्या राज्यातील काही शेतकरीही शेतीसाठी मध्यप्रदेशच्या जामनी नदीतील पाणी पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जामनी नदीच्या सुरक्षेसाठी १० शस्त्रधारी व्यक्तींची नियुक्ती केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष लक्ष्मी गिरी यांनी दिली आहे.देहली महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून मंदिर आणि गुरुद्वारा यांच्या बाहेर असणार्‍या पाणपोईवर कारवाई !

देहली महानगरपालिकेने अशी कारवाई कधी अन्य धर्मियांच्या 
अवैध धार्मिक स्थळांवर केली आहे का ?    
    देहली - भाजपच्या कह्यात असलेल्या देहली महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने येथील चांदणी चौकातील गौरी शंकर मंदिर आणि शीशगंज गुरुद्वार यांच्या बाहेर असलेल्या पाणपोईवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करत ती तोडून टाकली. या कारवाईला अनेक हिंदू आणि शीख नेते, तसेच स्थानिक नागरिक यांनी विरोध करत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. चांदणी चौकाच्या पुनर्उभारणीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याविषयी माजी नगरसेवक सुमन गुप्ता म्हणाल्या की, शासनाने धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यापेक्षा प्रथम चांदणी चौकातील शेकडो दुकानासमोर असलेली अवैध अतिक्रमणे हटवावीत.
हिंदूंच्या विरोधामुले हनुमान मंदिरावरील कारवाई टळली 
     या कारवाईनंतर अतिक्रमण पथकाकडून कटारा धूलिया येथील हनुमान मंदिर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु स्थानिक नेते आणि हिंदू यांनी या पथकाला ते मंदिरापर्यंत पोहचण्यापूर्वीच अडवून त्यांना घेराव घातला. पथकाला पुढे जाण्यास रोखण्यात आले. घेराव घालणार्‍या हिंदूंनी येथे हनुमान चालिसाचे पठण चालू केले. त्यामुळे पथकाला कारवाई न करताच परतावे लागले.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी मिळतो केवळ ५ ते ६ मिनिटांचा वेळ !

     नवी देहली - खटल्यांची वाढती संख्या, न्यायाधिशांची कमतरता आणि निकालाला लागणारा वर्षानुवर्षांचा विलंब, या आव्हानांचा भारतीय न्यायव्यवस्था आज सामना करत आहे. न्यायव्यवस्थेच्या या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर, बेंंगळुरूस्थित दक्षा या स्वंयसेवी संस्थेने न्यायाधिशांवरील कामकाजाच्या दबावाचा अभ्यास केला. जानेवारी २०१५ पासून देशातील २१ उच्च न्यायालयातील १९ लाख खटल्यांचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढला. या निष्कर्षाद्वारे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१. उच्च न्यायालयातील न्यायाधिशाला एका खटल्याच्या सुनावणीसाठी सरासरी ५ मिनिटांपेक्षा अल्प वेळ देता येतो. काही न्यायाधिशांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी १५ ते १६ मिनिटे इतका वेळ देता येतो. 
२. कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधिशासमोर एका दिवसात १६३ प्रकरणे सुनावणीसाठी असली, तर त्याला प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी २ मिनिटांचा वेळ मिळतो.

तरुण हिंदू संघटनेकडून नवाटांड (झारखंड) येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन

अशी मागणी करावी लागायला हा भारत आहे कि पाक ? हिंदूंवर अन्याय करणार्‍या धर्मांधांना 
वठणीवर आणण्यासाठी शासन काय करणार आहे ? हिंदूंनो, तुमच्या धर्मबांधवांवरील 
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा !
धर्मांधांपासून आमचे रक्षण करा ! - नवाटांड येथील ग्रामस्थांची भाजपकडे कळकळीची मागणी
     नवाटांड (झारखंड) - धर्मांधांपासून आमचे रक्षण करा, अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांकडे येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात केली. येथील तरुण हिंदू या हिंदुत्ववादी संघटनेने या मेळाव्याचे नुुकतेच आयोजन केलेे होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिंह, गिरीडीह लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामप्रसाद महंतो, तसेच भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यकर्ते अन् पदाधिकारी उपस्थित होते.

शंभूराजांच्या समाधीच्या साक्षीने युवकांचा धर्मरक्षणाचा संकल्प !

वढू (जि. पुणे), ८ एप्रिल (वार्ता.) - देव, देश आणि धर्म यांच्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजणारे संभाजी महाराज खर्‍या अर्थाने धर्मवीर ! स्वधर्मावर निष्ठा असणार्‍या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी देहाला अतोनात कष्ट होऊनही धर्मपरिवर्तनाचा पर्याय स्वीकारला नाही आणि मरण पत्करले. फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानदिनानिमित्त वढू येथे सहस्रो शंभूभक्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात. यंदाच्या वर्षीही ७ एप्रिल या दिवशी वढू येथे जमलेल्या शंभूभक्तांनी महाराजांचा आदर्श ठेवत धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, प.पू. बालयोगी सदानंद महाराज, भाजपचे आमदार श्री. बाबूराव पाचर्णे, ह.भ.प. मुकुंद महाराज जाटदेवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. मंगलदास बांदल, मंचर येथील छाया पडवळ, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. सोमनाथ भंडारे, धर्माभिमानी श्री. कुणाल साठे, श्री. अभिजीत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि शोभायात्रांमध्ये सहभाग

     गुढीपाडवा या हिंदु नववर्षारंभानिमित्त सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राज्यात विविध ठिकाणी नववर्ष शोभायात्रा काढल्या, तर काही ठिकाणी शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला. हिंदु राष्ट्राची संकल्पगुढी उभारण्याचा निर्धार या शोभायात्रांच्या निमित्ताने करण्यात आला. या वेळी नववर्ष पाश्‍चात्त्यांप्रमाणे १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचे महत्त्व बिंबवण्यात आले, तर हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगणार्‍या घोषणा देण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी सामूहिक गुढीपूजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. याविषयी सविस्तर वृत्तांत आणि छायाचित्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.

फलक प्रसिद्धीकरता

शत्रूराष्ट्राचे झेंडे फडकवणार्‍यांना रोखू न शकणारे राज्यकर्ते आतंकवाद्यांना कसे रोखणार ?
     श्रीनगर येथील जामिया मशिदीजवळ शुक्रवारच्या नमाजानंतर देशद्रोह्यांनी पुन्हा एकदा पाक आणि इसिस यांचे झेंडे फडकवले. या वेळी झालेल्या चकमकीत ४ जण घायाळ झाले. या देशद्रोह्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Srinagarme Shukrawarki namaazke paschat deshdrohiyone Pak evam ISISke jhande ek bar phir fahraye. - Ham aur kitne din Pak samarthakoki andekhi karenge?
जागो ! : श्रीनगर में शुक्रवार की नमाज के पश्‍चात देशद्रोहियों ने पाक एवं इसिस के झंडे एक बार फिर फहराए. - हम और कितने दिन पाक समर्थकों की अनदेखी करेंगे ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीवर कारवाई होण्याची शक्यता

     मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अल्पसंख्यांकमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी संकेत दिले आहेत. वक्फ बोर्डाच्या राज्यातील सुमारे ८० टक्के भूमी अवैधपणे लीज आणि मालकी हक्काने हस्तांतरित करण्यात आली असून ती कह्यात घेण्यासाठी विधिमंडळात कायदा करण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. यापुढे वक्फ बोर्डाच्या भूमीच्या हस्तांतरणास बंदी घालण्यात येत असून अवैधपणे भूमी हस्तांतरणात माजी मंत्री तारिक अन्वर, राजेंद्र शिंगणे आदींचा समावेश असल्याची माहिती खडसे यांनी दिली. अँटिलिया ही इमारत वक्फ बोर्डाच्या भूमीवर उभी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या कायद्यामुळे या इमारतीवर कारवाई होऊ शकते. 
     अल्पसंख्यांक विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या कालावधीत झालेल्या चर्चेच्या वेळी वक्फ बोर्डाची भूमी अवैधपणे विकल्याचे किंवा हस्तांतरित केल्याचे सूत्र उपस्थित झाले होते. राज्यात सुमारे एक लाख एकर वक्फ बोर्डाची भूमी असून त्यापैकी ८० टक्के भूमी अवैधपणे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यावर इमारती आणि शासकीय कार्यालयेही आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक आंधळकर यांना अटक

हत्येच्या प्रकरणात माजी पोलीस निरीक्षकाला अटक होते, यावरून पोलीस दलाची काय अवस्था 
असेल, याचा विचारच करवत नाही ! असे पोलीस जनतेला कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ?
     पिंपरी (पुणे), ८ एप्रिल - तळेगाव-दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ६ एप्रिल या दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केली. केंद्रीय अन्वेषण विभागाने भाऊसाहेब आंदळकर यांना ७ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १६ एप्रिलपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची कोठडी सुनावली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव-दाभाडे येथे १३ जानेवारी २०१० या दिवशी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. आंधळकर यांनी काहींशी संगनमत करून खुनाच्या पुराव्यांमध्ये कुभांड रचले, तसेच अफरातफर केली. शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकरी यांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असा आरोप आंधळकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
     सदर हत्येच्या काही मास आधी सतीश शेट्टी यांनी लोणावळ्याजवळील एक भूखंड खरेदीचे प्रकरण उघड केले होते. या भागातील मोठमोठे भूखंड खोट्या पद्धतीने खरेदी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत प्रविष्ट केली होती. त्यानंतर शेट्टी यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्या तक्रारीनंतर अवघ्या ४ मासांतच त्यांची निर्घृण हत्या झाली होती.

मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणे अत्यावश्यक ! - सौ. शालिनी सुरेश, श्री बालाजी धर्मजागृती समिती

     एळमक्करा (एर्नाकुलम्, केरळ) - मुलांना बालपणापासूनच चांगल्या सवयी लावणे पालकांचे दायित्व आहे. मुले ही राष्ट्राची भावी पिढी आहे, हे लक्षात घेऊन मुलांना वाढवले पाहिजे. मुले आई-वडिलांकडे बघून शिकतात आणि त्यानुसार आचरण करतात; म्हणून आई-वडिलांचे वागणे योग्यच हवे, असे प्रतिपादन श्री बालाजी धर्मजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी येथील तानिक्कल या ठिकाणी आई या विषयावरील आयोजित एका कार्यक्रमात केले.

आयसीटीईच्या शिष्यवृत्ती योजनेत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना २ ऐवजी १० जागा मिळणार !

अन्य राज्यांतील महाविद्यालयात शिक्षण घेणारे काश्मीरमधील विद्यार्थी भारतविरोधी कृती 
करत असतांना त्यांच्या संख्येत वाढ करणारे प्रशासन त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे कधी देणार ?
देहलीच्या जेएन्यूमध्ये देशविरोधी घोषणा देणारे काश्मिरी विद्यार्थी होते, हे प्रशासन विसरले का ?
     नवी देहली - ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (आयसीटीईने) त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना २ ऐवजी १० विद्यार्थ्यांना जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
   आयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, सध्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात किंवा इन्स्टिट्यूटमध्ये २ जागा देण्यात येतात. इंटर मिनिस्ट्रियल कमिटीच्या अनुमतीने या वर्षी एका इन्स्टिट्यूटमध्ये जम्मू-काश्मीरमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. घरापासून दूर असलेल्या या महाविद्यालयांमध्ये काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांना एकटे वाटू नये, तसेच आजारी असतांना किंवा घरी जातांना त्यांना आधार वाटावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये शिष्यवृत्ती योजनेला अल्प प्रतिसाद आहे.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीची छायाचित्रे

९ एप्रिल २०१६ या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन आहे. त्यानिमित्ताने...
     भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे प्रभु दत्तात्रेयांचे चौथे अवतार होय. त्यांनी अक्कलकोट, सोलापूर येथे बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.
भक्तांना भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभयदान 
देणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ !
माघ कृष्ण पक्ष १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात ३०० वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीरा भोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुर्‍हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला आणि श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कोलकाता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास १२ वर्षे राहिले. मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गे अक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके १८०० पर्यंत होते. दत्त संप्रदायात श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले आणि दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत; म्हणजे दत्तावतार होय.

देशाच्या अस्मितेसाठी सवलत कशाला ?

     नुकतेच मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एम्आयएम्) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माझ्या गळ्यावर सुरी जरी ठेवली, तरी भारत माता की जय म्हणणार नाही, अशी वल्गना केली. त्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या आणि हिंदुबहुल देशात भारत माता की जय ही घोषणा देऊ नका या आणि अन्य प्रकारचे फतवेही काढले गेले. असे अपप्रकार यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. एकीकडे असहिष्णुतेच्या नावावर टाहो फोडायचा आणि देशद्रोही विधाने करून देशात अस्थिर वातावरण करायचे. देशभक्ती सिद्ध करण्यास ही घोषणा देण्याची आवश्यकता नाही आणि संविधानात असे कुठे अंतर्भूत नाही, असे म्हणत धर्मांधांचा वेगवेगळा खटाटोप चालू आहे. यामुळे देशद्रोहाचा एक नमुना समोर ठेवत देशाच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे.

गोवा राज्याचा मार्च २०१६ या मासाचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा

आधुनिक वैद्य
मनोज सोलंकी
१. धर्माभिमान्यांचा धर्मप्रसारात उत्स्फूर्त सहभाग 
१ अ. गावातील युवकांनी मेळाव्याची पूर्वसिद्धता करणे : २८.२.२०१६ या दिवशी श्री ब्राह्मणेश्‍वर देवस्थान (पिळगाव, डिचोली) येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानिमित्त घराघरांत प्रसार करण्यासाठी श्री. आनंद धाटकर, श्री. हरि कवळेकर आणि श्री. सिद्धेश धाटकर यांनी साहाय्य केले. एका धर्माभिमान्याने सनातनची सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी उपस्थितांना उद्युक्त केले. मेळाव्याची पूर्वसिद्धताही गावातील युवकांनीच केली.
१ आ. करमळे (केरी) येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी त्यांच्या वाडीतील लोकांसाठी महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आयोजित केले.

आतंकवादग्रस्त भारतासमोरील नवीन आव्हाने

     ऊठसूट आतंकवादी आक्रमणे करणार्‍या पाकच्या कारवायांनी भारत त्रस्त आहे. २६/११ चे मुंबईवरील आक्रमण असो वा पठाणकोट येथे झालेले आक्रमण असो, पाकिस्तान नेहमीच भारताला आतंकवादाच्या छायेत ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ही आतंकवादी आक्रमणे मोडून काढणे हे भारतासाठी आतापर्यंत एक आव्हानच ठरले आहे. पाकच्या या कारवायांना अन्य देशांच्या दृष्टीस आणण्यासाठी भारतीय अन्वेषण यंत्रणा जिवाचे रान करून पुरावे गोळा करतात; पण पाक त्याला उडवाउडवीची उत्तरे देतो. नुकत्याच घडलेल्या पठाणकोट आक्रमणातील घटनांवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वर्ष २०१२ मध्ये मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या (कि भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट व्हावेत; म्हणून लावलेल्या ?) आगीचा परिणाम

     वर्ष २०१२ मध्ये मुंबईतील मंत्रालयात एक भीषण आग लागली. मंत्रालयात जळलेल्या गोष्टीचा आढावा घेत आहोत. सुमारे ६० हजार धारिका (फाईल्स) जळून खाक झाल्या आहेत. तीन-चार धारिका मात्र चमत्कारिकरित्या वाचल्या. - श्री. धनंजय साळगांवकर (संदर्भ : मासिक धनुर्धारी, मार्च २०१६)

सुशिक्षित बेरोजगारांची सेना निर्माण करणारी सध्याची शिक्षणपद्धती !

     शिक्षण सम्राटांनी त्यांच्या धंदेवाईक शिक्षण संस्थांमधून कुचकामी शिक्षण देऊन समाजाच्या हाती ज्ञानाऐवजी निरर्थक पदव्यांची भंडारे दिली आहेत. अशिक्षित बेरोजगारांच्या जागी आता सुशिक्षित बेरोजगारांची सेना आम्ही सिद्ध केली. - श्री. अभय भंडारी, विटा, सांगली 
(साप्ताहिक वज्रधारी, वर्ष ७ वे, अंक २५, २५ जुलै ते ३१ जुलै २०१३)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

हे एकच मागणे श्रीगुरुमाऊलीला, आनंद अन् शांती मिळो सार्‍या जिवांना !

       
श्रीमती घोडकेआजी
मी पंचकर्म चिकित्सेसंबंधी उपचारांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या लोटे - घाणेकुंट, खेड, रत्नागिरी येथील परशुराम रुग्णालयात गेले होते. उपचारांनंतर निघतांना तेथील वैद्यांनी माझ्याकडे अभिप्राय मागितला. तेव्हा देवाच्या कृपेने पुढील काव्य सुचले. त्यांनाही ते आवडले आणि त्यांनी या लिखाणाची आपापल्या भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढून घेतली. ते काव्य आज देवाच्या चरणी अर्पण करते.
सार्‍या जिवांची काळजी ईश्‍वराला ।
ते सुदृढ आणि सक्षम होण्याची तळमळ प.पू. श्रीगुरुदेवांना ॥
नियोजन करूनी स्थान निवडले भगवान श्रीपरशुरामनगरीचे ।
आहे तेथे अस्तित्व भगवान श्रीपरशुरामाचे भरभरून ॥ १ ॥

शांत, सहनशील वृत्तीची आणि सेवाभाव असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. देवांशी महेश घिसे (वय २ वर्षे) !

चि. देवांशी घिसे
         चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (८.४.२०१६) या दिवशी चि. देवांशी महेश घिसे हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची आई आणि मावशी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. खिडकीवर बसलेले फुलपाखरू पाहून आपल्या पोटी सात्त्विक जीव जन्माला येईल, असे वाटणे : देवांशीच्या वेळी गर्भधारणा होणे, ही देवाने दिलेली एक मोठी अनुभूती होती. शारीरिक अडचणी असूनही देवाने योग्य असे वैद्य सुचवून त्यांच्या माध्यमातून योग्य विचार दिले. वैद्य अतिशय सात्त्विक होते. त्यांच्याकडे गेल्यावर सत्संग मिळाल्यासारखे वाटायचे. गर्भधारणा झाल्यावर मी एक फुलपाखरू खिडकीवर बसलेले पाहिले. मी खिडकीवर बसलेले फुलपाखरू प्रथमच पहात होते. त्याच्याकडे पाहून मला आपल्या पोटी सात्त्विक जीव जन्माला येईल, असे वाटले. मी देवाला प्रार्थना केली. त्यानंतर ते उडून गेले. या वेळी माझ्याकडून देवा, या बाळाच्या माध्यमातून माझी साधना करवून घे, अशी सारखी प्रार्थना होत होती.

इतरांचा विचार करून सेवा करणारी आणि सहसाधिकांना आधार देणारी कु. प्राजक्ता धोतमल !

कु. प्राजक्ता धोतमल
१. प्रेमभाव
        प्राजक्ता रुग्णाईत साधकांना वेळेवर जेवण नेऊन देते.
२. इतरांचा विचार करणे
        प्राजक्ता नेहमी इतरांचा विचार करून प्रेमाने सेवा करते. तिच्याकडून कधीही इतरांचे मन दुखावले जात असेल, असे वाटत नाही.
३. स्वीकारण्याची वृत्ती
        माझ्यातील विसराळूपणा या दोषामुळे अनेक वेळा मी तिला काही सेवा किंवा निरोप ऐन वेळी सांगत असे; पण ती कधीही मला आता जमणार नाही, असे म्हणाली नाही.

महर्षींनी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोलूर या गावातील मूकांबिकादेवीच्या दर्शनासाठी जाण्यास सांगितल्यावर आलेल्या अनुभूती आणि मूकांबिकादेवीचे दर्शन घेण्यातील लक्षात आलेला ईश्‍वराचा कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव 
मूकांबिकादेवी
 १. स्थानमहात्म्य कळले की, पूजाविधी करतांना आपोआपच तो भावपूर्ण केला जाणे; परंतु विज्ञानवादी मात्र पुराणकथांना नावे ठेवत असणे; कारण या कथा ऐकण्याची अनुभूती त्यांनी प्रत्यक्षात घेतलेली नसणे : प्रत्येक ठिकाणचे एक स्थानमहात्म्य असते. ते लक्षात घेतले असता तेथे पूजा करतांनाही विधीमध्ये प्राण ओतला जातो आणि पूजाविधी आपोआपच भावपूर्ण होतात; म्हणूनच पुराणांत देवादिकांच्या ज्या कथा सांगितल्या आहेत, त्या श्रवण करण्याचे हेच फळ आहे.
        आता मात्र विज्ञानवादी पौराणिक कथांना भाकड कथा किंवा काल्पनिक कथा असे संबोधतात. त्यांना हे ठाऊक नसते की, या कथांतूनच श्रद्धाळू घडतो आणि त्याला देवाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो.

उन्हाळ्यात घाम आणि पावसाळ्यात पाणी यांमुळे होणारे त्वचाविकार, त्यांमागील कारणे आणि उपाय

श्री. गिरिधर भार्गव वझे
१. त्वचेला एक प्रकारची बुरशी आल्याने होणारे त्वचाविकार : उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक जणांना किंवा स्थूल शरीरयष्टी आणि उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींना अन्य वेळीही खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचा काचणे (सोलली जाणे) आदी शारीरिक त्रास संभवतात. पावसाळ्यात दोन बोटांमधील त्वचेचा पाण्याशी अधिक वेळ संपर्क आला, तरीही वरील त्वचाविकार होतात. अशा प्रसंगी विविध मलमाच्या महागड्या ट्यूब्स वापरल्या जातात. तरी बुरशी येण्याच्या मूळ अडचणीवर उपाय न योजल्याने काही दिवसांच्या अंतराने वरील त्रास वारंवार संभवतात.
२. त्वचेला बुरशी येण्याचे कारण : त्वचेचे घर्षण होत असलेल्या ठिकाणच्या (उदा. काखेतील) त्वचेवर घाम वा पाणी जास्त वेळ राहिल्याने तेथे एक प्रकारची बुरशी (फंगल इन्फेक्शन्स) येते.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

अ‍ॅल्युमिनीयम आणि हिंडालियम यांच्या 
भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने होणारे 
दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यायी भांड्यांचा वापर करा !
       बरेच जण स्वयंपाक करण्यासाठी अ‍ॅल्युमिनीयम अथवा हिंडालियम (अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेला एक मिश्रधातू) यांपासून बनवलेली भांडी वापरतात. या भांड्यात अन्न शिजवणे शरिरासाठी अपायकारक असते. ५ वर्षे अथवा त्याहून अधिक कालावधीसाठी ही भांडी वापरली, तर त्याचा शरिरावर होणारा दुष्परिणाम दिसून येतो. या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.
१. दोन्ही धातू शरिरासाठी 
अपायकारक असण्याची कारणे
१ अ. अन्नाद्वारे धातूंचा अंश शरिरात जाऊन विविध आजार बळावणे : अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यांवर स्टीलचा साधा चमचा जरी जोरात ओढला, तरी या धातूचे कण बाहेर पडतात. या भांड्यांत बनवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. प्रतिदिन अन्नातून साधारणतः ५ मिलिग्रॅमएवढे अ‍ॅल्युमिनीयम सेवन केले जाते.

सभेनंतरच्या बैठकीत आत्मप्रौढी करणारी सूत्रे सांगणार्‍या एका संघटनेच्या जिल्हाप्रमुखांमुळे विषय भरकटत असल्याचे लक्षात येऊनही बघ्याची भूमिका घेणारे उपस्थित कार्यकर्ते !

१. पूर्वानुमती न घेता व्यासपिठावर गेलेल्या जिल्हाप्रमुखांना उत्तरदायी कार्यकर्त्यांनी न अडवणे : काही दिवसांपूर्वी एका शहरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. सभा संपल्यानंतर आढावाबैठक चालू असतांना एका हिंदुत्ववादी संघटनेच्या जिल्हाप्रमुखांना एक स्थानिक हितचिंतक व्यासपिठावर घेऊन गेले. या प्रसंगात व्यासपिठाकडे अपेक्षित अशी सुरक्षाव्यवस्था नव्हती, असे लक्षात आले.
       व्यासपिठावर गेलेल्या जिल्हाप्रमुखांना तत्परतेने बाजूला घेऊन जाण्यासाठी संबंधित उत्तरदायी कार्यकर्त्यांकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १७ सहस्र ७५६ वाचकांचे शेष नूतनीकरण १५.४.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

 साधकांसाठी सूचना
     नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही.

अध्यात्मप्रसारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाकरता चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन या कार्यात हातभार लावा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेले महान कार्य !
      मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी नाडीवाचनातून सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा २३ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम, संशोधन केंद्रे यांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत.
२. अध्यात्मप्रसारासाठी केला जाणारा हा दैवी प्रवास निर्विघ्नपणे 
पार पडण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीची तातडीने आवश्यकता !
     पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत २,७५,००० कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. दूरदूरच्या ठिकाणी होणार्‍या सततच्या प्रवासामुळे दौर्‍यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनाला सध्या तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याच्या दुरुस्तीमध्ये बराच वेळ जात आहे.
     दौर्‍याच्या माध्यमातून होणारे हे कार्य निर्विघ्नपणे चालू रहाण्यासाठी महिंद्रा आस्थापनाच्या स्कॉर्पिओे या गाडीची तातडीने आवश्यकता आहे. दौर्‍याच्या कालावधीत भेट दिलेल्या विविध ठिकाणचे अनमोल क्षण टिपता यावेत, यासाठी तेथील चित्रीकरण (शूटिंग) आणि छायाचित्रीकरण (फोटोग्राफी) करण्यात येते. त्यासाठीचे आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी या गाडीत पुरेशी जागा उपलब्ध असून ती प्रवासासाठीही सोयीस्कर आहे. या गाडीची अंदाजे किंमत ११,५०,००० रुपये एवढी आहे.
     जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी स्कॉर्पिओ गाडी विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात अथवा सुस्थितीत असलेली गाडी अर्पण करू शकतात, त्यांनी ९४०४९५६००३ या क्रमांकावर आपली माहिती कळवावी, ही विनंती !

कर्णावती, गुजरात येथील अक्षरान्यासाकडून शिष्यवृत्तीसाठी सनातनचे साधक श्री. अमोल देशमुख यांची निवड

श्री. अमोल देशमुख
        कर्णावती (अहमदाबाद) - कर्णावती येथील अक्षरा न्यासाच्या वतीने प्रतिवर्षी भारतातील प्राचीन देवळे आणि त्यांचे स्थापत्य या विषयावर संशोधन करण्यासाठी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी भारतातून दोन जणांना शिष्यवृत्तीच्या रूपात अनुदान देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी यावर्षी नाशिक येथील सनातनचे साधक श्री. अमोल देशमुख यांची निवड झाली आहे. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी देशभरातील स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि तरूण स्थापत्य अभियंते यासाठी प्रयत्न करतात. ही शिष्यवृत्ती मिळाल्यावर मंदिरांच्या स्थापत्याचा अभ्यास करून त्या संदर्भातील अहवाल अक्षरा संस्थेला सादर करायचा असतो. श्री. अमोल यांनी त्यांच्या अभ्यासासाठी नाशिकमधील श्री गोरे राममंदिर निवडले आहे.

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रोहिणी नक्षत्रातील लाभदायी चंद्रदर्शन !

      १४.३.२०१६ या दिवशी सकाळी ८.१९ मिनिटांनी चंद्राचे रोहिणी नक्षत्र आरंभ झाले. रोहिणी नक्षत्रातील चंद्राचा नेपच्यून या ग्रहाशी आणि गुरु या ग्रहाशी केंद्रयोग आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. नेपच्यून हा ग्रह गूढ विषयाचा कारक आहे. गुरु हा ग्रह साधनेसाठी पोषक आहे. साधनारत व्यक्तींनी या योगात चंद्राचे दर्शन घेतल्यास मन स्थिर होण्यास, तसेच साधनेतील अडथळे दूर होण्यास लाभदायक ठरते. २७ दिवसांनी, म्हणजे १०.४.२०१६ या दिवशी पुन्हा असा योग असणार आहे.
- सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०१६)
 ॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

आध्यात्मिक उपायांच्या संदर्भातील काही तात्त्विक सूत्रे

१. उपायांत आलेल्या नामजपाचा विसर पडण्याचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम : उपायांत आलेला नामजप करतांना कधी कधी साधक नामजप करायचे विसरल्यास इतरांनी त्याला नामजपाची आठवण करून द्यावी. नाहीतर साधकाचा त्रास वाढू शकतो. संतांच्या बाबतीत एखादे वेळी त्यांना नामजपाचा विसर पडला, तरी त्यांच्या त्रासात वाढ होत नाही; कारण त्यांचा जप अंतर्मनातून चालूच असतो.
२. उपाय केल्याने त्रास टिकण्याचा अवधी अल्प होणे : त्रासालाही उत्त्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्रास झाला, तरी तो काही काळाने अल्प होणारच आहे. उपाय केल्याने त्रास टिकण्याचा अवधी अल्प होतो. त्रास सोसणे सुसह्य होते.
३. त्रास अल्प होण्यासाठी नामजप, संकल्प आणि काळ यांचे महत्त्व : त्रास अल्प होण्यात नामजप, संतांचा संकल्प आणि काळ या घटकांचे प्रमाण त्रासानुसार वेगवेगळे असते. नामजपाने त्रासाची तीव्रता अल्प होते. जप केला नाही, तर त्रास पुष्कळ वाढू शकतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
     कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ :
जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     घराला आग लागली असता खेळणे देत नाही; म्हणून रडणार्‍या बाळाकडे लक्ष देणे जसे अयोग्य आहे, तसेच राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना विविध मंदिरांत जाण्याचा स्त्रियांना हक्क हवा, यासाठी आंदोलने करणे अयोग्य आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

प्रश्‍नामुळे होणारी हानी !

   लंडन येथील ज्येष्ठ पत्रकार डग्लस मरे जिहादी आक्रमणाविषयी उद्भवणार्‍या स्थितीविषयी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. जिहादी आक्रमणानंतर आपण स्वतःला अनावश्यक प्रश्‍न विचारण्यात मग्न असतो. जिहादच्या सत्यस्थितीला सामोरे न जाता आपण आणखी किती सबब सांगणार आहोत ? असा परखड प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. जिहादी आतंकवादी कसे निर्माण होतात, याविषयी प्रचलीत असलेल्या सर्व संकल्पना त्यांनी खोडून काढल्या आहेत.

श्रीनगरची एन्आयटी !

संपादकीय 
     जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील एन्आयटीमध्ये शिकणार्‍या बिगर काश्मिरी विद्यार्थिनींवर बलात्कार करण्याची धमकी महाविद्यालयाबाहेरील लोकांनी दिली आहे. या महाविद्यालयात जेमतेम ३५ टक्के स्थानिक विद्यार्थी आहेत आणि उर्वरित सर्व इतर राज्यांतून आलेले विद्यार्थी आहेत. स्थानिक विद्यार्थी देहलीतील जेएन्यू विद्यापिठातील देशद्रोही विद्यार्थ्यांना समर्थन देतात, तर बाहेरच्या राज्यांतून आलेले विद्यार्थी देशाविषयी प्रेम आणि आदर दाखवतात. काश्मीरमधील बहुसंख्यांकांच्या देशविषयक आत्मियतेविषयी नेहमीच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn