Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

कानिफनाथ प्रकटदिन

विनम्र अभिवादन !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन

जम्मू-काश्मीर पोलिसांचा देशप्रेमी विद्यार्थ्यांवर लाठीमार !

श्रीनगर येथील एन्आयटीमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याचे प्रकरण
      श्रीनगर - देशद्रोही घोषणा देण्याच्या प्रकरणावरून येथील एन्आयटीमध्ये (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये) स्थानिक काश्मिरी विद्यार्थी आणि बिगरकाश्मिरी देशप्रेमी विद्यार्थी यांच्यातील वाद ४ एप्रिल या दिवशी पुन्हा उफाळून आला. यात पोलिसांनी हस्तक्षेप करत देशप्रेमी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. यात अनेक विद्यार्थी घायाळ झाले आहेत. आम्ही शांततेने आंदोलन करत असतांना पोलिसांनीच आक्रमक होत लाठीमार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. सध्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एन्आयटीच्या आवारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणाची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दखल घेतली असून त्यांचे दोन सदस्यीय पथक श्रीनगरकडे पाठवण्यात आले आहे.
     एन्आयटीमध्ये अनुमाने २ सहस्र विद्यार्थी आहेत. यातील केवळ २५ ते ३० टक्के विद्यार्थी काश्मिरी असून इतर देशांच्या अन्य राज्यांतून आलेले आहेत. टी-२० विश्‍व चषक स्पर्धेत वेस्ट इंडीजकडून भारत पराभूत झाला. या पराभवाचा एन्आयटीच्या आवारात आनंद साजरा करतांना काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकचे झेंडे फडकवले आणि भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे या देशद्रोही कृत्याचा बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला, तसेच भारताचा राष्ट्रध्वज फडकवून प्रत्युत्तर दिले. परिणामी दोन गटांत संघर्ष होऊन हाणामारी झाली होती. तेव्हापासून या दोन गटांत वाद चालू आहे.

इसिसच्या एका संशयित धर्मांध आतंकवाद्याला पुण्यात अटक

  • पकडलेला संशयित दुबईमार्गे सिरियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात
  • पकडलेल्या संशयितावर गृहमंत्रालयाची लुकआऊट नोटीस
  • इसिसने पोखरलेला भारत ! भारतात आतंकवादी संघटनांची पाळेमुळे रुजली जाणे, हे कायदा-सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही ! 
  • इसिस संबंधित आणखी किती आतंकवादी पकडल्यावर शासन फ्रान्सप्रमाणे कृती करणार आहे ?
      पुणे - इसिस (आयएस्आयएस्) या आतंकवादी संघटनेचा संशयित आतंकवादी राऊफ अहमद याला ५ एप्रिल या दिवशी येथील लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. देशभरात आतंकवादी कारवाया करणारे रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, यासीन भटकळ हे कर्नाटकातील भटकळ तालुक्यातील आहेत. राऊफ अहमद हाही मूळचा त्याच तालुक्यातील रहिवासी आहे. (आतंकवाद्यांनी निर्माण केलेली देशातील ही छोटी पाकिस्ताने अन्वेषण यंत्रणांनी कोम्बिंग ऑपरेशन करून नष्ट करावीत ! - संपादक) तो पुण्यातून दुबईमार्गे सिरियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळी गुप्तचर विभाग आणि अन्य अन्वेषण यंत्रणा यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राऊफ अहमदवर केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी लुकआऊट नोटीस बजावली होती. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकही त्याच्या मागावर होते.
     राऊफ हा इंटरनेटवरून इसिसच्या आतंकवाद्यांशी माहिती आदान-प्रदान (चॅटिंग) करत होता. त्यावर अन्वेषण यंत्रणांचे बारीक लक्ष होते. तो इंटरनेटच्या माध्यमातून इसिसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होता.

समुद्रकिनारी असलेल्या वाळूचे कण एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. त्याप्रमाणे हिंदु समाजाची स्थिती आहे.संभाव्य चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी शनिमंदिरात चौथर्‍यावर प्रवेश नाही ! - मुख्यमंत्री

शनैश्‍वर देवस्थान समितीवर कारवाईचा प्रश्‍नच नसल्याची स्पष्टोक्ती
विशेष प्रतिनिधी : श्री. संतोष पाटणे
      मुंबई -  शनि मंदिरात सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश खुला असून चौथर्‍यावर जाण्यास बंदी आहे. तसा ठराव वर्ष २०११ मध्ये देवस्थान समितीने केला आहे. चौथर्‍यावर गर्दी झाल्यास संभाव्य चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी चौथर्‍यावर प्रवेश नाही. त्यामुळे शनैश्‍वर देवस्थान समितीवर कारवाईचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले. या संदर्भातील तारांकित प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार श्रीमती विद्या चव्हाण, हेमंत टकले, आनंद ठाकूर, नरेंद्र पाटील आणि किरण पावसकर यांनी विचारला होता.
     विद्या चव्हाण यांनी या संदर्भातील लेखी प्रश्‍न विचारला की, शबरीमला मंदिरातील प्रवेशाच्या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राज्यघटनेत असा अधिकार दिला नसेल, तर प्रवेश रोखता येणार नाही, असा आदेश ११ जानेवारी २०१६ या दिवशी उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे शनैश्‍वर देवस्थान समितीवर कोणती कारवाई शासन करणार आहे ?
या प्रश्‍नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर देतांना म्हटले आहे की, १. श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर स्त्री आणि पुरुष यांना जाता येणार नाही, असा ठराव विश्‍वस्त मंडळाने ९ फेब्रुवारी २०११ या दिवशी पारीत केला आहे.
२. असा ठराव संमत करण्याचे कारण असे की, भाविक ओल्या वस्त्राने दर्शन घेतांना शनिमूर्तीस दोन्ही हातांनी स्पर्श करून संपूर्ण भार मूर्तीवर टाकतात, तसेच सोबत आणलेले पूजा साहित्य लोखंडी नाल, यंत्र, अंगठी इत्यादी शनिमूर्तीस घासतात.

श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍या दोषींवर कारवाई करा ! - आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • आदेश निर्गमित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदार गोगावले यांना आश्‍वासन ! 
  • शिवसेनेच्या आमदारांचे विधानभवनात आंदोलन !
डावीकडून शिवसेनेचे आमदार सर्वश्री उल्हास पाटील, सदानंद चव्हाण, तुकाराम काते, 
भरतशेठ गोगावले, राजेश क्षीरसागर, रूपेश म्हात्रे, अमित घोडा आणि प्रकाश आबिटकर
      मुंबई - सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून अंदाजे शेकडो कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लूट केलेली आहे; म्हणूनच आघाडी शासनावर देवीचा कोप होऊन शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे महाड येथील आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना केला. त्याचबरोबर या विषयाची लक्षवेधी मांडल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे आमदार सर्वश्री उल्हास पाटील, सदानंद चव्हाण, तुकाराम काते, राजेश क्षीरसागर, रूपेश म्हात्रे, अमित घोडा आणि प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी गृहनिर्माण आणि कामगार मंत्री श्री. प्रकाश मेहता यांनी भेट दिली.
     या प्रकरणी सहा वर्षे झाली, तरी गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी रखडवून ठेवण्यात आलेली आहे. कोणावरही कारवाई झालेली नाही. या घोटाळ्याचे अहवालच दडपले जात आहेत.

महालक्ष्मी मंदिर प्रवेशप्रश्‍नी बैठकीनंतर निर्णय घेऊ ! - जिल्हाधिकारी

     कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरप्रवेशाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला दिलेल्या निर्देशाची माहिती घेऊन दोन दिवसांत या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ यांच्याशी बैठक घेऊ. त्यानंतर मंदिर प्रवेश अंमलबजावणीविषयी चर्चा करू, असे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सांगितले आहे. 

भारत फक्त हिंदूंसाठीच का ? - मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

एड्स जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालिसाच का ?, 
कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही ? 
     मुंबई - नागपूर महानगरपालिकेने एड्स विषयीच्या जनजागृतीसाठीच्या कार्यक्रमात हनुमान चालिसा कथनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना हनुमान चालिसाच का ?, कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही ? हनुमान चालिसा आणि एड्स जनजागृतीचा काय संबंध ? फक्त हिंदूंनाच एड्सची लागण होते का ? भारत फक्त हिंदूंसाठीच का ? केवळ हनुमान चालिसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार का?, असे प्रश्‍न न्यायालयाने विचारले. 

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
        वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मुसलमान भारतात प्रेम आणि सलोखा यांच्या वातावरणात जीवन जगत आहेत ! - काबा शरीफचे इमाम शेख सालेह

भारतात असहिष्णुता आहे, अशी ओरड करणारे तथाकथित पुरोगामी, साम्यवादी आणि 
धर्मांध मंडळी यांना काबा शरीफच्या इमामांच्या विधानाविषयी काय म्हणायचे आहे ?
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारतीय मुसलमान इतर सर्व धर्मियांशी मिळून मिसळून प्रेम आणि सलोखा यांच्या वातावरणात जीवन जगत आहेत, असे काबा शरीफचे इमाम शेख सालेह बिन महंमद बिन इब्राहीम आल-ए-तालिब यांनी म्हटले आहे. (जगभरात केवळ भारतातील मुसलमान अधिक सुखी आहेत, हे वन्दे मातरम्, भारतमाता की जय म्हणण्यास आणि राष्ट्रध्वजाला वंदन करण्यास नकार देणार्‍या मुसलमानांनी लक्षात घ्यावे ! - संपादक) येथील इस्लाम आणि विश्‍वशांती या संदर्भात आयोजित एका जागतिक संमेलनामध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगात दुसरी सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे, याचा मला आनंद असून येथे ते इतर सर्व धर्मियांशी सलोख्याचे संबंध ठेवून चांगल्या वातावरणात जीवन जगत आहेत. अनेक देशांमध्ये धर्माच्या नावावर निरपराध लोकांची हत्या करण्यात येत असून सर्व जग आतंकवादामुळे पीडित आहे.


कन्हैया कुमारला पुण्यात येण्यास मज्जाव करण्यासाठी शिवाजीनगर (पुणे) येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट

देशविरोधी घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारवर न्यायालयाने
 प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी देशप्रेमी जनतेची अपेक्षा आहे ! 
     पुणे, ६ एप्रिल - १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा (जेएन्यूचा) विद्यार्थी कन्हैया कुमार पुण्यात येणार आहे. त्या वेळी तो पुण्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सभा घेणार आहे. त्याच्या सभेमुळे येथील सामाजिक शांतता भंग होऊ नये, यासाठी त्याला पुण्यात येण्यास मज्जाव करावा, अशी याचिका शिवाजीनगर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. येथील दिवाणी न्यायाधीश एस्.आर्. यादव यांच्या न्यायालयात ही याचिका प्रविष्ट केली आहे. 

गुढीपाडव्याच्या दिवशी शनिचौथर्‍यावर गंगाजल अर्पण करण्यास बंदी

  • भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे शेकडो वर्षांची परंपरा होणार खंडीत ! 
  • ग्रामस्थांचा बंदीला कडाडून विरोध 

     सोनई (नगर) - शनिशिंगणापूरच्या शनि मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा यासाठी भूमाता बिग्रेडने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रथापंरपरेनुसार प्रवरासंगम आणि काशी येथून आणण्यात येणारे पवित्र गंगाजल चौथर्‍यावर जाऊन अर्पण करण्यास बंदी घालण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. 

भुजबळ यांच्या नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई

     नाशिक - महाराष्ट्र सदन आणि अन्य घोटाळ्यांप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ यांच्या 'आर्मस्ट्राँग एनर्जी ' आस्थापनाने सहा कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीचा बडगा उभारण्यात आला आहे. अधिकोषाकडून यासाठी वृत्तपत्रात नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिकमधील मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या समीर आणि पंकज यांच्या भूमी आणि मुंबईतील विविध भूखंड यांवर अधिकोषाने प्रतिकात्मक स्वरूपाची जप्ती आणली आहे. याशिवाय ३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, अशी चेतावणी स्टेट बँकेकडून देण्यात आली आहे. भुजबळ कुटुंबियांना कर्जबुडव्यांच्या सूचीत टाकण्यात आले आहे. भुजबळ कुटुंबियांवरील कारवाईचे फास दिवसेंदिवस आवळले जात आहेत, असे यावरून लक्षात येते.

पुण्यातील कोथरूडमध्ये पुन्हा ८ दुचाकी जाळल्या

एकाच मासात अशी घटना चौथ्यांदा होणे, यावरून पुण्यात पोलीस 
प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो ! 
     पुणे, ६ एप्रिल - येथील कोथरूड भागातील किष्किंधा नगरमध्ये ५ एप्रिलच्या रात्री पुन्हा एकदा ८ दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. एकाच मासात पुण्यामध्ये घडलेले हे चौथे जळीतकांड असून किष्किंधा नगरमध्ये यापूर्वी २९ डिसेंबर या दिवशी अशीच घटना घडली होती. किष्किंधा नगरमधील काही रहिवासी त्यांच्या दुचाकी एका मोकळ्या पटांगणात लावून ठेवतात. अज्ञात व्यक्तीने या दुचाकींना रात्री २ ते २.३० च्या सुमारास आग लावली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पुण्यात दुचाकी जाळण्याच्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. (वाहनतळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे किंवा गुरखा ठेवणे यांसारख्या उपाययोजना आता करायला हव्यात ! - संपादक)

नंदुरबार येथे सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने सरबत वाटप

सरबत वाटप करतांना कार्यकर्ते
      नंदुरबार - येथे २७ मार्च या दिवशी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने गणपति मंदिराजवळ सरबत वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. यासाठी सर्वश्री सोनार काका, राजू भाऊ चौधरी, मयुर भाऊ चौधरी, अमोल ठाकरे, सौ. भारती पंडित, सौ. निवेदिता जोशी, सौ. शोभा माळी, सौ. छाया सोनार यांनी सहकार्य केले.


उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री शनिशिंगणापूर येथे महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण
     मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरून ५ वेळा वाजणारे अवैध भोंगे बंद करणे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या थडग्याभोवतीची अवैध शेड काढून टाकणे, याविषयी आदेश दिले होते. या आदेशांचे पालनही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून होत नाही. त्यामुळेही न्यायालयाचा अवमान होतो. या प्रकरणीही हेमंत पाटील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करतील का ?       मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश दिला जावा, तसेच महिलांच्या अधिकाराचे रक्षण करणे, हे राज्यशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. यावर राज्यशासनानेही महिलांचे सर्वतोपरी रक्षण करण्याची हमीही न्यायालयात दिली आहे. असे असतांनाही श्री शनिशिंगणापूर येथे गेलेल्या महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून या प्रकरणी ४ एप्रिल या दिवशी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली. ही याचिका पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी प्रविष्ट केली आहे.
      या याचिकेत म्हटले आहे की, मंदिर प्रवेश करणार्‍या महिलांना संरक्षण उपलब्ध करून देणे, महिलांना रोखण्याऐवजी त्यांना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन पूजा करू देणे, असे आदेश श्री शनैश्‍वर देवस्थान, राज्यशासन आणि पोलीस महासंचालक यांना देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे,

इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या शुल्कवाढीच्या विरोधात पॅरेंट्स ऑफ प्राइव्हेट स्कूल ऑफ महाराष्ट्रचे बेमुदत उपोषण

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मनमानी कारभाराला शिक्षण विभाग आळा घालणार का ?
या प्रकरणी शिक्षण विभाग संबंधित शाळांची चौकशी करून कारवाई करेल का ?
      पुणे - इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मनमानी कारभार आणि शैक्षणिक शुल्क दरवाढ विरोधात ४ एप्रिल या दिवशी पॅरेंट्स ऑफ प्राइव्हेट स्कूल ऑफ महाराष्ट्र्रच्या वतीने येथील बालभारती भवनजवळ बेमुदत उपोषण करण्यात आले.
     उपोषण करणार्‍या पालकांनी या वेळी मागणी केली की, शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायद्यानुसार ही शुल्कवाढ व्हायला पाहिजे; पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही शुल्कवाढ मनमानीप्रमाणे करत आहेत. या शाळांवर शासनाने कारवाई करून शुल्कवाढीवर नियंत्रण आणायला हवे; परंतु सद्यस्थितीत शासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून अशा प्रकारची लूट चालू आहे. शासनाने ती थांबवणे महत्त्वाचे आहे.

मराठवाड्यातील बंदिवानांचे नाशिकमध्ये स्थलांतर होण्याची शक्यता

     लातूर - मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे लातूर आणि बीड येथील कारागृहांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास १०० बंदिवानांना धुळे आणि तेवढ्यांनाच नाशिक कारागृहात हालवण्याची सिद्धता चालू आहे.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ धर्मदिंडीचे आयोजन

     पुणे, ६ एप्रिल (वार्ता.) - धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानदिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे फाल्गुन अमावस्येला श्रीक्षेत्र आळंदी पासून वढूपर्यंत धर्मदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु कुलभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांपासून या धर्मदिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी ७ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीमंदिरापासून दिंडीचे प्रस्थान होईल. 'एक दिवस शंभूसाठी ! समर्थ हिंदुराष्ट्रासाठी !!' असे दिंडीचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. मणकर्णिका, भागीरथी, इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमाच्या पवित्रतीर्थाचा कुंभ घेऊन दिंडी मार्गस्थ होईल. श्रीक्षेत्र वढू येथे शिवसेनेचे उपनेते श्री. अनिलभैय्या राठोड यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस जलाभिषेक करण्यात येईल. अधिकाधिक शंभूप्रेमींनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

९ एप्रिल या दिवशी पनवेल येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि जयंती उत्सव सोहळा

अन्नदानासाठी सहकार्याचे आवाहन 
     पनवेल - प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही खांदा वसाहत, पीएल् ५, तीर्थराज अपार्टमेंट, ओनर्स असोसिएशन, सेक्टर ९ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात ९ एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घ्यावेत, तसेच सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत महाप्रसाद आणि अन्नदान कार्यक्रम, तसेच सुश्राव्य भजन यांचा लाभ घ्यावा. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या साखर कारखान्यातील स्फोटात २ ठार

     शिर्डी - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात उसाच्या मळीच्या टाकीचा भीषण स्फोट झाला असून त्यात २ कामगार मृत्यूमुखी पडले, तर १० ते १२ जण घायाळ झाले आहेत. लोणी प्रवरानगर भागात ६ एप्रिलला सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.

पनामा प्रकरणात माझ्या नावाचा अयोग्य वापर ! - अमिताभ बच्चन यांचा आरोप

     मुंबई - पनामा पेपर्सने उघड केलेल्या करचुकवेगिरीच्या प्रकरणात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, यात माझ्या नावाचा अयोग्य वापर करण्यात आला आहे. सी बल्क शिपिंग लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजरर शिपिंग लिमिटेड आणि ट्राम शिपिंग लिमिटेड या आस्थापनांशी माझे नाव जोडण्यात आले आहे, त्या आस्थापनांचा मी कधीही संचालक नव्हतो आणि मी त्यांना ओळखतही नाही. विदेशात खर्च केलेल्या रकमेवर मी कर भरलेला आहे. विदेशात मी जो पैसा पाठवला, त्यावरही कर भरलेला होता. या प्रकरणात अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन यांचेही नाव आले होते. ऐश्‍वर्या यांनी पनामा प्रकरणातील अहवालाला खोटे ठरवून तो फेटाळून लावला आहे.

७ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करणार ! - मधुकर बनसोडे, तालुका प्रमुख, शिवसेना

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे शिवसेनेकडून नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन
      सांगोला (जिल्हा सोलापूर) - सांगोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने रस्त्याला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करावी, रस्त्याची रूंदी वाढवून त्यांची आखणी करून खुणा कराव्यात, तसेच वर्दळीच्या ठिकाणी विजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, स्वच्छतेच्या दृष्टीने शहर आणि उपनगरातील गटारे वाहती करावीत, वेळोवेळी शौचालयांची साफसफाई करावी यांसह विविध मागण्या येत्या ७ दिवसांत पूर्ण न झाल्यास नगरपालिकेच्या विरोधात शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेने नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिली. या वेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री. मधुकर बनसोडे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, युवा सेना शहर प्रमुख श्री. अनिल निंबाळकर, शिवसेना उपशहरप्रमुख सर्वश्री तानाजी गोडसे, तुषार इंगळे, सुमित कोळवले, अक्षय येलपले, निखिल चव्हाण यांसह सांगोला शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन नगरपालिकेच्या वतीने तामाणे यांनी स्वीकारले.


स्फोटात उल्फाच्या आतंकवाद्यांचा हात असल्याचा संशय

      गोलपारा (आसाम) - गोलपारा जिल्ह्यातील दुधनोई येथे ४ एप्रिल या दिवशी भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामागे उल्फा (स्वतंत्र) या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उल्फाने मात्र या घटनेचे दायित्व घेतलेले नाही. या स्फोटात आतापर्यंत ३ जण मृत्युमुखी पडले असून २० जण घायाळ झाले आहेत.

पनामा प्रकरणी आइसलॅण्डच्या पंतप्रधानांचे त्यागपत्र !

     रेकजाविक (आइसलॅण्ड) - पनामा करचुकवेगिरीच्या प्रकरणी आइसलॅण्डचे पंतप्रधान सिगमुंडर गुन्नलाउगस्सोन यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. पनामाच्या मोसॅक फॉन्सेकामध्ये गुन्नलाउगस्सोन यांनी त्यांची पत्नी विंट्रिस यांच्यासोबत एक विदेशी आस्थापन स्थापन केले होते. याद्वारे कोट्यवधी रुपयांची संपत्ती दडवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांचे नाव समोर आल्यानंतर संसदेत त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती.

पुण्यातील कात्रज येथील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचे घर आणि कार्यालय यांवर दगडफेक

     पुणे, ६ एप्रिल - येथील कात्रज भागातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचे घर आणि कार्यालय यांवर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना झाली आहे. ही घटना ४ एप्रिल या दिवशी रात्री ८ वाजता झाली असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ६ संशयितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या दगडफेकीत एक जण घायाळ झाला आहे. (ज्या शहरातील नगरसेवक असुरक्षित असतील, त्या ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक किती असुरक्षित असतील, याचा विचारच न केलेला बरा ! पुण्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुस्थापित करण्यासाठी पोलीस आणि गृह विभाग कोणती कठोर पावले उचलणार आहे ? - संपादक) 

नागपूर येथील श्रीमती ताराबाई शिरसाठ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

(याविषयीचे वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांवर लाठ्या उगारणारे काश्मिरी पोलीस राष्ट्रद्रोहीच !
     श्रीनगरमधील एन्आयटीमध्ये देशविरोधी घोषणा देणारे काश्मिरी विद्यार्थी आणि तिरंगा फडकावणारे बिगरकाश्मिरी विद्यार्थी यांच्यात ४ एप्रिल या दिवशी वाद उफाळून आला. तेव्हा पोलिसांनी राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. यात अनेक विद्यार्थी घायाळ झाले.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : NIT, Srinagarme deshdrohi ghoshna denewale vidyarthiyoko chod rashtrapremi vidyarthiyopar police ne laathia barsai.
- Kya policeka yah deshdroh nahi ?
जागो ! : एन्आयटी, श्रीनगर में देशद्रोही घोषणा देनेवाले विद्यार्थियों को छोड राष्ट्रप्रेमी विद्यार्थियों पर पुलिस ने लाठियां बरसाईं.
- क्या पुलिस का यह देशद्रोह नहीं ?


३ आतंकवाद्यांना मरेपर्यंत जन्मठेप, तर २ जणांना १० वर्षांची शिक्षा

वर्ष २००२-२००३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 
     मुंबई - मुंबईत वर्ष २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी मुंबईतील विशेष टाडा न्यायालयाने मुजम्मिल अख्तर अन्सारी, फरहान खोत आणि वाहिद अन्सारी या तीन आतंकवाद्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे; तर साकीब नाचन, आतिफ मुल्ला, हाशिब मुल्ला, गुलाम कोटला, फरहान मलिक यांना १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० लाख रुपयांचा दंड केला आहे. महंमद कमील, महंमद अली अन्वर, नूर महंमद यांनाही प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित जणांनी अपेक्षेपेक्षा अधिक शिक्षा भोगल्याने त्यांची जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने सांगितले. (१४ वर्षांनंतर निकाल देणारी कूर्मगतीने चालणारी न्याययंत्रणा ! - संपादक) 

श्रीलंकेकडून ९९ भारतीय मच्छीमारांची सुटका

     मदुराई - मच्छीमारी करतांना सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या सैन्याने अटक केलेल्या ९९ मच्छीमारांनी तेथील न्यायालयाने ६ एप्रिल या दिवशी सुटका केली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूमधील विविध भागातील आहेत. हे सर्व जण पुढील २ दिवसांत भारतात परततील, असे सूत्रांनी सांगितले. श्रीलंकेने रामेश्‍वरम् येथील ४ मच्छीमारांना ४ एप्रिल या दिवशी कह्यात घेतले.

महिला आरोपीचा केरळच्या मुख्यमंत्र्यांवर यौन शोषणाचा आरोप

केरळमधील सौर घोटाळा प्रकरण 
     कोची (केरळ) - केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी सोलर व्यवसायात साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊन माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप कोची सोलर घोटाळ्यातील एका महिला सहआरोपीने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी दूरभाषवर बोलतांना केला. हा आरोप मुख्यमंत्री चंडी यांनी फेटाळला असून शासनाच्या विरोधात षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नेते जी.एल्. नरसिंहा यांनी भ्रष्टाचार आणि आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन चंडी यांनी त्वरित मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. या घोटाळ्यातील एक आरोपी बीजू राधाकृष्णन् यांनी यापूर्वीच उपरोक्त महिला सहआरोपी आणि मुख्यमंत्री चंडी यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता. (काँग्रेस नेत्यांचा इतिहास पहाता आणि सध्या राजकारणाने गाठलेली हीन पातळी पहाता आरोपी महिलेने केलेले यौन शोषणाचे आरोप खरे वाटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - संपादक)

मंदिर प्रवेशाच्या संदर्भातील न्यायालयाचा निर्णय चुकीचा ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

झी २४ तास वृत्तवाहिनीवरील 
रोखठोक कार्यक्रमातील चर्चासत्र 
अधिवक्ता
श्री. संजीव पुनाळेकर
        पनवेल - न्यायालयाविषयी पूर्ण आदर बाळगून आणि त्याचे पूर्ण दायित्व घेऊन मी सांगतो की, महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या संदर्भातील एवढा चुकीचा निर्णय मी पाहिलेला नाही. याच्याविरुद्ध अर्ज केले जातील आणि ते ऐकले जातील; याचे कारण ज्या जुन्या कायद्यावर आधारित तो दिला आहे, तो कायदा जातीभेद, अस्पृश्यता यांसंदर्भातील कायदा होता; त्यामुळे तिथे लिंगभेद असा अर्थ अभिप्रेत असता, तर तो विधानसभा किंवा राज्यसभा यांमध्ये तसा तो घातला गेला असता. या ठिकाणी ज्या प्रकारे ही याचिका दिली गेली, घाईघाईने ऐकली गेली, अन्य याचिका खंडपिठासमोर प्रलंबित असतांना ती ऐकली गेली, असे स्पष्ट प्रतिपादन सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. ते ५ मार्च या दिवशी झी २४ तास वृत्तवाहिनीवरील रोखठोक या चर्चासत्रातील उघड दार देवा आता या कार्यक्रमात बोलत होते. धर्म हा स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव करतो का ? न्यायालयाचा निवाडा असूनही एक विधीज्ञ म्हणून मत आहे की, महिलांना प्रवेश दिला जाऊ नये ? असा प्रश्‍न निवेदक श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांना विचारला. त्यावर ते बोलत होते. हिंदु व्यक्तीला मंदिर प्रवेशापासून रोखता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या प्रकरणी अनेक घडामोडी चालू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चेमध्ये महालक्ष्मी देवस्थानचे श्रीपूजक आणि भाजपचे नगरसेवक श्री. अजित ठाणेकर, त्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त सौ. ललिता शिंदे, त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त अधिवक्ता श्री. श्रीकांत गायधनी आणि महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी याचिका प्रविष्ट केलेल्या अधिवक्त्या नीलिमा वर्तक हे सहभागी झाले होते.

केरळमधील अभियंत्याचे लिबियामध्ये अपहरण

       त्रिपोली (लिबिया) - येथे केरळच्या कोझीकोड येथील ४३ वर्षीय अभियंता रेगी जोसेफ यांचे अपहरण करण्यात आले आहे. ३१ मार्चला त्यांच्या कार्यालयातून येथील शासनाच्या विरोधात बंड करणार्‍या लोकांनी अपहरण केले. जोसेफ यांच्यासहित लीबियाच्या तीन नागरिकांचेही अपहरण करण्यात आले आहे.
       जोसेफ त्रिपोलीमध्ये त्यांची पत्नी आणि ३ मुलींसह रहात आहेत. त्यांची पत्नी शिनुजा येथील रुग्णालयात परिचारिका आहे. तिने येथील भारतीय दूतावासाकडे साहाय्य मागितल्याचे जोसेफ यांच्या वडिलांनी सांगितले आहे.

वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

७ एप्रिल २०१६ या दिवशी छत्रपती संभाजी 
महाराज यांचा बलीदानदिन आहे. त्यानिमित्ताने... 
वढू, तुळापूर येथील संभाजी महाराज यांचे स्मारक
वढू बुद्रुक, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी.
वढू बुद्रुक, पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची इमारत
         छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
        वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाधी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे पाहून छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे प्रखर धर्मप्रेम स्वत:त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया !

पनामा पेपर्स म्हणजे काय ?

श्री. भाऊ तोरसेकर
       सध्या पनामा पेपर्स नावाची भानगड भलतीच चर्चेत आहे. ही काय भानगड आहे आणि ती कोण कशाला चव्हाट्यावर आणू इच्छितो, त्याचे फारसे स्पष्टीकरण होऊ शकलेले नाही. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन येथे शोधपत्रकारांची एक संस्था आहे. तिने हे काम डोक्यावर घेतले असून, तिला कोणा अज्ञात गोटातून ही कागदपत्रे पुरवण्यात आलेली आहेत. जर्मनीतील एका वृत्तपत्राने काही काळापूर्वी अशीच एक भानगड प्रसिद्धीस आणली होती. त्यानंतर कुणा अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि कोट्यवधी अवैध आस्थापने अन् पैशांच्या अफरातफरीचे दस्तावेज देण्याची सिद्धता दर्शवली. तेथून हे प्रकरण चालू झाले. अमेरिका खंडाच्या मध्यावर पनामा नावाचा किरकोळ देश आहे. तिथे कुठला उद्योग - व्यापार फारसा चालत नाही. अशा देशात जगभरच्या पैसेवाल्यांना हेराफेरी करण्याची सवलत दिलेली असते. नगण्य कर आणि कायदेशीर गोपनीयतेचे कवच बहाल केले जाते. कुठल्याही मार्गाने पैसे घेऊन या आणि आपली ओळख लपवून काहीही उद्योग करायची मुभा मिळते. जगात असे अनेक देश आहेत आणि मग तिथे चोरट्यांना आश्रय देणारे कायदे आणि अधिवक्ते तत्पर असतात. मोझॅक फोन्सेका ही अशीच एक कायदा कंपनी असून, ती जगभरातील कोणालाही आर्थिक आणि कायदेशीर सेवा पुरवत असते; म्हणजे पैसे कुठे गुंतवावे आणि नाव लपवून कसे गुंतवावे, याचा सल्ला ही कंपनी देते. पनामामध्ये या कंपनीचे मुख्यालय असून तिथूनच सहस्रो बोगस आस्थापने स्थापन करून काळा पैसा खेळवला गेला आहे. त्यात मग कोण कोण गुंतले आहेत, ते पनामा पेपर्स उघडकीस करतात.

रोगापेक्षा इलाज भयंकर !

       सर्वत्र असलेल्या दुष्काळाच्या धर्तीवर एका मोठ्या जिल्ह्यात पाणी वाचवा, हा संदेश देण्यासाठी मॅरेथॉन आयोजित केल्याचे वृत्त दूरचित्रवाणीवर पाहिले. त्यात असंख्य नागरिक सहभागी झाले होते. मनात प्रश्‍न आला, खरंच अशा मॅरेथॉन आयोजित करून पाणी वाचवण्याचे गांभीर्य लोकांमध्ये निर्माण होऊ शकते का ? पाण्याच्या प्रश्‍नाला मॅरेथॉनच्या माध्यमातून आवाज उठवणे सयुक्तिक आहे का ? दुष्काळाच्या अनुषंगाने एका शहरातील नागरिकांनी संघटित होणे हे जरी स्तुत्य असले, तरी अशा प्रकारच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून आपण पाणी बचतीचा संदेश संबंधितांपर्यंत पोहोचवू शकत नाही, हेही तितकेच खरे ! या मॅरेथॉनमध्ये असंख्य नागरिक धावत होते. धावल्याने या सर्वांना तुलनेत अधिक पाणी पिण्याची, तसेच घाम गाळल्याने थोडे अधिक पाणी वापरून आंघोळ करण्याची आवश्यकता नक्कीच भासली असणार ! तर मग या मॅरेथॉनची फलनिष्पत्तीच काय राहिली ? एकीकडे संदेश द्यायचा आणि दुसरीकडे मात्र पाणी उपसायचे, यात काय तथ्य ? हे करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असे आहे. मध्यंतरी आतंकवादाच्या विरोधातही एका ठिकाणी मॅरेथॉनचे आयोजन केले होते; पण मॅरेथॉनमध्ये धावून आतंकवादाचे निर्मूलन होणार आहे का ? अशा प्रकारे हास्यास्पद पर्याय वापरून मनुष्यबळ, वेळ आणि पैसा यांची हानी करणारे समाजहित कधीतरी साधू शकतील का ?

पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत !

उज्जैन सिंहस्थपर्व 
पेशवाईचे शंखनादाद्वारे स्वागत करतांना सनातनचे साधक
पेशवाईतील सहभागी संतांना ओवाळतांना सनातनच्या साधिका
संतांच्या स्वागतासाठी सनातनच्या वतीने लावण्यात आलेले स्वागताचे फलक
         उज्जैन, ६ एप्रिल (श्री. निषाद देशमुख) - येथे होणार्‍या सिंहस्थपर्वानिमित्त ५ एप्रिल या दिवशी पंचदशनाम जुना आखाड्याच्या (दत्त आखाड्याच्या) वतीने नीलगंगा ते रामघाट मार्गावरून पेशवाई (मिरवणूक) काढण्यात आली होती. या पेशवाईत जुना आखाड्याचे प.पू. अवधेशानंद गिरीजी महाराज, श्रीमहंत देव्या गिरी, गोल्डन बाबा, महामंडलेश्‍वर पायलट बाबा, महामंडलेश्‍वर स्वामी कपिलपुरी महाराज, महामंडलेश्‍वर श्री श्री श्री १००८ स्वामी राजराजेश्‍वरानंद गिरी महाराज आणि श्रीकाशीसुमेरू पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य अनंत विभूषित स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज अन् इतर अनेक संतांची वंदनीय उपस्थिती होती. स्थानिक भाविक, विविध समाज, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून पेशवाईचे स्वागत, आणि औक्षण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातन आणि समिती यांनी पेशवाईच्या स्वागतासाठी उज्जैन शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या चामुण्डा माता चौक ते देवास गेट परिसरात ठिकठिकाणी हार्दिक स्वागताचे कापडी फलक लावले होते, तर काही ठिकाणी साधक साधू-संतांच्या स्वागतासाठी हातात कापडी फलक घेऊन उभे होते, पेशवाईत येणार्‍या संतांची आरती ओवाळून पूजन करण्यात आले आणि संतांच्या आगमनाच्या वेळी शंखनाद अन् पुष्पवृष्टीही करण्यात आली. पेशवाईत सहभागी अनेक संतांनी आवर्जून लक्ष देऊन साधकांवर पुष्पवृष्टी करून, हार देऊन आणि प्रसाद देऊन आशीर्वाद दिले. साधकांना पाहून संत स्मित हास्य करून प्रतिसाद द्यायचे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

       भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भारतातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती

जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने... 
        ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती पुढे दिली आहे.
१. भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील
 आरोग्य व्यवस्थेची झालेली दुर्दशा !
       जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्रे आणि उपकेंद्रांच्या माध्यमांतून देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कारभार चालतो. यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये, तसेच शहरी भागांत महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था पुरवली जाते. भ्रष्टाचारामुळे ही यंत्रणा सडलेली आहे. अनेक रुग्णालयांत उपकरणे आहेत; पण तंत्रज्ञ आणि आधुनिक वैद्य नाहीत. जेथे आधुनिक वैद्य आहेत, तेथे उपकरणे नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांनी विश्‍वास कोणावर ठेवावा, हा खरा प्रश्‍न आहे.

देशद्रोहाचे बाळकडू देणारी इतिहासाची पाठ्यपुस्तके पालटून राष्ट्रवादी प्रतिचळवळ उभारणे आवश्यक ! - श्री. सुनील आंबेकर, अभाविप

        पणजी, ६ एप्रिल (वार्ता.) - जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा देण्याचा प्रकार हा देशविरोधी षड्यंत्राचा मोठा भाग आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी देशद्रोहाचे बाळकडू पाजणारे प्राचार्य, देशप्रेमाची भावना बोथट बनवणारा अभ्यासक्रम, इतिहासाची पाठ्यपुस्तके आदी पालटून देशप्रेमी विद्यार्थी कसे घडतील, यासाठी मोठी सर्वंकष राष्ट्रवादी प्रतिचळवळ उभारली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. सुनील आंबेकर यांनी केले.
       चैतन्य प्रतिष्ठान, गोवा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवा यांच्या वतीने हिंदु नववर्षावर आधारित चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामध्ये श्री. सुनील आंबेकर बोलत होते. श्री. आंबेकर यांनी राष्ट्रवाद-राष्ट्रविरोधी वृत्ती या विषयावर व्याख्यान दिले.
भारतीय राष्ट्रीयत्व हे जगासाठी हितकारक !
श्री. आंबेकर पुढे म्हणाले,
१. जेएन्यूमध्ये सातत्याने आतंकवादी अफझलचा उदोउदो करणारे कार्यक्रम करण्यात येत आहेत. त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी लोकांकडून विरोध झाला आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे.

स्वतःतील दायित्वशून्यतेमुळे वाचकांना सनातन प्रभातमधील अमूल्य ज्ञानापासून वंचित ठेवणारे, तसेच त्यांची नाराजी ओढवून घेणारे साधक !

        सनातन प्रभात नियतकालिकाच्या वतीने दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक यांचे प्रकाशन केले जाते. या नियतकालिकाच्या संदर्भात साधकांकडून झालेल्या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. वाचकांना विलंबाने अंक देणे
१ अ. वाचकांना ६ अंक एकत्रितरित्या दिल्याने त्यांनी व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया ! : ठाणे जिल्ह्यातील सौ. किशोरी कुलकर्णी यांनी रविवारच्या एका वाचकाला ६ अंक एकत्रितरित्या दिले. एवढे अंक दीड मासांनी एकत्रित दिल्याने ते वाचक मला रद्दी देऊ नका, असे नाराजीने म्हणाले.

रामजन्मभूमीविषयी तात्काळ सुनावणीची मागणी करणार्‍या डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

      नवी देहली - भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्याम् स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाला अयोध्येतील रामजन्मभूमीविषयीच्या याचिकेची तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तुम्ही मुख्य पक्षकार नसून मध्यस्थी असल्याने या याचिकेची सुनावणी अन्य संबंधित पक्षांसह करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. याचिकेद्वारे डॉ. स्वामी यांनी अयोध्येमध्ये दर्शनार्थींसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयीची मागणीही केली होती.

तत्परता आणि योग्य निर्णयक्षमतेचा अभाव यांमुळे श्री. राजन बुणगे यांच्याकडून झालेली गंभीर चूक !

१. राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवता न आल्याने हिंदुत्ववाद्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवणे, त्या संदर्भातील बैठकीत कार्यकर्त्यांना बोलवण्यात येणे : एका जिल्ह्यातील काही हिंदुत्ववाद्यांना एका राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीचे तिकीट मिळालेले नसल्याने ते स्वतंत्रपणे निवडणूक लढणार होते. त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती आणि त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रित केले होते.
२. बैठकीत कार्यकर्त्यांनी समितीचा राजकारणात सहभाग नसण्याविषयी स्पष्ट केले असतांनाही हिंदुत्ववाद्यांनी वृत्तपत्रात खोटे वृत्त प्रसिद्ध करणे : त्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही राजकारणात सहभागी होणार नाही, असे हिंदुत्ववाद्यांना स्पष्ट सांगितले होते. असे असतांनाही त्या हिंदुत्ववाद्यांनी समिती राजकारणात उतरणार आहे, असे खोटे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. अशा वेळी समितीच्या संदर्भात समाजमनात अपसमज निर्माण होऊ शकतो.

गुढीपाडव्यानिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत नववर्षारंभ विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : ८ (४ रंगीत + ४ कृष्णधवल) 
मूल्य : ४ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी
 ७ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

गुढीपाडव्याच्या दिवशी होणार्‍या सर्व कार्यक्रमांमध्ये पुढील विषय मांडा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !
     गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ होत आहे. यानिमित्त गुढीपाडव्याला कोल्हापूर येथे जाहीर कार्यक्रमाद्वारे या चळवळीची घोषणा केली जाणार आहे. गुढीपाडव्याला समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच काही कार्यक्रमांमध्ये समितीचे वक्ते विषय मांडण्यासाठी सहभागी होत असतात. या दृष्टीने गुढीपाडव्याच्या दिवशी होणार्‍या सर्व कार्यक्रमांमध्ये पुढील विषय मांडल्यास ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या
रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ !
     हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी या महिला शाखेचे कार्य गेली ७ वर्षेे चालू आहे. आतापर्यंत रणरागिणी शाखेने लव्ह जिहाद, अश्‍लीलता, महिलांवरील अन्याय, युवतींची छेडछाड आदी अनेक अपप्रकारांच्या विरोधात कार्य केले आहे, तसेच महिलांची शारीरिक अन् मानसिक प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण चालू केले आहे. सध्या महिला अधिकारांच्या (हक्कांच्या) नावाखाली हिंदु धर्मातील प्राचीन परंपरा, धर्मशास्त्र आदींवर आघात करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील शेकडो वर्षांच्या परंपरा मोडून समानतेच्या नावाखाली महिलांना चौथर्‍यावर अथवा गर्भगृहात प्रवेश देण्यात यावा, यासाठी आंदोलने केली जात आहेत. वास्तविक हिंदु धर्म हा स्त्रीला देवतेचे स्थान देणारा आहे.

स्वतः सतत सेवारत राहून अन्य साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस !

१. दादाला भेटल्यानंतर सेवेची ओढ निर्माण होणे : वर्ष २००३ मध्ये माझी चेतनदादाशी प्रथम भेट झाली. त्या आधी मी एकदाच सत्संगाला गेले होते. त्या वेळी मला केवळ नामजप करण्याचे महत्त्व ठाऊक होते; परंतु चेतनदादाच्या भेटीनंतर मला सेवेचे महत्त्व समजून माझ्यात सेवा करण्याची ओढ निर्माण झाली.
२. जवळीक साधणे : तो वयाने लहान-मोठ्या सर्वांना लवकर आपलेसे करतो. चेतनदादाला पहिल्यापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम आहे. त्याच्यातील राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची तळमळ त्याच्या कृतीतून दिसायची. तो घरी रहायला आल्यावर सर्वांना आनंद व्हायचा. आताही त्याची घरी सर्व जण आठवण काढतात. त्याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घरी सांगितल्यावर सर्वांना आनंद झाला.

अध्यात्मप्रसारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाकरता चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन या कार्यात हातभार लावा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेले महान कार्य !
     मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी नाडीवाचनातून सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा २३ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम, संशोधन केंद्रे यांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत.
२. अध्यात्मप्रसारासाठी केला जाणारा हा दैवी प्रवास निर्विघ्नपणे 
पार पडण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीची तातडीने आवश्यकता !
     पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत २,७५,००० कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. दूरदूरच्या ठिकाणी होणार्‍या सततच्या प्रवासामुळे दौर्‍यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनाला सध्या तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याच्या दुरुस्तीमध्ये बराच वेळ जात आहे.
     दौर्‍याच्या माध्यमातून होणारे हे कार्य निर्विघ्नपणे चालू रहाण्यासाठी महिंद्रा आस्थापनाच्या स्कॉर्पिओे या गाडीची तातडीने आवश्यकता आहे. दौर्‍याच्या कालावधीत भेट दिलेल्या विविध ठिकाणचे अनमोल क्षण टिपता यावेत, यासाठी तेथील चित्रीकरण (शूटिंग) आणि छायाचित्रीकरण (फोटोग्राफी) करण्यात येते. त्यासाठीचे आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी या गाडीत पुरेशी जागा उपलब्ध असून ती प्रवासासाठीही सोयीस्कर आहे.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

         सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
जानेवारी २०१५ मध्ये रामनाथी आश्रमभेटीसाठी आलेल्या 
विशाखापट्टणम् येथील साधकांना आलेल्या अनुभूती आणि अन्य सूत्रे 
रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
१. सौ. अश्‍विनी भगत
१ अ. आरती म्हणतांना सप्तदेवता जागृत असल्याचे आणि गुरुदेवांचे विराट रूप दिसणे : एक दिवस मी ध्यानमंदिरात आरती म्हणतांना सप्तदेवता जागृत आहेत आणि मी हवेत तरंगत आहे, असे जाणवले. गुुरूंची आरती म्हणतांना गुरुदेवांचे विराट रूप दिसत होते.

कुशाग्र बुद्धीमत्तेचे लेणे लाभलेले आणि लहान वयातच साधनेचा दृढनिश्‍चय करून झोकून देऊन गुरुसेवा करणारे ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेले सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस !

श्री. चेतन राजहंस
      अनेक सेवा दायित्व घेऊन कौशल्याने करणारे, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व लाभलेले सनातन संस्थेचे प्रवक्ता ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. चेतन राजहंस यांची त्यांचे आई- वडील सौ. वैशाली आणि श्री. धनंजय राजहंस यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्यै येथे पाहूया. या लेखातून त्यांच्यातील प्रेमभाव, अभ्यासूवृत्ती आदी गुणांचे दर्शन घडेल.
१. चेतनच्या जन्मापूर्वी
        एका देवीच्या भोप्याने तुझ्या पोटी येणारा मुलगा शिवाजीसारखा शूर आणि स्वामी विवेकानंदांसारखा होणार आहे, असे सांगणे : चेतनच्या वेळी गर्भारपणात मला ९ मास झाले असतांना देवीचा एक भोप्या आमच्या घरी आला होता. त्याने माझ्याकडे ११ रुपये दक्षिणा मागितली आणि सांगितले, आई, तुझ्या पोटी येणारा मुलगा शिवाजीसारखा शूर आणि स्वामी विवेकानंदांसारखा होणार आहे. त्याला द्यायला माझ्याजवळ ११ रुपये नव्हते; परंतु त्या वेळी भोप्याने केलेली भविष्यवाणी आता सत्यात उतरत आहे, हे लक्षात येते. 
- सौ. वैशाली राजहंस (श्री. चेतन राजहंस यांची आई)

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती ! 
     सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे. 
          जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

खरे संस्कार म्हणजे नराचा नारायण होण्यासाठी साधना आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठीची प्रक्रिया करणे आवश्यक !

कु. वैष्णवी जाधव
      पालक आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी (भविष्यासाठी) प्रारंभीपासूनच आयुष्यभर पुष्कळ झटत असतात. ते आपल्या मुलांना कुठे संघर्ष करावा लागू नये. त्यांना जगातील सर्व सुखे मिळावीत, यासाठी प्रयत्न करतात. खरे पहाता यात पाल्यांच्या भविष्याचा विचार केला जातो; पण त्यांचे चारित्र्य घडवण्याचा नाही. पाल्यांना संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रयत्न केला जातो; पण तो संघर्ष केल्यामुळे त्यातून मुले जी घडणार आणि शिकणार आहेत, त्याचा विचार केला जात नाही. मुलांना सुख मिळवण्यासाठी धडपडायला शिकवले जाते. सर्वोच्च आनंदप्राप्ती करायला शिकवले जात नाही.
१. पाल्यांवर संस्कार करणे, म्हणजे त्यांच्या मनावर 
सात्त्विकता आणि धर्माचरण यांचा संस्कार करणे
        वस्तूस्थिती पाहिल्यावर जाणीव झाली की, खरेच नकळतपणे सर्व पालक मुलांना योग्य दृष्टीने घडवत नाहीत. आजची तरुण पिढी वाया गेली आहे, असे सर्वत्र म्हटले जाते आणि ते वास्तवही आहे; परंतु हे टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वव्यापी ईश्‍वराला एक कुंभार म्हणतो. तो आकार देतो, तोच मोडतो, पुन्हा जोडतो आणि पालक हे त्याचेच रूप म्हणजे कुंभार नाहीत का ? ज्यांच्या हातात एक निष्पाप, निर्मळ बालकरूपी गोळा दिलेला असतो. पालकांना आपण मुलावर संस्कार करतो, असे वाटते; पण त्या मुलांचे जे गतजन्मीचे दोष, संस्कार, इच्छा असतात, त्यानुसार त्यांना घडवणे अपेक्षित असते. इच्छा मारणे म्हणजे संस्कार करणे नाही, तर ती इच्छा अयोग्य असून योग्य काय ते समजावता येणे, त्यानुसार उपाययोजना करता येणे, मनावर सात्त्विकता आणि धर्माचरण यांचा संस्कार होणे, म्हणजे खरे पहाता संस्कारक्षम मुले निर्माण करणे होय.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (६.४.२०१६) रा. ८.३७ वाजता
समाप्ती - फाल्गुन अमावास्या (७.४.२०१६) दु. ४.५४ वाजता
आज अमावास्या आहे.

महर्षींनी साधकांना करण्यास सांगितलेल्या जय गरुदेव । या नामजपाची साधकाला आलेली अनुभूती

आस्थापनाच्या अधिकार्‍याने आम्हाला ती सेवा करता 
येणार नाही, असे साधकाला सांगणे आणि साधकाचा जय 
गुरुदेव ।, असा नामजप आपोआप चालू झाल्यावर अधिकार्‍याने 
लगेच सकारात्मक होऊन आम्ही सेवा करू शकतो, असे सांगणे
        ८.३.२०१६ या दिवशी माझी एका आस्थापनाच्या अधिकार्‍यांकडे एका सेवेसंदर्भात चर्चा झाली. तेव्हा ते अधिकारी म्हणाले, ती सेवा आम्हाला करता येणार नाही. त्याच क्षणी माझा महर्षींनी साधकांना करण्यास सांगितलेला जय गुरुदेव । हा नामजप आपोआप चालू झाला. त्या वेळी त्या अधिकार्‍याने कोणालातरी दूरभाष केला आणि त्यांचे बोलणे झाल्यावर त्यांनी मला सांगितले, आम्ही ती सेवा करू शकतो. त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर त्यांना हा सकारात्मक विचार देवानेच दिला आहे, असे वाटून माझा भाव जागृत झाला. तेव्हा महर्षींनी सांगितलेले पुढील वाक्य मला आठवले, तुम्ही जय गरुदेव ।, असे म्हटल्याने आकाशातून स्वयं दत्तात्रेय, म्हणजेच त्रिमूर्ती तुमच्याकडे पहातील आणि म्हणतील, हा कोण बरे आमची आठवण काढत आहे ? या जयघोषामुळे देवाचे लक्ष तुमच्याकडे जाईल आणि आपोआपच तुमचे मन आनंदी होईल. तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवशी त्यांच्या या ब्रह्मवाक्याची अनुभूतीही घेतली.
- श्री. घनश्याम गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०१६)

ज्ञान आणि भाव यांचा परस्परांशी असलेला संबंध

श्री. राम होनप
       ईश्‍वराप्रती भाव असल्याने ज्ञानप्राप्तकर्त्याला ज्ञान मिळते आणि ज्ञान मिळत असल्याने त्याच्यात भाववृद्धी होते. ईश्‍वर ज्ञान देतो, ही जाणीव ज्ञानप्राप्तकर्त्याला असल्याने ईश्‍वर त्याला ज्ञान देतो आणि ज्ञानाच्या माध्यमातून ईश्‍वराशी संपर्क होत असल्याने जिवाची भाववृद्धी व्हायला साहाय्य होते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०१५)
        आदिशंकराचार्यांची पवित्र भूमी असलेल्या केरळमधून हिंदु धर्म नामशेष करण्याचा केरळमधील साम्यवादी सरकारचा डाव दिसतो. 
- माता अमृतानंदमयी मठाचे उपाध्यक्ष स्वामी अमृतास्वरूपानंद

स्वतःमध्ये व्यापकता आणि प्रीती येण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?

१. व्यष्टी संदर्भातील प्रेमभाव 
(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ
 १ अ. स्वतःच्या विचारापेक्षा दुसर्‍याचा विचार करणे : मनात इच्छापूर्तीचे विचार असल्यास आपण दुसर्‍याचा विचार करण्यास न्यून (कमी) पडतो. स्वतःला काय हवे आहे ?, या विचारापेक्षा दुसर्‍याला कशाची आवश्यकता आहे ?, हा विचार केल्यास आपल्या अपेक्षा न्यून होऊन दुसर्‍याचा विचार करण्याची सवय लागते आणि आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो. आपल्यात प्रेमभाव असेल, तरच पुढे आपण प्रीतीच्या (निरपेक्ष प्रेमाच्या) टप्प्याला जाऊ शकतो.
१ आ. दुसर्‍यासाठी त्याग करून इच्छा आणि वासना न्यून करणे : दुसर्‍याचा विचार करण्याची सवय लागल्याने आपला आपोआप त्यागही होतो आणि आपल्या इच्छाही न्यून होतात, उदा. आश्रमात महाप्रसादाच्या वेळी (भोजनामध्ये) आंब्याच्या फोडी ठेवल्या असतांना मोठ्या मोठ्या फोडी स्वतः घेण्यापेक्षा दुसर्‍यांना या फोडी घेण्याचा आनंद देऊया, असा विचार केल्यास त्या त्यागातील आनंद वेगळाच असतो. कोणत्याही वासनेची तृप्ती कधीच होत नाही; पण त्याग केल्यास मात्र वासनेचे निर्मूलन होते. आध्यात्मिक उन्नतीसाठी असे करणे योग्य आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

असत्याचा विजय तात्पुरताच ! 
        सत्य हे स्वयंप्रकाशी असते. कलियुगात असत्याचा विजय होतो, असे वाटले, तरी नित्य हे लक्षात ठेवावे की, हा विजय तात्पुरता असतो !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सनातनच्या काही संतांची प्रमुख कार्यक्षेत्रे

       व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. तो संतांनाही कसा लागू पडतो, हे पुढील तक्त्यावरून लक्षात येईल.
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६८ वर्षे भारतावर राज्य केलेल्या शासनांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा आणि न जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

आतंकवाद्यांच्या प्रबोधनकर्त्यांचे अपयश !

       जगभर धुमाकूळ घालणार्‍या इसिसच्या आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक राष्ट्रांनी बाह्या सरसावल्या आहेत. उद्याची ही डोकेदुखी आजच संपवण्याचा विडा अनेक राष्ट्रांनी उचलला आहे. इसिसच्या या जिहादी विळख्यातून भारतही वाचू शकलेला नाही. या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या भारतातील अनेक मुसलमान युवकांना पकडण्यात आले आहे. पुण्यात ४ एप्रिल या दिवशी इसिसमध्ये सहभागी होऊ पहाणारा अब्दुल रौफ नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. काही मासांपूर्वी पुण्यातील एक महाविद्यालयीन मुसलमान विद्यार्थिनी इसिसच्या संपर्कात असल्याची अन् इराकमध्ये पळून जाण्याच्या सिद्धतेत असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली होती. या मुलीचे पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आल्याचे पोलिसांनीच सांगितले. तथापि पुण्याच्या पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळण्याऐवजी तिचे प्रबोधन करण्याचा पर्याय स्वीकारला ! तिचे करण्यात आलेले ब्रेनवॉश इतके पराकोटीचे होते की, तिची समजूत काढण्यासाठी पोलिसांना मुसलमान धर्मगुरुंचे साहाय्य घ्यावे लागले ! यानंतर पोलिसांनी धार्मिक स्थळांतूनही प्रबोधनकार्य चालू केल्याच्या बातम्या वरचेवर कानी पडू लागल्या. हल्लीच अटक करण्यात आलेल्या अब्दुल रौफवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्याचे प्रबोधन करून त्यास सोडून दिले, तर आश्‍चर्य वाटून घेऊ नये. पोलिसांनी असे केल्यास हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवणारे रझाकारी वृत्तीचे पोलीस इस्लामी आतंकवाद्यांसमोर मात्र गुडघे टेकतात, हा संदेश जनमानसांत निश्‍चितपणे जाईल. पोलिसांच्या प्रबोधनाच्या भूमिकेनंतरही इसिसकडे आजही मुसलमान तरुणांचा ओढा कायम आहे, हेच अब्दुल रौफ याची अटक सांगते. हे प्रबोधनकर्त्यांचे ठळक अपयशच म्हणावे लागेल.

देशभक्तांची ससेहोलपट !

      देशभक्तांचा छळ, हे शब्द जरी कानी पडले, तरी संतापून राष्ट्रभक्तांच्या मुठी आवळल्या जातात. स्वातंत्र्यपूर्व काळातील जुलमी इंग्रजी राजवटीत घडणार्‍या या घटना स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर आजही देशाच्या कानाकोपर्‍यात घडत आहेत. काश्मीरमधील श्रीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या शिक्षणसंस्थेत देशभक्त विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. काश्मीरमध्ये पाककडून होणार्‍या गोळीबाराच्या घटना वगळता घडणारी कुठलीही घटना प्रसारमाध्यमांना कधीच दखल घेण्याजोगी वाटत नाही; म्हणून वरील घटनेपासून समस्त भारतीय अनभिज्ञ असावेत. त्यासाठी या घटनेचे वास्तव समोर येणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn