Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. सीताराम देसाई यांचा आज वाढदिवस !

(म्हणे) पठाणकोटमधील आतंकवादी आक्रमण हा भारताचाच बनाव !

चोराच्या नव्हे, आतंकवाद्यांच्या उलट्या बोंबा !
भारतात अन्वेषण करून गेेलेल्या पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाचा अहवाल !
पाकशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या शासनाला चपराक !
      नवी देहली - पठाणकोट आक्रमणाच्या अन्वेषणासाठी भारतात आलेले संयुक्त अन्वेषण पथक पाकमध्ये परतल्यानंतर चौकशीचा अहवाल बनवण्यात आला आहे. हा अहवाल येत्या काही दिवसांतच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तो सार्वजनिक होणार आहे; मात्र तत्पूर्वी तो फुटला आहे. त्यातून पाकचा भारतद्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. पाकच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या अहवालात पठाणकोट आक्रमणाला भारताचाच बनाव असल्याचे म्हटले आहे.
     यात पुढे म्हटले आहे की, या आक्रमणात आतंकवादी पाकमधून आल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. तसेच भारतीय अधिकार्‍यांनी पाकच्या अन्वेषण पथकाला सहकार्य केले नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
     या वृत्तावरून विरोधी पक्षांनी केंद्रातील भाजप शासनावर टीका करण्यास आरंभ केला आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुँह में राम, बगल में छुरी। भाजप आणि संघवाले तोंडाने भारतमाता की जय म्हणतात आणि आयएस्आयला भारतात बोलावून पाठीत सुरा खुपसतात.

बिहारमध्ये दारूबंदी लागू

दारूबंदी करणारे भारतातील चौथे राज्य
बिहारपासून देशातील इतर राज्यांनीही बोध घेऊन दारूबंदी करावी !
      पाटलीपुत्र (पाटणा) - गुजरात, नागालॅण्ड आणि मिझोराम या राज्यांच्या पाठोपाठ आता संपूर्ण बिहारमध्येही दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर मासात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे १ एप्रिलपासून दारूबंदी अस्तित्वात आली आहे. या निर्णयामुळे राज्यात केवळ देशी नव्हे, तर विदेशी दारूवरही बंदी लागू करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देतांना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, यापुढे कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये दारू मिळणार नाही, तसेच दारूची अनुज्ञप्तीही देण्यात येणार नाही. राज्यात दारूबंदी असली, तरी सैन्याच्या आर्मी कॅन्टीनमध्ये दारूची विक्री चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पनामा प्रकरणाची चौकशी करण्याचा पंतप्रधानांचा आदेश

      नवी देहली - अमेरिका खंडातील पनामा देशातील उघडकीस आलेल्या करचुकवेगिरीच्या प्रकरणातील भारतियांच्या सहभागाची चौकशी करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. यानंतर अर्थ मंत्रालयानेे रिझर्व्ह बँक, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) आणि अर्थविषयक गुप्तचर शाखा (एफ्आययू) यांचे एक संयुक्त पथक बनवून त्यांना चौकशीचा अधिकार देण्यात आला आहे. अरुण जेटली म्हणाले की, ज्या लोकांची नावे समोर आली आहेत, त्यांच्या कथित आस्थापनांची चौकशी केली जाईल. यात त्यांनी अवैधरित्या कृती केली असल्याने त्यांना शिक्षा करण्यात येईल.


उज्जैन सिंहस्थ पर्वाच्या पहिल्या पेशवाईला (मिरवणुकीला) थाटात प्रारंभ

पंचदशनाम जुना आखाड्याची पेशवाई (मिरवणूक)
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून पेशवाईचे स्वागत
      उज्जैन (मध्यप्रदेश) - उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या पहिल्या पेशवाईला (मिरवणुकीला) प्रारंभ झाला. ५ एप्रिल या दिवशी येथील नीलगंगा पडाव येथून पंचदशनाम जुना आखाड्याची पेशवाई (मिरवणूक) काढण्यात आली. २० घोडे, २४ वाजंत्री पथके, १२ रथ, उंट, हत्ती, रथ आणि ढोल-ताशांसह निघालेल्या मिरवणुकीमध्ये २५ हून अधिक महामंडलेश्‍वर, तसेच शेकडो नागा साधू सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या धर्मपत्नी साधना सिंह यांनी केले.
क्षणचित्रे
१. जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर अवधेशानंद गिरी यांच्यासह मुख्यमंत्री चौहान रथामध्ये उपस्थित होते.
२. या पेशवाईमध्ये जुना आखाड्याचे निशान असलेला दत्त प्रकाश भाला सर्वांत पुढे होता.
३. पेशवाईत साधूंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
४. पेशवाईत विविध शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या.

श्री महालक्ष्मी देवस्थानच्या मनकर्णिका कुंडावरील शौचालय न तोडल्यास शिवसैनिक करसेवा करून ते उद्ध्वस्त करतील ! - आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना

विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांची संतप्त निदर्शने ! 
डावीकडून आमदार सर्वश्री गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले,
जेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, नरेंद्र पवार, प्रशांत ठाकूर
      मुंबई - कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत, तसेच शासनाने १५ एप्रिल २०१६ पर्यंत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचे अनधिकृत शौचालय स्वतःहून पाडून टाकावे अन्यथा शिवसैनिक आपल्या पद्धतीने करसेवा करून ते शौचालय पाडतील, अशी चेतावणी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विधानभवनाच्या परिसरात केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला दिली.
     या वेळी झालेल्या आंदोलनात शिवसेना आणि भाजप यांचे आमदार सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसले !

भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा विधानसभेत गंभीर आरोप
राष्ट्रध्वजाचा मान न राखता येणार्‍या आव्हाडांचे लोकप्रतिनिधी 
म्हणून काय वर्तन असेल, याचा विचारच न केलेला बरा ! 
      मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसले असा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ५ एप्रिल या दिवशी विधानसभेत केला. यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वादावादी होऊन गदारोळ झाला. या प्रकरणी चित्रीकरण पाहून आणि राष्ट्रध्वज हाताळण्याचे नियम पाहून पुढील निर्णय घेऊ, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कामकाज अर्ध्या घंट्यासाठी स्थगित करण्यात आले.
     जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याप्रकरणी आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून या घटनेचे चित्रीकरण स्वत:जवळ असल्याचेही सभागृहात सांगितले. या सूत्रावरून सत्ताधार्‍यांनी आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची एकमुखी मागणी अध्यक्षांकडे केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या मागणीला विरोध करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही राष्ट्रगीताचा अवमान झाला असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीसुद्धा कारवाईला विरोध केला. सभागृहात भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण कोणी केले, कोणाच्या आदेशावरून केले, याचाही अध्यक्षांनी शोध घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

(म्हणे) शासन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्या विचाराने चालत आहे !

विधानपरिषदेत शनिशिंगणापूर मंदिरातील महिला प्रवेश प्रकरणावरून 
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना पोटशूळ !
      मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या गाभार्‍यात भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांना चौथर्‍यावर प्रवेश दिला नसल्याचे कारण पुढे करत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत काँग्रेसचे आमदार संजय सावंत यांनी विधान परिषदेत चर्चेची मागणी केली होती. या चर्चेच्या वेळी सभापतींनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विद्या चव्हाण यांना बोलण्याची संधी दिली. या वेळी शासनाची भूमिका ही महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची आहे का ? राज्यशासनाची तशी इच्छा असल्याचे दिसत आहे. हा न्यायालयाचा अवमान असून त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
     हे शासन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्या विचाराने चालत आहे, असा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केला. या वेळी सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. या वेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी नाकारलेल्या प्रस्तावावर सभापतींनी विरोधकांना बोलण्याची संधी दिल्याने त्यांच्याकडून एकतर्फी आरोप करण्याची पद्धत चालू झाली आहे.

महिलांचा सन्मान करणार्‍या हिंदु धर्माचा अभिमान वाटतो ! - सौ. अंजली मणेरीकर, रणरागिणी शाखा

कसाल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
दीपप्रज्वलन करून हिंदु धर्मजागृती सभेचा प्रारंभ 
करतांना डावीकडून श्री. दैवेश रेडकर, सौ. अंजली 
मणेरीकर आणि श्री. हेमंत मणेरीकर
     कसाल, ५ एप्रिल (वार्ता.) - न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत काही महिलांनी नुकतेच शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाणीवपूर्वक प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथील जागृत धर्माभिमानी ग्रामस्थ आणि पोलीस यांनी धर्मद्रोही महिलांचा हा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला. आम्हाला आमच्या हिंदु धर्माचा अभिमान आहे; कारण त्याने आम्हा महिलांचा सतत सन्मानच केला. चौथर्‍यावर महिलांना प्रवेश वर्ज्य आहे आणि त्या विरोधाला शास्त्राधार आहे. याचा अभ्यास न करता आणि त्याला स्त्रीमुक्ती अन् महिलांचे सबलीकरण, असे नाव देऊन जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. यातून त्यांचा हिंदु धर्माविषयी आकसच दिसून येतो, अशी टीका हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली मणेरीकर यांनी ४ एप्रिल या दिवशी कसाल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत केली.

कन्हैयाच्या नावाखाली राजकीय पक्ष विद्यार्थी आणि युवक यांच्यात द्वेषाचे विष पसरवत आहेत !

व्हॉइस ऑफ स्टुडंट्स या अराजकीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अक्षय मडकईकर यांचे प्रतिपादन
     पणजी - कन्हैयाच्या प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राजकीय पक्ष विद्यार्थी आणि युवक यांच्यात द्वेषाचे विष पसरवत आहेत. कन्हैया कुमारपेक्षा येथील विद्यार्थी किंवा युवक यांच्यासमोर जी आव्हाने उभी आहेत, त्याविषयी चर्चा किंवा वादविवाद घडले, तर त्याचा राज्यासाठी उपयोग होऊ शकतो, असे मत गोव्यात नव्याने येऊ घातलेल्या व्हॉइस ऑफ स्टुडंट्स या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अक्षय मडकईकर यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले. 
     मडकईकर पुढे म्हणाले, गोव्यात पुन्हा विद्यार्थी चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी व्हॉइस ऑफ स्टुडंट्स या नावाने चळवळ उभारली जात आहे. या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, विद्यार्थ्यांनी त्यांची बुद्धीमत्ता गहाण ठेवू नये. संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आळस झटकून उज्ज्वल भवितव्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

संघाच्या कार्यावर टीका करणार्‍या आव्हाडांचा ठाण्यात विविध मान्यवरांनी घेतला समाचार !

      ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक श्री. भैय्याजी जोशी यांनी या देशाचा राष्ट्रध्वज भगवा आणि राष्ट्रगीत वन्दे मातरम् हे असावे असे वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे राबवले जात आहे, असा आरोप करत ठाण्यात संघाच्या कार्याविषयी तोंडसुख घेतले होते. यावर विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया देऊन आव्हाडांचा समाचार घेतला.
घोटाळ्यात ज्यांचे नाव आहे, अशांनी देशभक्ती, राष्ट्रप्रेमाची 
भाषा बोलू नये ! - संजय केळकर, आमदार, भाजप
     आव्हाडांनी आधी आपल्या पायाखाली काय चालले आहे ते पहावे. त्यांच्या पक्षातील एकेक भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर पडत आहेत. वेगवेळ्या घोटाळ्यांत ज्यांचे नाव आहे अशांनी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम यांची भाषा बोलू नये. वन्दे मातरम्ला विरोध म्हणजे या हुतात्म्यांचा अपमान आहे. त्याला विरोध करणार्‍या भामट्यांचे राष्ट्रप्रेम किती बेगडी आहे, हे आपल्याला कळते.
मुसलमानांची मते मिळवण्यासाठी राजकारण करणार्‍यांनी आम्हाला
स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवू नये ! - रविंद्र चव्हाण, आमदार, भाजप
     जितेंद्र आव्हाडांनी यापूर्वी कधी तिरंग्यासाठी फेरी काढली होती का ? अनेक वर्षे मुसलमानांची मते मिळवण्यासाठी राजकारण करणार्‍यांनी आम्हाला स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवू नये.

हिंदू सेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा देहली येथील कार्यक्रम रहित

पाकिस्तानी गायकांचे कार्यक्रम होऊ देणारा भारत 
कधीतरी भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड पाकवर उगवेल का ? 
     नवी देहली - हिंदू सेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा देहली येथील एका उपाहारगृहात होणारा कार्यक्रम रहित करावा लागला आहे. याप्रकरणी हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांच्या विरोधात तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

नाशिकमधील अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयावर विविध तपाससंस्थांचे छापे

     नाशिक - आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि आयकर खाते यांनी संयुक्तपणे अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयांवर छापे टाकले. नाशिकमधील आलिशान 'भुजबळ फार्म' अशोका बिल्डकॉनच्या पैशांतून उभे राहिल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी अलीकडेच केला होता. 
१. नाशिकमधील अशोका मार्गावर असलेल्या अशोका बिल्डकॉनच्या मुख्यालयात आज सकाळी तिन्ही संस्थांच्या अधिकार्‍यांचे पथक पोहोचले. त्यांनी हे कार्यालय सील केले आणि सर्व कागदपत्रांची कसून चौकशी चालू केली. 
२. कंत्राट गैरव्यवहार प्रकरणाचा तपास या तीन तपाससंस्था करत आहेत. त्यांनी पिंपळगाव रस्त्यावरील आस्थापनाच्या पथकर नाक्यावरही छापा टाकला. त्यामुळे नाशिकमधील भुजबळ समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 
३. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे छगन भुजबळ यांनी अशोका बिल्डकॉन आस्थापनाला मिळवून दिली होती आणि त्या बदल्यात अशोक आणि आशिष कटारिया यांनी त्यांना कोट्यवधी रुपये दिले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी अलीकडेच केला होता. 
४. या पैशांतूनच भुजबळ फार्म उभे राहिल्याचे सांगत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. भुजबळ कुटुंबियांना 'फिफा'चे फुटबॉल सामने दाखवण्यासाठी कटारिया यांनी खास विमानाने परदेशात नेल्याचा आरोप करण्यात आला होता. हे सर्व आरोप अशोका बिल्डकॉनने फेटाळले होते.

कालव्यासाठीच्या खोदकामामुळे श्री माऊली मंदिराचा सभामंडप कोसळला : तळी उद्ध्वस्त !

मंदिरांचा विध्वंस करणारे कर्नाटकचे हिंदुद्रोही काँग्रेस शासन !
न्यायालयाची स्थगिती असूनही प्रकल्प पुढे रेटणार्‍या आणि मंदिराची हानी करणार्‍या 
आततायी कर्नाटक शासनाला भाविकांनी खडसवायला हवे !
श्री माऊली मंदिराचा कोसळलेला सभामंडप
आणि कोसळण्याच्या मार्गावर असलेले मंदिर
   कणकुंबी (कर्नाटक) - कर्नाटक शासनाच्या कालव्यासाठीच्या खोदकामामुळे येथील श्री माऊली देवस्थानची मलप्रभेचा उगमस्रोत म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक तळी ३ एप्रिल या दिवशी संध्याकाळी उद्ध्वस्त झाली. भेगा पडल्याने कौले हटवलेला मंदिराचा सभामंडप यापूर्वीच निकामी झाला आहे. या ठिकाणचा जुनाट आम्रवृक्षही हटवण्यात आला आहे.
   कर्नाटक निरावरी निगमने गेल्या दीड-दोन मासांपासून कळसा कालव्याला मलप्रभा कालव्याशी जोडण्यासाठी कणकुंबी येथे कालवा बांधण्यासाठी युद्धपातळीवर खोदकाम चालू केले आहे. या बांधकामामुळे श्री माऊली मंदिर आणि मंदिराच्या परिसराला धोका निर्माण झाला होता. याविषयी कणकुंबी येथील ग्रामस्थांनी खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांच्या उपस्थितीत कर्नाटक निरावरी निगमच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती; मात्र या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कळसा कालव्यासाठीचे खोदकाम आणि बांधकाम चालूच ठेवण्यात आले. त्याची परिणती म्हणून मंदिराची पवित्र तळी आणि मलप्रभेचा उगमस्रोत नष्ट झाला. म्हादई बचाव अभियानाचे कार्यकर्ते राजेंद्र केरकर आणि विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी कणकुंबी गावाला भेट देऊन या सगळ्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या आठवड्यात गोव्याच्या गटानेही या ठिकाणी भेट देऊन कर्नाटक शासनाच्या गैरकृत्यांच्या नोंदी केल्या आहेत.

त्र्यंबकेश्‍वर देवस्थान निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा

शासनाचा हलगर्जीपणा आणि न्यायालयाचा अयोग्य
निकाल यांमुळे धार्मिक क्षेत्रात माजलेले अराजक !
      नाशिक - त्र्यंबकेश्‍वर देवस्थानने मंदिर गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये निराशेचे वातावरण आहे. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी पुरोहित महासंघ आणि ग्रामस्थांनी मोर्चा काढला. देवस्थानच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले असल्याने आता हा वाद नव्या वळणावर येणार असल्याची चिन्हे आहेत.
      शनीशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावर जाऊन दर्शन देण्याच्या मुद्दयावरून मोठा गदारोळ झाला होता. या पार्श्‍वभूमीवर त्र्यंंबकेश्‍वर येथे कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या वतीने पुरूषांनाच गाभार्‍यात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे. यापूर्वी भूमाता ब्रिगेटने त्र्यंबकेश्‍वरच्या गाभार्‍यात महिलांना दर्शनासाठी जाऊ द्यावे, अशी मागणी केली होती. तसेच त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनीशिंगणापूर येथील भूमाता ब्रिगेटचे आंदोलन पाहता त्र्यंंबकेश्‍वर देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. देवस्थानच्या निर्णयास विरोध म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला होता.

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा तृप्ती देसाई यांचा हेका कायम

न्यायालयाच्या अवमानाची स्वतंत्र तक्रार प्रविष्ट करणार
वारंवार धर्मावर आघात करणार्‍या आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती 
बिघडवू पहाणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर हिंदूंच्या धर्मभावना 
दुखावल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी सश्रद्ध हिंदूंची अपेक्षा आहे !
      पुणे - २ एप्रिल या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते. आतापर्यंत त्यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी देसाई यांना सपशेल अपयश आले आहे. एवढे होऊनही तृप्ती देसाई यांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा त्यांचा हेका मात्र कायम ठेवला आहे. नगरमधील सुपा येथे ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट केल्यानंतर देसाई यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने शनिशिंगणापूरमधील घटनाक्रमाची स्वत:हून दखल न घेतल्यास आपण उच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमानाची स्वतंत्र याचिका प्रविष्ट करणार आहोत. तसेच आम्ही पुन्हा गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणार आहोत.
     देसाई पुढे म्हणाल्या की, आम्ही प्रविष्ट करणार असलेल्या याचिकेत मुख्यमंत्री, पोलीस प्रशासन आणि श्री शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्‍वस्त यांना प्रतिवादी करण्यात येईल

महाराष्ट्रातील एकाही विद्यापिठाचे नाव राष्ट्रीय क्रमवारीतील पहिल्या २५ क्रमांकांमध्ये नाही !

     शैक्षणिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्रातील दु:स्थिती ! 
ही स्थिती सुधारण्यासाठी  शिक्षण खाते  आणि  राज्यशासन यांनी तत्परतेने प्रयत्न  करावेत!
     पुणे, ५ एप्रिल - देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाच्या प्रक्रियेसाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 'राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन पद्धत' सिद्ध केली आहे. यामध्ये देशातील विद्यापिठे आणि महाविद्यालये यांना मानांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मानांकन निश्‍चित करून घेण्याचे आवाहन केले होते. या मानांकनाची पहिल्या टप्प्यातील सूची प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये राज्यातील एकाही विद्यापिठाचे नाव पहिल्या २५ क्रमांकांमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्रमवारीनुसार देशातील विद्यापिठांमध्ये बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने ९१.९१ गुणांसह प्रथम स्थान पटकावले. 

कन्हैया कुमारने एकही देशद्रोही शब्द उच्चारल्यास तो स्वत:च्या पायावर बाहेर जाणार नाही !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? शासन देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देऊ 
शकण्यास अपयशी ठरल्यास लोकांचा असा उद्रेक होऊ शकतो, हे शासनाने लक्षात घ्यावे ! 
हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या युवा विभागाची सणसणीत चेतावणी 
     पुणे, ५ एप्रिल - 'जेएनयू' विद्यापिठाचा विद्यार्थी कन्हैया कुमार याचे पुण्यात नेहमीच स्वागत आहे. 'अतिथी देवो भव' ही पुण्याची संस्कृती आहे; परंतु अतिथी जर शाहिस्तेखान, अफझलखान किंवा औरंगजेब यांच्याप्रमाणे असेल, तर त्याला याच मातीत गाडून टाकण्याचीही आमची संस्कृती आहे. कन्हैयाने देहलीत आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन केले, त्याप्रमाणेच पुण्यातील सभेत त्याने जर एकही देशद्रोही शब्द उच्चारला किंवा देशद्रोही वक्तव्य केले, तर हिंदुस्थान प्रजा पक्षाचे कार्यकर्ते त्याला स्वत:च्या पायावर बाहेर जाऊ देणार नाहीत, अशी चेतावणी पक्षाच्या युवा विभागाचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ पाटील यांनी दिली. हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने ४ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण आदमाने, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष प्रवीण चौगुले आदी उपस्थित होते. 

अलिगड मुस्लिम विद्यापिठाला अल्पसंख्यांक संस्थानच्या श्रेणीत ठेवू शकत नाही ! - केंद्रशासन

     नवी देहली - केंद्रशासन अलिगड मुस्लिम विद्यापिठाला अल्पसंख्यांक संस्थान या श्रेणीत ठेवण्यास सिद्ध नाही. यासाठी केंद्रशासनाने 'अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालावर सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान' परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील चंद्रभागा नदीवरील सहा घाटांच्या सुशोभीकरणासाठी २१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

या पैशांचा योग्य प्रकारे विनियोग होतो कि नाही, हेही प्रशासनाने पहाणे आवश्यक ! 
     पंढरपूर(जिल्हा सोलापूर), ५ एप्रिल - येथील चंद्रभागा नदी तीरावरील विविध सहा घाटांचे जुने साधर्म्य राखत त्यांचे सुशोभीकरण करून सौंदर्य वाढवण्यासह मजबूतीकरणही करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ कोटी ५९ लक्ष ३२ सहस्र ३८३ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी कार्यक्रमांतर्गत शासनाने पंढरपूरसह श्रीक्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर येथील घाटांचा विकास करायचे ठरवले असून त्याचा आराखडा यापूर्वीच करण्यात आला आहे. पंढरपुरातील विविध सहा घाटांच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा संमत करण्यात आला आहे.

सांगली जिल्हा पुरोहित संघाच्या वतीने पर्जन्ययागाचे आयोजन !


     सांगली, ५ एप्रिल (वार्ता.) - पावसाचे दुर्भिक्ष्य दूर होण्यासाठी सांगली जिल्हा पुरोहित संघ आणि पशुपती देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीशेजारी शासकीय घाटावर ५ एप्रिल या दिवशी पर्जन्ययाग पार पडला. यात १५० हून अधिक पुरोहित सहभागी झाले होते. या यागास पू. केळकर महाराज, प.पू. कोटणीस महाराज, तसेच करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांचे आशीर्वाद लाभले. या यज्ञाच्या निमित्ताने पाच ट्रक ओला चारा विविध गोशाळांना देण्यात येणार आहे.

केरळचे पाद्री टॉम उझुनूल्ली यांच्या सुटकेसाठी शासन प्रयत्नरत ! - विदेशमंत्री सुषमा स्वराज

पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या सुटकेसाठी शासन काही प्रयत्न करणार का ?
यमनमध्ये इसिसने केले आहे पाद्री टॉम यांचे अपहरण
     यमन - आतंकवादी संघटना इसिसकडून अपहरण करण्यात आलेले केरळचे पाद्री टॉम उझुनूल्ली पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या सुटकेसाठी शासन संपूर्ण प्रयत्न करत आहे, अशी माहिती विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. (एका ख्रिस्ती पाद्य्रासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतात; मात्र पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये नरकयातना भोगत असलेल्या हिंदूंसाठी शासन काय करत आहे, हे जनतेला कळेल का ? - संपादक) 
     पाद्री टॉम यमनमध्ये जे ओल्ड एज होम चालवत होते, त्यावर ४ मार्च या दिवशी इसिसच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या वेळी १६ लोकांना ठार मारण्यात आले होते. यात ४ भारतीय नन्सचाही समावेश होता. याच वेळी पाद्री टॉम यांचेही अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या आतंकवाद्यांनी पाद्री टॉम यांना फासावर लटकवले, असा दावा काही प्रसारमाध्यमांमधून करण्यात आला होता; परंतु तो खोटा होता.

इसिसने बेल्जियमलाच का लक्ष्य केले ? - डॉ. कोनरॅड एल्स्ट

    ब्रुसेल्स - इस्लामिक स्टेटचे आतंकवादी खिलाफतचे राज्य जगावर स्थापन करण्यासाठी लढाई करत आहेत. त्यांना इतिहासाची संपूर्ण माहिती आहे. या माहितीच्या आधारेच त्यांनी बेल्जियम देशाला लक्ष्य केले, असे वक्तव्य डॉ. कोनरॅड एल्स्ट यांनी केले आहे. यासाठी त्यांनी पुढील कारणे दिली आहेत.
१. बेल्जियम देश मध्ययुगीन धर्मयोध्यांसाठी (क्रुसेडरसाठी) प्रसिद्ध आहे. ख्रिस्ताब्द १०९९ मध्ये बेल्जियम देशाचा सेनापती गॉड्फ्रे याने शिया मुसलमान योध्यांना समर्थन देऊन जेरुसेलम येथे आक्रमण केले आणि सुन्नी मुसलमानांचा पाडाव केला. गॉड्फ्रे हा जेरुसेलमचा प्रथम राजा बनला. त्याचा अश्‍वारूढ पुतळा आजही ब्रुसेल्सच्या मध्यभागी उभा आहे. इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना या घटनेचा सूड घ्यायचा होता.

अंनिसच्या विरोधात पुण्यात १० एप्रिलला ज्योतिषतज्ञांचा मोर्चा !

     पुणे, ५ एप्रिल (वार्ता.) - ज्योतिषशास्त्रावर आंधळेपणाने टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता पुणे स्थानकापासून विधानभवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून ज्योतिषावर श्रद्धा असणार्‍या, तसेच धर्माविषयी आस्था असणार्‍यांनी या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अंनिसला आव्हान देणारे ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. 

(म्हणे) 'कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी समीर गायकवाडला वाचवण्याचा प्रयत्न !'

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा कांगावा ! 
     मुंबई, ५ एप्रिल - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही. हत्येच्या अन्वेषणात जाणीवपूर्वक विलंब होत असून अटक केलेला एकमेव आरोपी समीर गायकवाड याला वाचवण्याचा शासनाकडून प्रयत्न होत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी ५ एप्रिलला सभागृहात केला. 

अफगाणिस्तानात आत्मघाती आक्रमणात ६ जण ठार

     परवान - अफगाणिस्तानच्या परवान प्रांतातील सैयागर्द येथे ५ एप्रिलच्या सकाळी झालेल्या आत्मघाती आक्रमणात ६ जण ठार झाले. येथे एका शाळेजवळ असणार्‍या चारचाकी वाहनात हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. आतापर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही.

लातूरमध्ये पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी पोलिसांचा पहारा

     लातूर, ५ एप्रिल - येथे पाण्यासाठी प्रति दिवशी होणारी मारामारी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न यांमुळे शहरात कलम १४४ लागू करण्यात आले; पण त्याचाही उपयोग होत नसल्याचे एकूण चित्र आहे. पाण्यावरून होणारे अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता पाण्याच्या टाकीच्या ठिकाणीच पोलिसांचा पहारा बसवला आहे. त्यासाठी विशेष पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचसमवेत वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रति २ घंट्याने प्रत्येक पाण्याच्या टाकीला भेट देणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.

अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमात हिंदु धर्माला गौण स्थान दिल्याच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

अमेरिकेतील हिंदूंकडून भारतातील हिंदू काही बोध घेतील का ? 
     कॅलिफोर्निया - सॅक्रोमान्तो येथील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर सुमारे १०० हिंदु धर्माभिमान्यांनी शालेय अभ्यासक्रमात हिंदु धर्माला गौण स्थान दिल्याच्या विरोधात निदर्शने केली. शाळांतील इयत्ता ६ ते १० वीच्या दक्षिण आशिया विषयावरील क्रमिक पुस्तकांत हिंदु धर्माविषयी पालट करण्याच्या शिफारसी शिक्षण मंडळाने नेमलेल्या समितीने केल्या होत्या. त्यात भारताला इंडिया ऐवजी दक्षिण आशिया आणि हिंदु धर्माला प्राचीन सिंधू संस्कृतीचा धर्म असे संबोधण्यात आले आहे. या शिफारसी शिक्षण मंडळाने स्वीकारून अंमलात आणल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

अमेरिकेत पाश्‍चात्त्य देशातील सर्वांत मोठी मशीद आणि इस्लामी केंद्राद्वारे इसिसच्या इस्लामी राष्ट्राला बळ !

पत्रकार जॅनेट लेव्ही यांची टीका 
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या मेरिलॅन्ड राज्यातील लॅनहॅम येथील पाश्‍चात्त्य देशातील सर्वांत मोठी मशीद आणि इस्लामी केंद्र यांचे उद्घाटन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि इसिसचे छुपे समर्थक असलेले तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी केले. या घटनेमुळे जगात खिलाफत हे इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या इसिसच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे, अशी टीका पत्रकार जॅनेट लेव्ही यांनी केली आहे. 
लेव्ही यांनी याविषयी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, 
१. अनुमाने ७५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या इस्लामी केंद्रात भव्य मशीद, सांस्कृतिक केंद्र, निवासस्थाने आणि खेळाचे मैदान आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये २५ मशिदी आहेत. 
२. एका गुप्तहेर संस्थेने केलेल्या पाहणीवरून, अमेरिकेतील एकूण मशिदींच्या ८० टक्के मशिदींमध्ये जिहादचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच वॉशिंग्टनमधील २० मशिदींत आतंकवादी निर्माण होत आहेत.

वॉल्ट डिस्नी आस्थापनाने ख्रिस्ती धर्माच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा टेक्सास व्हॅल्युसचा आरोप

     जॉर्जिया (अमेरिका) - वॉल्ट डिस्नीसह अमेरिकेतील अनेक आस्थापनांनी ख्रिस्ती धर्माच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असा आरोप टेक्सास व्हॅल्युस या ख्रिस्ती गटाने केला आहे. जॉर्जियाचे गव्हर्नर नॅथन डील यांनी फ्री एक्झरसाईज प्रोटेक्शन अ‍ॅक्टविषयीचे विधेयक नुकतेच फेटाळून लावले. या कायद्यामुळे समलिंगी विवाह करणार्‍यांना सेवा नाकारण्याचा अधिकार स्थानिक आस्थापनांना मिळणार होता. 
    त्यानंतर टेक्सास व्हॅल्युसच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात काही आस्थापनंावर वरील आरोप केला. अ‍ॅपल, वॉल्ट डिस्नी, इंटेल, कोका-कोला यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या धर्मस्वातंत्र्याच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. वॉल्ट डिस्नी आता गळ्यात क्रॉस घालायलाही विरोध करणार का ? असा प्रश्‍न या निवेदनात करण्यात आला आहे.

हिंदुस्थानात हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणण्याची लाज वाटते आणि ते सर्वधर्मसमभावी किंवा निधर्मी असल्याचे अभिमानाने सांगतात ! - प्रा. दिलीप बेतकीकर, गोवा


फलक प्रसिद्धीकरता

इतिहास विसरून शत्रूराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे म्हणजे
 स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणे होय !
     पठाणकोटमध्ये झालेले जिहादी आक्रमण भारताचाच बनाव असल्याची खोटी माहिती या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाने अहवालात दिली आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pathankotka akraman Bharatka hi natak tha, aisi jhuthi jankari Pakke anveshan dalne apne byoreme di hai.
Kya yah hamari gandhigiri ka parinam nahi ?
जागो ! : पठानकोट का आक्रमण भारत का ही नाटक था, ऐसी झूठी जानकारी पाक के अन्वेषण दल ने अपने ब्यौरे में दी है.
क्या यह हमारी गांधीगिरी का परिणाम नहीं ?

गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणार्‍या नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! - नववर्ष स्वागत समिती

     सांगली, ५ एप्रिल (वार्ता.) - नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने विजयनगर, वारणाली आणि दक्षिण विश्रामबाग येथून सकाळी ८.३० नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहेत. या यात्रेत सर्व नागरिकांना सहकुटंब सहभागी व्हावे, असे आवाहन नववर्ष स्वागत समितीचे श्री. गोरक्ष इनामदार यांनी केले आहे. या तिन्ही यात्रा विश्रामबाग चौकातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात एकत्र येतील. तेथे विविध प्रात्यक्षिके होतील आणि प्रसादाचे वाटप होऊन समारोप केला जाईल.

कामोठे (नवी मुंबई) येथे ८ एप्रिलला भव्य शोभायात्रा !

     कामोठे (नवी मुंबई) - येथे हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त ८ एप्रिलला दुपारी ४.३० वाजता श्री संत तुकाराम महाराज मंदिर सेक्टर ३६ येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्वांनी पक्ष, संप्रदाय, संघटना विसरून हिंदु म्हणून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी हिंदु नववर्ष समिती आणि सहभागी होणार्‍या सर्व संघटनांनी हिंदूंना आवाहन केले आहे.

आरोपी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी विद्यापीठ घेणार कायदेशीर सल्ला !

जेएन्यू प्रकरण
देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना १ मासानंतरही काहीच शिक्षा न करणार्‍या विद्यापिठातून 
भावी पिढी देशद्रोही निपजल्यास नवल नाही ! अशा विद्यार्थ्यांना थेट घरचा रस्ता दाखवा !
    नवी देहली - येथील जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) आवारात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांच्या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा देण्यात यावी, यासंदर्भात विद्यापिठाने कायदेशीर सल्ला मागितला आहे. 
    संसद आक्रमणाच्या प्रकरणी आतंकवादी महंमद अफझलला देण्यात आलेल्या फाशीच्या विरोधात ९ फेब्रुवारी या दिवशी जेएन्यूच्या आवारात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कन्हैया कुमार, अनिर्बन भट्टाचार्य आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी पाकच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विद्यापिठाने १४ मार्चला २१ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या आरोपी विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा देण्यात यावी, या संदर्भात विद्यापिठाने कायदेशीर सल्ला मागितला आहे. या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या विद्यापिठातील पथकाने ११ मार्चला त्यांचा अहवाल सादर केला होता; परंतु विद्यापिठाने अद्याप याप्रकरणी अंतिम निर्णय घेतला नाही. देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे शिस्तपालनाच्या अंतर्भूत नियमांना अनुसरून आरोपी विद्यार्थ्यांना किती शिक्षा द्यावी, यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी ही शिक्षा कायद्यानुसार न्यायोचित असल्याचेही निश्‍चित करण्यात येणार आहे.

माजी खासदार शहाबुद्दीन यांचा राजदच्या कार्यकारिणीत समावेश; बिहारचे राजकारण संतप्त

भारतातील निरर्थक लोकशाही ! 
     पटणा - सध्या कारागृहात अटकेत असलेले माजी खासदार शहाबुद्दीन यांना राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सहभागी करण्यात आले आहे. यावर भाजपचे नेते सुशील मोदी म्हणाले, शहाबुद्दीन यांना राजदच्या कार्यकारिणीत सहभागी करून घेऊन लालूप्रसाद गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत. शहाबुद्दीन यांच्यावर वेगवेगळ्या ४ प्रकरणांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या असून ३४ पोलीस ठाण्यांमध्ये हत्या, अपहरण, खंडणी मागणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भारतमाता की जय म्हणू; मात्र मूर्तीसमोर झुकणार नाही ! - देवबंदचे मौलाना

     मुंबई - भारतमाता की जय म्हणणे इस्लामविरोधी असल्याचा फतवा देवबंदच्या दारूल उलुमने काढल्यानंतर बहुतांश मौलाना आणि नेते यांनी भारतमाता की जय म्हणण्यास इस्लाम धर्माची आडकाठी येत नाही; मात्र भारतमातेच्या मूर्तीची पूजा इस्लामनुसार होऊ शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. देवबंदच्या काही मौलानांनी याविषयी महाराष्ट्र टाइम्सकडे त्यांचे मत व्यक्त केले.

शाळेच्या आवेदनपत्रात भारतमाता की जय लिहिल्यासच प्रवेश !

भारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर शाळेत मुलांना भारतमाता की जय म्हणण्यासाठी 
बंधन घालावे लागणे, ही गोष्ट विस्मयचकीत करणारी !
गुजरातच्या शाळेत पोहोचले भारतमाता की जय प्रकरण !
     कर्णावती (अहमदाबाद) - अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवेदनपत्रात भारतमाता की जय लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे असून तसे न लिहिल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही. भाजपचे नेते दिलीप संघानी हे या संस्थेचे अध्यक्ष असून अमरेलीमध्ये या संस्थेचे प्राथमिक विद्यालय, २ माध्यमिक विद्यालये आणि १ महाविद्यालय आहे. यासंदर्भात संघानी म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक मोहन वीरजी पटेल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. या १०४ वर्षे जुन्या संस्थेने विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंग चुडासमा म्हणाले, अशा प्रकारे कुणीही बळजोरी करू शकत नाही; मात्र हा एका संस्थेचा स्वतःचा निर्णय आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांचे उपरोधक वक्तव्य

उमर अब्दुल्ला ही घोषणा देतील का ?
आता पीडीपी-भाजप शासनातील मंत्री भारतमाता की जय म्हणतील !
     श्रीनगर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरवर मला आशा आहे की, पीडीपी-भाजप युतीचे शासन बनल्यावर शपथ घेणारे सर्व सदस्यही भारतमाता की जय ही घोषणा देतील, असे उपरोधक विधान केले. महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही.

स्त्रीमुक्तीवाद्यांनो, धर्माच्या विरोधात जाऊन पाप ओढवून घेऊ नका !

सौ. अनघा शशांक जोशी
१. स्त्रीमुक्तीवाद्यांची धर्मविरोधी आंदोलने, 
ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच !
    सध्या हिंदूंच्या धार्मिक रूढी, परंपरा अन् प्रथा यांना विरोध करणे याविषयीच्या स्त्रीमुक्तीवाद्यांच्या आंदोलनांना उधाण आले आहे. शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर चढून महिलांना दर्शन घेऊ देणे असो किंवा कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा वाद असो, धर्मशास्त्र समजून न घेता त्याला विरोध करणे, ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल !
२. आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःला ऋषीमुनींपेक्षा 
श्रेष्ठ समजणार्‍या स्त्रीमुक्तीवादी महिला !
     धार्मिक प्रथा न पाळणे, त्यांना विरोध करणे म्हणजे आम्ही आधुनिक आहोत, असे या महिलांना वाटते. जे काळाच्या पलीकडचेही पाहू शकतात, अशा ऋषीमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी लिहिलेले शास्त्र न मानणे, म्हणजे या तथाकथित स्त्रीमुक्तीवादी स्त्रिया ऋषीमुनींपेक्षा श्रेष्ठ (?) झाल्या कि काय ? हे स्त्रीमुक्तीवाद्यांच्या अहंकाराचे प्रतीक आहे. त्या असे करून समाजाची दिशाभूलच करत आहेत.

मला खडसवणारे विद्यार्थी कोकणीप्रेमी नव्हे, तर कन्हैयाप्रेमी ! - संजय हरमलकर

संजय हरमलकर यांनी देशद्रोही कन्हैया कुमार यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण
श्री. संजय हरमलकर
     पणजी - मला खडसवणारे विद्यार्थी कोकणीप्रेमी किंवा गोवाप्रेमी नव्हे, तर ते कन्हैयाप्रेमी आहेत. या विद्यार्थ्यांना देशद्रोही कन्हैयाचे उदात्तीकरण करायचे आहे, असे विधान इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे गोवा उपाध्यक्ष तथा सिद्धहस्त पोर्ट्रेट कलाकार श्री. संजय हरमलकर यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.
    श्री. संजय हरमलकर यांनी जेएन्यूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार हा देशद्रोही असून त्याने गोव्यात येऊन देशाशी प्रतारणा करणारे विधान केल्यास त्याच्या थोबाडीत मारणार, असे विधान गोवा विद्यापिठाच्या एका कार्यक्रमाच्या वेळी केले होते. श्री. हरमलकर यांनी कोकणीविरोधी विधान केल्याचा कांगावा करून कोकणीमोगी (कोकणीप्रेमी) या नावाने काहींनी त्यांना धमकी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री. हरमलकर यांनी हे विधान केले.

सौदी अरेबिया : भारतविरोधी आतंकवाद्यांचा अड्डा !

१. उच्चशिक्षित मुसलमान युवकही आतंकवादी बनणे
     मागील काही काळापासून सौदी अरेबिया हा आतंकवाद्यांचा अड्डा बनत चालला आहे. एक काळ असा होता की, ज्यांना आतंकवादी बनवले जात होते, ते अशिक्षित लोक असायचे; परंतु आता काळानुसार हा प्रवाह पालटला आहे. आताच्या काळात जे मुसलमान आतंकवादी सिद्ध केले जातात, ते सर्व शिकलेले असतात. त्यांमध्ये कुणी डॉक्टर, अभियंता किंवा वैज्ञानिकही असतो. केवळ इतकेच नव्हे, तर ते इस्लामचेही पूर्ण शिक्षण घेतात. हे लोक पैशांसाठी आतंकवादी तर होतातच; पण त्या समवेत त्यांच्या धर्माची सेवा करण्याचाही त्यांचा उद्देश असतो.

मूल्यांकन वार्षिक नको, प्रतिदिनच हवे !

     नुकतेच इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका अवैधरित्या वसतीगृहात आणून त्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा लिहून घेणार्‍या टोळीला जालना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त चर्चेत होते. ही टोळी संकेतांक लिहिलेल्या उत्तरपत्रिका शोधून काढून त्यामध्ये विद्यार्थ्याने न सोडवलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहीत असे आणि त्यानंतर शिक्षक अशा परिपूर्ण उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करत असे. तसे पहायला गेले, तर परीक्षाकाळात जवळ बसलेल्या विद्यार्थ्याचे उत्तर पाहून लिहिणे, संभाव्य प्रश्‍नांच्या उत्तरांच्या छोट्या छायांकित प्रती जवळ बाळगणे (कॉपी), एकमेकांना विचारून उत्तरे लिहणे, खाणाखुणा करून उत्तरे विचारणे, लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने प्रश्‍नांची उत्तरे वाचून येणे, असे अपप्रकार सर्रास चालतात; पण बारकोड असलेल्या उत्तरपत्रिका शोधून काढून पैसे चारणार्‍या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका पुन्हा लिहिणे हा प्रकार भयंकरच होता. विद्यार्थ्यांनी अशी कुकृत्ये करण्यासाठी बुद्धी खर्च करण्यापेक्षा तीच बुद्धी अभ्यास करण्यासाठी वापरली, तर संबंधित विद्यार्थी सध्याच्या शिक्षणप्रक्रियातून विनाकष्ट बाहेर पडू शकतो; पण घोडे नेमके इथेच अडते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

मंदिरे आणि धर्म हे सत्ता अन् संपत्ती यांचे निदर्शक !

     कोल्हापूर येथे एका प्रसंगी भाषण करतांना न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी पुढील आशयाचे उद्गार काढले, भारतामधील मंदिरे आणि धर्म हे सत्ता अन् संपत्ती यांचे निदर्शक आहेत. देव किंवा अध्यात्मवाद यांच्याशी त्यांचा संबंध नाही. (सरकारीकरण झालेल्या मंदिरांची स्थिती गेल्या ३२ वर्षांत शेकडो पटींनी भयावह झाली आहे ! - संपादक) 
- महाराष्ट्र हेराल्ड (१६.१२.१९८२) (प्रज्ञालोक, १९८३)

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

    विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो. - मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली सोलापूर जिल्ह्यातील कु. समृद्धी बाळासाहेब करडे (वय १८ वर्षे) !

कु. समृद्धी करडे
       घारी, बार्शी, सोलापूर येथे रहाणारी कु. समृद्धी बाळासाहेब करडे हिचा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी (६.४.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे, तिला सूक्ष्मातून दिसलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आणि तिने तिच्या आईविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता येथे देत आहोत.
कु. समृद्धी करडे हिला 
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. वर्ष २०१५ या 
वर्षभरातील लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. वर्तमानकाळात रहाणे : समृद्धी नेहमी सत्य बोलते. ती सतत वर्तमानकाळात रहाते. भूतकाळ किंवा भविष्यकाळातील चांगले-वाईट प्रसंग आठवून कधी आनंदी किंवा दुःखी होत नाही.
१ आ. उत्तम स्मरणशक्ती : तिची स्मरणशक्ती चांगली आहे. ती अभ्यासात हुशार आहे. एखादी व्यक्ती, रस्ता, वास, चव एकदा अनुभवले की, ते तिच्या नित्य स्मरणात रहाते.
१ इ. तिच्याशी मैत्रिणी, ओळखीच्या व्यक्ती, नातेवाईक प्रेमाने आणि आदराने वागतात.

भावपूर्ण प्रार्थना करणारा, शांत, स्थिर आणि आनंदी दिसणारा, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. सोहम् उदय बडगुजर ! (वय ४ वर्षे)

        चि. सोहम् उदय बडगुजर याचा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी (६.४.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे वडील आणि आजी यांना जाणवलेली त्याच्याविषयीची सूत्रे येथे देत आहे.
चि. सोहम् उदय बडगुजर यास सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद ! 
घोषणा देतांना चि. सोहम् बडगुजर
 १. श्री. उदय रविंद्र बडगुजर (सोहम्चे बाबा)
१ अ. आनंदी दिसणे : सोहम्चा आध्यात्मिक स्तर घोषित झाल्यापासून तो शांत, स्थिर आणि अंतर्मुख असल्याचे आमच्या लक्षात आले. त्याच्या तोंडवळ्यावर सतत आनंद दिसतो. तो कुठलीही वस्तू घेण्यासाठी हट्ट करत नाही.
१ आ. उत्कृष्ट वेशभूषा घातल्याचे पाहून शाळेतील बाईंनी गौरवणे : सोहम्च्या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम होता. त्या वेळी त्याने सात्त्विक वेशभूषा केली होती आणि नाम (टिळा) लावले होते. तेव्हा शाळेतील बाईंनी उत्कृष्ट वेशभूषा म्हणून सोहम्चे नाव घेऊन गौरवले.

हरिभक्तिकी प्यास ।

हरिभक्तिकी प्यास ।बुझाए न बुझे ॥
पियामिलनकी आस । मिटाए न मिटे ॥ १ ॥
प्रेम-रस भरे सुनयन । बिना बोले कह जाए ॥
श्यामपियासे मधुर-मिलन । बिना बताए हो जाए ॥ २ ॥
विरहकी अगन । बहुत तडपाए ।
कांटोंसी चुभन । गहरी हो जाए ॥ ३ ॥
मनमोहनकी प्रीत । छिपाए न छिपे ॥
प्रेमभरा संगीत । भुलाए न भुले ॥ ४ ॥
प्यारे मनमोहन । संसारमें हम न रमे ॥
भक्तिभरा मन । श्याममें रमे ॥ ५ ॥
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०१४)

कळीचे फूल होऊन प.पू. डॉक्टरांच्या चरणी समर्पित होण्यासाठी एका कळीने पू. (सौ.) बिंदाताईंना कळकळीने केलेली याचना !

१. कृष्णाने आनंदी फुलाच्या कळीला
 उमलण्यासाठी पू. (सौ.) बिंदाताईंकडे (आईकडे) सोपवणे 
कु. गौरी मुद्गल
         प.पू. डॉक्टरांनी माझ्या जीवनात आनंद दिला आणि मी सतत आनंदी रहाण्यासाठी त्यांनी आनंदी फुलाची एक कळी दिली. ती कळी उमलण्यासाठी श्रीकृष्णाकडे गेली. श्रीकृष्णाने त्या कळीला उमलण्यासाठी गोकुळात (रामनाथी आश्रमात) पू. बिंदाताईंकडे (आईकडे) सोपवले. आईने व्यष्टी साधनेचे आणि प्रेमाचे खत अन् पाणी दिले. ते फूल उमलत असतांना त्याला दोष आणि अहंची किड लागू नये; म्हणून तिने त्या फुलाला आपल्या मायेच्या छत्रछायेखाली ठेवले.
२. कळीचे फूल होण्यासाठी योग्य 
खत आणि पाणी घालून पू. बिंदाताईंनी काळजी घेणे
       त्या कळीच्या पाकळ्यांना ऊन, पाऊस लागू नये, याची त्यांनी काळजी घेतली. गेल्या वर्षी नवरात्रीत ७ व्या माळेला पू. आईंनी मला स्वतःहून भ्रमणभाष केला आणि सांगितले, तुझे चित्र प.पू. डॉक्टरांना आवडले आहे; म्हणून त्यांनी प्रसाद दिला आहे. त्यांनी वेळात वेळ काढून या कळीची आठवण काढली. तेव्हा या कळीला कृतज्ञतेचा पाझर फुटला. पू. ताई (आई) दिवस-रात्र सेवा करतात; पण वेळात वेळ काढून या फुलाला खत आणि पाणी घालतात; म्हणून ही कळी थोडीशी आनंदाने फुलली. ही कळी पूर्ण फुलण्यासाठी आईंनी या नवरात्रीला प.पू. डॉक्टरांचे चरण आणि महाप्रसाद दिला अन् प्रेमाने जवळ घेतले. आता ही कळी सेवा करून उमलत आहे.

अध्यात्मप्रसारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाकरता चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन या कार्यात हातभार लावा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
१. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेले महान कार्य !
     मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी नाडीवाचनातून सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा २३ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम, संशोधन केंद्रे यांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत.
२. अध्यात्मप्रसारासाठी केला जाणारा हा दैवी प्रवास निर्विघ्नपणे 
पार पडण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीची तातडीने आवश्यकता !
     पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत २,७५,००० कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. दूरदूरच्या ठिकाणी होणार्‍या सततच्या प्रवासामुळे दौर्‍यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनाला सध्या तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याच्या दुरुस्तीमध्ये बराच वेळ जात आहे.
      दौर्‍याच्या माध्यमातून होणारे हे कार्य निर्विघ्नपणे चालू रहाण्यासाठी महिंद्रा आस्थापनाच्या स्कॉर्पिओे या गाडीची तातडीने आवश्यकता आहे.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
         सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
रामनाथी आश्रमात आल्यावर 
साधिकेने अनुभवलेले आणि वेचलेले भावमोती !
१. अनुभूती
अ. रामनाथी आश्रमात आल्यावर मी स्वर्गात, म्हणजे साक्षात् ईश्‍वराच्या सान्निध्यात आले आहे, या कृतज्ञतेच्या जाणिवेने मन भरून आले.
आ. स्वागत कक्षातील बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराजांच्या) छायाचित्राकडे बघून माझी भावजागृती होऊन मला गुरूंना भेटण्याची ओढ वाढली.
इ. प.पू. गुरुदेवांचा सत्संग चालू असतांना मला हा सत्संग संपूच नये, असे वाटले.

हिंदु राष्ट्राची स्थापना योग्य वेळी होणार असणे

श्री. राम होनप
          भारतात राष्ट्र आणि धर्माची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, असे वाटते. हिंदूंना असे वाटणे स्वाभाविक असले, तरी ज्याप्रमाणे मूल जन्माला येण्यासाठी नऊ मास वाट पहावी लागते, त्याप्रमाणे काळगर्भात हिंदु राष्ट्र स्थापनेचे बीज पेरले गेले असून हिंदु राष्ट्ररूपी अपत्य अवतरित होण्यासाठी संतांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०१६)

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
      सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

'हिंदु जनजागृती समिती'च्या कार्यकर्त्यांना सूचना

गुढीपाडव्यानिमित्त प्रबोधन करण्यासाठी 
 इंग्रजी नववर्षाच्या तुलनेत गुढीपाडव्याचे महत्त्व आणि 
हिंदु संस्कृतीची प्राचीनता या सूत्रांचा समावेश असलेले नूतन पत्रक उपलब्ध ! 
     'हिंदु जनजागृती समिती'च्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त यापूर्वी एक 'ए-५' आकारातील पाठपोठ प्रबोधनपत्रक आपण उपलब्ध केले होते. त्यासोबतच आता '१ जानेवारीपेक्षा गुढीपाडव्याला नववर्ष का साजरे करावे ?' आणि 'हिंदु संस्कृतीची प्राचीनता' या सूत्रांचा समावेश असणारे ए-५ आकारातील आणखी एक पत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करतांना या पत्रकाचाही वापर करावा. ज्या जिल्ह्यांनी यापूर्वीचे पत्रक मुद्रित करून घेतले असेल, त्यांनी हे नवे पत्रक पुन्हा मुद्रित करण्याची आवश्यकता नाही; मात्र जे प्रथमच पत्रक मुद्रित करणार आहेत, त्यांनी जिल्ह्यातील जनमानसाचा अभ्यास करून आवश्यक ते कोणतेही एक पत्रक मुद्रित करून घेऊ शकतो, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

सनातनचा बालसाधक कु. देवनारायण (वय १३ वर्षे) याला ओलंपियाडच्या परीक्षेत मिळालेले यश !

कु. देवनारायण
     सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारा केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम् जिल्ह्यातील बालसाधक चि. देवनारायण (इयत्ता ७ वी, वय १३ वर्षे) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओलंपियाड २०१५-२०१६ या परीक्षेत नॅशनल साइबर स्पेस या विषयावरील परीक्षेत राज्य स्तरावर दुसर्‍या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तो नॅशनल सायन्स या विषयावरील परीक्षेत राज्य स्तरावर चौथ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ४४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो नॅशनल इंग्लीश या परीक्षेत राज्य स्तरावर १९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
           कु. देवनारायण साधना म्हणून प्रतिदिन नामजप आणि आध्यात्मिक उपाय करतो, तसेच प्रासंगिक सेवाही करतो.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (६.४.२०१६) रा. ८.३७ वाजता
समाप्ती - फाल्गुन अमावास्या (७.४.२०१६) दु. ४.५४ वाजता
उद्या अमावास्या आहे.


पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.


शुद्ध उच्चार करण्याचे महत्त्व !

      एका वृत्तातील नावाविषयी मी संबंधित साधकांना भ्रमणभाषवरून संपर्क केला. त्यांनी मला त्या व्यक्तीचे नाव सांगितले. त्यांचे नाव एम्. रामकुमार असे होते; परंतु ते साधक एम्चा उच्चार यम् असा करून पूर्ण नाव सलग उच्चारत होते. त्यामुळे मला ते नाव यमराम कुमार असे ऐकू आले. मला शंका आल्याने मी त्यांना विचारले, व्यक्तीचे नाव यमराम कसे असेल ? त्यानंतर त्यांनी नावातील एम् हे इंग्रजीतील अक्षर असल्याचे सांगितल्यावर व्यक्तीचे नाव एम्. रामकुमार असे असल्याचे मला समजले.
- कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

रुग्णाईत साधिकांनी प.पू. डॉक्टरांना लिहिलेले प्रार्थनारूपी पत्र !

तुमच्या वेड्या लेकींकडून 
कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण नमस्कार ! 
        प.पू. बाबा, आम्हाला तुमचे गुपित कळले आहे. कोणते ते, ओळखा पाहू ?
       आम्हाला कांजिण्या झाल्या आहेत; पण आम्हाला त्याचा किंचितही त्रास होत नाही; कारण तो त्रास सर्वस्वी तुम्ही घेतला आहे. प.पू. डॉक्टर, तुम्ही आम्हा लेकरांसाठी जन्मापासून आतापर्यंत जे केले आहे, जे करत आहात, पुढे करणार आहात, त्याचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही ! देवा, आम्ही तुझ्या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना करतो की, तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी भावपूर्ण अन् परिपूर्ण साधना करवून घ्या.
गुरुचरणांशी एकरूप होण्यासाठी आतूर झालेल्या,
- कु. अमृता मुद्गल, कु. गीतांजली काणे आणि कु. गौरी मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०१६)

गुढीपाडव्यानिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत नववर्षारंभ विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : ८ (४ रंगीत + ४ कृष्णधवल) 
मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

साधकांनो, विहंगम मार्गाने प्रगती करण्यासाठी साहाय्यक ठरणार्‍या आध्यात्मिक मैत्रीद्वारे मनमोकळेपणा वृद्धींगत करा आणि आनंदाचे डोही आनंद तरंग या उक्तीची अनुभूती घ्या !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
      संकल्प-विकल्प हे मनाचे कार्य असल्याने मनात योग्य-अयोग्य विचारांची शृंखला चालू असणे साहजिकच आहे. बर्‍याचदा मनात नकारात्मक, तसेच अन्य अयोग्य विचार आल्यास साधक त्यावर लगेचच मात करू शकतात; पण काही वेळा त्या विचारांची तीव्रता अधिक असल्याने त्यावर ते स्वतः मात करू शकत नाहीत. त्यामुळे त्या विचारांशी संघर्ष करण्यात त्यांच्या साधनेची ऊर्जा मोठ्या प्रमाणावर खर्च होते. परिणामी त्यांच्या व्यष्टी, तसेच समष्टी साधनेवर विपरित परिणाम होतो. अशा वेळी त्यांनी मनातील सर्व विचार योग्य साधकाशी वेळोवेळी मोकळेपणाने बोलून साधनेसाठी पुढील दिशा घेणे आवश्यक असते. या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.
१. आध्यात्मिक मैत्री म्हणजे काय ?
       मनातील अयोग्य विचाररूपी अडथळ्यांची शुद्धीयज्ञात आहुती देऊन अंतरात साधनेच्या तळमळीची ज्योत प्रज्वलित करणे आणि सतत आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करून मनमंदिरात श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवणे, यांसाठी श्रीगुरूंनी दिलेले सर्वोत्तम साधन म्हणजे आध्यात्मिक मैत्री ! 
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     वैद्य नसलेल्यांनी अमुक रोगासाठी अमुक औषध द्या, अशी मागणी वैद्यांकडे करणे जसे हास्यास्पद असते, तसे अध्यात्माचा अभ्यास नसणार्‍यांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरांतील गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश द्या, शनीच्या चौथर्‍यावर स्त्रियांना चढू द्या, इत्यादी मागण्या करणे हास्यास्पद आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सन्मार्गावरून चालण्याचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     सत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण चित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्यजीवनातील सुवर्णक्षण होय ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)बोधचित्र


पाणीबाणी !

संपादकीय
     नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे भारतातही गेल्या काही वर्षांत दुष्काळही आता नेहमीचाच झाला आहे. गेल्या १० वर्षांत पर्जन्यमान सातत्याने अल्प होत आहे. कृषीप्रधान म्हणवून घेणार्‍या आणि जिथे अनेक पिके केवळ पावसाच्या पाण्यावर घेतली जातात, अशा अनेक राज्यांत पाऊस न झाल्याने पिके आलेलीच नाहीत. शेती आणि अन्य वापरासाठी तर लांबच; पण पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे, अशी गंभीर परिस्थिती अनेक जिल्ह्यांत निर्माण झाली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ यांसह अनेक भागांत गंभीर परिस्थिती आहे. सलग ४ वर्षे अल्प पाऊस झाल्याने राज्यातील जवळपास ३ सहस्र ७०० हून अधिक छोट्या-मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा पार तळाला गेला आहे. नाशिक, संभाजीनगर, ठाणे यांसह अनेक प्रमुख शहरांत आठवड्यातून एक-दोन दिवस पाणी बंद, तर लातूर शहरात पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. लातूर शहरात दोनच दिवसांपूर्वी पाण्यासाठी चिडलेल्या लोकांनी जमावबंदीचे कलम धुडकावून पाण्याच्या टाक्यावर चढून रोष व्यक्त केल्याने पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय प्रशासनास घ्यावा लागला आहे. पुढील दिवसांत पाणी कोठून भरायचे, अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यातच भूजल पातळी कमालीची खालावलेली असल्याने महाराष्ट्रात पाणीबाणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn