Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पनामा पेपर्सने करचुकवेगिरी करणार्‍या कोट्यधिशांची नावे उघड केली!

अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या बच्चन यांच्यासह ५०० भारतियांचा समावेश !
देशाचा कररूपातील पैसा लपवणारे राष्ट्रद्रोहीच होत !
शासनाने अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !
      नवी देहली - २०० हून अधिक देशांतील अनेक राजकारणी, आजी-माजी राष्ट्रप्रमुख, अतीमहनीय व्यक्ती आणि गुन्हेगार यांनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गुप्तपणे आस्थापने (कंपन्या) स्थापन केल्याची खळबळजनक माहिती पनामा पेपर्सच्या माध्यमातून समोर आली आहे. इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आय्सीआय्जे) या अमेरिकेतील संशोधनात्मक पत्रकारांच्या संघटनेने ही माहिती उघड केली आहे. (भारतीय प्रसारमाध्यमे यातून काही बोध घेतील का ? - संपादक) त्यांनी या माहितीचे पनामा पेपर्स असे नामकरण केले.
     करचुकवेगिरी करणार्‍या या सूचीत तब्बल ५०० हून अधिक भारतियांचा समावेश असून यात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री सौ. ऐश्‍वर्या बच्चन, डीएल्एफ्चे प्रवर्तक के.पी. सिंह, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत यांच्यासह अनेक भारतियांचा समावेश आहे. (उद्या ही माहिती सत्य असल्याचे सिद्ध झाले आणि राष्ट्रप्रेमी जनतेने संबंधित अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला, तर त्यात कोणाला आश्‍चर्य वाटायला नको ! - संपादक) १. मध्य अमेरिकेच्या पनामा या देशातील मोसॅक फॉन्सेका या कायदेविषयक आस्थापनाकडील अनुमाने एक कोटी दहा लाख दस्तावेजांचा ८ मासांपेक्षा अधिक काळ अभ्यास केल्यानंतर विविध माहिती आणि नावे पुढे आली

मुख्यमंत्र्यांच्या भारतमाता की जय म्हणावेच लागेल या विधानावरून विधानसभेत वातावरण तापले, कामकाज २ वेळा स्थगित !

भारतमाता की जय या शब्दावरून गदारोळ माजवायला आणि 
राष्ट्रध्वज उलटा फडकवायला हा पाक आहे का ? अशा 
लोकप्रतिनिधींना या देशात रहाण्याचा काय अधिकार !
विशेष प्रतिनिधी श्री. संतोष पाटणे
      मुंबई - नाशिक येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय म्हणावेच लागेल, असे विधान केले होते. या विधानाचे ४ एप्रिलला विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विधानसभेत विरोधी पक्षाने यावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. या सूत्रांवरून झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम १५ मिनिटे आणि नंतर ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. (गदारोळ माजवून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यास भाग पाडणार्‍या आणि जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घालवणार्‍या लोकप्रतिनिधींमुळेच लोकशाही निरर्थक ठरली आहे ! अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणारी जनता याविषयी त्यांना खडसावणार का ? - संपादक)
राष्ट्रध्वज उलटा फडकवणे, हा देश स्वतंत्र होण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी
प्राणार्पण करणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा अन् क्रांतीकारकांचा अवमानच होय !
विरोधी पक्षातील सदस्यांनी राष्ट्रध्वज उलटा धरल्याने गदारोळ !
सदस्यांवर कारवाई करून सदस्यत्व रहित करण्याची महसूलमंत्री एकनाथ खडसेंची मागणी !
     या वेळी विरोधी पक्षाच्या वतीने राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होते. त्यातील काही सदस्यांनी राष्ट्रध्वज उलटा पकडलेला दिसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि हसन मुश्रीफ या सदस्यांची नावे घेऊन त्यांच्यावर कारवाई करून निलंबनाची मागणी केली. (केवळ मागणी नको, तर अशी देशद्रोही कृत्ये करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! - संपादक) यावर सभापतींनी चित्रफीत पाहून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले.
विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा वैचारिक गोंधळ !
     राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून सामान्यांच्या, अल्पसंख्यांकाच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची क्षमा मागावी. शासनाची भूमिका धर्माधर्मांत तेढ निर्माण करणारी आहे.

(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्तोम बंद न केल्यास जनता मुडदे पाडील !

प्रकाश आंबेडकर यांची मुक्ताफळे !
मुडदे पाडण्याची भाषा करणे राज्यघटनेत बसते का ? प्रकाश आंबेडकरांची ही सहिष्णुता आहे का ?
      नागपूर - समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे. शासन आणि कायदा त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळेच आंदोलन करणार्‍यांना वेगवेगळी लेबले लावून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असेच स्तोम देशात चालू ठेवून सत्ता चालवल्यास येणार्‍या काळात जनता त्यांचे मुडदे पाडल्याशिवाय रहाणार नाही, अशी मुक्ताफळे भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी उधळली.
     सरसंघचालकांनी समरसता आणि समानता यावर आमने-सामने यावे, असे थेट आव्हानही आंबेडकरांनी दिले. कस्तूरचंद पार्कवर ३ एप्रिल या दिवशी आयोजित जातिअंत परिषदेच्या निमित्ताने आंबेडकर बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले की, मुळात संघाने बाबासाहेबांना कधी स्वीकारलेच नाही. त्यांचा विचार स्वीकारला असता, तर महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात कधीच प्रवेश मिळाला असता.

... अन्यथा भारतमाता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकांची मुंडकी छाटली असती ! - योगऋषी रामदेवबाबा

पूर्वीपासून देशातील जनतेला राष्ट्रभक्ती शिकवली असती, तर
भारतमाता की जयम्हणा, असे सांगावे लागले नसते, तसेच अशी 
घोषणा देण्यास नकार देणार्‍यास जनतेनेच धडा शिकवला असता !
      रोहतक (हरियाणा) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही, असे म्हटल्यानंतर आता योगऋषी रामदेवबाबा यांनीही, कायद्याने हात बांधले आहेत अन्यथा भारतमाता की जय बोलण्यास नकार देणार्‍या एकाचे नव्हे, तर लाखो लोकांची मुंडकी छाटली असती, असे म्हटले आहे.
      एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे नाव घेता रामदेवबाबा म्हणाले, मान कापली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे जर कुणी म्हणत असेल, तर मला त्यांना सांगायचे आहे की, आम्ही कायद्याचा आणि राज्यघटनेचा आदर करतो अन्यथा सहस्रावधीच काय; पण लाखो मुंडकी आम्ही छाटू शकतो. अशा प्रकारे बोलण्याची लोकांना लाज वाटायला हवी. प्रत्येकाने मातृभूमीचा आदर केला पाहिजे.

कोल्हापूर येथील करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात अवनि संस्थेच्या महिलांचा घुसण्याचा प्रयत्न

  • पुजार्‍यांनी महिलांचा प्रवेश रोखला 
  • स्थानिक महिलांनी त्या महिलांना मंदिराबाहेर पिटाळले
      कोल्हापूर - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात अन्न, वस्त्र, निवारा (अवनि) या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु मंदिराच्या पुजार्‍यांनी त्या महिलांना गाभार्‍यात जाण्यापासून रोखले. अवनि संस्थेच्या महिलांना विरोध झाल्याने आंदोलक महिलांनी गाभार्‍यातच तीव्र घोषणाबाजी केली. या वेळी तेथे जमलेल्या स्थानिक महिलांनी त्या महिलांना मंदिराच्या आवारातून बाहेर पिटाळले. या घटनेमुळे मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अवनि या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना नोटीस बजावली आहे.
     मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रवेश दिला जावा. या आदेशामुळे २ एप्रिल या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथेही काही नास्तिकवादी आणि पुरो(अधो)गामी महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळण्यासाठी अयशस्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी अनुराधा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा तेंडुलकर यांनी आंदोलन केले.
१. अनुराधा भोसले, अनुराधा तेंडुलकर आणि अन्य काही महिला कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषेत मंदिरामध्ये प्रवेश केला.
२. या वेळी त्या महिलांना गाभार्‍याबाहेर पितळी उंबर्‍यापासून आत जाण्यास श्रीपूजक आणि इतर महिला यांनी मज्जाव केला.

समान हक्क, न्याय आणि अस्मिता यांच्या नावाखाली काही महिला संघटनांनी शनिशिंगणापूरचे रणमैदान केले !

धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या धर्मद्रोह्यांना दैनिक सामनामधून चपराक !
      मुंबई - समान हक्क, न्याय आणि अस्मिता यांच्या नावाखाली काही महिला संघटनांनी शनिशिंगणापूरचेा रणमैदान केले आहे, अशा शब्दांत धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या धर्मद्रोह्यांना दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहे. या लेखात पुढे म्हटले आहे की,
१. श्री शनिदेवाच्या चौथर्‍याला सशस्त्र पोलिसांनी घेरले आहे आणि राजकारणी धडका मारून ते कडे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात आता एवढेच व्हायचे शिल्लक राहिले होते !
२. श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाही, ही रूढी, अंधश्रद्धा अथवा परंपरा आहे कि यापेक्षा त्यास काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे, यावरही चर्चा होणे आवश्यक आहे. यासंदर्भात साधकबाधक चर्चा न होता हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले आणि निर्णय झाला.
३. श्री शनिमंदिरातील श्रद्धेचा विषय सामंजस्याने सोडवायला हवा. श्री शनिशिंगणापूर येथील श्रद्धेचे निवाडेही मंदिराचे विश्‍वस्त, गावकरी आणि समाजातील धुरिण यांनी एकत्र बसूनच सोडवणे आवश्यक आहे.
४. श्रद्धेच्या विषयांचे जसे राजकारण होऊ नये, तसे न्यायालयात आमच्याच श्रद्धांचे धिंडवडेदेखील निघू नयेत. काही जण याचे राजकारण करत असल्याने शनिशिंगणापुरात कायदा-सुव्यवस्थेची जी परिस्थिती निर्माण झाली ती चिंताजनकच आहे.
५. मंदिरात महिलांना प्रवेश हवाच, असे न्यायालयाने बजावले; पण हा निर्णय मुसलमानांनासुद्धा लागू पडेल का ? दर्गा, मशिदीत महिला जाऊ शकतील का ?
६. मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यातदेखील महिलांना प्रवेशबंदी आहे. या बंदीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे.

१० शीख युवकांच्या बनावट चकमक प्रकरणी ४७ पोलिसांना जन्मठेप !

पीलभीत येथील वर्ष १९९१ ची घटना
उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच नव्हे का ?
     पीलभीत (उत्तरप्रदेश) - वर्ष १९९१ मधील येथील १० शीख युवकांच्या बनावट चकमक प्रकरणी सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या) विशेष न्यायालयाने ४७ पोलीस कर्मचार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवली आहे. या पोलिसांनी १२ जुलै या दिवशी तीर्थयात्रेकरूंच्या बसमधून या शीख युवकांना उतरवून त्यांना आतंकवादी म्हणून ठार मारले होते. या प्रकरणातील सुनावणीच्या काळात १० आरोपी पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
     १ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी सीबीआयचे विशेष न्यायाधीश लल्लू सिंह यांनी त्यांच्या आदेशामध्ये सांगितल्यानुसार, १२ जुलै १९९१ या दिवशी यात्रेकरूंच्या बसमधून ११ युवकांना कछाला घाटाजवळ उतरवून त्यांना निळ्या गाडीत बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना ३ गटांमध्ये विभागून रात्रीच्या वेळी ३ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रांतील जंगलांमध्ये ठार मारण्यात आले. त्यांच्यापैकी १० जणांचे मृतदेह मिळाले, तर एकाविषयी माहिती मिळू शकली नाही. न्यायालयाने सांगितले की, या सुनावणीच्या वेळी जे पुरावे आणि साक्षीदार सादर करण्यात आले, त्यावरून आरोपी पोलिसांनी या युवकांना कह्यात घेतल्यानंतर केवळ २४ घंट्यांमध्ये त्यांचे मृतदेह मिळाले.

अल्पवयीन मुलांचा अमली पदार्थ व्यवसायासाठी वापर : शैक्षणिक संस्थांमधून जागृती

शासनाने आतापर्यंत या समस्येवर ठोस उपाययोजना न आखल्याचाच हा परिणाम आहे ! 
गोव्याला अमली पदार्थांचा विळखा !
     पणजी - अन्वेषण यंत्रणांची कारवाई चुकवण्यासाठी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा अमली पदार्थ व्यवसायासाठी वापर केला जात आहे. हे रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती करण्यात येत आहे, अशी माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिली आहे.
     अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अन्वेषण यंत्रणांना अल्पवयीन मुलांची कधीही शंका येत नाही आणि याचा लाभ उठवत त्यांचा अमली पदार्थ व्यवसायासाठी वापर केला जात आहे. या मुलांचा अमली पदार्थ ने-आण करण्यासाठी वापर केला जात असून त्यांना या व्यवहारातील काही भाग दिला जातो. (एवढे होईपर्यंत अन्वेषण यंत्रणा काय करत होत्या ? अमली पदार्थ व्यवसायामुळे गोमंतकाचे किती मोठ्या प्रमाणावर अधःपतन होत आहे, हेच यावरून दिसून येते ! - संपादक) अन्वेषण यंत्रणांनी अमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना कह्यात घेतल्यावर हे सूत्र समोर आले आहे. ही अल्पवयीन मुले अमली पदार्थाच्या व्यसनाची शिकार होत असल्याचेही उघड झाले आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाने यासंबंधी जागृती करणारे ६० हून अधिक कार्यक्रम घेतले असून अनुमाने १७ सहस्र विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती केली आहे. विभागाने मागील काही वर्षांत अमली पदार्थ व्यवसायाला अनुसरून एकूण २१ व्यावसायिकांना पकडले असून यामधील ७ जण हे परराज्यांतील नागरिक आहेत.

(म्हणे) माध्यम न पहाता शासनाकडे नोंद असलेल्या सर्वच प्राथमिक शाळांना अनुदान द्यावे !

गोवा फॉर्वर्ड पक्षाची मातृभाषाद्रोही मागणी !
     पणजी - माध्यम न पहाता शासकीय स्तरावर नोंद असलेल्या सर्वच प्राथमिक शाळांना अनुदान द्यावे, अशी मातृभाषाद्रोही मागणी गोव्यात नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा फॉर्वर्ड पक्षाने घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी ही माहिती येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. तिंबले यांनी गोवा फॉर्वर्डची माध्यम प्रश्‍नावरील भूमिका पत्रकार परिषदेत घोषित केली. 
     तिंबले पुढे म्हणाले, माध्यमप्रश्‍नी धोरण स्पष्ट असले पाहिजे. पालक आणि विद्यार्थी यांना असलेल्या माध्यम निवडण्याच्या अधिकाराचा आम्ही सन्मान करतो. (कोणत्या आजारावर कोणते औषध घ्यायचे, याचेसुद्धा स्वातंत्र्य नसते, तर पालक आणि विद्यार्थी यांना माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य किंवा अधिकार कसा देता येईल ? त्यासाठी शिक्षणतज्ञच लागणार आणि शिक्षणतज्ञांनी तर मातृभाषेतूनच शिक्षण हवे, असे म्हटले आहे ! - संपादक) वास्तविक शाळांमध्ये चांगला शिक्षकवर्ग नेमून, तसेच योग्य साधनसुविधा उपलब्ध करून शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, हेच शासनाचे कर्तव्य असते. प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले पाहिजे, असे म्हणणार्‍या विशेषत: ख्रिस्ती पालकांना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे.

अभाविपचे सुनील अंबेकर यांचे जेएन्यू प्रकरणावर ५ एप्रिलला पणजी येथे व्याख्यान

     पणजी - चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी गुढीपाडव्यास दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार आहे. या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर प्रमुख वक्ता या नात्याने राष्ट्रवाद राष्ट्रविरोधी वृत्ती या विषयावर आणि जेएनयू प्रकरणाच्या संदर्भाला अनुसरून व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभाविप आणि चैतन्य प्रतिष्ठान यांनी केले आहे.

मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

      श्रीनगर - भाजपच्या पाठिंब्यावर जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ४ एप्रिलला शपथविधी पार पडला. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. या वेळी राज्यपाल एन्.एन्. व्होरा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुफ्ती शासनामध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे भाजप नेते निर्मल सिंह यांनीही या वेळी शपथ घेतली. या वेळी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान कार्यालयाचे (राज्यमंत्री) जीतेंद्र सिंह उपस्थित होते.


क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्याच्या भावासह दोघे कह्यात

      ठाणे - टी-२० विश्‍वकप क्रिकेट सामन्यांतील भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील काँगेसच्या वरिष्ठ नेत्यासह दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकार्‍यांनी कल्याण येथील गौरी पाडा परिसरातील एका इमारतीवर छापा टाकून दिलीप वर्मा आणि राधेश्याम पारसनाथ गोस्वामी उपाख्य शम्मु तिवारी यांना कह्यात घेतले आहे. शम्मु तिवारी हे ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन तिवारी यांचे भाऊ आहेत. मोहन तिवारी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि ठाण्याच्या समन्वय समितीचे सदस्य आहेत.

आम्ही शेवटपर्यंत धर्म, श्रद्धा आणि परंपरा यांचे रक्षण करणारच ! - सौ. नयना भगत, सनातन संस्था

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करण्याच्या विषयावर 
टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन
सौ. नयना भगत
     मुंबई - आम्ही धर्मपरंपरांचे रक्षण करणारच. तृप्ती देसाईंना चौथर्‍यावर मुळीच जाऊ देणार नाही. राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्‍वरीय सत्ता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. १ एप्रिलला टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यामध्ये सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन निखिला म्हात्रे यांनी केले.

(म्हणे) 'हुकूमशाही प्रवृत्तीमुळे राज्यात आणि देशात उद्रेक होईल !'

शरद पवार यांचे भाकीत 
'भारतमाता की जय' म्हणण्याविषयी आग्रही रहाणे, यात हुकूमशाही काय ? 
     पुणे, ४ एप्रिल - मुख्यमंत्री हा कोणत्या पक्षाचा नसतो, तर तो राज्याचा आणि विविध जाती-धर्मांचा प्रमुख असतो. त्यामुळे राज्याच्या प्रमुखाने अशी भूमिका घ्यायची नसते. देशात आणि राज्यात अजून काही काळ अशी हुकूमशाही प्रवृत्ती राहिली, तर उद्रेक झाल्याशिवाय रहाणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चेतावणी दिली. 'भारतमाता की जय', असे म्हणणार नसाल, तर त्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

महिलांच्या मंदिरप्रवेशापेक्षाही रिक्शाचालकांचा विषय महत्त्वाचा असल्याविषयी पत्रकारांना सुनावले

महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या संदर्भातील प्रश्‍नाने सुप्रिया सुळे संतप्त 
     पुणे, ४ एप्रिल - महिलांच्या मंदिरप्रवेशापेक्षाही रिक्शाचालकांचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. मंदिराचा विषय थोडा बाजूला ठेवा. प्रत्येकच गोष्ट 'ब्रेकिंग न्यूज' नसते. रिक्शाचालकांच्या प्रश्‍नांविषयी विचारणार असाल, तर मी उत्तरे देते. या देशात कुठला विषय महत्त्वाचा आहे, हे तुम्हालाही कळायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना फटकारले. शिवनेरी रिक्शा संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सौ. सुळे सहभागी झाल्या होत्या. सोडत पद्धतीने रिक्शा परवाने मिळालेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना विनाअट रिक्शापरवाने देण्यात यावेत, या मागणीसाठी रिक्शाचालकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांनी कोल्हापूर येथे काही महिलांकडून गाभार्‍यात शिरण्याच्या झालेल्या प्रयत्नाविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी पत्रकारांना फटकारत महिलांच्या मंदिर प्रवेशाचे सूत्र प्रसिद्धीमाध्यमांकडून नको इतके उचलले जात असल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. रिक्शाचालकांचा विषय हा त्यांचा पोटापाण्याचा विषय आहे. तो प्रथम मार्गी लावू आणि नंतर मंदिराविषयी बोलू, असे त्यांनी सांगितले. (याला सुप्रिया सुळे यांचे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणायचे का ? न्यायालयाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महिलांनी शनिचौथर्‍यावर प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. या संदर्भात त्यांच्याच पक्षाच्या विद्या चव्हाण यांच्याकडूनही महिलांवर अन्याय होत असल्याच्या संदर्भात ओरड केली जात होती आणि आहे. जर सुळे यांना खरेच मंदिरप्रवेशापेक्षा अन्य सूत्रे महत्त्वाची वाटत असतील, तर त्यांनी सर्वप्रथम या संदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांचेच प्रबोधन करावे. - संपादक)

पाकचे अंग नसणार्‍या बलुचिस्तानला भारताने बांगलादेशप्रमाणे मुक्त करावे ! - वर्ल्ड बलोच वुमन्स फोरमच्या नेत्या नाएला कादरी

इंदिरा गांधी यांनी दाखवली तशी धमक मोदी शासन दाखवणार का ?
     बलुचिस्तान - बलुचिस्तानवर पाकने आक्रमण केले असल्याने ते पाकिस्तानचे अंग नाही. भारताने यामध्ये हस्तक्षेप करून पाकिस्तानला बलोच लोकांचा संहार करण्यापासून रोखायला हवे. भारताने जसे पूर्व पाकिस्तानात हस्तक्षेप करून बांगलादेशची निर्मिती केली, तसेच बलोचला साहाय्य करावे. बलोच समुदाय भारताकडे आशेने पहात आहे, असे आवाहन वर्ल्ड बलोच वुमन्स फोरमच्या अध्यक्षा नाएला कादरी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना केले. (भारताने उद्या बलुचिस्तानला पाकच्या जोखडातून मुक्त केले, तरी बलोची लोक भारताशी कृतज्ञ रहातील का ? आज बांगलादेशी भारताच्या मुळावर उठले आहेत, ते पहाता बलोची लोकांपासून सावध रहावे, असे भारतियांना वाटल्यास आश्‍चर्य नाही ! - संपादक)

मंगळवेढ्यात (जिल्हा सोलापूर) पशूवधगृहाकडे गोवंश घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

     मंगळवेढा (सोलापूर)- सांगोल्याहून तुळजापूरकडे पशूवधगृहात गोवंश घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडून टेम्पोचालक सादिक इब्राहिम जहांगिरदार, हसन शेख आणि हनिफ इलाही पठाण या धर्मांधांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याची तक्रार पोलीस नाईक विकास क्षीरसागर यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कौस्तुभ सागवेकर हे करीत आहेत.

पुढील सुनावणीच्या वेळी समीर गायकवाड यांना उपस्थित करण्याचे पोलीस प्रशासनाचे न्यायालयाला लेखी आश्‍वासन !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
  • पुढील सुनावणी ११ एप्रिलला 
  • पोलीस यंत्रणेच्या कारभारावर न्यायालयाची नापसंती 

     कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) - २९ मार्च या दिवशी समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करण्याविषयी न्यायालयाने आदेश देऊनही ४ एप्रिलला श्री. समीर गायकवाड यांना सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित करण्यात आलेे नाही. प्रत्येक वेळी पोलीस प्रशासन बंदोबस्ताचे कारण पुढे करते. हा न्यायालयाचा अवमान असल्याने पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केली. यावर अपर पोलीस अधीक्षक एस्. चैतन्या यांनी पुढील दिनांकाच्या वेळी समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करत असल्याचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. वारंवार न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस प्रशासन समीर यांना न्यायालयात उपस्थित करत नसल्याविषयी न्यायालयाने पोलीस यंत्रणेच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. पुढील सुनावणी ११ एप्रिलला होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे हे न्यायालयात उपस्थित होते, तर शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी बाजू मांडली. ४ एप्रिलला झालेल्या सुनावणीसाठी उचगाव येथील शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. रवींद्र एडके, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनय करी, श्री. दीपक रेडेकर, बजरंग दलाचे श्री. पिंटू तुरुके, हिंदु धर्माभिमानी श्री. बाळासाहेब निगवेकर उपस्थित होते. (सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या समर्थनार्थ उपस्थित रहाणार्‍या सर्वच हिंदु धर्माभिमान्यांचे आभार ! - संपादक)

(म्हणे), भाजप शासनामुळे उर्दू भाषेला 'बुरे दिन' !

मराठी भाषेच्या दुर्दशेविषयी काही न बोलणारे आमदार भारत भालके 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ४ एप्रिल 'अच्छे दिन' म्हणणार्‍या शासनामुळे उर्दू भाषेला 'बुरे दिन' येत असून उर्दू भाषेच्या उन्नतीसाठी आणि मुसलमान समाजाच्या विकास निधीविषयी राज्य शासनाची नियत खराब आहे, असे मत काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले. पंढरपूर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे आमदार भालके यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून चार संगणक संच देण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पंढरपूरचे आमदार भालके बोलत होते. 

देशद्रोही दारूल उलूम सारख्या संस्थेच्या संचालकांवर देशद्रोहाचा खटला भरा ! - विश्‍व हिंदू परिषदेचा धर्मप्रसार विभाग

     नाशिक - भारताची भूमी ही मातीचा तुकडा नसून तो साक्षात राष्ट्रपुरुष आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतमातेचा आदर करणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे; पण सध्या देशात देशविरोधी कारवाया वाढत आहेत. 'भारतमाता की जय म्हणू नका', असे फतवे काढण्यापर्यंत दारूल उलूम देवबंद या मुसलमानांच्या प्रमुख संस्थेची मजल जात आहे. आतंकवादी अफझलच्या समर्थनार्थ घोषणा देऊन देशद्रोह घडवणे यांच्या अंगवळणी पडले आहे. या देशद्रोहींवर, तसेच देशद्रोही दारूल उलूम सारख्या संस्थेच्या संचालकांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना देशातून हद्दपार करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रस्तरावर होणार्‍या राष्ट्रभक्तांच्या आंदोलनाच्या परिणामांचे दायित्व शासनाचे असेल, याची नोंद घ्यावी, अशी चेतावणी विश्‍व हिंदू परिषदेच्या धर्मप्रसार विभागाने दिली आहे. 

तालिबानने कुलभूषण जाधव यांना पकडून पाकला विकले !

पाकचा खोटारडेपणा उघड !
जर्मनीच्या माजी राजदूताचा गौप्यस्फोट
     नवी देहली - कुलभूषण जाधव यांना तालिबानने पकडून पाकिस्तानला विकले आणि त्यानंतर पाकने भारताचा गुप्तहेर पकडल्याचा गाजावाजा चालू केला, असा गौप्यस्फोट जर्मनीचे माजी राजदूत डॉ. गुंटर मुलक यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात आल्याच्या भारताच्या आरोपाला भक्कम आधार मिळाला आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कुलभूषण जाधव यांचे इराणमध्येच अपहरण झाले होते. आता या वृत्तामुळे अपहरण नेमके कोठे झाले, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. 
     डॉ. गुंटर मुलक यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्या वाढत्या मैत्रीमुळे भारतीय उपखंडात तणाव निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमार्गे थेट चीनपर्यंत जाणारा एक महामार्ग बनवण्याचे काम चीनच्या नेतृत्वाखाली चालू आहे. हा रस्ता भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकतो, असेही डॉ. मुलक यांनी सांगितले.

(म्हणे) मौलाना मसूद अझहरचे पाकमधून अफगाणिस्तानात पलायन !

भारताला वाकुल्या दाखवणार्‍या पाकचे डावपेच !
     नवी देहली - पठाणकोटवरील आक्रमणाचा सूत्रधार आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर पाकमध्ये नसून त्याने अफगाणिस्तानमध्ये पलायन केल्याच्या बातम्या पाककडून पसरवण्यात येत आहेत. यापूर्वी पाकने त्याला नजरकैदेत ठेवल्याचे म्हटले होते; मात्र आता पाक म्हणत आहे की, मसूद पाकमध्ये नाही.
    पठाणकोट आक्रमणाच्या अन्वेषणासाठी पाकचे संयुक्त अन्वेषण पथक भारतात येऊन गेल्यावर आता भारतीय अन्वेषण पथक पाकमध्ये जाणार आहे. पथकाकडून मसूद याच्या चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याने पाककडून मसूद पाकमध्ये नसल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

(म्हणे) पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकचा हात असल्याचे पुरावे नाहीत !

पाकमध्ये परतल्यावर पाकच्या अन्वेषण पथकाची कोलांटीउडी !
     इस्लामाबाद - पठाणकोट आक्रमणाच्या अन्वेषणासाठी भारतात आलेल्या पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाने या आक्रमणात पाकमधील आतंकवाद्यांचा हात असल्याचे पुरावे मिळाल्याचे म्हटले होते; मात्र भारतातून पाकमध्ये परतल्यावर त्यांनी कोलांटीउडी मारत पाकचा हात असल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. भारतीय अधिकारी पुरावे देण्यात अयशस्वी ठरले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
     भारतीय शासनाने पाकच्या संदर्भात गांधीगिरी करणे आता थांबवले पाहिजे. पाक हा विश्‍वासघातकी देश असून भारताचा अपमान करणे, हेच त्याचे राजकीय धोरण आहे. भारतीय जनतेची सहनशीलता संपली आहे, हे लक्षात घेऊन केंद्रशासनाने आता पाकच्या विरोधात अंतिम पाऊल उचलले पाहिजे !

फलक प्रसिद्धीकरता


हिंदु नवर्षारंभानिमित्त आतापासूनच वैशिष्ट्यपूर्ण फलकप्रसिद्धी करून जनप्रबोधन करा !
     हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फलकप्रसिद्धीकरिता वैशिष्ट्यपूर्ण माहिती असणारे लिखाण सिद्ध करण्यात आले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी हे लिखाण अधिकाधिक मंडळे, सार्वजनिक वाचनालये, तालीम, हिंदु संघटना आदींच्या फलकांवर लिहून प्रबोधन करावे. यामुळे आतापासूनच हिंदूंना हिंदु संस्कृतीची प्राचीनता लक्षात येण्यास साहाय्य होईल. फलकप्रसिध्दी कशी करू शकतो, याचे उदाहरण येथे देत आहोत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Amitabh, Aishwarya, DLFke KP Singhsahit 500 Bharatiyone apna paisa chhipane hetu videsh bheja: Panama Papers
Deshse dhokadhadi karnewalo ko saza ho.
जागो ! : अमिताभ, ऐश्‍वर्या, डीएल्एफ्के के. पी. सिंह सहित ५०० भारतियों ने अपना पैसा छिपाने हेतु विदेश भेजा : पनामा पेपर्स
देश से धोखाधडी करनेवालों को सजा हो !
श्रीपूजक अथवा देवस्थान समितीने कोणत्याही प्रकारे महिला भाविकांची अडवणूक केलेली नाही ! - श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ

     कोल्हापूर, ४ एप्रिल (वार्ता.) - श्री महालक्ष्मी देवस्थानात एका संस्थेच्या महिला कार्यकर्त्या गाभारा प्रवेशासाठी आल्या होत्या. त्यांनी ओटी भरून प्रसाद घेतला. यानंतर अचानकपणे काही महिला मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेण्याची मागणी करू लागल्या. त्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे दुपारचे महाभिषेक स्नान आणि अलंकार पूजेची सिद्धता चालू होती. त्यामुळे तेथे उपस्थित असणारे भाविक आणि महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये वादावादी चालू झाली. या वादावादीमुळे बाहेरील रांगेतील भाविकांना दर्शन मिळेना आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे महिला पोलीस कर्मचार्‍यांनी सर्वच महिलांना गाभार्‍याबाहेर काढले. यात श्रीपूजक अथवा देवस्थान समितीने कोणत्याही प्रकारे महिला भाविकांची अडवणूक केलेली नाही, असे प्रसिद्धीपत्रक श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव वासुदेव मुनीश्‍वर यांनी दिले आहे. 

गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीने आणलेले गंगाजल श्री शनिदेवाला चौथर्‍याखालूनच अर्पण करण्याचा देवस्थानचा निर्णय

     नगर, ४ एप्रिल - गुढीपाडव्याच्या दिवशी काशी येथून सायकलीवरून कावडीने आणलेले गंगाजल चौथर्‍याखालूनच अर्पण करण्याचा निर्णय श्री शनिशिंगणापूर देवस्थान आणि ग्रामस्थ यांनी घेतला आहे. यापूर्वी फक्त गुढीपाडव्याला पुरुष कावडधारक श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन गंगाजल अर्पण करत होते; परंतु सध्याची वादाची पार्श्‍वभूमी पहाता ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार उपरोक्त पालट करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे माजी विश्‍वस्त अधिवक्ता सयाराम बानकर यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे गणेशोत्सवात डॉल्बी लावल्याप्रकरणी ३७ मंडळांवर आरोपपत्र

अशीच तत्परता पोलिसांनी अन्य धर्मियांविषयीही दाखवणे अपेक्षित ! 
     कोल्हापूर - पोलिसांचे आदेश धुडकावून गणेशोत्सवात डॉल्बी लावल्याविषयी ३७ सार्वजनिक मंडळांचे २१३ कार्यकर्ते आणि डॉल्बी चालक यांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर आरोपपत्र दाखल केले आहे. भारतीय दंड विधान संहिता आणि ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक लक्ष रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. (मशिदींच्या भोंग्यावरून दिवसभरात ५ वेळा बांग देऊन ध्वनीप्रदूषण केल्याविषयी पोलीस कधी कृती करणार ? - संपादक) 

भारतातील असहिष्णुतेच्या वातावरणाचा लाभ घेण्याचा परकीय शक्तीचा प्रयत्न

पाकिस्तानातून भारतियांना दूरभाषवरून थेट प्रश्‍न !
शासनाकडून तुम्हाला काही त्रास नाही ना ? 
     पुणे - भारतात असहिष्णुतेच्या सूत्रावरून वातावरण तापवले जात असतांना या वातावरणाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न परकीय शक्तींकडून होत असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांतील नागरिकांना निनावी दूरभाष करण्यात येत असून, सध्याच्या केंद्रशासनाकडून तुम्हाला काही त्रास नाही ना ?, अशी थेट विचारणा करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे; मात्र सध्या प्राथमिक चौकशीत तरी हे दूरभाष पाकिस्तानच्या लाहोर येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. (भारतातील कथित असहिष्णुतेच्या वातावरणाचा लाभ परकीय शक्ती उठवत असतांना त्याची काळजी भारतातील राजकीय नेत्यांना आहे का ? - संपादक)
     गुप्तचर यंत्रणांनी या संदर्भातील माहिती सर्व पोलीस दलांना पाठवली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये आलेल्या दूरभाषांची माहिती घेतल्यांतर ते इंटरनेटवरून करण्यात आले असल्याचे लक्षात आले आहे. प्रॉक्झी सर्व्हर वापरून अशा प्रकारचे दूरभाष कोठूनही करता येऊ शकते, तसेच ते कुठल्याही देशातून केले असल्याचे भासवता येऊ शकते. ही शक्यता गृहीत धरून तपास यंत्रणांनी दूरध्वनी नेमके कोठून केले आहेत, याचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.


भारतमाता की जय न म्हणणार्‍यांवर बहिष्कार टाकला पाहिजे !

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची निष्ठा कोणाशी आहे, हे सर्व जगाला ठाऊक आहे. त्यामुळे 
अशा लोकांवर सर्वत्रच्या पंचायतींनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! 
उत्तरप्रदेशातील पंचायतीचा निर्णय
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - जे भारतमाता की जय म्हणणार नाहीत, त्यांच्यावर सामाजिक आणि व्यावसायिक बहिष्कार टाकला पाहिजे, असा निर्णय उत्तरप्रदेशातील बागपत जिलह्याच्या बिजरौल गावातील एका पंचायतीने घेतला आहे. या पंचायतीमध्ये खाप पंचायतीचे प्रमुखही सहभागी झाले होते. त्यांनीही भारतमाता की जय न म्हणणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. हे प्रकरण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या विधानापासून चालू झाले आहे. त्यांनी लोकांना भारतमाता की जय म्हणणे शिकवले पाहिजे, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ही घोषणा देण्यास जाहीरपणे नकार दिला. तेव्हापासून नवीन वादाला प्रारंभ झाला आहे.

अमेरिकेत एका मुसलमान विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षिकेने आतंकवादी संबोधले !

     टेक्सास (अमेरिका) - येथील १२ वर्षीय वलीद नावाच्या मुसलमान विद्यार्थ्याला त्याच्या वर्गशिक्षिकेने आतंकवादी म्हणून संबोधले. त्यामुळे वर्गातील इतरही मुलांनी बॉम्ब, बॉम्ब म्हणून त्याला चिडवणे चालू केले. याविषयी त्याच्या पालकांनी फोर्ट बेन्ड स्कूल डिस्ट्रिक्ट या शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेला त्या वर्गात शिकवण्याला बंदी केली आहे; मात्र या शिक्षिकेला शाळेतूनच काढून टाकावे, अशी मागणी वलीदच्या पालकांनी केली आहे. वलीदने सांगितले, त्यांचा संपूर्ण वर्ग एक चित्रपट पहात होता. तेव्हा एका विनोदावर मी मोठ्याने हसलो. त्यामुळे आमची वर्गशिक्षिका मला म्हणाली, तुमच्या जागेवर मी असते, तर हसले नसते. मी याचे कारण विचारले. तेव्हा ती मला म्हणाली, आम्हाला वाटते की, तू आतंकवादी आहेस. या टिप्पणीनंतर संपूर्ण वर्गाने मला बॉम्ब, बॉम्ब चिडवणे चालू केले.झारखंडच्या गिरीडीह येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात ६ पोलीस घायाळ

देशाच्या कथित विकासासाठी प्रयत्नशील असणारे राज्यकर्ते 
नक्षलवाद नष्ट करण्यासाठी मात्र निष्क्रीय ! 
     गिरीडीह (झारखंड) - २ एप्रिल या दिवशी नक्षलवाद्यांनी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांना लक्ष्य करून केलेल्या साखळी बॉम्बस्फोटात ६ पोलीस घायाळ झाले. हे सर्व पोलीस दुचाकीवरून जात होते. या स्फोटांच्या प्रकरणी ३ महिलांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.भैय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत पालटण्याची मागणी केली नाही ! - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खुलासा

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांच्यात पालट करण्याची मागणी केली नसल्याचा खुलासा संघाचे प्रवक्ता मनमोहन वैद्य यांनी केला आहे. त्यांच्या मते, जोशी केवळ राज्यशक्ती आणि राष्ट्र यांच्यातील अंतर यांच्या संदर्भात चर्चा करत होते. वैद्य पुढे म्हणाले, जोशी यांच्या म्हणण्यानुसार, वर्ष १९४७ मध्ये संविधान सभेने तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला होता. भगव्या ध्वजाला भारतियांनी त्यांच्या प्राचीन संस्कृतीचे प्रतीक म्हणून कधीपासून पूज्य मानले, हे माहीत नाही. आम्ही तिरंगा आणि भगवा झेंडा जो आमची प्राचीन संस्कृती आहे, दोहोंनाही पूज्य मानतो.

असहिष्णुता देशाला नवी नाही ! - ज्येष्ठ साहित्यिक भैरप्पा

     मुंबई - भारतात कायमच असहिष्णुता होती. ब्रिटिशांची फोडा आणि झोडा हीच नीती साम्यवाद्यांनी अणि काँग्रेसने अंगीकारली. त्यांच्या वैचारिक स्थैर्यास प्रचलित व्यवस्थेत आव्हान मिळाल्याने ही आवई आताच चालू झाली, असे स्पष्ट आणि सडोतेड प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस्.एल्. भरप्पा यांनी केले. लोकसत्ता गप्पाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जेएन्यूत सध्या चालू असलेल्या वादावर भूमिका मांडतांना, गेली अनेक वर्षे केवळ डाव्या विचारांच्या संघटना आणि विचारवंत या जेएन्यूवर कसे अधिराज्य गाजवत आहेत, हे भरप्पा यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसचा हात..., डावे आणि देशद्रोही यांंना साथ !

श्री. सुरेश चिपळूणकर
     या लेखांतर्गत २ आणि ४ एप्रिल या दिवशी आपण काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी डाव्यांना दिलेली साथ आणि देशविरोधी कृत्ये यांविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
१०. श्री. नरेंद्र मोदी यांच्या तिरस्कारापोटी 
देशाच्या सुरक्षेशी खेळणारी काँग्रेस !
     काँग्रेसच्या देशद्रोहाला पूर्णत: उघड करणारे आणखी एक सत्य अलीकडेच जगाच्या समोर आले. २६/११ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडली याने अमेरिकेच्या कारागृहातून भारताच्या न्यायालयात व्हिडिओ रिकॉर्डिंगद्वारे हाफिज सईद आणि मौलाना मसूद अजहर यांचा या आक्रमणात सहभाग असल्याचे सांगितलेच; परंतु ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मुसलमान मुलगी इशरतजहाँ ही वास्तविकपणे लष्कर-ए-तोयबाची जिवंत बॉम्ब होती, हा त्याने केलेला खुलासा धक्कादायक होता. श्री. नरेंद्र मोदी यांचा अत्यंत तिरस्कार करणारी काँग्रेस, डावे आणि अन्य पक्षांचे धर्मनिरपेक्ष नेते, भाजपचे अध्यक्ष श्री. अमित शाह यांना फसवण्यासाठी काही वर्षे सतत खोटे बोलले आहेत की, इशरतजहाँ एक निष्पाप मुलगी होती आणि हे हत्याकांड श्री. अमित शाह यांनी जाणूनबुजून घडवून आणले आहे. या सर्वांची तोंडे आता बंद झाली आहेत. बिहारचे मुख्यमंत्री श्री. नितीशकुमार इशरतजहाँला बिहारची मुलगी म्हणवत होते. आपल्या देशातील सुरक्षादल, गुप्तचर संस्था आणि आतंकवादविरोधी पथक यांच्यावर विश्‍वास न ठेवता मुसलमानांची मते मिळवण्यासाठी खालच्या स्तरापर्यंत जाणार्‍या काँग्रेसला देशद्रोही म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ? इशरतजहांचे सत्य समोर आल्यानंतरही काँग्रेस, नितीशकुमार आणि जितेंद्र आव्हाड यांपैकी कोणाकडूनही देशाची क्षमा मागितली गेलीच नाही.

सामान्य नागरिकाच्या दृष्टीकोनातून संरक्षण प्रदर्शन २०१६ !

श्री. अमर जोशी
     दिनांक २८ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत नाकेरी, बेतूल, गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन २०१६ या प्रदर्शनाला जाण्याची गुरुकृपेने संधी मिळाली. आपल्या देशात सैन्य आणि सामान्य नागरिक यांचा परस्परांशी संबंध येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कधी योग आलाच, तर युद्धप्रसंगी, नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणे यांपुरताच काय तो नागरिक आणि सैन्याचा संबंध येतो. मुळात १ सहस्र १५० या दराने सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा प्रवेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आदेशाने विनामूल्य मिळाल्याने या प्रदर्शनाच्या माध्यमातून शांतताकाळात सैन्य आणि नागरिक यांचा चांगला संवाद घडून आला.
१. प्रदर्शनाची भव्यता
संरक्षण प्रदर्शनातील भव्य रणगाडा
     प्रदर्शनस्थळी जातांनाच प्रदर्शनाचे नियोजन प्रभावित करून गेले. मडगावच्या आधीपासूनच प्रदर्शनस्थळापर्यंत जाण्याचे दिशादर्शक फलक लावल्याने जागा शोधण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागले नाहीत. प्रदर्शनस्थळाच्या प्रवेशद्वारावर सर्व सहभागी देशांचे ध्वज आणि त्या सर्वांपुढे सगळ्यात मोठा भारताचा तिरंगा निश्‍चितच उठून दिसला. संपूर्ण प्रदर्शनस्थळी डांबरी रस्ते, ११ अतिभव्य वातानुकूलित तंबू (हँगर्स), उत्तम सुशोभीकरण, हवाई कसरतीसाठी (Air show) स्टेडियम, रणगाडे आणि लष्करी वाहनांच्या प्रात्यक्षिकांसाठी मैदान, संरक्षण मंत्रालयाचे कार्यालय, हा सबंध डोलारा अवघ्या २१ दिवसांत उभा केला गेला, हे विशेष !

देशवासियो कब जागोगे ? इंतजार और मत करो !

पू. दिव्यजीवनदासजी
महाराज
     देहलीतील डॉ. पंकज नारंग यांना नुकतीच धर्मांधांनी क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केली. या मारहाणीत डॉ. नारंग यांचा मृत्यू झाला. या घटनेविषयी पू. दिव्यजीवनदासजी महाराज यांना हिंदी भाषेत सुचलेले काव्य येथे देत आहोत.
     दरबारों में खामोशी है, हल न मिला सवालों को;
     आज दादरी चिढा रही है, कायर दिल्लीवालों को ।
     एक मुसलमान के मरने पर सबके सब हिल जाते है;
     जब हिन्दू का बेटा मरता, होंठ सभी के सिल जाते है ।
     वो तो एक चिकित्सक भर था, मानवधर्म निभाता था,
     हिन्दू और मुसलमानों में, भेद नहीं कर पाता था ।

वेगळ्या राज्यांमुळे भले कोणाचे ?

     स्वतंत्र विदर्भवादी म्हणून प्रसिद्ध असलेले अधिवक्ता श्रीहरि अणे यांनी आतापर्यंत गेल्या वर्षभरात जिथे मिळेल, तिथे स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासंबंधीची भूमिका मांडली. नुकतेच अणे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भासमवेतच मराठवाडाही वेगळे स्वतंत्र राज्य करा, अशी मागणी केली. त्यानंतर अर्थातच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वादळ उठले. त्याचे पर्यवसान म्हणून अणे यांनी राज्याच्या महाअधिवक्ता पदाचे त्यागपत्र दिले. एकूणच सध्या स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा ही नवीन राज्ये करण्याची मागणी जोर धरू पहात आहे. या मागणीला तेथील काही मूठभर लोक वगळले, तर संपूर्ण जनतेचा पाठिंबा निश्‍चितच नाही. सदर मागणीमधून जो संघर्ष केला जात आहे, त्यामध्ये नक्कीच काहीतरी राजकारण खेळले जात आहेे. त्यामुळे राज्य आणि देश या स्तरांवरील मूळ प्रश्‍न बाजूला रहात आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

विद्यार्थी-साधकांनो, सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी 
वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
      भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक 
वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
       थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमांत अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.

पुरोगामी कोणाला म्हणावे ?

       युरोपमध्ये तेथील पुरोगाम्यांच्या दबावामुळे मुसलमान विस्थापितांवर कठोर कारवाई करायला अडचण येत आहे. यावरून सर्वत्रचे पुरोगामी म्हणजे देश, धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांना मानवता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि सहिष्णुता यांच्या गोंडस नावाखाली बुद्धीभ्रम करून नष्ट करणार्‍या टोळ्याच होत ! 
- श्री. (पू.) राजेंद्र शिंदे (३.२.२०१६)

गुढीपाडव्यानिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत नववर्षारंभ विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : ८ (४ रंगीत + ४ कृष्णधवल) 
मूल्य : ४ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
६ एप्रिलला रात्री ८.३० पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !
        कुठे प्रत्येक मानवाला उन्नत बनवून त्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे आपले पूर्वज, तर कुठे जनतेला भोगवादाच्या खाईत लोटणारी हल्लीची शासने !

वैज्ञानिक संशोधन आणि अध्यात्मिक संशोधन यांमधील भेद

       वैज्ञानिक संशोधन बुद्धी आणि अहंच्या बळावर केले जाते, तर आध्यात्मिक संशोधन श्रद्धा आणि भावाच्या बळावर केलेले असते. वैज्ञानिक संशोधन करतांना मूळ संकल्पनेचे कार्य, सत्यता आणि परिणाम आदी दृष्टीने अभ्यास करून निकष मांडले जातात, तर आध्यात्मिक संशोधनात ईश्‍वरी शक्तीचे कार्य आणि ती कशा अन् किती स्वरूपात प्रगट होत आहे, याचे संशोधन केले जाते. त्या शक्तीची परिणीती कधी गणिती सूत्रांतून, तर कधी विमानाच्या शोधातून अवतरित होते. या संशोधनामुळे मनुष्याला परमेश्‍वरी शक्तीपुढे नतमस्तक होण्यास साहाय्य मिळते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०१६)

नम्रता या नावाची गंमत !

       एकदा पुणे जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमाची छायाचित्रे तेथील २ नवीन साधकांनी दैनिक विभागात पाठवली. छायाचित्रे मिळाल्यावर मी त्याविषयीची पोच देतांना नम्रता (माझे नाव) असे लिहिले. ते वाचून त्या साधकांना संगणकीय पत्र पाठवतांना काय चूक झाली ? ते नम्रपणे पाठवले नाही कि काय ?; म्हणून दैनिक कार्यालयातून नम्रता अशी पोच आली असावी !, अशी शंका आली. त्यांनी सहसाधिकेला याविषयी गंभीरपणे विचारले. तेव्हा तिने पोच देणार्‍या साधिकेचे नाव नम्रता असल्याचे सांगितल्यावर त्यांना त्याचा उलगडा झाला.
- सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.९.२०१४)

एका जिल्ह्यातील प्रदर्शनकक्षात फुलपाखरू येऊन बसणे आणि पू. बिंदाताई सत्संगासाठी बसत असलेल्या खोलीत फुलपाखरू येऊन बसणे, हे तेथील सात्त्विकतेचे दर्शक असणे

१. एका जिल्ह्यातील 
प्रदर्शनकक्षात फुलपाखरू येऊन बसणे
        ३०.३.२०१६ या दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत भ्रमणभाषवरून राष्ट्रीय सत्संग चालू होता. त्या सत्संगात साधक महाशिवरात्रीच्या दिवशी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची सेवा परिपूर्ण करण्यासाठी, तसेच भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती यांविषयी सांगत होते. तेव्हा एका जिल्ह्यातील साधिकेने सांगितले, आम्ही भावपूर्णरित्या प्रदर्शनकक्षाची सिद्धता केली होती. नंतर काही वेळाने कक्षात एक फुलपाखरू आले आणि तेथे ठेवलेल्या श्रीकृष्ण अन् शिव यांच्या चित्राच्या भोवतीने ते उडत होते.

बालपणापासून साधनेची आवड असणारा नाशिक येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. अनन्य मयुर झुरळे (वय १ वर्ष) !

चि. अनन्य झुरळे
       नाशिक येथील सनातनच्या साधिका सौ. भाग्यश्री मयुर झुरळे यांचा सुपुत्र चि. अनन्य मयुर झुरळे याचा फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी (५.४.२०१६) या दिवशी तिथीनुसार पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
चि. अनन्य मयुर झुरळे याला सनातन 
परिवाराच्या वतीने प्रथम वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. गर्भधारणा झाल्यानंतर
अ. संतांना भेटण्याची इच्छा होत असे.
आ. सतत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जावेसे वाटायचे. 
इ. मी प्रतिदिन श्रीदुर्गाकवच म्हणत असे.
ई. प्रतिदिन गोड खाण्यास आवडत असे. पंचामृत तर अतिशय आवडायचे. 

साधकांनो, स्वतःची इतरांशी तुलना करण्यापेक्षा मिळालेली सेवा मनापासून, परिपूर्ण आणि भावपूर्ण करून साधनेतील आनंद अनुभवा !

कु. श्रद्धा लोंढे
        अनेक साधक स्वतःला मिळालेल्या सेवेची इतर करत असलेल्या सेवेशी तुलना करून किंवा सेवेची गुणवत्ता ठरवून सेवेतून मिळणारा आनंद गमावतात. जेव्हा सेवेविषयी मनात नकारात्मक विचार येतील, तेव्हा आपण आपल्या मनाला सांगू शकतो की, प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे आपल्याला गुरुकृपायोग हा साधनामार्ग मिळाला आहे. या साधनामार्गामध्ये ठराविक सेवा हे कधीच प्रगतीचे कारण ठरलेले नाही. साधना होण्यासाठी सेवा हे केवळ माध्यम आहे. मिळालेली सेवा मनापासून, परिपूर्ण आणि भावपूर्ण करूनच आजपर्यंत अनेक साधक पुढे गेले आहेत आणि जातही आहेत.
       काही दिवसांपूर्वीच रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा करणारे साधक श्री. चेतन राजहंस (चेतनदादा), तसेच साधक-कामगार श्री. बाबूलाल चौधरी आणि श्री. बसू ठाणेद यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के घोषित करण्यात आला. चेतनदादांची सर्व सेवा बुद्धीच्या स्तरावरची असते. ते सतत काहीना काही विषयाचा अभ्यास वा चिंतन किंवा लिखाण करत असतात. याउलट वरील २ साधक-कामगारांकडे स्वच्छता करणे, कचरा टाकणे, साहित्याची ने-आण करणे आदी सेवा असतात. यावरून सेवेमुळे (कार्य केल्याने) नव्हे, तर सेवेतील आनंद मिळाल्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते, हे स्पष्ट होते.
- कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०१६)

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

अध्यात्मप्रसारासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या 
प्रवासाकरता चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन या कार्यात हातभार लावा ! 
१. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी पू. अंजली गाडगीळ करत असलेले महान कार्य ! 
     मागील ४ वर्षांपासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, तसेच सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी नाडीवाचनातून सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब अशा २३ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम, संशोधन केंद्रे यांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. 

कु. दीपाली पवार हिच्या पत्रांविषयी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती !

१. जाणवलेली सूत्रे
१ अ. कु. दीपाली पवार हिच्या पत्रांमधून प.पू. डॉक्टरांचा सत्संग मिळतो, असे वाटणे : मला टंकलेखन करण्यासाठी आलेली दीपालीताईची पत्रे मी वाचते. त्या वेळी तिच्या पत्रातील प्रत्येक शब्द माझ्या अंतर्मनात जात आहे, असे मला जाणवते. माझ्या सप्तचक्रांवर थंड संवेदना जाणवतात. तिचे प्रत्येक पत्र, त्यामधील विचार मला माझेच वाटतात, तसेच तिची स्थितीही माझ्यासारखी आहे, असे मला वाटते. माझ्या अडचणींत मी एका टप्प्याला थांबले असून त्याच्यापुढे कसे जायचे ?, याचे मार्गदर्शन मला तिच्या पत्रांतून मिळते. त्यामुळे तिच्या पत्रातून मला प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरांचाच सत्संग मिळतो, असे वाटते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त हिंदु संस्कृतीची प्राचीनता सांगणारे तसेच नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याविषयी प्रबोधन करणारे लिखाण असलेले प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. हे प्रसारसाहित्य ए ४, तसेच ए २ आकारातील भित्तीपत्रक आणि २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फलक बनवण्यात आला आहे. यांचा प्रसारासाठी पुढीलप्रमाणे वापर करता येईल
१. ए ४ आकारातील भित्तीपत्रक : व्यापारी संकुल, रहिवासी संकुल, गृहनिर्माण संस्था, इमारती, कार्यालये यांच्या सूचना फलकांवर (नोटीस बोर्डवर) संबंधितांची अनुमती घेऊन लावता येईल.
२. ए २ आकारातील भित्तीपत्रक आणि २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फलक (रंगीत) : देवळे, सार्वजनिक ठिकाणे, हिंदु नववर्ष साजरे करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणी अनुमती घेऊन लावण्याचे नियोजन करू शकतो. रंगीत फलकासाठी प्रायोजक मिळवू शकतो.
     गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु संस्कृतीच्या महानतेविषयी प्रबोधन करणार्‍या या प्रसारमाध्यमांचा अधिकाधिक परिणामकारक वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. हे फलक नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहेत.

आपत्काळात देवच सर्वांना सांभाळणार आहे, अशी श्रद्धा असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील कु. पद्मनाभ महेश परांजपे (वय ९ वर्षे) !

       फाल्गुन कृष्ण पक्ष. एकादशी (३.४.२०१६) या दिवशी नागपूर येथील कु. पद्मनाभ महेश परांजपे याचा वाढदिवस झाला. यानिमित्त त्याचे आई-वडील, आजी आणि मावशी यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी 
कु. पद्मनाभ परांजपे
१ अ. आधुनिक वैद्यांनी बाळ अशक्त असून कदाचित् गर्भपात करावा लागेल, असे सांगितल्यावर मनापासून प्रार्थना करणे आणि बाळाची वाढ चांगली होत असल्याचे समजणे : पद्मनाभच्या वेळी दिवस गेल्याचे कळल्यानंतर मी रुग्णालयात गेले असता आधुनिक वैद्यांनी सांगितले, बाळ अशक्त आहे. मी औषधे देते; पण कदाचित् आपल्याला गर्भपात करावा लागेल. घरी आल्यावर मी देवा, तूच माझ्या बाळाचे रक्षण कर, अशी मनापासून प्रार्थना करत होते आणि आश्‍चर्य म्हणजे १५ दिवसांनी मी पुन्हा आधुनिक वैद्यांकडे गेले असता मला त्या म्हणाल्या, बाळाची वाढ फारच चांगली झाली आहे. काही काळजी करू नकोस.
१ आ. गर्भारपणामध्ये माझी सेवा चालू होती. तेव्हा अनेक वेळा सेवा करतांना बाळही मला सेवेत साहाय्य करत आहे, असे जाणवायचे.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (६.४.२०१६) रा. ८.३७ वाजता
समाप्ती - फाल्गुन अमावास्या (७.४.२०१६) दु. ४.५४ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

वाढदिवसाला स्वेच्छा त्यागून ईश्‍वरेच्छेने वागण्याचा संकल्प करणारी कु. दीपाली पवार !

      आज फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सनातनच्या साधिका कु. दीपाली पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी केलेल्या संकल्पाविषयी येथे देत आहोत.   
कु. दीपाली पवार यांना 
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! 
कु. दीपाली पवार
१. वाढदिवस धर्मशास्त्रानुसार साजरा करण्याची पद्धत
      कृष्णा, आज माझा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन शिरसाष्टांग नमस्कार करते. कृष्णा, प्रत्येकासाठी हा दिवस पुष्कळ महत्त्वाचा असतो ना ? धर्मशास्त्रानुसार ज्या तिथीला आपण जन्माला आलो, त्या तिथीला आपण कुलदेवीला अभिषेक करावा. पुढील आयुष्य चांगले आणि सुखकर जाण्यासाठी तिचा आशीर्वाद घ्यावा. वाढदिवसाच्या दिवशी रामरक्षा म्हणून औक्षण करून घ्यायला हवे. रामरक्षेत प्रत्यक्ष श्रीरामाला प्रत्येक अवयवाभोवती संरक्षककवच निर्माण करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. थोडक्यात रामरक्षेच्या माध्यमातून श्रीरामाचे आशीर्वाद घेतले जातात. औक्षणामुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते. या दिवशी वडीलधारी, संत, देवता आणि आपले शुभचिंतक यांचे आशीर्वाद अन् शुभेच्छा घ्याव्यात. वाढदिवसाच्या तिथीची स्पंदने आपल्या स्पंदनाशी मिळती-जुळती असल्याने धर्मशास्त्रानुसार याच दिवशी वाढदिवस करणे अधिक लाभदायक असते, असे धर्मशास्त्र सांगते.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पुरोगाम्यांची आदीमानवाकडे वाटचाल !
     मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदीमानवाकडे होत आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आवश्यक तेव्हढेच बोलणे योग्य !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वराने आपल्याला दोन कान आणि एक जीभ दिली आहे. ती यासाठी की, जेवढे ऐकाल, त्याच्या निम्मेच बोला. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

बलुचिस्तानची हाक !

संपादकीय
   द्रात भाजप सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजे काँग्रेसच्या सत्ताकाळात भारतात सातत्याने जिहादी आतंकवाद्यांची आक्रमणे होत होती. भाजप सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणे सोडल्यास पंजाबमध्ये दोन आतंकवादी आक्रमणे झाली. मोदी पंतप्रधान होताच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती केली. डोवाल भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. निवृत्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा शासकीय सेवेत घेण्यासाठी मोदी यांनी नियमांत पालट करून घेतले. डोवाल यांची क्षमता पहाता त्यांना या सेवेत घेण्याचा मोदी यांचा त्यांच्यावर विश्‍वास होता आणि तो त्यांनी सार्थ ठरवला आहे, असेच मोदी यांना वाटत आहे. डोवाल यांच्याविषयी हे सांगण्याचे प्रयोजन असे की, भारतात पाकने आतंकवादी आक्रमणे केल्यास पाकला बलुचिस्तानवर पाणी सोडावे लागेल, अशी उघड धमकी डोवाल यांनी पाकला दिली होती. त्यामुळे पाककडून आतंकवादी आक्रमणे झाली नाहीत, असे तज्ञांना वाटते; मात्र पंजाबच्या गुरुदासपूर आणि नंतर पठाणकोटमधील मोठे आक्रमण पहाता ते पूर्ण सत्य नाही, हेही लक्षात येते. तरीही डोवाल यांनी पाकला दिलेली चेतावणी सत्य ठरवण्यासाठी प्रयत्न चालू झालेत, असे म्हणण्यास वाव असणार्‍या घटना घडतांना दिसू लागल्या आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn