Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांचा आज वाढदिवस


विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर हरि मकाजी नाईक बलीदानदिन !

बिजनोर येथे एन्आयएच्या अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या

  • पत्नी गंभीर घायाळ, २ मुले सुदैवाने वाचली
  • पठाणकोट प्रकरणातील अन्वेषण पथकांत सहभाग होता
आतंकवादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना त्वरित फासावर लटकवले
असते, तर अन्वेषण अधिकार्‍यांवर आक्रमण करण्याचे त्यांचे धाडस झाले नसते !
      बिजनोर (उत्तरप्रदेश) - पठाणकोट येथील हवाई तळावरील आतंकवादी आक्रमणाचे अन्वेषण करणारे एन्आयएचे (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे) अधिकारी तन्जीम अहमद यांच्यावर बिजनोर येथे दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात अहमद यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर घायाळ झाली. त्यांना नोएडा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात त्यांची २ मुले सुदैवाने वाचली आहेत. या प्रकरणी एन्आयए आणि एटीएस् (आतंकवादविरोधी पथक) यांच्या पथकांनी अन्वेषण चालू केले आहे.
     अहमद हे २ एप्रिलच्या रात्री पत्नी आणि दोन मुले यांसह एका विवाह समारंभाकरिता चारचाकी वाहनातून गेले होते. तेथून परत येत असतांना सहसपूर येथे दोन दुचाकींवरून आलेल्या ४ अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात अहमद यांना आठ, तर त्यांच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या.

काश्मीर विद्यापिठात देशद्रोही विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा !

एन्आयटीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा
जनतेने भरलेल्या कराच्या धनातून शिकणारे विद्यार्थी देशाच्या विरोधात घोषणा
देत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना देशद्रोहाखाली कठोर शिक्षा झाली पाहिजे !
     श्रीनगर - टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील एन्आयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधील देशद्रोही विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या, तसेच फटाके फोडून आनंद साजरा केला होता. त्यामुळे एन्आयटीमधील देशद्रोही विद्यार्थी आणि राष्ट्रप्रेमी विद्यार्थी यांच्यात संघर्ष होऊन हाणामारी झाली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर एन्आयटीपासून काही किलोमीटर लांब असलेल्या काश्मीर विद्यापिठाच्या आवारात २ एप्रिल या दिवशी शेकडो देशद्रोही विद्यार्थ्यांनी एन्आयटीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. या मोर्च्यात एन्आयटीमध्ये काश्मीरच्या बाहेरून शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी, तसेच भारत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या

तृप्ती देसाई यांना महिलांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी मुसलमान महिलांना मशिदीत प्रवेश मिळवून दाखवावा ! - खासदार श्री. चंद्रकांत खैरे, शिवसेना

श्री. चंद्रकांत खैरे
      संभाजीनगर (औरंगाबाद) - शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी पुरुषांना ओले सोवळे नेसूनच शनिदेवाचे दर्शन घेता येते. शेकडोे वर्षांच्या या प्राचीन परंपरेला तडा जाऊ देऊ नये. जेथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर पुरुषांनाही अनुमती नाही, तेथे तृप्ती देसाई यांनी चौथर्‍यावर जाऊन पूजा करण्याला काही अर्थच रहात नाही. जर तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटनेला महिलांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी मुसलमान महिलांना मशिदींत प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करून दाखवावे. केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करू नये, अशी प्रतिक्रिया संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.
ग्रामस्थ आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे हार्दिक अभिनंदन !
     शनिशिंगणापूर येथे संघटित झालेले सर्व ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. हिंदूंची अशीच एकजूट व्हायला हवी. हिंदूंची संघटित शक्ती अशा (धर्मद्रोही) लोकांना सरळ करण्यासाठी वापरायला हवी, असे ही खासदार खैरे यांनी या वेळी म्हटले.


हिंदु संस्कृतीत भेदभावाला थारा नाही ! - मुख्यमंत्री

धर्मपरंपरा आणि धर्मशास्त्र यासंबंधी शासनाने शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत 
यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सश्रद्ध हिंदूंची अपेक्षा आहे !
     मुंबई - हिंदु संस्कृतीत कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. आमच्या शासनाने उच्च न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रत्यक्ष कार्यवाही करणार आहोत; परंतु केवळ प्रसिद्धीसाठी कोणीही कायदा-सुव्यवस्थेत बाधा आणू नये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री शनिशिंगणापूरमधील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.


त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसमवेत आता पुरुषांनाही प्रवेश बंद ! - मंदिर देवस्थान

      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) - येथील श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती, तसेच गाभार्‍यात जायचे झाल्यास केवळ सोवळे नेसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश करण्याची अनुमती होती. नुकतेच म्हणजे १ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे निर्देश दिले. या पार्श्‍वभूमीवर श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर प्रशासनाच्या विश्‍वस्तांची ३ एप्रिल या दिवशी बैठक झाली. या बैठकीमध्ये धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी पुरुषांनाही प्रवेश बंद करण्यात आला आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधने यांनी दिली.
     अधिवक्ता गायधने पुढे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही आमच्या परंपरांचे रक्षण करणार आहोत. गर्भगृहात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांना प्रवेश दिला जातो आणि महिलांना प्रवेश दिला जात नाही. हा वाद टाळण्यासाठी आम्ही गर्भगृहात पुरुषांनाही जाण्यास बंदी केली आहे. येथून पुढे केवळ मंदिराचे पुजारी, शासकीय पूजा, त्यासंबंधीचे लोक आणि त्यांचे साहाय्यक, तसेच तुंगार मंडळी यांनाच गर्भगृहात जाण्याची अनुमती असेल.
धर्मपरंपरांचे रक्षण करणार्‍या शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या विरोधात तृप्ती देसाई यांच्याकडून पोलीस तक्रार प्रविष्ट

तृप्ती देसाई यांचा थयथयाट चालूच !
तृप्ती देसाई यांचे हे कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच
म्हणावे लागेल. प्रत्यक्षात देसाई यांनीच कायदा-सुव्यवस्था 
बिघडवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे ! 
ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना अधिवक्ता श्री. देवदास शिंदे
     नगर - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश करण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अन्य महिला कार्यकर्त्या यांना २ एप्रिल या दिवशी ग्रामस्थांनी मंदिराबाहेर पिटाळून लावले होते. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी श्री शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या विरोधात येथील सुपा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
     श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. या वेळी मंदिर सुरक्षारक्षक, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांनी देसाई यांना चौथर्‍यावर जाण्यापासून रोखले होते. सुपा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, हे शासनाचेच दायित्व असल्याचे स्पष्ट करत धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही,

शनिशिंगणापूर प्रकरणी हिंदु जनजागृती समितीची भूमिका अतिशय योग्य ! - प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (बसलेले) 
यांना दैनिक भेट देतांना श्री. आनंद पाटील
     कोल्हापूर - शनिशिंगणापूर प्रकरणात हिंदु जनजागृती समितीने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मी सकाळीच संकेतस्थळावर दैनिक सनातन प्रभातमध्ये सर्व वृत्त वाचले आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (पूर्वाश्रीमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी काढले. प.पू. महाराजांची ३ एप्रिल या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे, तसेच बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील यांनी श्री. नारायण रामचंद्र बुधले यांच्या घरी दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते.
     डॉ. मानसिंग शिंदे यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा शाल, श्रीफळ, तसेच गोसंवर्धन हा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. शनिशिंगणापूर येथील आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण वृत्त असणारा दैनिक सनातन प्रभातचा ३ एप्रिल या दिवशीचा अंकही प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना भेट देण्यात आला.

भूमाता ब्रिगेडचे आंदोलन एक राजकीय स्टंट ! - भाजप

भाजप शासनाने भूमता ब्रिगेडवर कारवाई करणे अपेक्षित
      पुणे - शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी भूमाता ब्रिगेडकडून केले जाणारे आंदोलन एक राजकीय स्टंट आहे ज्याचा उद्देश केवळ प्रसिद्धी मिळावणे इतकाच आहे. यात कोणतीही भक्ती किंवा धार्मिक भावना नाही. आंदोलनाचा लैंगिक समानतेच्या सूत्राशीही काही देणेघेणे नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.
     भांडारी पुढे म्हणाले की, तृप्ती देसाई यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि ती पूर्णपणे राजकीय नाट्यात सहभागी आहे. गेल्या वर्षी ती निवडणुकीत पराभूत झाली, तेव्हापासून तिने हे आंदोलन चालू केले आहे.

(म्हणे) महिलांना दर्शन घेण्यासाठी रोखणे, हे अधोगतीकडे नेणारे ! - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अशी भूमिका मुसलमान महिलांना मशिदीमध्ये 
प्रवेश देण्यासंबंधीही घ्यावी, म्हणजे त्यांना अधोगती काय असते, ते कळेल !
      शिर्डी - श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी चौथर्‍यावर जाण्यासाठी गेलेल्या महिलांना रोखणे, हे अधोगतीकडे नेणारे आहे. असे करणे हे चुकीचे आहे, तसेच त्या महिलांना गावातील गावगुंडांनी रोखणे, हेदेखील अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही धार्मिक स्थळी महिलांना दर्शनासाठी बंदी नसावी, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. ते येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
वारंवार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या 
तृप्ती देसाई यांना शासन प्रतिबंधात्मक स्थानबद्ध का करत नाही ?
चुनाभट्टी (मुंबई) येथे हिंदु स्मशानभूमीतील मुसलमान महिलेच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात वर्षभर कारवाई नाही !

संतप्त स्थानिक हिंदूंची बांधकामाच्या 
संदर्भात कारवाई व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहीम !
        मुंबई, ३ एप्रिल (वार्ता.) - चुनाभट्टी येथे राहणार्‍या एका मुसलमान महिलेने येथील हिंदु स्मशानभूमीच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. (हिंदूंच्या स्मशानभूमीत अनधिकृत बांधकाम करणारे उद्दाम धर्मांध ! - संपादक) या विरोधात पंचशीलनगर येथील जागरूक धर्माभिमानी युवकांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. (अनधिकृत बांधकामाच्या विरोध आवाज उठवणार्‍या धर्माभिमानी युवकांचे अभिनंदन ! असे जागरूक युवक हीच राष्ट्राची शक्ती आहे. - संपादक) वर्ष २०१५ मध्ये स्थानिक नगरसेवक श्री. विजय तांडेल यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात महानगरपालिकेकडे तक्रार केली होती; मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (एका लोकप्रतिनिधीच्या पत्राची नोंद न घेणारी महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची कशी नोंद घेत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) ३१ मार्च २०१६ च्या रात्री हे अनधिकृत बांधकाम वाढवण्यात येत असल्याचे जागरूक धर्माभिमान्यांच्या लक्षात आली. याविषयी धर्माभिमानी युवकांनी त्वरित दूरध्वनीवरून पोलिसांत तक्रार केली. तिसर्‍यांदा दूरभाष केल्यावर पोलिसानी बांधकाम रोखले. (पोलिसांच्या अशा कृतींमुळेच समाजातील त्यांची विश्‍वासार्हता अल्प झाली आहे. - संपादक)

हिंदूंनो, धर्म वाचवण्यासाठी संघटित व्हा ! - रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

बोईसर येथे विराट हिंदू संमेलन
      बोईसर (पालघर) - जगाच्या पाठीवर हिंदूंसाठी एकही देश नाही, त्या दृष्टीने विचार केल्यास आपण जगात अल्पसंख्यांक आहोत. प्राचीन काळापासून हिंदु धर्मावर अनेक आघात झाले. हिंदु धर्म संपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत. तसेच चालू राहिल्यास धर्म नामशेष होईल. धर्म वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. संस्कार रक्षण आणि संस्कृती रक्षण झाले पाहिजे, असे मार्गदर्शन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया हेही उपस्थित होते.
      डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले, हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा. काश्मीरमधील राजा हरिसिंग याच्या काळात हिंदू, गाय, मंदिरे यांच्यावर कधीही अत्याचार झाले नाहीत. हिंदूंनी सुरक्षित जीवन जगण्यासाठी राजसत्ता आपल्या नियंत्रणात ठेवायला हवी.


मायमराठीसाठी मराठी बोला चळवळीचा स्तुत्य उपक्रम

नभोवाणीवरील बोलणे 
मातृभाषेत व्हावे ! - चळवळीची मागणी
       पुणे, ३ एप्रिल (वार्ता.) - इंग्रजीच्या अवास्तव प्रेमापोटी, तसेच मराठीविषयीच्या न्यूनगंडामुळे आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मराठीप्रेमींच्या तुलनेने क्षीण आवाजामुळे ठिकठिकाणी मायमराठीला दुय्यम स्थान मिळते. मग ते अधिकोशांमध्ये भरायचे विविध अर्ज असोत, दुकानांच्या पाट्या असोत अथवा नभोवाणीवर कार्यक्रमाच्या वेळी होणारे निवेदन असो. ही सूची दुर्दैवाने पुष्कळ मोठी आहे; पण मराठीला गतवैभव मिळवून देण्यासाठी, तसेच महाराष्ट्रात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी आता मराठी बोला चळवळ या मराठीहितासाठी कार्यरत गटाने कृतीशील प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे.

महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयीची याचिका जनतेची आणि न्यायालयाची दिशाभूल करणारी ! - कु. अश्‍विनी कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

साम या मराठी वाहिनीवर समानतेच्या गोष्टी करतांना स्त्री-पुरुष 
भेदाभेद कशासाठी ? या विषयावरील चर्चासत्र
कु. अश्‍विनी कुलकर्णी
     मुंबई - महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती; मात्र मंदिरात स्त्रियांना प्रवेश आधीपासूनच आहे. याचिकाकर्त्या विद्या बाळ यांनी याचिकेमध्ये महिलांना चौथर्‍यावर प्रवेश नाही, असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसह पुरुषांनाही प्रवेश नाही. त्यामुळे ही याचिका म्हणजे जनतेची आणि न्यायालयाची दिशाभूल करणारी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनी केले. साम या मराठी वाहिनीवर समानतेच्या गोष्टी करतांना स्त्री-पुरुष भेदाभेद कशासाठी ? या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होत्या. या चर्चासत्रात भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे, भूमाता ब्रिगेडच्या मनिषा टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, अंनिसच्या सुशीला मुंडे, तसेच मंदिर प्रवेशासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार्‍या अधिवक्त्या निलीमा वर्तक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन संजय आवटे यांनी केले.

नाशक हिरा पुन्हा नाशिकमध्ये आणण्यासाठी २०० वर्षांनी प्रयत्न

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही देशाची अमूल्य संपत्ती पुन्हा देशात आणण्यासाठी 
प्रयत्न न करणारे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित !
      नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वराच्या शिरपेचातील नाशक हिरा म्हणजेच आय ऑफ गॉड शिवा आजही भारताबाहेर आहे. हा नाशिकचा अनमोल ठेवा २०० वर्षांनी का होईना पुन्हा मायभूमीत परत आण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया नाशिककरांनी व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्सने नाशक हिर्‍याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.
१. खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी नाशक पुन्हा त्र्यंबकेश्‍वरमध्ये आणण्यासाठी पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
२. नाशक हिरा पुन्हा त्र्यंबकेश्‍वराच्या खजिन्यात आणण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर देवस्थान प्रयत्न करेल, असे देवस्थानच्या विश्‍वस्त ललिता शिंदे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, हिर्‍याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्र्यंबकेश्‍वरमध्ये नाशक हिर्‍याविषयी चर्चा होती.
३. नागरिक हा हिरा पुन्हा देवस्थानात कसा दाखल होईल, याविषयी विचारणा करत होते. देवस्थानने बैठक घेऊन हिरा परत आणण्यासाठी ठराव करावा म्हणजे मुख्यमंत्री आणि खासदार यांच्या वतीने हा विषय केंद्रापर्यंत नेता येईल.
४. नाशक हिरा पुन्हा भारतात आणणे शक्य आहे. यासाठी भारतीय पुरातत्व खात्याकडे महाराष्ट्र पुरातत्व खात्यातून पाठपुरावा करण्यात येईल. याविषयी नाशिककरही पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार करू शकतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात माजी विद्यार्थी आणि पोलीस यांची मद्यपानाची मेजवानी

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील विद्यापिठात 
अशी मेजवानी होणे, हे शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद आहे !
      पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात माजी विद्यार्थी आणि पोलीस हे मद्यपानाची मेजवानी करत असल्याचे सुरक्षारक्षकाला ३१ मार्चच्या रात्री आढळून आले. या वेळी सुरक्षारक्षकाने त्यांना पकडताच पोलीस कर्मचारी आणि काही जण तेथून पसार झाले; परंतु एक जण मद्यधुंद अवस्थेत तेथेच पडला होता. हे सर्व जण विद्यापिठातील वसतीगृह क्रमांक ८ च्या गच्चीवर मद्यपान करत होते.
     मद्यधुंद अवस्थेतील एका वसतीगृह प्रमुख टी.डी. निकम आणि वैभव जाधव यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशदारावर ६ हून अधिक सुरक्षारक्षक तैनात असतात. असे असतांनाही बाहेरील विद्यार्थी मद्याच्या बाटल्या घेऊन विद्यापिठाच्या आवारात प्रवेश कसा करू शकतात, याविषयीची चर्चा चालू आहे.
पनवेलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा उच्छाद !

रेल्वेस्थानकाच्या परिसरात पत्रके 
वाटतांना हिंदुत्ववाद्यांनी दिले पकडून !
       पनवेल - येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात काही धर्मपरिवर्तीत झालेली ख्रिस्ती मंडळी हिंदूंची फसवणूक करणारी पत्रके वाटत असतांना येथील काही हिंदुत्ववाद्यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. हे ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून लोकांचे फसवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असले, तरी पोलिसांनी मात्र रेल्वेच्या हद्दीत प्रसार करणारी पत्रके वाटल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.
      हिंदुत्ववाद्यांनी रेल्वे स्थानकावर या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हटकले असता त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी रस्त्यावरून जाणारे अन्य काही धर्माभिमानीही हिंदुत्ववाद्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे आले. या ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍यांची नावे हिंदूंचीच असल्याचे या वेळी लक्षात आले.

थकीत पाणीपट्टी न भरल्याने पालिकेने पुणे रेल्वे प्रशासनाची पाणीपुरवठ्याची जोडणी तोडली

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी होईपर्यंत पालिका
प्रशासन कारवाई करण्यासाठी का थांबले होते ?
      पुणे - रेल्वे प्रशासनाने ४ कोटी ३२ लक्ष रुपयांची थकीत पाणीपट्टी न भरल्याने पुणे महानगरपालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठ्याची जोडणी ३० मार्च या दिवशी तोडली. रेल्वे प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी दिल्यानंतर १ एप्रिल या दिवशी पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत चालू करण्यात आला आहे.
     सदर थकबाकी भरण्यासाठी पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला जुलै २०१५ मध्ये पाणीपट्टी तातडीने भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाला अनेकदा स्मरणपत्रेही पाठवण्यात आली होती. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनाने या पत्रांकडे दुर्लक्ष केले. (पालिकेच्या पत्रांना न जुमानणारे रेल्वे प्रशासन जनतेच्या तक्रारींना कशी उत्तरे देत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा जोडणी तोडली.


वाराणसीच्या कारागृहात कैदी आणि पोलीस यांच्यात धुमश्‍चक्री !

  • पोलिसांचा गोळीबार 
  • कारागृह अधीक्षकासह अनेक कैदी घायाळ
कारागृहातील कैद्यांवरही नियंत्रण ठेवू न शकणारे पोलीस बाहेर 
गुन्हेगारी करणार्‍या गुंडांवर कधीतरी नियंत्रण मिळवू शकतील का ?
     वाराणसी - वाराणसी जिल्हा कारागृहात कैदी आणि कारागृहातील पोलीस यांच्यात २ एप्रिलच्या दिवशी धुमश्‍चक्री उडाली. कैद्यांनी पोलिसांवर प्रचंड दगडफेक केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. या घटनेत कारागृह अधीक्षकांसह अनेक कैदी घायाळ झाले. घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शीघ्र कृती दलासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या कारागृहात दाखल झाल्या. पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने कैद्यांनी कारागृह परिसरातील झाडांवर चढून आक्रमण केले. कैद्यांनी दगडफेकीच्या वेळी पोलीस अधिकार्‍यांचा भ्रमणभाष संच हिसकावून घेतला. याच भ्रमणभाषवरून कैद्यांनी माध्यमांशी संपर्क करून आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी केली.


बसथांब्यांवर मिळणार विनामूल्य वाय-फाय सेवा

     पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसथांब्यांवर प्रवाशांसाठी मे २०१६ पासून इंटरनेटची वाय-फाय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन महामंडळ आणि जॉयस्टर या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने ही सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी दिली. यासाठी प्रत्येक थांब्यांवर जागा आणि वीज यांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (मूलभूत सुविधा परिपूर्ण झाल्यानंतर त्या पुढील सुविधांचा विचार केला, तर त्याचा अधिक लाभ होईल. त्यामुळे अत्याधुनिक होण्याच्या जोडीला प्रवाशांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत ! - संपादक)

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा कोणताही अधिकार नाही ! - मुख्यमंत्री फडणवीस

भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणार्‍यांना भाजप 
शासनाने पाकमध्ये हाकलावे, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे !
        नाशिक - भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगून अशा प्रकारच्या घोषणा देणार्‍यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उभे राहत असल्याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले.
       भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने ३ एप्रिल या दिवशी गोदाकाठावर आयोजित संवादयात्रेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारतमाता की जय, वन्दे मातरम् या विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. विरोधकांनी प्रसंगी भाजपला विरोध करावा; परंतु भारतमातेला विरोध करू नये. ते देशातील जनता कदापि सहन करणार नाही.
       नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्याला पाणी सोडले त्या वेळी आमदार, खासदार यांनी माझ्याकडे येऊन तक्रार केली; परंतु राज्यातील एक भाग तहानलेला असतांना त्यांना पाणी न देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका स्वत: घेतली आणि मराठवाड्याला पाणी सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.

चोपडा (जिल्हा जळगाव) शहरात लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस

  • हिंदु मुलींनो, लव्ह जिहादींपासून रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
  • आरोपीस तात्काळ अटक
       चोपडा (जळगाव) - चोपडा शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर रहाणार्‍या एका महाविद्यालयीन हिंदु तरुणीशी धर्मांध युवक मोहीन मुक्तार अहमद जहागिरदार (वय १७ वर्षे) याने एकतर्फी प्रेम करून बळजोरीने घरात घुसून मुलीच्या वडिलांसमोर मी या मुलीवर प्रेम करतो मला लग्न करायचे आहे, असे सांगून तिचा हात धरला. ही घटना २ एप्रिलला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
       घडलेल्या प्रकाराची मुलीच्या आई-वडिलांनी रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना माहिती दिली. त्यानुसार रात्री बारा वाजता त्या मुलीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५२ अन्वये विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली आहे.

इंग्लंडमध्ये मुसलमान शाळेमध्ये शिकवला जातो इस्लामी कट्टरतावाद !

     लंडन (इंग्लंड) - इंग्लंडच्या यॉर्कशायरधील एका मुसलमान शाळेमध्ये इस्लामी कट्टरतावाद शिकवला जात आहे. मुफ्ती झुबेर दुढा यांनी ड्युसबरी येथे इस्लामी तर्बिया अकादमीची स्थापना केली असून त्यामध्ये सध्या सुमारे १४० विद्यार्थी इस्लामचे शिक्षण घेत आहेत. ज्यू लोकांनी जागतिक स्तरावर कट रचला आहे. विविध माध्यमांतून मुसलमान तरुणांच्या मनामध्ये विष पेरण्याचा ज्यू लोकांचा प्रयत्न आहे, असा दावा दुढा यांनी केला आहे.

आज हिंदूंसाठी कोण, तर हिंदु जनजागृती समिती ! - एक हिंदु धर्माभिमानी, कराड
नगर शहरात ११७ अवैध भ्रमणभाष मनोर्‍यांवर कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश

      नगर - शहरात विविध भ्रमणभाष आस्थापनांचे अवैध भ्रमणभाष मनोरे (मोबाईल टॉवर) आहेत. त्यावर महानगरपालिकेकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने पालिकेचा महसूल जात आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत या मनोर्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर अभिषेक कळमकर यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोरे उभे राहिले, तरी ते प्रशासनाला कसे दिसले नाहीत, याचीही चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. - संपादक)
१. शहरात विविध भ्रमणभाष आस्थापनांनी मनोरे उभारले आहेत. ते बसवण्यासाठी त्यांनी पालिकेची अनुमती घेतलेली नाही. यातून पालिकेची आर्थिक हानी होत आहे. (शासनाचा बुडालेला महसूल संबंधित आस्थापनांकडून व्याजासह वसूल करावा. - संपादक)
२. नुकतेच नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ११७ भ्रमणभाष मनोरे अवैध असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरसेवकांनी यापूर्वी झालेल्या पालिकेच्या महासभेत प्रश्‍न उपस्थित केला होता.
३. महापौरांनी त्यावर अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले होते; परंतु आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने नगरसेवक अनिल शिंदे यांनी अंदाजपत्रकाच्या सभेत हे सूत्र उपस्थित केले.

श्री शनिशिंगणापूर येथे प्रशासनाकडून जमावबंदी आदेश लागू

धर्मद्रोही तृप्ती देसाई श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन 
दर्शन घेण्यासाठी पुन्हा शनिशिंगणापूर येथे येण्याची शक्यता
        नगर, ३ एप्रिल (वार्ता.) - कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये आणि कोणताही अनर्थ होऊ नये, यासाठी श्री शनिशिंगणापूर येथे पोलिसांनी ३ एप्रिलला जमावबंदीचा आदेश लागू केला. हा आदेश डावलल्यास संबंधितांना अटक करण्याची चेतावणीही पोलिसांनी दिली आहे.
       येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळवण्यासाठी भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी २ एप्रिल या दिवशी आंदोलन केले होते. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्या महिला यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. देसाई यांच्या आंदोलनामुळे श्री शनिशिंगणापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने प्रशासनाच्या वतीने जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
       तृप्ती देसाई या पुन्हा श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यास येऊ शकतात; म्हणून पोलिसांनी श्री शनिशिंगणापूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. (देसाई यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व आंदोलनांमुळे नेहमीच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनर्थ टाळण्यासाठी सहस्रावधी पोलिसांचा वेळ अनावश्यक वायाही गेला आहे. यामुळे कायदा हातात घेऊ पहाणार्‍या तृप्ती देसाई यांना अटक करण्याची सामान्य हिंदु भाविकांची शासनाकडून अपेक्षा आहे. - संपादक)

७ एप्रिल या दिवशी होत असलेल्या मूकपदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! - श्रीशिवप्रतिष्ठानचे आवाहन

       सांगली, ३ एप्रिल (वार्ता.) - पकडल्या गेलेल्या क्षणापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पाशवी छळ करून प्रतिदिन त्यांचा एकेक अवयव तोडण्यात आला. फाल्गुन अमावास्येच्या दिवशी महाराजांच्या देहाचे तुकडे करून त्यांना ठार मारण्यात आले. त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी ७ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता मूकपदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा मारुति चौक येथून प्रारंभ होईल. तरी या यात्रेसाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. मूकपदयात्रेच्या आवाहनासाठी मोठ्या प्रमाणात हस्तपत्रके वाटण्यात येत असून अनेक चौकात होर्डिंगही लावण्यात येत आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पंढरपूर येथे १ सहस्र शौचालयांचे बांधकाम

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! कायम स्वरूपातील 
शौचालये बांधणे, हे शासनाचे कर्तव्य असतांना त्यासाठीचे 
पैसे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून का घ्यावेत ?
      पंढरपूर, ३ एप्रिल - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पंढरपूर शहरातील १२७ मठांना दिलेल्या अनुदानातून १ सहस्र ५ शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. त्यासाठी मंदिर समितीने संबंधित मठांना १ कोटी २८ लक्ष रुपयांचे अनुदान दिले आहे. पंढरपूर परिसरात एकूण २ सहस्र शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट मंदिर समितीने ठेवले आहे.
       पंढरपूर शहरात येणार्‍या भाविकांसाठी शौचालये आणि स्वच्छतागृहे यांसाठी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भार उचलावा, अशी अपेक्षा पंढरपूर नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत होती. श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेला व्यय करावा लागतो. त्यामुळे स्वच्छतेच्या संदर्भात मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी शहरातील विविध मठांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी मंदिर समितीने त्याविषयीची आर्थिक तरतूदही केलेली आहे.

ताजिकिस्तानमध्ये चुलत-मामे भावंडांमध्ये विवाह करण्यास बंदी

अशा विवाहातून होणार्‍या संततीला अनुवंशिक रोग होण्याची शक्यता ! 
     दुशांबे (ताजिकिस्तान) - चुलत आणि मामे बहीण-भावंडांनी विवाह केल्यानंतर निर्माण होणार्‍या मुलांना अनुवांशिक रोग होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत यावर बंदी घालण्याचा निर्णय ताजिकिस्तानने घेतला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये, विशेषत्वाने मुसलमानबहूल देशांमध्ये जवळच्या नातेवाइकांमध्ये विवाह करणे, ही सर्वसाधारण गोष्ट मानली जाते. त्यामुळे मुसलमानबहूल ताजिकिस्तानमध्ये यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. येथील आरोग्य विभागाने २५ सहस्रांहून अधिक अपंग मुलांच्या केलेल्या नोंदींचा अभ्यास केल्यानंतर यातील अनुमाने ३५ टक्के मुले ही जवळच्या नातेवाइकांमध्ये केलेल्या विवाहामुळे जन्माला आली आहेत.

भारतमाता की जय म्हणणे इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढणार्‍या मौलवीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा ! - सुरेंद्र जैन, सरचिटणीस, विहिंप

     लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारत माता की जय म्हणणे मुसलमानविरोधी आहे, असा फतवा काढणार्‍या मौलवीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची, तसेच आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या दारुल उलूम देवबंदवर बंदी घालावी, अशी मागणी विहिंपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी उत्तरप्रदेश शासनाकडे केली आहे. 
     जैन म्हणाले, ते म्हणतात की भारतमाता की जय म्हणणे मूर्ती पूजा करण्यासारखे आहे. मला त्यांना हे विचारायचे आहे की, विजयाप्रीत्यर्थ दिली जाणारी जय अशी घोषणा ही कुठल्या प्रकारची पूजा आहे ? देवबंदने वन्दे मातरम् म्हणण्यासही विरोध केला आहे. भारताला नष्ट करण्यासाठी देवबंद विषारी विचार पेरत आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष माफियांमध्ये खरे देशप्रेम असल्यास त्यांनी देशात वहाबी मानसिकतेला कोणतेही स्थान नाही, हे स्पष्ट करायला हवे. विहिंपकडून संपूर्ण देशात ८ एप्रिलपासून आयोजित होणार्‍या राम महोत्सवात या फतव्याच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल.

निवृत्त पोलीस अधिकारी वंजारा यांना गुजरातमध्ये येण्यास अनुमती

     कर्णावती (अहमदाबाद) - इशरतजहाँ आणि सोहराबुद्दीन शेख यांच्याशी झालेल्या चकमकीच्या प्रकरणी आरोपी असलेले गुजरातचे निवृत्त पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा यांना गुजरातमध्ये परत येण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाकडून ही अनुमती देण्यात आली आहे.

धर्मांधतेला धर्मशक्तीच्या सामर्थ्यानेच तोंड देता येईल ! - श्री. विनय पानवळकर, धर्मशक्ती सेना
फलक प्रसिद्धीकरता

देशातील प्रत्येक विद्यापिठात राष्ट्रद्रोही कन्हैया
निर्माण होण्याची शासन वाट पहात आहे का ?
     श्रीनगरच्या एन्आयटीमध्ये भारतविरोधी घोषणा देणार्‍या देशद्रोही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काश्मीर विश्‍वविद्यालयाच्या आवारातही शेकडो देशद्रोही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून भारतविरोधी घोषणा दिल्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : NIT, Srinagar ke paschat ab Kashmir vishvavidyalay ke saikdo vidyarthiyone bhi deshdrohi naare lagayein.
Hum aur kitne Kanhaiya tayyar hone denge ?

जागो ! : एन्आय्टी, श्रीनगर के पश्‍चात अब कश्मीर विश्‍वविद्यालय के सैकडो विद्यार्थियों ने भी देशद्रोही नारे लगाएं.
हम और कितने कन्हैया तैयार होने देंगे ?

(म्हणे) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला या देशाचे तुकडे पाडून देशात पुन्हा मनूचे राज्य आणायचे आहे !

भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी 
काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रभक्त रा.स्व. संघावर मिथ्यारोप !
      ठाणे, ३ एप्रिल (वार्ता.) - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. (मनूच्या नितीनियमांप्रमाणे सहस्रो वर्षे सहस्रो राजांनी या भारतभूमध्ये अत्यंत सुखी आणि समृद्ध राज्ये चालवली, हे आव्हाड यांना माहीत नाही. - संपादक) त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे राबवले जात आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला नाही. या देशाच्या तिरंग्याला कधी सन्मान दिला नाही. (याचा काय पुरावा आहे ? भगवा ध्वज हा भारताचा प्राचीन काळापासूनचा ध्वज आहे. त्यामुळे कुणाला तो राष्ट्रध्वज व्हावा, असे वाटले, तर त्यात गैर ते काय ? - संपादक) कधी ध्वजारोहण केले नाही. ते संघवाले देशप्रेमाची व्याख्या आम्हाला सांगत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देश तोडण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार, अशी अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. (आव्हाड यांनी स्वतःच्या पायाखालची वाळू सरकत आहे, याकडे लक्ष द्यावे. - संपादक) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांनी ठाण्यात तिरंगा मोटारसायकल फेरी (रॅली) काढून येथील जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्यासमोर देश हितासाठी बलीदान देण्याची प्रतिज्ञा केली. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी या देशाचा राष्ट्रध्वज भगवा आणि राष्ट्रगीत वन्दे मातरम् हे असावे असे वक्तव्य केले होते. त्यावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात तिरंगा मोटरसायकल फेरी काढून जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

पाकमध्ये भारतीय आगंतुकांवर असणार विशेष लक्ष !

     इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये येणार्‍या भारतियांवर पाक शासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जियो या पाकिस्तानी दूरचित्रवाहिनीनुसार, पाकच्या गृहमंत्रालयाने पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबरपख्तूनख्वा या चारही प्रांतांबरोबरच गिलगिट-बल्तिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या भागांत येणारे विदेशी विशेषत: भारतीय नागरिक यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तचर संस्था रॉचे हस्तक असल्याच्या आरोपावरून अलिकडे अटक करण्यात आली होती. पाकचा हा आरोप भारताने फेटाळला असला, तरी या पार्श्‍वभूमीवर पाककडून बाहेरून येणार्‍या आगंतुकांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (केवळ संशयावरून एका भारतियाला अटक केल्यावर पाकने त्यांच्या देशात येणार्‍या सर्वच भारतियांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले; मात्र भारतात प्रतिवर्षी अनेक विदेशी नागरिक येऊन येथे अवैध उद्योग करत असतात; पण त्यांच्याकडे लक्ष देण्याचीही दक्षता भारत घेत नाही ! - संपादक)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन

मराठीला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी परिवहनाच्या माध्यमातून प्रयत्न 
करणारे मंत्री श्री. दिवाकर रावते यांचा आदर्श सर्वच मंत्र्यांनी घ्यावा ! 
  • ६०० फ्लेक्स, १८ सहस्र स्टिकर्स, मनोगताच्या २५ सहस्र प्रती यांद्वारे प्रसार
  • मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांचा स्तुत्य प्रयत्न
कवितांच्या फ्लेक्सच्या अनावरणप्रसंगी उपस्थित
मंत्री श्री. दिवाकर रावते (उजवीकडून तिसरे)
आणि अन्य मान्यवर
     मुंबई - मराठी भाषा गौरवदिनाच्या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील एकूण ५६८ बसस्थानकांवर मराठी भाषेचे गुणगान करणार्‍या विविध नामवंत कवींच्या कवितांच्या फ्लेक्सचे अनावरण करण्यात आले. यात परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजितसिंह देओल यांचा पुढाकार होता. या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करण्यात आला.

तुर्कस्थानकडून सिरियाच्या सहस्रो शरणार्थींना बलपूर्वक परत सिरियामध्ये पाठवले जात असल्याचा अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा आरोप !

     लंडन (इंग्लंड) - जानेवारी २०१५ च्या मध्यापासून तुर्कस्थानने सिरियामधील सहस्रो शरणार्थींना बलपूर्वक परत सिरियामध्ये पाठवल्याचा आरोप अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने केला आहे. प्रतिदिन जवळपास १०० शरणार्थींना तुर्कस्थानमधून परत सिरियामध्ये पाठवले जात आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. इंग्लंडच्या बीबीसी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देश ग्रीसमध्ये प्रवेश करणार्‍या शरणार्थींना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. 
     तुर्कस्थानने मात्र अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा दावा फेटाळून लावला आहे. तुर्कस्थान आणि युरोपीय युनियन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, ग्रीसमधील ज्या शरणार्थींनी आश्रयासाठी अर्ज केला नसेल किंवा ज्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असेल, त्यांची परत तुर्कस्थानमध्ये रवानगी केली जाईल. त्याऐवजी तुर्कस्थानला आर्थिक साहाय्य आणि राजकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत, असेही करारात म्हणण्यात आले आहे.स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीविषयी पक्ष ठाम ! - रावसाहेब दानवे, भाजप

       नाशिक - छोटी राज्ये असावीत, ही भाजपची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीविषयी पक्ष ठाम आहे; मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले, तसेच छोटी राज्ये निर्माण करण्यामागे काँग्रेसप्रमाणे राजकारण हा हेतू नसून प्रशासकीय सोय हेच सूत्र असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. मराठवाड्याविषयी मात्र भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले.

रस्ते खोदाईला आयुक्तच कारणीभूत ! - महापौर

       पुणे, ३ एप्रिल - गेल्या दोन मासांंपासून शहरात विविध ठिकाणी विविध कारणांवरून रस्ते खोदले गेल्याने, तसेच अजूनही खोदले जात असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी चांगले डांबरी रस्ते उखडून ते सिमेंट-क्राँक्रीटचे केले जात आहेत. या प्रकरणी महापौर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन ठिकठिकाणच्या रस्तेखोदाईला आयुक्त कुणाल कुमारच उत्तरदायी आहेत. अनेक मोठ्या केबल आस्थापनांच्या दबावाखाली आयुक्त आस्थापनांना लाभ व्हावा, यासाठी रस्ते खोदण्याची अनुमती देत आहेत. आयुक्त आमचे ऐकतच नाहीत, अशी तक्रार मांडली. (यावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये असणारा समन्वयाचा अभाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एकमेकांवर आरोप करून जनतेची दिशाभूल करणारे नव्हे, तर जनहिताची तळमळ असणारे नेते आणि अधिकारी हेच शहराचा विकास खर्‍या अर्थाने करू शकतील. - संपादक)

काँग्रेसचा हात..., डावे आणि देशद्रोही यांना साथ !

श्री. सुरेश चिपळूणकर
     या लेखांतर्गत २ एप्रिल या दिवशी आपण काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी डाव्यांना दिलेली साथ आणि देशविरोधी कृत्ये यांविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
६. काँग्रेसची अलीकडची काही देशद्रोही कृत्ये !
६ आ. बाटला हाऊसच्या चकमकीत मारले गेलेल्या आतंकवाद्याच्या कुटुंबियांना सहानुभूती देऊन देहली पोलिसांचा अवमान करणारी काँग्रेस ! : काँग्रेसचा देशद्रोही दृष्टीकोन देहलीच्या बाटला हाऊसच्या चकमकीच्या वेळीही समोर आला होता. सप्टेंबर २००८मध्ये ज्या वेळी केंद्र आणि देहली या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे शासन होते, त्या वेळी दोन आतंकवादी मारले जाणे आणि मोहनचंद्र नावाचा शूर पोलीस अधिकारी हुतात्मा झाल्यानंतरही काँग्रेसकडून त्याबद्दल कोणतीही कठोर प्रतिक्रिया येणे दूरच राहिली, नेहमीप्रमाणे राहुलचे राजकीय गुरु, अर्थात् दिग्विजयसिंह दुखवटा व्यक्त करण्यासाठी आतंकवाद्यांचे घर आझमगढ येथे पोचले. मुसलमानांकडून मते गोळा करण्याचा प्रयत्न करतांना पक्षाने सरळसरळ देहली पोलीस आणि हुतात्मा शर्मा यांच्या बलीदानावर प्रत्यक्षपणे प्रश्‍न उठवला.

लातूर शहराला मे मासात रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार

       लातूर, ३ एप्रिल - लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेने पाणीपुरवठा करता यावा, यासाठी रेल्वे विभागाला अनुमती मिळाली आहे. त्यामुळे मे मासामध्ये लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली. पंढरपूर आणि लातूर या दोन्ही ठिकाणी रेल्वेमध्ये पाणी भरणे आणि ते उतरवून घेणे, ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने पाणी उपलब्ध होईल. १७ एप्रिलपासून पंढरपूर रेल्वे स्थानकापर्यंत उजनी धरणातून पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात लातूरला रेल्वेने पाणी पाठवण्यास आरंभ होईल. एका रेल्वेमध्ये २७ लक्ष ५० सहस्र लिटर पाणी आणले जाणार असून ते पाणी शहराला आठवडाभर पुरेल.

शिवभक्तांनो, केवळ उत्सव नको !

     जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव या वीरश्री निर्माण करणार्‍या घोषणा देत राज्यात आणि देशभरात ठिकठिकाणी धर्माभिमान्यांनी शिवजयंती उत्सव साजरा केला. भगवे फेटे, पारंपरिक वाद्ये आणि मर्दानी खेळ सादर करून ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू संघटित झाले; मात्र शिवजयंती साजरी करतांनाचा हा उत्साह केवळ घोषणा देणे, फटाके फोडणे, मिरवणुका काढणे एवढ्यापुरताच मर्यादित राहिला, तर त्यातून काही खरे धर्महित साधेल असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्‍वराच्या मंदिरात शपथ घेऊन पाच पातशाह्यांना नेस्तनाबूत केले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याची संस्थापना हे महाराजांचे महत् कार्य आहे. मुघल आक्रमण लुटमारी करत असतांना अन् हिंदु स्त्रियांची अब्रू लुटत असतांना तत्कालीन वीर मराठे मुघलांची मांडलीक स्वीकारून त्यांची वतनदारी सांभाळत होते.

राज्यात संपूर्ण पथकरमुक्ती अशक्य ! - चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्र

      मुंबई - राज्यात संपूर्ण पथकरमुक्ती अशक्य आहे, असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच विधान परिषदेत केले. राज्यातील पथकर संपूर्ण बंद होणार का, असा प्रश्‍न प्रश्‍नोत्तराच्या तासाला विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी हे उत्तर दिले.

इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करून त्यांच्यावर अन्याय का करावा ? - मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री

असे आहे, तर मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हवे, हे वक्तव्य कसे खरे समजायचे ?
गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
     केपे - मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले जावे, असे विधान गेल्या काही दिवसांत वारंवार करणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना चालू असलेले शासकीय अनुदान रहित करून त्यांच्यावर अन्याय का करावा ?, असा प्रश्‍न कुडचडे मतदारसंघातील असोल्डा पंचायत सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित केला. या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते.
     संरक्षणमंत्री पर्रीकर या वेळी म्हणाले, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळणे महत्त्वाचे असून इंग्रजी भाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे अनुदान का बंद करावे ? मागील काँग्रेस शासनाने हे अनुदान चालू केले होते आणि विद्यमान शासनाने ते कायम ठेवले आहे. ते बंद करून त्यांच्यावर अन्याय का करावा ?

संरक्षण प्रदर्शनामुळे अनुभवला देशाभिमानाचा अपूर्व क्षण !

कु. प्राजक्ता धोतमल
     २८ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत गोव्यात झालेल्या संरक्षण प्रदर्शनाला जाण्याची देवाच्या कृपेने संधी मिळाली. या प्रदर्शनामुळे संरक्षणखात्याविषयी, तसेच शस्त्रास्त्रांंविषयी अनभिज्ञ असलेल्या जिज्ञासूंना राष्ट्राच्या संरक्षणविषयीच्या धोरणांविषयी, तसेच आधुनिक शस्त्रांविषयी तोंडओळख झाली. युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी रणगाड्यांचे, तसेच लढाऊ विमानांचे प्रात्यक्षिक ही या वेळी दाखवण्यात आले. गगनाला भिडणार्‍या लढाऊ विमानांचे प्रात्यक्षिक, तसेच भारतीय वैमानिकांचा कौशल्यपूर्ण आविष्कार पाहून राष्ट्राविषयीच्या अस्मितेने मन उचंबळून आले. भारताच्या क्षेपणस्त्रांची, युद्धनौकांची, तसेच लढाऊ विमानांची भारतीय नावे, भारताने या क्षेत्रात केलेला उत्कर्ष आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताच्या महत्त्वाकांक्षी योजना हे सारेच भारतीय म्हणून मान उंचावणारे होते. हे सारे अभिमानास्पद वाटत असले, तरी देशात भ्रष्टाचार आणि अन्य अंतर्गत समस्यांच्या रूपाने जो दु:शाप लागला आहे, त्याचेही स्मरण होऊन या योजनेला ग्रहण तर लागणार नाही ना, अशी चिंता वाटली. बोफोर्स घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे वाटले. भारतात सर्वच क्षेत्रांत अजून पुष्कळ सुधारणा अभिप्रेत आहेत; पण तरी संरक्षण प्रदर्शनातून काही अंशी तरी उद्याच्या सक्षम आणि स्वावलंबी राष्ट्रासाठी आशेचा किरण दिसला !

गुढीपाडव्यानिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत नववर्षारंभ विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : ८ (४ रंगीत + ४ कृष्णधवल)
मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ 
एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     सर्व पशू हे अपरिपूर्ण पशू आहेत, तर केवळ मनुष्यच परिपूर्ण नरपशू आहे. (All beasts are Imperfect animals. Man alone is the perfect brute.) - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

हिंदु आहोत, हे सांगायची लाज वाटणारे हिंदू !

     जगातील प्रत्येक सहावा माणूस हिंदु आहे; पण हिंदू प्रामुख्याने ज्या देशात रहातात, त्या हिंदुस्थानात स्वतःला हिंदु म्हणवणे, हे नैतिकदृष्ट्या कमीपणाचे मानले जाते ! (लोकजागर, सांगली)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
२. धर्माविषयी केलेले लिखाण 
२ अ. देवतांचे विडंबन रोखणे 
श्री. विनायक पाटील
२ अ १. श्री. विनायक पाटील 
२ अ १ अ. हिंदु कैद्याला ॐ लिहिलेला अंगरखा घातल्याने होणारे विडंबन समजावून सांगितल्यावर त्याने तो अंगरखा वापरणे बंद करून नामजपास आरंभ करणे : एकदा एक हिंदु तरुण कैदी माझ्या खोलीत रहायला आला होता. त्याच्याजवळील एका अंगरख्यावर ॐ असे लिहिले होते. एकदा त्याला ॐ हा आपला मंत्र असून ॐ असलेला अंगरखा परिधान केल्याने कशा प्रकारे विडंबन होते, ते समजावून सांगितले. त्यानंतर त्याने तो अंगरखा वापरणे बंद केले आणि जातांना तो मला देऊन टाकला. 
     त्या कैद्याने माझ्याकडून कुलदेवी आणि दत्तगुरु यांच्या नामजपाविषयी विचारून घेऊन नामजप करण्यास आरंभ केला अन् माझ्याकडून जपमाळही घेतली. (४.१.२०११)
२ आ. कृतज्ञता वाटणे 
२ आ १. श्री. प्रशांत जुवेकर
२ आ १ अ. हिंदु धर्मात जन्म मिळाल्याने कृतज्ञता वाटणे : आज हिंदु असल्याचा पुष्कळ अभिमान वाटत आहे. हिंदु धर्मात जन्म मिळाला; म्हणून जी कृतज्ञता वाटायला हवी, ती अल्प-अधिक प्रमाणात का होईना, आज जाणवली. धर्म पेशीपेशींत आणि रोमरोमांत भरला पाहिजे. कट्टरतेने धर्माचे आचरण करायला हवे, असे तीव्रतेने वाटायला लागले. - श्री. प्रशांत जुवेकर (२४.५.२०१२)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मला उलगडलेेले पू. अनुताईंच्या विशाल हृदयाचे गूढ !

१. प.पू. गुरुदेवांच्या वाढदिवसाचा भावसोहळा पहात असतांना पू. अनुताईंना मिठी मारावी, असे वाटणे आणि त्यांनी मनातील इच्छा जाणून मिठीत घेणे : प.पू. गुरुदेवांच्या वाढदिवसाचा भावसोहळा पहात असतांना मला सतत पू. अनुताईंना (पू. (कु.) अनुराधा वाडेकर) मिठी मारावी, असे वाटत होते. मी कार्यक्रम संपताच पू. अनुताईंच्या समोर जाऊन उभी राहिले. त्यांनीच जणू काही माझ्या मनातील इच्छा समजल्याप्रमाणे मला मिठीत घेतले.

पू. अनुताई असे प्रीतीचा अथांग सागर !

पू. अनुताई असे आम्हा लेकरांची आई ।
प्रीती अन् आनंद असे ज्यांच्या ठायी ।
पू. अनुताईंसारख्या आहेत केवळ पू. अनुताई ॥ १ ॥
प्रीतीचा सागर आहे ज्यांच्यात सामावलेला ।
कुणीही कधीच ज्यांच्यात कोरडेपणा न अनुभवलेला ।
अडचण असो वा आनंदाचा क्षण, असे तत्पर त्यात सहभाग घेण्याला ॥ २ ॥
ज्यांच्या अंतरी केवळ भगवंतच विसावलेला ।

आश्रमातील अंथरुण, पांघरुण आदी, तसेच लेखा विभागांतर्गत कापडी फलक आवश्यक तेवढा वेळ उन्हात ठेवण्याचे नियोजन १५.४.२०१६ या दिवसापर्यंत करावे !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     सध्या उन्हाळा चालू असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमसाठ्यातील अंथरुण-पांघरुण, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य उन्हात ठेवावे. यासमवेतच आश्रमातील लाकडी फर्निचरही आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.
लेखासेवकांनी जिल्हासाठ्यातील कापडी फलक, कनाती आदी साहित्यही उन्हात ठेवावे.
     असे केल्यास दमट हवामानामुळे ओलसर झालेले साहित्य पुढील वर्षभर चांगल्या स्थितीत राहू शकते. कापडाचा रंग जाऊ नये, यासाठी साहित्य जास्त वेळ कडक उन्हात न ठेवता आवश्यक तेवढा वेळच ठेवावे.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

नामजपाची सुधारित ध्वनीफीत उपलब्ध !

साधकांना सूचना !
     सध्या आपल्याला महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक करायचा आहे. या नामजपाची ध्वनीमुद्रित धारिका संगणकीय मार्गिका (लिंक) http://www.sanatan.org/mr/a/11560.html येथे उपलब्ध करून देण्यात आली होती. आता नामजप करण्याच्या पद्धतीत थोडा पालट झाला असल्यामुळे ती ध्वनीफीत त्याच मार्गिकेवर सुधारित ठेवण्यात आली आहे. तरी साधकांनी यापूर्वी ती ध्वनीफीत डाऊनलोड केली असल्यास ती पुसून नामजपाची नवीन ध्वनीफीत डाऊनलोड करून घ्यावी.

साधकांना प्रेमाने घडवणार्‍या पू. (कु.) अनुराधा वाडेकर !

       आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी या दिवशी सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
पू. (कु.) अनुराधा वाडेकर
यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त
सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. (कु.) अनुराधा वाडेकर
१. पू. अनुताई साधकांना त्यांच्या चुका, दोष आणि 
साधनेची होणारी हानी अत्यंत प्रेमाने सांगत असल्याचे 
पाहून त्यांची सर्वोच्च प्रीती अनुभवण्यास मिळणे
        पू. अनुताई (पू. (कु.) अनुराधा वाडेकर) आणि सौ. घोंगाणेकाकू यांनी सांगितल्याप्रमाणे मी सप्टेंबर २०१५ मध्ये धर्मरथावर सेवा करण्यासाठी ठाणे सेवाकेंद्रात गेले. त्या वेळी मी प्रथमच पू. अनुताईंना पाहिले. तेथे सेवाकेंद्रातील साधकांची बैठक चालू होती. त्यामध्ये साधकांच्या चुका, त्यांचे दोष, चुकांविषयी गांभीर्याचा अभाव असणे आणि त्यामुळे त्यांच्या साधनेची होणारी हानी, असे सर्व पू. अनुताई साधकांना अत्यंत प्रेमाने सांगत होत्या. त्या वेळी त्यांच्या प्रत्येक शब्दातून वेगळीच स्पंदने बाहेर पडत होती. मला त्यातून फार आनंद मिळत होता. साधकांच्या चुका आणि साधकांचे नेमके कुठे दुर्लक्ष होते, याविषयी सांगतांना त्यांची शब्दाशब्दांतून साधकांच्या प्रगतीची तळमळ व्यक्त होत होती. साधकांची वेगाने प्रगती व्हावी, यासाठी त्यांची ती धडपड पाहून मला उच्च प्रतीची प्रीती कशी असते, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

प्रांजळ, सर्वांशी जवळीक साधणारा आणि बालपणापासूनच कृष्णावर दृढ श्रद्धा असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. आदित्य वाघमारे (वय ५ वर्षे) !

चि. आदित्य वाघमारे
     वर्ष २०१४ मध्ये वयाच्या तिसर्‍या वर्षी चि. आदित्य वाघमारे त्याच्या आईसोबत सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात रहायला आला. उपजत अंगभूत गुणांमुळे त्याची सर्व साधकांशी लवकर जवळीक निर्माण झाली. त्याच्या वागण्या-बोलण्यातून तो आश्रमात रहाणार्‍या अन्य बालसाधकांच्या तुलनेत निराळा आहे, हे सहजतेने कोणाच्याही लक्षात येत असे. वर्ष २०१४ मध्ये त्याचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के असल्याचे उद्घोषित करण्यात आले. दीड वर्षापूर्वी साधकांनी त्याची गुणवैशिष्ट्ये लिहून दिली. आता त्या वैशिष्ट्यांत आणखी वाढ झाली आहे. त्याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त ती येथे देत आहोत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेणार्‍या बालकांच्या अंगी असणारे दैवी गुण कसे असतात, ते सर्वांना शिकायला मिळेल !
चि. आदित्यचा वाढदिवस काल 
फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशीला झाला !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भूमाता ब्रिगेडवाल्यांनो, शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यात शक्ती फुकट घालवण्यापेक्षा शनिदेवाची भक्ती करा. शनिदेव तुम्हाला स्वतःहून दर्शन देईल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सर्वकाही परमेश्‍वराच्या इच्छेने होते ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र अन् मानव यांचा जन्म आणि त्यांचे प्राप्तकार्य हे परमेश्‍वरी इच्छेनेच नियंत्रित आहेत, हा विश्‍वास असला की, कुणाचाही द्वेष वाटत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

गोमंतक गोंधळला !

संपादकीय
     सध्या गोमंतकात दोन निरनिराळे वारे वहात आहेत. एकीकडे संस्कृतीप्रेमी आंदोलने करत आहेत. कुणी कॅसिनोच्या विरोधात संघटित होत आहेत, कुणी माध्यमप्रश्‍नी जागृती करत आहेत, तर कुणी मराठी राजभाषा होण्यासाठी आंदोलन करत आहेत. अमली पदार्थ व्यवसाय, वेश्याव्यवसाय, संगीतरजनी यांच्या विरोधातही काही क्षीण आवाज मध्ये मध्ये उठतात आणि नंतर विरून जातात. या सर्व सूत्रांसंदर्भात शासनाचे धोरण पाहिले, तर संस्कृतीप्रेमींच्या काळजाला घरे पडावी, असेच आहे. एवढे होते, तोपर्यंत ते सामान्यच वाटते. अलीकडे धर्म-संस्कृतीला तडा देऊनच राजकारण करण्याची पद्धत प्रचलित झाली असल्यामुळे शासनाने संस्कृतीविरोधी धोरणे राबवायची आणि संस्कृतीरक्षकांनी त्याविरुद्ध आवाज उठवायचा, हे आपल्या देशात काही नवीन नाही. गोमंतकात असे काय आहे की, नवखी व्यक्ती गोंधळात पडेल ? वरकरणी नेत्यांची भाषणे ऐकली, तरी एखादा सुखावेल, इतके संस्कृतीप्रेम, मातृभाषाप्रेम त्यातून ओथंबून वहात असते. स्वतःच्या भाषणांतून व्यक्त होणार्‍या या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध धोरणे राबवणारेही हेच नेत आहेत, हीच खरी अडचण आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn