Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकचा आतंकवादी मसूद अझरवर बंदी घालण्यास चीनचा विरोध !

विश्‍वासघातकी चीनकडून पाकमधील जिहादी 
आतंकवाद्यांची उघड पाठराखण !
अझरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रस्तावाच्या 
विरोधात चीनकडून नकाराधिकाराचा वापर !
पाकच्या आतंकवाद्यांना रोखू न शकणारे 
भारतीय शासन बलाढ्य चीनला कसे तोंड देणार ?
      नवी देहली - पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख आणि पठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार मौलाना मसूद अझर याच्यावर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रस्तावाच्या विरोधात चीनने नकाराधिकाराचा वापर केल्याने तो फेटाळला गेला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते; मात्र चीनच्या विरोधामुळे अझरवरील बंदी लांबणीवर पडली.
१. पठाणकोट येथील भारतीय वायूदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणात अझरचा हात असल्याचे ठोस पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रापुढे सादर केले आहेत. हे पुरावे मिळाल्यामुळेच संयुक्त राष्ट्राने अझरवरील बंदीच्या प्रस्तावावर सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र चर्चा चालू होण्याच्या काही घंटे आधीच चीनने प्रस्तावाला विरोध करण्यासाठी नकाराधिकार वापरणार असल्याचे घोषित केल्याने चर्चा होऊ शकली नाही.
२. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील चर्चेनंतरच चीनकडून नकाराधिकार वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

(म्हणे) भारतमाता की जय घोषणा इस्लामविरोधी असल्याने मुसलमानांनी ती देऊ नये !

राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेत विष कालवणार्‍या दारुल उलूमचा फतवा
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारतमाता की जय ही घोषणा इस्लामविरोधी असून कोणत्याही मुसलमानाने ही घोषणा देऊ नये, असा फतवा दारुल उलूम या मुसलमानांच्या प्रमुख संघटनेने काढला आहे. या फतव्यात म्हटले आहे की, आमच्या देशावर आमचे प्रेम आहेच; पण देश हा आमचा देव नाही. इस्लाम केवळ एकाच देवाला मानतो. त्यामुळे मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करणे इस्लामविरोधी आहे. देशभरातील इस्लामी विद्वानांच्या दारुल इफ्ता या ८ सदस्यीय समितीने २ दिवसांच्या चर्चेनंतर हा फतवा काढला.
दारुल उलूमच्या फतव्यातील सूत्रे
१. यापूर्वीही वन्दे मातरम्वरून असाच वाद निर्माण करण्यात आला होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वन्दे मातरम् म्हणण्याची सक्ती करण्यात आली होती. आता भारतमाता की जय म्हणण्याची सक्ती केली जात आहे. हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत.
२. इस्लाम हा एकेश्‍वरवाद मानणारा धर्म आहे. इस्लामचे पालन करणारी व्यक्ती केवळ एकाच देवाला मानते. या देवाची मूर्ती किंवा चित्र रेखाटले जाऊ शकत नाही. काही हिंदु धर्मीय भारतमातेला देवता मानतात आणि तिची पूजा करतात.

श्री शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याचे प्रकरण धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही ! - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाघेला आणि
 न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपिठाचे निर्देश
  • अभ्यास नसतांना धर्माविषयी निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का ?
  •  अन्य धर्मियांविषयी असा निर्णय का घेतला जात नाही ? कि ते न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत ?
  •  काफिरांना, मूर्तीपूजकांना म्हणजेच हिंदूंना ठार मारा, अशी आज्ञा कुराणातून करण्यात आली आहे, त्याविषयी न्यायालय काहीच का करत नाही ?
      मुंबई - मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्‍या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. महिलांच्या प्रवेशासाठी शासनाने व्यवस्था करावी. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आणि त्यासाठी संरक्षण देणे, हे शासनाचे दायित्व आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे सांगितले. यासंदर्भात योग्य ती नियमावली आणि तरतुदी शासनाने कराव्यात, असेही निर्देश मुख्य न्यायमूर्ती डी.एच्. वाघेला आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनक यांच्या खंडपिठाने दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे शनिशिंगणापूर येथे महिलांना प्रवेश करण्यास नकार देणार्‍यांना कारावास आणि दंड अशी शिक्षाही होऊ शकते.
     महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अधिवक्त्या निलिमा वर्तक यांनी अधिवक्त्या कल्याणी तुळणकर यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.

न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार ! - हिंदु जनजागृती समिती

     मुंबई - हिंदूंच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही, हा आरोपच मुख्यतः चुकीचा आहे. हिंदूंच्या सर्व मंदिरांत महिलांना प्रवेश आहे. केवळ काही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या मंदिरांचा याला अपवाद आहे. कर्मकांडाच्या उपासनेतील जे देहाशी निगडित नियम आहेत, ते व्यक्तीच्या आरोग्याची काळजी या दृष्टीने केलेले आहेत. ते केवळ कर्मकांडाशी निगडितच असतात. उपासनाकांडानुसार महिला कोणतीही उपासना करू शकतात. आजच्या याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या मंदिरात पुरुषांना प्रवेश आहे, तेथे महिलांनाही प्रवेश मिळावा; मात्र
     श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर वर्ष २०११ पासून पुरुष आणि महिला या दोघांनाही प्रवेशबंदी लागू आहे. त्यामुळे या चौथर्‍यावर महिलांसह पुरुषांनाही प्रवेश देता येणार नाही. श्री शनिमंदिरात केवळ महिलांना प्रवेशबंदी असल्याची चुकीची माहिती दिली जात आहे. मुळातच शनिमंदिरात सर्वांना प्रवेश आहे आणि चौथर्‍यावर महिला आणि पुरुष दोघांनाही प्रवेश नाही. असे असतांना या प्रकरणी न्यायालयाची दिशाभूल केल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर प्रकरणात आम्ही फेरविचार याचिका दाखल करणार आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
समितीने या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. हिंदु प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप अ‍ॅक्ट १९५६ या कायद्याचा संदर्भ शासनाने न्यायालयात दिला आहे, त्यात केवळ मंदिरात प्रवेश मिळावा, असे म्हटले आहे.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देणे सयुक्तिक नाही ! - ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा

     शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देणे सयुक्तिक नाही. ही याचिका फार जलदगतीने ऐकली आणि निकाली काढली जात आहे, असा युक्तीवाद ज्येष्ठ अधिवक्ता श्री. सुभाष झा यांनी १ एप्रिल या दिवशी मुख्य न्यायमूर्ती वाघेला आणि न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपिठासमोर याचिकेचा निकाल लागल्यानंतर केला. केवळ न्यायालयात उपस्थित असलेल्या व्यक्तीच नव्हे, तर सहस्रावधी लोकांच्या भावना या विषयाशी जोडलेल्या आहेत. असे असतांना त्यांचेही ऐकून घेतले पाहिजे. मलाही माझे म्हणणे मांडायचे आहे. असे असतांना आपण ही याचिका आज अशी निकाली काढू नका, अशी माझी न्यायालयाला नम्र विनंती आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती श्री. वाघेला म्हणाले, मी याचिका निकाली काढली आहे. आता मी ऐकणार नाही. अजूनही तुम्ही बोलाल, तर न्यायालयाचा अवमान होईल. त्यावर अधिवक्ता झा म्हणाले, न्यायालयाचा अवमान करण्यासाठी बोलायची माझी इच्छा नाही; परंतु आमच्या भावना पोचवायची इच्छा आहे. ही याचिका निकाली काढली, तर आमचे म्हणणे ऐकले जाणार कसे ? त्यावर फारसे उत्तर न देता खंडपिठाने पुढील याचिकांची सुनावणी चालू केली.

न्यायालयाच्या निर्णयाविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया

श्री शनिदेवाच्या चौथर्‍याच्या खालून दर्शन देण्याचा नियम तसाच
ठेवावा ! - श्री. बाळासाहेब बानकर, सरपंच, शनिशिंगणापूर
     न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आम्हाला आदरच आहे. मुळात मंदिरामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात नाही. मंदिरात प्रवेश सर्वांनाच आहे. त्यामुळे येथे भेदभावाचा प्रश्‍नच येत नाही. श्री शनिशिंगणापूर येथे वर्ष २०११ पासून चौथर्‍याच्या खालूनच दर्शन दिले जाते आणि तो नियम तसाच रहावा.
...तर आम्हीही न्यायालयात याचिका प्रविष्ट करू ! - 
अधिवक्ता श्री. श्रीकांत गायधने, विश्‍वस्त, श्री त्र्यंबकेश्‍वर देवस्थान
     मुळातच आम्ही त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरामध्ये स्त्री-पुरुष असा कोणालाही प्रवेश नाकारलेला नाही, तर गर्भगृहात प्रवेश नाकारत आहोत. श्री त्र्यंबकेश्‍वराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी सोवळ्यात गेले पाहिजे, असा धर्मादाय आयुक्तांचाच आदेश आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही कसा मोडणार ? तसेच न्यायालयाने ज्या कायद्याचा उल्लेेख करून निर्णय दिला आहे, तो कायदा अस्पृश्यतेसंबंधी आहे आणि आम्ही मंदिरात अस्पृश्यता पाळत नाही. आज न्यायालयाने निर्णय देतांना केवळ एकच बाजू ऐकून निर्णय दिला आहे. दुसरी बाजू ऐकून घेतलेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा अभ्यास करून आम्हीही न्यायालयात याचिका प्रविष्ट करू.

जोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी ! - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर, जिल्हा सोलापूरशासकीय भूमीचा कसा वापर होतो, हे तुम्ही का तपासत नाही ? माहिती का प्रसिद्ध करत नाही ? - मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र शासनाला प्रश्‍न

हिंदु विधीज्ञ परिषदेचे यश !
       मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) - शासकीय भूमींच्या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर १ एप्रिल या दिवशी सुनावणी करतांना न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला फटकारले. उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्व बाबींची गंभीर दखल घेत न्यायालयाने शासनाला म्हटले की, तुम्ही काय करत आहात ? भूमीच्या वापरात अटींचे उल्लंघन होत आहे किंवा नाही याविषयी तुम्ही अद्याप काही केले आहे का ? सर्व माहिती शासकीय संकेतस्थळावर तुम्ही प्रसिद्ध करणार आहात का ? आतापर्यंत का केली नाही ? असे प्रश्‍न विचारत फैलावर घेतले. तसेच शासनाला कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

इस्लामी आतंकवादासाठी स्वत:ला दोष देणे थांबवले पाहिजे ! - लंडन येथील ज्येष्ठ पत्रकार डग्लस मरे

     लंडन (इंग्लंड) - पाश्‍चात्त्य देशांवर झालेल्या जिहादी आक्रमणानंतर आपण प्रत्येक वेळी स्वत:ला चुकीचे प्रश्‍न विचारण्याच्या शर्यतीत का असतो ? जिहादच्या सत्यस्थितीला सामोरे जाण्यापूर्वी आपण आणखी किती सबब सांगणार आहोत ? युरोपीय समाजावर जेव्हा जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होते, तेव्हा असे अनावश्यक प्रश्‍न का विचारले जातात ? त्यामुळे आपण काहीतरी सबब सांगून वेळ मारून नेण्याचे काम करत आहोत, असे परखड मत टेलिग्राफ या इंग्लंडच्या संकेतस्थळावर प्रकाशित लेखाद्वारे वरिष्ठ पत्रकार डगलस मरे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली महासंचालनालयाकडून शासनाधीन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याचे प्रकरण
घोटाळेबाजांचा भरणा असलेला राष्ट्र्रवादी (?) काँग्रेस पक्ष !
      मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोटयवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू आहे. या प्रकरणात महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या मालकीची १२० कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली महासंचालनालयाने शासनाधीन केली आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेले राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर पक्षाच्या आणखी एका आमदाराची मालमत्ता शासनाधीन करण्यात आली आहे.
     कदम हे ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असतांना इतर सदस्यांच्या साहाय्याने ३०० कोटी रुपयांहून अधिक निधीचा घोटाळा केला होता. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा प्रविष्ट केला होता. याच गुन्ह्याच्या आधारे सप्टेंबर २०१५ मध्ये महासंचालनालयाने काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वयेही त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला होता. या प्रकरणी आमदार कदम यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली.

आतंकवादी पाकचेच असल्याची पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाची स्वीकृती !

पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
       नवी देहली - पठाणकोट येतील भारतीय हवाईदलाच्या तळावर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात सहभागी झालेले आतंकवादी हे पाकमधूनच आले होते, अशी स्वीकृती पाकच्या संयुक्त अन्वेषण पथकाने दिली आहे. या आक्रमणाचे षड्यंत्रही पाकमध्येच रचले गेल्याचे या पथकाने मान्य केले आहे. पथकाकडून आक्रमणाच्या संदर्भात १३ साक्षीदारांची चौकशी करण्यात आल्यावर आणि भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) सादर केलेले सर्व पुरावे पाहून पाकिस्तानी पथकाने वरील सूत्रे मान्य केली आहेत. (भारताने पाक आतंकवाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा न ठेवता पाकला धडा शिकवावा ! - संपादक)
       एन्.आय.ए.ने पाकिस्तानच्या पथकाला मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ भाई रउफ असगर आणि आतंकवाद्यांचा संचालक कासिफ जान यांच्या विरोधातही ठोस पुरावे देऊन पाकने या तिघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तथापि यावर पाकिस्तानी पथकाने मौन बाळगले. (पाकचे खरे स्वरूप ! - संपादक) या आक्रमणाच्या प्रकरणी आता एन्.आय.ए. पाकिस्तानात जाऊन संबंधितांची चौकशी करणार आहे.

दिलीप पाटीदार यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल ! - मुख्यमंत्री

मालेगाव बॉम्बस्फोटातील साक्षीदाराच्या मृत्यूस 
उत्तरदायी अन्वेषण यंत्रणा आणि राज्यकर्ते यांचे अन्वेषण करा ! 
- भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांची विधानसभेत मागणी
         मुंबई, १ एप्रिल (वार्ता.) - मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील दिलीप पाटीदार यांच्यावर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी महाराष्ट्रातील अन्वेषण यंत्रणेकडून दबाव आणण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पाटीदार यांच्यावर दबाव आणणारे अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी आणि या यंत्रणेवर दबाव आणणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्यांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत गृहखात्याकडे केली. त्यावर गृहखात्याचे दायित्व असणारे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावप्रकरणी कोठडीत मृत्यू झालेल्या प्रकरणाचे पूर्ण अन्वेषण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

पुण्यातील ४ सहकारी अधिकोषांमध्ये ३ कोटी ४७ लक्ष रुपयांचा वाहनकर्ज घोटाळा

सहकार म्हणजे स्वाहाकार !
  • ८४ जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट
  • ८ वर्षांनंतर कारवाइ
       पुणे, १ एप्रिल - शहरातील रूपी को-ऑप. बँक, महेश सहकारी बँक, राजगुरुनगर सहकारी बँक आणि कराड अर्बन को-ऑप. बँक या ४ सहकारी अधिकोषांमध्ये ३ कोटी ४७ लक्ष रुपयांचा वाहनकर्ज घोटाळा झाला आहे. या प्रकरणी तत्कालीन संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी अशा ८४ जणांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात ३१ मार्च या दिवशी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हा वाहनकर्ज घोटाळा वर्ष २००८ मध्ये झाला आहे. (इतक्या विलंबाने कारवाई होणार असेल, तर घोटाळेबाजांना कायद्याचा धाक निर्माण होईल का ? - संपादक) हे गुन्हे नोंदवण्यासाठी पुणेकर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मिहीर थत्ते यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला होता. (वाहनकर्ज घोटाळ्याचा पाठपुरावा करून गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मिहीर थत्ते यांचे अभिनंदन ! - संपादक)

पालकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अमेरिकेने शालेय अभ्यासक्रमातून नमस्ते शब्द वगळला !

हिंदूंनो, ख्रिस्त्यांच्या कॉन्व्हेंटमधून हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना येशूची प्रार्थना करण्यास 
लावून त्यांना टिळा लावण्यास अन् अन्य धार्मिक परंपरांचे पालन करण्यास प्रतिबंध केला जातो, 
त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या !
     वॉशिंग्टन - पालकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अमेरिकेने अभ्यासक्रमातून नमस्कार हा शब्द वगळण्यात आला आहे, तसेच प्रार्थना हा शब्दही काढून टाकण्यात आला आहे. ख्रिस्ती धर्मात नसलेल्या गोष्टी मुलांना शिकवल्या जात आहेत, असे पालकांचे म्हणणे आहे. (कॉन्व्हेंट शाळांमध्ये स्वतःच्या पाल्यांचे ख्रिस्तीकरण होत असतांना हिंदु पालक कधी असे बोलतात का ? - संपादक) पालकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी क्षमा मागितली आहे, तसेच सार्वजनिक शाळांमधील धार्मिक प्रथांवर बंदी घालण्यात आली असून हिंदु धर्माची प्रतिके दाखवण्यात येणारी रंगीत पानेही अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहेत.
    भारतात एन्.सी.ई.आर्.टी.सारख्या अभ्यासक्रमातून होणारे मोगलांचे उदात्तीकरण रोखण्यासाठी कित्येकदा आंदोलने करूनही त्याकडे कानाडोळा केला जातो, तर अमेरिकेत केवळ पालकांच्या आक्षेपावरून अभ्यासक्रमात त्वरित पालट केला जातो !

सहकार विभागाच्या सनदी लेखापालांच्या नावांच्या सूचीतून २७ सनदी लेखापाल बडतर्फ

अशा सनदी लेखापालांची सनदच कायमची रहित करून त्यांच्यावर 
दंडात्मक कारवाई केल्यास सर्वत्रच्याच सनदी लेखापालांना धडा मिळेल !
      पुणे - सहकारी संस्थांचे सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करतांना त्यातील अपहार उघडकीस न आणणे, त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणात गंभीर चुका आढळणे आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणे अशा गोष्टी आढळल्या होत्या. या प्रकरणी सहकार विभागाने सनदी लेखापालांच्या नावांच्या सूचीतून २७ सनदी लेखापाल, त्यांची आस्थापने आणि प्रमाणित लेखापरीक्षक यांना बडतर्फ केले आहे, अशी माहिती सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.
     ते पुढे म्हणाले की, राज्यातील नागरी सहकारी अधिकोष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोष, पतसंस्था, साखर कारखाने, सूत गिरण्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था आदींनी वर्षातून एकदा वैधानिक लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार विभागाने राज्यातील ९ सहस्र २३७ सनदी लेखापाल, त्यांची आस्थापने आणि प्रमाणित लेखापरीक्षक नेमले आहेत. यांपैकी उपरोक्त २७ सनदी लेखापालांनी लेखापरीक्षण करतांना संस्थेची खरी आणि वास्तव आर्थिक स्थिती निदर्शनास आणून दिली नाही. याचसमवेत त्यांनी अपहार आणि अपव्यवहार यांविषयीच्या गंभीर सूत्रांचा विशेष अहवाल सादर केलेला नाही. या कारवाईमुळे त्या सनदी लेखापालांना आता कोणत्याच सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करता येणार नाही.

धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने वर्धा येथे विनामूल्य रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबीर

रुग्णाची पडताळणी करतांना डॉ. शैलेश नागपुरे
      वर्धा - धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने डॉ. शैलेश नागपुरे, पाटीलनगर, नालवाडी, वर्धा यांच्याकडे गरजू रुग्णांसाठी विनामूल्य रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले. धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने नियमितपणे समाजोपयोगी उपक्रम, उदा. फळे वाटप, खाऊ वाटप, गणवेश वाटप, तसेच सार्वजनिक उत्सवातील अपप्रकारांच्या विरोधातील प्रबोधन, तणावमुक्त जीवन कसे जगावे, बालसंस्कार शिबीर, विनामूल्य वैद्यकीय तपासणी हे उपक्रम राबवण्यात येतात.
     दैनंदिन जीवनात रक्तदाब आणि मधुमेह यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यामुळे येणार्‍या समस्या आणि त्यांचे निवारण यांसाठी आणि त्यांचे निवारण यांसाठी शिबिराचे न्यासाच्या वतीने आयोजन करण्यात आले. धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने डॉ. शैलेश नागपुरे यांनी गरजू रुग्णांची विनामूल्य रक्तदाब तपासणी केली, तर रेड्डी लॅबचे श्री. अमित राऊत यांनी मधुमेहाची तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यासाच्या सौ. माधुरी पाटील, सौ. वंदना कामनापुरे यांनी परिश्रम घेतले.

खारघर येथील गोहत्या आणि गोमांसाची वाहतूक बंद करण्यासाठी खासदार बारणे यांना निवेदन

डावीकडून गोरक्षक श्री. महेंद्र पवार, गोसेवक श्री. सुनील कुमार,
खा. श्री. बारणे, गोसेवक श्री. संदीप शर्मा, श्री. वसंत सणस
       नवी मुंबई - येथील गोमांसाची वाढती वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी, तसेच गोहत्या करणारे अन् गोमांस वाहतूक करणारे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या हेतूने खारघर येथील गोसेवक अणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शिवसेना खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना गोसेवक सर्वश्री महेंद्र पवार, सुनील कुमार, संदीप शर्मा अणि समितीचे श्री. वसंत सणस उपस्थित होते.

गर्भपात करणार्‍या महिलांना शिक्षा ठोठावली पाहिजे ! - डोनाल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन (अमेरिका) - अनधिकृत रितीने गर्भपात करणार्‍या महिलांना शिक्षा ठोठावण्यात यावी; परंतु प्रमाणित ठिकाणी गर्भपात करण्यात काही अडचण नाही. अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या महत्त्वाच्या उमेदवारांपैकी एक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत वरील वक्तव्य केले.देशाचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एकाच वेळी सर्व निवडणुका घ्या ! - पंतप्रधानांचे मत

जे नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले, ते गेल्या ६८ वर्षांत सर्वाधिक काळ 
राज्य करणार्‍या काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या का लक्षात आले नाही ?
     नवी देहली - निवडणुकांच्या वेळी खर्च करावा लागणारा पैसा आणि वेळ वाचावा, यासाठी देशातील सर्वच निवडणुका एकावेळी घेण्यात याव्यात, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. 
   पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या अर्थसंकल्पातील झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीत बहुतांश पक्षांनी मोदींच्या मताविषयी सकारात्मकता दर्शवली होती.

गेल्या दोन वर्षांत लोकसभेतील १०५ खासदारांनी संपत्ती घोषित केलेली नाही !

या खासदारांची सर्व संपत्ती जप्त करण्याची कारवाई करावी, 
असे जनतेच्या मनात आल्यास त्यात चुकीचे काय ? 
     नवी देहली - लोकसभेच्या नियमाप्रमाणे, संसदेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यापासून ९० दिवसांच्या आत प्रत्येक सदस्याला त्याची संपत्ती आणि मालमत्ता घोषित करावी लागते; मात्र लोकसभेला २ वर्षे पूर्ण होण्यास आली, तरी १०५ खासदारांनी त्यांची संपत्ती घोषित केली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये काँग्रेसचे ४५ पैकी १४ खासदार, तृणमूल काँग्रेसचे ३४ पैकी ८, आंध्रप्रदेश आणि तेलंगण येथील तेलगू देसम पक्षाचे १६ पैकी १०, शिवसेनेचे १८ पैकी ९, समाजवादी पक्षाचे ५, आम आदमी पक्षाचे सर्व ४ आणि सत्ताधारी भाजपच्या २ खासदारांनी अद्याप त्यांच्या संपत्तीची माहिती उघड केलेली नाही. एका इंग्रजी दैनिकाने माहितीच्या अधिकारांतर्गत विचालेल्या प्रश्‍नांतून ही माहिती समोर आली आहे.
     विशेष म्हणजे संपत्ती घोषित न करणार्‍यांंच्या सूचीमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, त्यांची सून डिंपल यादव, तसेच धर्मेंद्र यादव, अक्षय यादव आणि तेजप्रतापसिंह यादव या ५ जणांचाही समावेश आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील दिलीपकुमार मनसुखलाल गांधी आणि रवींद्रकुमार राय या दोघांनीही अद्याप संपत्ती घोषित केलेली नाही.

अभिनेते रजनीकांत यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक नको ! - न्यायालय

     चेन्नई - दक्षिणेमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना त्यांच्या चाहत्यांकडून देवाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या अतीउत्साही चाहत्यांकडून अनेकदा रजनीकांत यांची प्रतिमा आणि मोठे फलक यांना दुधाचा अभिषेक घातला जाऊन लाखो लिटर दुधाची नासाडी करण्यात येते. (हिंदूंमधील धर्माशिक्षणाच्या अभावाचे फलित ! - संपादक) अलीकडेच रजनीकांत यांना महत्त्वाचा पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून उत्साहाच्या भरात अशा प्रकारे दुधाची नासाडी करण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयाने या चाहत्यांना असे कृत्य न करण्याचा आदेश दिला असून दूध वाया न घालवण्याचीही सूचना केली आहे.
     या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. आय.एम्.एस्. मणीवन्नन् यांनी २६ मार्च या दिवशी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यात रजनीकांत यांच्या चाहत्यांना दूध वाया घालवण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिला.

धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने वर्धा येथे स्तन आणि गर्भाशय यांचेे आजार विनामूल्य तपासणी शिबीर

महिलांशी चर्चा करतांना आधुनिक वैद्या (सौ.) शिवाली काशीकर
       वर्धा - धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने येथे नुकतेच आधुनिक वैद्या (सौ.) शिवाली काशीकर, सोनो स्कॅन यांच्याकडे गरजू स्त्रियांसाठी विनामूल्य स्तन आणि गर्भाशय यांचे विविध आजार तपासणी शिबीर घेण्यात आले.
     दैनंदिन जीवनात कर्करोग आणि गर्भाशयाच्या विविध आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तो दूर करण्यासाठी काय प्रयत्न करावे, स्त्रियांना पंचविशीनंतर येणार्‍या समस्या आणि त्यांचे निवारण यांसाठी शिबिराचे आयोजन न्यासाच्या वतीने करण्यात आले. आधुनिक वैद्या (सौ.) शिवाली काशीकर यांनी सोनोग्राफीच्या माध्यमाने गरजू रुग्णांची विनामूल्य तपासणी केली.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यासाच्या सौ. विजया भोळे, सौ. रत्ना हस्ती यांनी परिश्रम घेतले. तसेच दवाखान्यातील कर्मचारी यांचे सहकार्य, तर आधुनिक वैद्या (सौ.) शिवाली काशीकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा लाभ १७ गरजू स्त्रियांनी घेतला.

पूल बनवणार्‍या आस्थापनाचे ५ अधिकारी पोलिसांच्या कह्यात

कोलकात्यातील पूल पडल्याचे प्रकरण
  • बॉम्बस्फोटाद्वारे पूल पडल्याचा आस्थापनाचा दावा !
  • मृतांची संख्या २४ वर
       कोलकाता / भाग्यनगर - येथे बांधकाम चालू असलेला पूल पडल्याच्या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी बांधकाम करणार्‍या आय.व्ही.आर्.सी.एल्. या आस्थापनेच्या ५ अधिकार्‍यांना भाग्यनगर येथून कह्यात घेतले आहे. पोलिसांनी या आस्थापनाच्या विरोधात निष्काळजीपणा, षड्यंत्र रचणे आणि हत्या या संदर्भातील कलमान्वये गुुन्हा नोंद केला आहे. याशिवाय आस्थापनाच्या स्थानिक कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
      तथापि या आस्थापनाने बॉम्बस्फोटामुळे पूल कोसळल्याचा दावा केला आहे. यापूर्वी आस्थापनाने हा अपघात म्हणजे ईश्‍वरेच्छा असल्याचे म्हटले होते. या अपघातात आतापर्यंत २४ जण ठार झाले आहेत.

केवळ हिंदु राष्ट्रच आम्हाला आमची सुखसमृद्धी आणि गतवैभव पुन्हा मिळवून देऊ शकते ! - सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

      भांडुप (पश्‍चिम), मुंबई - राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संघटन, संयम आणि संघर्ष या ३ महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या होत्या. जिजाऊंच्या संस्कारामुळेच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपणही या तीन गोष्टी आत्मसात करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पवित्र कार्यात सहभागी झाले पाहिजे; कारण केवळ हिंदु राष्ट्रच आम्हाला आमची हरवलेली सुखसमृद्धी आणि गतवैभव पुन्हा मिळवून देऊ शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. येथील साईलीला मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ चरित्र या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला १५० धर्माभिमानी आणि शिवभक्त उपस्थित होते.

समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांना पुन्हा अटक

  • अशा घोटाळेबाजांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
  • समृद्ध जीवन घोटाळा प्रकरण
      पुणे, १ एप्रिल - गुंतवणुकीवर जास्त लाभ देण्याचे आमिष दाखूवन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड इंडिया लिमिटेड या आस्थापनाचे संचालक महेश मोतेवार यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३१ मार्च या दिवशी अटक केली. त्यांच्या विरोधात येथील सुनीता धनवे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोतेवार यांना ओडिशा राज्यातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे कह्यात घेऊन अटक करण्यात आली. विशेष न्यायाधीश एस्.जे. काळे यांच्या न्यायालयात मोतेवार यांना उपस्थित केले असता त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

१० वर्षांच्या प्रयत्नानंतरही केवळ ५० सहस्र भारतीय सैनिकांना नवीन बुलेट प्रूफ जॅकेट मिळणार

देशद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या तत्कालीन काँग्रेसच्या राज्यात सैनिकांना असे जॅकेट 
का पुरवले गेले नाहीत, याची चौकशी करून संबंधितांना कठोर शासन केले पाहिजे !
     नवी देहली - देशाच्या सीमेवर दिवसरात्र पहारा देणार्‍या सैनिकांना १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नवीन बुलेट प्रूफ जॅकेट्स देण्यात येणार आहेत; मात्र साडेतीन लाखांची आवश्यकता असतांना केवळ ५० सहस्र जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. सध्या सैन्याकडे असलेल्या जॅकेट्सची स्थिती दयनीय झाली आहे. 
      संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे जॅकेट्स जानेवारी २०१७ पर्यंत मिळणार आहेत. या जॅकेट्ससाठी सैन्याने आपतकालिन करार केला होता; मात्र त्यावरील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १० वर्षे लागली आहेत. पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांनी या कराराला गती दिली. आता मिळणार्‍या जॅकेट्समुळे सैनिकांचे डोके, गळा, छाती आणि पाय सुरक्षित राहू शकणार आहेत.
७२ आस्थापनांनी थकवले ५ लक्ष ५३ सहस्र १६७ कोटी रुपये !

एवढी थकबाकी होईपर्यंत शासन आणि बँक प्रशासन काय करत होते ? 
रिझर्व्ह बँकेकडून थकबाकीदारांची सूची सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर
     नवी देहली - रिझर्व्ह बँकेने कर्ज थकबाकीदारांची एक सूची सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली आहे. यात ७२ आस्थापनांची नावे असून त्यांनी ५ लक्ष ५३ सहस्र १६७ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापैकी केवळ अदानी पॉवर, लॅन्को इन्फ्रा, जीव्हीके पॉवर, सुझलॉन आणि एच्सीसी या ५ आस्थापनांनी १ लाख ४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याचे म्हटले आहे. या सूचीनुसार ७२ पैकी ४० आस्थापनांनी, तर ३ वर्षांत एकदाही त्यांच्यावरील कर्जाची रक्कम भरली नाही. ही सूची न्यायालयामध्ये सादर करण्यात आली असली, तरी अद्यापही सार्वजनिकरित्या सादर करण्यात आली नाही. (सर्वसामान्यांकडून बलपूर्वक एकेक पैसा वसूल करणार्‍या बँका मोठ्या आस्थापनांकडून पैसे वसूल करण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? - संपादक)

अरविंद केजरीवाल महाभ्रष्टाचारी आणि नक्षलवादी !

नक्षलवादी असल्याचा आरोप असलेले राज्यकर्ते पुन:पुन्हा 
सत्तापदी बसतात, ही लोकशाहीची शोकांतिका आहे !
भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप
     नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाभ्रष्टाचारी आणि नक्षलवादी आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे. काँग्रेसला शुद्ध भारतीय नेतृत्वाची आवश्यकता असून त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही स्वामी म्हणाले. अलीकडेच डॉ. स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयात खेचले होते. हा खटला अजूनही चालू आहे.मशिदीच्या इमामाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार !

हिंदूंच्या संतांवरील कथित आरोपांची वृत्त दाखवणारी प्रसारमाध्यमे अन्य 
धर्मियांच्या धर्मगुरूंच्या लैंगिक शोषणांची वृत्ते मात्र दडपतात ! 
     सहरसा (बिहार) - येथील मशिदीचा इमाम महंमद जसीम याने १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जसीम या मशिदीत गेल्या वर्षभरापासून मुलांना शिकवत होता. त्याने पीडित मुलीला शिकण्यासाठी मशिदीत पाठवण्यासाठी तिच्या आईवर दबाव निर्माण केला होता. त्यामुळे तिने मुलीला शिकण्यासाठी मशिदीत पाठवले. त्या वेळी त्याने या मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर इमाम फरार झाला आहे.

पूर्वी जगात केवळ हिंदूच होते. आता ८९ देश ख्रिस्ती आणि ८० देश मुसलमानांचे आहेत. आज या धरणीवर एकही हिंदु देश नाही. (सावरकर टाइम्स, मे २०१०)

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरमध्ये इसिस आणि पाकिस्तान यांचे झेंडे 
फडकवण्याच्या विरोधात फतवे का काढले जात नाहीत ?
     भारतमाता की जय ही घोषणा इस्लामविरोधी असून कोणत्याही मुसलमानाने ही घोषणा देऊ नये, असा फतवा दारुल उलूम या मुसलमानांच्या प्रमुख संघटनेने काढला आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatmata ki Jai yah ghoshna Islamvirodhi honeke karan Musalman use na de- Darul Uloom ka fatwa
Bharatiyo, Kya Rashtrase adhik Dharmko mahatva hai ?
जागो ! : भारतमाता की जय यह घोषणा इस्लामविरोधी होने के कारण मुसलमान उसे न दें ! - दारुल उलूम का फतवा
भारतियो, क्या राष्ट्र से अधिक धर्म को महत्त्व है ?

वित्तीय पुनर्रचना केल्याने ऊर्जा विभागाची पत सुधारणार ! - ऊर्जामंत्री बावनकुळ

       मुंबई, १ एप्रिल - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वित्तीय पुनर्रचनेचा आराखडा केल्याने ऊर्जा विभागाची पत सुधारणार असल्याचा विश्‍वास ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी १ एप्रिल या दिवशी येथे व्यक्त केला. वित्तीय पुनर्रचनेच्या आराखड्याविषयी बावनकुळे यांनी विधीमंडळात निवेदन सादर केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या पुनर्रचनेत तीन आस्थापने झाली असून त्यांची एकत्रित मालमत्ता रु. ७६ सहस्र ४८० कोटी इतकी नोंद झाली आहे. मागील १० वर्षांतील शासनांनी नियमानुसार ही पुनर्रचना केली नव्हती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर हानीला सामोरे जावे लागले होते. या हानीला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे अप्रत्यक्ष संकेत बावनकुळे यांनी दिले.

छेडछाड टाळण्यासाठी विद्यार्थिनींनी सलवार-कुर्ता घालावा !

यासह छेडछाड करणार्‍या टवाळखोरांच्याही मुसक्या आवळून त्यांना कारागृहात डांबायला हवे !
तेलंगणाच्या आमदार कोंदा सुरेखा यांचे आवाहन !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - शाळेत विद्यार्थिनींना ड्रेस कोड असायला हवा; परंतु तो आखूड नसावा. विविध शाळा विद्यार्थिनींना छोट्या कपड्यांचा ड्रेस कोड देतात. शासनाने यामध्ये लक्ष घालून छोट्या कपड्यांऐवजी सलवार कुर्ता घालण्याची अनुमती द्यावी. यामुळे छेडछाडीचे प्रमाण अल्प होईल, असे आवाहन तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार कोंदा सुरेखा यांनी केले आहे. 
   आमदार सुरेखा पुढे म्हणाल्या की, सलवार कुर्ता घातल्यामुळे संपूर्ण शरीर झाकले जाते. तसेच कोणी छेडछाडीचा प्रयत्न केल्यास त्याला महिला विरोध करू शकते. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याने छेडछाड केल्यास त्याला शाळेतून काढून टाकावे आणि दुसर्‍या कोणत्याही शाळेने प्रवेश देऊ नये.

धार्मिक भावना दुखावणारे ट्विट केल्याने ऋतिक रोशन यांना ख्रिस्ती संघटनेकडून नोटीस !

कुठे धार्मिक भावना दुखावल्यावरून तत्परतेने कृती करणारी ख्रिस्ती संघटना, तर कुठे धर्मश्रद्धांचा 
अवमान होत असतांना निष्क्रिय रहाणार्‍या बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना !
     मुंबई - अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वैयक्तिक वादाच्या संदर्भात ट्विट करतांना ऋतिक रोशनने पोप फ्रान्सिस नावाचा उल्लेख केल्याने ख्रिश्‍चन सेक्यूलर फोरमने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून ऋतिक रोशन यांनी विना अट त्यांची क्षमा मागावी, असे म्हटले आहे; मात्र सामाजिक संकेतस्थळावरून रोशन यांचे समर्थन करण्यात येत आहे.असहिष्णुता काय असते, हे इराकसारख्या मुसलमान देशात जाऊन पहा ! - प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी

भारतात असहिष्णुता असल्याची ओरड करणार्‍या अमीर आणि शाहरूख खान यांना चपराक !
     पटियाळा (पंजाब) - देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे मला वाटत नाही, असे ठाम मत व्यक्त करत प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी देशात असहिष्णुता असल्याची ओरड करणारे अभिनेते अमीर आणि शाहरूख खान यांना चपराक लगावली आहे. देशात असहिष्णुतेच्या गोष्टी करणारे अमीर आणि शाहरूख खान यांना इराकसारख्या मुसलमान देशांमध्ये जाऊन येण्यास सांगितले पाहिजे. तेथे मुसलमान मुसलमानांना मारत आहेत, ती खरी असहिष्णुता आहे, असे विधान गायक मेहंदी यांनी असहिष्णुतेविषयी बोलतांना केले. यापूर्वी मेहंदी यांनी मी संपूर्ण जग फिरलो आहे; मात्र भारतासारखा देश कोणताच नाही ! असे विधान केले होते. मागील वर्षीच्या नोव्हेंबर मासात अभिनेते अमीर खान यांनी एका कार्यक्रमात बोलतांना, माझी पत्नी किरणला देश सोडून जावेसे वाटते, असे विधान केले होते, तसेच शाहरूख यांनीही देशात असहिष्णुता वाढत असल्याविषयी वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता

हफपोस्ट-सीवोटर यांचे सर्वेक्षण
     नवी देहली / चंदीगड - हफपोस्ट-सीवोटर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंजाबमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर ११७ जागांपैकी ९४ ते १०० जागा आम आदमी पक्षाला मिळू शकतात. तसेच काँग्रेसला ८ ते १४ आणि सत्ताधारी भाजप-अकाली दल यांच्या युतीला ६ ते १२ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या नावाला पसंती दिली आहे.

आग्रा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना डावीकडून
श्री. ठाकूर सिंह, श्री. संजीव शर्मा, श्री. शुभम
आणि श्री. उत्सव शर्मा
     आग्रा - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० मार्च या दिवशी जिल्हाधिकारी राजेश श्रीवास्तव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
     या निवेदनात आग्रा येथील विश्‍व हिंदू परिषदेचे नेता तसेच रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. यासह इशरतजहाँ संदर्भात पी. चिदंबरम् यांनी केलेला अधिकारांच्या दुरूपयोगवरून त्यांना शासन करण्याबरोबर मलेशिया, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंवर होणारे आघात रोखण्यासाठी आणि काश्मीरमध्ये सैनिक अन् आतंकवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या वेळी राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी अवमानकारक लिखाण करणार्‍या कादंबरी लेखकाला दिलेला पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, तसेच कुंभ पर्वाच्या कालावधीत रेल्वे प्रवासाचे भाडे वाढवले जाऊ नये, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आलेे. 

७८६ नावाच्या हॉटेलचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या अधिकार्‍यावर ओतली चिकन करी !

लोकहो, नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवणार्‍या धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !
वाहतूक पोलीस आणि तहसीलदार यांनाही मारहाण !
     विलासपूर (छत्तीसगड) - येथील अवैधरित्या चालणारे ७८६ नावाच्या हॉटेलचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नगरपरिषदेच्या एका अधिकार्‍यावर हॉटेलच्या व्यवस्थापकाने चिकन करी ओतली. यामुळे अधिकार्‍याचा चेहरा, छाती आणि पोटाचा भाग भाजला आहे. बख्तावर खान असे या हॉटेलच्या मालकाचे नाव असून त्याने अनधिकृत शेड आणि भट्टी बनवली होती. या अधिकार्‍याला वाचवण्यासाठी गेलेला वाहतूक पोलीस, तसेच तेथे गेलेले तहसीलदार यांनाही मारहाण करण्यात आली. यापूर्वी खान याला हॉटेलचे अतिक्रमण हटवण्याची नोटीस देण्यात आली होती.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

पालघर येथे दोन आस्थापनांमध्ये भीषण आग

       पालघर - वसई पूर्व औद्योगिक वसाहतीमध्ये १ एप्रिलला पहाटेच्या सुमारास दोन आस्थापनांमध्ये भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर आणि अंधेरी औद्योगिक वसाहतीमधील अग्नीशमन पथके बोलावण्यात आली. महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून घटनेची माहिती घेतली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम चालू होते.

काँग्रेसचा हात..., डावे आणि देशद्रोही यांना साथ !

श्री. सुरेश चिपळूणकर
१. मोदी शासनाला प्रतिदिन निरनिराळ्या सूत्रात अडकवण्यासाठी 
नव्यानव्या योजना राबवल्या जात आहेत !
     सियाचीनमधील बर्फाच्या वादळावर मात करून परत आलेला वीर सैनिक हनुमंथप्पा याला भेटण्यासाठी ९ फेब्रुवारीला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी रुग्णालयात गेले होते, त्याच वेळी राजधानी देहलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय (जेएन्यू) या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक गट केवळ भारताविरुद्ध घोषणाच देत नव्हता, तर भारताची न्यायव्यवस्था आणि राष्ट्रपतींची चेष्टा करत काश्मिरी फुटीरतावादी महंमद अफझलला दिलेली फाशी चुकीची असण्यासंदर्भात आणि तो निर्दोष असल्याचे सांगत प्रदर्शन करत होता.

शिक्षणक्षेत्राचा राजकीय आखाडा !

       विद्यापिठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुले स्वत:समवेतच देशाचे भविष्य घडवतात. शाळा-महाविद्यालयांमधून मिळालेल्या ज्ञानामुळेे योग्य-अयोग्याची जाणीव होते. त्यामुळे शिक्षण हे पवित्र क्षेत्र मानले जाते; पण आज याच शिक्षणक्षेत्रात राजकारण घुसल्याने आणि विद्यापिठे ही राजकीय पुढार्‍यांचा अड्डा बनल्याने शिक्षणक्षेत्राचे वाटोळे होतांना दिसत आहे.

दूरचित्रवाहिन्या या मराठीच्या शववाहिन्या झाल्या आहेत ! - साहित्यिक अंतरकर

      संभाजीनगर - सोशल मीडिया, दृकश्राव्य माध्यमे आणि मुद्रित माध्यमे यांतून मराठी भाषेवर भीषण आक्रमण चालू आहे. व्याकरण, शुद्धलेखन आणि भाषासौष्ठव यांत कमालीची घसरण झाल्यामुळे मराठीचा दर्जा वेगाने घसरला आहे. दूरचित्र(टीव्ही)वाहिन्या तर मराठीच्या शववाहिन्या झाल्या आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आनंद अंतरकर यांनी केले.
      घुमर या ललित गद्य पुस्तकासाठी लेखक आनंद अंतरकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार ३१ मार्च या दिवशी प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या मंचावर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते आनंद अंतरकर यांना रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. श्री. अंतरकर पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत मराठी भाषेचा दर्जा खालावत आहे. पाया खिळखिळा झालेल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे. शासकीय प्यादे हलवून मागण्या कधीच पूर्ण होत नसतात, तर भाषा अभिजात ठेवण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो.

स्वयंसेवी संस्था कुणाची सेवा करतात ?

श्री. भाऊ तोरसेकर
      इशरतजहाँ प्रकरणातील अनेक गुंते समजून घेण्यासाठी पार ओसामापर्यंत जावे लागेल. इशरतजहाँच्या चकमकीनंतर भारतातील अनेक मानवतावादी संस्था किंवा स्वयंसेवी संस्था कमालीच्या अस्वस्थ होत्या. चकमकीची बातमी आल्यापासून त्यांनी ती चकमक खोटी असल्याचा दावा केला आणि संपूर्ण चौकशीची मागणी केली; पण चौकशीपूर्वी ती चकमक खोटी असल्याचा अशा लोकांचा निष्कर्ष सिद्धच होता. म्हणजे चौकशी दुय्यम होती आणि त्या संशयाला दुजोरा देण्यापुरती चौकशी त्यांना हवी होती. याकूब, अफझल यांपासून इशरतपर्यंत देशाचे शत्रू मानल्या गेलेल्या लोकांविषयी या स्वयंसेवी मंडळींना इतकी आपुलकी कशासाठी असते ? हा कुणाही भारतियाला सतावणारा प्रश्‍न आहे. भारतातील स्वयंसेवी संस्थांचे परकीय वा देशाच्या शत्रू मानल्या गेलेल्यांशी इतके साटेलोटे कशाला असते ? असाही एक गंभीर प्रश्‍न लोकांना पडतो; पण त्याचे उत्तर सापडत नाही. कारण अशा संबंधांची इतकी बारीक गुंतागुंत असते की, त्याचे धागेदोरे सापडणेही अशक्य होऊन जाते. अशाच एका प्रकरणात स्वयंसेवी संस्था कशा परकीय हस्तक असतात, त्याचे स्पष्टीकरण होऊ शकत असल्याने आपण ओसामाकडे बघू शकतो.

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची मानसिकता दिसून येते ! - केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती

        लक्ष्मणपुरी (लखनौ) - भारतमाता की जय न म्हणणे म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्यांचा अपमान आहे. यातून इस्लामचा मूलतत्त्ववाद दिसून येतो. यातून त्यांची मानसिकता दिसून येते. ते पाकिस्तानमध्ये रहात नाहीत, हे त्यांनी समजून घ्यावे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केली आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांनी कट रचून गोध्रा हत्याकांड घडवून आणले असतांनाही खोटा अहवाल सिद्ध करून हे प्रकरण म्हणजे दुर्घटना होती, असा अहवाल सादर करणारे बॅनर्जी यांना फाशीची शिक्षा द्या !

     गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी साबरमती एक्स्प्रेसच्या एस्-६ डब्याला मुसलमानांकडून आग लावण्यात आली होती. या घटनेत ५८ जण ठार झाले होते. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कटच होता, असा निर्णय विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी ९४ पैकी ३१ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. यु.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गोध्रा हत्याकांड म्हणजे एक दुर्घटना होती, असा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा आणि जिहाद्यांना खूष करणारा अहवाल सिद्ध केला होता. (२३.२.२०११) 

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
www.sanatan.org
वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

संपत या नावाची गंमत !

       एकदा दैनिक विभागात सेवा करणारे साधक श्री. संपत जाखोटिया यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सेवेला येणार नव्हते. मी हा निरोप सहसाधिकेला देतांना म्हणाले, आज संपत येणार नाही. त्या वेळी आम्ही सर्व जण भोजनकक्षात अल्पाहार घेत होतो. माझ्या ताटलीत लाडू होता. समोरच्या साधिकेला वाटले की, मी म्हणाले, मला हे संपत नाही.
- सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(२४.९.२०१४)

सर्वत्रच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

अपघाताचा दिवसेंदिवस उंचावणारा आलेख लक्षात घेऊन 
वाहनांच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा !
१. अनेकदा जाणीव करून देऊनही वाहनांच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणारे दायित्वशून्य कार्यकर्ते ! : आतापर्यंत अनेकदा हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय सत्संगात वाहनांच्या संदर्भातील नियम पाळण्याविषयी चुका घेण्यात आल्या आहेत. आपत्काळ दिवसेंदिवस समीप येत असल्याने वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असतांनाही काही कार्यकर्त्यांकडून वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अन्य कागदपत्रे समवेत न बाळगणे, दुचाकी चालवतांना शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, तर चारचाकी चालवतांना सीटबेल्ट न वापरणे, भ्रमणभाषवर बोलत, तसेच अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गंभीर चुका वारंवार होत आहेत. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याने आतापर्यंत काही जणांना दंडही भरावा लागला आहे.

सर्व साधक-पालकांसाठी सूचना

आपले पाल्य उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्यास 
संशोधनासाठी त्याची माहिती आणि छायाचित्रे १०.४.२०१६ या दिवसापर्यंत पाठवा !
       ईश्‍वराच्या कृपेने भारतभरातील आणि विदेशातील काही बालके उच्च स्वर्ग, महर् अन् जन अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली आहेत. या बालकांचा आध्यात्मिक स्तर जन्मतःच चांगला असून ती सर्वसामान्य बालकांपेक्षा निराळी आहेत.
      १०.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये उच्च लोकांतील दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकेतील साधनेच्या दृष्टीने योग अभ्यासण्यासाठी त्यांची माहिती आणि छायाचित्र पाठवा, अशी चौकट प्रसिद्ध झाली होती. आतापर्यंत ४९० पेक्षा अधिक बालकांची गुणवैशिष्ट्ये दैनिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहेत. असे असतांनाही त्यांपैकी केवळ २५ बालकांची माहिती संशोधनासाठी प्राप्त झाली आहे.

भगवंताची कृपा होण्यासाठी निर्मळ अंतःकरण आवश्यक !

       पारदर्शी वस्तूमधूनच सूर्यकिरण प्रविष्ट होऊन पार जाऊ शकतात. भगवंताचा प्रकाश आणि प्रेम केवळ त्यांनाच प्राप्त होतेे, ज्यांचे हृदय निर्मळ असते.
(संदर्भ : मासिक अखंड ज्योती, मे २०००)

राजापूर, रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनोद गादीकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. पूर्वसूचना 
श्री. विनोद गादीकर
अ. धर्मजागृती सभेच्या वेळी दादांकडे बघून लवकरच त्यांची ६१ पातळी होणार, असे वाटत होते. - श्री. परेश गुजराथी, दाभोळ
आ. वर्धापनदिनापासून दादांची प्रगती होईल, असे वाटत होते.
- सौ. अंजली करंबेळकर, रत्नागिरी आणि श्री. भास्कर खडपे, राजापूर
इ. एकदा दैनिक सनातन प्रभातमध्ये दोन छायाचित्रांत असलेले साम्य या चौकटीत दादांचे छायाचित्र छापून आले होते. त्या वेळी दादांची पातळी लवकर घोषित होणार, असे वाटले. - श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. शांत आणि समजूतदार : ते शांत आणि समजूतदार आहेत. ते सोबत असले की, संरक्षककवच असल्याप्रमाणे वाटते. आमचे दुकान म्हणजे आश्रम आहे, असे वाटायला लागले आहे.
- सौ. वैष्णवी गादीकर (श्री. विनोद गादीकर यांची पत्नी)
श्री. राम होनप
      स्वैर झालेल्या अधर्मरूपी घोड्याला धर्मरूपी लगाम लावल्याने घोडा नियंत्रित होतो. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१५)

श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारा आणि भावस्थितीत रहाणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू, कर्नाटक येथील बालसाधक चि. शौर्य कपाडनीस (वय १ वर्ष) !

१. जन्मापूर्वी 
१ अ. बाळ नामजप ऐकत असल्याचे जाणवणे : चि. शौर्य गर्भात असतांना मी श्रीकृष्णाचा नामजप करत असे. त्या वेळी गर्भातील बाळ जप ऐकत आहे आणि हालचाल करत आहे, असे जाणवायचे.
१ आ. श्रीकृष्णाविषयी भाव : श्रीकृष्णाची भजने ऐकतांनाही त्याची हालचाल जाणवायची. एवढेच नव्हे, तर श्रीकृष्णाचा ग्रंथ पांडव प्रथम विजय वाचतांना पोट दुखत नसे. तो शांत झाल्याचे जाणवत असे. इतर वेळी मात्र पोट पुष्कळ दुखत असे. सायंकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणतांना तो शांतपणे ऐकत आहे, असे जाणवायचे. इतर वेळी उलटी होणे, दुखणे आदी त्रास होत असत.

हृदयात सतत देव असल्याची अनुभूती घेणारे संत सूरदास

श्री. अरुण डोंगरे
      थोर कृष्णभक्त संत सूरदासांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सूरदास अंध होते. एकदा त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. कोण आपल्याला साहाय्य करील ? असा विचार करत असतांना साक्षात् भगवान श्रीकृष्ण एका बालकाच्या रूपात येऊन त्यांना रस्ता ओलांडण्यास साहाय्य करतो आणि रस्ता पार झाल्यावर त्यांच्या हाताला हिसका देऊन निघून जातो. त्या वेळी सूरदासाच्या तोंडातून पुढील ओळी बाहेर पडतात.
हात छुडाकर जायहू, निर्बल जानके मोही ।
हृदयसे जब जायहू, सबल कहोगे तबही ॥
अर्थ : हे देवा, मला दुर्बल समजून तू माझा हात सोडून जात आहेस; पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव. तेव्हाच मी तुला शक्तीशाली म्हणेन.

प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या ७१ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या कै. देवकी वासू परबआजी संतपदावर आरूढ !

पू. देवकी परबआजी
       कै. देवकी वासू परबआजी (पेडणे, गोवा) यांचे २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस २.४.२०१६ या दिवशी आहे. यानिमित्त त्यांच्या नातवाला त्यांच्याविषयी जाणवलली सूत्रे येथे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांना भेटण्याची तीव्र इच्छा 
असल्याने ते आजीला सूक्ष्मातून भेटणे
        काही दिवसांपूर्वी आजीला प.पू. डॉक्टरांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती; पण काही कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नाही. १५.३.२०१६ या दिवशी आजी एकटी असतांना पुरे पुरे, असे म्हणाली. तिला त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, प.पू. डॉक्टर मला शेव-चिवडा भरवत होते. मला चावता येत नाही; म्हणून मी पुरे पुरे, असे म्हटले. नंतर ती म्हणाली, प.पू. डॉक्टरांनी घाबरू नकोस, असे सांगितले आहे. आजीच्या तळमळीमुळे भक्तवत्सल भगवंत (प.पू. डॉक्टर) आजीला सूक्ष्मातून भेटले.

साधकांनो, १०.४.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १०.४.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी
२. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे बाकी
 ३. सनातन पंचांग २०१६च्या विज्ञापनांची येणे बाकी
४. गुरुपौर्णिमा २०१५ च्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका 
यांच्या विज्ञापनांची येणे बाकी : अकोला, सिंधुदुर्ग
५. ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांच्या साठ्याची येणे बाकी
५ अ. जिल्हास्तरीय साठ्याची येणे बाकी प्रलंबित असणारे जिल्हे : अकोला, अमरावती, जळगाव, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, यवतमाळ
५ आ. वितरकांची येणे बाकी प्रलंबित असणारे जिल्हे अन् राज्य : जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, सांगली, सातारा, यवतमाळ
६. साधकांनो, प्रलंबित येणे बाकी वेळेत पूर्ण केली, तरच आपली सेवा परिपूर्ण होणार आहे, हे लक्षात घ्या !
     प्रलंबित राहिलेली सर्व येणे बाकी वेळेत पूर्ण करणे, ही आपली साधना आहे, हे लक्षात घेऊन उत्तरदायी साधकांनी १०.४.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करण्याचे नियोजन करावे.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.महर्षींनी दिलेला नामजप आपोआप आणि एकाग्रतेने होणे, तो कोणीतरी करून घेत असल्याची जाणीव होऊन मन उत्साही अन् आनंदी होणे

       महर्षींनी सनातनच्या साधकांना ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । असा नामजप करण्यास सांगितला आहे. १४.३.२०१६ या दिवसापासून सर्व साधकांनी हा नामजप चालू केला. बराच काळ सर्वजण ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा नामजप करत असल्याने आरंभी महर्षींनी दिलेला नामजप नीट होईल का ? असा प्रश्‍न पडला होता. एका दिवसातच असे लक्षात आले, नामजप मोठा असूनही तो व्यवस्थित पाठ झाला आणि बराच काळ करत असल्याप्रमाणे सवयीचाही झाला. हा नामजप करू लागल्यापासून माझे मन शांत झाले, तसेच माझ्या उत्साहात भर पडली असून मरगळ गेली आहे. या नामजपाचा अर्थ कळला नाही, तरी तो म्हणतांना आनंद होतो. दिवसभरात तो आपोआप चालू होतो आणि एकाग्रतेने होत रहातो, हे एक आश्‍चर्यच वाटते ! असे वाटते की, कोणीतरी तो आपल्याकडून करूनच घेत आहे. काही साधकांनाही असेच जाणवले. ही महर्षींच्या संकल्पाचीच प्रचीती असावी, असे वाटते.

व्यष्टी साधनेचा आढावा देतांना रामनाथी आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. आढावा घेतांना 
तटस्थपणे घेत आहे, असे जाणवणे 
सौ. सुप्रिया माथूर
          सौ. सुप्रियाताई सर्व साधकांचा आढावा कसा घेतात आणि स्वयंपाक विभागातील सर्व व्यवस्थापन कसे बघतात, याचा विचार जरी केला, तरी त्यातून ताईचे वेगळेपण जाणवते. आढावा घेतांना ताई तटस्थपणे आमचा आढावा घेत आहे, असे जाणवते. आरंभी दोष-अहंची तीव्रता आणि व्याप्ती काढल्यानंतर ताई काय सांगते, ते थोडे-थोडे आतमध्ये जाऊ लागले; पण जसा आढावा चालू झाला, तसे संघर्षातून पुढे कसे जायचे ?, हे इतर साधक सांगत होते आणि देवाच्या भेटीतून पुढे जाण्यासाठी उत्साहही येत होता.
२. ताईने आमच्या 
अहंला लहान व्हायला शिकवले !
         आमच्या मनाला किंवा अहंला लहान व्हायला आवडत नव्हते; पण ताई त्यांना लहान होण्यासाठी सर्व काही सांगत होती आणि तसे आमच्याकडून करवूनही घेत होती. प्रत्येक चुकीच्या मागचे चिंतन करायला सांगितल्यामुळे विचार मनाच्या आतमध्ये शिरायचे.

महर्षींनी सांगितलेला श्‍लोकासारखा नामजप प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने करून त्यांची कृपा संपादन करूया !

       १३.३.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने महर्षींनी श्‍लोकासारखा जप करायला सांगितला आहे, अशा आशयाची साधकांना सूचना वाचली. तेव्हा मला व्यवहारातील एक उदाहरण आठवले. आधुनिक वैद्य गंभीर अवस्थेतील रुग्णाला अतीदक्षता विभागात एकाच वेळी ३ - ४ औषधे देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात; कारण तेथे एकच औषध पुरेसे नसते. तसेच क्षयरोग, कर्करोग, एड्स आदी अतीगंभीर रोगांमध्येही रुग्णांना एकापेक्षा अधिक औषधे द्यावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे या घोर आपत्काळात महर्षींनी सर्व साधकांना पूर्वी करत असलेला श्रीकृष्ण किंवा आकाशदेवता यांचा नामजप करण्यापेक्षा आता श्‍लोकासारखा असलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । असा जप करायला सांगितला आहे. त्यामुळे आता आपण सर्व प.पू. गुरुदेवांच्या कृपेने वरील नामजप प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने करून महर्षींची कृपा संपादन करूया अन् प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी आपली साधना वाढवूया !
- डॉ. भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

आश्रमातील अंथरुण, पांघरुण आदी, तसेच लेखा विभागांतर्गत कापडी फलक आवश्यक तेवढा वेळ उन्हात ठेवण्याचे नियोजन १५.४.२०१६ या दिवसापर्यंत करावे !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
      सध्या उन्हाळा चालू असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमसाठ्यातील अंथरुण-पांघरुण, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य उन्हात ठेवावे. यासमवेतच आश्रमातील लाकडी फर्निचरही आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.
     लेखासेवकांनी जिल्हासाठ्यातील कापडी फलक, कनाती आदी साहित्यही उन्हात ठेवावे. असे केल्यास दमट हवामानामुळे ओलसर झालेले साहित्य पुढील वर्षभर चांगल्या स्थितीत राहू शकते. कापडाचा रंग जाऊ नये, यासाठी साहित्य जास्त वेळ कडक उन्हात न ठेवता आवश्यक तेवढा वेळच ठेवावे.

९.१२.२०१५ या दिवशी तिरुवण्णामलई, तमिळनाडू येथे झालेल्या नाडीवाचन क्रमांक ५०मधील काही महत्त्वाची सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
१. कार्तिकेय आणि गणपति आता नाडीपट्टीसमवेत भूलोकात असणार आहेत, या देवसभेतील संवादातून एकप्रकारे आता आपत्काळाला प्रारंभ झाला असल्याचेच देव आता लक्षात आणून देत आहे, असे वाटणे : देवलोकात ऋषिमुनींची सभा चालू आहे. या सभेला सर्व देवदेवताही उपस्थित आहेत. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे देवसभेत कार्तिकेय आणि गणपति येतात अन् शिवाला सांगतात, भूलोकात परम गुरुजींबरोबर असणार्‍या या नाडीपट्टीसमवेत (म्हणजेच कार्तिकपुत्री (पू.) सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत) आता आम्हीपण असणार. (यावरून असे वाटले की, आता आपत्काळाला प्रारंभ झाला आहे. गणपति ही मूलाधारचक्राची, म्हणजेच पृथ्वीतत्त्वाची देवता आहे. तीच आता साहाय्याला आली आहे. कार्तिकेय हा देवांचा सेनापती असल्याने तो तर हवाच. त्याशिवाय आपण जिंकूच शकत नाही.) 
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१३.१२.२०१५, सकाळी ७.५८)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

साधकांनो, भावजागृतीसाठी एखादी कृती मानस करणे आणि ती सूक्ष्मातून जाणवणे यांतील भेद समजून घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     साधक भावजागृतीसाठी प्रयत्न करतांना त्यांना येणार्‍या अनुभूतींच्या संदर्भात अनेक वेळा सूक्ष्मातून हा शब्दप्रयोग करतात, उदा. सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेलो, प.पू. भक्तराज महाराज पूर्वी वापरत असलेल्या गाडीला सूक्ष्मातून प्रदक्षिणा घातल्या इत्यादी. खरे पहाता अशा कृती मानस भाव ठेवून केलेल्या असल्याने त्यांना सूक्ष्मातून हा शब्दप्रयोग करू नये. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्या गोष्टी स्वतःला जाणवतात अथवा दिसतात, त्यांना सूक्ष्मातून हा शब्दप्रयोग योग्य आहे, उदा. एखाद्या यज्ञाच्या वेळी पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) योया वाले इत्यादी संत आणि साधक यांना यज्ञस्थळी देवतांचे आगमन झालेले जाणवणे अथवा दिसणे, यज्ञाचा सप्तलोक आणि सप्तपाताळ यांवर होत असलेला परिणाम जाणवणे इत्यादी घटना म्हणजे सूक्ष्म-परीक्षण होय.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ :
आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरिराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मानवाची प्रगती कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले विज्ञान !
      पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, आदीमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे. प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे. सत्ययुगातील मानव देवाशी एकरूप होता. त्रेता आणि द्वापर युगांत त्याची थोडी अधोगती होत गेली. आता कलियुगाच्या आरंभीच त्याची परमावधीची अधोगती झाली आहे. कलियुगाच्या उरलेल्या सुमारे ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही करता येत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनुष्याची बलवान शस्त्रे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जीवनसंग्राम यशस्वी करण्याकरता अनेक शस्त्रांची आवश्यकता असते; पण सर्वांत बलवान शस्त्रे म्हणजे धैर्य आणि योग्य वेळ हीच होत ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बंगालमधील दुर्घटना !

संपादकीय
     उत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ बांधकाम चालू असलेला उड्डाणपूल ३१ मार्च या दिवशी सकाळी साडेअकरा कोसळला. या दुर्घटनेमध्ये मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे. आरंभी केवळ सतरा जणच दगावले असल्याचे वृत्त आले असले, तरी ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याने आपत्ग्रस्तांची काहीतरी वेगळी आकडेवारी येणे स्वाभाविक आहे. या पुलाच्या उभारणीचे काम म्हणे २००९ या वर्षी चालू झाले होते. १६४ कोटी रुपये व्यय करून १८ मासांत हा पूल पूर्ण करण्याचे नियोजन होते. माशी कुठे शिंकली ते सांगता येत नाही; पण आजपर्यंत केवळ २५ टक्केच काम पूर्ण झाले, अशी एक चर्चा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn