Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. महेंद्र क्षत्रिय यांचा आज वाढदिवस !

कोलकातामध्ये बांधकाम चालू असलेला पूल कोसळून १७ जण ठार

कोलकातामधील कोसळलेला पूल
१५० हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता ९ वर्षांत केवळ २५ टक्के बांधकाम पूर्ण !
मृतांना ५ लाख, तर घायाळांना
 २ लाख अर्थसाहाय्य घोषित !
     ९ वर्षांत एक पूल बांधून पूर्ण करू न शकलेले आणि त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेले तत्कालीन डावे अन् विद्यमान तृणमूल काँग्रेस यांच्या राज्यकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात डांबा !
      कोलकाता - उत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ वर्ष २००७ पासून बांधकाम चालू असलेला पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाले आहेत. पोलीस, सैन्य आणि स्थानिक प्रशासनाने ढिगारा हटवण्याचे काम चालू केले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बांधकामासाठी हलक्या प्रतीचे लोखंड वापरण्यात आल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे; मात्र पुलाचे बांधकाम करणार्‍या आय.व्ही.आर्.सी.एल्. या आस्थापनाने या अपघातावर ही देवाची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (स्वत:ची अक्षम्य चूक देवाच्या नावाखाली खपवणार्‍या या आस्थापनावर त्वरित कठोर कारवाई करावी ! - संपादक) या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख, तर घायाळांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले. (शासनाने हे अर्थसाहाय्य संबंधित आस्थापनाकडून वसूल करावे ! - संपादक)

कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही ! - पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांचा बेल्जियम दौरा
      ब्रुसेल्स - कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही. आतंकवादाला धर्माशी जोडू नका, आतंकवाद संपूर्ण मानवजातीसाठी धोका असून ज्यांचा मानवतेवर विश्‍वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे केले. (आतंकवादी स्वतः धर्मासाठी जिहाद करत आहोत, असे सांगतात, तसेच स्वतःच्या संघटनेचे नाव धर्माच्या आधारे ठेवतात. अशा वेळी आतंकवाद आणि आतंकवादी यांसह संबंधित धर्माविषयीची चर्चा लोक करू लागतात. ते कसे टाळणार ? - संपादक) ते भारतीय समुदायाला संबोधित करत होते.
     मोदींनी या वेळी आतंकवादावरून संयुक्त राष्ट्र्रावर टीका केली. मागच्या आठवड्यात ब्रुसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, संयुक्त राष्ट्राला आतंकवाद समजलेला नाही. आतंकवादामुळे आज संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. आतंकवादाला आसरा आणि पाठिंबा देणार्‍यांंवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. (भारतातही अशा प्रकारची कारवाई व्हावी, अशीच जनतेची इच्छा आहे ! - संपादक) भारत मागच्या ४० वर्षांपासून आतंकवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला आतंकवादाचा धक्का दिला, तोपर्यंत जागतिक महासत्तांना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती; पण भारत आतंकवादासमोर वाकला नाही आणि वाकणारही नाही. (आतंकवादाच्या समोर वाकता कामा नये, हे ठीकच आहे, तरीही मागील ४० वर्षांत जिहादी आतंकवादामुळे झालेली हानी मोठीच आहे, हे विसरता येत नाही. - संपादक)

महिलांनी अधिकारक्षेत्रात रहायला हवे ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर 
महिलांनी प्रवेश करण्याचे प्रकरण
      डेहराडून (उत्तराखंड) - कायदा एका ठिकाणी असून हिंदूंच्या परंपरांना विशिष्ट स्थान आहे. आपण धर्मशास्त्राला अनुसरून चालतो. मंदिरांच्या प्राचीन शास्त्रीय परंपरांचे पालन व्हायला हवे. महिलांनी आपल्या अधिकारक्षेत्रात रहायला हवे. त्यांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढू नये, असे स्पष्ट मत ज्योतिष् आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. शनिशिंगणापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्चला महाराष्ट्र शासनाला आदेश देत म्हटले, ज्याठिकाणी पुरुषांना प्रवेश मिळतो, त्याठिकाणी महिलांनाही प्रवेश मिळायला हवा.
      जर महिलांना शनिशिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल, तर तसा कायदा करावा किंवा मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्‍न असेल, तर येत्या दोन दिवसांत यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. यावर शंकराचार्यांनी वरील मत व्यक्त केले.
     शंकराचार्य पुढे म्हणाले की, (भूमाता ब्रिगेडच्या) तृप्ती देसाई या नास्तिक असून त्या महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

बेंगळुरूमध्ये १२ वीची प्रश्‍नपत्रिका दुसर्‍यांदा फुटली : विद्यार्थ्यांचे आंदोलन !

साधी प्रश्‍नपत्रिकाही सुरक्षित ठेवू न शकणारे काँग्रेस शासन कारभार कसा करत असेल ?
      बेंगळुरू - येथे बारावीची रसायनशास्त्राची परीक्षा २२ मार्च या दिवशी होणार होती, मात्र त्या विषयाची प्रश्‍नपत्रिका फुटल्याने ऐनवेळी वेळापत्रकात पालट करण्यात आला. ही परीक्षा ३१ मार्चला घेण्यात येणार होती; मात्र पुन्हा ही प्रश्‍नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी या विरोधात घोषणाबाजी करत, काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. कर्नाटक शिक्षण उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी निदर्शने केल्यानंतर कर्नाटक शासनाने गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना दिली.

हिंदु समाज हा देहाने जरी पुरुष असला, तरी राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात मात्र नपुंसकच आहे. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान


ब्रह्मोस क्षेपणास्त्र लवकरच लष्करात दाखल होणार ! - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

      पुणे - ब्रह्मोस क्षेपणास्त्र १ आणि २ सिद्ध झाले असून लवकरच ते लष्करात दाखल करण्यात येणार आहे. येत्या २ मासांत ही प्रक्रिया पूर्ण करून ते लष्करामध्ये पाठवले जाणार आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३१ मार्च या दिवशी दिली. (क्षेपणास्त्रांची नुसती निर्मिती उपयोगी नाही, तर त्यांचा शत्रूराष्ट्रांच्या विरोधात वापरही करायला हवा. असे केले, तरच आतंकवादी कारवायांना आळा बसेल आणि भारताकडे कोणीही वाकड्या दृष्टीने पहाणार नाही ! - संपादक) येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या दीक्षांत समारंभात पर्रीकर यांच्या हस्ते ९७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत, वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक लेफ्टनंट जनरल ए.के. नागपाल आदी उपस्थित होते.
     पर्रीकर पुढे म्हणाले की, भारतीय लष्कराकडे सर्वांत जास्त लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे असून जवळील पल्ल्यांची क्षेपणास्त्रे फारच अल्प प्रमाणात आहेत.

अहवाल प्राप्त होताच कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई करू ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याचे प्रकरण
शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची 
घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची विधानसभेत जोरदार मागणी 
विधानसभेत लक्षवेधी 
सूचना मांडणारे आमदार
 श्री. राजेश क्षीरसागर
      मुंबई - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या विविध भागांत कार्यरत आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यास विलंब होत असला, तरी घोटाळ्याची चौकशी जलदगतीने चालू आहे. अहवाल प्राप्त होताच सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घालण्याचा राज्यशासनाचा उद्देश नाही, असे उत्तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात एका लक्षवेधी सूचनेवर शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात दिले.
     महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास आणि कुलदैवत श्री ज्योतिबा यांसह ३ सहस्र ६७ मंदिरांचे व्यवस्थान पहाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रंचड मोठा घोटाळा केल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेने उघड केले होते.

कुचेली येथील मंदिर पुजार्‍याच्या प्रसंगावधानामुळे बालिकेचे शीलरक्षण

सर्वपक्षीय नेत्यांनी जनतेला नैतिकतेचे शिक्षण न दिल्याने बालिकांवर अत्याचाराच्या घटना घडतात ! 
    म्हापसा, ३१ मार्च (वार्ता.) - कुचेली येथील शिवमंदिराच्या बाजूला आठ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा ट्रकचालकाचा प्रयत्न मंदिराच्या पुजार्‍याच्या प्रसंगावधानामुळे टळला. अप्पाजी नाईक (वय ३० वर्षे) या आरोपी ट्रकचालकास स्थानिक लोकांनी पुष्कळ चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
     २९ मार्च या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुचेली येथील शाळेतील ४ विद्यार्थिनी चालत घरी जात असतांना जीए-०१-झेड-५११७ या ट्रकच्या चालकाने त्यांना घरी सोडतो, असे सांगून या मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यानंतर मंदिरातील पुजारी तेथे धावत आले आणि त्यांनी मुलीची सुटका केली. त्यानंतर अन्य नागरिकही तेथे पोचले. पोलिसांनी आरोपीस अटक करून भारतीय दंड संहिता कलम ३६३, ३४२, ४२७, ३७६, ५०६, ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३५४ (क), ३२३, बाल कायदा कलम ८ आणि पोस्को कायदा ४, ८, ११, १२ नुसार गुन्हा नोंदवलेला आहे. उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक या प्रकरणी चौकशी करत आहेत.

गोवा शिपयार्डनिर्मित ११ गस्तीनौका मॉरिशसकडे सुपुर्द !

     पणजी - गोवा शिपयार्डने मॉरिशस पोलीस दलासाठी बनवलेल्या ११ गस्तीनौका (इन्टरसेप्टर) मॉरिशस शासनाकडे सुपुर्द केल्या आहेत. यांपैकी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मॉरिशस नौदलाच्या ताफ्यात १० गस्तीनौका समाविष्ट करण्यात आल्या. मॉरिशसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध आणि गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल उपस्थित होते. गोवा शिपयार्डने मॉरिशस देशासाठी ११ गस्तीनौका बनवण्यासंबंधी वर्ष २०१४ मध्ये मॉरिशस आणि गोवा शिपयार्ड यांच्यामध्ये करार झाला होता. त्यानुसार या गस्तीनौका मॉरिशस शासनाकडे सुपुर्द केल्या आहेत. गोवा शिपयार्डने निर्यातीसाठी मिळवलेले हे पहिलेच कंत्राट होते. या वेळी मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जुगनाथ यांनी भारत शासन आणि भारतीय नौदल यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याविषयी आभार व्यक्त केले.

अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलकचे वंशज अजूनही जिवंत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी, तरच या घटना थांबतील ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदू जनजागृती समिती.
भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद ! - खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

   जोधपूर - जे लोक भारतमाता की जय म्हणत नाहीत, त्यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी जैसलमेर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले. 
योगी आदित्यनाथ म्हणाले, 
१. कोणताही राजकीय पक्ष राष्ट्रपिता घोषित करू शकत नाही. राष्ट्रपिता घोषित करायचे असेल, तर भगवान शिवाला करा, असेही खासदार योगी म्हणाले. 
२. गोहत्या प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. देशात गोहत्येवर कायद्याने त्वरित प्रतिबंध घातला पाहिजे.
३. अयोध्येत लवकरात लवकर तोडगा निघून तेथे राममंदिर बनावे, असा आमचा प्रयत्न राहील.
४. परकियांच्या उष्ट्यावर जगणार्‍यांना या देशात विकास करणारे शासन आले, हेच पचले नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी असहिष्णुतेच्या नावावर भारताची मानहानी करणारे हे लोक तोंडावर आपटतील.
५. महर्षि अरविंद यानी ५०-६० वर्षांपूर्वी लिहून ठेवल्याप्रमाणे पाक जसे कर्म, तसे फळ या न्यायाप्रमाणे त्याच्या कर्माचे फळ भोगत आहे.

जर घराघरांतून अफझल निघणार असतील, तर प्रत्येक घरातून छत्रपती शिवाजी महाराजही बाहेर पडतील ! - पू. नंदकुमार जाधव

तळई (तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा 

धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित धर्माभिमानी     जळगाव - भारतात राहून येथील सुविधा उपभोगून भारतमातेचा जयजयकार करायचा नसेल, भारतमातेविषयी प्रेम वाटत नसेल, तर अशांना या भूमीत रहाण्याचा काय अधिकार ? जेएन्यूत देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या. जर घराघरांतून अफझल निघणार असतील, तर प्रत्येकच घरातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडतील अन् तेही या अफझलला प्रत्युत्तर देतील, असे प्रतिपादन सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. येथे २९ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. 

परळी येथील महावितरणच्या उपमहाव्यवस्थापकाला १ लक्ष रुपयांची लाच घेतांना अटक

लाचखोरांना कठोरात कठोर शासन करणे आवश्यक ! 
     बीड, ३१ मार्च - महावितरणच्या परळी येथील वीजदेयक भरणा केंद्रात २ कोटी ४४ लक्ष रुपयांचा अपहार झाला होता. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेल्या कर्मचार्‍याला अटकपूर्व जामिनाच्या साहाय्यासाठी तक्रारदाराकडून १ लक्ष रुपयांची लाच घेतांना योगेश खैरनार आणि खाजगी ठेकेदार मिलिंद कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले. योगेश खैरनार हे महावितरणचे तांत्रिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. परळी वीजदेयक भरणा केंद्रात संगणकीय नोंदीमध्ये फेरफार झाल्याचे उघडकीस आल्यावर ४ कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. हे सर्व कर्मचारी पसार झाले आहेत. त्यांपैकी एका कर्मचार्‍याच्या मुलाने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अपहार प्रकरणात योगेश खैरनार आणि कांबळे यांचे साहाय्य मागितले होते. त्या वेळी खैरनार याने लाचेची मागणी केली होती.

कन्हैया कुमारला पुण्यात बोलावण्याची आवश्यकताच नाही - अनघा घैसास

देशद्रोह्यांच्या संदर्भात सडेतोड बोलणार्‍या अनघा घैसास यांचे अभिनंदन !
      पुणे - ज्या विद्यापिठात देशाविरोधात आणि आतंकवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, तो देशद्रोहच होय, तसेच या घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारचा जयजयकार करणेही देशद्रोहच आहे. जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणारा कन्हैया कुमार हा काही नेता (हिरो) नाही. त्यामुळे त्याला पुण्यात बोलावण्याची काही आवश्यकताच नाही, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या संचालिका अनघा घैसास यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य - काल, आज आणि उद्या या परिसंवादात त्या बोलत होत्या. या वेळी कॉन्टीनेन्टल प्रकाशनाच्या प्रकाशिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर याही उपस्थित होत्या.
     त्या पुढे म्हणाल्या की, टिळक, आगरकर यांच्या विचारांचा वारसा जोपासणार्‍या फर्ग्युसन महाविद्यालयात देशविरोधी घोषणा देणे, हे दुर्दैव आहे. फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी तक्रार मागे घेण्याची आवश्यकता नव्हती. सध्या चालू असलेले हे लोण देशासाठी घातक आहे. देशविरोधी कारवायांच्या विरोधात लढण्यासाठी समाजातील बुद्धीजीवी लोकांनी एकत्र यायला हवे, असेही घैसास म्हणाल्या.

नवी मुंबई येथे गोरक्षणाचे कार्य करणार्‍या २१ गोरक्षकांचा सत्कार !

(डावीकडे) शिवसेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. वासुदेव घरत 
यांचा सत्कार करतांना गोरक्षक आणि अधिवक्ता श्री. राजू गुप्ता
गोसेवक श्री. महेंद्र पवार यांचा सत्कार करतांना 
साहाय्यक वैज्ञानिक डॉ. नवनाथ बुधाजी (डावीकडे)
     खारघर (नवी मुंबई) - स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्‍या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि १९ मार्च या दिवणी गोरक्षण केले होते.
१. गोरक्षक आणि अधिवक्ता श्री. राजू गुप्ता यांनी नवी मुंबई गौरक्षक सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौशाळा अध्यक्ष श्री. अशोक शिवतेजजी, कोकण प्रांत बजरंग दलाचे श्री. उमेश गायकवाड, वर्धमान परिवाराचे श्री. रमेश पुरोहित, अधिवक्ता सौ. सिद्धविद्या, खारघर सेक्टर ६ येथील गोशाळेचे संचालक श्री. प्रतीक ननावरे, श्री. संदीप शर्मा, श्री. अमित शर्मा, पंचगव्य तज्ञ आणि गोसेवक डॉ. नीलेश तुपे, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष श्री. वासुदेव घरत, पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे श्री. चेतन शर्मा, कळंबोलीचे गोसेवक आणि शिवसैनिक श्री. महेंद्र पवार, बजरंग दल-कळंबोलीचे श्री. सचिन झुझेराव आणि चेतन जोशी

आसाममध्ये हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या धर्मांधाला अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी

हिंदूंनो, तुमच्या माता-भगिनींना लव्ह जिहादच्या हिरव्या विळख्यातून 
वाचवण्यासाठी आतातरी जागृत व्हा !
आसाममध्ये लव्ह जिहादचे षड्यंत्र उघड !
     बोंगायगांव (आसाम) - आसामच्या बोंगायगांव जिल्ह्यातील पूर्व भद्रगावातील एका हिंदु मुलीचे मुबारक हुसेन नावाच्या व्यक्तीने अपहरण केल्याच्या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. काक्रागांव माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणार्‍या मुबारक हुसेन (वय ३५ वर्षे ) याने १९ मार्च या दिवशी एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच तिच्या पालकांनी बिद्यापूर पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. हुसेनच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३६६ (अ) कलमाखाली बोंगायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
     त्यामुळे २१ मार्च या दिवशी सकाळी मुबारक हुसेन याच्या कुटुंबियांनी अपहृत हिंदु मुलीला बोंगायगांव पोलीस ठाण्यात आणून सोडले असले, तरी मुबारक सध्या फरार आहे. पोलिसांनी पीडित मुलीला गौहत्तीमधील महिलागृहात पाठवले आहे. आरोपीने पीडित मुलीशी विवाह केल्याचा दावा आरोपीच्या कुटुंबियांनी केला आहे.

बांगलादेशी घुसखोर देशात येण्यापासून रोखण्यासाठी भारत-बांगलादेश सीमा सील करणार ! - गृहमंत्री राजनाथ सिंह

     डिब्रूगढ (आसाम) - आम्हाला काही वेळ द्या. आम्ही भारत-बांगलादेश सीमा पूर्णत: सील करू, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. आसाममध्ये या मासात होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आले असता एका प्रचारसभेला संबोधित करतांना सिंह यांनी हे विधान केले. राज्यात ४ आणि ११ एप्रिल या दिवशी दोन टप्प्यांमध्ये मतदान करण्यात येणार आहे. 
     सिंह यांनी काँग्रेसला प्रश्‍न केला की, बांगलादेशी घुसखोरांची आसाम आणि बांगलादेश सीमेवरून आजही घुसखोरी चालू आहे. घुसखोरांना भारतात येण्यापासून का रोखले गेले नाही ? बांगलादेश-भारत सीमेला संपूर्णत: सील का करण्यात आले नाही ? या संपूर्ण परिस्थितीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. जो (सीमेपलीकडून) येत आहे, त्याला येऊ द्या, जो जात आहे, त्याला जाऊ द्या, अशाप्रकारे कधी देश चालतो का ? (या घुसखोरीला उत्तरदायी असणार्‍यांना भाजप शासनाने कठोर शिक्षा करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)     हिंदूंनो, पाकिस्तानधार्जिण्यांवर पूर्णपणे सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घाला अन् त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका किंवा त्यांना काही विकूही नका ! 
 - आचार्य स्वामी धर्मेंद्र महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
 www.hindujagruti.org

शरद फडके यांच्याकडून क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या हस्तलिखिताची छायांकीत प्रत नगर वाचनालयास भेट !

     सांगली, ३१ माचर्र् (वार्ता.) - आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी वर्ष १८७९ मध्ये 'दत्तमहात्म्य ' नावाचा ७ सहस्र १७४ ओव्यांचा ५२५ पृष्ठांचा एक ग्रंथ स्वत:च्या हाताने लिहिला होता. हा ग्रंथ ज्येष्ठ इतिहाससंशोधक श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे आहे. या पूर्ण ग्रंथांची एक छायांकीत प्रत काढून येथील फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद फडके यांनी राजवाडा येथील नगर वाचनालय येथे भेट म्हणून दिला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला हा अत्यंत दुर्मिळ ग्रंथ असून नागरिकांनी तो अवश्य पहावा, असे आवाहन श्री. शरद फडके यांनी केले आहे.

संविधानात पालट करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

     रामनाथ (अलिबाग), ३१ मार्च (वार्ता.) - आमची मागणी आहे की, भारताच्या संविधानामध्ये पालट करा आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा. हिंदूंना अभिप्रेत असे कायदे बनवा की, मुलायम सिंगलासुद्धा उद्या निवडणूक जिंकून प्रधानमंत्री पदाची शपथ घ्यायची असेल, तर जोपर्यंत ते अयोध्येमध्ये जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेणार नाही तोपर्यंत त्यांना शपथ घेता येणार नाही, असा घणाघात विश्‍व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे केला. रामनाथ येथील जयमाला गार्डन्समध्ये विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने डॉ. प्रवीण तोगाडिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेचे २ कोटी ७२ लक्षांहून अधिक रुपये थकीत

जिल्हाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार ! 
     पुणे, ३१ मार्च - जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील काही जागा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास जुलै २०१२ पासून भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यापोटी अद्यापपर्यंत एक रुपयाही जिल्हा परिषदेला दिलेला नाही. (जिल्हाधिकारी कार्यालयाने पैसे का दिले नाहीत, याची चौकशी व्हायला हवी ! - संपादक) त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला सुमारे २ कोटी ७२ लक्ष ४ सहस्र ७२२ रुपये येणे आहे. 

मुंब्रा (ठाणे) येथे वारंवार गोहत्या करणारा धर्मांध आरोपी मोकाटच !

गोरक्षकांनो, अशांना कठोर शासन होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या !
      मुंब्रा (ठाणे) - धर्मांध राजू उन्गली उपाख्य इक्बाल कुरेशी याच्यावर गोहत्या बंदी कायद्यानुसार ५ ते ६ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. कायदा येण्यापूर्वी त्यांच्या विरोधात २५ तक्रारी होत्या. तरीही त्याला जामीन मिळतो. सुटल्यावर तो पुन्हा गोहत्या करतो. या प्रकरणी शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धर्माभिमानी खेमजी पटेल, सुजित गुप्ता, महेश पाटील यांनी केली आहे.
     मध्यंतरी धर्मांध राजू उन्गली उपाख्य इक्बाल कुरेशी आणि त्याचे सहकारी गायीचे मांस विकत असतांना पोलीस आणि गोप्रेमी श्री. चेतन शर्मा यांनी त्यांच्या दुकानावर धाड टाकली. पोलिसांना पहाताच ते सर्वजण पळून गेले. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

नरसी (जिल्हा नांदेड) येथे पोलिसांनीकडून २२० किलो गोमांस शासनाधीन

गोवंशियांच्या हत्या रोखणे आणि धर्मांध कसाई यांच्या
मुसक्या आवळणे यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
  • इतवारा भागात १२ बैल शासनाधीन
  • ५ धर्मांधांना अटक
     नांदेड - येथील नायगाव तालुक्यातील नरसी येथे रामतीर्थ पोलिसांनी सापळा रचून २ क्विंटल २० किलो गोमांस (४४ सहस्र २३० रुपये किंमतीचे) शासनाधीन केले. याचसमवेत धर्मांधांनी लपून ठेवलेले १२ बैलही पोलिसांनी इतवारा भागातून शासनाधीन केले आहेत. या वेळी पोलिसांनी ५ धर्मांधांना कह्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
     पोलिसांनी नरसी येथील महेबूब नगर जिलानी कुरेशी याच्या रहात्या वाड्यात पहाटेच्या वेळी अवैधरित्या २ बैलाच्या मांसाचे तुकडे करतांना खाटीक कुरेशी महेबुब हिरानी याला कह्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी खाटिकाच्या व्यतिरिक्त जिलानी हिरानी कुरेशी, कुरेशी गौस राजेसाब, कुरेशी रसुल हिरानी, कुरेशी मकदुम हिरानी यांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त १२ बैलांना ज्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते, त्या जागेचा मालक अब्दुल वहाब याच्यावरही पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे.

काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सूत्र शाळातील पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करण्याची केंद्रशासनाकडे मागणी !

शासनाने स्वत:हून पाठ्यपुस्तकांमध्ये हा विषय अंतर्भूत का केला नाही ?
      नवी देहली - हिंदूंची गेल्या ५ सहस्र वर्षांपासूनची जन्मभूमी असलेल्या काश्मीर खोर्‍यातून हिंदूंना विस्थापित होण्याला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. काश्मीरमधील अहिंसेचे पूजक असलेल्या हिंदूंनी त्यांचा वंशविच्छेद कुठलाही प्रतिकार न करता निमूटपणे सहन केला. वर्ष १९९० मध्ये हिंदूंवर झालेला हा अत्याचार अजूनही जगासमोर मांडला गेला नाही. या पार्श्‍वभूमीवर काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाचा विषय एन्सीईआर्टीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करण्यात यावा, अशी मागणी डॉ. सुचित्रा कौर मिश्रा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि शिक्षण खाते यांच्याकडे एका ऑनलाइन याचिकेद्वारे केली आहे.

धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार ! - श्री. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्यप्रमुख, शिवसेना

मदुराई येथे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून सभा 
     मदुराई (तमिळनाडू) - तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या मुदराई शाखेने २७ मार्चला एका सभेचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्री. राधाकृष्णन् बोलत होते.
      ते पुढे म्हणाले, शिवसेनेचे प्रमुख धोरण हे राजकारण करणे नसून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश राज्यातील सर्व जनतेपर्यंत नेणे, हा आहे. भाजपसह झालेल्या २ बैठकांमध्ये कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपच्या युतीमध्ये हिंदु नेत्यांना सहभागी करून घेण्याची मागणी निष्फळ ठरल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये ५० उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. धर्मांतर, भ्रष्टाचार आदी गोष्टींवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही घोषणापत्रात केली आहे.
        या वेळी मंडळ प्रमुख श्री. पद्मनाभन् उपस्थित होते. श्री. जयमपंडियन्, श्री.पी. कारन् आणि श्री. गणेश बाबू यांच्यासह २० वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेस मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

कात्रज वाहन जळीत कांडातील आरोपीला अटक

     पुणे, ३१ मार्च - कात्रज भागातील गणेश पार्क या इमारतीच्या वाहनतळातील वाहने जाळणार्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या जळीत कांडामध्ये १३ दुचाकी आणि ३ चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या होत्या. प्रणय धाडवे (वय २९ वर्षे, रा. राजगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या चारचाकी गाडीला रंग लावून, तसेच टोमॅटो फेकून ती विद्रुप केल्याचा राग मनात धरून गाड्या पेटवण्यात आल्या होत्या.

साई संस्थानच्या दोन हृदयरोगतज्ञांवर गुन्हा नोंद

     शिर्डी (नगर) - साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कार्यरत असणार्‍या आणि सध्या निलंबित झालेल्या दोन हृदयरोगतज्ञांवर २९ मार्च या दिवशी संस्थान प्रशासनाने कारवाई केली. या दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. संस्थानने या दोन्ही डॉक्टरांना अपहाराच्या प्रकरणी ७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी निलंबित केले होते.

नवी मुंबईतील ३१ डिसेंबर २०१२ पूर्वीच्या बांधकामांवर कारवाई नाही - मुख्यमंत्री

     मुंबई, ३१ मार्च - नवी मुंबईतील गावठाण हद्दीतील जी बांधकामे ३१ डिसेंबर २०१२ पूर्वीची असतील ती पाडण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेश आजच सिडकोला देण्यात येतील. तसेच अनधिकृत घरांच्या संदर्भातील धोरण ठरवतांना सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. (अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यासच इतरांवर वचक बसेल.- संपादक) मंदा म्हात्रे यांनी या संदर्भातील लक्षवेधी विचारली होती. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी देयकावर अपघात सहायता निधीचा अधिभार लावून लूट

भरपाईचा निधी प्रवाशांकडून घेणे म्हणजे वडाचे साल पिंपळाला जोडण्याचाच प्रकार ! 
     पुणे, ३१ मार्च - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या प्रवासी देयकावर अपघात सहायता निधीचा अधिभार लावून प्रवाशांकडून तसे पैसे घेण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप पीएम्पी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी केला आहे. 
      ते पुढे म्हणाले की, महामंडळाच्या बसगाड्यांचे एका वर्षात किती अपघात होतात, त्यात मृत्युमुखी पडणारे, त्यांना दिली जाणारी भरपाई यांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. असे असतांना महामंडळाने वर्षाला २५ सहस्र अपघात होतील, असे गृहित धरून अधिभार लावला आहे, तसेच अपघातांची कोणतीही आकडेवारी जाहीर न करता महामंडळाने लावलेला अधिभार म्हणजे फसवणूकच आहे. सध्या महामंडळाकडून अपघातात मृत पावलेल्या प्रवाशाला ३ लक्ष रुपये, घायाळ प्रवाशाला ३० ते ५० सहस्र रुपये अशी भरपाई दिली जाते. त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रवासी देयकावर अधिभार लावण्यात येत आहे. या अधिभारामुळे महामंडळाला वर्षाला २०० कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे राठी यांनी म्हटले आहे.

पुणे येथे रेल्वेच्या डब्यांची (बोगी) स्वच्छता करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

पुणे रेल्वे प्रशासनाचा संतापजनक प्रकार ! राज्यात सर्वत्र पाण्यासाठी आणीबाणी असतांना रेल्वे 
प्रशासनाने असे करणे, हे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. 
     पुणे, ३१ मार्च - पुणे शहरामध्ये सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. असे असतांनाही पुणे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्यांचे डबे आणि रेल्वे रूळ हे धुण्यासाठी ६ लक्षहून अधिक लिटर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अनेकदा रेल्वे प्रशासनाला पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी पालिकेच्या शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, असा प्रस्ताव दिला होता; परंतु रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी सांगितले. (रेल्वे प्रशासन पालिकेचे ऐकत नसल्यास त्या विरोधात पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पालिका आयुक्त या प्रकरणी कारवाई करतील का ? - संपादक)


भोर (जिल्हा पुणे) येथील श्री मांढरदेवी घाटामध्ये देवतांची होणारी विटंबना धर्माभिमान्याने रोखली

 स्मारकाजवळ अस्ताव्यस्त ठेवलेली देवतांची चित्रे
   भोर - येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती. (यावरून जन्महिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच सिद्ध होते. - संपादक) ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीचे प्रा. विठ्ठल जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी त्या सर्व देवता चित्रांच्या चौकटी एकत्र करून त्यांचे अग्निविसर्जन केले आणि देवतांची होणारी विटंबना रोखली. (धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे समितीचे प्रा. विठ्ठल जाधव हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक)
     सदर मंदिराविषयी घाटाच्या पायथ्याला असलेल्या गावातील नागरिकांकडे श्री. जाधव यांनी चौकशी केली. त्या वेळी कळले की, ते मंदिर कोणत्याही देवतेचे नसून घाटाचे काम चालू असतांना एक कामगार मरण पावला होता.

१ एप्रिल हा दिन अर्थात एप्रिलफूल या पाश्‍चात्त्य प्रथेमागील इतिहास !

     साहित्यात १ एप्रिलच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख सर्वप्रथम वर्ष १९३२ मध्ये कँटरबरी टेल्स नामक पुस्तकात झाला असल्याचे सांगितले जाते. हे खरे मानले, तर मूर्खपणाला वर्षातून एक दिवस सन्मानाचे स्थान देण्याच्या या परंपरेला या वर्षी साधारण ८० वर्षे होतात. (वर्ष २०१६ मध्ये या परंपरेला ८४ वर्षे होत आहेत. - संपादक) आणखी काही शहाण्यांनी आपला वेळ घालवला आणि शोधून काढले ते असे की, वर्ष १५६४ मध्ये फ्रान्सने आपली दिनदर्शिका पालटली. तोवर तिथे नव्या वर्षाचा आरंभ १ एप्रिलला होत असे. मार्च मासात सगळा जुना हिशोब चुकता करून नव्या व्यवहाराची नांदी होत असे. वर्ष १५६४ मध्ये यात पालट होऊन जानेवारी हा वर्षाचा आरंभ मानला जाऊ लागला. या नव्या वर्षाचा ज्यांना विसर पडत असे, त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठीवर कागदी मासा चिकटवला जात असे आणि त्याला एप्रिल फिश असे चिडवले जात असे. या फिशचे फूल केव्हा झाले, याचा कोणत्याही शहाण्याला अद्याप शोध लागलेला नाही आणि मूर्ख लोक असल्या शोधात वेळ घालवण्याचा मूर्खपणा करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्ष पालटून जानेवारी मास सर्वत्र स्वीकारला गेला असला, तरीही मार्च समाप्तीची (एन्डिंगची) पद्धत मात्र चालूच आहे. (लोकसत्ता, २.४.२०११)

आमदार बच्चू कडू यांच्यावरील कारवाई प्रकरणी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

      मुंबई - अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयीन अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी विधानभवनाबाहेर पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणावर जमा होते. यातून आमदारांचे खच्चीकरण होऊन अधिकारी उद्दाम होत आहेत. या संदर्भात लोकप्रतिनिधींना हीन वागणूक देणार्‍या अधिकार्‍यावरही कारवाई व्हायला हवी, अशा तीव्र शब्दांत विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी झालेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वेळा एकूण २७ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
     आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, जो अधिकारी लोकप्रतिनिधीने मागणी केलेली कामे दोन-दोन वर्षे करत नाही. तर सर्वसामान्यांची कामे कशी होणार ? आ.कडू यांना अटक करण्यासाठी काल विधानभवनाबाहेर ५०० पोलीस तयार होते. ते अतिरेकी आहेत का ? भारतमाता की जय म्हणणार नाही, असे म्हणणार्‍यांना पकडण्यासाठी चार पोलीस नाहीत.


मागील वर्षी ४ सहस्र श्रीमंत भारतियांनी देश सोडला !

आतापर्यंतच्या शासनांनी जनतेमध्ये देशप्रेम न रुजवल्याचाच हा परिणाम आहे ! 
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     नवी देहली - वर्ष २०१५ या वर्षात ४ सहस्र श्रीमंत भारतीय विदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. हाई नेटवर्क इंडिव्हिज्युअलच्या माध्यमातून विदेशात स्थायिक होणार्‍या श्रीमंतांच्या सूचीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो.
      न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, चीनचे सर्वाधिक म्हणजे १० सहस्र श्रीमंत दुसर्‍या देशात स्थायिक झाले आहेत. चीननंतर स्वत:चा देश सोडून विदेशात स्थायिक होण्यामध्ये फ्रान्सचा क्रमांक आहे. जेथून ९ सहस्र कोट्यधिशांनी देश सोडला. त्यानंतर इटलीचे ६ सहस्र, ग्रीसचे ३ सहस्र श्रीमंत लोक देशाबाहेर गेले, तसेच रशिया, स्पेन, ब्राझिल आदी देशांच्या श्रीमंतांनीही देश सोडला आहे. भारत आणि चीन यांच्यासाठी ही चिंतेची गोष्ट नाही; कारण हे देश जितके कोट्यधीश गमवत आहेत, त्याहून अधिक कोट्यधीश ते निर्माण करत आहेत. या कोट्यधिशांनी सर्वाधिक पसंती ऑस्ट्रेलियाला दिली असून तेथे ८ सहस्र श्रीमंत स्थायिक झाले आहेत. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडा या देशांचा क्रमांक लागतो.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून समन्स

असे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? 
अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे प्रकरण
     देहली - वर्ष २०१३ मध्ये झालेल्या देहली विधानसभा निवडणुकांच्या वेळी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या याचिकेची सुनावणी करतांना पटियाला हाऊस न्यायालयाने त्यांच्या नावाने समन्स काढले आहे. मौलिक भारत संस्थेने फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायालयात या संबंधांची याचिका प्रविष्ट केली होती. 
     या संस्थेने न्यायालयाला सांगितले की, वर्ष २०१३ आणि २०१५ च्या देहली विधानसभा निवडणुकीत आणि वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी स्वत:च्या संपत्तीविषयी अन् त्यांच्या घराच्या स्थळा खोटी माहिती असलेली प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. (असा खेळखंडोबा लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करतो ! - संपादक) यासंदर्भात याचिकाकर्त्यांचा जबाब नोंदवल्यावर २१ मार्च या दिवशी न्यायालयाने केजरीवाल यांच्या नावे समन्स काढले आहे. या प्रकरणात केजरीवाल दोषी आढळले, तर त्यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकतो, तसेच त्यांना ६ मासांपासून २ वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.

प्रस्तावित खनिज प्रकल्पाला असलेल्या विरोधातून धुरीवाडी, मठ, वेंगुर्ले येथे वृद्धाची हत्या

     वेंगुर्ले - धुरीवाडी, मठ येथील रामचंद्र नारायण धुरी (वय ७० वर्षे) यांची तीन दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे उघड झाले होते. येथील प्रस्तावित खनिज प्रकल्प विरोधी लढ्यात धुरी सक्रीय होते, तसेच देवस्थान आणि खनिज प्रकल्पावरून त्यांचे अन् धुरीवाडी येथीलच यशवंत साबाजी धुरी यांचे पराकोटीचे वाद होते. त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचे त्यांंचा मुलगा स्वप्नील याने म्हटले आहे.

महाडिक वसाहत (कोल्हापूर) येथे होणार्‍या नवीन मशिदीस हिंदूंचा विरोध !

     कोल्हापूर, ३१ माचर्र् (वार्ता.) - महाडिक वसाहत येथील स्वामी समर्थ मंदिर आणि श्री दत्त मंदिर परिसरात केवळ ६ मुसलमानांची कुटुंबे असतांना तेथे मशीद उभारण्यात येत असल्याचे लक्षात येताच हिंदूंनी मोठ्या प्रमाणात विरोध केला अन् प्राथमिक स्थितीतील बांधकाम थांबवले. या वेळी ४०० हून अधिक हिंदू एकत्र आले होते. त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे आणि शिवानंद स्वामी हेही उपस्थित होते. 

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे श्रीहरि अणे यांच्यावर देहलीत शाई फेकली !

स्वाभिमान संघटनेने दायित्व स्वीकारले 
     नवी देहली - स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरि अणे जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. ३१ मार्चला ते भाषण करत असतांना काही जणांनी त्यांच्यावर शाई फेकली. 'आमच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली', असे सांगत शाईफेकीचे दायित्व स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी स्वीकारले आहे; मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अणे यांच्यावर शाई फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

प्रज्ञापुरी येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांना प्रारंभ !

     कोल्हापूर, ३१ माचर्र् (वार्ता.) - मार्केट यार्ड रोड, प्रज्ञापुरी येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्याच्या निमित्ताने ३० मार्चपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. ३० मार्चला गणपति अथर्वशीर्ष, श्री सुक्त आवर्तने, लघुरुद्र झाला, तर ३१ मार्च या दिवशी 'महारुद्र' पार पडले. ३ ते ११ एप्रिल या कालावधीत पूर्णवेळ श्री स्वामी कृपामृत वाचन, अखंड वीणा आणि नामस्मरण होणार आहे. ३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता 'ज्ञानदी' पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. गुरुवर्य के.डी. धनवडे तथा विनयानंदजी महाराज यांना पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते तो प्रदान केला जाईल. ९ एप्रिल या दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा होईल, तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना हा ईश्‍वरसंकल्पित विचार असला, तरी त्यासाठी आपण भगीरथ प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ! - श्री. मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदू जनजागृती समिती.


फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुमच्या मुलींना लव्ह जिहादच्या विळख्यातून वाचवण्यासाठी जागृत व्हा !
     आसामच्या बोंगायगांव जिल्ह्यात पूर्व भद्रगांवातील मुबारक हुसेन नावाच्या शिक्षकाने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले. आरोपीने पीडित मुलीशी विवाह केल्याचा दावा आरोपीच्या कुटुंबियांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Asamke Bongaigaon Jileme Mubarak Husain nam ke shikshak ne 1 16 varsh ki Hindu ladki ka apaharan kiya.
es love Jihad par nidharmi media chup kyo ?

जागो ! : असम के बोंगायगांव जिले में मुबारक हुसेन नाम के शिक्षक ने एक १६ वर्ष की हिंदु लडकी का अपहरण किया ।
इस लव्ह जिहाद पर निधर्मी मीडिया चूप क्यो ?

सुंदरगड (ओडिशा) जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यास चांगला प्रतिसाद

प्रदर्शन पहातांना धर्माभिमानी हिंदू
     राऊरकेला (ओडिशा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेमका (जिल्हा सुंदरगड), तसेच बरईगडा या गावांत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंघटन बैठकीस दोन्ही ठिकाणी १२५हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. 
१. बेमका आणि बरईगडा या दोन्ही ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र यांची सद्य:स्थिती, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांसंदर्भात मार्गदर्शन केले.

अमेरिकेच्या कलादालनाकडून हिंदु देवतेची प्राचीन मूर्ती कंबोडियाला परत !

     नोमपेन्ह - अमेरिकेच्या प्रसिद्ध डेनवर कलादालनाने कंबोडियाला हिंदु देवतेची प्राचीन मूर्ती परत केली आहे. या मूर्तीला तस्करांनी अमेरिकेत विकले होते. कंबोडियाची राजधानी नोमपेन्ह येथे एका कार्यक्रमाद्वारे ही मूर्ती परत करण्यात आली. टोरसो ऑफ राम नामक डोके नसलेली ही मूर्ती १० व्या शतकातील असून त्याची उंची ५९ मीटर आहे. शरिराचा काही भागही या मूर्तीला नाही. वर्ष १९७० च्या दशकात कंबोडियातील यादवीच्या वेळी या मूर्तीची कोह केर या मंदिरातून चोरण्यात आली होती. या कलादालनात ती ३० वर्षांपासून होती. 
     याच वर्षी जानेवारी मासात फ्रान्सच्या एका कलादालनाने १३० वर्षांनंतर ७ व्या शतकातील हिंदु देवतेची मूर्ती परत केली होती.

भारतीय प्रसारमाध्यमांप्रमाणे वार्तांकन करू नका ! - पाकच्या प्रसारमाध्यमांना नियामक मंडळाचा सल्ला

पाकचा उदोउदो करणार्‍या भारतीय प्रसारमाध्यमांना चपराक !
     इस्लामाबाद - भारतातील प्रसिद्धीमाध्यमांवर केवळ दर्शक संख्येचा विचार करून बातम्या देण्यात येतात. भारतीय प्रसारमाध्यमे केवळ व्यावसायिक नफ्या-तोट्याचा विचार करत असल्याने त्यांचे अनुकरण करू नका. देशाचा कृती आराखडा धोक्यात येऊ नये, यासाठी स्वतःचे व्यावसायिक कर्तव्य पार पाडतांना अतीउत्साहीपणा टाळा, असे आवाहन पाकच्या प्रसिद्धीमाध्यमांच्या नियामक मंडळाने केले आहे. लाहोर, इस्लामाबाद आणि कराची येथे झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले. 
  ब्रुसेल्स येथील आक्रमणासारख्या अवघड विषयाच्यासंदर्भात अंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांनी ज्या संवेदनाशीलतेने वार्तांकन केले त्याप्रमाणे सकारात्मकतेने, सारासार विचार करून प्रगल्भतेने वार्तांकन करायला हवे, अशी अपेक्षा पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने व्यक्त केली आहे.

इंग्लंडच्या साऊथ शिल्ड्स शहरात झळकत आहे मुसलमान शरणार्थींना बलात्कारी संबोधणारा फलक !

     साऊथ शिल्ड्स (इंग्लंड) - इंग्लंडच्या साऊथ शिल्ड्स शहरात शरणार्थींना बलात्कारी संबोधणारा फलक झळकला असल्याची माहिती मेट्रो डॉट को डॉट यूके या इंग्लंडच्या वृत्तसंकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे. सावधान, बलात्कारी शरणार्थींचे स्वागत करू नका !, बलात्कार्‍यांपासून दूर रहा !, असे शब्द असलेला फलक येथील एका रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात अला होता. नॉर्दर्न पेट्रिऑटिक फ्रंट या संघटनेकडून हा फलक लावण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (जर्मनीसमवेत युरोपमधील अनेक देशात शरणार्थींकडून स्त्रियांवर बलात्कार करणे, त्यांची छेड काढणे, त्यांचा विनयभंग करणे यांसारख्या अनेक घटना होत असतांना अशा प्रतिक्रिया व्यक्त होणे स्वाभाविक नव्हे का ? - संपादक)

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
     एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसार आढाव्या अंतर्गत ३० आणि ३१ मार्च या दिवशी आपण संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या संकेतस्थळाचे फेसबूक पान आणि गूगल प्लसद्वारे झालेला प्रसार, लॉग इन सुविधा आणि व्याख्याने यांविषयी पाहिले. आता त्यापुढील सूत्रे पाहूया.
६ आ. युरोप
६ आ १. जर्मनीमध्ये एस्.एस्.आर्.एफ्.तर्फे कार्यशाळांचे आयोजन : ५ आणि ६.१२.२०१५ या दिवशी जर्मनीमधील गॉर्लिट्झ आणि म्युनिच या शहरांत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. ज्या स्थानिक साधकांनी साधनेला आरंभ केला आहे, त्यांच्या साधनेत सातत्य आणून साधनेचे पुढचे टप्पे आत्मसात करणे, असे या कार्यशाळांचे उद्दिष्ट होते. कार्यशाळेत पूर्वजांच्या त्रासामुळे जीवनात निर्माण होणार्‍या समस्या आणि त्यावरील उपाय, याविषयी माहिती सांगण्यात आली. यामध्ये साधनेच्या सैद्धांतिक भागासमवेत त्रास न्यून करण्यासाठी लाभदायक ठरणार्‍या विविध आध्यात्मिक उपायपद्धतींचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. गॉर्लिट्झ येथील कार्यशाळेला उपस्थित एका जिज्ञासूमध्ये शिकण्याची पुष्कळ तळमळ असल्याचे जाणवले. त्यांनी कार्यशाळेतील सूत्रे शिकण्यासाठी त्यांची मुले उपस्थित राहू शकतात का ?, याविषयी विचारणा केली.

माध्यमप्रश्‍नी भाजपच्या नेत्यांची विधाने म्हणजे मुख मे राम ... ! - सुभाष वेलिंगकर, भाभासुमं

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
     पणजी - वर्ष २०१७ ची गोवा विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण झालेच पाहिजे, अशी भाजपच्या नेत्यांची विधाने सध्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत आहेत. यावरून आपणास मुख मे राम .. बगलमे छुरी ! या म्हणीची आठवण होते, अशी बोचरी टीका भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना केली आहे.
प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले,
१. वर्ष २०१२मध्ये भाजपने मातृभाषाप्रेमाचे वचननामे नाचवून आणि पुढे प्रत्यक्ष सत्ता हाती आल्यावर प्रथम झुलवत ठेवून नंतर मातृभाषाप्रेमींची घोर फसवणूक केली.

जिल्हा सहकारी बँकांची (अधिकोषांची) दुःस्थिती !

     शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जिल्हा सहकारी बँक. शेतकर्‍यांना अगदी गाव पातळीवर कर्जवाटप, वेळोवेळी शासकीय अनुदान, थोड्या फार ठेवी ठेवण्यास साहाय्य ही बँक करत असते. एकूण कर्ज पुरवठ्याच्या ६० ते ७० टक्के कर्जवाटप जिल्हा अधिकोषातून होत असते. गेल्या काही वर्षांत या अधिकोषांची परिस्थिती झपाट्याने खालावली आहे. या बहुतेक जिल्हा अधिकोषांना घरघर लागल्याचे दिसत आहे. त्यांची अनेक कारणे आहेत.
१. अधिकोषांची स्थिती
१ अ. जिल्हा अधिकोषांचे घोटाळे 
     अनेक जिल्हा अधिकोषांत वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराची प्रकरणे, घोटाळे उघडकीला आले आहेत. पीक विमा रकमेतील घोटाळा, संगणक खरेदीतील घोटाळा, कर्जमाफी रकमेतील घोटाळा, आय.बी.पी. घोटाळा, स्टेशनरी खरेदीत भ्रष्टाचार, अनेक प्रकरणे आहेत. घोटाळे, भ्रष्टाचार, करणार्‍या संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांना १० वर्षे सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. हे तर व्हायला हवेच; पण अजूनही काही महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघू.

विरोधकांचा निरर्थक गोंधळ !

     जेव्हापासून महाराष्ट्रात सत्तांतर झाले, तेव्हापासूनचे सध्या चालू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सहावे अधिवेशन आहे. सलग १५ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर अचानक विरोधी बाकावर बसावे लागल्यामुळे विरोधकांच्या भूमिकेत स्थिरस्थावर होण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना वेळ लागेल, म्हणून प्रारंभीच्या दोन अधिवेशनांमधून विरोधकांकडून जनतेच्या प्रश्‍नांवर विशेष अशी कामगिरी झाली नाही, असे गृहित धरू; मात्र अजूनपर्यंत तरी या तत्कालीन सत्ताधारी नेतेमंडळींनी विरोधी पक्षाची भूमिका नक्की काय असते, याचा अभ्यास केलेला नाही. प्रारंभीची २ अधिवेशने वगळता आताच्या सहाव्या अधिवेशनापर्यंत विरोधकांचा प्रवास पहाता तो अत्यंत केविलवाणाच असल्याचे दिसते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
      जेथे हिंदूंना नाही स्थान, ते हिंदुस्थान ! - प्रा. श्रीधर वक्ते

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा प्रभावीपणे होण्यासाठी सनातनचे 
ग्रंथ, तसेच नियतकालिक सनातन प्रभात यांचे अभ्यासपूर्वक वाचन करा !
       समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग आयोजित केले जात आहेत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोचता यावे, यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. जे साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करतात, त्यांनी पुढील ग्रंथांचा अभ्यास केल्यास त्यांना वर्ग प्रभावीपणे घेता येईल.
अ. अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन
आ. अध्यात्म

संसारातील प्रत्येक भूमिका साधना समजून आदर्शवत् करणार्‍या कै. पद्मजा देशमुख (वय ५० वर्षे) !

        सौ. संगीता घोंगाणे यांची मोठी बहीण आणि श्री. प्रतीक जाधव-घोंगाणे यांच्या मावशी पद्मजा देशमुख (वय ५० वर्षे) यांचे ७.११.२०१५ ला वसुबारसेच्या दिवशी निधन झाले. श्री. प्रतीक आणि सौ. कीर्ती प्रतीक जाधव-घोंगाणे यांना पद्मजा देशमुख यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
१. कै. पद्मजा देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये 
कै. पद्मजा देशमुख
 १ अ. व्यवहारातील प्रत्येक कर्तव्य साधना म्हणून करणे : मावशी तिच्या माहेरी आणि सासरीही सर्वांत मोठी होती. तिचे कुटुंब राजकारणात असल्याने तिचा अनेक लोकांशी संपर्क असायचा. ती प्रत्येकाला समजून घेत असे, तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात मनापासून सहभागी होत असे. ती प्रत्येकामध्ये भगवंताचे रूप पहायची आणि अडी-अडचणीला साहाय्य करायची. कुणाकडे काही कार्यक्रम असल्यास पुढाकार घेणे, इतरांसाठी त्याग करणे, धर्माचरणानुसार कृती करणे, दानधर्म करणे, हे सर्व गुण तिच्यात होते. ती प्रत्येक कर्तव्य साधना म्हणून करत असे.
१ आ. घरी येणार्‍या प्रत्येकाचा आपुलकीने पाहुणचार करणे : मावशीच्या घरामध्ये ४० वर्षांपासून राजकारणाचे वातावरण आहे. मावशीचे यजमान लातूरमध्ये मोठ्या पदावर आहेत. घरामध्ये लोकांची नित्य ये-जा चालू असे. मावशी प्रत्येकाचा आपुलकीने पाहुणचार करायची. ती घरातील आणि बाहेरील प्रत्येकावर निरपेक्षपणे प्रेम करायची. घरातील चाकरांपासून शेतात काम करणार्‍या गड्यापर्यंत प्रत्येकालाच ती प्रेमाने वागवत असे.

सेवेची तीव्र तळमळ असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश सुतार !

श्री. प्रकाश सुतार
१. सेवेची तीव्र तळमळ : सेवा करतांना साहित्याची आवश्यकता असते आणि सेवा दिलेल्या वेळेत पूर्ण होण्याकरता मनुष्यबळाचा अभाव असतो, त्या वेळी श्री. प्रकाश सुतार दुसर्‍या राज्यात जाऊन साहित्याची जमवाजमव करणे, तसेच मनुष्यबळ (कामगार) मिळवणे, हे सर्व प्रयत्न स्वतः दायित्व घेऊन करतात. त्यांच्यातील तीव्र तळमळीमुळे प्रत्येक सेवेमध्ये त्यांना ईश्‍वरी साहाय्याचा लाभ होतो.
२. सेवेचा परिपूर्ण अभ्यास : प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असेच त्यांचे वागणे असते. प्रत्येक सेवेविषयी त्यांचा परिपूर्ण अभ्यास असल्यामुळे अनेक सेवांमध्ये, उदा. हँगर लावणे, दोरीपट्टी लावणे, आरसा बसवणे इत्यादी सेवांमध्ये त्यांचा निर्णय अंतिम असतो.
३. अन्य विभागांना साहाय्य करणे : स्वयंपाकघराच्या बांधकामाची त्यांची सेवा पूर्ण झाली नव्हती, तरी ते अन्य विभागाच्या सेवेत, उदा. विद्युत् विभागात तळमळीने साहाय्य करायचे. स्वतःची सेवा उत्तम रितीने सांभाळून इतर विभागांची सेवा नीट चालली आहे ना ?, याविषयी ते नेहमी सतर्क असतात.
- श्री. सुधीश पुथलत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०१६)

प्रांजळ, काटकसरी, हसतमुख आणि नम्र असलेले ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले श्री. मंदार माधव गाडगीळ !

श्री. मंदार गाडगीळ
      देवद आश्रमात सेवा करणारे श्री. माधव गाडगीळ यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि पू. मुकुल गाडगीळकाका यांचे कनिष्ठ बंधू श्री. मंदार माधव गाडगीळ यांची नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्यानिमित्त त्यांची आई सौ. माधुरी गाडगीळ यांना त्यांच्या प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि त्यांचे वडील श्री. माधव गाडगीळ अन् अन्य साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. पूर्वसूचना
अ. मंदार २ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) आम्हाला भेटण्यासाठी देवद आश्रमात आला होता. त्या वेळी त्याचे साधनेसाठी होत असलेले प्रयत्न ऐकून त्याची चांगली प्रगती होत असल्याचे जाणवले. तो शांत आणि स्थिर जाणवला. हेे मी पू. मुकुल गाडगीळ यांना सांगितले होते.
आ. मंदारला छायाचित्र काढण्यासाठी देवद आश्रमात बोलावले होते. तो आल्यावर त्याचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. तेव्हा त्याची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे जाणवले.

सनातन-निर्मित साबणाची छापील मूल्यापेक्षा अधिक मूल्यात विक्री करून समाजाची फसवणूक करणारा आणि स्वतःच्या पापात भर घालून घेणारा एक कार्यकर्ता !

१. एका साधिकेच्या यजमानांनी सनातनच्या 
साबणांची २२ रुपयांऐवजी २४ रुपयांना विक्री करणे
       एका जिल्ह्यातील एक साधिका सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. तिच्या यजमानांचे एका आयुर्वेदिक आस्थापनाच्या उत्पादनांचे दुकान असून ते दीड वर्षापूर्वी सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे वितरक म्हणून सेवा करायचे. त्यानंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांनी उत्पादने आणि ग्रंथ वितरण करणे बंद केले.
       काही दिवसांपूर्वी एका प्रदर्शनाकक्षावर त्यांच्याशी भेट झाली असता ते सनातन-निर्मित २२ रुपयांचे साबण समाजातील लोकांना २४ रुपयांना विकत होते, असे लक्षात आले.

स्वयंसूचनांच्या सत्रासंबंधी अनुभूती

कु. ऐश्‍वर्या जोशी
१. सत्र परिणामकारक होण्यासाठी प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून श्रीकृष्णाला प्रार्थना करूनच सत्राला आरंभ करणे : पूर्वी सत्र करतांना माझ्या मनाची एकाग्रता होत नसे. कोणी शेजारून गेले, कोणताही आवाज आला, तर लक्ष विचलित होऊन मी डोळे उघडत असे. त्यामुळे सत्राची परिणामकारकता अल्प होऊन दोषांचे निर्मूलन होत नव्हते. त्यानंतर एकदा मी रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरबाबा पूर्वी रहात असलेल्या खोलीत सत्र करायला बसले आणि श्रीकृष्णाला तूच माझ्याकडून परिणामकारक सत्र करवून घे. माझे दोष नष्ट होऊन त्यांचे गुणांमध्ये रूपांतर होऊ दे. ते गुण आत्मसात करून आचरणात आणता येऊ देत. माझ्या हृदयात गुणांची खाण निर्माण होऊन त्यामध्ये प.पू. डॉक्टरबाबांचा वास राहू दे, अशी प्रार्थना केली. प्रार्थना करून सत्राला आरंभ केल्यावर मी स्वयंसूचनेप्रमाणे कृती करत आहे, असे दिसू लागले.

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्रता आणि एकांत या शब्दार्थांच्या गुंफणीतून उलगडलेले साधनामय जीवनाचे रहस्य !

प.पू. पांडे महाराज
      १५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले. शारीरिक व्याधी हा प्रारब्धाचा भाग आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे; पण अनेक जण असे म्हणतात, साधनेसाठी माझे मन एकाग्र होत नाही. मला एकांत पाहिजे. माझी साधना नीट होत नाही. असे विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांच्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्र आणि एकांत म्हणजे नक्की काय ? ते कसे साध्य करायचे ? याविषयी केलेले सुंदर विश्‍लेषण या लेखात आपण पहाणार आहोत. साधकांनी त्यांच्या साधनाजीवनात या विचारांचे चिंतन आणि परिपाठ करून जर ही सूत्रे अवलंबिली, तर त्यांना त्यांचा नक्कीच लाभ होऊन या लिखाणाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

कला आणि ज्ञान !

१. कला + ज्ञान = सनातनचे बोधचित्र.
२. कलाकृतीचे शाब्दिक विवरण, म्हणजे शब्दकला.
३. कलाकृतीचे शाब्दिक विवरण केल्यास कलेचा ज्ञानमय विकास होतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१४)

सेवेतील चुकांमुळे निराश होऊ नका !

पू. संदीप आळशी
      बरेच साधक सेवेत चुका झाल्यावर निराश होतात आणि चांगली सेवा करण्याचा आत्मविश्‍वास गमावून बसतात. सध्या समष्टी त्रासांचे प्रमाण वाढत असल्याने अगदी लहान लहान चुकांमुळेही साधक खचून जातात. अशांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. १०० टक्के परिपूर्ण सेवा ही ९० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे होते. तोपर्यंत ते साध्य समजून त्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे, ही साधनाच असते.
२. चुका झाल्यावर देव मला चुकांमधून शिकवून पुढे पुढेच नेत आहे, असा विचार केल्यास चुकांचे वाईट न वाटता आनंद होतो.
३. माझ्याकडून सर्व देवच करवून घेतो, असे आपण नेहमी म्हणतो. हा भाव अल्प पडल्याने चुका होतात, असा विचार केला, तर हा भाव वाढण्यास साहाय्य होते.

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.


फळ या शब्दाची गंमत !

कु. मानसी प्रभु
     एकदा आई रात्री माझ्या लहान भावाला (मुकुलला) झोपवत असतांना त्याच्याकडून प्रार्थना करवून घेत होती. तेव्हा तिने मुकुलकडून पुढील प्रार्थना म्हणून घेतली, हे श्रीकृष्णा, आज दिवसभरात झालेली चांगली कर्मे आणि माझ्याकडून झालेली सेवा तुला अर्पण होऊ दे आणि त्यामुळे मला मिळणारे फळही तुला अर्पण होऊ दे. आईने सांगितल्याप्रमाणे मुकुलने प्रार्थना म्हटल्यावर तो (मुकुल) म्हणाला, आई, मलाही ते फळ खायला दे हं...! आई (हसत) म्हणाली, हो. नंतर मुकुल पुन्हा म्हणाला, आई एकच दे हं, एकच दे !
- कु. मानसी प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.११.२०१४)

महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची मुलगी ॐ अक्षरा हिच्या माध्यमातून नामजपाच्या अक्षरांची दिलेली साक्ष ! जिच्या नावातच अक्षर हे शब्द आहेत, तिच्याचकडून अक्षरांची साक्ष देणे, ही महर्षींची हातोटी असणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
       महर्षि बर्‍याच वेळा अनेक ठिकाणी अनेक प्रसंगांमध्ये काहीतरी आध्यात्मिक स्वरूपाची साक्ष देत असतात. साक्ष देण्यामागील कारण पुढीलप्रमाणे आहे.
      महर्षींना प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे आणि ते सांगत असलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे, हे कलियुगातील माणसाला पटावे, असा यामागील उद्देश असतो. कलियुगातील माणसाच्या मनातील विकल्प आणि शंकाकुशंका काढून टाकण्यासाठी महर्षि किती आटापिटा करत असतात, तेच यातून लक्षात येते.
१. नाडीवाचनातून महर्षींनी निसर्ग देवो भव । वेदम् 
प्रमाणम् । आणि ॐ या जपांचा परत परत उच्चार करणे 
तमिळ भाषेत नामजप लिहिलेले रूईचे पान
        तिरुवण्णामलई येथे ५.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, निसर्ग देवो भव । वेदम् प्रमाणम् । आणि ॐ यांचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महर्षि या तीन जपांची परत परत आठवण करून देत आहेत; कारण हे जप आपल्याला आपत्कालात उपयोगी पडणार आहेत. या जपांचा आपल्या चित्तावर संस्कार होण्यासाठी महर्षींची ही धडपड आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हल्लीची कृतघ्न मुले !

      हल्लीच्या विवाह झालेल्या बर्‍याचश्या मुलांची पत्नी नोकरी करत असल्यामुळे ते आई-वडिलांना आपल्याकडे रहायला बोलावतात. तेव्हा ते आपल्या आईकडे फुकटची घरकाम करणारी बाई आणि वडिलांकडे मुलांचा अभ्यास करून घेणारे या दृष्टीने पहातात ! आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपले पालनपोषण केले, आपल्याला शिक्षण दिले, हे ते सर्व विसरतात. त्यामुळे त्यांची मुलेही त्यांच्याशी पुढे तशीच वागतात !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे विविध क्षेत्रांतील तज्ञ, तर कुठे संत !
     आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो, असे म्हणतात. याउलट संत एका क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचा कार्यकारणभाव आणि उपाय सांगतात, जे आधुनिक तज्ञ कधीही सांगू शकत नाहीत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सकारात्मकतेतील शक्ती !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     घडणार्‍या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


बोधचित्र

शासननिर्णय भक्तांच्या बाजूने हवा !

संपादकीय
     राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी असते, अशा अर्थाचे विधान पंतप्रधान श्री. मोदी यांनी निवडून आल्यावर एका भाषणात केले होते. पूर्वी प्रत्येक राजाच्या दरबारात एक धर्मगुरु असत. राजा त्या धर्मगुरूंचा योग्य तो मान राखून आज्ञापालन करत असे; राज्यातील पेचप्रसंगाच्या वेळी गुरु योग्य ते मार्गदर्शन राजाला करत आणि राजा त्यातून तरून जात असे; कारण धर्मशास्त्रात एखाद्या गोष्टीचे उत्तर नाही, अशी गोष्टच नाही. ही आपली सहस्रो वर्षांची प्राचीन परंपरा आता आठवण्याचे कारण म्हणजे ३० मार्च या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणी प्रविष्ट झालेल्या याचिकेवर राज्यशासनाला म्हणणे मांडायला सांगितले आहे. तथाकथित स्त्रीवादी आणि स्त्रीवादासाठी देवा-धर्मावर डागण्या डागण्यात कुप्रसिद्ध असलेल्या विद्या बाळ आणि विधीज्ञ नीलिमा वर्तक यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.एच्. वाघेला आणि न्या. एम्.एस्. सोनक यांच्या खंडपिठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn