Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विविध सूत्रांवरून विधानसभेत गदारोळ : ७ वेळा कामकाज स्थगित !

जनतेच्या प्रश्‍नांवर मार्ग न काढता केवळ गोंधळ घालणार्‍या 
लोकप्रतिनिधींना जनतेनेच माघारी बोलवावे !
वर्गात गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गाबाहेर काढतात, त्याप्रमाणे विधानभवनात
गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींना विधानसभा अध्यक्ष बाहेर का काढत नाहीत ? 
      मुंबई - मंत्रालयासमोर शेतकर्‍याची आत्महत्या, फर्ग्युसन विद्यापिठात देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी वेगवेगळी पत्रे सादर करणार्‍या प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी, चवदार तळ्यावर जलपूजन, आदी सूत्रांवरून सलग दुसर्‍या दिवशीही म्हणजे २९ मार्चला विधानसभेत गदारोळ कायम राहिला. परिणामी दिवसभरात एकूण ७ वेळा कामकाज स्थगित करावे लागले. एकूणच या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदनही केले; मात्र तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत हा गदारोळ कायम राहिला. वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातील महसूल, वन, कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि महिला-बालविकास विभागांच्या अनुदानाच्या मागण्या चर्चेविना संमत करण्यात आल्या. दोन लक्षवेधी सूचनाही मांडल्या; मात्र त्यावर चर्चा होऊ शकल्या नाहीत.
काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे दिवसभरासाठी निलंबन
     विधानसभेत चालू असलेल्या गदारोळात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तरीही विरोधक त्यांच्या मागणीवर ठाम रहात हौदामध्ये घोषणाबाजी करत कागदपत्रे भिरकावत राहिले. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आदींना कागदपत्रे भिरकावू नयेत, असे निर्देश दिले; मात्र आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

१४ वर्षांपूर्वीच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १० जण दोषी

१४ वर्षांनंतर निकाल देणारी कूर्मगतीने चालणारी न्याययंत्रणा !
     मुंबई - डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या कालावधीत रेल्वेत मुंबई सेंट्रल, वांद्रे, विलेपार्ले, घाटकोपर आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने त्यातील साकिब नाचन, फरहान मवीक, आतीफ, डै अन्सारी, नूर अली, नूर महंमद, नासीर मुल्ला, गुलाम अकबर, मुजम्मील आणि नसीर या १० जणांना दोषी ठरवले आहे, तर तिघांची निर्दोष सुटका केली आहे. दोषींना ३० मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हरियाणा विधानसभेत जाट आरक्षण विधेयक एकमताने संमत

आरक्षणाचा भस्मासुर !
     चंदीगढ - शासकीय नोकरी आणि शिक्षण यांत जाटांना आरक्षण देणारे विधेयक हरियाणा विधानसभेने २९ मार्च या दिवशी एकमताने संमत करण्यात आले. २८ मार्चला झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या विधेयकास संमती देण्यात आली होती. जाटांसह जाट शीख, रोर, बिश्‍नोई आणि त्यागी या ४ जातींनाही मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये नवी वर्गवारी करून आरक्षण देण्यात आले आहे. या सर्व जातींना अ आणि ब वर्गांतील शासकीय नोकर्‍यांमध्ये ६ टक्के आरक्षणाचा शासनाचा प्रस्ताव आहे. याशिवाय शासन मागासवर्ग आयोगाही स्थापन करणार आहे.
हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याची न्यायालयाची अनुमती

     डेहराडून - उत्तराखंड उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याची अनुमती दिली असून येत्या ३१ मार्चला त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनाही मतदानाचा अधिकार असल्याचे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे.
     काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हरीश रावत यांचे शासन अडचणीत सापडले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. या निर्णयाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री रावत यांनी नैनीतालमधील उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. यू.सी. ध्यानी यांच्या खंडपिठाने सुनावणी केली. दुसरीकडे काँग्रेसच्या ९ आमदारांनीही निलंबनाच्या विरोधात न्यायालयात आव्हान दिले आहे.

(म्हणे) १९८४ ची शीखविरोधी दंगल जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया !

चुकीचा इतिहास सांगून जनतेची दिशाभूल करणारा 
साम्यवादी विचारांचा विद्यार्थी कन्हैया !
     नवी देहली - गुजरातमधील दंगल ही राज्यशासनाच्या पाठिंब्याने घडवण्यात आली; तर १९८४ मधील दंगल ही निव्वळ हिंसक जमावाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे मत जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने २९ मार्च या दिवशी व्यक्त केले. (राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैया कुमार आता काँग्रेसची पोपटपंची करू लागला आहे. शीखविरोधी दंगल ही काँग्रेसप्रणीत दंगली होती. यात काँग्रेसचे नेतेही सापडलेले आहेत. कन्हैया कुमारचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्याने थापा मारू नयेत ! - संपादक) जेएन्यूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जश्‍न-इ-आझादी या कार्यक्रमात कन्हैया बोलत होता.
कन्हैया म्हणाला की,
१. आणीबाणी आणि फॅसिस्टवादामध्ये मूलभूत भेद आहे. आणीबाणीच्या काळात केवळ एका पक्षाच्या गुंडांनी दडपशाही केली; तर फॅसिस्टवादांतर्गत एकंदरच राज्यव्यवस्थेची गुंडगिरी पहावयास मिळते.
२. हिटलरप्रमाणेच मोदींनाही समाजातील बुद्धिवंतांचा पाठिंबा नसून यामुळेच विद्यापिठांवर आक्रमणे केली जात आहेत. मोदी यांच्या राजवटीस भारतातील कोणत्याही बुद्धिमंताचा पाठिंबा नाही.

(म्हणे)आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही ! - असदुद्दीन ओवैसी

१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू, म्हणणारे 
१५ मिनिटांत पाकिस्तानला संपवू असे विचार का मांडत नाहीत ?
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - मुसलमानांनी या देशासाठी पुष्कळ काही केले आहे, मोठे बलिदान दिले आहे. भारतमाता की जय ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीविषयी शंका घेऊ शकत नाही. (भारतमाता की जय म्हटल्याने ओवैसी देशद्रोहीही ठरणार नाहीत; मग ते तसे का म्हणत नाहीत ? - संपादक) आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता नाही. आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही, अशी टीका एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. येथे एका सभेत ते बोलत होते. या सभेपूर्वी झालेल्या पक्षबैठकीत त्यांनी हिंदुस्थान झिंदाबाद आणि जय हिंद अशा घोषणा दिल्या.
     ओवैसी पुढे म्हणाले की, जे आमच्यावर शंका घेत आहेत त्यांचा १८५७ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत कुठेच पत्ता नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्राणांचे बलिदान दिले, आम्ही ब्रिटिशांकडे कधीच दयेची भीक मागितली नाही. (ओवैसी यांनी प्राणांचे बलिदान देणार्‍यांची नावे घोषित करावीत ! - संपादक)

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनकाळातील मंत्री बबनराव पाचपुते यांची मालमत्ता बँकेकडून कह्यात

२८७ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणी कारवाई
भ्रष्टाचारग्रस्त भारत ! शासन अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती
कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का ?
     नगर - माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या खाजगी साईकृपा साखर कारखान्यासह बंगला आणि अन्य मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेने कह्यात घेतली केली. अनेक वेळा नोटीस देऊनही २८७ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने अखेर बँकेने मालमत्ता कह्यात घेतली. पंजाब नॅशनल बँकेच्या पुण्यातील कल्याणीनगर शाखेने ही कारवाई केली. (सर्वसामान्यांकडे थोडी थकबाकी राहिल्यावर कारवाई करणार्‍या बँका माजी मंत्र्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकीच्या वसुलीसाठी विलंब का करतात ? - संपादक) पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षे आमदार राहिले होते. नंतर काही कारणाने ते पक्षातून बाहेर पडले.
१. पाचपुते यांच्या साईकृपा शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज् लिमिटेड या कारखान्याने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यापोटी दोन्ही कारखान्यांची इमारत, यंत्रसामुग्री आणि अन्य मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.
२. कर्जाची थकबाकी २८७ कोटी ६० लक्ष ३८ सहस्र रुपये भरण्यासंबंधी बँकेने डिसेंबर २०१५ मध्ये कारखान्याला नोटीस दिली होती; मात्र थकबाकी न भरल्याने शेवटी बँकेने तारण मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला.
३. यामध्ये हिरडगाव (तालुका श्रीगोंदा) येथील कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री आणि अन्य मालमत्ता, देवदैठण येथील आस्थापनाची मालमत्ता, तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील रहिवाशी प्लॉट, श्रोगोंद्यातील पाचपुते यांच्या नावावर असलेला बंगला अशी मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे.
४. या कारखान्याने गेल्या वर्षी शेतकर्‍यांच्या उसाचे पैसे थकवले आहेत.

ममता बॅनर्जी शासनाच्या कार्यकाळात बंगालमध्ये केवळ बॉम्बचेच कारखाने निर्माण झाले ! - अमित शहा

     कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यात केवळ बॉम्बचेच कारखाने निर्माण झाले, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. येत्या काळात बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून निवडणूक प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे. या वेळी भाजप तृणमूल काँग्रेस किंवा डावे पक्ष यांच्याशी हातमिळवणी करणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. (एका राज्यात बॉम्बचे कारखाने उघडले जात असतांना ते रोखण्यास समर्थ असणारे शासन देशात हवे ! - संपादक)

इसिसने अखेर भारतीय पाद्य्राला सुळावर चढवले

     वॉशिंग्टन - इसिसने कॅथॉलिक वंशीय भारतीय पाद्री टॉम उजहुनालिल यांना प्रचंड यातना देत गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर चढवलेे. उजहुनालिल यांना येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणेच सुळावर चढवणार असल्याचे इसिसने आधीच घोषित केले होते. उजहुनालिल हे येमेनमधील मदर तेरेसा मिशनरीज्साठी काम करत होते. त्यांचे ४ मार्चला एका वृद्धाश्रमातून आतंकवाद्यांनी अपहरण केले. तथापि केंद्रशासनाने याविषयी अधिकृत काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. उजहुनालिल यांच्या कुटुंबियांनीही या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. उजहुनालिल हे बेंगळुरूमधील एका चर्चमध्ये काही वर्षे वास्तव्यास होते.

अमेरिकेतील डेअरी क्विन रेस्टॉरंटकडून हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करून अवमान !

  • अमेरिकेतील हिंदूंनी दर्शवला तीव्र विरोध
  • रेस्टॉरंटच्या धर्मांध मालकाने विरोधाला न जुमानल्याने हिंदु धर्माचा अवमान चालूच !
     केमाह, टेक्सास (अमेरिका) - अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केले आहे. रेस्टॉरंटने विविध ठिकाणी हिंदु धर्माचा अनादर करणारे फ्लेक्स फलक लावले आहेत. यात हिंदु धर्माची माकडाशी तुलना करण्यात आली आहे, तसेच देवता आणि ऋषिमुनी यांनाही विडंबनात्मकरित्या चित्रित करण्यात आले आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला आणि अमेरिकेचे नागरिकत्व असलेला महंमद दार हा डेअरी क्विन या रेस्टॉरंट गटापैकी (ब्रॅन्डचा) केमाहमधील रेस्टॉरंटचा मालक (फ्रॅन्चायजी ओनर) आहे.

न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस प्रशासनाने न जुमानणे हे गंभीर ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
* पुढील सुनावणी ४ एप्रिलला 
* पानसरे कुटुंबियांच्या वकीलांचा शासकीय यंत्रणेवर न्यायालयासमोरच अविश्‍वास 
* न्यायालयाने आदेश देऊनही तपास अधिकारी अनुपस्थित 
     कोल्हापूर, २९ मार्च (वार्ता.) - मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलिसांना 'अन्वेषणाचा अहवाल सादर करा', असा आदेश दिला होता. असे असतांना २९ मार्च या दिवशी अन्वेषण (तपास) अधिकारी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारचा पुढील अन्वेषण अहवाल सादर केला नाही याचा अर्थ न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस प्रशासनाने न जुमानणे हे गंभीर आहे, असे मत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. २९ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वतीने बाजू मांडणारे अधिवक्ता विवेक घाटगे यांनी न्यायाधिशांसमोरच शासकीय यंत्रणेवर अविश्‍वास व्यक्त करत हा खटला चालवल्याचे भासवत असल्याचा आरोप केला. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी चालू असून पुढील सुनावणी ४ एप्रिलला होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले. या वेळी श्री. समीर गायकवाड यांची बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता आनंद देशपांडे हेही उपस्थित होते. 

(म्हणे) 'फॅसिस्ट हिंदुत्ववादी ब्राह्मणवादाचे ध्रुवीकरण करण्यासाठी देशाचे राजकारण करत आहेत !'

सर्व श्रमिक महासंघाचा जातीयवाद ! 
     सातारा, २९ मार्च (वार्ता.) - दमन करणार्‍या शासनाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सतत चालूच आहे. १३ वर्षे जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा म्हणून लढणारे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, शेतकरी, शेतमजूर महिला, टोलमुक्त नाके व्हावेत, तसेच सनातनवाद्यांचा भांडाफोड करणारे कॉ. पानसरे यांचा खून झाला, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांनी खरा बसवअण्णा आणि विरशैवांचा खरा इतिहास लिहिला म्हणून त्यांना मारण्यात आले. सध्या फॅसिस्ट हिंदुत्ववादी 'ब्राह्मणवादाचे ध्रुवीकरण' करण्यासाठीच देशाचे राजकारण करत आहेत, अशी माहिती सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. (सर्व श्रमिक महासंघासारखे विद्रोहीच जातीयवादी विद्वेष समाजात पसरवून फॅसिस्टगिरी करत आहेत. - संपादक) 

पोप फ्रान्सिस यांनी ईस्टरनिमित्तच्या संदेशात उपस्थित केले मुसलमान शरणार्थींच्या गंभीर स्थितीचे सूत्र

मुसलमान शरणार्थींना साहाय्य केल्यामुळे उद्या अनेक शरणार्थींनी 
ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास कोणाला आश्‍चर्य वाटू नये !
     व्हॅटिकन - ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर सणानिमित्त व्हॅटिकन शहरातील सेंट पीटर्स स्क्वेअरवरून सहस्रावधी ख्रिस्त्यांना संबोधित करतांना मुसलमान शरणार्थींच्या गंभीर स्थितीचे सूत्र उपस्थित केले. तसेच आतंकवादाचा निषेधही केला. या वेळी त्यांनी युरोप, आफ्रिका आणि इतरत्र आतंकवादी आक्रमणाला बळी पडलेल्यांच्या प्रती सहानुभूतीही व्यक्त केली. 
     युरोपने संकटात सापडलेल्या शरणार्थींना हीन वागणूक दिल्याविषयी पोप यांनी खेद व्यक्त केला. पोप त्यांच्या संदेशात म्हणाले की, पाप आणि दुष्कृत्य यांवर विजय मिळवण्यासाठी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्यानंतर तेे भक्तांसाठी पुन्हा जीवित झाले. ख्रिस्ती समुदाय आतंकवादाला बळी पडलेल्या (मुसलमान) शरणार्थींना सहानुभूती दाखवील, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. (समाजसेवा हे धर्मांतराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे, असे विधान गेल्या वर्षी २४ जानेवारी या दिवशी स्वत: पोप फ्रान्सिस यांनीच केले होते. या पार्श्‍वभूमीवर मुसलमान शरणार्थींना साहाय्य केल्यामुळे उद्या अनेक शरणार्थींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास कोणाला आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक)
      संपूर्ण मानवजातीला जीवन जगू द्या, असा संदेशही त्यांनी ईस्टरनिमित्त सर्वांना दिला. युरोपमधील काही देशांनी शरणार्थींना आश्रय देण्यास नकार दर्शवला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा संदेश दिला आहे.

हिंदुत्व आणि राष्ट्र विरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद ! - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर


श्री. भाऊ तोरसेकर
      पिंपरी - आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा प्रारंभ होतो. सातत्याने हिंदुत्वविरोधी, राष्ट्रविरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, श्रद्धा खिळखिळ्या करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद आहे. अशा दहशतीला दहशतीनेच उत्तर देता येते, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक-राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांनी केले. २७ मार्च या दिवशी संत तुकाराम व्यापारी संकुल आणि शिववंदना राष्ट्रीय स्फुरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरोगामी दहशतवाद या विषयावर ते बोलत होते. येथील आचार्य अत्रे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
ते पुढे म्हणाले...
१. हिंदु असल्याविषयी अभिमान बाळगण्याची लाज जे लोक तुमच्यामध्ये निर्माण करत आहेत, त्यांना टक्कर द्या. कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे नाही, हे तुम्ही ठरवा. सत्य बोलण्याची हिंमत दाखवली की, सत्य आपोआप स्वीकारले जाते. त्यामुळे हिंदूंनो, तुम्हीही होय मी हिंदू आहे ! असे ठामपणे म्हणायला प्रारंभ केल्यास तुमची दहशत चालू होते.
२. समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्यक्रमांत भारतमाता की जय असे म्हणण्यास कोणी आग्रह करणार असेल, तर ती घोषणा मी देणार नाही, असे वक्तव्य केले. भारतमाता की जय हे केवळ शब्द नाहीत.

पुण्यात कात्रज भागामध्ये १५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने जाळली

पुण्यात दुचाकी जाळण्याचे वाढते प्रमाण हे गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्याचेच लक्षण ! 
     पुणे, २९ मार्च - येथील कात्रज भागातील गणेश पार्क या गृहरचना संस्थेच्या आवारात लावलेली १५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने एका अज्ञात व्यक्तीने २८ मार्चच्या रात्री जाळली. (पुण्यातील वाहने जाळण्याची मालिका म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेराच वाजले आहेत. पहिल्या दोन घटनांत गुन्हेगारांना तत्परतेने कडक शासन झाले असते, तर परत अशी कृत्ये करण्यास गुन्हेगार धजावले नसते. - संपादक) वाहनांना आग कोणी लावली, याचा शोध घेण्यात येत असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस या परिसरातील क्लोज्ड सर्किट टीव्ही चित्रकांचे चित्रीकरणही तपासून गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. 

कन्हैया कुमार एप्रिल मासात पुण्यासह महाराष्ट्रात सभा घेणार

देशविरोधी घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारला भाजप शासनाने 
'महाराष्ट्र बंदी' अथवा 'भाषण बंदी' करावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! 
     पुणे, २९ मार्च - जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या एप्रिल २०१६ मध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, अमरावती आणि संभाजीनगर येथे सभा घेण्यात येणार आहे. त्याविषयीचे नियोजन चालू असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएस्एफ्) आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन (एआययुएफ्) यांनी २८ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी 'एआयएस्एफ'चे प्रदेशाध्यक्ष पंकज चव्हाण आणि एआययुएफ्चे प्रदेशाध्यक्ष प्रसाद घागरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी

फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रकरणावरून कथित 
पुरोगामी संघटनांचा वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न 
     पुणे, २९ मार्च (वार्ता.) - अभाविपचे नेते श्री. आलोक सिंग फर्ग्युसन महाविद्यालयात 'जेएनयू'  प्रकरणासंदर्भात विद्यार्थ्यांशी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी आल्यानंतर डाव्या, तसेच आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी तो कार्यक्रम उधळून लावला होता. त्या ठिकाणी कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रवींद्रसिंह परदेशी यांनी देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याविषयी पोलिसांकडे तक्रार केली होती. या संदर्भात २९ मार्च या दिवशी संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, तसेच पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. (या संदर्भात प्राचार्य श्री. परदेशी यांनी पोलिसांकडे केलेली पहिली तक्रार मागे घेऊन 'देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या असल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई करावी', असे दुसरे पत्र पोलिसांना देऊन पहिल्या पत्रात चूक झाल्याचे सांगितले होते. असे असतांनाही इतक्या दिवसांनंतर हे प्रकरण उकरून काढून प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करणे, हा वातावरण विनाकारण तापवण्याचा, तसेच प्रसिद्धी मिळवण्याचाच प्रकार आहे. - संपादक)

२०० हून अधिक चोर्‍या करणारा नदीम कुरेशी पुन्हा अटकेत !

चोरी करणार्‍याला कठोर शिक्षा न मिळाल्याने आणि सध्याच्या शिक्षांमधून चोरीची 
वृत्ती नष्ट होत नसल्याने चोर पुनःपुन्हा चोर्‍या करतो !
     कायद्याचे भय उरले नसल्यानेच अनेकवेळा अटक होऊनही चोराने चोर्‍या करत रहाणे, हे भारतीय कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक !
   नवी देहली - देशातील अनेक राज्यांत तब्बल २०० हून अधिक चोर्‍या करणार्‍या नदीम कुरैशी या चोराला देहली पोलिसांनी अटक केली आहे. नदीम याला यापूर्वी अनेकदा अटक करण्यात आलेली आहे. देहली, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र इत्यादी अनेक राज्यांत नदीमने चोर्‍या केल्यामुळे मुंबई पोलीस, उत्तरप्रदेश पोलीस आणि देहली पोलीस यांची पथके त्याच्या शोधात होती, तेव्हा देहली पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. नदीमकडून होंडा सिटी चारचाकी गाडी कह्यात घेण्यात आली आहे. 
     याआधी न्यायालयात चालू असलेल्या १७ प्रकरणांत नदीमला फरारी म्हणून घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या अटकेमुळे चोरीच्या घटनांची ४ नवीन प्रकरणे सुटण्याची शक्यता आहे. यांपैकी ३ मुंबईतील असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बी.एस्. गुर्जर यांनी दिली आहे. नदीमने वर्ष १९९५ मध्ये अपराधी जगतात पाऊल ठेवले. आतापर्यंत ५०० हून अधिक घरांची कुलूपे तोडणार्‍या नदीमला अनेक वेळा अटकही करण्यात आली आहे.

जर्मनीमध्ये ३२ सहस्र वर्षे जुनी नृसिंहाची मूर्ती सापडली !

३२ सहस्र वषेर्र् जुनी 
नृसिंहाची मूर्ती
सनातन धर्माच्या विश्‍वव्यापक रूपाचा पुन्हा मिळाला पुरावा
    जर्मनी - येथे एका गुहेत भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची ३२ सहस्र वषेर्र् जुनी मूर्ती पुरातत्ववेत्त्यांना सापडली आहे. त्यामुळे जगातील सर्व धर्मांपैकी सनातन वैदिक हिंदु धर्म अनादि आणि सर्वांत प्राचीन असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे, असे सांगण्यात येत आहे. पाश्‍चिमात्य पुरातत्ववेत्त्यांनुसार सापडलेली ही मूर्ती कोणत्या तरी मंदिराच्या मुख्य देवतेची मूर्ती आहे. 
    नृसिंहाने भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी त्याचे वडील आणि राक्षस हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूचा शिवाचा वर होता की, त्याला दिवसाही मृत्यू येणार नाही आणि रात्रीही नाही. त्यामुळे भगवान नृसिंहानी त्याचा तिन्हीसांजेला वध केला. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही जर्मनीमध्ये मिळणार्‍या अन्य साधारण मूर्तींपेक्षा वेगळी आहे. संगमरवराने बनवलेली ही मूर्ती जर्मनीत सापडलेल्या मोठ्या मूर्तींपैकी एक आहे. (जगाच्या कानाकोपर्‍यात वेळोवेळी मिळणार्‍या प्राचीन मूर्ती आणि कलाकृती पाहिल्यास विश्‍वाच्या आरंभी केवळ एकच धर्मच अस्तित्वात होता, हे सिद्ध होते. हिंदूंनो, याविषयी अभिमान बाळगा ! - संपादक)

किती हिंदु लोकप्रतिनिधी अमरनाथ भूमी आंदोलनात सहभागी झाले ? हिंदूंनो, भारतात फारच थोडे हिंदु लोकप्रतिनिधी कर्महिंदू आहेत, हे लक्षात ठेवा !
'इजिप्त एअर'च्या विमानाचे अपहरण आणि सुटका

     
     कैरो - अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणार्‍या इजिप्त एअरच्या एम्एस् १८१ या विमानाचे २९ मार्चला अपहरण करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणांनी सायंकाळपर्यंत अहपरणकर्त्याला अटक करून विमान मुक्त केले. हे विमान अपहरण करून सायप्रस येथील विमानतळावर उतरवण्यात आले होते. विमानात इब्राहिम समाहा नावाच्या अपहरणकर्त्याने याचे अपहरण केले होते. तो आत्मघाती आतंकवादी असण्याची शक्यता आणि विमानात बॉम्ब असण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली होती; मात्र सायप्रसच्या अध्यक्षांनी म्हटले की, ही आतंकवादी घटना नाही. 

काम करण्यास विलंब करणार्‍या मंत्रालयीन अधिकार्‍याला आमदार बच्चू कडू यांच्याकडून मारहाण, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

आमदारही जनतेची काम करण्यास विलंब करतात किंवा केवळ आश्‍वासन देऊन 
जनतेला मूर्ख बनवतात त्या वेळी जनतेने बच्चू कडू यांच्या प्रमाणेच कृती करावी का ? 
 शासकीय अधिकारी काम करण्यास विलंब करत असल्याने आमदारांचा 
उद्रेक होऊन ते त्याला मारहाण करत असतील, तर जनतेने त्यांचा आदर्श घ्यावा का ?
     मुंबई, २९ मार्च - सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी.आर्. गावीत यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी २९ मार्च या दिवशी दुपारी मारहाण केली. या प्रकरणी मंत्रालयातील सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार कडू हे एका नागरिकाच्या समस्येच्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी मंत्रालयात गेले होते. या आधीही त्यांनी २-३ वेळा अधिकार्‍याकडे काम करण्यासाठी विनंती केली होती; मात्र अधिकारी काम करण्यास विलंब करत असल्याने त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

५५ प्रतिशत मुंबई पोलीस व्यसनाधीन !

असे पोलीस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय राखणार ! 
     मुंबई - मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून मुंबई पोलीस दलातील ५५ टक्के कर्मचार्‍यांना मद्य अथवा तंबाखू यांचे व्यसन आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अहवालातून दिसून येते. 

अंतराळात एकाच वेळी २२ उपग्रह (सॅटेलाइट) सोडण्याची 'इस्रो'ची सिद्धता चालू !

     तिरुवनंथपुरम् (केरळ) - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मे मासात २२ उपग्रहांचे ('सॅटेलाइट्स'चे) एकाच वेळी प्रक्षेपण करण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये 'कार्टोसॅट २सी' या भारतातील एकाच उपग्रहासह विदेशातील अमेरिका, कॅनडा, जर्मनी इंडोनेशिया इत्यादी देशांचे अनेक 'मायक्रो' आणि एका 'नॅनो' उपग्रहाचा समावेश आहे. इस्रोच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे, जेव्हा एवढे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. सर्व उपग्रह 'पीएस्एल्व्ही सी३४' च्या माध्यमातून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सोडण्यात येणार आहेत. 

कुडाळ, सिंधुदुर्ग येथील हिंदु धर्मजागृती सभेचा पथनाट्याच्या माध्यमातून प्रसार

     कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी बालसाधकांचे पथनाट्य शहरात विविध ठिकाणी सादर करण्यात येत होते. कुडाळ येथे गांधी चौक येथील पथनाट्य पाहिल्यानंतर बाजारपेठेतील स्वरूपानंद मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश पडते यांनी त्याच वेळी चालू असलेल्या स्वरूपानंद मित्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात पथनाट्य सादर करण्याचे निमंत्रण दिले. समितीच्या वतीने त्यांच्या कार्यक्रमात पथनाट्य सादर करण्यात आले. तेथे सुमारे ६०० लोक उपस्थित होते. पूर्ण बाजारपेठेत २ - ३ ठिकाणी त्यांनी ध्वनीक्षेपक बसवले असल्याने अनेक जणांपर्यंत सभेचा विषय आणि निमंत्रण पोेहोचले. प्रत्यक्ष सभेपूर्वी आणि नंतरही अनेक जण थांबून पथनाट्य जिज्ञासेने पहात होते अन् चित्रीकरण करत होते. - श्री. हेमंत मणेरीकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग. 

जर्मनीतील तीन राज्यांच्या निवडणुकीत चान्सलर अँजेला मर्केल यांच्या सीडीयू पक्षाचा दोन राज्यांत पराभव !

      बर्लीन - सिरिया येथील १० लाख शरणार्थींना जर्मनीचे द्वार खुले करून त्यांना देशात सामावून घेणार्‍या जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक युनियन (सीडीयू) पक्षाला तीन पैकी दोन राज्यांत पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या एएफ्डी म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर डॉईचलॅण्ड (याला अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी असेही म्हणतात) या पक्षाच्या मतांचा टक्का वाढला असून त्याचा तिन्ही राज्यांतील विधानसभेतील प्रवेश निश्‍चित झाला आहे.

व्हिसा न घेता भारतात आलेल्या ३५ पाकिस्तानी हिंदु नागरिकांना अटक

कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर आणि क्रिकेटचे सामने पहाण्यासाठी येऊन भारतात बेपत्ता होणारे 
पाकिस्तानी नागरिक यांना मोकाट सोडणारी भारतीय सुरक्षा यंत्रणा गरीब आणि अत्याचारित 
पाकिस्तानी हिंदु नागरिकांना मात्र तात्काळ अटक करते !
     जयपूर - व्हिसा न घेता भारतात आलेल्या ३५ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे नागरिक राजस्थानातील जैसलमेर येथे असलेल्या बाबा रामदेव यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले होते. रामदेवरा येथील पोलीस अधिकारी कुशल चंद्र यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. या नागरिकांकडे केवळ मथुरा आणि हरिद्वार येथील व्हिसा होता. राजस्थानमधील व्हिसा त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.इसिसचे विदेशी आणि स्थानिक सैनिक यांच्यातच संघर्ष !

     वॉशिंग्टन - इसिसच्या विदेशी आणि इराक अन् सिरिया येथील स्थानिक सैनिक यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याची माहिती समोर आली आहे. यासह इराक आणि सिरिया या देशांमध्ये इसिसच्या विविध ठिकाणी होत असलेल्या पराभवामुळे संघटनेतील आतंकवाद्यांतील तणावाचे वातावरण वृद्धींगत झाले आहे. 
    वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार इसिस विदेशी सैनिकांचे नेहमीच स्वागत करत आला असला, तरी आता स्थानिक इराकी आणि सिरियन सैनिकांसमवेत विदेशी सैनिकांचे असलेल्या संबंधांत दुरावा निर्माण झाला आहे. सिरियाच्या मोसुल शहरातील एका रहिवाशाने वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गटांमधील सैनिकांमध्ये व्यवस्थापन आणि आर्थिक स्वरूपाच्या अडचणींमुळे मतभेद निर्माण झाले आहेत. आम्ही त्या दिवसाची प्रतिक्षा करत आहोत, जेव्हा दोन्ही गट एकमेकांशी युद्ध करून स्वत:च मरून जातील, असे म्हटले आहे.

सुवर्ण मुद्रांकीकरण योजनेखाली नगदी पैशांऐवजी सोनेच द्या !

तिरुपती देवस्थानचा केंद्रशासनाकडे आग्रह 
     तिरुपती - शासनाच्या सुवर्ण मुद्रांकीकरण योजनेच्या अंतर्गत देशातील सोने विनावापर पडून राहण्याऐवजी सार्वजनिक अधिकोषात जमा केले, तर त्यावर आकर्षक व्याजापोटी उत्पन्न मिळू शकते, असा प्रचार शासन करत आहे. गुंतवलेल्या सोन्याचे रुपांतर पैशात करण्याऐवजी त्याच किमतीचे सोने परत करणे अधिक सोयीचे होईल, असे मत प्रसिद्ध तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापकीय मंडळाचे कार्यकारी संचालक डी. सांबशिव राव यांनी व्यक्त केले आहे. तिरुपती मंदिरामध्ये सुमारे २ सहस्र कोटी रुपये मूल्याचे ७ टन सोने उपलब्ध आहे; मात्र तिरुपती आणि इतर मंदिरे केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रांकीकरण योजनेत सोने गुंतवण्यासाठी इच्छुक नाहीत. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि विश्‍वासाने हे सोने देवतांना अर्पण केले आहे. हे सोने शासकीय योजनांमध्ये गुंतवल्यावर जर बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या, तर जुन्या किमतीत गुंतवलेल्या सोन्याच्या परतीवरील रक्कम अल्प मिळेल आणि तो भाविकांचा विश्‍वासघातही होईल. त्याऐवजी रकमेपेक्षा सोनेच परत केले, तर ते अधिक योग्य होईल, असे मत सर्व मंदिरांचे व्यवस्थापन व्यक्त करत आहेत.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच भारतीयत्व ! - श्री. विनोदकुमार सर्वोदय, गाजियाबाद, उत्तर प्रदेश.


फलक प्रसिद्धीकरता

ओवैसी यांची देशभक्ती (?) सर्वश्रुत आहे !
      भारतमाता की जय ही घोषणा न दिल्याने कोणी आमच्या देशभक्तीविषयी शंका घेऊ शकत नाही. आम्हाला कोणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता नाही. आमच्यावर शंका घेणारेच देशद्रोही असल्याची टीका एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
 

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hume kisise Deshbhaktike pramanpatraki avashyakta nahi. Humpar sandeh karnewalehi deshdrohi hain- Asaduddin Owaisi
Yakub ke samarthak Deshbhakta kaise?
जागो ! : हमेंकिसीसेदेशभक्तिकेप्रमाणपत्रकी आवश्यकता नहीं. हमपर संदेह करनेवालेही देशद्रोहीहैं! -असदुद्दीन ओवैसी - याकूबके समर्थक देशभक्त कैसे?
फर्ग्युसन महाविद्यालय घटनेप्रकरणी शोध समिती स्थापन

     मुंबई, २९ मार्च - पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात २२ मार्च या दिवशी घडलेल्या घटनेच्या वस्तूस्थितीची माहिती घेण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष श्री. शाहू छत्रपती महाराज यांनी शोध समिती स्थापन केली आहे. या समितीत नियामक मंडळ सदस्य राम निंबाळकर, आजीव सदस्य विष्णू मगरे, मुंबईतील किर्ती महविद्यालयाचे प्राचार्य यांचा समावेश आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

दीड टन गोमांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक

गोवंशियांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     सिडको (नाशिक) - मालेगावहून मुंबईला साधारणतः दीड टन गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनास प्राणीमित्र गौरव क्षत्रिय आणि विकास गुंजाळ या दोघांनी अंबड पोलिसांच्या साहाय्याने पाठलाग करून विल्होळी जकात नाक्यावर पकडले. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक संशयित शेख याकूब आयुब (वय २६ वर्षे) आणि शेख वसिम सलीम (वय १९ वर्षे) यांना अटक केली आहे. प्रारंभी 'वाहनात काय आहे', असे विचारताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चळवळ
     नवी देहली - हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील हेतूने विदेशातून अनेक ख्रिस्ती मिशनरी भारतात प्रवेश करण्यात यश मिळवतात. हे मिशनरी टुरिस्ट व्हिसावर भारतात येतात आणि हिंदूंच्याच पाठीत धर्मांतररूपी खंजीर खुपसतात. यावर आळा बसावा आणि अशा मिशनर्‍यांना भारतात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 
    भारतीय वकिलाती कार्यालये विदेशी नागरिकांना भारतीय व्हिसाचे नियम लागू करत नसल्याचे आणि मिशनर्‍यांची कोणतीही शहानिशा न करताच त्यांना भारतीय व्हिसा देण्याचा गंभीर आरोपही या याचिकेद्वारे याचिकाकर्त्याने केला आहे. (केंद्रशासनाने या गंभीर आरोपाची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदु धर्माभिमान्यांची मागणी आहे ! - संपादक) 
     ट्विटरच्या @noconversion नावाच्या खात्यावरून या याचिकेविषयी प्रसार करण्यात येत आहे. गेल्या ३ दिवसांतच या याचिकेवर १ सहस्रहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे. 
चेंज डॉट ऑर्गवरील ऑनलाईन याचिकेची मार्गिका (लिंक) - goo.gl/5m19Fx
(टीप : वरील मार्गिकेत काही अक्षरे कॅपिटल आहेत, याची नोंद घ्यावी.)

वाराणसी येथे गंगा नदीच्या काठी पाकिस्तानी मंदिर !

भारताच्या मुळावर उठलेल्या पाकचे नाव मंदिराला देणारे नतद्रष्ट हिंदू !
     वाराणसी - येथील वाराणसी डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (व्ही.डी.ए.च्या) अहवालानुसार या शहारातील गंगा नदीच्या किनारी असणार्‍या शीतला घाटावर पाकिस्तानी मंदिर आहे. हे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 
१. गंगा नदीच्या किनारी असलेल्या या छोट्याशा मंदिरात पांढर्‍या दगडाचे शिवलिंग आहे. काही जणांची नावे लिहिलेली एक पाटी लावण्यात आली आहे. ते सर्व या मंदिराचे संस्थापक आहेत, असे समजले जाते. या मंदिरांच्या शेजारी अनेक मंदिरे आहेत आणि येथेच शेजारच्या गल्लीमध्ये एक मशीदही आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेच्या संदर्भातील सर्वेक्षणाच्या आकड्यांमध्ये काँग्रेसने फेरफार करून केले प्रसारित !

मोदीद्वेषाने पछाडलेल्या काँग्रेसचे कुकृत्य !
फोटोशॉपचा वापर करून आकडे पालटण्यात आले
     नवी देहली - काँग्रेसच्या सोशल मीडिया (सामाजिक संकेतस्थळ) गटाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने मोदींच्या लोकप्रियतेच्या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पालटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणाचा स्नॅपशॉट (संगणकीय छायाचित्र) घेऊन त्यावर फोटोशॉपद्वारे मोदींची लोकप्रियता झपाट्याने न्यून झाल्याची आकडेवारी घालून पालटलेले छायाचित्र काँग्रेसच्या ट्विटरवरील @DrunkVinodMehta या ट्विटर हँडलद्वारे (खात्याद्वारे) प्रसारित करण्यात आले आहे. काँग्रेसने प्रसारित केलेल्या चित्रामध्ये मोदी यांना वर्ष २०१४ मध्ये मिळालेल्या ३१ टक्के मतांच्या तुलनेत आता केवळ २१ टक्केच मते मिळतील, अशा स्वरूपाचे आकडे प्रसिद्ध केले आहेत.

व्हिएतनाममध्ये सापडली ४ सहस्र वर्षांपूर्वीची भगवान श्रीविष्णूची प्राचीन मूर्ती !

जगात सर्वत्र हिंदु संस्कृती होती, याचा आणखी एक पुरावा !
     व्हिएतनाम - येथे २ वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाला ४ सहस्र वर्षांपूर्वीची भगवान श्रीविष्णूची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती ज्या भागात मिळाली, त्या भागात मेकाँग नावाची एक नदी आहे, जिचा अर्थ गंगामाता असा आहे. यापूर्वीही व्हिएतनाममध्ये गणपतीची मूर्ती मिळाली होती. मूर्तीसोबत मिळालेल्या अन्य १ सहस्र पौराणिक वस्तूंवरून प्राचीन वैदिक संस्कृती विश्‍वभर पसरली होती, हे सिद्ध होते.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ मधील आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. जानेवारी २०१६ मध्ये विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 

सवंग प्रसिद्धीप्रिय जितेंद्र आव्हाड !

श्री. नित्यानंद भिसे
१. आव्हाडांचा सवंग प्रसिद्धीचा रोजंदारीचा धंदा !
     महाराष्ट्राच्या राजकारणात जितेंेद्र आव्हाड हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात रहाणारे व्यक्तीमत्त्व बनले आहे. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे सत्तेअभावी राजकीय पटलावर महत्त्व अल्प झालेले असले अथवा त्या पक्षातील ज्येष्ठ नेते गजाआड जात असले, तरी त्याचा आव्हाडांच्या प्रसिद्धीच्या आलेखावर तसूभर परिणाम होतांना दिसत नाही, याचे कारणही तसे आहे. आव्हाडांची विषय निवडण्याची हातोटी. मागील ५-७ वर्षांपासून त्यांना या संदर्भात बराच अनुभव आलेला आहे. त्यामुळे लाल महालात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा असो, इशरत जहाँ चकमकीत ठार होणे असो, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित करणे असो, पाकिस्तानचे गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांना विरोध असो अथवा भारताच्या विघटनवादी भूमिकेचे समर्थन केल्याचा आरोप असलेल्या जेएन्यूतील कन्हैयाला विरोध होणे असो, अशा प्रत्येक प्रसंगात पक्षाची भूमिका काय आहे, याची काडीमात्र चिंता न बाळगता थेट स्वतंत्र भूमिका घेऊन सर्वचा सर्व प्रसिद्धीचा झोत आपल्या दिशेने वळवण्याची किमया आव्हाडांना अवगत झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की, त्यांच्या या प्रसिद्धीचे स्वरूप सवंग लोकप्रसिद्धीचे बनले आहे. त्यामुळे त्यातून विशेष काही निष्पन्न होतांना दिसत नाही. प्रतिदिन कमवा आणि प्रतिदिन खा, असा रोजंदारीचा धंदा त्यांचा चालू आहे. प्रतिदिन नवीन विषय घेऊन त्या दिवसापुरतीची प्रसिद्धी मिळवा, पुन्हा दुसर्‍या दिवशी नवीन प्रकरण शोधा, असा प्रकार चालू आहे. सध्या त्यांनी याकरता कन्हैयाला हाताशी धरला आहे.

बालपणापासून व्यायाम करा !

     हिंदु संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून ते समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत सर्वांनीच सुदृढ, सशक्त आणि निरोगी शरिराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निरोगी शरिरात निरोगी मन रहाते आणि मन हे शरिरावर राज्य करते, हे आपण सर्वजण जाणतोच. आपले व्यावहारिक जीवन असो वा ईश्‍वरप्राप्तीचे प्रयत्न असोत, प्रत्येकासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. हे सूत्र सर्वांनाच कळते; पण वळत नाही, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. आज सर्वच वयोगटातील प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने ग्रस्त आहे. त्यामध्ये सदोष जीवनशैली, प्रदूषित अन्न, पाणी, हवा हे जरी मुख्य घटक असले, तरी व्यायामाचा अभाव हे त्यामधील मुख्य कारण आहे. सध्याच्या यंत्रयुगामुळे शारीरिक कष्ट अल्प झाले; पण मानसिक तणाव वाढले. एका ठराविक काळानंतर जेव्हा शरीर साथ देईनासे होते, तेव्हा व्यायामाचे महत्त्व लक्षात येते; पण तोपर्यंत विलंब झालेला असतो.

उपनयन समारंभानंतर बटूला संध्याही शिकवा !

    अलीकडे लोक मुंज आणि विवाहसमारंभ दणक्यात साजरे करतात. समाजाच्या आर्थिक उन्नतीचे ते प्रतीक आहे; पण त्याचबरोबर आपले नित्य धार्मिक संस्कार शास्त्रोक्त पद्धतीने होण्यालाही तेवढेच महत्त्व द्यायला हवे. पूर्वी उपनयनानंतर पुरोहित आठवडाभर बटूंना संध्या शिकवायचे. त्याची त्यांना वेगळी दक्षिणा देत असत. त्यासाठी गुरुजी होतकरू पुरोहितांना पाठवत. एकदा संध्या करण्याचा विधी समजला की, नंतर कधीही पुस्तक पाहून संध्या करता येई. आता समारंभावर खर्च करून पुढे काहीच करत नाहीत. याने उपनयनाचा मूळ उद्देश दुर्लक्षिला जातो. समारंभानंतर ८-१५ दिवस बटूस संध्या शिकवणे आवश्यक आहे. कवळे मठ, पर्तगाळी मठ यांमध्ये बटूंसाठी निवासी कार्यशाळा आयोजित करून बटूंना संध्या, सर्वसाधारण हिंदु आचार-विचार शिकवले जातात. बटूंच्या पालकांनी हे लक्षात घेऊन बटूंवर उपनयनाचे योग्य संस्कार होण्याकडे लक्ष द्यावे.
- ग.ना. कापडी, पर्वरी, गोवा.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भगवंताची कृपा होण्यासाठी निर्मळ अंतःकरण आवश्यक !

     पारदर्शी वस्तूमधूनच सूर्यकिरण प्रविष्ट होऊन पार जाऊ शकतात. भगवंताचा प्रकाश आणि प्रेम त्यांनाच प्राप्त होते, ज्यांचे हृदय निर्मळ असते. (संदर्भ : मासिक अखंड ज्योती, मे २०००)

वर्ष २००९ मध्ये विविध घटनांतून ईश्‍वराने येणार्‍या भीषण संकटांची जाणीव करून देणे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे वागून पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे पाहीले. आता विविध घटनांतून ईश्‍वराने येणार्‍या भीषण संकटांची जाणीव कशी करून दिली याविषयी आज येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

नम्रता आणि प्रेमभाव असलेले दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. शंकर नरुटे
      जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) - नम्रता, प्रेमभाव आणि साधना म्हणून दंतचिकित्सा करणे या गुणांमुळे जयसिंगपूर येथील सनातनचे साधक आणि दंतवैद्य अनिरुद्ध अण्णासाहेब वरेकर (वय ३५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २८ मार्च या दिवशी घोषित करण्यात आले. श्री. अण्णासो वरेकर यांच्या घरी झालेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात सनातनचे ६५ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेले साधक श्री. शंकर नरुटे यांनी हे गुपित उघड केले. श्री. शंकर नरुटे यांच्या हस्ते दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी घरातील सर्वांनाच भावाश्रू अनावर झाले. या प्रसंगी दंतवैद्य अनिरुद्ध यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) स्वाती आणि त्यांच्या आई सौ. वासंती वरेकर उपस्थित होत्या.
     मनोगत व्यक्त करतांना दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर म्हणाले, गुरूंनी मला भरपूर दिले, प्रत्यक्षात मी मात्र त्यांच्यासाठी अल्पच केले आहे. आज मन एकाग्र होत आहे आणि आनंदही वाटत आहे. दंतवैद्य अनिरुद्ध यांचे वडील श्री. अण्णासो वरेकर म्हणाले, चार दिवसांपूर्वी प.पू. डॉक्टर स्वप्नात आले होते. त्याच वेळी काहीतरी आनंदाचे वृत्त मिळणार, असे वाटत होते.

साधना म्हणून दंतचिकित्सा करणारे जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथील दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर !

     मी दातांवरील उपचारांसाठी जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथील साधक आणि दंतवैद्य अनिरुद्ध वरेकर यांच्या चिकित्सालयात सलग काही दिवस जात होते. तेव्हा मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे.
१. धर्माचरण
दादा नेहमी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून चिकित्सालयात येतात.
२. नम्रता
     चिकित्सालयात येणारे रुग्ण, त्यांच्याकडे शिकण्यासाठी आलेल्या व्यक्ती आणि कामकरी यांच्यासमवेत दादा नम्रपणे बोलतात.
३. प्रेमभाव
३ अ. रुग्णाच्या दातांची पाहणी केल्यानंतर ते रुग्णावर काय उपचार करणार आहेत, याविषयी प्रेमाने सांगतात.
३ आ. प्रत्यक्ष चिकित्सा चालू असतांना दुखण्याविषयी प्रेमाने विचारणे : दंतचिकित्सेसाठी रुग्णाला बसायची आसंदी खाली-वर करतांना, रुग्णाच्या दातात इंजेक्शन देतांना किंवा प्रत्यक्ष उपचार चालू असतांना दुखत नाही ना ?, काही अडचण नाही ना ?, अशी विचारणा मध्ये-मध्ये करतात. त्यामुळे रुग्णाला त्यांचा आधार वाटतो आणि रुग्ण त्यांना अडचण मोकळेपणाने सांगू शकतो.
४. इतरांचा विचार करणे
४ अ. रात्रीच्या वेळी आश्रमात कोणत्या मार्गाने जाणे सुरक्षित आहे, याविषयी सांगणे : दादांचे चिकित्सालय मिरज आश्रमापासून ५० कि.मी.अंतरावरील जयसिंगपूर येथे आहे. एक दिवस उपचारांनंतर चिकित्सालयातून मिरजला दुचाकीने परतीच्या प्रवासाला रात्री ९ वाजता निघावे लागले.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. केशव अष्टेकर
१. साधकांनी त्यांच्या कुटुंबियांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये 
१ अ. प्रेमभाव 
१ अ १. श्री. केशव अष्टेकर यांच्यातील प्रेमभाव 
१ अ १ अ. भेटीला येतांना देवाच्याच दर्शनाला जात आहे, असा भाव ठेवणारे बाबा ! : एकदा बाबांनी भेटीच्या वेळी पुष्कळ फळे आणली होती. ती पाहून आम्ही बाबांना विचारले, बाबा, आज एवढी फळे कशाला आणलीत ? त्यावर बाबा म्हणाले, देवासाठी पाच प्रकारची फळे लागतात ना; म्हणून पाच प्रकारची फळे आणली आहेत. हे ऐकून आम्हाला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. - श्री. धनंजय अष्टेकर

पू. स्वातीताईंच्या सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या भावानंद सोहळ्यात संत आणि साधक यांनी मनोगतातून घडवलेले पू. ताईंमधील सुंदर गुणमोत्यांचे दर्शन आणि सद्गुरु पू. स्वातीताईंचे अनमोल मार्गदर्शन !

डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव आणि पू. (कु.) स्वाती खाडये
       साधकांना साधनेतील प्रगतीची आनंदवार्ता अनपेक्षितपणे देऊन अचंबित करणार्‍या सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांना २३.९.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अचंबित केले. निमित्त ठरले ते पू. स्वातीताईंनी सद्गुरुपदी विराजमान होण्याचे ! नाशिक येथील सिंहस्थपर्वात आज एक संत - हरिगिरी महाराज येणार; म्हणून साधकांनी भावपूर्ण सिद्धता केली. संतांचे आगमन होण्यापूर्वी पू. (कु.) स्वातीताई यांनी गुरुमाऊलींची मानसपूजा करवून घेतली. या वेळी उपस्थित सर्वच साधकांना गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवणे, भाव दाटून येणे, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. तेव्हा याचे गुपित पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उलगडले. सर्व साधकांमध्ये भाव निर्माण करून सिंहस्थपर्वाचे यशस्वी आयोजन करणार्‍या पू. (कु.) स्वातीताई सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घोषित केल्याचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांची गुरुपौर्णिमेला ७७ टक्के आध्यात्मिक पातळी होती. त्यांच्या तळमळीच्या प्रयत्नांमुळे केवळ ३ मासांतच ती वाढून ८० टक्के झाली. ही सुवार्ता ऐकताच पू. ताईंसह सर्व साधक भावानंदाने न्हाऊन निघाले.
      हा हृद्य भावसोहळा कसा पार पडला ? तसेच सिंहस्थ पर्वाच्या सेवेत सहभागी झालेले साधक आणि संत यांनी आपल्या मनोगतातून पू. (कु.) स्वातीताई यांच्यातील सुंदर गुणमोत्यांचे दर्शन कसे घडवले ? यांविषयी पुढे देत आहोत.
(भाग २)

श्री. राजू सुतार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासंदर्भात मिळालेली पूर्वसूचना

      काल श्री. राजूदादाला मी साधनाताईसोबत सायंकाळी गाडीवरून जातांना पाहिले, तेव्हा अचानक राजूदादाचे नम्रता, भाव, परिपूर्ण सेवा करणे इत्यादी सगळे गुण आठवले आणि मनात विचार आला, साधनाताई किती भाग्यवान आहे, तिला असा नम्र आणि भाव असलेला नवरा मिळाला ! लवकरच दादाची ६१ टक्के अध्यात्मिक पातळी घोषित होईल आणि आज त्याची ६१ टक्के पातळी घोषित झाली. तेव्हा ती पूर्वसूचना असल्याचे लक्षात आले.
श्री. राजू सुतार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. प.पू. डॉक्टरांचा लाडका राजूदादा ! : राजूदादा मधील भाव आणि गुण यांमुळे प.पू. डॉक्टर त्याचे सतत कौतुक करत असतात. कोणतेही छायाचित्र काढण्यासाठी त्यांच्या तोंडात प्रथम राजूदादाचेच नाव येते.

स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवणारे आणि साधकांचा आधारस्तंभ बनलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजू सुतार !

      चित्रीकरण विभागातील सर्व साधकांना श्री. राजू सुतार यांच्यामध्ये गेल्या ७ - ८ मासांत (महिन्यांत) जाणवलेले पालट पुढे देत आहोत.
१. पूर्वीचे श्री. राजूदादा 
श्री. राजू सुतार
 १ अ. अलिप्तता : पूर्वी राजूदादा विभागात सेवा करतांना विभागातील साधकांमध्ये मिसळत नसत. त्यामुळे विभागात काय सेवा चालू आहे ?, हे त्यांना ठाऊक नसायचे. ते केवळ त्यांना दिलेल्या छायाचित्रांच्या वर्गीकरणाची सेवा करायचे.
१ आ. चुकांची भीती वाटणे : पूर्वी प्रत्येक सेवा करतांना सेवेअंतर्गत होणार्‍या चुकांची त्यांना पुष्कळ भीती वाटायची; म्हणून ते दायित्व आणि पुढाकार घेऊन सेवा करण्यास टाळत असत.
१ इ. संकुचितता : दादा त्यांना शक्य आहे तेवढी आणि दिलेली सेवाच संकुचितपणे करायचे. विभागात रात्रीची सेवा असेल, तर ते स्पष्टपणे मला जमणार नाही, असे सांगायचे.

देहावसान झालेल्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळण्यासाठी प्रार्थना करणे टाळा !

      प्रारब्धभोग भोगून मोक्षप्राप्ती करणे, म्हणजेच ज्या ईश्‍वराचे आपण अंश आहोत, त्या ईश्‍वराशी एकरूप होणे, हा मानवी जन्माचा प्रमुख उद्देश आणि हेच मानवाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे; मात्र एखादी व्यक्तीचे निधन झाल्यास बर्‍याचदा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्य अथवा हितचिंतक त्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळावा, यासाठी प्रार्थना करतात. एखाद्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळावा, यासाठी प्रार्थना करणे म्हणजे त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकवल्यासारखे होते; म्हणून अशी प्रार्थना करणे अयोग्य होय. या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन मोक्षप्राप्तीसाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्तीची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करणे अधिक योग्य ठरते. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करण्याने आपण त्यांचे खर्‍या अर्थाने हितचिंतक ठरू !

नियोजनाचा अभाव, गृहीत धरणे यांमुळे कार्यक्रमस्थळाची शोधाशोध करण्यात १४ घंटे एवढा वेळ वाया घालवणारे आणि कार्यक्रमात अपेक्षित असा विषय मांडण्याची संधी गमावणारे देहलीतील कार्यकर्ते !

१. एका संतांच्या कार्यक्रमाचे मैदान 
इंटरनेटवर सर्च करतांना चुकीचे स्पेलिंग घालणे
        १४.२.२०१६ या दिवशी मातृ-पितृदिनाच्या निमित्ताने देहली येथे एका संप्रदायाचा मोठा कार्यक्रम होता. त्या संतांनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते. कु. कृतिका खत्री, श्री. विनय पानवळकर आणि श्री. कार्तिक साळुंके यांनी प्रसिद्धीपत्रकातील (प्रेसनोटमधील) कार्यक्रमाच्या मैदानाचे नाव व्यवस्थित वाचले नाही. परिणामी ते नाव गूगल मॅपवर सर्च करतांना चुकीचे स्पेलिंग घातले गेले. सर्च रिझल्टमध्ये दिसलेल्या मैदानातच कार्यक्रम असेल, असे गृहीत धरून कु. कृतिका आणि श्री. पानवळकर तेथे जाण्यास निघाले.

चारही मुलांना गुरूंनी सांभाळले, यासाठी कृतज्ञ होऊन केवळ स्वत:च्या मुलांसाठीच नाही, तर सर्व साधकांसाठी प्रार्थना करणार्‍या ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विमल आगावणे !

१. आश्रमातील चैतन्याने उपाय होणे 
श्रीमती विमल आगावणे
        १५.६.२०१५ या दिवशी मी आश्रमात आले. तेव्हा आश्रमातील चैतन्याने माझ्यावर उपाय होत होते. त्या वेळी आश्रमात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू होेते. सर्वांना पाहून मी आनंदित झाले. पूर्वी मला माझ्या दोन्ही मुलांनी देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या जवानांप्रमाणे सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करावे किंवा पोलीस क्षेत्रात जावे आणि मला अशा जवानांसाठी भाकरी करून देण्याची संधी मिळावी, असे वाटायचे.
२. साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश असलेल्या गुरुमाऊलींनी 
मायेतील चिखलातून बाहेर काढून साधनेचा मार्ग दाखवून कृपा करणे
      प.पू. गुरुमाऊली माझी ही सर्व तळमळ जाणत होते; म्हणून भ्रष्ट अशा चाकरीपासून गुरुमाऊलींनी माझ्या दोन्ही मुलांचे रक्षण करून त्यांना साधनेत आणून आमच्यावर कृपा केली. सौ. धनश्री केळशीकर हिच्या माध्यमातून आम्हा सर्वांना सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेचा मार्ग दाखवला. साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश असलेल्या गुरुमाऊलींशी आमची भेट झाली. त्यांनीच आम्हाला चिखलातून बाहेर काढले. गुरुमाऊलींनी आम्हाला आज अशा मायेतील चाकरीमध्ये आणि हव्यासामध्ये न अडकवता, जे खरे सच्चिदानंद आहे, सत्य आहे अशा सनातन संस्थेच्या माध्यमातून माझ्या चारही मुलांना जवळ घेतले, त्यासाठी हे श्रीकृष्णा, मी तुझ्या चरणी साष्टांग दंडवत घालून कृतज्ञता व्यक्त करते.

गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे हस्तपत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना
     एप्रिल मासापासून श्री गणेश चतुर्थीनिमित्त पूजेसाठी लागणार्‍या गणेशमूर्ती बनवण्याची प्रक्रिया मूर्तीकार चालू करतात. मूर्तीकारांनी सात्त्विक आणि शास्त्रानुसार गणेशमूर्ती बनवावी, या उद्देशाने मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे, तसेच शास्त्रानुसार असलेल्या गणेशमूर्तीची मापे सांगणारे ए-५ आकारातील चार पानी पत्रक सनातन संस्थेने बनवले आहे. आपल्या जिल्ह्यांतील मूर्तीकारांना भेटी घेऊन त्यांचे सात्त्विक गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी या पत्रकाचा परिणामकारकपणे वापर होऊ शकतो. हे हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध करण्यात आले आहे.


प्लूमो नावाच्या सात्त्विक कुत्र्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

      २८.५.२०१५ या दिवशी श्री. कोंडिबा जाधवकाका यांच्याकडील कुत्रा प्लूमो आश्रमात आला होता. प्लूमोकडे पाहून काय वाटते ?, याचा प्रयोग घेण्यात आला. प्रयोगाच्या कालावधीत माझा श्रीकृष्णाचा नामजप आपोआप होत होता. प्लूमोकडून वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. प्लूमोमध्ये प्रेमभाव, उत्साह, भोळेपणा आणि निरागसता हे गुण जाणवले. प्लूमोची दृष्टी दयाळू वाटली. त्याच्याकडे पाहून त्याच्याप्रती प्रेम वाटत होते. त्याला हात लावल्यावर त्याच्याविषयी पुष्कळ आपलेपणा वाटला. मी सूक्ष्मातून त्याच्या चरणांना नमस्कार केल्यावर मला त्याच्या जागी प्रकाशाचा गोळा दिसला आणि त्या गोळ्यातून आनंदाचे प्रक्षेपण होत होते.
- सौ. शुभांगी अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०१५)

देवाने कलियुगात जन्म देऊन सेवा करण्याची संधी दिल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि सेवेला कंटाळण्याचा विचार मनात येऊ न देण्याविषयी केलेली प्रार्थना !

      देवा, ज्या एका विचारामुळे मी तुझ्या चरणी अवतरलेल्या गंधर्वपुष्पातून गळून पडलो (विखुरला गेलो), तो सेवेला कंटाळण्याचा विचार पुन्हा कदापी माझ्या मनात डोकावूसुद्धा देऊ नकोस. पुन्हा साधना करून तुझ्या चरणी सेवारत रहाण्याची गमावलेली अवस्था पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी तू मला कलियुगात पाठवून पुन्हा संधी दिलीस. ती सार्थकी लागू दे. ईश्‍वरी सेवा ही मला प्राणापेक्षाही प्रिय होऊ दे. मला ईश्‍वरसेवेचे सामर्थ्य कळू दे. मला आता केवळ ईश्‍वरच हवा आहे, याची सतत जाणीव असू दे. अपूर्ण राहिलेली सेवा तूच माझ्याकडून पूर्ण करवून घे आणि लवकरात लवकर तुझ्या चरणी विलीन करवून घे. हे सर्व साध्य होण्यासाठी आवश्यक ते सर्व (निर्मळता, उत्कट भावभक्ती, तुला प्राप्त करून घेण्याची तीव्र तळमळ) तूच मला दे आणि वृद्धींगत कर. ज्या गोष्टीमुळे मी तुला प्राप्त करून घेऊ शकत नाही, त्या गोष्टी म्हणजे मला होणारा वाईट शक्तींचा त्रास; मन आणि बुद्धी यांचा अडथळा; षड्रिपू; अहं; अनावश्यक विचार आणि मनोरोग या वाईट गोष्टी तूच लवकरात लवकर समूळ नष्ट कर. तूच माझ्याकडून योग्य प्रयत्न करवून घे आणि त्यात सातत्य असू दे. माझ्यात प्रीती निर्माण करून ती वाढव. हीच तुझ्या चरणी कळकळीची याचना आहे.

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.


समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांंनी केलेले मार्गदर्शन आणि सनातन संस्थेची वर्णिलेली महती !

पू. मोहनबुवा रामदासी
      पनवेल परिसरात समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासमवेत आलेल्या समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांना २७.१.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यावर प्रेरणा झाली की, देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट द्यावी. त्यानुसार आश्रमात आल्यावर त्यांनी पुढील मार्गदर्शन केले.
१. सनातनच्या आश्रमांतील देव, देश आणि 
धर्म यांचे प्रत्यक्ष कार्य पाहून मला आनंद होत आहे !
       परमेश्‍वरकृपेने आश्रमात येण्याचा योग आला आहे. समर्थांच्या वचनानुसार आश्रमातील साधक मंडळी प्रत्यक्ष कृती करून आध्यात्मिक जीवन जगत असल्याने मला नेहमीप्रमाणेच आनंद झाला. रामनाथीसह सनातनच्या अनेक आश्रमांत मी जाऊन आलो. त्या त्या वेळी मला अशी अनुभूती आली, याचा मला विशेष करून अधिक आनंद होतो. देव, देश आणि धर्म यांचे येथे प्रत्यक्ष कार्य पाहून मला आनंद होतो.

७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादी पूर्वीप्रमाणे चिकट होण्याचे महर्षींनी सांगितलेले आध्यात्मिक कारण

        ७.२.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादी पूर्वीप्रमाणे चिकट होऊन सर्व खोलीमध्ये पायांचे ठसे उमटत होते. यापूर्वी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय चालू असतांना लादी चिकट होण्याचे प्रमाण वाढले. यासंदर्भात पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना कळवले असता त्यांना महर्षींनी पुढील माहिती सांगितली.
सोमवती अमावस्या, महोदय योग : रविवार, ७.२.२०१६ या रात्री १०.२० ते सोमवार, ८.२.२०१६ या दिवशी दुपारी २.२२ पर्यंत महोदय योग आहे. माघी अमावास्या, रविवार, श्रवण नक्षत्र आणि व्यतीपात योग यांचा संयोग होऊन महोदय योग बनतो. या ठिकाणी व्यतीपात योग ७.२.२०१६ या दिवशी सायं. ५.१५ ते ८.२.२०१६ या दिवशी दुपारी २.२१ वाजेपर्यंत आहे. तीन योगांपैकी दोन योगांचा संयोग होऊनसुद्धा महोदय योग बनतो.

एका संप्रदायात शिकवली जाणारी जीवन जगण्याची पद्धत आणि प.पू. डॉक्टर शिकवत असलेली ईश्‍वरप्राप्तीसाठीची पद्धत यांतील भेद

        एका संप्रदायात जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाते; परंतु प.पू. डॉक्टरांमुळे तर आम्ही विश्‍वातील अत्युच्च पद्धत शिकत आहोत, ती म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठीची पद्धत. हीच एकमेव अशी शाश्‍वत पद्धत आहे.
१. जीवन जगण्याच्या पद्धतीत पदवी मिळेलच याची निश्‍चिती नसणे; परंतु ईश्‍वरप्राप्तीसाठीच्या पद्धतीत मात्र मोक्षाची पदवी मिळतेच, याची निश्‍चिती असणे : जीवन जगण्याच्या पद्धतीत मायेत अडकण्याचा आणि भरकटत जाण्याचा धोका असतो. यात पदवी मिळेलच, याचा भरवसा नाही; परंतु ईश्‍वरप्राप्तीसाठीची पद्धत अवगत करणार्‍याला मात्र मोक्षाची पदवी मिळणारच, याची १०० टक्के निश्‍चिती असते; कारण येथे ईश्‍वर हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आपल्याला मिळालेला असतो.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक (१५.३.२०१६, सकाळी ७.४५)

महर्षींनी समष्टीसाठी सांगितलेल्या नामजपाचा आम्हाला कळलेला अर्थ आणि जाणवलेला कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
         महर्षींनी आता समष्टीसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजप करण्यास सांगितले आहे. या सर्वांचे कळलेले अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.
१. ॐ निसर्गदेवो भव । 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
        निसर्गच आता आपल्याला येणार्‍या काळात वाचवणार आहे. निसर्गाला देव मानले, तरच आपले रक्षण होणार आहे; कारण विनाशकालात सर्व खेळ पंचमहाभूतांचाच असतो. निसर्ग म्हणजेच पंचमहाभूतांचा अधिपती. त्यालाच शरण गेले, तर जीवनाचे वरदान आपल्याला आपोआपच लाभणार आहे.
२. ॐ वेदम् प्रमाणम् ।
      वेदांनाच प्रमाण मानले, तरच आपल्याभोवतीचे कवच घट्ट होणार आहे. कार्य करण्यातील आत्मविश्‍वास वाढणार आहे. विश्‍वात वेद हेच एकमेव सत्य आहेत आणि सत्यमेव जयति । या वचनानुसार सत्याच्या ठिकाणी जय आहेच.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रकृती आणि पुरुष
१ प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे.
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतियांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण करू न शकणारी आतापर्यंतची शासने हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे सिद्ध करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जर्मनीचे उजवेकरण !

संपादकीय
     जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या खमक्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विरोधकांना शिंगावर घेऊन राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयांची कार्यवाही करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच युरोपमध्ये जर्मनी हा दादा देश म्हणून ओळखला जातो. एवढे सगळे चांगले चालले असतांना मर्केलबाई यांचे वज्रहृदय मुसलमान शरणार्थींना पाहून वितळले आणि त्यांनी १० लाख मुसलमान शरणार्थींना देशात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक युनियन (सीडीयू) पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही विरोध केला; मात्र हटवादी मर्केलबाई बधल्या नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn