Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज रंगपंचमी
रंगपंचमी या उत्सवाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या.
http://www.sanatan.org/mr/a/575.html


भारतमाता की जय ही सिंहाची गर्जना, नपुंसकांची नव्हे ! - आमदार टी. राजासिंह

 पिंपरी येथे शिवजयंतीच्या शोभायात्रेत १० सहस्रांहून अधिक युवकांचा प्रतिसाद
शिवजयंतीच्या शोभायात्रेत उपस्थित धर्माभिमानी युवक
श्री. टी. राजासिंह
 • पिंपरी येथे अवतरली आज शिवशाही, शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापू, यात शंका मुळी नाही !
 • राजासिंह घालत असे, धर्मकार्य करण्यासाठी हिंदूंना साद ।
 • छत्रपतींचा जयजयकार करून धर्मवीर देती त्यांना दाद ॥
 • शिवराय प्रार्थना तुज करतो, धर्मकार्यरूपी शिवधनुष्य पेलण्या, तूच व्हावे आम्हा धर्मविरांचा श्‍वास !
 • संस्कार आम्हा शिवचरित्राचे, पायिक आम्ही स्वराज्याचे!
      पिंपरी - ओवैसी बंधू म्हणतात, आम्ही भारतमाता की जय म्हणणार नाही. जे सैनिक ही सिंहगर्जना करत देशासाठी लढतात, प्रसंगी प्राणांचे बलीदान देतात, त्यांच्यासाठी हा प्रेरणामंत्र आहे. ही हिंदूंची गर्जना आहे. नपुंसकांसाठी याचा काही उपयोग नाही. १५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा, आम्ही हिंदूंना संपवू,, अशी धमकी देणार्‍यांनी लक्षात ठेवावे की, पोलीस संरक्षण तुमच्या आजूबाजूला आहे; म्हणून तुम्ही जिवंत आहात, अशी गर्जना भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी येथे केली. शिवजयंतीनिमित्त अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवाच्या वतीने २६ मार्चला आयोजित केलेल्या शोभायात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या शोभायात्रेत १० सहस्रांहून अधिक युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
१. आयुष्यात प्रत्येकाला एकदा मरायचे आहे, तेव्हा धर्मासाठी कार्य करून धर्माभिमान बाळगून मरा.

शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना व्याख्यानासाठी समाजातून उत्स्फूर्त मागणी !

महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी 
कार्याला अधिकाधिक प्रसिद्धी प्राप्त होत असल्याची प्रचीती !
     फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीयेला (२६.३.२०१६ या दिवशी) छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती. त्या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि गोवा, तसेच देहली येथे एकूण ३६ ठिकाणी समितीच्या वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य अन् हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. समितीच्या कार्याला मिळणारा हा उदंड प्रतिसाद म्हणजे आपल्याला समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याची योग्य दिशा मिळणार, असा विश्‍वास ठिकठिकाणच्या हिंदुत्ववाद्यांमध्ये निर्माण झाल्याचे द्योतक आहे.

उत्तराखंड राज्यात राष्ट्र्रपती राजवट लागू

      नवी देहली - उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरोधात पक्षाच्या ९ आमदारांनी बंड केल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली होती. बहुमत सिद्ध करण्यासाठी रावत यांना राज्यपालांनी २८ मार्चपर्यंत मुदत दिली होती. ती संपण्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्र्रपती राजवट लागू करण्यात आली असली, तरी विधानसभा विसर्जित करण्यात आलेली नाही. विधानसभा पुढील आदेशापर्यंत स्थगित रहाणार आहे.
१. भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्र्रपतींची भेट घेऊन रावत शासन बडतर्फ करण्याची मागणी केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रपतींनी केंद्राच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्र्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
२. तत्पूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हरीश रावत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी भाजपकडून दिली जात असल्याचा आरोप केला होता.

छगन भुजबळ यांच्या विरोधातील कारवाई शरद पवार आणि अजित पवार यांच्या अनुमतीनेच

भाजप आमदार अनिल गोटे यांचे भुजबळ यांना पत्र
      मुंबई - भाजपचे धुळे येथील आमदार तथा तेलगी प्रकरणात कारावास भोगलेले अनिल गोटे यांनी आर्थर रोड कारागृहात कैदेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात गोटे यांनी म्हटले आहे की, भुजबळ यांच्या विरोधात चालू असलेली कारवाई ही भाजप शासनाने केलेली सूडाची कारवाई नसून कायदेशीर कारवाई आहे.
     त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत रा.रा. पाटील यांनी २१ सप्टेंबर २०१२ या दिवशी अनुमती दिली होती. ही अनुमती रा.रा. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते अजित पवार यांची अनुमती अन् सूचना यांशिवाय देणे कसे शक्य आहे, असा प्रश्‍नही गोटे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भातील पत्र २१ मार्च या दिवशी आमदार गोटे यांनी लिहिले आहे.
आय.डी.बी.आय. बँकेच्या ३२ सहस्र कर्मचार्‍यांचा आजपासून देशव्यापी संप

केंद्रशासनाकडून आय.डी.बी.आय. बँकेतील हिस्सा ४९ टक्क्यांवर आणण्याचे प्रकरण
      नवी देहली - केंद्रशासनाने आय.डी.बी.आय. बँकेच्या खाजगीकरणाचा डाव मांडल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ आय.डी.बी.आय. बँकेच्या ३२ सहस्र कर्मचार्‍यांनी २८ मार्चपासून ४ दिवस देशव्यापी संपाची हाक दिली आहे, अशी माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी.एच्. वेंकटचलम् यांनी दिली. (स्वत:च्या स्वार्थासाठी संप करून जनतेला वेठीस धरणारे समाजद्रोहीच होत ! - संपादक)
     २८ मार्चपासून सर्वच बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत, अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे; मात्र केवळ आय.डी.बी.आय. बँकेचेच कर्मचारी संपावर जाणार आहेत, असा खुलासाही वेंकटचलम् यांनी केला.
याविषयी आय.डी.बी.आय. बँक अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने म्हटले आहे की,
१. केंद्रशासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात आय.डी.बी.आय. बँकेतील हिस्सेदारी ४९ टक्क्यांपर्यंत अल्प करण्याची घोषणा केली. यामुळे या बँकेवरील केंद्रशासनाची मालकी संपुष्टात येईल आणि खासगी गुंतवणूकदार बँकेवर ताबा मिळवतील.
२. आय.डी.बी.आय.ने इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समधून अनेक मोठ्या प्रकल्पांना अर्थसाहाय्य केले. काही उद्योगपतींनी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. कर्जाची ती रक्कम बुडवल्याने बँकेचे बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले.

लाहोरमधील आत्मघाती आक्रमण ख्रिस्त्यांना लक्ष्य करण्यासाठी !

आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते अन्य धर्मियांना लक्ष्य करतात !
      लाहोर - २७ मार्च या दिवशी पाकच्या लाहोर शहरातील गुलशन-ए-इकबाल पार्कमध्ये झालेल्या आत्मघातकी आक्रमणात ७२ जण ठार, तर ३०० हून अधिक लोक घायाळ झाले. ठार झालेल्यांमध्ये १४ ख्रिस्ती आहेत. या आक्रमणाचे दायित्व पाकिस्तान तालिबान संघटनेपासून वेगळे झालेल्या जमात उल् एहरार या संघटनेने घेतले आहे. या संघटनेचा प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने म्हटले की, आमचे लक्ष्य ख्रिस्ती होते. आम्ही पंतप्रधान नवाज शरीफ यांना संदेश देऊ इच्छित होतो की, आम्ही लाहोरपर्यंत घुसलो आहोत. या प्रकरणी ५० तालिबान्यांना अटक करण्यात आली आहे. या आक्रमणानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाज शरीफ यांच्याशी दूरभाषवरून संपर्क करून आक्रमणाविषयी दुःख व्यक्त केले.


श्रीमंतांनी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायला लावू ! - पंतप्रधान

     गौहत्ती (आसाम) - श्रीमंतांनी बँकांकडून कर्जरूपाने घेतलेले पैसे त्यांना फेडायला लावू, बँकांची थकबाकी ठेवू देणार नाही, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आसाममधील रंगापाडा येथे एका प्रचारसभेत ते बोलत होते. विदेशात पळून गेलेले किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या नावावर असलेल्या कर्जाच्या अनुषंगाने मोदी यांनी हे विधान केल्याचे म्हटले जात आहे.
मोदी पुढे म्हणाले की,
१. गरिबांच्या हितासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण केले असल्याचे आधीच्या शासनाकडून सांगितले जात होते; मात्र बँकांचा गरिबांना अपेक्षित लाभ झालेला नाही. माझे शासन बँकांमुळे होणारे लाभ गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे.
२. दलालांचे जाळे नष्ट करणे आणि वर्ष २०२२ पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळवून देणे, ही शासनाची उद्दिष्टे आहेत.
३. ईशान्य भारतातील रेल्वेच्या विकासासाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी तरतूद केली आहे.

होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

     होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याची किंवा धावण्याची प्रथा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत आहे. या वर्षी कर्नाटकमधील तुमकूर गावात होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत असतांना तीन जणांचा भाजल्याने मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर या प्रथेवर बंदी आणण्यासाठी कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तरतूद करणार असल्याची घोषणा तेथील एका मंत्र्यांनी केली आहे. याविषयीचा सनातन दृष्टीकोन पुढे दिला आहे. १. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेचा धर्मशास्त्रात कुठेही उल्लेख नाही. असे असले, तरी हिंदु धर्म हा स्वतःची उपासनापद्धत निर्माण करण्याचे आणि त्याद्वारे ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. यानुसार तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेल्यांनी तेजतत्त्वाची उपासना म्हणून प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत गेल्यास त्यांना त्याचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर पहुडण्याविषयी कुठेही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. असे असले, तरी तंजावूर (तमिळनाडू) येथील अग्नीयोगी प.पू. रामभाऊस्वामी तेजतत्त्वाची उपासना म्हणून यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर १०-१५ मिनिटे पहूडतात.

मशिदीतून झालेली बांग ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेपाच मिनिटे भाषण थांबवले !

बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार
     खडगपूर (बंगाल) - २७ मार्च या दिवशी सायंकाळी येथील निवडणूक प्रचार सभेत बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे भाषण मशिदीमधून बांग चालू होताच मध्येच थांबवले. बांग संपेपर्यंत म्हणजेच सुमारे साडेपाच मिनिटे मोदी स्तब्ध उभे राहिले. बांग संपल्यावर मोदी म्हणाले की, बांग चालू असल्यामुळे आपण काही क्षणाची विश्रांती घेतली. आपल्यामुळे कुणाची पूजा, प्रार्थना बाधित होता कामा नये.
बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याच्या उद्योगाची भरभराट !
     गेल्या काही महिन्यांत तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून बॉम्ब बनवतांना काही कार्यकर्ते ठारही झाले. यावरून तृणमूल काँग्रेसवर टीका करतांना मोदी म्हणाले की, राज्यात उद्योगधंदे बंद झाले आहेत; मात्र अशात एका उद्योगाची भरभराट होत आहे आणि तो उद्योग आहे बॉम्ब बनवण्याचा.

नांगनूर येथे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात श्रीराम सेना आणि ग्रामस्थ यांचा निषेध मोर्चा !

       नांगनूर (जिल्हा बेळगाव) - एम्.आय.एम् या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे देशद्रोही वक्तव्य करून भारतमातेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ येथील श्रीराम सेना आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ओवैसी यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. भाजप, काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते, तसेच नमो ब्रिगेड, तिरंगा ग्रुप, जय हनुमान तरुण मंडळ, बसवक्रांती ग्रुप, आंभिरा तरुण मंडळ, दत्त तरुण मंडळ, संघर्ष तरुण मंडळ, विश्‍वजीत तरुण मंडळ, अष्टविनायक ग्रुप आदी संघटनांचे कार्यकर्ते या निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते. या वेळी सर्वश्री विठ्ठल कोगाळे, अजित पोवार, राहुल पाटील, महावीर कांबळे, अमोल गुरव, विजय पोवार, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी विवेक गुरव यांनी आभार मानले.

इस्लामिक स्टेटच्या हिटलिस्टवर गोवा आणि विदेशी पर्यटक ! - गुप्तचर विभाग

आतंकवाद दाराशी पोहचल्याचे द्योतक भारताला इसिसचा धोका नाही, असे 
म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह याविषयी का बोलत नाहीत ?
     नवी देहली - इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) हिटलिस्टवर गोवा हे अग्रस्थानी आहे आणि विशेष करून गोव्यात येणारे विदेशी पर्यटक हे त्यांचे लक्ष्य असल्याची माहिती उघड झाली आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिका, युरोप आणि रशिया येथील पर्यटक गोव्यात सर्वाधिक संख्येने येतात. वर्ष २०१४ च्या डिसेंबरमध्ये इसिसने गोव्यात बाँबस्फोट घडवण्याची योजना आखली होती; मात्र सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ही योजना अयशस्वी झाली. इसिसचा मुंब्रा, ठाणे येथील रहिवासी मुद्दाब्बीर मुस्ताक (इसिसचा अमीर-ए-हिंद म्हणून ओळखला जाणारा) याने चौकशीच्या वेळी अन्वेषण यंत्रणेला ही माहिती दिली आहे. 

शासनाच्या विरोधातील वृत्तांचे तातडीने खंडन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

      मुंबई - विविध शासकीय योजना, धोरणे, निर्णय, प्रशासनाची कार्यपद्धती, कर्मचारी अधिकारी आदींवर वृत्तपत्रांतून सतत टीका होत असते. या टीकेकडे अनेकदा शासनाकडून दुर्लक्ष केले जाते अथवा टीकेचे यथावकाश खंडन केले जाते; मात्र आता यापुढे शासनाच्या विरोधात प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही वृत्ताचा त्याच दिवशी तातडीने खुलासा केला जाणार आहे. शासनाने तसा आदेश सर्व कार्यालयांना दिला आहे. तसेच स्वतः मुख्यमंत्रीच या प्रक्रियेत लक्ष घालणार आहेत.
     राज्याचे मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रिय यांनी २२ मार्च या दिवशी काढलेल्या शासकीय परिपत्रकात सर्व विभागांचे सचिव आणि सर्व विभागीय कार्यालये यांना प्रसारमाध्यमांतून होणार्‍या टीकेला तातडीने उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. शासनाविरोधी वृत्त प्रसिद्ध होताच त्याचे खंडन करणारा वस्तुनिष्ठ खुलासा त्याच दिवशी दुपारपर्यंत प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात जायला हवा, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
     बातमी जर मुख्यमंत्र्यांशी अथवा त्यांच्या खात्याशी संबंधित असेल, तर खुलाशाचा मसुदा मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाकडे तात्काळ सादर करावा लागणार आहे. या संदर्भात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांकडे समन्वय आणि संनियंत्रण करण्याचे दायित्व देण्यात आले आहे. महासंचालकांनी त्यांचा अहवाल प्रती आठवड्याला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांद्वारे मुख्यमंत्र्यांकडे अवलोकनासाठी पाठवावा, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

भारतमातेच्या जयघोषास नकार देणार्‍या ओवैसीला पाकिस्तानात पाठवा ! - रामदास कदम, पर्यावरणमंत्री

शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले 
शिवसैनिकच अशी कणखर आणि ठाम भूमिका मांडू शकतात !
      लातूर - भारतमातेचा जयघोष करण्यास नकार देणार्‍या ओवैसीची जागा या देशात नसून त्याला पाकिस्तानात पाठवा, असे खणखणीत प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. येथील उदगीर शहरात शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होेते. घटनेमध्ये भारतमातेचा जयजयकार करू नये, असे लिहिलेले नाही, तर मग मशिदीवर भोंगे लावून दिवसातून ५-५ वेळा बोंबलत बसा, हेही कुठे लिहिलेले नाही, असेही त्यांनी या वेळी ठणकावले.

देशद्रोहाच्या समर्थकांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने निषेध

आंदोलन करतांना कार्यकर्ते
     पुणे - भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार देणारे असदुद्दीन ओवैसी, भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणारा कन्हैय्या कुमार, तसेच त्याचे समर्थन करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. नुकतीच सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ ही निदर्शने करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी देशद्रोह्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रसंगी महासंघाचे सर्वश्री अविनाश कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, आनंद मुंडवीकर, अनिरुद्ध पेटकर, हर्षल पाठक, प्रसाद जोशी, आनंद दवे, दुर्वांकुर कापरे, वंदना देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. महासंघाचे अध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी यांना कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. (देशद्रोह्यांना न रोखणारे पोलीस राष्ट्रघातकी लोकांचा निषेध करणार्‍यांना मात्र नोटीस देतात ! ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटेल ! - संपादक)
२. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता.

मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

      मुंबई - सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले. या वेळी युवा सेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे, महापौर सौ. स्नेहल आंबेकर, माजी मुख्यमंत्री सर्वश्री मनोहर जोशी, मंत्री दिवाकर रावते, आमदार अनिल परब आदी नेते उपस्थित होते. या वेळी शेकडो शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करत विमानतळ परिसर दणाणून सोडला.
     गेल्या काही मासांपूर्वीच शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा तेथे उभारण्यात आला आहे; मात्र अनावरण कार्यक्रम करण्यात जीव्हीके प्रशासनाची चालढकल चालू होती. पुतळ्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकून तो झाकून ठेवला होता. याविषयी शिवसेनेने आवाज उठवला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर मासात काही शिवसैनिकांनी त्याचे अनधिकृतरीत्या अनावरण केले होते; मात्र प्रशासनाने तांत्रिक अडचणी सांगितल्यानंतर पुतळा बंदिस्त ठेवला गेला होता.
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने विमानतळावर शिवशाहीचा देखावा उभारण्यात आला होता.

शिवजयंती तिथीप्रमाणे साजरा होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू ! - शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील

       जुन्नर (जिल्हा पुणे), २७ मार्च - तिथीप्रमाणे साजर्‍या होणार्‍या जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवभक्तांकडून पुष्कळ प्रतिसाद मिळत असतो. तो पाहून शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे साजरा व्हावा, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिले.
      छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत मावळे, निवृत्त ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिहादी आतंकवादाला बळी पडलेल्या युवतीचा होता मुसलमानविरोधी विचारांना विरोध !

ब्रुसेल्स येथील जिहादी आक्रमणाचे प्रकरण
     ब्रुसेल्स (बेल्जियम) - २२ मार्च या दिवशी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये झालेल्या जिहादी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या ३१ लोकांपैकी एक युवती मुसलमानांच्या विरोधात वाढत असलेल्या भावनेच्या विरोधात होती. मूळची नेदरलॅण्ड येथील असलेल्या आणि सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये रहाणार्‍या सेशा पिंजोस्की नावाच्या या २६ वर्षीय युवतीने ४ मासांपूर्वी तिच्या फेसबूक खात्यावरून जलदगतीने वाढत असलेल्या जिहादी आतंकवादाच्या संदर्भात चिंता व्यक्त केली होती.

संशयित आतंकवाद्यांविषयी मुसलमान माहिती देत नाहीत ! - डोनल्ड ट्रम्प यांचा आरोप

याचा प्रत्यय भारतातही येत आहे ! 
     लंडन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून प्रयत्नशील असलेले डोनल्ड ट्रम्प यांनी ब्रुसेल्सवरील आक्रमणानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की, मी येथील आणि अमेरिकेतीलही मुसलमानांना सांगू इच्छितो, कधीही काही संशयास्पद आढळले, तर त्याची माहिती द्या; परंतु ते जराही माहिती देत नाहीत. हीच एक मोठी समस्या आहे. ट्रम्प यांचा हा आरोप ब्रिटनच्या आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍याने फेटाळला आहे.

(म्हणे) आंतरराष्ट्रीय समुदायाने मुसलमानविरोधी हिंसाचारावर बोलावे ! - बान की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे

 • पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर बोलावे, असे मून यांना का वाटत नाही ?
 • अशांचा भरणा असलेली संयुक्त राष्ट्रे जगात फोफावणारा आतंकवाद काय निपटणार ?
     संयुक्त राष्ट्र - जगभरात असहिष्णुता आणि द्वेषमूलक हिंसाचारात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने मुसलमानविरोधी हिंसाचार आणि इतर द्वेषमूलक हिंसाचार यांवर उघडपणे बोलले पाहिजे, असे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय वंशभेद निर्मूलन दिनानिमित्त बान की मून यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले की, आर्थिक आव्हाने आणि राजकीय संधिसाधूपणा यातून अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे शरणार्थी, स्थलांतरित अन् मुसलमानविरोधी धोरण आहे. त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत.नवोदित शाहीर ऋषिकेश राहिंज यांना स्व. शाहीर जयराम नारगोलकर पुरस्कार प्रदान !

      पुणे - शाहिरी कलेचा वारसा पुढे चालवणारे नवोदित शाहीर ऋषिकेश राहिंज (वय १८ वर्षे) यांना यंदाचा स्व. जयराम नारगोलकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ मार्च या दिवशी भवानी पेठेतील श्री भवानीमाता मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ज्येष्ठ शाहीर श्री. श्रीराम दाते, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे श्री. दादा पासलकर, कै. जयराम नारगोलकर यांचे सुपुत्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. विद्याधर नारगोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित नवोदित शाहिरींनी वीरश्रीयुक्त पोवाडे सादर केले. या वेळी पुरस्कारार्थी श्री. ऋषिकेश राहिंज या वेळी म्हणाले, हा पुरस्कार गुरूंमुळेच मिळाला आहे. शेवटपर्यंत या कलेचा वारसा जोपासू. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीसमोर कै. जयराम नारगोलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर रचलेला पोवाडा गायल्याची आठवण सांगितली.

संभाजीनगर येथील धर्मजागृती सभेत साहाय्य करणारे धर्माभिमानी !

     २५ मार्च या दिवशी संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर धर्मजागृती सभा पार पडली. या सभेमध्ये अनेक हिंदुत्ववादी आणि धर्माभिमानी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामध्ये विजय मंडप डेकोरेटर्सचे श्री. विजय शिंदे आणि जोशी मंगल केंद्राचे श्री. उमेश जोशी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या सहकार्याविषयी समिती त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.


(म्हणे) महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरत असल्याने स्वतंत्र विदर्भाविना पर्याय नाही !

श्रीहरि अणे यांची पुन्हा तीच मुक्ताफळे !
       नागपूर, २७ मार्च (वार्ता.) - गेल्या ६० वर्षांत विदर्भ महाराष्ट्रात एकदिलाने कधीच नांदला नाही. महाराष्ट्राने विदर्भावर कायमच अन्याय केला. हा अन्याय भविष्यातही नको असेल, तर स्वतंत्र विदर्भाविना पर्याय नाही. विदर्भाच्या वाट्याचे पैसे पश्‍चिम महाराष्ट्राने चोरले आहेत. विदर्भ वेगळा झाला, तर ते पैसे त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. त्यांच्या भल्यासाठी विदर्भ वेगळा होऊन काय खाणार, असा प्रश्‍न करतात; मात्र मी म्हणतो, आम्ही काय खाऊ, याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचा विचार करा, अशी मुक्ताफळे राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांनी २६ मार्च या दिवशी पुन्हा उधळली. नागपूर येथे ते बोलत होते.

त्र्यंबकेश्‍वर येथील ग्रामस्थांवर कारवाई न केल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार ! - तृप्ती देसाई

स्वतः कायदाद्रोही असलेल्या तृप्ती देसाई 
यांची ही विधाने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच !
       पुणे, २७ मार्च - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. असे असतांना २५ मार्च या दिवशी येथील स्थानिक महिला आणि ग्रामस्थ यांनी माझ्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या अन् गोंधळ घातला. पोलिसांनी गावकर्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना उलट आम्हालाच कह्यात घेऊन मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले. त्र्यंबकेश्‍वर येथे स्थानिक महिला आणि पुरुष यांनी आम्हाला पुन्हा त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रवेश केल्यास आम्ही पाहून घेऊ, मारहाण करू, अशा धमक्या दिल्या. अशा ग्रामस्थांवर कारवाई न केल्यास भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू, असे विधान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले आहे. (धादांत खोटी विधाने करणार्‍या आणि ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ! - संपादक)
       शेती महामंडळ कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ मार्च या दिवशी महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याविषयीची माहिती देण्यासाठी २६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

ध्वजारोहणाने सिंहस्थपर्वाला प्रारंभ !

     उज्जैन - सिंहस्थपर्वामध्ये डमरू, शंखध्वनी, सनई यांचा ध्वनी आणि जय महाकाल, हर-हर महादेव यांच्या जयघोषात श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे श्रीपंचायती आव्हान आणि श्री पंचायती अग्नि आखाडा या तीन आखाड्यांंचे ध्वजारोहण नुकतेच पार पडले. श्रीपंच दशनाम जूना आखाड्यामध्ये ५२ फूट उंचीचा धर्मध्वज फडकवण्यात आला होता. या वेळी महंत, साधु-संत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. धर्मशास्त्रानुसार धर्मध्वजपूजन आणि धर्मध्वजारोहण झाल्यानंतर सिंहस्थपर्वाला विधीवत प्रारंभ झाला. या वेळी विशिष्ट मुहूर्तावर देवतांना आवाहन करण्यात येते. त्यांच्या आगमणानंतर येथील अनिष्ट प्रभाव दूर होतो.अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून शहर काजीला सिंहस्थपर्वाचे निमंत्रण

मुसलमान कधी त्यांच्या उत्सवांचे निमंत्रण हिंदु संतांना देतात का ?
     उज्जैन - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, उपाध्यक्ष महंत हरि गिरी महाराज आणि त्यांचे सहकारी संत यांनी शहर काजी खलीकुर्रेहमान यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना येथील सिंहस्थपर्वाचे निमंत्रण दिले. या वेळी काजी यांनी मुसलमान समाजाकडून सिंहस्थामध्ये संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.गन्नौर (हरियाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रेरणादायी मार्गदर्शन !

भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त कार्यक्रम
     हरियाणा - अखिल भारतीय हिंदू युवा मोर्चा संघटनेच्या वतीने भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त गन्नौर (हरियाणा) येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात क्रांतीकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिंदुवीर सचिन त्यागी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. 
    उपस्थितांना संबोधित करतांना समितीचे श्री. विनय पानवळकर म्हणाले की, 
१. भारताच्या सद्यःस्थितीकडे पाहून ज्या स्वराज्यासाठी अनेक क्रांतीकारक हसतमुखाने फाशी गेले, ते बलीदान व्यर्थ ठरत आहे का ? अशी शंका येते.

हिंदु-हिंदी-हिंदुस्थान या त्रिसूत्रांद्वारे कृतीशील होण्याचा संकल्प केल्यासच देश सुजलाम् सुफलाम् होईल ! - पांडुरंग भिसे

      ठाणे - आजची परिस्थिती पहाता धर्माभिमान्यांनी राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी वेळ काढायला हवा. क्रांतिवीर महाराणा प्रताप, श्रीशिवराय, गुरु गोविंदसिंह यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भारतमातेला स्वातंत्र्य करण्यासाठी ऐन तारुण्यात हसत हसत फासावर चढले, त्यांचेे बलिदान व्यर्थ जाऊ नये; म्हणून हिंदु-हिंदी-हिंदुस्थान या त्रिसूत्रांद्वारे आपण एकजुटीसाठी कृतीशील होण्याचा संकल्प करायला हवा. तसे झाल्यासच देश सुजलाम् सुफलाम् होईल, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते श्री. पांडुरंग भिसे यांनी जागर राष्ट्रधर्माचा या विषयावर व्याख्यान देतांना केले. हिंदु महासभा ठाणे महानगर शाखेच्या वतीने २३ मार्च या दिवशी असलेल्या राजगुरु, भगतसिंह, सुखदेव यांच्या बलीदान दिननिमित्त सायकंाळी ७.३० वाजता येथील सामाजिक सभागृहात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
     या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सर्वश्री राकेश हिंदुस्थानी, स्वप्नील जागुष्टे, हिंदु महासभा ठाणे महानगर युवा प्रभारी श्री. मनोज सुर्वे, हिंदु महासभा ठाणे महानगरचे सदस्य अधिवक्ता जयेश तिखे, अमोल देसाई, नागेश माने, मोतीलाल कुमावत, प्रवीण दावणे, रामचंद्र मसुरकर, शिवसेना ठाणेचे युवा कार्यकर्ते सर्वश्री विशाल सोरटे, संजय दळवी, संदीप गायकवाड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल देव आणि अन्य ४० ते ४५ राष्ट्रभक्त तरुण उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

इसिसच्या जिहादी आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी भारत सज्ज आहे का ?
     इसिसच्या हिटलिस्टवर गोवा हे अग्रस्थानी असून गोव्यात येणारे विदेशी पर्यटक हे त्यांचे लक्ष्य असल्याची विशेष माहिती इसिसचा आतंकवादी मुद्दाब्बीर मुस्ताक याने चौकशीच्या वेळी अन्वेषण यंत्रणेला दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : ISIS ke Hitlistpar Goa sabse upar hai evam videshi paryatakonko lakshya kiya ja sakta hai.
Kya ISIS se ladhne ke liye hum saksham hain ?

जागो ! : इसिस के हिटलिस्ट पर गोवा सबसे ऊपर है एवं विदेशी पर्यटकों को लक्ष्य किया जा सकता है.
क्या इसिस से लढने के लिए हम सक्षम हैं ?
स्वत: मॉडेल असल्याचे खोटे सांगून धर्मांधाने केला बौद्ध युवतीशी विवाह !

 • लव्ह जिहादविषयी अनभिज्ञ असल्याचे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या घटनेची माहिती घेतील का ? 
 • धर्मांध केवळ हिंदू युवतींनाच लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवत नसून अन्य धर्मियांनाही फसवतात, हे उघड करणारी घटना ! 
  विवाहानंतर युवतीचे बलपूर्वक धर्मांतर !
 • मिस्ड कॉलमुळे धर्मांधाच्या जाळ्यात फसली !
       कोलकाता - बंगालमधील एका युवतीला स्वत: मॉडेल असल्याचे खोटे सांगून एका धर्मांधाने फसवून विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे. शादाब असे या धर्मांधाचे नाव असून विवाहानंतर युवतीचे बलपूर्वक धर्मांतरण करण्यात आले.
१. ही युवती बौद्ध धर्मातील असून उच्चशिक्षित आहे. भ्रमणभाषवरील मिस्ड कॉलमुळे ती या धर्मांधाच्या संपर्कात आली. त्या वेळी स्वत: मॉडेल असल्याचे सांगून धर्मांधाने तिला गोव्यातील पणजी येथे बोलावले.
२. पणजी येथे धर्मांध या युवतीला त्याच्या सदनिकेत घेऊन गेला आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन देऊन तिच्याशी बलपूर्वक शारीरिक संबंध ठेवले.
३. त्यानंतर ती युवती गर्भवती राहिल्यामुळे तिला धर्मांधाशी लग्न करावे लागले आणि तिचे धर्मांतर करण्यात येऊन नावही पालटण्यात आले. युवतीने विरोध करताच तिला मारहाण करण्यात आली.

छगन भुजबळ यांनी १०० कोटी रुपयांतून राजमहाल साकारला ! - भाजपचे खासदार श्री. किरीट सोमय्या

पुढील लक्ष्य अजित पवार आणि सुनील तटकरे
       नाशिक, २७ मार्च (वार्ता.) - राष्ट्रीय महामार्ग आणि पथकर नाक्यांचा ठेका देण्याच्या मोबदल्यात नाशिकमधील अशोका बिल्डकॉन या आस्थापनाकडून मिळालेल्या पैशांतून छगन भुजबळ यांचा १०० कोटी रुपयांचा राजमहाल साकारण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार श्री. किरीट सोमय्या यांनी २५ मार्च या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर या आस्थापनाचे संचालक अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांनी दक्षिण आफ्रिकेत फिफाचे सामने बघण्यासाठी भुजबळ कुटुंबियांची व्यवस्था केल्याचा आरोपही केला. या सर्व प्रकरणांची आणि कटारिया यांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सक्तवसुली संचालनालय (ईडी), आयकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

मुसलमान युवकाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने केला अत्महत्येचा प्रयत्न !

वासनांध मुसलमानांमुळे मुली असुरक्षित !
     देहली - शेजारी रहाणार्‍या मुसलमान मुलाकडून होणार्‍या छेडछाडीला कंटाळून एका मुलीने विष प्राशन केले. पीडित मुलगी विश्‍वकर्मा कॉलनी येथे तिच्या कुटुंबियांसह रहाते. गेल्या चार मासांपासून घराशेजारी रहाणारा शहबाज नामक युवक तिची छेड काढत होता. यामुळे तिने शाळेत जाणेही बंद केले. काही दिवसांपूर्वी परीक्षेसाठी शाळेत जातांना शहबाजने तिला रस्त्यामध्ये अडवले आणि विवाह करण्याची धमकी दिली. यानंतर घाबरून तिने विष प्राशन केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा जीव वाचवण्यात आला.एन्आयएकडून पोलीस अधीक्षक सलविंदर सिंह यांची पुन्हा चौकशी

पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण 
     नवी देहली - २ जानेवारी २०१६च्या मध्यरात्री हवाईदलाच्या तळावर (एअरबेसवर) आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात ७ सैनिक हुतात्मा झाले होते. या आक्रमणाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) पुन्हा एकदा गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंह आणि स्वयंपाकी मदन गोपाल यांची चौकशी केली. पठाणकोटच्या घटनेपासून पोलीस अधीक्षक सिंह संशयाच्या फेर्‍यात आहेत. याबरोबरच पाकिस्तानचे संयुक्त अन्वेषण पथक पाच दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहे. हे पथकही या प्रकरणाची चौकशी करणार आहे; परंतु त्यांना सिंह आणि स्वयंपाकी गोपाल यांची चौकशी करण्याची अनुमती देण्यात येणार नाही, असे समजते.

सहावीत शिकणार्‍या मुलाने केला चौथीतील मुलीवर बलात्कार !

    फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) - येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या मुलाने इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनीवर बलात्कार केला. (दूरचित्रवाणीवरून अनैतिकतेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आणि चित्रपट दाखवण्याचे फलित ! - संपादक) ही मुलगी चारा गोळा करण्यासाठी गेली असता या मुलाने तिच्यावर आक्रमण करत बलात्कार केला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाला पकडण्यात आले.

पारंपरिक उपचारपद्धतींच्या प्रसारासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी करार ! - श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष राज्यमंत्री

गोव्यातील आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन
डावीकडून प्रतापसिंह राणे, दीपप्रज्वलन करतांना 
मुख्यमंत्री पार्सेकर, श्री. श्रीपाद नाईक, श्री. अनंत शेट, 
श्री. राजेंद्र आर्लेकरल, श्रीमती एलिना साल्हाणा 
 फ्रान्सिस डिसोझा
     पणजी, २७ मार्च (वार्ता.) - आयुर्वेद ही भारताची जगाला देणगी आहे. त्यामुळेच आयुर्वेदासह युनानी, सिद्ध, होमिओपथी या पारंपरिक उपचारपद्धतींच्या जागतिक प्रसारासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी करार करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्करोगावरील उपचारांसाठी भारत-अमेरिका यांच्यात संयुक्त संशोधनासाठीही एक परस्पर सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. गोव्यातील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजीनगर येथील होळीत देशविरोधी कारवाया करणार्‍यांचे प्रतिकात्मक दहन !

       मिरज, २७ मार्च (वार्ता.) - प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजीनगर येथे होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भारत देशाच्या विरोधात घोषणा देऊन देशाचा अपमान करणारा देशद्रोही कन्हैया कुमार आणि भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रतिकात्मक छायाचित्रांचे होळीच्या अग्नीत दहन करण्यात आले. या वेळी सर्वश्री मनोज नाईकवाडे, अजिंक्य हंबर, विपुल कांबळे, वैभव दरवंदर, राहुल साळुंखे, करण देसाई, अर्जुन नाईकवाडे, संदीप पाटील यांसह शिवाजीनगर येथील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

(म्हणे) पुण्यात कन्हैया कुमारची सभा घेणार ! - डॉ. कुमार सप्तर्षी

पुरोगामी आणि गांधीवादी म्हणवणार्‍यांचे खरे स्वरूप !
       पुणे, २७ मार्च - कन्हैया कुमारला पुण्यात बोलावून गांधी भवन येथे त्याची सभा घेण्याचा मानस असल्याचे गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले आहे. (अशा प्रकारे देशद्रोह्यांना उघडपणे समर्थन देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी ! - संपादक) ते पुढे म्हणाले की, पुण्यातील अनेक नागरिक आणि विद्यार्थी त्याचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. आम्हीही त्याला गांधीजी समजावून सांगणार आहोत. कन्हैया हा मला धाकट्या भावासारखा आहे. त्याला देशद्रोहाची पाटी लावून नष्ट केले जाईल, अशी भीती वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपकडून काँग्रेसच्या विरोधात मुंबईत आंदोलन

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
       मुंबई - काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याचा आरोप करत भाजपने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ आंदोलन केले. काँग्रेसच्या नेत्यांनी देशभक्तांचा अपमान केल्यामुळे या वेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजपचे श्री. आशिष शेलार या वेळी म्हणाले, सावरकरांच्या देशभक्तीविषयी प्रश्‍न निर्माण करणार्‍या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी. तसे न झाल्यास अशाच प्रकारचे प्रतिकात्मक आंदोलन मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांसमोर करण्यात येईल.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ४ बैलांची कसायांच्या तावडीतून सुटका

असे गोरक्षक सर्वत्र हवेत !
       रायगड - येथील तळोजा गावातील हिंदवी स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मुंबईकर आणि हिंदु जनजागरण सेवा समितीचे अध्यक्ष श्री. मोतीराम गोंधळी, तसेच अन्य धर्माभिमानी तरुण यांनी ४ बैलांची कसायांच्या तावडीतून सुटका केली.
       एक व्यक्ती ४ बैलांची कसायांना विक्री करणार असल्याची माहिती मिळताच सर्वांनी पाळत ठेवून विक्री करणारा हिंदु आणि विकत घेणारे दोन धर्मांध यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. याप्रकरणी संंबंधितांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये सर्वश्री मुरलीधर पाटील, संभाजी जावीर हेही सहभागी होते. श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी आसुडगाव येथील गोशाळेत गोवंशियांना स्वतःच्या गाडीने नेऊन सोडले. (या गोप्रेमींचे अभिनंदन ! - संपादक)

व्हाइट हाऊसच्या सर्वाधिक मोठ्या कार्यक्रमात योगाला स्थान !

        योगाला सांप्रदायिक म्हणून हिणवणारे आणि त्याला भारतात महत्त्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मोदी शासनावर देशाचे भगवेकरण करत असल्याचा आरोप करणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि प्रसारमाध्यमे आता गप्प का ?
        वॉशिंग्टन (अमेरिका) -
ओबामा प्रशासनाच्या व्हाइट हाउसमध्ये यंदाच्या ईस्टर कार्यक्रमात योगाला स्थान देण्यात आले आहे. या समारोहात २८ मार्चला व्हॉइट हाऊसच्या पटांगणात (लॉनमध्ये) सहस्रो अमेरिकी नागरिक सहभागी होणार आहेत. या विशालकाय पटांगणाचे १० भाग (झोन) करण्यात आले असून एका भागाला योग गार्डन असे नाव देण्यात आले आहे. ३५ सहस्र लोक बसू शकतील एवढी या गार्डनची क्षमता आहे. कार्यक्रमाच्या वेळी योग प्रशिक्षक सहभागी जनतेला योगासंदर्भात माहिती देणार आहेत. व्हाइट हाऊसमध्ये प्रतिवर्षी होणार्‍या कार्यक्रमांत हा कार्यक्रम सर्वाधिक मोठा आणि सार्वजनिक कार्यक्रम असतो. ईस्टरनिमित्त साजर्‍या करण्यात येणार्‍या या कार्यक्रमाची १३८ वर्षांपासूनची परंपरा आहे.

हिदूंना कट्टर होण्यास भाग पाडणारे पुरोगामी !

श्री. भाऊ तोरसेकर
       सोमवारी (२१ मार्चला) दिव्य मराठी दैनिकात डिवचलेले उधाण या शीर्षकाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातून पुरोगामी अतिरेक आणि मूर्खपणा यांचा लाभ, संघ अन् भाजप यांना कसा मिळतो, त्याचा ऊहापोह छान केलेला आहे. खरे तर त्यात नवे असे काही नाही. २२ मासांपूर्वी पुरोगाम्यांना भ्रमातून खेचून बाहेर आणणारा प्रचंड विजय संपादन केलेल्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी राजधानी देहलीत चालू होता. त्याच दिवशी दक्षिणेतील ख्यातनाम इंग्रजी दैनिक द हिंदूमध्ये एक अप्रतिम विश्‍लेषणात्मक लेख प्रसिद्ध झाला होता. शिव विश्‍वनाथन् या प्राध्यापक विचारवंताचा तो लेख होता. त्याचे शीर्षकच बोलके होते. आपला मूर्खपणा मान्य करण्यासाठीच त्यांनी तो लेख लिहिला होता.

विजयी तोफा पाकला जशास-तसे उत्तर देऊन गुडघे टेकण्यास लावल्यानंतर डागाव्यात !

श्री. संदीप जगताप
१. शत्रूला नामशेष करून तोफा डागा !
     भारत-पाक क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा विजय झाल्यानंतर एका वृत्तपत्रामध्ये ईडनवर डागल्या विजयी तोफा ! अशा स्वरूपाचे शीर्षक असणारी बातमी आली होती. ती वाचून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगडावर पोचल्यानंतर डागल्या गेल्या होत्या, त्या विजयी तोफांची आठवण झाली. अशा वेळी आठवण होते, नरवीर बाजीप्रभु देशपांडेंच्या कल्पनातीत शौर्याची ! आठवण होते, छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढून आतंकवाद संपवण्याचा आदर्श निर्मिल्याची आणि जाणीव होते ती, इतिहासाच्या पुनरावृत्तीच्या आवश्यकतेची ! आज इतिहासाच्या पुनरावृत्तीची आवश्यकता आहे, आम्हास विजयी तोफा डागायच्या आहेत, त्या शत्रूला नामशेष करून डागायच्या आहेत.

शासनाने सहकार क्षेत्रातील अधिकोषांचा स्वाहाकार थांबवावा !

     गेली काही वर्षे पुण्यात आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या रूपी बँकेचे प्रकरण गाजत आहे. या अधिकोषावर सहकार खात्याने प्रशासक नेमला असून आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. त्याचसमवेत अधिकोषाचे संचालक आणि अन्य यांच्याकडून वसुली करावयाचे कर्जही मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच या अधिकोषासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेने अन्य अधिकोषांना रूपी बँक विलिनीकरण करून घेण्यासाठी आवाहनही केले आहे; परंतु काही राष्ट्रीयीकृत अधिकोष त्या प्रक्रियेसाठी पुढे येतात. प्रत्यक्षात त्या अधिकोषांच्या अटी मान्य होत नसल्यामुळे आणि कर्जाचा बोजा पाहून कोणी विलिनीकरणाची प्रक्रिया करण्यास धजावत नाही, अशी स्थिती आहे. रूपी बँकेत सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि काही आस्थापनांचा पैसा अडकून पडला आहे.

शिवजयंती तिथीनुसारच साजरी होण्यासाठी शिवसेना आग्रह धरणार ! - रामदास कदम

राष्ट्रप्रेमापोटी अशी मागणी 
करणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन !
       संभाजीनगर, २७ मार्च - छत्रपती शिवाजी महाराज यांची यापुढे तिथीनुसार एकच जयंती साजरी व्हावी, या दृष्टीने शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने राज्य मंत्रीमंडळासमोर त्याविषयीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, असे आश्‍वासन पालकमंत्री श्री. रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
      ते पुढे म्हणाले की, शिवजयंती तिथीनुसार आणि दिनांकानुसार अशी वर्षातून दोनदा साजरी केली जाते. शासनाच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते; मात्र शिवप्रेमी तिथीनुसार जयंती साजरी करतात. या पार्श्‍वभूमीवर राज्यात युतीचे शासन आल्यानंतर शिवजयंती एकच साजरी व्हावी, या दृष्टीने शिवसेनेने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.

...तर हिंदुद्रोही वृत्तवाहिन्यांची मनोचिकित्सा का करू नये ?

     भारतात फसवे धर्मनिरपेक्षतावादी (Pseudo-Secular) आणि पैशासाठी विकली गेलेली प्रसारमाध्यमे (Presstitutes) हिंदूंना नेहमी झोडपत असल्याचा तथाकथित धर्मनिरपेक्ष आधुनिक भारताचा इतिहास आहे. याचाच एक भाग म्हणजे, मोदी शासन आल्यावर हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढले असल्याची बांग ठोकण्यात येणे ! 
      दादरी हत्याकांड आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचे भांडवल करून प्रसारमाध्यमांनी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांनी भाजपच्या विरोधात आरोळी ठोकली; परंतु त्याच वेळी कर्नाटकातील गोरक्षक प्रशांत पुजारी यांची धर्मांधांकडून करण्यात आलेली निर्घृण हत्या, केरळमधील संघ नेत्यांच्या डाव्यांनी केलेल्या हत्या इत्यादी घटनांकडे मात्र बहुतांश प्रसारमाध्यमांकडून डोळेझाक करण्यात आली. दादरी हत्याकांडाला धार्मिक रंग दिला जातो; परंतु संघ नेत्यांच्या हत्या मात्र केवळ हत्याच असतात, हे येथे लक्षात ठेवावयाचे महत्त्वाचे सूत्र आहे.

श्रीमंतांचे दान, गरिबांची दाणादाण; पण भ्रष्टाचार्‍यांना रोखणार कोण ?

२०१६ चा अर्थसंकल्प !
श्री. कुशल गुरव
१. भ्रष्टाचारी लोक या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचू देतील 
का ? असा चिंताजनक प्रश्‍न जनतेच्या मनात धुमसत असणे
     नुकतेच केंद्र आणि राज्य शासनांचे अर्थसंकल्प सादर झाले. त्यातील जनतेला मिळालेल्या योजना वाचल्या आणि मनात एक विचार आला, श्रीमंतांचे दान, गरिबांची दाणादाण; पण भ्रष्टाचार्‍यांना रोखणार कोण ? श्रीमंतांच्या खिशातून थोडे पैसे काढले आणि ते गरिबांच्या खिशात घातले; पण भ्रष्टाचारी लोक या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचू देतील का ? असा चिंताजनक प्रश्‍न जनतेच्या मनात धुमसत आहे. 
२. शासनाकडून ज्या योजना सामान्य जनतेसाठी येतात 
त्या मधल्यामधेच कुठे गायब होतात, हे समजत नाही 
     केंद्रशासनाने सादर केलेला २०१६ चा अर्थसंकल्प ऐकून बहुतेक सामान्य जनतेपेक्षा भ्रष्टाचारी लोकांना आनंद झाला असेल. आतापर्यंत शासनाकडून ज्या योजना सामान्य जनतेसाठी येतात त्या मधल्यामधेच कुठे गायब होतात, हे समजत नाही. इकडे त्या योजनेच्या प्रतीक्षेत सामान्य नागरिक दिवस काढतो; पण त्याला या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) कुठे कुटुंबाच्या हितासाठी स्वतःला मारहाण होऊनही पुरुषाला उत्तरदायी न ठरवणार्‍या सोशिक भारतीय महिला, तर कुठे खुट्ट झाले की, घटस्फोटाची भाषा करणार्‍या पाश्‍चात्त्य महिला !

     महाराष्ट्रात सरासरी १७ प्रतिशत विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीकडून मारहाण केली जाते. आणखी ४ टक्के स्त्रियांना सासू-सासरे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती, यांच्याकडून मारहाण होते किंवा शारीरिक यातना दिल्या जातात. कौटुंबिक हिंसाचार सहन कराव्या लागणार्‍या राज्यातील विवाहित स्त्रियांपैकी ९० प्रतिशत स्त्रियांवर हात उगारणारा त्यांचा पती असतो, असे राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षणाच्या अहवालावरून दिसून आले आहे. यांपैकी कोणत्याही एका कारणावरून पतीने मारहाण केली, तरी त्यात त्यांचे काहीच चुकले नाही, असे मानणार्‍या महिलांचे प्रमाण ७५ प्रतिशत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.

अशा वेळी खालच्या न्यायालयाचा निर्णय नेमका कुठे चुकला आहे, हे वरच्या न्यायालयाने त्याला सांगायला पाहिजे आणि खालचे न्यायाधीश अक्षम असल्यास त्यांना सेवानिवृत्त केले पाहिजे, तरच जनतेचा न्याययंत्रणेवर विश्‍वास राहील !

     पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेला मिर्झा हिमायत इनायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रहित करून जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार, तर ५८ जण गंभीर घायाळ झाले होते. साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी केलेल्या साधना, धर्म आणि राष्ट्र विषयक कविता 
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
१. साधना
श्री. विनय तळेकर
१ आ. श्री. विनय तळेकर 
१ आ १. मागणे अमुचे एकची देवा सदा द्या श्रीगुरुचरणी सेवा ।

वहीला येणार्‍या सुगंधाच्या संदर्भात अनुभूती लिहून द्यायला सांगितली, तेव्हा मला काही सुचेना. मी गंध घ्यायचा प्रयत्न केला; पण मला तो कळलाच नाही. त्याच दिवशी संध्याकाळच्या उपायांच्या सत्रानंतर अचानकपणे मला पुढील काव्यपंक्ती सुचल्या.
   न कळे आम्हा तो सूक्ष्म-गंध । 
   न कळे आम्हा ते सूक्ष्म-जगत ।
   आम्हा आहे एकच ठाऊक । जोवर प्राण असे या देहा ।
करू श्रीगुरुचरणांची सेवा ॥ १ ॥

गुरुराया मला क्षमा करा । नाही येत आम्हा लिखाण कराया ।
आम्ही सिद्ध केवळ तुमच्या । आज्ञेचे पालन करण्या ॥ २ ॥

आहे गुरुरायांसी एकची प्रार्थना । ठाव सदा द्यावा चरणी तुमच्या ।
नाही काही अपेक्षा नाही काही गरजा । 
सदा द्या आम्हा श्रीगुरुचरणी सेवा । 
अन् करवून घ्या आमच्याकडून अष्टांगसाधना ॥ ३ ॥
(१६.८.२०११, सायं. ७.१५)
श्री. विनायक पाटील
१ इ. श्री. विनायक पाटील 
१ इ १. प्रथमच केलेला काव्यरचनेचा प्रयत्न !
     यापूर्वी मी कधीच कविता केली नाही. प्रार्थना केल्यावर आपण काहीही करू शकतो, हे दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचले होते. त्यानुसार सहज कविता करण्याचा विचार आल्याने कृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केल्यावर त्यानेच एकेक शब्द आणि वाक्य सुचवले अन् पुढील कविता करवून घेतल्याने श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे. 
     कुठे कुठे शोधू तुला कृष्णा ?
     किती आस लावतोस तू । किती प्रीती देतोस तू ।
कुठे आहेस रे तू कृष्णा ? ॥ १ ॥

ध्यानी तू मनी तू । तरी नेत्र शोधे चित्रात तुला ।
किती आळवू तुला रे कृष्णा ॥ २ ॥

मज भाव नसे, मज दृष्टी नसे । मज मन नसे, मज बुद्धी नसे ।
मी सदा मीतच फसे । कधी जवळ घेणार रे कृष्णा ? ॥ ३ ॥

मजसी न बोले परी मनी असे तू । 
व्याकुळ झाली दृष्टीही का न दिसे तू ।
दावी या दृष्टीस रूप तुझे कृष्णा ॥ ४ ॥

आस लागली या नेत्रा पहाण्या तुला । 
मन व्याकुळ झाले दर्शन तुझे घेण्या ।
तू आहेस मजपाशी मग का न दर्शन देसी ।
आता नको अंत पाहूस रे कृष्णा ॥ ५ ॥

आता कळले या जिवा तू का न येई ।
अहं, दोष, बुद्धी उफाळून जोवरी येई ।
प्रार्थना करितो माऊलीला ।
नष्ट कर दोष, अहं अन् बुद्धीला ।
अन् घेऊनी जा कृष्णापाशी मजला ।
घेऊनी जा कृष्णापाशी मजला ॥ ६ ॥
- श्री. विनायक पाटील (१३.१०.२०१२, रात्री १२.३०) 
२. धर्म 
श्री. प्रशांत जुवेकर
२ अ. श्री. प्रशांत जुवेकर
निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी एका धर्माभिमान्याने केलेले आवाहन !
२ अ १. हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधर्मियांंच्या उन्मत्त सत्तेला तडाखा देऊया...... 
     युवकांनो, सोडून देऊन मरगळ चला होऊया सिद्ध । 
     परकीय सुखासीन, विलासी मानसिकतेचे फेकून देऊया जोखड । 
     सज्ज होऊया, पुन्हा एकदा । आवळूूया आपल्या मुठी । 
     आणूया पुन्हा एकदा । हर हर महादेवची गर्जना ओठी ॥ 
     आपल्या धमन्यांमध्ये वाहणारे रक्त कुणाचे । 
देव, देश अन् धर्म यांसाठी सर्वस्व बलीदान केलेल्या पूजनियांचे ।

आमचा इतिहास नसे केवळ २००-३०० वर्षांचा । 
श्रीराम-श्रीकृष्णादी ईश्‍वरी अवतार हा भाग असे इतिहासाचा ॥ २ ॥ 

जेव्हा जेव्हा अधर्मी माजतात अन् अधर्म बोकाळतो । 
कुणाचे काही चालत नाही असा त्यांना भ्रम होतो । 
अधर्मियांंच्या भ्रमाचा भोपळा आमचा इतिहास फोडतो ॥ ३ ॥ 

वानरसेना, पांडवसेना अन् मावळे । अशांनाच हे भाग्य लाभले । 
महान होते ते जीव ज्यांनी । 
धर्म आणि राष्ट्र यांसाठी सर्वस्व वाहिले ॥ ४ ॥ 

पुन्हा एकदा ही संधी लाभली आमच्या पिढीला । 
आता पाठीमागे फिरून पहायचे कशाला । 
श्रीराम, श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद आहे आपल्याला ।
जगदंबा पुन्हा उभी भवानी तलवार द्यायला ॥ ५ ॥ 

पहा पहा ती जगदंबा । तिच्या नेत्रात अंगार दिसत आहे । 
पहा पहा तो नृसिंह । पुन्हा खांबातून प्रगट होण्यास इच्छुक आहे ॥ ६ ॥ 

पहा, पहा आले आपले मारुतिराया । 
तेही सिद्ध या अधर्मी काँग्रेसची लंका जाळाया ।
सर्व सेनानी, पांडव, ऋषी, देव-देवता, हिमालय, गंगा अन् सह्याद्री ।
सर्व सर्व सिद्ध पुन्हा एकदा महाभारत पहाया ॥ ७ ॥ 
- श्री. प्रशांत जुवेकर (२५.६.२०११)
     (मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने तुरुंगात असतांना केलेले लिखाण - संकलक)
      कारागृहात ४ वर्षे राहिलेल्या सनातनच्या निष्पाप ६ साधकांनी साधनेसाठी कसे प्रयत्न केले, हे लक्षात घेतले, तर घरी राहूनही साधना होत नाही, असे म्हणणे किती चुकीचे आहे, हे सर्वांच्या लक्षात येईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांची लेखमाला या लेखमालेनंतर प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर पानसरे हत्या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर श्री. समीर गायकवाड यांची लेखमाला आरंभ करण्यात येईल. - संपादक

साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांना महत्त्वाची सूचना

       हिंदु धर्मजागृती सभांचा प्रसार करतांना, तसेच सभेत उपस्थित जिज्ञासू धर्मप्रेमींना सभेनंतरच्या आढावाबैठकीतून आणि सभा पार पडल्यावर घरी परततांना जिज्ञासूंना सनातन प्रभातचे जुने काही अंक वाचण्यासाठी द्या !
१. सभेला उपस्थित धर्मप्रेमींनी 
कार्याविषयी दिशादर्शन होण्यासाठी विचारणा करणे
        हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु संघटनासाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. ठिकठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करणे, हा त्यातीलच एक प्रभावी उपक्रम ! ईश्‍वरी कृपेने या सभांना धर्मप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. सभेला उपस्थित असणारे अनेक जण धर्मप्रेमी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नियमितपणे करण्याची इच्छा व्यक्त करतात, तसेच या कार्याविषयी दिशादर्शन होण्यासाठी विचारणा करतात.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

गुणों के रंग में रंग देना हे श्रीजयंत ।

कु. सर्वमंगला मेदी
गुणों के रंग में रंग देना हे श्रीजयंत ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगते हैं
आपके स्मरण में सनातन के सब संत ॥
गुणों के रंग में रंग देना हे श्रीरंग ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगी थीं
प्रेमरंग में सब गोपियां ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगी थी विरहरंग में राधा ॥ १ ॥
गुणों के रंग में रंग देना हे श्रीकृष्ण ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगी थी वात्सल्यरंग में मां यशोदा ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगी थी समर्पणरंग में संत मीरा ॥ २ ॥
गुणों के रंग में रंग देना हे श्रीराम ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगे थे भक्तिरंग श्री मारुति (सिंदूर लगाये थे) ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगी थी राह के रंग में शबरी ॥ ३ ॥
गुणों के रंग में रंग देना हे श्रीनिवास ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगे थे ब्राह्मतेजरंग में श्री समर्थ ।
रंग जाऊं मैं ऐसे जैसे रंगे थे क्षात्रतेजरंग में शिवाजी ॥ ४ ॥
गुणों के रंग में रंग देना हे श्रीजयंत ।
- कु. सर्वमंगला मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०१६)

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद 
आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
        देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात. 

आज रंगपंचमी त्यानिमित्ताने...

रामनाथी आश्रमातील साधिका 
कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

सेवेच्या तीव्र तळमळीमुळे भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणारे श्री. शशिकांत घाणेकरगुरुजी !

       रत्नागिरी येथील साधकांना घाणेकरगुरुजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. कु. स्नेहा जोशी
१ अ. सेवेची तळमळ : साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा करण्यासाठी गुरुजींना साहाय्याला बोलावले होते. तेव्हा ते शाळेतून घरी न जाता सेवा करण्यासाठी यायचे आणि सेेवा पूर्ण करूनच घरी जायचे.
१ आ. साप्ताहिक सनातन प्रभात पोस्टात देण्याची सेवा करण्याविषयी विचारल्यावर त्वरित स्वीकारणे : प्रत्येक आठवड्याला साप्ताहिक सनातन प्रभात पोस्टात देण्याची सेवा अन्य एक साधक करत होते. त्यांना सकाळी चाकरीसाठी जावे लागत असल्यामुळे ही सेवा करणे शक्य होत नसे. त्या वेळी या सेवेविषयी घाणेकरगुरुजींना विचारल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले. ते शाळेत जाण्यापूर्वी अंक पोस्टात देऊन मग शाळेत जातात.
        गुरुजींनी घरातील तसेच वाडीतील लोकांनाही सेवेत सहभागी करून घेतले आहे. ते व्यष्टी आढावा देतांना अजून काय करू, असे विचारतात.

संतपित्याने वाढदिनी त्यांच्या कन्येशी केलेला भावपूर्ण काव्यमय संवाद !

       पू. पात्रीकरकाकांचा २५.३.२०१६ या दिवशी वाढदिवस झाला. त्या दिवशी त्यांची ज्येष्ठ कन्या कु. तेजल हिने तिच्या लहानपणापासून आतापर्यंत पू. काकांनी तिन्ही मुलांना (कु. तेजल, श्री. निखिल आणि सौ. अनघा जोशी (पूर्वाश्रमीची कु. मीनल)) यांना कशा प्रकारे सांभाळले, याबद्दल भ्रमणभाषवरून व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता वाचून पू. काकांनी भ्रमणभाषवर तिला काव्यमय संदेश पाठवला.
कु. तेजल हिने पू. काकांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता 
कु. तेजल पात्रीकर
कृतज्ञ आम्ही, ऐसे संतपिता दिधले ।
द्यावा आशीर्वाद आपुल्या वाढदिनी ॥

जन्मदाते पिता आपण, सांभाळले आम्हासी ।
सुसंस्कार देऊनी आमच्या बालवयी झालासी पिता ॥
युवावयी तुम्ही झालासी सखा ।
सद्य:स्थितीत लाभूनी गुरुस्वरूपा ॥ १ ॥
आत्मदर्शनाचा मार्ग तो आम्हा दाखवी ।
प.पू. गुरुमाऊली सांगतसे ॥
त्याप्रमाणे आचरूनीया मार्ग ।
जावे साधनेत आम्ही लवकर पुढे ॥ २ ॥

देवाने एका साधकाला संतांचा संकल्प कसे कार्य करतो ?, याची पू. अशोक पात्रीकर यांच्यांद्वारे दिलेली प्रचीती !

१. पू. पात्रीकरकाकांनी अहं-निर्मूलनाचे प्रयत्न वाढवण्यासाठी 
पू. बाबा नाईक यांच्यासमोर जाणीव करून देणे आणि 
त्या दिवशी देवाला अहं-निर्मूलनासाठी सतत प्रार्थना होणे
     
पू. अशोक पात्रीकर
८.३.२०१६ या दिवशी मी भोजनकक्षात प्रसाद आणि कशाय घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी समोर असतांना पू. पात्रीकरकाका (पू. काका) आणि पू. बाबा नाईक यांचे पुढील संभाषण झाले.
पू. काका : गिरिधरमध्ये पुष्कळ अहं आहे.
पू. बाबा : हो ! तो प्रयत्न करतोय ना ?
पू. काका : प्रयत्न अतिशयच अल्प आहेत.
पू. बाबा : लहानपण देगा देवा ! नेहमी लहानपण घ्यायला हवे.
पू. काका : पण तो लहानपण घेण्यासच तयार नाही. त्याने ते प्रयत्न पुष्कळच वाढवायला हवेत.
        त्या प्रसंगी संतांच्या बोलण्याद्वारे माझ्यातील प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूला चांगलाच मार बसला. तसेच त्यांच्या संकल्पामुळे अहं-निर्मूलनाचे प्रयत्न वाढवण्यासाठी माझ्या मनाला टोचणी बसू लागली. त्या दिवशी त्या क्षणापासून माझ्याकडून देवाला सतत प्रार्थना होत होती, देवा, पू. काकांनी म्हटल्याप्रमाणे माझ्यात पुष्कळच अहं आहे; पण तो माझ्या लक्षात येत नाही. माझ्या प्रगतीची तुला आणि संतांनाच माझ्यापेक्षा अधिक तळमळ आहे. देवा, तूच माझ्याकडून अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करवून घे आणि मला पू. काकांचे मन जिंकता येऊ दे.

सर्व साधकांची मातृवत् काळजी घेणार्‍या, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे घडण्यासाठी क्षणोक्षणी स्वतः कृतीतून शिकवणार्‍या आणि प्रीतीचा सागर असलेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

       मला नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या सेवेला जाण्याची संधी मिळाली. सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने अध्यात्म आाणि धर्म प्रसार होण्यासाठी शहरातील भिंतीवर रंगाने आध्यात्मिक माहिती लिहिण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी पू. स्वाती खाडये यांच्यातील अनेक गुणांचा अनुभव घेतला. त्या संदर्भात लिहावे तेवढे थोडेच आहे; कारण शब्दही थिटे पडतील; पण हा अल्पसा प्रयत्न करत आहे.
१. परिपूर्ण नियोजन 
पू. (कु.) स्वाती खाडये
१ अ. साधकांच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करून सेवांचे नियोजन करणे : पू. स्वातीताईंनी सिंहस्थपर्वात आलेल्या प्रत्येक साधकाची शारीरिक स्थिती पाहून त्याला सोयीचे पडेल आणि कोणताही त्रास होणार नाही, अशा सेवा दिल्या. त्यामुळे सर्व साधक आनंदाने आणि उत्साहाने सेवा करतांना दिसायचे.
१ आ. सभागृहाची उत्कृष्ट रचना केल्याने रामनाथी आश्रमात गेल्यासारखे वाटून प.पू. गुरुदेवांचे सतत अस्तित्व जाणवणे : तेथे वारकरी संप्रदायाने त्यांचे एक सभागृह वापरण्यास दिले होते. त्या सभागृहात पू. ताईंनी काही साधिकांची निवासव्यवस्था केली. तेथे कनात लावून वेगवेगळ्या खोल्या बनवल्या. स्वयंपाकघर, भोजनकक्ष, स्वागतकक्ष, ध्यानमंदिर, निवासस्थान आदी भाग करून व्यवस्थित रचना केली. चुका लिहिण्यासाठी फलकही होते. त्यामुळे सर्व साधक महाप्रसाद घेण्यासाठी आल्यावर त्यांना सहजगत्या नामजप करणे, चुका लिहिणे, सूचना वाचणे इत्यादी सुविधा मिळायच्या. त्या सभागृहात गेल्यावर रामनाथी आश्रमात गेल्यासारखे वाटायचे आणि हे सर्व पाहून भावजागृती व्हायची. प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवायचे.

धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा प्रभावीपणे होण्यासाठी सनातनचे ग्रंथ, तसेच नियतकालिक सनातन प्रभात यांचे अभ्यासपूर्वक वाचन करा !

साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग आयोजित केले जात आहेत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोहचता यावे, यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. जे साधक, कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करतात, त्यांनी पुढील ग्रंथांचा अभ्यास केल्यास त्यांना वर्ग प्रभावीपणे घेता येईल.
अ. अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन
आ. अध्यात्म
इ. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते
ई. कौटुंबिक, धार्मिक आणि सामाजिक कृतींमागील शास्त्र - भाग ३
उ. धर्मशिक्षण फलक
ऊ. हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा
     राष्ट्र आणि धर्म यांवर प्रतिदिन होणार्‍या आघातांविषयीची माहिती, हिंदूसंघटनासाठी आवश्यक प्रयत्न, तसेच धर्महानी रोखण्यासाठी योग्य आणि प्रभावी उपाय यांविषयी धर्मशिक्षण वर्गात दिशादर्शन करण्यात येते.

पायाचा अस्थिभंग झाल्यावर आता देवाने मला ग्रंथलिखाण करण्यासाठी वेळ दिला, असे सांगणारे वैद्य प्रसाद आचार्य !

वैद्य प्रसाद आचार्य
      श्री. प्रसाद आचार्य हे आयुर्वेदिक वैद्य आहेत. ते त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत ग्रंथलिखाणाची सेवा करतात. अनेक दिवस त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना ग्रंथलिखाणासाठी वेळ देता येत नव्हता. २२.१.२०१६ या दिवशी ते साधकांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात येणार होते. येण्याआधी काही दिवस अपघात होऊन त्यांच्या पायाचा अस्थिभंग झाला. त्यांना पायही टेकवता येत नव्हता. त्या वेळी ते म्हणाले, आता देवाने मला ग्रंथलिखाण करण्यासाठी वेळ दिला आहे. अशा परिस्थितीतही वैद्य प्रसाद यांना सेवेचीच आठवण येते, हे बघून मला त्यांचे कौतुक वाटले.
         प.पू. गुरुदेवांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, या स्थितीत असा विचार करणे सोपे नसते. छान प्रगती आहे !
- श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०१६)

श्री. शशिकांत घाणेकर यांना हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

१. दुचाकीने प्रवास करत असतांना दिव्यांचा प्रकाश अंधूक झाल्यावर अन्य वाहनांच्या माध्यमातून गुरु प्रकाश दाखवत आहेत, या विचाराने भावजागृती होणे : एकदा मी करबुडे ते हातखंबा असा दुचाकीने प्रवास करत होतो. तेव्हा माझ्या दुचाकीच्या दिव्यांचा प्रकाश अत्यंत अंधूक झाला होता. मी प्रार्थना आणि जयघोष करून प्रवास चालू केला. तेव्हा मागाहून येणार्‍या गाडीच्या दिव्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून गुरूच प्रकाश दाखवत आहेत, या विचाराने माझी भावजागृती झाली. गुरु सतत माझ्यासमवेत असून ते प्रत्येक वेळी माझी काळजी घेत आहेत, असे जाणवले.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी हस्तपत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना !
     सनातन संस्थेच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ए-५ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्याचा ग्रंथप्रदर्शने, देवस्थाने, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर नंदिहळ्ळी, बेळगाव येथील साधकाला आलेल्या अनुभूती

१. लागवड विभागात 
सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. पावसाळ्याचे दिवस असूनही सेवेच्या वेळेत पाऊस न येणे : आम्ही नंदिहळ्ळी, बेळगाव येथील पाच साधक सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या लागवड विभागात २ दिवस सेवा करण्यासाठी आलो होतो. पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही रेनकोटही आणले होते. सेवेला आरंभ करण्यापूर्वी पाऊस पडत होता. आम्ही श्री. दादा कुंभार यांच्यासमवेत प्रार्थना करून सेवेला आरंभ केला आणि लगेच पाऊस पडायचा थांबला. पुढे २ दिवस आमच्या सेवेेच्या वेळेत पाऊस आला नाही. त्यामुळे आम्हाला रेनकोट घालावाच लागला नाही. वरुणदेव, श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भावजागृती झाली.

प्रामाणिकपणे भावाच्या स्तरावर प्रयत्न करणारे रत्नागिरी येथील श्री. शशिकांत घाणेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. शशिकांत घाणेकरगुरुजींचा सत्कार
करतांना श्री. प्रभाकर सुपल (डावीकडे)
        रत्नागिरी, २७ मार्च (वार्ता.) - येथील सनातनचे साधक श्री. शशिकांत घाणेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. दीपाली मतकर यांनी सर्व साधकांना दिली. या वेळी सर्वांची भावजागृती झाली. येथील दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात २५ मार्च या दिवशी झालेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात संगणकीय प्रणालीद्वारे बोलतांना कु. दीपाली मतकर यांनी ही आनंदवार्ता सांगितली. या वेळी सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर सुपल यांनी श्री. शशिकांत घाणेकरगुरुजींचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

आश्रमातील अंथरुण, पांघरुण आदी, तसेच लेखा विभागांतर्गत कापडी फलक आवश्यक तेवढा वेळ उन्हात ठेवण्याचे नियोजन १५.४.२०१६ या दिवसापर्यंत करावे !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     सध्या उन्हाळा चालू असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमसाठ्यातील अंथरुण-पांघरुण, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य उन्हात ठेवावे. यासमवेतच आश्रमातील लाकडी फर्निचरही आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे. लेखासेवकांनी जिल्हासाठ्यातील कापडी फलक, कनाती आदी साहित्यही उन्हात ठेवावे. असे केल्यास दमट हवामानामुळे ओलसर झालेले साहित्य पुढील वर्षभर चांगल्या स्थितीत राहू शकते. कापडाचा रंग जाऊ नये, यासाठी साहित्य जास्त वेळ कडक उन्हात न ठेवता आवश्यक तेवढा वेळच ठेवावे.


प.पू. डॉक्टर आणि सनातनचे संत यांच्या आरोग्याची महर्षि घेत असलेली काळजी !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना आदेश देऊन चेन्नईतील एका वयस्कर वैद्याकडून प.पू. डॉक्टर आणि सनातनचे संत यांच्यासाठी औषधे घेऊन येण्यास सांगणे : महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना आदेश देऊन चेन्नई येथील एका वयस्कर वैद्यांकडे जाण्यास सांगितले आणि त्यांच्याकडून प.पू. डॉक्टर, तसेच सनातनचे संत यांच्यासाठी औषधे आणण्याची आज्ञा दिली. या वैद्यांनी प.पू. डॉक्टरांना डोक्याला लावण्यासाठी एक तेल आणि पोटात घेण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे पाठवली. तसेच सनातनच्या संतांसाठी, म्हणजेच पू. डॉ. पिंगळेकाका, पू. स्वातीताई आणि पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासाठीही औषधे दिली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत 
नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : मी रस्त्यावर प्रेम करतो म्हणजे साधनेवर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडे दुर्लक्ष करतो. कारण आमची माघार नाही म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. म्हणून मी हरलो यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जिहादी आतंकवादी हिंदूंच्या रक्ताने प्रतिदिन रंगपंचमी खेळत असतांना हिंदू मात्र धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात एकमेकांवर आणि वाटसरूंवर रंग उडवण्यात दंग असतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अधर्माचा पूर आणि पाण्याची टंचाई !

संपादकीय 
     सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे न भूतो न भविष्यति संकट ओढावले आहे. अनेक शहरांमध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून लातूरसारख्या शहरांमध्ये तर १५ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक धरणांमधील जलसाठाही आटला असून केवळ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची भयावह स्थिती ओढवली आहे. ओस पडलेल्या विहिरी, आटलेले भूजल साठे, पावसाची हुलकावणी यांमुळे सर्वसामान्यांचे जिणे अक्षरश: अवघड झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली आणि पावसाने यंदाही ओढ दिली, तर पाण्यासाठी तिसरे महायुद्ध भडकेल, हे भाकित नाकारण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn