Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हाफीज सईदला बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा होता ! - हेडली

हिंदूंच्या मुळावर उठलेला जिहादी आतंकवाद ! अशा जिहाद्यांना धडा शिकवण्यासाठी शासन पावले उचलील का ?
मुंबई - ;लष्कर-ए-तोयबा;चा संस्थापक आणि ;जमात-उद-दावा; या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. त्यासाठीच मी दादरमधील शिवसेना भवनाची आणि मातोश्री बंगल्याची रेकी (अवलोकन), तसेच त्याचे चित्रीकरण केले होते; कारण बाळासाहेबांना धडा शिकवण्याचा मी हाफीज सईदला शब्द दिला होता, असा गौप्यस्फोट डेव्हिड हेडली याने २६ मार्च या दिवशी उलटतपासणीच्या वेळी केला. अमेरिकेतील कारागृहात असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गेल्या चार दिवसांपासून उलटतपासणी चालू आहे. २५ मार्चला हेडलीने बाळासाहेब ठाकरे यांना अमेरिकेत नेऊन त्यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचल्याची माहिती दिली होती.

गोवा येथे पंचम 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर 'आयकर कायदा, १९६१' नुसार '८०जी(५)' नुसार आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.

धर्मदानासाठी विवरण
बँकेचे नाव : IDBI Bank शाखेचे नाव : नवीन पनवेल
बचत खाते क्रमांक : 023104000180320 आयएफ्एस्सी क्रमांक : IBKL0000023
विशेष सूचना : धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती accsamiti@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना ०८४५१००६०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

बिलावल भुत्तो म्हणतात, "पाकमध्ये यापुढे एकाही हिंदूला बलपूर्वक मुसलमान बनवू देणार नाही !"

पाकमधील हिंदूंची आतापर्यंतची दु:स्थिती पहाता भुत्तो यांच्या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ?
फाळणीच्या नंतर पाकमधील हिंदूंची अनुमाने १५ टक्के इतकी असलेली लोकसंख्या जेमतेम २ टक्के राहिल्यावर आता जागे होणार्‍या बिलावल भुत्तो यांचे हे मगरीचे अश्रूच होत ! हा केवळ भारताची सहानुभूती मिळवण्याचा पाकचा डाव आहे !
इस्लामाबाद - पाकमध्ये यापुढे एकाही हिंदूला बलपूर्वक मुसलमान बनवू देणार नाही, असे विधान पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी होळीच्या वेळी पाकमधील हिंदूंना शुभेच्छा देतांना केले. ते पुढे म्हणाले, "सिंधमध्ये हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍यांच्या विरोधात माझा पक्ष विधेयक पारित करणार आहे. या विधेयकाचा उद्देश पाकिस्तानमध्ये हिंदु समाजाला सशक्त करणे हा आहे. भारतासारख्या हिंदूंच्या देशात सर्वोच्च पदावर जर एका मुसलमानाची नियुक्ती होऊ शकते, तर पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती राज्याचा प्रमुख का होऊ शकत नाही ? पाकमध्ये होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी घोषित करणारे आमचे पहिले शासन आहे."

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या वेळी काश्मीरमधील देशद्रोही नागरिक ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाठिंबा देणार !

असे केवळ भारतातच घडते ! अन्य देशात या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत देशाबाहेर काढले गेले असते !
टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा
मोहाली (पंजाब) - काश्मीरमधील देशद्रोही नागरिकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला पाठिंबा दिला होता; मात्र आता पाकिस्तान या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेल्यामुळे २७ मार्च या दिवशी होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याच्या वेळी या देशद्रोही नागरिकांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

आसाममधील घुसखोरी रोखणार ! - भाजपचे घोषणापत्रात आश्‍वासन

गौहत्ती - आसाममधील निवडणुकीच्या प्रचारात बांगलादेशी घुसखोरी हेच भाजपचे मुख्य सूत्र असल्याचे स्पष्ट करत ती रोखण्याचे आश्‍वासन भाजपने त्याच्या घोेषणापत्रात दिले आहे. ४ एप्रिलला आसाम राज्यात विधानसभेच्या होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले. (केंद्राची सत्ता हाती आल्यानंतर भाजपने घुसखोरीच्या समस्येवर ठोस उपाययोजना काढली असती, तर आसाममधील जनतेने येत्या निवडणुकीत त्यांना न मागताही भरभरून मते दिली असती ! - संपादक) आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई हे बांगलादेशी घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपने भारत-बांगलादेश सीमा सुरक्षित करण्याचे आश्‍वासन मतदारांना दिले आहे. याशिवाय घुसखोरांच्या आश्रयदात्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासनही या घोषणापत्रात देण्यात आले आहे.

'भारतमाता की जय' म्हणायला विरोध करणार्‍यांना देशभक्त म्हणायचे का ? - आमदार श्री. टी. राजासिंह

८ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.
आमदार श्री. टी. राजासिंह
                            'औरंगाबाद' नव्हे, 'संभाजीनगर' म्हणत संभाजीनगरवासियांचा हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार

संभाजीनगर, २६ मार्च (वार्ता.) - भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी बलीदान दिले. त्यातील अनेक हुतात्मे आणि सैनिक यांनी 'भारतमाता की जय' ही घोषणा दिली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनीही ही घोषणा दिली होती. त्यांनीही भारतदेशाला 'माता' मानले होते. असे असतांना या घोषणेला विरोध करणारे खरंच देशभक्त आहेत का, याचा विचार करायला हवा. त्यामुळे आज खरा देशभक्त कोण, हे ठरवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ मार्च या दिवशी कडा ऑफिस पटांगण, डॉ. हेडगेवार रुग्णालयाजवळ, गारखेडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. संभाजीनगर जिल्ह्यात समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही २९ वी सभा होती. या प्रसंगी सनातनचे पू. नंदकुमार जाधव, पू. (कु.) स्वाती खाडयेे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र्र संघटक श्री. सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेला ८ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.

कल्याण येथे पोलिसांच्या सूचनेनंतर रामबाग शिवसेना शाखेच्या चित्ररथात केले पालट !

मूळ चित्ररथ 
पालटलेला चित्ररथ 
पहिल्या छायाचित्रात मूळ चित्ररथ आणि दुसर्‍या छायाचित्रात 
पोलिसांनी आक्षेप घेतल्यावर (वर्तुळात) पालट केलेला चित्ररथ
         कल्याण येथील रामबाग शिवसेना शाखेच्या वादग्रस्त विधान करणार्‍या ओवैसींच्या संदर्भातील प्रबोधन चित्ररथाद्वारे करण्यात आले होते. यात ओवैसींचा कटआऊट दाखवण्यात आला होता. त्याच्या शेजारी अफजल खानाची हिरवी पैदास ओवैसी म्हणतो भारतमाता की जय म्हणार नाही, असे लिहिण्यात आले होते. यावर पोलिसांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे अफजल खानाची हिरवी पैदास याऐवजी तेथे देशद्रोही असा पालट करण्यात आला. चित्ररथावर एक तलवार घेतलेला तरुण दाखवण्यात आला होता. त्यावरही पोलिसांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी त्याच्या हातातील तलवार काढायला लावली. तसेच अखंड हिंदुस्थानचा संपूर्ण नकाशा भगवा दाखवण्यात आला होता. यावर अखंड भारताचा नकाशा (पाकिस्तानसहित) भगवा का दाखवला ?, असा आक्षेप घेण्यात आला, असे चित्ररथाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले.

भगतसिंह जिवंत असते, तर त्यांनी संसदेत बॉम्ब फेकले असते ! - देहलीतील आपचे मंत्री कपिल मिश्रा यांचे विधान

नवी देहली - आज देशाची स्थिती पहाता क्रांतीकारकांना पुन्हा संघर्ष करावा लागला असता. जर आज भगतसिंह जिवंत असते, तर त्यांनी संसदेतील रिकाम्या बाकड्यांवर दोन-चार बॉम्ब फेकले असते. तसेच गांधी यांनाही सत्याग्रहाची चळवळ चालू ठेवावी लागली असती, असे विधान आम आदमी पक्षाचे देहली शासनातील मंत्री कपिल मिश्रा यांनी केले.
पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी 'भारतमाता की जय' म्हटले नाही, तरीही भाजप त्यांच्या पक्षासमवेत जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करणार का ? असा प्रश्‍नही मिश्रा यांनी उपस्थित केला.

ठाणे जिल्ह्यात शिवप्रेमींकडून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा !

ठाणे, २६ मार्च (वार्ता.) - राज्यात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असतांनाच ठाणे जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डायघर (मुंब्रा), कल्याण, डोंबिवली या शहरांत ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही महापूजा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
        ठाणे शहरात तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे असलेल्या अश्‍वारूढ छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी खासदार श्री. राजन विचारे, ठाण्याचे महापौर श्री. संजय मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ठाण्यातील मासुंदा तलाव, टेंभी नाका, भवानी चौक, जांभळी नाका येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता गडकरी रंगायतन येथे झाली. ढोल-ताशांचा गजरात काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीत ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि शिवप्रेमी ठाणेकर नागरिक सहभागी झाले होते. तसेच शहरात विविध ठिकाणी मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाचा इतिहासाच्या पुस्तकातून भारताचे नाव वगळण्याचा घाट

     अमेरिकेतील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून भारताचे इंडिया हे नाव वगळून साऊथ एशिया (दक्षिण आशिया) असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील काही प्राध्यापकांच्या मते वर्ष १९४७ च्या आधी इंडिया अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. तसेच या पाठ्यपुस्तकातून हिंदु धर्माचे हिन्दुइझम हे नाव काढून केवळ भारतातील महिला आणि मागासवर्गीय यांना मिळणार्‍या वागणुकींचा ऐकीव उल्लेख केला आहे. याविरोधात ग्लोबल हिंदू हेरीटेज फाऊंडेशनच्या वतीने डॉ. वामसी जुलुरी यांनी स्वाक्षर्‍यांची चळवळ प्रारंभ केली असून भारताच्या विदेश व्यवहार विभागाने याविषयी शासन स्तरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्रशासनाने भारत-पाक चर्चा चालू ठेवावी ! - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आपण पाकशी चर्चा करत रहायची आणि त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून 
भारताचे सैनिक ठार मारायचे, असे किती दिवस चालू ठेवणार ?
     शेजारच्या देशाशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, हे फुटीरतावाद्यांना नको आहे; मात्र आम्हाला शेजारी देशांसह चांगले संबंध हवे आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने कोणत्याही चिथावणीकडे लक्ष न देता भारत-पाक चर्चा चालूच ठेवायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू-काश्मीरमधील प्रांत संघचालक ब्रिगेडियर सुचेत सिंह यांनी व्यक्त केले आहे. २३ मार्च या दिवशी होणार्‍या पाकिस्तान दिनासाठी पाकिस्तानने फुटीरतावादी नेत्यांना पाकच्या देहलीस्थित उच्चायुक्तालयात आमंत्रित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर संघाकडून उपरोक्त मत नोंदवण्यात आले आहे.

(म्हणे) कन्हैया कुमार हा आजच्या काळातील भगतसिंह !

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना क्रांतीकारक शब्दाचा अर्थ तरी ज्ञात आहे का ?
     कन्हैया कुमार हा आजच्या काळातला भगतसिंह आहे, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी २० मार्चच्या रात्री जेएन्यूतील (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील) विद्यार्थ्यांसमोर बोलतांना केले. त्यांच्या या विधानाशी असहमत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ते म्हणाले, भारत म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थान नाही. (भारत म्हणजे, नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल गांधी, असे थरूर यांना म्हणायचे आहे का ? - संपादक) आम्हाला कृष्णासमवेतच कन्हैया कुमारचा भारत हवा आहे. जेथे सर्व लोकांना समान अधिकार असतील; मात्र सध्या केवळ भारतमाता की जय या एका घोषणेवरून राष्ट्रभक्ती ठरवली जात आहे. कुणी कुणावर श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. ते ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. भारतमाता की जय म्हणण्यात मला आनंदच आहे; पण प्रत्येकानेच ते म्हणावे अशी बळजोरी का ?

धर्मांधाने १२ वीत शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीशी लग्न करून तिचे केले धर्मांतर !

हिंदूंनो, लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात शासन काही कृती करेल, अशी अपेक्षा न ठेवता 
ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आता तुम्हीच संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
     जबलपूर (मध्यप्रदेश) - येथील खान कोचिंग क्लासेसचा संचालक डॉ. एम्.एफ्. खान याने एका १२ वीच्या हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी निकाह (लग्न) करून तिचे धर्मांतर केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंंदु धर्मसेनेने लव्ह जिहादचा आरोप करत खान कोचिंग क्लासेसच्या (शिकवणीवर्गाच्या) बाहेर तीव्र निदर्शने केली, तसेच हे शिकवणीवर्ग बंद करण्याची पोलिसांकडे मागणी केली. याप्रकरणी प्रशासकीय अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारून आरोपीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले असून पोलिसांकडून अन्वेषण करण्यात येत आहे. 

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
साधकांनी केलेल्या साधना, धर्म आणि राष्ट्र विषयक कविता
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

डायघर (ठाणे) येथे शिवजयंती निमित्ताने भव्य फेरी

शिवजयंतीच्या वाहनफेरीत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले युवक
        डायघर (जिल्हा ठाणे), २६ मार्च (वार्ता.) - आज आपल्याला अनेक विंचू डसत आहेत. हिंदूंनी त्या संदर्भात नेहमी सतर्क आणि कृतीशील असायला हवे आणि संघटित होऊन सनदशीर मार्गाने कार्यरत रहायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते; पण त्यांनी जे कार्य केले ते केले नसते, तर आज देवळात देव रहिले नसते. आज आपण सर्वांनी महाराजांचे मावळे बनून आपापले सर्व मतभेद बाजूला ठेवून केवळ हिंदु म्हणून संघटित होऊन कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन डायघर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री. मोतीराम गोंधळी यांनी केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या निमिताने फेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

हिंदु युवतीने विवाहापूर्वी स्वीकारला इस्लाम धर्म !

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून लक्षात येते ! 
हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मेरठ येथे लव्ह जिहाद !
     मेरठ - येथील चौहान या गावामध्ये रहाणार्‍या हिंदु युवतीनेे प्रियकरासह पळून जाऊन विवाह करण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारल्याची घटना घडली. गेल्या दोन वर्षांत तिसर्‍यांदा अशी घटना घडली. ही युवती १६ लाख रुपये आणि दागिने घेऊन १४ फेब्रुवारीपासून म्हणजे व्हॅलेंटाईन डेपासून बेपत्ता होती. युवतीच्या कुटुंबियांनी गावातील ३ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यातील दोघांना अटक केली; परंतु मुख्य आरोपी वसीमला अटक करता आलेली नाही. २२ मार्च या दिवशी युवती आणि वसीम न्यायालयासमोर उपस्थित राहिले. दोघांनी युवतीच्या कुटुंबियांकडून धोका असल्याचे कारण सांगत संरक्षण पुरवण्याची मागणी केली. या प्रकरणी भाजपच्या युवा शाखेचे प्रमुख विनीत शारदा म्हणाले, लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमान युवक त्याची ओळख लपवून तरुण मुलींना फसवत आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी पक्षाकडून मोहीम राबवण्यात येईल. 
     उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांना संरक्षण पुरवण्यात येईल, असे मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश चंद यांनी सांगितले.

बुलढाणा येथे पोलिसांच्या उपस्थितीत सैलानीबाबाच्या यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन !

  • कायद्याचे रक्षणकर्ते असणारे पोलीसच कायद्याच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करतात, हा कायदाद्रोह नव्हे का ?
  • दर्ग्याच्या परिसरात चालणार्‍या अंधश्रद्धेकडे दुर्लक्ष करणारे अंनिसवाले !
     पिंपळगाव सैलानी (बुलढाणा) - येथील सैलानी दर्गा परिसरात २३ मार्चला दुपारी ३ वाजता कपड्याची आणि नारळाची होळी करून लाखो लोकांच्या उपस्थितीत सैलानीबाबाच्या यात्रेस प्रारंभ झाले. जादूटोण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सुया, बिबे, काळ्या बाहुल्या या वेळी परिसरात दिसून आल्या. येथे जादूटोणाविरोधी कायद्याचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून आले, असे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले आहे. 
१. सैलानीबाबा दर्ग्याचे मुजावर शेख रफिक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, नजीर मुजावर, शेख चाँद मुजावर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांच्या हस्ते होळीची पूजा करून आणि नैवेद्य दाखवून ती पेटवण्यात आली.

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात महिला भाविकाचा सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २६ मार्च येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार्‍या महिला भाविकाचा सुरक्षारक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली. तिने याविषयी खडसवताच तिला धक्काबुक्कीही करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे तक्रार नोंदवण्यासाठी महिला गेली असता तेथे ही घटना दाबण्याचा प्रयत्न संंबंधितांनी केला. महिला शहर पोलीस ठाण्यात गेल्यावर काही वेळातच तेथे मंदिर समितीचे संबंधित अधिकारीही आले. त्यांनी महिलेची समजूत काढत विनयभंग करणार्‍या सुरक्षारक्षकाचे स्थानांतर, तसेच चौकशीही करणार असल्याचे सांगितले आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यापूर्वीही असे प्रकार घडत असल्याने गाभार्‍यात महिलारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.


घाटकोपर (मुंबई) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याखान आणि फेरी

उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना श्री. आप्पा परब
       घाटकोपर - २५ मार्च या दिवशी स्वराज्य युवा प्रतिष्ठानने हिंदूसंघटनाच्या दृष्टीकोनातून येथील बर्वेनगर पोस्ट कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याखानाचे आयोजन केले होते. या वेळी ज्येेष्ठ इतिहास संकलक आणि लेखक श्री. आप्पा परब यांनी शिवपूर्वकालीन स्थिती, शिवजन्म, सद्यपरिस्थिती आणि शिवजयंतीविषयी होणारे वाद या सूत्रांवर मार्गदर्शन केले.
         श्री. परब या वेळी म्हणाले, त्या काळी इंग्रजी पंचांग नव्हते आणि प्रत्येक सण-उत्सव सर्व तिथीनुसार साजरे करत असत. महाराजांचे गुण आपल्या अंगी आले पाहिजेत आणि आपण दूरदृष्टी ठेवून प्रत्येक कार्य केले पाहिजे. पुढच्या पिढीला घडवण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलाला जिजाऊप्रमाणे कृष्ण आणि रामाच्या गोष्टी सांगून त्याचे गुण जोपासले पाहिजेत. प्रत्येक तरुणाने महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आजही दुष्काळात रायगडावर पाण्याचे तलाव आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे.
        या कार्यक्रमात संकल्प सिद्धी संघ, नवतरुण मित्र मंडळ, गुरुदत्त सेवा मंडळ, ओम साई कृपा मंडळ, बालगोपाळ मित्र मंडळ या संघटनांसह अन्य हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमी असे १२० जण उपस्थित होते.

रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाला निवेदने

नालासोपारा (पूर्व) 
डावीकडून सहपोलीस निरीक्षक सौ. लोंढे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
(डावीकडून) श्री. कुलकर्णी, श्री. दीपक तिवारी, श्री सुरेन्द्र शुक्ला आणि श्री ओमप्रकाश झा
 मानखुर्द 
पोलिसांना निवेदन देतांना डावीकडून धर्माभिमानी सर्वश्री
राहुल पवार, तुषार जाधव, पोलिसांच्या डावीकडे विनोद जगताप आणि राजेश केरेकर
 नालासोपारा (पश्‍चिम) 
डावीकडून नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बडगुजर
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी (उजवीकडून) संतोष पांडे, अतुल कापसे, संतोष पांडे आणि दिप्तेश पाटील
 नवी मुंबई 
डावीकडून श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. विनित शर्मा 
आणि श्री. प्रदीप चौटेले, गोरक्षक श्री. संदीप शर्मा, श्री. अनिल सावंत, 
श्री. महेंद्र पवार आणि नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त श्री. दिलीप सावंत

(म्हणे) आक्षेपार्ह साहित्य जाळणे आमचा अधिकार आहे !

मनुस्मृती न अभ्यासता तिचे दहन करणे, हा केवळ हिंदुद्वेष्टेपणा होय !
मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याचा आरोप असणार्‍या विद्यार्थ्यांचा उद्दामपणा
     नवी देहली - आक्षेपार्ह साहित्य जाळणे आमचा अधिकार आहे, असे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याचा आरोप असणार्‍या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. ८ मार्च या दिवशी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांकडून साबरमती ढाब्याजवळ मनुस्मृतीचे पाने जाळण्यात आली होती. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने ५ विद्यार्थ्यांना प्रॉक्टर कार्यालयात उपस्थित होऊन त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या वेळी यात महिलांच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी लिहण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनुस्मृतीचे पाने जाळली, असे स्पष्टीकरण या आरोपी विद्यार्थ्यांनी दिले.

भारत-पाकिस्तान सामन्यात पाक संघाला पाठिंबा देणार्‍या २ धर्मांध विद्यार्थ्यांना समन्स

देशद्रोही धर्मांधांच्या विरोधात वेळकाढू नव्हे, तात्काळ प्रक्रिया राबवून त्यांना 
कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! असे केले तरच देशद्रोह्यांना वचक बसेल !
     बेंगळुरू - भारत-पाकिस्तान २०-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाला पाठिंबा देणार्‍या दक्षिण कर्नाटकातील सत्तूर येथे रहाणार्‍या २ विद्यार्थ्यांना समन्स देण्यात आले आहे. सफवान आणि अब्दुल रशीद अशी या दोघांची नावे असून त्यांनी १९ मार्चला कोलकाता येथे झालेल्या सामन्याच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवर पाकिस्तान झिंदाबाद आणि जय पाकिस्तान असा मजकूर टाकला होता. (भारतात राहून भारतविरोधी आणि शत्रूराष्ट्राच्या विजयाच्या घोषणा देणार्‍यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ! - संपादक) याविषयी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली नसली, तरी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तसेच पुढील तपासही चालू आहे, असे पोलीस अधीक्षक एस्.डी. शरणप्पा यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडचे काँग्रेस शासनाचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे स्टिंग ऑपरेशन

  • काँग्रेसचा भ्रष्टाचारी चेहरा पुन्हा उघड !
  • आमदारांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीची चर्चा !
       नवी देहली / डेहराडून - उत्तराखंडचे काँग्रेस शासनातील मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात बंडखोर काँग्रेस आमदारांनी एक र्स्टिंग ऑपरेशन केले आहे. यात मुख्यमंत्री रावत दिसत असून त्यांच्यासमोर बसलेल्या आमदारांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीचीही चर्चा होत आहे. स्टिंगची चकती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. त्यांनी हे स्टिंग केल्याचा दावा करणार्‍या पत्रकाराच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍न उपस्थित केला. सध्या काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी बंडखोरी केली असून ते भाजपला जाऊन मिळाले आहेत. राज्यपालांनी रावत यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

(म्हणे) श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती देणार नाही !

हिंदूंच्या सण-उत्सवाच्या वेळी धर्मांधांकडून दंगली घडवल्या जात असतांना त्यांच्यावर 
कारवाई करण्याऐवजी हिंदूंवरच निर्बंध लादणारे पोलीस हिंदुद्वेषीच होय ! 
नगर येथील पोलिसांची मोगलाई !
     गेल्या वर्षी श्रीरामनवमीला नगर शहरात हिंदु-मुसलमान यांच्यात वाद होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी श्रीरामनवमीला कोणालाही शहरातून मिरवणूक काढण्यासाठी अनुमती देण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशी माहिती नगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले की, धार्मिक उत्सवात कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये आणि दुष्काळी परिस्थितीतही कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. चालू वर्षात जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून एकही गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. (दक्षता घेणे म्हणजे हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंध लादणे, असे समजायचे का ? - संपादक)

महिलांचे पाय धुण्याच्या पोपच्या फतव्याने केरळ चर्चमध्ये अस्वस्थता !

चर्चचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, याचा पुरावा !
     कोची - प्रत्येक वर्षी जगभरातील ख्रिस्ती मॉन्डी थर्स्डे नावाची रूढी पाळतात. येशू ख्रिस्ताने त्याच्या १२ शिष्याच्या स्मरणार्थ प्रत्येक चर्चमध्ये १२ पुरुषांचे पाय धुवावे, असे या रुढीत पाळले जाते. या वर्षी होणार्‍या उत्सवात या १२ जणांमध्ये महिला आणि मुले यांना सामावून घ्यावे, असा आदेश पोप यांनी दिला होता. त्यामुळे केरळमधील सायरो मलबार चर्चच्या मिशनर्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. (ख्रिस्ती नेहमीच पुरुष आणि महिला यांच्या समानतेचा डंका पिटतात; मात्र जेव्हा अशा तर्‍हेच्या परंपरा पाळण्याचे प्रसंग येतात, तेव्हा मात्र ते समतावाद खुंटीला टांगून ठेवतात ! महिलांना हीन लेखणार्‍या ख्रिस्त्यांना स्त्रीमुक्तीवाले खडसवणार का ? - संपादक) प्रारंभी ही प्रथा जगातील पूर्वेतील देशात लागू होणार नाही, असे घोषित केले होते; मात्र त्यापूर्वीच अनेक चर्चनी ही प्रथा पुढील वर्षांपासून पाळण्याचा निर्णय घेऊन टाकला होता.

पाकिस्तानी अण्वस्त्रांचा जगाला धोका ! - अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल

अण्वस्त्रे आतंकवाद्यांच्या कह्यात जाण्याचीही व्यक्त केली भीती
     वाशिंग्टन - पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचा फार मोठा साठा आहे. शिवाय ते युद्धभूमीवर वापर करण्यास योग्य अशी अण्वस्त्रेही सिद्ध करत आहेत. अशी अण्वस्त्रे चोरीला जाऊन जिहादी आतंकवाद्यांच्या हातात पडली, तर संपूर्ण जगाला धोका आहे. पाकिस्तानातील राजवट अत्यंत दोलायमान स्थितीत असून ती कधीही कोसळून आतंकवाद्यांच्या हातात जाऊ शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी अण्वस्त्रांचा साठा आतंकवादी कह्यात घेऊन जगात नरसंहार घडवू शकतात, अशी भीती अमेरिकेतील प्रख्यात हावर्ड केनेडी स्कूल या संस्थेने तिच्या अहवालातून व्यक्त केली आहे.

गोअभयारण्यात गायीचे तोडलेले शिर टाकले !

अमेरिकेत हिंदुद्वेष्ट्यांकडून गोरक्षणाला विरोध ! 
      पेनिसिल्व्हीया (अमेरिका) - येथील मन्रो विभागातील लक्ष्मी गोअभयारण्यात समाजकंटकांनी गायीचे तोडलेले शिर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून तेथील पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण चालू केले आहे. 
       हे गोअभयारण्य शंकर शास्त्री यांनी २० वर्षांपूर्वी चालू केले आहे. ते स्वत: न्यूयॉर्क तांत्रिक महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आणि डीन आहेत. या अभयारण्यात २० गायी असून त्यांना अद्यापपर्यंत कोणतीही इजा झालेली नव्हती. या अभयारण्याच्या माध्यमातून केवळ गोरक्षण करण्याचाच हेतू नसून त्याद्वारे हिंदु धर्माचे शिक्षण देण्याचा प्रयत्नही शास्त्री करत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी येथे गोवंशाची अवैध वाहतूक करणारे तीन मुसलमान पोलिसांच्या कह्यात

  • परस्पर विरोधी तक्रारी : तीन मुसलमान, तर चार हिंदूंच्या विरोधात गुन्हा दाखल
  • मुसलमानांकडून हिंदूंना जिवे मारण्याची धमकी
अवैधरित्या नेण्यात येणारा गोवंश
गाडीसह व रोखणारे गोरक्षक
    कुडाळ - गोवंशाची अवैधरित्या आजरा येथील पशूवधगृहात नेण्यासाठी वाहतूक करत असतांना आलियाज तलक मुराद (आजरा) याच्यासह तिघांना पकडून हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून मुराद याच्यासह तीन मुसलमानांवर, तर सावंतवाडी येथील गौरेश कामत यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुडाळ तालुक्यातील दांड्याचे गाळू, आकेरी येथे २३ मार्चला मध्यरात्री १ वाजता घडली. अवैध वाहतूक रोखणारे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे समजते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharat-Australia ke beech honewale cricket matchme Kashmiri darshakone Australiaka sath deneki baat kahi - Aise deshdrohiyopar karyavahi ki mang karo !

जागो ! : भारत-ऑस्ट्रेलिया के बीच होनेवाले क्रिकेट मैच में कश्मीरी दर्शकों ने ऑस्ट्रेलिया का साथ देने की बात कही. - ऐसे देशद्रोहियों पर कार्यवाही की मांग करो !

२८ मार्चपासून पाकिस्तानी पथक भारतात येऊन पठाणकोट आक्रमणाचे अन्वेषण करणार !

      इस्लामाबाद - भारताने पठाणकोट वायूदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचे अन्वेषण करणार्‍या पाकिस्तानी अन्वेषण पथकाला (जेआयटीला) व्हिसा दिल्यामुळे ते २७ मार्चला भारतात दाखल होईल आणि २८ मार्चपासून अन्वेषणाला प्रारंभ करील. या पथकात ५ जणांचा समावेश आहे. त्यांचे नेतृत्व पंजाबच्या आतंकवाद प्रतिबंधक विभागाचे महंमद ताहिर राय हे करणार आहेत. याशिवाय महंमद अजीम अर्शद, कर्नल तन्वीर अहमद, कर्नल इरफान मिर्झा, शाहिद तन्वीर यांचाही यात समावेश असेल.

इसिसच्या प्रभावाखाली असलेल्या देशांतून येणार्‍यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक ! - टेड क्रुझ

     न्यूयॉर्क - बेल्जियममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले, तसेच यापुढे अशी आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे, या पार्श्‍वभूमीवर इसिसच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमधून येणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी अमेरिकेने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मुसलमानांची वस्ती असलेल्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवल्यास कट्टरवादाकडे वळणार्‍यांना वेळीच रोखता येऊ शकेल, असे मत रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील टेड क्रुझ यांनी मांडले आहे. त्यांच्या या मताला पक्षांतर्गत असलेले त्यांचे विरोधक डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाठिंबा दिला आहे. (आतंकवादविरोधी पावले उचलण्यासाठी अमेरिकेतील राजकीय पक्षांचे नेते विरोधक असूनही एकमेकांना पाठिंबा देतात, तर भारतात राजकारणासाठी राजकीय पक्षांचे नेते प्रसंगी आतंकवाद्यांचेही समर्थन करतात ! भारत अमेरिकेप्रमाणे आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलील तो सुदिन ! - संपादक)
    ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, पॅरिसमध्ये आतंकवादी आक्रमणात पकडलेल्या संशयित आतंकवाद्याचा पद्धतशीरपणे छळ करून माहिती मिळवता आली असती. त्यामुळे ब्रुसेल्सवरील आक्रमण टाळता आले असते. पॅरिस येथील आक्रमणाप्रकरणी अटक केलेल्या आतंकवाद्याला ब्रुसेल्स येथील आक्रमणाच्या कटाची माहिती असणार, असा माझा ठाम विश्‍वास आहे.

इतरांना अंधश्रद्ध म्हणणारेच खर्‍या अर्थाने अंधश्रद्ध होत !

     अश्रद्धा हीच श्रद्धा असलेले, श्रृती, स्मृती व पुराणे यांची उलथापालथ करून लोकाचार आणि शास्त्राचार यांचा उच्छेद करणे, हेच जीवितकार्य असलेले उपद्व्याफी पुरोगामी लोक जुन्या वळणाच्या जनांना अंधश्रद्ध म्हणून शिवी हासडतात आणि स्वतः मात्र अंध अश्रद्ध असतात !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !

१. भ्रष्ट सत्तेला उखडून फेकण्यासाठी आता नव्या क्रांतीकारी तरुणांनीच पुढे आले पाहिजे ! : इतिहासाचे ज्ञान असणार्‍या जनतेने हे लक्षात ठेवले पाहिजे की, परिस्थिती नेहमी पालटत असते. चढानंतर उतार, अंधारानंतर प्रकाश, ओहोटीनंतर भरती आणि अमावास्येनंतर पौर्णिमा या सृष्टीनियमानुसार घडणार्‍या घटनेप्रमाणे बिकट दिवस प्रयत्नांती पालटणार आहेत. भ्रष्ट सत्तेला पाताळात दडपणारा बटू वामन नव्या क्रांतीकारी युवा पिढीतूनच, विद्यार्थी वर्गातूनच निर्माण होऊ घातला आहे. भ्रष्ट सत्तेला उखडून फेकण्यासाठी आता नव्या क्रांतीकारी तरुणांनीच पुढे आले पाहिजे. 
२. शासनाने प्रथम करबुडव्यांची मालमत्ता राजहृत केली पाहिजे ! : गरीब जनतेच्या मानेभोवती फास आवळण्यापूर्वी सर्व आयकरबुडव्या व्यक्तींची, व्यापार्‍यांची आणि उद्योगसमूहांची संपत्ती जप्त करावी. त्याचसमवेत काळाबाजारवाले, अन्य करबुडवे अशा कोट्यधिशांकडून करवसूली करावी, नट-नट्यांनाही यातून वगळू नये.

भारतद्वेषी काश्मिरी दर्शकांवर केंद्रशासन कारवाई करणार का ?

फलक प्रसिद्धीकरता
आज मोहाली (पंजाब) येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्याच्या वेळी आम्ही ऑस्ट्रेलियाला समर्थन देऊ, असे सामना पहायला येणार्‍या शेकडो भारतद्वेषी काश्मिरी दर्शकांनी सांगितले आहे.

रॉचा हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव मुंबईचे उद्योजक !

       नवी देहली - पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे पाकने रॉचा हस्तक म्हणून अटक केलेल्या भारतीय व्यक्तीशी भारत शासनाचा कोणताही संबंध नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अटक करण्यात आलेले कुलभूषण जाधव हे मुंबईतील निवासी असून त्यांचे वडील सुधीर जाधव साहाय्यक पोलीस आयुक्त होते, तर त्यांचे काका पोलीस खात्यात आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
        कुलभूषण जाधव यांचे ३ मासांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांसमवेत बोलणे झाले होते. नौदलातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कुलभूषण स्वतःचा व्यवसाय करत होते. त्यांची कार्गो बोट्स इराणचे बंदर अब्बास येथून चालते. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जाधव उद्योजक असून उद्योगासंबंधीच्या कामानिमित्त ते बलुचिस्तान भागात गेले होते. बलुचिस्तानचे गृहमंत्री मात्र त्यांचे नाव कुलभूषण यादव सांगत आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना समन्स जारी केला. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भारतीय उच्चायुक्तांना या प्रकरणाची माहिती दिली असून याचा कडाडून विरोध केला आहे. ही बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत प्रश्‍नांमध्ये ढवळाढवळ असल्याचा आरोप पाकने केला आहे.

केरळमध्ये फोफावलेल्या लव्ह जिहादची भीषणता दर्शवणार्‍या काही सत्य घटना !

लव्ह जिहादच्या समस्येची इतकी दाहकता असूनही एकही वृत्तवाहिनी 
किंवा प्रसिद्धीमाध्यम अशी वृत्ते प्रसिद्ध करत नाही, हे लक्षात घ्या !
     केरळमध्ये लव्ह जिहाद ची प्रकरणे वाढत असूनही प्रसारमाध्यमे याविषयी काहीच बोलतांना दिसत नाहीत. योगदिनाच्या निमित्ताने सूर्यनमस्कार घालणे किंवा ॐ काराचे उच्चारण करणे हे लोकराज्य (लोकशाही) असलेल्या भारतात मोठे संकट वाटते आणि प्रसारमाध्यमेही त्याला प्रसिद्धी देतात; मात्र लव्ह जिहादसारख्या प्रकरणांमध्ये हिंदु मुलींना फसवले जात आहे, तसेच सध्या देशाच्या युवा पिढीची अत्यंत दयनीय स्थिती आहे, हे प्रसारमाध्यमांना दिसत नाही.
     लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या हिंदु मुलींना वाचवण्यासाठी केरळमध्ये हिंदु हेल्पलाईन नावाची एक संघटना कार्यरत आहे. मुलींना धर्माचरणाचे महत्त्व कळावे, साधना करून त्यांच्या जन्माचा उद्धार व्हावा, यासाठी या संघटनेतील कार्यकर्ते अशा मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना हिंदु जनजागृती समितीशी जोडून देतात. या मुलींसोबत बोलल्यानंतर लक्षात आलेली समाजाची स्थिती आणि लव्ह जिहादविषयी लक्षात आलेले काही प्रसंग येथे देत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला अटक

        सोलापूर - व्हॉट्स अ‍ॅपवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्‍लील संदेश पाठवल्याप्रकरणी येथे धर्मांध इंजमाम शेख याला २० मार्च या दिवशी अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी आदित्य शहा यांनी तक्रार दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांंविषयी अश्‍लील संदेश पाठवल्याचा राग मनात धरून काही अज्ञात युवकांनी आसरा चौकात दगडफेक केली.

हिंदु धर्मात स्वर्गाच्याही पुढच्या लोकांत जाण्याची संधी असून ती व्यक्तीच्या कर्मफलन्यायावर अवलंबून असणे

     ७.११.२०१४ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये स्वर्गात जाण्यासाठी येशूला शरण जाणे हा एकमेव मार्ग ! असा फोंडा (गोवा) येथे मेगाफोनच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार एक व्यक्ती करत होती, असे वाचनात आले. त्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाने ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे दर्शवण्यासाठी हिंदु धर्मावर केलेल्या टिकेचे खंडण पुढे देत आहे.
१. ख्रिस्ती धर्मप्रसारक : मूर्तीमध्ये सामर्थ्य नाही. पूजापाठ करून सत्य सापडत नाही. स्वर्गात जाण्यासाठी येशूला शरण जाणे, हा एकमेव मार्ग. अन्य कोणताही मार्ग नाही.
खंडण : अशी विधाने वाचल्यावर ख्रिस्त्यांना विचारावेसे वाटते, वरील विधान हे हिंदु धर्मियांच्या मूर्तीविषयी आहे. जर मूर्तीमध्ये सामर्थ्य नाही, असे म्हणता, तर गोव्यात ठिकठिकाणी खांबावर उभ्या केलेल्या अवस्थेत असलेल्या येशूच्या मूर्तीत कोणते सामर्थ्य आहे ?, हे स्पष्ट करावे. ती मूर्ती स्थापन करण्यामागे ख्रिस्ती लोकांचा काय उद्देश आहे ? तसेच पूजापाठ करून सत्य सापडत नाही, असे म्हणता, तर बर्‍याच ठिकाण येशूच्या मूर्तीला फुले वाहिलेली असतात. त्यांच्यासमोर मेणबत्त्या पेटवलेल्या असतात, तसेच त्यांची स्तुती करणारे वाचन केले जाते. ते कशासाठी ? तसेच प्रार्थना करणे आणि क्षमा मागणे या कृतीही पूजापाठच आहेत.

एकाच वेळी संत आणि आणि राजकारणी अशी दुहेरी भूमिका करणारे गांधी !

    गांधी एकाच वेळी संत आणि आणि राजकारणी अशी दुहेरी भूमिका करायचे. तेच त्यांना घातक ठरायचे. ते जर केवळ संत राहिले असते, तर त्यांचा ख्रिस्त झाला असता. ते जर केवळ राजकारणी राहिले असते, तर शरद पवार.... नव्हे, पी.व्ही. नरसिंहराव झाले असते ! 
     गांधीजी हे हुकूमशाही पद्धतीने वागत. ते काँग्रेसचे चार आणे सदस्य नसतांनाही त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून मुंबईचे वीर नरिमन, नागपूरचे डॉ. ना.भा. खरे, संपूर्ण देशाचे देशगौरव सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसमधून हकलले ! करारानुसार भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायचे होते आणि पाकिस्तानकडून ३०० कोटी रुपये घ्यायचे होते. पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या साहाय्याने काश्मीरवर सशस्त्र सैनिकी आक्रमण केले. अशा युद्धमान परिस्थितीत भारताच्या मंत्रीमंडळाने पाकिस्तानने आक्रमण परत घेतल्याविना ५५ कोटी रुपये द्यायचे नाहीत, असा निर्णय बैठकीत घोषित केला. त्यानंतर गांधीजींनी, मंत्रीमंडळाने हा निर्णय पालटून ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत, यासाठी आमरण उपोषण केले.

उद्दाम धर्मांधांच्या विरोधात गेली ४ वर्षे प्राणपणाने लढा देणारे जळगाव येथील श्री. नितीन जोशी आणि त्यांचे कुटुंबीय !

श्री. नितीन जोशी
धर्मांधांच्या विरोधात न जाता नेभळट भूमिका 
घेणार्‍या सर्वच हिंदूंसाठी आदर्शवत उदाहरण !
     सध्या सर्वत्र धर्मनिरपेक्षतेचे पेव फुटल्याने धर्मांधांचे चांगलेच फावते. कुणी त्यांना विरोध केला, त्यांच्या अवैध धर्मस्थळांच्या संदर्भात आवाज उठवला की, ते लगेचच आक्रमक होतात. अशा धर्मांधांना आवर घालणे किंवा सामोरे जाणे, हे सर्वसामान्य हिंदूंसाठी कठीण आणि अशक्यप्राय आहे; कारण हिंदूच आज असंघटित आहेत. याला धर्माचरण आणि धर्मपालन यांचा अभावही कारणीभूत आहेत. आजच्या काळात ५-५० हिंदूंचे संघटन करणे अशक्य असतांना एक हिंदु कुटुंब स्वबळावर धर्मांधांचा सामना करण्यासाठी सदैव सिद्ध असते. हे उदाहरण आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील श्री. नितीश जोशी या हिंदु कुटुंबाचे !
     जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार करतांना भारतनगर परिसरात रहाणारे श्री. नितीन जोशी यांच्याशी आमचा संपर्क आला. भारतनगर परिसरातील स्वतःच्या घराला लागूनच असलेल्या आणि एका रात्रीत बांधलेल्या अनधिकृत मशिदीच्या संदर्भात तन, मन, धन अन् प्राणपणाने लढा देणार्‍या, तसेच त्यातूनच निर्माण झालेल्या धर्मांधांच्या रोषालाही धैर्याने सामोरे जाणार्‍या श्री. नितीन जोशी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या लढ्याचा वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. पूर्व इतिहास
      ऑगस्ट २०१२ मध्ये जळगाव येथे दूध फेडरेशन मार्गावरील भारतनगर परिसरातील श्री. नितीन जोशी यांच्या घराच्या मागे एका रात्रीत पत्र्याच्या मशिदीचे बांधकाम केले गेले.

महाविद्यालये नव्हे, शिक्षणाच्या नावाखाली भरणारा बाजार !

     सध्याचा शिक्षण विभाग आणि शिक्षण प्रक्रिया म्हणजे अनागोंदी प्रक्रियेचा उत्तम नुमना म्हणावा लागेल. कुठे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी गुरुकुल पद्धत, तर कुठे विद्यार्थ्यांना काहीच न देणारी सध्याची शिक्षणपद्धत ! अशा शिक्षणव्यवस्थेचे अनुभव मला नोकरी करत असतांना आले. एका शहरातील एका महाविद्यालयात मी एक वर्ष नोकरी करत होते. त्या वेळी मला शिक्षणव्यवस्थेविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहे.
१. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेत टंगळमंगळ करणे
      महाविद्यालयातील संगणक शाखेच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एका वर्गात साधारण ७० ते ७५ विद्यार्थी होते. त्यातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील अभ्यास चालू असतांना इकडे-तिकडे टंगळमंगळ करण्यातच लक्ष असे.
२. विद्यार्थ्यांना शिकवलेले समजत आहे का ?, यापेक्षा अभ्यासक्रम
वेळेत पूर्ण व्हायला हवा, याचाच शिक्षकांना ताण असणे
     ५० मिनिटांच्या एका तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे विषयाकडे लक्ष वळवणे अवघड जात असे. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिल्यास दिलेला अभ्यासक्रम वेळेत पुरा करणे, विषय अवघड असल्याने विद्यार्थ्यांना समजत आहे अथवा नाही, यापेक्षाही दिलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हायला हवा, याचाच शिक्षकांना ताण असे.
३. विद्यार्थिनींची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता शिक्षिकांनी त्यांच्याशी बोलतांना अपशब्द वापरणे
     महिला महाविद्यालयात येणार्‍या मुली साधारण ५० ते ७० टक्के या गटवारीतील असायच्या; मात्र त्यांची बौद्धिक क्षमता अल्प असल्याने प्राध्यापिकांची चिडचिड होत असे.

दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लिखाणावर श्री. विद्याधर नारगोलकर यांना सुचलेले विचार

श्री. विद्याधर नारगोलकर
     दैनिक सनातन प्रभातमध्ये ८ मार्च २०१६ या दिवशीच्या अंकात आसुरी लोक उदंड झाले आहेत, हे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. त्यासंदर्भात मला सुचलेले विचार पुढे देत आहे. 
श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले आसुरी वृत्तीचे लोक सध्या भारतात उदंड झाले आहेत ! 
कारण माणूस हा...
आश्रय दिला, तर डोक्यावर बसतो ! 
उपदेश केला, तर रुसून बसतो ! 
आदर केला, तर गुलाम समजतो !
उपकार केले, तर घमेंडी समजतो ! 
क्षमा केली, तर दुर्बल समजतो ! 
विश्‍वास ठेवला, तर घात करतो ! 
प्रेम केले, तर धोका देतो !
...म्हणून श्रीमद्भगवद्गीतेतच सांगितले आहे,
तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्‍चयः ॥
- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ३७
अर्थ : हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्‍चय करून उभा रहा. 
- श्री. विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे (८.३.२०१६)

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
     इसिसला काश्मीरपासून केरळपर्यंत समर्थन प्राप्त होत आहे. हा उद्याच्या गृहयुद्धाचा शत्रूने केलेला शंखनादच आहे. ही लढाई केवळ सीमेवर नाही, तर प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर लढली जाणार आहे; पण हिंदूंची आजची परिस्थिती त्याला तोंड द्यायला सक्षम आहे का ? - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

कुठे आरोप सिद्ध झाल्यावरही वर्षानुवर्षे शिक्षा न ठोठावणारी भारतीय न्याययंत्रणा, तर कुठे ३ मासांत शिक्षा ठोठावणारी अमेरिकन न्याययंत्रणा !

    इसिस या क्रूर आतंकवादी संघटनेमध्ये दोन आतंकवाद्यांची भरती करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यूयॉर्कच्या न्यायालयाने मुफिद एल्फजीह (वय ३२ वर्षे) याला २२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये एलफजीह याच्यावर हा आरोप सिद्ध झाला होता.

आम आदमी पक्ष तक्रार करेपर्यंत शासन काय करत होते ? पूर्वीच अटक का केली नाही ?

     महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने)१४ मार्च २०१६ या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केली होती. या संदर्भात त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षानेने तक्रार दाखल केली होती.

लाखो गुन्ह्यांचा तपास होत नसतांना संपूर्ण देशभरात आय.पी.एस्. अधिकार्‍यांची ९०० हून अधिक पदे रिक्त !

     संपूर्ण देशभरात भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्.) अधिकार्‍यांची १ जानेवारी २०१६ मध्ये ९०८ पदे रिक्त आहेत. देशात आय.पी.एस् अधिकार्‍यांची संमत संख्या ४ सहस्र ८०९ असून सध्या ३ सहस्र ८९४ आय.पी.एस्. अधिकारी कार्यरत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये ५१७ पैकी ११४ आय.पी.एस्. दर्जाची पदे रिक्त आहेत. बंगालमध्ये ३४७ पदांपैकी ८८ पदे, ओडिशात १८८ पैकी ७९, तर कर्नाटकात ७२ पदे रिक्त आहेत.

सत्तेसाठी भाजपने काश्मीरमधील सैन्य मागे घेण्यास आरंभ केला, असे कोणी म्हटले, तर ते चुकीचे असेल का ? उद्या संपूर्ण काश्मीरमधून सैन्य हटवून काश्मीर आतंकवाद्यांच्या किंवा पाकिस्तानच्या ताब्यात द्यायला शासन मागेपुढे पहाणार नाही, हे लक्षात घ्या !

     सत्तेसाठी पीडीपीने भाजपला घातलेल्या अटीनुसार जम्मू-काश्मिरातील मोक्याच्या ४ ठिकाणी असलेले भारताचे सैन्य मागे घेण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल एन्.एन्. व्होरा आणि उत्तर भारताचे लेफ्टनंट जनरल डी.एस्. हुड्डा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली.

भारतमाता की जय ही घोषणा संघाची नाही !

     भारतमाता की जय अशी घोषणा द्या, असे आमचे म्हणणे नाही; परंतु या घोषणेला कुणाचा विरोध असेल, तर ते देशविरोधी आहे. भारतमाता की जय आणि वन्दे मातरम् या घोषणा संघाच्या नाहीत. त्या स्वातंत्र्याच्या लढाईत स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्या होत्या.- दत्तात्रेय होसाबळे, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघाच्या नेत्यांकडून धर्माविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन अपेक्षित आहे !

     देशातील प्रत्येक मंदिरात महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे; मात्र हा वाद आंदोलनांऐवजी चर्चेने आणि सामंजस्याने सोडवला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. समलैंगिकता हा गुन्हा नसून ती लोकांची खाजगी बाब आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समलैंगिकतेवर चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. समलैंगिकतेकडे गुन्ह्याच्या दृष्टीकोनातून पाहू नये, तसेच त्यासाठी कुणालाही शिक्षा मिळू नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसाबळे यांनी केले.

अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ! अल्पसंख्यांकांना ४०५ कोटी रुपये, तर गोसंवर्धनासाठी केवळ ३४ कोटी रुपये !

     महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती शासनाने १८ मार्च २०१६ या दिवशी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य योजना मिळून एकूण ४०५ कोटी रुपये प्रावधान करण्यात आले आहे, तर गोसंवर्धन आणि गोरक्षण यांसाठी ३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
    अमेरिकेतही राज्यांचा आकार मोठा आहे. याउलट भारतात झारखंड, छत्तीसगड यांसारखी छोटी राज्ये अस्तित्वात आणूनही त्यांचा विकास झालेला नाही. विकास हा राज्यांच्या आकारावर नव्हे, तर राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो, हे यातून दिसून येते. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि वेगळा मराठवाडा अशी मागणी करणारे फुटीरतावाद जोपासत असून अशा मागण्यांना शासनाने थारा देऊ नये, अशी जनतेची अपेक्षा आहे.
     विदर्भापेक्षा मराठवाड्यावर अधिक अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी. 
- महाराष्ट्राचे (माजी) महाधिवक्ता श्रीहरि अणे

अशा वेळी खालच्या न्यायालयाचा निर्णय नेमका कुठे चुकला आहे, हे वरच्या न्यायालयाने त्याला सांगायला पाहिजे आणि खालचे न्यायाधीश अक्षम असल्यास त्यांना सेवानिवृत्त केले पाहिजे, तरच जनतेचा न्याययंत्रणेवर विश्‍वास राहील !

     पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेला मिर्झा हिमायत इनायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रहित करून जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार, तर ५८ जण गंभीर घायाळ झाले होते.साधकांनो, आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा !

साधकांना सूचना
महर्षींनी 'ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।' हा जो जप सांगितला आहे, तो समष्टीसाठी आहे. एखाद्याला वाईट शक्तींमुळे त्रास होत असेल, तर व्यष्टीसाठीचा जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे आवश्यक असते. जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे कठीण वाटत असेल, तर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्वांसाठीचे उपाय यामधील सूचनेप्रमाणे श्रीकृष्णाचा किंवा आकाशदेवाचा नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास या नामजपामुळे नियंत्रणात रहात असेल, तर उपायांची वेळ सोडून अन्य वेळेत महर्षींनी सांगितलेला नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास नियंत्रणात रहात नसेल, तर दिवसभर उपायांचाच नामजप करावा. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सध्या आपल्याला महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा 'ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।' हा जप अधिकाधिक करायचा आहे. या नामजपाच्या ध्वनीमुद्रित धारिकेच्या संदर्भातील संगणकीय मार्गिका (लिंक) http://www.sanatan.org/mr/a/11560.html येथे उपलब्ध आहे.

प.पू. डॉक्टरांच्या कार्याला शक्ती मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी महर्षींनी योजलेले उपाय !मईलाडुदुरै (जिल्हा नागपट्टणम्, तमिळनाडू) या गावातील सिद्दरकाडू शिवमंदिर
सिद्दरकाडू शिवमंदिरातील सिद्धांची प्रतिमा
 पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव
१. महर्षींनी तमिळनाडूतील मईलाडुदुरै या गावातील सिद्दरकाडू शिव मंदिरात दर्शनासाठी नेणे; कारण या ठिकाणी बरोबर प.पू. डॉक्टरांच्या जन्मतिथी दिवशीच एका सिद्धांनी त्यांच्या ६४ शिष्यांसह एकाच वेळी जीवसमाधी घेतलेली असल्याने हे ठिकाण प.पू. डॉक्टरांच्या कार्यसिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महर्षींनी सांगणे : महर्षींनी आम्हाला तमिळनाडू राज्यातील नागपट्टणम् जिल्ह्यातील मईलाडुदुरै या गावातील सिद्दरकाडू शिव मंदिरात दर्शनासाठी नेले होते. (छायाचित्र १) या ठिकाणी एका सिद्धांनी (छायाचित्र २) अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या ६४ शिष्यांसहित एकाच वेळी जीवसमाधी घेतली आहे. असे कुठेही घडलेले नाही. या ठिकाणी या ६४ शिष्यांचे प्रतीक म्हणून ६४ शिवपिंडी भिंतींवर कोरल्या आहेत. (छायाचित्र ३)
२. जीवसमाधी घेतलेल्या प्रमुख सिद्धांचे नक्षत्र, रास आणि तिथी ही प.पू. डॉक्टरांसारखीच असणे आणि प.पू. डॉक्टरांच्या जन्मवारीच त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली असणे : या स्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प.पू. डॉक्टरांचा आणि जीवसमाधी घेतलेल्या या प्रमुख सिद्धांचेही नक्षत्र, वार, रास आणि तिथी हीच होती.

मुलगी विवाहाच्या वयाची झाल्यावर काही जणांच्या मनात निर्माण होणारे काही प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

१. आई-वडिलांचा विचार
         हल्ली मुलेही नोकरीनिमित्त आई-वडिलांपासून दूर रहातात. त्यामुळे विवाहानंतर मुलगी आपल्यापासून कायमची दूर जाणार, याचे आई-वडिलांना दुःख वाटत नाही. मुलीची कटकट नको; म्हणूनही ते मुलीला सासरी पाठवत नाहीत; पण ती कधी एकदा लग्न होऊन सासरी जाईल ?, असे मात्र त्यांना वाटते.
१ अ. कधी एकदा लग्न होईल ?, 
या विचाराचे आश्‍चर्य वाटण्याची कारणे
१. लहानपणापासून विवाहाच्या वयापर्यंत, म्हणजे २० - २५ वर्षे तिचे सर्व अत्यंत प्रेमाने करूनही त्यांना ती कधी एकदा सासरी जाईल, याची घाई का असते ?

एका संतांकडे उपायांना गेले असता लक्षात आलेले संत आणि गुरु यांचे जीवनातील महत्त्व

कु. रूपाली कुलकर्णी
     शारीरिक त्रासांवर उपाय म्हणून मी एका संतांकडे उपायांना जाते. त्या संतांकडे अनेक लोक येत असतात. व्यावहारिक, आर्थिक, तसेच त्यांच्या अगदी वैयक्तिक समस्याही ते त्या संतांना मोकळेपणाने विचारतात. मला बरेच वेळा असे वाटायचे, हे लोक त्या संतांचा आध्यात्मिक लाभ का करून घेत नाहीत, तर कधी वाटायचे, हे संत कसले आहेत. त्यांनी लोकांना साधना सांगायला हवी. आता वाटते, जे आहे, ते बरोबरच आहे. आपण त्यातून शिकायचे आहे. अंनिस अनेक वेळा संतांना भोंदू ठरवते, तसेच प्रसारमाध्यमे संतांविरुद्ध सतत सांगत असतात. तरीही लोक संतांकडे जातात. त्यामुळे अंनिसने स्वतःचे काही चुकते का ? याविषयी आत्मपरीक्षण करायला हवे.
१. संत आणि गुरु यांना लोकांकडून कसलीच अपेक्षा नसते. त्यांचे कार्य प्रीतीच्या स्तरावर असते. त्यामुळे इतरांकडे, अगदी घरातील व्यक्तींनाही सांगू शकत नसलेल्या समस्या लोक संतांना मोकळेपणाने सांगतात आणि संत त्यांना साहाय्य करतात.
२. आपला खरा आधार गुरुच असतात. आपल्याला धर्मशिक्षण नसल्याने, तसेच आपण ते अनुभवले नसल्याने आपण इतरत्र धावतो; पण जेव्हा जीवनात कठीण समस्यांना सामोरे जावे लागते आणि कुणी साहाय्य करू शकत नाही, त्या वेळी संतांची, गुरूंची किंवा देवाची आठवण होते.

एकाच वास्तूमध्ये विविध ठिकाणी चालल्यानंतर देहावर होणारे सूक्ष्म स्तरावरील परिणाम

     मानवाची जाणीव दिवस-रात्र कार्यरत असते. ही वैयक्तिक जाणीव आतील वैश्‍विक जाणिवेशी सतत जोडलेली असते. त्यामुळे माणसाला मीची जाणीव प्रत्येक सेकंदाला असते. आपण एखाद्या चांगल्या रस्त्यावरून चालत असतांना भूमीच्या स्पर्शाची जाणीव आपल्या मनाला आनंद देणारी असते; परंतु त्याच रस्त्यावर पुष्कळ खडक असतील, तर अशा रस्त्यावर एकही पाऊल चालणे कठीण आहे. ही आपल्या स्थूलदेहाला होणारी जाणीव असते; परंतु या सर्वांपेक्षा वरची अशी असामान्य जाणीव असते. तिला सूक्ष्म जाणीव असेही म्हणतात. ही जाणीव आध्यात्मिक प्रगतीमुळे साध्य होते. ही जाणीव जागृत झाल्यामुळे मानवाला वातावरणातील दैवी ऊर्जा आणि त्रासदायक ऊर्जा यांची खरी जाणीव होण्यास प्रारंभ होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या पलीकडील सूक्ष्मातील अनुभूती येतात. माणसाची अध्यात्मात जसजशी प्रगती होऊ लागते, तसतशी या जाणिवेची पातळीही उंचावत जाते. अशाच एका जाणिवेची आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. रामनाथी आश्रमातील मार्गिकेत चालतांना डोके जड होऊन चक्कर येणे, 
एक संतसेवा करत असलेल्या खोलीत चालतांना उत्साह जाणवणे आणि एका
संतांच्या खोलीत पाऊल टाकताक्षणी शरीर हलके होऊन मन निर्विचार होणे
     ३.३.२०१६ ला रामनाथी आश्रमातील मार्गिकेतून चालतांना काय जाणवते ? त्यानंतर एक संत सेवा करत असलेल्या खोलीत आणि एक संत वास्तव्य करत असलेल्या खोलीत चालल्यानंतर काय जाणवते ?, असा प्रयोग केला. मार्गिकेतून चालल्यावर डोके जड होऊन चक्कर आल्याप्रमाणे झाले.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
       मागील चार मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१. 
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

हिंदु जनजागृती समिती आणि कमिन्स इंडिया लिमिटेड यांचे 'खडकवासला जलाशय रक्षण' संयुक्त अभियान

दिनांक : २८ मार्च २०१६
वार आणि वेळ : सोमवार, सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत
अभियानात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी ८९८३३ ३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कर्करोग झालेल्या विविध साधिकांच्या संपर्कात आणल्याविषयी देवाप्रती कृतज्ञ राहून स्वत:च्या आजाराकडे सकारात्मक दृष्टीने पहाणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शुभा सावंत

१. काही वर्षांपूर्वी कर्करोगाच्या प्रक्रियेतून गेलेल्या आणि आता 
तळमळीने सेवा करणार्‍या सौ. ज्योती पैंगीणकर आणि अन्य स्त्रिया ! 
सौ. शुभा सावंत
         मला कर्करोग झाला आहे, असे कळले, तेव्हा या रोगाविषयी जाणून घेण्यासाठी मी पहिला संपर्क सौ. ज्योती पैंगीणकर यांना केला. काही वर्षांपूर्वी त्या ह्या सर्व प्रक्रियेतून गेल्या होत्या आणि आज त्या परत सेवा करत असून त्या गुरुपौर्णिमा, हिंदु धर्मजागृती सभा आणि हिंदु अधिवेशन याप्रसंगी सेवा तळमळीने करतात. त्यांनी मला सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. माझे वैद्यकीय अहवाल आल्यावर त्या सर्व जाणून घ्यायच्या आणि काळजी करू नकोस, असे सांगून धीर द्यायच्या.
        त्यानंतर माझी मैत्रीण सौ. प्रतिमा बेसरे यांनी मला धीर दिला. त्यांनाही कर्करोग झाला होता आणि आज त्यातून त्या यशस्वीपणे बाहेर आल्या आहेत. त्यांनी गव्हांकुराविषयी माहिती दिली आणि योग्य उपचार घेतले की, सर्व ठीक होईल, असे सांगून धीर दिला.

उत्तरप्रदेशातील नोएडा आणि प्रयाग येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्रीकृष्णासमवेतच शाळेत जात असल्याचा भाव ठेवणे : जेव्हा मी शाळेत जाते, तेव्हा मला नेहमी याची जाणीव असते की, माझे दफ्तर हे श्रीकृष्णाचेच साहित्य आहे आणि मी त्याच्यासमवेत शाळेला जात आहे. 
- कु. तृप्ती पांडेय (वय १३ वर्षे), प्रयाग (अलाहाबाद), उत्तरप्रदेश. (४.७.२०१५)
२. यजमानांनी निधनापूर्वी गुरुदेवांचा महिमा वर्णन करणारे गीत लिहून त्यात शेवटी पत्नी आणि मुलगी यांचे नाव लिहिणे, म्हणजे निधनापूर्वीच त्यांनी आम्हाला गुरुदेवांच्या चरणी सोडल्याचे लक्षात येणे : माझ्या यजमानांनी त्यांच्या निधनापूर्वी गुरुदेवांचा महिमा वर्णन करणारे गीत त्यांच्या दैनंदिनीत लिहून ठेवले होते. त्यात शेवटी त्यांनी माझे आणि माझ्या मुलीचे नाव लिहिले होते. त्या वेळी मला ती दैनंदिनी पाहिल्यावर काही वाटले नव्हते; पण त्यांच्या निधनानंतर मला नोएडा येथे सनातन संस्थेच्या सत्संगाला जाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून माझी प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भाव यांमध्ये वाढ झाली. मला जेव्हा प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले, तेव्हा माझ्या यजमानांनी लिहिलेले गीत, हे केवळ गीत नव्हते, तर त्यामागे पत्नी आणि मुलगी यांना गुरुदेवांच्या चरणी (सान्निध्यात) सोडून जात आहे, हा संकेत होता, याचे स्मरण झाले.
- मिथिलेश पांडेय, प्रयाग (अलाहाबाद) (४.७.२०१५)

जयघोष करतांना रामनाथी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

श्रीमती रजनी नगरकर
प.पू. डॉक्टरांच्या जयजयकाराचे वृत्त समजण्याआधीच आनंद जाणवणे आणि समजल्यावर शरिरात आनंदाचे कारंजे उडत असल्याचे जाणवणे : ६.३.२०१५ या दिवशी दुपारी एका संतांच्या उपायांहून आम्ही दुपारी उशिरा आश्रमात आलो. महाप्रसाद घेतल्यानंतर विश्रांती घेत थोडा वेळ खोलीत पडले होते. आश्रमात येतांनाच का कोण जाणे; पण पोटातून आनंद जाणवत होता. मी जागी असतांनाच एका साधिकेने प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयजयकार झाला, हे वृत्त आनंदी होऊन कानात सांगितले. त्या वेळी या सुवर्णक्षणाला मी अनुपस्थित असल्याचे मला क्षणभर वाईट वाटले. नंतर आनंद होतोय का ?, असे आत डोकावून बघताच आश्रमात येतांनाच्या होणार्‍या आनंदाचे कारण समजले. हे वृत्त ऐकताच उत्साहाने भर्रकन उठले. माझ्या मनातून, हृदयातून, पोटातून आनंदाचे रंगीबेरंगी कारंजे उडत आहेत, असे जाणवत होते. आनंद मनात मावतच नव्हता.

जयघोष करतांना साधिकांना आलेली चैतन्याची अनुभूती !

श्रीमती मीरा करी
१. तीन आठवडे आधीपासून अंतर्मनातून जय गुरुदेव असा जयघोष होणे : अनुमाने ३ आठवड्यांपासून जर मला कुणी माझ्या सेवेतील चुका लक्षात आणून दिल्या, मला कुठल्याही स्वभावदोषावर नियंत्रण साध्य झाले किंवा काही गुणांची वृद्धी झाली; तर नकारात्मक विचारांपेक्षा शरणागत भावाने प्रार्थना आणि कृतज्ञता होण्यात वाढ झाली. चिंतन सारणी भरतांना आदर्श ध्येय साध्य झाले, तर गुरुदेवांनी मला जिंकवले, असे तीव्रतेने वाटून अंतर्मनातून जय गुरुदेव असा जयघोष होत होता आणि तो जयघोष करतांना मन कृतज्ञतेने भरून यायचे. त्या वेळी मला अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळायचा.

www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

' www.sanatan.org ' वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !

      प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. आता त्यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाल्याची घोषणा करून महर्षींनी साधकांना अनमोल भेटच दिली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करून साधकांनी त्यांचा कशा प्रकारे लाभ करून घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे ! - पू. (सौ.) अंजली गाडगीळ

शिव-पार्वती यांच्याप्रती कृतज्ञता !

पू. संदीप आळशी
     शिव-पार्वती यांच्यातील संवाद श्रवण करून महर्षींनी तो नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवला; म्हणून प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व आणि अवतारी कार्य यांची ओळख साधकांना, तसेच सार्‍या जगाला झाली. यासाठी आम्ही साधक महर्षींप्रमाणेच शिव-पार्वती यांच्याप्रतीही कोटी कोटी कृतज्ञ आहोत. 
- पू. संदीप आळशी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषासंदर्भात साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

        ६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले, काहींना पूर्वसूचना मिळाल्या, काहींना सूक्ष्मातील वैशिष्ट्ये जाणवली, तर काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून आणि सूक्ष्मातील वैशिष्ट्यांवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.

महर्षींनी सनातनच्या साधकांना सांगितलेल्या 'ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।' या नव्या मंत्रजपाचा प.पू. पांडे महाराज यांनी उलगडलेला गूढ भावार्थ !

प.पू. पांडे महाराज
महर्षींनी सनातनच्या साधकांसाठी दिलेला नवीन मंत्रजप करतांना साधकांना भावाच्या स्तरावर मंत्रजप करण्यात सुलभता यावी, यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेला मंत्राचा भावार्थ पुढे देत आहे.

१. प्रत्येक वाक्याचा अर्थ
अ. ॐ निसर्गदेवो भव । : भगवंताचे सगुण स्वरूपातील अवतरण !
आ. ॐ वेदम् प्रमाणम् । : वेदाला हे मान्य आहे.
इ. हरि ॐ जयमे जयम् । : हरण करणारा तो ईश्‍वर. ॐ हे ईश्‍वर तत्त्व आहे.
ई. जय गुरुदेव । : गुरुदेवांचा विजय असो !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः 
 दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : 'दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. 'स्वतःचे स्वतःला न उमजणे' म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. 'स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

अतीवृष्टी आणि अनावृष्टी यांच्या मुळाशी न जाता केवळ वरवरचे उपाय करणारी आतापर्यंतची शासने !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'कुठे अतीवृष्टी किंवा अनावृष्टी झाली, तर पीडित जनतेला साहाय्य करण्याचे नाटक सर्व शासने करतात. आपल्या धर्मात राष्ट्रावर येणार्‍या संकटांची पुढील कारणे सांगितलेली असूनही बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा पगडा असल्यामुळे शासने त्यासंदर्भात काहीच करत नाहीत आणि त्यांना त्याचे काहीही वाटत नाही.

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥
- कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा दोघेही धर्मपालक आणि साधना करणारे असले, तरच आपत्काळ येत नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता अल्प असते. हिंदु राष्ट्रातील प्रजा साधना करणारी असल्याने प्रजेवर अशी संकटे येणार नाहीत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     अहो रूपम् अहो ध्वनिः । म्हणजे (गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

साम्यवादी, निधर्मी आणि हिंदू !

संपादकीय 
     कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इब्राहिम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापण्यात आले. हिंदु भाविकांना हा प्रकार विचित्र वाटला; अर्थात् ते स्वाभाविकच होते. त्यामुळे जो असंतोष पसरला त्याला अनुसरून भाजपचे नेते श्री. सुनील कुमार यांनी हा विषय कर्नाटक राज्याच्या विधानसभेत मांडला. विधानसभा अध्यक्ष थीम्माप्पा यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला आणि शासनाला धारेवर धरले. त्याला उत्तर देतांना राज्याचे कायदामंत्री जयचंद्र म्हणाले, शिष्टाचार म्हणून जिल्हाधिकार्‍यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापले; मात्र यापुढे अशी चूक होणार नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn