Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
सूड उगवण्यासाठीच भारतावर आक्रमण केले ! - हेडलीचा खुलासा

भारताच्या मुळावर उठलेल्या जिहाद्यांना शासन धडा कधी शिकवणार ?
     मुंबई - सूड उगवण्यासाठीच भारतावर आक्रमण केले होते, असा खुलासा मुंबईतील २६/११ च्या आक्रमणातील आरोपी डेव्हिड हेडली याने त्याच्या उलटतपासणीत केला. या व्यतिरिक्त त्याने इतरही काही खुलासे केले.
१. ७ डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय सैन्याच्या विमानांनी माझ्या शाळेवर आक्रमण केले. यात तेथे काम करणारे अनेक लोक मारले गेले. तेव्हापासून माझ्या मनात भारताविषयी तिरस्काराची भावना होती आणि आहे. त्याचाच सूड घेण्यासाठी मी मुंबईवर आक्रमण केले.
२. अमेरिकेत शिवसेनेसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करून बाळासाहेब ठाकरे यांना बोलावण्याचा विचार होता. त्यासाठी मी राजाराम रेगेच्या संपर्कातही होतो. या संदर्भात लष्कर-ए-तोयबाशी केवळ चर्चा झाली होती. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसती, तर उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसेना नेत्यांना या कार्यक्रमाला बोलवण्याचा विचार होता; मात्र त्या वेळी अमेरिकेत त्यांच्यावर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे होळीच्या दिवशी रंग उडवल्याच्या कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !

धर्मांधांचा उद्दामपणा !
      फतेहपूर - येथील आलमपूर गावात २३ मार्चला होळी खेळत असतांना रेहान नावाच्या युवकावर रंग टाकण्यावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यात सरपंच, त्यांचा भाऊ आणि ४ जण घायाळ झाले. त्यांनी सरपंचांच्या भावाचे घर जाळले. रंग टाकल्यामुळे सरपंच कृष्णपाल यांचा पुतण्या सचिन आणि रेहान यांच्यात प्रथम मारामारी झाली. या वेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत त्यांना शांत केले होते; मात्र काही वेळाने मुल्लनपूर येथून अनेक धर्मांध लाठीकाठी घेऊन आले आणि त्यांनी कृष्णपाल, त्यांचा भाऊ आणि अन्य हिंदू यांना मारहाण चालू केली, तसेच त्यांचे घर जाळले. या वेळी हिंदूंनी संघटित होऊन त्यांना प्रत्युत्तर दिल्यावर धर्मांध पळून गेले.


त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करू पहाणार्‍या धर्मद्रोही तृप्ती देसाई पोलिसांच्या कह्यात

धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना धर्माभिमानी महिलांनी केला प्रखर विरोध 
वारंवार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या 
तृप्ती देसाई यांना शासन जिल्हा बंदी का करत नाही?
      नाशिक - धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी २५ मार्चला सकाळी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश केला आणि नंतर गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. तृप्ती देसाई त्र्यंबकेश्‍वर येथे येणार असल्याची माहिती गावातील महिलांना मिळाली होती. त्यामुळे देसाई यांना विरोध करण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने जमल्या होत्या. या धर्माभिमानी महिलांनीही तृप्ती देसाई यांना धक्काबुक्की करत प्रखर विरोध केला. (धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी जागृत असणार्‍या त्र्यंबकेश्‍वरमधील धर्माभिमानी महिलांचे अभिनंदन ! - संपादक) या अगोदरही तृप्ती देसाई यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखले होते.
      २५ मार्चला सकाळी ९.३० वाजता तृप्ती देसाई काही महिला कार्यकर्त्यांसह त्र्यंबकेश्‍वर येथे आल्या होत्या. देसाई यांनी मंदिरात प्रवेश केला; मात्र गाभारा बंद असल्यामुळे त्या गाभार्‍यात प्रवेश करू शकल्या नाहीत. मंदिरातून बाहेर पडत असतांना त्यांना गावातील धर्माभिमानी महिलांनी विरोध करत खडसावले.
     आम्ही तुम्हाला गाभार्‍यात कधीही प्रवेश करू देणार नाही, अशी चेतावणी देत या महिलांनी तृप्ती देसाई यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही दिल्या. त्यानंतर पोलिसांनी देसाई यांना कह्यात घेतले.

आधुनिक औरंगजेबांना पराभूत करून हिंदु राष्ट्र स्थापणार !

संभाजीनगरच्या हिंदु धर्मजागृती सभेतील मावळ्यांचा निर्धार ! 
डावीकडून पू. (कु.) स्वाती खाडये (दीपप्रज्वलन करतांना),
पू. नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट आणि श्री. टी. राजासिंह
      संभाजीनगर - हिंदूंच्या गौरवशाली इतिहासातील शूरवीर राजा कृष्णदेवराय यांची राजधानी असलेल्या संभाजीनगरला अजिंक्य अशा देवगिरी किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शूरवीर राजाचा वारसा घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून संभाजीनगरच्या मावळ्यांनी आधुनिक औरंगजेबांना पराभूत करून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. २५ मार्च या दिवशी येथील कडा ऑफीस पटांगण, डॉ. हेडगेवार रुग्णालयाजवळ, गारखेड परिसर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी भाग्यनगर येथील भाजप आमदार श्री. टी. राजासिंह, सनातनचे पू. नंदकुमार जाधव, पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना जाज्ज्वल्य मार्गदर्शन केले.

(म्हणे) हिंदूंच्या मंदिरावर अन्य धर्मियांची नियुक्ती करण्याचा कायदा करा ! - कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा आदेश

मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवर मुसलमानाचे नाव छापल्याचे प्रकरण
  • अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी कधी असा आदेश देण्याचे धाडस दाखवले गेले असते का ?
  • हिंदूंनो, कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा हा आदेश रहित करण्याची मागणी करा !
      बेंगळुरू - दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात आल्यावर हा विषय राज्याच्या विधानसभेत भाजपचे नेते सुनील कुमार यांच्याकडून मांडण्यात आला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष कागोडू थीम्माप्पा यांनी शासनास धारेवर धरले. कायदामंत्री टी.बी. जयचंद्र यांनी शिष्टाचार म्हणून जिल्हाधिकार्‍याचे नाव मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आले, अशी बनवाबनवी केली; मात्र यापुढे अशी चूक होणार नाही, असे आश्‍वासन दिले; मात्र कागोडू थीम्माप्पा यांनी हा कायदा योग्य नसून तो पालटण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या मंदिरातील उत्सवाची देखरेख कुठलाही धर्मीय करू शकेल, असा पालट करण्याचे आदेश त्यांनी शासनाला दिला. त्यावर मंत्री जयचंद्र यांनी तशी सुधारणा करण्याचे मान्य केले.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्या युतीला पनून कश्मीर संघटनेचा विरोध !

      जम्मू - जम्मू-काश्मीर राज्यात भाजप आणि पीडीपी यांच्यातील युतीला काश्मिरी हिंदूंची संघटना पनून कश्मीरने तीव्र विरोध केला आहे. या संघटनेने जम्मू येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगु आणि संयोजक डॉ. अग्नीशेखर यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली.
१. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युतीमुळे देशाच्या एकतेला अन् अखंडतेला धोका पोहोचेल.
२. सध्या मवाळ वाटणारा फुटीरतावादी गट युतीमुळे अधिक जहाल होण्याची दाट शक्यता आहे.
३. इसिससारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असणारे काश्मीरमधील आतंकवादी गट जम्मू-काश्मीरला गिळू पहात आहेत, हे गेल्या काही दिवसांतील घटनांमधून सिद्ध झाले आहे. या गटाने स्थानिक लोकांची एकता आणि आतंकवादी आक्रमणे अशा दुधारी शस्त्रांचा वापर करणे चालू केले आहे.
४. यापूर्वीही काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकांचे श्रेय पीडीपीने पाकिस्तानला देत त्यांचे शासन हुरियतच्या पाठिंब्याने स्थापन झाले, असे उघडपणे स्वीकारले होते. आता केंद्रशासनाच्या संमतीने फुटीरतावादी शक्तींशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इस्लामी कायदे संविधानापेक्षा श्रेष्ठ आहेत का ? - काँग्रेसचे प्रवक्ता अधिवक्ता मनीष तिवारी यांचा प्रश्‍न

सत्तेत असतांना काँग्रेसच्या हे लक्षात आले नाही कि मतांसाठी लक्षात येऊनही दुर्लक्ष केले ?
     नवी देहली - मुसलमानांचा जो कायदा ३ वेळा तलाक म्हटल्यावर घटस्फोटाला मान्यता देतो, तो भारतीय राज्यघटनेच्याही वर आहे का ? मुसलमान महिलांना एकतर्फी घटस्फोटात सुरक्षा निश्‍चित करायला नको का ?, असे प्रश्‍न काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अधिवक्ता मनीष तिवारी यांनी ट्विटरद्वारे केले आहेत. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आमचे कायदे कुराणवर आधारित असल्याने ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, असे म्हटले होते. त्यावर तिवारी यांनी वरील ट्विट केले आहे; मात्र नंतर त्यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


देहलीत क्षुल्लक कारणावरून नासीर आणि त्याच्या १५ सहकार्‍यांनी केलेल्या मारहाणीत डॉ. पंकज नारंग यांचा मृत्यू

  • दादरी येथील अखलाकच्या हत्येवरून अकांडतांडव करणारे ढोंगी सहिष्णुतावादी देहलीतील अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प रहातात !
  • रोहित वेमुलाच्या प्रकरणी अश्रू ढाळणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या राज्यातील या घटनेवर कधी बोलणार ?
      नवी देहली - येथील विकासपुरीमध्ये दुचाकीवरून जातांना रबरी चेंडू लागल्याच्या वादानंतर नासीर, आमीर यांच्यासह १५ जणांनी केलेल्या मारहाणीत डॉ. पंकज नारंग यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नासीर या प्रमुख आरोपीसह आमीर आणि अन्य ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पळून गेलेल्या उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
     २४ मार्चला रात्री नारंग त्यांच्या मुलांबरोबर क्रिकेट खेळत असतांना दुचाकीवरून जाणार्‍या नासीरला चेंडू लागला. या वेळी नारंग यांनी त्यांची क्षमा मागितली; परंतु नासीर काही वेळाने त्यांच्या १५ साथीदारांना घेऊन तेथे परत आला आणि त्यांनी नारंग यांना घराबाहेर खेचून हॉकी स्टीक आणि लोखंडी सळीने अमानुष मारहाण केली. डॉ. नारंग यांच्या साहाय्यासाठी आलेल्यांनाही नासीर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली.

मुंबईत हिंदुत्ववादी संघटनांसह विविध ठिकाणी निवेदने देऊन जागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या होळी आणि 
रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखण्याची मोहीम ! 
भांडुप - डावीकडून पोलीस उपनिरीक्षक श्री. राव, समितीचे श्री. कुणाल चेउलकर आणि श्री. गणेश पाटील
खारघर, नवी मुंबई - डावीकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप काळे,
गोरक्षक श्री. संदीप शर्मा आणि पूज्यपाद आसारामजी बापू संप्रदायाचे साधक श्री. प्रदीप चौटेले
         मुंबई - रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप, नालासोपारा, दादर, वरळी, शिवाजी पार्क, माहीम, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि नवी मुंबई या ठिकाणी निवेदन देण्यात आले.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

मुंबई येथे मद्य पिऊन वाहन चालवणार्‍या ६९७ जणांच्या विरोधात पोलिसांची कारवाई !

हिंदु जनजागृती समितीच्या होळी आणि धूलिवंदन
या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्याविषयीच्या मोहिमेचा परिणाम !
          मुंबई, २५ मार्च (वार्ता.) - राज्यातील दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई तसेच हिंदु जनजागृती समिती अन् मुंबई पोलीस यांनी केलेली जनजागृती यामुळे यंदाचे धूलिवंदन शहरात शांततेत साजरे झाले. मद्य पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांमध्येही काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. २४ मार्च या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मद्यपान करून गाडी चालवणार्‍या ६८७ जणांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी ही संख्या ७४९ इतकी होती. इतरही गुन्ह्यांमध्ये काहीशी घट झाल्याचे या वर्षी दिसून आले. हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या मोहिमेमुळे होळी आणि रंगपंचमी या सणांमधील अपप्रकार घटण्यात प्रशासन आणि पोलीस यांना यश आले आहे.

पाकिस्तानकडून भारतीय नागरिकाला पाकिस्तान झिंदाबाद म्हणण्यासाठी मारहाण !

      पाकच्या समर्थनार्थ घोषणा देण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांकडून मारहाण केली जाते, तर भारतात भारतमाता की जय म्हणण्याचे काही जणांना वावडे असते. भारत शत्रूराष्ट्र पाकिस्तानकडून राष्ट्रप्रेम शिकेल का ?
      अमृतसर - पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिकाला पाकिस्तान झिंदाबाद म्हणण्यासाठी मारहाण करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उत्तरप्रदेशात रहाणार्‍या या भारतीय नागरिकाचे सतबीर सिंह असे नाव असून या मारहाणीत सिंह यांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांना कित्येक महिने पाकिस्तानातील रुग्णालयात उपचारासाठी रहावे लागणार आहे. मला गोळी मारली तरी चालेल; पण मी पाकिस्तान झिंदाबाद म्हणणार नाही, असे सिंह यांनी म्हटले होते. (राष्ट्रप्रेमासाठी प्रसंगी प्राणही द्यायला सिद्ध असणारे सतबीर सिंह यांचे अभिनंदन ! सिंह यांसारखे राष्ट्राभिमानी सर्वत्र सिद्ध व्हायला हवेत ! - संपादक) पाकिस्तानातील लांडी कारागृहातून सुटका करण्यात आलेल्या ८६ मच्छीमारांमध्ये सतबीर सिंह यांचाही समावेश आहे.

निगडे (जिल्हा पुणे) येथील सामूहिक होळी उपक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

      भोर (जिल्हा पुणे) - येथील निगडे या गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या धर्मशिक्षणवर्गातील सर्व धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून २३ मार्च या दिवशी सामूहिक होळी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्री महालक्ष्मी मंदिर ते ग्रामदैवत श्री महाकाली मंदिरापर्यंत होळीनिमित्त प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी उपस्थितांना होळीचे महत्त्व, शास्त्र आणि होळी उत्सवामध्ये होणारे अपप्रकार यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ८० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी आयोजित केला होता.
क्षणचित्रे
१. होळीच्या संदर्भातील धर्मशिक्षण देणारे फलक घेऊन धर्मप्रेमी फेरीत सहभागी झाले होते.
२. अनेक ग्रामस्थ होळीच्या ठिकाणी भूमीवर नैवेद्य ठेवत होते. त्या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी त्यांचे प्रबोधन केले. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! - संपादक)

क्रांतीवीर सुखदेव समजून क्रांतीवीर भगतसिंग यांना आदरांजली !

मंत्रालयातील कार्यक्रमात चूक !
          मुंबई, २५ मार्च (विशेष प्रतिनिधी) - भगतसिंग यांच्याच छायाचित्राखाली सुखदेव असे नाव चिकटवलेल्या प्रतिमेला २३ मार्च या दिवशी मुख्यमंत्र्यांसह अन्य अधिकार्‍यांनी आदरांजली वाहिली. तसेच या प्रतिमांसमवत छायाचित्रेही काढून घेतली. तथापि ही चूक लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याची घोषणा विधानसभेत केली. (अधिकार्‍यांनी महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या नियोजनात केलेली ही चूक अक्षम्यच आहे. ज्या क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे आपण स्वांतत्र्य उपभोगू शकतो, त्यांच्याप्रतीची ही असंवेदनशीलता आहे. - संपादक)

काश्मीरमध्ये फडकवला पाकिस्तानचा झेंडा !

भारत या देशद्रोह्यांना शिक्षा करणार कि नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार ?
पाकदिनाला फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांच्या समर्थकांकडून देशद्रोही कृत्य
      श्रीनगर - दुख्तरन-ए-मिल्लत या संघटनेच्या फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांच्या समर्थकांनी पाकदिनाला पाकिस्तानचा झेंडा फडकवला. मागील वर्षीही त्यांनी अशाच प्रकारे पाकचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २३ मार्च हा पाकदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी आणि आसिया अंद्राबी यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना नवी देहलीतील पाक उच्चायुक्तालयातून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अंद्राबी उपस्थित नव्हत्या; मात्र त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानचा झेंडा फडकवून पाकप्रेम प्रकट केले.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशविरोधी घोषणा देणार्‍या ४ जणांची ओळख पटली !

देशविरोधी घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करणार कि 
केवळ वरवरची चौकशी करून त्यांना सोडून देणार ?
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या समितीला काही केंद्रीय विद्यालयांमध्ये शिकणारे काश्मिरी विद्यार्थी आणि एक पत्रकार यांची नुकतीच ओळख पटली असून त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. 
      ९ फेब्रुवारी या दिवशी जेएन्यूच्या परिसरात बाहेरच्या लोकांनी घोषणा दिल्याचे उच्चस्तरीय अन्वेषण समितीने तिच्या अहवालामध्ये म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी देशविरोधी घोषणा देणार्‍या ४ जणांना ओळखले असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. हे सर्व काश्मिरी असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी स्वत: देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, तसेच जमावालाही तशा घोषणा देण्यासाठी उत्तेजन दिले होते. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असल्यामुळे अद्याप त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. या प्रकरणात दोघे भाऊ असून एक जेएन्यूचा, तर दुसरा अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी आहे.

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे राष्ट्राभिमान्यांकडून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतामाता की जय म्हणण्यास विरोध केल्याचे प्रकरण
सांगोला (जिल्हा सोलापूर) - भारतमातेच्या जयजयकारास विरोध करणार्‍या एम्.आय.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा, अशी मागणी येथील राष्ट्राभिमान्यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील आणि पोलीस निरीक्षक अजय कदम यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री अरविंद केदार, बापूसाहेब भाकरे, नगरसेवक अरुण बिले, रमेश जाधव, बापूसाहेब ठोकळे, बाळासाहेब शिंदे, प्रताप इंगोले, संजय बाबर, भारत साळुंखे, तानाजी गोडसे, तुषार इंगळे यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर येथेही उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
      सोलापूर - येथेही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एम्.आय.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांना देण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे कु. अर्चना कडगंची, सर्वश्री बाबुराव कोळी, गजानन दलभंजन, किरण मंजुळे, कुलदीप उकीरडे, किशोर पुकाळे, विनायक नराल, सचिन कोनापुरे, समीर दीक्षित उपस्थित होते.

निगडे (जिल्हा पुणे) येथील सामूहिक होळी उपक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

      भोर (जिल्हा पुणे) - येथील निगडे या गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या धर्मशिक्षणवर्गातील सर्व धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून २३ मार्च या दिवशी सामूहिक होळी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्री महालक्ष्मी मंदिर ते ग्रामदैवत श्री महाकाली मंदिरापर्यंत होळीनिमित्त प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी उपस्थितांना होळीचे महत्त्व, शास्त्र आणि होळी उत्सवामध्ये होणारे अपप्रकार यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ८० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी आयोजित केला होता.
क्षणचित्रे
१. होळीच्या संदर्भातील धर्मशिक्षण देणारे फलक घेऊन धर्मप्रेमी फेरीत सहभागी झाले होते.
२. अनेक ग्रामस्थ होळीच्या ठिकाणी भूमीवर नैवेद्य ठेवत होते. त्या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी त्यांचे प्रबोधन केले. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! - संपादक)

प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावे, यासाठी कायदा करा ! - योगऋषी रामदेवबाबा यांची मागणी

हिंदूंनो, अन्य धर्मियांचे कोणतेही धर्मगुरू अशा प्रकारची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
     वडोदरा (गुजरात) - आपल्या राज्यघटनेत भारत माता की जय म्हटले पाहिजे, असे कुठे लिहिलेले नसले, तरी कुणालाही ते म्हणण्याची समस्या नसावी. त्यामुळे कायद्यात तशी तरतूद करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक जण ते म्हणू शकेल, असे मत योगऋषी रामदेवबाबा यांनी व्यक्त केले आहे. वडोदरा येथे विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढवण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

जनावरांची वाहतूक करणार्‍या ट्रकला लागलेल्या आगीत पाच म्हशींचा होरपळून मृत्यू

हिंदू एकता आंदोलनच्या
 युवकांमुळे सात म्हशी वाचल्या !
         सातारा, २५ मार्च (वार्ता.) - पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिवराज पेट्रोल पंपाजवळ जनावरांची वाहतूक करणार्‍या ट्रकला २२ मार्चला सायंकाळी आग लागली. या ट्रकमध्ये १२ पैकी ५ म्हशींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. हिंदू एकता आंदोलनच्या युवकांच्या सतर्कतेमुळे सात म्हशी वाचल्या आहेत. या वेळी युवकांनी ट्रकचालक आणि मालकाला अटक केल्याशिवाय महामार्गावरील ट्रक हालवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महामार्गावर काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय इतिहास संशोधन मंडळाची सल्लागार समिती अखेर विसर्जित

     नवी देहली - जानेवारी मासात मोदी शासनाने भारतीय इतिहास संशोधन मंडळाची पुनर्रचना करून अध्यक्षपदी वाय. सुदर्शन राव यांची १८ नवीन सदस्यांसह नियुक्ती केली होती. आता या मंडळाची सल्लागार समितीही विसर्जित (बरखास्त) केली आहे. या मंडळाचे अधिकृत नियतकालिक प्रकाशित होते. त्याच्या संपादकीय मंडळात भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे १८ सदस्य आहेत. या खेरीज २१ जणांची सल्लागार समिती आहे. काँग्रेस शासनकाळात नियुक्त झालेल्या या सल्लागार समितीमध्ये हिंदुद्वेष्ट्या रोमिला थापर, इरफान हबीब यांच्यासह देश-विदेशातील २१ इतिहासतज्ञ नेमले गेले होते. सल्लागार समितीचे सचिव गोपीनाथ रवींद्रन् यांच्या माहितीनुसार या सल्लागार समितीला विसर्जित करण्याची मागणी करण्यात येत होती. शेवटी या आठवड्यात झालेल्या भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष वाय. सुदर्शन राव यांनी हा निर्णय संपूर्णत: प्रशासकीय असून त्यात कुठल्याही राजकारणाचा भाग नाही, असे म्हटले आहे.

भारतात २७ कोटी ५० लाख जनता तंबाखूच्या आधीन ! - केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची संसदेत माहिती

गेल्या ६९ वर्षांमध्ये देशाने केलेली प्रगती !
शहरी भागातील ३० टक्के पुरुष करतात मद्यपान !
     जनतेला व्यसनापासून दूर ठेवू न शकणारे शासन लोकशाही निरर्थक ठरवतात ! केवळ वर्षातून एकदा व्यसनमुक्तीदिन पाळण्यासारखी वरवरची उपाययोजना करून काही उपयोग होणार नाही, तर जनतेला साधना आणि धर्माचरण शिकवल्यास ती खर्‍या अर्थाने व्यसनमुक्त होऊ शकते !
     नवी देहली - देशभरातील २७ कोटी ५० लाख नागरिक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत आहेत. यात ४८ टक्के पुरुष आणि २० टक्के महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी संसदेत दिली आहे. शहरी भागातील ३० टक्के पुरुष मद्यपान करतात, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागण्यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुणे - विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १३ मार्च या दिवशी पुणे-सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या चौकात विविध धर्म आणि राष्ट्र्र हितकारी सूत्रांसाठी आंदोलन करण्यात आले होते. महालक्ष्मी कारागृहातील प्रसाद कैद्यांकडून बनवून घेण्याचा प्रस्ताव रहित करण्यात यावा, पम्पोरमध्ये भारतीय सैनिक आतंकवाद्यांशी लढत असतांना मशिदीमधून आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. अशा मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे. इशरतजहाँ प्रकरणाच्या संदर्भातील अहवाल पालटणार्‍या पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागण्या आंदोलनाच्या कालावधीत करण्यात आल्या होत्या. या व्यतिरिक्त देशभरात विविध ठिकाणी हिंदुत्ववाद्यांच्या होणार्‍या हत्यांचाही निषेध करण्यात आला होता. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या मागण्या आणि स्वाक्षरी मोहिमेद्वारे त्याला मिळालेल्या प्रतिसादाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या वेळी पतित पवन संघटनेचे श्री. विजय गावडे, शिवप्रताप यादव, हिंदु एकता आघाडीचे विशाल पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

अमरावती येथे पोलीस आयुक्तांना ओवैसी यांच्या विरोधात कारवाई करण्याविषयी निवेदन

पोलीस आयुक्तांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
        अमरावती, २५ मार्च - ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल-मुस्लिमीन (एम्आयएम्) पक्षाचे खासदार अससुद्दिन ओवैसी हे नेहमीच राष्ट्रद्रोही आणि हिंदुविरोधी विधाने करत असूनही त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांंच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीने केली. निवेदन देतांना हिंदू महासभेचे सर्वश्री विक्रांत अलगुजे, सुधीर देशपांडे तपेश हंबर्डे, सुरज देवहाते, भगवा सेनेचे श्री. नितीनजी व्यास, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, भगवे वादळ संघटनेचे श्री. अतुल खोंड, शिवप्रतिष्ठानचे श्री. महेश लडके आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह २२ धर्मप्रेमी उपस्थित होते.

अधिवेशनात व्यत्यय न येण्यासाठी त्यागपत्र दिले ! - श्रीहरि अणे यांचे स्पष्टीकरण

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर ठाम
          मुंबई, २५ मार्च (विशेष प्रतिनिधी) - स्वतंत्र राज्याच्या मागणीच्या कारणांचा विचार होऊन त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. हे प्रश्‍न मांडणार्‍यांचा बळी देऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. विधीमंडळ कामकाजात व्यत्यय येऊ नये, यासाठीच त्यागपत्र दिले आहे, असे राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांनी आपली भूमिका २३ मार्च या दिवशी एका निवेदनाद्वारे मांडली आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही सोडणार नाही, असा हेका त्यांनी कायम ठेवला असून मला राज्यपाल अथवा मुख्यमंत्री यांनी त्यागपत्र देण्यास सांगितलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
         त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीविषयी आवाज उठवतच रहाणार. त्यामुळे विधीमंडळ कामकाज बंद पडत रहाणार. या परिस्थितीत कोणीतरी माघार घ्यायलाच हवी. जर महाधिवक्ता या नात्याने जनतेच्या हिताचे रक्षण करणे, हे माझे प्रथम कर्तव्य आहे. जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी विधीमंडळाचे कामकाज चालू रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यागपत्र हाच एक पर्याय शिल्लक होता.

देशातील प्रत्येक ३ नागरिकांपैकी २ नागरिक प्राशन करतात डिटर्जन्ट मिश्रित दूध ! - केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन

केंद्रीयमंत्र्यांनी केवळ माहिती न देता त्यावर काय उपाययोजना केली आणि जनतेच्या आरोग्याशी 
खेळणार्‍या उत्तरदायींना कठोर शिक्षा देण्यासाठी काय केले, हे सांगणे अपेक्षित आहे !
      नवी देहली - देशातील प्रत्येक ३ नागरिकांपैकी २ नागरिक प्राशन करत असलेल्या दुधात डिटर्जन्ट, कॉस्टिक सोडा, युरिया आणि रंग मिसळला जातो, असे केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 
डॉ. हर्षवर्धन यांनी पुढे म्हटले आहे की,
१. देशामध्ये विकल्या जाणार्‍या दुधापैकी ६८ टक्के दूध फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अ‍ॅथोरिटीच्या (एफ्एस्एस्एआयच्या) कसोटीवर उतरत नाही.
२. एफ्एस्एस्एआयने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार दुधात पाण्याची भेसळ अधिक प्रमाणात होते. जर दुधात मिसळलेल्या पाण्यामध्ये कीटनाशक, तसेच जड धातू असतील, तर आरोग्यासाठी ते हानीकारक आहे. 
३. दूध पिशव्यांमध्ये बंद करतांना लक्षपूर्वक बंद न केल्याने त्यात आसपासचे डिटर्जन्ट आणि घातक रसायने मिसळतात. असे दूध आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असून कॉस्टिक सोडा, युरिया यांमुळे गॅस्ट्रो, हृदयविकार, कर्करोग यांसारखे रोग उद्भवू शकतात. प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो.

देशद्रोही विद्यार्थ्यांना समर्थन देणार्‍या मूर्ती क्लासीकल लायब्ररीचे भारतद्वेष्टे सल्लागार शेल्डन पोलॉक यांना हटवण्याची मागणी !

देशातील १३२ विचारवंत आणि अभ्यासक यांनी इन्फोसिसचे 
संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे केली मागणी !
     नवी देहली - सहा वर्षांपूर्वी इन्फोसिस या प्रख्यात आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सुमारे ७०० कोटी रुपयांची देणगी देऊन हॉवर्ड विश्‍वविद्यालय आणि हॉवर्ड विश्‍वविद्यालय मुद्रण आस्थापना यांच्या संयुक्त विद्यमाने द्विभाषिक प्रकाशनांची मालिका प्रकाशित करण्यासाठी महत्वाकांक्षी मूर्ती क्लासीकल लायब्ररी ऑफ इंडिया या प्रकल्पाची स्थापना केली होती. या प्रकल्पाच्या अंतर्गत भारतातील अभिजात ग्रंथ हे मूळ भाषेसहित इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात येतात. या प्रकल्पाच्या सल्लागार आणि संपादक पदावर शेल्डन पोलॉक यांची नेमणूक करण्यात आली होती. ९ फेब्रुवारी या दिवशी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील (जेएन्यूमधील) विद्यार्थ्यांनी भारतविरोधी आंदोलन केले. त्याला या पोलॉक महाशयांनी समर्थन देऊन भारताच्या एकता आणि अखंडतेचा अनादर केला; म्हणून त्यांना या पदावरून काढून टाकावे, अशी मागणी देशातील १३२ विचारवंत आणि अभ्यासक यांनी नारायण मूर्ती आणि त्यांचे पुत्र रोहन मूर्ती यांना पत्र देऊन केली आहे. त्यात समावेश असलेल्या देहली विश्‍वविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख मकरंद परांजपे यांनी या विरोधाची कारणे स्पष्ट केली आहेत.

अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळवण्यासाठी पहा : www.sanatan.org
फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशमध्ये होळीचा रंग उडवल्याचा आरोप करत धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !
     उत्तरप्रदेश राज्यातील आलमपूर गावात होळी खेळत असतांना रेहान नावाच्या युवकावर रंग टाकण्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात सरपंच, त्यांचा भाऊ आणि ४ जण घायाळ झाले. सरपंचाच्या भावाचे घरही जाळण्यात आले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Uttar Pradeshke Alampurme Holika rang lagneka karan dekar dharmandhone Hinduopar akraman kiya.
Dadri hatyakand par shor machanewale ab chup kyon hai ?
जागो ! : उत्तरप्रदेश के आलमपूर में होली का रंग लगने का कारण देकर धर्मांधों ने हिन्दुआें पर आक्रमण किया.
दादरी हत्याकांड पर शोर मचानेवाले अब चुप क्यों हैं ?


महाराष्ट्राचे तुकडे करणे मान्य नाही ! - श्रीपाल सबनीस

        चिंचवड - श्रीहरि अणे महाधिवक्ता पदावर असतांना मराठवाडा, विदर्भ तोडण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे पाप महाराष्ट्रानेच नेमलेला अधिवक्ता करत आहे, हे दुर्दैव आहे. या दोन्ही भागांवर अन्याय झाला, हे मान्य केले तरीही महाराष्ट्राचे तुकडे करणे कदापि मान्य नाही, असे वक्तव्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी चिंचवड येथे शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत बोलतांना केले.
         ते पुढे म्हणाले की, येथील शेतकरी, दलित, आदिवासी कोणीच सुखी नाही. स्त्रिया सुरक्षित नाहीत. सहस्रो शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुष्काळाने कंबरडे मोडलेले शेतकरी कर्जबाजारी झाले. ते मुलींचे विवाह आणि मुलांचे शिक्षण करू शकत नाहीत. बसचा पास मिळत नाही म्हणून लातूरच्या तरुण मुलीला आत्महत्या करावी लागते, सध्या विस्फोटक परिस्थिती आहे. मरण स्वस्त, तर जीवन महाग झाले आहे. सांस्कृतिक विकृती निर्माण होतात, भ्रष्टाचाराचा पूर वहातो. ९२ वर्षांच्या वृद्धेवरही बलात्कार होतो. मनुष्यजात किती नालायक आहे, त्याचे उदाहरण पहायला मिळते.

सातारा येथील वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी यांना राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महर्षी बादरायण व्यास पुरस्कार प्रदान !

        सातारा, २५ मार्च (वार्ता.) - येथील वेदशास्त्रसंपन्न संस्कृत पंडित वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी यांना नुकताच राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते महर्षी बादरायण व्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्र्रपतीभवनामध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. या वेळी वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी आणि त्यांच्या कुटुंबातील मान्यवर मंडळीही उपस्थित होती.
        वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री काशीनाथशास्त्री जोशी (कोडणीकर) यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४२ या दिवशी सातारा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेदाध्ययन केले. तेच त्यांचे प्रथम गुरु. त्यांनी न्यायशास्त्र, काव्य, वेदांतशास्त्र इत्यादी विषयांचे वेदशास्त्रसंपन्न हरिरामशास्त्री शुक्ला यांच्याकडे अध्ययन केले. संकेश्‍वरपिठाधिश्‍वर विद्याशंकरभारती स्वामी, कांचीकामकोटी पिठाधिश्‍वर श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराज आणि वेदमूर्ती शंकरभट्ट गाडगीळ हे त्यांचे गुरुवर्य आहेत. महाराष्ट्र्रातील आणि महाराष्ट्र्राच्या बाहेरील अनेक नामवंत संस्था आणि मठ यांनी त्यांचा यापूर्वी यथोचित सन्मान केला आहे. न्यायशास्त्र हा विषय त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिकवला आहे. त्यांचे दोन चिरंजीव न्यायशास्त्र पंडित आहेत. वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी माची पेठेतील श्रीशंकराचार्य वेदशास्त्र पाठशाळेमध्ये ४५ वर्षे संस्कृत प्राचीन ग्रंथांचे अध्यापनही केले आहे. याच पाठशाळेत वास्तव्यास असलेल्या वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्र्रासह देशात विविध ठिकाणी धर्मशास्त्र, भागवत, देवी भागवत, वेद-पुराणे आदी विषयांवर शेकडो प्रवचने दिली आहेत. श्रीमद् भागवताच्या १२५ सप्ताहात त्यांनी प्रवचने दिली आहेत. विद्वतसभा, चर्चासत्र यांचे आयोजन करून त्यांनी संस्कृत, वेद वेदांत यांच्या प्रसाराचे कार्यही केले आहे. विद्यापिठांच्या महावाक्य सभांमध्येही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

अल्पसंख्यांकांना मिळणार्‍या सुविधांमुळे अनेक हिंदूंच्या मनात अल्पसंख्य होण्याचे विचार ! - प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

     डिचोली - सध्याचे राज्यकर्ते अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने अनेकांना आपण अल्पसंख्य झाल्यास बरे, असा विचार येत आहे. अल्पसंख्य झाल्यास अनेक सुविधा मिळत असल्याने असा विचार केला जात आहे. यामुळे गोमाता, भारतीय संस्कृती, स्वभाषा यांचे काय होईल ? असा प्रश्‍न पडला आहे, असे प्रतिपादन गोव्यातील तपोभूमी येथील पिठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी सिकेरी, मये येथे भारत स्वाभिमान आणि गोमंतक गोसेवक महासंघ संचालित गोशाळेच्या कृषक गौरव महोत्सवात केले. या वेळी व्यासपिठावर गोवा विधानसभेचे सभापती अनंत शेट, आमदार डॉ. प्रमोद सावंत, भारत स्वाभिमानचे गोवा प्रभारी कमलेश बांदेकर, गोसेवक महासंघाचे अध्यक्ष कमलाकांत तारी, आदींची उपस्थिती होती.
     प.पू. स्वामी महाराज पुढे म्हणाले, हिंदु धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय ही सर्वांसाठी पूजनीय असल्याने तिचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. घरातील दु:ख शोषणाची शक्ती गायीच्या अंगात आहे. ३३ कोटी देवता जिच्यामध्ये वास करतात, ती पूजनीय असून हिंदु धर्माची सर्वांत मोठी देवता गोमाताच आहे. सिकेरी गावात गोशाळा उभारून एक क्रांतीकारी पाऊल या कार्यकर्त्यांनी उभारले आहे. या वेळी इतरांचीही भाषणे झाली.

गोव्यातील आंबेगाळ येथे विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारामुळे विषबाधा !

एक योजनाही योग्य प्रकारे राबवू न शकणारा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवेल ? 
     साखळी - आंबेगाळ, पाळी येथील शासकीय प्राथमिक शाळेत दिल्या गेलेल्या माध्यान्ह आहारातील भाजीपाव खाल्ल्याने शिक्षिकेसह १७ विद्यार्थ्यांना २३ मार्च या दिवशी विषबाधा झाली. पिळये, धारबांदोडा प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करून या सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे. विषबाधेची माहिती मिळताच पाळी पंचायतीचे सरपंच अनंत परब आणि माजी सरपंच महेश गावस यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे धाव घेतली. भाग शिक्षणाधिकारी ज्योती हिंदे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चौकशी केली.
मामलेदारांनी देवस्थान समितीवर दबाव आणू नये ! - उपमुख्यमंत्री, गोवा

देवस्थानच्या संपत्तीच्या संदर्भात मामलेदारांनी आदेश काढल्याचे प्रकरण !
गोवा राज्य देवस्थान कृती समितीने घेतली उपमुख्यमंत्री डिसोझा यांची भेट
     म्हापसा - पेडणे आणि डिचोली तालुक्यांतील मामलेदारांनी संबंधित तालुक्यांतील सर्व देवस्थान समित्यांनी देवस्थानची संपत्ती आणि दानपेटी यांच्या चाव्या प्रशासक या नात्याने मामलेदारांकडे सुपुर्द करण्याचा आदेश देवस्थान समित्यांना दिला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या गोवा राज्य देवस्थान कृती समितीने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची पर्वरी येथील सचिवालयात भेट घेतली. मामलेदारांच्या उपरोल्लेखित आदेशामुळे देवस्थान समित्यांवर अन्याय झाल्याचे समितीने उपमुख्यमंत्री डिसोझा यांच्या लक्षात आणून दिले.

अणे यांनी यापुढे मराठवाड्यात पाऊल ठेवल्यास त्यांना शिवसेना पद्धतीने उत्तर देऊ !

खासदार चंद्रकांत खैरे 
यांचे श्रीहरि अणे यांना आव्हान
        संभाजीनगर, २५ मार्च - धैर्य असेल, तर श्रीहरि अणे यांनी यापुढे मराठवाड्यात पाऊल ठेवून दाखवावे. त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असे आव्हान शिवसेनेचे संभाजीनगरमधील हिंदुत्ववादी आणि प्रखर धर्माभिमानी खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी २३ मार्च या दिवशी दिले. ते संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होते.
       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी महाराष्ट्राचे ४ राज्यांत विभाजन करण्याची भूमिका मांडली होती. त्यावर खैरे टीका करतांना म्हटले की, वैद्य यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांना तसे सुचत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कूटनीतीला साहाय्यभूत ठरलेला आणि पुरंदरच्या तहामुळे प्रसिद्ध असलेला नारायणपूर (जिल्हा पुणे) येथील पुरंदरगड !

पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध !
पुरंदरगडावरील एक दुर्गम कडा
    शके १५८७ (१६६५ या वर्षी) मोगल सरदार जयसिंग राजे आणि दिलेरखान यांनी ४० ते ५० सहस्र फौजेनिशी पुरंदरला वेढा घातला. पुरंदरावर सरदार मुरारबाजी प्रभु आणि त्याच बरोबर एक सहस्र मावळे होते. खानाने वज्रगड घेऊन सफेद बुरुजांवरून पुरंदरावर चाल केली. खानाने पाच सहस्र कडवे पठाण घेऊन बालेकिल्यावर स्वारी केली मुरारबाजीने सातशे मावळे घेवून खानास प्रत्युत्तर दिले. मुरारबाजी देशपांडे यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना त्यांच्या बाजूने येण्यास सांगितले. मुरारबाजी बोलिले, मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो कि काय ? असे म्हणून खानावर वार करावा तोच खानाने तीन तीर मारून मुरारबाजी प्रभु यांना घायाळ केले. लढता लढता अखेर मुरारबाजी पडले. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळाले, तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाविषयी बोलणी चालू केली. ११ जून १६६५ या वर्षी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. या शौर्याचा साक्षीदार असलेला हाच तो पुरंदरगड !
     वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते. कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती अन् संधी विचार यांत साम्यस्थळे निश्‍चितपणे दिसतात.

(म्हणे) मराठवाडा स्वतंत्र झाला, तर लातूरला मुबलक पाणी मिळेल ! - खासदार डॉ. गायकवाड

        लातूर, २५ मार्च - मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, या मागणीला माझे समर्थन आहे. मराठवाडा स्वतंत्र झाला तर लातूरला मुबलक पाणी मिळेल, असे मत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले. छोटे राज्य केले तर केंद्राचा निधी मिळतो आणि विकास होतो. मराठवाडा स्वतंत्र झाला तर लातूरचा पाणी प्रश्‍न मिटेल. मराठवाड्यातून जाणार्‍या नद्यांचे पाणी पुढे जाऊ न देता ते अडवले जाईल. स्वतंत्र मराठवाडा झाला, तर तो सुजलाम् सुफलाम् होईल असे वाटते.

वेगळा मराठवाडा व्हावा या खासदार गायकवाड यांच्या मागणीचा शिवसेनेकडून निषेध !

      लातूर, २५ मार्च - छत्रपती शिवरायांचे स्वप्न तोडणारे आणि महाराष्ट्राचे तुकडे करणार्‍या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचे समर्थन करणार्‍या घरभेदी भाजप खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांनी केली आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली, अनेकांनी त्यासाठी रक्तही सांडले आहे. एकसंघ महाराष्ट्राच्या भूमिकेचा खून करण्याचे पाप खासदार गायकवाड हे करीत आहेत. अखंड महाराष्ट्रासाठी बलीदान दिलेल्या आणि मराठवाड्यासाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांचा अवमान करणार्‍या खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

रयतेचे हित जपणारी धार्मिक धोरणे राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती. त्यानिमित्ताने...
     छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा खजीना ! त्यांच्या गुणांचा जेवढा अभ्यास करावा, तेवढा अल्पच आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. संत-महंतांच्या मठांना इनामे दिली. ब्राह्मणांनाही त्यांनी आदराचे स्थान दिले; मात्र ते चुकल्यावर त्यांच्या विरोधात कृती करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. कठोरात कठोर निर्णय घेतांना प्रसंगी मृदुपणाही दाखवला. अशांच त्यांच्या विविध पैलूंविषयी या लेखात सविस्तर उहापोह केला आहे.
लेखक : अरुण मोतीराम भंडारे
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला 
अनेक संत-महंतांचे आशीर्वाद !
     छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक संत, सत्पुरुषांचे आशीर्वाद घेतले. ते सत्पुरुष म्हणजे संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, निश्‍चलपुरी गोसावी, जयरामस्वामी वडगावकर, परमानंदबुवा पोलादकर (शिवभारत लिहिणारे कविंद्र परमानंद) रंगनाथस्वामी निगडीकर, त्यांचे बंधू विठ्ठलस्वामी, चिंचवडचे देव, बोधलेबाबा धामणगावकर, त्रिंबक नारायण वाराणसीकर, आनंदमूर्ती ब्राह्मनाळकर, हैद्राबादचे केशस्वामी पंडित, बाबा याकूत केळशीकर आणि पाटगावचे मौनीमहाराज. या सत्पुरुषांव्यतिरिक्त महाराजांनी स्वराज्य शासनाचा एक भाग म्हणून तत्कालीन समाजव्यवस्थेचे एक अविभाज्य अंग असलेले ब्राह्मण, गोसावी यांना भूमी इनाम दिल्या. मठांना जागा दिल्या, वर्षासने (वर्षासाठी धार्मिक कार्याला दिलेले अर्थसाहाय्य) दिली, उत्पन्ने लावून दिली. सत्पुरुषांप्रमाणेच महाराज, विद्वान, ब्राह्मण, वैदिक यांचा आदर करत आपल्या राज्याभिषेकासाठी त्यांनी काशीहून गागाभट्टांना मोठ्या सन्मानाने निमंत्रित केले होते. साधूसंत, सत्पुरुष, गुणीजन; तसेच प्रसंगी दरिद्री ब्राह्मण यांचा आदरसत्कार करणे, हा महाराजांच्या व्यक्तीमत्वाचाच एक भाग होता.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

अशी मागणी का करावी लागते ? शासन स्वत:हून कृती का करत नाही ?

     वर्ष २०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित मुझफ्फरनगर अभी बाकी है हा लघुपट (डॉक्युमेन्ट्री) काही धर्मांधांनी सिद्ध केला असून डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्रात तो दाखवण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने १९ मार्च २०१६ या दिवशी महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता यांची भेट घेऊन केली. कुठे पदावर नसतांनाही जनतेला तारणारे सिद्ध, तर कुठे पदावर असतांनाही जनतेला बुडवणारे राजकारणी !

सिद्ध आणि राजकारणी यांच्या कार्यातील भेद
     या सिद्धांचा देह जीवसमाधी घेण्याने त्यांच्यातील तपोबलाने जमिनीखाली आपोआपच चैतन्यऊर्जेच्या साहाय्याने जतन होतो. येथून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने हे सिद्ध अजूनही लोककल्याणासाठी कार्य करत असतात. संतांचे, सिद्धांचे कार्य त्यांच्या देहत्यागानंतरही सुरूच असते; परंतु राजकारणी लोक, तसेच त्यांचे कार्यकर्ते मात्र पदावर असतांनाही कार्य करत नाहीत, उलट जनतेला लुटतातच ! म्हणून राष्ट्र वाचवण्यासाठी आता संतमहात्मेच हवेत, जनतेला बुडवणारे राजकारणी नकोत !
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (२८.२.२०१६, दुपारी ४.११)


साधकांना सूचना

साधकांनो, आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा !
           महर्षींनी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जो जप सांगितला आहे, तो समष्टीसाठी आहे. एखाद्याला वाईट शक्तींमुळे त्रास होत असेल, तर व्यष्टीसाठीचा जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे आवश्यक असते. जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे कठीण वाटत असेल, तर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्वांसाठीचे उपाय यामधील सूचनेप्रमाणे श्रीकृष्णाचा किंवा आकाशदेवाचा नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास या नामजपामुळे नियंत्रणात रहात असेल, तर उपायांची वेळ सोडून अन्य वेळेत महर्षींनी सांगितलेला नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास नियंत्रणात रहात नसेल, तर दिवसभर उपायांचाच नामजप करावा. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
-------------------------------------
महर्षींनी साधकांना सेवा करतांना किंवा इतर वेळी मधे मधे 
डोळे मिटून प.पू. डॉक्टरांच्या चेहर्‍याचे, देहाचे किंवा चरणांचे एक 
मिनिटभर तरी स्मरण करण्यास सांगणे; कारण त्यामुळे साधकांना 
प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्म शक्तीचा लाभ होण्यास साहाय्य मिळणार असणे
           महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६९मध्ये साधकांना सूचना केली की, परम गुरुजींना (प.पू. डॉक्टरांना) प्रत्यक्ष पहाण्यापेक्षा त्यांचा चेहरा, चरण किंवा देह यांचे स्मरण करणे आता महत्त्वाचे आहे. साधकांनी सेवा करतांना अथवा इतर वेळी मधे मधे एक मिनिटभर तरी डोळे मिटून त्यांचा चेहरा, चरण किंवा देह समोर आणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प.पू. डॉक्टरांमध्ये असलेल्या सूक्ष्म अवतारी शक्तीचा साधकांना लाभ होण्यास साहाय्य होईल. ईश्‍वराने त्यांना पृथ्वीवर काही विशिष्ट कार्य देऊन पाठवले आहे. त्यांचे स्मरण करणे, म्हणजे एकप्रकारे देवाने प.पू. डॉक्टरांना दिलेल्या कार्याच्या शक्तीचेच स्मरण करण्यासारखे असल्याने आणि ही शक्ती सूक्ष्म असल्याने केवळ स्मरणाने तिचा लाभ होण्यास साहाय्य होईल. यामुळे साधक करत असलेले हिंदु राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य आपोआपच पूर्ण होईल.
(संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६९, स्थळ : मंगळुरू, कर्नाटक, २१.३.२०१६)
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, जिल्हा मंगळुरू, राज्य कर्नाटक (२३.३.२०१६, पहाटे ५.५०)

विद्यार्थी-साधकांनो, सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी 
वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
       भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक 
वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
        थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमांत अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.

गुरूंचे चरण घट्ट पकडायचे ।

कु. वर्षा नकाते
स्थुलात नाही अडकायचे ।
सूक्ष्मातील तत्त्वाशी जोडायचे ॥ १ ॥
अहं अन् दोष यांच्या आवरणातून निसटायचे ।
आणि गुरूंचे मन जिंकायचे ॥ २ ॥
गुरूंचे चरण घट्ट पकडायचे ।
गुरूंचे स्मरण सतत मनात ठेवायचे ॥ ३ ॥
गुरूंच्या हृदयात गुपचूप जाऊन बसायचे ।
आणि त्यांचे बोट पकडून मोक्षाला जायचे ॥ ४ ॥
- कु. वर्षा नकाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०१५)

सौ. अंजली कणगलेकर यांना गेल्या काही दिवसांमध्ये स्वतःविषयी जाणवलेली सूत्रे

१. गेल्या काही दिवसांपासून देवीकवच म्हणतांना श्रीकृष्णाच्या चरणांवर पुष्प-पत्री अर्पण होते.
२. त्याच्या चरणांतच सर्व देवतांचा वास आहे, हा भाव वाढून केवळ त्यांच्या स्मरणानेही भावजागृती होते.
३. दत्तमाला मंत्रपठणाच्या वेळीही भावजागृती होते. आतून एक प्रकारचे गांभीर्य निर्माण होत असल्याचे जाणवते.
४. श्रीकृष्णाच्या चरणांविना आता काही नको, असा विचार असतो.
५. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या कार्याप्रतीही तोच भाव वृद्धींगत झाला आहे. सेवा करता यावी, यासाठीची तळमळ वाढली आहे.
६. आपण काहीच नाही, शून्य आहोत, असे वाटते.
७. पूर्ण शरणागत कसे व्हायचे ?, असा विचार सतत रहातो. 
- सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१६)

मनात नकारात्मक विचार येणार्‍या साधकांनो, संतांनी भेटून किंवा बोलून त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे आणि त्यांचे आपल्यावरही प्रेम आहे, हे सिद्ध करायला हवे का ?, याचा विचार करा !

कु. रूपाली कुलकर्णी
      एक दिवस मी युवराज्ञीताईला (कु. युवराज्ञी शिंदे यांना) म्हणाले, माझ्या मनात माझी साधना नीट होत नाही. किती दिवस मला प.पू. डॉक्टर भेटलेे नाहीत. त्यांचे माझ्याकडे लक्ष नसेल, अशा प्रकारचे विचार येतात. त्या क्षणी ती मला म्हणाली, ते मला भेटले नाहीत किंवा ते भेटले; पण बोलले नाहीत, म्हणजे माझी साधना नीट होत नाही, असा नकारात्मक विचार आपण का करायचा ? त्यांचे प्रेम आपण अनेकदा अनुभवले आहे आणि अनुभवतही आहोत; पण प्रत्येक वेळी त्यांनी भेटून किंवा बोलून त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे आणि त्यांचे आपल्यावरही प्रेम आहे, हे सिद्ध करायला हवे का ? अशी अयोग्य अपेक्षा का करायची ? तिचे हे बोलणे ऐकून माझे एकदम डोळेच उघडले ! त्या वेळी आपण किती अयोग्य अपेक्षा करतो ?, हे माझ्या लक्षात आले आणि माझ्या मनात वरीलप्रमाणे अपेक्षांचे विचार येण्याचे बंद झाले.
- कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०१४)

पू. भैय्याजी यांनी महाभारत युद्धात अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा करणे या गोष्टीच्या अनुषंगाने साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

पू. भैय्याजी
         महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाने सूर्यास्त होण्यापूर्वी मी जयद्रथाला मारीन अन्यथा चितेत प्रवेश करीन, अशा आशयाची प्रतिज्ञा केली होती. त्या दिवशी जयद्रथ लपून बसतो आणि सूर्यास्ताची वेळ जवळ येते. अर्जुन प्रतिज्ञेनुसार चितेत प्रवेश करायला निघतो. तेथे भगवान श्रीकृष्ण उभा असतो. युद्धाच्या आरंभी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून धर्मयुद्धाविषयी उपदेश केला होता; पण अर्जुन चितेत प्रवेश करण्यास निघत असतांना श्रीकृष्ण काहीच बोलत नाही. त्यामुळे पांडवांना चिंता वाटत असते आणि कौरव आनंदी झालेले असतात. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. पू. भैय्याजी यांनी या गोष्टीच्या अनुषंगाने साधनेविषयी केलेले मार्गदर्शन पुढे देत आहे.
१. कठीण प्रसंगी अर्जुनाच्या किंवा पांडवांच्या मनात 
श्रीकृष्णाविषयी विकल्प न येणे; पण संकटकाळी आपल्या 
मनात गुरूंनी साहाय्य करून ही स्थिती पालटावी, अशी अपेक्षा असणे
          त्या प्रसंगी अर्जुनाच्या किंवा पांडवांच्या मनात श्रीकृष्णासंबंधी कोणताही विकल्प आला नाही. कुणीही श्रीकृष्णाला तू एवढ्या कठीण प्रसंगी आम्हाला साहाय्य का करत नाहीस ?, असे विचारले नाही. त्याचप्रमाणे पूर्वी पांडव १२ वर्षे वनवासात असतांना श्रीकृष्ण हा देव आणि जगद्गुरु असतांनाही आमच्या वाट्याला वनवास का ?, असा त्यांनी विचार केला नाही. याउलट आपली स्थिती असते. आपल्या जीवनात कोणतेही संकट आले की, लगेच आपल्या मनात गुरूंनी आपल्याला साहाय्य करून ही स्थिती पालटावी, अशी अपेक्षा असते. आपण त्याविषयी लगेच गुरूंकडे बोलतो.

शीव सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांच्या अस्तित्वामुळे तेथे चैतन्य जाणवणे

         २१.७.२०१४ या दिवशी मी आणि श्री. दिनेश शिंदे वैयक्तिक कामासाठी मुंबई येथे जाणार होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी, गिरगाव येथील त्यांचे बालपणीचे स्थान, शीव सेवाकेंद्र येथील त्यांचे वास्तव्यस्थान, म्हणजेच जेथे सनातन संस्थेचा पाया रचला या ठिकाणांचे चित्रीकरण करून आणायला सांगितले होते.
       हे चित्रीकरण करतांना मला जुन्या आठवणी आल्या. प.पू. गुरुदेवांच्या बैठकीच्या खोलीतील चित्रीकरण करतांना त्यांच्या शयनकक्षातून बैठकीच्या कक्षात येण्यासाठी असलेल्या मार्गिकेमध्ये ते पांढरा सदरा अन् पांढरा पायजमा घालून येत आहेत, असे दिसले आणि मला भरून आले. प.पू. गुरुदेवांच्या आई-वडिलांच्या खोलीत चित्रीकरणासाठी स्वच्छता करत होतो. त्या वेळी आत गेल्यावर डाव्या बाजूला वडिलांच्या पलंगावर वडील बसले आहेत, तसेच उजव्या बाजूला पलंगावर आई बसल्या आहेत, असे दिसले आणि त्या वेळी ते आई-वडिलांंची कशी सेवा करायचे, ते चित्र दिसू लागले.

ईश्‍वराकडून मिळत असलेल्या ज्ञानातून परमेश्‍वराचे कार्य, त्याची वैशिष्ट्ये आणि गुण यांचे नम्रतापूर्वक वर्णन केल्यावर जिवाला ज्ञानसेवा आणि भगवंताची पूजा, असे दोन्ही कर्म केल्याचे फळ प्राप्त होणे

श्री. राम होनप
       ज्ञानी जीव त्याला मिळत असलेल्या ईश्‍वरी ज्ञानातून परमेश्‍वराचे कार्य, त्याची वैशिष्ट्ये आणि गुण यांचे नम्रतापूर्वक वर्णन करतो. तेव्हा ज्ञानातून प्राप्त शब्दरूपी फुले ईश्‍वरचरणी अर्पण होतात. यामुळे अशा जिवाला ज्ञानसेवा आणि भगवंताची पूजा असे दोन्ही कर्म केल्याचे फळ प्राप्त होते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१५)

साधकांनो, ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी. प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे. 
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी
 २. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे बाकी
 ३. सनातन पंचांग २०१६च्या विज्ञापनांची येणे बाकी
४. गुरुपौर्णिमा २०१५ च्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांची येणे

गुरूंचे मन जिंकायचे आहे, हा ध्यास ठेवून अविरत सेवा करणार्‍या पू. स्वातीताई आणि साधकांची प्रगती व्हावी, ही तळमळ असलेले पू. जाधवकाका यांचा सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने मिळालेला संतसंग !

          मी नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या सेवेसाठी गेले होते. या सेवेसाठी माझी निवड झाली, ही देवाचीच कृपा ! माझ्या मनात सिंहस्थपर्व म्हणजे काय ? त्या वेळी तेथे कसे वातावरण असते ? असे विचार यायचे; पण सिंहस्थपर्वाची सेवा करायला मिळेल, असे वाटले नव्हते. नाशिकला आल्यापासून एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. सिंहस्थपर्वात सनातनचे पू. (कु.) स्वाती खाडये आणि पू. जाधवकाका (माझे वडील) यांचे मार्गदर्शन अन् अखंड सहवास मिळाला. त्यामुळे सतत उत्साह मिळून वेगळेच चैतन्य अनुभवता आले. त्यांंच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. पू. स्वातीताई 
पू. (कु.) स्वाती खाडये
१ अ. उत्तम नियोजनकौशल्य : पू. ताईंना सिंहस्थपर्वाचा कोणताही अनुभव नसतांना त्यांनी अप्रतिम असे नियोजन करून सर्व दायित्व सांभाळले.
१ आ. प्रेमभाव
१ आ १. अन्नछत्रातील जेवणामुळे साधकांना त्रास होत असल्याचे कळल्यावर पू. स्वातीताईंना वाईट वाटणे आणि कोणीही याविषयी न सांगितल्याने मीच तुम्हा सर्वांशी जवळीक करण्यास उणी पडले, असे म्हणून त्यांनी स्वतःकडे चूक घेणे : पर्वणी चालू झाल्यावर नाशिकमध्ये पुष्कळ ठिकाणी अन्नछत्रे चालू झाली होती. एका अन्नछत्रात साधकांचे नियोजन केले होते. तेथे जेवल्यावर बर्‍याच साधकांना त्रास होऊ लागला; पण कोणीच पुढे येऊन सांगितले नाही. पू. ताईंना या संदर्भात कळल्यावर त्यांनी त्याच रात्री सर्वांना एकत्र करून जाणीव करून दिली. त्या म्हणाल्या, तिथले जेवण केल्याने त्रास होत आहे, हे एकाही साधकाने सांगितले नाही. मीच तुम्हा सर्वांशी जवळीक करण्यास उणी पडले. त्यामुळे एकानेही येऊन मोकळेपणाने सांगितले नाही. खरेतर प्रतिमा जपणे आणि भावनाशीलता या दोषांंंंंंमुळे आम्ही सांगितले नव्हते. तेव्हा पू. ताई म्हणाल्या, एक वेळ मला उपाशी रहावे लागले, तरी चालेल; पण एकही साधक उपाशी रहाता कामा नये; कारण साधक १२ - १२ घंटे सेवा करतात. हे सर्व सांगत असतांना पू. ताईंचा जीव तगमगत होता आणि त्यातून त्यांची साधकांवरील प्रीती कळत होती.

वातानुकूलित यंत्रे, शीतकपाट आदी उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, तसेच साधक यांना गुरुसेवेची सुवर्ण संधी !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही वातानुकूलित यंत्रे (विंडो ए.सी., तसेच स्प्लिट ए.सी.), शीतकपाट (फ्रिज) नादुरुस्त स्थितीत आहेत. ही उपकरणे वापरण्यायोग्य होण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याची सेवा उपलब्ध आहे.
     अशा उपकरणांची दुरुस्ती करण्याचा अनुभव असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक सेवा म्हणून करण्यास इच्छुक असतील किंवा सेवामूल्य घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतील, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर खालील माहिती पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास रामनाथी आश्रमात श्री. संभाजी माने यांच्याशी ०८४५१००६०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
     या सेवेत सहभागी होऊन ईश्‍वराने दिलेले कौशल्य त्याच्या चरणी समर्पित करण्याची संधी दवडू नका !


प.पू. पांडे महाराज यांच्या सत्संगातून चैतन्याची उधळण अनुभवतांना सौ. उषा पुराणिक यांना जाणवलेली सूत्रे

१. प.पू. पांडे महाराजांच्या वाढदिवसाच्या 
दिवशी त्यांचे दर्शन व्हावे, अशी तळमळ लागणे
        
प.पू. पांडे महाराज
१२.१२.२०१५ या दिवशी देवद आश्रमातील उच्च कोटीचे संत प.पू. पांडे महाराज यांचा वाढदिवस होता. प.पू. पांडे महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे दर्शन व्हावे, त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायला मिळावा, अशी मला फार तळमळ लागली होती. देवाच्या कृपेने तो क्षण आला. रात्री प.पू. पांडे महाराज त्यांच्या खोलीसमोरील मार्गिकेत शतपावली करत असतांना अचानक मला त्यांचे दर्शन झाले.
          प.पू. पांडे महाराजांची (प.पू. बाबांची) भेट झाल्यावर त्यांनी मला प्रसाद दिला. तेथे हळूहळू एक-एक करून अनेक साधक जमत गेले. त्या सर्वांनाच प.पू. बाबांकडून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसाद मिळाल्याने कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. सर्वांना प्रसाद देतांना प.पू. बाबा साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन करत होते. त्यातच पू. पात्रीकरकाका हेसुद्धा त्या वेळी तेथे उपस्थित झाल्याने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले.

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
शिवगंगा (तमिळनाडू) गावाजवळ असलेल्या भागंप्रियादेवीच्या स्थानी जाऊन महर्षींनी सनातनच्या कार्याला होत असलेल्या दुष्ट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ पूजा-अर्चना करण्याचा आदेश देणे आणि या ठिकाणी जाणवलेली सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव 
शिवगंगा या गावाजवळ असणारे भागंप्रियादेवीचे जागृत स्थान
श्री भागंप्रियादेवी
तांदुळाच्या पिठाच्या दिव्याने दृष्ट काढतांना
 १. शिवगंगा या गावाजवळ असणारे 
भागंप्रियादेवीचे जागृत स्थान आणि या स्थानाचा इतिहास
१ अ. पार्वतीचे तपःस्थान : या स्थानी देवी पार्वतीने शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी तपःश्‍चर्या केली होती. या ठिकाणी शिवालयही आहे. या ठिकाणीच देवी पार्वती मला शिवच पती म्हणून हवा, असे म्हणून शिवपिंडीला कवटाळून बसली होती, असे म्हटले जाते.
१ आ. देवीच्या ठिकाणी नेण्याचा महर्षींचा उद्देश : महर्षींनी या ठिकाणी जाऊन ध्यान करण्यास सांगितले होते. तसे आम्ही केले, तसेच देवीच्या ठिकाणी जाऊन साधकांच्या आणि प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. देवीचे हे देऊळ बाधा निवारणार्थ प्रसिद्ध आहे. महर्षींनी आम्हाला या ठिकाणी नेले आणि सनातनच्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठीही प्रार्थना करवून घेतली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
         अध्यात्मात ज्ञान मिळवण्याचा जिज्ञासा हा पाया असतो. सूक्ष्मातून माहिती मिळण्याची क्षमता, हा पुढचा टप्पा असतो, तर मिळालेल्या ज्ञानातील कार्यकारणभाव समजणे, हे शिखर असते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी उपासना सोडू नये. हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण !

संपादकीय 
     काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, मुसलमान समाजातील तलाकसारखे काही कायदे या समाजातील महिलांवर अन्याय करणारे असून घटनेने महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करणारे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाला आक्षेप घेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले की, संसदेत करण्यात आलेला कायदा आणि धर्माचे अधिष्ठान असलेला कायदा किंवा संकेत हे वेगळे आहेत. मुसलमानांच्या धर्मग्रंथाचा आधार घेऊन मुसलमानांचे वैयक्तिक कायदे करण्यात आले आहेत, वगैरे वगैरे. म्हणजे या देशात देशाचे जनताभिमुख कायदे असतांना मुसलमानांना त्यांचे वैयक्तिक कायदे पण हवे आहेत. सर्वोच्च न्यायालय केवळ देश आणि देशाचे नागरिक एवढेच सूत्र पहाते. देशातील जनतेला समान नियम लावण्याचे काम हे न्यायालय करते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn