Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नंदुरबार येथे धर्मांधांकडून किरकोळ कारणावरून दंगल, १० हून अधिक घायाळ

वाढत्या दंगलींमुळे शासनाच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍न निर्माण होतो ! किरकोळ कारणावरून
दंगल घडवणार्‍या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! 
दंगलस्थळी तैनात करण्यात आलेला पोलिसांचा मोठा फौजफाटा
  • धर्मांधांकडून हैदोस
  • रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच
      नंदुरबार - शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी वादावादी झाली. त्याचे पर्यावसान मोठ्या दंगलीत झाले. यामध्ये १० हून अधिक घायाळ झाले असून रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच पडला होता. पोलिसांच्या दंगल प्रतिबंधक दलाने परिस्थिती आटोक्यात आणली असून येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१. माळीवाडा भागामध्ये एका शाळेत १० वीची परीक्षा चालू होती. हा पेपर चालू असतांना परीक्षेला बसलेल्या हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये नक्कल (कॉपी) करण्यावरून वादावादी झाली.
२. परीक्षा संपल्यानंतर दुपारी २ ते २.३० या वेळेत मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुसलमान यांचा जमाव गोळा झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चिराग गल्ली आणि माळीवाडा या दोन्ही परिसरांत एकमेकांवर प्रचंड प्रमाणात दगड, विटा आणि बाटल्या फेकण्यात आल्या.

जातीय तेढ वाढवणारे लघुपट दाखवणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश देणार ! - गृहराज्यमंत्री पाटील

मुझफ्फरनगर दंगलीचा लघुपट दाखवल्याचे प्रकरण
      मुंबई - जातीय तेढ निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍या मुझफ्फरनगर अभी बाकी है या हिंदुविरोधी लघुपटावर (Documentery) तात्काळ बंदी आणून त्याचे महाराष्ट्र राज्यात प्रसारण करून जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी गृहराज्यमंत्री (शहर) श्री. रणजित पाटील यांना २१ मार्च या दिवशी दिले. या वेळी श्री. पाटील म्हणाले, राज्यात असे जातीय तेढ निर्माण करणारे लघुपट दाखवले जात असतील, तर ही गंभीर घटना आहे. हे लघुपट कोणकोणत्या जिल्ह्यांत दाखवले जातात, त्याची चौकशी करून माहिती मागवण्यात येईल आणि संबंधित दोषींवर कारवाई करण्याच्या संदर्भात मुंबई येथील पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात येतील.
     डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुझफ्फरनगर अभी बाकी है हा आक्षेपार्ह अन् जातीय भावना भडकवणारा लघुपट (Documentery) दाखवण्यात आला. हा लघुपट वर्ष २०१३ मधील उत्तरप्रदेश राज्यातील मुझफ्फरनगर येथे झालेल्या भीषण जातीय दंगलीच्या संदर्भात आहे.

पंजाबमध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्यास जन्मठेपेची तरतूद !

शीखबहुल राज्यात शीख धर्मग्रंथाचा अवमान रोखण्यासाठी कडक कायदा केला जातो;
मग या हिंदुबहुल देशात हिंंदूंच्या भावना दुखावणार्‍यांवर कडक कारवाईसाठी कायदा का नाही ?
      चंदीगड - शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करणार्‍याला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेले अपराधिक प्रक्रिया संहिता (पंजाब संशोधन) विधेयक पंजाब राज्यात पारित करण्यात आले आहे. या विधेयकानुसार पंजाब राज्यात शिखांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून गुरु ग्रंथ साहिब धर्मग्रंथाचा अवमान करणार्‍याला आजन्म कारावास ठोठावला जाणार आहे.
     अशा प्रकारचा कायदा बनवणारे पंजाब हे देशातील पहिलेच राज्य आहे. पंजाबच्या विधानसभेने यासंबंधीच्या विधेयकाला नुकतीच संमती दिली आहे. उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी यासंदर्भात विधेयक मांडल्यानंतर आवाजी मताने हे विधेयक पारित करण्यात आले.
अन्य धर्मांच्या धर्मग्रंथांना कायदा लागू नाही !
     गीता, बायबल, कुराण, रामायण आणि महाभारत आदी अन्य धर्मग्रंथांना हानी पोचवणार्‍यांना अशाच प्रकारे शिक्षेची तरतूद असावी, अशी विरोधी पक्षातील नेते चरणजीतसिंह चन्नी, काँग्रेस आमदार अश्‍विनी सेखरी आणि तरलोचन सिंह यांची मागणी मात्र हे विधेयक पारित करतांना फेटाळण्यात आली. (सर्वधर्मसमभावाचा डांगोरा पिटणारे हिंदू शिखांकडून काही बोध घेतील का ? - संपादक)


अभाविपच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी १५ वर्षांनंतर ७ धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा !

न्यायदानातील अशा विलंबामुळे न्याययंत्रणेवरील जनतेचा विश्‍वास उडाल्यास आश्‍चर्य ते काय ?
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - वर्ष २००१ मध्ये लखनौ विश्‍वविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग प्रमुख आणि एल्एल्एम्चे विद्यार्थी शिवाजी चंद्रमौलि सिंह यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने ७ धर्मांधांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच त्यांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. अन्य २ धर्मांधांना निर्दोष मुक्त केले आहे.

जळगाव येथे धर्मांधाकडून एका हिंदु युवतीला मारहाण आणि अश्‍लील शिवीगाळ

खोटी तक्रार प्रविष्ट करणारे पोलीस हिंदूंना न्याय काय देणार ?
पोलिसांकडून हिंदु युवती आणि तिच्या वडिलांवर नाहक चॅप्टर केस प्रविष्ट
      जळगाव - येथील भारतनगर भागातील एका १७ वर्षीय हिंदु युवतीला ती घरी जात असतांना फारुख शेख याने काठीने मारहाण केली आणि अश्‍लील शिवीगाळही केला. या युवतीच्या वडिलांनी जळगावमधील एका अवैध मशिदीच्या विरोधात कृती केल्याच्या रागातून शेख याने हे कृत्य केल्याचे समजते.
     या प्रकरणी ती युवती आणि तिचे वडील हे जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेले होते. त्या वेळी पोलीस निरीक्षक तांबे यांनी त्या युवतीच्या वडिलांनाच दरडावून सांगितले की, तुम्हीच भांडणे उकरून काढत आहात.
      त्यानंतर तांबे यांनी त्या युवतीचे वडील आणि धर्मांध यांना बोलावून दमदाटी केली. त्यानंतर त्यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून युवती, तिचे वडील, फारुख शेख आणि त्याचा मित्र अशा चौघांवर चॅप्टर केस प्रविष्ट केली.

मनकर्णिका कुंडावरील शौचालय पाडण्याविषयी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी यांना कार्यवाही करण्याचा आदेश देणार ! - कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

हिदु जनजागृती समितीकडून कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना निवेदन सादर
अशा अवैध आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्‍या कृत्यांविषयी
शासनाने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! 
उजवीकडेे श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देतांना 
डावीकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार
     मुंबई - कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातील पवित्र मनकर्णिका कुंडावर पुरातत्व खात्याची अनुमती न घेता बांधलेले अनधिकृत शौचालय तात्काळ पाडण्याचा (निष्कासित करण्याचा) आदेश देऊन ते कुंड भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले. या वेळी श्री. पाटील यांनी या कुंडावर शौचालय बांधले असल्याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले. या संदर्भात जिल्हाधिकारी अमित सैनी यांना मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात येईल, असे सांगून श्री. पाटील यांनी त्याचा योग्य तो अहवाल पाठवण्याविषयी स्वतःच्या स्वीय सचिवांना सूचना केली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार आणि श्री. अजय संभूस यांनी २१ मार्चला श्री. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी सांगितले की,
१. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री जोतिबा देवालय यांसह कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांमधील ३ सहस्र ६७ देवस्थाने सध्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे आहेत.
     या समितीच्या कारभारातील प्रचंड घोटाळेे हिंदु विधीज्ञ परिषदेने पुराव्यांसह उघड केले आहेत.

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे ६२ सहस्र खटले प्रलंबित !

जय जय महाराष्ट्र माझा !
एका राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने खटले प्रलंबित असतील, तर संपूर्ण देशात किती असतील ?
जलदगती न्यायालयाद्वारे खटले निकाली काढण्याची
 शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांची मागणी
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई
     मुंबई - मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील विविध न्यायालयांत महिला आणि अल्पवयीन मुली, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांच्यावर झालेल्या अत्याचारांच्या संदर्भातील सुमारे ६२ सहस्र खटले न्यायदानासाठी प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. हे खटले निकाली काढण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१२ मध्ये राज्यशासनास निर्देश दिलेले असतांनाही अजून हे प्रलंबित खटले निकाली काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शासनाने तात्काळ उपाययोजना करून हे खटले निकाली काढावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. (प्रलंबित खटल्यांविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे आणि जलदगती न्यायालये चालू न करणे यांमुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. यासाठी शासनाने न्यायालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे ! - संपादक)
     श्री. सुनील प्रभु म्हणाले, ८ मार्च हा जागतिक महिलादिन साजरा करत असतांना महिलांच्या सुरक्षिततेविषयी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात महिला, अल्पवयीन मुली यांच्यावरील बलात्काराच्या घटनेत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद !

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संभाजीनगरमध्ये 
हिंदु जनजागृती समितीची २५ मार्चला धर्मजागृती सभा
       संभाजीनगर, २३ मार्च (वार्ता.) - हिंदूंच्या गौरवशाली इतिहासातील शूरवीर राजा कृष्णदेवराय याची राजधानी असलेल्या अजिंक्य अशा देवगिरी किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण म्हणजे संभाजीनगर ! धर्मासाठी प्राणांची आहुती देणार्‍या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीत २५ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता कडा ऑफिस पटांगण, डॉ. हेगडेवार रुग्णालयाजवळ, गारखेडा परिसर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सध्या संभाजीनगर शहर, ग्रामीण भाग आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात प्रसार चालू आहे. सदर प्रसाराला हिंदुत्ववादी, युवक वर्ग आणि महिला वर्ग यांच्याकडून सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २२ मार्च या दिवशी सभेनिमित्त संभाजीनगर येथे वाहनफेरी पार पडली.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी काश्मिरी तरुणींनी महाविद्यालयात दिल्या भारतविरोधी घोषणा !

देशद्रोही घोषणांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई व्हायला हवी !
     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी गाझियाबाद येथील मुरादनगरमधील एका महाविद्यालयात भारतविरोधी घोषणा दिल्याचे उघड झाले आहे. याविषयी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
१. सामन्याच्या वेळी बिहार आणि जम्मू-कश्मीरच्या दोन विद्यार्थिनींमध्ये वाद झाला. त्यावेळी भारत मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
२. पोलिसांना अद्याप यासंबंधी सीसीटीव्ही फुटेज किंवा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
३. महाविद्यालयाचे मुख्य प्रशासनिक अधिकारी अतुल भूषण यांनी मात्र त्या दिवशी २ विद्यार्थिनींमध्ये वाद झालेला असला, तरी भारतविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत असे म्हटले आहे. (अतुल भूषण खरे बोलत आहेत कि देशद्रोह्यांना पाठिशी घालत आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. - संपादक)

अपप्रकार आढळल्यास कारवाई करू ! - नायब तहसीलदार, भोर

हिंदु जनजागृती समितीची होळी-रंगपंचमी 
या सणांमधील अपप्रकारांच्या विरोधात चळवळ 
नायब तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी
        भोर, २३ मार्च (वार्ता.) - होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीसाठी भोरचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. होळी आणि रंगपंचमीच्या काळात काही अपप्रकार आढळल्यास आम्ही त्यावर कारवाई करू, असे आश्‍वासन डॉ. जाधव यांनी दिले.
         या वेळी रायरेश्‍वर प्रतिष्ठानचे सर्वश्री चंद्रशेखर शेळके, योग वेदांत समितीचे अशोक बारीक, निगडे आणि भोर येथील धर्माभिमानी युवक नवनाथ सारुक, तुषार जाधव, स्वप्नील तांगडे, अमित सरक, सागर पवार, दिगंबर क्षीरसागर, स्वप्नील वेदपाठक, गोविंद वाल्हेकर, शुभम गोळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विठ्ठल जाधव, श्री. विश्‍वजीत चव्हाण उपस्थित होते. तहसीलदार मीनल कळसकर यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री जयवंत साळुंके, मंगेश वाडकर, अनिकेत हरळे उपस्थित होते.

छगन भुजबळ यांच्या गिरणा साखर कारखान्यासह २९० एकर भूमी शासनाने घेतली कह्यात !

अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई !
     मुंबई, २३ मार्च - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीचा नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे असलेला गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर भूमी अंमलबजावणी संचालनालयाने शासनाधीन केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत कारवाईविषयी आदेश काढला. या भूमीचे मूल्य ५५ कोटी रुपये आहे. या आधी संचालनालयाने भुजबळ कुटुंबियांची सुमारे २८० कोटी रुपयांची विविध प्रकारची मालमत्ता शासनाच्या कह्यात दिली आहे. भुजबळ कुटुंबाला या मालमत्तेच्या वापराविषयी मनाई केली आहे. ईडीने केलेली जप्तीची ही चौथी कारवाई आहे.

मुंबई जिल्हाधिकारी आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत निवेदने

धर्माभिमान्यांकडून निवेदन स्वीकारतांना
मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने (डावीकडे)
होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठीची हिंदु जनजागृती समितीची चळवळ
      मुंबई - होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी वांद्रे येथे मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.
     मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी श्री. महेंद्र तांडेल, सागर लाड, समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधकही उपस्थित होते. मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने यांनी निवेदन स्वीकारल्यावर सांगितले, होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, असे आम्ही पोलिसांना पत्रकांद्वारे सूचित करत आहोत.
      मीरा रोड येथे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. मोहन परब आणि सौ. ज्योती जोशी, तसेच समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधकही उपस्थित होते.

पाठ्यपुस्तकांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्मचरित्राचा समावेश करणार !

राजस्थान शासनाप्रमाणे देशस्तरावरच पाठ्यपुस्तकांमध्ये पालट करून 
मुलांमध्ये देशभक्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !
दुसरा कन्हैया कुमार निर्माण होऊ नये, यासाठी राजस्थान शासनाचा प्रयत्न 
हेमू कलानी
     जयपूर - देशद्रोहाच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारचा आदर्श घेऊन राज्यात नवीन कन्हैया निमार्र्ण होऊ नये; म्हणून राजस्थान शासनाकडून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या दृष्टीकोनातून अभ्यासक्रमात महत्त्वाचे पालट करण्यात येत असून स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्मचरित्राचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दिली. या अंतर्गत जॉन किट्स, विल्यिअम ब्लेक यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी हेमू कलानी, महाराज दहरसेन आणि स्वामी तौरम यांची आत्मचरित्रे समाविष्ट केली जाणार आहेत.

हिंदु तरुणीला विवाहासाठी फूस लावून पळवून नेणार्‍या धर्मांधाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप !

  • हिंदु तरुणींनो, प्रेमाच्या नावाखाली तुमचे शीलभंग करू पहाणारे लव्ह जिहादचे षड्यंत्र वेळीच ओळखा आणि सावध व्हा !
  • लव्ह जिहादच्या संकटावर मात करण्यासाठी धर्माचरण करून साधना वाढवणे हाच एकमेव पर्याय !
     परभणी - नांदेड येथे महाविद्यालयीन हिंदु तरुणीला विवाहासाठी फूस लावून पळवून नेणार्‍या येथील पठाण शाहरूख खान रफिक खान नामक धर्मांधाला संभाजीनगरच्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले. 
१. हा धर्मांध एका आस्थापनामध्ये काम करतो. त्याने लव्ह जिहादच्या उद्देशाने ४ वर्षांपूर्वी नांदेडमधील एका हिंदु तरुणीशी भ्रमणभाषवरून ओळख करून घेतली. 
२. ४ वर्षांपासून प्रेमाचे नाटक करत त्याने तिला लग्नासाठी तयार केले होते. त्यानुसार शाहरूखने २ मुसलमान साक्षीदारांसह तिला गाडीत घालून परभणी न्यायालयासमोर आणले.

गीतकार गुलजार यांचा जेएन्यूमधील देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा

देशद्रोह्यांना पाठिंबा देणार्‍यांची मानसिकता त्यांच्यापेक्षा निराळी नसणार, 
हे ओळखून गुलजार यांच्या गीतांवर आणि चित्रपटांवर बहिष्कार घाला ! 
     नवी देहली - भारताविरुद्ध घोषणाबाजी करणार्‍या जेएन्यूतील देशद्रोही विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी पाठिंबा दिला आहे. स्प्रिंग फिव्हर २०१६ या कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. या वेळी त्यांना जेएन्यू वादासंर्भात प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जेएन्यूमधील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, सेंट स्टीफन महाविद्यालयामध्ये शिकत असतांना, आम्ही रशियन क्रांतीवरील पुस्तके वाचत असू. क्रांतीसाठी आणि मतभेदांमध्ये आवाज उठवला जात असेल, तर तो केवळ तरुणांचा असतो. या तरुणांना पाहिल्यानंतर मला खूप निश्‍चिंत वाटते.


अशी मागणी का करावी लागते ? शासनाकडून स्वत:हून कृती होणे अपेक्षित आहे !

      वर्ष २०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित मुझफ्फरनगर अभी बाकी है हा लघुपट (डॉक्युमेन्ट्री) काही धर्मांधांनी सिद्ध केला असून डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्रात तो दाखवण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने १९ मार्च २०१६ या दिवशी महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता यांची भेट घेऊन केली.


गोप्रेमींनो, विषप्राशनाचा, तसेच उपोषणाचा शासनावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घ्या !

     गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि देशात गोमांसबंदी व्हावी, यांसाठी राजकोट (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ८ गोप्रेमींनी विष प्राशन केले. यांपैकी हिंदाभाई वांबाडिया या गोप्रेमीचा मृत्यू झाला असून अन्य ७ जणांवर विषप्राशनाचा गंभीर परिणाम झाला.


आरक्षण म्हणजे जात आणि लिंग यांच्या आधारावर कमी क्षमतेच्या व्यक्तींना पदावर बसवणे, म्हणजे पात्र व्यक्तीवर अन्याय करणे !

     विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे आणि या संदर्भातील विधेयक येत्या विधानसभेत संमत करावे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी केली.


अभ्यासूच्या मताला महत्त्व असते. पालकांचा शिक्षणाचे माध्यम या विषयाचा अभ्यास असतो का ? उद्या व्यक्तिस्वातंत्र्यवाले म्हणतील, औषधे कोणती घ्यायची, हे निवडण्याचा अधिकार रुग्णांना द्या

     प्राथमिक शिक्षणातील माध्यम निवडण्याचा अधिकार पालकांचा आहे. त्यांना हा अधिकार देऊन शासनाने गोवा विधानसभा निवडणूक २०१७ पूर्वी माध्यमप्रश्‍न सोडवला पाहिजे - काँग्रेस आमदार माविन गुदिन्हो, गोवा


उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकीत मत न दिल्याने दलित वस्तीला आग लावली !

  • उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या राजवटीतील झुंडशाही ! उत्तरप्रदेशमध्ये शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ?
  • २ मुलांचा आगीत जळून मृत्यू
  • स्थानिक सरपंचांनीच आग लावल्याचा आरोप
        लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशातील सीतापूर या गावातील दलित वस्तीला लागलेल्या आगीत ८ वर्षीय मुकेश आणि ४ वर्षीय प्रियांशी अशा २ मुलांचा मृत्यू झाला असून ३५ हून अधिक घरे जळून खाक झाली. या वस्तीतील लोकांचा आरोप आहे की, निवडणुकीत मत न दिल्याने गावाचे सरपंच कमलेश वर्मा यांनीच ही आग लावली आहे.

अणूऊर्जा निर्मितीसाठीचे खनिज असणारी माती अवैधरित्या निर्यात करणार्‍या सहा जणांना अटक

संवेदनशील क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कधी सक्षम होणार ?
     नवी देहली - अणूऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे बेरियल हे खनिज असणारी माती भारतातून चीनमध्ये अवैधरित्या निर्यात केली जात असल्याचे ऑक्टोबर २०१५ मध्ये राजस्थानच्या आतंकवादविरोधी पथक आणि अणूऊर्जा विभागाने केलेल्या चौकशीच्या वेळी उघड झाले आहे. या आधारावर कारवाई करतांना सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३१ टन खनिजयुक्त माती जप्त केली आहे. खनिजयुक्त मातीतून बेरियम वेगळे करून अणूउर्जा प्रकल्प, अंतराळ तंत्रज्ञान आणि स्कॅनिंगसाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांमध्ये त्याचा वापर केला जातो. जानेवारी मासाच्या प्रारंभी अणूऊर्जा विभागाला बेरियलची अवैध निर्यात होत असल्याची माहिती निनावी पत्राद्वारे मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांना अणूऊर्जा विभागाने तातडीने सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.

रत्नागिरी येथे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ६ जणांना न्यायालयीन कोठडी

      रत्नागिरी - विनापरवाना वाळू वाहतूक केल्याच्या आरोपाखाली पंचायत समिती सदस्य सुर्वे यांच्यासह ६ जणांना १७ मार्च या दिवशी अटक करण्यात आली. जयगड सागरी पोलिसांनी ही कारवाई केली. विनापरवाना वाळू वाहतूक करतांना हे सर्वजण महसूलच्या पथकाला आढळून आले होते. या वेळी महसूल पथकाला दमबाजी करत वाळूचा ट्रक बळजोेरीने घेऊन गेल्याने याबाबतची तक्रार जयगड पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले.

फलक प्रसिद्धीकरता

वारंवार होणार्‍या दंगलींपासून हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
     नंदुरबार शहरात किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर धर्मांधांकडून दंगल घडवण्यात आली. यामध्ये १० हून अधिक जण घायाळ झाले असून रस्त्यावर दगड, विटा आणि बाटल्या यांचा खच पडला होता.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Maharashtra ke Nandurbar me 1 mamuli karan par dharmandho dwara danga kiya gaya. isme 10 log ghayal huye. - Ab Hindu rastra apariharya Hai !
जागो !
महाराष्ट्र के नंदुरबार में एक मामुली कारण पर धर्मांधों द्वारा दंगा किया गया. इस में १० लोग घायल हुए. - अब हिंदु राष्ट्र अपरिहार्य है !

बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले केंद्रशासन साध्वी प्रज्ञासिंह यांची सुटका करत नाही !

जुना अखाड्याचे आंतरराष्ट्रीय मंत्री 
स्वामी नारायण गिरी महाराज यांचा आरोप
         भोपाळ - तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी असंवैधानिक पद्धतीने निर्दोष साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्यांना कारागृहात टाकले आहे. मुसलमान दुखावले होऊ नयेत यासाठी बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले मोदी शासन त्यांची सुटका करत नाही, असा आरोप जुना अखाड्याचे आंतरराष्ट्रीय मंत्री स्वामी नारायण गिरी महाराज यांनी एका पत्रकार परिषदेत केला. या वेळी अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय आयोजक आणि हिंदू संसदेचे प्रणेते यति बाबा नरसिंहानंद सरस्वती महाराज आणि हिंदू स्वाभिमानचे राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष बाबा परमेन्द्र आर्य उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारखाणी येथे सापडलेल्या बॉम्बचे गूढ वाढले

     संगमेश्‍वर - कुंभारखाणी येथे १६ मार्च या दिवशी सापडलेल्या बॉम्बचा संबंध उत्तरप्रदेशपर्यंत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. हे बॉम्ब उत्तरप्रदेशातील एका भैयाचे आहेत, असे या प्रकरणी पोलिसी अटकेत असलेला संजय कांबळे याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे या बॉम्बविषयी गूढ आणखी वाढले आहे.

चीन नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग बांधण्याच्या सिद्धतेत

विस्तारवादी चीनच्या धूर्त खेळीला शह देण्यासाठी भारत शासन काय करणार आहे?
     बीजिंग (चीन) - चीनने नेपाळशी असलेली दळणवळण यंत्रणा वाढवण्यासाठी नेपाळला चीनशी रेल्वेमार्गाने जोडण्याची सिद्धता दर्शवली आहे. चीन आणि नेपाळमधील रेल्वेमार्गामुळे नेपाळचे व्यापाराच्या दृष्टीकोनातून भारतावरील अवलंबित्व अल्प होणार आहे. (नेपाळ आणि चीन यांचे वाढते संबंध हे भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. हे लक्षात घेऊन छोट्याशा नेपाळला धडा शिकवण्यासाठी भारत शासनाने पालवे उचलावीत ! - संपादक) 
    नेपाळमध्ये एक विमानतळ आणि या दोन्ही देशांस जोडणार्‍या एका पुलाच्या निर्मितीसाठी चीन विशेष आग्रही आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली हे सध्या चीनच्या सात दिवसीय दौर्‍यावर आहेत. या काळात या दोन देशांमध्ये दहा महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या आंदोलनावेळी येथील भारतीय वंशाच्या मधेशी समुदायाने भारत आणि नेपाळमधील मार्ग रोखून धरले होते. यामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्‍वभूमीवर नेपाळ आणि चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व चीनकडे झुकले आहे.

देवस्थानची संपत्ती आणि दानपेटीच्या चाव्या प्रशासक या नात्याने मामलेदारांना सुपुर्द करण्याचे गोवा शासनाचे आदेश !

  • हे मंदिरांच्या सरकारीकरणाचे छुपे पाऊल ! मंदिरांच्या संपत्तीकडे पाहून त्यांचे व्यवस्थापन कह्यात घेऊ पहाणार्‍या शासनाला आताच विरोध केला नाही, तर एक दिवस मंदिरांचे सरकारीकरण अटळ होईल !
  • शासन अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांच्या संदर्भात असे आदेश का काढत नाही ?
निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी गोवा राज्य देवस्थान कृती समितीची स्थापना
     म्हापसा, २३ मार्च - तालुक्यातील देवस्थानचे प्रशासक म्हणून काम पहाणार्‍या तालुक्याच्या मामलेदारांनी तालुक्यातील प्रत्येक देवस्थान समितीने आपल्या देवस्थानची संपत्ती आणि दानपेट्या यांच्या चाव्या मामलेदारांकडे सुपुर्द करण्याचे आदेश दिले आहेत. (मंदिरांतील व्यवहार आणि कार्यक्रम यांचे दायित्व भक्तांचेच असायला हवे ! प्रशासकीय अधिकार्‍यांकडे अधिकार सुपुर्द करायला मंदिरे ही शासकीय कार्यालये आहेत का ? - संपादक) या आदेशाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हापसा येथील शिरसाट सभागृहात नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन या बैठकीत गोवा राज्य देवस्थान कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे निमंत्रक यशवंत गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

दैनिक सनातन प्रभातमधील मडगाव स्फोटासंदर्भातील लेखमाला वाचून कारागृहातून निर्दोष सुटलेल्या साधकांनी व्यक्त केलेले विचार !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज ही लेखमाला वाचून साधकांनी व्यक्त केलेले विचार पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

अर्थसंकल्पात काय राहिले ?

        
श्री. भूषण कुलकर्णी
सध्या राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत आणि त्या वाढतही आहेत. अशा बिकट स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. हा अर्थसंकल्प शेतकरी आणि शेती क्षेत्र यांना निश्‍चितच दिलासा देणारा आहे. मुनगंटीवार यांनी २०१६-१७ हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष साजरे केले जाणार असल्याचे सांगितले. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने महागाई अल्प करणे, महिलांचे सबलीकरण, हिंदूंसाठी काही तरतुदी आणि पोलीस दलाचे अत्याधुनिकीकरण करणे यांसाठीच्या व्ययाच्या काही गोष्टींवर उहापोह केलेला दिसत नाही. त्यावर शासनाने आताही फेरविचार करून त्याविषयीची पूर्तता करावी आणि महागाईला आळा घालून सर्वसामान्यांना जीवन जगणे सोपे होईल, यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

तळ्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जन होऊ न देणारे धर्मद्रोही आणि त्यांना साहाय्य करणारी सातारा नगरपालिका !

श्री. राहुल कोल्हापुरे
     सातारा येथील काही धर्मद्रोही संघटना आणि सातारा नगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशमूर्ती दान करणे आणि कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे, असे धर्मद्रोही उपक्रम राबवण्यात आले. या वेळी नगरपालिका प्रशासनाविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे.
१. गणेशोत्सव डोळ्यांसमोर ठेवून तलावांंची स्वच्छता करणे 
     सातारा शहरात मंगळवार तळे, मोती तळे आणि फुटका तलाव, असे तीन तलाव आहेत. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार या तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होते; मात्र वर्ष २०१५ मध्ये काही तथाकथित पर्यावरणप्रेमींनी नगरपालिकेला पुढे करून तळ्यातील गाळ काढण्यास प्रारंभ केला. यासाठी लाखो रुपये व्यय करून नगरपालिकेने सांगितलेल्या लोकांना निविदा दिली. गाळ काढण्याचे काम मुद्दाम संथगतीने चालू ठेवले; कारण येणारे-जाणारे नागरिक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडिया यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे किती प्रदूषण होते, हे पाहून पुढील गणेशमूर्तींचे विसर्जन तळ्यात करायचे कि नाही, हे ठरवावे, हा त्यातील गर्भितार्थ होता. संथ गतीमुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. जलचर प्राणी मेल्याने आजूबाजूला कुजट वास पसरला.

अंमली पदार्थ तस्करीत ५९ गुन्हे प्रविष्ट : ६३ महिलांना अटक ! - मुख्यमंत्री

विधिमंडळ अधिवेशन २०१६
         मुंबई, २३ मार्च (विशेष प्रतिनिधी) - अंमली पदार्थांच्या तस्करीविषयी महिला आरोपींच्या विरोधात या वर्षात एकूण ५९ गुन्हे प्रविष्ट असून त्यात ६३ महिलांना अटक केली आहे. वर्ष २०१५ मध्ये एकूण २४४ गुन्हे प्रविष्ट केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २२ मार्च या दिवशी विधानसभेत झालेल्या लेखी प्रश्‍नोत्तरात दिली. या संदर्भात आमदार सर्वश्री संजय पोतनीस, सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. (ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! - संपादक)

...हा सूर्यावर थुंकण्याचा घाणेरडा प्रकार !

१. केंद्रशासनाने पुरोगाम्यांच्या भुंकण्याची पर्वा 
न करता, कन्हैय्याकुमारवर कडक कायदेशीर 
कारवाई करायलाच हवी !
     मातृभूमी आणि जनता यांच्या रक्षणासाठी सर्वस्वाची होळी करून आपल्या रक्ताचे शिंपण करणार्‍या शूरवीर सैनिकांची खुलेआम विटंबना आणि अपकीर्ती करणार्‍या, सवंग प्रसिद्धीने उन्माद चढलेल्या कन्हैय्याकुमारच्या मुसक्या पुन्हा आवळायलाच हव्यात. राजधानी देहलीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात आतंकवादी महंमद अफझलचा स्मृतिदिन साजरा करणार्‍या टोळक्याचा म्होरक्या कन्हैय्याकुमारवर केंद्रशासनाने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवताच, उपटसुंभ पुरोगामी आणि तथाकथित लोकशाहीवादी नेत्यांनी, संघटनांनी त्याचा कैवार घेतला.

संपूर्ण राज्यात मद्यबंदी का नको ?

     निघोज (जिल्हा नगर) या गावात मद्यबंदी करावी आणि त्यासाठी विहित मार्गाने मतदान घेण्यात यावे, या मागण्यांसाठी निघोज ग्रामस्थ महिलांनी नगर-पुणे महामार्गावर १३ मार्च या दिवशी रस्ता बंद आंदोलन केले. या वेळी आंदोलक महिलांना रस्त्यावरून हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लाठीमार करून त्यांची धरपकड केली. पोलिसांच्या लाठीआक्रमणात काही आंदोलक घायाळ झाले. निघोजमध्ये मद्यबंदीसाठी यापूर्वी मतदान झाले होते; पण ते योग्य पद्धतीने घेतले गेले नाही. त्यामुळे फेरमतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले होते; परंतु उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी न्यायालयात उपरोक्त माहितीच सादर न केल्याने ग्रामस्थ महिलांनी उपरोक्त आंदोलन केले. ग्रामस्थांनी आतापर्यंत अशा प्रकारचे आंदोलन दुसर्‍यांदा केले आहे.

भारताची झालेली विदारक स्थिती पालटण्यासाठी हिदु राष्ट्राला पर्याय नाही !

कु. सानिका जोशी
१. राजकारणामुळे झालेली भारताची विदारक स्थिती !
     पूर्वी भारत हा देश आध्यात्मिक क्षेत्र आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जात होता; पण आता भारत अनेक संकटांनी पोखरला जात आहे. पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांत पुष्कळ भेद दिसून येतो. याला राजकारणी कारणीभूत आहेत. ते पैशांच्या लालसेपोटी जनतेचे शोषण करत आहेत. राजकारण्यांच्या प्रलोभनांना बळी पडून आपणच गेली अनेक वर्षे त्यांना निवडून देत आलो. त्यामुळे भारताची ही विदारक स्थिती झाली आहे.
२. पीडित हिंदूंवर लगेचच कारवाई; मात्र घरात शस्त्रे आणि 
बॉम्ब बाळगणार्‍या मुसलमानांना मोकळीक !
     पूर्वी भारतात सर्व जण एकमेकांवर विश्‍वास ठेवून मोकळेपणाने जगत होते; परंतु आता कुणावर विश्‍वास ठेवावा आणि कुणावर नाही, हीच चिंतेची गोष्ट आहे. कोण कधी घात करेल, हे सांगता येत नाही. भारत ही हिंदूंची भूमी आहे, हेही स्पष्टपणे सांगता येत नाही. इतकी वाईट स्थिती आज हिंदूंची झाली आहे. ठिकठिकाणी दंगली, बॉम्बस्फोट आणि हत्या होत असतात. त्यात हिंदूच मारले जातात. दंगली आणि हत्या करणारे वेगळेच असतात; पण हिंदूंनाच अटक केली जाते. मशिदीत आणि मुसलमानांच्या घरांत दगड, तलवारी आणि पेट्रोल बॉम्ब सापडतात; पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही किंवा त्यांना अटकही होत नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ राज्यातील प्रसारकार्यातील धर्माभिमान्यांचा उल्लेखनीय सहभाग

१. पत्रके छापून त्यांचे वितरण करणारे धर्माभिमानी 
अ. केरळ मधील कोझीकोड जिल्ह्यातील धर्माभिमानी श्री. निखिल यांनी व्हॅलेंटाइन डेविषयी प्रबोधन करण्यासाठी ७५० पत्रके छापून घेतली आणि वितरीत केली. याला लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला. 
आ. पालक्काड जिल्ह्यातील श्री. काशी विश्‍वनाथ यांनी शिव आणि शिवरात्रीचे महत्त्व असलेली २ सहस्र पत्रके छापून त्यांचे वितरण करणार असल्याचे सांगितले. 
     श्री. सुरेश हे एक धर्माभिमानी आहेत. तेसुुद्धा स्वतः पत्रके छापून वितरित करणार आहेत.

महिलांनी धर्मपरंपरांचे काटेकोर पालन करावे !

अधिवक्त्या श्रीमती
अपर्णा रामतीर्थकर
     करियर करण्यापेक्षा महिलांनी कुटुंबाच्या भल्यासाठी त्याग करायला हवा. सध्या संस्कार, संस्कृती यांना मृत्यूघंटा लागली आहे. घरात सगळ्या सुखसोयी असूनही समाधान नाही. घरातील स्त्री धर्मापासून दूर गेल्यामुळे हे प्रकार होत आहेत. आई ही सतत तेवणारी (जळणारी नव्हे) वात असते. ती स्वत: तेवून इतरांना उजेड देते. स्त्रीचे खरे स्वातंत्र्य हे धर्माचरणात घरच्यांच्या आनंदात असते. भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे. यामुळे आईने मुलीला मर्यादेने वागणे शिकवले पाहिजे. माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारांचा मला लाभ झाला आणि माझा संसार सुखाचा झाला. सध्या संस्कार लोप पावत चालल्यामुळे आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे. महिला सुधारल्या, तर समाज सुधारेल. समाजाला घडवण्याचे मोठे दायित्व महिलांवर आहे. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू नये, तर पुरुषांच्या क्षमतेने काम करायला हवे. धर्मातल्या परंपरांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 
- अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर (१.२.२०१४)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी काही कारणे !

१. पाकिस्तानातून आलेल्या हिंदु निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधींनी लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
२. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर अचानक आक्रमण केले, तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये (आताचे ३० सहस्र कोटी रुपये) न देण्याच्या मंत्रीमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे, हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास शासनाला भाग पाडले. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?
     पाकिस्तानात २४ प्रतिशत हिंदु होते. आता १५ प्रतिशत राहिले. बांगलादेशात ३० प्रतिशतचे ७ प्रतिशतवर आले. भारतात मात्र २ प्रतिशतचे मुसलमान १५ प्रतिशत झाले. याची लाज आम्हा हिंदूंना वाटली पाहिजे ! - ह.भ.प. अनिल (काका) बडवे महाराज, पंढरपूर. (२१.११.२०१०)

उत्कृष्ट नियोजनकौशल्य, अविश्रांत परिश्रम आणि गुरूंवरील अपार श्रद्धा यांमुळे नाशिक येथील सिंहस्थपर्वाची सेवा उत्तमरित्या पार पाडून सद्गुरुपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

पू. (कु.) स्वाती खाडये
      
पू. राजेंद्र शिंदे
जुलै आणि ऑगस्ट २०१५ मध्ये नाशिक येथे सिंहस्थापर्वाचे आयोजन होतेे. तेथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसाराच्या सेवेचे दायित्व प्रसारसेविका पू. (कु.) स्वातीताई खाडये यांनी पुष्कळ सक्षमतेने सांभाळले. पू. (कु.) स्वातीताई आणि अन्य साधक यांनी सिंहस्थापर्वाच्या आयोजनाचा उत्तम प्रकारे लाभ करून घेतला. त्यामुळे पू. ताईंची आध्यात्मिक पातळी केवळ २ मासांत (महिन्यांत) ३ टक्क्यांनी वाढून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या.
         ९ साधकांनी ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच जगभर धर्माचा प्रचार-प्रसारही झाला. काल २३ मार्चला आपण सिंहस्थपर्वाचे आयोजन, पू. स्वातीताईंनी केलेली व्यष्टी-समष्टी साधना आणि सेवा चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न पाहिले, आज त्यापुढील भाग पाहूया.

पतीसमवेत सप्तपदी चालून साधनेतही त्यांना पदोपदी साहाय्य करणार्‍या आणि देवाला अपेक्षित अशी सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर !

      
सौ. मंजिरी आगवेकर
फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.३.२०१६) या दिवशी सौ. मंजिरी आगवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे यजमान, नातेवाईक आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
सौ. मंजिरी आगवेकर यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. विनायक आगवेकर (सौ. मंजिरी यांचे पती)
१ अ. दोषांवर मात करत परिस्थिती स्वीकारणे
         विवाहापूर्वी मंजिरी पूर्णवेळ आश्रमात रहात होती. आमचे कुटुंब मोठे आहे. सण किंवा उत्सव आम्ही सगळे एकत्र येऊन साजरे करतो. कुटुंबातील प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने प्रारंभी त्यांच्याशी आणि चालीरीतींशी जुळवून घेणे तिला कठीण गेले. आश्रमातील निरपेक्ष जीवन आणि सांंसारिक अपेक्षा असणारे जीवन यांत पुष्कळ अंतर आहे; पण तिने परिस्थिती पालटण्यापेक्षा स्वतःलाच पालटायला हवे, हे स्वीकारले. तिने दोषांवर मात करत नातेवाईकांत मिसळायला आरंभ केला आणि मग त्यांच्याविषयी येणार्‍या प्रतिक्रिया आणि अपेक्षाही अल्प झाल्या.

साधकांनो, ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

 जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी

सिंहस्थपर्वात संत संमेलनाविषयी घडलेल्या घडामोडी

१. संत संमेलनासाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे छत्तीसगडचे पू. बालकदासजी महाराज ! : एका संतांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्राचा विषय सर्व संतांपर्यंत पोचवण्यासाठी जेव्हा संतसंमेलन घ्यायचे ठरले, तेव्हा संपर्क करत असतांना छत्तीसगडचे पू. बालकदासजी महाराज यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यांनी सांगितले, मी स्वतः पुढाकार घेतो. सर्व संतांना आमंत्रणही देतो. संमेलनाचे आयोजनही माझ्याच जागेत करूया. तुम्ही सिद्धतेला लागा. पू. बालकदास महाराज यांनी स्वतः निमंत्रण देऊन त्यांच्या आश्रमात व्यवस्था करून ३५ साधू-संतांना बोलावले.

सिंहस्थपर्वातील संपूर्ण वितरणाचा कार्यभार पू. जाधवकाकांनी कौशल्याने हाताळणे

       
पू. नंदकुमार जाधव
संपूर्ण सिंहस्थापर्वाच्या कालावधीत धर्मप्रसार करतांना झालेल्या एकंदरीत वितरणाचा आवाका पुष्कळ मोठा होता. पू. जाधवकाकांनी तो समर्थपणे सांभाळला. सिंहस्थापर्वाच्या ठिकाणी असलेल्या सर्व वितरण केंद्रांचा आढावा घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, हिशोब पहाणे, आवश्यक ते ग्रंथ अथवा सात्त्विक उत्पादने यांची संस्थेच्या मुख्य कार्यालयाकडून मागणी करून त्यांचा पुरवठा करणे, हे सर्व दायित्व त्यांनी चोखपणे सांभाळले. 
- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.११.२०१५)

साधकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचे दायित्व कौशल्याने सांभाळणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तृप्ती गावडे !

        २०० साधकांचा अल्पाहार, पथ्यापथ्य इत्यादी, तसेच पर्वणीच्या काळात बाहेर वाहतुकीची कोंडी झालेली असतांना त्या कालावधीतही जेवणाचे नियोजन पहाणे, साधकांना सेवेला जातांना जेवणाचे डबे देणे इत्यादी सेवा कु. तृप्ती गावडे यांनी स्वयंपाकगृहाचे दायित्व सांभाळत कौशल्याने सांभाळल्या. 
- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.११.२०१५)

स्वतःच्या अन्नछत्रातून साधकांना त्यांच्या निवासस्थानी जेवणाचे डबे पोचवण्याची व्यवस्था करणारे भैय्याजी महाराज !

       प्रसारसेवेसाठी २०० साधक नाशिक येथे आले होते. त्यांच्यासाठी २ वेळचे जेवण आणि अल्पाहार बनवण्यासाठीचा साधकांचा वेळ वाचून अधिकाधिक वेळ धर्मप्रसारासाठी द्यायला मिळावा, यासाठी तेथे संतांनी चालू केलेल्या अन्नछत्रामध्ये साधक जेवायला जात. तेथे रात्री ९ नंतर जेवण उपलब्ध नसे. साधकांना सेवा अधिक असल्याने अनेक साधकांना ९ वाजण्यापूर्वी जेवायला जाणे जमत नसे. त्यांचा जाण्या-येण्यास पुष्कळ वेळही जात असे. त्यावर उपाय म्हणून जेवणाचे डबे मिळू शकतात का ?, असेे विचारल्यावर कुणाचीच तशी सिद्धता नव्हती. अन्नछत्र असणारे सांगत, तुम्ही रात्री ९ च्या पूर्वी कितीही जण या. अगदी १ सहस्र जण आले, तरी आम्ही जेवण बनवून देऊ; परंतु रात्री ९ नंतर जेवण मागू नका आणि डबे मागू नका. आम्ही ते देणार नाही.
          एकदा संत भैय्याजी महाराज प्रदर्शन पहाण्यास आले. प्रदर्शन पाहून ते फारच प्रभावित झाले होते. त्यांना जेवणाची अडचण सांगितल्यावर ते म्हणाले, तुम्ही एवढे चांगले धर्माचे कार्य करता. तुमच्यासाठी आम्ही जेवणाचे डबे पाठवत जाऊ. त्यांनी लगेच संपर्क करून साधकांना निवासाच्या ठिकाणी डब्यातून जेवण घेऊन जाण्याची अनुमती दिली.

२४ मार्चला बीएस्एन्एल आस्थापनाचा ब्लॅक आऊट डे

साधकांना सूचना
     २४ मार्च या दिवशी धूलिवंदनानिमित्त बीएस्एन्एल या आस्थापनाने ब्लॅक आऊट डे घोषित केला आहे. ट्रायच्या नियमानुसार या दिवशी कॉल्स किंवा लघुसंदेश यांसाठी असलेल्या सवलतीच्या सुविधा मिळणार नाहीत. गटामध्ये कॉल केल्यास दर आकारला जाईल. लघुसंदेशासाठीच्या सवलतीही मिळणार नाहीत. त्यामुळे आवश्यक असल्यासच कॉल किंवा लघुसंदेश करावेत. शक्य असल्यास लॅन्डलाईनची सुविधा वापरावी.


राजयोगी स्नानाच्या मिरवणुकीच्या वेळी शिस्तबद्धरित्या जाणार्‍या सनातनच्या साधकांचे सह्याद्री या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रक्षेपण

          राजयोगी स्नानाच्या वेळी अनेक साधू-संतांचे आखाडे मिरवणुकीने राजयोगी मार्गावरून रामकुंडावर जायचे. त्या वेळी सनातननेही त्या मिरवणुकीत सर्वांत शेवटच्या रांगेत सहभाग घेतला होता. सनातनचे साधक अतिशय शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून आणि हातात धर्मशिक्षणाचे प्रबोधनात्मक फलक घेऊन मिरवणुकीत चालत होते. सह्याद्री या राष्ट्रीय वाहिनीवरून याचे प्रक्षेपण दाखवतांना त्यांनी सांगितले, आता सनातनची शिस्तबद्ध फेरी येत आहे. शिस्तबद्धता हे सनातनचे वैशिष्ट्य आहे. असे सांगून त्यांनी ५ मिनिटे सनातनच्या मिरवणुकीचे प्रक्षेपण दाखवले. 
- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.११.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

साधकांना संकटकाळात खोट्या आरोपावरून कारागृहात जायला लागू नये, म्हणून महर्षींचे उपाय !

महर्षींची शिकवण आणि कार्य !

पू. सौ. गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव
१. साधकांना कारागृहात जायला लागू नये, म्हणून तमिळनाडूतील तिरूवेंगाडू गावातील श्री गजाननाच्या मंदिरात महर्षींनी दर्शनासाठी नेणे : संकटकाळात साधकांना खोट्या आरोपावरून कारागृहात जायला नको आणि त्यांची साखळदंडापासून, म्हणजेच हातात घातल्या जाणार्‍या बेड्यांपासून सुटका व्हावी, तसेच त्यांचे आधीच अशा प्रकारच्या संकटांपासून रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी आम्हाला तमिळनाडू राज्यातील नागपट्टणम् जिल्ह्यातील तिरूवेंगाडू या गावातील श्री गजाननाच्या मंदिरात नेले होते. हे गाव तंजावरच्या जवळ आहे. साखळदंडी-गजानन म्हणूनच हा गणपति प्रसिद्ध आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

जीवनातील प्रत्येक दुःखद प्रसंगाकडे ईश्‍वरेच्छा, प्रारब्ध आणि साक्षीभाव या ३ दृष्टीकोनांतून पहाण्याचा प्रयत्न केला, तर दुःख होत नाही !

१. भक्तीयोगानुसार ईश्‍वरेच्छा
        जगातील सर्वच घटना आपल्या इच्छेने, म्हणजे स्वेच्छेने घडत नाहीत, तर ईश्‍वरेच्छेनेच घडत असल्याने आणि ईश्‍वराला व्यक्तीला काय आवश्यक आहे, हे ज्ञात असल्यामुळे तो योग्य तेच करतो.
२. कर्मयोगानुसार प्रारब्ध
       जीवनातील ३५ टक्के घटना क्रियमाण कर्मानुसार होतात, तर ६५ टक्के, म्हणजे बहुसंख्य घटना प्रारब्धानुसार घडतात. प्रारब्धभोग भोगूनच संपवावे लागत असल्यामुळे दुःखाकडे आपल्याच दुष्कृत्याची शिक्षा आपण भोगत आहोत, असा दृष्टीकोन ठेवून पहाता येते.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

सतत वर्तमानकाळात रहाणे
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म 
आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो. 
     भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आंधळा खड्ड्यात पडल्यावर त्याच्या पाठून जाणारे खड्ड्यात पडतात, तसे हिंदू बुद्धीप्रामाण्याद्यांसमवेत अधोगतीला जात आहेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन 
      परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावनेच आढळते; म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत; मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आत्मघात ठरू नये !

संपादकीय 
     जम्मू-काश्मीरमधील मोक्याच्या ४ ठिकाणी असलेले भारतीय सैन्य मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सत्तेसाठी पीडिपीने ही एक अट घातली आहे, अशी माहिती आहे. पीडिपीचा इतिहास पहाता आणि त्यातही मुख्यमंत्री होणार्‍या मेहबुबा मुफ्ती यांचा इतिहास पहाता त्यांना नेहमीच फुटीरतावाद्यांचा पुळका येतो. हे फुटीरतावादी काश्मीर भारतापासून स्वतंत्र करण्याची मागणी करतात. त्यामुळे साहजिकच ते पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये साहाय्य करत असतात. या मोक्याच्या चार ठिकाणचे सैन्य मागे घेतल्यावर त्या ठिकाणी फुटीरतावाद्यांच्या देशद्रोही कारवाया पुन्हा होणार नाहीत, याची ग्वाही पीडिपी देणार आहे का ? जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि सैन्याचे अधिकारी यांच्यातील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्याने या निर्णयाला अनुमती दिल्यामुळे केवळ राजकारण्यांवर या प्रकरणी आरोप करणे, अप्रस्तुत ठरेल; पण मग पीडिपीने अट घातल्यावरच हा निर्णय का घेण्यात आला ? हा प्रश्‍न रहातोच. पीडिपीनेही सत्तेसाठी अशी अट घालण्यामागील कारण काय ? हे फुटीरतावाद्यांचे लांगूलचालन नाही का ? काश्मीरमधील काही भागांत हल्लीच आतंकवाद्यांशी सुरक्षा दलांच्या सातत्याने चकमकी चालू होत्या. तेथील स्थानिक फुटीरतावाद्यांनी आतंकवाद्यांना सुरक्षा दलांपासून संरक्षण पुरवल्याचीही घटना घडली होती. सारांश हाच की, मोक्याच्या ठिकाणचे सैन्य मागे घेण्याचा निर्णय हा आत्मघात ठरू नये !

काँग्रेस कि इंग्रज ?

संपादकीय 
     काँग्रेसने स्वत:ची संपूर्ण राजवट केवळ इतिहासाशी प्रतारणा करण्यात खर्ची घातली आहे, हे ज्यांना ज्यांना ज्ञात आहे, अशांना शशी थरूर यांनी केलेल्या कन्हैया म्हणजे आजचा भगतसिंह या वक्तव्याचे फारसे आश्‍चर्य वाटणार नाही. ज्यांनी यापूर्वी क्रांतीकारक भगतसिंह यांना आतंकवादी ठरवले होते, अशा सडक्या मेंदूंचा भरणा असलेल्या पक्षाकडून दुसरी अपेक्षा तरी काय असू शकते ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn