Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज बलीदानदिन

कोटी कोटी प्रणाम !

 पू. जयराम जोशीआजोबा यांचा आज वाढदिवस 

पू. (कु.) स्वाती खाडये यांचा आज वाढदिवस

महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी अखेर त्यागपत्र दिले !

अणे यांनी मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळा करा, असे म्हटल्याचे प्रकरण
फुटीरतावादी विधाने करणार्‍यांवर शासनाने
 कारवाई करणे अपेक्षित आहे !
      मुंबई - विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी २२ मार्चला सकाळी अखेर त्यागपत्र (राजीनामा) दिले. हे त्यागपत्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वीकारले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अणे यांच्या हकालपट्टीच्या मागणीचे तीव्र पडसाद २१ मार्चला उमटले होते. महाधिवक्ता अणे यांना पदावरून दूर करावे, अशा आशयाचा ठराव शिवसेना, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सदस्यांनी मांडल होता. त्यामुळे अखेर शासनालाही अणे यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. अणे यांच्या मताशी राज्यशासन सहमत नाही, असे विधानसभेत २१ मार्चला स्पष्ट करण्यात आले होते. २२ मार्चला सकाळी सभागृह चालू होण्याआधी विरोधी पक्षांसह शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहाबाहेर घोषणा दिल्या.
विरोधकांचा गोंधळ आणि मुख्यमंत्र्यांकडून निवेदन
     अणे यांनी त्यागपत्र दिल्यानंतरही विरोधकांनी २२ मार्चला सभागृहात गोंधळ घातला. अणे यांनी सभागृहाची क्षमा मागावी, अशा घोषणा देण्यात आल्या.
     या वेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने निवेदन सादर केले. मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे.

ब्रुसेल्स (बेल्जियम) विमानतळावर बॉम्बस्फोट, २८ ठार

सालाह अब्दसलेम याच्या अटकेचा सूड उगवण्यासाठी आक्रमण ?
      ब्रुसेल्स - बेल्जियमची राजधानी असलेले ब्रुसेल्स येथील विमानतळ २ शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. या स्फोटात २८ ठार, तर १०० प्रवासी घायाळ झाले आहेत. मृत आणि घायाळ झालेल्या प्रवाशांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विमानतळावर काही भारतीय प्रवासीही होते, असे सांगितले जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता, तर स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता हे स्फोट झाले. बेल्जियममधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या प्रस्थान कक्षातील चेक इन एरियात हे स्फोट झाले. या स्फोटानंतर विमानतळावर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी जिवाच्या आकांताने सैरभैर पळत होते. घटनेनंतर ब्रुसेल्स विमानतळ पूर्णपणे रिकामे करण्यात आले. या विमानतळाकडे जाणारी रेल्वेसेवाही थांबवण्यात आली.

डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांकडून अभाविपचा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न !

  • कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी !
  • कार्यक्रम उधळणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची अभाविपची मागणी !
      पुणे - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएन्यूतील) अभाविपचे अध्यक्ष श्री. आलोकसिंह यांचा २२ मार्च या दिवशी फर्ग्युसन महाविद्यालयात एका अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता; मात्र हा कार्यक्रम महाविद्यालयातील काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या वेळी कन्हैया कुमार झिंदाबाद !, अभाविपवर बंदी घाला !, लाल सलाम अशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली. (व्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे डावे आता अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या विचार आणि भाषण स्वातंत्र्यावर का अतिक्रमण करत आहेत ? भारताची बरबादी इच्छिणार्‍या देशद्रोह्यांचे समर्थन करणारेही देशद्रोहीच आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातून तात्काळ निलंबन व्हायला हवे ! - संपादक) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले आहे.
१. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशाच्या बरबादीच्या घोषणा देण्याच्या प्रकरणाची वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळावी, यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सकाळी ११ वाजता श्री. आलोकसिंह यांच्या अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
२. कार्यक्रम चालू होताच डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करायला प्रारंभ केला.
३. या वेळी चर्चा करण्याचे आवाहन श्री. आलोकसिंह यांनी केले;

महाराष्ट्रात शासनाच्या योजनेच्या अंतर्गत १ लाख ८० सहस्र घरांच्या प्रस्तावास मान्यता

      मुंबई - देशात वर्ष २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्रात ती प्रभावीपणे राबवण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. या अंतर्गत राज्यातील १ लाख ८० सहस्र घरांच्या प्रस्तावास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश क्षत्रिय यांनी २१ मार्च या दिवशी दिले. संबंधित महापालिकांनी कामास गती देण्याचे आवाहनही क्षत्रिय यांनी केले.

(म्हणे) श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती देणार नाही !

नगर येथील पोलिसांची मोगलाई !
अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या वेळी पोलिसांनी अशी भूमिका कधी घेतली आहे का ?
हिंदुबहुल देशात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती न मिळायला हा पाकिस्तान आहे का ?
      नगर - गेल्या वर्षी श्रीरामनवमीला शहरात हिंदु-मुसलमान यांच्यात वाद होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी श्रीरामनवमीला कोणालाही शहरातून मिरवणूक काढण्यासाठी अनुमती देण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (हिंदूंच्या सण-उत्सवाच्या वेळी धर्मांधांकडून दंगली घडवल्या जात असतांना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हिंदूंवरच निर्बंध लादणारे पोलीस हिंदुद्वेषीच होय ! भाजप-शिवसेनेच्या शासनाने न्याय द्यावा, अशी हिंदूंची मागणी आहे ! - संपादक) या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे उपस्थित होते. डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले,
१. धार्मिक उत्सवात कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये आणि दुष्काळी परिस्थितीतही कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
२. शांततेच्या मार्गाने उत्सव साजरा करण्यास पोलिसांचा आक्षेप नाही.

उज्जैन सिंहस्थपर्वात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र उघड !

बॉम्बस्फोटाचा कट रचणारे आणि त्यांना साहाय्य 
करणारे यांना अटक करून तात्काळ खटला 
चालवून त्यांच्यावर कठोर शासन करण्याचे 
धाडस राज्यकर्ते दाखवतील का ?
     हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात काँग्रेस, साम्यवादी, आम आदमी पक्षाचे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
     उज्जैन - येथे पुढच्या महिन्यात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. येथील मुलांच्या वसतीगृहात नुकतेच सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीतून या षड्यंत्राचा सुगावा लागला आहे.
१. या संदर्भात आतंकवाद्यांच्या अटकेसाठी मध्यप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील अनेक ठिकाणी छापे मारले.
२. गेल्या दोन दिवसांत ४५ ठिकाणी छापे मारून १५० हून लोकांची चौकशी करण्यात आली.
३. सूत्रांच्या माहितीनुसार हे षड्यंत्र तडीस नेण्यासाठी ३० ते ४० वयोगटातील आतंकवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
४. सूत्रांच्या माहितीनुसार तीन संशयित आतंकवाद्यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख संजीव शमी यांनीही दावा केला आहे की, तीन आतंकवाद्यांची ओळख पटली आहे.

उज्जैन येथे १३ आखाड्यांतील संत एकत्र येऊन खेळणार गोमय आणि चंदनाने होळी !

      इंदूर (मध्यप्रदेश) - उज्जैन येथील शैव, वैष्णव तसेच उदासिन आखाड्यांनी एकत्र येऊन गोमय आणि चंदनाने होळी खेळण्याचे एकमताने ठरवले आहे. गायीचे शेण शुद्ध असल्याने रसायनांनी बनवलेल्या रंगांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो तसा याने होत नाही. भारतीय संस्कृतीतील गायीचे महत्त्व सांगण्यासाठी तसेच गोमयामुळे होणार्‍या वैद्यकीय लाभांची माहिती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. होळीच्या दिवशी सकाळी गोमय आणि गोमूत्र एकत्र करून होळी खेळण्यात येईल. आखाड्यांतील ज्येष्ठ संतांच्या कपाळावर सन्मानाचे प्रतीक म्हणून गोमय लावले जाईल. तर संध्याकाळी फूल आणि चंदनाने होळी खेळण्यात येईल. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्रगिरी यांनी माहिती देतांना म्हटले की, गोमय आणि गोमूत्र यांनी होळी खेळण्याची आमची पुष्कळ जुनी परंपरा आहे. कित्येक वर्षांपासून आम्ही याचे पालन करत आलो आहोत. उज्जैनमध्ये प्रत्येक सिंहस्थ मेळाव्याला १३ आखाडे एकत्र येऊन होळी खेळतात, हा विशेष क्षण आहे कारण सिंहस्थपर्व १२ वर्षांनी येते.

कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली

      नवी देहली - जेएन्यूत देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने २२ मार्चला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याविषयी मात्र माहिती मिळू शकली नाही.
होळी आणि रंगपंचमी या सणांविषयी धर्मशास्त्रीय माहिती
जाणून घेण्यासाठी पुढील मार्गिकेला अवश्य भेट द्या !

http://www.sanatan.org/mr/holi


'एम्.आय.एम्.' च्या नगरसेवकांचा विरोध न जुमानता नांदेड महानगरपालिकेत ओवैसींच्या विरोधात निषेध ठराव संमत

ओवैसींच्या विरोधात निषेध ठराव संमत करणार्‍या नांदेड महानगरपालिकेचे अभिनंदन ! 
इतरत्रच्या पालिकांनीही यातून बोध घेऊन अशी कृती करणे आवश्यक आहे. 
     नांदेड, २२ मार्च - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या २१ मार्च या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत 'एम्.आय.एम्.'चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला, तसेच 'भारतमाता की जय' म्हणण्यास विरोध करणार्‍या ओवैसींविषयी सभागृहाने तीव्र संताप व्यक्त करून निषेधाचा ठराव संमत करून घेतला. या प्रसंगी 'भारतमाता की जय', 'इस देश मे अगर रहेना होगा, तो वन्दे मातरम् कहना होगा !'अशा विविध घोषणा देण्यात आल्या. 

लंडनमध्ये एकाच वेळी १० ठिकाणी आतंकवादी आक्रमणे होण्याची शक्यता !

       लंडन - ब्रिटनमधील गुप्तचर विभागाने लंडनमध्ये एकाच वेळी १० आतंकवादी आक्रमणे होण्याच्या शक्यतेनंतर सतर्कतेची चेतावणी दिली आहे. सिरियामधील इसिसमध्ये सहभागी ब्रिटिश मुसलमान आतंकवादी पुन्हा ब्रिटनमध्ये येत असून त्यांच्याकडून पॅरीसमध्ये झालेल्या आक्रमणाप्रमाणे आक्रमण होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पोलिसांना साहाय्य करण्यासाठी सैन्यदलाच्या तुकडीला लंडन शहराच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे. तसेच सैन्याच्या आतंकवादविरोधी बॉम्बनाशक दलाला सतर्क रहाण्यास सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या कारागृहात बंद असणार्‍या आतंकवाद्यांकडून अराजक स्थिती निर्माण होऊ नये, म्हणूनही उपाय योजण्यात आले आहेत. (अशा प्रकारच्या उपाययोजना कधी भारतीय सुरक्षा यंत्रणा करतात का ? - संपादक)

(म्हणे) दंगलींमुळे मुसलमान समाजात निर्माण झालेली भीतीची भावना शासनाने दूर करावी !

सुफी समुदायाची मागणी
  • धर्मांधांच्या मनातील कथित भीती दूर करण्याचे आवाहन करणारे धर्मांध नेते बंगालमध्ये गेल्या मासात त्यांच्याच बांधवांनी घातलेल्या हैदोसाविषयी एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • आजपर्यंतचा दंगलींचा इतिहास पाहिल्यास धर्मांधच क्षुल्लक कारणावरून दंगल घडवून हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने अशा संपत्तीचा जाणीवपूर्वक विध्वंस करतात, हे लक्षात येईल. हिंदूच त्यामुळे खर्‍या अर्थाने पीडित असून त्यास उत्तरदायी असणार्‍या दंगलखोर धर्मांधांच्या मुसक्या शासनाने त्वरित आवळल्या पाहिजेत !
  • हिंदूंना उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांध दंगलखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी एकातरी हिंदु नेत्याने कधी केली आहे का ?
      नवी देहली - देशात काही ठिकाणी होणार्‍या जातीय दंगलींमुळे मुसलमान समाजात निर्माण झालेली भीतीची भावना शासनाने दूर करावी, तसेच त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने काय उपाययोजना केल्या तेही सांगावे, अशी मागणी द ऑल इंडिया उलेमा अ‍ॅण्ड मशैख बोर्डाचे प्रमुख सय्यद महंमद अश्रफ यांनी २० मार्च या दिवशी केली. वरील संघटनेच्या वतीने येथील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक सुफी फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होेते.

आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ! - पंतप्रधान

     आरक्षण म्हणजे अधिक पात्रता असलेल्या व्यक्तीला डावलून अल्प पात्रता असलेल्या व्यक्तीला संधी देणे होय ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची दिलेली कालमर्यादा पाळली जाणे आवश्यक आहे. आरक्षणामुळे समाज एकसंध कसा रहाणार ?      नवी देहली - आरक्षणाच्या सूत्रावरून विरोधी पक्षांकडून देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. विरोधकांच्या या राजकारणाला कोणीही बळी पडू नये. मी आंबेडकर भक्त आहे. आरक्षण काढून घेण्याचे सोडाच; पण माझे शासन आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
     केंद्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या डॉ. भीमराव आंबेडकर राष्ट्र्रीय स्मारकाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २१ मार्चला करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
      मोदी पुढे म्हणाले, तत्कालीन वाजपेयी शासनाच्या काळातही भाजप आरक्षण काढून घेणार, अशा जोरदार वावड्या उठवल्या गेल्या होत्या. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. तरीही अपप्रचार चालूच होता. आता पुन्हा तोच प्रकार चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणेच वैश्‍विक नेते होते. त्यांना केवळ दलितांचा मसिहा म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.

(म्हणे) अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांत वाढ झाली आहे !

अल्पसंख्यांकांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांत वाढ झाल्याविषयी 
काँग्रेसने कधी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे का ?
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचे पंतप्रधानांना पत्र
    नवी देहली - देशातील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांत वाढ झाली आहे, असा कांगावा काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केला आहे. 
या पत्रात पुढे म्हटले आहे की
१. राजकीय लाभ उठवण्यासाठी जातीय द्वेष पसरवून फुटीरतावादाला प्रोत्साहन देणार्‍या संघ परिवाराला नियंत्रणात ठेवण्यास मोदी शासनाला पूर्णपणे अपयश आले आहे.
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अरुण माहौर यांच्या हत्येनंतर झालेल्या शोकसभेत भडकावू भाषण दिल्याच्या आरोपाखाली भाजपच्या नेत्या कुंदनिका शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुंदनिका शर्मा, विहिंपचे अशोक लवानिया आणि अभाविपचे शशांक चौधरी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. शोकसभेत केंद्रीय मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया, साध्वी प्राची यांसह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते.

दौंड (जिल्हा पुणे) येथील तहसीलदारांवर वाळूमाफियांकडून आक्रमण

आक्रमणकर्त्यांमध्ये ८ धर्मांधांचा समावेश 
आणखी किती तहसीलदारांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटना 
झाल्यावर वाळूमाफियांच्या मुसक्या पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग आवळणार आहे ? 

     पुणे, २२ मार्च - दौंड तालुक्यात असलेल्या पेडगाव येथे भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पथक गेले होते. पथकातील तहसीलदार आणि अन्य जणांवर वाळूमाफियांनी १८ मार्चच्या रात्री दगडफेक करत आक्रमण केले; परंतु त्यात सर्वजण बचावले आहेत. या वेळी पथकाने कारवाईमध्ये हस्तगत केलेले २ 'जे.सी.बी.' वाळूमाफियांनीच पळवून नेले. या प्रकरणाची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे. या वेळी पेडगावमधून ३० हून अधिक लोकांचा जमाव पथकावर आक्रमण करण्यासाठी चालून आला. 

संपूर्ण देशभरात आय.पी.एस्. अधिकार्‍यांची ९०० हून अधिक पदे रिक्त !

     देश जिहादी आतंकवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या सावटाखाली असतांना, तसेच देशातील कायदा आणि सुव्यस्थेवर धर्मांधांकडून आघात होत असतांना पोलीस अधिकार्‍यांची पदे तात्काळ भरणे राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे ! 
     नवी देहली - संपूर्ण देशात भारतीय पोलीस सेवेतील (आय.पी.एस्) अधिकार्‍यांची सुमारे ९०० हून अधिक पदे रिक्त आहेत. १ जानेवारी २०१६ मध्ये देशभरात ९०८ पदे रिक्त आहेत. देशात आय.पी.एस् अधिकारी म्हणून संमत असणार्‍या पदांची संख्या ४ सहस्त्र ८०९ आहे. सध्या ३ सहस्त्र ८९४ आय.पी.एस्. अधिकारी कार्यरत आहेत. 
     उत्तरप्रदेशामध्ये ५१७ पैकी ११४ आय.पी.एस्. दर्जाची पदे रिक्त आहेत. बंगालमध्ये ३४७ पदांपैकी ८८ पदे, ओडिशात १८८ पैकी ७९, तर कर्नाटकात ७२ पदे रिक्त आहेत. देशाची लोकसंख्या अधिक असतांना रिक्त पदांची संख्या अधिक आहे, असे गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे.

बिहार शासनाकडून प्रत्येक आमदाराला मायक्रोवेव्ह ओव्हन भेट !

देशात अर्ध्याहून अधिक जनता उपाशीपोटी झोपत असतांना जनतेच्या 
पैशांची अशी उधळपट्टी करणारे जनताद्रोही लोकप्रतिनिधी !
बिहारमधील भाजपचे आमदार महागडे मायक्रोवेव्ह ओव्हन परत करणार
     पाटलीपुत्र (पाटणा) - भाजपचे नेते तथा आमदार सुशील मोदी, आमदार प्रेमकुमार आणि मंगल पांडे या ३ आमदारांनी त्यांना शासनाच्या शिक्षण विभागाकडून भेटवस्तू म्हणून देण्यात आलेला मायक्रोवेव्ह ओव्हन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४ मासांपासून लाखो शालेय शिक्षकांना वेतन देण्यात आले नसल्याचे कारण पुढे करत भाजपने हे पाऊल उचलले आहे. शिक्षण विभागाने १८ मार्च या दिवशी राज्यातील प्रत्येक आमदाराला ११ सहस्र २२५ रुपये किमतीचा मायक्रोवेव्ह ओव्हन भेटस्वरूपात दिला. यावर सर्व थरांतून टीका होत आहे. हे मायक्रोवेव्ह देतांना शासनाने आमदारही गरीब आहेत, तसेच शासकीय शाळेत देण्यात येणार्‍या माध्यांन्ह भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी आमदार त्याचा वापर करू शकतात, असे सांगितले होते. यावर सुशील मोदी यांनी आमदारांना दर महा दीड लाख रुपये दिले जातात, याचे स्मरण शासनाला करून दिले.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक


नाशिक येथे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात निषेध फेरी

प्रभारी पोलीस निरीक्षकांना निवेदनही सादर 
नाशिक येथे प्रभारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     पिंपळगांव बसवंत (नाशिक) - एम्आयएम् या पक्षाचे धर्मांध नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतमातेच्या विरोधात केलेल्या विधानाच्या घटनेनंतर येथे धर्माभिमान्यांनी निषेध फेरी काढली. या वेळी मातृभूमीविषयी प्रेम वाढवणार्‍या घोषणा देण्यात आल्या. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे श्री. कैलास साळुंके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरेे यांच्यासमवेत सर्वश्री बापूसाहेब पाटील, महेश राठी, किरण लभडे, अरुण मोरे, परेश शहा, प्रशांत घोडके, अनंत मोरे, आनंद मोरे, रामकृष्ण खोडे, नारायण जाधव, विजय भंडारे, प्रकाश घोडके आदींसह विविध पक्ष, संघटना आणि संप्रदायांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(म्हणे) 'वारिस यांच्या निलंबनाची आवश्यकता नव्हती !'

देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याचा काँग्रेसचा अश्‍लाघ्य प्रयत्न ! 
     सोलापूर, २२ मार्च - एम्.आय.एम्.' पक्ष हा कोणाच्या तरी इशार्‍यावर नाचत आहे. विधानसभेत आमदार वारिस पठाण यांच्या निलंबनाविषयी एकमताने ठराव करण्यात काँग्रेसने दिलेली सहमती पूर्णत: चुकीची आहे. प्रत्यक्षात वारिस यांच्या निलंबनाची आवश्यकता नव्हती, असे विधान काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी केले. (अल्पसंख्यांकांची तळी भरण्यासाठी काँग्रेसने भूमिका पालटली, हे सूज्ञ जनताही जाणते. आतापर्यंत काँग्रेसने केवळ मुसलमानांचीच बाजू घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही कारवायांना पाठिंबा देणार्‍या काँग्रेसवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक) दलवाई हे सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडून १ कोटी रुपये शासनाधीन

निवडणुकीतील भ्रष्टाचार !
     कोलकाता - निवडणूक होऊ घातलेल्या बंगालमध्ये गेल्या १८ दिवसांत निवडणूक आयोगाने १ कोटी रुपये शासनाधीन केले. अवैधरित्या रोख रक्कम बाळगल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी अमिताभ सेनगुप्ता यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये ९०८ जलद कृती पथके तैनात करण्यात आली आहेत. २१ जिल्ह्यांतील निवडणुकीच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी ५ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर ३० मिनिटांच्या आत त्याची दखल घेतली जाणार आहे, असे श्री. सेनगुप्ता यांनी सांगितले.

गुडगाव येथील अधिवक्त्यांच्या बैठकीत सनातन संस्थेचे मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांचे साधनेविषयी मार्गदर्शन

     देहली - गुडगाव येथील हिंदी मासिक सनातन प्रभातचे वाचक अधिवक्ता अरुण शर्मा यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सनातन संस्थेचे मानद सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी उपस्थित अधिवक्त्यांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी अधिवक्ता केसरकर म्हणाले की, येणार्‍या कठीण काळात आनंदी रहाण्यासाठी आध्यात्मिक बळ वाढवायला हवे. सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद प्राप्त करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार आपल्या कुलदेवतेचा नामजप करणे आवश्यक आहे. यामुळे आपण ईश्‍वरी कृपा संपादन करू शकतो. अधिकोषाचे व्यवस्थापक, लेखा परिक्षक आणि अधिवक्ते यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझाही विरोध ! - प.पू. श्री दामोदरानंद सरस्वतीजी

     सातारा, २२ मार्च (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी मला कर्नाटकातही माहिती मिळाली असून याविषयी मी अवगत आहे. कर्नाटक शासनाने कायदा करण्यापूर्वी त्या विषयातील तज्ञांचे मत जाणून घ्यायला हवे. कर्नाटक राज्यातील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला माझाही विरोध आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथील सदानंद स्वामी मठाचे मठाधिपती प.पू. श्री दामोदरानंद सरस्वतीजी यांनी केले. येथे एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना कर्नाटक राज्यात होऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी माहिती दिली. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. रविकुमार कोठाळे उपस्थित होते. 

सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्याचे न्यायालयाचे आदेश

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अपकीर्ती केल्याच्या खटल्याचे प्रकरण 
     पुणे, २२ मार्च - माजी मंत्री आणि सध्या कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची वर्ष २००३ मध्ये एका पत्रकार परिषदेत अपकीर्ती केली होती. या प्रकरणी त्या वेळी प्रविष्ट केलेल्या खटल्यात आरोपी जैन यांच्यावर आरोप निश्‍चिती करावी, असे आदेश पुणे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश सौ. शीतल एस्.बांगड यांनी दिले आहेत. (या प्रकरणी न्यायालयाने सुनावणी लवकर पूर्ण करून निकाल लवकर द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. - संपादक) सुरेश जैन हे सध्या जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणी गेल्या ३ वर्षांपासून कारागृहात आहेत. 

पुणे शहरातील जलतरण तलाव बंद ठेवण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश

अनेक मासांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांना 
असा आदेश आता काढला जाणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल ! 
     पुणे, २२ मार्च - राज्य शासनाच्या आदेशानंतर शहरातील महानगरपालिका आणि खाजगी असे सर्वच जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने २१ मार्च या दिवशी घेतला आहे. आदेशानंतरही तलाव चालू ठेवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 
     राज्यात यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे सर्वच शहरांमधील जलतरण तलाव बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. येत्या जुलै मासापर्यंत ते बंद ठेवावेत, असे त्या आदेशात म्हटले आहे. 

सुदर्शनवाहिनीवर होळी आणि धूलिवंदन विषयांवर मार्गदर्शन

विषय : होलिकादहन
दिनांक : २३.३.२०१६
वेळ : सकाळी ८-८.३०,  दुपारी १२.००-१२.३०,  दुपारी ४.००-४.३०
सहभाग : श्रीमती सन्दीप कौर मुंजाल, हिंदु जनजागृती समिती

विषय : धूलिवंदन
दिनांक : २३.३.२०१६ 
वेळ : सायं. : ६.००-६.३०
दिनांक : २४.३.२०१६
वेळ : सकाळी : ८.००-८.३०, दुपारी : १.००-१.३०, सायं. : ५.००-५.३० रात्री : ९.००-९.३०
सहभाग : कु. कृतिका खत्री, सनातन संस्था

धुळे येथील भाजपचे शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्याकडून तक्रार प्रविष्ट

खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार वारिस पठाण यांनी 
भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्याचे प्रकरण
      शिरपूर (जिल्हा धुळे) - भारतमाता की जय म्हणायला नकार दिल्यावरून एम्आयएम् या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात भाजपचे शहराध्यक्ष हेमंत गुलाबराव पाटील यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. याविषयी २ आठवड्यांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्या. कुलकर्णी यांनी शहर पोलिसांना दिला. ओवैसी यांनी माझ्या गळ्यावर चाकू ठेवला, तरी मी भारतमाता की जय असे म्हणणार नाही, असे विधान केले होते आणि आमदार वारिस पठाण यांनीही मुंबईत भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिला होता. याविरोधात हेमंत पाटील यांनी तक्रार दिली.


गोवा राज्यावर सुमारे ११ सहस्र कोटी रुपये कर्ज

असे असूनही कार्निव्हल, चित्रपट महोत्सव, लुसोफोनिया स्पर्धा, 
शवप्रदर्शन यांसाठी शासनाने कोट्यवधी रुपये उधळले !
    पणजी - विद्यमान भाजप शासनाने सत्तेवर आल्यावर १ एप्रिल २०१२ ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ५ सहस्र रुपये कर्ज विविध संस्थांकडून घेतले आहे. गोवा राज्यावर १० सहस्र ९६८ कोटी रुपये कर्ज आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.

वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाशी समीर सारदानाचा संबंध होता ! - मुख्यमंत्री, गोवा

      पणजी - इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला आणि ठोस पुराव्यांअभावी पुढे सुटका करण्यात आलेला समीर सारदाना याचा देशात वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाशी संबंध होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात एका उत्तरादाखल या प्रकरणाला अनुसरून संपूर्ण पोलीस चौकशीचा अहवाल विधानसभेत मांडला आहे.

इसिसमध्ये दोन आतंकवाद्यांची भरती करणार्‍या इसिसच्या समर्थकाला २२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

कुठे देशाविरुद्ध कट रचणार्‍या संघटनांमध्ये सहभागी होणार्‍यांना तात्काळ शिक्षा करणारी 
अमेरिका, तर कुठे त्यांचे समुदेशन करण्यात धन्यता मानणारा भारत ! 
      वॉशिंग्टन - इसिसमध्ये दोन आतंकवाद्यांची भरती करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने मुफिद एल्फजीह (वय ३२ वर्षे) याला २२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यूयॉर्कच्या न्यायालयाने ठोठावली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये एलफजीह याच्यावर हा आरोप सिद्ध झाला होता आणि अमेरिकेच्या सुरक्षा अधिकार्‍याला ठार मारण्याच्या प्रयत्न तसेच अवैध शस्त्रसाठा केल्याचा आरोपही करण्यात आला होता. एलफजीह याने न्यूयॉर्कमधील शिया मुसलमानांनाही ठार मारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि अन्य पाश्‍चात्त्य देशांमध्ये इसिसचा वैचारिक प्रभाव वाढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्ष २०१३ पासून इसिसच्या आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या ८० जणांना अमेरिकेमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (शत्रूशी निष्ठेने वागून स्वतःचा घात करणारे भारतीय अमेरिकेकडून काही बोध घेतील का ? - संपादक)


राज्यात २२ प्रतिशत वीजदरवाढीची शक्यता !

     मुंबई, २२ मार्च - ३८ सहस्र ९९७ कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीजदरात २२ प्रतिशत वाढ करण्याचा प्रस्ताव सिद्ध केल्याचे समजते. प्रतिवर्षी साडेपाच प्रतिशत दरवाढीस विद्युत नियामक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यास हा भार वीज ग्राहकांना सोसावा लागेल. मागील दोन वर्षांतील तूट आणि आगामी ४ वर्षांत होणार्‍या महसूल तुटीच्या वसुलीसाठी महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. महावितरण आस्थापनाने ४ मार्च या दिवशी हा प्रस्ताव सादर केला आहे. ही प्रस्तावित दरवाढ २०१६ ते २०२० या चार वर्षांसाठी आहे. यात शेतकर्‍यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व ग्राहकांचा समावेश आहे. या दरवाढीतून आगामी चार वर्षांत महावितरणाला ३८ सहस्र ९९७ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. (सहस्रो कोटी रुपयांची तूट ज्यांच्यामुळे निर्माण होत आहे, त्या घटकांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे ! - संपादक) 

'ईडी'च्या कारवाईमुळे छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द धोक्यात !

विशेष प्रतिनिधी : श्री. सचिन कौलकर, मुंबई 
     माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. उपमुख्यमंत्री पद सांभाळलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. भुजबळ यांच्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हादरा बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसची नाचक्कीही झाली आहे. भुजबळ यांना यापूर्वी बेळगावच्या सीमा लढ्यात अटक झाली होती; मात्र ती अटक राज्याच्या हितासाठी दिलेल्या लढाईसाठी होती; मात्र आता झालेली अटक घोटाळ्यासाठी आहे. 

महापुरुषांची शिकवण आचरणात आणा ! - श्री. मोहन शेटे, इतिहास अभ्यासक

      पिंपरी - महापुरुषांच्या जयंतीच्या वेळी त्यांच्या नावाने खंडणी गोळा करून मोठी ध्वनीयंत्रणा उभी केली जाते, तसेच चित्रपटगीतांवर विक्षिप्त अंगविक्षेप करून नाचण्याचे प्रकारही ठिकठिकाणी घडत आहेत. अशा प्रकारे महोत्सव साजरे न करता महापुरुषांनी त्यांच्या आचारातून दिलेली शिकवण कृतीत आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक श्री. मोहन शेटे यांनी केले. अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. उत्तम अभियंता, प्रशासक, व्यवस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये समोरच्याचे गुण हेरून त्यांचा वापर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात करवून घेण्याचे कौशल्य होते. शिवचरित्राचा अभ्यास करून छत्रपती शिवरायांचे गुण कृतीत आणायला हवेत, असे आवाहन श्री. शेटे यांनी केले.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hinduo, adarsha Holikotsav manaye ! Holike samay rashtra evam dharma-karya ke liye shakti mile, aisi samuhik prarthana kare !

जागो ! : हिंदूओ, आदर्श होलिकोत्सव मनाएं ! होली के समय राष्ट्र एवं धर्म-कार्य के लिए शक्ति मिले, ऐसी सामूहिक प्रार्थना करें !

फलक प्रसिद्धीकरता

होळी अन् रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखा !
* कचर्‍याची होळी करणे टाळा, मोठी होळी करू नका !
* लाकूड, गोवर्‍या किंवा इतर वस्तू चोरू नका !
* स्त्रियांशी असभ्यपणा करू नका !
* आरोग्याला घातक असणारे रंग अंगाला फासणे टाळा !
* कर्णकर्कश आवाजात चित्रपटगीते लावणे, मद्यपान करणे, रेन डान्स आयोजित करणे टाळा !

पाकिस्तानातील मोठ्या अधिकोषांची भारतात गुंतवणूक करून व्यवसाय करण्याची इच्छा

अशा बँका भारतात आल्या आणि त्यांनी भारतियांचे पैसे बुडवले, तर भारत 
ते पाककडून वसूल करण्याची धमक दाखवू शकतो का ? 
     इस्लामाबाद - पाकिस्तानातील चार-पाच मोठ्या अधिकोषांना भारतात गुंतवणूक करून व्यवसाय करण्याची इच्छा असल्याचे पाकिस्तान मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे; मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या सईद अहमद यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यवसाय आणि बँकींग सहयोगासाठी हालचाली होत नसणे ही दुर्देवाची बाब असून भारतीय अधिकोषांनाही पाकिस्तानात व्यवसाय करण्याची उत्सुकता असणारच, असे मत व्यक्त केले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१२ मध्ये दोन्ही देशांनी आपापल्या दोन बँकांना परस्परांच्या देशात बँकींग अनुज्ञप्ती देण्याच्या सूत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला होता; परंतु त्यानंतर वातावरण बिघडल्यामुळे पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. फाळणीपूर्वी पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय लाहोर येथे होते, तसेच एस्बीआय, बँक ऑफ इंडिया यांची १९६५ पर्यंत कराची आणि लाहोर येथे कार्यालये होती.

देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या रशियन युवकाला एक वर्ष कारावास होण्याची शक्यता !

भारतात ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली 
देवाचे अस्तित्व नाकारणार्‍यांना अशी शिक्षा कधी होणार ?
     मॉस्को - सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संवाद साधतांना एका रशियन तरुणाने देवाचे अस्तित्व नाकारल. त्याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली आहे. व्हिक्टर क्रासनोव असे या तरुणाचे नाव आहे. वर्ष २०१५ मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर व्हिक्टरची एक मास मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आरोप सिद्ध झाल्यास व्हिक्टरला एक वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. व्हिक्टरच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा प्रतिवाद त्याच्या बाजूने करण्यात आला. रशियन न्यायव्यवस्था व्हिक्टरला कारावासाची शिक्षा देते कि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेते हा रशियामधील चर्चेचा विषय झाला आहे.जिहादी आतंकवादामध्ये इस्लाम हे एक महत्त्वाचे सूत्र ! - कॅनडाच्या महिला पत्रकार फरजाना हसन यांचे मत

कॅनडाच्या मुसलमान महिला पत्रकाराला जे उमगले, ते भारतातील ढोंगी 
धर्मनिरपेक्षतावादी पत्रकारांना कधीही उमगणार नाही !
     टोरंटो (कॅनडा) - आतंकवादाविषयी बोलतांना आपण बहुतेक वेळा एक घोडचूक करतो. धर्मांध अथवा लढाऊ इस्लामी विचारधारा आतंकवादी कारवाया करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आपण अमान्य करतो. धार्मिक, सांस्कृतिक, मानसिक, सामाजिक आणि राजकीय घटक यांच्या जटील मिश्रणातून आतंकवाद निर्माण होतो. आपण कदाचित हे कधी समजू शकणार नाही की, आतंकवाद्यांना नेमके कोठून प्रोत्साहन मिळते; परंतु अनेक जिहादी आतंकवादी धार्मिक कट्टरतेतून प्रोत्साहन घेतात हे स्पष्ट आहे, असे परखड मत टोरंटो सन या कॅनडाच्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसारित करण्यात आलेल्या एका लेखातून फरजाना हसन या महिला मुसलमान पत्रकाराने व्यक्त केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आग्रा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आग्रा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात
सहभागी झालेले राष्ट्रप्रेमी हिंदू
    आग्रा - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था तसेच हिंदू सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या,
१. इशरतजहाँ प्रकरणात अधिकारांचा गैरवापर केल्याविषयी पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

'वॉट्सअप'च्या माध्यमातून होळीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न

     मुंबई - हिंदूंचा सण होळी अगदी जवळ आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून 'वॉट्सअप'च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही हिंदुद्वेष्ट्यांनी एक अश्‍लील चित्र असलेला संदेश सिद्ध केला असून त्यांनी तो 'वॉट्सअप'वरून इतरांना पाठवला आहे. या चित्रामध्ये काही पाठमोर्‍या तरुणी 'थ्री इडिएट्स' या चित्रपटातील दृश्याप्रमाणे दाखवण्यात आल्या असून त्या चित्रावर 'जहापनाह !' 'होली का तोहफा कबूल करो' 'अडव्हॉन्स में' असे लिखाण करण्यात आले आहे. हे चित्र एवढे अश्‍लील आहे की, ते आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही. अशा हीन पातळीला जाऊन होळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. चित्रपटातील दृश्याचा समाजमनावर किती परिणाम होतो, हे यातून लक्षात येते.

देवनार कचरा आगारातील आगीमुळे नागरिकांना श्‍वसनाचे विकार !

     मुंबई - देवनार कचरा आगारामध्ये झालेल्या आगीमुळे मुंबईच्या उपनगरांत सर्वत्र धुराचेच साम्राज्य आहे. धगधगणार्‍या कचर्‍याच्या ढिगार्‍यातून विषारी वायू हवेत पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही श्‍वसनासह इतर त्रासांना तोंड द्यावे लागत आहे. याप्रकरणी महानगरपालिका आणि राज्य शासन यांनी तोेडगा काढणे आवश्यक आहे. या धुरामुळे २२ मार्चला खाजगी शाळा बंद ठेवण्यात आल्या.

मडगाव स्फोटात अपघाती मृत्यू आलेल्या साधकाच्या श्राद्धासाठी साहाय्य करणारे एक धर्मप्रेमी !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज स्फोटात अपघाती मृत्यू झालेल्या साधकाच्या श्राद्धासाठी एका धर्मप्रेमी व्यक्तीने केलेल्या साहाय्याविषयी जाणून घेऊया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

होलिकोत्सवातील अपप्रकार रोखून तो धर्मशास्त्रानुसार साजरा करा !

आज असलेल्या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने...
     फाल्गुन पौर्णिमा (२३ मार्च २०१६) या दिवशी होलिकोत्सव आहे. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे; म्हणून हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि हे अपप्रकार रोखून धर्मकर्तव्य बजावा ! 
    देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

अग्नीशमन !

     गेल्या वर्षभराचा अभ्यास केला असता अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येते. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाच्या व्यासपिठाला लागलेली आग, कांदिवलीत ५० सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग, इमारतींना लागणार्‍या आगी, फटाक्यांच्या दुकानाला लागणार्‍या आगी किंवा देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेली आग अशी आगीची एक ना अनेक उदाहरणे देता येतील. सध्या आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत....! परंतु आगीचे हे रौद्ररूप आणखी किती काळ पहावे लागणार आहे ? अग्नीची मानवी जीवनाला आवश्यकता आहेच; परंतु सध्या वाढणार्‍या आगीच्या वाढलेल्या घटना पहाता हा अग्नी आज काळ बनून आलेला आहे, असेच म्हणावे लागेल. प्रतिदिन कुठेना कुठे लागणार्‍या आगीत होरपळणार्‍यांच्या केविलवाण्या हाका ऐकू येत आहेत. या आगींत मृत्यू तर होत आहेतच; पण वाचलेल्या जिवांच्या मनावरील आणि शरिरावरील जखमांचे काय ? दिवसेंदिवस वाढणार्‍या आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करायलाच हवी !

भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीपूर्वी त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची घेतलेली अखेरची भेट !

     भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव या जहाल क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कटामध्ये सामील असलेले शिवकर्मा, जयदेव कपूर आणि इतर सहकारी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्या या मंडळींना ती शिक्षा भोगण्यासाठी दुसर्‍या कारागृहात नेण्यात येणार होते. तेव्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची शेवटची भेट घेण्याची त्यांना अनुमती दिली.

सत्तेच्या लोभासाठी तत्कालीन काँग्रेस शासनाच्या मूर्खतेचा अतिरेक !

प.पू. पांडे महाराज
     माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी गौप्यस्फोट केला, इशरतजहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनातील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्रशासनाच्या प्रतिज्ञापत्रकात पालट केले होते. (दैनिक सनातन प्रभात, २९.२.२०१६)
     यावरून कुर्‍हाडीचा दांडा गोत्यास काळ !, असे म्हणावे लागेल. राष्ट्रहित आणि हिंदूंची विचारसरणी यांना काँग्रेसने किती विरोध केला, हे यावरून सिद्ध होते. जसे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, तसे विदेशी संस्कृतीचा पगडा असलेल्या गांधी घराण्याने भारतावर राज्य केले. इशरतजहाँ प्रकरणावरून त्यांना भारताविषयी आत्मीयता आहे का ? त्यांना देशप्रेम आहे कि विदेशप्रेम आहे ?, हेही समजते.
     सत्तेच्या लोभासाठी काँग्रेसने केलेली ही मूर्खतेची परिसीमा आहे. आतापर्यंत त्यांनी जनतेची दिशाभूल करून सत्ता उपभोगली आहे, तसेच अशा मूर्खांना सातत्याने ६० वर्षे निवडून देणारी जनता किती महामूर्ख आहे, हेही सिद्ध होते.
       हिंदु राष्ट्राची स्थापना हाच यावरचा एकमेव पर्याय आहे. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी स्वत:चा अमूल्य वेळ खर्ची घालणारे भारतीय नागरिक !

भारत-पाक द्वेष 
कु. प्राजक्ता धोतमल
      १९ मार्चला भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये किक्रेटचा सामना पार पडला. हा सामना साधारण ४ घंट्यांचा असेल; पण अवाजवी महत्त्व दिले गेल्यामुळे भारतियांसाठी निश्‍चितच ४ घंट्यांमध्ये आटोपेल, असा हा सामना नव्हता. याची झलक सामना चालू होण्यापूर्वी शुभेच्छा आणि औत्सुक्य यांच्या विश्‍वात रममाण झालेल्या नागरिकांमध्ये दिसली. सामना चालू होण्यापूर्वी सामाजिक संकेतस्थळावरून सामन्यासाठी अभिष्टचिंतन करणार्‍यांविषयी बरीच वृत्ते झळकत होती. सर्व वयोगटांतील नागरिक या शुभेच्छांच्या मोहिमेत हिरीरीने सहभागी झाले होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आणि म्हणूनच प्रारंभी देशप्रेम म्हणून या सर्व कृती साहजिक वाटत असल्या तरी याच्या मागे वहावत जाणार्‍या आणि आपला अमूल्य वेळ खर्ची घालणार्‍या नागरिकांना याची जाणीव करून देणे आवश्यक वाटते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण !

     जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण शासकीय खर्चाने होणार, असा प्रस्ताव पारित केला होता; मात्र गांधी हे मंत्रीमंडळाचे सदस्य नसतांनाही त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडला आणि त्याच वेळेस देहलीमधील मशिदीची दुरुस्ती शासकीय खर्चाने व्हावी, यासाठी १३ जानेवारी १९४८ या दिवशी उपोषण करून शासनावर दबाव आणला. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?
      राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहास शाईने नव्हे, क्रांतीकारकांच्या रक्ताने लिहिलेला असतो ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे (२४.८.२०१०)

आज स्वातंत्र्यविरांची होत असलेली दुरवस्था पाहून त्यांना असे म्हणावेसे वाटते !

     अभिनव भारत या संघटनेचे औपचारिक विसर्जन १० मे १९५२ या दिवशी झाले. त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुभाषबाबूंची प्रतिमा ठेवली होती. त्यानिमित्त पुण्यात पर्वतीजवळ क्रांतीस्तंभ उभारण्यात आला. त्यावर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रज शत्रूशी सशस्त्र लढा देतांना १८५७ ते १९४७ पर्यंत जे सशस्त्र क्रांतीकारक हुतात्मे अन् वीरात्मे यांनी आपल्या प्राणाहुती दिल्या, त्या सहस्रावधी ज्ञात आणि अज्ञात भारतीय सशस्त्र क्रांतीकारकांच्या स्मरणार्थ, असे लिहिण्यात आले. अशा स्मारकांची आजची दुरवस्था पाहून स्वातंत्र्यविरांना असेच वाटत असेल की,
     ओठी जरी कधीचे, स्वातंत्र्यगान आहे । माझ्या महान देशी मी बंदीवान आहे ॥
     मागू नकोस माझा संदर्भ मागचा तू । मागेच फाटलेले मी एक पान आहे ॥
- डॉ. सच्चिदानंद शेवडे, श्री गजानन आशिष, ऑक्टोबर २०१०

उत्साह निर्माण होतो होळीच्या सणामुळे ।

फाल्गुन पौर्णिमेला असतो होळीचा सण ।
फाल्गुन पंचमीपर्यंत चालतो हा सण ॥

निसर्ग फुलतो वसंतऋतूच्या आगमनामुळे ।
देशात उत्साह निर्माण होतो होळीच्या सणामुळे ॥ १ ॥

बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा एकमेव देश भारत !

     हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा एकमेव देश ञभारत ! जगातील कुठल्याही लोकशाही देशात शासन धार्मिक संस्थांवर नियंत्रण ठेवून जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालत नाही; मात्र भारतात ते घडत आहे ! - स्टीफन नॅप, लेखक, अमेरिका. (ते आता श्री नंदनानंद दास या नावाने ओळखले जातात) (२.३.२०१४))हिंदूंसाठी धोक्याची घंटा; एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही !

      एकही राज्यकर्ता हिंदूंच्या बाजूने नाही. सर्वजण विकासाची सूत्रे मांडत आहेत. धर्माच्या बाजूने कोणी नाही, अशी भयाण परिस्थिती आहे. हिंदूंमध्ये धर्माचरणाचा अभाव आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर (१.२.२०१४)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात संत आणि साधक यांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
       ज्यांना ध्येयाविषयी दृढ आस्था आहे, असे मूठभर संकल्पनिष्ट लोक इतिहासाचा प्रवाह पालटू शकतात.
- दीपक सिंह (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

उत्कृष्ट नियोजनकौशल्य, अविश्रांत परिश्रम आणि गुरूंवरील अपार श्रद्धा यांमुळे नाशिक येथील सिंहस्थपर्वाची सेवा उत्तमरित्या पार पाडून सद्गुरुपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

        जुलै आणि ऑगस्ट २०१५ मध्ये नाशिक येथे सिंहस्थपर्वाचे आयोजन होतेे. तेथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसाराच्या सेवेचे दायित्व प्रसारसेविका पू. (कु.) स्वातीताई खाडये यांनी पुष्कळ सक्षमतेने सांभाळले. पू. (कु.) स्वातीताई आणि अन्य साधक यांनी सिंहस्थपर्वाच्या आयोजनाचा उत्तम प्रकारे लाभ करून घेतला. त्यामुळे पू. ताईंची आध्यात्मिक पातळी केवळ २ मासांत (महिन्यांत) ३ टक्क्यांनी वाढून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या. ९ साधकांनी ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच जगभर धर्माचा प्रचार-प्रसारही झाला. हे सर्व पू. ताईंच्या समर्थ नेतृत्वाखाली कसे साध्य झाले, याचे त्यांनीच त्यांच्या मार्गदर्शनातून उलगडलेले रहस्य आपण या लेखात पहाणार आहोत.
पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त
सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
पू. राजेंद्र शिंदे
१. मनात सेवा कशी जमणार, असा विचार आल्यावर एका संतांशी बोलणे, त्यांनी मागच्या सिंहस्थपर्वाप्रमाणे चुका न करण्याविषयी सांगणे आणि देव करवून घेणारच आहे, असे सांगून आश्‍वस्त करणे : पू. (कु.) स्वातीताईंना पूर्वी झालेल्या सिंहस्थपर्वातील सेवेचा काहीच अनुभव नव्हता; कारण तेव्हा त्या नुकत्याच साधनेत आल्या होत्या. सिंहस्थपर्वातील प्रसाराचे नियोजन करण्यासाठी पू. ताई नाशिक येथे मार्च २०१५ मध्ये गेल्या. आरंभी सर्वसाधारण नियोजन करणे चालू झाले. तेव्हा हे नियोजन पुष्कळच मोठे आहे. ते आपल्याला कसे जमणार ?, असे त्यांना वाटले. त्यांनी एका संतांशी याविषयी बोलून घेतले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, आपल्याला सिंहस्थपर्वातील प्रसाराची संधी घालवायची नाही आणि मागच्या सिंहस्थपर्वाप्रमाणे चुकाही करायच्या नाहीत. (वर्ष २००३ मध्ये नाशिक येथे झालेल्या सिंहस्थपर्वात प्रसाराचे दायित्व असणार्‍या साधकांकडून अत्यंत गंभीर चुका झाल्या होत्या.) मग कसे करायचे ते तुम्ही ठरवा. देव करवून घेणारच आहे.

सर्व साधकांवर वडिलांप्रमाणे प्रेम करणारे आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पू. जयराम जोशीआजोबा (वय ७८ वर्षे) !

पू. जयराम जोशीआजोबा
      फाल्गुन पौर्णिमा (२३.३.२०१६) या दिवशी पू. जयराम जोशीआजोबा (पू. आबा) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिरज आश्रमातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पू. जयराम जोशीआजोबा
यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त
सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. वेळेचे पालन करणे
१. पू. आबा साधकांसमवेत नामजप करण्यासाठी नेहमीच वेळेच्या आधी येतात. आपल्यामुळे साधकांचा वेळ जाऊ नये, असे त्यांना वाटते.
२. वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर जायचे असले, तरी ते वेळेआधी ५ मिनिटे येतात.
- वर्षा नकाते

१५ एप्रिल ते २५ मे २०१६ या कालावधीत उज्जैन येथील सिंहस्थपर्वात (कुंभमेळ्यात) पाल्यांसाठी सेवेची सुवर्णसंधी !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती 
     उज्जैन येथे होणार्‍या सिंहस्थपर्वाच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपलेल्या असल्यामुळे पाल्यांना सुटीच्या कालावधीत या सिंहस्थपर्वात सेवा करण्याची सुवर्णसंधी ईश्‍वराच्या कृपेने प्राप्त झाली आहे. जे साधक, वाचक आणि हितचिंतक आपल्या पाल्यांना १५ एप्रिल ते २५ मे २०१६ या कालावधीत उज्जैन येथे सेवेसाठी पाठवू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांमार्फत त्वरित संपर्क साधावा.
- (पू.) कु. स्वाती खाडये, प्रसारसेविका

आपले पाल्य उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्यास संशोधनासाठी त्याची माहिती आणि छायाचित्रे ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत पाठवा !

सर्व साधक-पालकांसाठी सूचना
     ईश्‍वराच्या कृपेने भारतभरातील आणि विदेशातील काही बालके उच्च स्वर्ग, महर् अन् जन अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली आहेत. या बालकांचा आध्यात्मिक स्तर जन्मतःच चांगला असून ती सर्वसामान्य बालकांपेक्षा निराळी आहेत.
     १०.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये उच्च लोकांतील दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकेतील साधनेच्या दृष्टीने योग अभ्यासण्यासाठी त्यांची माहिती आणि छायाचित्र पाठवा, अशी चौकट प्रसिद्ध झाली होती. आतापर्यंत ४९० पेक्षा अधिक बालकांची गुणवैशिष्ट्ये दैनिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहेत. असे असतांनाही त्यांपैकी केवळ २५ बालकांची माहिती संशोधनासाठी प्राप्त झाली आहे.
     हे संशोधन लवकरात लवकर करता यावे, यासाठी उच्च लोकांतून जन्माला आलेल्या बालकांच्या पालकांनी त्यांची खालील सारणीनुसार माहिती पाठवणे अपेक्षित आहे.
अन्य सूचना
१. बालकाच्या जन्मानंतर जाणवलेली वैशिष्ट्ये (कालावधीसह) आधीच पाठवली असल्यास ती पुन्हा पाठवू नयेत; परंतु वैशिष्ट्ये १ वर्षापूर्वी पाठवली असतील, तर गेल्या वर्षभरातील वैशिष्ट्ये पाठवावीत.
२. त्याच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या असल्यास त्याही माहितीत अंतर्भूत कराव्यात.
३. बालकाची जन्मपत्रिका काढली असल्यास तिची झेरॉक्स प्रत अथवा स्कॅन इमेज पाठवावी.
४. ही सर्व माहिती पी.डी.एफ्. फॉरमॅटमध्ये पाठवावी.
     वरील माहिती आणि बालकांची सुस्पष्ट छायाचित्रे ३१.३.२०१६ या दिवसापर्यंत charansparsh25@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा लिखित स्वरूपात सौ. प्राजक्ता जोशी यांच्या नावे रामनाथी आश्रमाच्या पत्त्यावर पाठवावी.

श्रीकृष्णाप्रती भाव असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील कु. प्रार्थना रविकुमार तेरदाळ (वय ७ वर्षे) !

कु. प्रार्थना तेरदाळ
      कु. प्रार्थना रविकुमार तेरदाळ हिचा सातवा वाढदिवस फाल्गुन पौणिमा (२३.३.२०१६) या दिवशी आहे. त्यानिमित्त तिची आजी सौ. उमा ठोमके यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. प्रार्थना हिला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
        गर्भारपणी कु. प्रार्थनाची आई (सौ. नम्रता तेरदाळ) प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करणे आणि पोटावर हात ठेवून नामजप करणे, असे उपाय करत असे.
२. जन्मानंतर
२ अ. कु. प्रार्थनासमवेत सतत प्रार्थना करण्याची आठवण होणे : कु. प्रार्थनाकडे पाहिल्यावर शांत वाटायचे. बारशाच्या वेळी प्रार्थनाची मावशी रामनाथी आश्रमात होती. तिने पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना बाळाचे नाव काय ठेवायचे ?, असे विचारल्यावर त्यांनी प्रार्थना हे नाव सांगितले होते. कु. प्रार्थनामुळे आम्हा सर्वांना सतत प्रार्थना करण्याची आठवण होते.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२२.३.२०१६) दुपारी ३.१३ वाजता
समाप्ती - फाल्गुन पौर्णिमा (२३.३.२०१६) सायंकाळी ५.३१ वाजता
आज पौर्णिमा आहे.

सिंहस्थपर्वाच्या सेवेतील साधकांनी साजरी केलेली गणेशचतुर्थी

        सिंहस्थपर्वाच्या कालावधीत १७.९.२०१५ या दिवशी श्री गणेशचतुर्थी होती. सेवेला आलेल्या अनेक साधकांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जात असे. तेथे आलेल्या ५ कुटुंबांच्या घरी गणपती असायचे; परंतु त्यांनी ठरवले, १२ वर्षांनी एकदा सिंहस्थपर्वाची सेवा असते, तर या वेळी आपण सेवाच करूया. त्याप्रमाणे एका संतांना विचारल्यावर त्यांनीसुद्धा सांगितले, श्री गणेशालाही घरी गणेशमूर्ती आणून पूजा-अर्चा करण्यापेक्षा येथे राहून सिंहस्थपर्वाचा प्रचार-प्रसार केलेला अधिक आवडेल.
        पू. स्वातीताईंनी साधकांसाठी तेथेच गणपतीची मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा केला. निवासाच्या ठिकाणी गणेशमूर्ती आणून तेथे पूजा-अर्चा, आरती इत्यादी केल्याने साधकांनाही पुष्कळ आनंद मिळाला आणि सिंहस्थपर्वाचा अनमोल धर्मप्रसार करण्याच्या संधीचाही लाभ घेता आला. साधक आपण घरी गेलो नाही, हे विसरले आणि त्यांनी आनंदाने सेवा केली.

महर्षींची शिकवण आणि कार्य !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ या प.पू. डॉक्टरांच्या मागच्या जन्मातील भगिनी असून ईश्‍वराने प.पू. डॉक्टरांची कीर्ती सर्वत्र पसरवण्यासाठी त्यांना निवडलेले असणे : ११.५.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षी जीव नाडीपट्टीचे वाचन केले. त्यात महर्षि मला म्हणाले, तुमच्यामध्येही दिव्य शक्ती आहे. तुम्हाला याविषयी मी यापूर्वीही सांगितले होते. तुम्ही मागच्या जन्मात प.पू. गुरुदेवांच्या भगिनी होता; म्हणून या जन्मात तुम्ही त्यांच्यासमवेत आला आहात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र पसरवण्यासाठी मी तुम्हालाच निवडले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ :
हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे ! -  (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

सुफी मुसलमानांचा राष्ट्रवाद : चोराच्या उलट्या बोंबा !

संपादकीय
     मुसलमानांच्या मनातील दंगलीची भीती दूर करा आणि पंतप्रधानांनी देशातील ऐतिहासिक चुका सुधाराव्यात, ज्यामुळे या देशात मुसलमानांची कट्टरपंथीय विचारधारा निर्माण झाली, अशी अपेक्षा सुफी संप्रदायाच्या ऑल इंडिया उलेमा अ‍ॅण्ड मशाईख बोर्ड यांनी देहली येथील संमेलनात मोदी शासनाकडे केली आहे. सुफी संप्रदायाच्या तीन दिवसीय संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी उलेमांनी जगाच्या भल्यासाठी सुफीवाद परत एकदा जिवंत करा, अशीही मागणी केली आहे. वास्तविक हिंदूंनी पराकोटीची सहिष्णुता दाखवली त्यामुळेच मुसलमान इतकी वर्षे भारतात सुखाने राहू शकले. सध्या ज्या घटना होत आहेत, त्या हिंदूंकडून उद्रेकाच्या रूपाने बाहेर पडत आहेत. त्यामुळे सुफी उलेमांनी हिंदूंना आणि पंतप्रधानांनी काय करावे, हे न सांगता त्यांच्या धर्मात काय चालू आहे आणि त्यात पालट करण्यासाठी काय करायला हवे, याचा अगोदर गांभीर्याने विचार करावा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn