Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) कन्हैया कुमार हा आजच्या काळातील भगतसिंह !

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा शोध ! 
कन्हैया कुमार जर भगतसिंह आणि भाजप शासन म्हणजे 
ब्रिटीश, तर ब्रिटिशांनी भगतसिंह यांना फाशी दिली, तशी 
फाशी कन्हैयालाही द्यावी, असेही समीकरण होते त्याचे काय ?
      नवी देहली - कन्हैया कुमार हा आजच्या काळातला भगतसिंह आहे, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाशी असहमत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जेएन्यूतील (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शशी थरूर २० मार्चच्या रात्री विद्यापिठात गेले होते. तेथे विद्यार्थ्यांसमोर बोलतांना थरूर यांनी सध्याच्या घडामोडींवर विधाने केली. ते म्हणाले,
१. भारत म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थान नाही. (भारत म्हणजे, नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल गांधी, असे थरूर यांना म्हणायचे आहे का ? - संपादक) २. आम्हाला कृष्णासमवेतच कन्हैया कुमारचा भारत हवा आहे. जेथे सर्व लोकांना समान अधिकार असतील; मात्र सध्या केवळ भारतमाता की जय या एका घोषणेवरून राष्ट्रभक्ती ठरवली जात आहे. (ज्यांना कृष्ण हवा आहे, ते कधीही देशविरोधी घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारला जवळ करणार नाहीत ! - संपादक) ३. कुणी कुणावर श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. ते ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. (मात्र कोणी देशद्रोह्यांवर, आतंकवाद्यांवर श्रद्धा ठेवणार असेल, तर त्याला योग्य ती शिक्षा करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे, हे थरूर यांनी लक्षात ठेवावे. - संपादक)
४. भारतमाता की जय म्हणण्यात मला आनंदच आहे; पण प्रत्येकानेच ते म्हणावे अशी बळजोरी का ?

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी करा ! - सनातन संस्था

      मुंबई - होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण-उत्सव साजरे केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो. 
वर्षभर होणार्‍या वृक्षतोडीने जंगले उजाड होत असतांना, त्याकडे काणाडोळा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मविरोधी संघटना वर्षातून एकदा येणार्‍या होळीला कचर्‍याची होळी करा, पोळी दान करा, अशा चळवळी राबवतात. मोठमोठ्या कार्यक्रमांतून प्रतिदिन सहस्रावधी टन अन्न वाया जात असतांना धर्मद्रोही संघटना होळीच्या दिवशी पोळी दान करा असे म्हणतात. वृक्षतोड थांबवण्यासाठी ही मंडळी वर्षभर काय करतात ?

महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या वादग्रस्त विधानाचे विधीमंडळात तीव्र पडसाद

कुठे इस्लामसाठी जगभर एकत्र येणारे मुसलमान, तर कुठे महाराष्ट्रात
स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र मराठवाडा, स्वतंत्र कोकण राज्यांची मागणी करणारे हिंदू !
अणे यांनी मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळा करा, असे म्हटल्याचे प्रकरण
  • अणे यांच्या हकालपट्टीची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मागणी
  • विधानसभा आणि विधान परिषद यांचे कामकाज २ वेळा स्थगित
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई.
     अमेरिकेतही राज्यांचा आकार मोठा आहे. या उलट भारतात झारखंड, छत्तीसगड यांसारखी छोटी राज्ये अस्तित्वात आणूनही त्यांचा विकास झालेला नाही. विकास हा राज्यांच्या आकारावर नव्हे, तर राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो, हे यातून दिसून येते. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि वेगळा मराठवाडा अशी मागणी करणारे फुटीरतावाद जोपासत असून अशा मागण्यांना शासनाने थारा देऊ नये, अशी जनतेची अपेक्षा आहे.
     मुंबई - वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणारे राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांनी वेगळ्या मराठवाड्याविषयी केेलेल्या विधानाचे २१ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. जालना येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी विदर्भापेक्षा मराठवाड्यावर अधिक अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी, असे चिथावणीखोर विधान केले होते.
     शिवसेनेने या मागणीचा तीव्र विरोध करत अणे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेत केली, तर अणे यांनी राजद्रोह केला असून त्यांच्यावर खटला प्रविष्ट करून त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. विधानसभा आणि विधान परिषदेत या दोन्ही मागण्यांवरून सदस्यांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज २ वेळा स्थगित करावे लागले.

संघाचे शिबीर होते सिमीच्या जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य !

हिंदूंनो, जिहादी आतंकवाद्यांचे हिंदु संघटनांना लक्ष्य करण्याचे 
मनसुबे ओळखा आणि ते उधळून लावण्यासाठी संघटित व्हा !
      नवी देहली - मुझफ्फरनगर येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड उगवण्यासाठी स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात् सिमी या बंदी घालण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर आक्रमण करण्याची योजना आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अमजद खान, झाकीर हुसेन, मेहबुब गुड्डू, सालिक उपाख्य सल्लू अशी या आतंकवाद्यांची नावे असून हे सर्व जण मध्यप्रदेश राज्यातील खांडवा येथील कारागृहातून काही वर्षांपूर्वी पळून गेले होते. सुरक्षा यंत्रणांच्या अथक प्रयत्नांनंतर या चौघांना पुन्हा अटक करण्यात यश आले. यानंतर त्यांच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून वरील माहिती उघड झाली.
     या चौघांनी अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या इन्स्पायर या मासिकामधून सिलिंडर बॉम्ब सिद्ध करण्याचे तंत्र शिकून घेतले होते. संघाच्या शिबिराच्या वेळी या बॉम्बचा स्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती. तथापि या आतंकवादी आक्रमणासाठी वापरण्यात येणार्‍या बॉम्बमध्ये ऐन वेळी बिघाड होऊन त्याचा हे चौघे जण रहात असलेल्या घरामध्येच स्फोट झाला. या आतंकवाद्यांनी उत्तरप्रदेशमधील बिजनौर येथे एक घर भाड्याने घेतले होते. या चौघांच्या नावावर आतंकवादी कृत्ये आणि इतर असे तब्बल १७ गुन्हे प्रविष्ट आहेत.सराफांचा बंद अखेर मागे !

      मुंबई - दागिन्यांवर लावण्यात आलेला अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी १८ दिवसांपासून सराफांनी चालू केलेला बंद सराफांची कोणतीही पिळवणूक होणार नाही, असे आश्‍वासन शासनाने दिल्यानंतर मागे घेण्यात आला. या संपामुळे ७० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली.
     ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, जेम्स ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा बंद मागे घेतल्याची घोषणा केली. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष श्रीधर जी.व्ही. म्हणाले, कर मागे घेण्याची आमची मागणी मान्य झाली नसली, तरी आमच्या अडचणी शासनाने समजून घेतल्या आहेत. जेटली यांनी कसलाही इन्स्पेक्टरराज निर्माण होणार नाही, असे आश्‍वासन दिले आहे.
     गेली १८ दिवस सराफांनी बंद पाळला असून देशभरातील ३ लाख सराफ या संपात सहभागी झाले होते. देशाच्या जीडीपीमध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा हा टक्के वाढला असला, तरी या क्षेत्रातील ४.५ दशलक्ष कारागीर अजूनही असंघटितपणेच काम करतात. दागिन्यांची निर्मिती असंघटित क्षेत्रात होत असल्याने अबकारी कर लावणे योग्य ठरणार नाही, अशी सराफांची भूमिका होती. या बंदमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सराफांनीही सहभाग घेतला होता.

हरियाणात अफगाणिस्तानी युवकाकडे आधारकार्ड

      नवी देहली - हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अजमल पक्तियावाल नावाच्या एका अफगाणी युवकाकडे आधारकार्ड सापडले आहे. अजमल येथे योगेश गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या सदनिकेत भाड्याने रहात होता. तो घर सोडून गेल्यावर त्याच्या नावावर आलेल्या पाकिटामध्ये आधारकार्ड मिळाले. या संदर्भात योगेशने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार विदेशी नागरिकाकडे आधारकार्ड मिळणे, हा संवेदनशील विषय आहे. याची चौकशी करण्यात येत आहे.

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील ! - सुशील तिवारी, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य हिंदू सेना

'भारतमाता की जय' च्या घोषणा देत भिवंडी येथे 
हिंदुत्ववादी संघटनांची असदुद्दीन ओवैसींना निलंबित करण्याची मागणी ! 
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी हिंदु धर्माभिमानी
     भिवंडी, २१ मार्च (वार्ता.) आज 'भारतमाता की जय' म्हणणार नाही असे म्हणणारे ओवैसी दोघेच आहेत, पण उद्या यांची संख्या वाढली, तर भारताची अवस्था काय होईल, याचा विचार करायला हवा. आपण आज संघटित झालो नाही, तर भविष्यात आपल्याला गंभीर परिणाम भोगायला लागतील आणि आपण असेच संघटित होत राहिलो, तर भविष्यात भारताला हिंदु राष्ट्र बनवणे शक्य आहे, असे उद्गार स्वराज्य हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुशील तिवारी यांनी येथे काढले. २० मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता भिवंडी येथील टेमघर पाईपलाईन नाक्याजवळ आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी विविध संघटनांच्या वतीने ११० हिंदू सहभागी झाले होते. 
होळी आणि रंगपंचमी या सणांविषयी धर्मशास्त्रीय माहिती 
जाणून घेण्यासाठी पुढील मार्गिकेला अवश्य भेट द्या !
http://www.sanatan.org/mr/holi


जगभरात एप्रिल ते जून २०१६ या कालावधीत अनेक अशुभ घटना घडण्याची शक्यता !

     वाराणसी - काशी येथील ज्योतिषांनी ग्रहांच्या स्थितीनुसार २० एप्रिल ते २६ जून २०१६ या कालावधीत आकाशमंडलात काही अशुभ खगोलीय घटना घडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मंगळ आणि शनि हे ग्रह वक्री होणार आहेत. ज्योतिषांनी २० एप्रिल ते २६ जून या कालावधीत भारतासह पश्‍चिमेकडील देशांमध्ये भूकंप, रोगराई, त्सुनामी, प्रलय आदी नैसर्गिक आपत्तीसह दैवी संकट आणि विश्‍वयुद्ध यांसारखी स्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला आहे. 
   २० एप्रिल ते २६ जून २०१६ या कालावधीत गुरु चांडाळयोग येत आहे. सहस्त्रावधी वर्षांनंतर येणारा हा योग अत्यंत अनिष्ट आहे. भारतासह संपूर्ण जगभरात याचा प्रभाव दिसून येईल. गुरूला राहू ग्रासतो याला गुरु चांडाळयोग म्हटले जाते. २१ फेबु्रवारी ते २८ जुलै २०१६ पर्यंत आकाशमंडलात गुरु चांडाळयोग असणार आहे.

कुठे देशद्रोही विधानासंदर्भात तात्काळ कृती करणारा पाक, तर कुठे काहीच न करणारा भारत !

     पाक संघ टी-२० विश्‍वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर कर्णधार शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, तसेच भारतात सुरक्षेच्या संदर्भात कधीही धोका वाटला नाही, असे वक्तव्य केले होते. या विधानावरून पाकच्या न्यायालयाने आफ्रिदीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आतंकवादी इशरतजहाँ प्रकरणातील संबंधितांना कठोर शिक्षा करावी ! - डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी

     धुळे- लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी इशरतजहाँला तत्कालीन काँग्रेस शासन आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी लाभासाठी हुतात्मा ठरवून देशभक्त अधिकार्‍यांना कारागृहात डांबले होते. याची न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितांना कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आवाहन योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील यांनी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात १९ मार्च या दिवशी केले.

जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात होते देवी सरस्वतीची पूजा !

     नवी देहली - संगीत आणि विद्येची अधिष्ठात्री मानली जाणारी श्री सरस्वती देवी जपानमध्ये जलदेवतेच्या रूपात पुजली जाते. तसेच अन्य हिंदूंच्या देवतांची पूजा जपानमध्ये कोणत्या स्वरूपात होते यावषयी एक लघुपट बनवण्यात आला आहे.
      इंडियन डेइटीज वरशिप्ड इन जपान नामक हा लघुपट प्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि छायाचित्रकार बिनॉय के. बहल यांनी बनवला असून जपानमधील ५० मंदिरांचे चित्रण या लघुपटात समाविष्ट करण्यात आले आहे. हे जपानमधील लोक धर्म आणि अध्यात्म याला वज्रायनच्या शास्त्रीय सिद्धांताशी जोडतात. त्याचे मूळ थेट बिहारमधील नालंदाशी जोडता येते, असे बहल यांनी म्हटले आहे. बहल यांनी हा लघुपट भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागासाठी सिद्ध केला असून जपान फाऊंडेशन आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना सहकार्य केले.

इतक्या दिवसांनी शिफारस करणार्‍या समितीलाच काढून टाका !

     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये (जेएन्यूमध्ये) देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याच्यासह ४ विद्यार्थ्यांना विद्यापिठातून काढून टाकण्याची शिफारस विद्यापिठाच्या उच्चस्तरीय समितीने १४ मार्च २०१६ला कुलगुरूंकडे केली. ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी कन्हैया कुमारसह त्याच्या सहकार्‍यांनी भारताविरुद्ध देशद्रोही घोषणाबाजी केली होती.

राज्यातील प्रमुख धरणांमध्ये २५ प्रतिशत पाणीसाठा शिल्लक

राज्यातील विविध भागांतील धरणांचा साठा
राज्यातील दुष्काळाची दाहकता !
      पुणे - राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये केवळ २५ प्रतिशत, म्हणजेच ३२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील असंख्य गावांना मे मासाच्या अखेरपर्यंत या धरणांतील पाणीसाठा पुरेल कि नाही, अशी भयावह परिस्थिती झाली आहे. गतवर्षी याच काळात राज्यातील धरणांमध्ये ४१ प्रतिशत साठा होता. राज्यात यंदाच्या वर्षी २ सहस्र ५०० हून अधिक टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील अनेक धरणे रिकामी झाली असून उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. राज्यातील सर्वांत मोठे धरण समजले जाणार्‍या जायकवाडीमध्येही उपयुक्त साठा २ प्रतिशतच राहिला आहे.


तेल वाहून नेणार्‍या जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणार ! - डॉ. रणजित पाटील

१८ मार्च या दिवशीची विधानसभा प्रश्‍नोत्तरे.....
     मुंबई - तेल वाहून नेणार्‍या जलवाहिन्यांची देखभाल आणि सुरक्षा करण्याकरिता भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या आस्थापनांकडून एकूण २३८ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी १८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. गेल्या वर्षभरात पोर्टझोनमध्ये तेल आणि पेट्रोल चोरीचे घडलेले गुन्हे, या गुन्ह्यांतील गुन्हेगारांचे अन्वेषण करण्यासाठी पोलिसांद्वारे करण्यात येणारे प्रयत्न यांविषयाची लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.
     या लक्षवेधीला उत्तर देतांना डॉ. पाटील म्हणाले की, बंदर परिमंडळ हद्दीत वडाळा, शिवडी आणि यलोगेट परिसरात पेट्रोलियम आस्थापनांचे जाळे आहे. पेट्रोल, डिझेल आणि कच्चे तेल वाहून नेण्याकरिता एकूण १२ कि.मी. लांबीची तेलवाहिनीची असून तिचा वापर पेट्रोलियम आस्थापनांद्वारे तेल वाहून नेण्याकरिता करण्यात येतो.

भारतियांकडून विविध देशांत ११ लाख कोटी रुपये काळ्या धनाची गुंतवणूक ! - इटलीची माहिती

      नवी देहली - विविध देशांमध्ये भारतियांचे ११ लाख कोटी रुपये काळे धन असल्याची माहिती बँक ऑफ इटलीने त्यांच्या अहवालात दिली आहे. हा काळा पैसा शेअर्स, बँक डिपॉझिट आणि कर्ज यांच्या रूपात जमा आहे. अर्थशास्त्रज्ञ पेलेग्रिनी, सेनेली आणि तोस्ती या तिघांनी हा अहवाल सिद्ध केला असून तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अन् बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांनी दिलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याशी शासन म्हणून सहमत नाही ! - एकनाथ खडसे

लातूर येथे रेल्वेद्वारे पाणी पुरवण्याची शक्यता ! 
     मुंबई, २१ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मराठवाड्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याशी शासन म्हणून आम्ही सहमत नाही. या विषयावर मुख्यमंत्री महोदयांसमवेत चर्चा करावयाची आहे. अणे यांचे पद राज्यपाल नियुक्त आणि वैधानिक असल्यामुळे त्यांना त्या पदावरून दूर करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया अवलंबवावी लागेल. त्यानंतरच याविषयी राज्यपाल निर्णय घेऊ शकतात, असे श्री. खडसे यांनी सांगितले. तसेच उजनी धरणातील पाणी पंढरपूर येथून उचलून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याविषयी रेल्वे विभाग याविषयाची शक्यता पडताळून पहात आहे, अशी माहिती २१ मार्च या दिवशी कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली. 

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन

     कागल (जिल्हा कोल्हापूर), २१ मार्च (वार्ता.) - होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीसाठी कागल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी नगरसेवक श्री. धैर्यशील उपाख्य भैया इंगळे, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री नवनाथ पाटील, अर्जुन केसरकर, अनिल कोळी, सचिन पणदे, राजू भोजे, अशोक कोळी, हिंदु धर्माभिमानी श्री. सुधीर माळी यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
     याच मागणीचे निवेदन तासगाव पोलीस ठाणे (जिल्हा सांगली) येथेही देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

वल्लभगड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
करतांना धर्माभिमानी हिंदू
     वल्लभगड (हरियाणा) - इशरतजहाँ ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची आतंकवादी असल्याचे लपवणारे तत्कालीन काँग्रेस शासनातील केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्यात यावी, भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी विकृत लिखाण करणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना घोषित झालेला पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे, आदी मागण्यांसाठी २० मार्च या दिवशी येथील आंबेडकर चौकातील सिटी पार्कमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये गोमानव सेवा समिती, राजीव दीक्षित स्वदेश मंच, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह हिंदु धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

पाणीपुरवठ्यात व्यत्यय आणणार्‍यांच्या विरोधात १४४ कलम लागू

लातूर येथे भीषण पाणीटंचाई ! 
    लातूर - पाणीपुरवठ्यात व्यत्यय आणणार्‍यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक १४४ कलम लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली. 
ते पुढे म्हणाले...
१. पाणी भरण्यासाठी लोक एकत्र जमल्यास हे कलम लागू नसेल. परीक्षा केंद्रावर परीक्षेला अडथळा आणल्याविरुद्ध हे कलम लागू होते, मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यास अडथळा होतो, त्याच प्रमाणे जलकुंभावर पाणी वाटपात अडथळा होत आहे; म्हणून हे १४४ कलम लागू होणार आहे. 
२. सध्या लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याच्या अभावी काही लोक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात, तर काही जण टँकर आपल्या भागात पळवून नेतात. या घटनांना आळा बसण्यासाठी हे कलम लागू करावे लागले. हे कलम म्हणजे जमावबंदीचा आदेश नाही. शहरातील मुख्य सहा टँकर पॉईंट असलेल्या ठिकाणीच हे कलम लागू आहे.

कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाचा इतिहासाच्या पुस्तकातून भारताचे नाव वगळण्याचा घाट

     न्यूयॉर्क - अमेरिकेतील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून भारताचे इंडिया हे नाव वगळून साऊथ एशिया (दक्षिण आशिया) असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील काही प्राध्यापकांच्या मते १९४७ च्या आधी इंडिया अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. तसेच या पाठ्यपुस्तकातून हिंदु धर्माचे हिन्दुइझम हे नाव काढून केवळ भारतातील महिला आणि मागासवर्गीय यांना मिळणार्‍या वागणुकींचा ऐकीव उल्लेख केला आहे.

संतश्री आसारामजी बापू यांच्यावर आरोप करून खोटे पुरावे सादर करणार्‍याच्या विरोधात कारवाई

     जम्मू - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर आरोप करून त्यांच्याविरुद्ध खोटे पुरावे सादर करणार्‍या सतीश वाधवानी नावाच्या व्यक्तीला जम्मू पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त दबंग दुनिया वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. वाधवानी, तसेच अन्य आरोपींच्या विरोधात सबळ पुरावा मिळाला असल्याचे जम्मू येथील पोलीस पथकाचे प्रमुख एस्.आय. सुरेश वर्मा यांनी सांगितले.
१. पू. बापू यांच्यावर लैंगिक शोषण, हत्या करणे यांसारखे खोटे आरोप करण्यात आले होते. या आरोपांचा पुरावा म्हणून; बनवण्यात आलेले चलचित्र (व्हिडीओ) फेरफार करून बनवल्याचे म्हणजे शरीर एकाचे आणि चेहरे दुसर्‍याचे अशा पद्धतीने बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाधवानी याच्याकडे पैसे देऊन अशी कामे करणार्‍या महिलांची टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
२. वाधवानी आणि त्याच्या सहकार्‍याकडून जप्त करण्यात आलेले भ्रमणभाष संच आणि भ्रमणसंगणक यांतून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांना अन्वेषण करणे सुलभ झाले आहे. त्यांच्यापैकी पंकज नावाच्या व्यक्तीने पू. बापू आणि त्यांचे पुत्र नारायण साई यांना कलंकित करण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्यासाठी पुष्कळ पैसे मिळाले होते, असे सांगितले.

तुळजापुरात (जिल्हा धाराशिव) धर्मसभेनंतरच्या बैठकीत उपस्थित हिंदूंचा राष्ट्र आणि हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार !

तुळजापूर येथील आढावा बैठकीत सहभागी हिंदुत्ववादी
     तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २२ मार्च (वार्ता.) - राष्ट्र आणि हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी जात, पक्ष, संप्रदाय विसरून एकत्र येण्याचा निर्धार तुळजापुरात धर्मसभेनंतरच्या आढावा बैठकीत उपस्थित हिंदूंनी केला. येथील लोहिया मंगल कार्यालयात १७ मार्चला हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली होती. त्यानंतर १९ मार्च या दिवशी आर्य चौकातील श्रीराम मंदिरात धर्मसभेनंतरच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वरील निर्धार करण्यात आला. या बैठकीस २० पेक्षा अधिक हिंदु बांधव उपस्थित होते. सर्व उपस्थित हिंदूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्र-धर्माचे कार्य एकत्र येऊन करण्याचा निर्धार केला. या पैकी ६ जणांनी धर्मशिक्षणवर्ग वेगवेगळ्या ठिकाणी चालू करण्यास साहाय्य करणार असल्याचे सांगितले. ३ ठिकाणी बालसंस्कार चालू करण्याविषयी मागणी करण्यात आली. 

देशातील अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या सूचीमध्ये पुणे रेल्वेस्थानक प्रथम

अस्वच्छ पुणे !
      मुंबई - रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेविषयी अहवाल सादर केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि टापटीपपणा याविषयीचे मानांकन जाहीर केले आहे. यामध्ये ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांची वेगवेगळी मानांकने केली आहेत. ए-१ श्रेणीतील ७५ रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छ रेल्वे स्थानक म्हणून गुजरातमधील सूरत रेल्वे स्थानकाने पहिला क्रमांक, तर अस्वच्छ स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाने पहिले स्थान पटकावले आहे. (स्वच्छ भारत अभियान आणि रेल्वे स्थानकांच्या मानांकनामध्येही पुणे शहराचे नाव अस्वच्छ म्हणून येणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे. - संपादक) ए श्रेणीतील ३३२ रेल्वे स्थानकांमधून पंजाबमधील ब्यास रेल्वे स्थानकाने प्रथम स्थान, तर अस्वच्छ स्थानकांमध्ये मधुबनी रेल्वे स्थानकाने पहिले स्थान मिळवले आहे.
     रेल्वे मंत्रालयाने स्वच्छ रेल्वे हे अभियान स्वच्छ भारत अभियानानुसार चालू केले आहे. या अभियानांतर्गत १ लक्ष ३५ सहस्र प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य, फलाटांची अवस्था तुटलेल्या स्थितीत आहे.

निजामाबाद (तेलंगण) येथे ख्रिस्त्यांच्या प्रार्थना सभागृहाला अज्ञातांनी लावली आग !

हिंदूंच्या धर्मपरिवर्तनासाठी केला जात होता वापर !
     निजामाबाद (तेलंगण) - येथील ख्रिस्त्यांच्या एका प्रार्थना सभागृहाला अज्ञातांकडून आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गोपनपल्ली गावाच्या पंचायतने सभागृह बनवण्यास विरोध केला होता. त्यानंतर १८ मार्चच्या रात्री ही घटना घडली.
१. काही दिवसांपूर्वी एक पाद्री आणि त्याच्या काही सहकार्‍यांना अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली होती.
२. पाद्री आणि त्याचे सहकारी यांच्यावर हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
३. पाद्री नितीन कुमार यांचा आरोप आहे की, या मारहाणीत ६ जण घायाळ झाले असून यात एका ६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
४. ते म्हणाले की, आक्रमणाच्या वेळी आम्ही प्रार्थना करत होतो. आक्रमणामुळे सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळू लागले.


भारताच्या विजयाप्रीत्यर्थची फेरी मुसलमानांच्या घरासमोरून जात असतांना पोलिसांनी रोखली

हा भारत आहे कि पाकिस्तान ? 
     पुणे, २१ मार्च (वार्ता.) - १९ मार्च या दिवशी भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना होता. त्यामध्ये भारताने विजय प्राप्त केल्यावर पांडवनगर परिसरातील काही युवकांनी भगवा झेंडा फडकवत, तसेच भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देत दुचाकीवरून फेरी काढली. हे युवक त्या परिसरातून एका मुसलमानाच्या घरासमोरून जात असतांना पोलिसांनी मात्र ही फेरी त्या ठिकाणी रोखली. एवढेच नाही, तर मुलांना दटावत घोषणा थांबवण्यास भाग पाडले. पांडवनगर पोलीस चौकीतील एका पोलिसांनी मुलांवर लाठीही चालवली, तसेच त्यांची छायाचित्रे काढून घेतली. त्या वेळी आजूबाजूला जमलेले मुसलमान मुलांकडे पाहून हसत होते, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शींनी दिली. (भारताच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यास आडकाठी आणण्यास हा भारत आहे कि पाकिस्तान ? मुसलमानांची बाजू घेऊन हिंदूंशी सूडबुद्धीने वागणारे असे पोलीस जनतेला काय न्याय देणार ? - संपादक)

(म्हणे) 'शासन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गळचेपी करत आहे !'

मराठी माध्यमांच्या शाळांची गळचेपी आणि त्यांच्या शैक्षणिक दर्जाची 
घसरण होत असतांना त्याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कधी 'ब्र' तरी काढला होता का ? 
     नगर, २१ मार्च - दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नागरिकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत आहे; मात्र आताचे शासन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गळचेपी करत आहे. इंग्रजी शाळांविषयीचे शासकीय आदेश प्रतिदिन काढले जातात आणि ते तत्काळ रहित करण्यात येतात. शासनाच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्या वेळी ते बोलत होते.

सोलापूर जिल्ह्यातील साडेनऊ सहस्र विद्यार्थ्यांचे शुल्क दुष्काळामुळे माफ

     सोलापूर - महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील १ सहस्र ३८ गावांची दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली आहे. या दृष्टीने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे १ कोटी २१ लाख रुपयांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. शासनाच्या या साहाय्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना दिलासा मिळणार आहे. सोलापूर विद्यापिठांतर्गत शिकणार्‍या; मात्र सोलापूर सोडून इतर जिल्ह्यांतील दुष्काळी भागांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही ८३० आहे. या ८३० विद्यार्थ्यांसाठी ११ लाख ४ सहस्र ६३५ रुपयांचे शुल्क माफ होणार आहे. यासमवेत सोलापूर जिल्ह्यातील ८ सहस्र ७४२ विद्यार्थ्यांचे एक कोटी १० लाख रुपयांचे शुल्क माफ होणार आहे. एकूण ९ सहस्र ५७२ विद्यार्थ्यांना या तरतुदीचा फायदा होणार आहे.

अर्थसंकल्पात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना अनुदान : हिंदूंच्या मंदिरांकडे दुर्लक्ष !

कर्नाटकातील काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेष !
     बेंगळुरू - कर्नाटकचे काँग्रेस शासनाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अर्थसंकल्पात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना अनुदान देण्यात आले आहे. शासनाला प्रतिवर्षी कोट्यवधी उत्पन्न देणार्‍या मंदिरांसाठी मात्र काहीच तरतूद केलेली नाही. 
१. या अर्थसंकल्पात मदरशांसाठी ५० कोटी रुपयांची, तर हज भवन पूर्ण करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बौद्ध समुदायाच्या देवालयांसाठीही अनुदान देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

ब्रिटनमधील खलिस्तान समर्थक शीख संघटनेवरील बंदी हटण्याची शक्यता

     लंडन - खलिस्तानला समर्थन असल्यावरून ब्रिटनमध्ये गेली १५ वर्षे इंटरनॅशनल यूथ शीख फेडरेशन या संघटनेवर बंदी आहे. आता ही बंदी हटवण्याचा ब्रिटनचा विचार चालू आहे. ही संघटना आतंकवादी असल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचे ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहातील चर्चेतून पुढे आले आहे. या संघटनेवरील बंदी हटवण्याची सूचना लवकरच संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय संघ यांना दिली जाईल.
     इंटरनॅशनल यूथ शीख फेडरेशन या संघटनेची स्थापना १९८० च्या दशकात पंजाबमध्ये करण्यात आली.

पाकमधून अजमेर येथे येणार्‍या भाविकांचा दौरा रहित करावा, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शने !

     अजमेर - पठाणकोट येथे नुकत्याच झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे, तसेच पाकिस्तानहून वारंवार होणार्‍या घुसखोरीमुळे देशातील वातावरण बिघडत आहे; म्हणून पाकिस्तानमधून अजमेर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा दौरा रहित करण्यात यावा, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी १८ मार्च या दिवशी जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांसह राजस्थानच्या मुख्यमत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पाकमधून श्रद्धाळू भाविकांसह आतंकवादीही येऊ शकतात. यामुळ देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धक्का लागू शकतो. सध्या देशामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे; मात्र पाकिस्तानहून अजमेरला येणारे भाविकच ते बिघडवू शकतात, असा दावा निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

कन्हैया कुमारची तुलना भगतसिंहांशी करणे, हा क्रांतीकारकांचा अपमान !
     कन्हैया कुमार हा आजच्या काळातला भगतसिंह आहे. जेएन्यूत जे घडत आहे, त्यामुळे देशाला लोकशाही, देशद्रोह, स्वातंत्र्य यांविषयी नव्याने शिक्षण मिळत आहे. असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Congress ke neta Shashi Tharoorne deshdroh ke aropi kanhaiya kumarki tulana Bhagat singhse ki. - Congresio dwara krantikarionka apaman karana aj bhi jari.
जागो ! : काँग्रेस के नेता शशी थरूर ने देशद्रोह के आरोपी कन्हैया कुमार की तुलना भगतसिंग से की ! - काँग्रेसियों द्वारा क्रांतिकारियों का अपमान करना आज भी जारी !

(म्हणे) 'अनिवार्य झाल्यास 'भारतमाता की जय' म्हणणार नाही !' - समाजवादी नेते भाई वैद्य

 भाई वैद्य भारतात रहातात कि पाकमध्ये ? वैद्यांनाही पाकचा रस्ता मोकळा आहे ! 
     पुणे, २१ मार्च - 'भारतमाता की जय म्हणा', हे नव्या पिढीला शिकवावे लागेल, हे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहज केलेले नाही. ते आपण गंभीरपणाने घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना नेमके आताच 'भारतमाता की'चा पुळका का आला ? 'भारतमाता की जय' जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पहात आहेत. मुसलमानांना छळून कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्याकडून हे कुटिल राजकारण केले जात आहे. (वैद्य यांचा जावईशोध ! यावरून वैद्य यांचा संघद्वेषच प्रगट होतो. - संपादक) ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून 'भारतमाता की जय म्हणा', हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही, असे द्वेषमूलक प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. (हे आहे हिंदुद्वेषी साम्यवाद्यांचे खरे स्वरूप ! - संपादक) 

(म्हणे) 'काँग्रेसचा निलंबनाला पाठिंबा नाही !' - राधाकृष्ण विखे-पाटील यांचे घूमजाव

एम्.आय.एम्.चे आमदार वारिस पठाण यांच्या निलंबनाचे प्रकरण 
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई.
     मुंबई, २१ मार्च - वारिस पठाण यांचे निलंबन करतांना चूक झाली आहे. त्यामुळे वारिस पठाण यांच्या निलंबनाला काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे. (देशावरील प्रेमापोटी नव्हे, तर मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी काँग्रेसने भूमिका पालटली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसने केवळ मुसलमानांचीच बाजू घेतली. अशा राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे. - संपादक) 'भारतमाता की जय' अशी घोषणा देण्यास नकार देणार्‍या भायखळा (मुंबई) येथील एम्.आय.एम्.चे आमदार वारिस पठाण यांच्यावरील कारवाईला पाठिंबा देणे, ही काँग्रेसची चूक आहे, असे काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी पक्षाला घरचा अहेर देताच काँग्रेस पक्षाने घूमजाव केले.

होळी-धूलिवंदन खेळून खडकवासलाचे पाणी प्रदूषित केल्यास कारवाई होणार !

     पुणे - खडकवासला धरण क्षेत्रात होळी खेळून पाणी प्रदूषण केल्यास संबंधितांवर भारतीय दंडविधान कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश हवेलीच्या उपविभागीय दंडाधिकारी स्नेहल बर्गे यांनी २१ मार्च या दिवशी दिले आहेत. 
     खडकवासला धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याकरिता केला जातो. सध्या धरणातील पाणीसाठा अल्प झाला आहे. २० ते २७ मार्च या कालावधीत होळी आणि धूलिवंदन सण येत आहेत. या वेळी अनेक नागरिकांकडून खडकवासला धरण परिसरात रंग खेळणे, पाण्यात उतरणे, असे अपप्रकार केले जातात. त्यामुळे अपायकारक रंग तसेच वस्तू मिसळून पाणी खराब होऊन प्रदूषित पाण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीपासून आतल्या बाजूस हवेली तालुक्याच्या क्षेत्रातील पाणीसाठ्याच्या परिसरात २४ ते २७ मार्च या कालावधीत रंग खेळणे, खाद्यपदार्थ, रंग, प्लास्टिक अथवा अन्य वस्तू पाण्यात टाकणे, पाण्यामध्ये उतरणे अथवा कोणत्याही प्रकारे धरणाचे पाणी प्रदूषित होईल, अशा प्रकारच्या कृतीस या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.

सैन्याच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ४ जागा शासनाकडे सोपवणार !

     जम्मू - सत्तेसाठी पीडीपीने भाजपला घातलेल्या अटीनुसार जम्मू-काश्मिरातील मोक्याच्या ४ ठिकाणी असलेले भारताचे सैन्य मागे घेण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल एन्.एन्. व्होरा आणि उत्तर भारताचे लेफ्टनंट जनरल डी.एस्. हुड्डा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. जम्मू विद्यापिठाच्या जवळील १६.३० एकर, श्रीनगरमधील टॅॅट्टू मैदानातील २१२ एकर, अनंतनाग येथील हाय ग्राऊंड जवळील ४५६.६० कनॉल आणि कारगिलच्या खालील खुर्बा तांग येथील सैन्याची भूमी राज्यशासनाकडे सोपवण्यात येणार आहे. 

चीनमध्ये एका वर्षात ८१७ भ्रष्ट अधिकार्‍यांना शिक्षा !

भारतात भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करण्याच्या केवळ मोठमोठ्या वल्गना केल्या जातात, 
तर चीन भ्रष्टाचार्‍यांवर धडक कारवाई करतोे ! शासन यातून बोध घेईल का ?
     बीजिंग - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या राजवटीत एका वर्षात ८१७ भ्रष्ट अधिकारी आणि ९२८ आस्थापने यांना शिक्षा ठोठवण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांना आता शासनाच्या योजनांमध्ये सहभागी होता येणार नसून त्यांच्याशी व्यवहारही पूर्णपणे थांबवला जाऊ शकतो.

विहिंपचे नेते अरुण माहौर यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र निदर्शने !

     मेरठ - विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अरुण माहौर यांच्या हत्येच्या निषेर्धात दलित गर्जना न्याय मोर्चाच्या नेतृत्वाखाली भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद सहित अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी येथील सुभाष पार्क समोरील वाल्मीकि वाटिकेमध्ये निदर्शने केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामशंकर कठेरिया आणि खासदार चौधरी बाबूलाल हेही या निदर्शनात सहभागी झाले होते. निदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्यासाठी जमलेल्या शेकडो हिंदुत्ववाद्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे एम्.जी. मार्गावर अनेक घंटे वाहतूक कोंडी झाली होती. निदर्शक हिंदुत्ववादी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच अतिरिक्त जिल्हाधिकारी (शहर) राजेश कुमार श्रीवास्तव आणि पोलीस अधीक्षक (शहर) सुशील घुले घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अरुण माहौर यांच्या पत्नीला घर आणि विधवा निवृत्तीवेतन मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. २५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी अरुण माहौर यांची धर्मांधांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी ५ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष !

अर्थसंकल्पाच्या निमित्ताने...
तीर्थक्षेत्रांवर भरीव निधीची तरतूदच नाही !
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई.
       मुंबई, २१ मार्च - सह्याद्रीच्या रांगा, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि महाबळेश्‍वर, माथेरानसारखी थंड हवेची ठिकाणे, तसेच पश्‍चिम घाटाचा चित्ताकर्षक प्रदेश लाभलेला महाराष्ट्र पर्यटनाचे देशातील मोठे केंद्र आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यटनाच्या विकासासाठी यंदा २६५ कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात तरतुदी केल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाहीत.
      गेल्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा होता. त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पात गोदावरीचा घाट बांधणे, तात्पुरते आसरे निर्माण करणे आणि रस्तेबांधणी यांसाठी २ सहस्र ३७८ कोटी ७३ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. शिवाय कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्‍वर, जेजुरी, अक्कलकोट मुंबईतील हाजी अली दर्गा, नागपूरचा ताजुद्दिन दर्गा आदी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अतिरिक्त १२५ कोटी रुपयांची योजना दिली होती.

लोकसत्ताच्या कुबेरांची उसंतवाणी !

१. ज्यांच्या धर्मभावना आपण पायदळी तुडवत आहोत, ते वाचक वा श्रोते धर्माने 
आणि जन्माने हिंदु असावे, अशी पुरोगामी विचारवंतांची अट असते !
श्री. भाऊ तोरसेकर
    क्षमस्व ! प्रिय वाचक !, असंतांचे संत या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. - संपादक
   १८ मार्च २०१६ च्या लोकसत्तामध्ये एक इवली चौकट टाकून संपादक गिरीश कुबेर यांनी आपला अग्रलेख मागे घेतला आहे. त्या मोजक्या शब्दांतून त्यांना काय सांगायचे आहे ? असा वाचकांना प्रश्‍न पडला असेल; कारण ट्विटर आदी माध्यमांत तर अनेक वाचकांनी तातडीने अग्रलेखासाठी कुबेर यांचे अभिनंदन केले होते. अर्थातच ज्या विषयावर कुबेरांनी अग्रलेख लिहिला, त्या विषयाला हात घालणे किंवा त्याचे सडकून टीका करत वाभाडे काढणे, हे भारतीय सेक्युलर माध्यमांतील भयंकर पाप आहे; कारण संतपद बहाल होणार्‍या मदर तेरेसा काही हिंदु धर्मातील नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या चमत्कार वा साक्षात्कारी शक्तीला कुठल्याही विज्ञानाची जोड असण्याचे कारण नाही. त्या हिंदु नाहीत इतकीच गोष्ट त्यांच्या संदर्भातले कुठलेही अतिरेकी दावे सत्य मानायला पुरेसे असतात.

पाण्याच्या वापराविषयी सतर्कता ठेवा !

     मुंबई-पुण्यासह राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांत दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई आहे. या पार्श्‍वभूमीवर जलतरण तलावांचा वापर आणि रेन डान्सवर बंदी घालण्यात आली आहे. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने आदेश दिले असले, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोरपणे करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. असे आदेश जारी करावे लागणे, हेच मुळात आपल्यातील असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. आदेशामुळे रंगपंचमीच्या दिवशी होणार्‍या पाण्याच्या वापरावर प्रसारमाध्यमांचेही लक्ष असेलच. त्यामुळे अतिउत्साही मंडळींकडून या दिवशी पाण्याचा कसा अपवापर करण्यात आला, हे वृत्तांतून समजेल, असे वाटते. रंगपंचमीच्या त्या एक दिवसातील काही घंट्यांत होणारा पाण्याचा अपव्यय म्हणजे पुढील काही दिवसांचा पाणीसाठा आपल्या हातानेच वाया घालवणे होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कोरडी होळी खेळण्याचे आवाहन केले आहे.

होळीच्या कालावधीत काय करावे ?

२३ मार्च या दिवशी असलेल्या होलिकोत्सवाच्या निमित्ताने...
पूज्यपाद संतश्री
आसारामजी बापू
१. होळीची रात्र ही चार महारात्रींमधील एक आहे. होळीच्या रात्री केलेले जागरण आणि जप हे पुष्कळ फलदायी असतात.
२. ऋतु परिवर्तनातील १० ते २० दिवसांमध्ये लिंबाच्या १५ ते २० कोमल पानांसमवेत २ काळी मिरी चावून खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले रहाते. 
३. १३ ते २० दिवस मिठाविना भोजन घेणार्‍याचे आयुष्य आणि प्रसन्नता यांमध्ये वाढ होते.
४. होळीनंतर खजूर खाणे वर्ज्य आहे.
५. नैसर्गिक रंग वापरण्यामागील कारण : बाजारात मिळणार्‍या रासायनिक रंगांपेक्षा पळसाची फुले आणि इतर नैसर्गिक रंग यांनी सिद्ध केलेल्या रंगांनी होळी खेळावी. यामुळे सप्तरंग आणि सप्तधातू यांचे संतुलन टिकून रहाते.
- पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू (संदर्भ : क्या करें, न करे ?) 
     (सध्याच्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाणीविरहित कोरड्या रंगांनी होळी साजरी करावी, असे आवाहन सर्व स्तरांतून होत आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. - संपादक)

मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि राजकारण

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने...
    पाण्याचे स्रोत आटल्याने निर्माण झालेली पाणीटंचाई आणि तसेच त्यातील प्रशासकीय दिरंगाईमुळे निर्माण झालेले प्रश्‍न, यांचे आता काळानुसार अवलोकन करणे आवश्यक आहे. उदाहरण लातूर शहराचे देता येईल. लातूरला जुलै २०१५ पासून मासातून एकदा पाणी येत आहे. ते का, अशी मीमांसा केली की, उत्तरे राजकीय आखाड्यातही दडली आहेत, हे कळेल. ज्या मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केले, त्या गावच्या पाणीपुरवठ्याची महापालिकेने काढलेली निविदा भरण्यासाठी जवळजवळ सात वेळा जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. ही प्रक्रिया तब्बल दोन वर्षे चालली.

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी काही कारणे !

१. लाहोर काँग्रेसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आले असतांनाही केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
२. १४-१५ जून १९४७ ला देहलीमध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार होता; परंतु गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस फाळणीला त्यांचे समर्थन घोषित केले. यापूर्वी त्यांनी विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल, असे विधान केले होते.
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का ?

हास्यास्पद समाजसेवक !

     रायपूर येथे एका अस्वलाने नवागावचे डेप्युटी रेंजर, तसेच त्यांच्या अन्य दोन सहकार्‍यांवर वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करून त्यांना ठार मारले होते. त्यामुळे या अस्वलाला ठार करण्यासाठी पोलिसांनी एके-४७ रायफलींतून त्याच्यावर १०० हून अधिक गोळ्या झाडल्या. याला आक्षेप घेतांना समाजसेवक कुणाल शुक्ल म्हणाले, एका मुक्या प्राण्याला अशा पद्धतीने ठार मारणे चुकीचे आहे. अन्य मार्गाने अस्वलाला नियंत्रणात आणता आले असते. त्याच्यावर गोळ्या घालण्याची काय आवश्यकता होती ? या प्रकरणी पोलीस आणि वन संरक्षक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा. सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) भारतीय नागरिकांनो, जपानच्या नागरिकांकडून शिका !

      जपानमधील होजी तकाअशी या ७१ वर्षांच्या प्रेक्षकाने त्यांच्या देशातील दूरचित्रवाणीवरील राष्ट्रीय प्रसारणावर नाराजी व्यक्त करीत या वाहिनीकडून होत असलेल्या इंग्रजीच्या अतीवापराच्या विरोधात खटला प्रविष्ट केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या काही समर्थकांसह जपानमधील वाढत्या इंग्रजीच्या वापराच्या विरोधातही निदर्शने केली.
(संदर्भ : साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३)

साधक कारागृहातून सुटून आल्यावर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेले भव्य स्वागत !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या साधकांचे जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
आणि हर हर महादेवच्या जयघोषात स्वागत करतांना आश्रमातील साधक
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाल्यावर तेथील साधकांना जाणवलेली सूत्रे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

देवतेला नारळ कसा अर्पण करावा ?, हा फलक प्रबोधनासाठी उपलब्ध !

 साधकांना सूचना !
      सनातन संस्थेच्या वतीने देवतेला नारळ कसा अर्पण करावा ? हा २.२५ फूट ३.५ फूट आकारातील धर्मशिक्षण देणारा फलक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आला आहे. हा फलक विविध देवळे, यात्रा आदी ठिकाणी लावता येईल. या फलकासाठी प्रायोजक मिळवून त्याचा प्रबोधनासाठी वापर करावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

श्री. अमित डेगवेकर यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के झाल्याचे वर्षभरापूर्वीच जाणवणे, त्यांना स्वतःलाही त्या वेळी तसे जाणवले असणे आणि अन्य एका साधिकेलाही त्यांचा स्तर वाढल्याचे ६-८ मासांपूर्वीच जाणवले असणे

       आज एका साधिकेने श्री. अमित डेगवेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे सांगितल्यावर मला आनंद झाला आणि मनात विचार आला, श्री. अमित यांचा आध्यात्मिक स्तर तर केव्हाच ६१ टक्के झाला होता, आज केवळ घोषित झाला आहे. असा विचार येण्याचे कारण म्हणजे अनुमाने वर्षभरापूर्वी श्री. अमित आश्रमात आले होते. एरव्ही आमचे नाते खेळीमेळीचे आहे; पण त्या वेळी मात्र मला त्यांचा पुष्कळ राग येत होता. त्यांना मी तसे सांगितलेही आणि म्हटले, ज्याअर्थी मला तुमचा एवढा राग येत आहे, त्याअर्थी निश्‍चितपणे तुमची आध्यात्मिक प्रगती (६१ टक्के आध्यात्मिक स्तर) झाली असणार. (मला अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असून जेव्हा माझा त्रास वाढलेला असतो, तेव्हा संत, ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले किंवा चांगली साधना करणारे साधक यांचा मला राग येतो.) त्यावर ते म्हणाले, हो. तुम्ही बरोबर बोलत आहात. त्यानंतर वर्षभरात त्यांना भेटल्यावर बर्‍याचदा ते ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले साधक आहेत, असे मला वाटत असे. आज श्री. अमित यांचा स्तर घोषित झाल्यावर आणखीही एका साधिकेने तिला ६-८ मासांपूर्वीच त्यांचा स्तर वाढल्याचे जाणवले होते, असे सांगितले.
- कु. सुप्रिया, रामनाथी, गोवा. (४.३.२०१६)

तत्त्वनिष्ठ आणि आध्यात्मिक पातळीचा नाही, तर देवाला अपेक्षित असे करण्याचा ध्यास असलेले ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले श्री. अमित रामचंद्र डेगवेकर !

१. तत्त्वनिष्ठता आणि परखडपणा
       अमितमधे पुष्कळ तत्त्वनिष्ठता आहे. समोर कोणताही साधक असो, तोे त्याला कधीही भावनिक किंवा मानसिक स्तरावर हाताळत नाही. साधक रडत असला, तरी त्याचे नेमके काय चुकत आहे आणि कोणते प्रयत्न करायला हवेत ? हे परखडपणे सांगतो.
२. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे होण्यासाठी स्वतःकडे एखाद्या 
सेवेचे दायित्व नसतांनाही ही आपलीच सेवा आहे, असे समजून ती करणे
        त्याच्याकडे एखाद्या सेवेचे दायित्व नसले, तरीही तो त्या सेवेसंदर्भात सूत्रे, त्यातील बारकावे सांगतो, तसेच आणखी काय केल्यास चांगले होईल, याविषयीही सुचवतो आणि नंतर त्याचा पाठपुरावाही घेतो. सर्वकाही श्री गुरूंचे म्हणजे आपलेच आहे आणि ते प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे व्हायला हवे, असाच त्याचा भाव असतो. त्यामुळे एखाद्या सेवेचे दायित्व त्याच्याकडे असो वा नसो, आपलीच सेवा समजून परिपूर्ण आणि देवाला अपेक्षित असे करण्याची त्याची धडपड असते.

खर्‍या अर्थाने साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि भान हरपून गुरुसेवा करतांना तहान-भूकही विसरून जाणारे ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले श्री. अमित रामचंद्र डेगवेकर !

१. सहजता आणि प्रेमभाव 
असल्याने सर्वांशीच जवळीक साधता येणे
        पहिल्यापासूनच अमितमध्ये खूप सहजता जाणवायची. आश्रमात असो कि प्रसारात, लहानातल्या लहान आणि मोठ्यातील मोठ्यांशीही त्याची लगेचच जवळीक होते. त्याचसमवेत साधकांचे गुण-दोषही तोे लगेचच हेरतो आणि त्यांना साधनेत कसे साहाय्य करता येईल, असा विचार करतो. तो तेवढ्याच सहजतेने साधकांच्या चुका आणि स्वभावदोष सांगून त्यांना खर्‍या अर्थाने साधनेत साहाय्य करतो. त्यामुळेच साधक मोकळेपणाने स्वतःचेे दोष आणि चुका त्याला सांगू शकतात, असे वाटले.
२. तत्त्वनिष्ठ राहून साधकांना साधनेत साहाय्य करणे
२ अ. भावनिक स्तरावर न रहाता तत्त्वनिष्ठतेने वागणे : काही वेळा इतरांना भावनिक स्तरावर काय वाटेल, याचा विचार न करता समष्टीला काय अपेक्षित आहे, देवाला काय केलेले आवडेल ? याचा विचार करून तो झोकून देऊन कृती करत असतो. त्या साधकांना वाईट वाटेल, निराशा येईल, असा भावनिक विचार तो करत नाही.

ग्रंथप्रदर्शनांच्या ठिकाणी सनातन शॉप संकेतस्थळाचे विज्ञापन करणार्‍या डँग्लरचा वापर अधिकाधिक करा !

साधकांना सूचना !
     सनातन संस्थेचे ग्रंथ अधिकाधिक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावली जातात. ग्रंथप्रदर्शन संपल्यानंतर सनातनचे ग्रंथ ऑनलाईन कसे खरेदी करता येतील, हे समजणे जिज्ञासूंना सोपे व्हावे, या उद्देशाने सर्वत्रच्या ग्रंथप्रदर्शनांवर sanatanshop.com या संकेतस्थळाचे विज्ञापन करणारे ए २ आकारातील डँग्लर (पाठपोट पत्रक चिकटवलेल्या पुठ्ठ्याला डँग्लर म्हणतात.) लावावेत. हे ए २ आकारातील डँग्लरला दोन्ही बाजूंनी लावण्यासाठीचे पत्रक नेहमीच्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या वेळी उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांनी अद्याप डँग्लर बनवून घेतले नसतील, त्यांनी ते बनवून घ्यावेत. सनातन शॉप संकेतस्थळाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी ते जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात छापून घेऊन सर्वत्रच्या ग्रंथप्रदर्शनांवर लावू शकतो, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
     हे डँग्लर लावतांना ए २ आकाराचा पुठ्ठा घेऊन त्यावर दोन्ही बाजूने सनातन शॉपची माहिती असलेल्या लिखाणाचा कागद चिकटवावा.

पू. सौरभदादांच्या खोलीत सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. प्रेमभाव
      
वर्षा नकाते
पू. दादांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. पू. दादा येणार्‍या प्रत्येक साधकाला बसा, या, खाऊ दे, असे प्रेमाने सांगतात. सेवा करतांना माझ्यावर उपाय होऊ देत, अशी प्रार्थना केल्यानंतर माझ्यावर उपाय होऊ लागले. सेवेत असतांना मला मध्येच उचकी येत होती, तेव्हा पू. दादा माझ्याकडे पाहून ममम मम (पाणी पी), असे मला सांगत होते. ते शब्द ऐकून मला इतके भरून आले की, देव माझी किती काळजी घेतो, असे वाटले.
२. साधिकेला लहानपणी 
लाडाने हाक मारायचे, त्या नावाने हाक मारणे
        मी पू. दादांच्या खोलीत सेवा करत असतांना ते चिमु चिमुु, असे म्हणत होते. त्या वेळी सौ. प्राजक्ता जोशी (पू. दादांची आई) पू. दादांना म्हणाल्या, चिमणी नाही आली. तेव्हा ते मोठ्याने हसत होते. काही वेळाने मी काकूंना सांगितले, मला माहेरी चिमु म्हणतात. मग काकू म्हणाल्या, तरीच पू. दादा चिमु चिमु म्हणत आहेत.

साधनेचे प्रयत्न निरपेक्षपणे करणे, ही खरी साधना आहे !

       
पू. संदीप आळशी
सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक साधकांना विविध शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहेत. जसे साधनेतील अडथळे वाढत आहेत, तसेच साधक करत असलेल्या प्रयत्नांतील अडथळेही वाढत आहेत, उदा. प्रयत्न मनापासून किंवा भावपूर्ण न होणे, प्रयत्न करायचे स्मरण न रहाणे. विशेषतः त्रास अधिक असलेल्या साधकांच्या संदर्भात हे जास्त आढळते. त्यामुळे साधनेचे पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षित प्रगती होत नसल्यामुळे काही साधकांना प्रयत्नांविषयी नकारात्मकता किंवा निराशा येते. अशांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. साधनेचे पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षित प्रगती होतांना दिसत नसली, तरी साधनेच्या प्रयत्नांची धार मात्र वाढत जाते, म्हणजेच साधनाभिमुखता अधिक वाढत जाते. हे साधनेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे.
२. कर्म करा; पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका, असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. यानुसार साधनेच्या प्रयत्नांतही फळाची अपेक्षा न करणे, यातच खरी साधना आहे.
- (पू.) श्री. संदीप आळशी (१७.३.२०१६)

प्रसार करतांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देवाच्या साहाय्याविषयी शंका येताच देव प्रत्येक क्षणाला आपल्यासमवेत असतो, याची अनुभूती येणे

       श्री खंडोबा मंदिरात सात्त्विक उत्पादनांचा वितरणकक्ष (स्टॉल) लावण्यात येणार्‍या अडचणींविषयी माझे पू. गाडगीळकाकांशी बोलणे झाले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी देवळात जाऊन प्रार्थना केली आणि नारळ वाढवला.
       दुसर्‍या दिवशी माझे श्री.सिन्नरकरकाकांसोबत जी.आय्.डि.सी.मधे जायचे नियोजन होते.पंचांगासाठी ३ संपर्क, २०१४ पंचांग विज्ञापन वसूली संपर्क, एक नूतनीकरण आणि श्री. राजीव खोपकर यांना ५ पंचांग, ५ अत्तर आणि ५ चंदन उदबत्ती द्यायची होती. ३ संपर्कांपैकी कोणी भेटले नाही. विज्ञापन वसूलीसाठी गेलो, तर आदल्या रात्री त्यांचे कोणी नातेवाईक वारल्याने ते जळगावला गेल्याचे समजले. नूतनीकरण करायला गेलो, तर ते उशिराने येणार होते. माझ्या मनात विचार आला, आज कोणीच का भेटले नाही ? देवाला काय शिकवायचे आहे ? आपण तळमळीने एवढ्या लांब आलो, तरी देवाचे साहाय्य का लाभले नाही ? 

मायेकडे कशा दृष्टीने पहायचे, हे परात्पर गुरुपदी असणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे लक्षात येणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       परात्पर गुरुपदावर असणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या कृपेने सध्या मायेलाही कसे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहायचे, याची अनुभूती मी घेऊ शकत आहे. पूर्वी मी मायेचा आपल्यावर परिणाम होईल, या भीतीने तिच्यापासून दूर पळायचो; पण आता प.पू. डॉक्टरांच्या कृपेने लक्षात आले की, मायेकडे इच्छा, वासना यांविरहित भावनेने पाहिले, तर तिचा परिणाम आपल्यावर होत नाही. ईश्‍वरानेच माया निर्माण केली असल्याने तिच्यापासून दूर गेलो, तर ती आपली पाठ सोडत नाही. याउलट तिला सामोरे गेलो, तर तिचा परिणाम आपल्यावर होत नाही. मायेपासून आपल्याला अलग होता येत नाही; पण तिचा उपभोगही आवश्यक तेवढा आणि ईश्‍वरी अनुसंधानात राहून घेतला, तर तिचा उपभोग घेऊन न घेतल्यासारखा आहे, उदा. आपल्याला ईश्‍वराने शरीर दिले असल्याने ते चालवण्यासाठी आवश्यक तेवढे अन्न घेतले पाहिजे; पण त्यामध्ये इच्छा आणि वासना आली, तर मात्र ती वृत्ती हानीकारक आहे. याच दृष्टीकोनातून मायेकडे पाहिले आणि धर्माचरण केले, तर चारही पुरुषार्थ साधले जातात.
         परात्पर गुरुपदी असणार्‍या प.पू. डॉक्टरांमुळेच मला ही दृष्टी आली. हेच परात्पर गुरुपदाचे महत्त्व आहे.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०१६)

अहं निर्मूलन प्रक्रियेद्वारे प.पू. गुरुदेव साधकांतील रज-तम आणि नकारात्मकता नष्ट करून प्रेमळ मातेप्रमाणे प्रीतीचा वर्षाव करत असल्याचे जाणवणे

       डिसेंबर २०१५ मधे विदेशी साधकांसाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याअंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे सत्र होते. त्यासाठी मी स्वतःकडून झालेल्या चुका लिहून दिल्या होत्या. त्या सत्राच्या वेळी माझ्या मनाची झालेली प्रक्रिया आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देत आहे.
सौ. साईली गंद्रे
१. अहं निर्मूूलन सत्रात अश्रू पुसण्यासाठी रुमालाची आवश्यकता भासणार असल्याचे साधकांचे बोलणे ऐकणे; मात्र या सत्रात अहं निर्मूलनासाठी साहाय्य मिळणार असल्याने कृतज्ञता वाटून रडण्याऐेवजी शिकण्याचा विचार मनात असणे : अहं निर्मूलनच्या सत्राच्या आरंभी साधक एकमेकांशी अनौपचारिकपणे बोलत होते. विशेषकरून या अहं निर्मूूलन सत्रात प्रत्येकाला अश्रू पुसण्यासाठी रुमालाची आवश्यकता भासते, असे बोलले जात होते. या सत्रात मांडण्यासाठी माझ्याकडून अहंभावामुळे झालेल्या चुका मी लिहून दिल्या होत्या. त्याच वेळी या चुकांविषयी थोडेसे चिंतन झाल्याने मला पुष्कळ पश्‍चात्तापही होत होता. सत्राला आरंभ झाल्यानंतर मला चुका मांडण्याची संधी मिळाली, तेव्हा इतर साधकांकडून मिळणारे दृष्टीकोन जाणून घेऊन त्यांचा उपयोग अहं निर्मूलनासाठी करण्यास मी पुष्कळ उत्सुक होते. माझ्याजवळ माझा हातरुमाल असला, तरी मनात पुढील विचार होता, मी रडणार नसल्याने मला त्याची (हातरुमालाची) आवश्यकता भासणार नाही. उलटपक्षी मला शिकायला मिळत असल्याने मला या अहं निर्मूलन सत्राविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तसेच माझ्याकडून झालेल्या चुका समष्टीच्या दृष्टीने गंभीर असल्याने माझ्या अहं निर्मूलनासाठी या साहाय्याची आवश्यकता असतांना मी रडायचे कशाला ? असे मला वाटत होते.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२२.३.२०१६) दुपारी ३.१३ वाजता
समाप्ती - फाल्गुन पौर्णिमा (२३.३.२०१६) सायंकाळी ५.३१ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

आरंभी मुले आणि यजमान यांना साधनेसाठी पुष्कळ विरोध करणे, नंतर ईश्‍वरावर विश्‍वास ठेवल्याने पुष्कळ समाधान मिळणे आणि आता स्वतः पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करणे

       १९९८ या वर्षी माझी मुले आणि यजमान यांनी साधनेला आरंभ केला. मुलांनी शिक्षण सोडून साधनेला आरंभ केला होता. तेव्हा त्या सर्वांना मी साधनेसाठी पुष्कळ विरोध केला होता. नंतर समाजातील लोक आणि नातेवाईक आमच्याकडे यायचे बंद झाले. तेव्हा आता मुलांचे कसे होणार आणि चारही मुलांचे विवाह कसे होणार ?, याची मला सतत काळजी वाटू लागली. नंतर मात्र मीच खंबीर राहिले आणि ईश्‍वरावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर मला कुठलाच त्रास झाला नाही. नंतर चारही मुलांचे विवाह झाले आणि सुनाही साधना करणार्‍या मिळाल्या. आता मी पुष्कळ समाधानी आहे. आता मी पूर्णवेळ होऊन साधना करणार आहे. 
- सौ. रंजना विलास पोळ, तासगाव, सांगली (१५.१२.२०१५)

स्वप्नात एका काळ्या व्यक्तीने तीन कुत्री अंगावर सोडणे, त्यापैकी एक कुत्रे मानगुटीवर बसल्यावर त्या व्यक्तीस मोठ्याने दरडावणे आणि तेव्हा झोपण्यापूर्वी मनात दत्तमाला मंत्र घोळत असल्याने अंगी धारिष्ट्य निर्माण झाल्याचे जाणवणे

      
पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळे
१५.१२.२०१५ या दिवशी झोपल्यावर रात्री ते पहाटे मला पडलेल्या स्वप्नात एक काळी व्यक्ती २ - ३ कुत्री माझ्या अंगावर सोडत आहे, असे दिसले. मी दोन कुत्र्यांना मागे ढकलल्यावर ती निघून गेली; पण तिसरे कुत्रे मोठे होते, ते माझ्या मानगुटीवर बसले. मी समोरच्या व्यक्तीला या कुत्र्याला बाजूला कर, असे म्हटले; पण तसे होईना; म्हणून मी शेवटी त्याला दरडावून तू कुत्र्याला बाजूला काढ ! नाहीतर बघ ? असे बजावले. मी झोपेत असूनही मोठ्या आवाजात बोलल्याने खोलीतच झोपलेल्या सौ. ज्योती (मुलगी) आणि कु. शिवांजली (नात) यांना ते ऐकू गेले आणि त्यांनी मला जागे केले. साधारण २ मासांपूर्वीही मी झोपेतून घाबरत उठले होते. आज माझ्यात स्वप्नातील व्यक्तीला दरडावण्याचे धैर्य कुठून आले ? तेव्हा माझ्या लक्षात आले, मी झोपत असतांना मनात दत्तमाला मंत्रजप घोळत होता. (श्रीमती विजयालक्ष्मी काळे आजी दिवाळीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात आल्या असतांना त्या अन्य साधकांसमवेत सामूहिक दत्तमाला मंत्रजपाचे पठण करत असत. - संकलक)

संकटकाळात साधकांना भयमुक्त करण्यासाठी महर्षींनी तमिळनाडू येथील तंजावरजवळील कधिरमंगलम् या गावी असणार्‍या आणि अगस्ती महर्षींनी स्थापन केलेल्या श्री वनदुर्गादेवीच्या मंदिरात नेणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
साधकांना संकटांपासून 
भयमुक्त करण्यासाठी महर्षींचे उपाय ! 
श्री वनदुर्गादेवी
       महर्षि आम्हाला कार्य-उद्देशाप्रमाणे विविध ठिकाणी असणार्‍या देवतांच्या मंदिरांत दर्शनासाठी नेत असतात. पुराणकाळात अगस्ती महर्षींनी आपल्या तपोबलाने काशीच्या श्री विशालाक्षी देवीला तंजावर जवळील कधिरमंगलम् या गावी आवाहन करून बोलावून घेतले होते आणि तशी ती आलीही.
१. लोकांना भयमुक्त करण्याचे कार्य अगस्तींनी देवीवर सोपवणे : लोकांना भयमुक्त करणे, हे कार्य अगस्तींनी देवीवर सोपवले होते; म्हणून कोणतेही संकट आले, तरी निर्भयतेचे वरदान लाभावे, यासाठी या देवीची उपासना केली जाते. अगस्ती महर्षींनी तप केले, त्या वेळी येथे सर्वत्र अरण्य होते. अरण्यात देवी आल्याने तिचे नाव वनदुर्गा असे पडले.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते. 
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
     भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
     मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      साधे औषध कोणते घ्यायचे, हे बहुमताने ठरवत नाहीत; मात्र राज्य कोणत्या पक्षाने करावे, हे बहुमताने ठरवतात. यापेक्षा हास्यास्पद जगात काय असेल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     साधकांनी मी, माझे, माझ्यासाठी हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

लढाऊ बाणा दाखवणे आवश्यक !

संपादकीय 
    गायीला राष्ट्रमाता घोषित करावे, या मागणीसाठी राजस्थानमधील राजकोट येथे ८ गोप्रेमींनी विषप्राशन केल्याची घटना घडली. ती अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल. गेली काही वर्षे गाय, गीता आणि गंगा यांच्या रक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. शासने आली आणि गेली; मात्र या मागण्या तशा दुर्लक्षितच राहिल्या. गोसंवर्धनाचे ध्येय समोर ठेवून गोप्रेमींनी राजकोटमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करायचे ठरवले. त्याआधी राजकोटच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना गायीला राष्ट्रमातेचा दर्जा न दिल्यास सामूहिकपणे आत्महत्या करणार, अशी चेतावणी गोप्रेमींनी दिली होती. गोप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना असे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सुव्यवस्था करणे आवश्यक होते. तसे न करता प्रशासनाने केवळ आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस कुमक तैनात करण्याचा सोपस्कार पार पडला. पोलीस आंदोलनस्थळी असतांनाही गोप्रेमींनी विषप्राशन केले. त्या वेळी पोलीस झोपा काढत होते का ? गोप्रेमी सतर्क असल्यामुळे भारतात ठिकठिकाणी गायींची अवैध वाहतूक रोखली जाते. पोलिसांनी जे स्वतःहून करायला हवे, ते गोप्रेमी जिवावर उदार होऊन करतात. अनेक ठिकाणी पोलीस आणि गोमांसाचा व्यवसाय करणारे यांच्यात साटेलोटे असते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn