Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उज्जैनमध्ये सिंहस्थपर्वाच्या पार्श्‍वभूमीवर सापडली स्फोटके !

साजिद नावाच्या व्यक्तीने ठेवली होती स्फोटके
हिंदूंनो, धर्मांध सातत्याने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत असतांना
यासंदर्भात एकही ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
     उज्जैन - १९ मार्चला येथील नानाखेडामधील मुलांच्या वसतीगृहातील एका खोलीत स्फोटके असणारी एक पिशवी सापडली आहे. उज्जैनचे पोलीस अधीक्षक मनोहर वर्मा म्हणाले की, सापडलेल्या स्फोटकांच्या माध्यमातून सिंहस्थपर्वामध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. या घटनेनंतर शहरात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
१. वसतीगृहातील स्फोटके सापडलेली खोली साजिद नावाच्या व्यक्तीला भाड्याने देण्यात आली होती.
२. खोली घेतल्यावर अवघ्या १० मिनिटांत जेवण करण्यासाठी जातो, असे सांगून साजिद निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने वसतीगृहाच्या संचालकाला संशय आला. त्याने पोलिसांना कळवल्यावर खोली उघडण्यात आली. तेव्हा स्फोटकांची दारू, बॉम्ब बनवण्यासाठीची तार, जिलेटिनच्या कांड्या, डिटोनेटर आणि एक भ्रमणभाष संच मिळाला.
३. साजिदने खोली भाड्याने घेतांना दिलेल्या ओळखपत्राची प्रत बोगस असल्याचे उघड झाले.
४. पोलीस अधीक्षक वर्मा म्हणाले की, स्फोटके भ्रमणभाषला जोडून त्याद्वारे सिंहस्थामध्ये स्फोट घडवून आणण्यात येणार होते.

लष्कर-ए-तोयबा सैनिकी तळांवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

आतंकवादी भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याची सिद्धता करतात, 
तर भारतीय सैन्य त्यांचा बचाव करण्याच्या विचारात स्वतःची हानी 
करून घेते ! ही स्थिती पालटण्यासाठी शासन काही प्रयत्न करणार का ?
     नवी देहली - भारतीय गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजाना हा भारतीय सैन्य आणि अर्धसैनिक दल यांच्या तळांवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे. या आक्रमणाद्वारे सैन्याची हत्यारे लुटण्याचा त्यांचा हेतू आहे. अबू दुजाना आणि त्याचे साथीदार अबू खालिद, अली आणि एहसान काश्मीरच्या दुईला आणि लराई या भागांत लपले असण्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे. सैन्य त्यांच्या शोधासाठी मोहीम राबवत आहे.

उत्तरप्रदेशात मवानामध्ये मुसलमान नगरसेवकाच्या हत्येनंतर हिंसाचार !

कायदा हातात घेऊन हिंसाचार करणे ही सहिष्णुता होऊ शकत नाही; 
मात्र यावर कोणीही तोंड उघडणार नाही, हेही तितेकच खरे !
      मेरठ - १८ मार्चच्या रात्री मेरठपासून ३० कि.मी. अंतरावर असणार्‍या मवनामध्ये समाजवादी पक्षाच्या जाहिद नावाच्या नगरसेवकाच्या हत्येनंतर हिंसाचार झाला. या वेळी धर्मांधांनी पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह १२ हून अधिक गाड्या जाळल्या. धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाले आहेत. तसेच हिंदूंची दुकाने लुटण्यात आली. महामार्ग रोखून धरण्यात आला. पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून धर्मांधांना पांगवले. हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जाहिदच्या पत्नीने चेतावणी दिली आहे की, आरोपींना अटक न केल्यास मी माझ्या मुलांसह स्वतःला जाळून घेईन. जाहिद यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

गुरांच्या व्यापार्‍यांच्या हत्येप्रकरणी ५ जणांना अटक

      पाटलीपुत्र (पाटणा) - झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यातील गुरांचा व्यापार करणार्‍या २ मुसलमान व्यापार्‍यांच्या हत्येप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २ व्यापार्‍यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गोमाता संरक्षण समितीचे सदस्य मिथिलेश प्रसाद साहू उपाख्य बंटी, प्रमोद कुमार साहू, मनोजकुमार साहू, अवधेश साहू आणि मनोज साहू यांना अटक करण्यात आली आहे.

कारगिलमधील हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या सैनिकाचा मृतदेह सापडला

      जम्मू - कारगिल सेक्टरमध्ये १७ मार्चला हिमस्खलन होऊन बर्फाचा कडा सैन्याच्या एका चौकीवर कोसळला. त्यात २ सैनिक बर्फाखाली गाडले गेले. यात विजय कुमार हा सैनिक हुतात्मा झाला. सहाय्य आणि बचाव पथक यांनी घटनास्थळी शोध घेऊन विजय कुमार यांचा मृतदेह बाहेर काढला. दुसर्‍या सैनिकाला यापूर्वीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. या घटनेनंतर सियाचीनमध्ये २५ फूट बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही ६ दिवसांनी जीवंत सापडलेले हनुमंतप्पा कोप्पद यांनी मृत्यूशी दिलेली झुंज पुन्हा ताजी झाली.


श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना म्हैसूर येथे येण्यावर बंदी घातली !

कर्नाटकातील काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेष !
हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जाण्याचा प्रयत्न
      म्हैसूर (कर्नाटक) - मंड्या येथील महसूल आणि पोलीस अधिकार्‍यांनी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणाखाली म्हैसूर येथे येण्यावर बंदी घातली आहे. येथे काही दिवसांपूर्वीच भाजप कार्यकर्ते राजू यांची धर्मांधांनी निर्घृण हत्या केली होती. श्री. मुतालिक हे राजू यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येत होते.
     श्री. प्रमोद मुतालिक यांच्या मंड्या आणि म्हैसूर येथे पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना मंड्या-रामनगरम् जिल्ह्यांच्या सीमेवरील निदाघत्ता येथे थांबवून परत पाठवण्यात आले. त्याआधी म्हैसूर येथील विद्याराण्यापुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांनी काम्पेगौडा विमानतळावर श्री. प्रमोद मुतालिक यांना भेटून त्यांच्यावर म्हैसूर येथे न येण्याची नोटीस बजावली. तरीही श्री. मुतालिक हे म्हैसूर येथे येण्यास निघाले होते.

कन्हैया कुमारवर मेरठमध्ये देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

बुलंदेश्‍वर पोलिसांनी तक्रारच घेतली नाही !
तक्रार दाखल करून न घेणार्‍या पोलिसांच्या विरोधातच तक्रार केली पाहिजे !
       मेरठ (उत्तरप्रदेश) - बजरंग दलाचे बुलंदेश्‍वर येथील कार्यकर्ते हेमंत सिंह यांनी जेएन्यूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सैनिकांविषयी कन्हैयाने अपशब्द काढल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने याचिका दाखल करून घेत २८ मार्च या दिवशी सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे. हेमंत सिंह यांनी सांगितले की, भारतीय सैनिक काश्मिरी महिलांवर अत्याचार करतात, अशी भाषा कन्हैया कुमारने कोणत्या आधारावर केली, हे त्याने स्पष्ट केले पाहिजे. आपण त्याच्या विरोधात बुलंदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथे तक्रार न घेतल्याने न्यायालयाचा आधार घ्यावा लागला आहे.

श्री शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर गोंधळ केल्याने पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कह्यात घेऊन पुण्याला पाठवले !

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याची तृप्ती देसाई 
यांची धर्मद्रोही मागणी पुन्हा एकदा फेटाळली !
तृप्ती देसाई यांचा धूर्तपणा आणि कावेबाजपणा ओळखून पोलिसांनी त्यांना
श्री शनिदेवाच्या मंदिरात जाऊ देणे, हे आत्मघातकी ठरू शकते. हे जाणून
आतातरी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे !
नावातही इंग्रजी शब्द असणार्‍यांमध्ये स्वभाषा, स्वदेश
आणि स्वधर्म यांच्याविषयी कधी प्रेम असेल का ?
      नगर - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या १९ मार्च या दिवशी अचानकपणे श्री शनिशिंगणापूरमध्ये श्री शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांना आपण श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता दर्शन घेऊ, असे सांगितले. त्यानंतर देसाई यांना पोलीस बंदोबस्तामध्ये श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी मंदिरात नेण्यात आले. (प्रत्यक्षात धर्मादाय सहआयुक्तांचा भूमाता ब्रिगेडच्या महिलांना श्री शनिदेवाच्या मंदिरात प्रवेशबंदीचा आदेश आहे. असे असतांनाही पोलिसांनी देसाई यांना मंदिरात नेण्याचा निर्णय कसा घेतला ? याविषयी शासनाने संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक) श्री शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर देसाई यांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याची मागणी केली आणि घोषणाबाजी केली. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पोलीस आणि मंदिरातील महिला सुरक्षारक्षक यांनी देसाई यांना कह्यात घेतले अन् त्यांना पुन्हा पुण्याकडे पाठवून देण्यात आले.

खारघर (नवी मुंबई) येथे होणारी गोमांसाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्र शासनाकडे मागणी !

शासनाने गोमांसाची वाहतूक पूर्णपणे बंद होण्यासाठी 
स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
     मुंबई - खारघर (नवी मुंबई) येथे मोठ्या प्रमाणावर गोमांसाची वाहतूक होत आहे. ती पूर्णपणे बंद व्हावी, तसेच गोहत्या आणि गोमांस वाहतूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने रायगडचे पालकमंत्री श्री. प्रकाश मेहता यांच्याकडे केली आहे. या वेळी श्री. मेहता यांनी पुढील कारवाईसाठी निवेदन पाठवतो, असे आश्‍वासन दिले. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि कार्यकर्ते श्री. सतीश सोनार यांनी विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. मागील वर्षी भाजप-सेना युती शासनाने सत्तेवर येताच हिंदूंच्या धार्मिक भावनांची दखल घेत अनेक वर्षे प्रलंबित असलेला गोवंशहत्या बंदी कायदा राज्यात लागू केला. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यात युती शासनाने उल्लेखनीय पुढाकार घेतला; मात्र प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून अद्याप या कायद्याची कार्यवाही अत्यल्प होत असल्याने गोहत्या करणारे उद्दाम झाले आहेत.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना निलंबित करा ! - समस्त हिंदुत्ववाद्यांची मागणी

कोपरखैरणे आणि नालासोपारा येथे विविध 
हिंदुत्ववादी संघटनांद्वारे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
       मुंबई - गळ्यावर सुरी ठेवली, तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे देशद्रोही वक्तव्य एम्आयएम् पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. त्याच पक्षाचे भायखळा, मुंबई येथील आमदार वारिस पठाण यांनीही असेच वक्तव्य विधानसभेत केले. त्यामुळे आमदार पठाण यांना एकमताने निलंबित करण्यात आले होते; मात्र ओवैसी यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. ओवैसी यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना निलंबित करण्यात यावे, आतंकवादी इशरतजहाँ प्रकरणी सत्य माहिती दडवून चुकीची माहिती न्यायालयात देणारे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम्, काँग्रेसचे नेते आणि सीबीआयचे अधिकारी यांची न्यायालयीन देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी होऊन अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा केली जावी, तसेच श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी द्रौपदी या कादंबरीत विकृत लिखाण करणार्‍या डॉ. यारल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना घोषित झालेला पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, या मागण्यांसाठी १९ मार्च २०१६ या दिवशी कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे गुलाब सन्स डेअरीसमोर आणि नालासोपारा (प.) येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे सिविक सेंटरसमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषदेकडून उर्दू लेखकांना आर्थिक साहाय्य !

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची योजना
उर्दू लेखकांना त्यांचे पुस्तक शासन किंवा देश यांच्या विरोधात नसल्याचे सांगावे लागणार !
     नवी देहली - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्‍या राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषदेकडून उर्दू लेखकांना आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत एक आवेदनपत्र काढण्यात आले, ज्यात उर्दू लेखकांना प्रत्येक वर्षी त्यांचे पुस्तक शासन किंवा देशविरोधी नसल्याचे घोषित करावे लागणार आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार मागील काही मासांपासून अनेक लेखक आणि संपादक यांना अशा प्रकारचे आवेदनपत्र प्राप्त झाले आहे. ज्यात लेखकांच्या मतासह दोन साक्षीदारांच्या स्वाक्षर्‍याही आवश्यक करण्यात आल्या आहेत.

(म्हणे) योग वृद्ध आणि आळशी लोकांचा !

योग वृद्ध आणि आळशी लोकांचा असता, तर जगभरात त्याला मान्यता मिळाली असती का ?
कुस्तीपटू खलीकडून योगाची खिल्ली
     कुरुक्षेत्र - द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असलेल्या दिलीप सिंह राणाकडून योगाची खिल्ली उडवण्यात आली आहे. वयोवृद्ध आणि आळशी लोकच योग करतात, तर ज्यांच्या मनगटात शक्ती आहे, ते माझ्यासारखे फायटर बनतात, असे खलीने म्हटले आहे. पुढे त्याने सांगितले, जर कपालभाती केल्याने ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले असते, तर आपल्या देशात सुवर्णपदके जिकणार्‍यांची मोठी सूची निर्माण झाली असती; पण तसे काहीही झालेले नाही. योग वाईट आहे, असे मला म्हणायचे नाही, असेही खलीने पुढे सारवासारव करतांना म्हटले. (योग हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. योगामुळे कोट्यवधी लोकांचे विविध आजारांपासून रक्षण झाले आहे, तसेच त्यांना निरामय जीवन जगण्याचा आनंद मिळत आहे. - संपादक)

भारतातून चोरीला गेलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मूर्ती अमेरिकेत जप्त

मूर्तींच्या शोधासाठी भारत शासन आणि इंटरपोल यांचे साहाय्य
     नवी देहली - भारतामधून चोरीला गेलेल्या साडेचार लाख डॉलर, म्हणजे अनुमाने ३ कोटी १५ लाख रुपयांच्या २ मूर्ती क्रिस्टीझ या लिलाव करणार्‍या आस्थापनाकडून पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत. या मूर्ती ८ व्या आणि १० व्या शतकातील असाव्यात, अशी प्राथमिक माहिती आहे. या मूर्तींकरता भारत शासन आणि इंटरपोल यांच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध घेण्यात आला. क्रिस्टीझकडून या मूर्तींचा १५ मार्च या दिवशी लिलाव ठरला होता; मात्र त्यापूर्वीच या मूर्ती त्यांच्याकडून कह्यात घेण्यात आल्या. या दोन्ही मूर्ती चोरीच्या आणि अनधिकृत असल्याची आम्हाला माहिती नव्हती, असा दावा या आस्थापनाने केला आहे. यातील एक मूर्ती रिषंभता या पहिल्या जैन तीर्थंकाराची असून दुसरी सूर्यदेवाचे पुत्र रेवंता यांची आहे.

शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्याची रा.स्व. संघाची मागणी !

     नागौर (राजस्थान) - देशातील विश्‍वविद्यालयांत देशद्रोही कारवायात गुंतलेल्या विध्वंसक शक्तींना आळा घालण्याची मागणी करतांनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वांना समान संधी असणारे मूल्याधिष्ठित आणि राष्ट्र्रवादी विचारसरणीचे शिक्षण देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. संघाच्या सर्वोच्च निर्णय समिती अकाहिलं भारतीय प्रतिनिधी सभेची ३ दिवसीय बैठक ११ ते १३ मार्चपर्यंत पार पडली. या प्रतिनिधी सभेस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शैक्षणिक, वैद्यकीय आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांशी संबंधित दोन ठराव संमत करण्यात आले. ही दोन्ही क्षेत्रे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी खुली असली पाहिजेत, असेही या ठरावांत म्हटले आहे.

देशभरात १५ महाविद्यालये आणि ५९२ वसतीगृहे स्थापन करणार !

मुसलमान महिलांच्या शिक्षणासाठी केंद्रशासनाचा प्रयत्न
     नवी देहली - मुसलमान समाजातील महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी देशभरात १५ महाविद्यालये आणि ५९२ वसतीगृहे स्थापन करण्यासाठी केंद्रशासनाने संमती दिली आहे, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी एका प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात लोकसभेत दिली. ५९२ वसतीगृहांपैकी ७७ वसतीगृहे पूर्ण झाल्याचेही नक्वी यांनी या उत्तरात म्हटले आहे.

बिहारच्या शिक्षण खात्याकडून आमदारांना ३० लाख रुपयांच्या भेटवस्तू !

लोकशाहीला निरर्थक ठरवणारी घटना !
     पाटणा - बिहार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सदस्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. प्रतिवर्षी विविध शासकीय विभागांकडून अशा भेटवस्तू सदस्यांना भेट म्हणून दिल्या जातात. या वर्षी विधानसभेतील २४३ आणि विधान परिषदेतील ७५ सदस्यांना राज्याच्या शिक्षण विभागाकडून ३० लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम भेटवस्तूंवर व्यय करण्यात आली. प्रत्येक सदस्याला एक महागडी सूटकेस आणि ओव्हन भेट देण्यात आले. एका ओव्हनची किंमत ११ सहस्र २७५ रुपये एवढी होती.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

गोव्यातील गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीसह घुमटीचे समाजकंटकांकडून भंजन !

तोडफोड झालेली
श्री ब्रह्मादेवाची मूर्ती 
      केपे, २० मार्च (वार्ता.) - गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीचे शिर आणि हात तोडण्याचा, तसेच घुमटीच्या वरच्या भागाच्या भंजनाचा निषेधार्ह प्रकार १७ मार्चच्या रात्री घडला. १८ मार्चला सकाळी ग्रामस्थ घुमटीच्या ठिकाणी पूजनासाठी आले असता, हे भंजन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात गुढी येथील रहिवासी श्री. आनंद गावकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी श्‍वानपथकासह येऊन घटनास्थळी चौकशी केली आणि मूर्तीभंजनाची तक्रार नोंद करून पंचनामा केला. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यासाठी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५ आणि ४२७ खाली गुन्हा नोंद केला. यापूर्वी रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या घुमटीच्या शेजारील अर्पणपेटीतील पैसे चोरण्याचे प्रकार एक-दोन वेळा घडले होते; मात्र यासंदर्भात तक्रार न झाल्यामुळे या प्रकाराचा गाजावाजा झाला नाही. घुमटी आणि देवतेची मूर्ती यांवर आघात करणार्‍या समाजकंटकाला त्वरित पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इतकी प्रकरणे होईपर्यंत शासनाने कारवाई का नाही केली ?

      अनुमाने १७ अधिकोषांकडून घेतलेले ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेले राज्यसभेचे खासदार विजय मल्ल्या यांच्या विरोधात आणखी ५ प्रकरणांत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आली आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद न्यायालयाने विजय मल्ल्या आणि किंगफिशर एअरलाईन्सचे माजी अधिकारी रघुनाथन् यांच्या विरोधात ५० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याच्या प्रकरणी अजामीनपत्र वॉरंट काढले आहे. धनादेश न वटल्याच्या प्रकरणी जी.एम्.आर्. या आस्थापनेने मल्ल्या यांच्या विरोधात एकूण ११ तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. यातील एकूण ६ प्रकरणांत त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले होते.


मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करायच्या !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा आरोप
     नवी देहली - मुसलमानांमधील चालीरितींवर परखडपणे आसूड ओढणार्‍या प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करत होत्या, असा आरोप केला आहे. व्हॅटिकन चर्चने कथितपणे गरिबांची सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते तेरेसा गरिबीचे निर्मूलन करायचे नव्हते, तर त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. (तत्कालीन काँग्रेस शासनाने तेरेसा यांना गरिबांच्या सेवेसाठी कि धर्मांतरासाठी भारतरत्न दिले होते ? - संपादक)

राज्यात महिला आणि बालके यांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ

      नगर - राज्यातील महिला आणि बालके यांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी गुन्हे अन्वेषण विभागाकडून घोषित झाली आहे. त्यानुसार वर्ष २०१५ मध्ये ३० सहस्र ८४७ महिला आणि ११ सहस्र ६७६ बालके यांच्यावर अत्याचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. वर्ष २०१५ मध्ये महिलांविषयी ४ सहस्र १७६ बलात्काराचे गुन्हे, तर ४ सहस्र ८६८ अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. (यावरून राज्यातील महिला असुरक्षित आणि कायदा-सुव्यवस्था ढासळली जात आहे, असे म्हटल्यास वावगे काय ? - संपादक)

छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे देव, देश अन् धर्म यांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढणे, हे आपले धर्मकर्तव्यच ! - विजय चव्हाण

     कराड - हिंदवी स्वराज्यासाठी तसेच देव, देश अन् धर्म यांसाठी छत्रपती संभाजी महाराज शेवटच्या श्‍वासापर्यंत लढले. संभाजी महाराजांप्रमाणे आपणही देव, देश अन् धर्म यांसाठी लढले पाहिजे, हे आपले धर्मकर्तव्यच आहे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय चव्हाण यांनी केले.
     कराड येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमास पाळण्यात प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याजवळील शनिवार पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास श्रद्धांजलीचा दैनंदिन उपक्रम येेथील धर्माभिमानी करत आहेत. या उपक्रमामध्ये अखंड महिनाभर सायंकाळी सर्व मुले आणि मुली एकत्र येऊन संभाजी महाराजांची प्रतिमा समोर ठेवतात. त्यासमोर उभे राहून ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र, श्री संभाजीसूर्य दयमंत्र म्हणतात.

राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात भारतमातेचा जयजयकार करत मोर्चा !

भारतमातेचा जयजयकार करतांना युवक
       पुणे, २० मार्च (वार्ता.) - गेेले काही दिवस भारतमातेचा जयजयकार करणार नाही, असे उद्दाम वक्तव्य राष्ट्रद्रोह्यांनी केल्यानंतर वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील राष्ट्रभक्त युवकांनी २० मार्च या दिवशी एकत्रित येऊन भारतमाता की जय अशा घोषणा देत डेक्कन येथील चौपाटीपासून अलका चित्रपटगृहापर्यंत फेरी काढली. सर्वश्री सागर शिंदे, निखिल वाळिंबे, अमोल पवार यांनी फेसबूकवर भारतमाता की जय हा इव्हेंट सिद्ध करून उत्स्फूर्तपणे फेरी काढण्याचे ठरवले. त्याला समाजातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळजवळ ५० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. (देशभक्ती जागृत करण्यासाठी, तसेच प्रबोधनासाठी कृतीशील सहभाग नोंदवणार्‍या सर्वांचे अभिनंदन ! अशाच प्रकारे अन्यत्रचे युवक राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील झाले, तर राष्ट्रविरोधकांना चाप बसल्याविना रहाणार नाही. - संपादक)

उज्जैन सिंहस्थामध्ये आखाड्यातील साधू-संतांना गोपनीय संकेतांक !

     उज्जैन - सिंहस्थात येणार्‍या साधूंमधून खरे आणि खोटे साधू ओळखण्यासाठी त्यांना गोपनीय संकेतांक देण्यात येणार आहे. आखाड्यांकडून यासाठी संकेतांक बनवण्यात येणार आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आखाड्यांकडूनच ही व्यवस्था करण्यात आली आहे. सिंहस्थासाठी १३ आखाड्यांनी येथे त्यांचे शिबीर स्थापन केले आहे. यात सहस्रो साधू येतात. म्हणून त्यांच्यासाठी संकेतांक देण्यात येणार आहे. ३६५ प्रकारचे सांकेतांक बनवण्यात आले आहेत. हे संकेतांक गुरूंकडून त्यांच्या शिष्यांना सांगितले जातात. आखाड्यात पहिल्यांदा साधू-संत येतात तेव्हा येथील साधू-संत त्यांच्याशी सांकेतिक भाषेतच बोलतात. त्यांना दोन-तीन प्रश्‍न विचारले जातात. त्याची उत्तरे संकेतांकामध्ये दिल्यावरच त्यांना प्रवेश दिला जातो.

उज्जैन सिंहस्थाच्या पहिल्या पेशवाईचे स्वागत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान करणार

     उज्जैन - येथील सिंहस्थच्या पहिल्या पेशवाईचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान करणार आहेत. याच दिवशी अखाडा परिषदही मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहे. जुना अखाड्याकडून २७ मार्चला नीलगंगा येथून पेशवाई काढण्यात येईल.

समलैंगिक संबंधाच्या वक्तव्यावरून संघाची कोलांटीउडी !

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी समलैंगिक संबंधाच्या वक्तव्यावर कोलांटीउडी मारली आहे. होसाबळे यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिकता ही सामाजिक अनैतिकता असून त्याच्यावर मानसिकदृष्ट्या उपचार करणे आवश्यक आहे.
    गुरुवारी इंडिया टुडेच्या परिसंवादात दत्तात्रेय होसाबळे यांनी समलैंगिक संबंधांवर मत व्यक्त केले होते. यापूर्वी होसाबळे यांनी म्हटले होते की, दुसर्‍याच्या आयुष्यावर परिणाम होत नसेल तोपर्यंत समलैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही. लैंगिक पसंती हा प्रत्येकाचा खाजगी विषय आहे.

रामनगर (कर्नाटक) येथील धर्माभिमानी आणि सनातन प्रभातचे वाचक विलास नाईक यांचा सत्कार

श्री. विलास नाईक (डावीकडे) यांना भेटवस्तू
देतांना पू. शंकर गुंजेकर
   रामनगर (कर्नाटक) - येथील धर्माभिमानी आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. विलास चंदू नाईक यांची नुकतीच सनातनचे पू. शंकर गुंजेकर यांनी भेट घेऊन त्यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली. 
सनातन संस्थेला माझा पाठिंबा होता 
आणि पुढेही रहाणार ! - विलास नाईक
     या वेळी सनातनच्या कार्याविषयी श्री. विलास नाईक म्हणाले, सनातन संस्थेविषयी मला अभिमान आहे. सनातन संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. संस्थेला माझा यापूर्वीही पाठिंबा होता आणि पुढेही रहाणार. जो हिंदु धर्माला विरोध करतो, त्याला मीही विरोध करणार. माझ्या वडिलांप्रमाणे मलाही धर्माविषयी अभिमान आहे. माझ्या वडिलांनी वर्ष १९६४ मध्ये देहलीच्या लाल किल्ल्यासमोर उपोषण केले होते.

संगमनेर (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहांवरील धाड सत्र थांबवण्यासाठी माझ्यावर दबावाचा प्रयत्न झाला !

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची स्वीकृती
जिल्हा पोलीस अधीक्षकांवर जर दबाव टाकला जात असेल, तर जिल्ह्यामधील 
कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बिघडलेली आहे, हेच यावरून दिसून येते.
      संगमनेर - गोवंश हत्या रोखण्यासाठी शहरातील पशूवधगृहांवर धाड सत्र चालू करण्यात आले. त्यानंतर ती कारवाई होऊ नये, म्हणून माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची स्वीकृती नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी दिली. (जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही स्वीकृती देण्यासमवेत असा दबाव टाकणार्‍यांचीही नावे जाहीर करावीत. त्यांनी एवढ्यावरच न थांबता आपल्या अधिकारांचा वापर करून कठोर कारवाईही करावी, ही अपेक्षा ! - संपादक) माझ्यावर कितीही दबाव आला, तरी पशूवधगृहांवर कारवाई होणारच आणि याहीपेक्षा अधिक कडक कारवाई होणार, असेही त्यांनी सांगितले. (गोवंश रक्षणासाठी कठोर भूमिका घेणार्‍या पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांचे अभिनंदन ! गोवंश रक्षणासाठी अशी भूमिका सर्वत्रच्या पोलिसांनी घ्यावी, ही अपेक्षा ! - संपादक) संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वार्षिक पडताळणीसाठी डॉ. त्रिपाठी आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महालिंगेश्‍वर मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेतील मुसलमान जिल्हाधिकार्‍याच्या नावाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

      बेंगळुरू - विश्‍व हिंदू परिषदेचे नेते नवीन कुलाल यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत मुसलमान जिल्हाधिकारी ए.बी. इम्राहिम यांचे नाव असल्याचा विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याविषयी न्यायालयाने कर्नाटक शासनाला माहिती देण्यास सांगितले आहे. २१ मार्चला यावर पुढील सुनावणी होणार आहे. या दिवशी भक्तांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी मंदिरात सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे.
     यासंदर्भात भाविकांनी येथे आंदोलनही केले. निमंत्रणपत्रिका पुनः मुद्रित केलीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे अन्यथा दक्षिण कन्नड जिल्हा बंद पुकारण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.

विहिंप-बजरंग दल यांच्या वतीने ओवैसींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

खासदार ओवैसी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास
चपलांचा हार घालतांना विहिंप-बजरंग दल यांचे कार्यकर्ते
      ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २० मार्च (वार्ता.) - भारतमाता की जय, असे म्हणण्यास नकार देणार्‍या एम्आयएम् या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने दोघांचे पुतळे जाळण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष सपाटे, श्री. संजय पिस्तुले, शहरप्रमुख श्री. गुलाब पवार, विहिंप जिल्हासहमंत्री श्री. सुभाष शिंगण, सर्वश्री अनिल वाळवेकर, सतीश महाडिक, अनिकेत सूर्यवंशी, प्रताप मोरे, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जमशेदपूर (झारखंड) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाईची मागणी !

आतंकवादी इशरतजहाँ प्रकरण 
आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदू !
       जमशेदपूर (झारखंड), २० मार्च (वार्ता.) - आतंकवादी इशरतजहाँला राजकीय लाभासाठी हुतात्मा ठरवून या प्रकरणी देशभक्त पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात डांबण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासह काँग्रेसचे नेते, तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी यांची न्यायालयीन देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी द्रौपदी या कादंबरीत विकृत लिखाण करणार्‍या डॉ. यारल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना घोषित पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, या मागण्यांसाठी येथील शीतलामाता मंदिराच्या प्रांगणात २० मार्चला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

दक्षिण सुदानमध्ये सैनिकांकडून एका वर्षात १ सहस्र ३०० महिलांवर बलात्कार !

भारतातील धर्मनिरपेक्षतावाद्यांनी दक्षिण सुदानमध्ये जाऊन यावे, 
म्हणजे त्यांना असहिष्णुता कशाला म्हणतात, हे कळेल !
दक्षिण सुदानमध्ये गृहयुद्ध
    जुबा (दक्षिण सुदान) - वर्ष २०१३ पासून दक्षिण सुदान या देशामध्ये गृहयुद्ध चालू आहे. या युद्धात लढणार्‍या सैनिकांना वेतन म्हणून महिलांशी बलात्कार करण्याची मुभा देण्यात येते, असे संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे. 
१. या अहवालानुसार दक्षिण सुदानच्या युनिटी राज्यात मागील वर्षी १ सहस्र ३०० महिलांवर बलात्कार करण्यात आले. 
२. शासनाने सैन्याशी एक करार केला आहे. या करारानुसार सैनिकांना जे करायचे आहे, ते त्यांनी करावे, त्यांना जे घेऊन जायचे आहे ते घेऊन जावे, अशी संपूर्ण सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हे सैनिक मुली आणि महिला यांना पळवून नेतात, तसेच ते सामान्य नागरिकांची संपत्तीही हडप करतात. (भारतीय सैन्यावर बलात्काराचा आरोप करणारे साम्यवाद्यांनी सुदानमध्ये काय चालते ते पहायला पाहिजे ! - संपादक)

इस्लामी राष्ट्रे एकत्र येऊन संयुक्त सेना स्थापणार !

सौदी अरेबियाचा पुढाकार आतंकवादाशी दोन हात करणार
     रियाध (सौदी अरेबिया) - आतंकवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौदी अरेबियाकडून नाटोच्या धर्तीवर इस्लामी राष्ट्रांची संयुक्त सेना सिद्ध करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे. या प्रस्तावातील माहितीनुसार ही सेना कुठल्याही विशिष्ट देशाच्या विरोधात नसून आतंकवाद आणि इसिससारख्या संघटनांच्या कारवायांविरूद्ध लढण्यासाठी निर्माण केली जाईल. या विषयाच्या अभ्यासासाठी उत्तर सौदी अरेबियामध्ये २१ राष्ट्रांच्या सेना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये त्यांना आक्रमणांच्या वेळी प्रतिकार करण्याच्या पद्धती शिकवून आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले.

पॅरिस आक्रमणाचा सूत्रधार सलाह अब्देसलाम याला अटक

     ब्रुसेल्स - १३ नोव्हेंबर २०१५ या दिवशी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार सलाह अब्देसलाम याच्यासह पाच जणांना बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सपासून जवळच असलेल्या मोलेनबीक भागात पोलिसांनी अटक केली. 
    या वेळी गोळीबारही झाला; मात्र यात कोणीही घायाळ झालेले नाही. सलाहच्या हाताच्या ठशांवरून त्याला ओळखण्यात आले. पॅरिसमध्ये आतंकवाद्यांनी सहा ठिकाणी आत्मघाती आक्रमणे आणि बेछूट गोळीबार केला होता. यात १२८ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. दोनशेहून अधिक जण घायाळ झाले होते. इसिसने या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले होते.

महाराष्ट्रावर ३ लाख ३३ सहस्र कोटी रुपयांचे ऋण

राज्यावर इतके ऋण असतांना ते फेडण्यासाठी स्वतः त्याग आणि काटकसर 
करून जनतेला तसे करण्यास सांगणारे राज्यकर्ते हवेत !
     मुंबई - महाराष्ट्र राज्यावर फेब्रुवारी २०१६ अखेर ३ लाख ३३ सहस्र कोटी रुपयांचे ऋण आहे. या ऋणाचे प्रमाण राज्याच्या उत्पन्नाच्या १६.९२ टक्के आहे. ही माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात मांडलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षातील राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आली आहे.असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! - हिंदुत्ववाद्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

      कोल्हापूर - भारतमाता की जय म्हणणार नाही, असे विधान करणारे एम्.आय्.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप देशपांडे यांना देण्यात आले. श्री. देशपांडे यांनी हे निवेदन वरिष्ठांकडे पाठवतो, असे सांगितले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे सर्वश्री किशोर घाटगे, शशी बीडकर, यश जुन्नरकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, युवा सेनेचे श्री. रणजित आयरेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे उपस्थित होते. (देशद्रोही विधान करणार्‍या खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार्‍या सर्व हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

कायदा हातात घेऊन हिंसाचार करणे, ही सहिष्णुता आहे का ?
      मेरठमधील मवनामध्ये समाजवादी पक्षाच्या जाहिद नावाच्या नगरसेवकाच्या हत्येनंतर धर्मांधांनी पोलीस अधीक्षकाच्या गाडीसह १२ हून अधिक गाड्या जाळल्या, तसेच हिंदूंची दुकाने लुटली. त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Meerat ke Mavana me SP neta ki hatya ke bad dharmandhone Hinduonke makan aur dukanonko nishana banaya.
kya kanoon hat me lena yahi sahishnuta hai ?
जागो ! : मेरठ के मवाना में सपा नेता की हत्या के बाद धर्मांधोने हिंदूआेंके मकान और दुकानों को निशाना बनाया.
क्या कानून हात में लेना यही सहिष्णुता है ?

जालना येथे १२ वीच्या उत्तरपत्रिका अवैधरित्या पुनर्लेखन करणारी टोळी पोलिसांच्या कह्यात

      जालना, २० मार्च - इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका अवैधरित्या वसतिगृहात आणून त्या पुन्हा विद्यार्थ्यांकडून लिहून घेणार्‍या टोळीला जालना पोलिसांनी पकडले आहे. येथील मातोश्री लॉन्सशेजारील संस्कार निवासी वसतिगृहात ही टोळी १८ मार्च या दिवशी पकडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी वसतिगृह व्यवस्थापक, एक परीक्षक आणि ५० विद्यार्थी यांना अटक केली असून २ सहस्र ५०० उत्तरपत्रिकाही शासनाधीन केल्या आहेत. (या प्रकरणी पोलिसांनी पाळेमुळे खोदून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. राज्य शासनानेही तातडीने परीक्षा व्यवस्था आणि उत्तरपत्रिका पडताळणी यांविषयीची योग्य ती सुरक्षा व्यवस्था अन् उपाययोजना करायला हवी ! - संपादक)

खोट्या फेसबूक खात्याद्वारे महिलांना अश्‍लील संदेश : शिरोडा (सिंधुदुर्ग) येथील महिलांनी काढली तरुणाची धिंड

पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे महिलांना कृती करावी लागणे, ही पोलिसांसाठी नामुष्की ! 
महिलांनो, थातुरमातुर कारणे देऊन कृती करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिसांच्या 
विरोधातही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा !
     वेंगुर्ले - खोट्या फेसबूक खाते उघडून महिलांना अश्‍लील संदेश पाठवणार्‍या आरवली, शिरोडा परिसरातील एका संशयित युवकाला महिलांनी चोप देऊन गळ्यात चपलांचा हार घालून शिरोडा बाजारपेठेतून धिंड काढली.
    आरवली येथील एका तरुणाने एका महिलेच्या नावे फेसबूक खाते उघडून गेले काही दिवस अश्‍लील संदेश पाठवून चॅटिंग चालू केले होते. या प्रकरणी त्याचा एक सहकारीही त्याच्या सोबत होता. असे प्रकार अन्य काही महिलांसमवेत झाल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलांनी एकत्र येत दोन दिवसांपूर्वी वेंगुर्ले पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मात्र हा सायबर गुन्हा असल्याने आणि यासंदर्भातील सक्षम यंत्रणा नसल्याने गुन्हा दाखल करण्याबाबत असमर्थता दर्शवली. त्यामुळे १७ मार्चला सायंकाळी संबंधित महिलांनी एकत्र येत तरुणाचे घर गाठले आणि त्याला चोप दिला. त्याच अवस्थेत त्याची आरवली ते शिरोडा अशी वाजत गाजत धिंड काढली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.

गोव्यातील १२३ शासकीय कर्मचार्‍यांनी सामाजिक सुरक्षा योजनेचे अनुदान उकळले !

  • या भ्रष्ट कर्मचार्‍यांवर शासनाने यापूर्वीच कारवाई करणे अपेक्षित होते !
  • आतातरी शासनाने त्यांना कायमचे निलंबित करून कठोर शिक्षा करावी ! 
     पर्वरी, २० मार्च (वार्ता.) - वर्ष २०१२ पासून एकूण १२३ शासकीय कर्मचार्‍यांनी बनावट कागदपत्रे सादर करून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली अनुदान उकळले आहे. समाजकल्याण खात्याचे मंत्री महादेव नाईक यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिल्यानंतर हे उघड झाले आहे.
भ्रष्ट कर्मचार्‍यांकडून पैसे सव्याज वसूल करणार ! - मंत्री महादेव नाईक
     खरे तर ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि विकलांग यांसाठी या योजनेद्वारे अनुदान दिले जाते; मात्र या योजनेचा निधी शासकीय अधिकार्‍यांनी बनावट कागदपत्रे सादर करून लाटला आहे. अनुदान लाटणार्‍यांमध्ये काही महिला कर्मचारीही आहेत. एका कर्मचार्‍याने आतापर्यंत १ लक्ष २० सहस्र रुपये अनुदान घेतले आहे. अन्य एका कर्मचार्‍याने १ लक्ष १० सहस्र रुपये अनुदान लाटले आहे. अनेकांनी लाटलेली रक्कम २ सहस्र रुपये एवढी आहे. या कर्मचार्‍यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे, तसेच कारवाई करण्यासाठी या सर्वांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या सर्वांकडून या अनुदानाचे पैसे ८ टक्के व्याजासहित परत घेतले जाणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण मंत्र्यांनी दिली.

तासगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू ! - नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील

      तासगाव (जिल्हा सांगली), २० मार्च (वार्ता.) - तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्‍वासन नगराध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील यांनी दिले. येथील चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या पटांगणावर ही सभा होत आहे, त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सिद्धेश्‍वर लांब, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण पोळ, राहुल कदम, तसेच अन्य उपस्थित होते. भाजपच्या अन्य नगरसेवकांनीही सभेसाठी सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
गावांमधून सभेच्या प्रचारासाठी वाढता प्रतिसाद !
        या सभेसाठी तासगाव तालुक्यातील जुनी डोर्ले, कवठेएकंद, येळावी यांसह ३० हून अधिक गावांत सभेच्या निमित्ताने प्रचार चालू असून सभेच्या निमित्ताने नागरिकांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. गावांमध्ये होत असलेल्या बैठकांना ५० ते १०० हिंदूंची उपस्थित लाभत आहे. सभेच्या निमित्ताने युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.

दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणे बंधनकारक ! - विनोद तावडे

१८ मार्च या दिवशीची विधानसभा प्रश्‍नोत्तरे...
        मुंबई, २० मार्च (विशेष प्रतिनिधी) - शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. जळगाव जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केल्याविषयीचा प्रश्‍न सदस्य उमेश पाटील, प्रशांत ठाकूर, हरीभाऊ जावळे, सौ. मेधा कुलकर्णी यांनी विचारला होता. श्री. तावडे पुढे म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटांतील मुलांच्या शिक्षणाचे दायित्व शालेय शिक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण विभागाकडे नाही. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विनामूल्य शिक्षणांतर्गत निधी शाळेपर्यंत नेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण शुल्क किती घ्यावे, या संदर्भात शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. ज्या शाळांच्या प्राथमिक तपासणीत त्रुटी आढळल्या आहेत, त्या शाळांकडून त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे.

स्त्रियांची गर्भगृह किंवा शनिचौथर्‍यावरील प्रवेशाची मागणी असहिष्णु आणि अहंकारी !

      सध्या अनेक वृत्तवाहिन्यांवर महिलांना सर्वच धर्मांनी अन्याय्य वागणूक दिल्याचे सूत्र घेऊन चर्चासत्रे होत आहेत. शनिशिंगणापूर येथे महिलांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश देणे, महिला पुजारी नेमणे, हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देणे या सूत्रांवरून ही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यात महिलांना अनादि काळापासून समानतेची वागणूक मिळाली नाही, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांची गळचेपी झाली, आदी आरोप करण्यात आले. हे आरोप आणि चर्चा पुढील कारणांसाठी चुकीच्या आहेत. १९ मार्च या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुन्हा शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न केला. अन्य भाविकांनी सतर्क राहून त्यांना रोखले; मात्र त्यामुळेच या पुढील कारणांविषयी चर्चा करणे अगत्याचे ठरले आहे. 

विरोधकांना दायित्वाचे भान आहे का ?

     अधिवेशन म्हटले म्हणजे लोकप्रतिनिधींचा गोंधळ, अशी व्याख्याच झाली आहे. जे काम चर्चेने होऊ शकते, ते गोंधळाने कदापि शक्य नाही, हे ज्ञात असूनही गोंधळ घालून प्रसिद्धीची हौस भागवण्यात समाधान मानणे लांच्छनास्पद आहे. देशात काँग्रेस बराच काळ केंद्रस्थानी सत्तेत होती आणि त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी संसदेत अभ्यासपूर्ण सूत्रे मांडत असत. दुर्दैवाने आजच्या केंद्रातील विरोधकांच्या भात्यात अटलजींप्रमाणे आक्रमक, अभ्यासूपणे सूत्रे मांडणारा एकही लोकप्रतिनिधी नाही. ही विरोधकांसाठी चिंतेची, चिंतनीय गोष्ट आहे; पण त्याचे त्यांना काहीही सुवेरसुतक नाही. बेंबीच्या देठापासून ओरडत संपूर्ण ताकदीनिशी घालता येईल, तेवढा गोंधळ ते घालत असतात.

भारतमाता की जय !

कु. मधुरा गद्रे
१. ओवैसी आणि कन्हैया यांच्यातील साम्य !
     सध्या देशात देशविरोधी कृती करण्याची एक टूम निघाली आहे कि काय ? असाच प्रश्‍न पडला आहे. कुणी भारताविरुद्ध घोषणाबाजी करतो, तर कुणी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे म्हणत भाषणबाजी करतो. यात सध्या प्रामुख्याने पुढे आहेत ते खासदार असदुद्दीन ओवैसी आणि कन्हैया कुमार हे दोघे ! या दोघांमध्ये साम्य एकच पराकोटीचा राष्ट्रद्वेष !
     कन्हैया कुमार एक विद्यार्थी आहे. त्याला योग्य दिशा नाही; म्हणून तो असे वागत आहे, असे म्हणून त्याने केलेल्या चुकांचे खापर त्याच्या शिक्षकांच्या माथी मारायचे, तर तेही तशाच विचारसरणीचे. मग अशा विद्यालयांतून कसे विद्यार्थी निपजणार, हे सांगायलाच नको. अशांवर कारवाईची मागणी करावी, तर जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे काही आमदार आणि खासदारही आता तसलेच निघाले. तेच भारतमाता की जय म्हणणार नाही म्हणतात, तर राष्ट्राभिमानी जनतेने दाद मागावी तरी कुणाकडे ?

हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांकडून अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमणाचा प्रयत्न !

      भैंसा (तेलंगण) - एम्आयएम्चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी येथे एका सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्या वेळी हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त सिसायत या हिंदी वृत्तसंकेतस्थळाने प्रकाशित केले आहे. या वेळी ओवैसींचे समर्थक आणि हिंदू वाहिनीचे कार्यकर्ते यांच्यात दगडफेक झाली. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या हिंसाचारात ४ जण घायाळ झाले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी काही कारणे !

१. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने वर्ष १९३१ मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता; परंतु गांधींच्या हट्टामुळे भारताचा ध्वज तिरंगी केला गेला.
२. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने काँग्रेसचे अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते; पण गांधींचे समर्थन पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाषबाबूंना नेहमी होणार्‍या विरोधामुळे, तसेच गांधींच्या असहयोगामुळे सुभाषबाबूंनी त्यागपत्र दिले. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का ?

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सर्वश्री संदीप सकपाळ, सागर म्हात्रे आणि सिद्धेश पुजारी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

(बसलेले) पू. राजेंद्र शिंदे, डावीकडून (उभे असलेले) श्री. सिद्धेश पुजारी, 
श्री. सागर म्हात्रे आणि श्री. संदीप सकपाळ
श्रीकृष्णाने उलगडले देवद आश्रमात एक गुपित ।
३ साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करूनी केले सर्वांना चकित ।
आनंदाची उधळण झाली सर्वांवरती ।
सर्वांची होवो उन्नती, हीच प्रार्थना साधक करिती ॥
      देवद (पनवेल) - येथील सनातनच्या आश्रमातील नियतकालिके लेखासंबंधित सेवा करणारे श्री. संदीप सकपाळ (वय ३६ वर्षे), बांधकामाची सेवा करणारे श्री. सिद्धेश पुजारी (वय २६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांनी १९ मार्च या दिवशी एका अनौपचारिक कार्यक्रमात केली. तसेच साधनेत काही कारणांमुळे दोन पावले मागे आलेले श्री. सागर म्हात्रे (वय ३३ वर्षे) यांनीही पुन्हा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे या वेळी घोषित करण्यात आले. श्रीकृष्णाने दिलेल्या या आनंदवार्तेने उपस्थित साधकांची भावजागृती झाली. या वेळी श्री. सागर म्हात्रे यांचे आई-वडील आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. हेमंत म्हात्रे आणि सौ. वीणा म्हात्रे, तसेच श्री. सिद्धेश पुजारी यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी पुजारी आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. वर्षा (वय दीड वर्षे) उपस्थित होती.

साधक कारागृहातून सुटून आल्यावर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेले भव्य स्वागत !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या साधकांचे जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । 
आणि हर हर महादेवच्या जयघोषात स्वागत करतांना आश्रमातील साधक
   वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाल्यावर तेथील साधकांना जाणवलेली सूत्रे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

गुढीपाडवा विशेषांक (रंगीत)

साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक
वर्ष अठरावे : अंक क्र. : २० (३१ मार्च ते ६ एप्रिल २०१६)
  • गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती 
  • गुढी उभारण्याची पद्धत आणि गुढी पूजाविधी 
  • गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा आणि प्रार्थना
  • गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या
  • अन्य वाचनीय लिखाण.....
आपली मागणी आजच करा
वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी सोमवार, २२ जानेवारी २०१६ 
या रात्री ८ वाजेपर्यंत ईआरपी प्रणालीत भरावी.


साधनेसंबंधी जिज्ञासा असलेले आणि सतत सेवारत असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाबूलाल चौधरी !

श्री. बाबूलाल चौधरी
१. साधनेसंबंधी जिज्ञासा : आम्ही शिमगोत्सवात फोंड्याला रथयात्रा बघण्यासाठी गेलो होतो. तेव्हा श्री. बाबूलालही इतरांसमवेत आले होते. आमची साधनेविषयी चर्चा चालू असतांना बाबूलालही ती ऐकत होते. त्यांच्यासमवेत जे आले होते, त्यांना ते विसरले आणि आमची साधनेसंबंधीची सूत्रे त्यांनी शेवटपर्यंत ऐकली. एक कामगार असून त्यांची उत्सुकता आणि साधनेतील गोडी उल्लेखनीय होती. तेव्हा लक्षात आले, आपल्यापेक्षाही त्यांचे वागणे प्रशंसनीय आहे.
२. सतत सेवारत असणे : त्यांना दिलेल्या कामात ते कधीच कुचराई करत नाहीत आणि त्यांची ती स्थिती कायम असते. आश्रमात इतरत्र त्यांचे लक्ष नसते. ते त्यांच्या सेवेतच सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त असतात.
३. ते तन, मन आणि धन अर्पण करत असावेत, असे मला जाणवले.

महर्षींनी दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाच्या संदर्भात चालू असणार्‍या प्रकरणात सनातनवर गंभीर आरोप करणार्‍यांपासून रक्षण होण्यासाठी आणि न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगणे अन् विजय आपलाच असल्याचे सांगून साधकांना आधार देणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
चेन्नई येथे रामनाथी आश्रमातून परम गुरुजींचा संदेश घेऊन एक साधक 
आला आहे, तो संदेश काय आहे, हे पहाण्यासाठी तू तेथे जा ! आणि 
संदेश ऐकून त्यावर आध्यात्मिक उपाय करून सर्व साधकांना निर्धास्त 
कर !, असा आदेश महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना अंतर्मनातून देणे
       २०.२.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमातून सनातनचे साधक श्री. चेतन राजहंस धर्माभिन्यांच्या बैठकीसाठी चेन्नईला आले होते. कर्मधर्मसंयोगाने महर्षींनी त्याच दिवशी तंजावुर येथून निघून आम्हाला रात्रीपर्यंत चेन्नई येथे पोहोचण्यास सांगितले. तेथे श्री. चेतन यांच्याशी आमची भेट झाली. चर्चा करतांना श्री. चेतन यांच्याकडून कळले, सनातनच्या आश्रमांवर धाडी घालून पोलीस अकारण साधकांना त्रास देत आहेत. तसेच दोन साधकांना ब्रेनमॅपिंग चाचणीसाठीही बोलावले आहे. एका साधिकेलाही चौकशीसाठी पुणे येथे बोलावले आहे. परिस्थिती गंभीर आहे. आपल्यावर कधीही कोणताही आरोप ठेवून फसवले जाऊ शकते. अशी चर्चा चालू असतांना अचानक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा श्री. विनायक शानभाग यांना भ्रमणभाष आला. ते म्हणाले, महर्षि मला सांगत आहेत की, कार्तिकपुत्रीच्या (पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्या) येथे जा ! तेथे परम गुरुजींकडून काहीतरी संदेश घेऊन एक साधक आला आहे. यावर आपल्याला उपाय सांगून सर्व साधकांना निर्धास्त करायचे आहे.

जसा ज्याचा भाव (भाग्य), तसे त्याला फळ मिळते !

श्री. प्रकाश मराठे
     जगात कोट्यवधी माणसे आहेत. पशू, पक्षी आहेत. जलचर प्राणी आहेत. प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतात. मी प.पू. डॉक्टरांना हे सर्व जण देवाला प्रार्थना करून देवाकडेे सारखे मागणे मागत असतात, तर अशा वेळी देव काय करतो ?, असा माझ्या मनात आलेला प्रश्‍न विचारला. त्या वेळी त्यांनी सांगितले, देव काही करत नाही, तर निसर्गाची अशी यंत्रणा आहे की, ज्याचा जसा भाव (भाग्य) असेल, त्याप्रमाणे त्याला फळ मिळते. 
- श्री. प्रकाश रा. मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०१६)

कालीमातेला मांसाचा नैवेद्य.... अयोग्यच ! हा लेख वाचल्यावर भक्तीभावाने अर्पण केलेल्या पेढ्यांचा नैवेद्य कालीमाता स्वीकारते, या संदर्भात बालपणी आलेल्या अनुभूतीचे झालेले स्मरण

         पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे कालीमातेला मांसाचा नैवेद्य...... अयोग्यच ! हा लेख दै. सनातन प्रभात, रविवार (२७.१२.२०१५) पृष्ठ क्र. ६) मध्ये आला होता. तो वाचल्यावर श्री कालीमातेने एका जुन्या अनुभवाची आठवण करून दिली. तो पुढे देत आहे.
पू. विजयालक्ष्मी काळेआजी
१. पहाटेपासून कालीभक्तांचे आवाज आणि बोकडांचे केविलवाणे सूर ऐकू येणे अन् दाराच्या फटीतून डोकावल्यावर कालीमातेचे अनेक भक्तगण आपापल्या बोकड पशूबळीचा उजवा कान कापून त्याला देवीच्या मंदिरातून घेऊन येत असल्याचे दिसणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला माझ्या आई-वडिलांसमवेत वर्ष १९४६ च्या साधारण ऑगस्ट मासात कोलकाता येथील श्री कालीमातेच्या दर्शनाचा योग आला. काली घाटावरील श्री कालीमातेच्या देवळाजवळील एका धर्मशाळेत आम्ही रात्री राहिलो होतो. पहाटे ४ च्या आधीपासूनच बाहेरील कालीभक्तांचे आवाज आणि बोकडांचे केविलवाणे सूर ऐकू येऊ लागले. दाराच्या फटीतून पाहिल्यावर असे दिसले की, कालीमातेचे अनेक भक्तगण आपापल्या बोकड पशूबळीचा उजवा कान कापून त्याला देवीच्या मंदिरातून घेऊन येत होते. कापलेल्या कानातून गळणारे ताजे रक्त श्री कालीमातेचा प्रसाद (गंध) म्हणून डोक्यापासून हातापर्यंत भस्माचे पट्टे ओढल्याप्रमाणे लावून घेऊन कृतकृत्य झाल्याचा आनंद व्यक्त करत होते. अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्ध स्त्री-पुरुष सगळेच कालीमातेचा जयघोष करत होते. ते दृश्य अंगावर शहारे आणत होते.

ईश्‍वर लिखाण करवून घेत असल्याच्या संदर्भात ईश्‍वरच आपल्याला चालवत आहे, याची आनंददायी अनुभूती येणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
        सध्या ईश्‍वराने सुचवण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.
१. ईश्‍वराशी अनुसंधानात असतांना ईश्‍वर ग्रंथाच्या चालू असलेल्या एखाद्या विषयावर किंवा आलेल्या अनुभवावर लिहायला सुचवतो. तेव्हा तो लिखाणाचा विषय बीजरूपात सांगतो. (ईश्‍वर काटकसरी आहे.) त्या वेळी अचानकच तो विषय मनात आलेला असतो. यावरून तो ईश्‍वराने सुचवला आहे, हे लक्षात येते.
२. काही वेळा ईश्‍वरच मनात प्रश्‍न निर्माण करतो आणि तोच उत्तरही देतो. त्यामुळे त्या विषयाचे आकलन होते.
३. ईश्‍वराने सुचवलेल्या एखाद्या विषयावर लिहायला आरंभ केला आणि त्याविषयी त्याला आणखी काही सुचवायचे असेल, तर विषय कसा मांडायचा ?, हे सुचत नाही. त्यानंतर काही कालावधीने त्याने आणखी पुढचे सुचवल्यावर लिहिण्याची स्फूर्ती येते. तोपर्यंत नाही.

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल येथील कु. श्रावण रिसबूड (वय ८ वर्षे) !

१. सुट्टीत गोव्याला गेल्यावरही समुद्रावर न जाता 
आश्रमात जाऊन सेवा करणार असल्याचे सांगणारा कु. श्रावण !
कु. श्रावण रिसबूड
      श्रावणने सुट्टी लागल्यावर मी आश्रमात सेवा करण्यास येऊ का ?, असे विचारले. त्याला तेथून येतांना त्याच्या आईने सांगितले होते, तुला आता कुणीही समुद्रावर नेणार नाही. तुला केवळ आश्रमातच जावे लागेल. तेव्हा तो म्हणाला, मी आश्रमातच जाईन आणि सेवा करीन.
२. आश्रमातील वातावरणात रमणे
       आम्ही देवदला असतांना तो आश्रमात येऊन सेवा करत असे. येथे आल्यावरही तो रामनाथी आश्रमात पटकन रमला आणि मुलांसमवेत सेवाही करू लागला.

स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जायला लागल्यापासून व्याधी जलद गतीने बर्‍या होणे आणि या वर्गाच्या माध्यमातून प.पू. डॉक्टर चैतन्य देत असल्याचे लक्षात येणे

        गेल्या दोन मासांमध्ये (महिन्यांमध्ये) डोळे आणि पाय यांसंदर्भातील व्याधी झाल्या होत्या. या व्याधी बर्‍या होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत होता. व्याधी पूर्ण बर्‍या झालेल्या नसतांनाच मी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाला जाऊ लागलो. परिणामी असे लक्षात आले की, या व्याधी पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने बर्‍या झाल्या. मरगळ निघून गेली. स्वभावदोष आणि अहं यांविषयी लिखाण करण्यास साहाय्य झाले. वर्गानंतर उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वर्गाच्या माध्यमातून प.पू. गुरुमाऊली चैतन्य देत असल्याचेही लक्षात आले. यातून प.पू. गुरुमाऊलीने प्रशिक्षणवर्गाला नियमितपणे जाण्यास सांगण्यामागची कारणमीमांसा काही प्रमाणात लक्षात आली. - श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०१६)

उतारवयातही स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या पुणे येथील पू. विजयालक्ष्मी काळेआजी !

१. आजी सतत आनंदावस्थेत, स्थिर आणि शांत असते.
२. ती प्रत्येक कृती चिकाटीने आणि सातत्य ठेवून करते.
३. सेवेची तळमळ
      वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते. नामपट्ट्यांचे छत बनवणे, घरी सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, अशा सेवा ती तळमळीने करते. घराजवळ सत्संग चालू व्हावा, यासाठी तिने तळमळीने प्रयत्न केले.
४. साधनेचा आढावा प्रांजळपणे देणे
       आजी आढावा देतांना सतत तिचे दोष सांगून आणि योग्य कृती विचारून घ्यायची अन् तळमळीने प्रयत्न करायची. तिची तळमळ बघून मला पुष्कळ उत्साह वाटायचा. आदर्श आढावा कसा द्यायचा ?, हे मला आजीकडून शिकायला मिळाले.

गुरूंनी शिष्याची साधी इच्छाही पूर्ण करण्यासंबंधी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना आलेली अनुभूती

 पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक
१. रत्नागिरी येथील हिंदु धर्मजागृती सभेहून येतांना श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेण्याचा विचार मनात येणे आणि गाडीतील सर्वांनी मंदिर बंद झाले असेल, असे सांगणे : १९.२.२०१६ या रात्री १० वाजता आम्ही रत्नागिरी येथील हिंदु धर्मजागृती सभेहून चारचाकी गाडीतून बांद्याला यायला निघालो. रत्नागिरी शहरात पॉवर हाऊसच्या मागच्या बाजूला श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे. लहानपणापासून मी श्री गजानन महाराजांच्या मार्गदर्शनानुसार साधना केली आहे. त्यामुळे त्यांचे दर्शन घेऊन पुढे जाऊया, असा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार चालक साधकाला मी तिथे गाडी नेण्यास सांगितले. तेव्हा गाडीतील सर्व जण म्हणाले, माई, ते मंदिर रात्री ९ वाजता बंद होते. आता जाऊन दर्शन होणार नाही.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ -
फाल्गुन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२२.३.२०१६) दुपारी ३.१३ वाजता
समाप्ती -
फाल्गुन पौर्णिमा (२३.३.२०१६) सायंकाळी ५.३१ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.


पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. विजयालक्ष्मी काळेआजी संत 
होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना
       काळेआजींशी भ्रमणभाषवर बोलतांना त्यांना पू. आजी असे संबोधले जाणे आणि त्यानंतर २ दिवसांनी त्या संतपदी विराजमान झाल्याची वार्ता समजणे : १५.३.२०१६ या माझा मुलगा कु. विश्‍व याच्या वाढदिवशी श्रीमती काळेआजींचा त्याला आशीर्वाद देण्यासाठी भ्रमणभाष आला होता. त्या वेळी आजींना पू. आजी म्हणावे, असे मला पुष्कळ आतून वाटत होते. त्यांच्याशी बोलतांना नकळत एकदा त्यांना पू. आजी असे म्हटलेही गेले. त्यानंतर २ दिवसांनी, म्हणजे १७.३.२०१६ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्याचे कळले.
- सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.१०१६)

कु. तृप्ती गावडे यांनी प्रार्थना केल्यामुळे सुकलेल्या पारिजातकाच्या रोपाला पुन्हा पालवी फुटून फुले येणे

      
कु. तृप्ती गावडे
गच्चीत बादलीमध्ये पारिजातकाच्या झाडाच्या बिया लावल्या होत्या. काही दिवसांनी रोप उगवले आणि एक फुटापर्यंत वाढले. नंतर रोप आपोआप वाळू लागले. पूर्ण रोप वाळून गेले. केवळ एक काठी शिल्लक राहिली होती. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी तृप्तीताई गच्चीत आल्या होत्या. मी ताईला म्हणालो, झाड वाळले आहे. तूच तिला प्रार्थना कर. तेव्हा ताई म्हणाली, हो दादा, आपण प्रार्थना करूया. काही दिवसांनी आश्‍चर्य म्हणजे त्या झाडाला पालवी फुटायला लागली. आता ते झाड इतके सुंदर वाढले आहे की, एक ते दोन फूट उंचीच्या झाडाला आता फुले लागत आहेत. एक फूल उमलले, तेव्हा पूर्ण गच्चीमध्ये सुगंध दरवळत होता. आता दोन दिवसांनी १ - २ फुले येतात. प्रत्यक्षात पारिजातकाचे झाड ४ ते ५ फूट उंच वाढल्यानंतर फुले लागतात; पण हे झाड दोन फूट उंचीचे असूनही त्याला फुले लागतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
     भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे निवेदन देण्यास किंवा निदर्शन करण्यातही सहभागी न होणारे हिंदू, तर कुठे जिहादसाठी प्राण अर्पण करण्यास तयार असलेले मुसलमान ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. त्याच्याकडेच लक्ष द्यावे. दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)दुष्काळाच्या झळांना उत्तर काय ?

संपादकीय 
     हा महिना अर्थसंकल्पांचा आहे. प्रथम देशाचा अर्थसंकल्प झाल्यानंतर निरनिराळ्या राज्यांचे अर्थसंकल्प विधानसभांमधून सादर होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. यंदाचे वर्ष आपल्यासाठी दुष्काळी असल्यामुळे शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर बळीराजाला समर्पित अर्थसंकल्प सादर झाला. २६ सहस्र ८९१ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद शेतकरी बांधवांसाठी करण्यात आली. इतरही योजनांची रेलचेल आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेत गैर काय ?

संपादकीय
    भारत हे एक स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. मध्यंतरी काही चुकीच्या धोरणांमुळे फाळणी झाली. त्यानंतर मतांच्या राजकारणापोटी धर्मनिरपेक्षतेचे खूळही जनतेच्या माथी मारले गेले. कागदपत्रे काहीही सांगत राहिली, तरीही अंतिम सत्य नाकारता येत नसते. त्यामुळेच भारताला कुणी हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याने ते सत्य स्वीकारून स्तुत्य पाऊल उचलले आहे, असे म्हणता येते. हिंदु राष्ट्र म्हटले की, एकासुरात गळे काढणार्‍यांना भारताचे इस्लामीकरण होत आहे, ते चालते, ख्रिस्त्यांची दादागिरी चालते, तर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु सहिष्णु मार्गाने करत असलेले प्रयत्न डोळ्यांत का खुपतात, याचे उत्तर शोधणे अगत्याचे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn