Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाग्यनगर येथील मदरशाचा 'भारतमाता की जय' म्हणण्याच्या विरोधात फतवा !

अशा मदरशांवर केंद्रशासन प्रतिबंध कधी आणणार ?
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या विरोधात कधी फतवे निघाले आहेत का ? कि ते इस्लामला मान्य आहे ?
भाग्यनगर - 'भारतमाता की जय' ही घोषणा देण्याची सहमती इस्लाम देत नाही, इस्लाममधील मान्यता आणि तर्कात ते बसत नाही, असे नमूद करत भाग्यनगर (हैद्राबाद) येथील जामिया निजामिया मदरशाने भारतमाता की जय घोषणा देण्यास मनाई करणारा फतवा काढला आहे. (भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, तर सर्व काही इस्लामच्या नियमांत का बसवण्यात येते ? येथे धर्मनिरपेक्षता का दाखवली जात नाही ? कि धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीच आहे ? - संपादक)
जामिया निजामिया हा भारतातील प्रमुख मदरशांपैकी एक मदरसा आहे. येथील फतवा केंद्राचे प्रमुख मुफ्ती अजीमुद्दीन यांनी या फतव्याचे विश्‍लेषणही केले आहे. इस्लामच्या तर्कानुसार एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला जन्म देते. त्यामुळे भारताला माता म्हणणे या तर्कात बसत नाही, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. (एकीकडे मदरसे भारताचा जयजयकार करण्यास नकार देतात, तर दुसरीकडे शासन मात्र मदरशांना भरघोस अनुदान देते. असे केवळ भारतातच घडू शकते ! - संपादक)

"देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याचा अभिमान वाटतो !"

अंतरिम जामीन संमत झालेला उमर खालिद म्हणतो,
"देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याचा अभिमान वाटतो !"

देशद्रोह्यांना त्यांची जागा दाखवणे, हाच देशद्रोही कृत्ये रोखण्याचा खरा पर्याय !

नवी देहली - आम्हाला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याचा अभिमान आहे. मी हे ओरडून ओरडून सांगू इच्छितो की, आमचा देशद्रोह असाच चालू रहाणार आहे. अपराधी आम्ही नाही, तर सत्तेत असलेले राजकारणी आहेत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलणार्‍यांना कारागृहातच डांबले जाते, अशी गरळओक जेएन्यूतील देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणातील आरोपी विद्यार्थी उमर खालिद याने केली आहे. अनिर्बन भट्टाचार्य आणि उमर खालिद या दोघांना पटियाला हाऊस न्यायालयाने ६ मासांचा सशर्त अंतरिम जामीन संमत केला आहे. त्यानंतर रात्री उशिरा हे दोघे जेएन्यूमध्ये पोहोचले. जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला जामीन संमत झाल्यावर त्याने जेएन्यमध्ये आल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना संबोधित केले होते, त्याचप्रमाणे उमर खालिदनेही विद्यार्थ्यांना संबोधित केले.

मणीपूर येथे बॉम्बस्फोट, जीवितहानी नाही !

इंफाळ (मणीपूर) - म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या मोरेह शहरात १८ मार्चला सायंकाळी एका अल्प क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, येथील व्यापार्‍यांना घाबरवण्यासाठी हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे ते आतंकवाद्यांना खंडणी देतील. हे शहर अवैध कृत्यांसाठी कुप्रसिद्ध असून येथे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र यांची तस्करी केली जाते.
गुरांचा व्यापार करणार्‍या २ व्यापार्‍यांची हत्या करून शव झाडावर लटकवले !

रांची/डाल्टनगंज (झारखंड) - ८ म्हशींना घेऊन शुक्रवारच्या बाजारात जाणार्‍या महंमद मजलूम (वय ३५ वर्ष) आणि आझाद खान उपाख्य इब्राहिम (वय १५ वर्षे) या दोघांची हत्या करून त्यांचे शव झाडावर लटकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. १८ मार्च या दिवशी सकाळी रांचीपासून १०० किलोमीटर दूर लातेहार जिल्ह्यातील बालूमठ जंगलामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पशु संरक्षण समितीच्या सदस्यांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या वेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात ६ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी या वेळी प्रथम लाठीमार आणि नंतर हवेत गोळीबार केला.
१. या दोघांचेही हात पाठीमागे बांधण्यात आले होते आणि त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबण्यात आले होते.
२. झारखंड विकास मोर्च्याचे स्थानिक आमदार प्रकाश राम यांनी या घटनेमागे हिंदुत्ववाद्यांचा हात असल्याचा दावा केला आहे. (कोणताही पुरावा नसतांना हिंदुत्ववाद्यांवर हत्यांचे आरोप करणे, ही आता एक फॅशन झाली आहे. - संपादक)
३. या घटनेनंतर निदर्शने करणार्‍या ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ते पशूंचा व्यवसाय करत असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
४. पोलीस अधीक्षक म्हणाले की, या घटनेची चौकशी चालू असून व्यवसायातील शत्रूत्वामुळे ही घटना घडली आहे कि अन्य कोणते कारण आहे, याचा शोध घेत आहोत. मारेकरी संबंधित म्हशींना घेऊन गेले कि त्यांना जंगलात सोडून देण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एका शासकीय रुग्णालयात रुग्णांविषयीच्या संवेदनशून्यतेच्या संदर्भात आलेले अनुभव, शासनाची निष्क्रीयता आणि त्यावरील उपाय

१. एका शासकीय रुग्णालयाची रुग्णांसंबंधीची संवेदनशून्यता
     मी रुग्णाईत असतांना मला एका शासकीय रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्या वेळी तेथील काही त्रुटी लक्षात आल्या आणि या त्रुटींचा अभ्यास करून त्या दूर करणे सहज शक्य आहे, असे मला वाटले. तसेच ईश्‍वरी राज्यात या त्रुटी नसतील, असाही विचारही देवाने दिला. मला जाणवलेली ही सूत्रे येथे देत आहे. 
१ अ. आकस्मिक अपघाती विभागात (कॅज्युअल्टीमध्ये) येणार्‍या रुग्णांची होणारी गैरसोय : अचानक अतिशय आजारी पडणे, अपघातग्रस्त होणे, अशा अनेक कारणांनी आलेल्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. यासाठी कार्यरत असलेला रुग्णालयाचा हा विभाग. या विभागात सतत रुग्ण येत असतात. त्यांपैकी काहींची वैद्यकीय चाचणी करावी लागते, काहींवर तात्काळ इलाज करावा लागतो, तर काही शेवटच्या घटका मोजत असतात. यांपैकी ज्या रुग्णांच्या तातडीने वैद्यकीय चाचण्या करायच्या असतात, अशा रुग्णांना बराच वेळ (काही घंटेसुद्धा) थांबावे लागते.

रशियामध्ये 'फ्लायदुबई'चे विमान कोसळून ६१ ठार, २ भारतियांचा समावेश

मॉस्को - दुबईहून आलेले फ्लायदुबई या आस्थापनाचे बोईंग ७३८ हे प्रवासी विमान विमानतळावर उतरत असतांना कोसळल्याने विमानातील ५५ प्रवासी आणि ६ कर्मचारी यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ भारतियांचा समावेश आहे. रोस्तोव-ऑन-डॉन येथे १९ मार्च या दिवशी हा अपघात झाला. स्थानिक प्रशासनातील अधिकारी मार्टिना कोस्तिकोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. हवामान खराब असल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे; परंतु याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या अपघातानंतर अन्य विमानांच्या उड्डाणांमधे पालट करण्यात आला आहे.

गायीला 'राष्ट्र्माता' घोषित केल्यास भाजपला समर्थन ! - काँग्रेस

राजकोट (गुजरात) - येथील गो-रक्षा एकता समितीच्या एका कार्यकर्त्याने गायीला राष्ट्र्रमाता घोषित करण्याच्या मागणीसाठी आत्महत्या केल्यानंतर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी गायीला राष्ट्र्माता घोषित केल्यास भाजपला समर्थन देऊ, असे काँग्रेसने घोषित केले आहे. (प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणारी हिंदुद्वेषी काँग्रेस ! - संपादक) गो-रक्षा एकता समितीच्या ८ कार्यकर्त्यांनी १७ मार्च या दिवशी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गाभ्रू भरवाड या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने वरील घोषण करण्यात आली आहे.


भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही ! - खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे देशद्रोही विधान

अशांना देशप्रेमी म्हणावे कि देशद्रोही ? यावरून ओवैसी यांना भारताविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट 
होते. उद्या भारत-पाक युद्ध झालेच, तर असे खासदार कुणाच्या बाजूने असतील, हे उघड आहे !
     मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथील एका भाषणात केले. ते पुढे म्हणाले, माझ्या गळ्यावर कुणी चाकू जरी लावला, तरी मी भारतमाता की जय कदापि म्हणणार नाही. पुणे जर्मन बेकरीतील प्रमुख आरोपी हिमायत बेग, इशरतजहाँ हे निर्दोष असून त्यांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे रहाणार आहोत. 

(म्हणे) काश्मीर भारताचा भाग नाही !

देशाच्या राजधानीसारख्या शहरातील विद्यापिठात देशविरोधी घटना घडत असतांनाही 
ते आतापर्यंतच्या एकाही शासनाच्या लक्षात कसे आले नाही ?
  • जेएन्यूतील प्रा. निवेदिता मेनन यांचा देशद्रोह !
  • मेननसारख्या प्राध्यापिका असणार्‍या विद्यापिठातून देशभक्त नाहीत, तर देशद्रोहीच निपजणार !
     काश्मीर हा भारताचा भाग नाही, त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा चुकीच्या नाहीत, असे विधान जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) प्राध्यापिका निवेदिता मेनन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे. मेनन या आंतरराष्ट्रीय संबंध विभागात तुलनात्मक राजकारण आणि राजकीय विचारधारा केंद्रात शिकवतात.
     २२ फेब्रुवारीला प्रा. मेमन यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या या भाषणात म्हटले की, टाइम आणि न्यूज वीक यांसारख्या परदेशी प्रकाशनांमध्ये भारताच्या नकाशात काश्मीर दाखवले जात नाही. म्हणजेच, काश्मीरवरील भारताचा ताबा अवैध आहे, असेच जग मानते; मग काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणांमध्ये चुकीचे काय आहे ? (जेएन्यूची स्थिती आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या मदरशांप्रमाणे आहे, हे मेनन यांच्या विधानातून वाटू लागले आहे. ! - संपादक) कन्हैया कुमार याने केलेले भारतीय सैनिकांविषयीचे विधान आणि प्रा. निवेदिता मेनन यांनी केलेले काश्मीरविषयीचे विधान यांवरून त्यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्च्याकडून देहलीच्या वसंत विहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देशात विदेशी पर्यटकांच्या संदर्भातील गुन्ह्यांत देहलीच्या पाठोपाठ गोवा दुसर्‍या क्रमांकावर !

     देशात विदेशी पर्यटकांच्या संदर्भातील गुन्ह्यांत देहलीपाठोपाठ गोवा दुसर्‍या क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि संस्कृती राज्यमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१४मध्ये पर्यटकांच्या संदर्भात देशभरात एकूण ३८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी देहली येथे १३५ गुन्हे घडले, तर गोव्यात ६६ गुन्हे घडले. स्क्रोलड्रोल डॉट कॉम संकेतस्थळाद्वारे हिंदूंच्या देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदूंनो, सातत्याने तुमच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्‍या हिंदुद्रोह्यांच्या 
विरोधात कठोर कायदा करण्यासाठी केंद्रशासनाला भाग पाडा !
     स्क्रोलड्रोल डॉट कॉम या संकेतस्थळाने त्याच्या फेसबूक पानावर देवतांचे विडंबन केले आहे. हे संकेतस्थळ काही कलाकार व्यक्तींनी बनवले आहे. एखादा विषय अथवा योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही मंडळी त्या विषयावर आधारित चित्रे किंवा पत्रके बनवतात. अनेक व्यावसायिक संकेतस्थळे त्यांचा आधार घेतात. हिंदूंच्या देवता आणि डिजिटल तंत्रज्ञान एकत्रित आले, तर काय होऊ शकते, हा विषय घेऊन या संकेतस्थळाने तिच्या फेसबूकच्या पानावर हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रसारित केली आहेत.

(म्हणे) साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये !

हिंदूंच्या साध्वीविषयी असे विधान करणार्‍या खान यांना आतापर्यंत कारागृहात डांबायला हवे होते ! 
उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे संतापजनक वक्तव्य !
    साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये, असे संतापजनक वक्तव्य उत्तरप्रदेशचे शहर विकास मंत्री आझम खान यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात केले. खान यांच्या या वक्तव्यावर बोलतानंा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले, साध्वी प्राची यांच्याविषयीचे हे वक्तव्य विकृत असून खान त्यांच्या आई-मुलीविषयीही असा विचार करू शकतात.

'मुझफ्फरनगर अभी बाकी है' या हिंदुविरोधी लघुपटावर बंदी आणण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्र शासनाकडे मागणी !

गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता यांना निवेदन देतांना श्री. सतीश सोनार (उजवीकडे)
मुंबई, १९ मार्च (वार्ता.) - वर्ष २०१३ मध्ये उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित 'मुझफ्फरनगर अभी बाकी है' हा लघुपट (डॉक्युमेन्ट्री) काही धर्मांधांनी सिद्ध केला असून डाव्या विचारांच्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्रात तो दाखवण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने रायगडचे पालकमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता यांची भेट घेऊन केली. या वेळी त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन समितीला दिले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई येथील कार्यकर्ते श्री. सतीश सोनार आणि समितीचे राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

डान्सबार प्रकरणी चुकीचा अहवाल देणार्‍या निरीक्षकांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

जे पोलीस अधिकारी शासनाला फसवत 
असतील, ते सामान्य जनतेशी कसे वागत असतील ?
      मुंबई १९ मार्च - डान्सबार चालू करण्याच्या संदर्भात चुकीचा अहवाल देणार्‍या, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुज्ञप्ती (परवाने) देण्यासाठी आवश्यक असणार्‍या सूत्रांची पडताळनी न करणारे मुंबईतील तीन पोलीस निरीक्षक आणि एक साहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. (असे तीन-चार नव्हे, तर राज्यातील बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जनतेला नाडत आहेत. प्रतिदिन पोलिसांचा अत्यंत कटु अनुभव जनता घेत आहे. ज्या तत्परतेने मुंबईतील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई झाली, तशी राज्यातील अन्य दोषी पोलिसांवर कधी होणार आहे ? - संपादक)

डॉ. श्रीकर परदेशी यांनी अवैध बांधकामप्रकरणी लवचिकता न ठेवल्यामुळे अजित पवार यांच्याकडून त्यांचे स्थानांतर

       पिंपरी (पुणे), १९ मार्च - डॉ. श्रीकर परदेशी यांनी अवैध बांधकामाच्या प्रकरणी लवचिक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही, म्हणूनच आम्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे तगादा लावून परदेशींचे स्थानांतर करवून घेतले, अशी स्वीकृती माजी महापौर योगेश बहल यांनी दिली. (राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजकारणी यांचे खरे स्वरूप ! यामुळेच चांगल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना कायद्यान्वये कर्तव्य पार पाडता येत नाही, हेच यावरून दिसून येते. जनतेनेच अशा स्वार्थी पक्षांना येत्या महानगरपालिका निवडणुकीत योग्य ती जागा दाखवून द्यायला हवी ! - संपादक) ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत खाजगी आस्थापनांना खोदाई शुल्कात सवलत देण्याच्या प्रस्तावावर बोलत होते. त्या वेळी त्यांनी ही स्वीकृती दिली. ही सभा महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (आजचे प्रशासकीय अधिकारी हे राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनवल्याची ही अप्रत्यक्ष स्वीकृतीच म्हणावी लागेल. कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांसाठी हिंदु राष्ट्र हवे ! - संपादक)

श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना मिळणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करण्यासाठी आवाहन !

      यावर्षी देण्यात येणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी आंध्रप्रदेशातील लेखक डॉ. यरलगद्दा लक्ष्मीप्रसाद यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी द्रौपदी, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे द्रौपदी नावाचे तेलुगु पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात प्रसाद द्रौपदीला केवळ कामुक म्हणून चित्रित करून थांबले नसून त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिले आहे. हिंदु जनजागृती समितीने पद्म पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, आणि राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून डॉ. यरल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना मिळणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करण्याची मागणी केली होती.

श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी चार मासांनी वाढवली !

गोव्यात आतंकवादी येऊन राहून गेले, तर शासनाला चालते; मात्र प्रखर 
हिंदुत्ववादी श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर बंदी लादली जाते ! 
     श्रीराम सेनेचे संस्थापक तथा प्रखर हिंदुत्ववादी प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावरील गोवा प्रवेशबंदीमध्ये चार मासांनी वाढ केल्याचा आदेश राज्याच्या गृहखात्याने १७ मार्च या दिवशी दिला आहे. श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर १५ जुलै २०१६ पर्यंत गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. अशा प्रकारचे गोवा प्रशासनाने आतापर्यंत ८ वेळा बंदी घालणारे आदेश काढले आहेत.

सोनिया गांधी यांच्याकडून उर्दूत स्वाक्षरी !

     १२ मार्च २०१६ या दिवशी जमियत उलेमा-ए-हिंदने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनाच्या व्यासपिठावरून बोलतांना काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश वाचून दाखवला. या संदेशावर सोनिया गांधी यांनी उर्दूत स्वाक्षरी केल्याचे त्यांनी नमूद केले. (मुसलमानांना खुश करण्यासाठी उर्दूत स्वाक्षरी करणार्‍या सोनिया गांधी यांनी कधी भारतीय भाषांत स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला आहे का ? - संपादक)

पुण्यातील शहर परिसरात एकाच दिवसांत ७ ठिकाणी घरफोड्या

असुरक्षित पुणे ! पुण्यामध्ये पोलीस प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?
पुणे, १९ मार्च - शहर परिसरात एकाच दिवसांत ७ ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी डेक्कन आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करत सुमारे १५ लक्ष रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याचसमवेत शहरातील अन्य ५ ठिकाणी चोरट्यांनी घर आणि आस्थापनांची कार्यालये यांची कडी-कोयंडे तोडून घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न केला. यामुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

पुणे विद्यापिठातील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणारे ३ कर्मचारी निलंबित

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना होणे, 
हे लज्जास्पद आहे. या प्रकरणी त्या कर्मचार्‍यांचे केवळ निलंबन 
करून उपयोग नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
       पुणे, १९ मार्च - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील रसायनशास्त्र विभागातील ३ कर्मचार्‍यांना विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण फेब्रुवारी मासात घडले होते. त्याविषयीची चौकशी केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्या कर्मचार्‍यांचे निलंबन १८ मार्च या दिवशी केले. यामध्ये प्रयोगशाळेचे दोन परिचारक आणि एक शिपाई यांचा समावेश आहे.
१. काही विद्यार्थिनी विभागात आल्यावर ते कर्मचारी टोमणे मारणे, महिला प्रसाधनगृहासमोर उभे रहाणे, असे अपप्रकार करत होते. विद्यार्थिनींनी त्याविषयीची लेखी तक्रार विभागप्रमुखांकडे दिली होती.
२. त्या विभागप्रमुखांनी या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही; परंतु संबंधित कर्मचार्‍यांनी लेखी क्षमायाचना दिल्यानंतर हे प्रकरण काही काळ शांत झाले. (विभागप्रमुखांनी हे प्रकरण प्रशासनापासून का लपवले, याचीही चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. - संपादक) थोड्या कालावधीनंतर ते कर्मचारी पुन्हा तसेच करू लागल्याने विद्यार्थिनी वैतागल्या होत्या.

दैनिक लोकसत्ताकडून ख्रिस्त्यांची क्षमायाचना !

लोकसत्तेवर चर्चसत्ता भारी ?
     मुंबई - लोकमान्य, लोकशक्ती, असे ब्रीदवाक्य असणार्‍या दैनिक लोकसत्ताने १७ मार्च या दिवशीच्या अंकात असंतांचे संत या मथळ्याखाली पृष्ठ ७ वर संपादकीय लिहिले होते. या संपादकीयमध्ये मदर तेरेसा यांचा समाजसेवा करण्यामागील दांभिकपणा चव्हाट्यावर आणत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या प्रकरणी वृत्तपत्राच्या संपादकांनी दुसर्‍या दिवशी म्हणजे १८ मार्च या दिवशी क्षमायाचना केली आहे. (ख्रिस्त्यांचा असतात त्या धर्मभावना आणि हिंदूंना असतात त्याला काय म्हणायचे ? लोकसत्ताच काय तर अन्य वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धर्मभावनांची दखल घेतात; मात्र हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवतात. एका संपादकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे कुठे आहेत ? - संपादक) 

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
        वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार

ठाणे - एकतर्फी प्रेमप्रकरणातून माथेफिरू तरुणाने १५ वर्षीय तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना १८ मार्च या दिवशी कळव्यातील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत घडली. यात गंभीर घायाळ झालेल्या तरुणीवर केईएम् रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्या तरुणाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. कमलकांत सैनी (१९) महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत रहाणार्‍या तरुणीच्या घरी १० दिवसांपासून वास्तव्याला होता. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात सैनीने त्याच्याजवळील गावठी कट्ट्यातून त्या तरुणीवर गोळी झाडली.

देशाच्या उन्नतीसाठी संतांचे विचार मोलाचे ! - मोहन भागवत

श्री समर्थ रामदासस्वामी साधक 
निवासाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा
        पिंपरी, १९ मार्च - माझ्यासह माझा समूह आणि देश यांचा विकास हे आमचे संस्कार आहेत. मानवहित जपणारी आपली संस्कृती आहे. हीच गोष्ट आमचे राष्ट्र अवघ्या जगाला शिकवते. राष्ट्र म्हणजे वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना रुजवणार्‍या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी संतांचे विचार मोलाचे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. (तेच विचार घेऊन रा.स्व. संघाने कृती करणे अपेक्षित आहे. - संपादक) श्री क्षेत्र देहू येथील गाथा मंदिराच्या परिसरात बांधण्यात आलेल्या श्री समर्थ रामदासस्वामी साधक निवासाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

वाराणसी येथील मार्कंडेय महादेव मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची चोरी

उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या शासनाच्या राजवटीत हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! कधी मशीद किंवा 
चर्च यांमध्ये चोरी झाल्याचे वृत्त ऐकले आहे का ? हिंदूंनीही मंदिराच्या रक्षणार्थ आत जागरूक राहिले पाहिजे !
     वाराणसी - येथील गंगा आणि गोमती नदींच्या संगमावरील मार्कंडेय महादेव मंदिर संकुल येथे असलेल्या श्रीराम-जानकी मंदिरातील श्रीरामाची मूर्ती चोरीस गेली आहे. ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडापासून सिद्ध केली आहे. ही मूर्ती चोरीला गेल्याचे पुजार्‍याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. चोरांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला अन् मूर्ती चोरून नेली. चोरीचे वृत्त गावात पसरताच शेकडो ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. पोलिसांनी श्‍वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राचीन मूर्तींची चोरी करणार्‍या टोळीने वाराणसी शहरात सुमारे ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्राचीन मूर्ती चोरली आहे. वर्ष २०१३ मध्ये चोरांनी कबीर मूलगडी मठातून संत कबीरदास यांची जपमाळ पळवली होती. त्यापूर्वी चोरांनी तुलसीघाट जवळील गोस्वामी तुलसीदास मंदिरातील तुलसीदासांच्या रामचरित मानसची हस्तलिखित प्रत पळवली होती.

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी काही कारणे !

१. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुसलमानबहुल आहे; म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्‍चित करण्यास सांगितले. याउलट भाग्यनगर (हैद्राबाद) हिंदुबहुल असतांनाही तेथील निझामाला समर्थन दिले होते.
२. बॅ. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?

ओवैसी, भारत अम्मी की जय म्हणणार का ? - शबाना आझमी

     मुंबई - भारतमाता की जय, म्हणण्यात अडचण वाटत असेल, तर भारत अम्मी की जय म्हणतील का, असा प्रश्‍न अभिनेत्री शबाना आझमी यांनी एम्आयएम्चे नेते असदुद्दीन ओवैसी यांना विचारला आहे. ओवैसी यांनी, माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे देशविरोधी विधान केल्याच्या पार्श्‍वभूमीवर आझमी यांनी असा प्रश्‍न विचारला आहे. यापूर्वी शबाना आझमी यांचे पती आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ओवैसींच्या या भूमिकेवरून त्यांना फटकारले होते.

शाळांच्या गुणपत्रिका रोखण्याचा शिक्षण मंडळाचा निर्णय

१० वी आणि १२ वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी पडताळणी न करण्याचे प्रकरण
शिक्षक आणि मंडळ या दोहोंच्या वर्तनामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे. या प्रकरणी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे.
संभाजीनगर, १९ मार्च - राज्यातील कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील २२ सहस्र ५०० शिक्षकांनी १० वी आणि १२ वीच्या उत्तरपत्रिका पडताळणीवर बहिष्कार घातला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाकडे आतापर्यंत उत्तरपत्रिकांचे १७३ गठ्ठे परत आले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका परत पाठवणार्‍या शाळांच्या गुणपत्रिका रोखण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

भारताची वाटचाल विश्‍वगुरुपदाच्या दिशेने होत आहे ! - राम माधव

       पुणे, १९ मार्च (वार्ता.) - भारताच्या भाग्योदयाचे दिवस आले आहेत. भारत विश्‍वाला मार्गदर्शन करू शकतो. भारतियांमध्ये मुळातच विश्‍वकल्याणाचे बीज आहे. भारतियांच्या प्रार्थनांमध्येही व्यापकता आहे. विश्‍वगुरु बनण्यासाठी आवश्यक असलेले सक्षम नेतृत्वही देशाला लाभले आहे. आता स्वप्नाच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या राष्ट्रीय समाजाची आवश्यकता आहे. हे केवळ शासनाचे नाही, तर सर्वांचे दायित्व आहे. विश्‍वगुरु बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल चालू असून एक दिवस भारत निश्‍चितपणे विश्‍वगुरु बनेल, असे प्रतिपादन भाजपचे महासचिव श्री. राम माधव यांनी केले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेच्या अंतर्गत १६ मार्च या दिवशी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी श्री. अनिरुद्ध देशपांडे हेही उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले, प्रगतीला अध्यात्माची जोड हवी. नीतीमूल्यांवर समाजाची बांधणी व्हायला हवी.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१५-१६ मधील काही विशेष तरतुदींची थोडक्यात माहिती !

१. पत्रकारांच्या कुटुंबांसाठी १० कोटी रुपयांचे प्रावधान ! 
     अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दुर्धर आजार, तसेच मृत्यूपश्‍चात त्यांच्या वारसदारांना आर्थिक साहाय्य, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून देण्यात येते. या योजनेमध्ये आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या कुटुंबाचाही समावेश करण्यात येत असून या निधीसाठीच्या ५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीमध्ये वाढ करून ती १० कोटी रुपये करण्यात येत आहे. 
२. लोकमान्य टिळकांच्या कार्याची जनजागृती होण्यासाठी 
राबवण्यात येणार्‍या उपक्रमांसाठी ५ कोटी रुपये 
     स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्यातील नोंदणीकृत सुमारे ४१ सहस्र ३२८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकमान्यांच्या कार्याविषयी जनजागृती व्हावी याकरिता राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी वर्ष २०१६-१७ मध्ये ५ कोटी रुपये प्रस्तावित आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

विद्यार्थ्यांना देशभक्ती शिकवण्यासाठी शासकीय शाळांमध्ये होणार माजी सैनिकांची नियुक्ती !

     नवी देहली - शासन शासकीय शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना देशभक्ती शिकवण्याचे दायित्व आता माजी सैनिकांवर सोपवणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या कामासाठी सैन्यातील निवृत्त अधिकारी आणि सैनिक यांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव बनवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होण्यास साहाय्य होऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमताही वाढेल. प्राप्त माहितीनुसार मंत्रालयाकडून हा प्रस्ताव सैन्यदलप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. 
    विद्यार्थ्यांना प्रथमपासून राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण दिले असते, तर देशभक्ती शिकवण्याची वेळ आली नसती ! केवळ शाळांमधील नव्हे, तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, पोलीस अधिकार्‍यांना, प्रशासकीय अधिकार्‍यांना आणि लोकप्रतिनिधींनाही देशभक्ती शिकवण्यासाठी माजी सैनिक अन् अधिकारी यांची नियुक्ती करावी !


कोल्हापूर पोलिसांना मनकर्णिका कुंडाप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यास सांगणार ! - प्रा. राम शिंदे, गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार (उजवीकडे)
मुंबई, १९ मार्च (वार्ता.) - कोल्हापूर येथील स्थानिक पोलिसांना मनकर्णिका कुंडप्रकरणी कारवाई करण्यास सांगणार, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळास १९ मार्च या दिवशी दिले.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन 'मनकर्णिका कुंड' नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि पुरातत्व खात्याची अनुमती न घेता तेथे अनधिकृत शौचालय बांधल्याप्रकरणी उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने केली आहे; मात्र या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे पोलीस तक्रार प्रविष्ट करूनही त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

वाई (जिल्हा सातारा) येथील आजच्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

       सातारा, १९ मार्च (वार्ता.) - हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि धर्माचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवारी, २० मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता वाई येथील श्रीमहागणपति घाटावर जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार आता अंतिम टप्प्यात आला असून स्थानिक हिंदुत्ववाद्यांकडून सभेच्या पूर्वप्रसिद्धीसाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. धर्मसभेच्या निमित्ताने कोपरा सभा, रिक्शावरील फलक, भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदींच्या माध्यमातून घराघरांतून प्रसार-प्रचार चालू आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठ्या आकारांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये रिक्शाद्वारे उद्घोषणेला आरंभ झाला असून शहरातील वातावरण हिंदुमय झाल्याचे जाणवू लागले आहे.

आज टेमघर (भिवंडी) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

स्थळ : टेमघर पाईपलाईन नाका, कल्याण-भिवंडी मार्ग, भिवंडी.
वेळ : सायंकाळी ५ वाजता 
संपर्क : ९९८७० २७४२७
आंदोलनातील मागण्या
१. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी विकृत लिखाण करणार्‍या डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना घोषित पद्मभूषण पुरस्कार रहित करावा.
२. पम्पोरमध्ये सैनिकांची आतंकवाद्यांसमवेत लढाई चालू असतांना मशिदीतून राष्ट्रदोही घोषणा देणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी.

आतंकवादी इशरतजहाँ प्रकरणात पी. चिदंबरम् यांच्यावर कठोर कारवाई करा !

धनबाद (झारखंड) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
डॉ. यरल्लगदा यांना घोषित पद्मभूषण रहित करावा !
धनबादमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनात
सहभागी राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदू
     धनबाद (झारखंड), १९ मार्च (वार्ता.) - लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी इशरतजहाँला राजकीय लाभासाठी शहीद ठरवून याप्रकरणी देशभक्त अधिकार्‍यांना कारागृहात डांबण्यात आले. यातून तत्कालीन काँग्रेस शासन आणि गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी इशरतजहाँचे आतंकवाद्यांशी असलेले संबंधच लपवून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या कारस्थानात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासह काँग्रेसचे नेते, तसेच सीबीआय अधिकारी यांची न्यायालयीन देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशा देशद्रोह्यांना कठोर शिक्षा केली जावी, तसेच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी द्रौपदी या कादंबरीत विकृत लिखाण करणार्‍या डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांना देण्यात येणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, या मागण्यांसाठी येथील रणधीर प्रसाद वर्मा चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक शासनाचे हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

पेजावर (कर्नाटक) येथील श्रीकृष्ण मठाचे श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी यांचे मत
कर्नाटकमध्ये हिंदूंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लादण्याचा घाट
श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी यांना अंधश्रद्धा निर्मूलन
कायद्याविषयी माहिती देतांना धर्माभिमानी
     उडुपी (कर्नाटक) - राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. इतर पंथांमध्ये पुष्कळ अंधश्रद्धा असूनही यात त्याविषयी चकार शब्दही न काढता केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य करणे , हा चिंतेचा विषय आहे. याचा आम्ही तीव्र विरोध करतो. या कायद्यात श्रद्धा कोणत्या आणि अंधश्रद्धा कोणत्या यांचाही उल्लेख नाही; म्हणून हा कायदा लागू करणे हिंदूंच्या हिताच्या दृष्टीने विनाशकारी आहे. त्यासाठी हिंदु संघटनांनी हा कायदा येणारच नाही, यासाठी संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे, असे मत पेजावर येथील श्रीकृष्ण मठाचे श्री श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजी यांनी व्यक्त केले.

देशद्रोही कृत्ये रोखण्यासाठी देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

देशद्रोही कृत्ये रोखण्यासाठी देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
आम्हाला देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याचा अभिमान आहे. मी हे ओरडून ओरडून सांगू इच्छितो की, आमचा देशद्रोह असाच चालू रहाणार आहे, असे वक्तव्य जेएन्यू प्रकरणात सशर्त अंतरिम जामिनावर सुटून आलेल्या उमर खालिदने केले आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
JNU mamle me jamanat milne par Umar Khalid ne kaha, deshdrohake aropme bandi banaye janepar garva hai.
kya sarkar aise deshdrohionko sabak sikhayegi ?

जागो !
जेएन्यू मामले में जमानत मिलने पर उमर खालिदने कहा, देशद्रोह के आरोप में बंदी बनाये जाने पर गर्व है.
क्या सरकार ऐसे देशद्रोहीआेंको सबक सिखाएगी ?

घोडेगाव (पुणे) येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून ओवैसीच्या पुतळ्याचे दहन

घोडेगाव (जिल्हा पुणे), १९ मार्च (वार्ता.) - एम्आयएम्चे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी गळ्यावर सुरी फिरवली, तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य केले होते. या राष्ट्रद्रोही विधानाचा निषेध करत येथील सर्वपक्षीय नेत्यांनी १८ मार्च या दिवशी भारतमातेचा जयजयकार करत ओवैसीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ गिरे, भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामशेठ काळे यांच्यासह २३० हून अधिक देशभक्त ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी भारतमाता की जय, वन्दे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

मलकापूर येथे ओवैसीच्या पुतळ्याचे दहन आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन !

ओवैसीचा प्रतिकात्मक पुतळा दहन करतांना पदाधिकारी आणि कार्यकर्ते
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), १९ मार्च (वार्ता.) - एम्आयएम् या पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि भायखळा येथील आमदार वारिस पठाण यांनी भारतमाता की जय, असे म्हणणार नाही, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, या मागणीसाठी येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध व्यक्त करून औवेसीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांना शिवसेना जिल्हाउपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष डिल्मा यांच्या विरोधात ३० लाख नागरिक रस्त्यावर ! : देशाला मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप

     साओ पावलो - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष डिल्मा रोसेफ यांनी भ्रष्टाचार करून देशाला मंदीच्या खाईत लोटल्याचा आरोप करत येथील अनुमाने ३० लाख नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या सर्वांनी रोसेफ यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. या आंदोलनात २०० शहरांतून अनुमाने ३० लाख नागरिकांचा समावेश असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राष्ट्राध्यक्ष रोसेफ यांचे कट्टर विरोधक तथा कनिष्ठ सभागृहाचे सभापती इडुडो कुनहा हे रोसेफ यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी आयोग स्थापन करण्याच्या सिद्धतेत आहेत. रोसेफ यांना त्यांच्या स्वत:च्याच वर्कर्स पार्टीकडूनही विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष ल्युईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात आहे.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळण्यासाठी गोप्रेमींकडून विषप्राशन

हिंदूंनो, तुमच्या सर्व समस्या हिंदु राष्ट्रातच सुटणार आहेत. त्यामुळे एकेका समस्येसाठी आत्मत्याग 
न करता वैध मार्गाने प्रयत्नरत राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
१ मृत्यूमुखी आणि ७ गंभीर
     राजकोट (राजस्थान) - गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि देशात गोमांसबंदी व्हावी यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ८ गोप्रेमींनी विष प्राशन केले. त्या सर्वांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यांपैकी हिंदाभाई वांबाडिया या गोप्रेमीचा मृत्यू झाला असून अन्य ७ जण गंभीर आहेत. या गोप्रेमींनी राजकोटच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना गायीला राष्ट्रमातेचा दर्जा न दिल्यास सामूहिकपणे आत्महत्या करण्याची चेतावणी दिली होती. ही चेतावणी प्रत्यक्षात उतरवत त्यांनी विष प्राशन केले.

राजकारणासाठी देशहितावर निखारे ठेवणार्‍या विविध सत्तालोलुप राजकीय नेत्यांना खड्यासारखे वगळून देशहित साधा !

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !
     येऊ घातलेल्या देशव्यापी युद्धाचा धोेका लक्षात घेऊन भारतातील देशभक्त जनतेने केवळ खुर्चीच्या राजकारणासाठी देशहितावर निखारे ठेवणार्‍या विविध सत्तालोलुप राजकीय नेत्यांना खड्यासारखे वगळून अखंड भारत निर्मितीच्या कार्यात भारत शासनाला सर्वांगीण सहकार्य करणे, हे देशभक्तीचे लक्षण ठरेल.

धर्मकार्याची तीव्र तळमळ, उत्तम संघटनकौशल्य आणि नेतृत्व या गुणांनी युक्त असलेले ठाणे जिल्ह्यातील हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी !

श्री. मोतीराम गोंधळी
     १९.२.२०१६ या दिवशी ठाणे जिल्ह्यातील डायघर गावात मोठ्या हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या आयोजनामध्ये हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी (वय ४२ वर्षे) आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन सेवा केली. त्या वेळी मोतीरामदादांचे अनेक गुण साधकांच्या लक्षात आले. पुढील लेखात त्यांचे गुण दर्शवणारे काही प्रसंग दिले आहेत. ते गुण आत्मसात करण्याचे प्रयत्न सर्व साधकांकडून होवोत, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !
१. शिकण्याची तीव्र तळमळ 
    मोतीरामदादांचे शालेय शिक्षण अल्प असले, तरी धर्मकार्य आणि साधना करतांना कराव्या लागणार्‍या सर्व गोष्टी त्यांनी लगेच शिकून आत्मसात केल्या आहेत, उदा. आंदोलनात विषय मांडणे, पत्रकार परिषद घेणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, सनदशीर मार्गाने धर्महानीला विरोध करणे इत्यादी. ते सेवेआधी प्रार्थना आणि सेवा झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करतात.

ओवैसी यांचे देशविरोधी भाषण ऐकून १०० वर्षांची स्वातंत्र्यसैनिक महिला बेशुद्ध !

       गोपालगंज (बिहार) - एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे भारतमाता की जय ही घोषणा देण्यास नकार दिल्याचे भाषण टीव्हीवर पाहून स्वातंत्र्यलढ्यात गांधींसोबत सहभागी झालेल्या खातून यांचा संताप इतका अनावर झाला की, त्यांची शुद्धच हरपली. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी नातेवाइकांना नेमके कारण सांगितले. खातून यांच्या नातेवाइकाने ओवैसी यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
      बिहारच्या गोपालगंजमध्ये रहाणार्‍या १०० वर्षांच्या सदीकन खातून म्हणाल्या की, ज्या कठीण परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, ते पाहता स्वतंत्र भारतातील प्रत्येकाने भारतमाता की जय ही घोषणा दिली पाहिजे. जर एखाद्याने ही घोषणा म्हणण्यास नकार दिला, तर त्याला कारागृहात डांबायला हवे.

अपप्रकार आढळल्यास माहिती द्या; पोलीस नोंद घेतील ! - कोल्हापूर पोलीस अधीक्षक

हिंदु जनजागृती समितीची होळी-
रंगपंचमीतील अपप्रकारांच्या विरोधात चळवळ
       कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) - होळी-रंगपंचमीच्या काळात तुम्हाला अपप्रकार आढळल्यास पोलिसांना माहिती द्या, पोलीस त्याची नोंद घेतील, असे आश्‍वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे सर्वश्री किशोर घाटगे, शशी बीडकर, यश जुन्नरकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, युवा सेनेचे श्री. रणजित आयरेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे उपस्थित होते.

वारजे (पुणे) येथे शिवसेनेच्या वतीने ओवैसींच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलन

      पुणे, १९ मार्च - मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एम्आयएम्) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार वारीस पठाण यांनी भारतमाता की जय या घोषणेला विरोध केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या वारजे विभागाच्या वतीने ओवैसी आणि पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारण्यात आले. या आंदोलनात शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी भारतमाता की जय आणि जय भवानी, जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप मोरे आदींसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.
     देशाला नष्ट करण्यासाठी पाकिस्तान किंवा अन्य देशांतून आलेल्या लोकांना आपण शत्रू म्हणतो; परंतु ज्यांना आम्ही निवडून दिले, तेच देशाचा विश्‍वासघात करत असतील, तर त्याला काय म्हणावे ?
- पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती    आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे, हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे. - भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज 

हिंदूंवर प्रतिदिन भयानक आघात होत आहेत त्या संदर्भात प्राधान्याने कृती करणे आवश्यक असतांना स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला प्राधान्य देणे संघाकडून अभिप्रेत नव्हते !

     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालात महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या सूत्रावर सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यात संघाने देशातील प्रत्येक मंदिरात महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे; मात्र हा वाद आंदोलनांऐवजी चर्चेने आणि सामंजस्याने सोडवला पाहिजे, असे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आतंकवादी इशरतजहाँ हिच्या नावाने रुग्णवाहिका चालू असतांना पोलीस प्रशासन काय करत होते ? सर्व जनतेला प्रतिदिन दृष्टीस दिसणारी ही रुग्णवाहिका प्रशासन आणि पोलीस यांना का दिसली नाही ? असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण करू शकतील का ?

     गुजरात पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार झालेली लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकातील इशरत जहाँ हिच्या नावाने ठाणे येथे वर्ष २०११ पासून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) वृंदा करात यांच्या निधीतून माय मुंब्रा फॉऊंडेशन या संस्थेकडून ३ रुग्णवाहिका चालवल्या जात आहेत.

मंत्र्यांकडून बोलणे नाही, तर कृती अपेक्षित !

     देशी गायींचे दूध, मूत्र, गोमय हे आरोग्यासाठी हितकारक आहेत. भावी पिढीच्या हितासाठी आपण देशी गायींचे संवर्धन केले पाहिजे. जैविक शेती आणि देशी गायींना प्रोत्साहन दिले, तर गोव्याचे नाव सर्वत्र होईल. - पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, गोवा 

देशात विदेशी पर्यटकांच्या संदर्भातील गुन्ह्यांत देहलीच्या पाठोपाठ गोवा दुसर्‍या क्रमांकावर !

     देशात विदेशी पर्यटकांच्या संदर्भातील गुन्ह्यांत देहलीपाठोपाठ गोवा दुसर्‍या क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि संस्कृती राज्यमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१४मध्ये पर्यटकांच्या संदर्भात देशभरात एकूण ३८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी देहली येथे १३५ गुन्हे घडले, तर गोव्यात ६६ गुन्हे घडले.

अशी मागणी का करावी लागते ? शासन स्वत:हून कृती का करत नाही ?

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
     मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय असे कधीच म्हणणार नाही, असे विधान करून एम्आय्एमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माझ्या आणि सर्व भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. जाणीवपूर्वक हे प्रक्षोभक देशद्रोही विधान करून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा, अशा तक्रारीचे आवेदन शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. अनिल उपाख्य राजू यादव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिले आहे.

साधक-पालकांसाठी महत्त्वाची सूचना

पाल्याच्या अयोग्य छायाचित्रामुळे परीक्षणावर 
परिणाम होऊन त्याच्या आध्यात्मिक पातळीत फरक पडू 
शकतो, हे लक्षात घेऊन परीक्षणासाठी योग्य छायाचित्रे पाठवा !
       आपले पाल्य उच्चलोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्याचे वाटत असल्यास त्याची गुणवैशिष्ट्ये आणि छायाचित्रे पाठवतांना लक्षात घ्यावयाची मार्गदर्शक सूत्रे यापूर्वी अनेकदा दैनिकात प्रसिद्ध झाली आहेत. असे असतांनाही पालकांकडून त्यांचे पालन होत नाही. बालकाचे अयोग्य छायाचित्र पाठवल्यास त्याची आध्यात्मिक पातळी मूळ पातळीपेक्षा उणी-अधिक झाल्याचे काही उदाहरणांवरून लक्षात आले आहे.

महर्षींनी सकाळी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेले वाक्य ज्ञात नसतांनाही तंतोतंत तेच सूत्र सायंकाळी प.पू. डॉक्टरांनी साधिकेला सांगणे

१. साधकांना देवाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाणारा जप करण्यास महर्षींनी सांगणे
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा 'ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।' हा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करावा, अशी दैनिक सनातन प्रभातमध्ये चौकट छापायची होती. त्या जपामध्ये 'ॐ' कुठे लावायचा, यासंदर्भात सायंकाळी मी (पू.) सौ. अंजली गाडगीळकाकू यांना भ्रमणभाष केला होता. त्या वेळी पू. काकू महर्षींची आपल्यावर किती कृपा आहे, यासंदर्भात मला सांगत होत्या. तेव्हा पू. काकूंनी सकाळी झालेल्या सप्तर्षि जीवनाडीच्या वाचनामधील महर्षींचे पुढील सूत्र मला सांगितले, पुढे येणार्‍या आपत्काळासाठी कोणता नामजप साधकांनी करणे आवश्यक आहे, हे आम्हाला ज्ञात आहे. हा नामजप साधकांना देवाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाईल. महर्षींचे हे वाक्य सांगून झाल्यावर पू. काकू म्हणाल्या, "महर्षींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी अल्पच आहे !"

देशाच्या रक्षणासाठी असा विचार तरी कोणी करील का ?

चीनची भिंत
     १५०० मैल, म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या बाराव्या हिश्श्याइतकी जागा व्यापणारी, मानवाने बांधलेली अशी ही सर्वांत मोठी वास्तू होय. या भिंतीत २४,००० दरवाजे आणि मिनार आहेत. भिंतीची सरासरी उंची २५ फूट असून पायथ्याशी तिची रुंदी २० ते ३० फूट इतकी आहे. या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात चीनचा राजा शिने व्हांग टी याने बांधकामास प्रारंभ केलेल्या या भिंतीचे काम पुढे १७०० वर्षांपर्यंत चालू राहिले आणि त्याला शेवटचा हात मिंग राजघराण्याकडून (इ.स. १३६८ - १६४४ मध्ये) दिला गेला. (श्री गजानन आशिष, जानेवारी २००२)

तृप्ती देसाई यांच्यासह स्टंटबाजी करणार्‍या महिलांनो, तुम्हाला खरेच देवदर्शन हवे असेल, तर अधर्माचरण सोडून देवाचे खरे भक्त व्हा !

पू. बाबा (सदानंद) नाईक
      सहस्रो वर्षांच्या इतिहासात क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णांतील सोडा; पण ब्राह्मण वर्णातील स्त्रियांनी तरी देवालयाच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्यासाठी हेका धरला आहे का ? तर नाही ! आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या स्टंट म्हणून प्रथम शनिशिंगणापूरला, नंतर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्‍वराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्या आता देवालयांमध्ये महिला पुजारी नियुक्त करण्यासाठी पुरो (अधो) गाम्यांच्या साहाय्याने प्रयत्न करत आहेत. यावरून विनाशकाले विपरीतबुद्धिः ।, म्हणजे विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट (अधर्माचरणी) होते, हे वचन आठवते.
     तृप्ती देसाई यांच्यासह अधर्माचरणी कृती करण्यात आघाडीवर असणार्‍यांनो, वेळीच सावध व्हा ! तुम्हाला खरेच देवदर्शन हवे असेल, तर योग्य प्रकारे धर्माचरण करून देवाचे खरे भक्त व्हा ! 
- पू. बाबा (सदानंद) नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०१६)


एखाद्या गोष्टीचे रूप जाणण्यासाठी स्थूलरूप जाणणे जितके आवश्यक, तितकेच सूक्ष्म-पैलू जाणणे महत्त्वाचे !

सौ. जान्हवी शिंदे
     एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण रहाते. विषयाचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्याच्यातील सूक्ष्म-पैलूंचे ज्ञान हवे. मनुष्याचे डोळे, मन आणि बुद्धी यांनी एखाद्या विषयातील स्थुलातील भाग कळतो, तर साधनेने सक्षम झालेले सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी यांना त्यातील सूक्ष्मातील भाग कळू शकतो. विषय आकलन करण्याच्या या पद्धती जाणून घेतांना एका अ नावाच्या व्यक्तीचे उदाहरण पाहू.
१. डोळे
      पंचज्ञानेंद्रियांमधील एक म्हणजे आपले डोळे. डोळ्यांनी विषयाच्या स्थूलरूपाची ओळख होते. विषयाचे स्थुलातील घटक म्हणजे त्याचे रूप, आकार, रंग इत्यादी माध्यमांतून कळतात. मन आणि बुद्धी यांना विषयाची प्राथमिक ओळख करून देण्याचे हे माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीचे रूप, रंग, वागणे-बोलणे, राहणीमान यांवरून आपल्याला त्याची प्राथमिक माहिती मिळते, उदा. अ नावाची व्यक्ती ही सावळ्या वर्णाची, मध्यम बांध्याची, तसेच नीटनेटकी आहे.
२. मन
      माणसाची प्रकृती आणि गुण-दोष यांनुसार मन विषयाचे आकलन करते. बरेचदा त्या विषयासंदर्भात डोळ्यांना जे दिसते आणि बुद्धीला जे कळते, त्यावर मनाचे कळणे अवलंबून असते,

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
 कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील साडेतीन मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सजीव सृष्टीच्या शुद्ध सात्त्विक स्वरूपाचे मूळ बीज भारतीय (देशी) आहे !

१. भारतीय बीज असलेले प्राणी, पक्षी आणि वनस्पती
     गाय, हत्ती, सिंह, खार हे प्राणी; गरूड, मोर, कोकिळ, भारद्वाज, राजहंस अशा प्रकारचे पक्षी; हापूस आंबा, केळी, चिक्कू, डाळिंब, आवळा यांसारखी फळे; कमळ, कण्हेर, मोगरा, शेवंती, सोनचाफा, जास्वंद, गुलाब यांसारखी फुले; भुईमूग, सूर्यफूल, मोहरी, गहू, ज्वारी, आंबेमोहर तांदूळ या सर्वांचे मूळ बीज भारतीय आहे. तसेच तुळस, बेल, औदुंबर, कडुलिंब, आवळा, पुदिना, आले, लवंग, मिरी, वेलची, कोथिंबीर यांसारख्या औषधी वनस्पती अन् कांदा, मुळा, वांगी, दोडका या भाज्या, तसेच पालक, शेपू, मेथी, माठ, तांदुळजा या पालेभाज्या या सर्वांचे मूळ बीज भारतीय आहे.
२. भारतीय (देशी) बिजात सजीव आणि निर्जीव सृष्टीचे मूळ शुद्ध अन् सात्त्विक
स्वरूप सामावले असल्याने विदेशी वंशाच्या तुलनेत त्यांची गुणवत्ता, सौंदर्य 
अन् आध्यात्मिक गुणवत्ता लक्ष पटींनी अधिक असणे
     भारतीय (देशी) बिजात सजीव आणि निर्जीव सृष्टीचे मूळ शुद्ध आणि सात्त्विक स्वरूप सामावलेले आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे देशी भाजीपाला, फळे, फुले, वनस्पती, पक्षी अन् प्राणी, चंदनाचे लाकूड, कस्तुरी, रूद्राक्ष, मोती यांपैकी काहींचा आकार जरी विदेशी वंशातील स्वजातींपेक्षा तुलनेने लहान दिसत असला, तरी त्यांची गुणवत्ता अन् सौंदर्य अतुलनीय आहे. याचे मूळ कारण भारतीय वंश (देशी) मुळात सात्त्विक आहे, तर विदेशी वंश रज-तम प्रधान आहे.

हिंदूंनो, असे ऐक्य प्रत्येक ठिकाणी दाखवल्यास तुम्हाला धर्मांधांसमोर नमते घ्यावे लागणार नाही !

     रामनाथी आश्रमातून यवतमाळला परत येतांना आम्ही राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने (बसने) निघालो. गाडी प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती. बसायला एकही आसंदी रिकामी नव्हती. निम-आराम वाहन असेल, तर जास्तीचे प्रवासी घेत नाहीत. उभे प्रवासी सहसा नसतात. गाडी ज्या वेळी अहमदपूरला पोेचली, तेव्हा तेथे असलेल्या प्रवाशांना वाहकाने (कंडक्टरने) बजावले होते, बसायला जागा नाही. उभ्याने प्रवास करावा लागेल. तरीही काही प्रवासी गाडीत चढले. या प्रवाशांमध्ये ३ धर्मांध होते.
     गाडी चालू झाल्यावर बसायला जागा नाही; म्हणून धर्मांध वाहकाशी जोरजोराने भांडू लागले. वाहकाने त्यांना सांगितले, मी आधीच कल्पना दिली होती. तुम्हाला पटत नसेल, तर उतरून जा. त्यावर ते वाहकाशी वाद घालू लागले अन् गाडी पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे वारंवार म्हणायला लागले. काही मिनिटे असे चालले. ते वाहकाला ऐकत नव्हते. तेव्हा गाडीतील इतर सर्व प्रवासी त्या वाहकाच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी एकदम ओरडून धर्मांधांना दम भरला.

हायब्रिड, तसेच रासायनिक पद्धतीने वाढवलेली आणि नैसर्गिकरित्या वाढलेली फळे अन् भाज्या यांविषयी जाणवलेली सूत्रे

१. कृत्रिम शीतपेये आणि नैसर्गिक फळांचा रस यांत जाणवलेला भेद
१ अ. कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणाम : कृत्रिम शीतपेयांमध्ये हानीकारक रसायने, दूषित पाणी, कीटक, कचरा, बुरशी इत्यादी आढळल्याची माहिती उघड झालेली आहे. आरोग्यासाठी सर्वदृष्ट्या हानीकारक असणार्‍या शीत पेयांचे सेवन तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात करत असतो. त्यामुळे देशाची युवा पिढी अकार्यक्षम बनत चालली आहे.
१ आ. देवाच्या कृपेने लहानपणापासून कृत्रिम शीतपेये पिण्याची इच्छा न होणे आणि फळांचे नैसर्गिक पेय पिणेच आवडणे : मला माझ्या पूर्व आयुष्यातील काही प्रसंग आठवले. देवाच्या कृपेने शाळेत असल्यापासून मला कृत्रिम शीतपेयांविषयी कधीच आकर्षण वाटले नाही. सहल, वाढदिवस किंवा स्नेहसम्मेलनादी कार्यक्रमांमध्ये इतर मुले शीतपेय घेत असतांना, मला ते पिण्याचा कधीच मोह झाला नाही, ही केवळ देवाचीच कृपा होती. एक-दोन वेळा इतरांच्या आग्रहाने शीतपेयाचा एखादा घोट जरी मी घेतला, तरी त्याचा उग्र वास आणि जिभेला होणार्‍या झिणझिणणार्‍या संवेदना, यांमुळे ते पेय पिण्यात मला कधीच सुख वाटले नाही. शीतपेय प्यायल्यानंतर करपट ढेकर येऊन तोंडात कडवट चव घोळत असे अन् त्यामुळे श्‍वसन आणि पचन क्रियांमध्ये अवरोध उत्पन्न होऊन मला अस्वस्थ वाटत असे.

महर्षींनी विविध उपमांद्वारे प.पू. डॉक्टरांनी निर्माण केलेल्या रामनाथी आश्रमाचे केलेले वर्णनमहर्षींची शिकवण आणि कार्य !
१. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम म्हणजे जणूकाही श्रीकृष्णाचे वृंदावन; कारण तेथे गोपगोपींना आत्यंतिक मायेने सांभाळणारी वृंदा आहे !
     क्षीरसागरात झोपलेल्या श्रीमत् नारायणाचे आश्रमाकडे पूर्ण लक्ष आहे. या आश्रमात असणारी वृंदा (महर्षि सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वृंदा म्हणतात.) सर्व गोपगोपींना आत्यंतिक मायेने सांभाळत आहे. त्यांची सर्वतोपरी काळजी घेत आहे आणि म्हणूनच रामनाथी म्हणजे वृंदावन आहे. रामनाथीमध्ये प्रत्यक्ष स्वयं श्रीमत् नारायण परम गुरुजींच्या रूपाने वास करत आहे. असा आश्रम भूतलावर कुठेही नाही ! (महर्षींनी केलेले रामनाथी आश्रमाचे हे वर्णन ऐकून भावजागृती होत होती आणि रामनाथी आश्रमाला आतूनच त्रिवार नमस्कार केला जात होता. डोळ्यांत आलेल्या भावाश्रूंमध्ये धूसर झालेला रामनाथी आश्रम त्यातही अत्यंत प्रकाशमान दिसत होता. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ)
२. रामनाथी आश्रम म्हणजे साक्षात् श्रीमत् नारायणाचा वैकुंठ लोक !
     रामनाथी आश्रम म्हणजे साक्षात् श्रीमत् नारायणाचा वैकुंठ लोक आहे; कारण अवतार लीला करणारा भगवान श्रीकृष्ण येथे प्रत्यक्ष विराजमान आहे.
३. रामनाथी आश्रम म्हणजे अमृताश्रम !
     परम गुरुजी (प.पू. डॉक्टरांना महर्षि परम गुरुजी या नावाने संबोधतात.), कार्तिकपुत्री (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षि कार्तिकपुत्री या नावाने हाक मारतात; कारण यांचे जन्मनक्षत्र कृत्तिका आहे.) आणि उत्तरापुत्री (पू. (सौ.) बिंदाताईंना महर्षि कधी कधी उत्तरापुत्री या नावाने हाक मारतात; कारण पू. (सौ.) बिंदाताईंचे जन्मनक्षत्र उत्तराफाल्गुनी आहे.) यांना जगात घडणार्‍या गोष्टींची माहिती असते.

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

बिंदूदाबन उपचारपद्धतीवर मार्गदर्शक सनातनचे ग्रंथ !
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या
निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख)
     प्रत्येकालाच आपण सदा निरोगी आणि आनंदी रहावे, असे वाटत असते; परंतु आजकाल निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे. प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. याऐवजी बिंदूदाबन उपचारपद्धत अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह विकारावर मूलगामी उपचार होण्यासही साहाय्य होते. बहुतेकांना बिंदूदाबन उपचारपद्धत ही चीनमधून आलेली आहे, असे वाटत असते; परंतु प्रत्यक्षात तिचा उगम हिंदुस्थानातच झालेला आहे.

संत मीराबाई यांचे निवासस्थान आणि उपासनास्थान यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !


थोर श्रीकृष्णभक्त संत मीराबाई
  भाविकांना संतांमधील सात्त्विक स्पंदनांचा लाभ व्हावा, यासाठी संतांशी संबंधित वस्तू जतन करून ठेवण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. आजही त्यांंचे निवासस्थान असलेला महाल, तसेच त्यांनी जेथे श्रीकृष्णाची उपासना केली, ते मंदिर राजस्थानातील सुप्रसिद्ध चितौडगडावर आहे. या दोन्ही वास्तू ४०० वर्षांहूनही अधिक पुरातन आहेत. त्यांमधील स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
      एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषासंदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

       ६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले जय गुरुदेव ।, हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले, काहींना पूर्वसूचना मिळाल्या, तर काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.

कान पकडून उठाबशा काढल्याने होणारे लाभ

१. हिंदु धर्माने दोन्ही कान पकडण्याचे जाणलेले महत्त्व
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१ अ. पूर्वी शाळेत गुरुजी विद्यार्थ्याचे काही चुकले, तर त्याला शिक्षा म्हणून दोन्ही कान पकडून १० उठाबशा काढायला लावत असणे आणि ती शिक्षा विद्यार्थ्याला अंतर्मुख करण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे : एखादी चूक झाल्यावर क्षमा मागायची असल्यास सनातनमध्ये आपण दोन्ही कान पकडून (डाव्या हाताने उजवा कान आणि उजव्या हाताने डावा कान पकडून) क्षमा मागतो, हे साधकांना ठाऊकच आहे. पूर्वी शाळेत गुरुजी विद्यार्थ्याचे काही चुकले, तर त्याला शिक्षा म्हणून दोन्ही कान पकडून १० उठाबशा काढायला लावत. उठाबशा काढणे म्हणजे गुडघ्यातून खाली वाकून बसणे आणि पुन्हा उभे रहाणे. आजकाल अशी शिक्षा कोणी करत नाही. खरेतर एखाद्याला चुकीची जाणीव व्हावी; म्हणून अंतर्मुख करण्यासाठी ही शिक्षा आध्यात्मिकदृष्ट्या योग्य होती. दोन्ही कान पकडल्याने सुषुम्नानाडी चालू होते, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्‍वासोच्छ्वास चालू होतो. सुषुम्नानाडी ही आध्यात्मिक स्तराची नाडी आहे. या नाडीने अंतर्मुखता प्राप्त होत असल्याने एखादी चूक झाल्यास क्षमा मागतांना दोन्ही कान पकडण्याचे महत्त्व आहे.
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती

साधकांनी 'श्रीकृष्ण' किंवा 'आकाशदेवता' यांच्या जपाऐवजी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा 'ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।' हा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना १३.३.२०१६ या दिवशीच्या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे वाचक किंवा हिंतचिंतक यापूर्वी दैनिकात आलेल्या सूचनेप्रमाणे श्रीकृष्ण किंवा आकाशदेवता यांचा जप करत होते, तेही काळानुसार महर्षींनी सांगितलेला जप करू शकतात.

विविध क्लृप्त्या काढून सनातनच्या आश्रमात प्रवेश मिळवू पहाणार्‍या संशयितांपासून सावधान !

साधकांना सूचना 
सनातनच्या एका आश्रमात नुकताच एक युवक आश्रम व्यवस्थापनास पूर्वकल्पना न देता थेट आश्रमात आला. त्याने 'मन:शांती मिळावी, यासाठी १-२ मासांकरता आश्रमात वास्तव्य करायच्या हेतूने आलो आहे,' असे सांगितले. त्याच्याशी अधिक संभाषण केल्यावर मी हिंदुत्वाचे बरेच कार्य केले. माझ्यासारखे अनेक युवक हिंदुत्वाचे कार्य करत असतात; मात्र त्यांच्या पाठीशी कुणी खंबीरपणे उभे रहात नाही. माझ्याकडे पैसे आहेत. नुसते कार्य करत राहिल्याने कंटाळलो. आता जरा मन:शांती हवी; म्हणून इकडे आलो. माझे इंग्रजी चांगले आहे, राहणीमान सभ्य आहे. तुम्ही मला स्वागत कक्ष स्वच्छता, शारिरीक सेवा काहीपण सेवा सांगा. मी प्रामाणिकपणे करीन, असे सांगितले.
अशा प्रकारे हा युवक आश्रमात प्रवेश मिळवण्याच्या हेतूने स्वतः एक हिंदुत्ववादी असल्याचे भासवणे, कोणतीही सेवा करण्याची सिद्धता दर्शवणे याद्वारे संबंधित साधकावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्यक्षात मात्र या युवकाचे वागणे-बोलणे साधकाला संशयास्पद जाणवले.
पूर्वकल्पना न देता, प्रसारातील कोणाचीही ओळख न देता अशा प्रकारे विविध क्लृप्त्या काढून संशयितांनी थेट सनातनच्या आश्रमात येण्याचे प्रकार वाढत असून साधकांनी योग्य ती सावधानता बाळगावी !

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !

       प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. आता त्यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाल्याची घोषणा करून महर्षींनी साधकांना अनमोल भेटच दिली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करून साधकांनी त्यांचा कशा प्रकारे लाभ करून घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे ! - पू. (सौ.) अंजली गाडगीळ
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांकडून मिळवायच्या गोष्टी
'देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. ज्याला घ्यायचे असेल, तो आमच्याकडून सर्वकाही घेऊ शकतो.
भावार्थ : 'देण्यासाठी आमच्याकडे काही नाही' मधील 'काही शब्द व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात आहे. सर्वकाही घेऊ शकतो मधील सर्वकाही अध्यात्माच्या संदर्भातील आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)


इतरांना मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
'मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
१. मानसिक स्तर : 'भुकेलेल्याला अन्न द्या', असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते 'भुकेलेला भुकेला का आहे ?', याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते.
२. आध्यात्मिक स्तर : 'साधना कर. देव अन्न देईल', असे म्हणणारे आध्यात्मिक स्तरावरचे असतात. ते 'भुकेलेला भुकेला का आहे ?', याचा विचार करतात आणि त्याला साधना करण्यास सांगतात. साधनेमुळे भुकेलेल्याचे प्रारब्ध पालटते. त्यामुळे कोणालातरी त्याला आयुष्यभर अन्न द्यावे लागत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

जम्मू-काश्मीरची सत्ता !

संपादकीय
     जम्मू-काश्मीर राज्यात पीडीपी-भाजप हे युतीचे शासन होते. मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांचे निधन झाल्यावर तेथे हे शासन नाही. ८ जानेवारी या दिवशी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू झाली. नियमाप्रमाणे राज्यात ९ एप्रिलपूर्वी विधानसभेचे अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे. मुफ्ती महंमद सईद यांचे निधन झाल्यावर त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपसमवेत सत्ता स्थापन करण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्यावर राजकीय किंवा सामाजिक दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात् त्यांची स्वतःची मानसिकताही भाजपसमवेत शासन स्थापण्यासाठी अनुकूल असते, असे मात्र नाही. दोन वर्षांपूर्वी जेव्हा जम्मू-काश्मीर राज्यात पीडीपीच्या नंतर अधिक जागा पटकावणारा भाजप हा पक्ष ठरला, तेव्हा या दोन पक्षांचे संयुक्त शासन स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यावर, भाजपसमोर पीडीपीच्या नेतृत्वाने म्हणजे मेहबुबा मुफ्ती यांनी आडमुठ्या अटी ठेवल्या होत्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn