Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शेतकरी केंद्रबिंदू असलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर !

  • शेतकर्‍यांसाठी २६ सहस्र ८९१ कोटी कोटींचे भरीव प्रावधान
  • गोसंवर्धनासाठी ३४ कोटी रुपये
  • अल्पसंख्यांकांसाठी ४०५ कोटी रुपयांची तरतूद
  • जलयुक्त शिवार योजनेसाठी १ सहस्र कोटी रुपये
  • यंदाचे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरे करणार
  • महसुली तूट ३ सहस्र ६४४ कोटी रुपये
      मुंबई - विकासाची कास धरणारा युती शासनाचा दुसरा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी १८ मार्च या दिवशी विधानसभेत सादर केला. राज्याचा २०१६-१७ वर्षीचा हा अर्थसंकल्प शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठेवून केला आहे. शेतकर्‍यांसाठी समर्पित असलेला आणि त्यांच्यासाठी २६ सहस्र कोटी ८९१ कोटी रुपयांची तरतूद केलेला; परंतु ३ सहस्र ६४४ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करतांना श्री. मुनगंटीवार यांनी विविध कवितांची साखरपेरणी करत शासन शेतकरी आणि महिला यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे सूतोवाच केले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, कृषी उत्पन्नात घट या संकटांतून राज्य जात असतांना कृषी क्षेत्रासाठी भरीव साहाय्याची तरतूद करणारा आणि त्याचसमवेत विकासकामांवर अधिकाअधिक भर देत; परंतु सामान्यांच्या खिशाला अधिक झळ बसणार नाही, असा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सादर केला.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंदिराच्या उत्सव निमंत्रण पत्रिकेवर मुसलमान अधिकार्‍याचे नाव : विहिंपकडून निषेध व्यक्त

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम
  • कर्नाटकमधील काँग्रेस शासनाने कधी मशीद किंवा चर्च यांच्या उत्सव समितीवर हिंदु अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे का ? 
  • यावरून मंदिरे पूर्णपणे भक्तांच्याच कह्यात असण्याचे महत्त्व लक्षात येते !
      बेंगळुरू - दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने विश्‍व हिंदु परिषदेने यावर आक्षेप घेऊन निषेध व्यक्त केला. हे मंदिर कर्नाटक शासनाच्या धर्मादाय विभागाच्या अंतर्गत असल्याने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी वा उपायुक्त यांची नेमणूक असते.
     महालिंगेश्‍वर मंदिराचा वार्षिक उत्सव १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेवर एका मुसलमानाचे नाव कसे छापले, असा प्रश्‍न विश्‍व हिंदु परिषदेने उपस्थित केला. ए.बी. इब्राहीम यांनी म्हटले आहे की, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून मी या मंदिराचा विकास केला आहे, तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही, मग आताच हे का घडले ?

श्रीराम सेना ओवैसी यांच्या विरोधात देशभर आंदोलन छेडणार !

भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्याचे प्रकरण
     रायचूर (कर्नाटक) - एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतमाता की जय म्हणण्याच्या संदर्भात देशद्रोही भूमिका घेतल्याविरुद्ध देशभर आंदोलन छेडणार, अशी घोषणा श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली आहे. श्री. मुतालिक म्हणाले, आम्ही असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा धिक्कार करतो. भारतमाता की जय म्हणण्याविषयी त्यांनी केलेले वक्तव्य सहन होण्यापलीकडचे आहे. त्यांना लोकसभेतून निलंबित केले पाहिजे. त्यांचे वक्तव्य देशाच्या एकात्मतेला धोकादायक आहे. जर ओवैसी यांना देशप्रेमाच्या घोषणा द्यायच्या नसतील, तर त्यांनी हा देश सोडून इतरत्र निघून जावे.


हिंदु महिलेशी लग्न केल्यामुळे चर्चने स्पष्टीकरण मागितले !

     कोच्ची (केरळ) - हिंदु महिलेशी लग्न केल्यावरून येथील सेंट जोसेफ चर्चकडून या चर्चचे सदस्य बेन्नी थोम्माना यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वी त्यांनी लिजा जयासुधन या हिंदु महिलेशी लग्न केले होते.
     बेन्नी यांनी चर्चचे धार्मिक विधी न करता लग्न केल्याप्रकरणी त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवण्यात आले असून त्यांना चर्चच्या विशेष प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. या संदर्भात बेन्नी म्हणाले,विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत ७ फेब्रुवारी २००५ मध्ये विवाहाची नोंदणी करण्यात आली आहे. मी कायदाविरोधी कोणतेही कृत्य केलेले नाही, तरीही आम्हाला धमकावले जात आहे. इतकी वर्षे या कुटुंबाने त्यांच्या लग्नाची माहिती लपवली होती. त्यामुळे याविषयी स्पष्टीकरण मागण्यात चर्चला उशीर लागल्याचे फादर पदायत्ती यांनी म्हटले आहे.

फेसबूकवर मोहन भागवत यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या धर्मांधाला अटक

      कोरबा (छत्तीसगड) - सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या धर्मांध युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर संघाचे कार्यकर्ते शांत झाले असून परिस्थिती सामान्य झाली आहे. कटघोरा येथील अमन हसन अली याने संघाच्या नवीन पोशाखावरून सरसंघचालकांच्या संदर्भात आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट केले होते. ही पोस्ट सर्वत्र पसरल्यावर संघ परिवारातील संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात येऊन आरोपीवर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण केला. शेवटी पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत आरोपीवर गुन्हा नोंद केला, तसेच त्याला अटकही केली. संघाने त्याच्या पोशाखात पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी ही पोस्ट टाकण्यात आली होती.

उमर खालिद आणि अनिबर्र्न भट्टाचार्य यांना ६ मासांचा अंतरिम जामीन संमत

      नवी देहली - जेएन्यूप्रकरणी मागील ३ आठवड्यांपासून तिहार कारागृहात बंदिस्त असलेले देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएन्यूतील) उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना पटियाळा हाऊस न्यायालयाने ६ मासांचा अंतरिम जामीन संमत केला आहे. या दोन्ही आरोपींवर जेएन्यूमधील एका वादग्रस्त कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना २५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनाचा आदेश दिला आहे; तसेच त्यांना या ६ मासांच्या कालावधीत देहलीच्या बाहेर जाता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
     न्यायालयाने निकाल देतांना सांगितले की, अनिर्बन आणि खालिद यांनी चांगले शिक्षण घेतले आहे. त्यांची विश्‍वसनीयता आणि कुटुंब यांच्याविषयी शासनाने कोणताही आक्षेप घेतला नाही आहे. या दोघांच्या विरोधातील आरोप गंभीर आहेत; मात्र त्यांच्या विरोधातील व्हिडिओ फुटेजच्या फॉरेन्सिक तपासाचा अहवाल येण्यास वेळ लागेल, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोघांनाही हा जामीन देण्यात येत आहे.
खासदार ओवैसी यांच्या कार्यक्रमांना उत्तरप्रदेश शासनाने अनुमती नाकारली

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - एम्आयएम्चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यामुळे देशभरात वातावरण तापले आहे. परिणामी उत्तरप्रदेशच्या शासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांवरून असदुद्दीन ओवैसी यांच्या दोन कार्यक्रमांना अनुमती नाकारल्याने खासदार ओवैसी यांना नियोजित कार्यक्रम रहित करावे लागले आहेत. बिहारमध्येही दोन याचिका प्रविष्ट करून ओवैसी यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंगालमध्ये इसिस या आतंकवादी संघटनेच्या समर्थकाला अटक

      नवी देहली - इसिस या आतंकवादी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेेने १७ मार्च या दिवशी बंगालमध्ये अटक केली. या समर्थकाचे नाव आशिक अहमद उपाख्य राजा असे असून तो बंगालच्या हुगली जिल्ह्यातील आहे. त्याला देहलीच्या विशेष न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप युतीचे शासन स्थापन होण्याची चिन्हे

पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची नरमाईची भूमिका
      नवी देहली - गेल्या अडीच मासांपासून जम्मू-काश्मीरमध्ये चालू असलेली राष्ट्रपती राजवट संपून तेथे पीडीपी-भाजप युतीचे शासन स्थापन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शासन स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे कळते.
      तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या मेहबूबा यांनी भाजपशी नव्याने युतीचे शासन स्थापन करण्यावरून आडमुठी भूमिका घेतली होती. राज्यात ८ जानेवारी या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अधिवेशन ९ एप्रिलपूर्वी बोलावणे आवश्यक आहे अन्यथा राज्याला नव्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

     श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने २ आतंकवाद्यांना ठार मारले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिकांनी १७ मार्चच्या रात्रीपासून हंदवाडा भागातील पेठा वदर भागात आतंकवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम चालू केली आहे. या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने गोळीबार चालू केला. या गोळीबाराला सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात २ आतंकवादी जागीच ठार झाले. हे आतंकवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याविषयी अद्याप कळू शकले नाही.

कोपरगाव (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहातून ८ गायींची सुटका

      कोपरगाव - शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आयेशा वसाहतीमधील पशूवधगृहामध्ये धाड टाकून ८ गायींची सुटका केली. (राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा होऊनही राज्यातील गोवंश अजूनही असुरक्षित आहे. गोवंशियांच्या रक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक ! - संपादक) ही घटना १६ मार्च या दिवशी पहाटे घडली आहे. वसाहतीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये ६ गायी आणि २ वासरे यांचे पाय बांधून ठेवलेले होते. पोलिसांनी त्या गायींची सुटका करून त्यांना कोकमठाण येथील गोकुळधाम गोरक्षा केंद्रात पाठवले़ आहे. या प्रकरणी धर्मांध सिकंदर शब्बीर कुरेशी याच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.


कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात विशेषाधिकारभंगाची

      मुंबई - शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीविषयी कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी असत्य माहिती दिली. सार्वभौम सभागृहाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटील यांनी श्री. खडसे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना विधानसभेत मांडली.
     विखे-पाटील म्हणाले की, १४ मार्च या दिवशी विधानसभेत दुष्काळाच्या चर्चेला उत्तर देतांना कृषीमंत्री श्री. खडसे यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारी देतांना वर्ष २०१२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे सांगितले; मात्र वर्ष २००९ मध्ये १६०५, २०१० मध्ये १७४१, २०११ मध्ये १५१८, २०१२ मध्ये १४७३, २०१३ मध्ये १२९६, २०१४ मध्ये १९८१ आणि २०१५ मध्ये ३२२८ अशी प्रत्यक्ष आकडेवारी आहे. त्यामुळे कृषीमंत्री श्री. खडसे यांनी जाणीवपूर्वक आकडेवारी लपवून वस्तुस्थितीशी विसंगत महिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे.


(म्हणे) समलैंगिकता लोकांची खाजगी गोष्ट असून तो गुन्हा नाही!

संघाने समलैंगिकतेविषयी धर्मशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसावळे यांचे मत
     नवी देहली - समलैंगिकता हा गुन्हा नसून ती लोकांची खाजगी गोष्ट आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समलैंगिकतेवर चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसावळे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. समलैंगिकतेकडे गुन्ह्याच्या दृष्टीकोनातून पाहू नये, तसेच त्यासाठी कुणालाही शिक्षा मिळू नये, असेही ते म्हणाले. (समलैंगिकता ही विकृती आहे. ती समाजाच्या उन्नतीमध्ये अडथळा असून समाजाला अधोगतीकडे नेणारी आहे ! - संपादक) कलम ३७७ अंतर्गत समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा निकाल देहली उच्च न्यायालयाने दिला होता; परंतु त्यावर सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा असल्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका चालू आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानित वसतीगृहांच्या ८ सहस्र कर्मचार्‍यांचे वेतन थकीत

राज्य शासनाने या प्रकरणी लक्ष घालून वसतीगृहांच्या कर्मचार्‍यांना 
लवकरात लवकर अनुदान मिळवून द्यावे !
     पुणे - राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या अनुदानित वसतीगृहांच्या ८ सहस्र कर्मचार्‍यांचे १ वर्षाचे वेतन थकीत आहे, अशी माहिती मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह संस्थाचालक असोसिएशनचे सचिव अशोकलाल शहा यांनी दिली. वसतीगृहांना दिल्या जाणार्‍या अनुदानात राज्य शासनाकडून सातत्याने कपात केली जात असल्याने गेल्या ४ वर्षांपासून इमारत भाडे, २ वर्षांपासूनचे परिपोषण अनुदानही थकीत आहे. परिणामी वसतीगृह चालकांना उसनवारीद्वारे वसतीगृहे चालवावी लागत आहेत. राज्यात अशी २ सहस्र ३८८ वसतीगृहे असून तेथे ८ सहस्र १०४ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन आणि अन्य मार्ग यांनी लढा देत आहेत; परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत, असेही शहा म्हणाले.

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू

      पुणे - पिंपरी-चिंचवड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चव्हाण यांनी लोणीकंद येथील एका लॉजमध्ये १६ मार्च या दिवशी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे चव्हाण यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या झाली, असा संशय निर्माण झाला आहे. बिर्ला रुग्णालय, चिंचवड देवस्थान, लोणावळा जवळील वॉटरपार्क आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दीतील अवैध बांधकामे अशा अनेक प्रकरणांचा तुकाराम चव्हाण हे पाठपुरावा करत होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


अभाविपच्या वतीने ओवैसीच्या पुतळ्याचे दहन

      पुणे - खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी गळ्यावर शस्त्र ठेवले, तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असे संतापजनक विधान केले. त्याचा निषेध म्हणून १६ मार्च या दिवशी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स.प. महाविद्यालय शाखेच्या वतीने ओवैसीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
     महाविद्यालयातून फेरी काढून सर्व कार्यकर्ते स.प. महाविद्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ जमले. त्यानंतर त्या ठिकाणी भारतमाता की जय, वन्देे मातरम् अशा घोषणांसह प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जो या देशात रहातो, त्या प्रत्येकाने भारतमाता की जय म्हटले पाहिजे. वन्देे मातरम् म्हणणे आणि भारतमातेचा जयजयकार करणे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया अभाविपचे श्री. ओंकार मारणे यांनी व्यक्त केली.

राज्यावर ३ लक्ष ३३ सहस्र १६० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर !

       मुंबई, १८ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्याचा आर्थिक विकास दर ८ टक्के राहिला आहे, असे राज्य शासनाने २०१५-१६च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे; मात्र त्याच वेळी राज्यावर ३ लक्ष ३३ सहस्र १६० कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरडोई सुमारे ३० सहस्र रुपये कर्ज असून कर्जाच्या डोंगरावर दुष्काळाचे ढग आहेत. राज्यातील कृषी आणि संलग्न क्षेत्रातील उत्पादन घटले आहे. महागाई आटोक्यात आल्याचा दावा करतांनाच ग्रामीण, शहरी भागांतील खाद्यपदार्थ महागल्याची स्वीकृती राज्य शासनाने दिली आहे.

भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी पाककडून अ‍ॅपचा वापर !

येनकेन प्रकारेण भारताला अस्थिर करणारा धूर्त पाक ! भारतावर सतत कुरघोड्या 
करणार्‍या पाकला शासनाने आता तरी धडा शिकवावा !
पठाणकोट आक्रमणाच्या वेळीही झाला होता या अ‍ॅपचा वापर !
     नवी देहली - भारतीय सैन्यदलाच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. याविषयीची माहिती उघड झाल्यानंतर गूगलने हे अ‍ॅप त्यांच्या प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. विशेष म्हणजे पठाणकोट येथे जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी या अ‍ॅपचा वापर करून भारतीय सैन्याच्या हालचालींची महत्त्वाची माहिती मिळाली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

टाकळी (नाशिक) येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन

     नाशिक - श्री मारुति देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ, अगर टाकळी येथे श्रीरामनवमी म्हणजे १५ एप्रिल ते हनुमान जयंती म्हणजे २२ एप्रिल या कालावधीत प्रसिद्ध वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
      १५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. या व्याख्यानमालेचे उद्घाटन नाशिकचे जिल्हा प्रमुख आणि सत्र न्यायाधीश ए.एम्. ढवळे यांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गायकवाडी येथील गावातील रखडलेल्या कामांची लवकरात लवकर पूर्तता करा ! - श्रीराम सेनेचे निवेदन

      कोडणी (जिल्हा बेळगाव) - गायकवाडी गावात कर्नाटक शासनाकडून प्राथमिक सुविधांचे काम चालू आहे. ही कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. यात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न, अर्धवट रस्ते, तुंबलेली गटारे आणि शाळेच्या आवारातील धोकादायक स्थितीतील पाण्याची टाकी लवकरच काढून टाकणे यांचा समावेश आहे. ही सर्व कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण न केल्यास श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन श्रीराम सेनेच्या वतीने कोडणी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिलीप जाधव यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री संतोष गायकवाड, प्रल्हाद तिप्पे, प्रवीण खोत, उदय खोत, प्रताप कुंभार, शुभम टीपुगडे, आकाश जाधव यांसह गावातील नागरिक आणि श्रीराम सेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (रस्ते, पाणी यांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी जर आंदोलन करावे लागते, तर प्रशासकीय अधिकारी नेमके काय काम करतात ? - संपादक)

श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोशाळेस चारावाटप

      बेळगाव - श्रीराम सेनेचे बेळगावचे जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर यांच्या ४४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीराम सेनेच्या वतीने समाधीमठ येथील गोशाळेसाठी एक ट्रक चारा देण्यात आला. हा चारा येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. या वेळी श्री. सागर श्रीखंडे म्हणाले, श्री. रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांमध्ये जागृती करून प्रभावी संघटन उभारले आहे. या वेळी सर्वश्री राजू सुतार, विठ्ठल कोगले, उत्तम कमते, प्रसाद आैंधरकर, सूरज खाडे, निवास पोवार, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंख्येच्या तुलनेत मुसलमानांचे साक्षरतेचे प्रमाण ८३.६ टक्के आणि हिंदूंचे ८१.८ टक्के !

राज्यात साक्षरतेमध्ये हिंदूंपेक्षा मुसलमान आघाडीवर !
        मुंबई, १८ मार्च (विशेष प्रतिनिधी) - शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने मुसलमान तरुणांची प्रगती होत नसल्याचे म्हटले जाते; मात्र राज्याच्या २०१५-१६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार साक्षरतेच्या टक्केवारीत मुसलमानांनी हिंदूंपेक्षा आघाडी केल्याचे दिसून येते. राज्यातील मुसलमानांचे लोकसंख्येच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण ८३.६ टक्के आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ७९.१ टक्के, तर शहरात ८५.२ टक्के आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात मुसलमानांच्या साक्षरतेचा दर ६८.५ टक्के आहे, जो अन्य सर्व धर्मियांपेक्षा अल्प आहे. दुसरीकडे राज्यात हिंदूंच्या साक्षरतेचे प्रमाण ८१.८ टक्के आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७६.७ टक्के, तर शहरी भागात ८९.३ टक्के असे प्रमाण आहे. हा आर्थिक पाहणी अहवाल वर्ष २०११ च्या आकडेवारीवर आधारित आहे. (यातून हिंदूंनी बोध घेऊन हिंदूंना साक्षर करून देशहितासाठी संघटित केले पाहिजे. - संपादक)

तेलंगणमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन

हिंदुत्ववादी, अधिवक्ते, 
पत्रकार आणि धर्माभिमानी यांचा सहभाग 
डावीकडून श्री. श्रीहरी, श्री. चेतन जनार्दन, 
श्री. घनःश्याम व्यास, श्री. शरत् चंद्र आणि श्री. नेला तुकाराम
         इंदूर (तेलंगण) - येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० मार्च या दिवशी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन, श्री नेला तुकाराम, अधिवक्ता श्री. शरत् चंद्र आणि हिंदु धर्माभिमानी श्री. घनःश्याम व्यास, तसेच शिवसेनेचे नगराध्यक्ष श्री. श्रीहरी उपस्थित होते. या अधिवेशनात एदुलापुरम् (आदिलाबाद), करीनगर (करीमनगर) आणि इंदूर (निझामाबाद) येथील हिंदुत्ववादी, अधिवक्ते, पत्रकार आणि धर्माभिमानी सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला २३ प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आतंकवादाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्‍वभूमीवर सुफी विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण ! - पंतप्रधान

      नवी देहली - इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती आहे. सुफी विचार हे मूलतः आतंकवादाच्या विरोधात असल्याने आतंकवादाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्‍वभूमीवर या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
     ऑल इंडिया उलेमा अ‍ॅण्ड मशाइख बोर्डच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड सूफी फोरम या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात पाकिस्तान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, रशिया यांसह विविध २० देशांमधील धार्मिक क्षेत्रातील प्रतिनिधी, विचारवंत आणि विद्यार्थीं सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या आरंभी भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान पुढे म्हणाले, आपला लढा हा आतंकदाविरुद्ध आहे, कुठल्याही धर्माविरुद्ध नाही. भारतामध्ये सुफी विचार ही इस्लामची ओळख आहे. मानवी मूल्ये आणि अमानवी शक्ती यांच्यातील संघर्षात सुफी विचार निणार्यक भूमिका बजावू शकतो. भारतीय संगीत आणि कला यांच्या विकासातही सुफी विचारांचे मोठे योगदान आहे. माझ्या शासनाच्या सबका साथ सबका विकास, या घोषणेमागे सुफी विचारांची प्रेरणा आहे.

आझाद हिंद सेनेच्या सैनिकावर भीक मागून जगण्याची वेळ असे केवळ भारतातच घडते !

     नवी देहली - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारे आझाद हिंद सेनेचे ९० वर्षीय सैनिक श्रीपत आल यांच्यावर आज दारोदार भटकून भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. (स्वातंत्र्यसैनिकांना स्वतःच्या देशामध्ये भीक मागून जगण्याची वेळ येणे, हे देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. सैनिकांकडे दुर्लक्ष करून त्यांना देशोधडीला लावणार्‍या आतापर्यंतच्या शासनांना राष्ट्रप्रेमी नागरिक खडसवतील का ? - संपादक)
     लहान असतांना वडिलांकडून क्रांतीकारकांच्या कथा ऐकल्याने आणि लहानपणापासून स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात राहिल्याने श्रीपत आल यांच्यात देशभक्तीची भावना जागृत झाली. झांसी येथे सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. वर्ष १९४३ मध्ये ते आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. श्रीपत यांच्याकडे ७ एकर भूमी होती. त्यांच्या मुलाने सर्व मालमत्ता दारू आणि जुगार यांच्या नादात विकून टाकली. जोपर्यंत शरीर साथ देत होते, तोपर्यंत आल यांनी शेतात मजूरी केली आणि पोट भरले. आता शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांना भीक मागावी लागत आहे. श्रीपत त्यांच्या पत्नीसह येथील हंसारी भागातील एका झोपडपट्टीत रहातात.

कर्नाटक येथे एका बैठकीमध्ये भाजपच्या समर्थनार्थ हात वर न केल्यामुळे जनता दल(धर्मनिरपेक्ष)च्या नेत्याने एका महिला कार्यकर्तीच्या कानशिलात लगावली !

     कोपल - कर्नाटक येथे एका बैठकीमध्ये भाजपच्या समर्थनार्थ हात वर न केल्यामुळे जनता दल (धर्मनिरपेक्ष) च्या नेत्याने त्यांच्याच पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीला कानशिलात लगावली. चिनप्पा असे या नेत्याचे नाव आहे. (महिलांवरील अत्याचारांविषयी आणि अधिकारांविषयी कथित आंदोलन करणार्‍या तथाकथित महिला संघटना याविरुद्ध आवाज उठवणार का ? - संपादक)

पुढील आठवड्यात विधिमंडळात जातपंचायतविरोधी विधेयक मांडणार ! - राम शिंदे

      मुंबई - जातपंचायतीच्या अत्याचाराच्या विरोधात पुढील आठवड्यात विधेयक सादर करण्यात येणार आहे. त्यात असे गुन्हे करणार्‍यांना ३ वर्षे कारागृह आणि १ लक्ष रुपयांच्या दंडाचे प्रावधान करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री श्री. राम शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
     नंदुरबार जिल्ह्यातील कंजरवाडा समाजाच्या जातपंचायतीने तेथील एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तसेच तिच्या १२ वर्षांच्या मुलाला तापलेली कुर्‍हाड हातात धरण्याची शिक्षा दिली. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उपरोक्त प्रकरणी प्रविष्ट झालेल्या तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विधवा महिलेच्या कुटुंबातील ४ सदस्य आणि जातपंचायतीमधील ६ जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आहे. सध्या त्यांना अंतरिम जामीन संमत झाला आहे. अधिक अन्वेषणासाठी हे प्रकरण जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात येणार आहे. विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सदस्य डी.एस्. आहीर, विजय वडेट्टीवार आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना श्री. शिंदे यांनी ही माहिती दिली.

भारतमातेचे तैलचित्र सार्वजनिक ठिकाणी लावावे ! - आमदार संजय केळकर

      मुंबई - भारतमाता की जय हा मूलमंत्र प्रत्येक भारतियांच्या नसानसात रुजला पाहिजे, त्यासाठी महापुरुषांच्या चित्राप्रमाणेच भारतमातेचे तैलचित्र शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक ठिकाणी लावावे, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. संजय केळकर यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे मांडली. (अशी मागणी करणारे भाजपचे आमदार श्री. संजय केळकर यांचे अभिनंदन ! - संपादक)

पुरोगाम्यांचा अनाठायी उच्छाद हा हिंदु धर्मासाठी मोठा धोका ! - शशिधर जोशी, सनातन संस्था

नाशिक येथे हिंदु धर्मजागृती सभा 
व्यासपिठावर उपस्थित डावीकडून
श्री. शशिधर जोशी आणि श्री. पराग गोखले
       गाजरवाडी, (जिल्हा नाशिक) १८ मार्च (वार्ता.) - डॉ. दाभोलकर, श्याम मानव, प्रा. कलबुर्गी यांसारखी निधर्मीपणाचा टाहो फोडणारी मंडळी सतत हिंदु धर्म, देवदेवता आणि साधू-संत यांवर केवळ टीका करतांना आढळतात. अंधश्रद्धा निर्मूलनापेक्षा ते हिंदु धर्म नष्ट करण्यासाठीच अविरत प्रयत्न दिसतात. या पुरोगाम्यांचा अनाठायी उच्छाद हा हिंदु धर्मासाठी मोठा धोका आहे. त्यांच्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे कार्य सनातन संस्था करत आहेत. त्यामुळेच भोंदूबाबांच्या संदर्भात सनातनने ४ ग्रंथ प्रकाशित करून त्याद्वारे समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनही केले जात आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशिधर जोशी यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाने मला नामांकन दिले नाही, तर दंगली होतील !

स्वत:ला उमेदवारी मिळण्याची चिन्हे धूसर झाल्यावर दंगलीची भाषा करणारे ट्रम्प अमेरिकेचे 
राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्यांच्या देशात, तसेच जगात ते कधीतरी शांतता प्रस्थापित करतील का ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांची चेतावणी
     पाल बीच - मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी मिळूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मला रिपब्लिकन पक्षाने नामांकन दिले नाही, तर दंगली होतील, अशी चेतावणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. अमेरिकेत ८ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून नामांकन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या १ सहस्र २३७ प्रतिनिधींच्या आकड्याजवळ ते जाऊन पोहोचले आहेत; मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ट्रम्प गाठू शकणार नाहीत, अशी शक्यता आहे. तसे झाले, तर पक्षाकडून दुसरे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले जाऊ शकते. ट्रम्प यांची धोरणे रिपब्लिकन पक्षाच्या मूळ विचारधारेशी विसंगत आहेत, अशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धारणा आहे. बेकायदा १.१ कोटी स्थलांतरितांना हाकलून देऊ, अमेरिकेमध्ये मुसलमानांना बंदी करू इत्यादी वक्तव्ये ट्रम्प यांनी केली होती.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या उत्सवाचा निमंत्रक अन्य धर्मीय असणे हा धर्मनिरपेक्षतेचा अतिरेकच !
     दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिर कर्नाटक शासनाच्या धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येत असून या मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापले आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : karnatak sarkarne Mahalingeshwar mandirke utsav patrikapar Muslim adhikarika nam nimantrakke rupme chhapa.
kya yaha dharmanirapekshta ka atirek nahi ?
जागो ! : कर्नाटक सरकारने महालिंगेश्‍वर मंदिर के उत्सव पत्रिका पर मुस्लीम अधिकारीका नाम निमंत्रक के रुप में छापा.
क्या यह धर्मनिरपेक्षता का अतिरेक नही ?

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच अंतिम उपाय ! राजश्री तिवारी

तुळजापुरात (जिल्हा धाराशिव) हिंदु 
धर्मजागृती सभेला ६०० हिंदूंची उपस्थिती 
दीपप्रज्वलन करताना डावीकडून श्री. सांगोलकर आणि सौ. तिवारी
         तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १८ मार्च (वार्ता.) - राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा होऊनही गोवंशाची राजरोस हत्या केली जात आहे, व्यवस्थापनाच्या नावाखाली हिंदूंची देवळे कह्यात घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. अल्पसंख्यांकांच्या यात्रेला अनुदान, तर हिंदूंच्या यात्रांवर कर लादला जात आहे. यांसारख्या अनेक समस्या आज देशात बहुसंख्य हिंदू असतांनाही निर्माण झाल्या आहेत. हे सर्व थांबवायचे असेल, तर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच अंतिम उपाय असल्याचेे मत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी व्यक्त केले. येथील बस आगाराच्या पाठीमागे आहे, असे लोहिया मंगल कार्यालयात आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत सौ. तिवारी बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या वतीने अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर उपस्थित होते, तर ६०० हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

भेलाटांड (धनबाद) येथील श्री श्री १००८ श्री महारूद्र यज्ञात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मशिक्षण अन् धर्मजागृती यांविषयी प्रवचनांचे आयोजन

डावीकडून कु. निशाली सिंह आणि उपस्थितांना 
मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जाखोटिया
     भेलाटांड (धनबाद), १८ मार्च (वार्ता.) - येथील शिवमंदिरात ७ मार्चपासून चालू असलेल्या श्री श्री १००८ श्री महारूद्र यज्ञात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृतीच्या दृष्टीने ३ दिवस विविध विषयांवर प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. १३ मार्चला समितीचे पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी धर्माची सद्य:स्थिती, धार्मिक उत्सवांतील कुप्रथा आणि त्यावरील उपाय यांविषयी, तर सनातन संस्थेचे झारखंड राज्य समन्वयक श्री. प्रदीप खेमका यांनी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. १४ मार्च या दिवशी विविध धार्मिक आणि सामाजिक कृती अन् त्यामागील शास्त्र, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया आणि कु. निशाली सिंह यांनी प्रोजेक्टरद्वारे विविध चलचित्रे दाखवून सविस्तर माहिती दिलीे. १५ मार्च या दिवशी देवालयात प्रवेश करण्यापासून परत तेथून निघेपर्यंत करायच्या वेगवेगळ्या कृतींमागील शास्त्राविषयी श्री. सुराल आणि कु. निशाली सिंह यांनी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी श्री. सुराल यांनी यज्ञ महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याविषयी आयोजकांचे आभार मानले.

श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी चार मासांनी वाढवली !

गोव्यात आतंकवादी येऊन राहून गेले, तर शासनाला चालते; मात्र प्रखर हिंदुत्ववादी श्री. प्रमोद 
मुतालिक यांच्यावर बंदी लादली जाते ! शासनाचे संस्कृतीद्रोही उपक्रम उघड होतील, याच भीतीने संस्कृतीरक्षकांचे असे दमन केले जात आहे, हेच यातून उघड होते !
     पणजी - श्रीराम सेनेचे संस्थापक तथा प्रखर हिंदुत्ववादी प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावरील गोवा प्रवेशबंदीमध्ये चार मासांनी वाढ केल्याचा आदेश राज्याच्या गृहखात्याने १७ मार्च या दिवशी दिला आहे. श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर १५ जुलै २०१६ पर्यंत गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. 
    उत्तर गोवा जिल्हाधिकारी निला मोहानन, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी वेनान्सियो फुर्तादो आणि अंतर्गत गृह सचिव नितल आमोणकर आदींनी आतापर्यंत बंदी वाढवण्यासाठी ८ वेळा पुढील दिनांकांना बंदीचे आदेश काढले आहेत. १९ आणि २० ऑगस्ट २०१४, १८ ऑक्टोबर २०१४, १६ जानेवारी २०१५, १४ मार्च २०१५, १५ जुलै २०१५, १४ सप्टेंबर २०१५, १५ जानेवारी २०१६ आणि आता १७ मार्च २०१६ या दिवशी बंदी घालणारे आदेश काढले आहेत.

जुने गोवे येथील हातकातरो खांबाचे जतन करणार ! - सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर

हिंदूंवरील अत्याचारांची आठवण करून देणार्‍या हातकातरो 
खांबाचे जतन करणारे श्री. ढवळीकर यांचे अभिनंदन !
इतर लोकप्रतिनिधी हिंदूंच्या सांस्कृतिक वारशांविषयी काहीच का बोलत नाहीत ?
गोवा विधानसभा अधिवेशन २०१६
श्री. रामकृष्ण
(सुदिन) ढवळीकर
     पणजी, १८ मार्च (वार्ता.) - जुने गोवे येथील हातकातरो खांबला ऐतिहासिक महत्त्व आहे. वाहतुकीच्या वर्दळीवर उपाययोजना काढून या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या खांबाचे जतन केले जाईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर यांनी विधानसभेत केले.
    पोर्तुगीज काळात धर्मच्छळाच्या (इन्क्विझिशन) काळात जुने गोवे येथील या हातकातरो खांबाचा वापर हिंदूंना आणि धर्मांतरित झालेल्या मूळ हिंदूंना शिक्षा देण्यासाठी, तसेच छळण्यासाठी वापर केला जात होता. त्यामुळे या खांबाचे महत्त्व ऐतिसहासिकदृष्ट्या मोठे आहे. काही जणांकडून वाहतुकीला अडचण होते या नावाखाली हा खांब हटवण्याची मागणी केली जात होती; मात्र श्री. ढवळीकर यांनी हा खांब हटवला जाणार नाही, हे विधानसभेत १७ मार्च या दिवशी स्पष्ट केले. विधानसभेत शून्य प्रहरात काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी हा हातकातरो खांब असलेल्या ठिकाणी ७ रस्ते मिळत असल्याने हे अपघातप्रवण क्षेत्र झाले असल्याचे सूत्र उपस्थित केले.

जिल्हाधिकारी, तसेच श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी १ मास कैद्यांनी बनवलेले जेवण खावून दाखवावे ! - हिंदु विधीज्ञ परिषद

        मुंबई - जिल्हाधिकारी, तसेच श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी १ मास कारागृहातील कैद्यांकडून बनवलेले जेवण खावून दाखवावे, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तीन मास प्रायोगिक तत्त्वावर महिला कैद्यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या प्रसादाचे लाडू बनवून घेता येईल, असा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महिला कैद्यांकडून लाडू बनवून घेण्याच्या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या निवेदनाची कोणतीही नोंद न घेता, तसेच कोणतेही धर्माचार्य, शंकराचार्य, साधू-संत यांच्याशी विचारविनिमय न करता अथवा सल्ला न घेता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केवळ अट्टाहासापोटी एकाधिकारशाहीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वरील आवाहन करण्यात येत आहे, असे हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगितले.

कै. विजय गणपति जाधव यांनी मृत्यूसमयी गाठला ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर !

कै. विजय जाधव
       संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) - येथील कै. विजय गणपति जाधव यांच्या १२ व्या दिवशी म्हणजेच १५ मार्चला कै. जाधव यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठल्याचे घोषित करण्यात आले. सनातन संस्थेचे गडहिंग्लज येथील साधक श्री. बाबूराव कडूकर यांनी कै. विजय जाधव यांनी मृत्यूसमयी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठून जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटका झाली आहे, असे सांगताच सर्वांनी भावावस्था अनुभवली.
       कै. जाधव यांचे ४ मार्च या दिवशी रात्री १२ वाजता निधन झाले. त्यांच्या बाराव्याला ४० हून अधिक नातेवाईक, साधक उपस्थित होते. या वेळी सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी अशा कठीण प्रसंगातही देवच पाठीराखा असल्याची भावना व्यक्त करून श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित नातेवाईक आणि अन्य नागरिक यांनी आध्यात्मिक स्तर ६० प्रतिशत होणे म्हणजे काय, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटका होण्यासाठी काय करावे, तसेच अन्य माहिती जाणून घेतली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. निगोंडा पाटील उपस्थित होते.

सागरी सुरक्षेकडे केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष भारतासाठी धोकादायक !

    स्वातंत्र्यानंतर राजकीय नेतृत्वाने सागरी सुरक्षेविषयी उदासीनताच दाखवली आहे. राजकीय नेतृत्वाने इतिहासातून धडा घेण्यापेक्षा इतर गोष्टींतच रस घेतला, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. स्वातंत्र्यानंतर समुद्रकिनारे तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. तस्करीविषयी अनेक प्रकरणे उघडकीस येऊनही या गोष्टींकडे कानाडोळाच केला गेला. भारतात आतंकवादी आक्रमणांसाठी समुद्रमार्गांचा वापर केला गेला, तरीही या विषयातील उदासीनता संपली नाही. शेजारी राष्ट्रांच्या कुरघोड्यांमुळे सध्या भारतीय सीमा भूक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात आहेे; परंतु सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेविषयी फार चर्चा केली जात नाही.

शासनाने तिथीनुसार शिवजयंतीची सुट्टी जाहीर करावी ! - हिंदु एकता आंदोलन पक्ष

      श्रीरामपूर (जिल्हा नगर), १८ मार्च - महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचे शासन येऊनही २ वर्षांत शिवजयंतीची सुट्टी तिथीनुसार देण्यात आली नाही. शासनाने तिथीनुसार शिवजयंती साजरी करून यंदाच्या वर्षी २६ मार्चला शिवजयंतीनिमित्त शासकीय सुट्टी द्यावी, अशी मागणी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये केली. या प्रसंगी श्रीरामपूर येथे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे म्हणाले की, समान नागरी कायद्याची भाषा करणारे भाजप शासन सत्तेत येऊन २ वर्षे झाली; पण अजून ना समान नागरी कायदा झाला ना अयोध्येत राममंदिराची उभारणी झाली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, मुंबई शहराध्यक्ष धर्मेश व्यास यांनीही मनोगत व्यक्त केले.

सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधींची वैचारिक दिवाळखोरी !

    काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना नकली पंडित संबोधले. त्यानंतर गांधीजी आमचे, सावरकर तुमचे, असेही वक्तव्य करून स्वत:च्या कोत्या, संकुचित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेचे प्रदर्शन केले. काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रतिदिन कुठला ना कुठला वाद निर्माण करत देशाचा वेळ आणि पैसा या दोन्हींचा पुष्कळ प्रमाणात व्यय करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. देशासमोरील विविध आव्हाने सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार्‍या शासनाला वेठीस धरण्याचा एक केविलवाणा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून केला जात आहे. वर्तमानातील सूत्रे अल्प पडतात; म्हणून कि काय त्यांनी राष्ट्रपुरुष आणि त्यांचे अजोड असे कर्तृत्व यांना विभागण्याची उपरती काँग्रेस आणि राहुल गांधी यांना झाली आहे.

एका डाकूला देशभक्त बनवून स्वातंत्र्यचळवळीत सहभागी करून घेणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई !

     वर्ष १८५७ मध्ये स्वातंत्र्याचे युद्ध चालू झाले होते. झाशीत इंग्रजांना पिटाळून लावण्यात आले होते. राणीने झाशीचे राज्य पुन्हा जिंकून कह्यात घेतले. त्यानंतर राणीला समजले की, बरुआ सागरच्या जवळ रावली गावचा एक निवासी डाकू सागर सिंह सर्वत्र धुमाकूळ घालत होता. राणी स्वत: स्त्री-सेनेच्या एका तुकडीसह डाकूला पकडून बंदी बनवण्यासठी निघाली. एके ठिकाणी राणीने सुंदराबाईच्या साहाय्याने सागर सिंहला जिवंत पकडून बंदी केले आणि स्वस्थानी आणले. तेव्हा राणीने सागर सिंह याच्याकडून डाकूचे निकृष्ट आणि पलायनवादी जीवन जगण्यामागील कारण जाणून घेण्याची इच्छा दर्शवली. सागर सिंह म्हणाला, मी पण एकेकाळी प्रतिष्ठित सैनिक होतो; परंतु इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांमुळे मला डाकू बनण्यास बाध्य केले. डाकूचे सत्यवचन ऐकून झाशीची राणी अतिशय प्रभावित झाली. तिने सागर सिंहचे अपराध क्षमा केले. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र संग्रामात सर्व डाकूंनी संघटितपणे झाशीच्या राणीला साहाय्य करून पूर्णपणे सहकार्य केले. सागर सिंह असा देशभक्त झाला की, त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध करतांना झाशीत वीरगती प्राप्त केली. (संदर्भ : साप्ताहिक हिंदू सभावार्ता, १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१४) हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची ईश्‍वरानेच निवड केलेली असणे

श्री. अशोक रेणके
     ईश्‍वराने धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धर्मनिष्ठ, सत्यनिष्ठ, ईश्‍वरनिष्ठ, तत्त्वनिष्ठ, ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून ईश्‍वराच्या आशीर्वादानेे धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ हिंदु राष्ट्र निर्मितीच्या प्रेरणेने एकवटलेली सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांची निवड केली आहे. त्यांच्याकडून ईश्‍वर त्याला अपेक्षित असे हिंदु राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करवून घेणार आहे, असेच सर्वांना वाटते. याचे कारण असे आहे की, प.पू. डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे सर्व साधक धर्मप्रेमी, श्रद्धावान आणि भक्तीभावाने ओथंबलेले असून ते सर्व साधक स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून केवळ गुरुनिष्ठेने गुरूंच्या कार्यात त्यांनी वाहून घेतलेले आहेत. त्यामुळे हे कार्य ते पूर्णत्वाला नेणारच आहेत, याची पूर्ण निश्‍चिती आहे.

स्त्रीरूपी ईश्‍वरी धनाचे रक्षण प्रत्येक हिंदु पुरुषाने प्राणपणाने करणे, हे त्याचे प्रथम कर्तव्य !

     हिंदु स्त्री ईश्‍वराने विश्‍वाला दिलेले सर्वांत मोठे धन आहे. धर्माचरण करून स्वत: सर्व कर्तव्ये करत सर्वांवर योग्य संस्कार होण्यासाठी आयुष्यभर सर्वस्वाचा त्याग करणारी, सर्वांसमोर आदर्शाचे मूर्तीमंत उदाहरण असणारी, कधीही स्वत:पेक्षा इतरांचा अधिक विचार करणारी आणि त्यागातच आनंद मानणारी हिंदु स्त्री आदर्शवत् आहे. स्वत:च्या धर्माचरणातून सर्वांवर योग्य संस्कार करून जगामध्ये आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करत स्वत:तील धर्माचरणाची शक्ती ती सर्वांना आशीर्वादरूपाने, शुभेच्छेने देत असते. मग ती माता, पत्नी, मुलगी असो किंवा नातेवाईक, हितचिंतक असो.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी काही कारणे !

१. वर्ष १९२६ मध्ये आर्य समाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्या एका मुसलमान युवकाने केली. यावर प्रतिक्रिया देतांना गांधींनी या रशीदला त्यांचा भाऊ संबोधले, त्याचे कृत्य योग्य असून आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्र्रविरोधी आणि हिंदू-मुसलमान एकतेसाठी घातक आहे, असे घोषित केले.
२. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्र्रभक्त म्हटले होते. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

प.पू. पांडे महाराजांकडून मंत्रोपाय प्राप्त झालेल्या 
साधकांनी उपायांमध्ये झालेले पुढील पालट लक्षात घ्यावेत !
        डिसेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या ३ मासांत प.पू. पांडे महाराजांकडून शेकडो साधकांना मंत्रोपाय देण्यात आले होते. संभाव्य आपत्काळानुसार मंत्रोपाय करणार्‍या साधकांनी त्यात पुढील पालट करावेत.
१. सर्वांसाठी दिलेल्या मंत्रांपैकी पापनाशक मंत्र, विषनाशक मंत्र, काळी शक्तीनाशक दत्तात्रेय मंत्र, विषाचे झाडन करणारा मंत्र आणि प्रारब्ध भोग नष्ट करणारा मंत्र हे मंत्र केवळ आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी आवश्यकतेनुसार म्हणावेत.
२. काही साधकांना मलबद्धता दूर होण्यासाठीचा मंत्र, जठराग्नी प्रबळ होण्याचा मंत्र, झोप येण्यासाठी मंत्र, साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी मंत्र, तसेच आपल्या व्याधीविना अन्य मंत्र देण्यात आले आहेत. हे मंत्र ती व्याधी नसल्यास म्हणू नयेत.

अनेक अडचणींतून मार्ग काढत साधनापथावर वाटचाल करतांना संसाराचा सर्व भार देवावर सोपवून निश्‍चिंतपणे साधनेला वाहून घेतलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र उपाख्य दादा कुंभार !

श्री. रामचंद्र (दादा) कुंभार
      रामनाथी आश्रमाच्या लागवडीत सेवा करणारे श्री. रामचंद्र (दादा) कुंभार हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील आहेत. माझी त्यांच्याशी पूर्वीपासून ओळख असल्याने अधूनमधून त्यांच्याशी बोलणे होते. विविध प्रसंगी त्यांच्याशी झालेले बोलणे आणि त्यातून त्यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे देत आहे.
१. साधनेत येण्यापूर्वीचे जीवन - 
रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणे
       श्री. रामचंद्र (दादा) कुंभार साधनेत येण्यापूर्वी शेती करणे, नारळ काढून देणे, नर्सरीमध्ये काम करणे अशी रोजंदारीवर कामे करीत असत.
२. सनातनशी संपर्क येणे आणि सेवेला आरंभ करणे
      वर्ष १९९८ मध्ये श्री. दादा (रामचंद्र) कुंभार सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्या वेळी ते सनातनच्या साप्ताहिक सत्संगाला जात; परंतु त्यांना सेवेसाठी घराबाहेर जाणे अशक्य होई. सेवेसाठी बाहेर जाणे शक्य होत नसल्यामुळे दादांनी गावात दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करण्यास प्रारंभ केला. तसेच वेळ मिळेल तेव्हा कुडाळ येथील सेवाकेंद्रासाठी लागणारी लाकडे तोडून देणे, तेथील गायींची देखभाल करणे, अशा प्रासंगिक सेवाही ते करू लागले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणारे श्री. रामचंद्र कुंभार यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. ओळख नसतांनाही दूरभाषवरून आध्यात्मिक 
स्तरावरील जवळीक करणारे श्री. रामचंद्र कुंभार !
       श्री. रामचंद्र कुंभार (दादा) यांना मी देवद आश्रमात असल्यापासून ओळखते. तेव्हा माझ्याकडे सनातन संस्थेचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे यांसाठी लागणार्‍या दैनंदिन वस्तू, तसेच स्वच्छतेचे साहित्य खरेदी करून पाठवण्याची सेवा होती. तेव्हा दादा कुंभार तपोधाम येथे रहायचे. तपोधाम येथे लागणार्‍या स्वच्छतेच्या साहित्याची मागणी घेणे आणि साहित्य पाठवल्यावर त्यांना कळवणे अशा प्रकारच्या सेवेच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी दूरभाषवरून संपर्क असायचा. तेव्हा मी त्यांना बघितलेही नव्हते, तरीही दादांना मी दूरभाष केल्यावर सेवेसंदर्भातील बोलणे झाल्यावर अधूनमधून ते मला साधनेसंदर्भात काय प्रयत्न केलेस ?, असे विचारायचे. त्याचबरोबर साधनेसंदर्भात त्यांना सुचलेली नवीन सूत्रेही ते मला सांगायचे. त्यानंतर २ वर्षांनी दादा कुंभार रामनाथी आश्रमात आल्यावर मी त्यांना पहिल्यांदा पाहिले.

व्यावहारिक आणि आध्यात्मिक श्रीमंती

श्री. राम होनप
      व्यक्तीकडे अब्जावधी रुपये, अनेक बंगले, नोकर असल्यास तो स्वतःला सगळ्यात श्रीमंत समजतो, तर भाव असलेल्या साधकाला सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, चौदा भुवनांचा स्वामी श्रीकृष्ण सोबत असणे, ही खरी श्रीमंती वाटते. व्यावहारिक माणूस त्याची श्रीमंती पैशात मोजतो, तर साधक त्याची श्रीमंती देवता आणि गुरु यांचा आशीर्वाद मिळण्यात मानतो. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०१६)

दैनिक सनातन प्रभातच्या अंकावर दैवी कण दिसण्याच्या प्रमाणात वाढ होणे आणि हा रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचा परिणाम असावा, असे वाटणे

       वर्ष २०१४ पासून दैनिक सनातन प्रभातच्या अंकावर दैवी कण दिसण्याचे प्रमाण अत्यंत न्यून झाले होते; परंतु ९.१.२०१६ या दिवसापासून त्यामध्ये अकस्मात् वाढ झाल्याचे दिसले. नेमके याच दिवशी मिरज येथील सनातनच्या आश्रमात लेखा सेवा करणार्‍या साधकांचे शिबीर चालू झाले. त्यामुळे मला वाटले, लेखा सेवा करणार्‍या साधकांना चैतन्य देण्यासाठी श्रीकृष्ण या दैवी कणांच्या माध्यमातून अवतरला असावा. तसे मी त्या साधकांना सांगितलेही; परंतु शिबीर झाल्यानंतरही दैवी कणांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढच होत असल्याचे लक्षात आले. यावरून आता असे वाटत आहे की, हा कदाचित् रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्री उच्छिष्ट गणपति यज्ञाचा परिणाम असावा. कुठलीही घटना स्थुलातून घडण्याआधी सूक्ष्मातून घडलेली असते, या नियमाप्रमाणे ९.१.२०१६ या दिवसापासूनच दैवी कणांच्या प्रमाणात पुष्कळ वाढ झाली असावी, असे वाटते.

अंत:करणाला भिडणार्‍या आणि चैतन्यमय वाणीतील पू. नकातेकाकांच्या मार्गदर्शनामुळे मनावरील मरगळ दूर होऊन नवचैतन्य निर्माण झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

       प.पू. गुरुदेवांच्या कृपेने काही दिवसांपूर्वी पू. नकातेकाकांंच्या चैतन्यमय सत्संगात मला सेवा करण्याची संधी लाभली. पू. नकातेकाकांच्या अनौपचारिक वागण्या-बोलण्याने माझ्या मनावरचे दडपण नाहिसे झाले आणि मला माझ्या साधनेतील अडचणी, स्वभावदोष अन् अहंचे पैलू त्यांना मनमोकळेपणाने सांगता आले.
       पू. काकांना साधकांविषयी आपुलकी आणि प्रेम असल्याचे जाणवले. त्यांनी सुचवलेले उपाय करून पहाणे हे किती सहज शक्य आहे, याची अनुभूती आली.

घराच्या परिसरातील तुळशीच्या, तसेच इतर रोपांवरही दैवी कण येणे

कु. समिधा कामत
     २९.११.२०१३ या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपांना शेणाचे पाणी घालतांना तुळशीवर दैवी कण आले असतील, असा विचार माझ्या मनात आला; पण काही कालावधीनंतर मी ते पहाण्याचे विसरले. ३०.११.२०१३ या दिवशी सकाळी दैनिक सनातन प्रभातमधील तुळशीच्या संदर्भातील माहिती वाचल्यावर मी लगेचच बागेत जाऊन तुळशीची रोपे पाहिली. त्या वेळी मला त्यांवर अनेक चंदेरी कण असल्याचे आढळले.
      जास्वंद, गुलाब, सदाफुली, अनंत, केळीची झाडे, पारिजातकाचे रोपटे, अबोली, ब्रह्मकमळ अशा अन्य झाडांवरही दैवी कण असल्याचे आढळून आले.
 - कु. समिधा कामत, म्हापसा, गोवा. (३०.११.२०१३)

वापी, गुजरात येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांचा ॐकाराविषयीचा संदेश !

विश्‍व ज्या शांतीसाठी प्रयत्न करत आहे, ती 
शांती निश्‍चितरूपे ॐच्या जपोच्चाराने मिळू शकते !
पू. इंद्रवदन शुक्ल
       ॐकार हे नादब्रह्माचे प्रतीक आहे. जगातील प्रत्येक धर्माने त्याचा स्वीकार केलेला आहे. ॐकार अ + उ + म् यांनी बनलेला आहे. ॐकार हे ब्रह्मांडाचे स्वयंभू संगीत आहे. त्याचे एका निश्‍चित समयी केवळ २ मिनिटे; परंतु मोठ्याने उच्चारण केल्यास ते नादब्रह्म ब्रह्मांडातील अणू-रेणूत पोचते. आता ब्रह्मांडात जी उलथापालथ चालली आहे, तिला पूर्ववत करण्याचे सामर्थ्य ॐकारात आहे. विश्‍व ज्या शांतीसाठी प्रयत्न करत आहे, ती शांती निश्‍चितरूपे ॐच्या जपोच्चाराने मिळू शकते. शास्त्राप्रमाणे १५ मास (महिने) ॐकाराचे मोठ्याने उच्चारण केले, तरी आपल्याला जे हवे तसे (मनातील इच्छेप्रमाणे) फळ आपण मिळवू शकतो. हाच माझा विश्‍वाला ॐकाराविषयीचा संदेश आहे.
- पू. इंद्रवदन शुक्ल, बगवाडा, वापी, गुजरात. (२६.१.२०१६)

पू. अप्पाकाकांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लिखाणावर विविध रंगांचे आठ दैवी कण दिसणे

       पू. अप्पाकाकांच्या (पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले यांच्या) प्रथम पुण्यतिथीनिमित्त (नोव्हेंबर २०१४) दैनिक सनातन प्रभातमध्ये त्यांच्याविषयी आलेले लिखाण मी वाचत होतो. त्या वेळी मला या लिखाणावर प्रथम एक मोरपंखी रंगाचा दैवी कण आढळला; म्हणून तो निरखून पाहू लागलो, तर तिथे आणखी एक पांढर्‍या रंगाचा दैैवी कण दिसला. पूर्ण दैनिकात अन्यत्र कुठेही नाही; पण या लेखावर वेगवेगळ्या रंगाचे दोन दैवी कण दिसल्यावर मला कुतूहल वाटले आणि मी आणखी दैवी कण शोधू लागलो. जसजसे मी पहात होतो, तसतसे मला विविध रंगांचे दैवी कण दिसू लागले. मी त्यांची छायाचित्रे काढली. छायाचित्र काढतांना मला आणखी दैवी कण दिसले. सोनेरी, पांढरा, पिवळसर आणि मोरपंखी या रंगांचे मिळून एकूण आठ दैवी कण दिसले. त्या वेळी पू. अप्पाकाकांच्या पुण्यस्मरणदिनी आम्हाला ही अनोखी अनुभूती देवाने दिल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.
- श्री. राकेश पाध्ये

हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येण्यासाठी सर्व संत आणि साधक यांचे त्रास स्वतःवर झेलून सूक्ष्मातून त्यांना सेवा करण्यासाठी बळ देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पू. सुदामराव शेंडे
      ९.१.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एक चौकट दिली आहे. त्यात त्यांनी आजारपण आणि म्हातारपण यांतील भेद सांगितला आहे. त्या चौकटीत त्यांनी म्हटले आहे, म्हातारपण आल्यामुळे मी बाहेर कुठे जाऊ शकत नाही आणि म्हातारपण कधीच बरे होऊ शकत नाही. हे वाचून माझ्या मनात पुढील विचार आले.
१. खोलीत बसून विश्‍वाची 
सर्व सूत्रे सूक्ष्मातून चालवणे
        प.पू. डॉक्टर बाहेर कुठे जाऊ शकत नाहीत. खरेतर त्यांना बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही; कारण ते खोलीत बसून विश्‍वाची सर्व सूत्रे सूक्ष्मातून चालवत आहेत. त्याचप्रमाणे प.पू. डॉक्टरांचे म्हातारपण कधीच बरे होऊ न शकण्याचे कारण आहे, ते सर्व संत आणि साधक यांचे त्रास स्वतःवर घेतात अन् त्यांना सेवेसाठी शक्ती देतात.

स्वच्छतेची सेवा करतांना हातावर ओरखडे उमटणे आणि विभूती आणि अष्टगंध लावल्यावर ओरखडे पूर्ण नाहीसे होणे

       गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मी पहिला मजला स्वच्छता करतांना माझा हात जळजळत असल्याची मला जाणीव झाली. त्या वेळी मी बघितले, तर ५ - ६ ओरखडे हातावर आल्याचे माझ्या लक्षात आले. मी बांगड्यांना हात लावून बघितले; पण त्या व्यवस्थित होत्या. त्यानंतर मी हातावर आलेल्या ओरखड्यांविषयी पूर्ण विसरून गेले. रात्री हातावर आलेल्या ओरखड्यांवर विभूती आणि अष्टगंध लावल्यावर दुसर्‍या दिवशी ते ओरखडे पूर्ण गेले.
      दुसर्‍या दिवशी पुसतांना परत १ - २ ओरखडे आले; पण ते लगेच निघून गेले. त्या वेळी देव सतत माझ्याबरोबर असल्याने ओरखडे येऊनही काही त्रास झाला नाही, अशी अनुभूती येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली. देव माझी किती काळजी घेतो, याची जाणीव झाली.
- सौै. अश्‍विनी सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०१५)

महर्षींनी २०१६ या वर्षीच्या दैवी प्रवासाच्या कालावधीत तमिळनाडूतील विविध गावांतील मंदिरांत नेणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
१. महर्षींनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन 
विविध प्रकारच्या उपासना करण्यास सांगणे
       दैवी प्रवासाच्या वेळी महर्षि आम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक मंदिरात नेत आहेत. तेथे पूजा-अर्चना करण्यास, तर कधी तेथील देवाला अभिषेक करण्यासही ते सांगतात. काही मंदिरात दक्षिणा देण्यास सांगतात, तर काही मंदिरात केवळ दर्शन घेऊन येण्यास सांगतात. कधी मंदिराच्या बाहेर असणार्‍या दुकानातून देवाचे चित्रही विकत घेण्यास सांगतात, तर कधी मंदिरात झालेल्या यज्ञाची विभूती रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांकडे पाठवण्यास सांगतात. कधी कधी प्रतिदिन ३ - ४ मंदिरांतही ते देवदर्शनासाठी घेऊन जातात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण

      व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे अपूर्ण विज्ञान, तर कुठे परिपूर्ण अध्यात्म !
     विज्ञान अपूर्ण आहे. त्यामुळे त्यात सतत संशोधन करावे लागते. ते संशोधनही मायेतील असल्यामुळे तात्कालिक सुख देणारे असते. याउलट अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही; कारण ते चिरंतन आनंद देणारे परिपूर्ण शास्त्र आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बोधचित्र

हिंदु राष्ट्रात सर्व प्रकारच्या जुगारांवर बंदी घातली जाईल !

कॅसिनोला प्रोत्साहन देऊन जुगाराचे समर्थन करणारे गोव्यातील सर्वपक्षीय 
राज्यकर्ते गोव्याचे सर्व वैभव गमावतील, यात शंका नाही !
परात्पर गुरु डॉ. आठवले
     सध्या गोव्यातील सर्वच राजकीय पक्ष कॅसिनो या जुगार प्रकाराचे समर्थन करून त्याला उत्तेजन देत आहेत. कॅसिनोमुळे गोमंतकियांना रोजगार मिळतो, असे कारण पुढे केले जात आहे. प्रत्यक्षात कॅसिनो, म्हणजेच जुगारामुळे होणारी नैतिक हानी कधीही भरून न येणारी आहे. जुगाराला संस्कृत भाषेत द्यूतक्रीडा असे म्हणतात. या द्यूतक्रिडेचे दुष्परिणाम पुढे दिले आहेत.
१. धर्मशास्त्रानुसार
     द्यूतक्रीडा ही वाईट आहे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. धर्मशास्त्रकारांनी समाजाची द्युतासक्ती ध्यानी घेऊन कोजागिरी पौर्णिमा आणि बलिप्रतिपदा, म्हणजेच अनुक्रमे द्यूतपौर्णिमा आणि द्यूतप्रतिपदा या वर्षातील दोन दिवशीस द्यूत खेळण्याचे विधान सांगितले आहे. या व्यतिरिक्त केव्हाही द्यूत खेळणे, हे मात्र धर्मशास्त्राने निषिद्ध मानले आहे. द्युताच्या निंद्यतेविषयी काही धर्मशास्त्रकारांची मते पुढे दिली आहेत -

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदु राष्ट्र स्थापनेची पूर्वसिद्धता !

संपादकीय 
    एम्आयएम् पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूर येथील सभेत मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे प्रचंड संतापाच्या आवेशात घोषित केले. एक लोकप्रतिनिधी अशी घोषणा करतो, ही गोष्टच कुणाला पटणारी नव्हती. देशभर त्याविषयी कतूहल, संताप आणि राग व्यक्त झाला. ओवैसी यांची देशातून हकालपट्टी करा, त्यांच्या विरोधात खटला दाखल करा, त्यांचे नागरिकत्व रद्दबातल करा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या. अशाच प्रकारची एक प्रतिक्रिया देहलीमध्ये उमटली. अशोक रोडवरील ओवैसी यांच्या निवासस्थानासमोर हिंदु सेनेने आंदोलन करत ओवैसी यांच्या विरोधातील फलक लावले. पोलिसांनी नंतर ते फलक काढून घेतले, हा भाग वेगळा ! देशद्रोह्यांना देशात थारा असू नये, असा हे फलक लावण्यामागे उद्देश होता, असे हिंदु सेनेचे अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांनी सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn