Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची स्वच्छता

      पुणे - काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या करण्यात आलेल्या अवमनाचा ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची स्वच्छता करून निषेध नोंदवण्यात आला. स्मारकाच्या स्वच्छतेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून स्मारकाबाहेर निषेधाचा फलक लावण्यात आला. पक्षीय राजकारणात देशासाठी सर्वस्व देणार्‍या महापुरुषांची अपकीर्ती करणे, हे राष्ट्राचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केली.

श्रीमती अलका भालचंद्र कुंभोजकर यांना जीवनगौरव पुरस्कार !

     जयसिंगपूर - सनातन संस्थेच्या हितचिंतक आणि दैनिक सनातन प्रभातच्या नियमित वाचक श्रीमती अलका भालचंद्र कुंभोजकर यांना ८ मार्च या महिलादिनी जायंटस् गु्रप ऑफ सिटी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सहकार, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांत कार्य करणार्‍यांना हा पुरस्कार देण्यात येतो. श्रीमती कुंभोजकर यांचे कुटुंबीय सनातन संस्थेचे हितचिंतक आहेत. श्रीमती अलका यांनी भरत अधिकोषात संचालिका म्हणून उत्तम कार्य केले आहे. जयसिंगपूरमधील महिला सक्षम, तसेच आर्थिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात; म्हणून त्यांनी महिला मंडळाच्या, तसेच वैयक्तिक स्तरावर त्यांना साहाय्य केले. जयसिंगपूर येथील पहिल्या भजनी मंडळास आरंभ करून त्या आध्यात्मिक क्षेत्रातही कार्यरत आहेत.

विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांचा स्मृतीदिन


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

भाजप शासनाने भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! 
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण 
  • १४ मार्चला केली होती अटक
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलने !
     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण करून त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि पैशांची अफरातफर (मनी लॉड्रिंग) या प्रकरणी समाधानकारक उत्तरे न दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) १४ मार्चला रात्री भुजबळांना अटक केली होती. ही अटक आपने केलेल्या तक्रारीवरून झालेली आहे.
     छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे शासनाला ८८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी सध्या एकाच प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.

विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित !

भुजबळ यांच्या अटकेचे विधानसभेत तीव्र पडसाद !
जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्याऐवजी भ्रष्टाचार्‍यांसाठी विधानसभेचे कामकाज
बंद पाडून कोट्यवधी रुपये वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनताद्रोहीच होय !
      मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केल्याचे पडसाद १५ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले. भुजबळ यांच्या अटकेच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. भुजबळ यांच्यावर युती शासनाने सूडबुद्धीने कारवाई करून त्यांची मानहानी केल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांनी युती शासनाचा निषेध केला, तसेच सभागृहात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विधानसभा अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी ४ वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित केले. या सूत्रावरून विरोधकांनी सभागृहात सभात्यागही केला. विधानभवनाच्या पायर्‍यावर बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी निदर्शने केली.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आठ एकर भूमी अवैधरित्या विकली ! - प्रजासत्ताकचा आरोप

घोटाळ्यांवर घोटाळे करणारी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती !
      कोल्हापूर - श्री करवीर निवासिनी देवी अंबाबाईच्या मालकी अधिकारातील मोरेवाडी येथील ८ एकर भूमी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अनधिकृतरित्या विक्री केली आहे. या प्रकरणात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक या सामाजिक सेवा संस्थेचे कार्यकर्ते श्री. दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री. देसाई या वेळी म्हणाले की,
१. या व्यवहारात समितीतील तत्कालीन सदस्य श्री. दिगंबर निलकंठ यांची स्वाक्षरी फसवी आहे.
२. महसूल मंत्रालय आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी संगनमताने हा व्यवहार केला आहे. अंबाबाई मालकी हक्कातील रि.स. क्रमांक ३२ आणि ४५ क्षेत्रातील ही भूमी विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिला आहे. असे असतांना अवैधरित्या या जागेची विक्री झाली आहे.
३. देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.

प्रतिज्ञापत्रात पालट केल्याचे पी. चिदंबरम् यांनी स्वीकारले !

इशरतजहाँ चकमक प्रकरणात केलेल्या चुकीसाठी पी. चिदंबरम् प्रायश्‍चित्त घेतील का ?
     मुंबई - इशरतजहाँ चकमक प्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पालट केल्याचे माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम् यांनी मान्य केले आहे. या प्रतिज्ञापत्रात संबंधित मंत्री म्हणून केवळ संपादकीय पालट केले असून एक अधिवक्ता म्हणून आपली ती सवय असल्याचेही चिदंबरम् यांनी म्हटले आहे. कोणाला वाचवण्यासाठी नाही, तर न्यायालयामध्ये केंद्रशासनाची बाजू योग्य प्रकारे मांडण्यासाठी मी तसे केले, असेही ते म्हणाले.
     स्टँडिंग गार्ड-ए ईअर अपोझिशन या स्वत: लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी चिदंबरम् बोलत होते. ते म्हणाले, दुसरे प्रतिज्ञापत्र हे महाधिवक्ता यांनी प्रमाणित केले असून यात कोणताही भाग चुकीचा नाही. या प्रकरणाची धारिका माजी गृहसचिव पिल्लाई यांनी तीन वेळा पाहिली होती. गुप्तचर विभाग केवळ गुप्त माहिती राज्यशासनाला पुरवत असतो.

प्रयाग येथे ओवैसी यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट

राष्ट्राचा अवमान करणार्‍यांना पाकमध्ये हाकला !
     प्रयाग (अलाहाबाद) - कुणी माझ्या गळ्याला सुरा लावला, तरी मी भारतमाता की जय, असे म्हणणार नाही, असे विधान केल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. अलाहाबादमध्ये भा.दं.वि.च्या कलम १२४ अ नुसार दाखल झालेल्या या जनहित याचिकेत ओवैसी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. याविषयी ओवैसी यांनी न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. न्यायालय योग्य न्याय देईल. जय हिंद, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
लक्ष्मणपुरी (लखनौ) येथेही गुन्हा नोंद
      लक्ष्मणपुरी - ओवैसी यांनी केलेल्या देशद्रोही विधानाच्या प्रकरणी लक्ष्मणपुरी येथेही देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात ओवैसींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला तडे, केंद्रशासनाला साहाय्य करण्याचे ओडिशा शासनाचे आवाहन

      भुवनेश्‍वर (ओडिशा) - पुरी येथील १२व्या शतकातील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला तडे गेले असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांना पत्र पाठवून तातडीने साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे, लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय असल्याने याप्रकरणी मंत्रीमहोदयांनी वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वरिष्ठ तांत्रिक तज्ञांना पाठवून लवकरात लवकर मंदिराची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करावा. मंदिरातील आतील भिंतींना गिलावा देतांना मंदिरातील ४ खांब आणि त्यातील दगड यांना तडा गेल्याचे दिसून आले आहे. याचे अत्यंत गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मंदिराला आणखी काही इजा पोहचू नये; म्हणून तातडीने कारवाई करण्याचे आवाहनही पटनाईक यांनी केले आहे.


मल्ल्या यांच्या विरोधात आणखी ५ प्रकरणांत अजामीनपात्र वॉरंट

      नवी देहली - राज्यसभेचे खासदार विजय मल्ल्या यांच्या विरोधात आणखी ५ प्रकरणांत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. १४ मार्चला मल्ल्या यांच्या विरोधात एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे १५ मार्चला त्यांच्या विरोधात आणखी ५ प्रकरणांत वॉरंट काढण्यात आले आहेत. भाग्यनगर न्यायालयाने विजय मल्ल्या आणि किंगफिशर एअरलाईन्सचे माजी अधिकारी रघुनाथन् यांच्या विरोधात ५० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याच्या प्रकरणी अजामीनपत्र वॉरंट काढले आहे. धनादेश न वटल्याच्या प्रकरणी जी.एम्.आर्. या आस्थापनेने मल्ल्या यांच्या विरोधात एकूण ११ तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. यातील एकूण ६ प्रकरणांत त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले आहेत.
शासन मल्ल्या यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याच्या सिद्धतेत
     तब्बल १७ अधिकोषांकडून घेतलेले ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे. आता अधिकोषांसह शासनही मल्ल्या यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याच्या सिद्धतेत असल्याचे सांगितले जात आहे.

संघ स्वयंसेवकांना दंडुक्याच्या जागी शस्त्र द्यायला हवे ! - शिवसेना

     मुंबई - पालटत्या काळानुसार ज्याप्रमाणे संघाच्या गणवेशात पालट करण्यात आला, त्याचप्रमाणे त्यांच्या हातात असलेल्या दंडुक्याच्या जागी एखादे शस्त्र द्यायला पाहिजे होते. संघाच्या दृष्टीने त्यांचे स्वयंसेवक हे कवायती, संचलन, व्यायामाचे प्रकार वगैरे करत असतात. त्यामुळे ही एक बिनहत्यारी फौज आहे. हातात लाठी असली, तरी सध्याच्या जमान्यात (काळात) लाठीस कोणी हत्यार मानायला सिद्ध नाही आणि लाठीने सध्याच्या स्थितीत लढताही येत नाही. त्यामुळे हातातील लाठीची जागा एखाद्या शस्त्राने घेतली असती, तर देशाच्या शत्रूशी लढता आले असते. सध्या जी धर्मांधता, आतंकवाद वाढला आहे, तो रोखण्याची ताकद आपल्या हातातील लाठीत आहे काय, याचाही विचार पालटत्या काळानुसार संघाला करावा लागेल, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात मांडण्यात आले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. संघाने मोदी शासनाच्या माध्यमातून अयोध्येतील राममंदिराचा आणि समान नागरी कायद्याचा प्रश्‍न झटक्यात मार्गी लावावा. देशातील सत्तापालट हा संघाच्या रणनीतीमुळे आणि स्वयंसेवकांच्या कष्टामुळे झाला.

एम्आय्एमचे खासदार असदुद्दीन औवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा ! - शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख

श्री. अनिल उपाख्य राजू यादव 
यांचे गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदन 
पोलीस उपनिरीक्षक पांचाळ (मध्यभागी) यांना निवेदन
देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी
       कोल्हापूर, १५ मार्च (वार्ता.) - मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय असे कधीच म्हणणार नाही, असे विधान करून एम्आय्एमचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी माझ्या आणि सर्व भारतियांच्या भावना दुखावल्या आहेत. जाणीवपूर्वक हे प्रक्षोभक देशद्रोही विधान करून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने खासदार असदुद्दीन औवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा, असा तक्रार अर्ज शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. अनिल उपाख्य राजू यादव यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. तसेच औवेसी यांची खासदारकी रहित करावी, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. हा अर्ज पोलीस उपनिरीक्षक पांचाळ यांनी स्वीकारला. (देशविरोधी विधान करणार्‍या असदुद्दीन औवैसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी करणार्‍या श्री. अनिल यादव आणि अन्य सर्व हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! - संपादक)

मशिदींवर होळीचा रंग उडाला, तर बरेली (उत्तरप्रदेश) प्रशासन पांढरा रंग लावून देणार !

* मुसलमानांच्या लांगूलचालनाचे टोक गाठणारे समाजवादी पक्षाचे उत्तरप्रदेश शासन ! 
* यावर ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत; कारण त्यांच्या मते हीच धर्मनिरेपक्षता आहे !
* लोकहो, जनतेच्या करातून मिळणारा पैसा अशा कार्यासाठी खर्च करणार्‍या उत्तरप्रदेश शासनाला जाब विचारा ! 
* हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी मशिदीतून होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कधी प्रयत्न केले जातात का ?
     बरेली (उत्तरप्रदेश) - हिंदु आणि मुसलमान यांची लोकसंख्या ५०-५० टक्के असल्याने धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या बरेली शहरामध्ये होळीच्या सणात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २४ मार्चला होळीच्या दिवशी मशिदींवर रंग उडाला, तर प्रशासनाने स्थापन केलेले रंगरंगोटी करणारे पथक लगेच त्यावर पांढरा रंग लावतील. संपूर्ण बरेली शहरात एकूण ३००, तर संपूर्ण बरेली जिल्ह्यात एक सहस्र मशिदी आहेत. तसेच प्रशासनाने डीजे संगीताला अनुमती नाकारली आहे. येथे डीजे संगीताच्या आधारे आखाड्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाते. त्यात तलवारसहित अन्य शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले जाते. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

हिंदु धर्मजागृती सभेतील छायाचित्रात्मक क्षणमोती !

 बेळगाव येथे १३ मार्च या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा
 पार पडली. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. 
 सभास्थळी मान्यवर वक्त्यांचे आगमन ।
झाले हिंदुतेजाचे अवतरण ॥ 
डावीकडून दुसरे श्री. अभय वर्तक, श्री. टी. राजासिंह आणि श्री. मनोज खाडये
माननीय वक्त्यांची ढोल-ताशांसह रथातून भव्य मिरवणूक !

      सभा चालू होण्याच्या अगोदर रथातून ढोल-ताशा वाजवत वक्त्यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भगवे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.

धर्मांधांच्या मागणीवरून महाशिवरात्रीनिमित्त लावण्यात आलेली गंगेश्‍वर महादेव मंदिराची कमान तोडली !

  • आज हिंदू असंघटित असल्यानेच हिंदूंच्या धर्मस्थळांच्या संदर्भात कोणीही अशी कारवाई करण्यास धजावते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य आहे !
  • कल्याण महानगरपालिकेचा धर्मद्रोह !
धर्मांधांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेने तोडलेली मंदिराची कमान
       कल्याण (वार्ता.) - येथील पूर्व भागातील सूचक नाका परिसरात असलेल्या गंगेश्‍वर महादेव मंदिराची कमान महाशिवरात्रीनिमित्त रस्त्यावर लावण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ८ मार्चला सकाळी कोणतीही सूचना न देता महानगरपालिकेने पोलीस संरक्षण घेऊन ती कमान तोडली. (हिंदूंनो, सूचनेविना कमान तोडणार्‍या महानगरपालिकेला संघटित होऊन खडसवा ! - संपादक) वस्तीत रहाणार्‍या ६०० धर्मांधांनी स्वाक्षर्‍या करून ही कमान अनधिकृत असल्याने तोडून टाकण्यात यावी, अशा आशयाचे पत्र दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (धर्मांधांच्या म्हणण्यानुसार कृती करायला हा भारत आहे कि पाक ? - संपादक) कमान तोडल्यावर याविषयी हिंदूंनी धर्मांधांना खडसवले. त्या वेळी त्यांनी सांगितले, आम्हाला ही कमान नको. (हिंदूंनो, धर्मांधांचा हा उद्दामपणा जाणा ! - संपादक)

केरळमध्ये धर्मांधांनी केलेल्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा !

  • अशा घोषणा देणे म्हणजे केरळ छोटे पाकिस्तान झाल्याचे द्योतक
  • अशा देशद्रोह्यांना मोकळीक दिली जात असल्यानेच भारतात शत्रूराष्ट्राविषयीच्या घोषणा वारंवार ऐकायला मिळतात ! हे उदात्तीकरण रोखण्यासाठी शासन कठोर कारवाई करेल का ? 
     कालिकत (केरळ) - येथे काही दिवसांपूर्वी धर्मांधांनी केलेल्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची बाब उघडकीस आली आहे. 
    केरळमधील मातृभूमी या वृत्तपत्रात महंमद पैगंबर यांनी एका ९ वर्षीय मुलीसोबत विवाह केल्याचे म्हटले होते. या वृत्ताच्या निषेधार्थ धर्मांधांनी आंदोलन केले होते. (हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होते; पण हिंदू नेहमीच त्याला वैध मार्गाने विरोध करतात. याउलट धर्मांध कायद्याच्या चौकटीचे उल्लंघन करून देशद्रोह करतात ! - संपादक) 
     या घटनेवर धर्मांधांनी केलेल्या प्रखर टीकेमुळे मातृभूमीच्या प्रतिनिधीने या विधानाविषयी सामाजिक संकेतस्थळावर क्षमा मागितली आहे. (कुठे धर्मावरील आघातांविषयी कृतीशील होऊन संबंधितांना क्षमा मागण्यास भाग पाडणारे धर्मांध, तर कुठे धर्मातील आघातांविषयी काहीही न वाटणारे हिंदू ! - संपादक)

श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद कैद्यांनी बनवण्याचा प्रस्ताव म्हणजे धर्मशास्त्र मोडीत काढण्याचा डाव ! - श्री. पराग गोखले

      पुणे - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद कळंबा कारागृहातील महिलांकडून सिद्ध करवून घेण्याचा प्रस्ताव कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी ठेवला आहे. हा प्रस्ताव म्हणजे धर्मशास्त्र मोडीत काढण्याचाच डाव आहे. हिंदु धर्मशास्त्राच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असल्यानेच अशा प्रकारे धर्मावर आघात केले जातात. देवासाठी प्रसाद बनवणे, हा कर्मकांडाचा भाग आहे. कारागृहात त्या संदर्भातील नियम काय पाळले जाणार का ? धर्मावर होणारे आघात रोखायचे असतील, तर हिंदूंनी संघटित होऊन त्यांचा प्रतिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले.
     १३ मार्च या दिवशी पुणे-सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या चौकात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

शासनाची अकार्यक्षमता !

     नवी देहली येथील ल्युटेन या अतिमहागड्या भागात केंद्रशासनाची अनेक घरे मंत्री, कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना देण्यात आली होती; मात्र समय मर्यादा संपून गेल्यावरही अनेकांनी या घरांवर त्यांचा ताबा ठेवला होता. शासनाने वर्ष २०१३ मध्ये केवळ २४६ घरे रिकामी करून घेतली होती. त्यानंतर वर्ष २०१४ मध्ये ५३९ तर वर्ष २०१५ मध्ये ७४६ घरे रिकामी करून घेण्यात शासनाला यश मिळाले. तरीही अद्याप १ सहस्र २०७ घरे अनधिकृतपणे वापरात आहेत, अशी माहिती शहर विकास खात्याचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लोकसभेत दिली.
      एवढ्या मोठ्या संख्येने अवैधपणे रहाणार्‍यांना बेमुदत कारागृहात ठेवले पाहिजे !

सूडाच्या भावनेने राज्यशासनाने भुजबळ यांच्यावर कारवाई केलेली नाही ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधीमंडळ अधिवेशन २०१६
       मुंबई, १५ मार्च (विशेष प्रतिनिधी) - भुजबळ यांच्या अटकेशी राज्यशासनाचा काही संबंध नाही. राज्यात भ्रष्टाचार झाला असेल, तर ईडीने गप्प बसायचे का ? ईडी ही स्वायत्त संस्था आहे. गेल्या काही मासांपासून या संस्थेने अन्वेषण केल्यानंतर त्यांना हवालाद्वारे मोठी रक्कम उचलली गेल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये दोषी आढळल्यामुळे प्रथम समीर भुजबळ आणि नंतर छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. या चौकशी यंत्रणेकडे भुजबळ यांच्या विरोधात पुरावे आहेत. सभागृहात विरोधकांनी न्याय प्रक्रियेवर असा दबाव टाकणे योग्य आहे का ? सूडाच्या भावनेने राज्यशासनाने भुजबळ यांच्यावर कारवाई केलेली नाही. हवाल्याद्वारे अनधिकृतपणे मोठ्या रकमेची कोणी उचल करून घोटाळे करत असेल, तर आम्ही गप्प बसायचे का, असे विधान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत केले. मुख्यमंत्री बोलत असतांना सभागृहात एकही विरोधी पक्षीय सदस्य उपस्थित नव्हता.

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा ! - हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

अशी मागणी करणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! 
तहसीलदार मनीषा खत्री (मध्यभागी बसलेल्या) यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी
      कागल (जिल्हा कोल्हापूर), १५ मार्च (वार्ता.) - श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना देण्यात आले. (सर्वत्रचा वाढता विरोध पहाता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या मागणीचा पुनर्विचार करावा ! - संपादक) या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, उपतालुकाप्रमुख श्री. शिवगोंड पाटील, शिवसेनेचे श्री. भाऊसो पाटील, भाजप सरचिटणीस श्री. आनंद मांगले, शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री विजय आरेकर, अर्जुन केसरकर, संतोष जाधव, चेतन चव्हाण, राजेंद्र भोजे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, प्रीतम पवार, गोविंद पाटील, दीपक भोपळे, तसेच अन्य उपस्थित होते.

इराकमध्ये इसिसने जाळले ख्रिस्ती धर्मातील ग्रंथ !

ख्रिस्ती धर्माचे प्रतीक असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करणार असल्याची इसिसची घोषणा !
     रक्का (सीरिया) - इसिसने ख्रिस्ती धर्मातील ग्रंथ जाळल्याचे एक चलचित्र (व्हिडीयो) प्रसारित झाले आहे. जाळण्यात आलेल्या पुस्तकातून अल्लाचा अपमान करण्यात आला होता, असे इसिसने म्हटले आहे. तसेच इसिसने घोषणा केली आहे की, सभ्य मार्गांचा अवलंब करत ख्रिस्ती धर्माचे प्रतीक असणार्‍या सर्व गोष्टी नष्ट करणार आहे. 
     इसिसशी संबंधित असलेली दीवान अल हिस्बा ही संघटना शरीया कायदा लागू करण्याचे आणि कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा देण्याचे कार्य करते.
     गेल्या वर्षीही इसिसने फेब्रुवारी मासात मोसुल येथील मुख्य वाचनालयातील १० सहस्र पुस्तके आणि ७०० पांडुलिपीतील कागद नष्ट केले होते.

जयपूर येथे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांध धर्मांधांना तात्काळ फासावर लटकवा ! त्यामुळे पुन्हा कोणी असे 
दुष्कर्म करण्याचे धाडस करणार नाही !
    जयपूर (राजस्थान) - येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आरिफ कुरैशीसह त्याच्या शाहरूख आणि रहिम या सहकार्‍यांना अटक केली आहे. त्यामुळे धर्मांधांची पुन्हा वासनांध प्रवृत्ती समोर आली आहे. 
१. आरिफ कुरैशीचा फ्रूट चाटचा ठेला आहे. या दुकानामुळे काही दिवसांपूर्वी त्याची ओळख १६ वर्षीय मुलीशी झाली. 
२. या ओळखीतून आरोपीने पीडितेला फूस लावून एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.
३. त्यानंतर आरिफने या पीडितेला रहिम आणि शाहरुख या त्याच्या मित्रांकडे सोपवले. त्यानंतर त्यांनीही बलात्कार केला. शेवटी पुन्हा तिघांनी मिळून तिच्याशी दुष्कर्म केले. 
४. त्यानंतर आरोपींनी २-३ दिवस तिला वेगवेगळ्या हॉटेल्स आणि निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. 
५. अल्पवयीन पीडिता १० वीची परीक्षा चालू असतांना अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

निगडी (जिल्हा पुणे) येथे महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग

      निगडी - एका चारचाकी चालकाने ११ मार्च या दिवशी सकाळी महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग केला. पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी टिळक चौकात अपघात झाल्याने आणि वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने वाहतुकीचे नियमन करत होत्या. त्या वेळी राजू गुप्ता या चारचाकी चालकाने वाहतुकीचे नियम उल्लंघन केले. त्याच्यावर कारवाई करतांना गुप्ता याने महिला पोलिसाचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (जेथे महिला पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य महिलांची काय कथा ? - संपादक)

अशी मागणी करावी लागते, हे भाजप शासनाला लज्जास्पद ! शासन स्वत:च कृती का करत नाही ?

     भारतीय सैनिक काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करतात, असे वादग्रस्त विधान करून जेएन्यूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या शूरवीर जवानांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड येथील भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली.
जेएन्यू विद्यापिठाला टाळे ठोका, तसेच कन्हैया कुमार-उमर खालीद यांना फाशी द्या ! - राष्ट्रप्रेमींची निषेधफेरीद्वारे मागणी

देशद्रोही कन्हैया कुमार याचे छायाचित्र जाळतांना राष्ट्रप्रेमी
       सांगली, १५ मार्च (वार्ता.) - उमर खालीद आणि कन्हैया कुमार, तसेच त्यांचे सहकारी यांनी दिलेल्या घोषणा या उघडउघड राष्ट्रद्रोहाचे समर्थन करतात. कन्हैया कुमार याने देशाच्या सैनिकांचा अवमान केला आहे. ते ज्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात शिकतात, तेथील प्राध्यापकांचा अशांना पाठिंबा असल्यानेच हे होऊ शकते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु विद्यापिठाला टाळे ठोका आणि कन्हैया कुमार-उमर खालीद यांच्यासारख्यांवर वचक बसण्यासाठी त्यांना फाशी द्या, अशी एकमुखी मागणी विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने फेरी काढून निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. तत्पूर्वी स्टेशन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी निषेध फेरी काढण्यात आली. या वेळी कन्हैया कुमार याचे छायाचित्र जाळण्यात आले.

तृणमूल काँग्रेसच्या १२ नेत्यांवर लाच घेतल्याचा आरोप

जनतेने अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्यावी ! 
     कोलकाता - ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील १२ नेत्यांवर चेन्नईतील इंपेक्स कन्सल्टन्सी या आस्थापनाकडून बंगालमध्ये उद्योग उभा करण्यासाठी अनुमाने ५० लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. नारद न्यूज या संकेतस्थळाने पत्रकार परिषदेत एक चलचित्र (व्हिडीओ) प्रसारित केले असून त्यात तृणमूल काँग्रेसचे नेते पैसे घेतांना दिसत आहेत. हे स्टिंग ऑपरेशन २ वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे नारद न्यूजचे म्हणणे आहे.
१. या सूत्रावरून विरोधकांनी तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंगालमध्ये राष्ट्र्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली, तर भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.
२. प्रसिद्ध केलेले चलचित्र खोटे असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक पक्षाला अपकीर्त करण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर गेले आहेत, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी व्यक्त केली.
३. नारद न्यूजविरूद्ध अब्रूनुकसानीचा खटला भरण्याची चेतावणीही तृणमूल काँग्रेसने दिली आहे.

नाशिकमध्ये सरासरी १० दिवसांच्या अंतराने एकाची हत्या

नाशिकमध्ये हत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून तेथे कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि 
नाही, असा प्रश्‍न पडल्यास आश्‍चर्य ते काय ? ती राखण्यासाठी गृह विभाग उपाययोजना करून 
नाशिककरांना सुरक्षिततेचे चांगले दिवस दाखवेल का ?
     नाशिक, १५ मार्च - नाशिकमध्ये वर्ष २००८ ते २०१५ या ८ वर्षांच्या कालावधीत २९१ हत्या झाल्या आहेत. वर्ष २०१६ च्या पहिल्या २ मासांत हत्येच्या १० घटना घडल्या आहेत. याचाच अर्थ नाशिकमध्ये सरासरी १० दिवसांच्या अंतराने एकाची हत्या होत आहे. यामुळे जनतेचे रक्षक असलेले पोलीसही या घटना रोखण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, हत्या करण्याच्या ८० प्रतिशतहून अधिक घटना या ओळखीच्या व्यक्तीकडून होत असतात. त्यामध्ये ९९ प्रतिशत घटनांमध्ये पोलीस संशयितांना अटक करतात.

मुसलमानांनी ५ वेळा नमाज पठण करण्याऐवजी एकदाच करावे !

सुधारणावादी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे मत
     नवी देहली - मुसलमानांनी दिवसांतून ५ वेळा नमाज पठण करण्याऐवजी एकदाच करावे, असे मत बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विटर वर व्यक्त केले आहे. 
     जर्मन विद्यापिठात नमाज पठणाच्या खोल्या बंद करण्यात आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सुधारणावादी लेखिका तस्लिमा ट्विटरवर म्हणाल्या, मुसलमानांना सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्याचे स्वातंत्र्य असू नये. शाळा, महाविद्यालये, विमानतळ आणि बाजार अशा सार्वजनिक ठिकाणच्या प्रार्थना खोल्या बंद केल्या पाहिजे. त्यांना नमाज पठण करायचे असेल, तर त्यांनी घरी करावे. मागील वर्षी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधतांना तस्लिमा यांनी मला मुसलमान म्हणू नका, मी एक नास्तिक आहे, असे उद्गार काढले होते. त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर शिवलिंगाची काही छायाचित्रेही ठेवली होती. यात त्या शिवाला श्रद्धास्थानी ठेवून पूजा करतांना दिसून आल्या होत्या. तस्लिमा यांनी मुसलमानांच्या संदर्भात सुधारणावादी विचार व्यक्त केल्यामुळे त्यांना बांगलादेशातून बाहेर पडावे लागले असून सध्या त्या भारतात रहात आहेत.

भाग्यनगर (तेलंगण) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववाद्यांच्या हत्या करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     भाग्यनगर (तेलंगण) - १३ मार्च या दिवशी येथे शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद, शिवशक्ती, भगवद्गीता जागृती समिती, नेताजी स्फूर्ती केंद्रम्, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे तीन मागण्या करण्यात आल्या. यात जेएन्यूतील देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी, कर्नाटक आणि केरळ येथे हिंदुत्ववाद्यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात कारवाई करावी, तसेच द्रौपदीचा अवमान करणार्‍या तेलुगु पुस्तकाच्या विरोधात कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश होता. या वेळी ६० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. मुरली, शिवशक्तीचे अध्यक्ष श्री. करुणाकर, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज पहिल्याच दिवशी दोन वेळा स्थगित

     पणजी, १५ मार्च (वार्ता.) - राज्यातील समुद्री स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून विरोधी पक्ष सदस्यांनी विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे प्रश्‍नोत्तरांच्या महत्त्वपूर्ण वेळेत दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. 
     पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची छोटी शस्त्रक्रिया झाली असल्याने ते विधानसभेत अनुपस्थित होते. पर्यटन खात्याविषयीच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिल्यानंतर आमदार रोहन खंवटे यांनी समुद्रीस्वच्छतेच्या विषयी प्रश्‍न विचारला. कंत्राटदाराला १४.५ कोटी रुपये प्रतिवर्ष रुपयांचे कंत्राट दिले असतांना प्रत्यक्षात त्या प्रतीची स्वच्छता होत नसल्याचा आरोप करत कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा पाहिला आहे का ?, असा प्रश्‍न आमदार खंवटे यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात विरोधकांचे आरोप फेटाळले. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदुत्ववाद्यांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन उभारा !
     म्हैसुरू (कर्नाटक) येथील भाजप आणि श्रीराम सेना यांचे कार्यकर्ते राजू यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. येथे स्थानिक हिंदूंच्या बाजूने लढण्यात राजू यांची भूमिका महत्त्वाची होती. या प्रकरणी पोलीस आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karnatak ke Mysuru me BJP ke yuva karyakarta Raju Inki agnyato ne hatya ki. - Dadari ke nampar aag ugalnewali media ab chup kyo ?
जागो ! : कर्नाटक के म्हैसुरू में भाजप के युवा कार्यकर्ता राजू इनकी अज्ञातों ने हत्या की. - दादरी के नामपर आग उगलेवाली मिडिया अब चूप क्यो ?

एकहाती सत्तेच्या नादात शासनाने संस्कृती बिघडवू नये ! - श्री. सुदर्शनअण्णा शितोळे, हिंदु एकता आंदोलन पक्ष

       नगर, १५ मार्च (वार्ता.) - महिलांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेचा हिंदु एकता आंदोलन पक्ष विरोध करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे राज्यात भाजपला सत्ता मिळाली असल्याचे सांगतात. आम्ही शासनाला सांगू इच्छितो की, त्यांनी एकहाती सत्ता मिळाल्याच्या भ्रमात राहू नये. जनता आता खुळी राहिलेली नाही. संस्कृती बिघडवणार्‍यांना पाठिंबा द्याल, तर जनता पुढच्या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाही. या संदर्भात लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहोत, असे मत हिंदु एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुदर्शनअण्णा शितोळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गाभार्‍यात महिलांच्या प्रवेशासंदर्भात अनुकूल भूमिका घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराकडे त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

बंदमुळे शासनाला २५ कोटींहून अधिक रुपयांचा फटका

  • देश आणि राज्य आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी असतांना पुकारण्यात आलेला बंद म्हणजे राष्ट्र्रद्रोहच होय !  
  • महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने पुकारलेला बेमुदत बंद
      पुणे, १५ मार्च - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावला आहे. त्या विरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने १ मार्चपासून पुण्यासह राज्यभर बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे मागील १४ दिवसांत १ सहस्र ४०० कोटी रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. तसेच शासनाच्या तिजोरीलाही २५ कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होऊनही सराफ संघटना अबकारी कर रहित करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

गोव्यातील श्री माऊली मंदिराची हानी केल्याप्रकरणी सर्व स्तरांतून संताप व्यक्त

हिंदूंच्या श्रद्धांची दखल न घेता, तसेच न्यायालयालाही न जुमानता कर्नाटक 
शासन करत असलेल्या आततायीपणाचा धिक्कार करावा तेवढा थोडा !
म्हादई पाणी तंटा !
     पणजी - म्हादई पाणी तंटा वाद लवादासमोर असतांना पाण्याच्या हट्टापायी कर्नाटकी निरावरी निगमकडून कणकुंबी गावातील श्री माऊली देवस्थानचे सभागृह उद्ध्वस्त करण्याची कृती घडली असून या कृतीला अनुसरून भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
     गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील अनेक भाविकांची श्री माऊली देवीवर श्रद्धा आहे. श्री माऊली मंदिराची अशा प्रकारे झालेली दुर्दशा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. श्री माऊली देवस्थानचे अध्यक्ष श्री. दळवी यांनी या प्रकारासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. श्री. दळवी यांनी यापूर्वी कालव्याच्या कामाची जागा पालटण्याची मागणी केली होती; मात्र ही मागणी धुडकावण्यात आली.

पाकपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, असे म्हणणार्‍या पाकच्या कर्णधाराला पाक न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

पाकशी मैत्री करू इच्छिणार्‍या पाकप्रेमी भारतियांना चपराक !
     कराची - पाक संघ टी-२० विश्‍वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर कर्णधार शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, असे म्हटले होते. भारतात सुरक्षेच्या बाबतीत कधीही धोका वाटला नाही, असेही आफ्रिदी म्हणाला होता; मात्र आता पाकच्या न्यायालयाने या विधानावरून आफ्रिदी याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत या विधानाविषयी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. 
    आफ्रिदीच्या विधानावरून पाकमध्ये चर्चा चालू असतांनाच पाक संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदादने आफ्रिदीवर टीका केली आहे. अशी वक्तव्ये करतांना लाज कशी वाटत नाही ?, असा प्रश्‍न मियांदादने केला आहे. (भारताविषयी प्रेम व्यक्त केल्यावर भारतद्वेष नसानसांत भिनलेल्यांकडून अशी विधाने होणे साहजिकच आहे. अशांबरोबर क्रिकेट खेळून भारताला कोणता लाभ आणि कोणती मैत्री होणार आहे, हे केंद्रातील शासनाने जनतेला सांगायला हवे ! - संपादक)

२७ टक्के मुसलमान आतंकवादी विचारांचे ! - डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

     वॉशिंग्टन - जगातील एकूण मुसलमानांपैकी २७ टक्के मुसलमान आतंकवादी विचारांचे आहेत, असे विधान अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे विधान केले. 
     मुलाखतीच्या वेळी ट्रम्प यांना सांगण्यात आले की, जगातील १ अब्ज ६० लाख मुसलमानांंपैकी केवळ १ लाख मुसलमान जिहादी कारवायांत सहभागी आहेत. त्यावर ट्रम्प म्हणाले की, हा आकडा इतका अल्प असूच शकत नाही. ज्यांनी कुणी हा अहवाल मांडला आहे, त्यांचा अंदाज पूर्ण चुकला आहे. माझ्या मते २७ टक्के मुसलमान अतिशय आतंकवादी विचारसरणीचे आहेत. हे प्रमाण ३५ टक्के इतकेही असू शकते. ट्रम्प पुढे म्हणाले की, मुसलमानांंमध्ये प्रखर अमेरिकाविरोधी भावना आहे. पॅरिस आणि कॅलिफोर्निया येथे झालेल्या हत्याकांडांवरून त्यांची मानसिकता दिसून येते. इसिस ज्या प्रकारे निरपराध व्यक्तींचे शिरच्छेद करत आहे आणि लोकांना लोखंडी पिंजर्‍यात भरून पाण्यात बुडवून ठार मारत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते. आता या सगळ्याचा बीमोड करण्याची वेळ आली आहे.

अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     बालासोर (ओडिशा) - भारतीय सैन्याने अग्नी-१ या स्वदेशी बनावटीच्या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. १२ टन वजन आणि १५ मीटर लांबी असलेल्या या क्षेपणास्त्राने ९ मिनिटे आणि ३६ सेकंदांत ७०० कि.मी.चा पल्ला पार केल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले.

तुळजापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद

२१ गावांतील प्रसार पूर्ण
      तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १५ मार्च (वार्ता.) - धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथे १७ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे.
१. पंचक्रोशीत २१ गावांमध्ये धर्माभिमान्यांच्या १८ बैठका, तर शहरात ५ बैठका झाल्या आहेत. २ सहस्र हस्तपत्रके वितरीत करण्यात आली आहेत.
२. फेसबूक, ई-मेल, व्हॉटस् अ‍ॅप यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातूनही आणि लघुसंदेशाद्वारे प्रसार होत आहे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आैंध (जिल्हा पुणे) येथील प्रख्यात हवामानशास्त्रज्ञ पू. (प्रा.) जी.सी. असनानी यांचा देहत्याग

पू.(प्रा.)जी.सी. आसनानी
      पुणे, १५ मार्च (वार्ता.) - येथील जागतिक कीर्तीचे हवामानशास्त्रज्ञ पू. (प्रा.) जी.सी. तथा गेलाराम चेतनदास असनानी (वय ९५ वर्षे) यांनी १५ मार्चला पहाटे ४ वाजता त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला. ७ मार्च या दिवशीच त्यांनी वयाची ९५ वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या पश्‍चात मुलगा, स्नुषा आणि नातू असा परिवार आहे. दुपारी ४ वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातन परिवार असनानी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
      पू. (प्रा.) जी.सी. असनानी यांचा परिचय : पू. (प्रा.) असनानी यांचा जन्म कराची येथील असून त्यांचे शालेय शिक्षणही तेथेच झालेे. त्यांनी मुंबई विद्यापिठात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण गणित (एम्.एस्सी. मॅथ्स) या विषयातून केले. त्यांनी पुढे पीएच्डी केली असून ते ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीमधील तज्ञ म्हणून वर्ष १९४५ पासून कार्यरत होते. देहत्यागाच्या अगोदर काही आठवड्यापर्यंत ते प्रतिदिन दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत भारतीय हवामान खात्याच्या पुणे शाखेत (शिमला ऑफीसमध्ये) या खात्याच्या संदर्भातील बैठकीला जायचे. ते पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (युनोमध्ये) संशोधक म्हणून कार्यरत होते.

सावरकर इंग्रज असते, तर अपमानित झाले नसते !

१. काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराज वाट चुकलेले देशभक्त वाटतात, तिथे सावरकरांना त्यांनी फेक (खोटे) स्वातंत्र्यसैनिक म्हणणे स्वाभाविक !
     काँग्रेसचे युवराज श्री. राहुल गांधी यांनी गांधी आमचे आणि सावरकर तुमचे, अशा प्रकारचे विधान केले आहे. काँग्रेसजनांकडून ट्विटरवरूनही सावरकरांचा अपमान करण्यात आला. सावरकर हे फेक (खोटे) स्वातंत्र्यसैनिक होते, गांधींच्या हत्येत त्यांचा सहभाग होता, असे आरोप करतांनाच या काँग्रेसजनांनी चंद्रशेखर आझाद आणि सावरकर यांची तुलना करत आझाद हे थोर देशभक्त असल्याचे भासवत सावरकर हे ढोंगी असल्याचेही मत व्यक्त केले. याआधी मणिशंकर अय्यर यांनीसुद्धा सावरकरांचा अपमान केला होता. आता काँग्रेसने चंद्रशेखर आझाद हे देशभक्त असल्याचे म्हटले आहे; परंतु त्याच काँग्रेसने भगतसिंहांच्या बाजूने उभे रहाण्यास नकार दिला होता. काँग्रेसची मानसिकता मुळात समजून घ्यायला हवी.

अराष्ट्रीयत्वाचे मूळ ख्रिस्तीबहुल सासष्टीतच !

     संरक्षणविषयक प्रदर्शनाचे विरोधक अराष्ट्रीय आहेत, हे सत्य आहे. गोव्यातील काँग्रेस पक्ष हाच मुळात युनायटेड गोवन्स या पक्षाची सुधारित आवृत्ती आहे. या काँग्रेसची सूत्रे सासष्टीतील काही प्रमुख ख्रिस्ती नेत्यांच्या हातीच होती. केंद्रात काँग्रेस पक्षाचे शासन असल्यामुळे हवा तसा धुमाकूळ घालायला त्यांना संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवर जसे मुसलमान समाजातील कट्टरपंथियांना हाताशी धरून राजकारण केले जात होते, तोच प्रयोग येथे ख्रिस्ती समाजातील काही जातीयवादी शक्तींना हाताशी धरून केला गेला. अल्पसंख्यांक या गोंडस नावाखाली हे सर्व प्रकार खपवून घेतले गेले. भ्रष्टाचाराला प्रारंभ, त्याला राजमान्यता आणि लोकमान्यताही याच काळात मिळाली. पैसे खाण्यास जास्त वाव असलेले खाते आपल्या नेत्याला मिळावे; म्हणून लोक मागणी करू लागले.

गोव्यात होणार्‍या संरक्षणविषयक प्रदर्शनाच्या निमित्ताने...

    गोव्यात २८ मार्चपासून चालू होणार्‍या संरक्षणविषयक प्रदर्शनाला अनुसरून काही वृत्तपत्रांमधून विचारमंथन चालू आहे. याअनुषंगाने दैनिक नवप्रभामध्ये प्रसिद्ध झालेल्या दोन पत्रांमधील काही निवडक भाग प्रसिद्ध करत आहे.
संरक्षणविषयक प्रदर्शनाचे विरोधक अराष्ट्रीय !
     संरक्षणविषयक प्रदर्शनाच्या वादाला मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री हेच आहेत; कारण या दोघांनाही दक्षिण गोव्यातील मूठभर अराष्ट्रीय लोक, चर्चसंस्था खायला उठल्यामुळे बल्कांवावर (बाकांवर) बसून विरोध करणारे, संरक्षणविषयक प्रदर्शनाला विरोध करणार हे माहिती असायला हवे होते. भारतीय संरक्षण दलांनी सालाझारला गोव्यातून पळवून लावले, हे विसरलेले लोक अजूनही आहेत. ख्रिस्त्यांची ओरिष्ट प्रजेचो आवाज ही संघटना याच लोकांची ! संरक्षणमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर गोव्याला त्यांच्या पदाचा कसा फायदा होऊ शकतो, हे पहात आहे; मात्र हे पहावत नसलेले काँग्रेसचे लुईझिन फालेरो, चर्चसंस्था, ओरिष्ट प्रजेचो आवाज आणि आम आदमी पक्षाचे उपटसूंभ याला विरोध करत आहेत. मुळातच काँग्रेसचे लुईझिन फालेरो यांनी ही जागा कवडीमोलाने औद्यागिक विकास महामंडळाला (आयडीसी) दिली आणि या जागेवरील जनतेचा हक्क संपुष्टात आला. या जागेचा कसा उपयोग करायचा, हे ठरवण्याचा अधिकार आता मूळ मालकांना नाही. ही जागा किटला कोमुनिदाद आणि किटला-फार्तपा पंचायतक्षेत्रात येते. किटला-फार्तपा पंचायतीचा संरक्षणविषयक प्रदर्शनाला विरोध नाही.

अमेरिकेतील फोर्ड फाऊंडेशनने पोसलेली मोदी आणि संघ विरोधी भारतातील स्वयंसेवी संस्थांची पिलावळ !

श्री. भाऊ तोरसेकर
    मुंबईचे बॉम्बस्फोट वा कसाब टोळीचे आक्रमण असो, त्यात घायाळ झालेल्या वा मेलेल्यांचे अजून पुनर्वसन होऊ शकलेले नाही. अनेकांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अनेकांना तेव्हा उपचाराची आश्‍वासने मिळाली; पण कुठलेही साहाय्य मिळू शकलेले नाही. असे शेकड्यांनी लोक देशाच्या कुठल्याही शहरात, महानगरात आपल्याला सापडू शकतील. कधी हुंडाबळी वा बलात्काराचा बळी झालेल्या अन्यायग्रस्त महिला-मुली मिळतील; पण त्यांच्या न्यायासाठी कोणी मोठा नावाजलेला अधिवक्ता, कायदेपंडित पुढे येतांना दिसत नाही; मात्र असे नामांकित अधिवक्ते वा त्यांची फौज घातपाती, जिहादी वा आतंकवादी यांना शिक्षेतून सवलत मिळावी; म्हणून दिवसरात्र एक करतांना आपल्याला दिसते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

प.पू. डॉक्टरांच्या दर्शनाची ओढ लागलेल्या कु. विश्‍व आय्या याने वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रातून केलेले मागणे !

कु. विश्‍व आय्या
परम पूज्य माई,
आपल्या चरणी साष्टांग दंडवत.
    परम पूज्य माई, आज (फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमीला) पहिल्यांदाच मी माझ्या वाढदिवसाला आश्रमात आहे. मला आज तुमचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. परम पूज्य माई, तुम्ही मला कधी-कधी दर्शन देता; परंतु आज ती ओढ वाढली आहे. परम पूज्य माई, मी तुमचा सेवक आहे, असे आई-बाबा मला नेहमी सांगतात. यापुढे मी तुमचा सेवकच आहे, असा कृतज्ञताभाव ठेवून आणि प्रयत्न करून मला तुमच्या चरणांशी एकरूप व्हायचे आहे. मला संत व्हायचे आहे. यासाठी मला पुष्कळ आशीर्वाद द्या !
तुमचा लाडका,
- कु. विश्‍व आय्या (वय ९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०१६)


पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण !

     भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे संतापलेली जनता गांधी यांच्याकडे आशेने बघत होती की, गांधी यांनी यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावेत; मात्र गांधींनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
हा इतिहास ज्ञास नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच !

विद्यार्थी-साधकांनो, सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी 
वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
      भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक 
वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
      थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमांत अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी 
आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरता 
पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !
      पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे

सेवेची तळमळ असलेला, इतरांचा विचार करून त्यांना साहाय्य करण्यासाठी धडपडणारा आणि वयाने लहान असूनही कुटुंबियांना आधार देणारा देवद, पनवेल येथील श्री. संकेत डिंगरे (वय २० वर्षे) !

श्री. संकेत डिंगरे
    मूळचा अकलूज, जिल्हा सोलापूर येथील श्री. संकेत दिलीप डिंगरे महाविद्यालयीन शिक्षणानिमित्त त्याची ताई सौ. अर्पिता पाठक यांच्याकडे पनवेल येथे रहातो. शिक्षण घेतांना वेळ मिळेल, तसे देवद आश्रमात जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. संकेतचा फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमी (१६.३.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
श्री. संकेत डिंगरे याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. अर्पिता पाठक, सनातन 
संकुल, देवद, पनवेल (मोठी बहीण)
१ अ. सर्वांशी जवळीक साधणे : संकेत सर्व वयोगटांत रमतो. कोणत्याही नातेवाइकांकडे गेल्यानंतरही तो पटकन जवळीक साधतो. लहानांसमवेत लहानांसारखा आणि मोठ्यांमध्ये मोठा होऊन रहातो. तो सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागतो. तो घरी असला की, घरातील लहान आणि मोठाही तोच असतो. त्यामुळे सर्वांना तो घरी असला की, आधार वाटतो. संकेत महाविद्यालयातही सर्व मित्रांमध्ये आवडता आहे.

साधकांशी जवळीक साधणारी आणि सिंहस्थपर्वाच्या सेवेतही सहभागी झालेली उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची सावंतवाडी येथील कु. वैदेही संदीप सावंत (वय ६ वर्षे) !

कु. वैदेही सावंत
      सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथील कु. वैदेही संदीप सावंत हिचा १६.३.२०१६ या दिवशी सहावा वाढदिवस आहे. तिला सेवेची आवड असून ती आई आणि आजीसमवेत सेवा करते. ती सिंहस्थापर्वाच्या सेवेसाठी नाशिकला गेली होती. तिचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. वैदेही सावंत हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जिज्ञासू वृत्ती
      वैदेहीने एखादी नवीन गोष्ट पाहिली किंवा ऐकली, तर त्याविषयी जाणून घेण्यासाठी ती अनेक प्रश्‍न विचारते आणि उत्तर मिळेपर्यंत पाठपुरावा करते.

सतत कृष्णाच्या अनुसंधानात रहाणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील कु. नंदिनी प्रीतम पवार (वय ४ वर्षे) !

       फाल्गुन शुक्ल अष्टमी (१६.३.२०१६) या दिवशी कोल्हापूर येथील कु. नंदिनी प्रीतम पवार हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. नंदिनी हिला वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
कु. नंदिनी पवार
१. जन्मापूर्वी
१ अ. नामजप आणि आध्यात्मिक उपाय केल्यामुळे उत्साही वाटणे : गर्भधारणेपासून सतत खोक्यांचे उपाय करणे, रामरक्षा म्हणणे, दिवसभर नामजप आणि भजने ऐकणे इत्यादी उपाय करत असल्याने मला सतत उत्साही वाटायचे. याचा आपल्या गर्भावर चांगला परिणाम होत आहे, असे जाणवायचे.
१ आ. अपेक्षा न्यून होऊन सेवकभावातील आनंद अनुभवता येणे : गर्भधारणा झाल्यापासून माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा न्यून झाल्या. घरातील प्रत्येक काम करतांना एक वेगळाच आनंद मिळत होता. त्या वेळी मला सेवकभावातील आनंद अनुभवता आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करणारे प.पू. दास महाराज !

प.पू. दास महाराज
     हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यासाठी दासनवमीच्या शुभमुहूर्तापासून, म्हणजे ३.३.२०१६ या दिवसापासून वर्षभर मौनव्रत धारण करण्याची आज्ञा प.पू. श्रीधर स्वामी महाराज यांनी मला दिली आहे. स्वप्नदृष्टांत देऊन केलेल्या या आज्ञेला प.पू. गुरुदेवांनी आशीर्वाद दिला आहे.
१. मौन साधनेची व्याख्या आणि माहिती
       मौन साधना म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन केवळ ईश्‍वरी अनुसंधानात रहाणे होय. यामुळे मौन साधनेत शब्दांतून काही सांगता येत नाही. बोलण्याऐवजी लिहून दिल्यास मौन साधना होत नाही; कारण शेवटी ते शब्द आलेच. उलट ते शब्द लिहिण्यासाठी आणखी क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे श्रीधर स्वामी महाराज मौनात असतांना कधीही लिहून देत नसत. आवश्यकतेपुरत्या खाणाखुणा करून सूचना देत असत.

महर्षींनी साधकांना सप्तरंगांचा धागा उजव्या हातात बांधण्यास सांगणे आणि त्याचे कारणही सांगणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
      महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून साधकांच्या उजव्या हातात सप्तरंगी धागा असावा, अशी सूचना केली आणि यामागचे कारण सांगतांना महर्षि म्हणाले की, सारे ब्रह्मांडच सप्तरंगांनी बनलेले आहे. या रंगांतून आपल्याला सातही देवता आणि सप्तर्षि यांचे आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होते. उजव्या हाताच्या मनगटात हा सप्तरंगांचा धागा बांधल्याने हा साधक आम्हा सप्तर्षींचा आहे, हे ओळखण्यास सोपे जाईल आणि सात रंगांमुळे ब्रह्मांडात त्या त्या वेळी कार्यरत असलेले देवतेचे ते ते तत्त्व धाग्यातील देवतेच्या पूरक रंगातून देहात प्रवेश करण्यासही सोपे होईल.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. -
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, तरी 
त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विरोधकांनी जनाची नाही, तरी मनाची बाळगावी !

संपादकीय
     महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारी भाजपला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर धारेवर धरले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना म्हटले की, तुम्ही जलशिवार योजना काढता आहात, ते चांगले आहे; परंतु त्यात पाणी साठण्यासाठी पाऊस कुठे पडला आहे ? अजित पवार यांनी तर सिंचन घोटाळा न करता धरणे बांधली असती, तर आज पाऊस न पडताही त्या धरणांमध्ये पाणीसाठा राहिला असता आणि शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नसत्या, हे सत्य आहे.

ओवैसींची बोलती बंद करा !

संपादकीय
     देशद्रोही आणि हिंदुद्वेषी मुक्ताफळे उधळून स्वतःचा भारतद्वेष अन् मुसलमानप्रेम वारंवार उघड करणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी परत एकदा हिंदु राष्ट्रप्रेमी आणि देशभक्त भारतीय यांच्या हृदयावर डागण्या दिल्या आहेत. भारतात रहात असलो आणि आपल्या गळ्यावर जरी कोणी चाकू लावला, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, अशी देशद्रोही गरळओक मजलिस-ए-इत्तेहाद-उल्-मुस्लिमीन (एम्आयएम्) या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. विशेष म्हणजे उदगीर येथील जाहीर सभेत त्यांनी असे वक्तव्य केल्यावर उपस्थित धर्मांधांनी एकच हलकल्लोळ करून त्यांच्या विधानाला पाठिंबा दिला. आज लोकमान्य टिळक असते, तर या प्रसंगाला प्रत्युत्तर देतांना त्यांनी केसरीच्या अग्रलेखात लिहिले असते, अशा देशद्रोह्यांची जीभ छाटून टाका ! हिंदूंच्या दुर्दैवाने आज ते नाहीत आणि राज्यकर्त्यांसह सहिष्णु भारतीय जनतेनेही या हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणार्‍या या विषारी सर्पांचा धोका अद्याप ओळखलेला नाही, असेच म्हणावेसे वाटते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn