Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

हिंदूंचा उद्रेक !
     दादरी, रोहित वेमुला आदी प्रकरणी असहिष्णुतेच्या नावावरून ऊर बडवून घेणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि हिंदुत्ववाद्यांच्या हत्या या त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाहीत ?
  •  क्यातमारनहळ्ळी येथे हिंदूंच्या हत्यांचे सत्र चालूच !
  •  आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश !
      म्हैसुरू - येथील भाजपचे कार्यकर्ते राजू (वय ३० वर्षे) यांची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर म्हैसुरू शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी आक्रमणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. राजू हे श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेचेही कार्यकर्ते होते. क्यातमारनहळ्ळी येथील रहिवासी असलेले राजू हे येथील एका चहाच्या दुकानाजवळ उभे होते. त्या वेळी ३ जण दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी राजू यांच्यावर आक्रमण करून ते पळून गेले. यात राजू गंभीररित्या घायाळ होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात कर्नाटक राज्यातील दैनिक विजयवाणीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, क्यातमारनहळ्ळी भागात २ दशकांपूर्वी गणपति मंदिर बांधण्यात आले होते. तथापि मंदिरात श्रीगणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नव्हती. या सूत्रावरून दंगलही झाली होती.

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण !

     वर्ष १९१९ मध्ये अमृतसरच्या जालीयनवाला बाग हत्याकांडामध्ये झालेल्या नरसंहाराविषयी जनरल डायर यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी मागणी संतप्त जनतेकडून करण्यात आली होती. त्या वेळी मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला.
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोही नव्हेत का ?

भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही ! - खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे देशद्रोही विधान

हा भारतद्वेष नव्हे का? यावरून ओवैसी यांना भारताविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते.
उद्या भारत-पाक युद्ध झालेच, तर असे खासदार कुणाच्या बाजूने असतील, हे उघड आहे !
      लातूर - मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथील एका भाषणात केले. ते पुढे म्हणाले, माझ्या गळ्यावर कुणी चाकू जरी लावला, तरी मी भारतमाता की जय कदापि म्हणणार नाही. पुणे जर्मन बेकरीतील प्रमुख आरोपी हिमायत बेग, इशरतजहाँ हे निर्दोष असून त्यांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे रहाणार आहोत.

छगन भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

भ्रष्टाचारग्रस्त भारत !
     मुंबई - नवी देहलीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याच्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडीसमोर) चौकशीसाठी उपस्थित झाले. देेहलीत महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याच्या अतंर्गत भुजबळ यांची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आर्टीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्प आदी ९ विविध प्रकल्पांत स्वत:च्या जवळच्या नातेवाइकांना कंत्राट देऊन ८७० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या चौकशीनंतर छगन भुजबळ यांना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यापिठांमध्ये महिषासुर जयंती साजरी करून धर्महानी करणार्‍यांना रोखा ! - पू. शंकरदादा गुंजेकर

पू. शंकरदादा गुंजेकर
     आज हिंदु धर्म संकटात आहे. जो कोण उठतो, तो हिंदु धर्म आणि भारतमाता यांच्यावर टीका करतो. आपण सर्व जण महिषासुरमर्दिनी आई जगदंबेची भक्ती करणारेे आहोत; पण याच देशातील काही विद्यापिठांमध्ये महिषासुर जयंती साजरी केली जात आहे. देवतांच्या या देशात असुरांची उपासना होणे, हे गंभीर आहे. आई जगदंबा महिषासुराचे समर्थन करणार्‍यांना शिक्षा करीलच; पण आपणही सर्वांनी मिळून या धर्महानीला वैध मार्गाने विरोध करायला हवा, असे मार्गदर्शन सनातनचे पू. शंकरदादा गुंजेकर यांनी केले.


अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही ! - श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर

बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेला १० सहस्रांहून
अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
आमदार श्री. टी. राजासिंह
सभेला उपस्थित जनसमुदाय
     बेळगाव - आज गोहत्या, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांनी भयावह स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते. अशा वेळी हिंदूंनी जात-पात, पक्ष, संप्रदाय, सीमावाद अशा संकुचित गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, असे जाज्वल्य प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रविवार, १३ मार्च या दिवशी येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले.
     श्रीराम सेना, हिंदु एकता आंदोलन, हिंदु राष्ट्र सेना यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आणि मंडळे यांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अन् धर्माभिमानी, तसेच शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांचे कार्यकर्ते अशा १० सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंनी सभेला उपस्थित राहून राष्ट्र आणि धर्म यांप्रतीचे कर्तव्य बजावले.

काँग्रेस आघाडी शासनाने ७० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्यामुळे राज्याची अवस्था बिकट ! - मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळत विधानसभेत गोंधळ घालण्याची परंपरा कायम ! 
  • दोन वेळा विधानसभेचे, तर तीन वेळा विधान परिषदेचे कामकाज स्थगित !
       मुंबई, १४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - युती शासनाने शेतकर्‍यांवर १८ सहस्र कोटी रुपये कुठे खर्च केले ? असा प्रश्‍न १४ मार्च या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत विचारला. त्यानंतर या सूत्रावरून मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना धारेवर धरून आघाडी शासनाच्या काळातील ७० सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळेच राज्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे, असे सुनावले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मुख्यमंत्री बोलत असतांना विरोधकांनी घोषणा देऊन गोंधळ घातल्याने विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे आणि नंतर तसाच गोंधळ असल्याने १५ मिनिटांसाठी स्थगित केले.

श्री मल्लिकार्जुन मंदिर चोरीप्रकरणी दुसरा संशयित आरोपी पोलिसांच्या कह्यात

मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी चोरी करणार्‍या नतद्रष्टांना पोलिसांनी कठोर शासन करावे ! 
चार जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय
    काणकोण (गोवा) - येथील प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन देवस्थानची फंडपेटी चोरीच्या प्रकरणी सोलापूर (महाराष्ट्र) येथील रमेश पचांगी (वय २७ वर्षे) या दुसर्‍या संशयिताला कह्यात घेण्यास काणकोण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रमुख आरोपी नूर महंमद शेख या संशयिताला कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांच्या सतर्कतेमुळे कह्यात घेण्यास यश आले होते.
      पोलिसांनी संशयित पचांगी याला काणकोण येथील कनिष्ठ न्यायालयात सादर करून पाच दिवसांचा रिमांड मागून घेतला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीप्रकरणी अजून चार व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागणार आहे. श्री मल्लिकार्जुन देवस्थानात ९ फेब्रुवारी या दिवशी ही चोरी झाली होती; मात्र सुदैवाने संशयितांना फंडपेटी फोडल्यानंतर मंदिरातील रक्कम घेऊन जाण्यास यश आले नव्हते. १९६८ या वर्षीही अशीच घटना या ठिकाणी घडली होती; मात्र त्या वेळीही संशयित व्यक्ती मंदिरातील रक्कम घेऊन जाऊ शकले नाहीत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

(म्हणे) माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला !

हिंदुद्वेषी गुलाम नबी आझाद यांची कोलांटी उडी
संघाची इसिसशी तुलना केल्याचे प्रकरण
      नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना इसिस (आय.एस्.आय.एस्) या जिहादी आतंकवादी संघटनेशी करणारे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत कोलांटी उडी घेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे सांगितले.
     जमियत-उलेमा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलतांना आझाद यांनी संघाप्रमाणेच इसिस आणि अन्य आतंकवादी संघटनांना विरोध करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत हे सूत्र उपस्थित केले. आझाद यांच्या वक्तव्यामुळे देशात अस्वस्थता आहे. त्यांनी या सूत्रावर क्षमा मागावी, अशी मागणी नक्वी यांनी केली. सत्ताधार्‍यांच्या आक्षेपाला उत्तर देतांना आझाद म्हणाले, मी तसे काहीही म्हणालो नव्हतो.

हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला तीव्र विरोध करणार !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय तृतीय हिंदु अधिवेशनाची समाप्ती
     हुब्बळ्ळी (कर्नाटक) - येथे चालू असलेल्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी अंधश्रद्धा कायद्याला विरोध करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करण्यात आला. या अधिवेशनात हिंदूंच्या समस्यांविषयी आणि लढ्याची पुढील दिशा ठरवण्याविषयी चर्चा करण्यात आली.
     दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात व्यासपिठावर वन्दे मातरम् संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रीतेश, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. अमृतेश, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राज्य समन्वयक अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु जनजागृती समितीचे बेंगळुरू समन्वयक श्री. मोहन गौडा आदी मान्यवर उपस्थित होते.
अंधश्रद्धा कायद्याचा विरोध करण्यासाठी मठ, देवस्थानांनी
पुढाकार घ्यावा ! - अधिवक्ता श्री. अमृतेश
     कायद्याचा रबरबँडप्रमाणे हवा तसा उपयोग करता येतो. या कायद्यामुळे देवस्थान, मठ येथील पद्धतींवर आघात होऊन उद्या पाद्यपूजेलाही विरोध होऊ शकतो. म्हणून सर्वांनी याचा विरोध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

इशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी ! - श्री. मिलिंद कदम, धर्माभिमानी

जोगेश्‍वरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
       मुंबई - तत्कालीन काँग्रेसच्या काळात इशरत जहाँप्रकरणी पी. चिदंबरम् यांनी खोटे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. पोलीस अधिकार्‍यांवर चुकीचे गुन्हेही प्रविष्ट करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी आतंकवादी इशरत जहाँचे उघड समर्थन केले. इशरत जहाँ प्रकरणी पी. चिदंबरम् यांच्यासहित जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. मिलिंद कदम यांनी केले. जोगेश्‍वरी (पू.) रेल्वे स्थानकाजवळील कॅफे गार्डन् समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रसंगी गोवा बंदचे आंदोलन छेडणार - गो.रा. ढवळीकर

      म्हापसा (गोवा) - मराठी राजभाषेसंदर्भात झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यशासनाला जागे करण्यासाठी यापुढे धडक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी जाहीर सभांचे आयोजन, रस्ता बंद आंदोलन आणि प्रसंगी गोवा बंद आंदोलनही छेडले जाणार असल्याची चेतावणी मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे अध्यक्ष गो.रा. ढवळीकर यांनी दिली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाला मराठी राजभाषेच्या वचनाची आठवून करून देण्यासाठी हा धडक कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी पुढे सांगितले.कॅसिनो हटवून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत म्हापसा (गोवा) येथे निदर्शनांद्वारे 
समस्त हिंदुत्ववादी संघटनेची मागणी !
     म्हापसा (गोवा) युवकांना जुगारी बनवणारे कॅसिनो हटवून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा, आतंकवादी इशरतजहाँ प्रकरणात न्यायालयीन प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देण्यासाठी भाग पाडणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करून सर्व उत्तरदायींना कठोर शासन करा आणि निर्दोष पोलीस अधिकार्‍यांची आरोपांतून मुक्तता करा, या प्रमुख मागण्यांसाठी म्हापसा पालिका बाजार (सार्वजनिक गणपति पूजनाच्या ठिकाणी) म्हापसा येथे १२ मार्च या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाअंतर्गत निदर्शने करण्यात आली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचाच हा एक भाग होता.

छत्तीसगड पोलिसांनी एके-४७ रायफलीतून अस्वलावर झाडल्या जवळजवळ १०० हून अधिक गोळ्या !

पोलिसांना अस्वलाविषयी वाटणारी चीड आतंकवाद्यांविषयी का वाटत नाही ?
  • १०० पैकी १६ गोळ्या लागल्याने अस्वलाचा मृत्यू 
  • अस्वलाने ३ जणांना ठार केल्यानंतर कारवाई
      रायपूर - येथील पोलिसांनी एके-४७ रायफलीतून अस्वलावर जवळजवळ १०० हून अधिक गोळ्या झाडल्या. २ दिवसांपूर्वी या अस्वलाने नवागावचे डेप्युटी रेंजर, तसेच त्यांचे अन्य दोन सहकारी, अशा एकूण तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करून त्यांना ठार मारले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पिसाळलेल्या अस्वलावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन संरक्षक विभागाने पोलिसांचे साहाय्य घेतले. घटनास्थळी एके-४७ घेऊन १० हून अधिक पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी अस्वलावर एकाच वेळी १०० हून अधिक गोळ्या झाडल्या. याविषयीची चित्रफीतही समोर आली आहे. यावर आक्षेप घेत रायपूर येथील समाजसेवक कुणाल शुक्ल म्हणाले, एका मुक्या प्राण्याला अशा पद्धतीने ठार मारणे चुकीचे आहे. अन्य मार्गाने अस्वलाला नियंत्रणात आणता आले असते. त्याच्यावर गोळ्या घालण्याची काय आवश्यकता होती ? या प्रकरणी पोलीस आणि वन संरक्षक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा.


मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता खचला

      कटरा - मुसळधार पावसाने जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे. यामुळे काही कालावधीसाठी यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. १२ मार्चलाही असाच पाऊस पडल्याने यात्रेकरूंना थांबबवण्यात आले होते; मात्र नंतर अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी असणारा दरवाजा उघडून सर्व भक्तांना मार्ग खुला करून देण्यात आला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

बांगलादेश राष्ट्राचा धर्म म्हणून इस्लामला तिलांजली देणार काय ?

      ढाका - बांगलादेशला वर्ष १९७१ च्या युद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा अध्यक्षपदावर आलेले मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशला देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून मान्यता दिली. कालांतराने बांगलादेशमध्ये अनेक पालट होऊन वर्ष १९८८ मध्ये इस्लामी विचारसरणीचे शासन आले. या शासनाने संसदेत ठराव पारित करून घटनेत पालट केला आणि इस्लामला राष्ट्राचा धर्म म्हणून घोषित केले. त्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक त्यातही हिंदूंंवर होणार्‍या अत्याचारात प्रचंड वाढ झाली. तेव्हा देशाचा धर्म म्हणून इस्लामला मान्यता देणारी घटनादुरुस्ती रहित करावी, यासाठी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावर केंद्रशासनाने स्वीकार केल्यास या याचिकेवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले; मात्र जर सर्वोच्च न्यायालयानेही घटनादुरुस्ती कायदाबाह्य ठरवली, तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील यावर अनेक वृत्तपत्रात लेख प्रकाशित झाले. त्यातील हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात खालील शक्यता वर्तवण्यात आल्या.

भ्रष्टाचार ७-८ वर्षांनी उघडकीस आणणारे आणि भ्रष्टाचार होत आहे, हे ज्ञात असतांनाही काही वर्षे तपास न करणारे प्रशासन !

     देशातील रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि एअरसेल या ६ प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी त्यांचे उत्पन्न ४६ सहस्र कोटी रुपयांनी अल्प करून दाखवले आहे, तसेच शासनाचा १२ सहस्र ४०० कोटी रुपयांचा हिस्सा नाकारून घोटाळा केल्याचा दावा महालेखापरीक्षकांच्या अहवालात करण्यात आला आहे. वर्ष २००६-०७ आणि २००९-१०च्या उत्पन्नात हा घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २००९ मध्ये दूरसंचार आस्थापनांचा जमाखर्च तपासण्यास बंदी घालण्यात आली होती. २०१४ मध्ये जमाखर्च पडताळण्यास अनुमती देण्यात आली.


दारू निर्मितीचा परवाना असलेल्यांकडून लाच घेऊन ही शिक्षा करणार, असे नाही ना ?

     बिहार राज्यात १ एप्रिलपासून देशी दारूवर पूर्णपणे बंदी असणार आहे. या संदर्भात अवैध दारू बनवणार्‍यांना फाशीची शिक्षा करणारे विधेयक राज्यशासनाकडून बनवण्यात येत आहे.

राष्ट्रदोही कन्हैया कुमार हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रभावी वक्ता मिळाला ! - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांची मुक्ताफळे

आमदार जयंत पाटील यांची मॉर्निगवॉकवरून सनातनवर टीका !
    मुंबई - शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या चौथार्‍यावर महिलांना प्रवेश देण्याला महिला आणि बालकल्याणमंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे विरोध करतात, तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाची आवश्यकता नाही, असे म्हणून नंतर ते या विषयावर काहीच न बोलता गप्प बसतात. राज्यात आता धर्मनिरपेक्षनंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. धर्मनिरपेक्ष विचारांच्या लेखकांना सनातनकडून धमकी आल्याने त्यांना मॉर्निंगवॉक करावे लागते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सनातन संस्थेवर केली. दुष्काळ आणि राज्यातील विविध प्रश्‍नावर ते बोलत होते.
     या वेळी जयंत पाटील म्हणाले, देहली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा राष्ट्रद्रोही विद्यार्थी कन्हैया कुमार याच्यामुळे सत्ताधारी किती हरलेले आहेत, हे मी २-३ आठवडे पहात आहे. या देशात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्त्याची आवश्यकता होती; मात्र कन्हैया कुमार याने ती प्रभावीपणे मांडली, अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली. यानंतर जयंत पाटील यांच्या विधानाचा युतीच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवून जयंत पाटील यांच्या विरोधात सभागृहात धिक्काराच्या घोषणा दिल्या. या घोषणा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी घोषणा देणार्‍या आमदारांना थॅक्यू असे संबोधले.

विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी ! - स्वित्झर्लंड येथील प्रयोगशाळेचे अनुमान

हिंदूंनो, पाश्‍चात्त्यांचा उदोउदो न करता आपल्या महान परंपरेचा सदैव अभिमान बाळगा !
भारतीय शास्त्रज्ञ कधी असे संशोधन करतात का ? 
हिंदूंच्या देवतांवर टीका करणारे आता बोलतील का ?
      सर्न (स्वित्झर्लंड) - विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी, असे स्वित्झर्लंड येथील एका प्रयोगशाळेने अनुमान वर्तवले असून या दिशेने त्यांचा अभ्यास चालू आहे. 
येथील शास्त्रज्ञ फ्रिजोफ काप्रा यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकतांना सांगितले की, 
१. विश्‍वाच्या उत्पत्तीच्या आधुनिक भौतिकशास्त्राच्या संकल्पना आणि प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या संकल्पना यांमध्ये पुष्कळ साम्य आहेे. तसेच प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या या संकल्पना आधुनिक विज्ञानासाठी दिशादर्शक ठरत आहेत. (प्राचीन हिंदु तत्त्वज्ञान परिपूर्ण असल्याने पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञ त्याचा जिज्ञासेने अभ्यास करतात. भारतातील तथाकथित स्वाभिमानशून्य बुद्धीवादी मात्र त्यावर उपहासात्मक टीका करून दिव्याखाली अंधार ही म्हण सार्थ ठरवतात ! - संपादक)

सौदी अरेबियातील कारागृहात १ सहस्र ५७५ भारतीय कैदी भोगत आहेत शिक्षा !

       नवी देहली - सौदी अरेबियातील कारागृहात १ सहस्र ५७५ भारतीय कैदी शिक्षा भोगत असल्याची माहिती विदेश राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी दिली. सौदी अरेबियातील कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
सिंग पुढे म्हणाले की,
१. कारागृहात बंद असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी भारतीय दूतावास प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार भारतीय समुदाय कल्याण निधीतून त्यांच्या दंडाची रक्कम भरली जाते.
२. त्याचप्रमाणे हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दयेच्या याचिकांना पुढे पाठवण्यात येते. 
     काही भारतीय नागरिकांना प्रतिनिधींच्या माध्यमातून नोकरीच्या उद्देशाने तेथे नेण्यात येते; पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जबरदस्तीने अन्य कामे करून घेतली जातात. या नागरिकांचे पारपत्र (पासपोर्ट) स्वत:जवळ ठेवले जातात. अशी प्रकरणे ठळक वृत्तांमध्ये येतात; पण दूतावासांना याविषयी काहीच माहिती नसते. (माहिती नसते कि याकडे परराष्ट्र मंत्रालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते ? - संपादक)

तपासाच्या नावाखाली समीर गायकवाड यांच्या जामीन अधिकारावर गदा आणू नये ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण
पुढील सुनावणी २३ मार्चला
      कोल्हापूर - कॉ. पानसरे खून प्रकरणात समीर गायकवाड यांचा तपास चालू आहे, या नावाखाली त्यांच्या जामीन अधिकारावर गदा आणू नये. समीर यांना जामीन देऊनही तपास चालू ठेवता येतो. समीर यांना कोणतेही सबळ कारण नसतांना जाणीवपूर्वक कारागृहात ठेवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला. ते समीर गायकवाड यांच्या जामीन अर्जावर केलेल्या युक्तिवादावर बोलत होते. ही सुनावणी न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर चालू आहे. शासकीय अधिवक्त्यांनी गेल्या वेळी समीर यांचा जामीन फेटाळल्याने या वेळीही फेटाळावा, अशी मागणी केली. दोन्ही बाजूचे ऐकून न्यायाधिशांनी २३ मार्च या दिवशी जामीन अर्जावर निकाल देऊ, असे घोषित केले. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता आनंद देशपांडे, संजय धर्माधिकारी, श्रीपाद होमकर उपस्थित होते.


अन्य देशांच्या तुलनेत भारतात कॉल ड्रॉपच्या समस्येचे प्रमाण अधिक

     नवी देहली - अन्य देशांच्या तुलनेत भारतात कॉल ड्रॉप (भ्रमणभाषवरून बोलतांना मध्येच संपर्क तुटणे) या समस्येचे प्रमाण अधिक असल्याचे रेडमँगो एनालेटिक्सने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण देशातील मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि जम्मू-काश्मीरमधील २० शहरांमध्ये करण्यात आले होते.
१. जगातील कॉल ड्रॉपचे सर्व साधारण प्रमाण ३ टक्के आहे. भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्रायने) साधारण २ टक्क्यांपर्यंतचे कॉल ड्रॉप ग्राह्य मानले आहेत. मात्र भारतातील बहुतेक भागांमध्ये कॉल ड्रॉपचे प्रमाण ४.७३ टक्के असल्याचे आढळले आहे. 
२. कॉल ड्रॉप झाला, तर त्यावर दूरसंचार आस्थापनांनी हानी भरपाई देण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध दूरसंचार आस्थापनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
३. १५ मार्चपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार असून १७ मार्चला निकाल येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
४. अल्प किमतीतील भ्रमणभाष कॉल ड्रॉपला कारणीभूत ठरत असल्याचा दावा दूरसंचार आस्थापनांनी केला आहे.

भारतात २१ लाख लोकांना एच्आयव्हीची बाधा ! - केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती

देशात होणारा एड्सचा प्रसार रोखण्यासाठी देशाला विकासासह नीतीमत्तेचे धडे देणे आवश्यक !
     नवी देहली - भारतात २१ लाखांहून अधिक लोक एच्आयव्ही बाधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला दिलेल्या लिखित उत्तरात दिली. नड्डा म्हणाले, वर्ष २०१५ च्या अहवालानुसार भारतात अनुमाने २१ लाख १७ सहस्त्र लोक एच्आयव्ही बाधित आहेत.यूएन्एआयडीएस्च्या (यूनोएड्सच्या) वर्ष २०१४ च्या अहवालानुसार जगात एच्आयव्ही बाधित लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ६८ लाख आणि नायजेरियामध्ये ३४ लाख लोक एच्आयव्हीमुळे बाधित आहेत.न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे वार्षिक निवेदन देण्यास प्रारंभ करावा ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

     पाटलीपुत्र (पाटणा) - न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे एक वार्षिक निवेदन चालू करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पाटणा उच्च न्यायालयाच्या शतकपूर्ती सोहळ्याचा समारोप मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
१. न्यायालयाने प्रलंबित खटल्यांची माहिती देणे चालू केले, तर न्यायालयाच्या कार्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होईल. तसेच एखाद्या कारणामुळे खटला प्रलंबित रहात असेल, तर त्यावर उपयायोजना काढण्यास यातून सहाय्य होईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.
२. या कल्पनेसोबत मोदी यांनी अधिवक्त्यांना त्यांच्या संघटना आणि न्यायालयीन कार्यामध्ये विविध पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करू शकतो, याविषयी अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. 
३. याद्वारे न्यायालयाच्या प्रक्रियेला वेग मिळू शकेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.


कर्तव्य न करता केवळ देवाचा नामजप करणारे देवभक्त नसून देवद्रोही असतात. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१०)
निघोज (जिल्हा नगर) येथे मद्यबंदीसाठी आंदोलन करणार्‍या महिलांवर पोलिसांकडून लाठीमार

मद्यबंदीसाठी पुढाकार घेऊन आंदोलन 
करणारे ग्रामस्थ आणि महिला यांचे अभिनंदन !
       नगर, १४ मार्च - निघोज येथे मद्यबंदी करावी आणि त्यासाठी विहीत मार्गाने मतदान घेण्यात यावे, या मागण्यांसाठी निघोज ग्रामस्थ महिलांनी नगर-पुणे महामार्गावर १३ मार्च या दिवशी रस्ता बंद आंदोलन केले. या वेळी आंदोलक महिलांना रस्त्यावरून हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लाठीमार करून त्यांची धरपकड केली. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात १० आंदोलक घायाळ झाले आहेत.

देशभर प्रखर राष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार !

ओम जी विश्‍व वीर सेनेचे अध्यक्ष डॉण् स्वामी ओम जी मण् यांचा निर्धार !
आंदोलनात सहभागी झालेले डॉण् स्वामी ओम जी मण्
   नवी देहली - कारागृहामधून बाहेर पडलेल्या कन्हैया कुमार आदी सर्व देशद्रोह्यांना धडा शिकवणे, जेएन्यूसारखी सर्व देशद्रोही विद्यापिठे बंद करणे आणि लोकांना प्रखर राष्ट्रवाद शिकवणे यांसाठी ओम जी विश्‍व वीर सेना संघटनेचे अध्यक्ष डॉण् स्वामी ओम जी मण् यांच्याकडून देशव्यापी तीव्र आंदोलन चालू करण्यात आले आहे. 
   या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉण् स्वामी ओम जी मण् म्हणाले की, 
१. देशद्रोही काँग्रेस आणि वामपंथी कॅम्युनिस्ट आदी पक्षांच्या नेत्यांच्या संरक्षणात जेएन्यूचे कुविद्यार्थी आणि शिक्षक यांना देशद्रोह करण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळेच त्यांच्याकडून मागील अनेक वर्षांपासून जेएन्यू परिसरात देशविरोधी अनेक कार्यक्रमांसह अश्‍लील कारवाया करण्यात आल्या.

गोध्रा हत्याकांडातील ११८ धर्मांध आरोपींची निर्दोष मुक्तता

     गांधीनगर (गुजरात) - वर्ष २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर कारसेवकांवर झालेल्या आक्रमणातील ११८ धर्मांध आरोपींना गुजरातच्या नडियाद जिल्हा न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. या आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळाला नसल्याने त्यांना दोषी ठरवता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले. यापूर्वी २०११ मध्ये एका विशेष न्यायालयाने गोध्रा जळीत हत्याकांडात ३१ जणांना दोषी ठरवले होते, तर ६३ जणांना निर्दोष ठरवले होते.

२३ मार्चपासून सलग ५ दिवस बँका बंद रहाणार !

देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार्‍या सुट्टया काय कामाच्या ?
     नवी देहली - २३ मार्च ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बँका बंद रहाणार आहेत. २३ मार्चला होळी, २४ ला धूलिवंदन आणि २५ ला गुड फ्रायडे, यानंतर चौथा शनिवार आणि रविवारमुळे सट्टी आहे. या कालावधीत पैसे काढण्यासाठी एटीएम्चा वापर करता येईल; मात्र सण-उत्सवांच्या काळात एटीएम्मधील पैसेही संपण्याची शक्यता आहे.

फलक प्रसिद्धीकरता

देशाच्या विरोधात बोलणार्‍यांची निष्ठा भारताशी कि पाकिस्तानशी ?
      मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूर येथील एका सभेत बोलतांना केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mai Bhrat mata ki jay kabhi nahi kahunga ! aise MIMke neta Asaduddin Ovaisine kaha.
Ovaisi Bharat ke hai ya Pak ke ?

जागो ! : मै भारत माता की जय कभी नही कहूंगा ! ऐसे एम्आयएम् के नेता असदुद्दीन ओवैसी ने कहा.
ओवैसी भारत के है या पाक के ?

शिक्षण आयुक्तांकडून चौकशी करणार ! - शालेय शिक्षणमंत्री

कासा-बुद्रुक मध्यान्न आहार विषबाधा प्रकरण
      मुंबई, १४ मार्च (वार्ता.) - पालघर जिल्ह्यातील कासा-बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणी शाळेत पाठवलेले अन्न २ घंटे उन्हात ठेवण्यात आल्यामुळे कि शिजवतांना खराब झाले, याची चौकशी केल्यानंतरच मध्यान्न पोषण आहार पुरवणार्‍या इस्कॉन संस्थेला दोषी ठरवण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी शिक्षण आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

इंग्लंडमध्ये खाद्यपदार्थांसोबत होते गोमूत्राचीही विक्री !

     लंडन - गोमूत्राचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन लंडनच्या दक्षिण आशियायी दुकानांमध्ये खाद्यपदार्थांसोबत गोमूत्राचीही विक्री होत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.
       एका दुकानविक्रेत्याने सांगितलेल्या माहितीनुसार लंडनमधील हिंदू धार्मिक कारणासांठी तसेच घरामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर गोमूत्राचा उपयोग करतात, असे लक्षात आले आहे. वेटफोर्ड येथील हरे कृष्णा मंदिराच्या डेअरीमध्ये गोमूत्राचे उत्पादन केले जाते. मंदिराचे व्यवस्थापक गौरी दास यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला माहिती देतांना सांगितले की, ७० च्या दशकापासून ते गोमूत्राचे उत्पादन करत आहेत. धार्मिक कार्यांसोबत औषध म्हणूनही गोमूत्राचा उपयोग केला जात आहे.

(म्हणे) साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये !

हिंदूंच्या साध्वीविषयी असे विधान करणार्‍या खान यांना आतापर्यंत कारागृहात डांबायला हवे होते ! 
उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे संतापजनक वक्तव्य !
     नवी देहली - उत्तरप्रदेशचे शहर विकास मंत्री आझम खान यांनी साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये, असे संतापजनक वक्तव्य केले. आग्रा येथील एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांच्याविषयीच्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते. खान यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, साध्वी प्राची यांच्याविषयीचे हे वक्तव्य विकृत असून खान त्यांच्या आई-मुलीविषयीही असे विचार करू शकतात.

राजिम कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा प्रदर्शन पाहून प्रभावित

     राजिम कुंभमेळा (छत्तीसगड) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या भव्य प्रदर्शनाला या कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा आणि राजिम कुंभमेळा आयोजन समितीचे सदस्य श्री. राकेश तिवारी यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहून ते अतिशय प्रभावित झाले. या वेळी श्री. बिस्सा म्हणाले, प्रतिवर्षी मला तुमचे प्रदर्शन पहाण्याचा विचार येतो. आज हे प्रदर्शन पाहून अतिशय चांगले वाटले; मात्र या प्रदर्शनाचे मुख्यद्वार लहान पडते. हे द्वार आणखी मोठे असायला हवे होते. पुढील वर्षी तुमच्या प्रदर्शनाकरता याहून मोठे द्वार सिद्ध करून देईन. त्यामुळे सर्व जिज्ञासूंना हे प्रदर्शन ठळकपणे दिसेल.
     संस्कृतीद्वेष्टे अंधश्रद्धा अशी शिवी हासडून स्वतःला कृतार्थ मानतात. अंधश्रद्ध अशी श्रद्धावानाची हेटाळणी करणारे हे कॉन्व्हेंट, पॉप संस्कृतीचे पोषक नि संवर्धक स्वतः मात्र अंधश्रद्धेने पछाडलेले असतात ! - प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शनाचे आयोजन

राजिम कुंभमेळा-२०१६
डावीकडून माजी आमदार धनेन्द्र साहू सनातनचे
पू. चत्तरसिंग इंगळे यांच्याशी संवाद साधतांन
प्रदर्शनाला अभनपूर येथील काँग्रेसचे माजी 
आमदार धनेन्द्र साहू यांची भेट
     राजिम कुंभमेळा (छत्तीसगड) - छत्तीसगड राज्यात राजिम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तपणे राष्ट्र आणि धर्म या विषयांवर भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अभनपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी आमदार धनेन्द्र साहू यांनी भेट दिली. प्रदर्शनी पाहून ते अतिशय प्रभावित झाले. गोरक्षण विषयावरील प्रदर्शन पाहून ते म्हणाले, हा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे केंद्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी दुर्ग येथील सनातनचे पू. चत्तरसिंग बाबूलालसिंग इंगळेकाका उपस्थित होते.

पत्नी सेवेसाठी अन्यत्र जात असल्याचे ईश्‍वरेच्छा म्हणून सहजतेने स्वीकारणारे श्री. प्रतीक जाधव !

सौ. कीर्ती जाधव
श्री. प्रतीक जाधव
      ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सौ. कीर्ती (वय २४ वर्षे) आणि श्री. प्रतीक जाधव यांनी (वय २५ वर्षे) या वयातच एकमेकांच्या केवळ आध्यात्मिक प्रगतीचाच विचार करून सर्वच पती-पत्नींपुढे एक फार मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

     सौ. कीर्तीला देवद आश्रमात सेवेसाठी जाण्याविषयी तिचे पती श्री. प्रतीक यांना विचारून घेण्यास सांगितले होते. दुसर्‍या दिवशी तिने त्यांना विचारून मला पुढील लघुसंदेश पाठवला, पूज्य ताई, श्री. प्रतीक म्हणतात, तू देवाची आहेस. तुझ्यावर पूर्णपणे देवाचाच अधिकार आहे. त्यामुळे भगवंताचे जसे नियोजन आहे, तसे कर. तुझ्या जाण्याविषयी गुरूंनी मला विचारल्याने कसेतरीच वाटले. त्यांनी मला विचारणे अपेक्षित नाही.
      यावरून श्री. प्रतीक कीर्तीकडे साधक-पत्नी म्हणून पहात असल्याचे लक्षात येते.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

चारही नगरसेवकांचे पद रहित करण्याचा आदेश

सूरज परमार आत्महत्या प्रकरण
       ठाणे - येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी आरोपी नगरसेवकांच्या अपात्रतेची कारवाई चालू झाली आहे. कारण या नगरसेवकांचे पद रहित करा, असा आदेश स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेने या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी ७ ऑक्टोबर २०१५ या दिवशी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या चारही नगरसेवकांवर आहे.
      या नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही ४ नावे होती.

चाणाक्ष, त्यागी वृत्तीचे आणि शत्रूशी कसे वागावे, याचा आदर्श ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर अन् सध्याच्या राज्यकर्त्यांची विदारक स्थिती !

१४ मार्च या दिवशी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...
श्री. संदीप जगताप
       स्वातंत्र्याचा ध्यास हा । कुणा कठोर कारावास ।
       कुणी हो जननिंदेचा घास । कुणाच्या गळ्यात येई फास ।
       शाईने का लिहिला जाई । राष्ट्राचा इतिहास ॥
   अशा प्रकारचा जाज्वल्य इतिहासाचा वारसा आपल्यासाठी ठेवणारे अनेक क्रांतीकारक या भारतभूमीमध्ये होऊन गेले. त्यांनी जुलमी इंग्रजी राजवटीतून भारतभूमीची सुटका केली; पण ज्यांच्या कर्तृत्वाने जनता त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखू लागली, ते क्रांतीसूर्य श्री. विनायक दामोदर सावरकर ! त्यांची वैशिष्ट्ये प्रत्येक देशप्रेमीला खात्रीने मार्गदर्शक ठरतील आणि त्यांच्या तुलनेत सध्याच्या राज्यकर्त्यांची विदारक स्थिती स्पष्ट करतील.

प.पू. परूळेकर महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. परूळेकर महाराज यांची साखरेने तुला करण्यात आली तो क्षण
प.पू. परूळेकर महाराज यांचे आशीर्वाद घेतांना हिंदु जनजागृती समितीचे
श्री. हेमंत मणेरीकर

मूळ वस्तूपेक्षा बर्‍याच मोठ्या आकाराचे वेष्टन करून ती वस्तू खरेदी करायची भुरळ पाडणारी व्यापारी आस्थापने !

जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने...
     काही औषधांच्या संदर्भात पुढील फसवणूक होत असल्याचे दिसून येते. औषधाचा आकार मोठा दिसावा; म्हणून आस्थापनांकडून पुढील पद्धती अवलंबल्या जातात.
१. औषधाचा खोका मोठ्या आकाराचा करतात. त्यातील मलमाची ट्यूब छोटीशी आहे, हे कळू नये; म्हणून त्या खोक्यात एक कप्पा करून त्यात मलमाची ट्यूब ठेवली जाते. डोळ्यांत थेंब घालायच्या औषधाची छोटीशी बाटली असल्यास मोठ्या आकाराच्या खोक्यात आणखी एका प्लास्टिकच्या वेष्टनात ती बाटली ठेवली जाते. असे करून ती छोटी औषधाची ट्यूब किंवा बाटली हलून त्या आवाजावरून तिचा आकार कळू नये, असा हेतू साध्य केलेला असावा. एका आस्थापनाच्या डोळ्यांच्या ३ मि.ली. द्रवरूप औषधाची ३ सें.मी. उंचीची बाटली १० सें.मी. उंचीच्या खोक्यात ठेवलेली होती.

गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवणार का ?

    पुणे शहरात गेल्या काही दिवसांत बलात्कार आणि सोनसाखळी चोरण्याच्या घटना विविध भागांत वाढल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे कौशल्य (?) पणाला लावून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना अटकही केली; परंतु या दोन्ही प्रकारच्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न एकदा ऐरणीवर आला आहे. अद्यापही पुण्याचे नाव हे विद्येचे माहेरघर, असे म्हणून काही प्रमाणात ओळखले जाते; पण सध्या महिलांविषयी घडणार्‍या गुन्ह्याच्या घटना पाहून हे शहर महिलांसाठी असुरक्षित शहर म्हणून ओळखले जाईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
                          मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्यावर त्यानंतरची ७० टक्के फलनिष्पत्ती मिळण्याच्या दृष्टीने अभिप्रायपत्रकाचे महत्त्व लक्षात घ्या आणि उपस्थित धर्मप्रेमींकडून ते परिपूर्ण भरून घ्या !

समितीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना
     हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करत आहे. ईश्‍वरी कृपा आणि संतांचे आशीर्वाद यांमुळे या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सभेला उपस्थित राष्ट्र-धर्म प्रेमी यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी सर्वत्रच्या कार्यकर्त्यांनी अभिप्रायपत्रकांचे महत्त्व जाणून त्यांचा पुढील प्रकारे प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.
१. अभिप्रायपत्रकांचे महत्त्व
अ. सभेला उपस्थित राहिलेल्या धर्मप्रेमींना राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी करून घेण्याचा सभेचा उद्देश सफल करण्यासाठी अभिप्रायपत्रक हे महत्त्वाचे माध्यम आहे.
आ. प्रत्येक धर्मप्रेमीची क्षमता भिन्न असते. अभिप्रायपत्रकात राष्ट्र-धर्म विषयीच्या विविध प्रकारच्या उपक्रमांची सूची दिलेली असल्याने धर्मप्रेमी स्वतःची क्षमता, आवड आणि तळमळ यांनुसार राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याचा विचार करू शकतात.
इ. अभिप्रायपत्रकात धर्मप्रेमीचे नाव आणि संपर्कपत्ता नमूद केलेला असतो. त्यामुळे त्यांना राष्ट्र-धर्म विषयीच्या उपक्रमांत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा संपर्क साधणे शक्य होते. सभेला उपस्थित धर्मप्रेमींचे नाव आणि संपर्कपत्ता उपलब्ध नसेल, तर त्यांना पुन्हा संपर्क करणे जवळजवळ अशक्य होते.
ई. अभिप्रायपत्रकात धर्मप्रेमींनी लिहून दिलेल्या माहितीमुळे त्यांचा समष्टी सेवेत सहभागी होण्याचा कल लक्षात येतो.

मोठेपणी शिवाजी होण्याची इच्छा असणारा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) (वय ९ वर्षे) !

      फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (१५.३.२०१६) या दिवशी कु. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि नातेवाइक यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
कु. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) याला 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
कु. विश्‍व कृष्णा आय्या
१. जन्मापूर्वी
१ अ. जन्माला येणारे बाळ पुढील साधना होण्यासाठी जन्म घेत असल्याचे जाणवणे आणि बालसंगोपनाच्या माध्यमातून साधना होणार असल्याचे जाणवून भावाश्रू येणे : विवाहानंतर आम्ही उभयतां रामनाथी आश्रमात गेलो होतो. परतल्यानंतर एका मासातच गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर जन्माला येणारे बाळ त्याची पुढील साधना लवकर होण्यासाठी जन्म घेत आहे, असे वाटून कृतज्ञता वाटली. माझी या बालसंगोपनाच्या माध्यमातून साधना होण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी माझी किती काळजी घेतली, असे वाटून मला अश्रू आवरता येत नव्हते.

निरासक्त वृत्तीचे, कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे आणि श्री गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून कठीण परिस्थितीला आनंदाने तोंड देणारे संकेश्‍वर, जिल्हा बेळगाव येथील कै. विजय गणपति जाधव !

कै. विजय जाधव
     संकेश्‍वर, जिल्हा बेळगाव येथील कै. विजय गणपति जाधव (वय ५५ वर्षे) यांचे ४.३.२०१६ या रात्री १२ वाजता हृदयविकाराने निधन झाले. १५.३.२०१६ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. कष्टाळू आणि सदा कार्यरत
       दादा लहानपणापासून कष्टाळू वृत्तीचा होता. तो सकाळी ५.३० ला उठायचा आणि रात्री ११ पर्यंत सतत काही ना काही कामे करत रहायचा. त्याला कधी सुटी घेण्यास सांगितले, तर तो घरी राहून कामे करत असे. दादा नेहमी प्रत्येक कृती पटपट आणि परिपूर्ण करायचा. रुग्णाईत असला, तरी तो कधी विश्रांती घेत नसे किंवा कंटाळा आला, असेही म्हणत नसे. प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेत पूर्ण करून, तसेच कोणतेही काम चिकाटीने पूर्ण करूनच तो थांबायचा. तेव्हा त्याला वेळेचेही भान नसायचे.

दत्तमाला मंत्रपठणाच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर सौ. पार्वती जनार्दन यांना देवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

१. मंत्रपठणाला गेल्यावर प्रारंभी शारीरिक त्रास होणे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर सर्व देवच करवून घेतो, याची अनुभूती येणे : आरंभी मी थोडा वेळ मंत्रपठण केल्यावर माझा घसा दुखायचा आणि खोकलाही यायचा. काही दिवसांनी मी भावाच्या स्तरावर प्र्रयत्न करूया, असा विचार करून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, माझे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होऊन मंत्रपठण करतांना तुझ्याच अस्तित्वात रहाता येऊ दे. तेव्हा मनात सतत जाणीव राहिली की, देव नसल्यास आपल्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडू शकत नाही आणि सर्व देवच करवून घेत आहे. त्यामुळे मंत्रपठण भावपूर्ण व्हायला लागले आणि माझा त्रास अल्प झाला. आश्रमातील अन्य साधक म्हणाले, पठणात तुझा आवाज मोठा आणि चांगला ऐकू येतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, देवच माझ्या देहाच्या माध्यमातून म्हणवून घेत असल्यामुळे साधकांनापण मंत्रपठण चांगले वाटले.

कृष्णसेवेत रममाण झालेल्या रामनाथी गोकुळीच्या गोप-गोपींची श्री. रोहित साळुंके यांनी उलगडली भाववैशिष्ट्ये !

श्री. रोहित साळुंके
     एका सेवेनिमित्त व्यवस्थापनाची सेवा करणार्‍या गोप-गोपींशी माझा संपर्क आला. तेव्हा त्या गोप-गोपींकडून (कु. प्रियांका जोशी, कु. स्वाती गायकवाड, कु. अमृता मुद्गल, श्री. कुशल गुरव इत्यादींकडून) बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या पुढे देत आहे.
१. अनोखा सेवाभाव !
अ. पूर्वीच्या काळी गोपी कृष्णनामात दंग असायच्या. आताच्या या गोपी कृष्णसेवेत इतक्या दंग असतात की, त्यांना कुठलेच भान नसते. तहान, भूक, झोप विसरून त्या सतत सेवेत दंग असतात. त्या स्वला पूर्णपणे विसरून सेवा करत असल्याने पुष्कळ आनंदी दिसतात.
आ. गोपींच्या अपूर्व भक्तीमुळेच त्यापैकी काही जणी (उदा. अमृता) लहान असूनही कोणत्याही परिस्थितीत अत्यंत सहजतेने सेवा करतात.

सत्य न कळल्याने लहान लहान गोष्टींतूनही असत्याशी संग होत असणे आणि भगवंताचे नियोजन समजून घेतल्यास भाव जागृत होऊन सत्य जाणण्याची क्षमता निर्माण होत असणे

प.पू. पांडे महाराज
१. असत्य संगाच्या प्रभावामुळे रज-तमाचा परिणाम वाढून आत्म्यावर काळ्या शक्तीचे आवरण आल्याने मायेतील सर्व व्यवहार सत्य वाटू लागणे आणि जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकणे : मी हाताने दिवा विझवला असे आपण म्हणतो; परंतु वास्तविक तेथे वायू (हवा) होताच. मी हाताने तेथील वायूला केवळ गती दिली आणि त्या वायूद्वारे दिवा विझला. हे सत्य असतांना आपण मात्र मी हाताने दिवा विझवला, असे म्हणतो, म्हणजे जे सत्य आहे, ते अज्ञानाने लोप पावते आणि असत्य हे दृश्यरूपात असल्यामुळे त्याचा प्रभाव पडून ते सत्य भासते. अशा प्रकारे सतत असत्य संगाच्या प्रभावामुळे रज-तमाचा परिणाम वाढून आत्म्यावर काळ्या शक्तीचे आवरण येते. तेव्हा मायेतील सर्व व्यवहार सत्य वाटू लागतात आणि सत्य अशा परमेश्‍वरापासून तो जीव दूर होतो. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती खुंटते आणि तो जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकतो. त्यातून सुटका होण्यासाठी त्याने सतत साधना केल्यास तो भगवंताच्या अनुसंधानात राहतो. सत्याची सतत जाणीव रहात असल्यामुळे त्याची आध्यात्मिक पातळी वाढते. अशा रितीने तो जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटतो.

पुणे-गोवा प्रवास करतांना प्रवासात त्रास होणे; पण रामनाथीच्या दिशेने प्रवास चालू झाल्यावर मनाला आनंद होत असल्याचे जाणवणे

      २२.७.२०१५ या दिवशी मी पुणे येथून गोव्याला येण्यास निघालो. बसमध्ये साधारणतः १ घंट्याने मला त्रास जाणवू लागला. त्यावर मी प्रार्थना आणि नामजप करत मात करण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे चार घंट्यांनंतर मला एकदम उत्साह वाटू लागला. यावरून रामनाथीच्या दिशेने प्रवास चालू झाल्यावर उपाय होऊन आनंद अनुभवता येतो, याची ही अनुभूती श्रीगुरूंच्या कृपेने मला मिळाली.
- श्री. विशाल देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या विजयाविषयी, तसेच सनातन संस्थेच्या कार्याविषयी केलेले भाकीत आणि आम्ही प.पू. डॉक्टरांची छाया बनून त्यांच्या समवेतच वावरत आहोत, यासंबंधी केलेले विधान !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
१. सनातन संस्थेच्या मागे ईश्‍वराचे पाठबळ 
असणे, तसेच अनेक संतांचे, महर्षींचे आशीर्वादही असणे
       सनातन संस्थेवर आजवर अनेक संकटे आली आहेत आणि वेळोवेळी मोठ्या संकटांतून देवाने तारलेही आहे. अनेक संतांचे, सप्तर्षींचे आशीर्वाद सनातनच्या पाठीशी असल्याचीच ही अनुभूती आहे. सनातन संस्थेला अनेकदा रसातळाला नेण्याचा, तिची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न समाजद्रोही, धर्मद्रोही आणि राजकारणी यांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत; परंतु सनातन संस्थेच्या मागे ईश्‍वराचे पाठबळ असल्याने साधक अशा संकटांमध्ये कधीच खचून गेले नाहीत अथवा डगमगलेही नाहीत.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे हे देऊ, ते देऊ, असे सांगणार्‍या राजकारण्यांच्या सभांना पैसे देऊन बोलावलेल्या स्वार्थी माणसांची गर्दी, तर कुठे राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्यास सांगणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या अन् लोकांच्या त्यागातून होणार्‍या सभांना होणारी राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची गर्दी ! - परात्पर गुरु डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रमाची कास धरा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     ईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भारतीयसैन्याचा तेजोभंगथांबवा!

संपादकीय
     अब्दुल कादीर बलुच, डॉ. मन्नन बलुच, ब्राहमदाग बुगती, हरबियार मारी ही नावे आहेत पाकमधील बलुची नेत्यांची ! हे नेते गेली कित्येक दशके स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. आपल्या भाषेत आपण त्यांना पाकमधील फुटीरतावादी नेते म्हणू शकतो. आपल्याकडेही तेरी जान, मेरी जान पाकिस्तान, पाकिस्तान ! असे म्हणणारे यासीन मलिक, मसरत आलम, सैय्यद अली शाह गिलानी असे फुटीरतावादी नेते आहेत; मात्र बलुची नेते आणि काश्मिरी फुटीरतावादी नेते यांच्यात आकाश-पाताळाचा भेद आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे हे बहुतांश नेते विविध देशांमध्ये आश्रय घेऊन निर्वासिताचे जीवन जगत आहेत. यांतील बहुतांश नेत्यांना जिवंत किंवा मृत पाकमध्ये परत आणण्यासाठी पाक सेना खटपट करत आहे. हे नेते अमेरिका, स्वित्झर्लंड यांसारख्या देशात राहून पाक सैन्य बलुची लोकांवर करत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचत दिवस ढकलत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn