Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन

देशातील प्रत्येक मंदिरात महिलांना प्रवेश मिळायलाच हवा ! - रा.स्व. संघ

      नागपूर - देशातील प्रत्येक मंदिरात महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे; मात्र हा वाद आंदोलनांऐवजी चर्चेने आणि सामंजस्याने सोडवला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक अहवालात महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या सूत्रावर संघाने सविस्तर भूमिका मांडली आहे.
यात संघाने म्हटले आहे,
१. धर्माच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रात पुरुष अन् महिला असा भेदभाव नाही. तिथे दोघेही समान आहेत. महिलांच्या मंदिर प्रवेशाला आमचा पाठिंबा आहे. (अध्यात्मशास्त्रात पुरुष आणि महिला यांनी कसे आचरण करावे आणि करू नये, याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. - संपादक)
२. चुकीच्या प्रथा-परंपरा पालटायलाच हव्यात. त्यासाठी सामाजिक आणि धार्मिक नेतृत्वाने एकत्र येऊन, मंदिर व्यवस्थापनांशी संवाद साधून लोकांची मानसिकता पालटण्याचा प्रयत्न करायला हवा. संघ यासाठी प्रयत्न करील.
३. अशा गोष्टींसाठी आंदोलन करणे अयोग्य आहे. चर्चा आणि संवाद यांतून मार्ग काढायला हवा.

मनुस्मृति जाळण्याची आवश्यकता नाही ! - मायावती

उत्तरप्रदेशच्या निवडणुका जवळ आल्यावर 
हिंदूंच्या मतांसाठी रंग पालटणार्‍या मायावती !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मनुस्मृति जाळण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी बंधूभावाची आवश्यकता आहे. यामुळे जातीभेद अल्प होईल. मनुस्मृति जाळावी, अशी स्थिती आता राहिलेली नाही, असे विधान बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी येथे केले. काही दिवसांपूर्वी जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये) मनुस्मृति जाळण्यात आली होती. या कृतीचा सामाजिक संकेतस्थळावर विरोध करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मायावती यांनी वरील विधान केले आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते पी.एल्. पुनिया यांनी मनुस्मृतीचा विरोध केला आहे. अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहेब आंबेडकर मिशनचे राष्ट्र्रीय महासचिव दिलीप चौधरी यांनी म्हटले आहे की, कोणताही ग्रंथ जाळण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक ग्रंथात काही चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि वाईट सोडून दिल्या पाहिजेत.

पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर चिनी सैनिक !

      श्रीनगर - लडाख येथे घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर चिनी सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेजवळच्या भागाची पाहणी करतांना दिसले आहेत. (कुरापतखोर चीन ! - संपादक) भारतीय सैनिकांनी नौगांव सेक्टरसमोर नियंत्रणरेषेजवळील पाकच्या लष्करी चौकीवर चिनी सैनिकांना बघितले आणि दक्षतेची चेतावणी दिली.

(म्हणे) रा.स्व. संघ आणि इसिस एकसारखेच !

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचा शोध !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर इसिससारखा असता, तर गुलाम नबी आझाद यांचे असे 
बोलण्याचे धाडस झाले असते का ? यातून आझाद यांची हिंदुद्वेषी वृत्ती दिसून येते !
     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इस्लामिक स्टेट (इसिस) यांचे सिद्धांत सारखेच आहेत. इसिस इस्लामी जगताची मागणी करत आहे, तर संघ हिंदु राष्ट्राची अपेक्षा बाळगत आहे, असे विधान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी १२ मार्च या दिवशी केले. आम्ही संघाचा जेवढा विरोध करतो, तेवढाच इसिसचाही तीव्रतेने विरोध करतो, असेही आझाद म्हणाले. जमियत उलेमा-ए-हिंदने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनात ते बोलत होते. आझाद यांच्या या वक्तव्याबद्दल संघ कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे; तर आझाद यांनी क्षमा मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र आझाद त्यांच्या विधानावर ठाम आहेत.
सोनिया गांधी यांच्याकडून उर्दूत स्वाक्षरी !
     जमियतच्या व्यासपिठावरून आझाद यांनी सोनिया गांधी यांचाही संदेश वाचून दाखवला.

बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत उमटला हिंदुत्वाचा हुंकार !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. टी. राजासिंह,
श्री. मनोज खाडये आणि श्री. अभय वर्तक
     बेळगाव - येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणावर १३ मार्च या दिवशी पार पडलेल्या भव्य हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी मांडलेेल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी उपस्थित सहस्रो धर्माभिमान्यांच्या मनांत हिंदुत्वाचा हुंकार उमटला आणि त्यांनी मनोमन संघटित होण्याचा दृढनिश्‍चय केला. हिंदु जनजागृती समिती आयोजित या सभेला श्रीराम युवा सेवा संस्थापक अध्यक्ष आणि भाग्यनगरचे आमदार श्री. टी. राजासिंह, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी संबोधित केले.


संघाच्या गणवेशात पालट, खाकी हाफ पॅन्टऐवजी आता तपकिरी रंगाची फुल पॅन्ट!

      नागौर (राजस्थान) - राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पालट करण्यात आला असून खाकी हाफ पॅन्टच्या जागी आता तपकिरी रंगाची फुल पॅन्ट वापरण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी दिली. राजस्थानमधील नागौरमध्ये चालू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला. पांढरा सदरा आणि काळी टोपी कायम रहाणार आहे. ते पुढे म्हणाले, आता सर्व जण फुल पॅन्ट परिधान करतात. त्यामुळे आम्ही फुल पॅन्टचा स्वीकार केला आहे. राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघ काळानुसार परिवर्तन करणारी संघटना आहे. तपकिरी रंगाची पॅन्ट सगळीकडे उपलब्ध होऊ शकेल, म्हणून हा रंग निवडण्यात आला आहे. यामागे काही विशेष कारण नाही.

तेलंगण शासन ब्राह्मणांच्या कल्याणासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची शक्यता

      भाग्यनगर - तेलंगण राज्यशासन या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समाजावरील कल्याणकारी योजनांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी संमत करणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. ब्राह्मणांच्या कल्याणासाठी राज्यशासन अधिकाधिक सकारात्मक पावले उचलणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिले होते. भाग्यनगर येथे ब्राह्मण भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राव यांच्याकडून याआधीच करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाने राव यांना नुकत्याच झालेल्या भाग्यनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. शेजारील आंध्रप्रदेश शासनानेही ब्राह्मण प्राधिकरणाची स्थापना केली आहे, तसेच अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समाजासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश देण्याच्या संदर्भात धर्मसंसद बोलावण्याचा निर्णय ! - दुर्गा शुक्रे, अध्यक्ष, भूमाता महिला ब्रिगेड

     नाशिक - त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाविषयी चार पिठांचे शंकराचार्य, आखाडा परिषद, त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त, तसेच भूमाता महिला ब्रिगेड यांच्यासोबत धर्मसंसद भरवून चर्चा करून सर्वसंमतीने हा प्रश्‍न सोडवला जाईल, असा निर्णय १२ मार्चला घेण्यात आला, असे भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गा शुक्रे यांनी सांगितले.
आमच्या गावाची परंपरा आम्ही मोडू देणार नाही !
- योगेश तुंगार, माजी नगराध्यक्ष, त्रिंबक नगरपरिषद
     तुम्ही चर्चेसाठी आला असाल, तर स्वागत आहे. शास्त्र आणि परंपरा समजून घ्या. तुम्ही धर्मसंसद बोलावणार आहात, हेही चांगले आहे; परंतु कोणी काही म्हणाले, तरी आम्ही आमच्या गावाची परंपरा मोडू देणार नाही, असे त्रिंबक नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. योगेश तुंगार यांनी भूमाता ब्रिगेडच्या महिलांना या वेळी सांगितले.

उच्च न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

      मुंबई - फौजदारी आणि दिवाणी न्यायालयाप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मराठी भाषामंत्री श्री. विनोद तावडे यांनी नुकतेच सांगितले. एका तारांकीत प्रश्‍नावर उत्तर देतांना त्यांनी हे सूत्र स्पष्ट केले. कनिष्ठ न्यायालयात मराठीत कामकाज चालवण्यासाठी उच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायालयांना आदेश दिले आहेत. तिथे कामकाज मराठीत चालते कि नाही, हे पहाण्यासाठी चार महिन्यांनी आढावा घेतला जातो, तसेच कामकाज मराठीत चालवण्यासाठी कार्यशाळा घेतली जाते. मराठीतून न्यायनिर्णयाशी संबंधित न्याय निर्णय नावाचे मासिकही प्रसिद्ध होते. वरील निर्णयामुळे मराठी माध्यमातून कायद्याची पदवी घेणार्‍यांना उच्च न्यायालयात वकिली करणे सुलभ होणार आहे.

(म्हणे) गांधीवध नव्हे, तर खून म्हणा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विधान
      मुंबई - गांधीहत्या करणार्‍या विचारांच्या लोकांनी गांधीवध हा शब्द बेमालुमपणे समाजात रुजवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याचा प्रयोग इतक्या सहजपणे केला जातो की, बोलतांना त्याचे भानही रहात नाही. गांधीजींचा खून करण्यात आल्याचा उल्लेेख करणे उचित आहे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या कुलगुरूंना त्यांचे भाषण चालू असतांना केली. या विद्यापिठातील कला दालनाचे उद्घाटन १२ मार्च या दिवशी पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळच्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला.
      विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या भाषणात गांधीवधाचा खटला असा उल्लेख केल्यावर पवार यांनी त्यांना थांबवत वरील सूचना करून नंतर स्वतःच्या भाषणात हा शब्द रुजवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची कार्यशैली कथन केली.

स्त्रीमुक्तीवाल्यांप्रमाणे नव्हे, तर राजमाता जिजाऊंप्रमाणे विचार करा ! - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

महिला दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन
करतांंना अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर
      सांगवी (जिल्हा पुणे), १३ मार्च (वार्ता.) - मातृत्व हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. असे असतांना स्त्री ही चूल आणि मूल यांमध्ये अडकली आहे, असा विचार स्त्रीमुक्तीवाले करतात. राजमाता जिजाऊंनी असाच विचार केला असता, तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपल्याला लाभले असते का ? पालकांनी मुलींना अभियंता, आधुनिक वैद्य केले; पण ते तिच्यात आई निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे तिच्यामध्ये आई निर्माण करा, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगवी विकास मंच यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांत आई तू जिजाऊ हो या विषयावर त्या बोलत होत्या. मार्गदर्शनानंतर अनेक पालकांनी अधिवक्त्या रामतीर्थकर यांनी आमच्या पाल्यांना समुपदेशन करावे, अशी विनंती केली.
त्या पुढे म्हणाल्या...
१. मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे आज मुली धर्मांतर करून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. मुसलमान स्त्रियांप्रमाणे हिंदु स्त्रियांनीही धर्माभिमान बाळगायला हवा.
२. मुलांना इंग्रजी शिकवा; पण त्यांना इंग्रज करू नका.
क्षणचित्र - अधिवक्त्या रामतीर्थकर मागील सप्ताहात अतीदक्षता विभागात भरती होत्या. प्रकृती अस्वास्थ्य असूनही त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

विशाळगड येथे महाशिवरात्र सोहळा उत्साहात शिवकालीन तोफेची प्रतिष्ठापना

      विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) - शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगड येथील भगवंतेश्‍वर मंदिरात विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आणि ग्रामस्थ यांच्या वतीने पहाटे भगवंतेश्‍वर मंदिरात महादेवास अभिषेक करण्यात आला. यानंतर नरवीर बाजीप्रभू देशपांडे दौड घेण्यात आली. या वेळी दौडीचा प्रारंभ विभागीय पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विशाळगड येथील मध्यवर्ती चौक, तसेच मुंडा द्वार येथे ध्वजारोहण करण्यात आले.
     या वेळी ४५० वर्षांपूर्वी गडावर पडलेली तोफ सर्व कार्यकर्त्यांनी उचलून दगडी चबुतरा करून त्यावर स्थानापन्न केली. वजनाने अतिशय जड असलेली तोफ शिवप्रेमींनी हर हर महादेवचा जयघोष करत उचलली. शिवप्रेमी श्री. बंडोपंत भोसले यांनी सिद्ध केलेल्या शिवछत्रपतींच्या पराक्रमाची माहिती देणार्‍या प्रदर्शनाचाही सर्वांनी लाभ घेतला. शेवटी भगवंतेश्‍वराचा पालखी सोहळा पार पडला.

पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या गोवंशियांना गोप्रेमींनी धर्मांधांच्या कह्यातून वाचवले !

सर्वत्रच्या गोरक्षकांनी अशी सतर्कता बाळगणे आवश्यक !
      तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १३ मार्च (वार्ता.) - संभाजीनगर येथून ट्रकमधून जहिराबाद (आंध्रप्रदेश) येथे विनापरवाना पशूवधगृहाकडे नेणार्‍या १३ गोवंशियांना गोप्रेमी सर्वश्री अर्जुन (अप्पा) साळुंके, संजय (दादा) सोनवणे, अमित कदम यांनी धर्मांधांच्या कह्यातून वाचवले. (सर्व गोप्रेमींचे अभिनंदन ! - संपादक) या प्रकरणी धर्मांध शेख हुसेन शेख युसूफ आणि शेख अफसर शेख सिकंदर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोवंशियांना सोलापूर येथील गोशाळेत पाठवण्यात आले. गोवंशियांच्या रक्षणासाठी गोरक्षक महेश भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

महिला दिनानिमित्त सनातन संस्थेच्या वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदात्या सौ. विजया केळकर यांचा सत्कार

सत्कार स्वीकारतांना सौ. विजया केळकर (उजवीकडे)
      नवीन पनवेल - येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सनातन संस्थेच्या वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदात्या सौ. विजया अरुण केळकर यांचा सत्कार करण्यात आला. सौ. केळकर गेली २५ वर्षे पनवेलमध्ये पाळणाघर चालवतात. पुरस्कार मिळाल्यावर मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, मी हे केवळ परमेश्‍वराच्या कृपेमुळेच करू शकले. पहाटेपासून रात्रीपर्यंत अहोरात्र कष्ट करूनही नेहमी हसतमुख असतात. पाळणाघराकडे त्या व्यवसाय म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पहातात. पाळणाघरातील मुलांकडून त्या श्‍लोक आणि नामजप यांचे पठण करून घेतात.

दादर येथील सनातनच्या सेवाकेंद्रातील साधकांची वैद्यकीय पडताळणी

      मुंबई - दादर येथील सनातनच्या सेवाकेंद्रातील साधकांची नुकतीच विनामूल्य वैद्यकीय पडताळणी करण्यात आली. या वेळी सेवाकेंद्रात रहाणार्‍या आणि सेवेनिमित्त तेथे आलेल्या अशा एकूण १५ साधकांनी पडताळणीचा लाभ घेतला. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी ही पडताळणी केली. साधकांना असलेल्या त्रासांवर त्वरित उपचार व्हावेत आणि लहान-मोठ्या त्रासांना प्रारंभ होत असल्यास ते वाढू नयेत, तसेच ते लवकर ठीक व्हावेत, यासाठी ही पडताळणी करण्यात आली.
...तर महिलांना साडेसाती कशी येऊ शकते ?
वलयांकीत व्यक्तींनी धर्मातील जाणकारांचे मत घेऊनच
धर्म आणि देवता यांच्याशी संबंधित विधाने करावीत !
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे अज्ञान
      मुंबई - महिलांना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. जर असे असेल, तर महिलांना साडेसाती कशी येऊ शकते, असे विधान ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. त्या पुढे म्हणाल्या, शनीची साडेसाती सर्वांनाच भोगावी लागते. शनीला स्त्रिया चालत नसतील, तर साडेसातीमध्ये तो स्त्रियांना सोडून पुरुषांच्याच डोक्यावर का बसत नाही ? स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे ? हे सर्व नियम पुरुषांनी काढले आहेत. ते स्त्रियांच्या विरुद्ध आहे.

विद्यार्थ्यांना शिरस्त्राणाविना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येऊ नये !

पुणे पोलीस आणि परिवहन विभाग यांचे महाविद्यालयांना पत्र
     पुणे - येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिरस्त्राण वापरावे, यासाठी पुणे पोलीस आणि परिवहन खाते यांनी थेट महाविद्यालयांनाच पत्र पाठवले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिरस्त्राण किती आवश्यक आहे आणि ते बंधनकारक करण्यासाठी दोन्ही विभागांकडून एक संयुक्त पत्र पुण्यातील १ सहस्र ४०० महाविद्यालयांना पाठवले आहे. अनेक महाविद्यालय प्रशासनांच्या हाती ही पत्रे पडली असून त्याप्रमाणे महाविद्यालयांनी कार्यवाही करायलाही आरंभ केली आहे. शिरस्त्राण सक्तीला पुणेकरांचा विरोध असला, तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र शिरस्त्राण सक्ती योग्य असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हिंदु धर्माभिमान्यांनी नॉकआऊट या मद्याच्या विज्ञापनातून होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला !

असे हिंदू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती !
      भोर, १३ मार्च (वार्ता.) - येथील एका मद्यविक्री करणार्‍या दुकानाच्या जिन्याच्या पायर्‍यांवर राष्ट्रध्वजाच्या रंगातील नॉकआउट या मद्याच्या विज्ञापनाचे स्टिकर लावण्यात आले होते. या संदर्भात माहिती मिळाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विठ्ठल जाधव, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक काका सणस, धर्माभिमानी श्री. धीरज गुजर यांनी दुकानाचे मालक श्री. सदानंद शेट्टी यांची भेट घेऊन राष्ट्रध्वजातील रंगांचा अशा प्रकारे वापर करणे अयोग्य असल्याचे सांगून त्यांचे प्रबोधन केले. (जागरूक हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! अशीच सतर्कता आणि तत्परता सर्वत्रच्या हिंदूंनी दाखवली, तर राष्ट्रहानीच्या घटनांना आळा बसायला वेळ लागणार नाही. - संपादक) प्रबोधनानंतर श्री. शेट्टी यांनी लगेच विडंबनात्मक विज्ञापनाचे स्टिकर काढले.

जायकवाडी धरणात केवळ ०.५ टक्के पाणीसाठा

लोकहो, वाढत्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी साधना करा !
      संभाजीनगर - पैठण येथील जायकवाडी धरणात सध्या केवळ ११ दशलक्ष घनमीटर म्हणजे ०.५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे १५ मार्चपासून मृत जलसाठ्यातून उपसा करावा लागणार आहे. प्रत्यक्षात जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण आहे. सध्या कडक उन्हामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने अल्प होत आहे.
गोदावरी नदीही कोरडी !
       मराठवाड्याला सोडलेल्या पाण्यामुळे बारमाही दुथडी वाहणारी गोदावरी नदी आता कोरडी पडू लागली आहे. त्यामुळे गोदाकाठची शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे. अनेक वर्षे पाण्याखाली असलेल्या चांदोरी येथील गोदापात्रातील विविध मंदिरांचे भाविकांना दर्शन होत आहे.

पाचोरा (जळगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त फ्लेक्स प्रदर्शन

प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू
      पाचोरा (जळगाव) - येथे महाशिवरात्रीनिमित्त धर्मशिक्षण आणि धर्मावरील आघात या विषयांच्या संदर्भात सनातन संस्थेच्या वतीने फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला ५५० हून अधिक लोकांनी भेट दिली.पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेसाठी सभागृहात केवळ दोघांची उपस्थिती

पुणे महानगरपालिकेतील नगरसेवकांचा उदासीन कारभार !
आर्थिक अंदाजपत्रकावरील महत्त्वपूर्ण चर्चेविषयी नगरसेवकांची अशी उदासीनता असेल, 
तर शहरातील नागरिकांच्या समस्यांविषयी किती गांभीर्य असेल, याचा विचारच न केलेला बरा !
     पुणे - महानगरपालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे (२०१६-१७) अंदाजपत्रक स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला सादर केले होते. त्या अंदाजपत्रकाला ३१ मार्चपर्यंत संमती देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी या अंदाजपत्रकावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होते. तशी सभा ९ मार्च या दिवशी आयोजित केली होती. ही सभा चालू झाली, तेव्हा १५७ नगरसेवकांपैकी केवळ महापौर प्रशांत जगताप हे व्यासपिठावर, तर सभागृहात माजी उपमहापौर आबा बागूल हे एकमेव नगरसेवक उपस्थित होते. पालिका आयुक्त हे मुंबई येथे न्यायालयीन कामकाजाकरता गेले होते आणि अन्य २ अतिरिक्त आयुक्तांपैकी एकही जण उपस्थित नव्हता.
     प्रत्यक्ष सभा चालू झाल्यानंतर काही वेळाने अन्य नगरसेवक आले. त्यानंतर काँग्रेसचे संजय बालगुडे यांनी सभा गणसंख्येअभावी चालू करता येणार नाही, अशी हरकत घेतली. हा भाग लक्षात घेऊन काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नगरसेवक सभागृहातून बाहेर गेले.

मराठवाडा विद्यापिठात विभागप्रमुखांना मारहाण केल्यामुळे प्राध्यापक निलंबित

महाविद्यालयात हाणामारी करणारे 
प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कुठला आदर्श ठेवत आहेत ?
      संभाजीनगर - विभागप्रमुखांना मारहाण केल्याचा ठपका ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील रसायन तंत्रज्ञान विभागाचे प्रा. डॉ. सी.डी. गौरशेटे यांच्यावर विद्यापिठाने १२ मार्च या दिवशी निलंबनाची कारवाई केली.
      रसायन तंत्रज्ञान विभागात १० मार्च या दिवशी विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांना प्रा. डॉ. सी.डी. गौरशेटे यांनी मारहाण केली, अशी तक्रार करण्यात आली होती. विभागातील बैठकीत हा प्रकार घडला. त्यानंतर कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सीसीटीव्हीतील छायाचित्रण पाहिले, तसेच उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ही कारवाई केली. विद्यापिठातील प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई होण्याची पाच वर्षांतील पहिलीच घटना आहे. तसेच या घटनेच्या सविस्तर चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

मतांसाठी रंग पालटणारे राजकारणी हिंदूंचे हित कधी साधतील का ?
     मनुुस्मृति जाळण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी बंधूभावाची आवश्यकता आहे. यामुळे जातीभेद अल्प होईल. मनुस्मृति जाळावी, अशी स्थिती आता राहिलेली नाही, असे विधान बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Manusmruti jalaneki awashyakta nahi, abhi bhaichareki awashyakta hai, aisa Mayawatine kaha.
Chunav aate hi inke bol badal jate hai !

जागो ! : मनुुस्मृति जलाने की आवश्यकता नही, अभी भाईचारे की आवश्यकता है, ऐसा मायावती ने कहा ।
चुनाव आतेही इनके बोल बदल जाते है !

बिहारमध्ये जेएन्यूचा विद्यार्थी कन्हैयाच्या समर्थनार्थ होणार्‍या कार्यक्रमावर दगडफेक

      मुझफ्फरपूर (बिहार) - येथील आम्रपाली सभागृहाबाहेर जेएन्यूचा विद्यार्थी कन्हैया कुमार याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात दलित एकता मंचाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत दगडफेक केली. इंसाफ मंचकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेने सभागृहात कार्यक्रम करण्याची अनुमती रहित केल्याने त्यांनी सभागृहाबाहेर कार्यक्रम आयोजित केला होता.

संभाजीनगर येथील मारुति मंदिरात चोरी

हिंदूंनो, आणखी किती काळ मंदिरातील चोरीच्या घटना 
सहन करणार आहात ? आता हिंदु राष्ट्र स्थापण्याविना पर्याय नाही !
      संभाजीनगर - शहरातील मयुर पार्क भागातील मारोतीनगर परिसरातील मारुति मंदिरातून चोरांनी हनुमानाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि हातातील चांदीचे कडे असा एकूण ४० सहस्र रुपयांचा ऐवज पळवून नेला. सकाळी दर्शनाला गेलेल्या भाविकाच्या हे लक्षात आल्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.

मिरज येथे कीर्तन महोत्सवात सनातन संस्थेकडून धर्मांतर - काळाची समस्या या विषयावर प्रवचन

     मिरज - येथील भानु तालमीसमोरच्या काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री. माधव गाडगीळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात ६ मार्चला सनातन संस्थेच्या वतीने धर्मांतर - काळाची समस्या या विषयावर कु. सुरेखा आचार्य यांनी प्रवचन केले. १२० स्त्रियांनी याचा लाभ घेतला. कु. सुरेखा यांना धर्मांतराचे प्रकार तसेच ते रोखण्यासाठी करावयाचे धर्माचरणाचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन केले. मांडलेल्या विचारांचे उपस्थितांनी स्वागत केले आणि सर्वांनीच धर्माचरण करावे, असे मत मांडले. या काळात असे प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे, असेही काहींनी सांगितले.

देहलीत लावण्यात आलेल्या भीत्तीपत्रकांत कन्हैया कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना ठार मारण्याची धमकी !

     नवी देहली - कन्हैया कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य या देशद्रोही घोषणा देणार्‍या जेएन्यूतील विद्यार्थ्यांना ठार मारण्याची धमकी देणारी भीत्तीपत्रके देहलीत लावण्यात आली आहेत. जेएन्यूतील देशद्रोह्यांना गोळ्या घालणे हा राष्ट्र्रधर्म आहे. मी कन्हैया, उमर खालीद आणि अनिर्बान यांना गोळ्या घालणार, असे या भीत्तीपत्रकावर लिहिले आहे. त्याच्यावर बलवीर सिंग असे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, असे म्हटले आहे. 
      जंतर मंतर येथे त्यांना ठार मारण्याच्या धमकीचे पोस्टर्स ११ मार्चला वाटण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावरून ती प्रसारित करण्यात आली. पोलिसांनी या भीत्तीपत्रकांविषयी चौकशी केली असता त्यांना अशी भीत्तीपत्रके सापडली नाहीत, असे म्हटले जात आहे. यापूर्वीही कन्हैया याला गोळ्या घालणार्‍याला ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे आवाहन करणारी भीत्तीपत्रके आदर्श शर्मा यांच्याकडून लावण्यात आली होती. पोलिसांनी शर्मा यांना अटक केली आहे.

शैक्षणिक संस्था राजकारणाचे अड्डे बनू नयेत ! - रा.स्व. संघ

      नागौर (राजस्थान) - केंद्र आणि राज्य शासनांंकडून आमची अपेक्षा आहे की, देशविरोधी शक्तींना कठोरपणे तोंड दिले जाईल. अशा लोकांवर अंकुश आणत हे सुनिश्‍चित केले जाईल की, आमच्या शैक्षणिक संस्था राजकारणाचे अड्डे बनणार नाहीत, असे रा.स्व. संघाने म्हटले आहे. राजस्थानच्या नागौरमध्ये आयोजित ३ दिवसीय वार्षिक संमेलनाच्या पहिल्या दिवशी संघाने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

(म्हणे) जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांनाही द्यावा !

धर्मशास्त्राचा कोणताही अभ्यास नसलेले अभिनेते अक्षयकुमार यांचा नवा स्टंट !
     मुंबई - जुन्या चुकीच्या रुढ प्रथा परंपरा बंद व्हायला हव्यात. देव तुमच्याकडे काही मागत नाही, त्यामुळे त्याच्यासमोर नारळ फोडणे, तेल वाहणे हे बंद करायला हवे आणि या गोष्टी त्यांना द्यायला हव्यात, ज्यांना त्याची आवश्यकता आहे. स्त्री आणि पुरुष समान आहेत. त्यांच्यात काही भेदभाव नाही, त्यामुळे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांना प्रवेश मिळायला हवा, असे धर्मद्रोही मत अभिनेते अक्षयकुमार यांनी व्यक्त केले. जर कुठलीही व्यक्ती प्रामाणिकपणे विचार करेल, तर हेच सांगेल की, भारत हा अत्यंत सहिष्णु देश आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याची चाचपणी

     मुंबई - समुद्रातील पाण्यावर पुनपर्र्क्रिया करून ते वापरात आणण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तज्ञांचा गट यासंदर्भात चाचपणी करणार आहे. यासंदर्भात विधीमंडळात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर समुद्रातील पर्यायी पाण्याचा वापर करण्यात येणार आहे.

कन्हैय्याने जेएन्यू सोडावे, अन्यथा त्याला गोळ्या घालीन ! - अमित जानी, अध्यक्ष, उत्तरप्रदेश नवनिर्माण सेना

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - कन्हैय्या कुमारने ३१ मार्चपर्यंत जेएन्यू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) सोडले नाही, तर त्याला गोळ्या घालीन, अशी चेतावणी उत्तरप्रदेश नवनिर्माण सेना या संघटनेचे अध्यक्ष अमित जानी या व्यक्तीने दिली आहे. वर्ष २०१२ मध्ये जानी यांनी मायावती यांच्या मूर्ती फोडल्या होत्या. जानी यांनी कन्हैय्याविषयीची चित्रफित स्वत:च्या फेसबूक खात्यावरून प्रसिद्ध केली आहे. जानी म्हणाले, कन्हैय्याने भारतीय सैन्याविषयी केलेले विधान पहाता तो वेडा झाला आहे, असे वाटते आणि वेड्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. देशाला अशा सापांची आवश्यकता नाही.

चारचाकीसमोर यू टर्न घेतल्याच्या रागामुळे तरुणाचा हवेत गोळीबार

महाराष्ट्राची बिहारच्या दिशेने वाटचाल !
       विरार - यू टर्न घेतल्याच्या रागातून एका श्रीमंताच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना विरारमध्ये घडली आहे. आदित्य मानिकताला असे या तरुणाचे नाव असून तो प्रसिद्ध कुमार मेटल्स आस्थापनाच्या मालकाचा मुलगा आहे.
      जयेश कुडु यांनी त्यांची आय-टेन ही चारचाकी गाडी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरासाड फाटा येथे वळवून घेतली. या वेळी त्यांच्या पाठीमागे जग्वारमध्ये असलेल्या आदित्यला स्वतःच्या गाडीसमोर गाडी वळवल्यामुळे त्याचा राग आला. या रागातून त्याने गाडीखाली उतरून बंदुकीचे तीन राऊंड हवेत उडवले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ पसरली होती. आदित्य मानिकतालासमवेत त्याचा वाहन चालक मनोजकुमार मिश्राला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

अपघात योजनेच्या अंतर्गत प्रकरण समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणार ! - चंद्रशेखर बावनकुळे

१० मार्च या दिवशीची विधानसभा प्रश्‍नोत्तरे
      मुंबई - रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील मौजे पडवे मोहल्ला येथे झालेल्या दुर्घटनेत अपघातग्रस्तांना हानीभरपाई मिळण्यासाठी हे प्रकरण दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा करू, असे ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. ही दुर्घटना घराचे बांधकाम वाढवल्याने झाली आहे. यामुळे महावितरणकडून कोणताही अपघात झाला नाही. तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी भूमीगत विद्युत् केबल टाकण्यासाठी महावितरण आस्थापनाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. (अपघात घडल्यावर उपाययोजना नव्हे, अपघात होऊच नये या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक ! - संपादक) या संदर्भात वित्तीय प्रावर्धानही करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी संघटित झालेले धुळे येथील धर्माभिमानी हिंदू !

इसिसचा आतंकवाद, पुणे येथील सावन राठोड हत्या प्रकरण आणि कॉन्व्हेंट 
शाळांमधील अपप्रकार या समस्यांवर उठवला आवाज !
श्री. सुनील घनवट
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ जानेवारी २०१६ या दिवशी धुळे शहरात हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. या सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत ३५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले. या वेळी स्थानिक हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात मोर्चा काढण्याचे ठरले. त्याविषयी मागील लेखात मोर्च्याची पूर्वसिद्धता आणि नियोजन कशा प्रकारे करण्यात आले, प्रसार बैठकांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, गंभीर विषयांच्या संदर्भात राजकीय उदासीनता आदी आपण सूत्रे पाहिली. आता या लेखाचा उर्वरित भाग पाहूया. 
८. पत्रकार परिषदेत पुरोगामी पत्रकारांनी विषयांतर करणे 
आणि पोलिसांना अपेक्षित भूमिकेतून प्रश्‍न विचारणे ! 
     या मोर्च्याच्या संदर्भात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुरोगामी विचारांच्या दोन पत्रकारांनी मोर्च्याच्या विषयाशी संबंधित नसणारे ब्राह्मण आणि दलित, तसेच हिंदु धर्मातल्या प्रथा-परंपरा, समीर गायकवाड अटक प्रकरण आदींविषयी जाणीवपूर्वक प्रश्‍न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. इसिसच्या संपर्कातील धुळे येथील धर्मांधाचे समुपदेशन केल्याविषयी मोर्च्यात न बोलण्याविषयी जी पोलिसांची भूमिका होती, त्याच भूमिकेतून पत्रकार प्रश्‍न विचारत होते. यावरून पोलीस आणि पत्रकार यांचे संगनमत कसे असते, हे लक्षात आले. राष्ट्राची सुरक्षा, आतंकवाद असे संवेदनशील विषय असतांनासुद्धा पत्रकारांवरती पुरोगामित्वाचा किती पगडा आहे, हे यावरून लक्षात आले. या पत्रकार परिषदेला स्थानिक आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारीही उपस्थित होते. यातून मोर्च्यासंदर्भात होणार्‍या प्रत्येक घडामोडीकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे, हे समजले.

मराठीचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध करता न आल्याने इंग्रजीचे स्तोम ! - दासू वैद्य

      बुलढाणा - मुलांना इंग्रजी कि मराठी माध्यमात शिकवायचे यांवर किती चर्चा करणार ? तालुका पातळीवरही आता इंग्रजी शाळा निघाल्या आहेत. बोटावर मोजण्याइतक्या मराठी शाळांची नावे आपण घेत रहातो, तर दर्जेदार मराठी शाळा आपल्याला चालवता आल्या नाही. म्हणजेच आपल्याला मराठीचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध न करता आल्याने इंग्रजीचे स्तोम वाढले आहे, असे मत कवी आणि संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांनी १२ मार्च या दिवशी येथे व्यक्त केले.
     प्रगती सार्वजनिक वाचनालय तथा मुंबई येथील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने दोन दिवसीय राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन १२ मार्च या दिवशी करण्यात आले. या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून दासू वैद्य बोलत होते.

अंदमानातील स्वा. सावरकरांच्या स्मृती जागृत करणारी छायाचित्रे

समोरच्या बाजूने अंदमान येथील सेल्युलर कारागृह
कारागृहात सावरकरांना ठेवलेली खोली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मार्पण : मृत्यूंजय जीवनावरील सुवर्णकळस !

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि पवित्र अन् तेजस्वी जीवन यांना कोटी कोटी प्रणाम !
श्री. दुर्गेश परुळकर
     आज फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी (१४ मार्च २०१६) म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन (आत्मार्पण) ! त्यांच्या आत्मार्पणाला आज ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या मनात आत्मार्पणाचे विचार कसे आले, त्यासंबंधी त्यांनी निकटवर्तियांशी केलेली चर्चा, आत्मार्पणास खर्‍या अर्थाने झालेला प्रारंभ याविषयीचे लेखस्वरूपातील वर्णन श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारक चळवळीचे धुरीण असलेल्या सावरकरांच्या आत्मार्पणदिनानिमित्त ही माहिती आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. युगप्रवर्तक क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर ! 
      वीर सावरकरांनी कुमारवयातच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्रक्रांती करण्याची शपथ घेतली आणि ती शेवटपर्यंत पाळली. तारुण्य, संसार, घरदार, आयुष्य यांची देशासाठी राखरांगोळी करणारा हा द्रष्टा युगपुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना हौतात्म्याची ओढ होती. त्यामुळे त्यांना कधी मृत्यूचे भय वाटलेच नाही. इंग्रज शासनाने काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावली; पण त्यांनी तेथील काळकोठडीतही आपली प्रतिभा जिवंत ठेवली. असा हा सहस्रावधी पानांचे वाङ्मय लिहिणारा युगप्रवर्तक क्रांतीकारक अन्य कोणीही त्या काळात नव्हता. अशा या महायोद्ध्याला भेटायला असंख्य माणसे सावरकर सदनात येत होती. त्यात सरसेनापती करीअप्पा, न.वि. गाडगीळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक पू. गोळवलकरगुरुजी असे विविध क्षेत्रांतील नामवंतही होते.

डहाणू येथे टँकरला भीषण आग

      डहाणू - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रसायनाने भरलेल्या टँकरला भीषण आग लागली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चारोटी पथकरनाक्यानजीक ही आग लागली. रसायनानेे भरलेला टँकर मुंबईकडे जात होता. टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने मेंढवन घाटात टँकर उलटून त्याने पेट घेतला. यामध्ये चालक घायाळ झाला असून कुठलीही जीवितहानी झाली नाही. ज्वलनशील रसायन असलेल्या या टँकरच्या आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरले असून वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने चालू आहे.

पन्हाळगडावर स्कार्फ बंदी उपक्रम

तरुणाईमध्ये देशप्रेम निर्माण केल्यास असे 
उपक्रम राबवण्याची आवश्यकता भासणार नाही !
      पन्हाळा - पन्हाळगडावर येथील नागरिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने १२ मार्चला स्कार्फ बंदी उपक्रम राबवण्यात आला. स्कार्फ बांधून येणार्‍या युगुलांना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड असून येथे तोंडे झाकून येऊ नका, असे आवाहन करण्यात आले.
      या संदर्भात भाजपचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब भोसले म्हणाले, पन्हाळा येथे सकाळी सात वाजता महाविद्यालयात जाण्यास म्हणून घरातून बाहेर पडलेले युवक-युवती महाविद्यालयात न जाता थेट पन्हाळा येथे येतात. कोणाच्या दृष्टीस पडू नये; म्हणून ते स्वतःची तोंडे स्कार्फने झाकून घेतात. या प्रकारांना आळा बसण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पालकांनीही याविषयी जागरूक रहाणे आवश्यक आहे.

प्रणाम आमुचा स्वातंत्र्यविरास ।

कु. ऐश्‍वर्या वांडरे
क्षण तो एक आमच्या भाग्याचा उगवला ।
२८ मे या दिनी सावरकरांचा जन्म झाला ।
मातृभूमीला आनंदीआनंद झाला ।
राधेपोटी वीर विनायक अवतरला ॥ १ ॥

बालपणी होता त्यांच्यावर स्वातंत्र्याचा पगडा ।
नंतर त्यांनीच केला त्याचा उलगडा ॥ २ ॥

स्वातंत्र्यासाठी ते क्रांतीकारक बनले ।
क्रांतीकारकांचे मुकूटमणी ते शोभले ॥ ३ ॥

अंदमानात नानाविध छळ त्यांनी सोसले ।
मातृभूमीसाठी जीवन आपुले अर्पियले ॥ ४ ॥

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेली (१५० पैकी) काही प्रमुख कारणे !

पंडित नथुराम गोडसे
१. वर्ष १९१९ मध्ये अमृतसरच्या जालीयनवाला बाग हत्याकांडामध्ये झालेल्या नरसंहाराविषयी जनरल डायर यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी मागणी संतप्त जनतेकडून करण्यात आली होती. त्यावेळी मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला.
२. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशीमुळे संतापलेली जनता गांधी यांच्याकडे आशेने बघत होती की, गांधी यांनी यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे; मात्र गांधींनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
३. ६ मे १९४६ या दिवशी समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करतांना गांधींनी मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.

कळसा प्रकल्पाच्या बांधकामामुळे कणकुंबी गावातील श्री माऊली देवस्थानला हानी !

कर्नाटक शासनाचा आततायीपणा
      पणजी, १३ मार्च (वार्ता.) - कळसा प्रकल्प बांधकामाविषयीचा गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील वाद जल लवादासमोर न्यायप्रविष्ट असतांना कर्नाटक शासनाकडून अवैधपणे कळसा प्रकल्पाचे काम चालूच ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचे शेवटच्या टप्प्यातील दीडशे मीटर लांबीच्या कालवा खोदाईचे काम घाई गडबडीने युद्ध पातळीवर चालू आहे. त्यामुळे कणकुंबी गावात या कालव्याच्या शेजारी असलेल्या पुरातन श्री माऊली मंदिराला आणि मंदिराजवळ असलेल्या तळीला हानी पोहोचली आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) नक्षलवाद्यांच्या आक्रमणात पोलीस शिपाई हुतात्मा

      गडचिरोली - येथील एटापम तालुक्याच्या हेडरी पोलीस ठाण्यासमोर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस शिपाई हुतात्मा झाले आहेत. पोलीस बंदोबस्ताच्या वेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

स्वा. सावरकर हीच आमची स्फूर्तीदेवता !

     स्वा. सावरकरांचे हिंदुत्व हीच राष्ट्राची संजीवनी आहे. या हिंदुत्वाचे विस्मरण, म्हणजेच उद्याचे मरण होय. स्वा. सावरकरप्रणीत हिंदुत्वाला पर्याय नाही. यामुळेच स्वा. सावरकर हीच आमची स्फूर्तीदेवता आहे. 
- गोविंद गांधी, हिंदू महासभा, महाराष्ट्र प्रमुख.

सावरकर या शब्दाचा बालसाधिकेला समजलेला अर्थ

सा - साहित्यिक
- वीर पुरुष
- रोमारोमात मातृभूमीविषयी प्रेम असणारे
- कितीही छळ झाला, तरी न डगमगणारे
- रात्रंदिवस हिंदु राष्ट्राचाच विचार करणारे
- कु. ऐश्‍वर्या रमेश वांडरे (वय १२ वर्षे), मिरज

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
श्री. प्रशांत अष्टेकर
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

प.पू. पांडे महाराजांकडून मंत्रोपाय प्राप्त झालेल्या 
साधकांनी उपायांमध्ये झालेले पुढील पालट लक्षात घ्यावेत !
        डिसेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या ३ मासांत प.पू. पांडे महाराजांकडून शेकडो साधकांना मंत्रोपाय देण्यात आले होते. संभाव्य आपत्काळानुसार मंत्रोपाय करणार्‍या साधकांनी त्यात पुढील पालट करावेत.
१. सर्वांसाठी दिलेल्या मंत्रांपैकी पापनाशक मंत्र, विषनाशक मंत्र, काळी शक्तीनाशक दत्तात्रेय मंत्र, विषाचे झाडन करणारा मंत्र आणि प्रारब्ध भोग नष्ट करणारा मंत्र हे मंत्र केवळ आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी आवश्यकतेनुसार म्हणावेत.

विश्‍वाला नसले कारण जरी, बोधाला मात्र गुरुकृपा हीच कारण खरी ।

डॉ. दुर्गेश सामंत
      गेले काही दिवस वर्तमानकाळात रहाण्याच्या प्रयत्नाला अंतर्यामी एक वेगळेच परिणाम लाभले. काहीतरी आपल्यात असे आहे की, ज्याच्या आधारे गेलेला भूतकाळ जागतो, नसलेला भविष्यकाळ भासतो, असे वाटले. मन त्याच्या आलंबनात मधे-मधे आपोआप थांबू लागले. त्यामुळे विचार मनात आले, तरी मन त्यापासून दूर होऊन वर्तमानकाळात येऊ लागले. तसे करणे यात त्याला अधिक जिवंतपणा वाटू लागला. त्यामुळे पुष्कळ शांंतपणा मिळू लागला. त्यातून हे काव्यस्फुरण.......
वर्तमानदेवता, तुझ्या शोधापायी कष्टलो मी भारी ।
सुख-दुःखामाजी हरवलो जरी, तवकृपेने चिंतन थोडे राहिले मनी ॥ १ ॥
प्रसंगांच्या आठवणी अन् ग्रंथांच्या शिकवणी ।
कर्मातून साठली होती अनुभवांची गाठोडी ॥ २ ॥

दत्तगुरूंच्या सतत अनुसंधानात असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्लोकवासी श्रीमती विमलाबाई दत्तात्रेय गोळे !

श्रीमती विमलाबाई गोळे
      सनातन आश्रम, देवद, पनवेल येथील सौ. संध्या अरुण डोंगरे यांच्या मातोश्री आणि सनातनचे साधक डॉ. गौतम गोळे यांच्या आजी श्रीमती विमलाबाई दत्तात्रेय गोळे यांचे २ मार्च २०१६ या दिवशी वयाच्या ९२ व्या वर्षी सांगली येथील रहात्या घरी निधन झाले. १४.३.२०१६ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि अन्य सूत्रे येथे देत आहोत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. सहनशीलता : आमची आई अत्यंत सहनशील होती. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना आई धिराने सामोरे गेली आणि ते शांतपणे सहन केले. त्यांची झळही तिने कधी आम्हाला लागू दिली नाही.
१ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे : आईने आमच्यावर आणि नातेवाइकांच्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. चुकाही प्रेमाने सांगून त्या पुढे होणार नाहीत, याचा ती पाठपुरावाही घेत असे.
१ इ. इतरांचा विचार करणे : आमच्या आईने स्वतःच्या धाकट्या जावांची, बहिणींची, पुतणींची आणि भाचींची बाळंतपणे अन् मंगळागौरीसारखे सण आनंदाने केले होते. तिने स्वतःच्या नणदांची आणि दिरांची मुले शिक्षणासाठी स्वतःहून सांभाळली होती.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

नांद्रा (बुद्रुक), जळगाव येथील साधनारत सौ. जानकी हिरामण वाघ आणि श्री. हिरामण वाघ

१. सौ. जानकी हिरामण वाघ यांच्यातील 
भावामुळे त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
अ. भावजागृतीचे प्रयत्न करत असतांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर, श्रीकृष्ण आणि सर्व संत शेतात येत असल्याचे दिसले.
आ. आध्यात्मिक उपाय केल्यामुळे गारांचा पाऊस होऊनही हानी न होता चांगले पीक येणे :
आम्ही केळीला खत टाकत असतांना त्यात विभूती आणि कापूर घालतो. सर्व शेतावर विभूती फुंकरतो आणि उदबत्ती लावतो. सर्व झाडांवर आम्ही सूक्ष्मातून श्रीकृष्ण, श्रीकृष्ण असे लिहितो. त्यामुळे ज्या वेळी गारांचा पाऊस पडला, वादळ झाले, त्या वेळी ईश्‍वरकृपेने आमच्या शेतातील पिकांची काहीही हानी झाली नाही. भगवान श्रीकृष्ण शेतात आहे आणि त्याने वादळ अन् गारांचा पाऊस यांपासून शेताचे रक्षण होण्यासाठी शेतावर गोवर्धन पर्वत धरला आहे, असे दिसले. त्या वेळी आजूबाजूच्या शेतांतील पिकांची बरीच हानी झाली. त्या वर्षी पीकही पुष्कळ चांगले झाले. त्या वेळी श्रीकृष्ण आपल्यासमवेतच आहे, असे जाणवले.

स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

दीड घंटा मन पुष्कळ अस्वस्थ असणे, शिवस्वरोदय शास्त्रानुसार 
उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यावर १५ मिनिटांतच मनातील 
अयोग्य विचार न्यून होणे आणि त्यानंतर उजव्या कुशीवर झोपल्यावर 
डाव्या नाकपुडीतून श्‍वास चालू होऊन मनाला उत्साह जाणवू लागणे
       दिनांक १४.२.२०१६ या दिवशी दुपारी दीड वाजता अचानक माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले. माझ्या मनाची चिडचिड होऊ लागली. मला एका जागी बसून नामजप करता येत नव्हता. त्यामुळे मी दुपारी ३ वाजता विभागात आल्यावर याविषयी पू. गाडगीळकाकांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला तुमचा कुठल्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे ?, असे विचारले. मी सांगितले, उजव्या. माझी डावी नाकपुडी बंद आहे. तेव्हा त्यांनी मला शिव-स्वरोदयशास्त्रानुसार पुढील दोन उपाय एकानंतर दुसरा करण्यास सांगितले. (पुढील दोन्ही उपायांमुळे तुमची डावी नाकपुडी (चंद्रनाडी) चालू होऊन तुमचा मनाचा त्रास दूर होईल, असे ते म्हणाले.)
१. उजव्या कानात १५ मिनिटे कापसाचा बोळा 
घालून काय परिणाम जाणवतो, याचे निरीक्षण करा.
१ अ. परिणाम : वरीलप्रमाणे उपाय १५ मिनिटे केल्यावर माझ्या मनाची चिडचिड न्यून (कमी) झाली, तसेच माझे अनावश्यक विचारही न्यून झाले.
२. विश्रांती घेतांना उजव्या कुशीवर झोपा.
२ अ. परिणाम : हा उपाय अर्धा घंटा केल्यावर (तेव्हा माझ्या उजव्या कानात कापसाचा बोळाही होता.) माझ्या डाव्या नाकपुडीतून श्‍वास मोकळेपणाने झाला झाला. तसेच माझ्या मनात येणारे अयोग्य विचार थांबून मन ताजेतवाने झाले आणि मला उत्साह जाणवू लागला.
- सौ. प्रार्थना प्रसाद देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

हिंदु धर्मजागृती सभांचा प्रसार करतांना, तसेच सभेत उपस्थित जिज्ञासू धर्मप्रेमींना सभेनंतरच्या आढावा बैठकीतून आणि सभा पार पडल्यावर घरी परततांना जिज्ञासूंना सनातन प्रभातचे जुने काही अंक वाचण्यासाठी द्या !

साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना महत्त्वाची सूचना
१. सभेला उपस्थित धर्मप्रेमींनी कार्याविषयी दिशादर्शन होण्यासाठी विचारणा करणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु संघटनासाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. ठिकठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करणे, हा त्यातीलच एक प्रभावी उपक्रम ! ईश्‍वरी कृपेने या सभांना धर्मप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. सभेला उपस्थित असणारे अनेक जण धर्मप्रेमी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नियमितपणे करण्याची इच्छा व्यक्त करतात, तसेच या कार्याविषयी दिशादर्शन होण्यासाठी विचारणा करतात.
२. राष्ट्र अन् धर्म कार्याविषयी अवगत करून घेण्यासाठी धर्मप्रेमींनी सनातन प्रभात नियतकालिके अभ्यासणे उपयुक्त : हिंदु धर्मावर होणारे विविध आघात, ते रोखण्यासाठी करावयाच्या कृती, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्मशिक्षण आदी विविध विषयांवरील मार्गदर्शन सनातन प्रभात नियतकालिकातून नियमितपणे प्रसिद्ध होते. हिंदु धर्मरक्षणार्थ कार्य करण्यास इच्छुक धर्मप्रेमी या अंकांतील मार्गदर्शक सूत्रे अभ्यासू शकतात.
३. साधकांकडून जुने अंक एकत्रित करून ते धर्मप्रेमींना उपलब्ध करून द्या ! : धर्मप्रेमींना नियतकालिके अभ्यासणे सुलभ जावे, यासाठी साधक आणि कार्यकर्ते यांनी सनातन प्रभातचे जुने अंक साधकांकडून एकत्रित करावेत. सभेचा प्रसार करतांना, सभेनंतरच्या आढावाबैठकीतून, तसेच सभा पार पडल्यावर घरी परततांना जिज्ञासा असलेल्या प्रत्येक धर्मप्रेमीला ४ - ५ अंक वाचनासाठी द्यावेत.

पूजेचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप

श्री. राम होनप
१. बाह्यपूजा : गंध, अक्षता, फुले, दुर्वा, फळे आदी सामग्री वापरून देवतेच्या मूर्तीची केलेली पूजा.
२. अंतर्पूजा : निर्मळ आणि भावस्पर्शाने सुगंधित झालेले मनरूपी पुष्प हृदयातील श्रीकृष्णाला अर्पण करणे.
       बाह्यपूजेला ३० प्रतिशत, तर अंतर्पूजेला ७० प्रतिशत महत्त्व आहे. दोन्ही पूजाप्रकार आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. या दोन पद्धतींच्या एकत्रीकरणाने पूजकाला पूजेचा पूर्णतः लाभ होतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०१६)

पू. बाबा (सदानंद) नाईक यांनी सांगितलेली साधनेत प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी सूत्रे

पू. बाबा (सदानंद) नाईक
      पू. बाबा नाईक हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असल्याने त्यांच्याशी माझी एवढी ओळख, संपर्क किंवा जवळीक नाही. ते देवद आश्रमात आले असतांना सायंकाळी एकटेच उभे असतांना मी त्यांना नमस्कार केला. अनौपचारिक बोलत असतांना मला त्यांचा २ घंटे सत्संग मिळाला. मी त्यांना साधनेविषयी काय करू शकतो ?, हे विचारल्यावर माझ्या साधनेला आवश्यक असे मार्गदर्शन त्यांनी स्वतःच्या उदाहरणांतून आणि त्यांच्या अनुभूतीतून केले.
१. गुरुसेवा कशी करावी ?
१ अ. प्रत्येक सेवा ही माझीच आहे, या व्यापक भावाने गुरुसेवा करणे : हा आश्रम माझा आहे. हे माझ्या गुरूंचे कार्य आहे. प्रत्येक सेवा ही माझीच सेवा आहे, असे वाटले पाहिजे. केवळ भोजनकक्षातील किंवा संगणकावरील सेवा माझी आहे, असे नको. आपल्याला प्रत्येक सेवा करता आली पाहिजे. व्यापक होऊन सेवा केली पाहिजे. इतरांना साहाय्य करून प्रत्येक साधकाशी एकरूप होता आले पाहिजे. असे केले, तर पुढे गुरूंशी एकरूप होऊ शकतो. हे गुरूंना सांगावे लागत नाही. त्यांच्यापर्यंत आपोआप पोहोचते, त्यांना सर्व कळते.

महर्षींनी सांगितलेल्या जपासंबंधी साधकांना सूचना

१. महर्षींनी सांगितलेला जप आपापल्या प्रकृतीप्रमाणे योग्य त्या चालीत करावा ! : सर्व साधकांना आता महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप करण्यास सांगितले आहे. हा जप मोठा असल्याने याचे ध्वनीमुद्रण करण्यात आलेले नाही. प्रत्येकाने तो आपापल्या प्रकृतीप्रमाणे योग्य त्या चालीत करावा.
२. जे संत किंवा ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक समष्टीसाठी नामजप करतात, त्यांनी आता हाच नामजप समष्टीसाठी करावा.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

दिवसभर होत असलेले मानसिक त्रास रात्री उजव्या कानात कापसाचा बोळा ठेवल्यावर डावी नाकपुडी चालू झाल्याने अर्ध्या घंट्यात न्यून होणे

      १९.२.२०१६ या दिवशी दिवसभर मला भीती वाटणे, ताण येणे, काळजी वाटणे, अस्वस्थता, यांसारखे मानसिक त्रास होत होते. हे मी रात्री ९.३० वाजता पू. गाडगीळकाका यांना सांगितल्यावर त्यांनी मला कोणती नाकपुडी चालू आहे, हे पाहायला सांगितले. तेव्हा माझी उजवी नाकपुडी चालू असल्याचे लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी मला उजव्या कानात कापसाचा बोळा ठेवायला सांगितले. मी त्याप्रमाणे केल्यावर अर्ध्या घंट्याने माझी डावी नाकपुडी चालू झाल्याचे आणि मला होणारे मानसिक त्रास न्यून (कमी) झाल्याचे माझ्या लक्षात आले.
- कु. गायत्री बुट्टे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ स्वरोदयशास्त्रानुसार उपाय)

वैराज्य म्हणजे राज्य विहीन व्यवस्था- एक स्वयंशासित राज्यव्यवस्था !

प.पू. पांडे महाराज
      आपण पूजेत म्हणतो, त्या मंत्रपुष्पांजलीमध्ये केलेल्या राज्य व्यवस्थेच्या वर्णनात वैराज्याचा संदर्भ आला आहे. त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केले आहे.
१. व्यक्ती धर्मशील असल्यावरच वैराज्य म्हणजे राज्यविहीन व्यवस्था येऊ शकणे : वैराज्य म्हणजे राज्यविहीन व्यवस्था ! त्यात शासन व्यवस्था नाही. राजा नाही. अराजकता नाही. अशी स्थिती येण्यासाठी व्यक्ती सौजन्यशील असावी लागते. सौजन्यशीलता धर्माचरणाने येते. जोपर्यंत व्यक्ती धर्मशील होत नाही, तोपर्यंत वैराज्य व्यवस्था येऊ शकत नाही.
२. कायद्याची आवश्यकता समंजस लोकांना नसून दुष्ट लोकांना असणे : आजही पाहिले तरी, भारतातील ८० टक्के जनता ही सौजन्यशील आहे; म्हणून त्यांना पोलिसांची भीती आहे. ते कायद्यानुसार वागतात; परंतु जे १० टक्के दुष्ट आहेत, ते पोलिसांना घाबरत नाहीत. नंगेसे खुदा भी डरता है ।, अशी म्हण प्रचलित आहे. मग तो नंगा पोलिसांना कसा घाबरणार ! असे लोकच उलट पोलिसांवर आक्रमण करतात. त्यांच्यात दहशत निर्माण करतात. याकरता समंजस लोकांना कायद्याची आवश्यकता कशाला ? खरी कायद्याची आवश्यकता दुष्ट लोकांना असते. 

महर्षींनी २३.२.२०१६ या दिवशी झालेल्या ६२ क्रमांकाच्या नाडीवाचनातून सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
महर्षि म्हणतात -
१. देवाने आश्रमाचे रक्षण करण्याविषयी
      शेवटपर्यंत तुमची एकच श्रद्धा आम्हाला पुरी आहे, ती म्हणजे भगवंताची शक्ती महर्षींच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. नवग्रह हे एखाद्या सैनिकांसारखे (आर्मीसारखे) आश्रमाभोवती उभे आहेत.
२. दैवी प्रवासाविषयी महर्षींनी केलेले संभाषण
       महर्षि कार्तिकपुत्रीला (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना) उद्देशून म्हणतात
२ अ. प.पू. डॉक्टरांचे कार्य केवळ अस्तित्वाने चालू असल्याने त्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नसणे : प्रवासात तू अनेक मंदिरांना जातेस. प्रत्येक मंदिराला काहीतरी इतिहास आहे आणि त्याचे आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी महत्त्वही आहे. खरंतर हा प्रवास गुरूंनी करायला हवा; परंतु गुरु एका स्थानी राहून केवळ अस्तित्वाने कार्य करणारे आहेत. त्यांच्याऐवजी तुझा हा चाललेला प्रवास भगीरथासारखा आहे. त्याने कशी गंगा पृथ्वीवर आणली आणि तशी गुरूंची शक्ती तू सर्वत्र घेऊन चालली आहेस. श्रद्धेने ऐकणार्‍यांसाठी हे शास्त्र आहे. वाद घालणार्‍यांसाठी नव्हे.
३. आश्रम आणि आश्रमात असलेले साधक, तसेच गुरु 
आणि गुरूंभोवती गोळा झालेले साधक कसे आहेत, याविषयीचे 
वर्णन करतांना महर्षींनी मधमाशांच्या पोळ्याचे उदाहरण देणे
      मध म्हणजे गुरु आणि मधमाशा म्हणजे साधक आहेत. मधाच्या पोळ्याला जशा मधमाशा चिकटून असतात, तसेच साधक गुरूंना चिकटून आहेत. जर कोणी अचानक आक्रमण करून मध काढायला आले, तर माशा चावायला येतात, तसेच हे साधक गुरूंविषयी सतर्क असतात. येणार्‍या काळात अशा काही घटना घडणार आहेत. मधमाशा फुलांतून अविरत कष्ट करून मध गोळा करतात. एवढे कष्ट केल्याने साधकांना देवाने गुरु मिळवून दिले आहेत.
४. प.पू. डॉक्टर हे पृथ्वीवरील 
गुरूंचे गुरु म्हणजेच सत्यपुरुष गुरु असणे
        गुरूंचे साधकाच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करतांना महर्षि म्हणतात
      पृथ्वीवर अनेक गुरु आहेत; परंतु या गुरूंचेही जे गुरु आहेत, असे सत्यपुरुष गुरु तुम्हाला लाभले आहेत. गुरूंकडे पूर्ण आणि शुद्ध अध्यात्म आहे. याची कुणी परीक्षा करू शकत नाही. पाण्यात शेवाळे असते. आपण ते शेवाळे दूर करून आतील शुद्ध पाणी वापरतोच ना ? या शेवाळ्याप्रमाणे असलेले आपले प्रारब्धकर्म, दोष, चुका दूर करण्यासाठी आपण गुरूंकडे, देवाकडे येतो. अग्नीत लोह घातले, तर त्याचा रंग पालटतो. ते लाल आणि प्रकाशमान होते, तसेच सोन्याच्या बाबतीतही आहे. तसेच गुरूंकडे आलेल्या साधकाचेही होते. तोही गुरूंच्या सहवासाने प्रकाशमान होऊ लागतो.
५. श्रद्धा आणि भक्ती कशी असायला हवी, याचे वर्णन 
करतांना महर्षींनी खोल सागरातील माशाचे उदाहरण देणे
       महर्षि म्हणतात, भगवंताची लीला कशी आहे पहा ! मधाचे पोळे देवाने झाडावर ठेवलेले आहे, तर पाण्याचे स्थान जमिनीवर आहे. खोल सागरातसुद्धा अनेक जीव आणि मासे रहातात. केवळ देवावरील श्रद्धेमुळेच एवढ्या मोठ्या आणि खोल असणार्‍या सागरात मासे एकटे राहू शकतात. खोल आणि अथांग असणार्‍या सागरासारखी आपली अंतःकरणातील भक्ती हवी.
६. जमिनीत जाणार्‍या मुळासारखे अध्यात्म आहे; 
परंतु राजकारण्यांचे तसे नाही, ते झाडासारखे आहेत !
      अध्यात्म हे भूमीत जाणार्‍या झाडाच्या मुळासारखे आहे. हे मूळ आत जमिनीत कुठे कुठे जाते, हे कुणीही सांगू शकत नाही. झाडाचे मात्र तसे नाही. झाड कधीही पडू शकते. राजकारण्यांचे अगदी तसेच आहे.
७. सनातनच्या पुढे होणार्‍या महर्षि अध्यात्म 
विश्‍वविद्यालयातील विभागांविषयी महर्षींनी केलेले भाष्य
       या विश्‍वविद्यालयात प्रमुख ५ भाग असणार.
७ अ. औषध विभाग
७ आ. आध्यात्मिक विभाग : सत्संग घेणे, कार्यशाळा घेणे, संतांचे मार्गदर्शन, शिबिरे घेणे इत्यादी
७ इ. गुरुकुल शिक्षण विभाग
७ ई. ध्यानधारणा विभाग
७ उ. मुद्रा, न्यास विभाग :
प्रत्येक बोटांची एकेक मुद्रा महर्षि सांगणार. या मुद्रांनी कोणते रोग बरे होतात, याविषयीचे शास्त्र येथे शिकवले जाईल. (याविषयी प.पू. डॉक्टरांनी बर्‍याच त्रासांवर आधीच बर्‍याच मुद्रा शोधून काढल्या आहेत आणि त्याविषयीचा ग्रंथही आता प्रकाशित होणार आहे. - (पू.) सौ. गाडगीळ)
७ उ १. दोन्ही हातांच्या बोटांची टोके एकमेकांवर आपटण्याने एक प्रकारची शक्ती मिळणे : या वेळी महर्षींनी सांगितले की दोन्ही हातांच्या बोटांची टोके एकमेकांवर आपटत रहा. यातून तुम्हाला एक प्रकारची शक्ती मिळते कि नाही, ते पहा ! मोकळा वेळ मिळेल, तेव्हा अशी मुद्रा केली तरी चालेल. पुढे अशा प्रकारच्या अनेक मुद्रांचे ज्ञान दिले जाईल.
८. प.पू. डॉक्टरांचे महानत्व
       प.पू. डॉक्टर कसे आहेत ?, याचे वर्णन करतांना महर्षी म्हणतात
     परम गुरुजींना सांगा की, ते दिसायला जरी सामान्य असले, तरी ते आतून कोण आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. प्रसाद घेतांना आपला भाव प्रसाद घेण्याचा असतो; परंतु प्रसादाला हे ठाऊक नसते. तसेच परम गुरुजींना ते स्वतः कोण आहेत, हे ज्ञात नाही.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२५.२.२०१६, दुपारी १.०६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणेसर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

      शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप... यांच्याशी नसतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
     भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 
   स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पवारांचा इतिहास !

संपादकीय 
     शरद पवार यांनी गांधी यांचा वध नसून तो खून आहे. त्याला खूनच म्हटले पाहिजे, असे विधान केले आहे. न्यायालयाने खुनी ठरवलेल्या स्वपक्षातील पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात ब्र ही न काढणारे आणि त्यांना पक्षाबाहेर न काढणारे पवार गांधीवधाविषयी जाहीर कार्यक्रमातून बोलतात, तेव्हा आश्‍चर्यच वाटते. नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात एका कार्यक्रमात प्रत्यक्ष विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांचे भाषण मध्येच थांबवत त्यांनी हे विधान केले. त्यांनी स्पष्टीकरणही दिले. पवार म्हणाले, गांधी हत्या करणार्‍या विचारांच्या लोकांनी गांधीवध हा शब्द बेमालुमपणे समाजात रुजवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याचा प्रयोग इतक्या सहजपणे केला जातो की, बोलतांना त्याचे भानही रहात नाही. पवार साहेब बोलतात, त्याचे नेमके उलट करतात, असाच त्यांचा स्वतःचा इतिहास राहिलेला आहे. येथे पवारांनी लक्षात घेतले पाहिजे की, गांधीवध हा शब्द कोणी रुजवलेला नाही. तो कोणाच्याही मुखातून अनावधानाने येत नाही. गांधीवधाच्या प्रकरणी स्वतः पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीवध का केला याची १५० कारणे सविस्तर दिली आहेत. ते वाचल्यावर राष्ट्रभक्ताला तो वधच आहे, असे वाटते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn