Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम

 प.पू.विनायक (अण्णा) राऊळ महाराज जन्मोत्सव 

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांसाठी करतो !

पाकव्याप्त काश्मीरचे नेते शौकत अली यांच्याकडून पाकचा चेहरा उघड !
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर पाकच्या विरोधात धरणे आंदोलन
      जिनेव्हा (स्वित्झर्लंड) - पाकिस्तान त्याच्या कह्यात असलेल्या काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांना प्रारंभ करण्यासाठी करत आहे, असा दावा पाकव्याप्त काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेले नेते शौकत अली काश्मिरी यांनी केला आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
     शौकत अली म्हणाले की, पाकिस्तान एकीकडे आतंकवादाच्या विरोधात आपली लढाई असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी उघडपणे फिरतात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा वाढता वावर असल्याने येथे विविध प्रश्‍न निर्माण झाले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर पाकव्याप्त 
काश्मीरच्या नेत्यांचे पाकिस्तानच्या विरोधात धरणे
     संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर पाकव्याप्त काश्मीरच्या नेत्यांकडून पाकविरोधात ११ मार्चला धरणे आंदोलन करण्यात आले. या नेत्यांनी येथील अत्याचार थांबवावे, या मागणीचे निवेदन संयुक्त राष्ट्राला दिले. या वेळी वर्ल्ड सिंधी काँग्रेसचे अध्यक्ष लखू लुहाना म्हणाले की, सिंध, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगीट-बाल्टिस्तान या भागांत मानवी अधिकारांची स्थिती वाईट आहे.

भारतीय सीमेत घुसलेल्या चीनच्या सैनिकांना सुरक्षादलाच्या सैनिकांनी पिटाळले !

      श्रीनगर / नवी देहली - ८ मार्च या दिवशी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ११ सैनिकांची एक तुकडी लडाख येथील पैगांग सरोवराजवळ भारतीय सीमेत ६ कि.मी.पर्यंत आत घुसली होती; परंतु येथे उपस्थित भारत-तिबेट सीमा पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी चुशूल-मोल्डो क्षेत्रात चिनी सैनिकांच्या एक पथकाने भारतीय सैनिकांबरोबर मिळून साहाय्यता कार्याचा संयुक्त सराव केला होता. तरीही ही घटना घडली. (विश्‍वासघात करणे हा चीनचा इतिहास आहे. हिंदी-चिनी भाईभाई म्हणतच चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण करून सहस्रो चौ.कि.मी. प्रदेश गिळंकृत केला होता. चीनला जशास तसे उत्तर देणारे शासन भारताला न मिळाल्याने चीनची ही खोड अद्याप चालूच आहे. - संपादक)
१. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रानुसार, चार वाहनांतून एक कर्नल आणि दोन मेजर यांच्यासह ११ चिनी सैनिक भारतीय सीमेत घुसले होते. त्यांनी येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचे उल्लंघन केले होते. ते ठाकूंगस्थित भारतीय चौकीजवळून ६ कि.मी. आत घुसले होते.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा

      रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील कन्केर जिल्ह्यात १२ मार्चला सकाळी नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा झाले, तर ४ सैनिक घायाळ झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.


शासनाचा बांधकाम व्यावसायिकांशी करार ! - राज ठाकरे यांचा आरोप

      मुंबई - बांधकाम व्यावसायिकांवर कुठलीही कारवाई न करता त्यांची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा राज्यशासनाचा निर्णय म्हणजे बांधकाम व्यावसायिकांशी केलेला करार (डील) आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरांतील ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे काही अटींवर नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतल्यानंतर ते बोलत होते.
     बांधकाम व्यावसायिकांनाच सगळ्या सवलती का आणि कशा दिल्या जात आहेत ? या सगळ्या गोष्टी ठरवून चालल्या आहेत आणि त्या बांधकाम व्यावसायिकांसाठीच केल्या जात आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य लोकांना फसवले आहे.

(म्हणे) मनुस्मृति पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री यांवर त्वरित बंदी आणावी !

काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांची धर्मद्रोही मागणी
      मुंबई - युती शासनाकडून जातीयतेला आणि वर्णवर्चस्वाला खतपाणी घालणार्‍या मनुस्मृति पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मनुस्मृतीच्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणून त्या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी ११ मार्चला केली. (अशी मागणी करण्यापूर्वी आमदार गजभिये यांनी मनुस्मृति ग्रंथाचा अभ्यास करावा. - संपादक) देशातील जाती-वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी, तसेच अस्पृश्य समाजाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आघाडी शासनानेही मनुस्मृतीचे प्रकाशन आणि विक्री यांवर बंदी आणली होती, असेही ते म्हणाले. (मनुस्मृतीवर कधीच बंदी नव्हती ! - संपादक)

श्री श्री रविशंकर यांना दंड ठोठावणारे सकाळी भोंगा लावून ध्वनीप्रदूषण करणार्‍यांना दंड का करत नाहीत ? - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. गंगाधर कुलकर्णी, पू. सत्यवान कदम (दीपप्रज्वलन
करतांना), श्री. रमेश शिंदे आणि अधिवक्ता श्री. अमृतेश
 हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे २ दिवसांचे राज्यस्तरीय तृतीय हिंदू अधिवेशन !
      हुब्बळ्ळी (कर्नाटक) - आज धर्मावर आघात केल्याप्रमाणे धर्मशास्त्रावरही आघाताला आरंभ झाला आहे. शबरीमला, शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर येथे महिलांच्या प्रवेशाचे आंदोलन याच दृष्टीने होत आहे. त्यांना धर्मावर प्रेम नाही. धर्म, संस्कृती बुडावी म्हणून ते असे करत आहेत.
     श्री श्री रविशंकर गुरुजींना प्रदूषणाच्या नावाखाली दंड लावणारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सकाळी भोंगा लावून ध्वनी प्रदूषण करणार्‍यांना दंड का लावत नाहीत ? यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ? अखलाखची हत्या होताच चर्चा करणार्‍यांना गोरक्षणासाठी रक्त सांडणार्‍या प्रशांत पुजारी याच्या हत्येचे मूल्य कळत नाही का, असे प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
     ते येथील वासवी महल येथे श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्चपासून प्रारंभ झालेल्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय तृतीय हिंदु अधिवेशनात बोलत होते. दीपप्रज्वलनाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.

नेताजींच्या संदर्भातील धारिकांचे काँग्रेसीकरण ! - अनिल धर यांचा आरोप

नेताजींच्या गूढ मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची मागणी
      पुणे - काँग्रेसने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या संदर्भातील अनेक धारिका दडपल्या, तर काही नष्ट केल्या. या प्रकरणात केवळ दिवंगत जवाहरलाल नेहरूच नाही, तर अनेक काँग्रेसी सहभागी आहेत. काँग्रेसने नेताजींच्या मृत्यूचे गुढ दडपले. नेताजींच्या संदर्भातील धारिकांचे वर्गीकरण नाही, तर काँग्रेसीकरण (काँग्रेसिफिकेशन नॉट क्लासिफिकेशन) केले, असा आरोप करत पत्रकार आणि लेखक श्री. अनिल धर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयोग नेमला जाऊन हे सत्य जनतेसमोर आणले जावे, अशी आग्रही मागणी केली. श्री. अनिल धर लिखित इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या नेताजींच्या मृत्यूचे गूढ... भारताचे सर्वांत मोठे रहस्य या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ११ मार्च या दिवशी अक्षरधारा बुक गॅलरी येथे हा कार्यक्रम पार पडला.

(म्हणे) ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
बंगालमधील हिंदूंची दयनीय स्थिती न दिसणारे नोबेल पारितोषिक विजेते 
अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे मुसलमानधार्जिणे विधान
    ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय आहे, असे मुसलमानधार्जिणे विधान अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी कोलकत्ता येथे केले आहे. अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेल्या प्रातिची ट्रस्ट, गाईडंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या सिद्ध केलेल्या अहवालामध्ये हे नमूद केले असून त्यात मुसलमानांची कथित दयनीय स्थिती मांडली आहे. 
१. या अहवालानुसार बंगालमधील ८० टक्के मुसलमान कुटुंबे प्रतिमाह केवळ ५ सहस्र रुपये वेतनावर त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. 
२. यातील जवळजवळ ३८ टक्के मुसलमानांचे मासिक वेतन केवळ २ सहस्र ५०० रुपये एवढेच असून यात ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. ३२५ ग्रामीण भागांतील गावे आणि ७३ शहरांतील मुसलमानांच्या संख्येवरून हा अभ्यास केला आहे. 
३. बंगालमधील केवळ १.५ टक्के मुसलमानांकडे नियमित वेतन मिळणारी खाजगी नोकरी, तर १ टक्के मुसलमानांकडे नियमित वेतन असलेली शासकीय नोकरी आहे. 
४. बंगालमधील ग्रामीण भागात ८० टक्के मुसलमान दारिद्य्ररेषेखाली आहेत. 

इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू ! - अँटी टेररिस्ट फ्रंट ऑफ इंडियाची चेतावणी

 • शत्रूकडून वारंवार आक्रमण होऊनही त्याच्या समवेत क्रिकेट खेळणारा जगातील एकमेव देश भारत !
 • क्रिकेटसारखे खेळ खेळून भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारतील, असे शहाजोगपणे सांगणार्‍यांनी आतापर्यंत क्रिकेटचे अनेक सामने खेळूनही पाकची भारतावरील आक्रमणे का थांबली नाहीत, हेही स्पष्ट करावे !
 • भारत-पाक क्रिकेट सामन्याला वाढता विरोध
      कोलकाता - टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील १९ मार्च या दिवशी होणारा भारत-पाक क्रिकेट सामना आता कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे. पूर्वी तो हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे खेळवण्यात येणार होता. त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी विरोध केल्याने तो कोलकाता येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र येथेही त्याला विरोध होऊ लागला आहे. इडन गार्डनची खेळपट्टी उखडून टाकण्याची चेतावणी अँटी टेररिस्ट फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने दिली आहे. तसेच हा सामना रहित करावा, असे पत्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना लिहिले आहे. हा सामना म्हणजे हुतात्मा सैनिकांचा अवमान आहे. मुंबई आणि पठाणकोटवरील आतंकवादी आक्रमण तसेच पम्पोर आक्रमणातील दोषींना पाकिस्तान भारताकडे सोपवत नाही, तोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

देहली महानगरपालिकेची संजय दत्त याला सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर) बनण्यासाठी विनंती !

      १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगून परत आलेले अभिनेते संजय दत्त यांना देहली महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान आणि स्मार्ट सिटीचे सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर) होण्यासाठी विनंती केली आहे. संजय दत्त त्यांची ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण करून २५ फेब्रुवारी २०१६ला पुण्याच्या येरवाडा कारागृहातून सुटले आहेत. 


चुकीचे काम करण्यात विघ्न येत नाही; पण चांगल्या कामात अनेक विघ्ने येतात ! - श्री श्री रविशंकर

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाला पुष्कळ उत्साहात आरंभ !
      नवी देहली - आर्ट ऑफ लिव्हिंगला ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि १ सहस्र ५० ब्राह्मणांद्वारे मंत्रपठण करून आरंभ झाला. या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह देशविदेशातील प्रमुख, राजकीय नेते, मान्यवर आदी सहस्रो लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री श्री रविशंकर म्हणाले,
१. कोणीतरी म्हणाले, गुरुजींची प्रायव्हेट पार्टी आहे; पण हे अवघे विश्‍वच माझे कुटुंब आहे.
२. क्रीडा, कला, विचार, व्यापार आणि अध्यात्म ही पाच सूत्रे संपूर्ण मानवजातीला जोडतात.
३. अध्यात्म ही सर्वकाही स्वतःमध्ये सामावून घेण्याची कला आहे.
४. वसुधैव कुटुम्बकम् हे खरेच सत्यात उतरल्यासारखे आज वाटत आहे.
५. खासगी आणि सामाजिक जीवन वेगळे दिसता कामा नये.

इशरतजहाँ प्रकरणी गुन्हे रहित करण्याची मागणी योग्य ठिकाणी करा ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - इशरतजहाँच्या प्रकरणी गुजरात पोलिसांवरील गुन्हे रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. इशरत लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याच्या डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे रहित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. अधिवक्ता एम्.एल्. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती.

गोमांस पकडून दिल्या कारणाने शिवसैनिकावर काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकाकडून आक्रमण

 • हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
 • लोकप्रतिनिधींचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षावर बंदी का आणू नये ?
      नांदेड, १२ मार्च - ११ मार्च या दिवशी पीरबुर्हाणनगर येथे गोमांस पकडल्याच्या कारणावरून गुन्हा प्रविष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या एका धर्मांध नगरसेवकाने शिवसैनिकावर आक्रमण केले. त्यामध्ये शिवसैनिक सोनू बाबुराव गायकवाड हे गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे नगरसेवक फारुख यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईची करावी, यासाठी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

जेएन्यूकडून देशद्रोही कन्हैया कुमारचे निलंबन मागे !

कन्हैया कुमारवरील निलंबन मागे घेणार्‍या जेएन्यूकडून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक
 • अहवाल तपाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांवरील निलंबन मागे का घेतले ? 
 • याचा अर्थ विद्यापिठालाच कन्हैया आणि त्याचे साथीदार यांना पाठीशी घालायचे आहे, असा होत नाही का ?अशा विद्यापिठात विद्यार्थ्यांवर कसले संस्कार होत असतील, हे उघड आहे ! असली विद्यापिठे हवीत कशाला ?
कुलगुरूंनी अहवाल तपासण्यापूर्वीच घेतला निर्णय !
     नवी देहली - जिहादी आतंकवादी महंमद अफझल याच्या फाशीच्या विरोधात निदर्शने केल्याच्या प्रकरणी जेएन्यूतील (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारसह ८ विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई विद्यापिठाने मागे घेतली. जेएन्यूमधील या देशद्रोही निदर्शनांमुळे देशभर वादळ उठल्यानंतर विद्यापिठाने कन्हैयासह काही विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने तिचा अहवाल १२ मार्च या दिवशी विद्यापिठास सादर केला. अहवाल पडताळण्याआधीच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आई-वडिलांकडून त्यांचा सर्वोत्कृष्ट गुण घेणारे एकमेव आहेत पितांबरी उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई
     श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचे वडील श्री. वामनराव प्रभुदेसाई यांनी पितांबरी उद्योगसमूहाची स्थापना केली. श्री. रवींद्र यांनी वडिलांकडून उद्योग कसा करायचा आणि वाढवायचा, हे शिकून त्याप्रमाणे पितांबरीला उद्योग-जगतात उच्च स्थान प्राप्त करून दिले आहे. त्याच वेळी त्यांनी आईकडून साधनेचे बाळकडू घेऊन ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


विविध महामंडळांच्या अपहाराच्या प्रकरणी शासनाकडून समिती नियुक्त !

अर्थसंकल्पीय
अधिवेशन २०१६
         मुंबई, १२ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या विविध महामंडळांमध्ये झालेल्या अपहाराप्रकरणी फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाने समिती नियुक्त करण्याचे निर्देश ११ मार्च या दिवशी विधान परिषदेते सभापती रामराजे निंबाळकर यांनी शासनाला दिले.
      अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सार्वजनिक उपक्रमातील मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग अन् चर्मकार विकास महामंडळ यांच्यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन शासनाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशी सोपवली होती. गुन्हे विभागाने जून २०१५ मध्ये देना अधिकोष कर्मचार्‍यांविरुद्ध विशेष न्यायाधीश बृहन्मुंबई येथे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विजय अधिकोषासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांच्याद्वारे अन्वेषण चालू आहे. राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या देना अधिकोषातील आणि इतर राष्ट्रीयकृत अधिकोषातील मुदत ठेवीवरील रकमेचा अपहार झाल्याविषयीचा प्रश्‍न सदस्या श्रीमती शोभा फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना अर्थमंत्री बोलत होते.

देहलीतील ल्युटेन भागातील शासकीय घरांत अनधिकृतपणे रहाणार्‍यांना केंद्रशासनाने हाकलले !

     नवी देहली - येथील ल्युटेन या अतिमहागड्या भागात केंद्रशासनाची अनेक घरे मंत्री, कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना देण्यात आली होती. मात्र मुदत संपून गेल्यावरही अनेकांनी या घरांवर त्यांचा ताबा ठेवलाच होता. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर त्यांनी याविषयी कडक धोरण राबवून अनेक घरे रिकामी करून घेतली, अशी माहिती शहरी विकास खात्याचे राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लोकसभेत दिली.
    २०१३ मध्ये केवळ २४६ घरे रिकामी करून घेण्यात आली होती. मात्र २०१४ मध्ये ५३९ तर २०१५ मध्ये ७४६ घरे रिकामी करून घेण्यात शासनाला यश मिळाले. तरीही अद्याप १ सहस्र २०७ घरे अनधिकृतपणे वापरात आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येने अवैधपणे रहाणार्‍यांना बेमुदत कारागृहात ठेवले पाहिजे ! - संपादक) माजी निवासस्थान रिक्त करण्यास सांगितल्यामुळे गृहमंत्री बुटासिंग आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री न्यायालयात गेले आहेत. भाजपचे नेते जसवंत सिंह हे गंभीर आजारी असल्याने शासकीय घरात राहत आहेत.

संमतीने शारीरिक संबंध हा बलात्कार नाही ! - मुंबई उच्च न्यायालय

     मुंबई - एखादी सुशिक्षित महिला शारीरिक संबंध ठेवत असेल, तर तिला त्याच्या परिणामांची जाणीव असते. त्यामुळे असे प्रकरण हे बलात्काराच्या व्याख्येत मोडत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने १० मार्च या दिवशी सोलापूरमधील एका २५ वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन संमत केला. तरुणीने या तरुणाविरुद्ध लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आणि बलात्कार केल्याचा आरोप करत गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे तरुणाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आचारसंहितेचा भंग करणार्‍या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

      मुंबई - केंद्रशासनाने मंत्र्यांच्या आचारसंहितेविषयी (कोड ऑफ कन्डक्ट) काही नियमावली सिद्ध केली आहे; मात्र त्याचे उल्लंघन मंत्रिमंडळातील मंत्र्याकडून करण्यात आले आहे. त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार शरद रणपिसे यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत केली.
     रणपिसे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री याविषयी निर्णय घेणार नसतील, तर नैतिकतेच्या आधारावर संबंधित मंत्र्याने स्वतःहून त्यागपत्र दिले पाहिजे. स्वच्छता अभियान चालवणार्‍या शासनाने प्रथम शासनामधील स्वच्छता करावी. आचारसंहितेच्या सूत्रावर सभागृहात तात्काळ चर्चा करावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली; मात्र सभापती रामराजे-निंबाळकर यांनी ही मागणी फेटाळून लावत ३४ मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले.

चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार ! - चंद्रशेखर बावनकुळे

अकोला येथील विद्युत वितरण 
निविदा प्रक्रियेतील अनियमितता प्रकरण
        मुंबई, १२ मार्च (विशेष प्रतिनिधी) - अकोला येथील विद्युत वितरण आस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेच्या प्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी चालू आहे. या चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.
      श्री. बावनकुळे म्हणाले की, सदर निविदा अकोला येथील विद्युत वितरण आस्थापनाकडून फोटो मीटर रिडींगच्या कामाकरिता लागणारे मनुष्यबळ पुरवण्यासाठी काढण्यात आली होती. या निविदेमध्ये बाह्यस्रोत कर्मचारी पुरवणार्‍या संस्थेकडे १ लक्ष रिडींगचा अनुभव अशी अट नमूद करण्यात आली होती. त्यामध्ये कालावधीचा उल्लेख नसल्याने ही निविदा रहित करण्यात आली आहे.

पुरुषांच्या बरोबरीने भारतात १ कोटी महिला करतात धूम्रपान !

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचा हा दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्रशासन काही करेल का ?
भारतात महिलांची अशीही समानता !
      तथाकथित हक्कांसाठी वारंवार हिंदूंच्या रूढी-परंपरांवर आघात करणार्‍या भूमाता ब्रिगेडसारख्या महिला संघटना महिलांच्या धूम्रपानाच्या विरोधात पुढे का येत नाहीत ? कि त्यांना केवळ महिलांच्या नावाने राजकारण करायचे एवढेच माहिती आहे ?
      मुंबई - ९ मार्च हा जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर एका स्वयंसेवी संस्थेने एका अहवालातून भारतात १ कोटी महिला धूम्रपान करतात, अशी धक्कादायक माहिती उघड केली आहे. (महिलांनो, पुरुषांच्या चुकीच्या गोष्टींचे अनुकरण करून व्यसनाधीन होण्यापेक्षा साधना आणि धर्माचरण करून आदर्श कुटुंबव्यवस्था निर्माण करा ! - संपादक) 

भारतीय रेल्वे मंत्रालय आणि स्पेन रेल्वे संयुक्तरित्या देशात नवीन अतिवेगवान रेल्वे प्रकल्प उभारणार

येत्या ८ वर्षांत नागपूर ते मुंबई रेल्वे प्रवास ४ घंट्यांत होणार !
     संभाजीनगर - भारतीय रेल्वे मंत्रालय आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने देशात नवीन अतिवेगवान रेल्वे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी स्पेनच्या ४ सदस्य असलेल्या समितीने भारताला भेट दिली. दौर्‍यावर आलेल्या स्पेनच्या जे.जे. ओटेटिओ यांनी १० मार्च या दिवशी पत्रकारांना भेट देतांना या प्रकल्पाच्या अभ्यास आणि नियोजन यांविषयी माहिती दिली.
    प्रारंभी हा प्रकल्प २ टप्प्यांत उभारला जाणार आहे. पहिल्यांदा नागपूर ते मुंबई असा विशेष मार्ग आखण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईहून नागपूरला जाणे ४ घंट्यांतच शक्य होणार आहे. त्यानंतर मुंबई ते कोलकाता असा दुसरा विशेष मार्ग आखण्यात येणार आहे. यामुळे ३ सहस्त्र कि.मी.चे अंतर जोडले जाणार आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी दीड वर्ष लागणार आहे.

धर्मांधाने खोटे नाव सांगून केले हिंदु महिलेचे शारीरिक शोषण !

अशा किती महिला आणि मुली यांना धर्मांधांनी फसवल्यावर हिंदु समाज जागा होणार आहे ?
आग्रा येथे लव्ह जिहाद!
     आग्रा - येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. सिकंदरा भागातील विकास कॉलनीमध्ये विवाहित मुबीनउद्दीन या धर्मांध युवकाने एका २४ वर्षीय विधवा महिलेला खोट्या नावाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्याशी विवाह करून तिचे सलग २ वर्षे शारीरिक शोषण केले. युवकाच्या पत्नीने ही बाब उघड केल्यानंतर पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडितेने हिंदुत्ववाद्यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार, फसवणूक आणि गर्भपाताची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हालगाव (खालापूर) येथे गोवंशियांची हत्या करणार्‍याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

     खालापूर (जिल्हा रायगड) - येथील हालगाव परिसरात गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांनी घातलेल्या धाडीत गोवंशियांची हत्या करणार्‍याला पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला आहे. (गोवंशियांच्या रक्षणासाठी तत्पर असणारे श्री. चेतन शर्मा यांचे अभिनंदन ! - संपादक) या वेळी हत्या केलेला बैल आणि ७ जिवंत गायी यांची सुटका करण्यात आली.

विनोदी अभिनेता रहमान खानला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत सर्वात पुढे !
      वसई - स्टॅण्डअप कॉमेडियन रहमान खान यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. रहमान यांना कुर्ल्यातून अटक करण्यात आली. रहमान खान यांनी ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी सर्कसच्या माध्यमातून या क्षेत्रात ओळख निर्माण केली होती.
     तक्रारदार महिला आणि रहमान खान यांची ओळख एक वर्षापूर्वी व्ही चॅट या सामाजिक संकेतस्थळावर झाली होती. रहमान खानने तिच्याकडून २ लाख रुपये उसने घेतले होते. यानंतर महिलेने पैशांची मागणी केल्यावर त्याने तिला वसईतील एका उपाहारगृहामध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. (धर्मांधांचे खरे स्वरूप ! - संपादक) रहमानने बलात्काराचे चलचित्र बनवून लुबाडणूक केल्याचा आरोपही महिलेने आहे. अटक केल्यानंतर रहमान यांना वसई न्यायालयात सादर केल्यावर न्यायालयाने त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र !

       ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सातत्याने धमकीची पत्रे येणे, याचा अर्थ गुंड आणि गुन्हेगार यांना राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही, असेच नव्हे का ?
       नगर, १२ मार्च -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका अज्ञात व्यक्तीने ४ जणांची नावे घालून धमकीचे पत्र पाठवले आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
       हजारे यांना हे पत्र ९ मार्च या दिवशी टपालाने आले असून त्यावर नेवासा टपाल कार्यालयाचा शिक्का आहे. या पत्रात त्या अज्ञात व्यक्तीने अंबादास लष्करे, पप्पू पवार, परांडे मिस्तरी, काळाराम पिटेकर यांची नावे लिहिलेली असून हजारे यांचे वर्तमानपत्रातील छायाचित्र चिटकवले आहे. तसेच पत्रामध्ये धमकावले आहे की, तुम्ही माजी सैनिक आहात. जर तुम्ही दर मासाला १ लक्ष रुपये हप्ता दिला, तर तुमच्याशी दोस्ती करू आणि पैसे दिले नाहीत, तर दुष्मनी करू. आमच्याशी दुष्मनी चांगली नाही.

पाकिस्तानशी कोणतेही संबंध नकोत ! - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

     मुंबई - पाकिस्तानला हिंदुस्थानात क्रिकेट खेळू न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेशी आता काँग्रेस आणि अन्य पक्षही सहमत होऊ लागले आहेत. देशप्रेमाची भावना अधिक तीव्र होत आहे. आतंकवादी कारवाया थांबवेपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असा एकमुखी आवाज देशात घुमल्याशिवाय पाकिस्तानचे चाळे थांबणार नाहीत, असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मार्च या दिवशी व्यक्त केले.
      विक्रोळी पार्कसाइट येथे मुंबई अग्नीशमनदलाच्या समादेश केंद्राचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाला खेळू देण्यास विरोध करण्याच्या निर्णयाचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. हिमाचल प्रदेशने सामन्याला केलेल्या विरोधानंतर टी-२० सामना कोलकाता येथे खेळवला जाणार असून त्यासाठी पाकिस्तानी संघ हिंदुस्थानात येणार आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असेही ठाकरे या वेळी म्हणाले.

इस्लाम अमेरिकेचाद्वेष करतो ! - डोनाल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन - इस्लाम अमेरिकेचा द्वेष करतो आणि जे अमेरिकेचा द्वेष करतात त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळू शकत नाही, असे मत एका दूरचित्रवाहिनीशी संवाद साधतांना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. यापूर्वीही ट्रम्प यांनी मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश घेण्यावर तात्पुरती बंदी घालावी, अशी मागणी केली होती. इस्लाम धर्मातच द्वेष ठासून भरला आहे काय ?, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, हे शोधून काढणे प्रसारमाध्यमांचे काम आहे. आम्हाला सतर्क राहिले पाहिजे. जे अमेरिकेचा द्वेष करतात, त्यांना अमेरिकेत प्रवेश देता कामा नये. अमेरिकेचा लढा जहाल इस्लामशी आहे.

साम्यवाद मानवजातीला विनाशाच्या खाईत लोटत आहे ! - राजेंद्र आर्लेकर, पंचायतमंत्री, गोवा.

जेएन्यूतील देशद्रोहाचे प्रकरण
     पणजी, १२ मार्च (वार्ता.) - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाचे तुकडे पाडण्याची घोषणा दिल्या जात आहेत. हे देशातील युवा पिढी अजिबात खपवून घेणार नाही. साम्यवाद मानवजातीला विनाशाच्या खाईत लोटत आहे. भाषणस्वातंत्र्याचा आधार घेऊन हिंदुस्थानची सुरक्षा धोक्यात आणणारा साम्यवादी कन्हैया कुमारची प्रवृत्ती वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी केले. 
    नेहरू युवा केंद्र, गोवाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मिनेझिस ब्रागांझा सभागृहातील कार्यक्रमात पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर बोलत होते.

वायूदलाजवळ दुहेरी लढाईला आवश्यक लढाऊ विमानांची कमतरता !

ही आहे भारताची ६९ वर्षांतील प्रगती ! आता मोदी शासनाकडून ही स्थिती पालटेल, अशी आशा आहे. 
     नवी देहली - एकावेळी दोन लढाया लढण्याची वेळ आल्यास भारतीय वायूदलाजवळ आवश्यक लढाऊ विमाने नाहीत, असे वायूदलाने म्हटले आहे. वायूदलाचे उपप्रमुख एअर मार्शल बी.एस्. धनोआ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, वायूदलामध्ये असलेल्या ३३ स्क्वॉड्रनमध्येसुद्धा बहुतांश रशियानिर्मित सुखोई-३० लढाऊ विमाने आहेत. या विमानांपैकी आवश्यकता भासल्यास केवळ ५५ टक्केच विमाने युद्धाच्या काळात उपयोगात येण्याची शक्यता आहे. वायूदलाकडील ठरलेल्या स्क्वॉड्रनची संख्या ४२ वरून ३३ करण्यात आल्यानंतर या दलाकडून ही बाब उघड करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विवाह समारंभात झालेल्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू

उत्तरप्रदेशात शासन समाजवादी पक्षाचे कि गुन्हेगारांचे ? 
     कानपूर (उत्तरप्रदेश) - खडगपूर येथील राम प्रताप यादव यांचा १६ वर्षीय मुलगा अजय शेजारच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. या वेळी उत्सव साजरा करतांना करण्यात आलेल्या गोळीबारात अजयचा गोळी लागून मृत्यू झाला. मृतकाच्या नातेवाईकांनी या हत्येमागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते अजयला समोरून गोळी मारण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भारतियांनो, धूम्रपानाचे दुष्परिणाम विसरू नका !
     जागतिक धूम्रपानविरोधी दिनाच्या पार्श्‍वभूमीवर एका स्वयंसेवी संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भारतात धूम्रपान करणार्‍यांची संख्या १० कोटी असून त्यात १ कोटी महिलांचा समावेश आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Bharat me 1 Karod Mahilaye dhumrapan karti hai, yaha Toronto ke yek report me prasidha huva hai - Janaho, dhumrapan ke dushparinam dhyanme le !

जागो !
     भारत में १ करोड महिलांए धुम्रपान करती है, यह टोरॅन्टो के एक रिपोर्ट में प्रसिद्ध हुवा है ! - जनहो, धुम्रपानके दुष्परिणाम ध्यान में ले !

आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी दोषी करंजुले यांना फाशीऐवजी कारावास

      मुंबई - १९ मतिमंद विद्यार्थिनींवर बलात्कार आणि एका विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या रामचंद्र करंजुले यांची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रहित केली आहे. फाशीऐवजी त्यांना १० वर्षांचा कारावास आणि ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच करंजुले यांची शिक्षा कमी करतांना उच्च न्यायालयाने त्यांना हत्येच्या आरोपातूनही मुक्त केले आहे.

अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भातील सुनावणी आणखी दोन आठवडे स्थगित

     मुंबई - पहाटेपासून रात्रीपर्यंत मशिदींवर वाजणार्‍या नवी मुंबई परिसरातील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे स्थगित करण्यात आली आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील याचिका आणि ध्वनीप्रदूषणाच्या विरोधातील याचिकेसह अन्य याचिका यांमधील सूत्रे सारखीच आहेत; मात्र या याचिका सुनावणीसाठी वेगवेगळ्या न्यायमूर्तींकडे गेल्या आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी घेणे योग्य ठरेल, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी या वेळी व्यक्त केले. ही गोष्ट मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश त्यांनी याचिकाकर्त्यांना दिले.

राजिम (छत्तीसगड) कुंभभेळ्यामध्ये उभारण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म प्रदर्शनाला संत-महंतांची भेट

डावीकडून आर्य समाजाचे छत्तीसगड प्रांतीय आर्य
प्रतिनिधी सभेचे धर्ममुनी वानप्रस्थी, मुजफ्फरनगर
 येथील पं. सुमन राही यांचा सत्कार करतांना
सनातन संस्थेचे श्री. हेमंत कानस्कर
   राजिम (छत्तीसगड) - येथे राजिम कुंभभेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे राष्ट्र आणि धर्म प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आर्य समाजचे रायपूर येथील श्री. जगबंधु शास्त्री आणि मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील पं. सुमन राही यांनी नुकतीच भेट दिली. 
    प्रदर्शन पाहून ते अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले. प्रदर्शनात राष्ट्र आणि धर्म विषयी फ्लेक्स फलक उभारण्यात आले असून सनातनचे ग्रंथही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
माजी आमदार श्री. सोनप्रकाशगिरी यांची प्रदर्शनाला भेट 
     राजिम कुंभभेळ्यामधे लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला धमतरी (छत्तीसगड)चे माजी आमदार श्री. सोनप्रकाश गिरी यांनी ४ मार्च या दिवशी भेट देऊन अवलोकन केले.

विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या पेडणे, गोवा येथील सुजित (बंड्या) राणे या शिक्षकाला अटक !

समाजाचे होणारे घोर अध:पतन रोखण्यासाठी धर्माधिष्ठित जीवनपद्धतीला पर्याय नाही ! 
     पेडणे, १२ मार्च (वार्ता.) - तुये-मुरमुसे येथील एका प्रतिष्ठित विद्यालयातील शारीरिक प्रशिक्षण देणारे शिक्षक सुजित (बंड्या) राणे यांना पेडणे पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित केले असता सुजित राणे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
१. शारीरिक शिक्षण देणार्‍या शिक्षकांकडून विद्यार्थिनींवर अत्याचाराचा हा हल्लीच उघडकीस आलेला दुसरा प्रकार आहे. यापूर्वी मुळगाव येथे शारीरिक प्रशिक्षण देणारे शिक्षक उमेश फडते यांना अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे.

गोवा वेश्याव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले आहे ! - अर्ज संघटनेची माहिती

शासन ही परिस्थिती पालटण्यासाठी काही प्रयत्न करणार का ?
     पणजी, १२ मार्च (वार्ता.) - गोवा हे वेश्याव्यवसायाचे केंद्र बनले असून, याला वेळीच आळा घातला पाहिजे. अनेक पर्यटक यासाठीच गोव्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती अर्ज या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष अरुण पांडे यांनी महिला आणि बाल अत्याचारांच्या विरोधात पणजी येथे आयोजित जागृती कार्यक्रमात केले. 
या वेळी अरुण देशपांडे म्हणाले, 
१. शस्त्रे आणि अमली पदार्थ यांच्यानंतर वेश्याव्यवसाय हा मोठा महसूल देणारा तिसर्‍या क्रमांकाचा अवैध व्यवसाय आहे. भारतात हे तिन्ही व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. इतकेच नव्हे, तर या व्यवसायात भारतातून मुली इतर देशांत पुरवल्या जातात. तशाच इतर देशांतील मुली येथे आणल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरून हा व्यवसाय चालवला जात आहे. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून महिलांना प्रथम भारतात आणले जाते. या ठिकाणाहून त्यांना इतर देशांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे भारत हे वेश्याव्यवसायाचा निर्माता आणि पुरवठादार देश बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

औषधी वनस्पतींची लागवड करा !

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका भावी आपत्काळातील संजीवनी

१. काळाची पावले ओळखून जनकल्याणासाठी ग्रंथाची निर्मिती !
पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. जनजीवन आणि दळणवळण सुविधा विस्कळीत झाल्याने तयार औषधांचा पुरवठा होऊ शकत नाही. कधी सीमेवर युद्धाची ठिणगी पडल्यास शासनाकडे उपलब्ध औषधे सैन्याला पुरवायची कि जनतेला, हा प्रश्‍न येतो आणि सहाजिकच सर्व सुविधा सैन्याकडे वळवल्या जातात. अलीकडेच नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक मरण पावले. तेथेही औषधांचा प्रचंड तुटवडा भासत होता. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात. या वनस्पती कशा लावाव्यात याची इत्थंभूत माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे. हा ग्रंथ म्हणजे काळाची पावले ओळखून जनकल्याणासाठी केलेला एक यज्ञच म्हणावा लागेल.

देशभरात होणार्‍या हिंदु नेत्यांच्या हत्या म्हणजे सुनियोजित कट ! - सनातन संस्था

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      जळगाव - हिंदुत्ववादी विचारसरणी असल्यानेच हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या, हे सुस्पष्ट असूनही पोलीस या हत्यांमागे वैयक्तिक हेवेदावे असल्याचे दाखवून हत्यांचा तपास दडपू पहातात. देशभरात होणार्‍या हिंदु नेत्यांच्या हत्या म्हणजे सुनियोजित कट आहे. या हत्यांमागील सूत्रधारांवर, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणांची केंद्रीय स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या कु. पूजा जाधव यांनी केले. येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने महानगरपालिकेसमोर १२ मार्च या दिवशी सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. या आंदोलन त्या बोलत होत्या.

देशद्रोहाच्या गँगरीनवर ठोस उपाय करण्याची सूचना देणारा देहली उच्च न्यायालयाचा निकाल !

     जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला देहली उच्च न्यायालयाने ६ मासांसाठी अंतरिम जामीन दिला. जामीन देतांना न्या. प्रतिभा रानी यांनी केलेल्या नोंदी या देशद्रोही घोषणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलामा चढवू पहाणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालणार्‍या आहेत. असे असतांनाही देशातील प्रमुख वृत्तपत्रे, तसेच वृत्तवाहिन्या यांनी जामीन देतांना उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कन्हैया कुमार याला जामीन मिळाला, ही एवढीच गोष्ट प्रसारित करून कन्हैयाला नायकाच्या भूमिकेत प्रसारित केले. कन्हैयाला जामीन देतांना उच्च न्यायालयाची नेमकी काय भूमिका होती, हे सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा काही संपादित भाग येथे देत आहोत. 

रामनाथी आश्रमातील विभागात सूक्ष्म स्तरावर त्रासदायक शक्तींचा सूक्ष्म आवाज ऐकू येणे

कु. प्रियांका लोटलीकर
आपण रेल्वे स्टेशनवर अथवा बसस्थानकावर उभे राहून तेथील गदारोळ ऐकला असता आपल्याला नकोसे होते. मन अस्वस्थ होते आणि आपल्याला कधी एकदा एखाद्या शांत ठिकाणी जातो असे होते; परंतु हा स्थुलातून ऐकू येणारा गोंगाट आहे. स्थुलातून आजूबाजूला कोणीही नसतांनाही जो आवाज ऐकू येतो, त्याला 'सूक्ष्मनाद' असे म्हणतात. स्थुलातून येणार्‍या नादापेक्षा सूक्ष्मातून येणार्‍या नादाचा मन आणि बुद्धी यांवर होणारा परिणाम अधिक परिणामकारक असतो. साधकांना १६.१२.२०१५ या दिवशी अशीच एक त्रासदायक अनुभूती आली. त्यांसंदर्भात जाणून घेऊया.
१. माणसांचा जमाव आरडाओरडा करत आश्रमाच्या दिशेने चालत येत आहे, असे वाटणे आणि विभागातील अन्य एका साधकालाही तसा आवाज ऐकू येणे
१६.१२.२०१५ या दिवशी विभागात रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी मला प्रचंड गदारोळ ऐकू येत होता. त्या वेळी काही माणसांचा जमाव आरडाओरडा करत आश्रमाच्या दिशेने चालत येत आहे, असे मला वाटले. मला तो आवाज इतका स्पष्ट ऐकू येत होता की, मी सेवा थांबवून अंदाज घेतला. त्या वेळी मला भास झाला, असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केले. काही क्षणांतच विभागातील अन्य एका साधकालाही आवाज ऐकू येऊन त्याने तसे अन्य साधकाला विचारले. त्या वेळी मग मला ऐकू आलेला आवाज हा भास नाही, हे लक्षात येऊन मी पुन्हा आगाशीत पहायला गेले.

यवतमाळ येथे धावत्या चारचाकी गाडीमध्ये युवतीवर बलात्कार

महिलांसाठी असुरक्षित होत असलेले महाराष्ट्र राज्य !
       नागपूर, १२ मार्च - दोन मद्यधुंद नराधमांनी वर्गमैत्रिणीला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर धावत्या वाहनात बलात्कार केला. ही घटना यवतमाळच्या पांढरकवडा बायपास मार्गावर घडला. या प्रकरणी धर्मांधासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी संघटित झालेले धुळे येथील धर्माभिमानी हिंदू !

इसिसचा आतंकवाद, पुणे येथील सावन राठोड हत्या प्रकरण आणि कॉन्व्हेंट 
शाळांमधील अपप्रकार या समस्यांवर उठवला आवाज !
श्री. सुनील घनवट
१. पार्श्‍वभूमी 
      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ जानेवारी २०१६ या दिवशी धुळे शहरात हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला ८ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे यांपैकी ९५ टक्क्यांहून अधिक धर्माभिमानी युवक होते. या सभेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी स्थानिक जिव्हाळ्याच्या विषयांवर मार्गदर्शन केल्यामुळे वक्ते जणू आमच्या मनातीलच विषय बोलत आहेत आणि धर्मावर होणार्‍या आघातांच्या संदर्भात आम्हाला दिशा मिळत आहे, असे त्यांना जाणवले. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता निरपेक्षपणे चाललेल्या कार्यामुळे सर्वजण प्रभावित झाले. या सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत ३५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले. या बैठकीत धुळे शहरात होत असलेल्या इसिस या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्याचे वाढलेले प्रमाण, पुणे येथील सावन राठोड यांना धर्मांधांनी जाळून ठार मारल्याची घटना, तसेच धुळे शहरात कॉन्व्हेंट शाळांमधून चालू असलेले हिंदुविरोधी प्रकार, या विषयांवर आवाज उठवण्यासाठी एका भव्य मोर्च्याचे आयोजन धुळे शहरात करूया, असा मानस सर्वांनी व्यक्त केला. त्यानंतरच्या आढावा बैठकीत मोर्च्याचे स्थळ, वार, वेळ निश्‍चित करून भव्य हिंदु मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.

तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

'रामनाथी येथील सनातनच्या आश्रम, अन्य सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे येथे विविध सूक्ष्म-स्तरावरील नाद ऐकू येतात. काही नाद ऐकल्यावर चांगले वाटते, तर काही नाद ऐकल्यावर त्रास जाणवणे म्हणजे भीती वाटणे, दाब जाणवणे, नकोसे वाटणे इत्यादी त्रास जाणवतात.
१. सूक्ष्म स्तरावर येणार्‍या चांगल्या आणि त्रासदायक नाद येण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. सूक्ष्म स्तरावर येणार्‍या नाद येण्याची प्रक्रिया काय असते ?
३. सूक्ष्म स्तरावर येणार्‍या नादांचा वातावरण आणि तेथील व्यक्ती यांवर काय परिणाम होतो ?
४. सूक्ष्म स्तरावर येणार्‍या नादांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?', या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : savv.research@gmail.com)

सावधान ! मोबाईल नावाचा असुर तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
भ्रमणभाषच्या अति उपयोगामुळे मायेत भ्रमण करणार्‍या तुमच्या मनरूपी बाळाला वेळीच आवर घालून त्याला अंतर्मुखतेचे शिक्षण द्या !

१. मनाला आपले बाळ समजून त्याच्यावर चांगले संस्कार करा !
आई बाळाला अतिशय मायेने मोठे करते, तसेच त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी दिवसरात्र झटत असते. आपले मनही आपले एक बाळच आहे, असे त्याला आपण सांभाळले पाहिजे. या मन नावाच्या बाळाला चांगले वळण लावले पाहिजे. ते मायेकडे वेळोवेळी धावत असेल, तर त्याला वेळीच समजावून त्याच्याकडून साधना करवून घेतली पाहिजे.
२. भ्रमणभाषच्या संगतीमुळे तुमचे मनरूपी बाळ मायेत इतरत्र अनावश्यकरित्या संचार करत असल्याने त्याला वेळीच साधनेने स्थिर करा !
सध्या भ्रमणभाषमुळे या मनरूपी बाळाला मायेत इतरत्र आणि अनावश्यक ठिकाणी संचार करण्याची सवय झाली आहे. यामुळे साधकांची साधनेत अतोनात हानी होत आहे. भ्रमणभाषच्या अति उपयोगामुळे साधकांचे साधनेतील अनेक घंटे वाया जातांना दिसत आहेत. अध्यात्म जगण्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. साधनेनेच मनाला तुम्ही एका जागी स्थिर करू शकता, हे लक्षात घ्या.
३. मोबाईलमध्ये दंग असणार्‍या साधकांना अवतीभोवतीच्या विश्‍वातून ईश्‍वर आपल्याला काहीतरी शिकवत आहे, याकडे लक्ष नसणे
साधकांना कुठेही पाहिले, तरी ते भ्रमणभाषवर काहीतरी करतांना दिसतात. त्यांचे लक्ष भोवताली अजिबात नसते. ईश्‍वर आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या जगातून बरेच काही शिकवत असतो; परंतु तुमचे त्याकडे लक्ष हवे ना ? तुम्ही आपले सतत त्या मोबाईलमध्ये दंग ! कुणाकडून शिकणे नाही, कुणाशी बोलणे नाही, समष्टीचे भान नाही, अंतर्मनातून नामजप चालू आहे का ?, याकडे लक्ष नाही. ईश्‍वरी अनुसंधान तर दूरच आणि मग आपली प्रगती का होत नाही, याचा विचारही होत नाही.
४. पूर्वी मोबाईल नसल्याने विश्‍व अधिक सुखी होते !
आपले वागणे जर अध्यात्माला धरून नाही, तर आपली प्रगती कदापि होणे शक्य नाही. पूर्वी कुठे मोबाईल होते ?; परंतु हे विश्‍व चालूच होते ना ? हे विश्‍व आतापेक्षा अधिक सुखी होते.
५. सेवेपुरता मोबाईलचा उपयोग करून इतर वेळी मनाला अंतर्मुख केले पाहिजे, नाहीतर पुढे आपत्कालात जगणे कठीण होईल !
सेवेपुरता मोबाईलचा उपयोग करून इतर वेळी मनाला अंतर्मुख केले पाहिजे, नाहीतर पुढे आपत्कालात जगणे कठीण होईल. साधक गादीवर झोपले, तरी मोबाईलचा स्क्रिन पहात असतात. खरं म्हणजे झोपतांना आपल्या दिवसभरातील चुका देवाला सांगून नामजप करत झोपले, तरच झोप तमोगुणी होणार नाही. संत झोपून उठले, तरी छानच दिसतात; कारण त्यांचे रात्रीही देवाशी अनुसंधान असते.
६. ईश्‍वराला न पहाता दिवसातील अनेक घंटे मोबाईलच पहात बसणार्‍या साधकांचे चेहरे दुसर्‍या दिवशी आवरण आल्यासारखे दिसणे
ईश्‍वराला न पहाता दिवसातील अनेक घंटे मोबाईलच पहात बसणार्‍या साधकांचे चेहरे दुसर्‍या दिवशी आवरण आल्यासारखे आणि सुजल्यासारखे दिसतात. रात्रीची झोपही त्यांना चांगली लागत नाही आणि मग आध्यात्मिक त्रास होतो, याचे कारण पुढे करून अनेक घंटे उपायांना बसावे लागते. यामुळे सेवेवरही परिणाम होतो.
७. आपल्या जीवनातील मोबाईलचे स्थान न्यून करून देवाच्या अनुसंधानाकडे लक्ष दिल्यास आपल्या सेवेतील फलनिष्पत्ती वाढेल आणि आध्यात्मिक उन्नतीही होईल.
८. मोबाईलचा अतीवापर टाळल्यामुळे आपल्यावर होणारे दुष्ट शक्तींचे आक्रमणही थांबेल !
कुणी आध्यात्मिक उपाय विचारायला आले, तर त्यांना आधी हाच प्रश्‍न विचारला पाहिजे की, तुम्ही मोबाईलवर काय काय अनावश्यक पहाता आणि किती घंटे त्यात वाया घालवता ? मोबाईलचा अतीवापर टाळल्यामुळे आपल्यावर होणारे दुष्ट शक्तींचे आक्रमणही थांबेल.
९. मुलांना महागडा मोबाईल घेऊन देणारे आई-वडीलच मुलांच्या हानीला कारणीभूत आहेत !
आई-वडिलांनीही आपल्या मुलाला अति महागाईचा मोबाईल घेऊन देऊ नये. नाहीतर त्याची साधनेत हानी होईल. आजकाल मुले इतरांशी अनावश्यक बोलण्यात वेळ घालवत आहेत. लहान वयात त्यांच्यावर साधनेचे संस्कार व्हायचे सोडून मायेतील इतर गोष्टींकडेच त्यांचे लक्ष अधिक जात आहे; परंतु यात मुलांना दोष देऊन काय उपयोग ? याला सर्वस्वी त्यांचे पालकच उत्तरदायी आहेत.
१०. मुलांना मोबाईलवर बोलणे शिकवण्यापेक्षा त्यांना देवाशी कसे बोलायचे, हे शिकवा !
तेव्हा वेळीच मुलांना चांगले वळण लावून मोबाईलच्या संकटापासून त्यांचे रक्षण करा आणि त्यांना अध्यात्मात पुढे न्या ! त्यांना मोबाईलवर बोलणे शिकवण्यापेक्षा त्यांना देवाशी कसे बोलायचे, हे शिकवा. देवाशी बोलण्याने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होईल; परंतु मोबाईलच्या संगतीमुळे मात्र त्यांचे आयुष्य वाया जाईल. देवाची संगत त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडवेल.
११. मोबाईल नावाच्या असुराला आपल्या जीवनात स्थान देऊ नका !
तेव्हा सावधान ! मोबाईल नावाच्या असुराला आपल्या जीवनात स्थान देऊ नका. तो मायावी आहे, तो तुम्हाला फसवेल. देवसंगतीतच तुमचे कल्याण आहे, हे विसरू नका !
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (३.३.२०१६, सकाळी ८.२४)

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंना कारावास ही अन्यायाची परिसीमा होय !

     पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू अडीच वर्षांपासून कारागृहात असले, तरीही त्यांनी समता सोडली नाही. ८ ते १० कोटी साधकांचे बळ असतांनाही त्यांनी त्याचा दुरुपयोग केला नाही. नेहमीच शांतीचा संदेश देऊन शासन आणि प्रशासन यांना सहकार्य केले. कारागृहात असतांनाही नेहमी त्यांच्या भक्तांना समता, धीर आणि अहिंसा यांचा संदेश पाठवत राहिले; मात्र विष ओकणार्‍या दूरचित्रवाहिन्यांनी कधीही याकडे लक्ष दिले नाही. पू. बापूंना वाटत नाही की, त्यांच्या लाडक्या साधकांनी त्यांच्यासाठी कष्ट सहन करावे, तसेच कायदा हातात घेऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलावे. ते स्वत: त्रास सहन करून हसतात आणि साधकांना सांगतात, 
   मुस्कराकर गम का जहर जिनको पीना आ गया ।
   यह हकीकत है कि जहाँ में उनको जीना आ गया ॥
     ज्यांनी भारतीय संस्कृतीची महानता सर्वदूर पोचवली, जगाला प्रेम आणि बंधूभाव शिकवला, त्यांनाच खोट्या आरोपाखाली कारागृहात जीवन व्यतीत करावे लागत आहे. याला अन्यायाची परिसीमा नाही, तर काय म्हणणार ? 
- श्री. ब.रा. सिन्हा, संपादक, मासिक लक्ष्य छत्तीसगड, राजनांदगाव, छत्तीसगड.

सनातन अ‍ॅन्ड्रॉईड पंचांग २०१६ ला समाजातून मिळत असलेला उत्साहवर्धक प्रतिसाद !

गेल्या ४ - ५ वर्षांपासून 'सनातन अ‍ॅन्ड्रॉईड पंचांग' नियमित वापरणारे वाचक चातक पक्ष्याप्रमाणे पुढील वर्षीच्या सनातन अ‍ॅन्ड्रॉईड पंचांगाची आतुरतेने वाट पहात असतात, असे त्यांनी दिलेल्या अनेक अभिप्रायांवरून लक्षात आले. समाजातील अशा वाढत्या मागणीमुळे यावर्षी प्रथमच डिसेंबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यातच वर्ष २०१६ चे सनातन अ‍ॅन्ड्रॉईड पंचांग 'गुगल प्ले स्टोअर'वर उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणेच मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, इंग्रजी, तमिळ, गुजराती आणि ओडिया या ८ भाषांमध्ये अ‍ॅन्ड्रॉईड पंचांग प्रसिद्ध करण्यात आले. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु प.पू. डॉक्टर यांच्या कृपाशीर्वादाने या पंचांगांना समाजातून प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद लाभत आहे. यंदाच्या वर्षीही त्याला वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे. नवीन पंचांगात विविध सदरांमध्ये नवीन माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे.

गिरणी कामगारांना घरे देण्यास शासन कटीबद्ध ! - मुख्यमंत्री

विधान परिषद प्रश्‍नोत्तरे
      मुंबई - गिरणी कामकारांना घरे देण्यास शासन कटीबद्ध आहे. घरांच्या किमतींच्या सदंर्भात येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे २०१९ पर्यंत याविषयीचा पथदर्शी आराखडा सिद्ध करून टप्प्याटप्प्याने गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून दिली जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ११ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी गिरणी कामगारांच्या संदर्भातील स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते.

बंदुकीच्या गोळ्यांच्या खरेदी प्रकरणी १०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश !

काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची न संपणारी मालिका !
       मुंबई - महाराष्ट्र पोलीस दलाकडे उपलब्ध नसलेल्या बंदुकांसाठी त्या आकारातील १०० कोटी रुपयांच्या गोळ्या काँग्रेस शासनाच्या काळात खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या वतीने या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश ११ मार्च या दिवशी दिले.
      काँग्रेस शासनाच्या काळात ७.६७ * ५१ एम्.एम्. आकाराच्या १०० कोटी रुपयांच्या गोळ्यांची खरेदी त्यासाठी आवश्यक आकाराच्या बंदुका उपलब्ध नसतांनाही करण्यात आली. २०१४ पासून मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत. विधान परिषदेत हे सूत्र उपस्थित करून त्यांनी वारंवार या संबंधी तत्कालीन शासनाचे लक्ष वेधले होते. ही खरेदी करून शासनाचा निधी वाया घालवण्यात आला आहे. २००८ या कालखंडापासून या गोळ्या पुणे येथील एस्आर्पी ग्रुप २ या ठिकाणी पडून आहेत.

देशात असहिष्णुतेची अजब व्याख्या बनली आहे !

     सध्या भारतात हिंदु शब्द उच्चारायला अघोषित बंदी आहे. हिंदु शब्द उच्चारला की, त्याला कम्युनल म्हणून हिणवले जाते. हिंदु धर्माच्या विरोधात झालेल्या कृतीला विरोध न करणे आणि धर्माविषयी काहीही न बोलणे म्हणजे सहिष्णुता, अशी सहिष्णुतेची अजब व्याख्या आता केली जात आहे. - श्री. कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान, गोवा प्रभारी


हे शासनाला लज्जास्पद !

     बिहारमधील दीडशे डॉक्टरांनी जिवाला धोका असल्याचे सांगत स्वरक्षणासाठी शस्त्र बागळण्याची अनुज्ञप्ती (परवाना) मिळण्याची मागणी केली आहे. यात मधेपुरा, सुपौल आणि सहरसा येथील ५० डॉक्टरांनी अर्ज केला आहे. गेल्या ५ मासांत १५ डॉक्टरांवर झालेल्या आक्रमणामुळे इंडियन मेडिकल असोसिएशननेही त्यांना शस्त्र बागळण्याची अनुज्ञप्ती देण्याची मागणी केली आहे.
     हिंदुस्थानात हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणण्याची लाज वाटते आणि ते सर्वधर्मसमभावी किंवा निधर्मी असल्याचे अभिमानाने सांगतात ! - प्रा. दिलीप बेतकीकर, गोवा

विदेशात 'मनुस्मृति' हा अभ्यास, संशोधन आणि अभ्यासपूर्ण टीकेचा विषय असून त्याचे त्यांना आकर्षण वाटणे, हे मनुस्मृति श्रेष्ठ असल्याचे द्योतक !

१. सुदैवाने जगामध्ये मात्र अजूनही 'मनुस्मृति' हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. 'ऑक्सफर्ड' विद्यापिठाच्या प्रकाशकांनी नुकताच मनुस्मृतीवरील तौलनिक आणि संशोधनपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला. पॅट्रिक ऑलीवेल या भारतीय वंशाच्या अमेरिकन अभ्यासकांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. १७९४ या वर्षी विल्यम जोन्स यांनी मनुस्मृृृतीचे इंग्रजीत भाषांतर केले. मनूचे आकर्षण असणार्‍या या व्यक्तीच्या लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रलमधे असलेल्या पुतळ्याच्या हातात मनुस्मृति हा ग्रंथ दाखवण्यात आला आहे. हिंदु धर्मशास्त्राचे विश्‍वातील अनेक अभ्यासक आजही मनुस्मृतीचा चिकित्सकपणे अभ्यास करतात. यामधे मनूच्या विचारांवर टीकाही असते; पण ती स्वतःला सोयीस्कर संदर्भ घेऊन होत नाही.
२. मनुस्मृतीतील स्त्रीविषयीच्या लिखाणावर आक्षेप घेणार्‍यांची ख्रिस्ती आणि इस्लाम पंथांतील स्त्रीविषयी बोलतांना जीभ अडखळणे, हा त्यांचा हिंदूद्वेष कि डरपोकपणा ? : ख्रिस्ती आणि इस्लाम या पंथांमध्ये स्त्रीची काय श्रेणी (दर्जा) आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. ख्रिस्ती स्त्रियांना आजही पौरोहित्य करता येत नाही किंवा स्वेच्छेने गर्भपात करता येत नाही. इस्लामी स्त्रियांना समान श्रेणी तर दूरच राहो; पण त्यांना आजही बुरख्यामध्येच बाहेर पडावे लागते. या पंथांमधील स्त्रियांच्या अशा परिस्थितीविषयी बोलतांना मात्र सर्व विचारवंतांच्या जिभा लुळ्या पडतात.

जोगेश्‍वरी येथे आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन

स्थळ : कॅफे गार्डनच्या समोर, जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकाबाहेर, जोगेश्‍वरी (पूर्व)
वेळ : सायंकाळी ५ संपर्क : ९९२०२०८९५८
आंदोलनातील मागण्या
 • आग्रा येथील विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण कुमार आणि केरळचे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक श्री. सुजीत यांच्या हत्येचा निषेध, तसेच हिंदु नेत्यांच्या हत्यांचे सीबीआयकडून अन्वेषण व्हावे आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी !
 • आतंकवादी इशरत जहाँ प्रकरणात न्यायालयीन प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देण्यार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करून सर्व उत्तरदायींना कठोर शासन करण्यात यावे, तसेच निर्दोष पोलीस अधिकार्‍यांची आरोपांतून मुक्तता करण्यात यावी !
 • श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी द्रौपदी या कादंबरीचा धर्मद्रोही आणि विकृत लेखक डॉ. यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचा घोषित पद्मभूषण पुरस्कार रहित करण्यात यावा !

भुयार बांधून होईपर्यंत कोणाला कळले कसे नाही ? ही बेफिकिरी कि भ्रष्टाचार ?

     भारतीय सीमा सुरक्षा दलाला जम्मूतील निक्की तावी नदीच्या परिसरात एक भुयार आढळून आले आहे. या भुयाराचा प्रारंभ पाकिस्तानातून झाला असून त्याचा शेवट थेट जम्मूतील पुरा भागात झाला आहे. हे भुयार भूमीखाली १० फुटांवर असून त्याची लांबी अनुमाने ३० मीटर आहे, अशी माहिती सुरक्षा दलाचे अधिकारी राकेश शर्मा यांनी दिली. मनुस्मृतीला विरोध करणार्‍यांनी मनुस्मृति अभ्यासावी !

कायदा-सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांसाठी मनुस्मृति हा ग्रंथ आहे. तो लिहिणारे महर्षि मनु यांचा अनेक वर्षे राजस्थान न्यायालयाबाहेर असणारा पुतळा
मनुस्मृतिविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा सनातनचा ग्रंथ
वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांनी 'सार्थ श्रीमनुस्मृती' अशा नवीन नावाने मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर करून प्रकाशन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड या जातीयवादी नेत्याने 'हा ग्रंथ ज्या दुकानात विक्रीसाठी असेल, ते दुकान फोडू', अशी धमकी दिली आहे. या अनुषंगाने मनुस्मृति या धर्मग्रंथाविषयी सनातनचा दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहे.
श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
.
१. मनुस्मृति या धर्मग्रंथावर बंदी असेल, तर ती पूर्णतः चुकीची आहे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याआधी सहस्रो वर्षे मनुस्मृति होती. मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसारच राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
२. प्रसिद्ध 'कोलकाता कुराण पीटीशन'वर निकाल देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने हे मान्य केले की, कुराणमधील काही वाक्ये दोन समाजांत वितुष्ट आणू शकतात; मात्र हा अर्वाचीन धर्मग्रंथ असल्याने त्यावर बंदी आणू शकत नाही. हाच न्याय अन्य धर्मग्रंथांनाही लागू होतो. त्यामुळे जरी अशी बंदी असेल, तर आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील तीन मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१. 
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या 
व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी 
टाळण्यासाठी १५.४.२०१६ या दिवसापर्यंत पुढील प्रक्रिया करा !
       आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
      प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

फलक-प्रसिद्धीसाठीचा मजकूर हिंदु 
जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध !
       अल्प साधकसंख्या आणि न्यून श्रम यांमध्ये जनसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रभावी उपक्रम म्हणजे फलक-प्रसिद्धी ! फलकांवरील मजकुरामुळे प्रबोधन झाल्याने आतापर्यंत अनेकांचे धर्मप्रेम वृद्धींगत होण्यासाठी साहाय्य झाले आहे, तर बर्‍याच जणांना धर्मशिक्षण मिळाल्याने हिंदु धर्माची महानता समजली आहे.
       दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून प्रतिदिन फलक-प्रसिद्धीसाठीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात येतो. आता हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या www.hindujagruti.org/falak या मार्गिकेवरही हा मजकूर ठेवण्यात आला आहे.

एका रुग्णालयातील विदारक स्थिती पाहून लक्षात आलेली साधनेची अपरिहार्यता !

कु. शीतल चिंचकर 
     मी गेल्या ४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. आश्रमातील साधकांवर, तसेच संस्थेतील सर्वच साधकांवर प.पू. डॉक्टरांनी किती चांगले संस्कार केले आहेत, याचे प्रतिदिन दर्शन घडते. आई-वडील, शिक्षक किंवा अन्य कुणीही करू शकत नाही, असे संस्कार आश्रमात शिकवले जात आहेत, याची जाणीव मी एका साधिकेच्या सेवेसाठी रुग्णालयात असतांना मला झाली.
१. रुग्णाशी रागावून आणि अधिकारवाणीने बोलणारे 
आधुनिक वैद्य अन् कर्मचारी ! 
     या रुग्णालयात नोकरीला असलेले आधुनिक वैद्य, कर्मचारी, स्वच्छता सेवक इत्यादी सर्वच जण रुग्णांशी बोलतांना रागावून आणि अधिकारवाणीने बोलतांना पाहिले. आपण येथे रुग्णांना साहाय्य करण्यासाठी आहोत, याची कुणालाच जाणीव नाही आणि तशी कुणाची सिद्धताही नाही, असे मला जाणवले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कु. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांना चाकरीच्या ठिकाणी आलेल्या अनुभूती

कु. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की
१. कितीही प्रयत्न केले, तरी मुलांमधे काहीच पालट होत नाहीत, या 
विचाराने प्रार्थना करण्याचा कंटाळा करणे आणि घरी कुटुंबियांसमवेत 
भोजन करण्यापूर्वी मनातल्या मनात प्रार्थना केली असल्याचे 
एका मुलीने सांगितल्यावर स्वतःची चूक लक्षात येणे 
     मी एका शाळेत शिक्षिका आहे. प्रतिदिन जेवणापूर्वी मी मुलांना प्रार्थना करण्यास सांगितले होते आणि मुलांसह मीही प्रार्थना करत होते. एकदा माझ्या मनात मी कितीही प्रयत्न केले, तरी मुलांमधे काहीच पालट होत नाहीत, असा विचार आल्याने मी प्रार्थना करण्याचा कंटाळा केला. एवढ्यात एक छोटी मुलगी माझ्याकडे येऊन आनंदाने म्हणाली, काल सायंकाळी कुटुंबियांसमवेत भोजन करण्यापूर्वी मी मनातल्या मनात प्रार्थना केली. ते ऐकून मला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला, तसेच मला माझी चूकही लक्षात आली. केवळ प.पू. डॉक्टरच त्यांच्यात पालट घडवत असल्याने कोणता आणि कसा पालट व्हावा, याविषयी कसलीच अपेक्षा असायला नको, हेही माझ्या लक्षात आले. मुलांमध्ये होणारे पालट माझ्या अज्ञानामुळे मला दिसत नाहीत. माझ्या हातून गंभीर चूक होऊ नये, यासाठी श्रीकृष्णाने हे उदाहरण दाखवून दिल्याविषयी मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे.
     (प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात साधिकेचा भाव असल्याने तिला ही अनुभूती आली आहे. ही साधिकेची वैयक्तिक अनुभूती आहे. - संकलक) 

भगवंताने गायीच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीसाठी दूध हा सात्त्विक आहार उपलब्ध करून देणे

श्री. प्रशांत जुवेकर
     एकदा आश्रमात आलेल्या पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना त्यांच्यापैकी एकाने मला प्रश्‍न विचारला, गाय जे दूध देते, त्यावर वासराची मालकी असते. त्याच्यासाठीच देवाने ती सोय केली आहे; पण मग आपण दुधाचा वापर करणे कितपत योग्य आहे ? आश्रमदर्शन चालू असतांना मोकळ्या वेळेत मी आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा करणार्‍या एका साधकाला हा प्रश्‍न विचारला. तेव्हा त्यांनी मला दिलेले उत्तर आणि त्या वेळी देवाने सुचवलेले विचार सर्वांसाठीच उपयुक्त असल्याने ते येथे देत आहे. 
१. गायीला जे दूध येते, त्यावर वासराची मालकी आहे, हा दृष्टीकोनच अयोग्य आहे. भगवंताने या सर्व गोष्टी मनुष्यासाठीच निर्माण केल्या आहेत, उदा. झाडांना येणारी फळे, नदीचे वहाते पाणी, गायीला येणारे दूध इत्यादी.

येणार्‍या आपत्कालाविषयी सतर्क रहा आणि व्यष्टी साधना वाढवण्याकडे लक्ष द्या !

साधकांना सूचना !
महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६५मध्ये साधकांना दिलेली सूचना
     ईरोड, तमिळनाडू येथे झालेल्या ६५ क्रमांकाच्या नाडीवाचनात महर्षि म्हणतात - गोकुळाष्टमीपर्यंत धर्मप्रसारासाठी नवीन क्षेत्र निवडण्याऐवजी सध्या चालू असलेल्या ठिकाणीच प्रभावीपणे प्रसार करा. या काळात एकमेकांमध्ये संघटन बनवा. संघटित होत असतांना स्व-संरक्षण प्रशिक्षणावर भर द्या. काळ कठीण असल्याने प्रसारकार्य करतांना व्यष्टी साधनेकडे अधिकाधिक लक्ष द्या. अधिकतर आपल्या साधनेविषयी सतर्क रहा. साधनेचे प्रयत्न अखंड रहातील, असे पहा. सत्संग, मार्गदर्शन, आढावा बैठका यांतून साधनेची घडी नीट बसवा. तुम्ही संघटित झाला की, आम्ही (महर्षि) विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती या काळात तुमच्याकडे प्रक्षेपित करू. यामुळे तुमचे आत्मबळ वाढेल. या आत्मिक शक्तीमुळे येणार्‍या काळातील अनेक संकटे दूर होतील.
१. अधिकाधिक जप करणे
     आतापर्यंत साधक श्रीकृष्ण किंवा आकाशदेवता यांचा जप करत होते. यापुढे सर्वांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करावा.

जयघोष करतांना रामनाथी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. अविनाश जाधव
१ अ. जयघोष चालू केल्यावर अंगावर शहारे येऊन पूर्ण शरीर थंड होणे आणि मन एकाग्र होऊन उत्साहात वाढ होणे : पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी जयघोष करायला सांगितल्यावर सर्वांसमवेत आम्हीही जयघोष करू लागलो. जयघोष चालू करताच संपूर्ण शरिरावर शहारे येऊन शरीर आपोआप थंड होऊ लागले. वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक असतांनाही शरिरात पुष्कळ थंडावा जाणवत होता. उत्साहात वाढ झाली, मन एकाग्र झाले होते, तर आनंदात वाढ झाली होती; कारण साक्षात् गुुरुदेवांचा जयघोष करण्याची संधी ईश्‍वरकृपेने लाभली होती.

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या महर्षींच्या चरणी कृतज्ञता !

      प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. आता त्यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाल्याची घोषणा करून महर्षींनी साधकांना अनमोल भेटच दिली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. गुरुदेवांचे महात्म्य वर्णन करून साधकांनी त्यांचा कशा प्रकारे लाभ करून घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे !
- पू. (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीजयंत बाळाजी आठवले जय गुरुदेव । असा जयघोष करण्याविषयी साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

कु. कल्याणी गांगण
१. प.पू. डॉक्टरांचे नाव घोषित होण्यापूर्वी ४ दिवस आलेल्या अनुभूती (२.३.२०१६)
अ. रामपंचायतनाचे चित्र स्वत:जवळ घेतल्यावर मन शांत होऊन झोप लागणे : २.३.२०१६ या दिवशी मला काही घंट्यांच्या अंतराने रामाची आठवण येत होती. त्यामुळे त्या रात्री मी महर्षींच्या सांगण्यावरून पूर्वी सर्व साधकांना दिलेले रामपंचायतनाचे चित्र स्वत:जवळ घेतले. त्या वेळी माझे मन शांत झाले आणि मला झोप लागली.
आ. चार दिवसांपासून काही घंट्यांच्या अंतराने राम आणि प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून दिसणे आणि रामजन्माची आठवण येणे; पण त्याचे कारण शोधता न येणे : चार दिवसांपासून मला काही घंट्यांच्या अंतराने राम आणि प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून दिसत होते अन् माझा भाव जागृत होत होता. त्याचप्रमाणे गेले चार दिवस मला आता रामाचा जन्म होणार, असा विचार येत होता; म्हणून मी दिनदर्शिकेत रामनवमी कधी आहे ?, हे पाहिले. तेव्हा कळले की, रामनवमी पुढच्या मासात (महिन्यात) आहे. मला रामाची एवढी आठवण गेल्या अनेक वर्षांमध्ये आलेली नाही. मग आताच मला रामाच्या जन्माची आठवण का येत आहे ?

शिव-पार्वती यांच्याप्रती कृतज्ञता !

पू. संदीप आळशी
     शिव-पार्वती यांच्यातील संवाद श्रवण करून महर्षींनी तो नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवला; म्हणून प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व आणि अवतारी कार्य यांची ओळख साधकांना, तसेच सार्‍या जगाला झाली. यासाठी आम्ही साधक महर्षींप्रमाणेच शिव-पार्वती यांच्याप्रतीही कोटी कोटी कृतज्ञ आहोत.
- पू. संदीप आळशी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषाच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

       ६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले जय गुरुदेव । हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले. काहींना पूर्वसूचना मिळाल्या. काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
६.३.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याविषयी 
महर्षींनी रामनाथी आश्रमात करण्यास सांगितलेल्या विधीविषयी माहिती 
जयघोष करतांना आश्रमातील साधक !
       ६ मार्च २०१६ म्हणजेच सनातनच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस ! हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अहोरात्र धडपडणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला या शुभदिनापासून आरंभ झाला आणि त्यांच्या महान कार्याला दिवसागणिक अधिकाधिक प्रसिद्धी प्राप्त होणार आहे, अशी शुभवार्ता सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी आपल्या सर्वांना सांगितली आहे.

पालकांनो, जन्मपत्रिकेनुसार सांगितलेले भविष्य खरे असण्यासाठी प्रत्यक्षच्या जन्मवेळेची नोंद करा !

       हल्ली जन्मपत्रिकेत सांगितलेले भविष्य बर्‍याच व्यक्तींच्या जीवनाशी तंतोतंत जुळत नाही. अशा वेळी ते का जुळत नाही, याचा अभ्यास करण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी ज्योतिषशास्त्र हे खोटे शास्त्र आहे, असा कांगावा करतात. पत्रिकेत सांगितलेले भविष्य व्यक्तीच्या जीवनाशी न जुळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्योतिषाला जन्मवेळ चुकीची सांगितली जाणे. याचे मुख्य कारण म्हणजे बहुतेक जण जन्म झाला, तो क्षण घड्याळात पाहून लिहून ठेवत नाहीत. एखाद्याचा जन्म सकाळी झाला असेल, तर सकाळी किती वाजता झाला, हे त्याला त्याच्या आई-वडिलांना नक्की सांगता येत नाही; म्हणून ते अंदाजे ९ - ९.३० असे काहीतरी सांगतात. बर्‍याचदा रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास परिचारिका बाहेर बसलेल्या नातेवाइकांना बाळाचा जन्म झाल्याचे सांगते, तेव्हा नातेवाइकांना बाळाचा जन्म झाल्याचे कळते.
      माझ्या स्वतःच्या बाबतीत माझे नाडीभविष्य सांगतांना महर्षींनी प्रथमच सांगितले, जन्म ७ मिनिटे आधी झाला आहे आणि खर्‍या जन्मवेळेनुसार त्यांनी माझे भविष्य सांगितले. ते तंतोतंत जुळले. ज्योतिषांनी त्यांना सांगितलेल्या जन्मवेळेनुसार सांगितलेले भविष्य सर्वसाधारणतः ३० टक्के चुकीचे असते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥


या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


देवाने आरोग्यदायी जीवन हवे कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण झालेले हवे ?, असे विचारले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना, असे उत्तर द्यावेसे वाटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     गेली ७ वर्षे प्राणशक्ती अल्प असल्यामुळे मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही. कधी कधी मला बसताही येत नाही. अशी माझी स्थिती होते. आज माझ्या मनात सहज विचार आला, देवाने विचारले तुला आरोग्यदायी जीवन हवे कि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्ण झालेले हवे ?, तर मी उत्तर देईन, कार्य पूर्ण झालेेले हवे !
     नंतर माझ्या लक्षात आले की, हे उत्तर द्यावे, असे मला का वाटले. तेव्हा माझ्या मनात विचार आला होता, देह कधीतरी सोडावाच लागतो; म्हणून जीवन मागण्यात अर्थ नाही. तसेच जीवन हे साधन असून कार्य हे साध्य आहे. त्यामुळे साध्याचाच विचार माझ्याकडून झाला. जीवन वाढवून मिळाले असते, तर फक्त मलाच थोडे बरे वाटले असते; पण मानवजातीचे हित करणारी हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सर्वत्रच्या मानवांना आनंद होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

चांगल्यापुढील समस्या !

संपादकीय 
      चुकीचे काम करण्यात विघ्न येत नाही; पण चांगल्या कामात अनेक विघ्ने येतात, असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर नवी देहली येथे म्हणाले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याला आरंभ होऊन ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देहली येथे भरवण्यात आलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. हिंदूंच्या आध्यात्मिक गुरूंनी काढलेले हे उद्गार कोणत्या परिस्थितीत काढले, ते पहाणे अगत्याचे आहे. यमुना नदीच्या किनार्‍यावर ३५ लाख पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी वसवण्यात आलेल्या नगरामुळे पर्यावरणाचा र्‍हास झाला, असे कारण देत राष्ट्रीय हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn