Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज विश्‍व अग्निहोत्र दिन
कोटी कोटी प्रणाम !

प.पू. परुळेकर महाराज यांचा आज ७५ वा वाढदिवस

काश्मीरमध्ये देशद्रोही धर्मांधांकडून सैनिकांवर पुन्हा दगडफेक !

अंतर्गत शत्रूंशी लढता न येणारे शासन पाकसारख्या बाह्यशत्रूंशी काय लढणार ?
 • पोलीस आणि सैनिक घायाळ
 • यापूर्वी मशिदीतून सैनिकांवर झाली होती दगडफेक
काँग्रेसच्या काळात हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले. 
आता सैन्यावर तशी पाळी येऊ नये, यासाठी शासन काही करणार का ?
     अश्मकुम (जम्मू-काश्मीर) - हिंदुत्ववार्ता डॉट इन्फो या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ८ मार्च या दिवशी काश्मीरमध्ये सैन्याकडून जिहादी आतंकवाद्यांना घेरण्यात आले होते, तेव्हा एक सहस्राहून अधिक देशद्रोही धर्मांधांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक करत आतंकवाद्यांवर कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. या दगडफेकीत काही पोलीस आणि सैनिक घायाळ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या गोंधळातच आतंकवादी येथून पळून गेले.
     १० मार्च या दिवशी सैन्याकडून चेतावणी देण्यात आली की, जर असा जमाव अनियंत्रित होऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर सैनिकांनी त्यांना रोखण्यासाठी जे शक्य असेल, ते करणे आवश्यक आहे.

सैनिकांचा अपमान केल्याच्या कारणावरून कन्हैया कुमारच्या कानफटात लगावली !

कन्हैय्यावर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर जनतेचा असा क्षोभ झाला नसता !
      नवी देहली - १० मार्च या दिवशी जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला विद्यापिठाच्या आवारात विकास चौधरी नावाच्या व्यक्तीने कानफटात मारली. भारतीय सैनिकांचा अपमान केल्याने कन्हैयाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे आक्रमण केल्याचे विकास चौधरीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे.
     विकास गाझियाबादमधील असून एका विद्यार्थ्याच्या साहाय्याने त्याने विद्यापिठाच्या आवारात प्रवेश केला होता. या मारहाणीनंतर कन्हैया कुमारने प्रतिक्रिया देतांना म्हटले की, मला गंभीर दुखापत झाली नसली, तरी या प्रवृत्ती पुन: पुन्हा मला लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर त्याच्या हातात बंदूक वा चाकू असता, तर काय झाले असते ? कोणी सांगावे पुढे अशी आक्रमणे कशावरून होणार नाहीत? एक मात्र नक्की आहे, असे कितीही आक्रमणे झाली, तरी माझी लढाई मी अर्धवट सोडणार नाही.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये शिकवणार ! - शिक्षणमंत्री विनोद तावडे

योग्य निर्णय घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन !
मराठी भाषा बंधनकारक करणार !
      मुंबई - महाराष्ट्रातील केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येणार असून त्यासाठी विधीमंडळ सदस्यांचा ठराव या अधिवेशनात करण्यात येईल आणि तो केंद्राकडे पाठवण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात स्पष्ट केले. श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस्.ई आणि सी.बी.एस्.ई., आय.जी.सी.एस्.ई., आय.बी. या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवण्याची अट या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देतांना नमूद करणार आहोत. तसेच यापुढे या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देतांना या शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा बंधनकारक करण्यात येईल.
     श्री. तावडे पुढे म्हणाले, मुंबई शहर आणि आणि उपनगरे येथील नर्सरी चालकांकडून भरमसाठ शुल्क आकारले जाते. पालकांची आर्थिक लुटमार होत असल्याच्या तक्रारी आहेत; मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण हे शासनाच्या थेट नियंत्रणाखाली नाही.

इसिसला बायोडेटा पाठवणार्‍या धर्मांधाला नोकरी मिळवून देण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाकडून साहाय्य

इसिसकडे आकर्षित होणार्‍या तरुणांना नोकरी दिल्याने ते धर्मांध विचारसरणीपासून
परावृत्त होतील, या दिवास्वप्नात रमणारे आतंकवादविरोधी पथक !
     मुंबई - आतंकवादी संघटना इसिसमध्ये (आय.एस्.आय.एस्.मध्ये) भरती होण्याच्या इच्छेने बायोडेटा पाठवणार्‍या इसमाला नवी मुंबईतील एका दुकानामध्ये विक्रेत्याची नोकरी देण्यात आली आहे. आतंकवादविरोधी पथकाने त्याला हे साहाय्य केले आहे. या धर्मांधाला ७ महिन्यांपूर्वी इराक दुतावासाबाहेरून कह्यात घेण्यात आले होते. हा धर्मांध ब्लॉगर आणि माजी पत्रकार आहे. इराकची विभागणी होऊन एका भागावर इसिसचे राज्य असेल आणि आपल्याला राजकीय प्रवक्तेपद मिळेल, हा त्याचा विचार होता. मुसलमान असलो, तरी देशभक्त आहे आणि मला आतंकवादी व्हायचे नाही, असे त्याने सांगितले. (आतंकवादविरोधी पथकाचेच दायित्व वाढले ! आता या पथकाला तो बोलल्याप्रमाणे वागतो किंवा नाही, यावर लक्ष ठेवावे लागेल ! - संपादक)


धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org


लंडनमध्ये पोहोचलेले मल्ल्या म्हणतात, मी भारतातून पळालेलो नाही !

      नवी देहली - देशातील १७ बँकांच्या ९ सहस्र ९१ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विटद्वारे आपण भारतातून पळून गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. मी पळपुटा नाही. भारत सोडून कुठेही पळून गेलेलो नाही आणि जाणार नाही. मी एक आंतरराष्ट्रीय उद्योजक आहे. त्यामुळे कामानिमित्त भारतातून सतत अन्य देशांमध्ये येणे-जाणे असते. त्याचे भांडवल करून मी पळाल्याच्या वावड्या उठवणे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे.

इशरत जहाँ आतंकवादी असल्याने तिच्या नावाच्या चालू असलेल्या ३ रुग्णवाहिका बंद कराव्यात, अन्यथा शासनाकडून कारवाई ! - मुख्यमंत्री

      मुंबई - गुजरात पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार झालेली लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकातील इशरत जहाँ हिच्या नावाने ठाणे येथे २०११ पासून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) वृंदा करात यांच्या निधीतून माय मुंब्रा फॉऊंडेशन या संस्थेकडून ३ रुग्णवाहिका चालवल्या जात आहेत. ही गोष्ट गंभीर असून निश्‍चित याची माहिती घेतली जाईल. इशरत जहाँ हिच्या नावाने रुग्णवाहिका चालवली जात असेल, तर ती संबंधितांनी बंद करावी, अन्यथा शासन त्यावर कारवाई करील, अशी चेतावणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ११ मार्च या दिवशी एका पत्रकार परिषदेत दिली. (गेल्या अनेक महिन्यांपासून आतंकवादी इशरत जहाँ हिच्या नावाने रुग्णवाहिका चालू असतांना पोलीस प्रशासन झोपले होते का ? सर्व जनतेला प्रतीदिन दृष्टीस दिसणारी ही रुग्णवाहिका प्रशासन आणि पोलीस यांना का दिसली नाही ? असे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण करू शकतील का ? - संपादक)
     दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिधिनीने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शासन आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी काय करणार आहे ? असा प्रश्‍न विचारला.

(म्हणे) मंदिर प्रवेशानंतर आता महिला पुजार्‍यांसाठी आंदोलन करणार !

धर्मपरंपरांवर आघात करण्यासाठी तृप्ती देसाई यांची नवी क्लृप्ती !
तृप्ती देसाई यांचा थयथयाट !
(म्हणे) आम्हाला दर्शन घ्यायला सोडावे !
      पुणे - देवीच्या मंदिरांमध्ये महिला पुजारी असणे आवश्यक असून ही मागणी भूमाता ब्रिगेडकडून राज्यभरातून केली जाईल; कारण तेथे महिलांना पूजा करण्याची संधी न मिळणे, हा देवीचा अपमान आहे, असे वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले. तृप्ती देसाई आणि लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीच्या संपादक आरती कदम यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २च्या वतीने १० मार्च या दिवशी ११ महिलांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी तृप्ती देसाई बोलत होत्या.
     तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, आताच आम्हाला स्टंट करणारे, देशद्रोही आणि धर्मद्रोही म्हटले जाते. महिला पुजार्‍यांचा विषय घेतल्यावर काय म्हटले जाईल ? आम्ही स्टंट करतो, असे जे म्हणतात, त्यांनी आम्हाला दर्शन घ्यायला सोडावे. तसे केल्यावर स्टंट होणारच नाही.

भ्रमणभाष (मोबाईल) आणि इंटरनेट यांच्या वाढत्या वापराचा युवा वर्गावर नकारात्मक परिणाम !

अमेरिकेच्या इलिनॉइस विद्यापिठाने केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष
     वॉशिंग्टन (अमेरिका) - इंटरनेट आणि भ्रमणभाष (मोबाईल) यांचे व्यसन युवावर्गात चिंता आणि उदासीनतेच्या भावना वृद्धींगत करत असल्याचा निष्कर्ष नव्या संशोधनातून पुढे आला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढवणार्‍या तंत्रज्ञानाचा समाजात प्रसार झाला असून, त्यामागची पार्श्‍वभूमी मोठी असल्याचे मत अमेरिकेतील इलिनॉइस विद्यापिठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक अ‍ॅलेक्झॅन्ड्रो लिइरस यांनी व्यक्त केले आहे, तसेच ही भीती दूरचित्रवाणी, व्हिडिओ गेम आणि सध्याच्या स्मार्टफोनसारख्या माध्यमातून पसरवली जात आहे.

चीनमध्ये आयफोन आणि दुचाकी घेण्यासाठी स्वत:च्या मुलीची विक्री !

चीनसारख्या देशांचा भारताने आदर्श घ्यायला हवा, असे म्हणणार्‍यांना चपराक !
     बीजिंग - चीनमध्ये एका दाम्पत्याने आयफोन, तसेच दुचाकी घेण्यासाठी स्वत:च्या १८ महिन्यांच्या मुलीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघाही पालकांचे वय १९ वर्षे आहे. 
१. चीनच्या पीपल्स डेली दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार फुजियन प्रांतात वडिलांनी या मुलीला विकण्यासाठी क्यूक्यू या सामाजिक संकेतस्थळाचे साहाय्य घेतले. संबंधित ग्राहकाने त्यांना २३ सहस्र युआन; म्हणजे ३ सहस्र ५३० अमेरिकन डॉलर्स दिले आहेत, असे पीपल्स डेलीने म्हटले आहे. 
२. या मुलीची आई शियाओ मेई हिने नोकरी करून पैसे कमावले आहेत. वडिलांनी मात्र काहीच पैसा न कमावता इंटरनेट कॅफेत बसून पैसा घालवला आहे. त्यामुळे यांच्याकडे मुलीच्या पालनपोषणासाठीही पुरेसा पैसा नव्हता.
३. मुलीला विकल्यानंतर मुलीची आई मेई टोंगान येथून पळून गेली, पण तिला पोलिसांनी शोधून कह्यात घेतले.
४. मेई हिला अडीच वर्षे, तर ड्युुआन याला तीन वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. सध्या विक्री झालेली मुलगी ग्राहकाच्या बहिणीकडे आहे.

बिहारच्या मंत्र्याने कारागृहात जाऊन घेतली माजी खासदार शहाबुद्दीन यांची भेट !

ज्या राज्यात मंत्र्याकडून गुन्हेगारांचे उदात्तीकरण केले जात असेल, 
तेथे जंगलराज आले नाही, तरच नवल ! 
भाजपकडून मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
     पाटणा (बिहार) - राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल गफूर यांनी अनेक गुन्हे दाखल असलेले राजदचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन यांची सिवानच्या कारागृहात जाऊन भेट घेतली. या प्रकरणी भाजपचे शासन गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत मंत्री गफूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 
    यावर मंत्री गफूर यांचे समर्थन करतांना राजदचे नेते लालूप्रसाद यादव म्हणाले, भाजपकडे काही काम नाही; म्हणून ते अशा प्रकारचे अनावश्यक प्रश्‍न उपस्थित करतात. जेव्हा मी कारागृहात होतो, तेव्हा मलाही भेटायला अनेक लोक यायचे. आम्ही एकत्र बसून चहापाणी करायचो. आता एका मंत्र्याने असे केले, तर काय बिघडले ?(गुन्हेगारांचे समर्थन करणार्‍या नेत्यांकडून कधी जनतेला न्याय मिळेल का ? - संपादक) 
     वर्ष २००४ मध्ये सिवान येथील दोन भावांच्या हत्येप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने माजी खासदार शहाबुद्दीन यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. हे प्रकरण पटणा उच्च न्यायालयामध्ये गेले. तेथे शहाबुद्दीन यांना जामीन दिला. हे प्रकरण अ‍ॅसिडकांड म्हणून परिचित झाले होते. त्यानंतर दुसर्‍या एका प्रकरणात शहाबुद्दीन सध्या कारागृहात बंदिस्त आहे.

न्याहारीत कॉर्न फ्लेक्स खाणे म्हणजे कर्करोगाला (कॅन्सरला) आमंत्रण !

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय आतातरी शहाणे होतील का ?
अमेरिकेच्या टेक्सास विद्यापिठातील संशोधनाचा निष्कर्ष
     वॉशिंग्टन (अमेरिका) - व्हाइट ब्रेड, कॉर्न-फ्लेक्स आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कर्करोग (कॅन्सर) होण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठाने केलेल्या संशोधात समोर आला आहे. या सर्व पदार्थांचा ग्लाइसेमिक इंडेक्स (जीआय्) अधिक असल्याने हे पदार्थ खाल्ल्याने कर्करोगाला आमंत्रण दिल्यासारखे असल्याचे आता वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे.
१. ग्लाइसेमिक सूचकांक अथवा ग्लाइसेमिक इंडेक्स ही संख्या भोजनाचा मनुष्याच्या रक्तातील ग्लूकोजच्या स्तरावर असलेला प्रभाव दर्शवते.
२. संशोधकांनी या शोधासाठी फुफ्फुसाच्या कर्करोगाशी बाधित असलेल्या १ सहस्र ९०५ रोग्यांवर अध्ययन केले. यासह २ सहस्र ४१३ सुदृढ लोकांचेही सर्वेक्षण केले गेले.
३. विद्यापिठाच्या जिफेंग वू यांच्यानुसार, संशोधनाच्या वेळी प्रतिदिन जीआय् युक्त भोजन करणार्‍यांमध्ये जीआय् भोजन न करणार्‍यांपेक्षा कर्करोगाला ४९ टक्के अधिक बळी पडू शकत असल्याचे स्पष्ट झाले.
४. हा शोध कैन्सर एपिडेमियोलॉजी बायोमार्कर्स ऍन्ड प्रिवेंशन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.लंडनमधील वृत्तवाहिनीने उघड केली इसिसमधील २२ सहस्र आतंकवाद्यांची माहिती !

     लंडन - लंडनमधील स्काय न्यूज या वृत्तवाहिनीने इसिसच्या २२ सहस्र आतंकवाद्यांची माहिती उघड केली आहे. जर्मनीच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने या आतंकवाद्यांची वैयक्तिक माहिती असणारी कागदपत्रे प्राप्त केली आहेत. त्यावरून ही माहिती मिळाली आहे.
१. इसिसमध्ये ५१ देशांतील आतंकवादी सहभागी आहेत. यात अधिकाधिक म्हणजे २५ टक्के आतंकवादी सौदी अरेबियाचे आहेत, तर ब्रिटन, अमेरिका, सिरिया आणि इराक येथील आतंकवाद्यांची संख्या पुष्कळ अल्प आहे.
२. स्काय न्यूजने ९ मार्च या दिवशी इसिसच्या काही कागदपत्रांच्या आधारे एक अहवाल सिद्ध केला आहे.
३. या अहवालात आतंकवाद्यांची नावे, पत्ते, दूरभाष क्रमांक आणि कौटुंबिक संबंधांविषयी माहिती आहे. यातील काही दूरध्वनी क्रमांक असे आहेत, जे अजूनही वापरात आहेत.

भारताशी धार्मिक स्वातंत्र्याविषयी चर्चा करण्यास आम्ही घाबरत नाही ! - अमेरिका

जगाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा कैवार घेतल्याच्या तोर्‍यात असलेली अमेरिका ! 
      वॉशिंग्टन - अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी धार्मिक स्वातंत्र्याविषयी आम्ही भारताशी संवाद नेहमीच चालू ठेवला आहे, त्यावर चर्चा करण्यास आम्ही घाबरत नाही, असे म्हटले आहे. भारतात येऊ इच्छिणार्‍या अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाला भारताने व्हिसा नाकारला होता. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. भारताने व्हिसा नाकारल्यामुळे अमेरिका नाराज आहे, असेही किरबी म्हणाले. भारताने व्हिसा नाकारतांना भारताने अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाला आमच्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर मत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, असे कारण स्पष्ट केले होते. 

इजिप्तमध्ये सार्वजनिक स्थानी बुरखा वापरावर बंदी येणार

सर्व इस्लामी राष्ट्रांनी बुरखा वापरण्यावर बंदी घातली, तरी भारतात असे कधीही होणार नाही; 
कारण अन्य कोणत्याही देशांपेक्षा मतांच्या लांगूलचालनासाठी अधिक इस्लामप्रेमी 
झालेले राजकीय नेते भारतात आहेत !
     कैरो - इजिप्त या इस्लामी देशांत महिलांना सार्वजनिक स्थानी आणि शासकीय कार्यालयात महिलांना बुरखा घालण्यावर बंदी आणण्यासाठी एक विधेयक संसदेत पारित करण्यात येणार आहे. इजिप्तमध्ये सध्या डोळे वगळता पूर्ण देह झाकेल, असा बुरखा मुसलमान महिला वापरतात.
     खासदार अमना नोसीर यांनी वरील ठरावाला पाठिंबा व्यक्त करतांना म्हटले आहे की, बुरखा घालणे हा प्रकार इस्लाममध्ये अस्तित्वात नाही. ही परंपरा ज्यू धर्मियांकडून आली आहे. कुराणमध्ये केवळ सोज्वळ कपडे घालणे आणि केस झाकणे एवढेच सांगितले आहे. इजिप्तमध्ये याआधी कैरो विश्‍वविद्यालयाने वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांची रुग्णालये येथे डॉक्टर आणि परिचारिका यांना बुरखा घालण्यास बंदी केली होती. त्यामुळे रुग्णांच्या अधिकारांचे रक्षण होते, असे कारण देण्यात आले होते. गेल्या सप्टेंबर मासात कैरो विश्‍वविद्यालयाने महाविद्यालयीन अध्यापकांनाही बुरखा घालण्यास बंदी केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी बुरखा घातलेल्या अध्यापकांशी चर्चा करतांना अडथळे येतात, अशा आशयाच्या तक्रारी केल्या होत्या.

तेलाची मागणी घटल्याने सौदी अरेबिया आर्थिक संकटाच्या विळख्यात

     दुबई - अमेरिकेत तेलसाठे सापडल्यानंतर सौदी अरेबियाकडून निर्यात होणार्‍या तेलाच्या मागणीत लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. परिणामी सौदी अरेबिया आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. सौदी अरेबियाची अर्थसंकल्पीय तूट प्रचंड वाढल्याने देशाचा गाडा हाकण्यासाठी या देशाला गेल्या १० वर्षांत प्रथमच वित्तीय संस्थांकडून ६ ते ८ अब्ज डॉलरचे कर्ज घ्यावे लागले आहे.

स्क्रोलड्रोल डॉट कॉम संकेतस्थळाद्वारे हिंदूंच्या देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदूंनो, सातत्याने तुमच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्‍या हिंदुद्रोह्यांच्या 
विरोधात कठोर कायदा करण्यासाठी केंद्रशासनाला भाग पाडा !
वस्त्रहरण चालू असतांना द्रौपदीसाठी ऑनलाईन
साडीची मागणी करणारा श्रीकृष्ण
     मुंबई - स्क्रोलड्रोल डॉट कॉम या संकेतस्थळाने त्याच्या फेसबूक पानावर देवतांचे विडंबन केले आहे. हे संकेतस्थळ काही कलाकार व्यक्तींनी बनवले आहे. एखादा विषय अथवा योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही मंडळी त्या विषयावर आधारित चित्रे किंवा पत्रके बनवतात. अनेक व्यावसायिक संकेतस्थळे त्यांचा आधार घेतात. हिंदूंच्या देवता आणि डिजिटल तंत्रज्ञान एकत्रित आले, तर काय होऊ शकते, हा विषय घेऊन या संकेतस्थळाने तिच्या फेसबूकच्या पानावर हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रसारित केली आहेत. यामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण चालू असतांना तिला कोणती साडी द्यावी, या विचारात असणारा श्रीकृष्ण भ्रमणभाषद्वारे साड्यांची ऑनलाईन खरेदी करतांना दाखवण्यात आला आहे. दुसर्‍या एका चित्रात लंकेचे दहन केल्यानंतर श्री हनुमान सेल्फी (स्वतःचेच स्वतः छायाचित्र काढणे) काढत असल्याचे चित्र प्रसारित केले आहे. अन्य एका चित्रात श्री गणेश भ्रमणभाषद्वारे ऑनलाईन मोदकाची मागणी करतांना दाखवण्यात आले आहे.

पवईतील बेपत्ता अल्पवयीन मुलीची हत्या !

महिला आणि मुली यांच्यासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेली मायानगरी !
      मुंबई - ७ मार्च या दिवशी पवई येथून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय मुलीचीही हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी या मुलीवरही लैगिंक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी १० संशयितांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पवई साकी विहार परिसरात रहाणारी श्रेया मेश्राम ही मुलगी घराबाहेर खेळत असतांना अचानक बेपत्ता झाली होती. ती बराच वेळानंतर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सोमवारी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. ९ मार्च या दिवशी सकाळी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह तुंगा एम्टीएन्एल्च्या मागील बाजूस आढळून आला. स्थानिकांनी याविषयी पोलिसांना माहिती दिल्यावर हा मृतदेह बेपत्ता झालेल्या श्रेयाचा असल्याची ओळख पटली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा संशय असल्याचे पोलिस उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ !

 • चार वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित !
 • सिंधुदुर्ग येथील डंपर चालकांच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या तोडफोडीचे प्रकरण
       मुंबई, ११ मार्च (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग येथील डंपर आंदोलनावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी १० मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आमदार आणि विरोधी सदस्य यांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. काँग्रेसचे आमदार नितेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही सदस्य यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी, तसेच आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे विधासभेच्या अध्यक्षांनी ४ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. (जनतेचे प्रश्‍न सोडवून विकासाची कामे करण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. आमदारांना मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर त्यासाठी वेगळ्या मार्गाने दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करता येते. त्यासाठी विधानसभेत गोंधळ घालण्याची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवश्यकता नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून लोकप्रतिनिधी गंभीरपणे कारभार करतील का ? - संपादक)

(म्हणे) इसिसचा खरा चेहरा उघड करण्यासाठी मुल्ला-मौलवींचे साहाय्य घेणार !

 • पोलिसांचा हा आशावाद आत्मघातकी आणि स्वतःच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! 
 •  पुणे पोलीस आयुक्तांचा भाबडा आशावाद
        पुणे, ११ मार्च - मुसलमान तरुण-तरुणींमध्ये इसिस या अतिरेकी संघटनेविषयीचे आकर्षण वाढत आहे. मुसलमानांवर अत्याचार केले जात असल्याचा खोटा प्रचार इसिसकडून सामाजिक संकेतस्थळावर केला जात आहे. याविषयीच्या ध्वनीचित्रफीती पाहून त्यांच्या विखारी प्रचाराला तरुण-तरुणींनी बळी पडू नये, यासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी मुल्ला-मौलवींचे साहाय्य घ्यायचे ठरवले आहे. ते त्या तरुण-तरुणींना पोलिसांपेक्षा व्यवस्थित समजावून सांगू शकतील. अशा तरुणांना परावृत्त करणे, हे आपले सामूहिक दायित्व आहे. या उपक्रमाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मौलावींनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पुणे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी सांगितले. पाठक यांनी शहरातील मौला-मौलावींची पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक, साहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, अनेक मौलाना आणि मौलवी उपस्थित होते.

जेएन्यूत योगऋषी रामदेवबाबा यांना घ्यायचे आहे योग शिबीर !

देशद्रोही विचारांची मुळे खोलवर गेलेल्या जेएन्यूमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेणे, हा वरवरचा 
उपायच ठरेल, यापेक्षा ती मुळे उखडून टाकण्याचाच प्रयत्न व्हायला हवा !
राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करणार्‍या जेएन्यूच्या विद्यार्थ्यांमध्ये
सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न !
     देहली - योगऋषी रामदेवबाबा यांनी जेएन्यूत योग शिबीर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याने विद्यापिठातील विद्यार्थ्यांना केवळ आरोग्यादृष्ट्याच लाभ होणार असे नाही, तर त्यांच्या विचारातही सकारात्मकता येईल. यासाठी रामदेवबाबा स्वत: विद्यापिठात योग शिकवण्यास जातील; परंतु आतापर्यंत याचे संपूर्ण नियोजन झालेले नाही, असे त्यांचे मुख्य प्रवक्ता एस्.के. तिजारवाला यांनी सांगितले आहे.
१. आम्ही प्रत्येक वर्गातील लोकांपर्यंत योगाला पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारागृहातही आम्ही योग शिबिरे घेतलेली आहेत, अशी माहितीही तिजारावाला यांनी दिली.
२. याआधी डिसेंबर २०१५ मध्ये योगऋषी रामदेवबाबा यांना जेएन्यूत वेदांत आणि आयुर्वेद या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते; परंतु जेएन्यूच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या निमंत्रणाला त्यावेळी विरोध केला होता. 
३. डाव्या विचारसरणीचा भरणा असलेल्या जेएन्यू विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षा शोहरा राशिद यांनी या वेळी मात्र योगऋषींच्या निमंत्रणाचा विरोध केलेला नाही.

तृप्ती देसाई यांनी अवैधपणे संघटनेच्या नावाचा वापर केल्याने कायदेशीर कारवाई करणार !

कायदाद्रोही कृत्य करणार्‍या तृप्ती देसाई !
      पुणे - भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी डॉ. मुळीक यांची अनुमती न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी चेतावणी भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे आणि संघटक अधिवक्ता कमल सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
     दुर्गा शुक्रे पुढे म्हणाल्या, देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वर येथे आंदोलन केले. कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता महिलांना समानतेचा अधिकार मिळावा, ही आमची मागणी आहे. श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ आणि विश्‍वस्त यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.

आरक्षित डब्यातील शौचालयातून दुधाच्या कॅनची वाहतूक !

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या रेल्वे प्रशासनाला वेळीच खडसवा !
      नागपूर - गोंदियाहून सुटणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोरच हा प्रकार चालतो; मात्र याला कुणीही विरोध करत नाही.
     गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतून नागपूरसाठी प्रतिदिन १५ ते २० सहस्र लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. वर्ष २००५ मध्ये भंडार्‍याचे तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्सप्रेसला दुधाची वाहतूक करण्यासाठी एक विशेष डबा जोडला आहे; मात्र त्या डब्यात कॅन ठेवले जात नाहीत.


केंद्रीय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य करण्याचा स्तुत्य निर्णय युतीशासनाने शीघ्रतेने कृतीत आणावा ! - हिंदु जनजागृती समिती

      मुंबई - महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी ११ मार्चला विधानसभेत केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवणे अनिवार्य करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला, याविषयी हिंदु जनजागृती समितीने त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. या निर्णयाच्या त्वरित कार्यवाहीसाठीही शासनाने पाठपुरावा करावा, अशी विनंती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

संभाजीनगरमध्ये धर्मांधाकडून वाहतूक पोलिसावर आक्रमण

पोलिसांवर आक्रमण करण्यात धर्मांध पुढे !
      संभाजीनगर, ११ मार्च - येथील वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या डोक्यामध्ये एका धर्मांधाने शिरस्त्राण मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करत जावेद अजिज पटेल याला अटक केली आहे. (अशा उद्दाम धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी ! - संपादक)

उघड्यावर लघुशंका करतांना पकडले; म्हणून कन्हैया कुमारने विद्यार्थिनीला धमकावले होते !

महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या भूमाता ब्रिगेडसारख्या 
संघटना कन्हैयाच्या विरोधात काही बोलतील का ?
     नवी देहली - देशद्रोहाचा आरोपी आणि जेएन्यूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला तेथील कमलेश परमेश्‍वरी या विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने ३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला होता, अशी माहिती स्वतः कमलेश परमेश्‍वरी या विद्यार्थिनीने उघड केली आहे. 
     गेल्या वर्षीच्या १० जूनला कमलेश सकाळी फिरण्यासाठी गेली असतांना तिला कन्हैया विद्यापिठात परिसरातील मोकळ्या जागेत लघुशंका करत असल्याचे आढळले. तेव्हा तिने कन्हैयाला यापासून परावृत्त केले. त्यावेळी कन्हैया तिच्यावर आक्रमकपणे चाल करून आला, तसेच त्याने तिला वेडपट म्हटल्याचेही या तक्रारीत तिने म्हटले आहे, असे कमलेश हिने म्हटले आहे. कन्हैयाला दोषी ठरवल्याचे पत्र कमलेशने फेसबूकवर पोस्ट केले आहे. कमलेश आता देहली विद्यापिठात शिकवते.

निवासी भागात शिकवणी वर्ग नकोत ! - सर्वोच्च न्यायालय

यावरून तरुण मुलांची मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, ते स्पष्ट होते ! 
ही दुरवस्था रोखण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार आहे ?
तरुण मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्रास देत असल्याचे निरीक्षण
     नवी देहली - निवासी भागांत चालणारे शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) हा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोठा उपद्रव ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवून अशा ठिकाणचे वर्ग व्यावसायिक अथवा शैक्षणिक परिसरात हालवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. 
     राजस्थानमधील जयपूर विकास प्राधिकरणाने निवासी भागांत अनधिकृतपणे चालवले जाणारे शिकवणी वर्ग बंद केले होते. त्याला हरकत घेत ऑल राजस्थान कोचिंग इन्स्टिट्यूट्स असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्या. यू.यू. ललित यांच्या खंडपिठाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. खंडपिठाने या सूत्रावर ताशेरे ओढतांना सांगितले, सकाळ-संध्याकाळ तरुण मुले दुचाकी वाहनांवरून येतात. अनेक जण तेथे भटकत रहातात, तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्रास देतात. त्यामुळे हे शिकवणी वर्ग व्यावसायिक किंवा शैक्षणिक परिसरात हालवावेत. शिकवणी वर्गांना निवासी भागांत अनुमती देऊन लोकांचे आयुष्य कठीण का करावे ? या संस्था निवासी भागांत गदारोळ निर्माण करतात. त्यामुळे आम्ही त्यांना निवासी भागांत अनुमती देऊ शकत नाही. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

बांगरवाडी (जिल्हा पुणे) येथे महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन

मार्गदर्शन ऐकतांना ग्रामस्थ
      बांगरवाडी (जिल्हा पुणे) - येथील नाशिक रस्ता भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाशिवरात्रीनिमित्त माहिती सांगण्यात आली. महाशिवरात्रीचे महत्त्व, श्री शंकरांच्या उपासनेमागील शास्त्र यांसंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी ग्रामस्थांना अवगत केले, तसेच शिवचरित्रावर व्याख्यान देऊनही ग्रामस्थांमध्ये वीरश्री निर्माण केली. या वेळी २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. ग्रामस्थ सर्वश्री नकाजी बांगर, गजानन बांगर, ईश्‍वर बांगर, दत्तात्रय घोलप, सचिन घोलप, शांताराम सावंत, बबन कदम, नवनाथ बांगर, श्रीराम गोसावी, बाबू बांगर, सागर घंगाळे यांचीही उपस्थिती होती.

चितळाची शिकार केल्याच्या प्रकरणी भाजप नेते आत्राम यांच्या घरावर धाड

      गडचिरोली - भाजप नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरात वनकर्मचार्‍यांनी टाकलेल्या धाडीत चितळाचे शिंग, मांसाचे तुकडे, काडतुसे, तसेच बंदुका सापडल्या आहेत. अहेरी परिक्षेत्रात येणार्‍या रामपूर बिटातील दोडेपल्ली या गावातील आनंदराव तोर्रेम यांच्या घरी चितळ कापत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यांनी तोर्रेम यांच्या घरी छापा टाकून चितळाचे मांस आणि वापरण्यात आलेल्या अवजारासह त्याला कह्यात घेतले. तेव्हा रवींद्रबाबा आत्राम यांनीच शिकार केली, असल्याचे समोर आले.
     ८ मार्चला रात्री उशिरापर्यंत आत्राम यांच्या घरात चौकशी चालू होती. आघाडी शासनाच्या काळातील राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे ते लहान बंधू होत.

संभाजीनगर येथील धर्माभिमान्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार

फेसबूकवर शिवलिंगाला निरोध 
घातल्याच्या अवमानकारक चित्राचे प्रकरण
      संभाजीनगर - महाशिवरात्रीच्या दिवशी फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर पश्‍चिम बंगालमधील एका धर्मद्रोह्याकडून शिवलिंगाला निरोध घातल्याचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले. या चित्रामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भगवान शिवाच्या या अवमानाविरुद्ध संभाजीनगर येथील धर्माभिमानी हिंदू श्री. भाग्यतुषार जोशी यांच्याकडून येथील सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. (देवतांच्या अवमानाविषयी तत्परतेने पोलिसात तक्रार प्रविष्ट करणारे धर्माभिमानी श्री. भाग्यतुषार जोशी यांचे अभिनंदन ! - संपादक)

आसाममधील विश्‍वविख्यात कामाख्या मंदिराच्या सचिवांची हिंदु जनजागृती समितीने घेतली भेट !

 • मंदिर सरकारीकरणाच्या काँग्रेसी षड्यंत्राविषयी चर्चा 
 • आसाममधील मंदिर विश्‍वस्तांच्या बैठकीत समितीला आमंत्रण देणार !
      गुवाहाटी (आसाम), ११ मार्च (वार्ता.) - येथील सुप्रसिद्ध कामाख्या मंदिराचे सरकारीकरण करण्याविषयी काँग्रेस शासनाच्या चाललेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यासाठी मंदिराचे सहसचिव श्री. भूपेश शर्मा यांची हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-उत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आणि श्री. आनंद जाखोटिया यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीसाठी समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. आसिम नाथ यांनी पुढाकार घेतला. 

छत्तीसगड येथील चर्चवरील आक्रमणाविषयी गोव्यातील काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत आवाज उठवला !

ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक !
 • गोव्यात झालेल्या मूर्तीभंजनाच्या प्रकारांविषयी काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक यांनी कधीच आवाज का उठवला नाही ? 
 • गोव्यात सातत्याने होत असलेल्या मंदिरांतील चोर्‍यांविषयी शांताराम नाईक का बोलत नाहीत ? 
     नवी देहली - भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे चर्चवर झालेल्या आक्रमणाचा विषय काँग्रेसचे गोव्यातील राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी ९ मार्च या दिवशी राज्यसभेत उपस्थित केला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
     मुसलमान अतिरेकी पाकिस्तानहून सहस्रो मैल प्रवास करून भारतात येऊन धर्मासाठी बलीदान करतात. आपण हिंदु म्हणून आपल्या धर्मासाठी केवळ काही किलोमीटर प्रवास करून निदान हिंदूंच्या धर्मसभेसाठी उपस्थित राहूया ! - श्री. शिवाजी वटकर, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक

फलक प्रसिद्धीकरता

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांवर कारवाई कधी ?
     ८ मार्च या दिवशी काश्मीरमध्ये सैन्याकडून जिहादी आतंकवाद्यांना घेरण्यात आले असतांना एक सहस्राहून अधिक देशद्रोही धर्मांधांनी भारतीय सैनिकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलिसांसह सैनिक घायाळ झाले. या गोंधळात आतंकवादी पळून गेले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmirme sainikodwara Atankionko gherne par 1 sahastrose adhik dharamandone sainikonpar pathrav kiya.
shasan in deshdrohionko sabak sikhayegi ?

जागो ! : कश्मीर में सैनिकों द्वारा आतंकिआें को घेरने पर एक सहस्रो से अधिक धर्मांधों ने सैनिकों पर पथराव किया.
शासन इन देशद्रोहीआेंको सबक सिखाएगी ?

संरक्षणातील त्रुटींविषयी मुख्यमंत्र्यांकडून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची क्षमायाचना

       नगर, ११ मार्च - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पोलीस संरक्षणातील त्रुटींवर बोट ठेवले होते. त्याविषयी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या आठवड्यात पत्र लिहून आक्षेपही नोंदवले होते. पत्राची नोंद घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची एका पत्राद्वारे क्षमायाचना केली आहे. तसेच सुरक्षेतील त्रुटी दूर करण्याचे आश्‍वासनही दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी हजारे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, जनसामान्यांसाठी आपले जीवन बहुमूल्य आहे. आपली काळजी घेणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. आपल्याला सुरक्षाव्यवस्था आवश्यक आहे. ती मागे घेण्याची आपली मागणी मान्य करू शकत नाही. (मुख्यमंत्र्यांनी दायित्वशून्य संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईही करावी ! - संपादक)

अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच !

      १२ मार्च हा विश्‍व अग्निहोत्र दिन म्हणून साजरा केला जातो. मानवजातीला मिळालेल्या अमूल्य देणगीपैकी एक म्हणजे अग्निहोत्र ! हा नित्य वैदिक यज्ञ समजला जातो. १० मिनिटांपेक्षाही अल्प कालावधीचे हे अग्निहोत्र मनुष्याला आयुष्यभरासाठीचा लाभ करून देते. या निमित्ताने नियमितपणे अग्निहोत्र करणार्‍या सौ. मीना घुले यांनी त्याविषयी दिलेली माहिती....
अग्निहोत्र म्हणजे काय ?
      सूर्योदयाच्या, तसेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सूर्याची उपासना म्हणजे अग्निहोत्र ! अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच आहे. अग्निहोत्र करण्यासाठी वेळ सोडली, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, २ चिमूट अखंड तांदूळ आणि देशी गायीचे तूप यांच्या साहाय्याने प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर २ मंत्र म्हणून आहुती दिली जाते.

इशरतजहाँच्या खटल्यात मोदी यांना अडकवण्यास सांगितले होते ! - विशेष अन्वेषण पथकाचे तत्कालीन प्रमुख सत्यपाल सिंह यांचा लोकसभेत खुलासा

     काँग्रेस शासनाच्या काळात सनातनच्या ६ साधकांना मडगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली निर्दोष असूनही ४ वर्षे विनाकारण कारावास भोगावा लागला होता. या प्रकरणातही निरपराध्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काँग्रेसकडून दबाव आणण्यात आला. अशा काँग्रेसवर बंदी घालण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न केले पाहिजेत !
     नवी देहली - इशरतजहाँच्या खटल्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्यास सांगीतले होते, असा खुलासा विशेष अन्वेषण पथकाचे तत्कालीन प्रमुख सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत केला. 
१. सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी यांना या खटल्यात अडकवण्यासाठीच सिंह यांना या पथकाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते; पण त्यांनी यास नकार दिला होता. इशरतजहाँची चकमक ही बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी तत्कालीन केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी इशरतविषयीचे प्रतिज्ञापत्र पालटण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचे सांगितले होते.
२. याचबरोबर गृहमंत्रालयाचे तत्कालीन सचिव मणि यांनी नवीन प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी त्यांना सिगारेटचे चटके दिल्याचे सांगितले होते.

गोव्यात पोलीस असल्याचे भासवून खंडणी उकळणार्‍या २ पत्रकारांना अटक !

असे लालची पत्रकार समाजाला काय दिशा देणार ?
     मडगाव, ११ मार्च (वार्ता.) - दक्षता खात्यातील पोलीस असल्याचे भासवून पैसे उकळणारे नावेली येथील संजय शिंदे आणि मुरीडा-फातोर्डा येथील मेल्विन सुवारीस या पत्रकारांना भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून मडगाव येथे अटक केली. त्यांनी वेळ्ळी येथील एका व्यक्तीकडून ५ लक्ष रुपयांची मागणी केली होती. हे दोघे काही वाहिन्यांसाठी मुक्त पत्रकार म्हणून काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी पोलीस असल्याचे भासवून वेळ्ळी येथील सिडनी नावाच्या व्यक्तीकडे जमिनीसंबंधी कागदपत्रे मागितली आणि त्याच्यावर कारवाई करण्याची भीती दाखवली. इमारत असलेल्या जागेचा झोन कायदाबाह्य आहे, असे सांगून या दोघांनी हे प्रकरण दाबण्यासाठी ५ लक्ष रुपयांची लाच मागितली. याविषयी सिडनी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली.

शिरगाव (गोवा) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे शिक्षक उमेश फडते यांना अटक

असे नीतीमत्ताहीन शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ?
     पणजी, ११ मार्च (वार्ता.) - डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील एका विद्यालयातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली शारीरिक शिक्षक उमेश फडते यांना डिचोली पोलिसांनी अटक केली.
      या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. १ मार्चच्या रात्री मये येथील एका कार्यक्रमाहून चारचाकी वाहनातून घरी येत असतांना असभ्य वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही गोष्ट समजल्यानंतर संतप्त बनलेल्या शिरगावातील लोकांनी शिक्षकाच्या दुचाकीला आग लावली होती. घडलेल्या प्रकाराची माहिती या विद्यार्थिनीने एका शिक्षिकेला सांगितली होती; मात्र तिने सदर प्रकरण गांभीर्याने न घेता विद्यालयाची अपकीर्ती होईल; म्हणून त्या विद्यार्थिनीला शांत रहाण्यास सांगितले. (अशा असंवेदनशील शिक्षिकेचा विद्यार्थिनींना कधी आधार वाटेल का ? - संपादक) नंतर या मुलीने याविषयी तिच्या भावाला सांगितले. भावाने आईला सांगताच आई आणि भाऊ विद्यालयात आले. पालक-शिक्षक संघाची बैठक चालू असतांना आई आणि भाऊ यांनी शिक्षक उमेश फडते यांना चोप दिला. या वेळी इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून उमेश फडते यांना एका खोलीत बंद केले. या प्रकरणाची कल्पना स्थानिकांना येताच त्यांनी विद्यालयासमोर गर्दी केली आणि त्या शिक्षकास आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी केली; मात्र त्या वेळी पोचलेल्या पोलिसांनी त्या शिक्षकाला पोलीस ठाण्यावर नेले आणि अटक केली.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यास राज्यशासन अनुकूल

 • राज्य शासनाने शंकराचार्य, धर्माचार्य, संत आणि महंत यांचे समुपदेशन घेऊन हिंदु धर्मियांच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही अपेक्षा !  
 • शासनाच्या वतीने न्यायालयामध्ये २ आठवड्यांत उत्तर प्रविष्ट करण्यात येणार !
       संभाजीनगर, ११ मार्च - श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात लातूर येथील डॉ. वसुधा पवार यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. राज्यशासन महिलांना मंदिर प्रवेश आणि श्री शनिदेवाचा चौथरा या ठिकाणी प्रवेश देण्यास अनुकूल आहे, तसेच त्यासाठीचे उत्तर न्यायालयात प्रविष्ट करण्यासाठी २ आठवड्यांचा वेळ द्यावा, असा युक्तिवाद शासकीय अधिवक्ता अमरजितसिंह गिरासे यांनी केला. न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे आणि पुखराज बोरा यांच्या खंडपिठाने ही विनंती मान्य केली आहे. या वेळी याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता अमेय सबनीस आणि श्री शनैश्‍वर देवस्थानचे अधिवक्ता व्ही.डी. सपकाळ यांनीही युक्तिवाद केला.

(म्हणे) गोवंश हत्याबंदी कायद्याचा फेरविचार करा !

भाजपच्याच आमदाराचे अचंबित करणारे मत
       मुंबई - शासनाने लागू केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचा पुनर्विचार करून त्यात गरीब शेतकर्‍यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आष्टी येथील आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, दुष्काळी स्थितीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. गरीब शेतकर्‍यांकडील बैलासारखी जनावरे विकण्याचा आणि त्यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा अधिकार त्यांना दिला गेला पाहिजे. ज्या गरिबांना आवश्यकता असेल, त्यांना गोमांस खाण्याची सवलतही दिली पाहिजे. (स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे जनावारांची काळजी घेणारे शेतकरी स्वतःचे पोट भरण्यासाठी जनावरांची कधी हत्या करतील का ? - संपादक)

अग्निहोत्राचे लाभ

विश्‍व अग्निहोत्र दिनाच्या निमित्ताने...
     जगातील अग्निहोत्राचे आचरण करणारे भिन्न वंश, भिन्न भाषा, भिन्न धर्म आणि आध्यात्मिक असे गट आहेत.
१. चैतन्यप्रदायी आणि औषधी वातावरण निर्माण होते.
२. अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकणे : अग्निहोत्रामुळे वनस्पतींना वातावरणातून पोषणद्रव्ये मिळतात आणि त्या सुखावतात. अग्निहोत्राच्या भस्माचाही शेती आणि वनस्पती यांच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य, फळे, फुले अन् भाजीपाला पिकतो.

वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ राहुरी (जिल्हा नगर) येथे कडकडीत बंद

गुन्हेगारी वाढल्याचे नागरिकांना मोर्चा काढून 
का सांगावे लागते ? पोलिसांच्या हे का लक्षात येत नाही ?
       राहुरी (नगर), ११ मार्च - राहुरी तालुक्यात शेतकर्‍यांच्या शेती मशागतीच्या अवजारांची चोरी, तसेच दिवसाढवळ्या व्यापार्‍यांना पिस्तूल दाखवून खंडणी मागण्याचे सत्र चालू आहे. मुळा आणि प्रवरा नदीपात्रांतील वाळूतस्करीने राहुरी तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ ९ मार्च या दिवशी राहुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात व्यापारी, शेतकरी, नगरसेवक, शिक्षक यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. मोर्च्यानंतर तनपुरे आणि बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी पोलीस उपअधीक्षक संजय जाधव यांना राहुरीवासियांच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनाची गांभीर्याने नोंद घेत संजय जाधव म्हणाले, गुन्हेगार कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही.

चिथावणीखोर वक्तव्याविषयी राज ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता

      मुंबई - कायदा न पाळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली. विधान भवन परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ९ मार्च या दिवशी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना राज यांनी नवीन रिक्षा जाळून टाका, अशी चिथावणी दिली होती.

देशद्रोही कोण ?

     साधू आणि संत या देशातील सर्वांत मोठे देशद्रोही आहेत. मंदिरांत बसलेले सर्व संत ढोंगी आहेत आणि या लोकांना गंगा नदीत फेकून दिले पाहिजे, असे धर्मद्रोही विधान जन अधिकार पक्षाचे प्रमुख खासदार पप्पू यादव यांनी केले आहे. त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे.
      साधू-संत हे देवाचे रूप असते. सध्याच्या कलियुगात सर्वत्र अधर्म बोकाळला आहे. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य, आधुनिकता, पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे पूर्वापार चालू असलेल्या धार्मिक प्रथा-परंपरा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जेथे धर्माशास्त्रानुसार आचरण केले जात आहे, तेथे त्याला हिंदुद्रोही, धर्मद्रोही, पुरोगामी, अधर्मी यांच्याकडून विरोध होत आहे. या विरोधामागे धर्माभिमान नसलेले जन्महिंदूही कारणीभूत आहेत. त्यामुळे धर्माची पर्यायाने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अधोगतीला चालले आहे.

इंटरनेटवरील वेश्याव्यवसायाची विज्ञापने आणि ती देणारी संकेतस्थळे यांवर कारवाई करा ! - न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ?  
शासन स्वतःहून कृती का करत नाही ?
      मुंबई - इंटरनेटवर चालू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या विज्ञापनांवर कारवाई करा, तसेच अशी विज्ञापने देणारी संकेतस्थळेही बंद करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालतो आणि अशा प्रकारच्या संकेतस्थळांवर संपर्क क्रमांकही दिलेले असतात, असा दावा याचिकाकर्ते अली अहमद सिद्दीकी यांनी केला होता. त्यावर सुनावणी करतांना अशी विज्ञापने आणि संकेतस्थळे बंद करा, सायबर विभागाचे साहाय्य घ्या आणि संबंधितांना अटक करा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदू विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची आवश्यकता आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! 
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
         वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

व्हॉट्सअ‍ॅप आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

      सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर व्हॉट्सअ‍ॅप असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे
      प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक व्हॉट्सअ‍ॅपवर गट (ग्रुप) सिद्ध करतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी असे करणे योग्य आहे का ?, असे उत्तरदायी साधकांना विचारून घेत नाहीत.
      आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी दायित्व असणार्‍या साधकांना विचारून घ्यावे.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, तसेच साधक यांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

वातानुकूलित यंत्रे, शीतकपाट आदी 
उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !
        सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही वातानुकूलित यंत्रे (विंडो ए.सी., तसेच स्प्लिट ए.सी.), शीतकपाट (फ्रिज) नादुरुस्त स्थितीत आहेत. ही उपकरणे वापरण्यायोग्य होण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याची सेवा उपलब्ध आहे.
      अशा उपकरणांची दुरुस्ती करण्याचा अनुभव असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक सेवा म्हणून करण्यास इच्छुक असतील किंवा सेवामूल्य घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतील, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर खालील माहिती पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास रामनाथी आश्रमात श्री. संभाजी माने यांच्याशी ०८४५१००६०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
       या सेवेत सहभागी होऊन ईश्‍वराने दिलेले कौशल्य त्याच्या चरणी समर्पित करण्याची संधी दवडू नका !

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेत आल्यावर स्वतःच्या चुकांची साधिकेला जाणीव झाल्यावर त्या चुकांची खंत वाटून मनात झालेली घालमेल अन् तिने प.पू. डॉक्टरांना आर्ततेने केलेली प्रार्थना !

       प.पू. डॉक्टर, तुम्ही आम्हाला साधनेचे महत्त्व सत्संगातून सांगितल्यावर साधना करणे मनाला पटले. सेवेच्या माध्यमातून आमचे प्रारब्ध जळणार आहे, ते समजल्यावर सेवेला आरंभ केला. सेवेतील आनंद घेता आला. पुढे पुढे सेवा आणि आम्ही असे सूत्र झाले; पण त्या सेवेमध्ये किती चुका होतात, ते कधी पाहिलेच नाही. पाहिले असले, तरी पहिल्यापासूनच त्या चुकांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच चुका आणि अहं इतका घट्ट बसला आहे की, तो घट्ट दगड झाला आहे. तो आमच्या प्रयत्नांनी फुटेल, अशी शाश्‍वतीच वाटत नाही; म्हणून तुम्ही भाव असलेल्या सौ. घोंगाणेंकाकूंना पाठवलेत. त्यानंतर प्रीतीचा सागर आणि मायेचा पाझर असलेल्या पू. अनूताईंना पाठवलेत; पण या दगडावर काही परिणाम होईना.

गुरु शिष्याच्या जीवनातील विविध प्रसंगरूपी परीक्षांची उत्तरे प्रत्यक्ष अथवा आतून सुचवत असल्यामुळे शिष्य जीवनाच्या परीक्षेत नेहमीच उत्तीर्ण होत असणे

श्री. राम होनप
     शिक्षक वर्षभर विद्यार्थ्याला शिकवतात; परंतु विद्यार्थी वार्षिक परीक्षेत प्रश्‍नपत्रिका सोडवत असतांना शिक्षक विद्यार्थ्याला साहाय्य करू शकत नाहीत. अशा वेळी उत्तीर्ण होणे हे केवळ विद्यार्थ्याच्या हातात असते. याउलट शिष्याच्या जीवनातील विविध प्रसंगरूपी परीक्षांची उत्तरे गुरु शिष्याला प्रत्यक्ष देतात अथवा आतून सुचवतात. त्यामुळे शिष्य जीवनाच्या परीक्षेत नेहमीच उत्तीर्ण होतो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१५)

आनंदी, उत्साही आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडेकाकू !

श्रीमती भारती गलांडे
१. गलांडेकाकू सतत आनंदी आणि उत्साही असतात.
२. सहसाधिकेला साधनेत साहाय्य करणे
      श्रीमती गलांडेकाकू सतत इतरांचा विचार करतात. कुणाच्या काही अडचणी असतील, तर त्यांना सांगितल्यावर सोडवण्याचा प्रयत्न करतात. माझे व्यष्टीचे प्रयत्न अल्प होतात, हे काकूंना समजल्यावर त्या मला त्याची सतत आठवण करून देतात. त्या म्हणतात, प्रार्थना, कृतज्ञता होतात ना ? नामजप चालू आहे ना ? नाहीतर मग आता चालू करूया. त्या सत्र करण्याची आठवण करून देतात. सत्र झाले नाही, तर मग तेव्हाच्या तेव्हा करायला सांगतात. चुका लिहिल्या का ?, असे विचारून त्या प्रथम व्यष्टी पूर्ण कर. मग सेवा कर, असे म्हणतात. सेवा आणि व्यष्टी साधना झाली, तरच देवाला आपण आवडतो, असे त्या सांगतात. त्यामुळे प्रयत्न करायला उत्साह येतो.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शोभा जयराम जोशी यांच्या देहावसनानंतर जाणवलेली सूत्रे

शोभा जोशी
१. आई गेल्यावर कुणाला त्रास होणे किंवा स्वप्नात दिसणे, असे झाले नाही. केवळ १ - २ वेळा त्या माझी नणंद सौ. आरती म्हैसकर यांच्या स्वप्नात आल्या होत्या.
२. त्यांचे शेवटी घरून निघतांना काढलेले छायाचित्र १६.६.२०१० या दिवशी प.पू. डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी सांगितले, यांना जप सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचा जप चालू आहे.
३. मृत्यूनंतरचे श्राद्धविधी हे पहिल्या वर्षी रामनाथीला, दुसर्‍या वर्षी देवदला आणि तिसर्‍या वर्षी मिरजेला झाले. पाचव्या वर्षी वाडीला श्राद्ध केले.
      या वेळी आश्रमात श्राद्ध झाल्यामुळे त्यांना पुढे जलद गती मिळून त्या आनंदाने वेगाने पुढे जात आहेत आणि वरच्या लोकात साधना करत असून आम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या आणि पू. बाबांच्या पुण्याईमुळे आम्हाला साधना करता आली आणि महर्लोकातील बाळ मिळाले, असे मला जाणवते.
- सौ. भाग्यश्री जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१०.२.२०१६)

देवी कवच म्हटल्यानंतर श्री. निषाद देशमुख यांना आलेल्या अनुभूती आणि मिळालेले ज्ञान !

१. देवी कवच म्हणतांना आलेल्या अनुभूती
श्री. निषाद देशमुख
१ अ. देवी कवच म्हणतांना त्या-त्या अवयवात देवीची शक्ती समाविष्ट होऊन तो अवयव जागृत झाल्याचे जाणवणे : रामरक्षामध्ये एकेका अवयवाच्या रक्षणासाठी श्रीरामाला प्रार्थना केली आहे. देवी कवच हेही त्याच स्वरूपाचे आहे. त्या-त्या अवयवाशी संबंधित श्‍लोकांचे उच्चारण करतांना त्या अवयवात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने शक्ती फिरत असल्याचे मला जाणवले. या अवयवांना जणू काही थकवा आला होता आणि आता अवयव जागृत होत आहेत, असेही मला जाणवले.
१ आ. देवी कवच म्हणत असतांना सहसाधकावर उपाय होणे : मी देवी कवच म्हणतांना माझ्या शेजारी श्री. योगेश व्हनमारे हे थकवा आल्याने विश्रांती घेत होते. देवी कवचाचे पठण ३० टक्के झाले असतांना ते उठून बसले आणि त्यांनी लगेच उत्साहाने त्यांची सेवा चालू केली. विश्रांती घेण्यापूर्वी ते पुष्कळ थकले होते आणि अर्धा घंटा तरी त्यांना विश्रांती घ्यावी लागणार, असे वाटत होते; मात्र ५ मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर ते उठून उत्साहाने सेवा करू लागले. देवी कवचाच्या चैतन्यमुळे त्यांना लाभ झाल्याचे जाणवले.

स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

असह्य थकवा, अस्वस्थता आदी त्रासांचे कारण आधुनिक वैद्यांना शोधता न 
येणे आणि शिव-स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यानंतर ते त्रास टप्प्याटप्प्याने न्यून होणे
१. अचानक सर्वाधिक थकवा, अस्वस्थता आदी त्रास होणे आणि आधुनिक वैद्यांनी तपासल्यानंतर शारीरिक स्थिती सामान्य असल्याचे सांगणे : १९.२.२०१६ या दिवशी अचानक सायंकाळी ५ वाजल्यापासून माझ्या शरिराला घाम फुटून अस्वस्थ वाटू लागले. हात-पाय गळून जाणे, शरिरातून उष्ण वाफा येणे, मन अस्वस्थ होणे आणि असह्य थकवा जाणवणे, असे त्रास होऊ लागले. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता मी विभागातील सेवा थांबवून खोलीमध्ये १ घंटा विश्रांती घेतली. तरीही त्रास न्यून न झाल्याने मी चिकित्सालयात जाऊन आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे यांना भेटलो. त्यांनी रक्तदाब आदी तपासून मला सांगितले, सर्व शारीरिक स्थिती सामान्य आहे.

कृष्णासम होण्यासाठी धडपडणारी कु. वैभवी झरकर (वय १० वर्षे) !

कु. वैभवी झरकर
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखे वागायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखे बोलायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखे हसायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखे खेळायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखी सेवा करायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आम्हाला तुझ्यासारखे सर्वांवर प्रेम करायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आमच्यामध्ये तुझे गुण येण्यासाठी प्रयत्न करायला शिकवणार का ?
कृष्णा कृष्णा, आमची प्रगती परम पूज्यांसारखी करवून घेणार का ?
- कु. वैभवी झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०१५)

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उज्ज्वला गुरव यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. उज्ज्वला गुरव
१. मुलीमध्ये ग्रंथवाचनाची गोडी निर्माण करणे
       आई आम्हाला ग्रंथ वाचून त्यातील शिकण्यासारख्या गोष्टी सांगत असे. तिला ग्रंथ वाचायची पुष्कळ आवड आहे. ती मला पुष्कळदा सांगते, ग्रंथ वाचन कर. मैत्रिणींसमवेत अनावश्यक वेळ कशाला घालवतेस ? ग्रंथ वाचल्याने त्यातील ज्ञान मिळून देवाप्रती भाव वाढेल. कधी कधी आईच्या म्हणण्याप्रमाणे ग्रंथ वाचते. तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटते. ग्रंथ परत परत वाचावा, असे वाटते.
२. दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे
      मी घरी असतांना माझ्या मनात विचार यायचा, आता अमुक एक काम करायचे. मी ते काम करायच्या आधीच आईला समजत असे. तेव्हा मला वाटायचे, हे काम करूया. आईने येऊन पाहिले, तर ती चांगले म्हणेल, तर तेच काम आई सांगत असे. त्या वेळी आईला सूक्ष्मातील कळते का ?, असा विचार माझ्या मनात येत असे. मग मी तिला विचारायचे, माझ्या मनातले तुला कसे समजले ? तेव्हा ती म्हणायची, देवाने सांगितले.

साधकत्व अंगी बाणवून प्रत्येक कार्य केल्यास ते कार्य ईश्‍वरी कार्य होईल ! - प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
      श्रीकृष्णाचे कोणते रूप मोठे आहे ? बाळकृष्ण, रासलीला खेळणारा, गीता सांगणारा कि आणखी कोणता ? जो श्रीकृष्ण आपले मोठेपणा विसरून एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या बनून सेवा करतो, जनाबाईंच्या घरी धुणीभांडी करतो, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो, यज्ञाच्या वेळी पत्रावळ्या उचलतो, तो श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ आहे !
       त्यासाठीच प्रत्येकातील अहं घालवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास सांगतात, उदा. स्वयंपाकघरात सेवा केल्याने अहं अल्प होऊन सुप्त गुण विकसित होतात. हे करणे कठीण असले, तरी अशक्य नाही. भगवंताच्या कृपेने साधना म्हणून असे केले, मीपणा गेला की, मग केवळ आनंदच आहे. यासाठी खरा साधक होणे आवश्यक आहे; म्हणून साधक पुरोहित, साधक न्यायाधीश, अशा प्रकारे प्रत्येकाच्या मागे साधक ही उपाधी लागल्यास त्याची महत्ता लक्षात येऊन ते कार्य ईश्‍वरी कार्य होईल.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१२.२०१५)

साधकांनो, २०.३.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

 जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
      संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २०.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहोत.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी
 २. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

      प.प. गुरुदेवा साधना करतांना होणार्‍या संघर्षामुळे आम्ही थकलो पडलो, खचलो, रडत बसलो, तरी पुन्हा पुन्हा तुमच्या मायेने, दयेने आम्हाला सांभाळून घेत आमचा हात पकडून पुन्हा ऊठ बाळ ! चल ! आपल्याला सदैव पुढे जायचेय, जिंकायचेय, असे सांगून पुन्हा आनंदप्राप्तीच्या दिशेने घेऊन चाललात, म्हणून आम्ही आपल्या चरणी अनंत कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

रामनाथी आश्रमातील बालसाधिका कु. गौरी मुद्गल (वय १५ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. गौरी मुद्गल
१. सेवेसाठी तत्पर असणे : कु. गौरी मुद्गल कुठल्याही सेवेसाठी अतिशय तत्पर असते. एखाद्याला साहाय्याची आवश्यकता दिसली, तर ती शक्य तिथे साहाय्य करत असते.
२. प्रेमभाव : तिच्यातील प्रेमभाव, तर मोठ्यांनीही शिकण्यासारखा आहे. जणू प्रेमाचा झरा सतत तिच्या वागण्या-बोलण्यातून पाझरत असतो.
३. जवळीक साधणे : गौरी पुष्कळ सहजतेने कुणाशीही जवळीक साधते. त्याला वयाचीही मर्यादा नसते. मग ती व्यक्ती आजी असो, मावशी असो, विभागातील ताई असो वा समवयस्क असो. गौरी पुष्कळ जवळची वाटते, ती भेटली नाही, तर करमत नाही.

एका चुकीबद्दल महर्षींनी सांगितलेली अवघड शिक्षा आणि त्या शिक्षेचे प.पू. डॉक्टरांच्या कृपेने अध्यात्मीकरण करू शकल्याने ती पूर्ण करू शकणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितलेल्या वेळी काही कारणाने पोहोचू न शकल्यावर त्यांनी महर्षींनी सांगितलेल्या वेळेत आला नाहीत, तर महर्षी शिक्षा म्हणून पुढे कित्येक मास (महिने) नाडीवाचन बंद करतील, असे सांगणे : पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची मातृभाषा तमिळ आहे. ते सर्वांशीच तमिळ भाषेत संवाद साधतात. नाडीवाचनही तमिळ भाषेतच केले जाते. आम्हाला भाषा कळत नसल्याने त्यांच्या बोलण्याचे भाषांतर श्री. विनायक शानबाग करतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पू. सखदेवआजी आणि प.पू. डॉक्टर यांचे उत्तर एकच !

       गेले ५ - ६ मास पू. सखदेवआजींना श्‍वास घ्यायचा तीव्र त्रास व्हायला लागला की, त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव मला आजींना होणार्‍या त्रासाचे स्वरूप आणि त्यावर आजींनी उपाय म्हणून शोधलेला नामजप, मुद्रा आणि न्यास हेही सांगायच्या आणि ते योग्य आहे का ?, असे विचारायच्या. आजपर्यंत जवळजवळ १०० प्रसंगी पू. आजींना आणि मला सुचलेले उपाय एकच आले आहेत. यावरून पू. सखदेवआजींची क्षमता आणि अध्यात्म हे शास्त्र कसे आहे, हे लक्षात येते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक कृती परमेश्‍वरी कार्य म्हणून करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्‍वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्‍वर आपल्यापासून फार दूर नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकशी क्रिकेट खेळण्याचा अट्टाहास का ?

संपादकीय 
      २०मार्चला पाकिस्तानसमवेत होणार्‍या टी-२० च्या क्रिकेट सामन्यासाठी माजी सैनिकांचा मोठा विरोध होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रशासन हा सामना देहली अथवा कोलकाता येथे खेळवण्याचा विचार करत आहेत ! स्वातंत्र्यापासून पाकिस्तान भारताच्या विरोधात कुरघोड्या करतच आहे; मात्र सध्या पठाणकोटची जखम ताजी आहे. शिवाय काश्मीरविषयी आम्ही आमचे धोरण पालटलेले नाही, असेही पाकिस्तानने कालच घोषित केले आहे. जे पाकिस्तान सीमेवर जवानांचा बळी घेते, प्रशिक्षित आतंकवाद्यांकडून भारतात आक्रमण करून निष्पाप नागरिकांचा बळी घेते, अशा शत्रूराष्ट्रासमवेत खेळण्याचा अट्टाहास आपले राज्यकर्ते का करत आहेत ? पाकिस्तान जोपर्यंत सर्वच थरांतून आतंकवाद थांबवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कसलीच बोलणी नाहीत आणि खेळ तर नाहीच नाही, अशी भूमिका आपले राज्यकर्ते कधी घेणार आहेत ? शासनाने किमान सीमेवरील जवानांच्या प्राणाचे मोल उमजून पाकसमवेत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घ्यावा, हीच देशप्रेमींची अपेक्षा आहे.

कर्जबुडव्यांवर ठोस कारवाई कधी ?

संपादकीय 
       सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज थकवून विदेशात पलायन केलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचे सूत्र सध्या देशभरात गाजत आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार असलेले मल्ल्या यांनी १७ सार्वजनिक अधिकोषांचे १७ सहस्र कोटी रुपये थकवले असून ते मिळण्यासाठी हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. मल्ल्या हे केवळ पुढे आलेले एक उदाहरण आहे. नुकतेच शासनाने वसूल न होणारे १ लक्ष ७० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मल्ल्या यांच्यासारख्या किती बड्या व्यक्ती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! मूळ समस्या ही आहे की, अशा प्रकारे उद्योगपती कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून ते राजकीय पाठिंब्याच्या जोरावर भरणार नसतील, तर भारतीय अधिकोषांचे एक दिवस दिवाळे निघाल्याशिवाय रहाणार नाही ! त्याच प्रकारे मद्यनिर्मिती करून लक्षावधींना देशोधडीला लावणारा, सातत्याने अश्‍लील दिनदर्शिका प्रकाशित करणारा मल्ल्यासारखा माणून राज्यसभेचा खासदार होतो, ही गोष्ट लोकराज्याचे धिंडवडे काढणारी आहे. शिवाय मल्ल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचे विविध लाभ घेतले असतीलच, हे सांगणे न लगे ! 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn