Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या प.पू. विमल फडके (आजी) यांची पुण्यतिथी

(म्हणे) काश्मीर भारताचा भाग नाही !

जेएन्यूतील प्रा. निवेदिता मेनन यांचा देशद्रोह !
मेननसारख्या प्राध्यापिका असणार्‍या विद्यापिठातून देशभक्त नाहीत, तर देशद्रोहीच निपजणार !
देशाच्या राजधानीसारख्या शहरातील विद्यापिठात देशविरोधी घटना घडत
असतांनही ते आतापर्यंतच्या एकाही शासनाला लक्षात कसे आले नाही ?
      नवी देहली - काश्मीर हा भारताचा भाग नाही, त्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा चुकीच्या नाहीत, असे विधान जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) प्राध्यापिका निवेदिता मेनन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हीडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे. मेनन या आंतरराष्ट्रीय संबंध विभागात तुलनात्मक राजकारण आणि राजकीय विचारधारा केंद्रात शिकवतात.
     २२ फेब्रुवारीला प्रा. मेमन यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या या भाषणात म्हटले की, टाइम आणि न्यूज वीक यांसारख्या परदेशी प्रकाशनांमध्ये भारताच्या नकाशात काश्मीर दाखवले जात नाही. म्हणजेच, काश्मीरवरील भारताचा ताबा अवैध आहे, असेच जग मानतो; मग काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणांमध्ये चुकीचे काय आहे ?

इशरतजहाँ प्रकरणी चिदंबरम् यांच्या काळातील वादग्रस्त निवेदन गृह मंत्रालयातून गायब !

     तत्कालीन काँग्रेस शासन सत्तेवरून जाण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे आणि अवैध कारभारचे सर्व पुरावे नष्ट करील, असे सनातन प्रभातने सातत्याने प्रसिद्ध केले होते, त्याचेच हे एक उदाहरण म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !
     नवी देहली - तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या कार्यकाळातील इशरतजहाँ प्रकरणातील पालटण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील निवेदन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयातून गायब झाले आहे. तसेच तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्याच्या संदर्भातील धारिकाही गृहमंत्रालयातून गायब आहेत. या प्रतिज्ञापत्रावरूनच गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस शासनाचा इशरतजहाँ प्रकरणातील खोटारडेपणा उघडकीस आला होता.

मला अटक करून दाखवाच ! - भाजपच्या खासदार साध्वी प्राची यांचे अभिनेता अनुपम खेर यांना आव्हान

     नवी देहली - हिंदूंच्या हितासाठी आम्ही लढतच राहू. धाडस असेल, तर मला आणि योगी आदित्यनाथ यांना अटक करून दाखवा, असे आव्हान साध्वी प्राची यांनी अभिनेते अनुपम खेर यांना दिले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे देशातील वाढती असहिष्णुता या विषयावर दैनिक टेलिग्राफने आयोजित केलेल्या चर्चासत्रात अनुपम खेर यांनी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांचे नाव न घेता त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. खेर म्हणाले होते की, भाजपमध्येही काही माणसे निरर्थक बडबड करत आहेत. मग ते योगी असतील किंवा साध्वी, त्यांना समज दिली पाहिजे, पक्षातून काढून टाकले पाहिजे, कारागृहात टाकले पाहिजे. भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, अनुपम खेर हे फक्त चित्रपटामध्येच नव्हे, तर प्रत्यक्षातही खलनायक आहेत.

बिहारमध्ये अवैध दारू बनवणार्‍यांना होणार फाशीची शिक्षा !

     पाटलीपुत्र (पाटणा) - अवैध दारू बनवणार्‍यांना फाशीची शिक्षा करणारे विधेयक बिहार शासनाकडून बनवण्यात येत आहे. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माहिती दिली. राज्यात १ एप्रिलपासून बिहार देशी दारूवर पूर्णपणे बंदी असणार आहे. (केवळ दारूसाठीच नव्हे, तर देशद्रोही आणि त्याचे समर्थक, भ्रष्टाचारी, बलात्कारी आदींनाही अशी शिक्षा द्या ! - संपादक)

शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी समन्वय आवश्यक ! - लष्करप्रमुख

     पुणे - शस्त्रसज्ज सैन्य केवळ युद्धासाठी नव्हे, तर शांतता प्रस्थापित करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. आशियातील लहान-मोठ्या देशांमध्ये कायम बाह्य आणि अंतर्गत कलहामुळे अनेकदा अस्थिरता निर्माण होते. अशा वेळी शांततेसाठी लष्कराचे सहकार्य महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि स्थैर्य कायम रहाण्यासाठी विविध देशांच्या लष्करामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, असे मत लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांततेसाठी लष्करी सराव या योजनेच्या अंतर्गत केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्य यांच्या वतीने आसियान संघटनेसह जगातील १७ राष्ट्रांच्या लष्कराच्या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुस्थानी सैन्यदलाचे लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात १० मार्च या दिवशी या सरावाचा समारोप झाला.


राहुल गांधी म्हणतात,विजय मल्ल्या यांना भाजपनेच पळू दिले !

     बोफोर्स प्रकरणी इटलीचा क्वात्रोची आणि भोपाळ वायू दुर्घटनेतील युनियन कार्बाइडचा मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन अँडरसन यांना भारतातून पळू देणार्‍या काँग्रेसने प्रथम त्याचे उत्तर द्यावे !
     नवी देहली - उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चाच करायची नाही; कारण भाजपनेच त्यांना पळवले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्या ९ सहस्र ९१ कोटीहून अधिक रुपयांच्या कर्जाची परतफेड न करताच उद्योगपती विजय मल्ल्या हे २ मार्चलाच लंडनला पळून गेले. (चौकशीच्या फेर्‍यात असणार्‍या उद्योगपतीला पळू देणारे शासन भ्रष्टाचारमुक्त शासन कसे देणार, असा प्रश्‍न जनतेला पडल्यास नवल ते काय ! - संपादक)

मुंबई महापालिकांच्या शाळांत कळसूत्री बाहुल्यांचा वापर करून लैंगिक शिक्षणाचे धडे

     समाजाला साधना आणि नैतिकता शिकवल्यास लैंगिक शोषणासारखे प्रकार आपोआप अल्प होतील. त्यामुळे लैंगिक शिक्षण देण्यासारखे अयोग्य उपाय योजण्याची आवश्यकता भासणार नाही !
      मुंबई - लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झालेली असल्याने त्याविषयी जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम करून लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात मुंबई महापालिकेने घेतला आहे. याविषयीच्या निर्णयावर पालिकेच्या सभागृहात शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. (लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शासन करणे, समाजाला धर्मशिक्षण देणे यांसारख्या उपाययोजना शासनाने करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे कार्यक्रम करून उलट विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयीच्या चर्चा वाढून गुन्ह्यात वाढही होऊ शकते ! - संपादक) या संदर्भात शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, वैद्यकीय तज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगला-वाईट स्पर्श आणि अवयव यांविषयी माहिती द्यावी.

कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातील ६६ टक्के विद्यार्थी आठवड्यातून ७ घंटे पहातात अश्‍लील चित्रपट !

विद्यार्थी म्हणतात, पॉर्न चित्रपट पाहिल्यावर बलात्कार करण्याची इच्छा होते !
  • विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार करून मनातील वासनांवर नियंत्रण मिळवण्यास शिकवले जात नसल्याचाच हा परिणाम आहे ! ही स्थिती धर्माधिष्ठित राज्यप्रणालीतूनच पालटता येईल !
  • जेथे शूरविरांचे, राष्ट्रपुरुषांचे आदर्श घेऊन राष्ट्राच्या प्रगतीचे विचार हवेत, तेथे असे विचार करणारे विद्यार्थी देशाचे रक्षण आणि प्रगती कशी करणार ?
  • केंद्रशासन यावर कठोर उपाययोजना कधी काढणार ?
      मंगळुरू - कर्नाटक राज्यातील महाविद्यालयातील ६६ टक्के विद्यार्थी आठवड्यातून ७ घंटे अश्‍लील (पॉर्न) चित्रपट पहातात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. विद्यार्थिनीही यात मागे नसून ३० टक्के विद्यार्थिनी आठवड्यातून ५ घंटे अश्‍लील चित्रपट पहातात. विद्यार्थ्यांनी पॉर्न पाहिल्यावर बलात्कार करण्याचे विचार येतात, असे म्हटले आहे.
१. १८३ महाविद्यालयांतील ३ सहस्र ५०० विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
२. रेस्क्यू या खाजगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक क्लिफॉर्ड यांनी हे सर्वेक्षण केले आहे.

५ कोटी रुपयांचा दंड आकारून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सांस्कृतिक महोत्सवास अनुमती

राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय !
पंतप्रधान मोदी करणार महोत्सवाचे उद्घाटन !
      नवी देहली - आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना देहलीत यमुना नदीकिनारी आंतरराष्ट्र्रीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्यात आली आहे. ११ ते १३ मार्च या कालावधीत या महोत्सवास आरंभ होणार असून ३ दिवस तो चालणार आहे. या महोत्सवामुळे पर्यावरणाच्या होणार्‍या हानीच्या भरपाईपोटी ५ कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पिठाने आर्ट ऑफ लिव्हिंगला दिला आहे. हा महोत्सव आयोजित करतांना पर्यावरणाविषयी कुणाही संबंधित खात्यांची अनुमती घेतली नसल्याचे सांगत लवादाने या महोत्सवास हरकत घेतली होती.
     या महोत्सवाच्या सिद्धतेसाठी सैन्याचे साहाय्य का घेण्यात आले, यावर विरोधकांनी संसदेत शासनाला धारेवर धरले. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय केला. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मार्चला या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

हिंदु धर्मजागृती कार्याला होणारा विरोध संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! - मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

  • पोलिसांनी ऐनवेळी आडमुठी भूमिका घेऊन आणि मार्ग पालटूनही ७० दुचाकी, ४ चारचाकी वाहने यांच्यासह २०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !
  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी !
       बेळगाव, १० मार्च (वार्ता.) - वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्‍या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला जाणीवपूर्वक निर्माण केलेला अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १३ मार्च या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आयोजित वाहन फेरीची सांगता झाल्यानंतरच्या सभेत ते बोलत होते. पोलिसांनी ऐनवेळी मार्ग पालटूनही या फेरीत ७० दुचाकी, ४ चारचाकी वाहन यांच्यासह २०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. शहरातील बॅरिस्टर नाथ पै चौक येथून वाहनफेरीचा प्रारंभ झाला. प्रारंभी धर्माभिमानी डॉ. समीर कुट्रे यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. धर्मध्वजास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

जेएन्यूमध्ये धार्मिक भावना दुखावण्यासाठी साम्यवादी विद्यार्थ्यांनी मनुस्मृती जाळली !

सातत्याने राष्ट्र आणि हिंदु धर्म द्रोही कृत्ये होणार्‍या 
जवाहरलाल नेहरू विद्यापिठाला टाळे ठोका !
     नवी देहली - ८ मार्च या दिवशी जेएन्यूमध्ये मनुस्मृती जाळण्यात आल्याचे वृत्त रिव्हॉल्ट प्रेस या वृत्त संकेस्थळाने प्रसिद्ध केले आहे. साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून साबरमती ढाब्याजवळ मनुस्मृती जाळण्यात आली. या वेळी हिंदुविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. जेएन्यू प्रशासनाने अशा प्रकारचे दहन करण्यासाठी कोणतीही अनुमती दिलेली नव्हती. प्रशासनाने या दहनाचे चित्रीकरण केल्याचे या वृत्तात म्हटले आहे; मात्र साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून चित्रीकरणाला विरोध झाला. या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सौरभ कुमार शर्मा म्हणाले की, जातीधर्माचा भेद नको, त्यासाठी कोणताही धार्मिक ग्रंथ जाळणे अयोग्य आहे. अभाविपमधून बाहेर पडलेल्या काही जणांनाही फितवून अशा कृत्यांमध्ये सहभागी करवून घेण्यात येत आहे.

काँग्रेस ही मृत्यूसारखी आहे, कधी अपकीर्त होत नाही ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

      नवी देहली - मृत्यूला एक वरदान आहे की, तो कधी अपकीर्त होत नाही. कर्करोगाने मरण आले, तर कर्करोग अपकीर्त होतो, अपघाताने मृत्यू आला, तर अपघात अपकीर्त होतो; पण मृत्यू कधी अपकीर्त होत नाही, त्याप्रमाणे आम्ही कितीही टीका केली, तरी विरोधी पक्षावर टीका असे म्हटले जाते; काँग्रेसवर टीका असे म्हटले जात नाही, असे मोदी म्हणाले.

सिगारेटमुळे कर्करोग होतो, याला पुरावा काय ? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

     नवी देहली - सिगारेट ओढल्यामुळे कर्करोग होतो, याचा पुरावा काय ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्रशासनाकडून उत्तर मागवले आहे.
१. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्या. यू.यू. ललित यांच्या खंडपिठाने सिगारेटची पाकिटे साधी बनवण्याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले की, अनेक नागरिक धूम्रपान करत नाहीत; पण त्यांना कर्करोग होतो. तसेच अनेक नागरिक असे आहेत की, जे नेहमी सिगारेट ओढतात; पण त्यांना काहीच होत नाही. धूम्रपानामुळे कर्करोग होत असल्याचा दावा पुराव्यांसह सिद्ध करता येऊ शकतो का ?
२. प्रयाग येथील ६६ वर्षीय अधिवक्ता उमेश नारायण शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिगारेटची पाकिटे आकर्षक असल्याने युवा वर्ग त्याकडे आकर्षित होतो. या पाकिटांवर लिहिण्यात आलेल्या सूचनेकडेही नागरिक दुर्लक्ष करतात.

रिलायन्स, टाटा, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि एअरसेल या ६ दूरसंचार आस्थापनांत ४६ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! - महालेखापरीक्षक

जनतेची लुबाडणूक करून आणि वर अल्प उत्पन्न दाखवून देशाची फसवणूक 
करणार्‍या या आस्थापनांकडून सहस्रावधी कोटी रुपयांचा दंड वसूल केला पाहिजे !
      नवी देहली - देशातील रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि एअरसेल या ६ प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी त्यांचे उत्पन्न ४६ सहस्र कोटी रुपयांनी अल्प करून दाखवले आहे. तसेच शासनाचा १२ सहस्र ४०० कोटी रुपयांचा हिस्सा नाकारून घोटाळा केल्याचा दावा महालेखापरीक्षकांच्या अहवालात करण्यात आला आहे. या आस्थापनांनी वर्ष २००६-०७ आणि वर्ष २००९-१० च्या उत्पन्नांमध्ये हा घोटाळा केला असल्याचा ठपका महालेखापरीक्षकांनी ठेवला आहे. वर्ष २००९ मध्ये दूरसंचार आस्थापनांचा जमाखर्च तपासण्यास महालेखापरीक्षकांना बंदी घालण्यात आली होती; परंतु न्यायालयात झालेल्या खटल्यानंतर पुन्हा वर्ष २०१४ मध्ये महालेखापरीक्षकांना त्यासाठी अनुमती देण्यात आली.

(म्हणे), कन्हैया कुमार पंतप्रधान मोदी यांना टक्कर देऊ शकतो ! - लेखिका नयनतारा सहगल

     राष्ट्रभक्त मोदी यांची तुलना देशद्रोहाचा आरोप असणारा कन्हैया कुमार याच्याशी करणार्‍या लेखिका नयनतारा सहगल मोदीद्वेषीच होत ! उद्या सहगल आतंकवादी हाफीज सईद, मसूद अझहर यांच्याशीही मोदी यांची तुलना करतील !
     नवी देहली - नेहरू परिवाराशी संबंध ठेवणार्‍या लेखिका नयनतारा सहगल यांनी राजमोहन गांधी यांचे नवीन पुस्तक अंडरस्टॅडिंग द फाऊंडींग फादर्सच्या प्रकाशनाच्या वेळी म्हटले की, कन्हैया कुमार पंतप्रधान मोदी यांना टक्कर देणारा होऊ शकतो. सहगल म्हणाल्या की, कन्हैया कुमार याने केलेल्या भाषणांमध्ये आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून भारतामध्ये नवीन उर्जेचा संचार झाला आहे.

दुष्काळाचा प्रश्‍न बाजूला ठेवून शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचा गोंधळ !

  • राज्याची आर्थिक स्थिती ठीक नसतांना, तसेच राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना विधानसभेचे कामकाज वारंवार स्थगित करणारे लोकप्रतिनिधी खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू शकतील का ?
  • ३ वेळा कामकाज स्थगित !
  • अधिवेशनात विरोधकांकडून गोंधळ घालण्याची परंपरा कायम !
    
अर्थसंकल्पीय
अधिवेशन २०१६
मुंबई, १० मार्च (विशेष प्रतिनिधी) -
सर्व शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी सातत्याने सत्ताधार्‍यांच्या नावाने ओरड करणार्‍या आणि शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत मात्र दुष्काळाचा प्रश्‍न बाजूला ठेवून शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या त्यागपत्राची मागणी केली. या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गोंधळ घातला. विरोधकांच्या शासनविरोधी घोषणा आणि गोंधळ या कारणांमुळे विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. त्यानंतर कामकाजाला प्रारंभ झाल्यावर विरोधकांनी दोन वेळा असाच गोंधळ घातल्याने ५ आणि १५ मिनिटे असे दोन वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. (सभागृहाचा वेळ आणि पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी ! - संपादक)

सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या यांचा पुरस्कार देऊन गौरव !

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांना कोकण एकता 
प्रतिष्ठानकडून सर्वोत्कृष्ट सामाजिक पुरस्कार प्रदान
श्री. राजेश मोरे यांच्या हस्ते सत्कार
स्वीकारतांना सौ. वेदिका पालन
     ठाणे - डोंबिवली येथील कोकण एकता प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांना सर्वोत्कृष्ट सामाजिक पुरस्कार देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ८ मार्च २०१६ या दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, अध्यात्म आणि धर्मप्रसार इत्यादी विविध क्षेत्रांत पुढे असणार्‍या १० महिलांचा सत्कार केला. सौ. वेदिका पालन या अध्यात्म आणि धर्मप्रसार या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास पुढे असतात. त्यानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. सन्मान पत्र आणि पदक यांसह तुळशीचे लहान रोप देऊन प्रत्येकाचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला १०० जणांची उपस्थिती लाभली.

पाकिस्तानशी मैत्री होत नसेल, तर आरपारची लढाई करा ! - खासदार रामदास आठवले

     शिर्डी (जिल्हा नगर) - पाकिस्तानशी वारंवार चर्चा करूनही त्यांनी अतिरेक्यांना साहाय्य करण्याचे उद्योग थांबवलेले नाहीत. त्यांच्याशी मैत्री होत नसेल, तर आरपारची लढाई करा आणि कायमचा धडा शिकवा. केवळ पाकव्याप्त काश्मीरच नाही, तर पाकिस्तानच कह्यात घ्या, असा आक्रमक सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केंद्रशासनाला दिला आहे. (घटक पक्ष असलेल्या भारिपच्या आठवले यांचा सल्ला केंद्रशासन स्वीकारून पुढील पावले उचलणार का ? - संपादक)
      डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त खासदार आठवले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने देशभर समता रथाच्या माध्यमातून जाती तोडो, समता जोडो अभियानांतर्गत भारत भीम यात्रेचे आयोजन केले आहे. २६ जानेवारीपासून देशभर या रथाचा प्रवास चालू आहे. त्या रथाच्या महाराष्ट्र दौर्‍याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे लातूरमधील दीड लाख लोकांना स्थलांतरित करणार !

लोकहो, पाणीटंचाईचे भयावह वास्तव लक्षात घेऊन
येत्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधना करा !
      लातूर - येथे पाण्याच्या अतिटंचाईमुळे दीड लाख लोकांना स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे समजते. उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार असल्याने मार्चच्या शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपण्यात येणार आहेत, तसेच २ मास शिकवणीवर्गांनाही सुट्टी देण्यात येणार आहे. येथील लोकांना दिवसरात्र पाण्यासाठीच पायपीट करावी लागते. येथे औषधालाही पाणी नाही, अशी सध्याची स्थिती आहे. १ सहस्र लिटर पाण्यासाठी लोकांना ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

गोमांस बंदीविषयी बोललो, तर नोकरी जाईल ! - केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम्

      मुंबई - मोदी शासनाने घेतलेल्या गोमांस बंदी निर्णयाविषयी मत व्यक्त करण्यासही शासकीय अधिकारी धजावत नसल्याचे चित्र आहे. याविषयी मत जरी व्यक्त केले, तरी नोकरी जाऊ शकते, अशी धास्ती मोदी शासनाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम् यांना आहे.
     मुंबई विद्यापिठात नुकत्याच अरविंद सुब्रह्मण्यम् यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. गोमांस बंदी निर्णयामुळे शेतकर्‍याचे उत्पन्न किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे का, असा प्रश्‍न सुब्रह्मण्यम यांना विचारण्यात आला. त्यावर सुब्रह्मण्यम् म्हणाले की, जर मी या प्रश्‍नाचे उत्तर दिले, तर माझी नोकरी जाईल. मात्र तुम्ही प्रश्‍न विचारल्याविषयी धन्यवाद. (यावरून सुब्रह्मण्यम् यांचा गोमांस बंदीला विरोध आहे, असे स्पष्ट होते. शासकीय निर्णयाविषयी एकतानता नसलेले असे अधिकारी शासनाशी एकनिष्ठ काय असणार ? - संपादक)

आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का ! - अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली

      मुंबई, १० मार्च (वार्ता.) - विधानसभेत आज दुष्काळाच्या प्रश्‍नावर चर्चा चालू असतांना अनेक सदस्यांनी दुष्काळाच्या प्रश्‍नावर आपाआपली मते व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेसाठी उभे राहिले. या प्रश्‍नावर सदस्य आपली मते मांडत असतांना सभागृहात मुख्यमंत्री, महसूलमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री, पाणीपुरवठा मंत्री असे एकही मंत्री उपस्थित नव्हता. हे पाहून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पारा चढला. ते म्हणाले, दुष्काळाच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चा करत असतांना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नाही. दुष्काळाच्या प्रश्‍नाचे मंत्र्यांना गांभीर्य नाही. मंत्री उपस्थित नाहीत, केवळ आम्ही चर्चा करायची का ? मंत्री उपस्थित नसतील, तर आम्ही येथे गोट्या खेळायला आलो आहोत का, असे त्यांनी हातवारे करून मोठ्या आवाजात सभागृहात सांगितले. (आमदारांनी सभागृहात कशा पद्धतीने बोलावे, वागावे याची कार्यशाळा घेण्याची वेळ आता शासनावर आली आहे. यापूर्वीही अजित पवार यांनी धरणात पाणी नाही तेथे लघुशंका करायची का ? असे अश्‍लील वक्तव्य करून शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळले होते. आताही सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार असे वक्तव्य करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा अवमानच करत आहेत. - संपादक)

पुणे येथे महिला दिनानिमित्त सनातनच्या साधिकांचा गौरव

सत्कार स्वीकारतांना सौ. विजया भिडे (डावीकडे)
सन्मानचिन्ह स्वीकारतांना सौ. प्रीती कुलकर्णी (डावीकडे)

संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) येथील माजी मंत्र्यांच्या विहिरीत ४० बॉम्ब सापडले

       संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) - येथे माजी मंत्री मल्हारगौडा पाटील यांच्या मालकीच्या मळ्यातील विहिरीत गाळ काढताना ४० हून अधिक निर्जीव मॉर्टर बॉम्ब सापडले. ११ फूट खोलीवर सापडलेले ४० मॉर्टर बाँब मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटचे १९७० सालचे असल्याचे कळते. याविषयीची माहिती बेळगावच्या एम्एल्आयआर्सी सेंटरला दिली असून याची चौकशी करण्यात येत आहे.


(म्हणे) साधे बोलले, तरी देशद्रोही ठरवण्याची भीती !

मुसलमानांविषयी पुळका असलेले डॉ. बाबा आढाव यांचा कांगावा
      पुणे - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कुठल्या पद्धतीचे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजेत. मुसलमान तरुणांना चौकशीच्या नावाखाली पोलीस कधीही उचलून नेत आहेत. त्या समाजावर पोलीस खात्याच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. त्यामुळे मुसलमान तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (बहुसंख्य गुन्ह्यांत धर्मांध मुसलमानांचा सहभाग असेल, तर त्याला पोलीस तरी काय करणार ? - संपादक) त्यामुळे मुसलमान समाज ओलीस ठेवला आहे कि काय, असे वाटते. साधे बोलायचे म्हटले, तरी आपल्याला देशद्रोही ठरवतील, अशी सध्याची स्थिती आहे, असे टीकात्मक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले. (असे असते, तर एवढे बोलण्याचे तरी आढाव यांचे धैर्य झाले असते का ? आढाव एवढे बोलू तरी शकले असते का ? - संपादक)
     मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि मुस्लिम सत्यशोधक महिला मंच यांच्या वतीने मुसलमान महिलांच्या अधिकाराच्या संदर्भात पुणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ८ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी क्रांतीकारकांची उपेक्षा केल्याप्रकरणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने निषेध

स्वातंत्र्यवीरांचा जयजयकार करत 
काँग्रेस भवनातच काँग्रेसींना निषेधपत्र !
कार्यालयीन प्रमुखांना निषेधपत्र देतांना महासंघाचे कार्यकर्ते
       पुणे, १० मार्च (वार्ता.) - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुद्वेषाच्या आणि राजकारण करण्याच्या नादात संसदेत गांधी आमचे आणि सावरकर तुमचे असे म्हणून क्रांतीकारकांचे मेरुमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उपेक्षा केली. त्या माध्यमातून त्यांचा हिंदुत्वद्वेषही प्रकट केला. याविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने येथील काँग्रेस भवनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार करत कार्यालयीन प्रमुखांना निषेधपत्र देण्यात आले. निवेदन देतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी काँग्रेसने तात्काळ देशवासियांची क्षमायाचना करावी, अशी मागणीही महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

त्रिंबक नगरपरिषदेने हिंदु जनजागृती समितीचे मानले जाहीर आभार

सन्मानचिन्ह स्वीकारतांना (उजवीकडून दुसर्‍या)
कु. प्रतिक्षा कोरगावकर
     श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, १० मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी काही नास्तिकतावादी महिलांनी आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला त्रिंबक नगरपरिषद, समस्त हिंदुत्ववादी संघटना, अनेक ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी कृतीशील विरोध दर्शवला होता. यामुळेच त्या नास्तिकवादी महिलांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. आम्हाला हे सर्व समिती आणि संस्था यांच्यामुळे शक्य झाले, अशी भावना त्रिंबक नगरपरिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या वेळी समिती आणि संस्था यांना श्री त्र्यंबकेश्‍वराची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. हा सत्कार नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा आणि उपनगराध्यक्ष श्री. संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यातील साडेतीन लक्ष संस्थांचा थांगपत्ता नाही ! - मुख्यमंत्री

जय जय महाराष्ट्र माझा !
      मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात मोठ्या संख्येने स्वयंसेवी संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे; मात्र त्यातील अनेक संस्था आहेत, ज्या नोंदणी केल्यानंतर त्यांच्या कार्याचा थांगपत्ताच नसतो. राज्यात ७ लक्ष संस्थांची नोंदणी झाली असून त्यातील साडेतीन लक्ष संस्थांचा थांगपत्ता नाही. त्यांनी ७ ते ८ वर्षे शासनाला हिशेब सादर केले नाहीत कि कार्यकारिणीची माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकारावर आळा घालवण्यासाठी शासन महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक २०१५ मध्ये आणखी नवीन सुधारणा करून हे विधेयक पुन्हा सभागृहात सादर करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

फलक प्रसिद्धीकरता

अशा राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार का ?
     तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या कार्यकाळातील इशरतजहाँ प्रकरणातील पालटण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील निवेदन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयातून गहाळ झाले आहे, तसेच तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्याच्या संदर्भातील धारिकाही गृहमंत्रालयातून गहाळ आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Congress shasan kalme Ishratjaha prakaranme durust kiya gaya pratignapatra kendriya gruhamantralayse lapta !
kya ye Congresska Muslimprem nahi ?

जागो ! : कांग्रेस शासन काल में इशरतजहाँ प्रकरण में दुरुस्त किया गया प्रतिज्ञापत्र केंद्रीय गृहमंत्रालय से लापता !
क्या ये काँग्रेसका मुस्लीमप्रेम नही ?

धर्माभिमानी पत्रकार मिलिंद चवंडके यांना राज्यस्तरीय महंत सुनीलगिरीजी संत गौरव पुरस्कार प्रदान

पत्रकार श्री. मिलिंद चवंडके (हार घातलेले) यांना
पुरस्कार प्रदान करतांना रामायणाचार्य रामराव महाराज ढोक
       नगर - येथील धर्माभिमानी पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांना अशोकनगर येथील पवनपुत्र देवस्थान सेवा आश्रमाच्या वतीने पहिला राज्यस्तरीय महंत सुनीलगिरीजी संत गौरव पुरस्कार महाशिवरात्रीला प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र, गुलाबपुष्पांचा हार, श्रीफळ आणि ५ सहस्र १ रु. असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक म्हणाले की, नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चाललेल्या संतांच्या कार्यामध्ये स्वत:हून सक्रीय सहभागी होत या कार्याचा सुगंध सर्वदूर पोहोचवण्याची सेवा श्री. चवंडके यांनी नि:स्वार्थ आणि निरपेक्षपणे केली. या पुरस्काराच्या रूपाने त्यांना देवतांसह संतांचे कृपाशीर्वाद लाभले आहेत. या वेळी उपस्थित महंत सुनीलगिरीजी महाराज म्हणाले की, स्वत:पेक्षा संतांच्या कामाला महत्त्व दिल्यामुळे आज माझ्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. या वेळी अनेक संत-महंत उपस्थित होते.

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

इशरतचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवणारे चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्याची मागणी !
जंतरमंतर येथे आंदोलनाच्या वेळी घोषणा
देतांना धर्माभिमानी हिंदू
    देहली - लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत लिखाण करणारे डॉ. यारल्लगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचा पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, या मागण्यांसाठी ९ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे धर्माभिमानी हिंदूंनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. याबरोबरच काश्मीरमध्ये ज्या मशिदींमधून देशद्रोही घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील भोंगे काढण्याबरोबरच देशातील अन्य मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगेही काढण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

महसूल प्रशासनाकडून पुरातन अर्धनारी नटेश्‍वर मंदिराला कागदपत्रे सादर न केल्यास मंदिर पाडण्याची नोटीस !

अधिकृत मंदिरांवर कायद्याचा बडगा उगारणारे प्रशासन अनधिकृत मशिदी आणि 
चर्च यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !
     वेळापूर (सोलापूर) - येथील १३ व्या शतकातील प्रसिद्ध पुरातन अर्धनारी नटेश्‍वर मंदिराला महसूल प्रशासनाने कागदपत्रे सादर न केल्यास मंदिर पाडण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे महसूल प्रशासनाविषयी भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
     या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याविषयी असलेले पुरावे लक्षात घेऊन हे मंदिर केंद्रशासनाच्या पुरातत्व विभागाने कह्यात घेतले आहे. असे असूनही पूर्ण वस्तूस्थिती जाणून न घेता मंदिराने अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.

आसाममध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटनासाठी ठिकठिकाणी बैठका

     धुबरी (आसाम), १० मार्च (वार्ता.) - धुबरी जिल्ह्यातील रवींद्रसरणी भागातील शिवमंदिर (धुबरी), सुखातिखाता (गोलकगंज, रूपशी) आणि कोक्राझार येथे हिंदूंची सद्यस्थिती आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-उत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी तरुणांचे प्रबोधन केले. याचा ४५ हून अधिक युवकांनी लाभ घेतला. या ठिकाणी ठराविक कालांतराने धर्मशिक्षणासाठी एकत्र बसण्याचे निश्‍चित करण्यात आले. कोक्राझार येथील बैठकीचे आयोजन करण्यासाठी श्री. रतन तालुकदार यांनी पुढाकार घेतला.

कचर्‍याची विल्हेवाट न लावणार्‍या महापालिकांना शासनाचे भूखंड मिळणार नाहीत ! - मुख्यमंत्री

देवनार कचराभूमीतील आगीचे प्रकरण
       मुंबई, १० मार्च (वार्ता.) - येथील देवनार कचराभूमीत ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमुळे गोवंडी, मानखुर्द, चेंबूर आणि दक्षिण मुंबई ते पामबीच रस्ता परिसरात धुराचे साम्राज्य पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या कचराभूमीला आग लावल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून १ मासात त्याचा अहवाल प्राप्त होईल. ही समिती नियुक्त केल्याने राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) द्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही. येथून पुढे नगरपालिका आणि महापालिका यांना कचरा साठवण्यासाठी शासनाचे भूखंड उपलब्ध करून देतांना कचरा न साठवता त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ज्या नगरपालिका आणि महापालिका कचर्‍यावर प्रक्रिया करून कचर्‍याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांना कचर्‍यासाठी शासनाचे भूखंड मिळणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्चला विधानसभेत दिली. आगीविषयीच्या मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

विरोधकांकडून शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कृती न करता केवळ 
सवंग लोकप्रियतेसाठी धडपडणारे दोन्ही काँग्रेसचे लोकप्रतिनिधी !
        मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या १० मार्च या दिवशी विरोधकांनी शासनाच्या विरोधात आक्रमक होत विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडून जोरदार घोषणा दिल्या. हातात निषेधाचे फलक घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विधानभवनाच्या आवारात आले. या वेळी शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली.

अतर्क्य घटनांचा ऐतिहासिक संदर्भ असतांनाही ते नाकारणारे नतद्रष्ट अभ्यासक !

      आज इतिहासातील केवळ एका लहानशा काळातील एक विशिष्ट प्रदेश आणि महापुरुषांशी संबंधित थोड्याशा ऐतिहासिक ज्ञानाहंकाराने ग्रस्त झालेली तरुणाई आपण पहातो. ते स्वतःचा धर्म-संस्कृती, संत अन् ईश्‍वरी अवतार आणि त्यांची जीवनचरित्रे ज्या ग्रंथांमध्ये जशीच्या तशी रेखाटली आहेत, असे ग्रंथांना नाकारतात. ही तरुणाई पाहून माझ्या मनात बर्‍याच दिवसांपासून हा लेख लिहिण्याची इच्छा होती. माझा हृदयस्थ ईश्‍वर मला त्यासाठी सारखा प्रेरित करत होता.

परीक्षांना कॉपीचे ग्रहण !

     महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी यांच्या परीक्षांत उघडकीस आलेल्या अन् येत असलेल्या कॉपी (नक्कल) प्रकरणांकडे लक्षवेध होत आहे. कॉपी करणे म्हणजे चोरी करणेच होय. मग ती एकदा करा वा त्याहून अधिक वेळा. मंडळाच्या परीक्षांवर प्रसारमाध्यमांचे विशेष लक्ष असल्याने परीक्षा केंद्रांवर काय लबाडी चालू आहे, हे तात्काळ उघडकीस येते. कॉपी करण्याची लाचार सवय जडलेले ते विद्यार्थी अन्य ठिकाणीही लाचारी करत असण्याची शक्यता कशी नाकारता येईल ? अभ्यासाविषयी पराकोटीची अनास्था असलेले विद्यार्थी दुसर्‍याच्या उत्तरपत्रिकेत डोकावून कॉपी करतांना दुसर्‍या परीक्षार्थीचाही अमूल्य वेळ वाया घालवतात. कॉपी करतांना पकडल्यावर पर्यवेक्षकांना धमकावणे, मारहाण करणे, असे प्रकार करणारे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी या पवित्र शब्दास कलंक आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात, त्याप्रमाणे भविष्यातील अशांची वाटचाल कोणत्या मार्गावर असेल, हे त्यांचे घृणास्पद कृत्यच सांगते.

हिंदु राष्ट्र स्थापनेतील क्रांतीकारक !

     भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, खुदिराम बोस यांनी स्वातंत्र्यासाठी बॉम्बस्फोट केले. कान्हेरे, चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांनी स्वातंत्र्यासाठी अत्याचारी इंग्रज अधिकार्‍यांचा वध केला. हे सर्व इंग्रज राजवटीत गुन्हेगार आणि आतंकवादी ठरवले गेले; पण इंग्रज राजवटीतही राष्ट्रप्रेमी त्यांना क्रांतीकारक म्हणत. या सर्वांचा स्वतंत्र भारतानेही क्रांतीकारक म्हणून गौरव केला. त्याचप्रमाणे आज हिंदुत्ववाद्यांना असहिष्णु, आतंकवादी संबोधले जात असले, तरी खरे राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांच्या दृष्टीने ते क्रांतीकारक आहेत आणि हिंदु राष्ट्रातही ते क्रांतीकारक म्हणूनच गौरवले जातील.

युपीए : युनायटेड पाकिस्तानी अलायन्स ?

श्री. भाऊ तोरसेकर
१. युपीएच्या काळात मनमोहन सिंह यांना अंधारात ठेवून 
कोणी भलताच माणूस पीएम्ओ चालवत होता !
     गेल्या मंगळवारी आर्.व्ही.एस्. मणि यांची जी मुलाखत टाईम्स् नाऊ वाहिनीने प्रक्षेपित केली, त्यातून युपीए म्हणून दहा वर्षे देशात राज्य करणारी मंडळी कोणाकडून आदेश घेत होती ? असा प्रश्‍न उभा राहिला आहे; कारण त्यांचे अनेक निर्णय हे पाकिस्तानला आणि पाकप्रणित जिहादी घटकांना लाभदायक ठरावेत, असेच होते. मनमोहन सिंह हे त्यांच्या बुद्धीने चालणारे पंतप्रधान नव्हते, तर सोनियांच्या हातातील कठपुतळी बाहुली होते. हे अवघ्या जगाला ठाऊक आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. केवळ तसे काही बोलायचे नाही, ही बुद्धीमंत आणि विचारवंत असण्यातली अट होती. म्हणून कुठलीही वाहिनी वा वर्तमानपत्रात त्याचा सहसा ऊहापोह झाला नाही; पण बारकाईने बघितले, तर मनमोहन सिंह यांना शासन कसे चालले आहे ? वा कोण कुठले निर्णय घेतो आहे ? त्याचा थांगपत्ता नव्हता. हे तेव्हाही दिसत होते, उदाहरणार्थ कोळसा घोटाळ्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

मंदिरे आणि धर्म हे सत्ता अन् संपत्ती यांचे निदर्शक !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांची स्थिती गेल्या ३२ वर्षांत शेकडो पटींनी भयावह झाली आहे ! 
     कोल्हापूर येथे एका प्रसंगी भाषण करतांना न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी पुढील आशयाचे उद्गार काढले, भारतामधील मंदिरे आणि धर्म हे सत्ता अन् संपत्ती यांचे निदर्शक आहेत. देव किंवा अध्यात्मवाद यांच्याशी त्यांचा संबंध नाही. - महाराष्ट्र हेराल्ड (१६.१२.१९८२) (प्रज्ञालोक, १९८३)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधकांनो, केंद्रस्तरावरील विक्री न करावयाचे साहित्य दायित्व असलेल्या साधकांकडे जमा करा !

      मार्च मासात सर्व जिल्हे, तसेच प्रभाग यांमधील विक्री न करावयाच्या साहित्याची प्रत्यक्ष साठा पडताळणी करायची आहे. केंद्रस्तरावरील सर्व साधकांनी त्यांच्याकडील कापडी फलक, फ्लेक्स, पत्रके, भित्तीपत्रके, तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी साहित्य केंद्रस्तरावरील दायित्व असणार्‍या साधकाकडे जमा केले नसल्यास ते लवकरात लवकर जमा करावे.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

घर नव्हे, तर साक्षात् मंदिर होऊन चैतन्याची उधळण करणारी प.पू. फडकेआजींची खोली !

     
प.पू. फडकेआजी
सनातनच्या १ ल्या संत प.पू. फडकेआजी यांचे देवद, पनवेल येथील सनातन संकुलात घर आहे. प.पू. आजींनी देहत्याग केल्यानंतरही या खोलीतील त्यांचे चैतन्य अजूनही टिकून आहे. वर्ष २००७ मध्ये प.पू. डॉक्टर प.पू. आजींच्या खोलीत आले होते. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वी पायरीवर असतांनाच आजींची खोली म्हणजे मंदिरच झाले आहे अगदी ! असे उद्गार काढले. त्यामुळे या खोलीत काही कालावधीत वस्तू, साहित्य, खोली यांत सातत्याने काही ना काही पालट होतात. या पालटांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. प.पू. फडकेआजींच्या खोलीविषयी जाणवलेली सूत्रे
        प.पू. आजींच्या खोलीतील चैतन्यात पुष्कळ वाढ झाल्याचे जाणवते. खोलीत असतांना देह हलका असल्याचे जाणवते. पटलावर ठेवलेली छायाचित्रे आणि अन्य वस्तू यांमध्येही आता पुष्कळ हलकेपणा जाणवतो.

साधकांनो, सेवेची फलनिष्पत्ती वाढवून शीघ्र गतीने प्रगती करा !

     
पू. संदीप आळशी
गुरूंचे मन जिंकायची गोष्ट म्हणजे सेवा ! सेवा फलनिष्पत्तीपूर्ण होणे अपेक्षित असते; कारण अशा सेवेमुळेच गुरूंची कृपा होऊन प्रगती लवकर होत असते. सध्या आपत्काळ असल्यामुळे साधकांच्या त्रासांमध्ये वाढ होत आहे. सेवेतून साधकांवर आध्यात्मिक उपायही होतात; पण त्यासाठी सेवा फलनिष्पत्तीपूर्ण होणे आवश्यक असते.
१. सेवेच्या फलनिष्पत्तीच्या संदर्भातील घटकांचे विश्‍लेषण
१ अ. सेवेचा कालावधी : उपलब्ध वेळेचा सुयोग्य वापर करून अधिकाधिक घंटे सेवा करावी. अनावश्यक वेळ न घालवता प्रत्येक सेवेनुसार त्या वेळेला आवश्यक तेवढाच वेळ द्यावा.
१ आ. सेवेतील परिपूर्णता साध्य करणे : स्वतःकडून होणार्‍या चुकांचा अभ्यास करून चुका न होण्यासाठी सारखे प्रयत्नशील रहावे.

स्वावलंबी आणि सर्वांशी आदराने अन् नम्रपणे वागणार्‍या जुवे, रत्नागिरी येथील कै. सुनंदा एकनाथ चव्हाण (वय ८३ वर्षे) !

      
कै. सुनंदा चव्हाण
रत्नागिरी येथील साधिका सौ. माधवी गजानन पाटील यांच्या मातोश्री कै. सुनंदा एकनाथ चव्हाण यांचे २.३.२०१६ या दिवशी देहावसान झाले. ११.३.२०१६ या दिवशी त्यांचा १० वा दिवस आहे. सौ. माधवी यांच्या घरी काही काळ त्या निवासासाठी आल्यानंतर त्यांच्यात घडून आलेले काही पालट, तसेच त्यांची अन्य गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. आईमधील पालट
१ अ. नामजपादी उपायांमुळे प्रकृतीत सुधारणा होणे : काही दिवसांपूर्वी आई आमच्या घरी आली. ती इकडे येण्यापूर्वी काहीच खात नव्हती. तिला पेजही पिता येत नव्हती. काही खाता-पितांना तिला त्रास व्हायचा. ईश्‍वराच्या कृपेने आमच्याकडे आल्यानंतर तिच्यात पुष्कळ पालट जाणवू लागले. ती माझ्यासमवेत नामजपाला बसायची. नामजप करत असतांना तिच्या तोंडवळ्यावर एक वेगळाच भाव दिसे. प्रार्थना, आध्यात्मिक उपाय आदींमुळे इथे आल्यापासून तिची प्रकृती चांगली झाली.

अर्थहीन असे तुमची प्रार्थना ।

      
श्री. उदयकुमार उपाध्ये
काही ठिकाणी अवर्षण आणि पावसाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्यामुळे हवालदिल मनुष्य रडकुंडीला येऊन निसर्गाला प्रार्थना करतोय खरं; पण क्रुद्ध निसर्ग त्याला सांगतोय....
तोडा तोडा झाडे तोडा । डोंगर फोडून माती काढा ।
आणि वरती नित्य ओरडा । पाऊस पाडा पाऊस पाडा ॥ १ ॥
धूर धूळ ती जगात भरता । नद्यांत नाले नित्य सोडता ।
आणि वरती नित्य प्रार्थिता । पाऊस पाडा पाऊस पाडा ॥ २ ॥
प्राण्यांची नित्य कत्तल करता ।
रत्तल रत्तल (किलो किलो) रक्त सांडता ।
आणि वरती नित्य प्रार्थिता । पाऊस पाडा पाऊस पाडा ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर श्री. आशिष जोशी यांना आलेल्या अनुभूती

श्री. आशिष जोशी
१. वर्ष २०१२ नंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये प.पू. डॉक्टरांना आध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्यावर जाणवलेले पालट
१ अ. वर्ष २०१२
१. प.पू. डॉक्टरांकडून चैतन्य प्रक्षेपित होत होते आणि त्यांचे शरीर पिवळे दिसत होते.
२. मला त्यांच्याकडे अधिक काळ पहाणे शक्य होत नव्हते.
१ आ. वर्ष २०१६
१. प.पू. डॉक्टरांकडे पाहिल्यावर मला सूक्ष्मातून पांढरा प्रकाश दिसला.
२. त्यांच्यातील निर्गुण तत्त्वात वाढ झाली आहे.
२. प.पू. डॉक्टरांच्या सत्संगासंबंधी पूर्वसूचना मिळणे
         प.पू. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी प.पू. डॉक्टर मला मार्गदर्शन करत आहेत, हे दृश्य मला काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) सूक्ष्मातून दिसले होते. भेटीच्या प्रसंगी प्रत्यक्षात सर्वकाही अगदी तसे घडत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला श्रीकृष्णाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
- श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१०.२.२०१६)
       (आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

स्वर (श्‍वास) पालटल्यावर मागील ७ दिवसांपासून असणारी डोकेदुखी 
थांबणे, तसेच डोकेदुखीमुळे मनाची होणारी अस्वस्थता आणि चिडचिडही दूर होणे
       मागील ७ दिवसांपासून माझी डोकेदुखी पुष्कळ वाढली होती. त्यावर औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. ११.२.२०१६ या दिवशी पू. गाडगीळकाकांनी मला उजव्या कानात कापूस घालून स्वरोदयशास्त्रानुसार स्वर (श्‍वास) पालटण्याचा उपाय करायला सांगितले. दुपारी १.३० वाजता मी हा उपाय करायला आरंभ केला. कानात कापूस ठेवल्यावर त्याक्षणीच माझी २० टक्के डोकेदुखी न्यून (कमी) झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७० टक्के डोकेदुखी आणि मानसिक त्रास न्यून झाला. डोकेदुखीमुळे मनाची होणारी अस्वस्थता आणि चिडचिड उपाय सुरू केल्यावर न्यून होत गेली. रात्री १० वाजता माझ्या मनातील सर्व अनावश्यक विचार न्यून झाले होते, तसेच डोकेदुखीही थांबली होती. या उपायांच्या वेळी मी काही विशेष प्रार्थनाही केली नव्हती; केवळ कानात कापूस ठेवला, तरी एवढा परिणाम झाला.
- श्री. सुदर्शन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधकाला ईश्‍वराच्या खजिन्यातून स्थिरता, निरपेक्षता, प्रीती, असे अनेक दैवी मोती प्राप्त झाल्यावर तो मोक्षाधिकारी होणे

        साधक साधनेच्या एका टप्प्याला आला की, ईश्‍वराच्या खजिन्याचे द्वार त्याच्यासाठी उघडे होते. साधकाला त्या खजिन्यातून हळूहळू स्थिरता, निरपेक्षता, प्रीती, असे अनेक दैवी मोती प्राप्त होतात. या मोत्यांची माळ पूर्ण झाल्यावर साधक मोक्षाधिकारी बनलेला असतो. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०१६)

पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांच्याकडे पहात नामजप करतांना स्वतःच्या शरिरात गारवा जाणवणे आणि नामजपातून आनंद मिळणे अन् त्यांच्या उजव्या चरणावर निळ्या रंगामध्ये ॐ दिसणे

     
पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
२९.१.२०१६ या दिवशी एस्.एस्.आर.एफ्.च्या पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली (पू. भावनाताई) या नामजप करायला बसल्या होत्या. त्याच खोलीत मी त्यांच्या चरणांकडे बघत नामजप करत होते. तेव्हा माझ्या मनाला हलकेपणा वाटला, शरिरात गारवा जाणवला आणि स्वतःला नामजपातून आनंदही मिळाला, तसेच मला पू. भावनाताईंच्या उजव्या चरणावर निळ्या रंगामध्ये ॐ दिसला.
- सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०१६)
      (आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

मिरज येथील सनातन आश्रमात सेवा करणार्‍या काही साधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. सर्व साधकांची साधना चांगली होण्यासाठी 
तळमळीने प्रयत्न करणार्‍या कु. वर्षा नकाते !
१ अ. साधकांच्या प्रगतीचा ध्यास : सर्व साधकांची साधना चांगली व्हावी, याचा ताईला सतत ध्यास लागलेला असतो. त्यामुळे तिच्याकडून मी साधकांसाठी काय करू शकते ?, असाच सतत विचार होत असतो.
१ आ. देवाशी अनुसंधान : ताई सतत देवाला आळवून त्याचे साहाय्य घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाणवते.
१ इ. विचारण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती : प्रत्येक सूत्र विचारून घेऊन ते देवाला अपेक्षित कसे करता येईल ?, याकडे तिचे सतत लक्ष असते. त्यामुळे कोणताही प्रसंग आला, तरी देव आपल्याला साहाय्य करणारच आहे, या श्रद्धेमुळे तिला परिस्थिती सहज स्वीकारता येते.

स्वतःतील चैतन्य जागृत करण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली अमूल्य सूत्रे !

प.पू. पांडे महाराज
१. कोणतेही कार्य करतांना भगवंताच्या अनुसंधानात राहून कामना न ठेवता भगवंताची सेवा करत आहे, असे समजून, झोकून देऊन, भावपूर्ण केल्यास, ते कार्य पूर्ण होईल. भगवंताला असे कर्म अर्पण केल्यास भगवंताची प्राप्ती होते.
      असे केल्याने जी पोकळी निर्माण होईल, त्याने अंत:करण शुद्ध होईल आणि भगवंत त्या व्यक्तीचे हृदयाकाश चैतन्याने भरून काढेल.
२. चैतन्य स्वसंवेद्य आहे. ते कोणत्याही स्थितीत काहीही करू शकते. चैतन्य म्हणजे कल्पतरू ! चैतन्यात इतकी शक्ती आहे की, ते कल्पतरूसारखे कार्य करते. याहीपेक्षा त्यात एवढी शक्ती आहे की, ते सर्व प्रकारचे कार्य करू शकते. चैतन्य शक्ती विलक्षण कार्य करू शकते.
३. साधना म्हणजे स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन करणे. सर्वस्व अर्पण करणे, म्हणजे देहातील कचरा काढणे. निर्वात पोकळी निर्माण करणे. ही पोकळी भगवंत नामाने, म्हणजे चैतन्याने भरून काढेल.
४. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी । हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, म्हणजे नामस्मरण करा, म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात रहा.
पुण्याची गणना कोण करी ।, म्हणजे पोकळी निर्माण होणे, म्हणजे चैतन्यमूर्ती व्हाल.
       देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।
      वरील प्रक्रियेने असा क्षण येईल की, मुक्ती साध्य होईल. भगवंतप्राप्ती सहजसाध्य होईल.
- श्री. नरेंद्र दाते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१२.२०१५)

हनुमान जयंतीनिमित्त प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमानजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा हनुमानजयंतीच्या उत्सवाची स्थळे, देवस्थाने आदी सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. उपलब्ध प्रसारसाहित्य खालीलप्रमाणे -
१. हनुमानाच्या उपासनेमागील शास्त्र सांगणारे ए-५ आकारातील हस्तपत्रक
२. २.२५ फूट X ३.५ या आकारातील मारुतीची उपासना हा फलक (याची कलाकृती सोबत दिली आहे.)

बुद्धीचा विचार न करता महर्षींनी सांगितल्याप्रमाणे लगेच तंतोतंत आज्ञापालन करून प.पू. डॉक्टरांचे, तसेच साधकांचे सर्व प्रकारचे क्लेष दूर करण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र प्रयत्नरत असणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् !

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी 
पिळ्ळैयारपट्टी (शिवगंगा) येथील स्वयंभू गजानन मंदिर
अभिषेक तीर्थाचा पवित्र कलश डोक्यावरून घेऊन जातांना वैदिक ब्राह्मण
 १. श्री गजाननाच्या स्थानी जाऊन 
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर 
करण्यासाठी प्रार्थना करण्यास महर्षींनी सांगणे
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१ अ. शिवगंगा येथून जवळ असणार्‍या पिळ्ळैयारपट्टी गावातील स्वयंभू श्री गजाननाच्या उद्भवामागील इतिहास : १४.२.२०१६ या दिवशी शिवगंगा येथून जवळ असणार्‍या पिळ्ळैयारपट्टी (पिळ्ळैयार म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी हे पहिले मंदिर आहे. हे मंदिर एक सहस्र वर्षांपूर्वी पल्लव राजांच्या काळात बांधले गेले आहे. गजाननाचा आकार डोंगरातूनच उत्पन्न झाला आहे. मंदिरामागे गेल्यास या डोंगराचे आपल्याला दर्शन घडते. गजाननाच्या स्वयंभू आकाराच्या रहस्याचा कालखंड कोणालाही ठाऊक नाही. या गजाननाच्या उजव्या हातात शिवपिंड धरलेली आढळून येते. मूर्तीमागे डोंगरातच एक शिवपिंडही आपोआप तयार झालेली आहे; परंतु या शिवपिंडीचे आपल्याला दर्शन घेता येणे शक्य होत नाही.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

समष्टीसाठीची साधना कोणी करावी, यासंदर्भात लक्षात आलेली सूत्रे

        सनातन संस्थेवर येणारी संकटे दूर व्हावी, यासाठी काही संत मंत्रपठण इत्यादी करायला सांगतात. मंत्रपठण कोणी करावे, यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.
१. बुद्धीचा विचार : प्रथम त्रास असलेल्या साधकांना पठण करायला सांगितले; कारण त्यामुळे सनातन संस्थेला होणार्‍या लाभाबरोबरच त्या साधकांनाही लाभ होईल, असे वाटले.
२. आध्यात्मिक विचार : नंतर लक्षात आले की, त्रास नसलेल्या साधकांनी पठण करणे जास्त योग्य होईल; कारण त्यामुळे पठणातील शक्तीचा थोडाही अंश त्रास असलेल्या साधकांचा त्रास न्यून होण्यासाठी वापरला न जाता पूर्ण शक्ती सनातन संस्थेवर येणार्‍या संकटांना तोंड देण्यासाठी वापरली जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. 
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, हिंदूंच्या सद्यस्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक 
स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !
     मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, पुढे हिंदू अल्पसंख्यांक होणार. याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे केवळ हिंदु धर्मच असणार आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मनुस्मृतीचा धसका !

संपादकीय
     मनुस्मृतीची विक्री थांबवा, नाहीतर हिंसक प्रत्युत्तराला सिद्ध रहा. या ग्रंथाची विक्री करणार्‍या दुकानांची आणि विक्रीकेंद्रांची तोडफोड करू, अशी चेतावणी देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या विषयाला धरून दूरचित्रवाहिनीवर चर्चासत्रही झाले. चर्चासत्रात सहभागी झालेल्या या धर्मग्रंथाच्या विरोधकांनी स्वतःच्या विचारसरणीच्या मर्यादा दाखवल्या. जे वक्ते या धर्मग्रंथाचा अभ्यास करून आले होते, त्यांचा वादविवाद ऐकावासा वाटला. आमदार आव्हाड यांनी दिलेली चेतावणी कुणाला असहिष्णुतेची ललकारी वाटली नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn