Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री रामकृष्ण परमहंस जयंती

(म्हणे) मनुस्मृतीची विक्री थांबवा, नाहीतर हिंसक प्रत्युत्तराला सिद्ध रहा !

जातीद्वेषाची कावीळ झालेल्या जितेंद्र आव्हाड यांचे अभिव्यक्ती 
स्वातंत्र्यावर घाला घालणारे आणि चिथावणारे असहिष्णु वक्तव्य !
      मुंबई - मनुस्मृतीची विक्री थांबवा, नाहीतर हिंसक प्रत्युत्तराला सिद्ध रहा. आम्ही या ग्रंथाची विक्री करणार्‍या दुकानांची आणि विक्रीकेंद्रांची तोडफोड करू, अशी चेतावणी देणारेे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (२ सहस्र ३०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंदूंच्या या आद्य धर्मग्रंथाचा द्वेष करणारे हिंदुद्रोही जितेंद्र आव्हाड ! आव्हाडांना आद्यग्रंथ मनुस्मृतीचे महत्त्व काय कळणार ? आव्हाडांनी मनुस्मृतीचे कधी वाचन केले आहे का ? केवळ स्टंटबाजीसाठी या ग्रंथात शूद्र आणि स्त्रिया यांना तुच्छ लेखले गेलेले आहे, असा अपसमज पसरवून आव्हाड जातीयवाद आणि विद्वेष पसरवत आहेत ! सध्या जिहादच्या नावाखाली आखातात रक्तपात आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. ही शिकवण जिहाद्यांना कुठून मिळते, याविषयी आव्हाड काही बोलतील का ? - संपादक)      वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांनी सार्थ श्रीमनुस्मृती अशा नवीन नावाने मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर करून प्रकाशन केले आहे.
ग्रंथाची विक्री थांबवून फौजदारी कारवाई करा ! 
- डॉ. राजेंद्र पडोळे, सचिव, तेली समाज महासंघ
     जाणीवपूर्वक हा ग्रंथ सार्वजनिकरित्या विक्रीस आणण्यात आला आहे.

(म्हणे) भारतीय सैनिक काश्मीरमध्ये बलात्कार करतात !

साम्यवादी कन्हैया कुमार याचे पुन्हा देशद्रोही विधान !
देशासाठी प्राण देणार्‍या सैनिकांप्रती कृतघ्नतेचे विधान 
करणार्‍या कन्हैयाला तात्काळ कारागृहात डांबा !
     नवी देहली - येथील जेएन्यू विद्यापिठात आतंकवादी महंमद अफझलचा स्मरणदिवस साजरा करून भारत तेरे टुकडे होंगे, इंशाल्लाह इंशाल्लाह, कश्मीर की आझादी तक जंग रहेगी जंग रहेगी, अशा देशद्रोही घोषणाबाजीप्रकरणी जामिनावर सुटलेला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने आता आणखी एक देशद्रोही विधान केले आहे. झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कन्हैयाने भारतीय सैनिक काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करत आहेत, असे म्हटले आहे. (पाकिस्तान आणि जिहादी आतंकवाद्यांच्या समर्थकांची भाषा बोलणार्‍या कन्हैया कुमारवर तात्काळ खटला चालवून कठोर शिक्षा करा ! देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैयाचे समर्थन करणारे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी आदींना कन्हैयाचे हे विधान मान्य आहे का ? - संपादक) जागतिक महिला दिनानिमित्त कन्हैया कुमार याने जेएन्यूत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आतंकवादी इशरतजहाँला शहीद म्हणणे आणि मनुस्मृति ठेवणारी दुकाने फोडण्याची धमकी देणे, हाच जितेंद्र आव्हाड यांचा घटनाद्रोह ! - सनातन संस्था

     मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड यांना माहिती नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन प्रतिकात्मक केले होते; मात्र त्याच बाबासाहेबांनी २४ फेब्रुवारी १९४९ यादिवशी संविधान निर्माती सभेसमोर भाषण करतांना म्हटले होते, ज्या १३७ लोकांनी स्मृति लिहिल्या आहेत, त्यामध्ये मी उल्लेखलेल्या याज्ञवल्क्य आणि मनु या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत. असे असतांना विनाकारण मनुस्मृतीवर बंदी घातल्याचा खोटारडेपणा करून आव्हाड ज्या दुकानांमध्ये ती विक्रीसाठी असेल, त्या दुकानांची तोडफोड करू, अशी धमकीची भाषा करत आहेत. हाच का त्यांचा गांधीवाद ? प्रत्यक्षात आव्हाड यांनी केवळ घटनेने दिलेले लेखनस्वातंत्र्य तर संकटात आणले आहेच, त्याशिवाय ते आतंकवादी असलेल्या इशरतजहाँला शहीद म्हणून घटनाद्रोहच करत आहेत, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
    मनुस्मृतीचा कोणताही अभ्यास न करता तिच्यावर टीका करणे, हे अविवेकी आहे. महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात मनुस्मृतीने सर्वांत आधी महिलांना संपत्तीतील चौथा हिस्सा दिला आहे, याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कौतुकही केले आहे.

(म्हणे) मनुस्मृतीवर दहा वर्षांपूर्वी बंदी !

मनुस्मृतीवर बंदी नसतांनाही प्रसिद्धीमाध्यमांचा गोबेल्स प्रसार !
     मनुस्मृतीवर दहा वर्षांपूर्वी बंदी घातलेली असतांना त्याची विक्री चालू असल्याने वाद उभा रहाण्याची शक्यता आहे, अशी विधाने प्रसारमाध्यमांतून करण्यात येत आहेत. (प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या प्रसारमाध्यमांनी कधी अभ्यासपूर्ण वृत्त दिले आहे, असे झाले आहे का ? प्रसारमाध्यमांतील किती जणांनी मनुस्मृति वाचली आहे ? अशा पाट्याटाकू वृत्तीमुळे जनतेची दिशाभूल करण्याचे पाप ही प्रसारमाध्यमे करत आहेत. - संपादक)
     सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने पुस्तकांवर बंदी घालण्याशी संबंधित शासनाच्या इडिपी (एक्झामिनेशन बुक्स अ‍ॅण्ड पब्लिकेशन) आणि जीएडी (जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट) (सामान्य प्रशासन विभाग) या विभागांशी संपर्क केला असता अशा प्रकारे कोणतीही बंदी मनुस्मृति या हिंदूंच्या प्राचीनतम धर्मग्रंथावर नाही, असे समजले.

(म्हणे) साधू आणि संत या देशातील सर्वांत मोठे देशद्रोही असून त्यांना गंगा नदीत फेकून द्या !

खासदार पप्पू यादव यांचे धर्मद्रोही विधान
  •  जिहादी आतंकवाद्यांना गंगेत फेकून द्या, असे पप्पू यादव का म्हणत नाहीत ? 
  •  जिहादी आतंकवादाच्या संदर्भात अटक होणारे मौलाना हे देशभक्त आहेत का ? 
  •  अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंविषयी असे विधान करण्याचे धाडस यादव करू शकतील का ? 
  •  चर्चमध्ये लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांंविषयी यादव यांनी कधी तोंड उघडले आहे का ?
     पाटलीपुत्र - साधू आणि संत या देशातील सर्वात मोठे देशद्रोही आहेत. मंदिरांत बसलेले सर्व संत ढोंगी आहेत आणि या लोकांना गंगा नदीत फेकून दिले पाहिजे, असे धर्मद्रोही विधान जन अधिकार पार्टीचे प्रमुख खासदार पप्पू यादव यांनी केले. गरिबांनी मंदिरात नव्हे, तर विद्या मंदिरात जायला हवे, असेही ते म्हणाले. (मदरशांमध्ये देशद्रोही सिद्ध होतात, चर्चमध्ये लैंगिक अत्याचार होतात, तेथे जाऊ नये, असे पप्पू यादव का म्हणत नाहीत ? - संपादक

मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक मासाची मुदत ! - प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

कोल्हापूर येथील प्राचीन मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाचे प्रकरण
अवैध बांधकाम हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येते; मात्र प्रशासनाच्या 
लक्षात का येत नाही ? अशा प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवाच कशाला ? 
पत्रकार परिषदेत डावीकडून उपस्थित हिंदुत्ववादी सर्वश्री महेश उरसाल, 
अधिवक्ता समीर पटवर्धन, सुनील घनवट, अभय वर्तक, बोलतांना 
प्रमोद मुतालिक, संभाजी साळुंखे, चंद्रकांत बराले आणि रणजित आयरेकर
      कोल्हापूर - गेली अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेवर हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता आहे. मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हे त्यांच्या कार्यकर्त्यांची महापालिकेत सत्ता असतानांच झालेले आहे. त्यामुळे मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम न हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या बगलबच्चांचा हात असल्याचा संशय वाटतो. त्यामुळे या प्रकरणी मी आवाहन करतो की, हसन मुश्रीफ त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणवून घेतात, तर त्यांनी पुढाकार घेऊन हे अनधिकृत बांधकाम काढून टाकावे; कारण हा प्रकार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. हे अवैध बांधकाम हटवण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना १ मासाची मुदत देत आहोत, अशी चेतावणी श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी ९ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय शांती सैनिक लैंगिक अत्याचारांमध्ये सहभागी नाहीत ! - संयुक्त राष्ट्र संघ

कुठे भारतीय सैनिकांविषयी विश्‍वास दाखवणारा संयुक्त राष्ट्र संघ, तर कुठे 
आपल्याच सैनिकांना बलात्कारी ठरवणारा देशद्रोही साम्यवादी कन्हैया कुमार !
      संयुक्त राष्ट्र - आफ्रिकी देशांत चालू असलेल्या शांतता मोहिमेत काही आफ्रिकी देशांनी शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले आहे की, लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झालेल्या शांती सैनिकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश नाही. त्यांनी भारतीय सैनिकांना याप्रकरणी निर्दोष घोषित केले आहे. वर्ष २०१५ मध्ये ६९ देशांकडून संयुक्त राष्ट्रांकडे शांती सैनिकांच्या विरोधात लैंगिक अत्याचारांच्या ९९ तक्रारी आल्या होत्या. त्यात एकही भारतीय सैनिक नाही. भारताचे ७ सहस्र ७९८ शांति सैनिक जगातील १० देशांमधील शांतता मोहिमेत सहभागी आहेत. वर्ष २०१५ मध्ये कांगो, मोरक्को, दक्षिण आफ्रीका, कॅमरून, रवांडा आणि टांझानिया या देशांतील शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर गुन्हे नोंद करा ! - हिंदुत्ववादी संघटनांचे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन

डावीकडून हिंदुत्ववादी सर्वश्री संभाजी भोकरे, चंद्रकांत बराले, संभाजी साळुंखे, महेश उरसाल,
सुनील घनवट, प्रमोद मुतालिक आणि निवेदन स्वीकारतांना पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख
       कोल्हापूर, ९ मार्च (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. ही श्री महालक्ष्मीच्या कोट्यवधी भाविकांच्या, तसेच कोल्हापुरातील समस्त नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत संतापजनक आणि धार्मिक भावना दुखावणारी कृती आहे. पुरातत्व कायद्यानुसारही हा दखलपात्र गुन्हा आहे. या संदर्भात १५ एप्रिल २०१३ या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी हे शौचालय हटवण्याचे आदेश दिले होते; परंतु त्या आदेशाचे अद्यापही पालन झालेलेच नाही. या संदर्भात ३१ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदेने पुन्हा तक्रार केली; मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थे आहे.

स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

मुरादाबादमध्ये कावडधारकांवर धर्मांधांचे आक्रमण

समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशचे इस्लामीस्तान झाल्याचा परिणाम !
  • सर्वत्र दगड-विटांचा खच 
  • पोलीस निरीक्षकाच्या वाहनाची तोडफोड
     मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - येथील काजीपुरा या गावात महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी कावडधारकांनी काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी घरांच्या छतावरून मोठ्या प्रमाणात दगड आणि विटा यांच्या साहाय्याने आक्रमण केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक केली आणि पोलीस निरीक्षकाच्या वाहनाची मोडतोड केली. (घरांमधून दगड-विटांच्या मार्फत आक्रमण करण्यात आले, याचा अर्थ हे जिहाद्यांकडून पूर्वनियोजित षड्यंत्र होते, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य नाही ! - संपादक)

नावातही इंग्रजी शब्द असणार्‍यांमध्ये स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म यांच्याविषयी कधी प्रेम असेल का ?

     महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा धर्मद्रोही तृप्ती देसाई आणि त्यांच्या आंदोलनकर्त्या महिला यांना संगमनेर-नाशिक महामार्गावरील नांदुर फाटा येथे पोलिसांनी कह्यात घेतले.

राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही नेहरूंची दुष्कृत्ये आठवल्यास त्यांच्या नावाने विद्यार्थी असे वागणार, यात आश्‍चर्य काय ?

     ९ फेब्रुवारी २०१६ला जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये) महंमद अफझलच्या फाशीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रहित केल्यावर कन्हैया कुमारने आक्षेप नोंदवला होता, असा गौप्यस्फोट जेएन्यूचे रजिस्ट्रार भूपिंदर जुत्शी यांनी केला आहे. याच कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या.

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या राष्ट्रद्रोही अन् हिंदु धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडसारख्या पुरोगामी संघटनांविरुद्ध हिंदूंना लढावे लागेल !

     श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून आणि संस्कृतमधून शिक्षण देण्यावर भर द्यावा ! - पेट्रियट्स फोरम

     नवी देहली - राष्ट्रासाठी मूल्याधिष्ठित नवे शैक्षणिक धोरण बनवण्यासाठी माजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात शिक्षणाविषयीच्या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत कि नाही याची आम्हाला कल्पना नाही; परंतु नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून आणि संस्कृतमधून शिक्षण देण्यात भर द्यावा, अशी विनंती गुप्तचर आयोगाचे माजी विशेष संचालक आणि पेट्रियट्स फोरमचे अध्यक्ष डी.सी. नाथ यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना केली आहे. देशातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई अशा अबलांना साहाय्य का करत नाहीत ?

     मणीपूरची रहिवासी असलेली एक तरुणी मुंबईतील कलिना येथील बाजारात गेली असता एका व्यक्तीने तिला मारहाण केली. तिने पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली असता कपडे फाटले नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप तिने केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मराठखेडे (जिल्हा जळगाव) येथे धर्मजागृतीपर प्रदर्शन आणि मार्गदर्शन

      जळगाव - येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण या विषयांवरील फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठखेडा येथील धर्मशिक्षणवर्गातील तरुणांनी प्रदर्शन आयोजित केले होते. ह.भ.प. सोपान महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी गावातील ग्रामपंचायत सभासद, तसेच प्रतिष्ठित उपस्थित होते. या प्रदर्शनाचा लाभ ४०० लोकांनी घेतला.
     सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती केली. कु. रागेश्री यांचा सत्कार कु. शीतल पाटील यांच्या हस्ते झाला.

निरंजन धनवे याला कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

कु. निरंजन धनवे
      पुणे - येथील सनातनचे साधक श्री. संजय धनवे यांचा मुलगा कु. निरंजन धनवे (वय १४ वर्षे) याला शिकीजीमा तायकांदो अकादमीच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले, तसेच अखिल पौडरस्ता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
     कु. निरंजन हा नियमित धर्माचरण करतो, तसेच प्रासंगिक सेवाही करतो. तो प्रत्येक स्पर्धेचा प्रारंभ जयघोष करूनच करतो. या यशाचे श्रेय त्याने परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण केले.


राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधकांकडून शासनाच्या विरोधात चारा छावण्या बंद आणि डान्स बार चालूच्या घोषणा !

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१६
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई
       मुंबई, ९ मार्च - राज्यातील १५ सहस्र ७५० गावे दुष्काळामुळे बाधीत झाली आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी आतापर्यंत २ सहस्र ५३६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दुष्काळासाठी केंद्र शासनाकडून ३ सहस्र ४९ कोटी रुपयांचे साहाय्य मिळाले आहे, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज विधीमंडळाच्या सभागृहांत अभिभाषणात दिली. आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. परंपरेप्रमाणे या अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला; मात्र हे अभिभाषण चालू असतांनाच विरोधकांनी दुष्काळाच्या सूत्रावरून घोषणा देण्यास प्रारंभ केला. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे, लावण्या चालू आणि छावण्या बंद, अशा घोषणा देत विरोधकांनी सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दुष्काळाच्या प्रश्‍नावरूनच विरोधक सभागृहात रणकंदन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात शासनाने यापूर्वी घोषित झालेल्या घोषणांची पुनरावृत्ती करण्यात आली.

उत्तरप्रदेशमध्ये परीक्षेतील फसवणुकीच्या प्रकरणी ५७ विद्यार्थी आणि १४ शिक्षक यांच्या विरोधात तक्रार

     मथुरा - उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यामधील वालदेव, राया आणि महावन परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावी परीक्षांच्या वेळी फसवणूक केल्याच्या प्रकरणी ५७ विद्यार्थी आणि १४ शिक्षक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच हे विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी बाहेरून साहाय्य घेतांना आढळले आहेत. (उत्तरप्रदेशमधील जंगलराज ! असे विद्यार्थी कधीतरी देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील का ? - संपादक) राममाधव कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सामूहिक कॉपी केली जात असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. उपजिल्हाधिकारी राजेश कुमार यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली असता स्थानिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. तसेच त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. (कॉपी करणार्‍यांचे समर्थकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. - संपादक) उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेला मथुरा जिल्ह्यात २१८ केंद्रांमधून सुमारे १ लक्ष २५ सहस्र विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या करणारा १५ वर्षीय आरोपी अटकेत

वासनांधतेने गाठलेली परिसीमा दूर करण्यासाठी शासन करणार आहे ?
     सातारा - येथे ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी १५ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकण्यात आल्याचे समजते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १३ मार्च या दिवशी बेळगाव येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा

डावीकडून श्री. मनोज खाडये, श्री. गुरुप्रसाद आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे
      बेळगाव - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने १३ मार्च या दिवशी आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या मैदानात सायंकाळी ६ वाजता जाहीर हिंदु धर्मजागृती सभा होत आहे. या सभेत भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य मार्गदर्शन होणार आहे. याचसमवेत सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचेही अनमोल मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद यांनी दिली. सभेनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये आणि सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेला एकूण २० पत्रकारांची उपस्थिती होती.

मलाही लाच देण्याचा प्रयत्न झाला होता !

अशी माहिती देण्यासह जे लाच देण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी 
प्रयत्न करणे निहलानी यांच्याकडून अपेक्षित आहे !
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष निहलानी यांचा खुलासा 
     मुंबई - एका चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी मलाही लाच देण्याचा प्रयत्न झाला होता, अशा खुलासा चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला आहे. 
     एका चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी लाच घेतल्याप्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश कुमार यांवर चालू असलेल्या खटल्याविषयी बोलतांना निहलानी म्हणाले, सध्या मंडळाच्या कार्यपद्धतीमध्ये थोडाही भ्रष्टाचार नाही. यासंदर्भात जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत, ती माझ्या नियुक्तीच्या पूर्वीची आहेत. चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यात आमच्याकडून विलंब होऊ नये, यासाठी आम्ही सुटीचे शनिवार आणि रविवार या दिवसांमध्येही काम करत आहोत. त्यामुळे येथे भ्रष्टाचार अजिबात नाही आहे. (भ्रष्टाचारमुक्त कारभारासह हिंदुविरोधी चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, याकडेही चित्रपट परिनिरीक्षण मंडळ लक्ष देईल, अशी आशा आहे ! - संपादक)

फरिदाबाद (हरियाणा) मध्ये तणावमुक्त जीवन या विषयावर आयोजित कार्यक्रमात सनातनच्या साधिकेचे मार्गदर्शन !

सौ. संदीप कौर (डावीकडून तिसर्‍या) यांचा
सत्कार करतांना ब्रह्मकुमारी
     फरिदाबाद (हरियाणा), ९ मार्च (वार्ता.) - येथील सेक्टर ११-सी मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या सेवाकेंद्रात ६ मार्च या दिवशी महाशिवरात्री पावन पर्व का आध्यात्मिक रहस्य एवं राजयोगद्वारा तनावमुक्त जीवन या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बल्लभगढचे आमदार श्री. मूलचंद शर्मा, लायन्स क्लबचे श्री. बी.एम्. शर्मा, सी ग्रूपचे निर्देशक श्री. बी.आर्. भाटिया, राजयोगिनी बी.के. उषा, सनातन संस्थेच्या सौ. संदीप कौर मुंजाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा लाभ १२५ जिज्ञासूंनी घेतला.

पुणे येथे महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधींची भेट

सनातनचे ग्रंथ घेतांना आबा बागुल 
आमदार माधुरी मिसाळ भेट देतांना

फलक प्रसिद्धीकरता

कन्हैया कुमारच्या तोंडी काश्मिरी फुटीरतावाद्यांची भाषा !
     देशद्रोहाचा आरोप असणारा कन्हैया कुमार फुटीरतावाद्यांची री ओढत म्हणाला, भारतीय सैनिक काश्मीरमधील महिलांवर बलात्कार करतात. तसेच त्याने जम्मू-काश्मीरमधून सैन्य हटवण्याच्या देशद्रोही सूत्रावरही आक्रमक मते मांडली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kanhaiya Kumarne kaha, Bharatiya sainik Kashmiri mahilayopar balatkar karte hai evam J&Kse sena hatayi jaye!
Kanhaiyake muh me Algavavadiyonki bhasha !

जागो ! :
कन्हैया कुमार ने कहा, भारतीय सैनिक कश्मीरी महिलाआें पर बलात्कार करते हैं एवं जम्मू-कश्मीर से सेना हटाई जाए !
कन्हैया के मुंह में अलगाववादियों की भाषा !

भिवंडी येथे धर्माभिमानी हिंदूंनी गोवंशियांची अवैध तस्करी रोखली !

गोवंशियांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
     ठाणे - भिवंडी येथील आनंद सिनेमाच्या मागील गैबिनगर परिसरात ४ मार्च २०१६ या दिवशी पहाटे ४ वाजता बोलेरो पीक-अप या मालवाहू गाडीमधून १२ गोवंशियांना पाय बांधून एकावर एक असे निर्दयपणे कोंबून नेण्यात येत होते. तसेच गोरक्षकांना फसवण्यासाठी गोवंशाच्या पुढे आणि मागे भाजीपाल्याचे क्रेट ठेवण्यात आले होते. या वाहनातून बैल उतरवतांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने आरोपींना पकडले.

तुळजाभवानी मंदिराच्या साहाय्यक व्यवस्थापकावर बलात्कार प्रकरणी गुन्हा

मंदिर व्यवस्थापनासाठी शासकीय कर्मचारी नव्हे, भक्तांची 
नियुक्ती करण्याची आवश्यकता सांगणारे उदाहरण !
     तुळजापूर - येथील एका २२ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तुळजाभवानी मंदिराचे साहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आणि त्यांच्या नातेवाइकावर गुन्हा नोंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 
१. दिलीप नाईकवाडी यांनी आपणास नोकरी लावतो, तसेच भाच्याचा मुलगा नितीन साळुंखे याच्याशी तुझा विवाह लावून देतो, असे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे. 
२. २ मार्चच्या रात्री आपल्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर नितीन साळुंखे यानेही गैरफायदा घेत आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असेही तिने तक्रारीत पुढे नमूद केले आहे.

पिंपरी (पुणे) येथील श्री वैष्णोदेवी मंदिर चोरीच्या प्रकरणी रखवालदारासह तिघांना अटक

     पिंपरी, ९ मार्च - येथील पिंपरी लष्कर भागात प्रसिद्ध असलेल्या श्री वैष्णोदेवी मंदिरात २९ फेब्रुवारी या दिवशी पहाटे चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंदिराच्या रखवालदारासह कलमबहादूर अग्रबहादूर शाही, ख्वामराज दिलबहादूर शाही आणि रमेशबहादूर मनरुप शाही (रहाणार पिंपरी, मूळ नेपाळ) यांना अटक केली आहे. (हिंदूंच्या मंदिरांत चोर्‍यांच्या शेकडो घटना मागील अनेक दिवसांपासून घडत आहेत; मात्र चोरांवर कठोर कारवाईच्या अभावी कायद्याचा धाक राहिला नाही, हेच यातून दिसून येते. - संपादक) पोलिसांनी त्यांच्याकडून १ मुकुट, ६ सहस्र रुपये रोख आणि दुचाकी असा ऐवज शासनाधीन केला आहे. या प्रकरणातील ३ आरोपी अजून पसार आहेत.

हिंदुहिताच्या विविध मागण्यांसाठी पाचोरा येथे धर्माभिमान्यांकडून तहसीलदारांना निवेदन

तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना धर्माभिमानी
     पाचोरा (जळगाव) - येथे हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदु हिताच्या विविध मागण्यांसाठी येथील तहसीलदार यांना निवेदन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रणव नागणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनीष काबरा, सनातन संस्थेच्या सौ. रेखा जाधव, धर्माभिमानी सर्वश्री राजेंद्र सोनवणे, संदीप पाटील, विनोद जगताप, तुषार जगताप, सौरभ चंद्राप्रे हे उपस्थित होते.

राष्ट्रद्रोही जेएन्यूच्या विरोधात चुनाभट्टी येथील राष्ट्राभिमानी युवकांकडून स्वाक्षरी चळवळीचे आयोजन

     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या येथील धर्मशिक्षणवर्गातील युवकांनी राष्ट्रद्रोही जेएन्यूच्या विरोधात पंचशीलनगर येथे स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली. या चळवळीला पंचशीलनगर मित्र मंडळाच्या युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पंचशीलनगर मित्र मंडळचे सर्वश्री संकेत घाग, सुशांत देवकर, निलेश मोहिते, उदय निकम, प्रणव मोहिते, निखिल मोहिते, प्रवीण माने, सन्नी घाडगे, निखिल उबाळे, अतुल साळुंखे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. स्थानिक नागरिकांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला.

माघी वारीत उभारलेल्या तात्पुरत्या शौचालयांचा व्यय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती देणार

  • मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
  • वारीच्या काळाचे नियोजन आणि त्याचा व्यय करणे, हे शासनाचे कर्तव्य असतांना त्यासाठीचे पैसे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून का घ्यावेत ?
      पंढरपूर, ९ मार्च - नुकत्याच झालेल्या माघी वारीत ६ दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात फायबरची शौचालये उभारण्यात आली होती. त्यासाठी झालेला व्यय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नगरपालिकेला साहाय्य म्हणून द्यावा, असा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. (हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावामुळेच जिल्हाधिकारी अशा प्रकारचा आदेश देण्यास धजावतात. अन्य धर्मियांच्या संदर्भात निर्णय घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे धाडस झाले असते का ? - संपादक)

दुष्काळाच्या प्रश्‍नावरून विरोधक शासनाची कोंडी करण्याच्या सिद्धतेत !

      मुंबई, ९ मार्च - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ९ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठीही महत्त्वाचे आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना विश्‍वास देण्याचे आव्हान शासनापुढे आहे. याच सूत्रावरून विरोधी पक्ष शासनाची कोंडी करण्याच्या सिद्धतेत आहेत. भाजप शासन सत्तेत आल्यानंतर विधानसभेचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. ९ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत अधिवेशन चालणार असून १८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी त्यांच्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या दौर्‍याच्या वेळी संतांच्या संकल्पाची घेतलेली प्रचीती !

अधिवक्ता रामदास
केसरकर
     सनातनच्या कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान आणि संतांचे आशीर्वाद आहेत. संत द्रष्टे असल्याने त्यांना पुढे काय होणार, हे समजते. संतांच्या संकल्पाने धर्मकार्य वेगाने आणि अडथळ्याविना होते. सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांचा दौरा केला. त्या वेळी त्यांना संतांच्या संकल्पामुळे अनुभवायला मिळालेली सूत्रे आपण पहात आहोत.
     काल आपण महाराष्ट्रातील दौर्‍याच्या वेळची सूत्रे पाहिली. आज मध्यप्रदेशमधील दौर्‍यातील सूत्रे पाहूया.
४. बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश)
४ अ. बैठकीला उपस्थित असलेले अधिवक्ता हेमेंद्र गोविंदजीवाला यांनी संघटन ही काळाची निकड आहे, या विषयावर सांगितलेली सर्व सूत्रे संक्षिप्तपणे लिहून घेणे : २.११.२०१५ या दिवशी मध्यप्रदेशमधील बुर्‍हाणपूर येथील राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी अधिवक्त्यांच्या बैठकीचे नियोजन स्थानिक साधिका सौ. पिंकी माहेश्‍वरी आणि सौ. विमल कदवाणी यांनी केले होते. या बैठकीला १७ हिंदुत्ववादी अधिवक्ते उपस्थित होते. या बैठकीला प्रारंभी अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. त्यानंतर मी संघटन ही काळाची निकड आहे, या विषयावर बोलून झाल्यावर मानवी जीवनातील साधनेचे महत्त्व सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेले अधिवक्ता हेमेंद्र गोविंदजीवाला यांनी मार्गदर्शनात सांगितलेली सगळी सूत्रे संक्षिप्तपणे लिहून घेतली आणि हिंदु विधीज्ञ परिषद अन् हिंदु जनजागृती समितीला आवश्यक असलेले सगळे कायदेविषयक साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. अधिवक्ता हेमेंद्र गोविंदजीवाला हे आजही भ्रमणभाषद्वारे माझ्या संपर्कात आहेत.

भंपक नेतृत्वाची हुजरेगिरी करणार्‍या काँग्रेसी जनांनो, आता तुमची शंभरी भरलीच म्हणून समजा !

     राष्ट्रीय काँग्रेसच्या फेसबूक पानावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानखंडना करण्याचे दुष्कृत्य काँग्रेसी मंडळींनी केले आहे. १२५ वर्षांपासूनच इतिहास सांगणारी आणि भारतीय राजकारणाचा भाग असलेली राजकीय सभा कृत्य करत आहे आणि तेसुद्धा कुठल्याही ठोस आणि मूळ पुराव्याचा आधार न घेता, हे त्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची बौद्धिक खोली दर्शवते; कारण त्याच्या संमतीव्यतिरिक्त असे दु:साहस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यास करणे अशक्य आहे. 

बंगालमध्ये साम्यवादी तरुणाने फेसबूकवर केला शिवलिंगाचा अवमान !

धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या ममता बॅनर्जी 
यांचे शासन हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखणार का ?
       कोलकाता - बंगालमधील अनिर्बन मैती या साम्यवादी विचारांच्या तरुणाने महाशिवरात्रीच्या दिवशी फेसबूकवर भगवान शिवाचा अवमान करणारे चित्र पोस्ट केले आहे. यात एक महिला शिवलिंगाला निरोध घालत आहे, असे दाखवण्यात आले आहे. या चित्रामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. (असा अवमान अन्य धर्मियांच्या संदर्भात झाला असता, तर देशात आगडोंब उसळला असता, हे शासन लक्षात घेईल का ? - संपादक) यातून पुन्हा एकदा साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष दिसून आला आहे. त्याच्यावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

कालीमातेचे महान उपासक श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण परमहंस 
     पश्‍चिम बंगालमधील कामारपुकुर या गावात ख्रिस्ताब्द १८६३ मध्ये गदाधराचा जन्म झाला. लहानपणापासून त्याला देवपूजा, भजन, सत्संग यांची आवड होती. तरुण वयात दक्षिणेश्‍वर येथे राहून त्याने कालीमातेची उपासना केली. त्याचे गुरु तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गदाधर परमहंस पदाला प्राप्त झाला. याच गदाधराला लोक श्रीरामकृष्ण परमहंस या नावाने ओळखू लागले. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपल्या हृदयात असल्याचे ते सांगत. सहस्रो जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यातील काही पाश्‍चिमात्य देशांतीलही होते. त्यांच्या कार्याची धुरा स्वामी विवेकानंद यांनी समर्थपणे पेलली.

वासुदेवाची स्वारी...

    लोककलेचा आणि प्रबोधनाचा महत्त्वाचा भाग असलेली एक परंपरा म्हणजे वासुदेवाची परंपरा. भल्या पहाटे मुखी हरिनाम घेत गावाला खर्‍या अर्थाने जागवण्याचे कार्य करणारा वासुदेव ! जागवणे म्हणजे केवळ झोपेतूनच नाही, तर राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती झालेल्या उदासीन आणि निष्क्रिय वृत्तीतूनतही समाजाला जागृत करणे. गावाला जागवत येणारी वासुदेवाची स्वारी आज दुर्मिळ झाली आहे. लोककला जपण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे पालटत्या जीवनशैलीसह त्याचाच एक भाग असणारी वासुदेवाची स्वारी लुप्त होत चालली आहे.

देशद्रोही विद्यार्थी निपजणार्‍या जेएन्यूसारख्या विद्यापिठांना टाळे लावा !

कु. मधुरा गद्रे
१. अलीकडे कारागृहात जाणे, हा प्रतिष्ठेचा विषय !
     जेएन्यूत देशद्रोही घोषणा देणारा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. दोन-चार दिवस खटला चालला आणि जामीनावर सुटकाही झाली. पूर्वी कोणी कारागृहात गेले, तर त्याच्याकडे लोक एखाद्या गुन्हेगाराप्रमाणेच बघायचे, मग तो गुन्हेगार असो वा नसो. आता कोणी कारागृहात गेले; म्हणजे काहीतरी मोठे काम केले असणार, असाच सगळ्यांचा समज झालेला आहे.
२. कन्हैयाचा दुतोंडीपणा
     कन्हैया कुमारसंदर्भातही सर्वांचा तसाच समज झाला आहे. त्याला जामिनावर सोडतांना न्यायालयाने बरेच काही सांगितले, फटकारले; पण समजून घ्यायला या कन्हैयाला सांगणार कोण ? हा कन्हैयाच आता अशी भाषणे ठोकत फिरेल की, जणू काही याने केलेले कर्म हे सत्कर्मच होते आणि त्याच्यावर कसा अन्याय झाला आहे ! एकाच दिवसात याची दोन वेगवेगळी रूपे पहायला मिळाली. रात्री सुटल्यावर जेएन्यूत दिलेल्या भाषणात फार मोठी कामगिरी केल्याचा आविर्भाव दिसून आला, तर नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यात साळसूदपणाचा आव आणत देशापासून नव्हे; तर देशात असलेल्या समस्यांपासून आझादी हवी आहे, असे म्हणतो. यावरूनच हा देशभक्त कि देशद्रोही, हे शेंबडे पोरही सांगू शकेल.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

     सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. - श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
         वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
      हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते !
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

आधुनिक वैद्य या पदाला कलंकित करणारे एक आधुनिक वैद्य !

      २६.६.२०१४ या दिवशी माझा भाऊ आंब्याच्या झाडावर चढून लाकडे तोडत होता. त्या वेळी त्याच्या हातातील कोयता निसटून त्याच्या पायावर पडून पायाचा अंगठा तुटला. त्यामुळे त्यातून पुष्कळ रक्तस्त्राव होऊ लागला. त्याला आधुनिक वैद्यांकडे नेले असता वैद्यानेे मलमपट्टी (ड्रेसिंग) करूनही त्यातून रक्तस्त्राव चालूच होता, तरीही त्या आधुनिक वैद्याने भावाला रुग्णालयात भरती करून न घेता घरी जाण्यास सांगितले. त्याच्या पायातून सतत २ दिवस रक्तस्त्राव होत होता. (अशा आधुनिक वैद्यांना हिंदु राष्ट्रात कठोर कारवाई करण्यात येईल. - संकलक) 
- एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०१४)

साधकांनो, केंद्रस्तरावरील विक्री न करावयाचे साहित्य दायित्व असलेल्या साधकांकडे जमा करा !

      मार्च मासात सर्व जिल्हे, तसेच प्रभाग यांमधील विक्री न करावयाच्या साहित्याची प्रत्यक्ष साठा पडताळणी करायची आहे. केंद्रस्तरावरील सर्व साधकांनी त्यांच्याकडील कापडी फलक, फ्लेक्स, पत्रके, भित्तीपत्रके, तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी साहित्य केंद्रस्तरावरील दायित्व असणार्‍या साधकाकडे जमा केले नसल्यास ते लवकरात लवकर जमा करावे.

साधकांनो, आश्रमाच्या सुरक्षिततेसाठी पहारा सेवा करतांना पुढील मार्गदर्शक सूत्रे लक्षात घेऊन आत्मबळ वाढवा !

१. पहारा करणार्‍या साधकाचा पेहराव सैलसर असावा.
२. आवश्यक साहित्य : साधकाच्या गळ्यात शिट्टी, तर रात्रीच्या वेळी त्याच्याजवळ विजेरी (बॅटरी) असावी. ही सेवा करतांना मौल्यवान वस्तू समवेत ठेवू नयेत.
३. कार्यपद्धती : ही सेवा करतांना इअरफोन न घालता भजने आदी ऐकू शकतो. आसपास सतर्कतेने लक्ष ठेवून सारणी लिखाण, दैनिकवाचन, ग्रंथवाचन, तसेच बिंदूदाबन उपाय करू शकतो.
४. पहार्‍याच्या वेळी आध्यात्मिक स्तरावर करावयाचे प्रयत्न
अ. मुखात अखंड श्रीकृष्णाचे नाम असावे.

रामनाथी आश्रमाच्या एका खोलीत नामजप करण्यासाठी बसल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

कु. चित्रा महामुनी
१. कोणतीही कृती भाव ठेवून केल्याने वेळ सत्कारणीच लागतो, हे शिकायला मिळणे : ११.२.२०१६ या दिवशी मी आश्रमातील पूर्वी संत रहायचे त्या खोलीत नामजप करण्यासाठी गेले होते. तेव्हा चि. भक्तीला (वय ३ वर्षे) घेऊन तिची आईही आली होती. भक्तीने खेळण्यासाठी आपल्यासमवेत तिची खेळणी आणली होती आणि ती त्या खेळण्यांसमवेत खेळत होती. मी नामजप करत तिच्या खेळण्याकडे पहात होते. ती खेळण्याच्या पिशवीमधून तिच्या बाहुलीचे कपडे एक एक करून काढून बाहुलीला घालत होती. मी ते पहात असल्याने माझा नामजपाचा वेळ वाया जात असल्याची मला जाणीव झाली. त्याच वेळी श्रीकृष्णाने सुचवले, हा सर्व खेळ बघतांना श्रीकृष्ण खेळतोय, असा भाव ठेवून बघ. त्यानुसार भाव ठेवल्याने माझ्या मनातील विचार न्यून झाले आणि कोणतीही कृती भाव ठेवून केल्याने वेळ सत्कारणीच लागतो, हे मला शिकायला मिळाले.

स्वधर्माविषयी प्रेम असणारा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. अथर्व पाटील (वय ५ वर्षे) !

       फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया (१०.३.२०१६) या दिवशी जळगाव येथील चि. अथर्व विजय पाटील याचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चि. अथर्व पाटील
चि. अथर्व विजय पाटील याला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. शारीरिक त्रास होत असतांना हनुमान आणि श्री दुर्गादेवी यांचा जप केल्यावर अन् ओटीपोटावर श्रीकृष्णाचे चित्र ठेवल्यावर त्रास दूर होणे : गर्भारपणाच्या तिसर्‍या मासात (महिन्यात) मला शारीरिक त्रास होऊ लागला. आधुनिक वैद्यांना दाखवले असता त्यांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास (बेडरेस्ट) संागितले; म्हणून मी अमळनेरला माझ्या माहेरी आले. माझा शारीरिक त्रास वाढतच होता. त्यामुळे मी लोटलीकरकाकांशी बोलले. तेव्हा त्यांनी मला हनुमान आणि श्री दुर्गादेवी यांचा जप करायला संागितला. मी हा जप केला आणि माझ्या ओटीपोटावर श्रीकृष्णाचे चित्र ठेवले. हे उपाय केल्यावर माझा त्रास लगेचच दूर झाला. तेव्हापासून मी प्रतिदिन हे उपाय करायचे. बाळाला श्रीकृष्णाचे चैतन्य ग्रहण करण्यास आणि त्याच्याशी बोलण्यास संागत असे.

भ्रमणभाषवर ॐचा नामजप लावलेला नसतांनाही घरी रहायला आलेल्या नातेवाइकांना रात्री ॐचा ध्वनी ऐकू येणे आणि त्यामुळे भगवंत समवेत असल्याची जाणीव होणे

      किर्लोस्करवाडी येथील आमच्या घरी आमचे नातेवाईक ह.भ.प. श्री. दिलीन अंबिके रहायला आले आहेत. २८.१२.२०१५ या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांनी मला विचारले, रात्री भ्रमणभाषवर ॐ चा जप लावला होता का ? तेव्हा मी त्यांना नाही सांगितले. त्यावर त्यांनी मला काल रात्री ॐ चा ध्वनी ऐकू येत होता, असे सांगितले. मी त्याच दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील सौ. रश्मी नल्लादारू यांची अनुभूती वाचल्यावर श्री. दिलीन अंबिके यांना अनुभूती आली आहे, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा माझी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि मी एकटी नसून भगवंत माझ्यासमवेत आहे, याची मला तीव्र जाणीव झाली.
- सौ. लुकतुके, किर्लोस्करवाडी, पलुस केंद्र, सांगली. (८.१.२०१६)

मन अर्पावे गुरुचरणी !

श्री. अशोक कुलकर्णी
गुरुविना नाही ईश्‍वरप्राप्ती ।
गुरुविना नाही दूर होणार अंधःकार ।
जाण्यासाठी अंधःकारातूनी प्रकाशाकडे ।
जाणूनी घ्यावा गुरुमहिमा प्रथम ॥ १ ॥
जावे शरण गुरुचरणी ।
राहून सतत शिकण्याच्या स्थितीत ।
गुरूआज्ञेने करूनी सेवा ।
मन अर्पावे गुरुचरणी ॥ २ ॥ 

ईश्‍वराकडून मिळत असलेल्या ज्ञानाची गती अधिक असल्याने ते मानवाला लगेच ग्रहण करता न येणे

     
श्री. राम होनप
ईश्‍वराकडून मिळत असलेल्या ज्ञानाची गती अधिक असते. त्यामुळे ईश्‍वर ज्या क्षणी ज्ञान देतो, त्याच वेळी मानवी मर्यादेमुळे ते त्याला लगेच ग्रहण करता येत नाही. ज्याप्रमाणे धबधब्यातून गतीने पडणारे पाणी आपल्याला लगेच घेता येत नाही, ते खाली पडेपर्यंत आपल्याला थांबावे लागते, त्याप्रमाणे ईश्‍वरी ज्ञान मिळाल्यानंतर त्याचे आकलन होईपर्यंत काही क्षण थांबावे लागते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०१६)

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, तसेच साधक यांना गुरुसेवेची सुवर्ण संधी !

वातानुकूलित यंत्रे, शीतकपाट आदी उपकरणांची
दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही वातानुकूलित यंत्रे (विंडो ए.सी., तसेच स्प्लिट ए.सी.), शीतकपाट (फ्रिज) नादुरुस्त स्थितीत आहेत. ही उपकरणे वापरण्यायोग्य होण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याची सेवा उपलब्ध आहे.
     अशा उपकरणांची दुरुस्ती करण्याचा अनुभव असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक सेवा म्हणून करण्यास इच्छुक असतील किंवा सेवामूल्य घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतील, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर खालील माहिती पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास रामनाथी आश्रमात श्री. संभाजी माने यांच्याशी ०८४५१००६०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा. 
या सेवेत सहभागी होऊन ईश्‍वराने दिलेले कौशल्य त्याच्या चरणी समर्पित करण्याची संधी दवडू नका !

देवद आश्रमाच्या रक्षणासाठी पहारा करणार्‍या साधकासमवेत कुत्रा थांबणे आणि देवताही त्यांचे अस्तित्व सुगंधाच्या माध्यमातून जाणवून देत असणे

     
श्री. महेंद्र सहस्रबुद्धे
ऑगस्ट २०१५ मध्ये एकदा आश्रमाच्या बाहेरील परिसरात चोर आले होते. तेव्हापासून म्हणजे सर्वपित्री अमावास्येच्या आदल्या दिवसापासून, म्हणजे ११.१०.२०१५ या दिवसापासून दिवसभर संकुल परिसरात फिरणारी चार कुत्री संपूर्ण रात्रभर आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबलेली असतात. या चार कुत्र्यांपैकी एक कुत्रा काळा आहे. एका संतांनी, तो सात्त्विक असल्याचे सांगितले. आश्रमाच्या गेटच्या आतील बाजूने पहारा करणार्‍या साधकांसमवेत थांबू लागला आहे. तो प्रवेशद्वाराच्या मागील बाजूने आत येऊन चारचाकी वाहनाच्या नदीकडील बाजूने संपूर्ण परिसरात फेरी मारतो आणि पहारा करणार्‍या साधकासमवेत येऊन थांबतो.
१. कुत्र्याने केलेली रक्षणाची सेवा !
१ अ. साधकाला बाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वार उघडतांना कुत्र्याला बाहेर काढल्यावरही तो मागील बाजूने येऊन प.पू. पांडे महाराजांच्या खोलीच्या समोर लावलेल्या वाहनाजवळ येणे आणि काही वेळाने त्याने आश्रमाच्या मागील बाजूला धाव घेणे : १२.१०.२०१५ या दिवशी मध्यरात्री ३.३० ते सकाळी ७ या वेळेत माझी पहार्‍याची सेवा होती. या वेळीही हा काळा कुत्रा माझ्या आधी पहार्‍याची सेवा करणार्‍या साधकासमवेत थांबला होता. त्यांनी या कुत्र्याला २ - ३ वेळा प्रवेशद्वार उघडून बाहेर पाठवले, तरी तो पुन्हा आत आला होता. माझी मध्यरात्री ३.३० वाजता पहार्‍याची सेवा चालू झाल्यानंतर एका साधकाला बाहेर जाण्यासाठी मी प्रवेशद्वार उघडले आणि त्या कुत्र्यालाही बाहेर काढले; परंतु ४ वाजण्याच्या सुमारास तो कुत्रा चारचाकी वाहनाच्या मागील बाजूने पुन्हा आश्रमाच्या परिसरात प.पू. पांडे महाराजांच्या खोलीच्या समोर लावलेल्या वाहनाजवळ आल्याचे माझ्या लक्षात आले. मी प्रवेशद्वारातच उभा राहून त्याच्याकडे पहात होतो. १-२ मिनिटांनंतर त्याने एकदम आश्रमाच्या मागील बाजूला धाव घेतली. त्यामुळे मीही तो का धावला, हे पहाण्यासाठी धावत गेलो.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
    देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.  

न सांगता कळे तुज अंतरीचे गुज ।

       प.पू. गुरुदेवांची भेट झाली. तेव्हा भावजागृती झाल्यामुळे काही बोलता आले नाही. त्या वेळी मनात पुढील ओळी सुचल्या.
न सांगता कळे तुज अंतरीचे गुज ।
काय सांगू सृष्टीचे हे बीज ॥ १ ॥
भगवंताची लीला न कळे कुणासी ।
नित्य ठेवी चित्त तव चरणांसी ॥ २ ॥
- श्रीकृष्णाची सौ. विमल माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आश्रमात पहार्‍याची सेवा करणार्‍या साधकांना प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
१. पहार्‍याची सेवा करणार्‍या साधकाने अखंड सावध राहिले पाहिजे !
       ४.९.२०१५ या रात्री देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर पहारा सेवा करणार्‍या साधकाचे निरीक्षण करतांना प.पू. पांडे महाराज यांनी पुढील मार्गदर्शन केले, पहार्‍याची सेवा करणार्‍या साधकाने कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, याचे भान ठेवून अखंड सावध राहिले पाहिजे. याचीच सिद्धता म्हणून त्याच्या गळ्यात शिट्टी, तर रात्रीच्या वेळी विजेरी (बॅटरी) असली पाहिजे. इतकेच नव्हे, तर प्रस्तुत (सदर) साधकाने सतत दक्ष आणि सजग असले पाहिजे.
२. पहार्‍याची सेवा करतांना 
आध्यात्मिक स्तरावर करावयाचे प्रयत्न
      ही सेवा आपण एकटे करत नसून आपल्यासमवेत सतत श्रीकृष्ण आहे असा भाव ठेवला पाहिजे. त्यासाठी त्या साधकाच्या मुखात अखंड श्रीकृष्णाचे नाम असावे, तसेच मधून मधून प्रार्थना आणि कृतज्ञताही व्यक्त करावी. त्याने असे केले, तर ती खर्‍या अर्थाने व्यष्टी साधना ठरेल, तसेच आपल्या या सेवेमुळे आश्रमाचे आणि साधकांचे रक्षण होणार आहे, असा भाव ठेवल्यास ती समष्टी साधना ठरेल.
- श्री. प्रभाकर प्रभुदेसाई, सनातन संकुल, देवद, पनवेल. (५.९.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे नाडीपट्टीचे वय सहस्रो वर्षे कसे ? प्रत्यक्षात तर पट्टीचे वय एवढे वाटत नाही !, या बुद्धीवाद्यांना पडणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर असे की, गेल्या सहस्रो वर्षांत नाडीपट्टयांचे लेखन अनेक जणांच्या माध्यमातून झालेले असल्याने त्याच्या दर काही शतकांनी नक्कल प्रती लिहिल्या जाणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. बहुतांश नाडीपट्ट्या ३०० ते ४०० वर्षे इतक्या जुन्या असणे : बहुतांश नाडीपट्ट्यांचे वय जवळजवळ ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचे आहे, असे कार्बन डेटिंग चाचणीतून सिद्ध झाले आहे. बर्‍याच व्यक्तींना प्रश्‍न पडू शकतो की, अरे, महर्षि तर म्हणतात की, या पट्ट्यांचे वय सांगता येत नाही इतक्या त्या जुन्या आहेत. त्यांचे वय सहस्रो वर्षांइतके आहे. हो ! हे अगदी योग्य आहे आणि याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
२. लाखो वर्षांपूर्वी महर्षींनी अशरिरी वाणीने दिलेले ज्ञान योग्य काळ आल्यावर त्या वेळच्या सिद्धांनी ताडपत्रांवर लिहून ठेवणे : पूर्वी लाखो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी वायूमंडलातून अशरिरी वाणीने जे ज्ञान विश्‍वाला दिले, ते योग्य काळ आल्यानंतर पृथ्वीवरील त्या वेळच्या सिद्धांनी लिहून ठेवले. हे अशरिरी ज्ञान वाणीच्या रूपात होते. या ज्ञानाची नादस्पंदने अजूनही वायूमंडलात आहेत; कारण वायूमंडलातील आकाशतत्त्वातच सर्वकाही सामावलेले असल्याने नाडीतील ज्ञानही याला अपवाद नाही.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

स्वतः करत असलेल्या साधनेचा अभिमान नको !

       काही जण अभिमानाने सांगतात, मी प्रतिदिन १० माळा जप करतो, १५ - २० मिनिटे स्तोत्रे म्हणतो, मंदिरात ११ प्रदक्षिणा घालतो, अर्धा तास पोथी वाचतो इत्यादी. त्यांच्या लक्षात येत नाही की, हे महत्त्वाचे नाही, तर तन-मन-धन यांचा त्याग किती केला, हे महत्त्वाचे आहे. साधनेत पुढे जाण्यासाठी काय करू ?, असे विचारणे महत्त्वाचे आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !
     व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्र्राणी असतो ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कन्हैया कुणाचा हस्तक ?

संपादकीय
     जेएन्यूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार गेले अनेक दिवस चर्चेत आहे. यापूर्वी दिलेल्या घोषणांमुळे तो बराच चर्चेत आला. नंतर कारागृहात जाऊन आल्यानंतरही त्याचा उद्दामपणा कमी झालेला नाही. एकापेक्षा एक गंभीर भारतविरोधी वक्तव्ये करण्याचा त्याने सपाटाच लावला आहे. आता इतक्यातच त्याने काश्मीरमधील सैनिक तेथील महिलांवर बलात्कार करतात, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. कन्हैयाला मनाला येईल, तसे भारतविरोधी बरळण्याचा रोगच जडलेला असल्यामुळे त्याच्या या बकबकीची आपल्याला सवय झाली आहे. असे असले, तरी तो त्याचा भारतद्वेष सार्वजनिकरित्या प्रकट करत असल्यामुळे त्याच्या बोलण्यामागची पार्श्‍वभूमी स्पष्ट करणे आवश्यक ठरते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn