Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


मुर्शिदाबाद (बंगाल) येथील बॉम्बस्फोटात २ ठार

 • अनेक वर्षे फटाक्यांप्रमाणे बॉम्ब बनवणार्‍या तृणमूल काँग्रेसवर बंदीची मागणी का केली जात नाही ?
 • सनातनवर बंदीची मागणी करणारे ढोंगी निधर्मी आणि सनातनद्वेषी प्रसारमाध्यमे आता गप्प का ? 
 • हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस गप्प का ? 
 • असहिष्णुतेवरून ऊर बडवणार्‍यांना तृणमूल काँग्रेसचा आतंकवाद सहिष्णु वाटतो का ? 
 • १०० क्रूड बॉम्ब जप्त
 • तृणमूल काँग्रेसच्या कासिम शेख आणि ताहिर शेख गटांमधील वाद
     मुर्शिदाबाद - येथील बिंदापूर गावात ८ मार्चला सकाळी क्रूड बॉम्बचा स्फोट झाल्याने मिनार शेख आणि बशीर शेख हे दोन जण ठार झाले, तर काही जण घायाळ झाले. भरतपूर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १०० क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.
१. प्राथमिक चौकशीतून हा स्फोट अपघाताने झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
२. पोलीस म्हणाले की, पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यासाठी हे क्रूड बॉम्ब बनवण्यात आल्याची शक्यता आहे.

कन्नूर (केरळ) येथे माकपच्या कार्यकर्त्यांकडून संघस्वयंसेवकावर प्राणघातक आक्रमण

यासंदर्भात ५० लक्ष स्वयंसेवक असलेल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाज उठवावा, ही हिंदूंची अपेक्षा !
     कन्नूर (केरळ) - केरळ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली असतांना ८ मार्च या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ए.व्ही. बीजू यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात गंभीर घायाळ झालेले बीजू यांना कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्शाचालक असणारे ३५ वर्षीय बीजू नेहमीप्रमाणे सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत नेत असतांना ५ जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. गेल्या महिन्यातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप, संघ यांच्या कार्यकर्त्यांवर साम्यवाद्यांकडून आक्रमणे होत आहेत. वर्ष १९९९ मध्ये भाजपचे कार्यकर्ते असलेले शिक्षक के.पी. जयकृष्णन् यांची शाळेत मुलांना शिकवतांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती.

रा.स्व. संघावर बंदी न घातल्यास बॉम्बस्फोट करण्याची मदरशातील शिक्षकाची धमकी !

मदरशातील शिक्षक असे असल्यानेच तेथील मुलांना जिहादचे
शिक्षण दिले जाते; म्हणूनच मदरशांना आतंकवाद्यांचे कारखाने म्हटले जाते !
     ठाकूरद्वारा (उत्तरप्रदेश) - येथील पोलीस नियंत्रण कक्षाला दूरभाष करून मदरशातील शिक्षक हाफीज वकील याने स्वतःला आतंकवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. बंदी न घातल्यास लवकरच जिल्ह्यात बॉम्बस्फोट केले जातील. रेल्वेही उडवण्यात येईल, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी तो बोलत असलेल्या एका मदरशातून त्याला कह्यात घेतले. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी २५० पाकिस्तानी प्रेक्षकांना व्हिसा

     नवी देहली - ८ मार्चपासून चालू झालेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी, तसेच पाकच्या प्रत्येक सामन्यासाठी केवळ २५० पाकिस्तानी प्रेक्षकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. सुरक्षेच्या कारणावरून अधिक पाकिस्तानी प्रेक्षकांना व्हिसा दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले गेले आहे. यापूर्वी क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून आलेले अनेक पाकिस्तानी परत मायदेशी गेलेले नाहीत, असे अनुभव अनेकदा आलेले असल्याने ही काळजी घेतली जात आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्याचा पुन्हा प्रयत्न करणार्‍या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुन्हा घेतले कह्यात !

नावातही इंग्रजी शब्द असणार्‍या भूमाता ब्रिगेडसारख्या संघटनांमध्ये
स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म यांच्याविषयी कधी प्रेम असेल का ?
     श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ८ मार्च (वार्ता) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी ७ मार्च या दिवशी संगमनेरजवळील नांदूर शिंगोटे फाट्याजवळ कह्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही घंट्यांनंतर पुन्हा सोडण्यात आले होते. ८ मार्च या दिवशी तृप्ती देसाई यांनी त्यांच्या महिलांसह पुन्हा एकदा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी ८० हून अधिक महिलांना पुन्हा एकदा नांदूर शिंगोटे फाट्याजवळ सकाळी अडवून कह्यात घेतले. देसाई आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास सोडले. (वारंवार धर्मद्रोही आंदोलन करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तृप्ती देसाई आणि अन्य महिला यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी श्रद्धाळू हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर कुठलाही कर नाही - अर्थमंत्री

     नवी देहली - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफ्च्या) व्याजावर कर आकारण्याच्या अर्थसंकल्पातील प्रस्तावाला देशभरातून झालेल्या विरोधानंतर मोदी शासनाने माघार घेतली आहे. ईपीएफ्वर कुठलाही कर लागणार नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केली.

त्र्यंबकेश्‍वर येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार

सन्मानचिन्ह स्वीकारतांना समितीचे कार्यकर्ते आणि संस्थेचे साधक
     श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ८ मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले. यामुळे अनेक ग्रामस्थांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार मानले, तसेच येथील कुशावर्तच्या ठिकाणी येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानने समिती आणि सनातन यांना सन्मानचिन्ह देऊन जाहीर आभार मानले.

पोलिसांनी तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेड यांच्यावर कारवाई करावी !

त्रिंबकनगरीतील ग्रामस्थ महिलांकडून 
त्र्यंबकेश्‍वर पोलीस चौकीत निवेदनाद्वारे मागणी
    श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ८ मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे महाशिवरात्री, म्हणजेच ७ मार्च या दिवशी आंदोलन फसले. त्यांना संगमनेरजवळील नांदूर शिंगोटे फाट्याजवळ कह्यात घेतले होते. त्यानंतर ८ मार्च या दिवशी देसाई यांनी पुन्हा तशाच प्रकारचे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना पुन्हा अडवून अटक केली. त्यांच्या अशा आंदोलन करण्यामुळे अनेकांना वेठीस धरण्यात येते. त्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन येथील काही ग्रामस्थ भक्त महिलांनी त्र्यंबकेश्‍वर पोलीस चौकीत दिले. हे निवेदन पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांनी स्वीकारले. (धर्मरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन भूमाता ब्रिगेडवर कारवाईची मागणी करणार्‍या ग्रामस्थ भक्त महिलांचे अभिनंदन ! - संपादक)

देशभक्त चंद्रशेखर आझाद यांचे मारेकरी जवाहरलाल नेहरू असल्याच्या आरोपांची चौकशी करा ! - हिंदु जनजागृती समिती

असली पंडित चंद्रशेखर आझाद आणि नकली पंडित जवाहरलाल नेहरू ! 
     मुंबई - थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी नुकतेच जवाहरलाल नेहरू यांनीच इंग्रजांना चंद्रशेखर आझाद यांची गुप्त माहिती पुरवली आणि त्या माहितीच्या आधारे इंग्रजांनी चंद्रशेखर आझाद यांना घेरले. या वेळी घायाळ झालेले आझाद यांनी इंग्रजांना शरण जाण्यापेक्षा स्वतःला संपवले आणि एका महान क्रांतीकारकाचा अंत झाला, असा खळबळजनक आरोप नुकताच केला आहे. तसेच त्यांनी नेहरूंना देण्यात आलेला भारतरत्न परत घेण्याची मागणी केली आहे. गांधी यांच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे कपूर आयोग नेमला गेला, तसा आयोग नेमून या आरोपांची त्वरित चौकशी करून शासनाने जनतेपुढे सत्य मांडावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. काँग्रेसने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नकली देशभक्त, तर चंद्रशेखर आझाद यांना असली देशभक्त म्हणत सावरकर यांचा द्वेष करणारा प्रचार चालू केला आहे. त्या अनुषंगाने समितीने ही मागणी केली आहे. 
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, 
१. नेहरू यांना क्रांतीकारकांप्रती इतका द्वेष होता की, आझाद आणि भगतसिंह आदी क्रांतीकारकांना ते फॅसिस्ट म्हणत. 

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील ! - प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या ठिकाणी ४० हून अधिक हिंदुत्ववाद्यांची भेट ! 
मध्यभागी उपरणे घेतलेले श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या
डाव्या बाजूला श्री. सुनील घनवट आणि अन्य हिंदुत्ववादी
     कोल्हापूर - महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे पाहणी केल्यानंतर भाविकांना किमान सुविधाही दिलेल्या नाहीत, असे लक्षात येते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक देवळासमोर एक कुंड असते; मात्र या ठिकाणी दुर्दैवाने कुंडावर अवैध बांधकाम करून शौचालय बांधण्यात आले आहे. हे बांधकाम हटवण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असूनही ते बांधकाम हटवले जात नाही, हे दुर्दैवी आहे. आज हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या असून लवकरच बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ८ मार्च या दिवशी श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ता श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्यासह बजरंग दल, युवा सेना, श्री शिवप्रतिष्ठान, श्रीराम सेना, हिंदु एकता आंदोलन आणि शिवसेना यांच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाची पाहणी केली. त्या वेळी श्री. मुतालिक माध्यमांशी बोलत होते. 

तृप्ती देसाई गावामध्ये येणार, असे कळताच श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशदाराजवळ अनेक ग्रामस्थ महिला अल्पावधीत एकत्र !

 • धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी समस्त ग्रामस्थांनी एकत्र येणे, ही हिंदूसंघटनाच्या आगामी काळाची नांदीच !
 • धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी त्वरित संघटित होणार्‍या धर्माभिमानी महिलांचे अभिनंदन ! अशा सतर्क ग्रामस्थ महिला याच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत !
      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ८ मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या पुन्हा एकदा ८ मार्च या दिवशी त्रिंबक नगरीत येणार आहेत, अशी वार्ता एका ग्रामस्थाला समजली. त्यानंतर त्या ग्रामस्थाने सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मंदिर प्रशासनाच्या उद्घोषणा केंद्रावरून ही माहिती सर्वांना दिली. या उद्घोषणेवरून दिलेले वृत्त गावामध्ये वार्‍यासारखे पसरले. त्यानंतर अल्पावधीतच त्रिंबक नगरीतील १०० हून अधिक ग्रामस्थ महिला श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशदाराजवळ गोळा झाल्या. या वेळी अनेक महिला घरातून आहे त्या स्थितीत निघाल्या आणि मंदिराजवळ येऊन धर्मकर्तव्य बजावण्यास एकत्र आल्या !
    (अशा प्रकारचे हिंदूंचे संघटन झाल्यासच धर्मद्रोह्यांना जरब बसेल आणि हिंदु राष्ट्राची पहाट लवकरच दिसेल ! - संपादक)

कर्नाटकात असलेल्या अडीच लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे ! - श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटकच्या चिक्कमगळुरू येथे हिंदु धर्मजागृती सभा !
डावीकडून सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा, 
हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आणि 
श्रीराम सेनेचे श्री. महेश कुमार कट्टीनामाने
     चिक्कमगळुरू (कर्नाटक) - आज कर्नाटकात अडीच लाख अनधिकृत बांगलादेशी रहात आहेत आणि शासनाकडून त्यांना ओळखपत्र, रेशनकार्ड इत्यादी देण्यात येते, हे दुर्दैवी आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य श्रीराम सेनेच्या श्री. महेशकुमार कट्टीनामाने यांनी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित करतांना केले. (कर्नाटकातील हिंदूंनी पुढील निवडणुकीत अशा देशविरोधी काँग्रेसला घरचा रस्ता दाखवावा ! - संपादक) हिंदु जनजागृती समितीने ६ मार्च या दिवशी कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू येथील लायन्स सेवा भवनामध्ये या सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या अन्य साधकांच्या पाठी लागलेला पोलिसी चौकशीचा ससेमिरा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण संकट टळण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

बुद्धीभेद करणार्‍या पुरोगाम्यांचे मार्मिक वर्णन हे विचारवंत नव्हे, विचारजंत ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे

पुस्तकाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. एकबोटे, महंत सुधीरदास, डॉ. शेवडे, श्री. काणे
      पुणे, ८ मार्च (वार्ता.) - एखाद्या विषयाच्या संदर्भात स्वतःचा अभ्यास नसूनही जो छातीठोकपणे बोलतो, तो पुरोगामी ! कुठलाही विषय असला, तरी ही मंडळी मत व्यक्त करतात. खोटेे बोला; पण रेटून बोला अशी त्यांची रीत आहे. ज्याची बाजू पडती असते, तो पुष्कळ हातवारे करत बोलतो; कारण त्यांना अज्ञान लपवायचे असते. हे विचारवंत नव्हे, विचारजंत आहेत, असे मार्मिक वर्णन करत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ढोंगी पुरोगाम्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाडला. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने ६ मार्च या दिवशी येथील मनोहर मंगल कार्यालयात डॉ. शेवडे यांचे हिंदू : काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी नाशिक येथील काळाराम मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सुधीरदासजी महाराज, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अंकित काणे उपस्थित होते. या वेळी डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित सेक्युलर्स, नव्हे फेक्युलर्स या पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोगा मांडणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी धडाडीने गोरक्षणाचे कार्य करणार्‍या काही गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य ! - भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे 
राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि 
व्यासपिठावर उपस्थित साधू-संतगण
     हरिपूर - आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज यांनी केले. धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य आहे आणि धर्माच्या रक्षणासाठीच परमात्म्याने त्यांना निर्माण केले असतांना आज हिंदु धर्माची एवढी दारूण अवस्था का झाली ? याचे चिंतन त्यांनी करणे आवश्यक आहे, असेही स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज म्हणाले.

आरोपीला निष्कारण कारागृहात ठेवणे, ही मानवी हक्कांची पायमल्ली ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

 • कॉ. पानसरे हत्या प्रकरण 
 • पुढील सुनावणी २९ मार्चला 
समीर गायकवाड यांच्या दुसर्‍या जामीन अर्जावर १४ मार्च या दिवशी सुनावणी 
     कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) - तपास चालू आहे हे कारण आरोप निश्‍चित करण्यासाठी पुरेसे होऊ शकत नाही. खटला ४ वर्षे चालला, तर आरोपीला तेवढा काळ कारागृहात ठेवणार का ? उद्या आरोपी निर्दोष सुटला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ? म्हणून आरोप निश्‍चित करण्याच्या नावाखाली आरोपीला कारागृहात ठेवणे, ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे, असा युक्तीवाद कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी ८ मार्च या दिवशी केला.

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेस सहस्रावधी धर्मांधांची उपस्थिती !

नथुराम गोडसे यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याचे आदेश 
देणारे केंद्रीय गृहमंत्री या धर्मांधांवर कधी कारवाई करणार आहेत ?
      श्रीनगर - सैन्याच्या कारवाईत ठार झालेल्या २१ वर्षीय दाऊद शेख या जिहादी आतंकवाद्याच्या दक्षिण काश्मीरमधील कैमोह या गावातील अंत्ययात्रेमध्ये सहस्रो धर्मांध नागरिकांनी सहभाग घेतला. (मुंबईतील बाँबस्फोटांच्या प्रकरणी आतंकवादी याकूब मेमनला फाशी दिल्यावर त्याच्या अंत्ययात्रेतही सहस्रो धर्मांध नागरिक सहभागी झाले होते. त्यावर शासनाने निष्क्रियता दाखवली होती आणि आताही. असे शासन कधीतरी आतंकवाद नष्ट करू शकते का ? - संपादक)

भ्रमणभाषच्या अतिरेकाचे दुष्परिणाम जाणून त्याचा अनावश्यक वापर टाळा ! - जे.जे. रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर

     मुंबई - भ्रमणभाषच्या अतिरेकी वापरामुळे त्याचा युवकांच्या कानावर घातक परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे. भ्रमणभाषमधून बाहेर पडणार्‍या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक लहरींचा थेट मेंदूवर परिणाम होतोच, त्याशिवाय ऐकण्याची क्षमताही न्यून होते, असे निरीक्षण मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे.
     नुकताच इंटरनॅशनल इअर केअर डे साजरा करण्यात आला. यानिमित्त बोलतांना जे. जे. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. मोहन जगदे यांनी वरील निरीक्षण सांगितले. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाने काही काळापूर्वी १०० तरुणांवर विविध चाचण्या केल्या असता ७० टक्के तरुणांना हाय फ्रिक्वेन्सीमधील (हटर्झमध्ये मोजली जाणारी चाचणी) आवाज ऐकून येत नसल्याचे दिसून आले. भ्रमणभाषच्या वापरासंदर्भात डॉ. जगदे यांचे मध्यंतरी आयआयटी पवईमध्ये व्याख्यान झाले. या व्याख्यानानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांना ऐकण्याचा त्रास होत असल्याचे मान्य केले. ४५ ते ५० डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचे आवाज कानांसाठी घातक असतो. 
     भ्रमणभाषप्रमाणेच डीजे किंवा मोटारीत महागडी म्युझिक सिस्टीम, हायफाय स्पीकर्स आणि वूफर लावून फिरणे, पबमध्ये जाणे या गोष्टी कानांच्या पडद्यांसाठी घातक आहेत.

मुस्लिम पर्सनल लॉनुसार जर मुसलमान पुरुष ४ पत्नी करू शकतात, तर मुसलमान महिला ४ पती का करू शकत नाहीत ? - न्या. बी. कमल पाशा

 • महिलांना समानतेचा अधिकार आणि न्याय मिळण्यासाठी भांडणार्‍या भूमाता ब्रिगेड सारख्या संघटना या संदर्भात आंदोलन का करत नाहीत ? कि त्यांना असहिष्णुतावाल्यांचा फटका बसू शकतो, असे वाटते ?
 • मुस्लिम पर्सनल लॉमध्ये महिलांना समानतेचा अधिकार नसल्याचा दावा
      कोझिकोड (केरळ) - मुस्लिम पर्सनल लॉनुसार मुसलमान पुरुष जर ४ पत्नी करू शकतात, तर मुसलमान महिला ४ पती का करू शकत नाहीत ?, असा प्रश्‍न केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. कमल पाशा यांनी येथे महिलांच्या संघटनेच्या एका कार्यक्रमात विचारला. न्या. पाशा पुढे म्हणाले की, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये अशा कायद्यांचा सुकाळ आहे जे महिलांच्या विरोधात आहेत. याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात बसलेले धर्माचे ठेकेदार उत्तरदायी आहेत. अशा धर्मप्रमुखांनी आत्मचिंतन केले पाहिजे की, त्यांना एकतर्फी निर्णय देण्याचा अधिकार आहे का ? तर सामान्य लोकांनीही विचार केला पाहिजे की, यांना अशा प्रकारचे निर्णय देण्याचा अधिकार आहे का ?
      ते पुढे म्हणाले की, पर्सनल लॉमध्ये अनेक विसंगती आहेत. महिलांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला नाही, तसेच संपत्तीच्या आणि अन्य प्रकरणांच्या वेळी त्यांना अधिकार नाकारलेला आहे.

गोवा शासन मांडवीतून कॅसिनो हटवणार ! - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री

यापूर्वीही असे आश्‍वासन अनेक वेळा देण्यात आले होते, हे जनता विसरलेली नाही !
     पणजी (गोवा) - मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना अजून मुदतवाढ न देण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे. गोवा शासन कॅसिनो मांडवीतून हटवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली आहे.
१. भाजप शासनाने गत निवडणुकीच्या वेळी मांडवीतून कॅसिनो हटवणार असल्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र या आश्‍वासनाने पालन झालेले नाही. याउलट शासनाने मांडवीतील चार तरंगत्या कॅसिनोंची अनुज्ञप्ती ३१ मार्च २०१६ पर्यंत वाढवली आहे. (अशीच आश्‍वासने विरून जातात; म्हणून जनतेला आता कृतीची अपेक्षा आहे ! - संपादक)
२. भाजप शासनाने गतवर्षी मांडवीतून कॅसिनो स्थलांतर करण्यासाठी आग्वाद खाडी आणि शापोरा नदी येथे प्रत्येकी एक ठिकाणी, तर झुवारी नदीत दोन ठिकाणी मिळून एकूण चार जागा निवडल्या होत्या. (स्थलांतर केल्याने जलप्रदूषण होणार नाही का ? कि जनतेत जुगाराचा प्रसार होणार नाही ? - संपादक)

काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याकडून अटकेत असतांना भ्रमणभाषचा वापर !

नीतेश राणे यांनी अटकेत असतांना ट्विटर खाते कसे वापरले, तसेच त्यांना भ्रमणभाषची 
सुविधा कुणी दिली, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा !
ट्विटरवरून शासनावर टीका 
     सिंधुदुर्ग - डंपर आंदोलनाच्या वेळी मारहाण करणारे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी अटकेत असतांना भ्रमणभाषचा वापर करून ट्विट केले आहे. माझे आंदोलन आणि आरक्षणावरची भाषणे या सरकारला जास्तच झोंबली वाटत ! बघू कोण थकतय हे सरकार कि मी ! असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर ७ मार्च या दिवशी टाकले आहे.
   सिंधुदुर्गात गौण खनिज प्रश्‍नावरून डम्परचालक आणि मालक संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या वेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवला होता, तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या दालनातही तोडफोड केली होती. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी राणे यांच्यासह ७० ते ८० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नीतेश राणे यांच्यासह ३८ जणांना अटक करण्यात आली होती. ६ मार्च या दिवशी येथील न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये चर्चवरील आक्रमणाच्या प्रकरणी ७ जणांना अटक

     रायपूर (छत्तीसगड) - येथे ६ मार्चच्या रात्री एका चर्चवर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. या आक्रमणकर्त्यांच्या घटनास्थळाजवळ मिळालेल्या दुचाकी गाड्यांच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली. या संदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, प्रशासनाने कारवाई चालू केली आहे. दोषींना पाठीशी घालण्यात येणार नाही. (किरेन रिजिजू चर्चवर झालेल्या आक्रमणांविषयी तत्परतेने माहिती देऊन दोषींवर कारवाई करण्याविषयी बोलतात; मात्र देशात धर्मांधांकडून मंदिरांवर, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे होतात, तेव्हा रिजिजू कुठे गायब होतात ? - संपादक) 
     पोलिसांच्या माहितीनुसार २० हून अधिक लोकांनी चर्चवर आक्रमण केले. त्याची तोडफोड केली, तसेच चर्चमधील लोकांना मारहाण केली.

फलक प्रसिद्धीकरता

शासनाने चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूचे सत्य त्वरित शोधावे !
     जवाहरलाल नेहरू यांनीच इंग्रजांना चंद्रशेखर आझाद यांची गुप्त माहिती पुरवली आणि इंग्रजांनी त्यांना घेरले, या आझाद यांच्या पुतण्याने केलेल्या आरोपाची चौकशी करण्यात यावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Nehru hi Chandrashekhar Azad ke hatyare the, is aarop ki jaanch ho - Hindu Janjagruti Samiti 
       Iski shighra jaanch kar sarkar satya jantake samne laye !
जागो !
       नेहरु ही चंद्रशेखर आजादजी के हत्यारे थे, इस आरोप की जांच हो ! - हिन्दू जनजागृति समिति
       इसकी शीघ्र जांच कर सरकार सत्य जनता के सामने लाए !

भाषण देण्यापूर्वी सूत्रांची सत्यता पडताळली होती का ? - जेएन्यूचे प्राध्यापक परांजपे यांचा साम्यवादी कन्हैया कुमारला प्रश्‍न

     नवी देहली - देशद्रोहाच्या प्रकरणी जामीनावर मुक्त झालेला जेएन्यूचा विद्यार्थी कन्हैया कुमार याने कारागृहातून बाहेर आल्यावर केलेल्या भाषणावर जेएन्यूचे प्राध्यापक आणि कवी मकरंद परांजपे यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. कन्हैयाने त्याच्या भाषणात पू. गोळवलकर यांनी मुसोलिनीची भेट घेतल्याचे म्हटले होते. यावर प्रा. परांजपे यांनी विचारले आहे की, कन्हैया याने भाषणात मांडलेल्या सूत्रांच्या सत्यतेची पडताळणी केली होती का ? मुसोलिनीची पू. गोळवलकर यांनी नव्हे, तर मुंजे यांनी भेट घेतली होती. मात्र मी हे नाही म्हणत की ते फॅसिस्ट विचारांनी प्रभावित नव्हते. ते प्रभावित होते, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले.

भारतातील साक्षीदार न्यायालयात उपस्थित करा ! - पाक

पाकचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ! 
मुंबई येथील २६/११च्या आक्रमणाच्या प्रकरणी पाकिस्तानमध्ये सुनावणी चालू
     लाहोर - मुंबई येथील २६/११च्या आक्रमणाच्या प्रकरणी गेल्या सहा वर्षांंपासून इस्लामाबादमधील आतंकवादविरोधी न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. या प्रकरणी पाकिस्तानमधील साक्षीदारांच्या साक्षी संपल्या आहेत आणि भारतातील २४ साक्षीदारांच्या साक्षी शेष आहेत. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला पत्र लिहिले असून या पत्राद्वारे त्या सर्वांना पाकिस्तानच्या न्यायालयात उपस्थित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे साक्षीदार आले, तरच सुनावणीला गती येईल, असे पाकच्या शासकीय पक्षाचे अधिवक्ता चौधरी अजहर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानकडून ८७ भारतीय मच्छीमारांची सुटका

भारतीय मच्छीमार पाकच्या सीमेतच जाणार नाही, याची काळजी भारताने घेणे आवश्यक आहे ! 
     कराची - सदिच्छेचे प्रतीक म्हणून पाकिस्तानने भारतासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. पाकिस्तानची सागरी मर्यादा ओलांडल्याचा आरोप असलेल्या ८७ भारतीय मच्छीमारांची पाकने नुकतीच सुटका केली. येत्या २० मार्च या दिवशी अन्य ८६ मच्छीमारांची सुटका या मासाच्या शेवटी करण्यात येणार आहे. पाकच्या लांधी कारागृहामध्ये ५३६ भारतीय मच्छीमार शिक्षा भोगत होते. त्यापैकी गेले दोन ते अडीच वर्षे पाकच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या या मच्छीमारांना मुक्त करण्यात आले. इधी फाऊंडेशनचे फैजल इधी यांनी या मच्छीमारांच्या कराचीहून वाघा सीमेपर्यंतच्या प्रवासाचे दायित्व घेतले.

इस्लामला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्याची बांगलादेशातील अल्पसंख्यांकाची मागणी !

      नवी देहली - बांगलादेशमध्ये इस्लामला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात यावा, अशी मागणी येथील अल्पसंख्यांक नेत्यांकडून करण्यात आली आहे. १९८८ पासून इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा आहे. हे अवैध असल्याचे अल्पसंख्यांक नेत्यांचे म्हणणे आहे. याविषयीचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.
    मागील काही वर्षांपासून बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून ख्रिस्ती, हिंदु आणि अन्य धर्मियांवर होणार्‍या आक्रमणांंमध्ये वाढ होत आहे. बांगलादेशात ९० टक्के मुसलमान, ८ टक्के हिंदु आणि २ टक्के अन्य धर्मीय रहातात. मागील महिन्यातच पंचागड जिल्ह्यातील एका हिंदु मंदिरावर आक्रमण करण्यात आले होते. यात एका पुजार्‍याचा मृत्यू झाला होता, तर २ हिंदू भाविक घायाळ झाले होते. गतवर्षी अनेक अल्पसंख्यांक लेखकांची हत्या करण्यात आली होती.

कॅथॉलिक बिशपांनी लैंगिक शोषण करणार्‍या पाद्रींना लपण्यास साहाय्य केले !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
     अल्टूना (अमेरिका) - दोन रोमन कॅथॉलिक बिशप यांनी ४० वर्षांहून अधिक काळात लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या ५० हून अधिक पाद्री आणि ख्रिस्ती धार्मिक नेते यांना लपवण्याचे काम केले होते, अशा आशयाची माहिती ग्रॅन्ड ज्युरी अहवालामध्ये देण्यात आली आहे. हा अहवाल गुप्त अभिलेखागारमधून मिळालेल्या पुराव्यांवर काही प्रमाणात आधारित आहे. हे पुरावे मागील वर्षी तपास वॉरंटच्या वेळी मिळाल्याचे पेन्स्लानिया अ‍ॅटर्नी जनरल कॅथलीन कॅने यांनी सांगितले. कॅने म्हणाले, काही मुलांना ठार केल्याचे समजले. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही; कारण यातील काही दुराचारी या जगातून निघून गेले आहेत. कायद्याची सीमा संपली आहे आणि काही प्रकरणांमध्ये पीडितही चौकशीमुळे घाबरले आहेत. (हिंदु संतांवर कथित आरोपावरून गरळओक करणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्त्यांच्या कुकृत्यांवर पांघरूण का घालतात ? - संपादक)

मानसी देशपांडे बलात्कार आणि हत्या प्रकरणी जावेद खान याला फाशीची शिक्षा

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले 
धर्मांध गुन्हेगारीत मात्र सर्वांत पुढे !
      संभाजीनगर - बहुचर्चित मानसी देशपांडे बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी दोषी जावेद खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने जावेदला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती; मात्र उच्च न्यायालयाने जावेदला फाशीची शिक्षा सुनावली.
१. ११ जून २००९ मध्ये १९ वर्षीय मानसी देशपांडे या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या जावेदने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले होते.

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी त्यांच्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दौर्‍याच्या वेळी संतांच्या संकल्पाची घेतलेली प्रचीती !

अधिवक्ता रामदास
केसरकर
       सनातनच्या कार्याला ईश्‍वरी अधिष्ठान आणि संतांचे आशीर्वाद आहेत. संत द्रष्टे असल्याने त्यांना पुढे काय होणार, हे समजते. संतांच्या संकल्पाने धर्मकार्य वेगाने आणि अडथळ्याविना होते. सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांचा दौरा केला. त्या वेळी त्यांना संतांच्या संकल्पामुळे अनुभवायला मिळालेली सूत्रे आपण पहाणार आहोत.
१. संतांच्या संकल्पशक्तीने ईश्‍वरी कार्य कसे चालते, हे शिकायला मिळणे
     भारतात सांप्रतकाळी हिंदु समाज आणि हिंदु धर्म यांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमणे होत आहेत. त्यात राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदुत्ववाद्यांवर पोलीस नाहक खटले दाखल करत असल्याने हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी हिंदुत्ववादी अधिवक्त्यांची काळाप्रमाणे आवश्यकता आहे; परंतु असे राष्ट्र अन् धर्मप्रेमी अधिवक्ते फारच दुर्मिळ असल्याने मी व्यथित झालो आणि त्याच वेळी माझी एका थोर संतांशी भेट झाली. त्यांना मी माझी व्यथा बोलून दाखवली आणि विचारले, मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. सनातन संस्थेत अनेक साधक-साधिका अधिवक्ता आहेत. ते वकील व्यवसाय न करता संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करीत आहेत. त्यामुळे त्यांना वकिलीचा अनुभव नाही, तर अशा साधक-साधिकांना मी प्रशिक्षित करू का ? तसे केल्यास आम्हाला काही प्रमाणात तरी हिंदूंना न्यायालयीन कामात साहाय्य होईल आणि त्याचसमवेत त्यांची साधनाही होईल. हे ऐकून क्षणाचाही विलंब न लावता ते संत मला म्हणाले, केसरकर, त्यांना प्रशिक्षित करण्यात तुमचा वेळ घालवू नका. तुम्हाला यापुढे सिद्ध (तयार) अधिवक्ते भेटतील. या संतांच्या आशीर्वचनाची मला या दौर्‍यात प्रचीती आली. यातून संतांच्या संकल्पशक्तीने ईश्‍वरी कार्य कसे चालते ?, हे शिकायला मिळाले.

गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथ भेट द्या !

पू. (कु.) स्वाती खाडये
      गुढीपाडवा म्हणजेच हिंदूंचे नववर्ष ! यानिमित्ताने अनेक आस्थापने, उत्पादक, दुकानांचे मालक, वितरक आदी त्यांचे ग्राहक, कर्मचारी किंवा देणगीदार यांना भेटवस्तू देत असतात. प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक भेटवस्तू दिल्यामुळे त्या घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो. त्यापेक्षा सात्त्विक भेटवस्तू दिल्याने ईश्‍वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक भेटवस्तू देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्‍वरी कृपाही संपादन करता येते. सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून आज समाजात मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार होत असून या ग्रंथांमुळे अनेकजण साधनेला प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे सर्व आस्थापने, उत्पादक, दुकानांचे मालक, वितरक आदींना आवाहन आहे की, आपण सनातनचे अध्यात्माला पूरक असलेले ग्रंथ भेट म्हणून तुमच्या जवळच्या व्यक्तींना द्यावेत आणि धर्मकार्यात सहभागी व्हावे. 
      सनातनचे ग्रंथ www.Sanatanshop.com या संकेतस्थळावर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रंथ मिळण्यासाठी ९३२२३१५३१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- पू. (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था, महाराष्ट्र.

हुंडा - एक विघातक रूढी

८ मार्च या दिवशी झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्ताने...
१. आपल्या देशात हुंडाबंदीचा कायदा होऊनही हुंडा देणे आणि 
घेणे हा व्यवहार अव्याहत चालू असणे
     आपल्या देशात १९६० साली हुंडाबंदीचा कायदा झाला; पण हुंडाबंदी काही झालेली नाही. हुंडा देणे आणि घेणे हा व्यवहार अव्याहत चालू आहे, असेच प्रत्ययाला येते. हुंड्यासाठी जुळत आलेली लग्ने मोडतात. लग्नाच्या मंडपातून नवरा रुसून जातो, अडून बसतो, नाहीतर लग्न झाल्यावर मुलीला माहेरी पाठवून देतो. सासरची मंडळी मुलाचे दुसरे लग्न करून देऊ अशा धमक्या देतात आणि त्या खर्‍या करतात. हुंडा, अलंकार (दागदागिने) यांसाठी मुलींना सासरी मारहाण होते. उपाशी ठेवतात. मोलकरणीसारखे राबवले जाते. तिचा खूनही होतो. मुली कित्येक वेळा यातना सहन होत नाहीत; म्हणून स्वतःला पेटवून घेतात. वर्तमानपत्रांमधून प्रतिदिन एकतरी हुंडाबळीचे वृत्त आपण वाचतो.

शेतकर्‍यांच्या पाठीशी विधानमंडळ उभे आहे, असे चित्र निर्माण करण्याची आवश्यकता ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१६
      मुंबई - दुष्काळाच्या संदर्भातील प्रश्‍न चर्चेच्या माध्यमातून मांडता आणि सोडवताही येतील. चर्चेच्या माध्यमातून प्रश्‍न मांडल्यास राज्यशासनाची भूमिकाही स्वीकारण्याचीच राहील ! शेतकर्‍यांच्या पाठीशी विधानमंडळ उभे आहे, असे चित्र निर्माण करण्याची आज आवश्यकता आहे. चर्चा आणि उपाययोजना हे महत्त्वाचे आहे, अशी आमची विरोधकांना विनंती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.

भ्रष्टाचाराची बजबजपुरी !

     सध्या राज्यात अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक खटले उघडकीला येत आहेत. काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत, काहींची चौकशी चालू आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा, आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, घरकुल घोटाळा, शिक्षणसंस्थांचे घोटाळे हे वरच्या पातळीवरील राजकारण्यांचे मोठे घोटाळे आहेत. काहींना कारवाई होऊन अटक झाली आहे, काही त्या मार्गावर आहेत. या कारवाया पूर्णत्वास नेऊन या सगळ्यांना चांगलीच अद्दल घडायला हवी आहे. गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांचे नेते; म्हणून फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार करायचा. पुढच्या सात पिढ्यांना पुरेल अशी माया जमवायची. यांना ना जनाची लाज ना मनाची. दुर्दैवाने या भ्रष्टाचार्‍यांना जनतेने निवडून दिले आहे.

केंद्रशासन आणि एअरटेल आस्थापन यांनी मागितली २ आठवड्यांची मुदत

एअरटेल या आस्थापनाने हिंदुजागृती डॉट 
ऑर्ग या संकेतस्थळावर बंदी घातल्याचे प्रकरण
    मुंबई, ८ मार्च (वार्ता.) - जुलै २०१५ मध्ये एअरटेल या आस्थापनाने हिंदुजागृती डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ दाखवायचे बंद केले होते. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणी ८ मार्च यादिवशी न्यायमूर्ती रानडे आणि न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्या खंडपिठासमोर समितीच्या याचिकेची सुनावणी झाली. गेल्या खेपेस आम्हाला न्यायालयाने म्हणणे मांडण्यास सांगितले होते; परंतु पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी विनंती केंद्रशासनाच्या अधिवक्त्याने खंडपिठास केली. तसेच एअरटेल या आस्थापनाच्या वतीने उपस्थित राहिलेल्या अधिवक्त्यांनीसुद्धा म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यानुसार खंडपिठाने त्यांना २ आठवड्यांची मुदत दिली आहे. गेल्या वेळेसच न्यायालयात केंद्रशासनाने आपण बंदी घालण्याचा कुठलाही आदेश दिलेला नाही, असे स्पष्ट केले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी त्यांचे म्हणणे मांडले.

देशवासियांनो, कन्हैयाला डोक्यावर घेण्यापूर्वी त्याच्या भूमिकेचा फेरविचार करा आणि देशद्रोह्यांपासून सतर्क रहा !

जेएन्यूतील वाद !
कु. प्राजक्ता धोतमल
       गेले काही आठवडे जेएन्यूने संपूर्ण देशवासियांचे लक्ष वेधले. विद्यापिठातील काही विद्यार्थ्यांनी संसदेवरील आक्रमणाचा सूत्रधार अफझलच्या समर्थनार्थ घोषणांसह पाकिस्तानच्या बाजूने देशद्रोही घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. देशाचा केंद्रबिंदू असणार्‍या राजधानीत आणि तेही विद्यार्जनासारख्या पवित्र ठिकाणी जिथे देशाच्या भावी पिढीने देशभक्तीचे धडे घेऊन भविष्यात देशाला सृजनता आणि विकासाच्या दिशेने न्यावे त्या विद्यापिठातील विद्यार्थीमानसातील हे देशद्रोहाचे विष पाहून जनता हादरली. या विषवल्लीला कायमचा आळा घालण्यासाठी देशद्रोह्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी सामान्य देशप्रेमी जनतेने, याच विद्यापिठातील काही देशप्रेमी विद्यार्थी संघटनांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचे राजकारण झाले; पण अंती आमचे सुदैव की, या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना तरी अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता ! 
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. 
      शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुट्टी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

राज्यातील समस्यांवर दिलासा मिळत नसल्याच्या कारणावरून विरोधकांचा चहापानावर बहिष्काराचा निर्णय !

     मुंबई - दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या यांवर उदासीनता, पशूधन वाचवण्यात अपयश आणि राज्यातील अन्य समस्यांविषयी शासन गंभीर नाही. या शासनाकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या निष्क्रीय आणि संवेदनाहीन शासनाच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, अशी घोषणा राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षांनी ८ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषद केली. (चहापानावर बहिष्कार घालून समस्या सुटणार आहेत का ? त्यापेक्षा सर्वांनी एक होऊन जनतेचे आणि राज्यातील प्रश्‍न सोडवणे आवश्यक आहे ! - संपादक)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, तसेच साधक यांना गुरुसेवेची सुवर्ण संधी !

वातानुकूलित यंत्रे, शीतकपाट आदी उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही वातानुकूलित यंत्रे (विंडो ए.सी., तसेच स्प्लिट ए.सी.), शीतकपाट (फ्रिज) नादुरुस्त स्थितीत आहेत. ही उपकरणे वापरण्यायोग्य होण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याची सेवा उपलब्ध आहे.
     अशा उपकरणांची दुरुस्ती करण्याचा अनुभव असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक सेवा म्हणून करण्यास इच्छुक असतील किंवा सेवामूल्य घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतील, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर खालील माहिती पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास रामनाथी आश्रमात श्री. संभाजी माने यांच्याशी ०८४५१००६०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
       या सेवेत सहभागी होऊन ईश्‍वराने दिलेले कौशल्य त्याच्या चरणी समर्पित करण्याची संधी दवडू नका !
     आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत ! - प.पू. झुरळे महाराज, डोंबिवलीसाधकांनी त्यांना सांगितलेले आध्यात्मिक उपाय पूर्ण करूनच सेवेचे नियोजन करावे !

पू. अशोक पात्रीकर
     आध्यात्मिक त्रास असलेले अनेक साधक त्यांना जेवढे घंटे आध्यात्मिक उपाय करायला सांगितले असतात, त्यापेक्षा प्रतिदिन अल्प वेळ उपाय करतात. सेवेची तातडी नसली, तरी उपायांकडे दुर्लक्ष करत सेवा करण्याचा प्रयत्न करतात. असे त्यांचे सलग होत असल्याने त्याचा परिणाम सेवेवर होऊन फलनिष्पत्ती अल्प होते; पण हे त्यांच्या लक्षात येत नाही. असे करत १५ दिवस झाले की, अमावास्या आणि पौर्णिमेच्या वेळी त्रासाचे प्रमाण वाढल्याने त्यांना जाणीव व्हायला लागते. तेव्हा तेवढ्यापुरते काही घंटे उपाय करून वेळ मारून नेली जाते आणि पुन्हा सेवेकडे ओढा चालू होतो. 
    काही दिवसांपूर्वी गुरुमाऊलींनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना न सुचणे किंवा डोके जड होणे, असे त्रास जाणवल्यास १० ते १५ मिनिटे ध्यानमंदिरात जाऊन उपाय करायला सांगितले होते; पण साधक त्या सूचनेकडेही दुर्लक्ष करतात. त्यानंतर साधकांना होणार्‍या त्रासांचे प्रमाण वाढल्याने त्रास अल्प न झाल्यास उपायांचा कालावधी वाढवायलाही सांगितला होता. तेही साधक करत नाहीत. साधकांनो, आपण आध्यात्मिक उपाय पूर्ण न करण्याचा परिणाम गुरुमाऊलीवर होत असतो, हे लक्षात ठेवा. उपाय पूर्ण केले, तर ज्या सेवेला १ घंटा लागतो, ती सेवा ४५ मिनिटांत पूर्ण होते. तेव्हा उपाय पूर्ण करण्याचे गांभीर्य जाणून ते पूर्ण करा आणि गुरुआज्ञेचे पालन करा.
- (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

देवाच्या सतत अनुसंधानात असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कामोठे, नवी मुंबई येथील चि. स्वराली संतोष पांढरे (वय २ वर्षे) !

चि. स्वराली पांढरे
      माघ कृष्ण पक्ष द्वादशी (६.३.२०१६) या दिवशी कामोठे, नवी मुंबई येथील चि. स्वराली संतोष पांढरे हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. गर्भारपणी
१ अ. आधुनिक वैद्या (सौ.) स्नेहश्री पांढरे 
(चि. स्वरालीची आई)
१ अ १. गर्भधारणा झाल्यानंतर सासरचे वातावरण आनंदी होणे आणि श्रीकृष्णच धावून आल्याचे जाणवणे : गर्भधारणा झाल्यानंतर सासरी आणि माहेरी सर्वांना आनंद झाला. सासरचे वातावरण तणावपूर्ण असायचे. ते थोडे आनंदी झाले. श्रीकृष्णालाच माझी काळजी आहे; म्हणून तो माझ्यासाठी धावून आला, असे मला वाटले. तेव्हापासून श्रीकृष्णच माझ्याजवळ आहे, असे मला नेहमी वाटायचे.

परम ज्ञानाचे स्रोत असणारे सर्वज्ञ आणि परम योगी महादेव !

कु. मधुरा भोसले
१. शिवपार्वती विश्‍वाचे जनक, म्हणजे 
आदिपिता अन् आदिमाता असणे
      शैव पंथानुसार शिवापासूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. शिवाच्या निर्गुण रूपातून त्याची शक्ती प्रगट होऊन तिच्यापासून अखिल ब्रह्मांडातील संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. समस्त देवगण, ऋषीगण आणि राक्षसगण हे शिवपार्वती यांच्या सत्त्व, रज अन् तम या त्रिगुणांपासून निर्मिले आहेत. शिवाच्या शक्तीरूपाने समस्त सृष्टीला स्वतःमध्ये धारण केल्याने शिव आणि पार्वती यांना विश्‍वाचे जनक म्हणजे आदिपिता अन् आदिमाता असे संबोधून शिवभक्तांकडून आदराने गौरवान्वित करण्यात आले आहे.
१ अ. काशीक्षेत्राचे माहात्म्य : शिवाने सृष्टीची निर्मिती करतांना काशी या पुण्यस्थळाची निर्मिती करून तिला त्रिशुळाच्या अग्रभागावर धारण केले आहे. त्यामुळे काशीची भूमी सामान्य नसून ती अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्ययुक्त भूमी आहे. काशीच्या ठिकाणी स्वतः शिव काशीविश्‍वेश्‍वराच्या रूपाने विराजमान असून ६४ योगिनी आणि ६४ भैरव तेथे विद्यमान आहेत. स्थुलातून दिसणारी काशी ही शिवतत्त्वाच्या सगुणरूपाशी संबंधित असून सूक्ष्मातील काशी ही शिवाच्या निर्गुण तत्त्वाशी संबंधित असून ती त्रिगुणातीत आहे. त्यामुळे प्रलयकाळात संपूर्ण सृष्टी जरी नष्ट झाली, तरी काशीपुरी अबाधित रहाते. केवळ प्रत्येक मन्वंतरात सप्त चिरंजीव काशी क्षेत्रातील ऊर्जेची पुनर्स्थानापना करून तिला पुनरुज्जीवित करत असतात.

मडिकेरी (जिल्हा कूर्ग, कर्नाटक) येथील शिवमंदिराच्या स्थापनेच्या इतिहासातून उलगडलेले शिवकृपेचे माहात्म्य आणि त्यासंबंधी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व दर्शवणारी सूत्रे

१. मडिकेरी येथील शिवमंदिरात गेल्यावर आलेली 
अनुभूती - मडिकेरी येथील शिवमंदिर हे गावातील सर्वांत 
सात्त्विक ठिकाण असून हे शिवलिंग जागृत असल्याचे जाणवणे
      मडिकेरी (जिल्हा कूर्ग, कर्नाटक) या गावी शिवाचे एक मंदिर आहे. येथे स्थापन केलेले शिवलिंग काशीहून आणलेले आहे. या मंदिराच्या आवारात प्रवेश करताच मला पुष्कळ सात्त्विकता आणि शांती जाणवत होती. शिवलिंगाचे दर्शन घेतांना मला जाणवले, हे जागृत शिवलिंग आहे आणि संपूर्ण मडिकेरी गावात हेच सर्वांत सात्त्विक ठिकाण आहे.

साधकांना सूचना

         पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (८.३.२०१६) सकाळी १०.३४ वाजता
समाप्ती - माघ अमावास्या/फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (९.३.२०१६) सकाळी ७.२५ वाजता
आज अमावास्या आहे.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ईरोड, तमिळनाडू येथे महामृत्यूंजय जपासहित केलेला सर्वसंकल्प सिद्धीयाग, तसेच भवानी क्षेत्रात केलेला नवग्रहशांत आणि सर्पशांत विधी यांमुळे प.पू. डॉक्टरांच्या प्राणशक्तीत वाढ होणे आणि याविषयीची सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
(पू.) सौ. अंजली गाडगीळ
१. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे महामृत्यूंजय 
जपासहित सर्वसंकल्प सिद्धीयाग केला जाणे
      महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी करण्यास सांगितलेला महामृत्यूंजय जपासहित सर्वसंकल्प सिद्धीयाग (या यागात सनातनच्या कार्याचा प्रसार सर्वत्र व्हावा, साधकांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच हिंदु राष्ट्र लवकर यावे, यांसाठीही संकल्प केले गेले.) पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घरी पार पडला. २ आणि ३ फेब्रुवारी २०१६ या दिवशी हा याग केला गेला.
२. ईरोड येथे नवग्रहशांत आणि सर्पशांत हे विधी पार पडणे
      महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ईरोड जवळ असणार्‍या भवानी क्षेत्रात नवग्रहशांत आणि सर्पशांत हे विधीही पार पडले. ७.२.२०१६ या दिवशी केल्या गेलेल्या या विधींमध्ये प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली गेली आणि त्यासंदर्भात होमहवनही केले गेले.

नाडी ज्योतिषाच्या भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीव नाडीपट्टी यांमध्ये प.पू. डॉक्टर आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात केलेल्या उल्लेखातील साम्य

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. भृगुसंहिता
      गेल्या अनेक जन्मांपासून पू. (सौ.) अंजली गाडगीळ या प.पू. डॉक्टरांच्या परम शिष्या राहिल्या आहेत. (११.१२.२०१५)
२. सप्तर्षि जीवनाडी
      महर्षींनी होसूर, बेंगळुरू येथे झालेल्या नाडीपट्टीवाचनाच्या वेळी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी अनुक्रमे प.पू. डॉक्टरांचा उजवा आणि डावा हात आहेत, असे सांगितले. (६.१२.२०१५, रात्री ९.२९)
     हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि एकमेकांशी संबंध नसलेल्या दोन नाडीपट्ट्यांतील साधर्म्य असलेल्या माहितीवरून नाडीशास्त्र आधुनिक विज्ञानाच्या तुलनेत किती प्रगत आहे, हे लक्षात येईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    वर्गात गडबड करणार्‍या मुलांना शिक्षक वर्गाबाहेर काढतात. संसदेत आरडाओरडा करून जनतेचे प्रतिदिन २ कोटी रुपये उधळणार्‍या खासदारांना सभापती तात्काळ सभागृहाबाहेर का घालवत नाहीत ? त्यांना शिक्षकांएवढेही समजत नाही का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे
श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
     आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

महिलादिनाच्या निमित्ताने...!

संपादकीय 
      ८ मार्च १९१० या दिवशी अमेरिकेतील कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत वस्त्रोद्योगातील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्याचे त्या वेळी ठरले. याच वेळी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्याची मागणी करण्यात आली. भारतात वर्ष १९४३ पासून हा दिवस साजरा करायला आरंभ झाला. सध्या तो आता अधिकोष, शासकीय आणि खाजगी कार्यालये, सामाजिक संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये, सर्व प्रसारमाध्यमे, सामाजिक संकेतस्थळे अशा विविध स्तरांवर साजरा होतो. सध्या हे दिन साजरे करण्याचे प्रस्थ एवढे वाढले आहे की, खरोखरच असे दिन साजरे करणार्‍या कार्यक्रमांतून काही साध्य होते का, हे पडताळून पहायला हवे. त्याची फलनिष्पत्ती काही विशेष नसतेच; कारण मुळातच त्याचा वैचारिक गाभा हा पोकळ आहे. एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या स्त्रियांचे कौतुक करणे, येथपर्यंतच त्याचे साजरीकरण मर्यादित रहात आहे. त्यामुळे पत्रकारदिन, महिलादिन यांसारखे दिवस एक करायचे म्हणून साजरे करायचे असेच बहुतेक ठिकाणी होत आहे. सामाजिक स्तरावरचे दिन साजरे करण्याची पाश्‍चात्त्यांची टूम अलीकडच्या काळीतील आहे. भारतीय संस्कृतीत पूर्वापार आध्यात्मिक स्तरावर तिथीनुसार सण साजरे केले जातात आणि त्याचा चैतन्याच्या स्तरावर सर्वांना लाभ होतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn