Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

त्रिंबकच्या महिला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त पुढाकाराने झाले त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिराचे पावित्र्यरक्षण !

धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचा पुन्हा एकदा फज्जा !
  • हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन झाले जनआंदोलन !
  • हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु परंपरा धर्मरक्षण अभियानात ग्रामस्थांचा सहभाग !
तृप्ती देसाई यांना अटक केल्यानंतर समस्त ग्रामस्थ आणि 
महिला यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन जयघोष केला
      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्‍वर येथील श्री त्र्यंबकराजाच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा घाट घालणार्‍या धर्मद्रोही पुरो(अधो)गामी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा दिखाऊपणा निष्फळ ठरलाच; मात्र त्याचवेळी त्र्यंबकनगरीच्या भाविक आणि धर्माभिमानी ग्रामस्थ महिलांनी मंदिराचे पावित्र्यरक्षण करून महाशिवरात्रीच्या मंगलदिनी शिवाची कृपा संपादन केली ! ७ मार्चला त्र्यंबकेश्‍वराचे पावित्र्य भंग करण्यासाठी त्याच्या गर्भगृहात जाण्याचे आंदोलन करणार्‍या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले आणि त्यामुळे त्र्यंबकनगरीत शिवभक्त, हिंदुत्ववादी, ग्रामस्थ यांनी हर हर महादेवचा जयघोष करून जल्लोष केला !

पोलिसांनी कह्यात घेतल्यावर तृप्ती देसाई यांच्या धर्मद्रोही दिखाऊ आंदोलनाची समाप्ती !

     नाशिक - त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा धर्मद्रोही तृप्ती देसाई आणि त्यांच्या आंदोलनकर्त्या महिला यांना संगमनेर-नाशिक महामार्गावरील नांदुर फाटा येथे पोलिसांनी कह्यात घेतले. अत्यंत सुनियोजित कारवाई करून पोलिसांनी गाड्यांचा ताफा अडवला आणि त्यांना नोटीस देण्यात आली. नाशिकपासून ४० कि.मी. अंतरावरच ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. महिला पोलिसांनी मानवी साखळी केली होती. हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. या वेळी १५० पोलीस उपस्थित होते. पोलीस आणि अत्यल्प संख्येने असलेल्या महिला आंदोलक यांच्यात वादावादी झाली. अखेर तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचा अशा प्रकारे फज्जा उडाला आणि हे धर्मद्रोही आंदोलन पूर्णतः थंड पडले !

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात घुसण्याचा साध्वी हरसिद्धगिरीजी यांचा प्रयत्न धर्माभिमानी ग्रामस्थ महिलांनी हाणून पाडला !

साध्वी यांना अडवतांना ग्रामस्थ महिला
हिंदूंच्या धर्मपरंपरा न मानणार्‍या म्हणे साध्वी !
     त्र्यंबकेश्‍वर - येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात घुसण्याचा अशयस्वी प्रयत्न जुना आखाड्याच्या साध्वी हरसिद्धगिरीजी यांच्याकडून ७ मार्च या दिवशी करण्यात आला. साध्वी मंदिरात ठाण मांडून बसल्या आणि पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्या ऐकत नव्हत्या. शेवटी ग्रामस्थ महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन साध्वींना उचलून मंदिराबाहेर आणले आणि त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले. (धर्मरक्षणासाठी कृतीशील असणार्‍या त्र्यंबकेश्‍वर येथील धर्माभिमानी महिलांचे अभिनंदन ! - संपादक) सुरक्षारक्षक आणि पोलीस यांनी नंतर साध्वींना आवाराबाहेर काढले. तृप्ती देसाई यांनी गर्भगृहात घुसण्याच्या दिलेल्या चेतावणीनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी अचानक साध्वींकडून होणार्‍या या कृत्याला धर्माभिमानी ग्रामस्थ महिलांनी कृतीशील विरोध करून धर्माचे रक्षण केले. त्यानंतर प्रसिद्धीची हौस असलेल्या वाहिन्यांना साध्वी मुलाखती देऊ लागल्या.
     या वेळी साध्वी हरसिद्धगिरीजी म्हणाल्या, १२ ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महिलांना गर्भगृहात प्रवेश आहे. मग इकडे का नाही ? माझा तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. 

जिहादी आतंकवाद्यांच्या बायका आणि मुले यांनाही ठार करा ! - डोनाल्ड ट्रम्प

आतंकवाद्यांच्या विरोधात इतके कठोर होण्याचा विचार गेली ३० वर्षे आतंकवाद्यांची 
आक्रमणे भोगणार्‍या भारतियांनी तरी केला होता का ?
     वॉशिंग्टन - इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्‍यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवाद्यांच्या बायकांना आणि मुलांनाही ठार करण्यात आले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. 
ट्रम्प म्हणाले की, 
१. इसिसला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे आता अस्तित्वात असलेले कायदे आणखी कडक करावे लागतील. 
     सीमेवर प्रतिदिन आतंकवादी आक्रमणांत सैनिकांचे जीव जात असतांना देशाच्या सद्यस्थितीचे गांभीर्य नसलेले संवेदनाशून्य निधर्मी राजकारणी आणि पुरो(अधो)गामी हे जेएन्यूमधील देशद्रोही विद्यार्थ्यांवरील कारवाई, शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावरून दर्शन यांसारख्या थेट राष्ट्रहिताशी संबंध नसलेल्या विषयांवर आंदोलने करतात. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितदक्ष पत्रकारितेचा वारसा लाभलेले भारतातील पत्रकारही अशांची तळी उचलून त्यांना प्रोत्साहन देतात, हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे ! - संपादक

(म्हणे) दयेची भीक मागणारे सावरकर नकली देशभक्त !

देशाची फाळणी करून १० लाख हिंदूंच्या
हत्यांना उत्तरदायी असणार्‍या काँग्रेसचा आरोप !
      नवी देहली - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद प्राणांची आहुती देत असतांना ब्रिटिशांकडे दयेची भीक मागणारे सावरकर हे नकली देशभक्तच होते, अशी टीका काँग्रेसने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. गेल्या आठवड्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील त्यांच्या भाषणात गांधी आमचे - सावरकर तुमचे असे म्हटले होते. (हिंदूंनो, काँग्रेसने नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पाण्यात पाहिले आहे. नेहरूंनी जाणीवपूर्वक त्यांना गांधीवधाच्या कटात गोवले; मात्र सावरकरांच्या देशभक्तीविषयी कधीही कौतुकाचे उद्गार काढले नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक)
१. चंद्रशेखर आझाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छायाचित्रे काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली आहेत. यात आझाद यांच्या छायाचित्रावर असली आणि सावरकरांच्या छायाचित्रावर नकली असे लिहिण्यात आले आहे.
२. आझाद अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांविरोधात लढले, त्यांनी प्राणांची आहुती दिली, तर सावरकरांनी सहा वेळा इंग्रजांकडे दयेची भीक मागितली, अशी टिप्पणीही येथे करण्यात आली आहे

अफझलच्या समर्थनार्थ कार्यक्रम रहित करण्यावर कन्हैया कुमारने आक्षेप घेतला होता ! - जेएन्यूच्या रजिस्ट्रारचा गौप्यस्फोट

अफझल माझा आदर्श नाही, म्हणणार्‍या कन्हैयाचे ढोंग उघड !
अशा देशद्रोह्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याचीच शिक्षा द्यायला हवी !
      नवी देहली - ९ फेब्रुवारीला जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये) महंमद अफझलच्या फाशीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रहित केल्यावर कन्हैया कुमारने आक्षेप नोंदवला होता, असा गौप्यस्फोट जेएन्यूचे रजिस्ट्रार भुपिंदर जुत्शी यांनी केला आहे. याच कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या.
     जुत्शी पुढे म्हणाले की, जेएन्यूतील अपंग विद्यार्थ्यांसाठी खास बस चालू करण्याबाबत ९ फेब्रुवारीला माझ्या कार्यालयात जेएन्एस्यूच्या नेत्यांना बोलवण्यात आले होते. कन्हैया आणि रामा नागा यांची अन् माझी दुपारी ३ वाजता या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी अभाविपचे सौरव शर्मा आल्यानंतर आमच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर शर्माने अफझलच्या फाशीविरोधात साबरमती ढाबा येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पत्रक मला दाखवले.

विमानवाहू नौका विराटला लागलेल्या आगीमध्ये अभियंत्याचा मृत्यू

      नवी देहली - भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका आयएन्एस् विराटला ६ मार्चला लागलेल्या आगीत आशु सिंह या अभियंत्याचा मृत्यू झाला असून तिघेजण घायाळ झाले आहेत. विराट सध्या गोव्याच्या समुद्रकिनार्‍यात तैनात आहे. दुसरीकडे हिमाचलच्या चंबामध्ये रावी नदीचे पाणी अचानक वाढल्याने २ सैनिक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

ए फॉर अल्ला, तर एच् फॉर हिंदु का नाही ?

उर्दू शाळेबाहेरील फलकावर लिहिण्यात
आलेले ए फॉर अल्ला हे शब्द
     तेलंगण राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात असलेल्या भूक्तपुरा येथे इंग्रजी माध्यमाची उर्दू शाळा आहे. या शाळेच्या बाहेर प्रवेशासंबंधी एक फलक लावण्यात आला आहे. त्यावर ए फॉर अल्ला हे शब्द ठळकपणे लिहिण्यात आले आहेत. 
     एखाद्या हिंदूंच्या शाळेबाहेर एच् फॉर हिंदु अथवा जी फॉर गणपति असे लिहिण्याचे धाडस हिंदू करू शकतील काय ? मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व जे मुसलमानांना कळते ते हिंदूंना कळत नाही; म्हणूनच आज जगात इस्लाम हा बलाढ्य धर्म मनाला जातो, तर हिंदु धर्माला भारतातही कुणी विचारत नाही. मी हिंदु आहे असे सांगायलाही अनेकांना लाज वाटते.

कर्करोगाच्या चिकित्सेसाठी अमेरिका आता आयुर्वेद अभ्यासणार !

  • पाश्‍चात्त्य उपचारपद्धतीचा (अ‍ॅलोपॅथीचा) उदोउदो करणार्‍यांनो, आयुर्वेदाचे महत्त्व जाणा आणि त्याच्या संवर्धनासाठी कृतीशील व्हा !
  • आता अमेरिका अभ्यास करून भारतियांपुढे आयुर्वेदाचे महत्त्व मांडेल, तेव्हा आपल्याला ते समजणार आहे का ? 
    वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त नेतृत्वाने दोन्ही देश आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य करणार आहेत. आयुर्वेदातील उपचारांचा विशेषत: कर्करोगांवरील उपचारांचा सखोल अभ्यास करून ही चिकित्सा पद्धत संपूर्ण जगासमोर आणण्याचा अमेरिकेचा मानस आहे. 
१. अमेरिकेच्या ९ सदस्यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी काशी हिंदु विश्‍वविद्यालयाला भेट दिली.
२. आयुर्वेदातील चिकित्सा पद्धती आणि औषधे यांचा जगभरातील प्रभाव आणि मिळणारे यश पाहून ती जगभरात लागू करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जातील, असे अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयाचे साहाय्यक सचिव जिम्मी कोल्कर यांनी म्हटले आहे.
३. या मोहिमेच्या अनुषंगाने नवी देहली येथे ३ आणि ४ मार्च या दिवशी आयुष मंत्रालयाकडून इंडो-अमेरिका पारंपरिक औषधी आयुर्वेदाशी संबंधित २ दिवसीय कार्यशाळा झाली.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडे भारताचे २० सहस्र कोटी पडून !

देशाच्या सहस्रो कोट्यवधी रुपयांविषयी निष्काळजी असणारी पूर्वीची शासने देशाचा कारभार 
काय चालवत असतील, याची कल्पना येते ! उत्तरदायी तत्कालीन मंत्री आणि अधिकारी 
यांच्यावर खटले प्रविष्ट करा !
मागील शासनांची देशाच्या धनाविषयी निष्काळजी वृत्ती उघड
     नवी देहली - अमेरिकी प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयात, म्हणजे पेन्टागॉनच्या खात्यात भारताचे २० सहस्र कोटी रुपये विनावापर पडून असल्याचे उघड झाले आहे. ही आगावू रक्कम शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी भारताकडून अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली होती. हे कोणत्या शासनकाळात घडले, याविषयी कळू शकले नाही. (एका खात्याचा एवढा पैसा विदेशात विनावापर पडून आहे, तर इतर खात्यांचीही चौकशी करा ! - संपादक)

क्रिकेट मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीवरून फटकारले !

     नवी देहली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अनागोंदी कारभारावर वचक बसावा; म्हणून सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीची नेमणूक केली होती. या समितीने केलेल्या शिफारसी अर्थातच नियामक मंडळाच्या एककल्ली कारभाराला वेसण घालणार्‍या असल्याने त्यांनी समितीच्या शिफारसींना विरोध केला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका स्वीकारून नियामक मंडळाचे सर्व आक्षेप फेटाळून लावले. क्रिकेट नियामक मंडळ आणि त्यांच्या आधिपत्याखालील राज्य क्रिकेट नियामक मंडळाचे अधिवक्ता के.के. वेणुगोपाल आणि कपिल सिब्बल यांसारख्या दिग्गज अधिवक्त्यांना न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी निरुत्तर केले.

मोदी केवळ बडबड करत आहेत !

मोदी शासनावर रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांची टीका !
     मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही स्वयंसेवकांनी ३ मार्च या दिवशी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन मोदी शासनावर टीका केली. संघाशी संबंधित वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे स्वयंसेवक मनोहर मेश्राम, हनुमान किन्नाने आणि अंकुश नेहारे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
यात मेश्राम म्हणाले,
१. परदेशातील काळा पैसा देशात परत आणू, बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई कमी करू, असे निवडणुकीपूर्वी आश्‍वासन देणारे नरेंद्र मोदी यांचे शासन केवळ बडबड करत आहे. या शासनाच्या हातून प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम होतांना दिसत नाही.

राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे २ सहस्र ९०० हून अधिक खटले प्रलंबित

एका राज्यात भ्रष्टाचाराचे एवढे खटले प्रलंबित आहेत, तर संपूर्ण देशात किती खटले 
प्रलंबित असतील ? अशाने भ्रष्टाचाराला आळा कसा बसेल ?
     जयपूर - राजस्थानच्या न्यायालयामध्ये डिसेंबर २०१५ पर्यंत भ्रष्टाचाराचे २ सहस्र ९०० हून अधिक खटले प्रलंबित आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहेत. लाचलूचपत प्रतिबंधक ब्युरोच्या वर्ष २०१५ च्या वार्षिक अहवालानुसार डिसेंबरपर्यंत २ सहस्र ९३८ खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत भ्रष्टाचाराशी संबंधित ३३३ प्रकरणे दाखल करण्यात आले. त्यातील ७५ प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा करण्यात आली आहे आणि ८७ प्रकरणांमध्ये आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.उज्जैनच्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी केंद्रशासनाचे एक रुपयाचेही साहाय्य नाही !

मुसलमानांवर हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपये उधळणार्‍या शासनाजवळ 
हिंदूंच्या कुंभपर्वासाठी नाही, हे लक्षात घ्या ! 
     उज्जैन - सिंहस्थ कुंभपर्वासाठी राज्यशासन ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत असतांना केंद्रशासनाकडून एक पैसाही मिळाला नसल्याचे सूत्र येथे सिंहस्थाच्या कार्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर उपस्थित झाले. या वेळी मुख्यमंत्री चौहान यांनी नवनिर्मित रेल्वे उड्डाणपूल, चारपदरी मार्ग, महाकाल मंदिर कॅरिडोर इत्यादी कार्यांचे लोकार्पण केले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मध्यप्रदेशच्या पर्यटनामध्ये येणार्‍या काळात बेगा आणि उज्जैन प्रमुख केंद्र असेल. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, दुबई आदी देशांमध्ये सिंहस्थाचीच चर्चा आहे.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी शासन सर्व बाजूंशी संवाद साधून निर्णय घेईल ! - अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना कु. प्रतिक्षा कोरगावकर
     महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात येणार्‍या आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले, मीदेखील आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मी अर्धवस्त्र नेसून गेलेलो नसल्यामुळे मला गाभार्‍यात सोडले नाही. मी त्या सूचनेचा आदर केला. त्यांनी केलेली मागणी, त्याला केला जाणारा विरोध आणि राज्यघटना या सर्वांना एकत्र करून चर्चा आणि संवाद साधल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढला पाहिजे. शासन सर्वांशी संवाद साधून निर्णय घेईल. सध्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकते. प्रत्येक वेळी शासनाने चर्चा करायला पाहिजे असे नाही. तृप्ती देसाई आणि मंदिराचे पुरोहित, ग्रामस्थ हेही चर्चेने प्रश्‍न सोडवू शकतात.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या अन्य साधकांच्या पाठी लागलेला पोलिसी चौकशीचा ससेमिरा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगात अन्य साधकांना झालेले त्रास आणि साधकांना आलरल्या अनुभूती पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

जेएन्यू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

थाळीनाद मोर्च्यात सहभागी हिंदुत्ववादी
     नंदुरबार - जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे ५ मार्च या दिवशी येथे करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी तरुणांनी थाळीनाद करून सर्वांचे लक्ष वेधले. शहरातील काही मार्गांनी गेलेल्या मोर्च्याचे तहसील कचेरीसमोर सभेत रूपांतर झाले. हिंदूंच्या सर्वच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. मोर्च्याच्या नियोजनात प्रा. डॉ. सतीश बागुल, भावना कदम, सौ. भारती पंडित, सौ. शोभना माळी, सौ. छाया सोनार, सौ. आव्हाड, राजेंद्र चौधरी, जितेंद्र मराठे आदींनी सहभाग घेतला.

छत्रपती संभाजीराजेंच्या बलीदानाचे स्मरण म्हणून एक मास आवडत्या गोष्टींचा त्याग करा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

धारकर्‍यांसमोर बोलतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी (वर्तुळात)

      सांगली, ७ मार्च (वार्ता.) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान केले. त्याचे स्मरण म्हणून दूरचित्रवाहिनी न पहाणे, चहा न पिणे, गादीवर न झोपणे, पायात वहाणा न घालणे, गोड पदार्थ न खाणे अशा प्रकारे आपल्याला आवडणार्‍या गोष्टींचा एक मास त्याग करा. त्यांचे बलीदान घराघरात पोहोचवण्यासाठी पराकाष्ठा करा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमासाच्या निमित्ताने वढुबुद्रुक येथून आलेल्या ज्वालेच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या फेरीच्या शेवटी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. 

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील धर्मपरंपरा रक्षणासाठी त्र्यंबकेश्‍वरवासियांची ग्रामसभा

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानामध्ये त्र्यंबकेश्‍वरवासियांचा सहभागी होण्याचा निर्धार ! 
ग्रामसभेला संबोधित करतांना मान्यवर

पाकच्या अफगाणिस्तान सीमेवरील मदरसे आतंकवाद्यांची केंद्रे !

पाकिस्तानला आतंकवाद्यांची झळ बसली नसती, तर त्याने 
आतंकवाद्यांच्या संदर्भात माहिती दिली असती का ? 
पाकिस्तानचे परराष्ट्र प्रकरणांचे सल्लागार सरताज अझिझ यांचे स्पष्टीकरण
    वॉशिंग्टन - अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा आणि उत्तरी वझिरिस्तानच्या निर्मनुष्य परिसरात असलेले मदरसे आतंकवादी कारवायांचे केंद्र बनले आहेत, असा खुलासा पाकिस्तानचे परराष्ट्र प्रकरणांचे सल्लागार सरताज अझिझ यांनी केला आहे. अझिझ यांनी या आतंकवादी कारवायांसाठी अफगाणी शरणार्थींना उत्तरदायी ठरवले आहे. हे शरणार्थी अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सत्तेवरून तालिबानला हुसकावल्यानंतर पाकिस्तानात घुसले होते.

पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बैठकीला उपस्थित धर्माभिमानी
      पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ७ मार्च (वार्ता.) - येथे २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वत: धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मबांधवांना संघटित करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. ४ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही आढावा बैठक स्वा. सावरकर मुक्तदार वाचनालय, सावरकर पथ येथे घेण्यात आली होती. बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका व्हनमारे आणि श्री. विनोद रसाळ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत प्रत्येक रविवारी सायंकाळी ६ वाजता सावरकर वाचनालय येथे धर्मशिक्षण वर्ग घेण्यासह प्रत्येक मासाच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. या वेळी गोरक्षक सर्वश्री आदिनाथ भोसले, स्वप्नील सुभेदार, अमोल पुजारी यांसह २७ हिंदु धर्मबांधव उपस्थित होते.

भादवड (ठाणे) गावात हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

ह.भ.प. चिंतामणी महाराज यांचा राज्यस्तरीय वारकरी आगरी भूषण 
पुरस्कार मिळाल्याविषयी सन्मान
१. ह.भ.प. चिंतामणी महाराजांचा
(डावीकडे) सत्कार करतांना ग्रामस्थ
     ठाणे - भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सर्वांनी हिंदु धर्मावरील आघात आणि हिंदूंना धर्माशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर चर्चा करून हिंदूसंघटन करण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचे निश्‍चित केले. तसेच गावातील हिंदूंच्या स्थानिक समस्यांवर उपाय काढण्याविषयी चर्चा केली.
    या वेळी ग्रामस्थांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सभेचे स्वरूप आणि सभेसाठी आवश्यक सर्व सेवा समजून घेतल्या. सभेचा प्रसार करण्यासाठी गावातील मान्यवर व्यक्तींना भेटणे आणि घराघरांमध्ये जाणे याविषयी नियोजन केले. तसेच गावातील महिलांची अशीच बैठक होण्यासाठी रविवारचा दिवस निश्‍चित केला.

सोलापूर येथे पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्‍या ७२ गोवंशियांची सुटका

     सोलापूर - वेळापूर मार्गे पशूवधगृहाकडे जात असलेल्या ७० वासरे आणि २ गाई यांचे प्राण गाडीवर छापा टाकून वेळापूर पोलिसांनी वाचवले आहेत. पालखी चौक येथील नाकेबंधी पोलीस कर्मचारी लक्ष्मणराव पिंगळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक बाबुराव आयवळे, विठ्ठल कुंभार यांना अकलूजहून आयशर टेम्पो हा सांगोल्याकडे जाणार, याची माहिती मिळाली. यामुळे वरील वर्णनाचा टेम्पो पालखी चौकात आल्यानंतर थांबण्यास सांगितले. या वेळी टेम्पो पाठीमागील हौदात जखमी अवस्थेत २ जर्सी गायी आणि १ ते ३ महिन्यांची कोवळी ७० वासरे, तोंड अन् पाय दोरीने बांधून दाटीवाटीने ठेवलेल्या स्थितीत आढळली. 
     या वेळी सह पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी चालकाकडे विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सांगोल्याकडे पशूवधगृहाकडे गाई आणि वासरे नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र शासन प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलमान्वये वेळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कह्यात घेतलेली वासरे, गायी यांना जवळच्या गोशाळेत पाठवण्यात आले आहे. (म्हणे) इंग्रजांच्या काळात भारत एकसंध झाला !

डॉ. कुमार सप्तर्षी बरळले...
     पुणे, ७ मार्च (वार्ता.) - भारत इतिहासकाळात कधीही एकसंध नव्हता. तो इंग्रजांच्या काळात एक झाला, असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. (वा रे कल्पनाशक्ती ! पुढे इंग्रजांमुळेच भारत हा देश झाला, असे म्हणायलाही ही मंडळी मागेपुढे पहाणार नाहीत. - संपादक) ३ मार्च या दिवशी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएन्यू आंदोलन आणि राष्ट्रद्रोहाची संकल्पना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला विरोध करणार्‍यांना देशद्रोही ठरवण्याचे षड्यंत्र चालू असल्याचा कांगावा कथित पुरोगामी आणि समाजवादी मंडळी यांनी या चर्चासत्रात केला.

फलज्योतिषातील फोलपणा उघड करणार्‍या अंनिसला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्काराची रक्कम दान

      सातारा - फलज्योतिषातील फोलपणा शास्त्रीय चाचण्यांद्वारे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न अंनिस प्रयत्न करत आहे. या कार्याला पाठिंबा दर्शवत मदतनिधी म्हणून शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांना मिळालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्काराची १ लक्ष रुपयांची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दान म्हणून दिली. (ज्योतिषशास्त्रातील तज्ञांना याविषयी विचारायला हवे, हेही न कळणारे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यातून स्वतःची वैचारिक दिवाळखोरीच दाखवत आहेत ! - संपादक)

भिवंडीत स्कॉर्पिओमधून तीन कोटी रुपये कह्यात !

      मुंबई - भिवंडीमध्ये एका स्कॉर्पिओमधून सुमारे तीन कोटी रुपये कह्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. कह्यात घेण्यात आलेले पैसे हवालाचे असून ते गुजरातहून मुंबईला आणण्यात येत होते, असा पोलिसांचा अंदाज आहे.पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यानंतर त्यांना स्कॉर्पिओमधील मागील आसनाच्या खाली कुलुप बंद पेटी बनवून आरोपींनी दोन कोटी ८५ लक्ष रुपये लपवल्याचे निदर्शनास आले.

पौड (पुणे) परिसरातून स्फोटके कह्यात

     पुणे - पौड येथील राज्य परिवहनाच्या (एस्टी) स्टँड परिसरातून स्फोटकांचा साठा कह्यात घेण्यात आला आहे. यामध्ये ४३२ जिलेटिनच्या कांड्या आणि ३२६ इलेक्ट्रिक डिटोनेटर्सचा समावेश आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली. संजय दत्तात्रय बलकवडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रऊप अन्वरखान इनामदार यांनी पौड पोलिसांत तक्रार दिली आहे. 
    ५ मार्चला रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य परिवहनाच्या स्टँडच्या परिसरात गाड्यांची तपासणी करत होते. त्या वेळी आरोपींना कह्यात घेतले. शासकीय वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने मात्र बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्याची जामिनावर मुक्तता केली. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

इतक्या मोठ्या प्रमाणातील पोलिसांच्या फौजफाट्याची खरंच आवश्यकता आहे का, 
याची पोलीस प्रशासनाने निश्‍चिती करावी !
एकूण ३४ पोलिसांची नियुक्ती 
     राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही मासांपासून त्यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याआधी त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती; परंतु आता अण्णांच्या सुरक्षेसाठी २ पोलीस अधिकारी आणि ३२ पोलीस कर्मचारी तैनात असतील. या सुरक्षेविषयी अण्णांनी खेद व्यक्त केला असून ही वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. 

आतंकवाद्यांचे उदात्तीकरण केले जात आहे ! - ठाकूर अजयसिंग सेंगर

हिंदवी स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्र-धर्म विषयावर व्याख्यान
उपस्थित हिंदु धर्माभिमानी
     पनवेल - नथुराम गोडसे यांचा २८० दिवसांमध्ये निकाल लागून फाशी देण्यात आली; मात्र याकूब मेननच्या फाशीला २२ वर्षे लागली. अफजलच्या फाशीसाठीही अनेक वर्षे लागली. अशा प्रकार आतंकवाद्यांचे उदात्तीकरण केले जात आहे, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे श्री. ठाकूर अजयसिंग सेंगर यांनी केले. हिंदवी स्वराज्य मावळा सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने तळोजा पाचनंद गाव, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे राष्ट्र आणि धर्म या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

अरविंद केजरीवाल पाकचा दौरा करणार

भारतात हुतात्मा सैनिकांच्या घरी सांत्वनासाठी कधीही न जाणार्‍या केजरीवाल यांचे पाकप्रेम ! 
     नवी देहली - सत्ताधारी आम आदमी पक्षाचे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लवकरच पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. पाकमधील कराची येथील आयोजित साहित्य महोत्सवामध्ये ते सहभागी होणार आहेत. आयोजकांकडून देण्यात आलेल्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला आहे. या कार्यक्रमासाठी भारतातील अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेते अनुपम खेर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते; मात्र पाकिस्तानकडून व्हिसा नाकारण्यात आल्याने झालेल्या वादानंतर त्यांनी तेथे जाण्यास नकार दिला.

अमेरिकेत गुरुद्वाराची तोडफोड

     वॉशिंग्टन - येथील स्पोकाने येथे ४४ वर्षीय जेफ्री सी पिट्टमन या नग्न व्यक्तीने शिखांच्या गुरुद्वारात तोडफोड केली. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गुरुद्वारामधील कागद आणि विशेष तलवार जप्त करण्यात आली. अमेरिकेतील शीख समुदायाने घटनेचा तीव्र निषेध केला. आम्ही सर्व धर्मांचा समान आदर करतो. त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील, असे कृत्य केल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असे स्पोकानेचे शेरीफ ओझ्झी क्नेझोव्हिच यांनी निवेदनात म्हटले आहे.


इंग्लंडमधील धर्मांधांच्या सेवाभावी संस्थेने करकपातीतील पैशांतून पीस टीव्हीला निधी दिल्याने लक्षावधी पौंडचा दंड !

     लंडन - इंग्लंडमधील इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन इंटरनॅशनल (आय.आर्.एफ्.आय.) या सेवाभावी संस्थेने ब्रिटीश कायद्याप्रमाणे सेवाभावी संस्थांना मिळणार्‍या करकपातीतील पैशांतून डॉ. झाकीर नाईक यांच्या दुबईतील पीस टीव्हीला देणग्या दिल्याचे ब्रिटीश अधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आय.आर्.एफ्.आय. संस्थेला लक्षावधी पौंडचा दंड ठोठावण्यात आला आहे.
१. पीस टीव्ही ही दूरचित्रवाणी ज्यू धर्मियांच्या विरोधात प्रचार करते. या पीस टीव्हीचे प्रमुख डॉ. झाकीर नाईक यांच्यावर २०१० मध्ये इंग्लंडमध्ये प्रवेश करण्यावर बंदी लावण्यात आली आहे.
२. डॉ. झाकीर ओसामा बिन लादेन याचे समर्थक असून ज्यू धर्मावर विषारी टीका करतात, ही बाब इंग्लंडच्या शासनाच्या लक्षात आली होती.

जर्मनीतील मुसलमान विस्थापितांमुळे तेथील ज्यू धर्मीय सापडले कात्रीत !

     कोलोन (जर्मनी) - सिरिया, इराक इत्यादी मुसलमान राष्ट्रांमधून सुमारे ११ लक्ष मुसलमान विस्थापित जर्मनीमध्ये शरणार्थी म्हणून आले आहेत. या अरब मुसलमानांचे ज्यू धर्मियांशी प्राचीन काळापासून असलेले हाडवैर जगजाहीर आहे. दुसरीकडे जर्मनीत नव-नाझीवादाचा उदय अनेक वर्षांपासून चालू झाला आहे. हिटलरला दैवत मानून त्याची धोरणे लागू करण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. हिटलरचा ज्यू द्वेषही सर्वश्रुत आहे. अशा परिस्थिती जर्मिनीतील ज्यू धर्मियांची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी झाली आहे. (जर्मनीतील पीडित ज्यूंची स्थिती जगभगर पोहोचते, तर बांगलादेशी मुसलमान घुसखोरांमुळे पूर्वोत्तर भारतातील हिंदूंची झालेली दयनीय स्थिती देशातही नीट पोहचत नाही ! - संपादक)

पाकिस्तानसारख्या धोकादायक देशाशी लढण्यासाठी भारताशी मैत्री करणे आवश्यक - डोनल्ड ट्रम्प

भारताकडे अण्वस्त्रे आणि शक्तीशाली सेना असूनही राज्यकर्त्यांच्या कचखाऊ धोरणांमुळे भारताला 
पाकच्या आतंकवादी आक्रमणांना सामोरे जावे लागते, हे भारतियांना लज्जास्पद !
    वॉशिंग्टन - अफगाणिस्तानच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने अफगाणिस्तानात रहाणे आवश्यक आहे. भारताजवळही अण्वस्त्रे आणि शक्तीशाली सेना आहे. त्यामुळे पाकिस्तानशी लढण्यासाठी भारताचे सहाय्य घ्यायला हवे. भारत हे पाकिस्तानाला रोखण्याचे माध्यम आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षातील उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते एका चर्चासत्रात ते बोलत होते. गतवर्षी ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये पाकिस्तान हा सर्वांत धोकादायक देश असल्याने पाकिस्तानानचे नि:शस्त्रीकरण आवश्यक आहे, असे म्हटले होते.

फलक प्रसिद्धीकरता

आतातरी भूमाता ब्रिगेड हिंदु धर्म परंपरा तोडण्याचा प्रयत्न थांबवेल का ?
     बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील त्र्यंबकराजाच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा घाट घालणार्‍या धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा दिखाऊपणा निष्फळ ठरला आणि पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Trimbakeshwarme hue Hindusanghatanke falswaroop Bhumata Brigadeka Dharmadrohi andolan vifal hua. - Hinduo, Sanghatanse hi Dharmaraksha sambhav hai !

जागो !: त्र्यंबकेश्‍वर में हुए हिन्दूसंगठन के फलस्वरूप भूमाता ब्रिगेड का धर्मद्रोही आंदोलन विफल हुआ. - हिन्दुओ, संगठन से ही धर्मरक्षा संभव है !

जर्मनीमध्ये बनावट नावाने चालवण्यात येणार्‍या फेसबूक अकाऊंटवर बंदी येणार !

      बर्लिन - न्यायालयाने बनावट नावे वापरून फेसबूकचे अकाऊंट खोलणार्‍यांची खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जर्मनीमध्ये लवकरच असे अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत. फेसबूक वापरणार्‍यांनी रिअल नेम पॉलिसीनुसार कायदेशीर ओळखपत्र देणे बंधनकारक असणार आहे. गोपनीयतेचा अधिकार भंग होत असल्याचे म्हणत हॅम्बर्ग डेटा प्रोटेक्शन यंत्रणेने फेसबूक वापरणार्‍यांना टोपणनावे वापरण्याची अनुमती दिली होती. या धोरणावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

जेएन्यूच्या विरोधात चुनाभट्टी येथील राष्ट्राभिमानी युवकांकडून स्वाक्षरी चळवळ

     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या येथील धर्मशिक्षणवर्गातील युवकांनी राष्ट्रद्रोही जेएन्यूच्या विरोधात पंचशीलनगर येथे स्वाक्षरी चळवळ राबवण्यात आली. या चळवळीला पंचशीलनगर मित्र मंडळाच्या युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पंचशीलनगर मित्र मंडळचे सर्वश्री संकेत घाग, सुशांत देवकर, निलेश मोहिते, उदय निकम, प्रणव मोहिते, निखिल मोहिते, प्रवीण माने, सन्नी घाडगे, निखिल उबाळे, अतुल साळुंखे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

अमेरिकेत पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या चोराला एका भारतीय महिलेने चोपले !

    नवी देहली - अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या आणि मूळ भारतीय असलेल्या भूमिका पटेल या महिलेने पिस्तुलाचा धाक दाखवून चोरी करणार्‍या चोराला चोप दिला. क्रिस्टियन डकोटा असे या चोराचे नाव असून तो १७ वर्षांचा आहे. युवक सोडा खरेदी करण्याचे निमित्त साधून दुकानात आला. समोर केवळ एक महिला आहे असे पाहून त्याने या महिलेवर पिस्तुल रोखून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. (महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम झाल्या, तर महिलांना अबला समजणार्‍या अशा चोरांना कायमचा धाक बसेल ! - संपादक)
     तरुणाच्या या अरेरावीला न जुमानता या महिलेने त्याच्यावर प्रतिआक्रमण केले, त्यामुळे या तरुणाला तेथून पळ काढावा लागला. पोलिसांनी या चोराला पकडले आहे.

श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करण्यासाठी आवाहन !

     देहली - यावर्षी देण्यात येणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी आंध्रप्रदेशातील लेखक डॉ. यरलगद्दा लक्ष्मी प्रसाद यांना पद्मभषूण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
      डॉ. प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी द्रौपदी, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे द्रौपदी नावाचे तेलुगु पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात प्रसाद द्रौपदीला केवळ कामुक म्हणून चित्रित करून थांबले नसून त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिले आहे. हिंदु जनजागृती समितीने पद्म पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी, आणि राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांन पत्र लिहून डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करण्याची मागणी केली होती. 
     धर्माभिमानी खालील इ-मेल पत्यावर डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणारा पद्मभूषण पुरस्कार रहित करण्याचे आवाहन करत आहेत. 
     इमेल : cabinetsy@nic.in, cm@ap.gov.in, appt.pmo@gov.in, presidentofindia@rb.nic.in

तेजस्वी नारी इतिहास लाभला भाग्य आमचे । अभिमानाने गातो पोवाडे त्यांच्या गौरवाचे ॥

८ मार्च या दिवशी असलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने...
हिरकणी नावाच्या मातेमुळे ओळख लाभलेला रायगडावरील हिरकणी बुरुज 
(हा कठीण बुरुज हिरकणी मातेने बाळासाठी सायंकाळच्या अंधारातही उतरला.)
पुत्रास्तव जी उतरली दुर्गम कडा, धन्य धन्य ती वीरमाता ॥
प्राणांची नाही केली पर्वा, जिच्या कीर्तीचा घोष दुमदुमला दिगंता 
साहसाने तिच्या हिरकणीनामे बुरूज कीर्तीस पावला आसमंता ॥

जगभरातील १९० राष्ट्रांतील ७ लक्षांहून अधिक जिज्ञासूंपर्यंत अध्यात्माविषयीचे ज्ञान पोचवणार्‍या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.Org) या संकेतस्थळाची यशस्वी वाटचाल !

७ मार्चला झालेल्या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.Org) 
या संकेतस्थळाच्या चतुर्थ वर्धापनदिनाच्या निमित्ताने...
     शास्त्रीय भाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य करणार्‍या सनातनच्या नव्या स्वरूपातील संकेतस्थळाचा महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर चतुर्थ वर्धापनदिन साजरा झाला . या दृष्टीने प्रस्तुत लेखात गतवर्षात संकेतस्थळाद्वारे झालेल्या धर्मप्रसाराच्या कार्याचा वेध घेण्यात आला आहे. सध्या हे संकेतस्थळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांमध्ये कार्यरत आहे.
१. विविध विषयांवरील १ सहस्रहून 
अधिक लेख आणि वृत्ते यांना प्रसिद्धी !
      आतापर्यंत सनातनच्या संकेतस्थळावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये अध्यात्म, हिंदु धर्म अन् साधना यांविषयी माहिती देणारे एकूण १ सहस्र २३३ वैविध्यपूर्ण लेख, तसेच सनातनशी संबंधित ७११ वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली.

प्राचीन काळापासून हिंदु नारीचे झालेले रक्षण आणि सांप्रतकाळी अत्याचारांपासून रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वैश्‍विक कार्यासाठी हिंदु नारीला केलेले आवाहन !

कु. मधुरा भोसले
     हिंदूंचे अवतारी पुरुष आणि धर्माधिष्ठित हिंदू राजे हेच खरे हिंदु नारीचे रक्षणकर्ते आहेत, हे धर्मग्रंथांनी आणि हिंदूंच्या इतिहासाने पुनःपुन्हा सांगितले आहे. हिंदु नारींच्या रक्षणाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण धार्मिक आणि ऐतिहासिक घटना अन् सांप्रतकाळासाठी हिंदु स्त्रियांनी रणरागिणी बनून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध होण्याची आवश्यकता या लेखात आपण पाहूया. 
१. श्रीविष्णूच्या विविध अवतारांचे नारीरक्षणाचे अनमोल कार्य
१ अ. श्रीविष्णूच्या वराह अवताराने पृथ्वीचे रक्षण करणे आणि नराधम हिरण्याक्षाला मृत्यूदंड देणे : असुर माता दितीचा पुत्र हिरण्याक्ष याने भूदेवीचे (पृथ्वीचे) अपहरण करून तिला पाताळात नेले. तेव्हा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी श्रीविष्णूने वराह अवतार धारण केला. श्री वराह अवताराने पृथ्वीला पाताळातून बाहेर काढून तिची मुक्तता केली आणि नराधम हिरण्याक्षाला मृत्यूदंड दिला.

बेवारस वाहनांविषयी पोलीस प्रशासनाचा गलथानपणा !

     पुण्यातील ४० पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने अनेक वर्षांपासून गंजून पडून आहेत. ही वाहने चोरी करतांना वापरलेली, अपघातग्रस्त झालेली, वाहनांचा प्रादेशिक परिवहन कर न भरलेली आणि बर्‍याचदा बेवारस सापडलेली वाहनेही पोलिसांनी ती शासनाधीन केलेली असतात. सद्यस्थितीत पुण्यात अशा प्रकारे पडीक असलेल्या वाहनांची किंमत ही ५ कोटी रुपयांहून अधिक आहे. ही स्थिती फक्त पुणे शहराची असून राज्यातील शेकडो पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारे असलेल्या वाहनांचा विचार केल्यास ती संख्या सहस्रो आणि त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांची होईल. पोलिसांना अंतर्गत कायदा सुव्यवस्था सांभाळत असतांना अशा गाड्या सांभाळावे लागणे, यापेक्षा अयोग्य गोष्ट कोणतीही नसेल. प्रत्यक्षातही अशा वाहनांकडे पोलीस प्रशासन प्रत्यक्षात किती लक्ष देत असेल, याचा विचारच न केलेला बरा अशी स्थिती आहे.

मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्याचे उत्तरदायित्व केवळ पुरुषाचे आहे, स्त्रीचे नव्हे !

     वैज्ञानिक युगातसुद्धा आपल्याला हे ठाऊक नाही की, मुलगा किंवा मुलींच्या जन्माचे उत्तरदायित्व पुरुषाचे असते, स्त्रियांचे नव्हे. पुरुषाच्या वीर्यात असंख्य शुक्राणू असतात. ते दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारच्या शुक्राणूमध्ये सगळे एक्स क्रोमासोम असतात. दुसर्‍या प्रकारच्या शुक्राणूमध्ये वाय क्रोमासोम असतात. महिलांमध्ये स्त्रीबीज असते. सगळ्या स्त्रीबीजांमध्ये एक्स क्रोमोसोम असतात. पुरुषामधील एक्स क्रोमोसोमवाला शुक्राणू महिला बिजात मिळून मूल झाले, तर मुलगी जन्मते. नरामधील वाय क्रोमोसोमचा शुक्राणू महिला बिजात मिसळून मूल झाले, तर मुलगा होतो. मुलगा होणार कि मुलगी हे पुरुषाचे शुक्राणू ठरवतात. यात महिलेचा काही संबंध नसतो. गर्भलिंगचिकित्सा करून मुलगी असेल, तर काही जण गर्भपात करतात. हे महिलांसंदर्भात मोठे पाप आहे. मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्याचे उत्तरदायित्व केवळ पुरुषाचे आहे, स्त्रीचे नव्हे. - मेजर मनोहर लाल (से.नि.) (संदर्भ : योग संदेश, जून २०१०) 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
 (संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

देशाच्या राजधानीतील राष्ट्रद्रोही रोखू न शकणारे केंद्रशासन सर्वत्रच्या आतंकवाद्यांपासून देशाचे कधीच रक्षण करू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी आतातरी सिद्ध व्हावे !

     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जेएन्यूच्या परिसरातील गोवरी वसतीगृहाजवळ २६ फेब्रुवारी २०१६च्या मध्यरात्री पुन्हा देशद्रोही फलक झळकवले गेले. या फलकांवर भारताला कारागृह असे संबोधले असून काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची देशद्रोही मागणी करण्यात आली. याशिवाय आतंकवादी महंमद अफझलची फाशी ही न्यायालयीन हत्या आहे, अशी गरळओक करण्यात आली. त्याचबरोबर या फलकांवर अनेक देशद्रोही घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी ४ विद्यार्थ्यांची चौकशी केली. धर्मांतरण होण्याआधीच रोखले असते, तर असे अभियान करावे लागले नसते !

     रायपूर येथे घरवापसी अभियान अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याची मोहीम देशभर राबवण्यात येईल, असे प्रतिपादन प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. प्रबल प्रतापसिंह जुदेव हे घरवापसी अभियान राबवणारे दिलीपसिंह जुदेव यांचे पुत्र आहेत.

संगीताचे सात सूर !

     सा रे ग म प ध नि सा हे सात सूर मानवी जीवनाचे संगीत घडवतात.
सा : सागरात पहिला जीव जन्मला. 
रे : रेतीवरचे जीव (कासव इत्यादी) नंतर जन्मले.
: गगनातील जीव, पक्षी नंतर जन्मले.
: मग मानव जन्माला आला.
: पराक्रमासाठी मानवाचा जन्म झाला.
: धर्मासाठी पराक्रम केला पाहिजे. 
नि : नियंत्रण मग मनावर ठेवले पाहिजे.
सा : साक्षात्कार भगवंताचा मन जिंकले की घडतो.
     सात सुरांच्या सात आठवणी ।
     त्यातून जुळती जीवन गाणी ॥
     गाणी गाऊनि रंगून जावे ।
     स्वामीचरणी विनम्र व्हावे ॥
(संदर्भ : श्री स्वामी समर्थ, त्रैमासिक, जुलै १९९८) 

श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले आसुरी लोक सध्या भारतात उदंड झाले आहेत !

१. स्वतःला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट वागणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधी-विधानांचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. (देवळात दर्शन घेतात.) (श्रीमद्भगवद्गीता १६, श्‍लोक १७) 
२. मिथ्या अहंकार, बळ, गर्व, काम आणि क्रोध यांमुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या आणि इतरांच्या देहांमध्ये असणार्‍या भगवंतांचा द्वेष करतात आणि खर्‍या धर्माची निंदा करतात.
(श्रीमद्भगवद्गीता १६, श्‍लोक १८)

पू. प्रभुदेसाईआजींची भेट झाल्यावर त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन करणे अन् दुसर्‍या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये त्याच विषयावरील लेख प्रसिद्ध झाल्यावर पू. आजींच्या माध्यमातून गुरुतत्त्व बोलल्याची जाणीव होणे

     १३.८.२०१५ या दिवशी पू. प्रभुदेसाईआजींची भेट झाली. आम्ही त्यांच्याकडे गेल्यापासून पू. आजी सातत्याने स्वभावदोषांविषयी बोलत होत्या. पू. आजी म्हणाल्या, साधक १५ ते २० वर्षे साधनेत आहेत, तरी प्रगती का होत नाही ?, याचा त्यांनी विचार करायला हवा. साधकांनी आपल्यातील कोणत्या दोषांमुळे पुढे जाऊ शकत नाही, हे समजून घेऊन त्याचा अभ्यास करायला हवा. गुरुमाऊली तर सर्व साधकांची काळजी घेतेच.
      १४.८.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये श्री. मधुसूदन कुलकर्णी यांनी लिहिलेला साधनेचा आत्मकल्याणकारी मार्ग सोडून मायेत जाऊ इच्छिणार्‍या साधकांनो, हे लक्षात घ्या ! हा लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा आदल्या दिवशी पू. आजींच्या मुखातून गुरुतत्त्वच बोलत आहे, याची जाणीव झाली.
     त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, गुरुमाऊलीने सर्व गोळ्यांना (साधकांना) आकार देत इथवर आणले आहे. आता याच जन्मात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून ईश्‍वराचे गुण आपल्यात येण्यासाठी अन् गुरुचरणी पोहोचण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे, हे आपले दायित्व आहे.

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

प.पू. पांडे महाराजांकडून मंत्रोपाय प्राप्त झालेल्या 
साधकांनी उपायांमध्ये झालेले पुढील पालट लक्षात घ्यावेत !
       डिसेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या ३ मासांत प.पू. पांडे महाराजांकडून शेकडो साधकांना मंत्रोपाय देण्यात आले होते. संभाव्य आपत्काळानुसार मंत्रोपाय करणार्‍या साधकांनी त्यात पुढील पालट करावेत.
१. सर्वांसाठी दिलेल्या मंत्रांपैकी पापनाशक मंत्र, विषनाशक मंत्र, काळी शक्तीनाशक दत्तात्रेय मंत्र, विषाचे झाडन करणारा मंत्र आणि प्रारब्ध भोग नष्ट करणारा मंत्र हे मंत्र केवळ आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी आवश्यकतेनुसार म्हणावेत.
२. काही साधकांना मलबद्धता दूर होण्यासाठीचा मंत्र, जठराग्नी प्रबळ होण्याचा मंत्र, झोप येण्यासाठी मंत्र, साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी मंत्र, तसेच आपल्या व्याधीविना अन्य मंत्र देण्यात आले आहेत. हे मंत्र ती व्याधी नसल्यास म्हणू नयेत.

९.३.२०१६ या दिवशीच्या सूर्यग्रहणाच्या संदर्भातील माहिती

     
सौ. प्राजक्ता जोशी
बुधवार, ९.३.२०१६ या दिवशी खग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तोदित) आहे. हे ग्रहण खग्रास असले, तरी भारतामध्ये ते खंडग्रास दिसणार आहे. ग्रहण दिसणार्‍या प्रदेशांमध्ये सूर्योदयाच्या वेळी ग्रस्त झालेले सूर्यबिंब उदयास दिसेल.
१. ग्रहण दिसणारे प्रदेश
     भारत, श्रीलंका, नेपाळसह पूर्व आशिया, चीनचा दक्षिणेकडील प्रदेश, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अलास्का आणि कॅनडाचा पश्‍चिमेकडील काही प्रदेश, पॅसिफिक आणि हिंदी महासागर या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे.
२. पुण्यकाळ
      सूर्योदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे.
३. ग्रहणाचे वेध
      हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने ८.३.२०१६ या दिवशी सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. बाल, वृद्ध, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती यांनी ८.३.२०१६ या रात्री ९ वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

चिकाटीने साधनेतील सातत्य टिकवून ठेवून आनंद अनुभवणारे मुंबईतील ६१ टक्के पातळीचे श्री. मंदार माधव गाडगीळ !

सात्त्विक प्रवृत्तीचे आणि साधी रहाणी असलेले श्री. मंदार 
गाडगीळ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचा वृत्तांत !
श्री. मंदार गाडगीळ
      देवद (पनवेल), ७ मार्च (वार्ता.) - सनातनचे पू. मुकुल गाडगीळ यांचे कनिष्ठ बंधू श्री. मंदार गाडगीळ (वय ४४ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे आश्रमातील ६८ टक्के पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांनी येथील सनातनच्या आश्रमात एका अनौपचारिक कार्यक्रमात ६ मार्च या दिवशी घोषित केले. या वेळी उपस्थित साधक आणि श्री. मंदार गाडगीळ यांचे ६७ टक्के पातळीचे वडील श्री. माधव गाडगीळ अन् ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची आई सौ. माधुरी गाडगीळ यांचा भाव जागृत झाला. श्री. माधव गाडगीळ यांनी श्री. मंदार गाडगीळ यांना श्रीकृष्णाच्या चित्राची चौकट देऊन त्यांचा सत्कार केला.
       आपल्या प्रगतीविषयी सांगतांना ते म्हणाले, असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. मी तर काहीच केले नाही. सत्कारानंतर त्यांचे आई-वडील यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, श्री. मंदार यांची साधना चांगली चालू आहे आणि त्याची प्रगती झाली आहे, याची आम्हाला पूर्वसूचनाही मिळाली होती. श्री. मंदार लहानपणापासूनच सात्त्विक विचारांचा आहे. मोठ्या पदावरची नोकरी करतांनाही त्याने कधीच पैशांचा हव्यास धरला नाही. त्याने सदैव संस्कार जोपासले आहेत. त्याच्यात अहं अल्प असून तो साधा आहे. तो १०० टक्के आज्ञापालन करतो. या वेळी भाऊ पू. मुकुल गाडगीळ आणि बहीण सौ. मनीषा गोडबोले (यांनी केवळ आनंद व्यक्त केला.) यांनीही दूरभाषवरून त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितले. पू. मुकुल गाडगीळ यांनी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करून श्री. मंदार यांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे श्री. मंदार गाडगीळ यांची मुलगी कु. राजसी गाडगीळ (वय १२ वर्षे) हीसुद्धा उच्च लोकातून आलेली आहे.

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

 साधकांनो, १५.३.२०१६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १५.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.

साधकांशी जवळीक साधून त्यांना प्रेम देणारे सिंहगड रस्ता, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाका (वय ६८ वर्षे) !

श्री. अरविंद सहस्रबुद्धे
     सिंहगड रस्ता, पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाका यांचा माघ कृष्ण पक्ष त्रयोदशी (७.३.२०१६) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त सौ. पार्वती जनार्दन यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. आपुलकीने आणि प्रेमाने 
बोलून साधकांशी जवळीक साधणे
       मी पू. स्वातीताईसमवेत पुण्याला गेले असतांना आमची श्री. अरविंद सहस्रबुद्धे काकांच्या घरी रहाण्याची सोय केलेली होती. आम्ही नवीन असूनही ते आमच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलत होते. त्यामुळे आम्हालाही नवीन ठिकाणी गेलेलो आहोत, असे वाटले नाही. आम्ही त्यांच्या घरी गेल्याने त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा. पुढील प्रवासासाठी आम्ही निघालो. त्या वेळी काका म्हणाले, तुम्ही गेलात की, घर रिकामे वाटेल. कधी येणार ? लवकर या.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

 विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.
 

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, १५.३.२०१६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
    संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १५.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी 
२. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे बाकी
मुंबई

३. वर्ष २०१५ च्या गुजराती भाषेतील पंचांगाच्या विज्ञापनांची येणे बाकी
४. सनातन पंचांग २०१६च्या विज्ञापनांची येणे बाकी 
५. गुरुपौर्णिमा २०१५ च्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांची येणे बाकी
अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग
६. लव्ह जिहाद विशेषांकाच्या विज्ञापनांची प्रलंबित येणेबाकी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग
७. ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांच्या साठ्याची येणे बाकी
७ अ. जिल्हास्तरीय साठ्याची येणे बाकी प्रलंबित असणारे जिल्हे : अकोला, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, संभाजीनगर
७ आ. वितरकांची येणे बाकी प्रलंबित असणारे जिल्हे : नाशिक, जळगाव, सांगली, सातारा, संभाजीनगर, सिंधुदुर्ग
८. साधकांनो, प्रलंबित येणे बाकी वेळेत पूर्ण केली, तरच आपली सेवा परिपूर्ण होणार आहे, हे लक्षात घ्या ! : प्रलंबित राहिलेली सर्व येणे बाकी वेळेत पूर्ण करणे, ही आपली साधना आहे, हे लक्षात घेऊन उत्तरदायी साधकांनी १५.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. यापुढेही जिल्हास्तरावर धर्मप्रसाराचे नियोजन करतांना प्रत्येक मासाला प्रथम प्राधान्याने येणे बाकी पूर्ण करण्याचे वेळोवेळी नियोजन करावे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (८.३.२०१६) सकाळी १०.३४ वाजता
समाप्ती - माघ अमावास्या/फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (९.३.२०१६) सकाळी ७.२५ वाजता
उद्या अमावास्या आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज महाराज 
सनातनचे श्रद्धास्थान
जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
     बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जीवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला पुरोगामी म्हणवतात, हे लक्षात घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

क्रिकेटचे जिहादीकरण !

संपादकीय
     भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश संघाला हरवून आशिया चषक जिंकला. तसे पाहिले, तर भारताने बांगलादेशाला हरवणे; म्हणजे एखाद्या पैलवानाने काडी पैलवानाला हरवल्यासारखे आहे. तरीही भारतीय क्रिकेटप्रेमींनी या सामन्यात अधिक रस घेतला. याला कारणही तसेच होते. या अंतिम सामन्याच्या आधी एका बांगलादेशी क्रिकेटप्रेमीने ट्विटरवर एक चित्र प्रसारित केले होते. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंह धोनी यांचे शिर बांगलादेशी गोलंदाज तस्कीन अहमद याच्या हातात दाखवण्यात आले होते. बांगलादेशी क्रिकेटप्रेमींकडून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे असे विकृतीकरण करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी भारतीय संघ बांगलादेशकडून पराजित झाल्यावर तेथील एका वृत्तपत्रामध्ये भारतीय खेळाडूंचे अर्धमुंडन केलेले चित्र प्रसारित झाले होते. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ राहिलेला नाही. इस्लामी राष्ट्रांशी खेळतांना तर नाहीच नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn