Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चौकटी


श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभागी होेऊ ! - स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, षड्दर्शन आखाडा परिषद

डावीकडून सौ. सुनीता पाटील, कु. प्रतिक्षा कोरगावकर, सौ. नयना भगत, सौ. विजया लढ्ढा, 
मध्यभागी स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, श्री. योगेश तुंगार, श्री. दीपक लढ्ढा
      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये. भूमाता ब्रिगेडने वैदिक सनातन धर्माच्या श्रद्धेला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. शासन, पोलीस आणि प्रशासन या सर्वांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभागी होऊ, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी केले.
     स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांची त्यांच्या आश्रमात हिंदुत्ववाद्यांनी हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानाची माहिती देण्यासाठी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अवतारी कार्याला आरंभ !


महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात साधकांनी केला
॥ श्रीजयंत बाळाजी आठवले - जय गुरुदेव ॥ हा जयघोष !

     रामनाथी (गोवा) - माघ कृष्ण पक्ष द्वादशी, म्हणजे ६ मार्च २०१६ हा दिवस सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला गेला ! या दिवशी आजपासून सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाला आहे, असे महर्षींनी घोषित केले. महर्षींच्याच आज्ञेने या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ॥ श्रीजयंत बाळाजी आठवले - जय गुरुदेव ॥ हा जयघोष भावपूर्ण करण्यात आला. या वेळी जयघोष करण्यामागील पार्श्‍वभूमी सांगून महर्षींनी सांगितलेली आनंदवार्ता सर्वांना सांगण्यात आली आणि हा छोटासा भावसोहळा साधकांच्या मनमंदिरात कायमचा कोरला गेला. उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून हा जयघोष आश्रमातील सर्व विभागांना ऐकवण्यात आला, तसेच संगणकीय प्रणालीद्वारे अन्यत्रच्या साधकांनाही ऐकवण्यात आला.

त्रिंबक नगरपरिषदेच्या उद्घोषणा केंद्रावरून हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

     श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - श्री त्र्यंबकराजाची पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्रिंबक नगरपरिषदेच्या उदघोषणा केंद्रावरून हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ५ मार्च या दिवसापासून करण्यात येत आहे. ५ मार्चला हे आवाहन २ वेळा, तर ६ मार्च या दिवशी प्रती १ घंट्याने करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या उद्घोषणा केंद्रावरून केलेली ही उद्घोषणा संपूर्ण त्रिंबकनगरीत प्रसारित होते. (धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी कृतीशील पाठिंबा देऊन हिंदु धर्माची खरी शक्ती दर्शवणार्‍या त्रिंबक नगरपरिषदेचे अभिनंदन ! सर्वत्रच्या नगरपालिका आणि महानगरपालिका यांनी यातून बोध घ्यावा ! - संपादक)

त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील ऊर्जास्रोत आणि त्यामुळे निर्माण होणारे परिणाम !

पू. डॉ. रघुनाथ शुक्ल
     महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेशबंदी आहे. असे असतांना स्त्रीमुक्तीचा कांगावा करत धर्मशास्त्राचा अभ्यास नसणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडसह अन्य पुरो(अधो)गामी संघटनांच्या महिलांकडून गर्भागृहात प्रवेश करण्याविषयी चेतावण्या दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील ऊर्जास्रोत आणि त्यामुळे निर्माण होणारे परिणाम यांविषयीची माहिती येेथे दिली आहे.
१. त्र्यंबकेश्‍वर देवालयाच्या गाभार्‍यात निर्मोण होणार्‍या ऊर्जा, चैतन्य सहन करण्याची ताकद ज्यांच्या शरिरात आहे, त्याच माणसांना गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. त्र्यंबकेश्‍वरात शुक्ल, पाटणकर, दीक्षित इत्यादि ठराविक पुरोहितांचीच माणसे ठराविक काळात पूजा-अर्चा करतात. त्यांच्या व्यतिरिक्त ज्या मुलांनी गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या अंगावर अनपेक्षितपणे पांढरे चट्टे पडलेले दिसून आले. याचे शास्त्रीय कारण असे की, ज्वालामुखीतून जसा ऊर्जेचा उद्रेक होतो आणि त्यातून गॅमा, अल्फा, क्ष किरण, तसेच इतर धन, ऋण या बारीक विद्युत कणांचा वर्षाव होतो, तसाच ज्योतिर्लिंगातातून होतो. त्र्यंबकेश्‍वरला हे सारे असे घडते; म्हणूनच आतापर्यंत काही वेळा तीन दिवस, सात दिवस हे त्र्यंबकेश्‍वराचे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे, असे तेथील स्थानिक वयस्कर पुरोहितांनी सांगितले

सिंहगड रस्ता, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाका (वय ६८ वर्षे) यांचा आज वाढदिवस !

श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाका यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त नमस्कार !
श्री. सहस्रबुद्धेकाकांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

फलक प्रसिद्धीकरता

महाशिवरात्रीचे महत्त्व !
     महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी शिवाची भावपूर्ण पूर्जाअर्चा करण्यासह ॐ नम: शिवाय हा नामजप अधिकाधिक करावा.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Aaj adhikadhik Shivtatva prapta karneke liye Bhagwan Shivki Bhavpurna puja-archa kare; sath hi Om namaha shivaya namjap adhikadhik kare.

जागो ! : आज अधिकाधिक शिवतत्त्व प्राप्त करने के लिए भगवान शिव की भावपूर्वक पूजा-अर्चा करें; साथ ही ॐ नम: शिवाय नामजप अधिकाधिक करें ।


श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभाग घेऊ ! - स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, षड्दर्शन आखाडा परिषद

      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये. भूमाता ब्रिगेडने वैदिक सनातन धर्माच्या श्रद्धेला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. शासन, पोलीस आणि प्रशासन या सर्वांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. श्री त्र्यंबकेश्‍वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रिय सहभाग घेऊ, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी केले.
     स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांची त्यांच्या आश्रमात हिंदुत्ववाद्यांनी हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानाची माहिती देण्यासाठी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा, गटनेते श्री. योगेश तुंगार, प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक श्री. दीपक लढ्ढा, सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील, सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर आदी उपस्थित होते

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील धर्मपरंपरा रक्षणासाठी अनेक धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग

      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटनांनी मंदिर देवस्थानला पत्र देऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्या विरोधात मंदिर विश्‍वस्त, त्रिंबक नगरपरिषद, समस्त ग्रामस्थ आणि धर्माभिमानी हिंदु यांनी चांगलीच कंबर कसली असून धर्मपरंपरा रक्षणासाठी कृतीशील सहभाग घेतला आहे. यामध्ये त्रिंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष श्री. संतोष कदम, नगरपरिषदेतील गटनेते श्री. योगेश तुंगार, आरोग्य सभापती श्री. यशवंत भोईये, नगरपरिषदेचे सदस्य श्री. धनंजय तुंगार, श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त श्री. सत्यप्रत शुक्ल, देवेंद्र बँकेचे संचालक श्री. दीपक लढ्ढा, सरपंच श्री. जयराम मोंढे, धर्माभिमानी श्री. सुनील अडसरे आदींचा समावेश आहे. हे सर्वजण संपूर्ण दिवस सातत्याने नास्तिकवाद्यांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि सक्रीय सहभाग घेत आहेत. (धर्मपरंपरा रक्षणासाठी सहभागी झालेल्या सर्व हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! - संपादक)
     सीमेवर प्रतिदिन आतंकवादी आक्रमणांत सैनिकांचे जीव जात असतांना देशाच्या सद्यस्थितीचे गांभीर्य नसलेले संवेदनाशून्य निधर्मी राजकारणी आणि पुरो(अधो)गामी हे जेएन्यूमधील देशद्रोही विद्यार्थ्यांवरील कारवाई, शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावरून दर्शन यांसारख्या थेट राष्ट्रहिताशी संबंध नसलेल्या विषयांवर आंदोलने करतात. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितदक्ष पत्रकारितेचा वारसा लाभलेले भारतातील पत्रकारही अशांची तळी उचलून त्यांना प्रोत्साहन देतात, हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे ! - संपादक

प्राधान्य न कळणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !

     लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, गोहत्या, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, ५ कोटी बांगलादेशियांचे आक्रमण, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना देशद्रोही आणि धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढणे, त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणे, अशा गोष्टींना प्राधान्य देतात !

धर्मगुरूंचे मत जाणून घ्यायला हवे ! - ललिता शिंदे, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

     मंदिरात महिलांनी प्रवेश करावा कि करू नये, या संदर्भात धर्मगुरु आणि संत यांची मते जाणून घ्यायला हवीत. त्यासाठी धर्मगुरूंची सभा बोलवा. रुढी, प्रथा-परंपरा मोडणे योग्य नव्हे. आपल्याला काही पालट हवे असतील, तर योग्य मार्गाने जायला हवे.
     भूमाता ब्रिगेडच्या महिलांना रोखण्यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. मंदिराच्या चारही दारांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे, असे त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्त ललिता शिंदे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना सांगितले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील धर्मपरंपरा रक्षणासाठी आमचा पाठिंबा ! - शिवसेना खासदार हेमंत गोडसे

      श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - काही नास्तिकवादी आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटनांनी मंदिर देवस्थानला पत्र देऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे.
     श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, ही मागणी करणे चुकीचे आहे. आपल्या धर्मपरंपरा, प्रथा आणि रूढी या चालूच राहिल्या पाहिजेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी त्यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

मान्यवरांची मते ! : पूर्वापार चालत आलेल्या प्रथांचे पालन व्हायला हवे ! - महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

     खरे तर त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये स्त्री-पुरुष दोघांनाही प्रवेश आहे. केवळ गर्भगृहात शुचिर्भूत पुरुषांनाच प्रवेश आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा तशाच पुढे चालू रहायला हव्यात. भूमाता ब्रिगेडच्या वतीने मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकाच पद्धतीची आंदोलने केली जात आहेत. त्यांचा धर्मशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासही नाही. या मंडळींना इतर उद्योग नाहीत का ? स्त्री-पुरुष समानता हा घटनेने अधिकार दिला असल्याचे ते सांगत असले, तरी घटनेने प्रत्येकाला आपल्या रुढी-परंपरा यांचे पालन करण्याचाही अधिकार दिला आहे. यासंदर्भात सुज्ञ लोकांना सर्व गोष्टी समजतात. सुज्ञास अधिक सांगणे न लगे !

शिवाविषयीची सनातनची उत्पादने !

  • सात्त्विक चित्रे
  • नामजप-पट्टी
  • पदक
  • भीमसेनी कापूर
सनातनची ध्वनी-चकती (एमपीथ्री)
शिव आणि दुर्गादेवीसह अन्य देवी यांचे नामजप आणि उपासनाशास्त्र 
नामजपाद्वारे देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ 
होण्यासाठी योग्य नामजप कसे करावेत, हे जाणून घ्या !

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरा आणि प्रथा मोडू पहाणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला यशस्वी लढा !

हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्ववादी संघटना आणि शनिशिंगणापूर पंचक्रोशीतील 
ग्रामस्थ यांची हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम
श्री. सुनील घनवट
कु. प्रियांका लोणे
     महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह घुसण्याची चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसाठी प्रवेश निषिद्ध असूनही त्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेण्याचा या महिलांचा यापूर्वी हेका होता. स्वतःला श्री शनिदेवांचे भक्त म्हणवून घेत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तीव्र अहंकाराने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची ठिणगी पेटताच धर्माभिमानी हिंदू, शनिभक्त, हिंदुत्ववादी महिला, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे सदस्य यांनी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा वणवा पेटवला. धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी सहस्रो धर्माभिमान्यांनी कंबर कसली आणि भूमाता ब्रिगेडवाल्यांचे धर्मद्रोही प्रयत्न हाणून पाडले. ७ मार्चला असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातील गाभार्‍यात महिलांना घेऊन घुसण्याच्या धर्मद्रोही चेतावणीच्या पार्श्‍वभूमीवर श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. हे आंदोलन कसे उभे राहिले ? त्यातील हिंदुत्ववाद्यांचा सहभाग, ग्रामस्थांची श्रद्धा, ईश्‍वराने साहाय्य केल्याविषयी आलेल्या अनुभूती आदी सूत्रे आपण या लेखातून पाहू. (भाग २) 
संकलक : श्री. सुनील घनवट आणि कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लक्ष्मी-नृसिंह याग

लक्ष्मी-नृसिंह यंत्र
यागात आहुती देतांना साधक-पुरोहित (डावीकडून) श्री. सिद्धेश करंदीकर,
श्री. मंदार मणेरीकर, श्री. अमर जोशी आणि श्री. सौरभ सप्रे

पृष्ठ ७ वर प्रसिद्ध केलेल्या महर्षींनी ईरोड या गावाजवळील.... या लेखाशी संबंधित छायाचित्र

विधीनंतर वस्त्रदान करतांना तयार झालेला वस्त्राचा शिवपिंडीसारखा आकार;
दान करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ, समवेत श्री. विनायक शानभाग

शनिशिंगणापूर ग्रामस्थांचे अनुभवायला मिळालेले प्रेम आणि जिव्हाळा !

श्री. दत्तात्रेय जामसंडे
१. चर्चासत्रासाठी शनिशिंगणापूर येथे गेल्यावर गावातील सरपंचांनी रात्री जेवायला बोलावणे : पहिल्यांदा नगर येथे याविषयी आंदोलन झाले, त्या वेळी एका वृत्तवाहिनीने आम्हाला चर्चासत्रासाठी शनिशिंगणापूर येथे बोलावले होते. ते चर्चासत्र संपण्यास रात्रीचे १० वाजून गेले होते. त्या वेळी त्या गावातील सरपंचांनी आम्हाला जेवायला बोलावले. रात्री आम्ही त्यांच्याकडे जाईपर्यंत त्यांनीही जेवण केले नव्हते. प्रत्यक्षात त्यांची आणि माझी (श्री. सुनील घनवट यांची) त्याआधी केवळ एकदाच भेट झाली होती, तरीही एवढ्या रात्री तुम्ही आमच्या गावातून उपाशी कसे जाणार ? तुम्ही आम्हालाच साहाय्य करण्यासाठी इथे आला आहात, असा त्यांचा भाव होता.

रुद्राक्षधारण

     शिवपूजा करतांना गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे विशेषकरून रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात. 
१. रुद्राक्ष शब्दाची व्युत्पत्ती अन् अर्थ 
    रुद्र + अक्ष या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे. अक्ष शब्दाचे काही अर्थ लक्षात घेऊन रुद्राक्ष शब्दाचे पुढील अर्थ होतात.

शिवाचा तिसरा डोळा !

१. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्तीचे महापीठ आहे. यालाच ज्योतिर्मठ, व्यासपीठ इत्यादी नावे आहेत. 
२. शिवाचा तिसरा डोळा हा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शिवाच्या चित्रातही तिसर्‍या डोळ्याचा आकार ज्योतीसारखा आहे. 
३. शिवाने तिसर्‍या डोळ्याने कामदहन केले आहे. (खर्‍या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही, तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने कामनांना जाळून टाकतो.)
४. योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्ना नाडी.
५. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. 

महाशिवरात्री : कल्याणमय रात्र

१. शिवरात्रीचा उपवास हा अतिशय दुर्लभ असून त्यात जागरण करणे, 
हे मनुष्यासाठी आणखी दुर्लभ असणे 
     स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडात असा उल्लेख येतो की, शिवरात्रीचा उपवास हा अतिशय दुर्लभ आहे आणि त्यातही जागरण करणे, हे तर मनुष्यासाठी आणखी दुर्लभ आहे. लोकात ब्रह्मादी देवता आणि वसिष्ठ आदी मुनी या चतुर्दशीची प्रशंसा करतात. या दिवशी जर एखाद्याने उपवास केला, तर त्याला १०० यज्ञांहून अधिक पुण्य मिळते.
२. ॐ नमः शिवाय । या नामजपाचा प्रभाव अतिशय हितकारक आणि लाभदायी असणे 
     शिव याचे तात्पर्य आहे कल्याण, म्हणजे ही रात्र अतिशय कल्याणकारी रात्र आहे. या रात्री जागरण करत ॐ नमः शिवाय । हा जप करावा. हा जप यंत्राने मोजून करू नये. हा जप घाईत करू नये. मधेमधे अल्प विश्रांती घ्यावी. याचा प्रभाव अतिशय हितकारक आणि लाभदायी आहे.
३. शिवपूजेत वस्तूंना महत्त्व नसून भावाला असणे 
      शिवपूजेत वस्तूंना काही महत्त्व नाही, तर भावाला महत्त्व आहे. भावे हि विद्यते देवः । म्हणजे भावातच ईश्‍वर वास करतो. ते अरण्य असो किंवा मरूभूमी असो, तेथे जरी वाळू किंवा मातीची शिवमूर्ती सिद्ध करून तिच्यावर पाण्याचे थेंब शिंपडले आणि अरण्यातील वनफुले तोडून जरी वाहिली आणि तोंडानेच नाद वाजवला, तरीही शिव प्रसन्न होतो.
४. आराधना करण्याच्या दोन पद्धती 
अ. आराधनेची पद्धत ही आहे की, उपवास करून फुले, पंचामृत, बिल्वपत्र आदींनी ४ प्रहर पूजा करावी. 
आ. दुसरी पद्धत अशी आहे की, आपण मनातल्या मनात पुढीलप्रमाणे भाव ठेवावा.
      ज्योतिर्मात्रस्वरूपाय निर्मलज्ञानचक्षुषे ।
      नमः शिवाय शान्ताय ब्रह्मणे लिङ्गमूर्तये ॥
अर्थ : ज्योतिर्मात्र (ज्ञानज्योती, म्हणजेच सच्चिदानंद, साक्षी) असे ज्याचे स्वरूप आहे, निर्मल ज्ञान हे ज्याचे नेत्र आहेत, जो लिंगस्वरूप परब्रह्म आहे, त्या परमशांत कल्याणमयी भगवान शिवाला माझा नमस्कार आहे.
५. महाशिवरात्रीच्या रात्री बम, बम... या बीजमंत्राचा सव्वा लक्ष जप केल्यास गाठ उठणे या वातविकारांपासून मुक्ती मिळते.
- पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू (संदर्भ : क्या करें, न करे ?)

भगवान शिवाच्या उपासनेत रुद्राध्याय पठण करण्याचे महत्त्व दर्शवणारी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

       उपासक पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा, हा देवतापूजनामागील एक उद्देश असतो. देवतेच्या पूजनातील विशिष्ट कृतींमुळे देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला होतो. यासाठी कोणत्या देवतेच्या पूजनात कोणते पुष्प, मंत्र आदींचा वापर करावा ?, हे धर्मशास्त्रात दिलेले असते. मंत्रद्रष्ट्या ऋषींच्या कृपेमुळे आपल्याला अनेक दिव्य स्तोत्रे, सूक्ते आदी प्राप्त झाली आहेत. भगवान शिवाच्या पूजनाच्या वेळी रुद्राध्याय म्हणण्याचा प्रघात आहे.

शिवाचे निस्सीम उपासक असलेले हिंदूंचे तेजस्वी राजे !

      सनातन हिंदु संस्कृतीचे सुवर्णयुग असलेले २०० वर्षांचे गुप्तवंशाचे साम्राज्य; गांधारपासून सागरापर्यंत राज्याची सीमा असलेला चंद्रगुप्त; चतुःसागरापर्यंत राज्याच्या सीमा असलेला अजिंक्य समुद्रगुप्त; नवरत्नांच्या सभेत शोभणारा विक्रमादित्य; अश्‍वमेध यज्ञ करणारा पुष्यमित्र आणि सत्याश्रय पुलकेशी यांसारखे प्रतापरुद्र अव्यक्त रुद्राच्या लिंगस्वरूपातील शिवाचे निस्सीम उपासक होते. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
महाशिवरात्रीला शिवाचा नामजप अधिकाधिक करा

मुलुंड (मुंबई) येथील श्री. मंदार गाडगीळ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. मंदार गाडगीळ (डावीकडे) यांचा सत्कार करतांना 
६७ टक्के पातळीचे त्यांचे वडील श्री. माधव गाडगीळ
 याविषयीचे अधिक वृत्त वाचा उद्याच्या अंकात !
     आज जागेअभावी नोंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! ही सदरे प्रसिद्ध करू शकलो नाही, याची नोंद घ्यावी ! - संपादक

शिवाला बेलाचे पान वाहण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

कु. प्रियांका लोटलीकर
तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वाहावा ? 
     बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचा देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.
अ. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे : सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वाहावे (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च ।)
आ. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे : शाक्तपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

शिवाचे कार्य

प.पू. पांडे महाराज
१. विश्‍वाची उत्पत्ती 
     शिव-पार्वतीला जगतः पितरौ, म्हणजे जगाचे आई-वडील म्हटले जाते. विश्‍वाच्या संहाराच्या वेळीच नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण शिव निर्माण करतो. 
२. जगद्गुरु 
     ज्ञानं महेश्‍वरात् इच्छेत् मोक्षम् इच्छेत् जनार्दनात् ।, म्हणजे शिवापासून ज्ञानाची आणि जनार्दनापासून (श्रीविष्णूपासून) मोक्षाची इच्छा करावी. 
३. स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेणारा
     शिव उत्तर दिशेला असलेल्या कैलास पर्वतावर ध्यान करतो आणि सर्व जगावर लक्ष ठेवतो. तो स्वतः साधना करून सर्वांची उत्तरोत्तर प्रगती करून घेतो.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील कु. वेदांत भूषण मिठबावकर (वय ८ वर्षे) याने पारिजातकाच्या फुलांपासून बनवलेली शिवपिंडी

शिवपिंड सिद्ध करतांना कु. वेदांत
पारिजातकाच्या फुलांची शिवपिंडी
सनातन-निर्मित शिवाचे सात्त्विक चित्र आणि 
ॐ नमः शिवाय । नामपट्टी मिळवण्यासाठी संपर्क साधा !
सनातन हेल्पलाईन - ९३२२३ १५३१७

वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी...

      विशेषांक वेळेत मिळावा, यासाठी छपाई लवकर करावी लागल्यामुळे आम्ही वाचकांना ताज्या घडामोडींची वृत्ते देऊ शकलो नाही. जागेअभावी काही नियमित सदरे प्रसिद्ध करू शकलो नाही, याची नोंद घ्यावी. - संपादक

महर्षींनी ईरोड या गावाजवळील भवानी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात अडथळा आणणार्‍या अनेक कारणांचे निवारण करण्यासाठी विविध पूजा करण्याचा आदेश देणे

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
संकल्पासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना अक्षता देतांना पुरोहित
पिठापासून सिद्ध केलेली कालीची प्रतिमा
सर्पशांत आणि नवग्रहशांती होम
       ९.२.२०१६ या दिवशी आम्ही तमिळनाडूतील ईरोड या शहराजवळ असलेल्या भवानी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन महर्षींनी सांगितलेले सर्व विधी पूर्ण केले.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. भवानी या तीर्थक्षेत्राचे महत्त्व
      कावेरी, भवानी आणि शिवामृत धारा या प्रवाहांसहित त्रिवेणी संगम असलेले आणि अमृतकुंभाचा काही अंश पडल्याने पुराणकाळापासून अत्यंत पवित्र असलेले असे हे ठिकाण !
      या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. हे तीर्थक्षेत्र शिव आणि विष्णु या दोन्ही देवतांच्या चैतन्याने युक्त आहे. या ठिकाणी सप्तनद्यांपैकी एक असणार्‍या कावेरी नदीची प्रवाहधारा आहे. भवानी नदी कावेरी नदीला ज्या ठिकाणी येऊन मिळते, त्या स्थानाला शिवामृत असे म्हटले जाते. या स्थानीच अमृताच्या कुंभाचा एक अंश पडला होता, अशी पुराणकथा आहे; म्हणून या स्थानी असणार्‍या शिवाला अमृतघटेश्‍वर या नावाने ओळखले जाते. कावेरी, भवानी आणि शिवामृत धारा या तीन प्रवाहांनी युक्त असणारा असा हा त्रिवेणी संगम आहे. हे ठिकाण अत्यंत पवित्र असल्याने भवानी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेले विधी लवकर फलद्रूप होतात, अशी या स्थानाची महती आहे आणि म्हणूनच महर्षींनी या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अनेक अडथळे दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे विधी संकल्प करून (छायाचित्र १ मध्ये संकल्पासाठी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना अक्षता देतांना पुरोहित) आमच्याकडून येथे करवून घेतले. त्यांपैकी काहींची माहिती येथे देत आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (८.३.२०१६) सकाळी १०.३४ वाजता
समाप्ती - माघ अमावास्या/फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (९.३.२०१६) सकाळी ७.२५ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान
      माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

असुरा हाती शस्त्र !

     भारत, तसेच अमेरिकेतील अनेक वरिष्ठ खासदार यांच्या तीव्र विरोधानंतरही बराक ओबामा यांनी पाकला एफ्-१६ या अत्याधुनिक ८ लढाऊ विमानांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर ओबामा यांनी ही विमाने देण्याविषयीची अधिसूचना काढून त्यांच्या उक्तीला कृतीची जोड दिली. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे अमेरिका भारताचा मित्र आहे कि शत्रू ?, असा प्रश्‍न पडतो. अमेरिकेने आरंभीपासून भारत-पाक वादात मध्यस्थी केली आहे. खरे तर हा वाद नव्हेच; कारण काश्मीर हा प्रथमपासून भारताचाच अविभाज्य अंग होता, आहे आणि राहील, हे निर्विवाद आहे. उलट पाक आणि चीन या धूर्त राष्ट्रांनी भारताचा मोठा भूभाग गिळंकृत केला आहे. अमेरिकेने मध्यस्थी राष्ट्र म्हणून भारताचा हा भूभाग भारताला परत करण्यासाठी या दोन्ही राष्ट्रांना खरे तर भाग पाडले पाहिजे. असे करणे तर दूरच. उलट भारताच्या मूळावर उठलेल्या पाकच्या हाती लढाऊ विमाने देण्याची घाई अमेरिकेला झाली आहे. म्हणूनच अमेरिकेची मध्यस्थीची भूमिका अपारदर्शी आणि तितकीच संशयास्पद आहे. अमेरिकेची ही कृती म्हणजे असुराच्या हाती शस्त्र देण्याचा प्रकार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn