Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याच्या मंदिर देवस्थानच्या भूमिकेस अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा कृतीशील पाठिंबा !

  श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात महिलांना प्रवेश देण्याविषयीचे प्रकरण
डावीकडून दुसरे श्री. सत्यप्रत शुक्ल, त्यांच्या बाजूला सौ. ललिता शिंदे यांना निवेदन
देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य धर्माभिमानी महिला
       श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ५ मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची भूमिका घोषित केली आहे. धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी मंदिर प्रशासनाने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे, अशा आशयाची पाठिंबा दर्शवणारी निवेदने विविध हिंदुत्ववादी संघटनांनी श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर देवस्थानचे विश्‍वस्त श्री. सत्यप्रत शुक्ल आणि सौ. ललिता शिंदे यांना भेटून दिली.

भारतात धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा करण्यासाठी येऊ इच्छिणार्‍या अमेरिकेच्या शिष्टमंडळाला व्हिसा देण्यास भारताचा नकार !

अल्पसंख्यांकांच्या धर्मांधतेकडे दुर्लक्ष करून हिंदूंना लक्ष्य करू पहाणार्‍या 
अमेरिकी शिष्टमंडळाला व्हिसा देण्यास नकार देणार्‍या केंद्रशानाचे अभिनंदन !
     देहली - भारताच्या धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा करण्यासाठी भारतात येऊ इच्छिणार्‍या अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यविषयक समितीच्या सदस्यांना केंद्रशासनाने व्हिसा नाकारला आहे.
१. भारतातील शासकीय अधिकारी, धार्मिक नेते आणि धार्मिक कार्यकर्ते यांची भेट घेण्यासाठी तीन सदस्यीय प्रतिनिधीमंडळ भारतात येणार होते. ४ मार्चपासून चालू होणारा हा दौरा १ आठवड्यासाठी असणार होता.
२. यापूर्वीही काँग्रेसच्या आघाडी शासनाच्या काळात भारताकडून जगभरातील देशांच्या धार्मिक स्वातंत्र्यांवर वार्षिक अहवाल बनवणार्‍या सदस्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला होता.
३. यूएस्सीआयआर्एफ्चे (युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजस फ्रिडमचे) अध्यक्ष रॉबर्ट पी. जॉर्ज यांनी भारताचा हा निर्णय निराश करणारा आहे, असे म्हटले आहे.

काशीमध्ये गंगेच्या काठावर लघवी केल्यास ५०० रुपये दंड !

हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घेऊन हा निर्णय घेणार्‍या प्रशासनाचे अभिनंदन ! 
आता प्रदूषण करणार्‍या कारखान्यांवरही प्रशासनाने कारवाई करावी !
     काशी (वाराणसी) - वाराणसी नगरपालिकेने गंगा नदीच्या घाटावर लघवी करणार्‍यांवर ५०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गंगेत अंघोळ करतांना साबण वापरणार्‍यांनाही दंड भरावा लागणार आहे. ही मोहीम या ३ मार्चपासून चालू करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त श्रीहरि प्रताप सहाय यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. प्रयागमध्ये एका अतिरिक्त जिल्हाधिकार्‍याने यमुनेच्या काठावर लघवी केल्याचे छायाचित्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली होती.

शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी नलिनी चिदंबरम् यांना सीबीआयकडून नोटीस

      नवी देहली - ३ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी यांना नोटीस पाठवली आहे. नलिनी यांना १० मार्च या दिवशी सीबीआयने कोलकाता कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.
     सीबीआयने यावर्षी जानेवारीमध्ये याविषयावर एक आरोपपत्र तयार केले होते, ज्यामध्ये नलिनी चिदंबरम, मनोरंजन सिंग, शारदा ग्रुपच्या सुदिप्ता सेन आणि उद्योगपती शांतनु घोष यांची नावे आहेत. नलिनी चिदंबरम् या शारदा ग्रुपच्या अधिवक्त्या असल्यामुळे त्यांना जीएन्एन् इंडिया आणि शारदा ग्रुप यांच्यामध्ये झालेल्या कराराची माहिती होती. त्यामुळे त्यांना ही नोटीस आली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये गोशाळेच्या निर्मितीसाठी काँग्रेस आणि भाजप यांचे आमदार संघटित !

 गायींचे संरक्षण करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्‍वासन
हिमाचल प्रदेशातील आमदारांचा आदर्श घेऊन देशातील सर्वपक्षीय खासदारांनी
देश स्तरावर गोहत्याबंदी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावे !
      सिमला - गायीच्या संरक्षणासाठी हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचे आमदार एकत्र आले असून त्यांनी भटक्या गायींच्या संरक्षणासाठी गोशाळेची निर्मिती व्हावी, यासाठी राज्यशासनाला आवाहन केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी पाऊल उचण्याचे आश्‍वासन दिले आहे.
      सर्वसामान्य लोक गायींनी दूध देणे बंद केल्यावर तिला मोकाट सोडतात. त्यामुळे अशा मोकाट गायींच्या संदर्भात शासनाने पाऊले उचलावीत, अशी मागणी या आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्‍नोत्तराच्या काळात केली. यावर मुख्यमंत्री सिंह म्हणाले की, मोकाट गायींना भटके पशू म्हणणे हा त्यांचा अवमान आहे.

आतंकवादी ओसामा बिन लादेनकडे होती २०२ कोटी रुपयांची संपत्ती !

जिहादी आतंकवादी धर्मासाठी संपत्ती आणि प्राण त्यागण्यास सदैव सिद्ध असतात.
याउलट हिंदू मात्र मी आणि माझे कुटुंब अशा स्वार्थीपणाच्या कुंपणातच वावरतात.
जिहादसाठी त्याग करणार्‍या या आतंकवाद्यांकडून हिंदू धर्मप्रेम शिकतील तो सुदिन !
संपत्ती अल्लासाठी आणि जिहादसाठी व्यय करण्याचा मृत्यूपत्रात उल्लेख
      वॉशिंग्टन - अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्याकडे मृत्यूपूर्वी २०२ कोटी ३४ लाख (३ कोटी डॉलर) एवढी संपत्ती होती. लादेनच्या मृत्यूपत्रातून ही बाब उघडकीस आली आहे.
१. अमेरिकेतील आतंकवादी आक्रमणांचा सूत्रधार असणार्‍या लादेनला अमेरिकी सैन्याने पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे ठार केले होते.
२. या चकमकीच्या वेळी अमेरिकेने लादेनकडील काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. या कागदपत्रांत लादेनच्या मृत्यूपत्राचाही समावेश आहे. अमेरिकेने ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड केली आहे.
३. ही संपत्ती सुडानमध्ये असल्याचा उल्लेख आहे; मात्र ही रोख रक्कम आहे कि अन्य स्वरूपात आहे याविषयी माहिती अजून स्पष्ट झालेली नाही.
४. मृत्यूपत्रात लादेनने म्हटले आहे, माझ्या इच्छांचे पालन करा आणि अल्लासाठी ही संपत्ती जिहादसाठी वापरा.

अण्वस्त्रांच्या वापरास सज्ज रहा ! - उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांचा सैन्याला आदेश

      सेऊल - उत्तर कोरियाचे अस्तित्व शत्रूराष्ट्र नष्ट करण्याचा प्रयत्न करत असून अमेरिका युद्धाची सिद्धता करत आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रांचा आधार घ्यावाच लागेल, असे सैन्याच्या कार्यक्रमात उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन म्हणाले. (जोंग यांच्यासारख्या माथेफिरू राष्ट्रप्रमुखांमुळे तिसरे युद्ध झाल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक) काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने काही नवे आणि कडक निर्बंध घातले होते. यामुळे तणावाचे वातावरण आहे.

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

   
शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ?

महेंद्रसिंह धोनी यांचे बांगलादेशचा खेळाडू तस्कीन अहमद यानेे हातात शिर घेतलेले चित्र सोशल मीडियावर प्रसारित !

 • बांगलादेशमध्ये हिंदूंची जी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे, त्याचेच प्रतिबिंब या चित्रातून समोर येते !
 • आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशची संतापजनक कृती
      मिरपूर (बांगलादेश) - बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशातील क्रिकेट समर्थकांनी बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद याने एका हातात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे कापलेले शिर धरल्याचे आणि विजयी आरोळी ठोकत तो उभा असल्याचे आक्षेपार्ह चित्र सोशल मीडियावरून प्रसारित केले आहे. याचा भारततियांकडून निषेध होत आहे.

अयोध्या दक्षिण कोरियाच्या दिवंगत महाराणीचे माहेर !

महाराणीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रतिवर्षी येतात दक्षिण कोरियातील शेकडो लोक
जगात पूर्वी केवळ हिंदूच आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती, याचे उदाहरण !
      नवी देहली - भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येशी दक्षिण कोरियाचा अनुमाने २ सहस्र वर्षे जुना संबंध आहे. आजही शेकडो दक्षिण कोरियन जनता प्रतिवर्षी त्यांच्या दिवंगत महाराणीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अयोध्येत येतात. दक्षिण कोरियाचे लोक अयोध्येला त्यांचे माहेर समजात. दक्षिण कोरियाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि दक्षिण कोरियाची दिवंगत महाराणी हुर ह्वांग ओके यांचे स्मारक अयोध्येत उभारण्यासाठी प्रस्ताव ठेवला. या महाराणीला राजकुमारी सुरिरत्ना नावानेही ओळखण्यात येते. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर राजकुमारी सुरिरत्ना मुळात अयोध्या येथील रहाणारी होती आणि इ.स.४८ मध्ये करक क्लानचा राजा किम सुरोशी विवाह करून कोरियाला गेली होती.

तुर्कस्तानमध्ये महिला आतंकवाद्यांचे पोलिसांवर आक्रमण

महिला आतंकवाद्यांशी लढण्यास भारतीय सिद्ध आहेत का ?
      इस्तंबूल (तुर्कस्तान) - येथे महिला आतंकवाद्यांकडून पोलिसांच्या बसवर आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात आक्रमण करणार्‍या २ महिला आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले. या आक्रमणात १ पोलीसही घायाळ झाला आहे.
    पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक बसस्थानकाकडे निघाले असता त्यांच्या बसवर एका महिला आतंकवाद्याने गोळीबार केला आणि दुसर्‍या सहकारी महिलेने बसवर ग्रेनेड फेकले. या आक्रमणाला पोलिसांनी प्रत्युतर दिले असून दोन्ही महिलांना ठार केले आहे. या आक्रमणाचे दायित्त्व अद्याप कोणीही घेतले नाही.

भारतियांनी पळवलेल्या अमेरिकी नागरिकांच्या नोकर्‍या परत मिळवणार ! - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेला महासत्ता बनवण्यास भारतियांचे योगदान विसरणार्‍या ट्रम्प यांचा कांगावा !
      कोलंबिया - अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्र्रपतीपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारत, चीन, जपान आणि मेक्सिको देशांचे नागरिक अमेरिकी नागरिकांच्या नोकर्‍या पळवत आहेत. मी राष्ट्रपती झाल्यावर या नोकर्‍या परत मिळवीन, असे आश्‍वासन दिले आहे. ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारणार, इसिसला नष्ट करणार आदी घोषणा केल्या.

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठीचा अर्ध्याहून अधिक निधी विनावापर पडून !

     नवी देहली - काश्मीरमधील विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर केलेला ५८० कोटी रूपयांच्या निधीपैकी अर्ध्यापेक्षा अधिक निधी विनावापर पडून राहिला आहे. विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने एक १० सदस्यीय समिती स्थापन केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या या समितीमध्ये पुखरू आणि मुथी येथील विस्थापितांच्या छावण्यातील प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. या समितीमध्ये एस्के फाऊंडेशनचे श्री. सुनिल शखधर, संपूर्ण काश्मीर संघटनेचे श्री. अनुप कौल, ऑल इंडिया काश्मीर समाजाचे श्री. विजय आयमा, जम्मू अँड काश्मीर विचार मंचचे श्री. अजय भारती, पनून काश्मीरचे श्री. अश्‍वनी च्रोंगू, काश्मिरी पंडित सभेचे श्री. के.के. खोसा, जागती टेनेमेंट्स कमिटीचे श्री. एस्.एल्. पंडित, मुथी कँपचे श्री. पायरे लाल, पुखरू कँपचे श्री. दया किशन आणि ऑल इंडिया युथ काश्मिरी सभेचे श्री. आर्.के. भट यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.
     २०१४मध्ये सत्तास्थानी आल्यानंतर श्री. नरेंद्र मोदी शासनाने विस्थापित काश्मिरी हिंदूच्या पुनर्वसनासाठी ५०० पेक्षा अधिक कोटी रूपयांचा निधी घोषित केला होता.

गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट

गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही (मध्यभागी) यांना
माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या डॉ. सौ. रेणु शर्मा
     दुर्ग (छत्तीसगड) - गायत्री परिवार, छत्तीसगडचे विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी राजिम कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत गायत्री परिवारचे श्री. टीकमराम साहू उपस्थित होते. गेल्या मासात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांच्या कार्यक्रमाचे रायपूर येथील गायत्री शक्तीपिठमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून प्रभावित होऊन श्री. पाणिग्रही यांनी छत्तीसगड येथील विविध धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटना यांची १२ मार्चला एकत्रित बैठक आयोजित केली. या बैठकीचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीला देण्यासाठी त्यांनी राजिम कुंभमेळ्यातील धर्मजागृती प्रदर्शनीला भेट दिली.

धर्मशाळा येथे पाकबरोबर क्रिकेट सामना ठरल्यास खेळपट्टी खोदून टाकू ! - भारतीय आतंकवादविरोधी मोर्चाची चेतावणी

    नवी देहली - १९ मार्च या दिवशी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील मैदानात टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक संघटनांनी विरोध केला आहे. माजी सैनिकांच्या संघटनेने याला विरोध दर्शवला आहे. आता आतंकवादविरोधी मोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र शांडिल्य यांनी चेतावणी दिली आहे की, जर पाकचा संघ येथे खेळण्यासाठी आला, तर आम्ही मैदानातील खेळपट्टी खोदून टाकू.

(म्हणे) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा !

 • विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची धर्मद्रोही मागणी !
 • मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
 • वक्फ मंडळ किंवा मशिदी यांना दिला जाणारा शासकीय निधी थांबवून तो दुष्काळ निवारणासाठी वळवण्याची मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कधी केली आहे का ?
     धाराशिव, ५ मार्च - मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि शिर्डी येथील श्री साई मंदिर संस्थान हे समाजहितासाठी मंदिराचा निधी वापरतात. त्याचप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने त्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा. त्यातून दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. (दुष्काळग्रस्तांसाठी निधी देण्याचे आणि तो उभारण्याचे काम शासनाचे आहे. त्यासाठी मंदिर देवस्थानच्या निधीवर डोळा कशाला ठेवायचा ? मंदिर देवस्थानचा निधी हा धर्मकार्यासाठी वापरला गेला पाहिजे. - संपादक) ते धाराशिव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असतांना त्यांनी ही मागणी केली. या वेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्‍वस्त आमदार मधुकरराव चव्हाण उपस्थित होते.

भूजच्या समुद्रात पाकची नाव सापडली, हेरगिरी करणार्‍या एकास अटक !

                                                        गुप्तहेरांनी पोखरलेला भारत !
    भूज (गुजरात) - भूजजवळील समुद्रात पाकिस्तानी नाव सापडली असून जिल्ह्यातील सैनिकी तळाजवळ हेरगिरी करणार्‍या एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या भ्रमणभाषमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील काही ठिकाणांची छायाचित्रे सापडली आहेत. नावेची तपासणी सुरक्षारक्षक करत आहेत. तसेच येथे काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ सुरक्षारक्षकांना कळवण्याची माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात आली आहे.

कपडे फाटले नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास नकार दिला !

विश्‍वासार्हता गमावलेले मुंबई पोलीस ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
     मुंबई - कपडे फाटले नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी एका युवतीला विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास नकार दिला. (पोलिसांच्या अशा वागण्याने महिला तक्रार करण्यास जातील का ? - संपादक) वरील आरोप मुंबईत आलेल्या मणिपूरच्या एका तरुणीने कलिना येथील पोलिसांवर केला आहे. ही तरुणी कलिना येथील बाजारात गेली असता एक व्यक्ती तिच्या अंगावर थुंकली, तसेच तिला मारहाणही करण्यात आली. या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांनी केवळ एन्सी नोंदवून घेतली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Trimbakeshwar mandir ke garbhagruhame mahilaonke pravesh par Hindu sangathanoka virodh. - Hinduo, paramparaon ki raksha karnewale Hinduon ka samarthan kare.
जागो !
त्र्यंबकेश्‍वर मंदिर के गर्भगृह में महिलाआें के प्रवेश पर हिन्दू संगठनों का विरोध ! - हिन्दुओ, परंपराआें की रक्षा करनेवाले हिन्दुत्वनिष्ठों का समर्थन करें !

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी कृतीशील झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे रहा !
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडसारख्या नास्तिकतावादी संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिल्यावर त्याविरोधात भूमिका घेणार्‍या मंदिर प्रशासनाला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी कृतीशील पाठिंबा दर्शवला आहे.

तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्रशासनाला उत्तर देण्यासाठी नोटीस !

हिंदु स्त्रियांवर कथित अन्याय होत असल्याचा कांगावा 
करणारे स्त्रीमुक्तीवाले याविषयी काय म्हणणार आहेत ?
      नवी देहली - मुसलमान महिलेकडून दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाला तलाक संदर्भात उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. न्या. अनिल आर्. दवे आणि ए.के. गोयल यांनी ही नोटीस दिली आहे.
१. शायरा बानो नावाच्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेत मुस्लिम पर्सनल लॉच्या तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देणे, घटस्फोट घेतलेल्या पतीशी पुन्हा विवाह करण्यावर बंदी आणि बहुविवाह प्रथा या अवैध अन् राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
२. न्यायालयाने म्हटले की, हे केवळ धोरणात्मक प्रकरण नाही, तर ते मूलभूत अधिकारांशी संबंधित प्रकरण आहे.
आंध्रप्रदेशात वाळू तस्करी रोखण्यासाठी वाळू विनामूल्य उपलब्ध होणार !

हिंदु राष्ट्रात अशा अवैध कृत्यांना कायमचा आळा बसण्यासाठी कठोर कायदे असतील !
वाळू तस्करांना रोखू न शकणारे आणि समस्यांवर हास्यास्पद 
उपाययोजना काढून स्वत:चे दायित्व झटकणारे आंध्रप्रदेश शासन !
     आंध्रप्रदेश - आंध्रप्रदेशातील शासनाने वाळू विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. शासनाच्या या निर्णयामुळे आता वाहतुकीचा खर्च वगळता नदीतून वाळू विनामूल्य मिळणार आहे; मात्र शासनाला वाळूतून मिळणार्‍या महसूलापासून वंचित रहावे लागणार आहे. वाळू तस्करी, त्यावरून होणारे वादविवाद आणि अवैध मार्गाने वाळू उपसणार्‍यांना आळा बसण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (अशा वरवरच्या उपाययोजनांपेक्षा वाळू तस्करांना कायमचा आळा बसण्यासाठी शासन कठोर कारवाई का करत नाही? - संपादक) विनामूल्य वाळू मिळण्यावर शासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.

पाकिस्तानच्या कतासराज हिंदु यात्रेकरूंमध्ये जिहादी आक्रमणाविषयी भीतीचे वातावरण

     नवी देहली - पठाणकोट आणि दिनानगर येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाकिस्तानमधील कतासराज शिव मंदिराला भेट देणार्‍या हिंदु यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पाकच्या इव्यक्यु ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने कठोर उपाययोजना हाती घेतली आहे. कतासराज शिव मंदिरात ५ मार्च ते ११ मार्चपर्यंत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे.
     पाकच्या इव्यक्यु ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डने प्रथमच पोलीस आणि संबंधित खाती यांची एक तातडीची बैठक बोलावून हिंदु यात्रेकरूंच्या सुरक्षेविषयी चर्चा केली.

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
    पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com

आर्थिक बोजा अल्प करण्यासाठी सैन्यातील मनुष्यबळात घट करणार ?

खासदार आणि आमदार यांच्या सुविधा अन् वेतन यांवर होणारी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी रोखून, मंत्रीमंडळातील  मंत्र्यांची संख्या अल्प करून शासन आर्थिक बोजा न्यून का करत नाही ?
    नवी देहली - जगातील तिसरे मोठे सैन्य असलेल्या भारतीय सुरक्षादलांवर अतिरिक्त मनुष्यबळाचा बोजा आहे. त्यामुळे मनुष्यबळात घट करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.
पर्रीकर म्हणाले की,
१. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मिळून एकूण १३ लाख गणवेशधारी सैनिक आणि अधिकारी कार्यरत आहेत; मात्र या सैनिकांंच्या वेतनासाठी यावर्षी ९५ सहस्र कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक दोन वर्षांनी १६ टक्के वाढ अपेक्षित आहे.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या अन्य साधकांच्या पाठी लागलेला पोलिसी चौकशीचा ससेमिरा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगात अन्य साधकांना झालेले त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

दैनिक सनातन प्रभातचे वितरण समन्वयक श्री. अमित डेगवेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

      रामनाथी - साधना करत असतांना सतत श्री गुरूंना काय अपेक्षित आहे, त्यांच्या समष्टीरूपाशी एकरूप होण्यासाठी काय करावे, याचा ध्यास असणारे दैनिक सनातन प्रभातचे वितरण समन्वयक श्री. अमित डेगवेकर (वय ३६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ४ मार्च या दिवशी येथे एका भावसत्संगात घोषित केले. ही आनंदवार्ता ऐकून उपस्थित साधकांनी भावानंद अनुभवला. या प्रसंगी श्री. अमित हे अव्यक्त भाव आणि सहजता यांमुळे स्थिर होते. श्री. अमित डेगवेकर सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा आरंभ झाला, त्या दिवसापासून सनातन प्रभातच्या संरचनेची सेवा करत होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे सनातन पंचांग, सनातन ग्रंथांची मुखपृष्ठे, तसेच सनातनच्या प्रसारसाहित्याची निर्मिती, अशा कलेशी संबंधित विविध सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून ते सनातन प्रभातचे वितरण समन्वयक म्हणून सेवा करत आहेत.

उज्जैन कुंभमेळ्यासाठी टंकलेखन आणि एक्सेल संबंधित संगणकीय सेवा करू शकणार्‍या साधकांची तातडीने आवश्यकता !

    उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वातील पूर्वसिद्धतेच्या सेवांना आरंभ झाला आहे. मराठी आणि हिंदी भाषांत टंकलेखन, एक्सेल किंवा तत्सम संगणकीय सेवा करण्यासाठी ३१.५.२०१६ या दिवसापर्यंत साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी साधक लगेचच येऊ शकत असल्यास सेवा उपलब्ध आहे. ज्या साधकांकडे या सेवा करण्याचे कौशल्य आहे, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून गूगल स्प्रेडशीटमध्ये नावनोंदणी करावी आणि श्री. निषाद देशमुख यांना ९४०४९५६१९४ किंवा ९८२६७४२८३९ या क्रमांकावर कळवावे.

हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता ! - पू. ब्रह्मानंद स्वामी

मार्गदर्शन करतांना पू. ब्रह्मानंद स्वामी
     सातारा, ५ मार्च (वार्ता.) - पाश्‍चिमात्त्यांच्या अंधानुकरणामुळे जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी महान भारतीय संस्कृती आज लयाला जात आहे. युवकही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून ते केवळ भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत. हिंदूंमध्ये पुनश्‍च धर्मतेज जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र कणूर येथील मठाधिपती पू. ब्रह्मानंद स्वामी यांनी केली. श्रीक्षेत्र कणूर येथील मठावर छोट्या स्वरूपाच्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. स्मिता भोज आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे उपस्थित होते. सभेला श्रीक्षेत्र कणूर आणि पंचक्रोशीतील ३५० हून अधिक भाविकांची उपस्थिती लाभली. श्री. कोल्हापुरे यांनी पू. ब्रह्मानंद स्वामी यांचा सन्मान केला.

डोंबिवलीत एका आस्थापनाला आग

    डोंबिवली - डोंबिवलीतील एम्आयडीसीमध्ये अल्ट्रा प्यूअर फेम या आस्थापनाला भीषण आग लागली. आस्थापनातील सर्व कर्मचार्‍यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले; मात्र आग पुष्कळ वेळ धुमसत होती. महत्त्वाचे म्हणजे या आस्थापनाच्या शेजारी सिलेंडरचे गोदाम असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनांच्या ठिकाणी सनातन शॉप संकेतस्थळाचे विज्ञापन करणारे डँग्लर लावा !

    सनातन संस्था निर्मित ग्रंथ अधिकाधिक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र मोठ्या प्रमाणात ग्रंथप्रदर्शने लावली जातात. ग्रंथप्रदर्शन संपल्यानंतर सनातनचे ग्रंथ ऑनलाईन कसे खरेदी करता येतील, हे समजणे जिज्ञासूंना सोपे व्हावे, या उद्देशाने सर्वत्रच्या ग्रंथप्रदर्शनांवर sanatanshop.com या संकेतस्थळाचे विज्ञापन करणारे ए २ आकारातील डँग्लर (पाठपोट पत्रक चिकटवलेल्या पुठ्ठ्याला डँग्लर म्हणतात.) लावावेत. हे ए २ आकारातील डँग्लरला दोन्ही बाजूंनी लावण्यासाठीचे पत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध केले आहे. सनातन शॉप संकेतस्थळाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी ते जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात छापून घेऊन सर्वत्रच्या ग्रंथप्रदर्शनांवर लावावेत, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
    हे डँग्लर लावतांना ए २ आकाराचा पुठ्ठा घेऊन त्यावर दोन्ही बाजूने सनातन शॉपची माहिती असलेल्या लिखाणाचा कागद चिकटवावा. मध्यभागी दोन छिद्रे पाडून डँग्लर दोरीने एकमेकांना जोडावेत. असे केल्याने ते डँग्लर दोन्ही बाजूने वाचता येते.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आणखी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा एकूण घोटाळा ५१२ कोटी रुपयांहूनही अधिक

महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे प्रकरण
     पुणे, ५ मार्च - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र प्रविष्ट केले होते. त्यानंतरच्या तपासात आणखी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावे अन्वेषण विभागाच्या हाती आले आहेत. त्यामुळे हा घोटाळा ५१२ कोटी रुपयांच्या वर गेला आहे. त्याचे पुरवणी आरोपपत्र ठेवण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाशिवरात्रीनिमित्त नीळकंठेश्‍वरला जाण्यासाठी २५ टक्के जादा भाडेआकारणी !

 • पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून भाविकांची लूट
 • अतिरिक्त भाडेवाड त्वरित रहित करण्याची भाविकांची मागणी
       पुणे, ५ मार्च (वार्ता.) - महाशिवरात्री हे हिंदूंचे दैवत असणार्‍या शिवशंकराचे व्रत ! या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने मात्र या भाविकांची सोय करण्याऐवजी नीळकंठेश्‍वरला जाण्यासाठी सोडण्यात येणार्‍या विशेष बससेवेसाठी २५ टक्के अतिरिक्त दर आकारण्यात येणार आहे. महामंडळाच्या वतीने पहाटे ३.३० वाजता नेहरू स्टेडियमपासून नीळकंठेश्‍वर येथे जाण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे सदर मार्गावर एक दिवसीय, साप्ताहिक, मासिक, तसेच इतर पासधारक यांना सवलतीच्या दराने प्रवास करण्याची मुभा रहाणार नसल्याचे परिवहन महामंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. पानशेतजवळ असणार्‍या नीळकंठेश्‍वर येथे भगवान शिवाचे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रोंच्या संख्येने भाविक तेथे येत असतात.

आतंकवाद्यांशी लढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समजून घ्यायला हवेत ! - प्रा. गजानन नेरकर

      मुंबई, ५ मार्च (वार्ता.) - भारताचे शासन विनंती, अर्ज, खलिते यांच्या माध्यमातून आतंकवादाचे निराकरण करता येईल का, हे पहात आहे. दुसरीकडे अमेरिका आतंकवाद्यांना त्यांच्याच भूमीत जाऊन कंठस्नान घालत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे. आतंकवाद्यांशी लढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार समजून घ्यायला हवेत, असे प्रतिपादन प्रा. गजानन नेरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ, अनुप केणी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते.
      श्री. नेरकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदुस्थानासाठी लढा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुसलमानद्वेष्टे संबोधणे चुकीचे असून त्यांनी केवळ मुसलमानांनी धर्माचा अतिरेक न करता राष्ट्रहिताचा प्रामुख्याने विचार करावा, अशी भूमिका मांडली होती. गांधीवध अभियोगातूनही ते निष्कलंक सुटले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश भोगले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष हा केवळ त्यांचा नाही, तर हिंदुत्वाचा द्वेष आहे, असे सांगितले.

नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नाशिक जिल्हा बंदी घोषित करा !

    श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर - महाशिवरात्रीच्या दिवशी लक्षावधी भाविक श्री त्र्यंबकेश्‍वर येथे दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडी महिलांच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले, तर त्याचे संपूर्ण दायित्व हे प्रशासनाचे असेल. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या ब्रिगेडी महिलांना तात्काळ नाशिक जिल्हा बंदी घोषित करावी.

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याशी 
शारीरिक संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीला भाग पाडले !
वासनांध आमदार देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे !
महिलेसह ४ जणांना अटक !
     बिहारशरीफ (बिहार) येथील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास एका शाळकरी मुलीला भाग पाडणार्‍या सुलेखादेवी या महिलेसह तिची आई राधादेवी, मुलगी छोटी कुमारी, लहान बहीण तुलसीदेवी आणि मोतीराम नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी या दिवशी सुलेखादेवी तिच्या शेजारी रहाणार्‍या या मुलीला वाढदिवसाच्या मेजवानीचे आमिष दाखवून राजवल्लभ यादव यांच्याकडे घेऊन गेली होती. या मुलीने धैर्य दाखवत घडल्या प्रकाराविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. २८ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांनी राजवल्लभ यादव यांच्या घरावर छापा घालून सर्व साहित्य जप्त केले आहे.

काफिर की लडकी असे संबोधून पीडित मुलीची सतावणूक
हिंदूंनो, धर्मांतराचे दुष्परिणाम लक्षात घ्या !
      वास्को, गोवा येथे मौलवी सर्फराज अहमद यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिलेली १३ वर्षांची मुलगी आणि तिची आई यांना तक्रार दिल्याच्या दिवसापासून सतत धर्मांध मुसलमानांकडून धमक्या येत आहेत. पीडित मुलीचे वडील हे मूळ हिंदू होते. त्यांनी या मुलीच्या आईशी (ही मुसलमान आहे) लग्न करण्यासाठी मुसलमान धर्म स्वीकारला होता. या गोष्टीला अनेक वर्षे झाली आहेत. आता त्यांचे निधनही झाले. असे असतांना स्थानिक मुसलमान पीडित मुलीला काफिर की लडकी, काफिर की बद्चलन लडकी (काफिराची नीतीमत्ताहीन मुलगी) असे म्हणून हिणवून तिचा छळ करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. (धर्मांतर केले, तरी मुसलमानांसाठी तो काफिरच असतो, हेच यावरून लक्षात येते ! - संपादक)

पक्षत्याग केलेले प्रकाश वेळीप यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश
      भाजपचा त्याग केलेले गोवा येथील उटा या अनुसूचित जमातीच्या संघटनेचे नेते प्रकाश शंकर वेळीप यांनी पुन्हा त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या वतीने मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रकाश वेळीप हे पक्षापासून दूर गेले होते. पक्षात प्रवेश दिल्यानंतर भाजपने प्रकाश वेळीप यांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

एका धर्माभिमान्याने हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद्गार !
     मी आजपर्यंत पुष्कळ संघटनांमध्ये जाऊन हिंदुत्वाचे कार्य केले. मी हे कार्य करत असल्याने नातेवाइकांनीही माझ्याशी संबंध तोडले. माझ्या पदरी निराशाच पडली. आज हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून मला प्रामाणिक आणि खरे व्यासपीठ मिळाल्याची निश्‍चिती वाटत आहे, असे २८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी अमरावती येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर एका धर्माभिमान्याने प्रतिक्रिया देतांना सांगितले.

महिषासुर केवळ भारतातील दलितांचाच नव्हे, तर जगभरातील अतिरेक्यांचा पूर्वज
आहे आणि त्याची पूजा करणारे प्रतिमहिषासुरच आहेत ! - भाजपचे खासदार उदित राज
     ऑक्टोबर २०१३ मध्ये जेएन्यूच्या परिसरात साजरा झालेल्या महिषासुर स्मृतीदिनाला मागासवर्गियांचे नेते आणि भाजपचे खासदार उदित राज उपस्थित होते. या संदर्भात ते म्हणाले, महिषासुराला मी हुतात्मा मानतो आणि तो दलितांचा पूर्वज आहे. बाबासाहेब आंबेडकर हेही महिषासुराला दलितांचा आदर्श मानत होते. उदित राज यांनी वर्ष २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पाकच्या समर्थनार्थ घोषणा देईपर्यंत विद्यापिठातील देशद्रोही
विद्यार्थ्यांची माहिती नसणारे शासन देशाचे रक्षण कसे करणार ?
     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये पाकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याचे प्रकरण अद्याप थांबलेले नसतांनाच उत्तरप्रदेशातील नोएडा येथील नॉलेज पार्क महाविद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

संसदेतील गदारोळामुळे जनतेच्या पैशांची होणारी हानी

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरा आणि प्रथा मोडू पहाणारे पुरो(अधो)गामी अन् नास्तिकतावादी यांच्या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला यशस्वी लढा !

श्री. सुनील घनवट
हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्ववादी संघटना 
आणि शनिशिंगणापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची 
हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम
       महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह घुसण्याची चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांसाठी प्रवेश निषिद्ध असूनही त्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेण्याचा या महिलांचा यापूर्वी हेका होता. स्वतःला श्री शनिदेवांचे भक्त म्हणवून घेत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तीव्र अहंकाराने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची ठिणगी पेटताच धर्माभिमानी हिंदू, शनिभक्त, हिंदुत्ववादी महिला, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे सदस्य यांनी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा वणवा पेटवला. धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी सहस्रो धर्माभिमान्यांनी कंबर कसली आणि भूमाता ब्रिगेडवाल्यांचे धर्मद्रोही प्रयत्न हाणून पाडले. ७ मार्चला असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातील गाभार्‍यात महिलांना घेऊन घुसण्याच्या धर्मद्रोही चेतावणीच्या पार्श्‍वभूमीवर श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. हे आंदोलन कसे उभे राहिले ? त्यातील हिंदुत्ववाद्यांचा सहभाग, ग्रामस्थांची श्रद्धा, ईश्‍वराने साहाय्य केल्याविषयी आलेल्या अनुभूती आदी सूत्रे आपण या लेखातून पाहू.
संकलक : श्री. सुनील घनवट आणि कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

चि. स्वरालीला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

माघ कृष्ण पक्ष द्वादशी (६.३.२०१६) या दिवशी कामोठे, नवी मुंबई येथील चि. स्वराली संतोष पांढरे हिचा वाढदिवस आहे. चि. स्वरालीची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

नास्तिकतावादी महिलांना मंदिर प्रवेशापासून प्रतिबंध करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! - सौ. प्रभावती तुंगार

भाजप महिला दक्षता समिती त्रिंबकच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन
    श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, ५ मार्च (वार्ता.) - श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नाही. ही धर्मपरंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. काही नास्तिकतावादी महिला ही परंपरा मोडण्यासाठी आंदोलन करणार आहेत. त्यांची ही कृती हिंदु धर्मियांच्या श्रद्धेला तडा देणारी आहे आणि आम्ही ते सहन करू शकत नाही.

हिंदूंनो, दूरचित्रवाहिन्यांवरील कोणते कार्यक्रम पहायचे ?, यासंदर्भात विवेकाने निर्णय घ्या !

श्री. संदीप जगताप
१. पूर्वीच्या काळी विरोधकांमध्ये वाद-विवाद आकलन करण्याची 
क्षमता, त्यातून शिकण्याची स्थिती आणि स्वीकारण्याची वृत्ती 
असल्यामुळे त्यांचे प्रबोधन करणे शंकराचार्यांना शक्य होणे
     पूर्वीच्या काळी अशोक राजाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतरण चालू झाले होते. याच काळात आद्य शंकराचार्यांनी वादविवादामध्ये बौद्ध धर्मगुरूंना जिंकून हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ?, हे पटवून दिले. त्या काळी हिंदु धर्मही विविध पंथांमध्ये विखुरलेला होता. त्या स्थितीतही शंकराचार्यांनी सर्व हिंदूंना एकत्र करण्याचे मोलाचे कार्य केले. शंकराचार्यांनी विरोधकांना वाद-विवादामध्ये जिंकले. त्या काळी विरोधकांचीही अशी स्थिती होती की, त्यांना धर्माविषयीचा वादविवाद आकलन होत होता आणि त्यांची स्वीकारण्याची अन् शिकण्याची स्थिती होती. त्यामुळेच त्यांचे प्रबोधन होऊ शकले आणि हिंदु धर्माचे महत्त्व समजल्यानंतर ते सकारात्मक होऊन धर्मशास्त्रानुसार कृतीप्रवणही झाले.
२. आज जिज्ञासेने ऐकण्याची आणि कृती करून अनुभवण्याची
 स्थिती उरलेली नसल्याने विरोधकांनी धर्माविषयी पुरेसा 
अभ्यास न करता त्यांची मते मांडून त्यांवर ठाम रहाणे
     आज आपण पाहिले, तर पूर्णतः विरुद्ध स्थिती पहावयास मिळते. ज्या वेळी संत किंवा गुरु धर्माविषयी काही सूत्रे मांडतात, ती सूत्रे जिज्ञासेने ऐकण्याची, कृती करून अनुभवण्याची समाजाची स्थिती राहिलेली नाही. काही मोजक्या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रे सोडली, तर अन्य वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये आपण हे अनुभवत आहोतच.

औरंगजेब आजही ओवैसीच्या रूपाने जिवंत आहे ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

      कराड, ५ मार्च (वार्ता.) - हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले प्रत्येत संकट शिवछत्रपतींनी बाणेदारपणे परतवून लावले. आपले शरीर नाशवंत आहे; परंतु शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात चिरकाल टिकणारे आहेत. मनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जिवंत करण्यासाठी प्रत्येकाने नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेब जरी मेला असला, तरी ओवैसीच्या रूपाने तो आजही जिवंत आहे, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. येथील सरस्वती शिशुवाटिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी कराड आणि पंचक्रोशीतील ७० हून अधिक युवक उपस्थित होते.

धर्मांतरण होण्याआधीच रोखले असते, तर असे अभियान राबवावे लागले नसते !

     रायपूर येथे घरवापसी अभियान अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याची मोहीम देशभर राबवण्यात येईल, असे प्रतिपादन प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. प्रबल प्रतापसिंह जुदेव हे घरवापसी अभियान राबवणारे दिलीपसिंह जुदेव यांचे पुत्र आहेत.

धर्माभिमान्यांना वाटत असलेला हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचा विश्‍वास !

     २८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी अमरावती येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर एक धर्माभिमानी सनातनच्या पू. (कु.) स्वातीताईंना म्हणाले, तुम्ही व्यासपिठावरून खाली येऊन आमच्या प्रश्‍नांची उत्तरे दिलीत. यावरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचे समजते. इतर संघटनांच्या सभांमध्ये वक्ते केवळ व्यासपिठावरून बोलतात आणि निघून जातात. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी आभार !

आश्रमातील साधना आणि कार्य पाहून मन प्रसन्न झाले !

     सनातन आश्रमातील साधना, तसेच चाललेले कार्य पाहून मन प्रसन्न झाले. आश्रमातील शांतता आणि सात्त्विक वातावणाने पुष्कळ बरे वाटले. - निवासी संपादक, दैनिक गोमन्तक, गोवा.

भोकरदन (संभाजीनगर) येथे एका हिंदु युवकास धर्मांध गुंडांकडून गंभीर मारहाण

धर्मांधांची वाढती गुन्हेगारी ! धर्मांधांकडून 
हिंदूंवर वारंवार आक्रमण व्हायला हे पाकिस्तान आहे का ?
       भोकरदन, ५ मार्च - येथील एका पेट्रोल पंपावरील कर्मचारी अवचित तळेकर याला पेट्रोल भरण्याच्या कारणावरून ७ धर्मांध गुंडांनी शिवीगाळ करत पुष्कळ मारहाण केली. ही घटना १ मार्च या दिवशी रात्री ११.३० वाजता घडली आहे. या वेळी धर्मांधांनी पेट्रोल पंपावर असलेल्या सिमेंटच्या गट्टूने तळेकर याच्या छाती आणि शरिराच्या अन्य भागांवर मारहाण केली. यामुळे तो गंभीर घायाळ झाला असून त्याला संभाजीनगर येथे रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. सध्या अवचित याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नवाब ईजाज शाह, जाफर ईजाज शाह, अफसर ईजाज शाह, मुजीब आणि अन्य ३ अज्ञातांवर गुन्हे प्रविष्ट केले आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
(संदर्भ : सामना)

रेल्वेच्या वेटींग तिकिटावर दुसर्‍या दिवशी प्रवास करण्याची सुविधा मिळणार !

      नवी देहली - आता वेटींंग तिकिटावर दुसर्‍या दिवशी प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी तिकिट खिडकीवर जाऊन तशी विनंती करावी लागेल. याविषयी रेल्वे नवी योजना लागू करण्याची शक्यता असून त्यावर अधिकारी वर्ग विचारविनिमय करत आहेत.
     अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन गोवा शासनाने चालूच ठेवल्यास शासनाला खाली खेचण्यास मागेपुढे पहाणार नाही. शासनाने भारतीय भाषा सुरक्षा मंचाला कमी लेखण्याची चूक करू नये; अन्यथा शासनाला पायउतार करण्यासाठी दिवसरात्र एकत्र करू. - सुभाष देसाई, भारतीय भाषा सुरक्षा मंच, गोवा

तीन वर्षे पाक मधून येणार्‍या मनीऑडर्स न कळणार्‍या उत्तरदायींना फाशी द्या !

     जागतिक बँकेच्या वर्ष २०१६ च्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या ३ वर्षांत पाकमधून ९८ सहस्र ७९६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मनीऑर्डर्स भारतात पाठवण्यात आल्या, तसेच भारत वर्ष २०१५ मध्ये सर्वाधिक मनीऑर्डर मिळणारा देश होता.

अशा राष्ट्रद्रोह्यांना फासावर लटकवा !

     इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनातील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्रशासनाच्या प्रतिज्ञापत्रात पालट केले होते. - माजी गृहसचिव जी.के.पिल्लाई

हिंदु जनजागृती समितीचा तोल गेला आहे का ? असे म्हणणार्‍या मी मराठी या वृत्तवाहिनीचा तोल गेला आहे का ?

     कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीचा प्रसाद येथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून बनवून घेण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला. या निमित्ताने २४ फेब्रुवारी या दिवशी मी मराठी या वृत्तवाहिनीने हिंदु जनजागृती समितीचा तोल गेला आहे का ? या विषयावरच चर्चासत्र आयोजित केले होते.


ठाणे येथील संत प.पू. स्वामी डी.के. दास महाराज यांचा देहत्याग !

प.पू. स्वामी डी.के. दास महाराज
      ठाणे - येथील मुंब्याजवळील कल्याणफाटा परिसरातील प.पू. स्वामी डी.के. दास महाराज (वय अंदाजे ९५ वर्षे) यांनी ४ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला. ५ मार्चला सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. १३ मार्च या दिवशी दत्त मंदिरात शोकसभा आयोजित केली असून १४ मार्च या दिवशी नाशिक येथे १० व्या दिवसाचे विधी करण्यात येतील. या वेळी तेथे अनेक संत-महंत येणार आहेत.
प.पू. स्वामी डी.के. दास महाराज यांचे कार्य
      प.पू. महाराजांनी वयाच्या २० व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर १४ वर्षे ते नाशिक मार्गावरील ईगतपुरीजवळील घोटगावात रहायला होते. तेथे कपिलधारा ठिकाणी त्यांनी समाजकार्य केले होते. ते लहान वयाचे असूनही ग्रामपंचायत सदस्य होते. तेथील आदिवासींना त्यांनी व्यसनमुक्त केले. तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शाळाही स्थापन केल्या. गावातील लोकांना पुष्कळ सुविधा दिल्या. त्यामुळे तेथील लोक त्यांना मानतात. वर्ष १९५९ मध्ये ते कल्याणफाटा परिसरात रहायला आले. त्या वेळी गावांतील लोकांमध्ये वादविवाद व्हायचे; मात्र प.पू. महाराजांनी लोकांना साधना सांगण्यास प्रारंभ केला, तसेच अनेकांना भक्तीमार्गाला लावले. प.पू. महाराजांच्या वाणीतील चैतन्यामुळे गावातील लोकांमध्ये परिवर्तन झाले. त्यांनी अनेकांना माळकरी केले आणि शाकाहारी बनवले. त्यांच्या अस्तित्वामुळे गावातील वादविवाद उणावले.

धर्मांध विद्यार्थ्याने बारावीची बुक कीपिंगची प्रश्‍नपत्रिका फोडली !

प्रश्‍नपत्रिका सांभाळू न शकणारे गलथान प्रशासन !
      मुंबई - बारावी बोर्डाची वाणिज्य शाखेची बुक कीपिंग (बीके) या विषयाची प्रश्‍नपत्रिका ३ मार्चला व्हॉट्स अ‍ॅपवर आढळली. परीक्षा चालू होण्याच्या काही मिनिटे पूर्वीच ही घटना समोर आल्याने ही प्रश्‍नपत्रिका फुटली आहे का, याचा तपास बोर्डाने चालू केला. मीरा रोड येथील एका परीक्षा केंद्रातील सय्यद अझहर या विद्यार्थ्याच्या भ्रमणभाषमध्ये हा पेपर सापडला. याच विद्यार्थ्याने पेपर हॉट्सअ‍ॅपवर प्रसिद्ध केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! - संपादक)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील तीन मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
      यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१. 
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी

अग्निहोत्र
 • भावी आपत्काळात नागरिकांच्या रक्षणाचा मूलमंत्र ठरणारा सनातनचा ग्रंथ !
 • अणूयुद्धामुळे होणार्‍या प्रदूषणापासूनच्या रक्षणाचा मार्ग !
      त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काल आहे आणि त्यामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. पुढे आपत्काल आहे, असे म्हणण्यापेक्षा आता आपत्कालाला आरंभ झालाच आहे. आपत्कालात तिसरे महायुद्ध भडकेल. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय हवा. तसेच त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्याकरिता स्थुलातील उपाय उपयोगी नाहीत; कारण अणुबाँब हा नेहमीच्या बाँबपेक्षा सूक्ष्म आहे. स्थूल (उदा. बाण मारून शत्रूचा नाश करणे), स्थूल अधिक सूक्ष्म (उदा. मंत्र म्हणून बाण मारणे), सूक्ष्मतर (उदा. नुसते मंत्र म्हणणे) आणि सूक्ष्मतम (उदा. संतांचा संकल्प) असे अधिकाधिक प्रभावशाली टप्पे असतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म हे कित्येक पटीने प्रभावी असते. त्यामुळे अणुबाँबसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले अग्निहोत्र हा उपाय सांगितला आहे. करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळेत होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा असा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही बनते. सामान्यांनी एवढे जरी केले, तरी पुरे आहे. याहूनही प्रभावी, म्हणजे सूक्ष्म उपाय म्हणजे साधना करणे. साधनेने आत्मबल प्राप्त होते आणि आपल्या कार्याला बळ प्राप्त होते. सामान्य व्यक्तीने अग्निहोत्र करण्याने जो लाभ होईल, तो लाभ साधना करणार्‍या आणि ६० टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या साधकाने केलेल्या नुसत्या प्रार्थनेने साध्य होतो.

धर्माच्या प्रसारासाठी वाटेल तो मार्ग अवलंबणारे ख्रिस्ती आणि धर्माचरणाकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे हिंदू !

     ४.८.२०१५ या दिवशी गोव्यातील एका रुग्णालयात मला शारीरिक पडताळणीसाठी जावे लागले. तेथे ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण ख्रिस्तीच होते. त्यात एक वयोवृद्ध ननही रुग्ण म्हणून आल्या होत्या. ते दृश्य पाहून माझ्या मनात पुढील विचार आले.
श्रीमती रजनी नगरकर
१. लोकांच्या अगतिकतेचा लाभ 
घेऊन त्यांना येशूलाच प्रार्थना करा 
असे ठामपणे सांगणारे बिलिव्हर्सवाले !
      बिलिव्हर्सवाले ख्रिस्ती पंथाचा प्रसार करतांना येशूलाच प्रार्थना करा. तोच तुमची दुःखे दूर करील. तोच संकटातून तारणारा आहे. त्याचीच प्रार्थना करा आणि त्यालाच शरण जा. तो आजारातून तुम्हाला नक्कीच सोडवील, असे सांगत फिरत असतात. दूरचित्रवाणीवर तर मोठा कार्यक्रमच असतो. प्रचारक आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संकटांनी ग्रासलेल्यांपर्यंत, तसेच खेड्यातील अशिक्षित लोकांपर्यंत पोचण्यासाठी खेडोपाडी जातात अन् त्यांना येशूची गीते, तसेच पुस्तके मोफत वाटतात. एवढे करून ते थांबत नाहीत, तर अडचणीत असलेल्यांना मोठ्या प्रेमाने आर्थिक साहाय्य करतात. अडलेला अशिक्षित समाज त्यांच्या या भूलथापांना पूर्ण फसतो आणि ते पंथप्रसारक जे सांगतील, ते करण्यास सिद्ध होतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्याल ?

वैद्य मेघराज पराडकर
१. सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.
२. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचे, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ खाणे टाळावे.
३. शीतपेये (कोल्डड्रिंक्स), आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद रस यांचे सेवन करू नये. हे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात. यांच्या अतीसेवनामुळे रक्तधातू दूषित होऊन त्वचारोग होतात.
४. कैरी उकडून बनवलेले गोड पन्हे, पाण्यात लिंबाचा रस आणि साखर घालून बनवलेले सरबत, जिर्‍याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदुळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड आणि द्रव पदार्थांपैकी जे शक्य आणि उपलब्ध होईल ते आहारात असावे. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरिराचे रक्षण होण्यास साहाय्य होते.

अंतर्गत मतभेदांमध्ये अडकलेल्या हिंदूंनो, आतातरी सावध व्हा !

श्री. संदेश नाणोसकर
कुठे परस्त्रीला मातेसमान मानणारे 
छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे अन्य धर्मीय महिलांवर 
अत्याचार करण्यास मान्यता देणारा मुस्लिम पंथ !
       काही दिवसांपूर्वी इजिप्तची राजधानी काहिरा येथील अल् अझहर या विद्यापिठातील प्राध्यापिका सुआद सालेह यांनी अल्लाहने मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर महिलांवर बलात्कार करण्याची आणि त्यांना अपमानित करण्याची अनुमती दिली आहे, असे विधान केले होते.
      त्या एवढेच बोलून थांबलेल्या नाहीत, तर त्या पुढे म्हणाल्या, मुसलमान आणि त्यांचे शत्रू यांच्यात युद्ध चालू असतांना मुसलमान पुरुष मुसलमानेतर महिलांना गुलाम बनवून त्यांच्यावर बलात्कार करू शकतात. त्या महिला म्हणजे मुसलमान पुरुषांची संपत्ती आहे.

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

Sanatan Shop.com
 • सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
 • विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७

शिवमहिमा विशेषांक

महाशिवरात्रीनिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
दिनांक : ७ मार्च २०१६
पृष्ठ : संख्या ८
मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च 
या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

साधना करतांना ईश्‍वराला अपेक्षित असे समष्टी कार्य निरपेक्षपणे केल्यास तोही आपणहून साहाय्य करत असणे आणि याचा प्रत्यय सनातन संस्थेच्या साधकांना गुरुकृपेने येत असणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     एप्रिल २०१५ पासून महर्षिच सनातन संस्थेची काळजी घेत आहेत. ते पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सनातनला आपणहून साहाय्य करत आहेत. भविष्यात सनातनवर येणारी संकटे त्यांना ज्ञात असल्याने ते आधीच ठिकठिकाणच्या देवतांचे आशीर्वाद सनातनला मिळण्यासाठी त्यांचे दर्शन घेण्यास सांगणे, होम-हवन करायला सांगणे, आसुरी शक्तींच्या बाधा दूर करण्यासाठी विधी करायला सांगणे, आश्रमांत स्थापन करण्यासाठी विविध यंत्रे देणे, मंत्रजप करण्यास सांगणे इत्यादी विविध उपाय सांगत आहेत. प.पू. डॉक्टरांवरील महामृत्यूयोगाचे संकट टळण्यासाठीही ते उपाय सांगत असतात आणि साधकांचे त्रासही दूर करत असतात. एखादे संकट आल्यावरही त्याचे निवारण होण्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. एवढेच नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्येही ते देवतांचे पाठबळ मिळवून देत आहेत आणि दिशा देत आहेत. तसेच विविध विषयांचे ज्ञानही ते जीवनाडीपट्टीद्वारे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या साहाय्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. आतापर्यंत विविध संतांनी सनातनला आपणहून साहाय्य केले आणि आता महर्षि साहाय्य करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वावर शंका घेणार्‍यांनो, पुढील सूत्रे वाचून अंतर्मुख व्हा !

      ७.६.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभात मधील पृष्ठ ३ वरील सनातन द्वेषापायी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वावर शंका घेऊन थयथयाट करणारे कथित हिंदुत्ववादी ! या मथळ्याखाली दिलेला लेख वाचल्यानंतर सुचलेले विचार पुढे देत आहे.
     ज्ञानी किंवा संत कसा ओळखावा ? याविषयी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत ज्ञानी आणि संत यांची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.

भाविकांच्या अर्पणाचा सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर अपव्यय करणारे एक देवस्थान

पू. राजेंद्र शिंदे
१. देवस्थान विश्‍वस्तांकडून भाविकांसाठी 
अनेकविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असणे
       मी महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी गेलो होतो. त्या देवस्थानाच्या विश्‍वस्त मंडळाने तेथील देवस्थानाच्या दैनंदिन कारभाराचे चांगले नियोजन आहे. मंदिराचे उत्तम बांधकाम, भक्तांना रेल्वेस्थानकापासून नेण्या-आणण्याची विनामूल्य आणि चोख व्यवस्था, प्रशस्त प्रांगण, भाविकांसाठी धर्मादाय चिकित्सालय, विनामूल्य महाप्रसाद (भोजन) व्यवस्था, प्रशस्त भोजनगृह, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, भक्तांच्या निवासासाठी आणि अधिक संख्येने भक्त राहू शकतील अशा सोयीसुविधा असलेल्या भक्तनिवासाच्या इमारती इत्यादी चांगल्या व्यवस्था त्यांनी केल्या आहेत.

देवीच्या मूर्तीला पुजार्‍यांनी वस्त्र नेसवण्याच्या कृतीविषयी भावाच्या पातळीवर नव्हे, तर लैंगिक स्तरावर विचार येणे, हे विकृत मानसिकतेचे लक्षण !

     ठाणे जिल्ह्यातील एका व्हॉटस्अपच्या ग्रुपवर धर्मभावना दुखावणारे पुढील लिखाण आले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने तसेच धर्मशास्त्र किंवा धार्मिक आचार यांच्याविषयी जाणून घ्यायची जिज्ञासाही नसल्याने आपण शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेतले म्हणजे आपल्याला सर्वकाही समजते, अशा आविर्भावात ते धर्मातील आचारांविषयी त्यांचे मत सार्वजनिकरित्या मांडतात. त्यात आपलेच हसे होते, याचेही त्यांना अहंकारापोटी भान उरत नाही; कारण धर्माचारामागील शास्त्र सांगितल्यावरही हे लोक अहंकारापोटी ते मान्य करत नाहीत. व्हॉट्स अ‍ॅपवरील अशा विकृत लिखाणामुळे सर्वसामान्य हिंदूंची दिशाभूल होऊ नये, यासाठी व्हॉट्स अ‍ॅपवरील विकृत लिखाण (कानामात्रेचाही फरक न करता) आणि त्याचा प्रतिवाद येथे देत आहोत.

श्री रामेश्‍वरम्मधील ऊर्जास्रोत हे आरोग्यदायी असल्याचेे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध !

पू. डॉ. रघुनाथ शुक्ल
      भारतात बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आढळतो. त्यांपैकी तमिळनाडू येथील कन्याकुमारीजवळ असलेल्या श्री रामेश्‍वरम् ज्योतिर्लिंगांची स्थापना कुणी ? केव्हा ? का ? आणि कशाकरिता केली ?; यामागील उद्देश आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांविषयी पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केलेले संशोधन येथे देत आहोत.
पू. डॉ. रघुनाथ शुक्ल यांचा परिचय
      पू. डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल हे पुणे येथील आहेत. ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन्.सी.एल्.) येथील शास्त्रज्ञ (निवृत्त), ज्योतिष महामहोपाध्याय, वास्तूशास्त्रवाचस्पती, विद्यावाचस्पती, विज्ञानाचार्य आणि जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून ओळखले जातात.
      भारतातील आणि महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचा विचार करतांना लक्षात येते की, ज्योतिर्लिंग त्यांच्या नावाच्या अर्थाशी निगडीत आहे. त्या ठिकाणी ज्योत आहे आणि प्रतिकात्मक लिंगही आहे. मला वर्ष १९६१ मध्ये निरनिराळ्या विषयांवर संशोधन करून चार वेळा पीएच्.डी. मिळवलेले संन्यासी वंगपुत्र भेटले. त्यांनी मला, तू ज्योतिर्लिंगांचा अभ्यास करावा असे वाटते, असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेचा स्वीकार करून मी संशोधन चालू केले.

शिवपूजेची काही वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र

१. शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही, तसेच शिवास शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल, तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास प्रतिबंध (हरकत) नाही; पण महादेवाची पिंडी असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये.
शास्त्र : शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणलिंगासह शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.
२. देवळात महादेवाची पूजा करतांना शंखपूजा उक्त नाही; मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.
शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर सिद्ध होतोच; तसेच शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, करणी इत्यादी वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

महर्षींनी विविध प्रकारच्या उपासनांयोगे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पंचमहाभूतांचे आशीर्वाद मिळवून देणे आणि याचे उदाहरण

     महर्षि साधकांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विविध प्रकारच्या उपासना सांगून त्यायोगे देवता आणि पंचमहाभुते यांचा आशीर्वाद मिळवून देत आहेत. त्याची दोन उदाहरणे येथे देत आहोत.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी ईरोड येथील शिवमंदिरात 
जाऊन दोन सुवासिनींना दीपदान करण्यास सांगणे
       महर्षींच्या आज्ञेप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ईरोड, तमिळनाडू येथील महिमालीश्‍वर शिवमंदिरात जाऊन तेथील दोन सुवासिनींना दीपदान करण्यास सांगितले होते. चौकशी केल्यानंतर कळले की, या दोन सुवासिनी एका उन्नत घराण्यातील आहेत. या घराण्याने गेली अनेक वर्षे शिवाची भक्ती केली आहे.
२. शिवमंदिराचा इतिहास
       हे शिवमंदिर चोल राजाने १० व्या शतकात बांधले होते. या ठिकाणी रावणाचे वंशज शिवभक्त माली आणि सुमाली यांनी प्रखर शिवभक्ती करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते. येथील शिवाला महिमालीश्‍वर या नावाने ओळखले जाते.

साधकांनो, केंद्रस्तरावरील विक्री न करावयाचे साहित्य दायित्व असलेल्या साधकांकडे जमा करा !

    मार्च मासात सर्व जिल्हे, तसेच प्रभाग यांमधील विक्री न करावयाच्या साहित्याची प्रत्यक्ष साठा पडताळणी करायची आहे. केंद्रस्तरावरील सर्व साधकांनी त्यांच्याकडील कापडी फलक, फ्लेक्स, पत्रके, भित्तीपत्रके, तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी साहित्य केंद्रस्तरावरील दायित्व असणार्‍या साधकाकडे जमा केले नसल्यास ते लवकरात लवकर जमा करावे.  ॐ

साधक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

वाहन वेगाने चालवल्याने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन वाहनगतीच्या नियमांचे कटाक्षाने पालन करा !
    काही जण अतिवेगाने दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवतात. वाहनाची वेगमर्यादा अधिक असल्यास भीषण अपघात होऊन स्वतः चालक, सहप्रवासी, तसेच अन्य व्यक्ती यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असतोे. त्याचप्रमाणे वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन तीव्र मनःस्तापाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारे वाहन चालवल्याने मान आणि पाठीचा मणका यांना जोराने हिसका (जर्क) बसल्याने त्याचे दुखणेही लवकर चालू होतेे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

स्वतःचा दुकानगाळा अथवा घर भाडेकरूला वापरण्यासाठी देत असल्यास त्याच्याकडून आगाऊ रक्कम घ्या !
    बरेच जण स्वतःचा दुकानगाळा अथवा घर (बंगला, सदनिका, खोली) काही कालावधीसाठी भाडेतत्त्वावर इतरांना देतात. काही भाडेकरू निर्धारित कालावधी संपल्यानंतरही दुकान अथवा घर सोडून जाण्यास सिद्ध नसतात किंवा नियमितपणे भाडे देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे मालकाला न्यायालयात धाव घेतल्याविना पर्याय नसतो. यामध्ये त्याचे धन आणि साधनेतील अमूल्य वेळ यांचा अपव्यय होतो, तसेच मनःस्तापाला सामोरे जावे लागते.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

महाशिवरात्र

७ मार्च यादिवशी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने.... 
 दर्शन घेण्याची पद्धत 
शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे) 
 शृंग म्हणजे शिवाच्या विविध लीला !
शिवलीलेचे नेतृत्व करणारा नंदी : शिवाच्या विविध लीलांमध्ये शिवगण सहभागी झालेले असतात. शिवगणांचा जो अधिपती नंदी, तो या शिवलीलेचे नेतृत्व करतो. शिवाची इच्छाशक्ती नंदीच्या माध्यमातून तेजोस्वरूप धारण करून ब्रह्मांडासाठी कार्य करते. नंदीची शिंगे शिवाच्या विविध लीलांचे अधिपत्य करण्याची क्षमता असणार्‍या घटकाचे प्रतिनिधीत्व करतात.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

     कलियुग म्हणजे दोषांचा खजिना असला, तरी केवळ श्रीकृष्णाच्या नामजपाने व्यक्तीला परमात्म्याच्या प्राप्तीची संधी देणारा मोठा गुण त्यामध्ये असणे
कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान्गुणः ।
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसङ्गः परं व्रजेत् ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्‍लोक ५१
अर्थ : परिक्षिता ! दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठायी एक मोठा गुण आहे. तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्णांचे केवळ संकीर्तन केल्यानेच सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते.
     (हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन आपत्काल दूर व्हावा, यासाठी सनातन संस्था श्रीकृष्णाचा नामजप करण्यास सांगते. - संपादक)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचा शोध घेऊ नये !
     खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. 

ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


संस्कृती रक्षकांनो, दायित्व वाढले !

      देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएन्यूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार ३ मार्च या दिवशी जामिनावर सुटून आला. त्याने विद्यापिठातील विद्यार्थ्यांसमोर भाषण करत तो आणि त्याचे सहकारी विद्यार्थी देशविरोधी नाहीत. ते देशद्रोही नाहीत. विद्यार्थी देशभक्तच आहेत, असे सांगितले. त्याच्या मनात खदखदत असलेला पोलीस आणि शासन यांच्या विरोधातील संताप मात्र लपत नव्हता. येथे त्याने दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे तो जामिनावर सुटलेला आहे; म्हणजे कायदा त्याची न्यायालयीन प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करत आहे. दुसरे म्हणजे देशद्रोही नसल्याचा त्याचा दावा अर्थहीन आहे; कारण पोलीस आणि शासन यांनी आंधळेपणाने त्याच्यावर कारवाई केलेली नाही. कन्हैया एका मोठ्या विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे.

राजकीय गुप्तता !

     काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांना वर्ष १९६० मध्ये चीनचे तत्कालीन नेते चाऊ-एन-लाई यांनी काश्मीरमध्ये सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी साहाय्य करण्याचे आमीष दाखवले होते, असे शेख अब्दुल्ला यांचे नातू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच एका कार्यक्रमात उघड केले. ही बंडखोरी अर्थात्च काश्मीर भारतापासून विभक्त करण्यासाठी होती, हे वेगळे सांगायला नको. अब्दुल्ला घराणे संधीसाधू धोरण राबवत असून काश्मीर भारतापासून तोडून स्वायत्त राज्यात (देशात) त्याचे रूपांतर करण्याच्या विचारसरणीशी त्याची बांधिलकी आहे. भारतीय शासन काश्मीर भारतापासून वेगळे होऊ देणे शक्य नाही, हे लक्षात असल्यामुळे अब्दुल्ला घराणे पाकची नेहमी कड घेत असते. पाकलाही काश्मीर राज्याने भारताबरोबर रहाणे मान्य नाही, हे सर्वांना ठाऊक आहेच. काश्मीरचा प्रश्‍न हा भारत-पाकमधील धगधगता प्रश्‍न आहे, हे विस्तारवादी चीनला ठाऊक असल्यामुळे तो या भांडणात तेल ओतत असतो किंवा हे भांडण असेच चालू रहावे, असे त्याचे धोरण असते. चीनने त्यामुळे वर्ष १९६०मध्ये काश्मीर राज्यात बंडाळी माजवण्याचे सुचवले असेल, ही गोष्ट अविश्‍वसनीय वाटत नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn