Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

पू. गोळवलकर गुरुजी जयंती

(म्हणे) आम्हाला देशातच स्वातंत्र्य हवे !

जामिनावर बाहेर आलेल्या कन्हैया कुमार याची भाषणबाजी
 • मी देशाच्या विरोधात बोललो नाही ! जेएन्यू प्रकरणात संघाचा हात !
 • पंतप्रधान मन की बात ऐकत नाहीत !
 • लढाई चालूच रहाणार !
नवी देहली, ४ मार्च- देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार ३ मार्चला जामिनानंतर कारागृहातून बाहेर आला. कारागृहातून सुटल्यावर तो थेट जेएन्यूमध्ये गेला. तेथे त्याचे मोठ्या जल्लोषात साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. या वेळी कन्हैयाने त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याप्रमाणे भाषणबाजी करत आम्हाला देशापासून नव्हे, तर देशातच भूक, भ्रष्टाचार, भेदभाव आणि मागासलेपणा यांपासून स्वातंत्र्य हवे, अशी मुक्ताफळे उधळली. कन्हैयाने ४० मिनिटांच्या भाषणात रा.स्व. संघ, भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यावर टीका केली.
देशद्रोहाचा आरोपी कन्हैया कुमार म्हणाला,
१. जेएन्यूवरील शासनाची कारवाई नियोजित होती. याची संपूर्ण योजना नागपुरातून आखण्यात आली. या सगळ्यामागे रा.स्व. संघ आहे.
२. रोहित वेमुलाला न्याय मिळावा, यासाठी चाललेल्या लढाईतील धार शासनाला मंद करायची होती. ही लढाई यापुढेही चालू राहील.
३. आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्यामुळे अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) या संघटनेच्या विरोधात कटुतेची भावना नाही.

नथुराम गोडसे यांच्या समर्थकांवर कारवाई करा ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

नथुराम गोडसे यांच्या समर्थकांवर कारवाई करा, म्हणणारे याची उत्तरे देतील का ?
 • काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या विरोधात मशिदीतून घोषणा देऊन त्यांच्यावर दगडफेक करणार्‍यांवर कारवाई कधी करणार ?
 • काश्मीरमधील पाकच्या समर्थकांवर कारवाई कधी करणार ?
 • काश्मीरमध्ये मशिदीतील नमाजानंतर इसिसचे झेंडे फडकवणार्‍यांवर कारवाई कधी करणार ?
 • इसिसमध्ये जाऊ इच्छिणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी केंद्रशासन त्यांना समुपदेशन का करत आहे ?
   नवी देहली - नथुराम गोडसे यांची पूजा कशी काय केली जाऊ शकते ? नथुराम गोडसे यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम करणार्‍यांच्या विरोधात राज्यशासनांंनी कारवाई केली पाहिजे. तसे करण्यापासून आम्ही कोणत्याही राज्याला रोखलेले नाही. त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. आग्रा येथे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रमाशंकर कथेरिया आणि अन्य भाजप नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी विरोधी पक्षाने लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेच्या वेळी नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचे सूत्र आले. त्यावर सिंह यांनी वरील उत्तर दिले.

पाकिस्तानात जाऊन मेजवान्या का झोडता ?

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची नरेंद्र मोदी यांच्यावर फुकाची टीका
स्वत: काहीही न करता केवळ विरोधकांवर टीका करणार्‍या आणि देशहिताचा पोकळ 
आव आणणार्‍या काँग्रेसने पाकच्या विरोधात काय दिवे लावलेत, हे जनतेला ठाऊक आहे !
      नवी देहली - काँग्रेस पक्षाचे गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस शासन पाकिस्तानशी चर्चा करत असे, तेव्हा तुम्ही (नरेंद्र मोदी) किती विषारी प्रचार करत होता ? आता सीमेवर भारतीय सैनिकांचा शिरच्छेद होत असतांना तुम्ही पाकिस्तानात स्वतःहून जाऊन मेजवान्या का झोडता ? विद्यमान शासनाची भूमिका कशीही असली, तरी देशाचे संरक्षण आणि देशहितासाठी विरोधक शासनाच्या खांद्याला खांदा लावून कायमच उभे राहतील. (देशाच्या संरक्षणासाठी आणि देशहितासाठी आतापर्यंत काँग्रेसने काय केले आहे ? देशाची सुरक्षा आणि देशहित यांच्या मुळावर उठलेल्या काँग्रेसवाल्यांना केवळ राज्यसभेत भाषणबाजी केली म्हणजे देशहित साधले, असे वाटते का ? - संपादक)
आझाद पुढे म्हणाले,
१. काँग्रेसच्या काळात जे सैनिक हुतात्मा झाले त्यांची शिरगणती आणि आता जे सैनिक पाकच्याच आक्रमणात मृत्युमुखी पडतात त्यांची शिरे म्हणजे कांदेबटाटे वाटतात का ?
२. काळ्या पैशाच्या सूत्रावरून भाजपने गेली १० वर्षे काँग्रेस नेतृत्वासह आमच्या पक्षाला अपकीर्त केले. आता दोन वर्षे झाली तरी त्याविषयी भाजपने काहीच सांगितलेले नाही

देहली महानगरपालिकेची संजय दत्त याला सदिच्छा दूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) बनण्यासाठी विनंती !

गुन्हेगार अभिनेत्याला सदिच्छा दूत बनवू पहाणारी
महानगरपालिका जनतेला दिशादर्शन काय करणार ?
      नवी देहली - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगून परत आलेला अभिनेता संजय दत्त याला देहली महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियन आणि स्मार्ट सिटीचा सदिच्छा दूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) होण्यासाठी विनंती केली आहे. संजय दत्त त्याची ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण करून २५ फेब्रुवारीला पुण्याच्या येरवाडा कारागृहातून सुटला आहे. या विषयाच्या अनुषंगाने देहली महानगरपालिकेने संजय दत्त याला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, संजय दत्त तरुणांचा आदर्श आणि देशातील महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे शहरात स्वच्छता राखण्यास नागरिक उद्युक्त होतील. (गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अभिनेत्याला सदिच्छा दूत बनवण्याचा प्रयत्न करणारा जगातील एकमेव देश भारत ! - संपादक) संजय दत्त याने या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे.
(म्हणे) खेळाडूंच्या संरक्षणाची हमी द्या, अन्यथा टी-२० विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर पडू ! - पाक क्रिकेट मंडळाच्या उलट्या बोंबा

 • भारत शासन भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत नाही, तेथे पाकच्या खेळाडूंच्या सुरक्षेची हमी कशी देणार ?
 • भारतातील राष्ट्रप्रेमी सहिष्णु असल्याने आतापर्यंत कधीही पाकच्या खेळाडूंवर आक्रमण झाले नाही ?
 • पाकच्या खेळाडूंवर भारतीय नाहीत, तर पाकचेच आतंकवादी आक्रमण करून भारताला दोषी ठरवू शकतात, हे पाक लक्षात घेईल का ?
सामना पहाण्यासाठी ७ सहस्र पाक नागरिक भारतात येण्याची शक्यता
     लाहोर - १९ मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे होणार्‍या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट सामन्याला प्रचंड विरोध होतांना दिसत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी याला विरोध केला आहे. त्यावरून पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे.

भूमाता रणरागिणी ब्रिगेडला नाशिक जिल्हाबंदी करावी अन् आंदोलनामुळे होणारी संभाव्य हानी वसूल करावी ! - हिंदु जनजागृती समिती

उपजिल्हाधिकारी (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते
    नाशिक, ४ मार्च - येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह घुसण्याची चेतावणी देणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडला नाशिक जिल्हाबंदी करण्यात यावी, तसेच या आंदोलनामुळे होणारी संभाव्य आर्थिक हानी त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्याकडून नाशिकचे जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. या वेळी प्रखर हिंदुत्ववादी अधिवक्त्या सौ. निलिमा साखरीकर आणि अधिवक्ता श्री. पुंडलिक गीते उपस्थित होते. तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ७ मार्चला महाशिवरात्रीला नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातील गाभार्‍यात महिलांना घेऊन घुसण्याची धर्मद्रोही चेतावणी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने हे निवेदन दिले आहे.
 या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी श्रीमती तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेड संघटना महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे त्यांच्या महिला पदाधिकार्‍यांनी घोषित केले आहे. त्यातून देसाई यांना महिलांच्या हक्कापेक्षा स्वतःची प्रसिद्ध महत्त्वाची वाटते, हे लक्षात आलेले आहे. आज राज्यासमोर अनेक समस्या असतांना, महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार घडत असतांना त्याविषयी ब्रही न काढता केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथा मोडण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. शनिशिंगणापूर येथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवावा लागला होता. त्यांच्यामुळे तेथे वारंवार तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

(म्हणे) ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय !

बंगालमधील हिंदूंची दयनीय स्थिती न दिसणारे अमर्त्य सेन यांचे मुसलमानधार्जिणे विधान
      कोलकाता - ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय आहे, असे मुसलमानधार्जिणे विधान अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी येथे केले. अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेले प्रातिची ट्रस्ट, तसेच गाईडेंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या लिव्हिंग रियालिटीज् ऑफ मुस्लिम इन वेस्ट बंगाल हा अहवाल सिद्ध केला असून त्यात मुसलमानांची कथित दयनीय स्थिती मांडली आहे.
या अहवालात पुढे म्हटले आहे,
१. बंगालमधील ८० टक्के मुसलमान कुटुंबे प्रतिमाह केवळ ५ सहस्र रुपये वेतनावर त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. ही लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली आहे.
२. यातील जवळजवळ ३८ टक्के मुसलमानांचे मासिक वेतन केवळ २ सहस्र ५०० रुपये एवढेच असून यात ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.

काश्मीरमध्ये सैन्याने ठार केलेला आतंकवादी शिक्षण अर्धवट सोडून आतंकवादाकडे वळल्याचे उघड !

जिहादसाठी शिक्षणावर पाणी सोडणारा धर्मांध विद्यार्थी ही, मुसलमानांना
शिक्षण दिल्यास ते आतंकवादापासून लांब जातील, असे म्हणणार्‍यांना चपराक !
      श्रीनगर - सैन्याने त्राल सेक्टरमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली. यांतील महंमद इशाक पैरी हा आतंकवादी त्याचे शिक्षण अर्धवट सोडून आतंकवादाकडे वळाला होता. अभ्यासात प्रचंड हुशार असलेला हा आतंकवादी वर्ष २०११ मध्ये इयत्ता १०वी तब्बल ९८ टक्के मिळवून काश्मीरमध्ये नवव्या स्थानावर होता. त्याच्या हुशारीमुळे त्याचे मित्र त्याला न्यूटन असे संबोधत; मात्र वर्ष २०१५ मध्ये शिक्षण अर्धवटच सोडून तो हिजबुल मुझाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेेत सहभागी झाला.

पाकिस्तानला जम्मू-काश्मीरशी जोडणार्‍या गुप्त भुयाराचा शोध

भारताला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणारे शत्रूराष्ट्र पाकिस्तान !
     जम्मू - भारतीय सीमा सुरक्षा दलाला जम्मूतील निक्की तावी नदीच्या परिसरात एक भूयार आढळून आले आहे. या भूयाराचा प्रारंभ पाकिस्तानातून झाला असून त्याचा शेवट थेट जम्मूतील पुरा भागात झाला आहे. हे भूयार भूमीखाली १० फुटांवर असून त्याची लांभी अनुमाने ३० फूट आहे, अशी माहिती दलाचे अधिकारी राकेश शर्मा यांनी दिली. भूमीच्या खालून एका सुरूंगाचे खोदकाम आणि बांधणी चालू असल्याचे सुरक्षा दलाला पाहणीत आढळून आले. हा पाकिस्तानचा भारतामध्ये आतंकवादी पाठवण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याचेही शर्मा म्हणाले. या भूयारात एखादी व्यक्ती खाली बसून सहज हालचाली करू शकते, असेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे. वर्ष २०१२ पासून आतापर्यंत भारतीय सीमा सुरक्षा दलाने अशा प्रकारचे ४ सुरूंग शोधून काढले आहेत.

शाळांमध्ये जंकफूडच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी देहली शासनाचे आदेश

इतरत्रच्या शासनांनीही असा आदेश देणे अपेक्षित आहे !
      नवी देहली - देहली शासनाने देहलीतील उपाहारगृहांमधील जंकफूडच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या संदर्भात शाळांना सांगण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयाने सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात त्यांच्या उपाहारगृहात चरबी, साखर आणि मीठ यांचे प्रमाण अधिक असलेल्या खाद्यपदार्थांचा शरिरावर होणार्‍या दुष्परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालक यांना जागृत करावे आणि याकरता शिक्षक-पालक बैठक घ्यावी, असेही म्हटले आहे.

भारत पाकवर आक्रमण करणार होता ! - ओसामा बिन लादेनच्या गोपनीय पत्रात उल्लेख

     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी १ मार्च या दिवशी आतंकवादी ओसामा बिन लादेनची गोपनीय पत्रे उघड केली आहेत. त्याच्या जिहाद इन पाकिस्तान या एका ४२ पानी पुस्तिकेत लादेनने अनेक दावे केलेले आहेत. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानचे तुकडे करून त्याची पाच-सहा प्रांतांमध्ये विभागणी करायची, अशी अमेरिकेची योजना होती. त्यानंतर भारतीय सैन्य स्वतंत्रपणे किंवा अमेरिकेच्या साहाय्याने पाकवर आक्रमण करील. लादेन याने या अमेरिकेची कथित योजना उलटवण्यासाठी पाकिस्तानमध्ये जिहाद करून तेथील सैन्याशी लढून पाकला अस्थिर करायचे आणि पाकवर नियंत्रण मिळवायचे, असा कट रचला होता. भारत १३४ लढाऊ विमाने खरेदी करणार असून जगाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा संरक्षण व्यवहार असेल. अरबी समुद्रात अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यासमवेत भारतीय नौदलाच्या कवायती, तसेच ब्रिटन सैन्यासमवेतचे प्रशिक्षण म्हणजे पाकवरील आक्रमणाची सिद्धता आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक घोषित

    नवी देहली - देशातील बंगाल, केरळ, तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि आसाम या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी ४ एप्रिल ते १६ मे या कालावधीत मतदान होणार असून मतमोजणी १९ मे या दिवशी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१९६० मध्ये चीनने शेख अब्दुल्ला यांना काश्मीरमध्ये सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी साहाय्य करण्याचे आमीष दाखवले होते ! - ओमर अब्दुल्ला

    श्रीनगर - जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एका कार्यक्रमात गौप्यस्फोट करत सांगितले की, वर्ष १९६० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांना चीनी नेते चाउ-एन्-लाई यांनी अल्जेरिया येथे झालेल्या एका परिषदेच्या वेळी काश्मीरमध्ये सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी साहाय्य करण्याचे आमीष दाखवले होते; मात्र शेख यांनी त्यास नकार दिला होता.

स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात भारताचा ९० वा क्रमांक

जागतिक आर्थिक मंचाकडून १२६ देशांच्या वीज पुरवठ्यांचे आकलन
देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे होऊनही उर्जा क्षेत्रात भारताची स्थिती विदारक !
     जिनेव्हा - स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात १२६ देशांच्या सूचीमध्ये भारताला ९० वा क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. या अहवालानुसार जागतिक आर्थिक मंचाकडून (डब्लू.ई.एफ्.कडून) एक सूची बनवण्यात आली आहे. या सूचीप्रमाणे स्वीत्झलॅन्ड प्रथम क्रमांकावर आहे. हे निष्कर्ष काढतांना उचित मूल्य, पर्यावरण, कायम आणि सुरक्षित पुरवठा यांच्या आधारावर १२६ देशांमधील वीज पुरवठ्यांचे आकलन करण्यात आले.

मुंबईच्या परीक्षा केंद्रावर मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब न घालण्याच्या सूचना

      मुंबई - भायखळा येथील १०वीच्या परीक्षा केंद्रावर मुसलमान विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याआधी हिजाब (डोके झाकण्याचा रूमाल) काढण्याच्या सूचना देण्यात आल्याच्या आल्या, अशी तक्रार या विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे. मुलींचे पालक म्हणाले, प्रारंभी या मुलींनी हिजाब काढण्यास नकार दिला; मात्र नंतर प्रश्‍नपत्रिका सोडवण्यास विलंब होईल, या भीतीने त्यांनी सूचनांचे पालन केले. आम्ही परीक्षा मंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी असा कुठलाही नियम नसल्याचे सांगितले.
      मुंबई परीक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणाले, आम्ही असा कुठलाही गणवेष-नियम केला नाही. कदाचित तेथील केंद्रप्रमुखांना फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी सूचना दिल्या असतील; मात्र अशा वेळी महिला अधिकार्‍यांकडून झडती घेता आली असती. तेथील प्राचार्याने अशी घटना घडणार नाही, याची ग्वाही दिली आहे, असे एन्.एस्.यु. आय. च्या राष्ट्रीय समन्वयक हीना कनोजिया यांनी सांगितले.

श्री सिद्धीविनायक ट्रस्टकडून शासकीय योजनांसाठी कोट्यवधी रुपये निधी

 • जलयुक्त शिवारसाठी ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये 
 • डायलिसीस यंत्रणेसाठी ७ कोटी रुपये
     मंदिर सरकारीकरण केल्याचे दुष्परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांतील पैसा हिंदूंना धर्मशिक्षण देणे, मंदिरांतील सुव्यवस्था ठेवणे आदी धर्मकार्यासाठीच व्हायला हवा ! शासनाकडे मनोरंजन किंवा क्रीडा आदीवर उधळण्यासाठी पैसा असतांना या विकासकार्यासाठी शासन मंदिरांचा पैसा का हडपते ?
     कणकवली - मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना डायलिसीस यंत्रणा बसवण्यासाठी १ कोटी ५१ लाख ८४ सहस्र रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयांना डायलिसीस मशीन देण्यासाठी ७.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी ही माहिती दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांना डावलून उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी !

     सेऊल - संयुक्त राष्ट्र्रसंघाकडून (यूएन) घातलेल्या निर्बंधांना न जुमानता ३ मार्च २०१६ या दिवशी उत्तर कोरियाकडून अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. उत्तर कोरियाकडून सलग घेण्यात येत असलेल्या अणूबॉम्ब आणि क्षेत्रपणास्त्र यांच्या चाचण्यांमुळे दक्षिण कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाने नुकतीच हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्रांची चाचणी घेतली होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर २ दशकांसाठी निर्बंध घातले आहेत; मात्र उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांना न जुमानता पुन्हा एकदा चाचणी घेतली. दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियाने उत्तरेकडील समुद्र किनार्‍यावरून अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

मुंबईत अवकाळी पाऊस

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥
                                           - कौशिकपद्धति
      अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
     मुंबई - राज्यातील विविध भागांसह मुंबईत आज ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. तसेच मध्यरात्रीपासूनच नाशिकमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ठाणे, वसई, विरार परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस आला असून अंधेरी, विलेपार्ले, कांदिवली, सांताक्रुझ, वांद्रे, डोंबिवली, बदलापूर या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या.
     मुंबईत ४ मार्चला सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला यांसह शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

देशाच्या विरोधात बोलणार्‍यांना ६ इंचाने लहान करू ! - दिलीप घोष, बंगालचे भाजप राज्यप्रमुख

      बीरभूम - देशाच्या विरोधात बोलणार्‍यांकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. देशाच्या विरोधात बोलणार्‍यांना शिक्षा केली जाईल, त्यांना ६ इंचाने लहान केले जाईल, असे विधान बंगाल भाजपचे राज्यप्रमुख दिलीप घोष यांनी येथे केल्याचे वृत्त दैनिक जनसत्ताने प्रसिद्ध केले आहे. येथील सिऊरीमध्ये आयोजित एका सभेत ते बोलत होते.
१. दोन दिवसांपूर्वी बीरभूमच्या इमलाबाजार येथे फेसबूकवरील पोस्टवरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणाच्या संदर्भात घोष म्हणाले की, येथे पोलीस स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरली आहेत.
२. या सभेनंतर घोष यांनी जिल्हाधिकार्‍यांना इमलाबाजारमधील हिंसाचाराविषयी एक निवेदन दिले.
३. सभेच्या वेळी भाजपकडून पत्रके वाटण्यात आल्याचे जनसत्ताच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या पत्रकात तालिबानी राज्यशासनाच्या विरोधात हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इमलाबाजारात धर्मांधांकडून झालेल्या हिंसाचाराची माहिती देण्यात आली आहे.

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ३ पोलीस ठार

   सुकमा (छत्तीसगड) - ३ मार्चला सायंकाळी राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) गस्ती पथकावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार, तर १५ पोलीस घायाळ झाल्याचे वृत्त आहे. यातील ७ पोलिसांची स्थिती गंभीर आहे. (नक्षलवाद मोडून काढण्यास अपयशी ठरलेली लोकशाही ! - संपादक)

येमेनमध्ये ४ भारतीय परिचारिका ठार

    एडन - मध्य-पूर्वेतील येमेन देशाच्या एडन शहरात ४ मार्चला चार आतंकवाद्यांनी एका वृद्धाश्रमात आक्रमण करून १६ जणांना ठार केले. यात ४ भारतीय परिचारिकांचा समावेश आहे. या आक्रमणानंतर चारही आतंकवादी फरार झाले. हे आतंकवादी इसिसचे असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

(म्हणे) इस्लाम कधी आतंकवादाचा पुरस्कर्ता राहिला नाही !

जगभरात इस्लामी आतंकवादाने थैमान घातले असतांना
एस्.एम्. बोबडे यांच्या या वक्तव्याला काय अर्थ रहातो ?
      वैभववाडी - उर्दूमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर केला जात असल्याने उर्दू सर्वधर्मसमभावाचे प्रतीक समजण्यात गैर काही नाही. आतंकवादाच्या शिक्क्यामुळे मुसलमान समाजाकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जाते. अल्पशिक्षित तरुणांची डोकी माथेफिरू भडकवत असल्याने धर्मगुरूंनी तरुणांना सरळमार्गावर आणण्यासाठी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. इस्लाम कधी आतंकवादाचा पुरस्कर्ता राहिला नाही आणि अन्य धर्मियांच्या रक्ताने देशाला रक्तरंजित करा, असे सांगत नाही, असे प्रतिपादन एस्.एम. बोबडे यांनी केले. (प्रबोधन करणे दूरच उलट इस्लामी धर्मगुरुच मुसलमान युवकांना भडकवणारी विखारी भाषणे करतात. वस्तूस्थिती लक्षात न घेता दिवास्वप्ने पहाणारे असे विचारवंत समाजाची दिशाभूलच करतात ! - संपादक)
     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील जमातवाडी, कोळपे येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि इमाम अहमद रजा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बीएस्एन्एल्चे अधिकृत वितरक उमेश नेसवणकर यांना पोलीस कोठडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बीएस्एन्एल्च्या ग्राहक
सेवाकेंद्रातील २५ लक्ष रुपयांच्या अपहाराचे प्रकरण
      देवगड - देवगड बीएस्एन्एल् कार्यालयाच्या ग्राहक सेवाकेंद्रात झालेल्या २५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य संशयित तत्कालीन अधिकृत वितरक उमेश केशव नेसवणकर (रहाणार मिठमुंबरी-बागवाडी, ता. देवगड) याला देवगड पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने नेसवणकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे.
     देवगड बीएस्एन्एल कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ साहाय्यक निशिकांत सावंत यांच्याकडे ग्राहक सेवाकेंद्राचा मार्च ते जून २०१० च्या मुदतीत कार्यभार असतांना बीएस्एन्एल् सीमकार्ड आणि व्हाऊचरचे पैसे बँकेत जमा करणे अन् हिशोब ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. निशिकांत सावंत आणि केशव नेसवणकर यांनी संगनमत करून मार्च ते जून २०१० या चार मासांच्या कालावधीत वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेले सीमकार्ड आणि व्हाऊचरच्या विक्रीतून मिळालेली २५ लाख २३ सहस्र ३३४ रुपये रक्कम बँक खात्यात जमा न करता अपहार केला, तसेच या रकमेचा खोटा हिशोब बीएस्एन्एल्च्या वरिष्ठ कार्यालयाला देऊन आस्थापनाची फसवणूक केली.

रशियातील मॉस्को शहरात मुलाचे शीर कापून ते फिरवणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

 अल्लाहच्या आदेशानुसार मुलाचे शीर कापले !
हिंदु धर्मात सहिष्णुता नाही, अशी ओरड करणार्‍या 
पुरो(अधो)गाम्यांना या घटनेविषयी काय म्हणायचे आहे ?
      मॉस्को - २९ फेब्रुवारी या दिवशी शहरात येथे एका मुलाचे कापलेले शीर हातात घेऊन रस्त्यावर फिरणार्‍या महिलेला अटक करण्यात आली. तिला न्यायालयासमोर उपस्थित केले असता तिने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. अल्लाहच्या आदेशानंतर हे कृत्य केले असल्याचे सांगून याविषयी तिला पश्‍चात्ताप नसल्याचे तिने म्हटले आहे. ही महिला उज्बेक येथे रहाणारी असून तिचे नाव गुलचेखरा बोबोकुलोवा असे आहे. (एकीकडे इसिसने केलेल्या क्रूर हत्यांच्या घटना वाढत असतांना दुसरीकडे धर्मांध महिलाही अल्लाहच्या आदेशानुसार अमानवी आणि हृदयद्रावक कृत्ये करत आहेत. अशांनी भारतातही आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करण्याची हिंदूंची सिद्धता आहे का ? - संपादक) ही महिला ३ मुलांची आई आहे. पोलिसांनी तिला मेट्रो स्टेशनच्या बाहेर मुलाचे शीर हातात घेऊन फिरतांना आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देताना पकडले.

येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करू ! - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मंत्रीमंडळाकडून मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौर्‍याला प्रारंभ
      लातूर/बीड/धाराशिव - राज्यात दुष्काळाची भीषणता वाढली आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा पुरवण्यात शासन न्यून पडणार नाही. जलयुक्त शिवार योजना शेतकर्‍यांसाठी फायद्याची ठरत आहे. येत्या पाच वर्षांत या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करू, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौर्‍याच्या वेळी दिली. तसेच दुष्काळाचे सातत्य हे मानवनिर्मित आपत्ती असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे उपस्थित होते.

संभाजीनगर येथे धर्मांधांच्या टोळक्याकडून हिंदु युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न

 • हिंदु युवतींनो, धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही !
 • स्त्री समानतेच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक गोष्टींत ढवळाढवळ करणार्‍या भूमाता ब्रिगेडसारख्या पुरो(अधो)गामी संघटना महिलांचे धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी आवाज उठवतील का ?
    संभाजीनगर, ४ मार्च - येथील सिडको भागातील एक हिंदु युवती समर्थनगर येथील खाजगी शिकवणीहून घरी येत असतांना निराला बाजार भागात धर्मांधांच्या एका टोळक्याने एका चारचाकी वाहनातून तिचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या युवतीने आरडाओरड केल्यामुळे बाजारातील काही तरुण तिच्या साहाय्यासाठी धावले. ते तरुण त्या युवतीच्या साहाय्यासाठी येत असल्याचे पाहून धर्मांधांचे टोळके पसार झाले. त्या युवतीने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात देवराई भागातील ३ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. (या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित ! - संपादक) हे धर्मांध हे त्या युवतीचा शिकवणीहून परत घरी जात असतांना चारचाकी किंवा दुचाकीवरून पाठलाग करत असत आणि तिची छेड काढत. (हिंदु युवतींनो, यासाठी स्वसंरक्षणाचे धडे घ्या ! - संपादक)

शिर्डी येथील श्री साई मंदिरात पोलिसाकडून स्वयंचलित बंदुकीतून चुकून गोळी सुटली

जीवितहानी नाही
      शिर्डी, ४ मार्च - येथील श्री साई मंदिर परिसरात दर्शन रांगेसाठी बंदोबस्ताला असलेल्या नकुल फडके या पोलीस कर्मचार्‍याकडून स्वयंचलित बंदुकीतून चुकून गोळी सुटली. ही गोळी आकाशाच्या दिशेने उडाल्याने कोणालाही इजा झाली नाही. (श्री साई मंदिर संस्थानाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने प्रशिक्षित कर्मचार्‍यांनाच कर्तव्य बजावण्यासाठी ठेवायला हवे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचार्‍यावर दंडात्मक कारवाईही व्हायला हवी ! - संपादक) १. पोलीस कर्मचारी नकुल फडके दर्शनरांगेच्या बॅरेकेडिंगला पाठ टेकवून बाकड्यावर बसले होते. सुरक्षेच्या चाकरीची वेळ पालटत असतांना स्वयंचलित बंदुकीची पडताळणी करत असतांना बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी उडाली. यामुळे मोठा आवाज होऊन भाविक, पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस यांची धावपळ झाली.

सरिता पाटील महापौरपदी विराजमान !

बेळगाव येथे जय महाराष्ट्र !
   बेळगाव, ४ मार्च (वार्ता.) - येथे झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बेळगाव विकास आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. कन्नड-उर्दू गटाचे मनसुबे उधळून लावत मराठी भाषिक गटाच्या सरिता पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही विकास आघाडीचेच श्री. संजय शिंदे विजयी झाल्याने बेळगाव येथे जय महाराष्ट्र आणि जय मराठीचा उद्घोष झाला आहे.
     बेळगाव महापालिकेतील महापौर-उपमहापौरपदाची गेल्या वेळची निवडणूक गाजली होती. कन्नड गटाचा महापौर करण्यासाठी मराठी भाषिक उमेदवारांचे अर्जच स्वीकारण्यात आले नव्हते.

ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिरात अपूर्व विज्ञान मेळावा २०१५-१६चे आयोजन

     मुंबई - ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर ऐरोली, ऐरोली माध्यमिक विद्यालय आणि चार्टर्ड इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश भाऊ संकपाळ यांच्या प्रेरणेतून अपूर्व विज्ञान मेळावा २०१५-१६ ज्ञानदीप विद्यामंदिर, ऐरोली या शाळेत २९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन ऐरोली प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक श्री. संजीव वाडे यांच्या हस्ते, तसेच पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. या वेळी दिघा गटाच्या केंद्र समन्वयक सौ. पायरे उपस्थित होत्या. मेळाव्याच्या औक्षणासाठी स्वयंसेवक आर्.एस्.पी. पथक, लेझीम पथक, कब-बुलबुल पथक उपस्थित होते. मेळाव्याचा लाभ ३ सहस्र ५०० विद्यार्थी आणि पालक यांनी घेतला. मेळाव्याचे आयोजन ज्ञानदीप विद्यामंदिराच्या सौ. विद्या ठाकूर आणि ऐरोली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी.आर्. नांदुगुडे यांनी केले.

श्री महालक्ष्मी मंदिरात खडीसाखर आणि फुटाणे यांचा प्रसाद चालू करावा ! - संजय पवार

श्री महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाचे प्रकरण
     कोल्हापूर, ४ मार्च (वार्ता.) - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना देण्यात येणारा लाडूचा प्रसाद बंद करून त्याऐवजी खडीसाखर आणि फुटाणे यांचा प्रसाद चालू करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे...
१. प्रसादाचा लाडू प्रश्‍नाच्या चर्चेमुळे श्री महालक्ष्मी देवस्थानची अपकीर्ती होत आहे.
२. देवीचा प्रसाद म्हणून खडीसाखर आणि फुटाणे देण्याची पारंपरिक प्रथा होती; मात्र ती बंद करून तिरुपतीच्या धर्तीवर लाडूप्रसाद द्यायला प्रारंभ झाला आहे. ही प्रथाच बंद करून खडीसाखर, फुटाणे प्रसाद दिल्यास लाडूवरून चालू असलेला वादही मिटेल.
३. श्री महालक्ष्मी मंदिर विकासाविषयी आणि भाविकांच्या सुविधाविषयी चर्चा करण्याऐवजी लाडू प्रसादाविषयी चालू असलेली नाहक चर्चा थांबवण्याची आवश्यकता आहे.

नांदेड येथील सौ. लीला गाजरे आणि श्री. प्रकाश पांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

    
सौ. लीला गाजरे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव
     
श्री. प्रकाश पांडे यांचा सत्कार करतांना (डावीकडे) पू. जाधवकाका
नांदेड -
येथील सनातनच्या साधिका सौ. लीला गाजरे आणि साधक श्री. प्रकाश पांडे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे पू. नंदकुमार जाधव यांनी एका सत्संगात घोषित केले. ही आनंददायी वार्ता ऐकून उपस्थितांची भावजागृती झाली. सौ. लीला गाजरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, मला काहीच कळत नाही. हे सर्व प.पू. डॉक्टरांमुळेच झाले. मी काय बोलू, तेही मला कळत नाही. मनोगत व्यक्त करतांना श्री. पांडेकाका म्हणाले, मी काहीही प्रयत्न करत नसतांना देवाने मला हे दिले. कृतज्ञतेसाठी शब्दच नाहीत.

रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या निष्काळजीपणामुळे दरोडेखोरांना मोकळे रान

वारंवार होणार्‍या दरोड्याच्या घटनांमधून रेल्वे प्रशासन आणि
रेल्वे पोलीस यांचा प्रवाशांसाठीचा हलगर्जीपणाच दिसून येत आहे. एकूणच या प्रकरणांमध्ये दरोडेखोर
आणि रेल्वे पोलीस यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा संशय आल्यास वावगे काय ?
     पुणे, ४ मार्च - दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसवर २९ फेब्रुवारी या दिवशी चोरट्यांकडून २ महिला प्रवाशांवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या घटना या मार्गावर सातत्याने होत असतात. त्याचप्रमाणे ठराविक टप्प्यातच सातत्याने दरोडा टाकण्याचे प्रकार होत असतांनाही रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांनी अद्यापही सुरक्षेविषयी ठोस पावले उचललेली नाहीत. या निष्काळजीपणामुळे दरोडेखोरांना सातत्याने मोकळे रान मिळत असून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. (याविषयी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि रेल्वे मंत्रालय उपाययोजना काढतील कि प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर सोडणार ? - संपादक)

अंनिससारख्या धर्मद्रोही संघटनांना बावधन गावाच्या वेशीवरच रोखा ! - राहुल कोल्हापुरे

    सातारा, ४ मार्च (वार्ता.) - बावधन नगरीचे ग्रामदैवत असणार्‍या श्री भैरवनाथाच्या बगाडासाठी केवळ सातारा जिल्ह्यातून नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. पोलीस आणि प्रशासन यांवर दबाव आणून बगाडाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला सुरुंग लावण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. आपल्या धर्मश्रद्धांचे भंजन होऊ नये, तसेच शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी अंनिससारख्या धर्मद्रोही संघटनांना बावधन गावाच्या वेशीवरच रोखावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले. बावधन (जिल्हा सातारा) येथील चावडी चौकात आयोजित करण्यात आलेल्या छोट्या स्वरूपाच्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री सोनजाई मंदिराचे विश्‍वस्त पू. पोपटगिरी गोसावी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हणमंत कदम उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. श्री. हणमंत कदम यांनी समितीच्या स्थापनेचा उद्देश आणि कार्य यांविषयी उपस्थितांना माहिती दिली.

तरुणांच्या अतिरेकी उत्साहाने उत्सवात स्वैराचार वाढला ! - पंचांगकर्ते मोहनराव दाते

     भोर (जिल्हा पुणे), ४ मार्च (वार्ता.) - आपल्या रूढी-परंपरा, सण आणि उत्सव हे ऋतुचर्या अन् दिनचर्या यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ते आनंदाने आणि उत्साहाने साजरे करावेत; परंतु सध्याच्या तरुण पिढीच्या अतिरेकी उत्साहाने त्यात स्वैराचार वाढत आहे, असे परखड प्रतिपादन प्रसिद्ध पंचांगकर्ते श्री. मोहनराव दाते यांनी केले. येथील वनवासी कल्याण आश्रम आणि डॉ. हेडगेवार स्मृती सेवा समिती, भोर यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
    २६ ते २८ फेब्रुवारी या तीन दिवसीय व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदराव खाडिलकर आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. विश्‍वंभर चौधरी यांचीही व्याख्याने झाली. या वेळी श्री. दाते यांनी श्री शनिदेवाचा त्रास, नवग्रह पूजन, उदकशांत, कालसर्पयोग यांवरील शंकांचे निरसन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

    मुंबई, ४ मार्च - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी ६ गटांतील ५० स्पर्धकांना पारितोषिके प्राप्त झाली. १ सहस्र १५१ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
     श्री. विज्ञानेश मासावकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यांना वाव मिळावा, तसेच क्रांतीकारकांचे कार्य अन् त्याग यांच्या जाणिवेने स्पर्धकांमध्ये राष्ट्रभक्ती वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री. मासावकर यांनी सांगितले.

इचलकरंजीला १० दिवसांनी पाणीपुरवठा !

निष्क्रीय प्रशासन !
दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
     इचलकरंजी, ४ मार्च (वार्ता.) - शहरात जवळजवळ १० दिवसांनी पाणीपुरवठा चालू झाला आहे; मात्र हिरवट आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी पुन्हा शुद्ध पेयजल प्रकल्पावर गर्दी करावी लागत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
१. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने ४ लक्ष लोकवस्तीच्या शहराचा पाणीपुरवठा १० दिवसांपासून ठप्प आहे. चांदोली धरणातील पाणी सोडण्यासाठी भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांनी पाठपुरावा केला; मात्र पाण्याचा विसर्ग अल्प होत असल्यामुळे शहराचा पाणीप्रश्‍न सुटण्याची शक्यता अल्प झाली.

डान्स बारप्रकरणी राज ठाकरे यांची टीका

    मुंबई - न्यायालयात लाखो प्रकरणे प्रलंबित असतांना डान्स बारवर मात्र तातडीने निर्णय कसे होत आहेत ? शासनाने डान्स बार चालू होण्याविषयी जशी तत्परता दाखवली, तशीच इतर विषयांच्या संदर्भात दाखवली, तर जनता त्यांना आशीर्वाद देईल. डान्स बार बंदीमुळे बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित होत असेल, तर शासनाने मग आता मटका, बेटिंग अधिकृत करावे. जमलेच तर चोर्‍या आणि दरोेडे यांनाही मान्यता द्यावी, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कमी पडला का ? आता फक्त डान्स बार मालकांचेच अच्छे दिन (चांगले दिवस) आले आहेत, असेही ठाकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

गोडसे समर्थकांवर कारवाई करा म्हणणारे
आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानवर कारवाई करणार का ?
    नथुराम गोडसे यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम करणार्‍यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. ही कारवाई करण्यापासून आम्ही कोणत्याही राज्याला रोखलेले नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेत म्हणाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Nathuram Godse ke sanman me karyakram karnewalon par karwai
honi chahiye. - kendriya gruhamantri
kya ham atank failanewale Pakpar karwai karenge ?
जागो !
 नथुराम गोडसे के सन्मान में कार्यक्रम करनेवालों पर कारवाई होनी चाहिए.
- केंद्रीय गृहमंत्री क्या हम आतंक फैलानेवाले पाक पर कारवाई करेंगे ?

संभाजीनगर येथे १० वीच्या परीक्षेच्या वेळी कॉपी केल्याची १११ प्रकरणे उघडकीस

     संभाजीनगर, ४ मार्च - १० वीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत झालेल्या २ विषयांच्या परीक्षेच्या वेळी कॉपी केल्याची १११ प्रकरणे उघडकीस आली आहेत. मराठी भाषा विषयाच्या पेपरच्या वेळ ५९, तर हिंदी विषयाच्या पेपरला ५२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (कॉपीच्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळ कोणती उपाययोजना काढणार आहे, ते स्पष्ट करेल का ? - संपादक)

छत्तीसगड येथील राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे संतांच्या हस्ते उद्घाटन !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून प.पू. महामण्डलेश्‍वर आनंदधाम पीठाधीश्‍वर योगीराज स्वामी
ज्ञानस्वरूपानंद अक्रियजी महाराज, श्री चक्रमहामेरु पीठाधीश्‍वर श्री श्री दण्डीस्वामी सच्चिदानंद तीर्थ महास्वामी,
प.पू. श्रीरामबालकदासजी महाराज, श्री सिद्धेश्‍वरानंदजी महाराज, सनातनचे पू. चत्तरसिंह बाबूलालसिंह इंगळे

(सर्वांत उजवीकडे)
राजिम (छत्तीसगड) - दोन मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन प.पू. श्रीरामबालकदासजी महाराज (पाटेश्‍वरधाम), श्री सिद्धेश्‍वरानंदजी महाराज (पंचकोशी पीठाधीश्‍वर), श्री चक्रमहामेरु पीठाधीश्‍वर श्री श्री दण्डीस्वामी सच्चिदानंद तीर्थ महास्वामी (श्री चक्रमहामेरू पीठम्), महामण्डलेश्‍वर आनंदधाम पीठाधीश्‍वर योगीराज स्वामी ज्ञानस्वरूपानंद अक्रियजी महाराज (संस्थापक-अध्यक्ष आनंदधाम, अलख ज्ञान गोरक्षा समिती, जोधपूर, राजस्थान) आणि सनातनचे पू. चत्तरसिंह बाबूलालसिंह इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व संत प्रदर्शनाचे कौतुक करतांना म्हणाले, आपण हे अद्भूत कार्य करत आहात या वेळी उपस्थित सर्व संतांचे भक्तगण, भाजपचे नयापारा-राजिमचे श्री. युधिष्ठीर चन्द्राकर आणि सनातन संस्थेचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे संकेतस्थळ हॅक

    भुसावळ (जिल्हा जळगाव) - मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. आतंकवादी संघटना अल्-कायदाने हे संकेतस्थळ हॅक केल्याचे ठोस पुरावे अद्याप नसल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. भुसावळ रेल्वेमंडळाच्या या संकेतस्थळावरील ११ पाने नष्ट करून त्यावर मुसलमानांना जिहादसाठी आवाहन करणारा संदेश लिहिण्यात आला होता. अल्-कायदाचा दक्षिण विभागाचा मौलाना असिम ऊमर याने हा संदेश दिला होता. २ मार्चला सकाळी ९.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. सायबरतज्ञ जळगाव येथे पोलीस मुख्यालयात तळ ठोकून आहेत. हे संकेतस्थळ हॅक झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचे अन्वेषण पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. हॅक झालेले संकेतस्थळ आणि अन्य संकेतस्थळ यांवरील लिखाण संकलित करण्याचे काम चालू आहे. हे संकेतस्थळ सिद्ध करतांना निष्काळजीपणा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अधिक अधिवक्ते झाल्याने भ्रष्टाचारात वाढ होते ! - सर्वोच्च न्यायालय

माननीय न्यायालयाने अशा भ्रष्ट अधिवक्त्यांवर कारवाई करून
न्यायपालिका भ्रष्टाचारमुक्त करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
      नवी देहली - अधिक अधिवक्ता झाल्याने भ्रष्टाचारात वाढ होते; कारण संधी मर्यादित आहे आणि प्रत्येकाला पोट भरायचे आहे. अशा वेळी प्रत्येक अधिवक्ता आपापल्या परीने काम करतो, मात्र अधिवक्ता असा असला पाहिजे की, त्याच्यात गुणवत्ता असावी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ऑल इंडिया बार कौन्सिलच्या परीक्षेला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी चालू असतांना न्यायालयाने ही विधाने केली.
१. या याचिकेत म्हटले आहे की, कायद्याची पदवी मिळवल्यानंतर अधिवक्त्यांची नोंदणी होते; मात्र पुढील दोन वर्षांत ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. जर या परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही, तर नोंदणी रहित केली जाते.
२. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, प्रत्येक वर्षी ६० सहस्र नवीन अधिवक्ते बनतात.

जोधपूरमध्ये गोवंशाचे अवशेष मिळाल्याने हिंदू संतप्त

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्यामुळेच राज्यात गोहत्या बंदी
कायदा असूनही गोवंशाचे तुकडे रस्त्यात फेकून देण्यात येतात, हे लक्षात घ्या !
      जयपूर - जोधपूरमध्ये १ मार्चच्या दुपारी दुचाकीवर येऊन काही अज्ञातांनी एका वासराचे शीर आणि पाय फेकून दिले. याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहचून संताप व्यक्त केला आणि घोषणा दिल्या. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या सूचनेवरून पोलिसांनी घटनास्थळी पोचून अवशेष जप्त केले. (भाजपचे राज्य असलेल्या राजस्थानमध्ये हिदूंना पवित्र गोवंशांचे अवशेष भर रस्त्यात फेकून देण्याचे धाडस कोणी करत असेल, तर शासनाने या संदर्भात अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे ! - संपादक)

द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजींचे आदर्श वागणे !

पू. गोळवलकर गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
१. शासनाला शह देण्याची क्षमता केवळ रा.स्व. संघात 
असल्याने तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी संघावर बंदी 
घालणे अन् नंतर संघाला अन्यायाने अपकीर्त करणे
     पंतप्रधान नेहरूंची सत्तापिपासा, सत्ता आणि शासन यांना शह (थ्रेट) देण्याची क्षमता केवळ रा.स्व. संघात होती. त्यामुळे भारत स्वतंत्र होताच पंतप्रधान नेहरूंनी रा.स्व. संघ चिरडण्याची उक्ती आणि कृती घोषित केली. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर नेहरूंनी रा.स्व. संघावर बंदी घालून त्याचे संघटन खिळखिळे केले. संघावरील बंदी उठवल्यानंतर झालेल्या प्रथम सार्वजनिक निवडणुकीत गांधी हत्येचे हत्यार वापरत रा.स्व. संघाला अन्यायाने अपकीर्त केले.
२. बंदी आणि नेहरूंनी सार्वत्रिक निवडणुकीत केलेली अपकीर्ती 
यांमुळे रा.स्व. संघावर कर्जाचा प्रचंड बोजा वाढणे
     म. गांधींच्या लास्ट विल अ‍ॅण्ड टेस्टामेंटला स्टॅलीनवादी जवाहरलाल नेहरूंनी पायदळी तुडवले आणि नष्ट केले. काँग्रेस विसर्जन आणि लोकसेवक संघाचे सृजन ही म. गांधींची अंतिम कृती होती. संघावरील बंदीमुळे रा.स्व. संघावर कर्जाचा प्रचंड बोजा झाला. त्यानंतर पं. नेहरूंनी वर्ष १९५२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संघावर चिखलफेक करून अपकीर्ती अभियान राबवले

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)


द्रोह कशास म्हणावे ?

     गेले काही दिवस देशद्रोही कोणाला म्हणावे आणि कोणाला म्हणू नये ?, घटनेतील देशद्रोहाचे कलम कोणत्या परिस्थितीत वापरले जाऊ शकते ?, द्रोह आहे कि नाही, हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे ? इथपासून देशद्रोहाचे कलम रहितच केले जावे का ?इथपर्यंत चर्चा झडत आहेत. नुकतेच जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये आतंकवादी अफजलच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करून भारताची दुर्दशा होईपर्यंत लढाई केली जाईल, असे फुत्कार सोडणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली. ही अटक होते ना होते तोच समाजवादी, पुरोगामी पिलावळ बाहेर पडत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे भेसूर राग आळवू लागली. त्याची परिणती पुढे राजकारण होण्यात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये खर्चून चालू असणारे संसदेचे अधिवेशनातील कामकाज काही काळ ठप्प होण्यात झाली.
धर्म अन् राष्ट्र यांच्या विरोधातील द्रोह अक्षम्यच !
     टीका करणे आणि द्रोह करणे, यात मूलभूत भेद आहे. एखाद्या धोरणाच्या, व्यक्तीच्या अथवा समूहाच्या विरोधात टीका करण्यामागे व्यापक जनहिताची भावना आणि संबंधित अयोग्य कृती रोखली जाण्यासंदर्भातील तळमळ असू शकते; किंबहुना ती असली, तरच तिला टीका म्हणता येईल, अन्यथा ते केवळ पूर्वग्रहातून अथवा द्वेषातून आलेले उमाळेच म्हणावे लागतील.

केवळ भ्रष्टाचार्‍यांना नव्हे, तर त्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सहआरोपी करून कठोर शासन करा !

     राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची केवळ मुंबईतील ११० कोटी रुपयांची मालमत्ता आर्थिक सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली. अर्थात भुजबळ यांची उघड झालेली मालमत्ता इतकी आहे; पण उघड न झालेली किती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! भुजबळ यांनी ही मालमत्ता एक-दोन महिन्यात मिळवलेली नाही, तर त्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली आहेत. म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणार्‍या शासकीय यंत्रणांमधील अधिकार्‍यांनी वर्षानुवर्षे चालणार्‍या या भ्रष्टाचाराकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. अशा प्रकरणांत केवळ भ्रष्टाचार करणार्‍यावर कारवाई न करता भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी. अर्थात ही कारवाई केवळ त्या अधिकार्‍याची पदोन्नती, निलंबन अशी तोंडदेखली न करता त्यांनाही सहआरोपी करून कठोर शासन करायला हवे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेविषयी प्रबोधन

     उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर १५ येथील सामुदायिक केंद्र सभागृहात ३१.१.२०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांच्या संप्रदायाच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करण्याची आवश्यकता या विषयावर एका भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमच्यापैकी मी (श्री. विनय पानवळकर यांनी) उपस्थितांना व्हॅलेंटाईन डे या कुप्रथेचे धोके सांगून धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास बापूजींचे १०० हून अधिक भक्त उपस्थित होते. - श्री. विनय पानवळकर आणि श्री सुरेश मुंजाल, देहली

अबला नको, रणरागिणी व्हा !

     सध्या प्रत्येक वृत्तपत्रात स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांच्या बातम्या प्रतिदिन वाचण्यास मिळतात. त्यातील काही गुन्हेगारांना लगेच शिक्षा होते, काहींना दोन वर्षांनी, तर काही जणांना अटक केली जाते; पण दुसर्‍या दिवशी त्यांची जामिनावर मुक्तता होते. ज्या देशामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ, ताराराणी अशा एक ना अनेक स्त्रिया होऊन गेल्या. ज्यांनी स्वतःचा प्राण गमावला; पण देह त्या नराधमांच्या हाती लागू दिला नाही. मग त्याच देशात आज स्त्रियांवर अशी वेळ का यावी ?

काँग्रेसी पुढार्‍यांनो, हिंदूंची गळचेपी करण्याची मनोवृत्ती सोडा, अन्यथा हिंदु धर्माभिमानी तुम्हाला जशास तसे उत्तर देतील !

श्री. विनायक आगवेकर
   मंदिरातून भाविकांना देण्यात येणारा प्रसाद कारागृहातील महिलांकडे करायला देण्यासंदर्भात एका दूरचित्रवाहिनीवर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चेत एका काँग्रेसी राजकारण्याने हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्याला तुम्ही मध्येच बोलता. हिंदु आहात, तर संयम पाळायला हवा, असे फटकारले. अशा प्रकारे हे काँग्रेसी पुढारी एकप्रकारे हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांवर दबाव आणून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. त्या प्रसंगी मनात पुढील विचारशृंखला चालू झाली, खरंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हिंदूंना संयम पाळायला शिकवण्याची आवश्यकता नाही.

गोव्यातील संरक्षणविषयक प्रदर्शनाला विरोध बुडत्या काँग्रेसला धर्मांध शक्तींचा आधार !

     गोव्यात २८ मार्च ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत संरक्षणविषयक प्रदर्शन (डिफेन्स एक्स्पो) भरत आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. मध्यंतरी आम आदमी पक्षानेही त्याला विरोध करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. देशाला अभिमान वाटावा, असे आंतरराष्ट्रीय संरक्षणविषयक प्रदर्शन गोव्यात होत असतांना या संधीचा पर्यटनाच्या दृष्टीने लाभ करून घेण्याऐवजी विरोध करण्याचा नतद्रष्टपणा का केला जात आहे, याचे विवेचन...

प.पू. डॉक्टर देत असलेल्या प्रसादाच्या संदर्भातील प्रसंगातून लक्षात आलेल्या स्वतःच्या चुका आणि प.पू. डॉक्टरांची महती !

श्री. सागर निंबाळकर
    २०.१०.२०१५ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी सनातन प्रभातमधील एक लेख आवडल्याविषयी मला खाऊ पाठवला होता. २२.१०.२०१५ या दिवशी पू. संदीप आळशी यांनी विभागातील साधिका कु. अंजली क्षीरसागर यांना खाऊ दिला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, प.पू. डॉक्टर तर प्रेमस्वरूप आहेत. ते प्रत्येक साधकावरच प्रेम करतात, त्यामुळे त्यांच्याकडून खाऊ मिळणे, हे त्यांचे प्रेम असते. माझ्यातील दोष घालवण्यासाठी प.पू. डॉक्टरच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने खाऊ देत असतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या अन्य साधकांच्या पाठी लागलेला पोलिसी चौकशीचा ससेमिरा !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे.

बालपणापासूनच श्रीकृष्णाशी बोलणारी कल्याण, ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. मृगा मकरंद जोशी (वय ४ वर्षे) !

चि. मृगा जोशी
    माघ कृष्ण पक्ष एकादशी (५.३.२०१६) या दिवशी कल्याण, ठाणे येथील चि. मृगा मकरंद जोशी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मृगाची आजी आणि आत्या यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. मृगा जोशी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. जन्म ते ६ मास
१ अ. जन्मतःच सर्वांशी जवळीक साधणे :
मृगाचा जन्म झाल्यावर तिला लगेच बालरोग तज्ञांकडे न्यावे लागले आणि तीन दिवस तेथेच ठेवावे लागले. तेव्हा बाळाने तेथील परिचारिका, आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि इतर सर्वांचे मन जिंकले. तिच्या तोंडवळ्यावर एक वेगळेच तेज जाणवत होते. ती सर्वांशी लवकर जवळीक साधते. तिच्यासमवेत वरील सर्व मंडळी (परिचारिका, परिचारक, आधुनिक वैद्य इत्यादी) खेळत असत. नंतर त्या सर्वांनी तिच्यासमवेत छायाचित्रेही काढली.

मोरपिसाशी साधिकेचे जडलेले आगळेवेगळे नाते !

सौ. मानसी राजंदेकर
  मला नेहमी नामजप करतांना किंवा मी जेव्हा जेव्हा प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघते, त्या वेळी मला त्यांच्या डोक्यावर मोरपीस डोलतांना दिसते. ते मोरपीस पुष्कळ आनंदी असते. त्याला बघण्यासाठी मला कधीच डोळे बंद करावे लागले नाही. त्या मोरपिसाचे अस्तित्व मला प.पू. डॉक्टरांच्या डोक्यावर नेहमी जाणवते. त्यानंतर साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मी एक मोरपीस विकत आणले. मी आणले, असे म्हणणेसुध्दा योग्य होणार नाही. मंडईत गेल्यानंतर मी या मोरपिसाच्या दुकानात कशी पोहोचले, हे मला कळले नाही. त्या दुकानदारानेसुद्धा ताई, तुम्हाला हे मोरपीस हवे होते ना ?, असे म्हणून मला ते मोरपीस दिले.

गुरुमाऊलीच्या भेटीसाठी तळमळणार्‍या एका साधिकेने आर्ततेने लिहिलेली प्रार्थनारूपी गद्य-पद्यरचना !

     भगवंता, मला घरी जावेसेेे वाटत नाही. भगवंता, आता तुम्ही सांगितले ना, आता ईश्‍वरेच्छा ! भगवंता, पण प्रारब्ध भोगण्याची शक्ती द्या. देवा, मी पुष्कळ खचून जाते.
गुरुराया, तूच कर्ता आणि करविता ।
शरण तुला भगवंता ॥ १ ॥
कन्या सासुराशी जाय ।
मागे परतूनी पाहे ॥
तैसे झाले माझ्या जिवा ।
कधी भेटसी केशवा ॥ २ ॥

भगवान श्रीकृष्णाने प.पू. डॉक्टरांची महती लक्षात आणून देणारे सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन

श्री. श्याम राजंदेकर
१. श्रीकृष्णाची मानसपूजा करतांना डोळ्यांपुढे श्रीकृष्ण
आसंदीवर बसलेला असून त्याच्या उजव्या हाताला प.पू. डॉक्टर आणि
डाव्या हाताला प.पू. भक्तराज महाराज विराजमान झालेले दिसणे
     २६.३.२०१५ या दिवशी पहाटे उठून नामजपाला आरंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाची मानसपूजा करावी; म्हणून डोळे मिटून प्रार्थनेला प्रारंभ केला. डोळे मिटताच मला स्पष्टपणे दिसले की, समोर आसंदीवर केवळ श्रीकृष्णच नव्हे, तर त्याच्या उजव्या हाताला प.पू. डॉक्टर आणि डाव्या हाताला प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आधीच विराजमान झाले आहेत. त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून त्यांच्यात काही संवाद चालू असावा, असे मला जाणवले.
२. सर्व स्वतःच करत असूनही कर्तेपण गुरूंना अर्पण करणारे शिष्यभावातील प.पू. डॉक्टर !
      काही क्षणात ध्यान लागताच मला श्रीकृष्णाचे शब्द स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. श्रीकृष्ण प.पू. बाबांकडे पाहून म्हणत होता, मलासुद्धा शिशुपालाचे १०० अपराध झाल्यावर क्रोध अनावर झाला होता; पण प.पू. डॉक्टर साधकांकडून एवढ्या अक्षम्य चुका होऊनही त्यांच्यावर प्रीतीच करतात. हे कसे काय ? यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, मी कुठे काय करतो ? ते सर्व बाबाच करतात. यावर बाबांनी सांगितलेे, मी आणि डॉक्टर वेगळे आहोत का ?
३. मीच प.पू. डॉक्टरांकडून ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे
उत्पत्ती, स्थिती अन् लय हे कार्य आदिशक्तीच्या आज्ञेवरून करवून घेत आहे !
     श्रीकृष्ण म्हणाला, पृथ्वीतलावर रज-तमाच्या लहरींचे साम्राज्य वाढले असून वाईट शक्तींचे प्राबल्य कार्यरत आहे. जिवांनी धर्माचरण सोडल्यामुळे भूकंप, महापूर आणि आतंकवाद यांत वाढ झाली असून धरणीमातेला आता भार झाला आहे. सर्वपक्षीय राज्य करणार्‍यांना धर्माचरणाचा गंध नसल्यामुळे लोक दिशाहीन झाले आहेत. अशा वेळी प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला असल्यामुळे मीच त्यांच्याकडून ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे उत्पत्ती, स्थिती अन् लय हे कार्य आदिशक्तीच्या आज्ञेवरून करवून घेत आहे. प्रत्येक युगात हे करावेच लागते.
४. संतांच्या रूपाने मीच कार्यरत असून ईश्‍वरी राज्याचा संकल्प निश्‍चितपणे फलद्रूप होणार आहे !
      श्रीकृष्ण पुढे म्हणाला, पृथ्वीवरील जिवांमध्ये धर्मबिजांचे रोपण करून जगातील ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असलेल्या प्रत्येक जिवाच्या उद्धारासाठी मार्गदर्शन करून प.पू. डॉक्टर साधकांची निर्मिती करीत आहेत. ते अष्टांगयोगानुसार साधना करवून घेत असल्यामुळे साधक शीघ्र गतीने प्रगती करत असून अनेक साधक संतपदी पोेचले आहेत. संतांच्या रूपाने मीच कार्यरत असून ईश्‍वरी राज्याचा संकल्प निश्‍चितपणे फलद्रूप होणार आहे. ईश्‍वरी राज्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या कृपेमुळेच उन्नत जीव पृथ्वीवर जन्म घेत आहेत.
५. प.पू. डॉक्टर सर्व साधकांचा भार स्वतःच वाहत असून
सूक्ष्मातील शक्तींचा विरोध स्वतःच निपटून काढत आहेत !
     श्रीकृष्ण म्हणाला, सध्या साधकांची साधनेची गती वाढल्यामुळे विरोधही वाढला आहे. योगक्षेमं वहाम्यहम् । या माझ्या उक्तीप्रमाणे प.पू. डॉक्टर सर्व साधकांचा भार स्वतःच वाहत आहेत. सूक्ष्मातील शक्तींचा विरोध ते स्वतःच निपटून काढत आहेत. ब्रह्मांडातील कुठल्याही सूक्ष्म विरोधाला सामोरे जाण्यासाठी ते एकटेच समर्थ आहेत.
६. प.पू. डॉक्टरांमधील प्रीतीचा परमोच्च बिंदू !
      यानंतर मला श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राच्या जागी सनातन प्रभात ही अक्षरे वेगाने फिरत असल्याचे दिसले. श्रीकृष्णाने पुढे सांगितले, प.पू. डॉक्टरांचा वेग काळाच्याही पलीकडे आहे. त्यामुळेच त्यांनी सनातन प्रभातची निर्मिती आधीच करून ठेवली आहे. सनातन प्रभातच्या धर्मतेजाने हिंदुद्वेष्ट्यांचे डोळे दिपतील. त्याच्या दुंदुंभीने त्यांचे कान ठार बहिरे होतील. त्यांच्या छातीत धडकी भरेल आणि ते आपोआप शरण येतील. हा प.पू. डॉक्टरांच्या प्रीती या गुणाचा परमोच्च बिंदू असेल.
७. प.पू. डॉक्टर अहोरात्र कष्ट घेत असल्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरच होणार आहे !
     श्रीकृष्णाने साधकांना संदेश देत म्हटले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याचे उदाहरण, म्हणजे प.पू. डॉक्टर आहेत. प.पू. डॉक्टर अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेला आता वेळ लागणार नाही. साधकांनी केवळ अष्टांग साधनेतील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया नियमित राबवून शरणागत भावाने माझी भक्ती वाढवावी.
हा संवाद ऐकून माझा भाव जागृत झाला आणि माझे अंग थरथरू लागले. कृतज्ञताभावाने माझे डोळे पाणावले.
८. प्रार्थना आणि कृतज्ञता
      हे श्रीकृष्णा, माझी पात्रता नसतांनाही तू मला एवढे सगळे अवगत केलेस. माझ्या परात्पर गुरूंची महती माझ्या लक्षात आणून दिलीस. यासाठी मी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
     हे श्रीकृष्णा, प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना तुझ्याशीच अनुसंधान ठेवून बोलायला का सांगितले, याचा उलगडाच तू करून दिलास. हे दयाघना, प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना आणि सेवा तूच आमच्याकडून करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो ॥
वरील अनुभूतीला अनुरूप लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये
वाचून स्वतःच्या अनुभूतीची पोचपावतीच मिळाल्याचा आनंद होणे
     वरील अनुभूती अनुभवायला मिळाल्यावर सकाळी २६.३.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील एका साधिकेचा लेख श्रीरामाप्रमाणेच विरोधकांवरही प्रीती करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर हा लेख वाचला आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझ्या अनुभूतीची पोचपावतीच मिळाल्याचा आनंद झाला.
- श्री. श्याम राजंदेकर, अकोला (२६.३.२०१५)

महाशिवरात्रीनिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत शिवमहिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ७ मार्च २०१६
पृष्ठ संख्या :
मूल्य : ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्चला दुपारी ३.३० वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या
देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात.
आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
गांधीवधाच्या वेळी ब्राह्मणांची घरे जाळणारे, आता आतंकवादी प्रतिदिन हिंदूंचीच नाही, तर नेत्यांचीही हत्याकांडे करत असतांना चूप बसतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
        परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

ब्रिगेडच्या महिलांचा अहंकार !

     भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या महिला महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याच्या ईर्षेने भारावून गेल्या आहेत. त्यांना केवळ देवाचे दर्शन नको, त्यांना गर्भगृहात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे आहे. असाच अट्टाहास त्यांनी २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूरच्या शनिदेवांच्या मंदिरातील चौथर्‍यावर चढून शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी धरला होता. अर्थहीन आग्रह, असे त्यांच्या त्या मोहिमेचे वर्णन तेव्हा करण्यात आले होते आणि त्यात त्यांना अपयशच आले होते. देवळातील परंपरा मोडण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता; पण लक्षावधी भाविकांच्या विरोधामुळे त्या यशस्वी होऊ शकल्या नव्हत्या. धार्मिक परंपरा मोडीत काढण्याचा आग्रह म्हणजे भाविकांच्या दृष्टीने पापच ! शनिशिंगणापूर प्रकरणातून काहीच धडा न घेतलेल्या या महिला त्यांची महत्त्वाकांक्षी मानसिकता दाखवत आहेत कि त्यांना कुणी राजकारणी पुढे करून मौज पहात आहेत कि त्यांचा हा प्रसिद्धी स्टंट आहे ? त्र्यंबकेश्‍वरचे शिवमंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

लोकराज्यातील न्यायालयांचे महत्त्व !

     गुजरात राज्याची राजधानी कर्णावती येथे २००४च्या चकमकीत ठार झालेली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी इशरतजहाँ, आतंकवादी असल्याच्या अटकळीवरून पोलिसांकडून ठार मारली गेली. ती आतंकवादी नव्हती, असा केंद्रातील तत्कालीन काँग्रेसींचा हेका असल्याने गुजरात राज्याच्या तत्कालीन भाजप शासनावर हत्येचा ठपका ठेवण्यात आला. आता मुंबईवरील २६/११च्या आक्रमणाविषयी माहिती पुरवणारा अमेरिकेच्या कारागृहात असलेला डेव्हीड हेडली याने इशरतजहाँ आतंकवादीच असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर परत तो विषय चर्चेत आला. सध्या तर तत्कालीन विविध पदांवरील निवृत्त अधिकार्‍यांनी उघड केलेल्या माहितीवरून आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी चालू आहे. खरं काय आणि खोटं काय ? काँग्रेसी नेत्यांनी इशरतजहाँचा लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेशी असलेला संबंध उघड होऊ दिला नाही, किंबहुना त्यासाठी हा पक्ष प्रयत्नशील होता, असे म्हटले जात आहे. काँग्रेसी दबावामुळे नोकरशहा हतबल झाला होता. अहवालात पालट करून तो दाखल करण्याची कुकृत्ये ज्या अधिकार्‍यांना करावी लागली, त्यांनी वस्तूस्थिती उघडपणे मांडण्यास आरंभ केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn