Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काही लोकांचे वय वाढते; पण समज नाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काढले राहुल गांधी 
यांच्या अज्ञानाचे आणि बालीशपणाचे वाभाडे !
     नवी देहली - २ मार्च या दिवशी लोकसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देतांना ३ मार्च या दिवशी मोदी यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या अज्ञानाचे आणि बालीशपणाचे वाभाडेच काढले. त्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीच म्हटलेल्या विधानाचे साहाय्य घेतले. मोदी म्हणाले, काही लोकांचे फक्त वय वाढते; परंतु समज वाढत नाही. काही गोष्टी सांगितल्या तरी लवकर समजत नाहीत. काही समजतात; पण खूप वेळ लागतो. काही खासदार हे संसदेत फक्त मनोरंजनासाठी येतात. संसदेत काय चालते हे अनेकांच्या उशिरा लक्षात येते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यादेश फाडून ज्येष्ठ खासदारांचा अपमान केला.
मोदी यांनी केलेल्या टीकेतील काही सूत्रे
१. राहुल गांधी यांनी टीका करतांना भाजप शासन राबवत असलेल्या अनेक योजनांचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचे म्हटले होते. त्याविषयी उपहासाने मोदी म्हणाले, काँग्रेस शासनाने शाळांमध्ये शौचालये बांधली नाहीत; म्हणून आम्ही ४ लाख शौचालये बांधू शकलो. बांगलादेश सीमावाद एवढ्या वर्षांत सोडवला नाही; म्हणून आम्ही तो सोडवू शकलो.

देहलीतील आप शासनाकडून कन्हैय्या कुमार आणि उमर खालिद निर्दोष घोषित !

     नवी देहली - जेएन्यूतील विद्यार्थी कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना देहलीतील अरविंद केजरीवाल यांच्या शासनाने देशद्रोहाच्या आरोपाच्या संदर्भात निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे देहली शासनातील उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ९ फेब्रुवारीला कन्हैया कुमार याने देशद्रोही घोषणा दिल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. कार्यक्रमाचा मुख्य आयोजक उमर खालिद याने यापूर्वीही काश्मीर आणि अफझल यांच्याविषयीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात त्याने जनता संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा दिल्या. अहवालात पुढे म्हटले आहे की, घोषणाबाजीच्या चित्रीकरणात विद्यापिठाबाहेरील काश्मिरी युवक चेहर्‍यावर कापड बांधून अफझलच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी घोषणा देत होते. त्यातील दोन युवक जेएन्यूमधील विद्यार्थी होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.
कन्हैया कुमार याची सुटका
     देहली उच्च न्यायालयाने २ मार्चला सशर्त अंतरिम जामीन संमत केल्याने ३ मार्च या दिवशी कन्हैया कुमार कारागृहातून बाहेर आला आहे

श्रीलंकेकडून ८ भारतीय मच्छीमारांना अटक

     रामेश्‍वरम् - श्रीलंकेच्या नौदलाने ८ भारतीय मच्छीमारांना आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. (अनेक वर्षे अशा घटना घडत असतांना भारतीय शासन गप्प का ? याविषयी काही उपाय योजना का करत नाहीत ? - संपादक) या मच्छीमारांच्या २ नावाही हस्तगत करण्यात आल्या आहेत. या मच्छीमारांना श्रीलंकेमधील कंगेसंथुराई येथे नेण्यात आले.

भारत माता की जय म्हणू नका, असे म्हणणार्‍यांची संख्या वाढली आहे ! - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

      नागपूर - जन्म देणार्‍या आईचा आणि मातृभूमीचा जयजयकार करणे, हे स्वाभाविकपणे यायला हवे. मातृशक्तीचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता खरेतर लागू नये; पण भारतातील नव्या पिढीला भारत माता की जय म्हणायला शिकवावे लागते; कारण तसे म्हणून नका, असे सांगणारे लोकही या देशात आहेत. त्यांची संख्या वाढली आहे, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ३ मार्च या दिवशी व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सरसंघचालकांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
     पुढे सरसंघचालक म्हणाले, वर्ष २०२० मध्ये भारत महाशक्ती होणार असल्याचे म्हटले जाते, त्यात गैर काहीच नाही; पण आज ज्या महाशक्ती आहेत, त्यांनी जगावर असे कोणते उपकार केले आहेत ? त्यांच्याकडे शक्तीशाली शस्त्रास्त्रे आहेत, त्यांच्या जोरावर ते जगाला दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने तशी महाशक्ती होऊ नये. भारताने जगाची माता होऊन प्रेम करणारी मातृशक्ती व्हायला हवे. तेव्हाच आपण महाशक्ती झालो, असे म्हणता येईल.

राष्ट्रनायकांच्या सूचीत मुसलमान नेता नसल्याच्या कारणावरून शासनावर खटला !

     मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनायकांच्या सूचीत एकाही मुसलमान नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते एस्. आरजू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. देशातील मान्यवर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याच्या संदर्भातील ३० नोव्हेंबरला काढलेल्या शासनाच्या परिपत्रकात २६ नेत्यांची सूची आहे. त्यावर आक्षेप घेत एम्.आय.एम्. पक्षानेने मागील हिवाळी अधिवेशनात ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
     राज्यशासन मुसलमानांशी पक्षपात करत आहे, तसेच अल्पसंख्यांकांच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करून इस्लामोफोबिया निर्माण करू पहात आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या सूचीत देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. झाकीर हुसेन, परमवीरचक्र विजेता अब्दुल हमीद आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांसह टीपू सुलतान आणि बहादूरशहा जफर यांचाही उल्लेख केला आहे. (एका दिवसात ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणारा, हिंदूंची मंदिरे पाडणारा क्रूरकर्मा टीपू सुलतान राष्ट्रनायक कसा काय होऊ शकतो ? - संपादक)

काश्मीरच्या पुलवामामध्ये ३ आतंकवादी ठार

      श्रीनगर - पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे ३ मार्चला सकाळी सुरक्षारक्षक आणि जिहादी आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत तीन आतंकवादी ठार झाले. आशिक हुसेन भट्ट, महंमद इसाक प्यारे आणि असिफ अहमद मीर अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. उधमपूर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर आक्रमण करणार्‍यांमध्ये भट्ट सहभागी होता. हे सर्व आतंकवादी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित होते. यांच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.


इशरतजहाँ चकमक पूर्वनियोजित असल्याचा विशेष अन्वेषण पथकाचे माजी प्रमुख सतीश वर्मा यांचा दावा

      नवी देहली - इशरतजहाँ चकमक पूर्वनियोजितच होती, असा दावा विशेष अन्वेषण पथकाचे माजी प्रमुख सतीश वर्मा यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे निवृत्त सहसचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी २ मार्च या दिवशी इशरतजहाँ चकमक प्रकरणात सतीश वर्मा यांनी त्यांना बलपूर्वक दुसर्‍यांदा प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले होते, असा आरोप केला होता. त्यावर वर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळतांना वरील दावा केला. इशरतजहाँ प्रकरणाच्या तपासासाठी गुजरात उच्च न्यायालयाने सतीश वर्मा यांची नेमणूक केली होती. वर्मा पुढे म्हणाले की, चकमकीच्या एक दिवसआधी इशरतजहाँ आणि अन्य तिघांना गुप्तचर विभागाकडून कह्यात घेण्यात आल्याची माहिती आमच्या अन्वेषणात पुढे आली होती. आतंकवादी असल्याचा आरोप असणार्‍या अन्य तिघांची इशरतजहाँ साथीदार आहे, अशी कोणतीही माहिती गुप्तचर खात्याने दिली नव्हती.


श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून भूमाता ब्रिगेडला हिंदुत्ववादी संघटना रोखणार ! - हिंदु जनजागृती समिती

     नाशिक - केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचा अट्टाहास करणार्‍या भूमाता ब्रिगेडी महिलांना ज्याप्रमाणे रोखण्यात आले, त्याचप्रमाणे ७ मार्च या महाशिवरात्रीच्या विशेष पर्वाच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची चेतावणी देणार्‍या भूमाता बिग्रेडी महिलांना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोखतील, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
     महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्‍वर येथे येतात. अशा वेळी ब्रिगेडी आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले, तर त्यांचे संपूर्ण दायित्व हे प्रशासनाचे असेल.

देशातील आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी विशेष कार्यकारी गट स्थापणार ! - केंद्रीय अन्वेषण विभाग

भ्रष्टाचार्‍यांवर वेळीच कठोर कारवाई केली असती, तर असे
विशेष गट स्थापन करण्याची आवश्यकता भासली नसती ! 
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     मुंबई - देशभरातील आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी, तसेच झालेल्या घोटाळ्यांच्या प्रभावी अन्वेषणासाठी आर्थिक संस्था आणि नियामक संस्था याच्याशी समन्वय साधून विशेष कार्यकारी गट स्थापन केला जाणार आहे, असे केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) संचालक अनिल सिन्हा यांनी सांगितले. देशभरातील आर्थिक घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी विविध बँका, विमा कंपन्या, आर्थिक संस्था, नियामक संस्था आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग म्हणून या सर्वांच्या प्रतिनिधींची ७ वी बैठक पार पडल्यानंतर सिन्हा पत्रकारांशी बोलत होते. सिन्हा पुढे म्हणाले, आर्थिक घोटाळे करणारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली अथवा कितीही धनाड्य असली, तरी ती कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. सर्व संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला कार्यकारी गट असून आर्थिक फसवणूक, मोठ्या रकमांची थकबाकी आणि ज्यामध्ये घोटाळा असू शकतो,

शेल्डन पोलॉक यांना मूर्ती ग्रंथालयातून काढून टाकण्याची मागणी !

जेएन्यूतील देशद्रोहाचे प्रकरण
१३२ वैज्ञानिक, विचारवंत आणि अभ्यासक यांनी संबंधित याचिकेवर केले हस्ताक्षर
     नवी देहली - मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाचे सल्लागार आणि संपादक शेल्डन पोलॉक यांनी जेएन्यू प्रकरणासंदर्भात राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करून भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा अनादर केला असल्याचे सांगत देशातील १३२ वैज्ञानिक, विचारवंत आणि अभ्यासक यांनी वरील ग्रंथालयाच्या पदावरून पोलॉक यांना काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. (राष्ट्राभिमानी असलेले सर्व १३२ वैज्ञानिक, विचारवंत आणि अभ्यासक यांचे अभिनंदन ! - संपादक)
     २६ फेब्रुवारी या दिवशी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर प्रविष्ट करण्यात आलेल्या ऑनलाईन याचिकेवर वरील प्रतिष्ठितांनी हस्ताक्षर केले. इन्फोसिस या प्रख्यात माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांचे पुत्र रोहन मूर्ती यांच्याकडे ही मागणी केली आहे.

आर्थिक मंदीचा फटका बसल्याने चीनच्या १८ लाख कामगारांवर घरी बसण्याची वेळ !

भारत अशा मंदीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे का ?
     बीजिंग - कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीनच्या शासनाने आखली आहे. चीन हा देश आर्थिक मंदीची झळ बसलेला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. चीनची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी घेतला आहे. याचाच भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे. चीनचे मनुष्यबळ आणि सामाजिक सुरक्षामंत्री सिन येमिन यांनी ही घोषणा केली; मात्र ही कर्मचारी कपात केव्हा करणार, हे त्यांनी घोषित केले नाही.

वाराणसी सिंधू खोरे संस्कृती म्हणजेच ६ सहस्र वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होती !

आय.आय.टी. खडगपूर संस्थेच्या संशोधनाचा निष्कर्ष
     कोलकाता - हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र वाराणसी सुमारे ६ सहस्र वर्षांआधीपासून म्हणजेच हडप्पा संस्कृतीशी संबंधित सिंधू खोरे संस्कृती पासून अस्तित्वात आहे. आय.आय.टी. खडगपूरने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस्) (जागतिक स्थिती यंत्रणा) या उपकरणाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
१. या प्रकल्पाला केंद्रशासनाच्या मानवी संसाधन विकास मंत्रालयाने २० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.
२. वरील निष्कर्षामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला नुकत्याच दिलेल्या भेटीत प्रकल्पाशी संबंधित प्राध्यापकांशी याविषयी चर्चा केली. या अभ्यासासाठी वाराणसीत १०० मीटर खोलीचे अनेक कूप खोदण्यात आले. त्यात जी.पी.एस्. यंत्रणेद्वारे उत्खनन प्रक्रियेचा अवलंब करून वाराणसी येथे किमान ख्रिस्तपूर्व २ सहस्र वर्षापूर्वी हिंदू संस्कृती अस्तित्वात होती, असे उघडकीस आले आहे.

सुपर ट्यूजडेला झालेल्या प्राथमिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन आघाडीवर !

अमेरिकी राष्ट्रपती पदाची निवडणूक
रिपब्लिकन पक्षाच्या चिंतेत वाढ !
     अमेरिका - १ मार्च या दिवशी झालेल्या सुपर ट्यूजडेच्या प्राथमिक निवडणुकीत (प्रायमरीमध्ये) डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांना चांगली आघाडी मिळाली आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या अमेरिकी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन ६ राज्यांत विजयी झाल्या, तर डेमोक्रॅट पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे ५ राज्यांत विजयी झाले आहेत. 
१. सुपर ट्यूजडे या एकाच दिवशी अमेरिकेतील अनेक राज्यांत प्राथमिक निवडणुका घेतल्या जातात. या वेळी १ मार्चला अमेरिकेतील १२ राज्यांत निवडणुका झाल्या.
२. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही विषयांवर टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील वरिष्ठांना पक्षाचे भवितव्य धोक्यात असल्याचे वाटते.
३. ट्रम्प यांनी मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, देशात असलेल्या १ कोटीपेक्षा अधिक स्थलांतरितांना अमेरिकेतून काढून टाकण्यात यावे आणि अमेरिकेच्या दक्षिणेत असलेल्या मेक्सिकोसमवेतच्या सीमेवर भिंत उभारणे यांसारख्या टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत. 
४. राष्ट्रपती पदाची अंतिम निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होणार आहे.

देशातील अर्ध्याहून अधिक कुटुंबांमध्ये २ पेक्षाही अल्प मुले !

देशात विशिष्ट धर्मामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत असतांना अल्प मुलांची कुटुंबे ही हिंदूंचीच 
अधिक असण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या आणि देशात समान नागरी कायद्याचा आग्रह धरा !
    नवी देहली - देशातील अर्ध्याहून अधिक कुटुंबात दोन हून अल्प मुले आहेत, असे वर्ष २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून समोर आले आहे. (ही आकडेवारी देशातील सर्वधर्मीय लोकसंख्येची आहे. यात हिंदूंना असलेल्या मुलांचे प्रमाण किती अल्प असेल, याचा विचार न केलेला बरा ! - संपादक)
१. या आकडेवारीनुसार ५४ टक्के विवाहित महिलांना दोन किंवा त्याहून अल्प मुले आहेत. 
२. वर्ष २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार त्यावेळी ४६.६ टक्के मातांना दोन किंवा त्याहून अल्प मुले होती.
३. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार देशात ३४ विवाहित महिला असून त्यांना ९२ कोटी मुले आहेत.

१० वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यात १०८ नक्कल (कॉपी) केल्याची प्रकरणे उघडकीस

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचे (कु)फलित !
      पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्चपासून १० वीची परीक्षा चालू झाली; परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषा विषयाच्या पेपरला राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना कॉपी करतांना पकडले. यामध्ये संभाजीनगर विभागात सर्वाधिक ६२ विद्यार्थ्यांवर परीक्षेत अपप्रकार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, असे राज्य मंडळाने सांगितले आहे.
     नगर जिल्ह्यातील एका तालुक्याच्या एका परीक्षाकेंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचे पडताळणी पथक येत असल्याचे पाहून परीक्षा केंद्राबाहेर असणार्‍या मुलांनी पत्र्यावर दगड मारून कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना खुणावले. शिक्षणाधिकारी परीक्षा केंद्राच्या आत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉपीच्या चिठ्ठ्या बाहेर फेकल्या. त्यामुळे पथकाला या ठिकाणी कॉपी करतांना विद्यार्थी आढळले नाहीत. (असे निरीक्षणशून्य पडताळणी पथक काय कामाचे ? - संपादक) पथक गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी टाकलेल्या चिठ्ठ्या गोळा केल्या.

मराठवाडा विद्यापिठाकडून एकाच दिवशी दोन विषयांची परीक्षा

मराठवाडा विद्यापिठाचा अजब कारभार !
      संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने मार्च आणि एप्रिल २०१६ मध्ये घेण्यात येणार्‍या पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच घोषित केले. त्यात एकाच दिवशी सलग ३ घंट्यांमध्ये २ विषयांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांची हानी होईल. त्यामुळे किमान एका दिवशी एकाच विषयाची परीक्षा घेण्यात यावी. त्याप्रमाणे वेळापत्रकात पालट करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे चेतावणीपर निवेदन धाराशिव युवा सेनेचे तालुका सचिव संजय भोरे यांनी कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांच्याकडे दिले.
     मागील परीक्षेच्या वेळीही अशा प्रकारे परीक्षा घेत विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला होता. तेव्हाही धाराशिव युवासेनेच्या वतीने विद्यापिठाच्या धाराशिव उपकेंद्रात आंदोलन करण्यात आले होते.

इसिसचा वाढता आतंकवाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय ! - मिलींद धर्माधिकारी

  • पंढरपूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र हिंदूंची उपस्थिती
  • वादळी वारा आणि पाऊस यांनंतरही पंढरपुरातील सभा धर्माभिमान्यांनी केली यशस्वी !
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३ मार्च (वार्ता.)  अफझलखानाचा कोथळा काढून आतंकवाद कसा संपवायचा हा आदर्श छत्रपतींनी घालून दिला आहे. तोच आदर्श समोर ठेवून इसिसचा वाढता आतंकवाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच त्यावरील एकमेव उपाय असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलींद धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. येथील टिळक स्मारक मैदानावर आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे साधक श्री. दैवेश रेडकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह पाऊस येत असतांनाही उपस्थित धर्माभिमान्यांच्या धर्मप्रेमापोटी आणि वक्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वरित सभा जवळच्या सभागृहात घेऊन यशस्वी केली.

महंमद पैगंबरांचा अवमान केल्यावरून बंगालच्या बीरभूममध्ये ३ सहस्र धर्मांधांकडून हिंसाचार !

पोलीस ठाण्यावर आक्रमण वाहनांची तोडफोड
     ममता बॅनर्जी यांच्या राज्यात धर्मांधांना मोकळीक देण्यात आली असल्याने ते सातत्याने हिंसाचार करत आहेत. यावर केंद्रशासनाने नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! देवतांचा अवमान झाल्यावर हिंदू निष्क्रीय रहातात किंवा शासनाला कारवाई करण्यासाठी निवेदने देतात, तर मुसलमान कायदा हातात घेतात !
     बीरभूम (बंगाल) - २ मार्च या दिवशी इल्मबाजारातील गरिचा गावात रहाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी सुजान मुखर्जी याने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारी पोस्ट फेसबूकवर टाकल्यावरून धर्मांधांंनी येथे हिंसाचार केला. 
१. मुखर्जी याने पोस्ट टाकल्यावरून त्याचा विरोध होऊ लागला. त्यामुळे मुखर्जी घरातून पळून गेला; मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

सांगली न्यायालय इमारतीसाठी तरतूद करा ! - उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश

      सांगली - विजयनगर येथील न्यायालयाच्या इमारतीसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिले आहेत. सांगली वकील संघटनेच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे.
     सांगली, मिरज येथील सर्व न्यायालये एकाच छताखाली चालू व्हावीत यांसाठी विजयनगर येथे इमारत संमत करण्यात आली आहे. यात ए आणि बी वींग अशा दोन इमारती आहेत. २३ कोटी रुपये खर्च करून ए वींग तयार असून बी वींगसाठी शासनाकडे निधी नसल्याने शासनाने ही इमारत रहित केली आहे. शासनाच्या या निर्णयाच्याविरुद्ध वकील संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निधी नसल्याच्या कारणावरून इमारत रहित करता येणार नाही. तसे केले तर तो न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल, असे न्यायाधिशांनी सांगितले आहे.


अबकारी कर वाढीच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात सराफांचा बंद दुसर्‍या दिवशी चालूच

कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प !
      सांगली - सुवर्ण व्यावसायिकांसाठी अबकारी करात एक टक्का वाढ केल्याच्या निषेधार्थ सोने-चांदी व्यावसायिकांनी २ आणि ३ मार्च या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. व्यावसायिकांनी २ मार्चला सकाळी फेरी काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या अगोदरच शासनाने दोन लक्ष रुपयांच्या सोने विक्रीवर कर लावला आहे, त्यात या कराची वाढ झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे सुवर्णकार असोसिएशनच्या निर्णयानुसार आज जिल्ह्यात सर्वत्र बंदची हाक देण्यात आली होती. बंदमुळे नेहमी गजबजाट असणारा सराफ कट्टा शांत होता, तसेच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शासनाने निर्णय मागे न घेतल्यास दुकाने बेमुदत बंद ठेवण्याची चेतावणी सुवर्णकारांनी दिली आहे.


श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या माघ-मास गोदा जन्मोत्सवाचा समारोप

      नाशिक - श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या माघ-मास गोदा जन्मोत्सवाचा समारोप शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभाने पार पडला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाहक श्री. रमेश दत्तात्रय गायधनी आणि सौ. सुमित्रा रमेश गायधनी हे होते. त्यांच्या हस्ते गोदावरी मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. संस्थेचे सरचिटणिस श्री. हेमंतभाई तळजिया यांनी संस्थेचा परिचय करून दिला, तर संस्थेच्या महोत्सवाचा अहवाल महोत्सव अध्यक्ष गौरव पंचभैये यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. सदानंद देव यांनी करून दिला. संस्था अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. तसेच या वर्षीच्या महोत्सव यज्ञ-यजमान गुड्डी केटरर्सचे श्री. राजूभाई व्यास यांचा सत्कार श्री. रमेश गायधनी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्याकडून फेसबूकवर कालीमातेचा अनादर !

कालीमातेचा अनादर होऊन त्याचा वैध मार्गानेही विरोध न करणारे हिंदू सहिष्णु कि षंढ ?
कालीमातेच्या रूपात मायावती यांना दाखवून तिच्या पायाखाली मोदी, एका हातात 
स्मृती इराणी यांचे शिर, तर शेजारी मोहन भागवत !
       लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशातील बहुजन समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्याच्या फेसबूक वरील पानावर मायावती यांना कालीमातेच्या रूपात दाखवलेले चित्र पोस्ट केले आहे. यात मायावतींच्या पायाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, एका हातात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांचे शिर, तर शेजारी संघाच्या गणवेशात सरसंघचालक मोहन भागवत उभे असल्याचे दर्शवण्यात आले आहे. तसेच चित्राच्या वर हिंदीत भाजपाइयो होशियार, नहीं चलेगा झूठ, बेईमानी का व्यापार, बहन जी हैं तैयार, अबकी बार बसपा सरकार, असे लिहिण्यात आले आहे. या चित्रामुळे वाद निर्माण झाला आहे; मात्र या घटनेनंतर कोठेही तक्रार नोंदवल्याचे किंवा हिंसाचार झाल्याचे वृत्त नाही. (हेच अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर एव्हाना उत्तरप्रदेशमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असती. - संपादक)

विदेशी डॉलर देऊन फसवणार्‍या धर्मांधांना अटक

अशा धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई केल्याविना 
फसवणुकीच्या घटना थांबणार नाहीत !
     नवी मुंबई - अल्प किमतीत मोठ्या प्रमाणात विदेशी डॉलर देण्याच्या आश्‍वासनाने लोकांची फसवणूक करणारे धर्मांध जमाल शमीम खान, इब्राहिम मेहबूब मंडळ, जहरुल अनारुल तरफदास यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. त्यांनी एका व्यक्तीला विदेशी डॉलर देणार असल्याचे खोटे सांगून २ लाख रुपयांना फसवले. याविरोधात गुन्हा प्रविष्ट झाल्यावर पोलिसांनी या सर्वांना अटक केली.
     या आरोपींकडून पोलिसांनी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे डॉलर या चलनातील २० डॉलर दराच्या ९ नोटा, सौदी अरेबिया देशाकडील रियाल या चलनातील १०० रियाल दराच्या ४ नोटा आणि फसवणूक केलेली १ लाख रुपयांची रक्कम कह्यात घेतली आहे.

ओंकारेश्‍वर मंडळ, आझाद गल्लीच्या वतीने चुनाभट्टी येथे जेएन्यूच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम !

स्वाक्षरी मोहिमेत सहभागी कार्यकर्ते
      मुंबई - चुनाभट्टी येथील आझाद गल्ली ओंकारेश्‍वर मंडळाच्या धर्माभिमानी कार्यकर्त्यांनी चुनाभट्टी रेल्वेस्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी जेएन्यूमध्ये घडलेल्या राष्ट्रद्रोही घटनेच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेला चुनाभट्टीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी ओंकारेश्‍वर मंडळाचे सर्वश्री श्रीराम यादव, राकेश पाल, नितीन दुबे, राजेश पाल, सचिन पाल, अशोक तिवारी, पंकज यादव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय सरगर हे उपस्थित होते. एक घंट्याच्या या स्वाक्षरी मोहिमेमध्ये तीनशेहून अधिक स्वाक्षर्‍या मिळाल्या. जेएन्यूतील राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सदर स्वाक्षर्‍या आणि निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे.


कुख्यात गुंड अरुण गवळी याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडून फर्लो रजा संमत !

आधी संजय दत्त, आता अरुण गवळी यांना सहजतेने रजा मिळते,
मग अटकेतील संशयित हिंदुत्ववाद्यांना का नाही ?
     नागपूर - येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरुण गवळी याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फर्लो रजा संमत केली आहेे; मात्र रजेचे कारण कळू शकलेले नाही. तो लवकरच मुंबईत परतणार आहे. मुंबईतील घाटकोपरचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणात दोषी आढळलेल्या गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी मुलाच्या लग्नासाठी त्याला फर्लो रजा संमत करण्यात आली होती.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ९२ गायींची कत्तलीपासून सुटका

पाच टन गोमांस कह्यात
    मिरज, ३ मार्च (वार्ता.) - मिरज शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेपारी गल्ली येथे गायींची कत्तल होणार असल्याची माहिती समस्त हिंदु आघाडीच्या गोरक्षण विभागाचे प्रमुख श्री. शिवशंकर स्वामी यांना मिळाली. श्री. स्वामी यांनी पशुसंवर्धन आयुक्त श्री. भोसले, भाजप गोविकास आघाडीचे श्री. अशोक जैन यांच्याशी संपर्क साधला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी रात्री १ वाजता कारवाई करत वरील ठिकाणी धाड टाकून ९२ गायी, ६ रेडकू आणि ५ टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी मोसीन बेपारी आणि मोईद्दिन बेपारी यांना अटक केली आहे. (कत्तलीपासून गायींना वाचवणार्‍या समस्त हिंदु आघाडीच्या श्री. शिवशंकर स्वामी यांचे अभिनंदन ! इतक्या मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गोधन सापडते यावरून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता स्पष्ट होते ! - संपादक)

लग्न, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन पुढे ढकला !

लोकहो, पाणीटंचाईचे भीषण वास्तव लक्षात घेऊन येत्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधना करा !
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सल्ला
      मुंबई - दुष्काळग्रस्त भागात पाण्याचा अपव्यव टाळायचा असेल, तर लग्न, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन पुढे ढकला, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला दिला आहे. मराठवाड्यात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा आणि त्यावरील व्यय यांची माहिती शासनाने न्यायालयाला दिली. तो व्यय पहाता टँकरऐवजी रेल्वेने पाणीपुरवठा करा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. धाराशीव, लातूर, बीड येथे पाण्याअभावी शस्त्रकर्म थांबू देऊ नका, असेही न्यायालयाने बजावले आहे.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील गोल मंदिरात दुसर्‍यांदा चोरी

महाराष्ट्रातील असुरक्षित मंदिरे !
     चोपडा (जिल्हा जळगाव) - शहारातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोल मंदिरातील दानपेटीचे टाळे तोडून चोरट्यांनी त्यातील पैसे चोरले, तसेच पितळी नागाची मोडतोड केली. महिन्याभरात दुसर्‍यांदा या मंदिराची दानपेटी फोडली गेली आहे. मागच्या चोरीचा तपास अद्याप लागला नसतांना ही दुसरी चोरी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर चोपडा शहराला सक्षम अधिकारी द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चोरांना तात्काळ अटक करून मंदिरात सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची मागणी करणारे नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे पत्र स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

      मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी ६ गटांतील ५० स्पर्धकांना पारितोषिके प्राप्त झाली. १ सहस्र १५१ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. श्री. विज्ञानेश मासावकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलांच्या कल्पनाशक्तीला, तसेच सर्जनशीलतेला वाव मिळावा, तसेच क्रांतीकारकांचे कार्य आणि त्याग यांच्या जाणिवेने स्पर्धकांमध्ये राष्ट्रभक्ती वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री. मासावकर यांनी सांगितले.

राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना सोडण्याची तमिळनाडू शासनाची सिद्धता

काँग्रेसची नाराजी
     चेन्नई - राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी संथान, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन् हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या सातही मारेकर्‍यांनी २४ वर्षाहून अधिक काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे, त्यामुळे त्यांना सोडण्याचा विचार तमिळनाडूचे जयललिता शासन करत आहे. तमिळनाडू शासनाने याप्रकरणी केंद्र शासनाचे मत मागितले आहे. तमिळनाडू शासनाच्या या निर्णयावर काँग्रेसने नाराजी नोंदवली आहे. याप्रकरणी केंद्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
     राजीव गांधी यांचे मारेकरी मुरुगन, संथान आणि अरिवू यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर तमिळनाडू शासनाने या तिघांची सुटका करण्याचा निर्णय घेतला;

मुंबई येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

१. जेएन्यू प्रकरणात देशद्रोही विद्यार्थी, त्यांचे समर्थक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
२. आग्रा येथील विश्‍व हिंदु परिषदेचे नेते, तसेच केरळचे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक
श्री. सुजीत यांच्या हत्येचा निषेध आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जावी यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन
स्थळ - कैफे गार्डन समोर, जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर, जोगेश्‍वरी (पूर्व), मुंबई ६०
दिनांक - ५ मार्च २०१६ सायं. ५.३० वा.
संपर्क क्रमांक - ९९२०२०८९५८
     हिंदूंनो, मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा !

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर प्रकरणी शासनाची भूमिका न्यायालयासमोरच !

    नगर, ३ मार्च - श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट आहे. या जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये शासनाने या प्रश्‍नासंबंधीची भूमिका मांडली असून त्यावर न्यायालयच निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दिली. भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २ मार्च या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील माहिती दिली. या वेळी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तातडीने श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी निर्णय घेण्याची विनंती केली.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथील रेणुकामाता मंदिर आणि खंडोबा मंदिर प्रशासनाने मध्यरात्रीत पाडले !

    सातारा, ३ मार्च (वार्ता.) - अतिक्रमणामध्ये मंदिरे असल्याचे कारण पुढे करत मध्यरात्री ३ वाजता माणच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तहसील विभाग, सार्वाजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला असलेले रेणुकामाता मंदिर आणि खंडोबा मंदिर प्रशासनाने मध्यरात्रीत पाडल्याची धक्कादायक घटना घडली. याचे तीव्र पडसाद म्हसवडसह संपूर्ण जिल्ह्यात उमटले.
    रेणुकामातेचे मंदिर हे अनधिकृत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. हे मंदिर प्रशासनाचे कर्मचारी पाडत असतांना तेथील जोगत्यांनी आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला. येथे काहीवेळ धक्काबुक्की झाली. या वेळी उपस्थित नायब तहसीलदार श्री. बाळासाहेब शिरसट यांना हणमंत दौंडे यांनी धक्काबुक्की केल्याने त्यांच्या मांडीचा अस्थीभंग झाला.

पुण्यामध्ये अवैध फ्लेक्स फलकाच्या प्रकरणी पालिका प्रशासनाकडून कारवाई करत असल्याचे निव्वळ नाटक

नव्या महापौरांच्या अभिनंदनाच्या एकाही फ्लेक्सवर प्रशासनाकडून कारवाई नाही !
    पुणे, ३ मार्च - अवैध फ्लेक्सच्या प्रकरणी माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. या घटनेमुळे अवैध फलक उभारण्याच्या घटनांना आळा बसण्याची आशा होती. अवैध फ्लेक्सच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जेमतेम काही दिवस कारवाईचे नाटक केलेल्या पुणे महानगरपालिका प्रशासनाने नवनियुक्त महापौर प्रशांत जगताप यांच्या अभिनंदनाच्या एकाही फ्लेक्सवर कारवाईचे धाडस दाखवलेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन या न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. (उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन सर्वसामान्यांच्या पत्रांकडे किती लक्ष देत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज देशाला आवश्यकता ! - अधिवक्ता गोविंद गांधी

    सातारा, ३ मार्च (वार्ता.) - सध्या भारत देश सहिष्णुता आणि असहिष्णुता, राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही या विचारांच्या गोंधळात सापडला आहे. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रोद्धारासाठीचे जाज्ज्वल्य विचारच देशाला योग्य दिशा देऊ शकतात. त्यामुळे आज संपूर्ण हिंदुस्थानला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे, असे गौरोवोद्गार महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांनी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पणदिनी अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या शाहूपुरी येथील निवासस्थानी आदरांजली वाहतांना ते बोलत होते.
    या वेळी हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, मुकुंद उरणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, अधिवक्ता सतीश खानविलकर, सर्वश्री धनराज जगताप, विनायक पतंगे, राजेंद्र मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. सोनावणे यांचेही भाषण झाले.

उपप्रादेशिक परिवहनाकडून १० मासांत १ सहस्र ९४१ वाहनांवर कारवाई

     जळगाव - उपप्रादेशिक परिवहन अर्थात आर्टीओच्या वतीने गेल्या १० मासांत १ सहस्र ९४१ वाहनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर ७ सहस्र ७०८ वाहनांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कारणाने वाहनाची नोंदणी, परमीट आणि लायसन्स निलंबित केले आहेत. यात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांचा समावेश आहे. एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ या १० मासांत राबवण्यात आलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २ कोटी ४२ लाख रुपयांचा दंड, तर २ कोटी ४१ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.

परीक्षेच्या काळात संगीतरजनीला अनुमती नको ! - गोव्यातील मोरजी येथील विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला या गोष्टी स्वतःहूनच का लक्षात येत नाहीत ?
     पेडणे - गावडेवाडा, मोरजी येथील तीन रेस्टॉरंटमधून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस कर्णकर्कश आवाजात संगीतरजनींचे आयोजन केले जाते. परीक्षेच्या काळात अशा पार्टीला अनुमती देऊ नये, अशी मागणी करणारे लेखी निवेदन गावडेवाडा, मोरजी येथील महिला आणि विद्यार्थी यांनी पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड आणि पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड यांची भेट घेऊन दिले.
     उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी या वेळी सांगितले की, उपरोल्लेखित तीनही रेस्टॉरंटना आजपर्यंत एकदाही संगीतरजनीसाठी अनुमती दिलेली नाही. २१ फेब्रुवारी या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत गावडेवाडा येथे एका संगीतरजनीसाठी अनुमती दिलेली आहे. ती शेवटची आहे. परीक्षेच्या काळात संगीतरजनीला अनुमती दिली जाणार नाही. विनाअनुमती संगीतरजनीचे आयोजन होत असेल, तर ते रोखण्यासाठी किनारपट्टीवर २४ घंटे पहारा ठेवण्यात येईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-

औंध (पुणे) येथील लष्करी केंद्रामध्ये १७ देशांतील सैनिकांच्या संयुक्त युद्धाभ्यासाला आरंभ

      पुणे, ३ मार्च - येथील औंध लष्करी केंद्रामध्ये सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासाला (एक्जरसायिज फोर्स एटीन) २ मार्च या दिवसापासून आरंभ झाला. यामध्ये एकूण १७ देशांच्या सैनिकांनी सहभाग घेतला आहे. औंधचे लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांच्या उपस्थितीत या सरावाचे उद्घाटन झाले. विनाकारण ओढावणारे युद्धाचे प्रसंग टाळणे आणि शांतीचा संदेश देणे यांसाठी संरक्षण खात्याच्या वतीने या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. (संपूर्ण जग आतंकवादाच्या सावटाखाली असतांना शांतीच्या संदेशापेक्षा सध्या आक्रमण हाच रक्षणाचा मार्ग आहे, याचा संदेश देणे आवश्यक आहे. - संपादक) हा युद्धाभ्यास २ ते ८ मार्च या कालावधीत चालू रहाणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपाईन्स, रशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड, अमेरिका, व्हिएतनाम, ब्रुनेई, लाओस, तैवान या १७ देशांच्या सैनिकांचा यात समावेश आहे. 
     या ७ दिवसांच्या युद्धाभ्यासात विविध प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण जवानांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत बचाव मोहिमा कशा प्रकारे राबवाव्यात, याचेही प्रशिक्षण या सरावात देण्यात येणार आहे.

फलक प्रसिद्धीकरता

ममताच्या बंगालमध्ये कायदा शिल्लक आहे का !
     बंगालमधील इल्मबाजारातील गरिचा गावात सुजान मुखर्जी या विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारी पोस्ट फेसबूकवर टाकल्यावरून ३ सहस्र धर्मांधांंनी सुजानचे घर, पोलीस ठाणे यांच्यावर आक्रमण केले, तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal ke Birbhum me Preshit ke kathit anadar par 3 sahastra kattarpanthiyone ki hinsa !
Hinduopar aag ugalnewali media ab chup kyo ?
 
जागो ! : बंगाल के बीरभूम में प्रेषित के कथित अनादर पर ३ सहस्र कट्टरपंथियोंने की हिंसा !
हिंदूंआेंपर आग उगलनेवाली मीडिया अब चूप क्यो ?


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमासासाठी रविवारी वढुबुद्रुक येथून ज्वाला येणार !

    सांगली, ३ मार्च (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाची आठवण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास पाळण्यात येतो. या मासाच्या शेवटी संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो. या चितेसाठी प्रतीवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढुबुद्रुक येथील समाधीपासून ज्वाला आणण्यात येते. ही ज्वाला यंदा रविवार, ६ मार्च या दिवशी सांगलीत दाखल होत आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता सांगलीवाडी येथे या ज्वालेचे आगमन होईल, तरी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

संभाजीनगरमध्ये १२ वीच्या परीक्षेच्या वेळी कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम बारगळला !

विभागीय मंडळामध्ये २०९ प्रकरणे उघडकीस
कॉपी करण्यासारखे प्रकार होऊच नयेत, यासाठी शिक्षण मंडळाने कठोर
शासनाचा अवलंब करायला हवा, तरच त्याला काही प्रमाणात आळा बसेल !
    संभाजीनगर, ३ मार्च - संभाजीनगरमध्ये १२ वीच्या परीक्षेच्या वेळी कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम बारगळला असल्याचे समोर आले आहे. (यावरून शिक्षण मंडळाने सदर उपक्रम राबवण्यासाठी केलेल्या उपाययोजना तकलादू ठरल्या आहेत ! - संपादक) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागीय मंडळामध्ये २ मार्चपर्यंत २०९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. २०१५ मध्ये येथे १०८ कॉपीची प्रकरणे उघडकीला आली होती. (कॉपी करण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ होणे, याचा अर्थ विद्यार्थ्यांना कायदा आणि दंड यांचे भय वाटत नाही, असे वाटल्यास नवल ते काय ? याविषयी शिक्षण विभाग तत्काळ उपाययोजना शोधेल का ? - संपादक)
    संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे आहेत. त्यातील हिंगोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम हा केवळ नावापुरताच आहे. आतापर्यंत कॉपी करण्याची जी प्रकरणे आढळली आहेत, त्यातील सर्वाधिक ११९ प्रकरणे संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत.

कॉपी करण्यास चालना देणारी शाळा आणि महाविद्यालये यांचा काळ्या सूचीत समावेश करणार

    बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवली जात नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केवळ शाळा आणि महाविद्यालये यांचा काळ्या  सूचीत समावेश करून उपयोग नाही, तर ही समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याला पर्याय नाही !
    संभाजीनगर, ३ मार्च - इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये कॉपी केल्याची ६८ प्रकरणे घडली. यांतील ५९ प्रकरणे संभाजीनगर जिल्ह्यातील होती. शहरातील काही केंद्रांसह बोकुड जळगाव, गेवराई तांडा, राजूर, कोलते टाकळी येथील केंद्रांवर अपप्रकार आढळून आले. त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी असे अपप्रकार आढळले, त्यांची नावे काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहेत. त्यांचे परीक्षा केंद्रही रहित करण्यात येणार आहे.

गोव्यात कनिष्ठ कारकूनाने केला २८ लक्ष रुपयांचा घोटाळा

कनिष्ठ स्तरावरील कारकून एवढा मोठा भ्रष्टाचार करत असेल, तर आपली 
व्यवस्था भ्रष्टाचाराने किती पोखरलेली आहे, हेच लक्षात येते ! 
     म्हापसा - पाच बोगस कर्मचार्‍यांची खाती उघडून वीज खात्याच्या म्हापसा कार्यालय विभाग १७ मधील कनिष्ठ कारकून विनोद वसंत मयेकर यांनी २८ लक्ष रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. लेखा संचालनालयाने हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
    प्राप्त माहितीनुसार म्हापसा वीज कार्यालयाच्या विभाग १७ मधून लेखा संचालनालयाकडे फेब्रुवारी मासासाठी कर्मचार्‍यांच्या वेतनाची देयके पाठवण्यात आली. या देयकांमध्ये पाच बनावट कर्मचार्‍यांच्या देयकांचा समावेश असल्याचा प्रकार लेखा संचालनालयाच्या निदर्शनास आला. या बोगस देयकांचे वेतन ज्या अधिकोषांमध्ये जमा झाले, त्या अधिकोषाचा तपशील तपासला असता कर्मचार्‍यांची वेतन देयके बनवणारा कनिष्ठ कारकून विनोद वसंत मयेकर यांच्या नावाने ही खाती असल्याचे उघड झाले. लेखा संचालनालयाकडून कनिष्ठ कारकून विनोद मयेकर यांनी पाच बोगस कर्मचार्‍यांची नावे तयार करून वेतनाचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा केले. हा प्रकार एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१६ या काळात घडला आहे.

गोव्यात धिरयोवरील बंदी कायम, बंदी मोडणार्‍यांवर कारवाई करणार ! - गोवा शासन

      पणजी - राज्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धिरयो (बैलांची झुंज) खेळावर बंदी आहे. हा बंदी आदेश मोडणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी गोवा शासनाने दिली आहे. शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील भाजप शासनाचा अलीकडेच धिरयोला कायद्याच्या चौकटीत राहून मान्यता देता येते का ?, याअनुषंगाने विचार चालू होता. त्यामुळेच या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्रसिद्ध केलेल्या उपरोल्लेखित प्रसिद्धीपत्रकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

तंत्रज्ञान कौशल्याबरोबर नैतिक मूल्यांचे शिक्षण मुलांना मिळायला हवे ! - डॉ. अनिल काकोडकर

      पणजी, ३ मार्च (वार्ता.) - तंत्रज्ञानाची निर्मिती करणारा देशच जगावर वर्चस्व गाजवू शकतो. भारत पहिल्या क्रमांकाचा देश व्हायचा असेल, तर नवीन तंत्रज्ञान निर्मितीत देश सर्वांत पुढे असला पाहिजे. तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून पुढे सरसावतांना आपल्या नैतिक मूल्यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान कौशल्याबरोबर नैतिक मूल्यांचे शिक्षण मुलांना मिळायला हवे. यासाठी सध्याच्या शैक्षणिक प्रणालीचे पुनर्परीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात मुष्टिफंड हायस्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमात केले. (सनातनही गेली अनेक वर्षे सातत्याने नैतिक मूल्यांचे शिक्षण शाळेमध्ये दिले पाहिजे, असे सांगत आहे ! - संपादक)

डान्स बारच्या आतमध्ये सीसीटीव्ही नकोत ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - डान्सबारच्या आतमध्ये सीसीटीव्ही छायाचित्रक (कॅमेरे) लावण्याच्या अटीला सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे. सीसीटीव्ही केवळ बारच्या प्रवेशद्वारावर असला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
      महाराष्ट्र शासनाने बारच्या अनुज्ञप्ती (परवान्या)साठी केलेल्या नियमावलीमध्ये बारच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधनकारक केले होते. हे सीसीटीव्हीचे छायाचित्रण पोलीस ठाण्याला देण्याचे बार मालकांना बंधनकारक करण्यात आले होते. राज्य शासनाच्या या अटींविरोधात बारमालक असोसिएशन न्यायालयात गेले होते. त्यावर २ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने हा लोकांच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा प्रकार असल्याचे सांगत ही अट रहित करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. बारमालकांना १० दिवसांत परवाना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

गोव्यातील अंजदीव बेटावर धार्मिक कार्यक्रमासाठी अनुमती देणार नाही !

संरक्षणमंत्र्यांनी दिली राज्यसभेत माहिती 
     पणजी, ३ मार्च (वार्ता.) - नौदलाची मालकी असलेल्या अंजदीव बेटावरील दोन चॅपलमध्ये (छोटे चर्च) फेस्त साजरे करण्यासाठी जाण्यास सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनुमती देता येणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. 
    आशियातील सर्वांत मोठा तळ असलेल्या कारवार येथील सीबर्ड नौदल तळापासून हे बेट जवळ आहे. सुरक्षा व्यूहरचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे बेट अत्यंत संवेदनशील आहे. अंजदीव बेटावर नागरिक गेल्यास तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू शकतो. त्यामुळे या बेटावर, तसेच बेटाभोवती कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तींना जाऊ दिले जाणार नाही, असे या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

संरक्षणक्षेत्रात भरीव तरतुदींची अपेक्षा होती; कारण... !

     केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ संरक्षणासाठी २ लक्ष ५७ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या वर्षीच्या तरतुदीपेक्षा केवळ ११ सहस्र कोटींनी अधिक आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर २९ फेब्रुवारीला ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी एका लेखात संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीविषयी ऊहापोह केला होता. तो आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. यातून संरक्षण खात्यातील लाल फितीचा कारभार, रखडलेली विमान खरेदी, सैन्याच्या आधुनिकीकरणासंदर्भात रखडलेले प्रकल्प आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

सर्व जीवसृष्टीचे हित साधणारे विज्ञान हवे !

     आज संपूर्ण जग अनेकविध प्रदूषणांच्या विळख्यात सापडले आहे. भारतासमवेत शेजारील देश चीनदेखील प्रदूषणामध्ये तसूभरही मागे नाही. चीनमधील सर्व प्रमुख शहरे वाढलेल्या प्रदूषणामध्ये सापडली आहेत. चीनमध्ये आजमितीस पाणी पिण्यासाठी हवाबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेणारे चित्र दिसत होते; पण आज संभाव्य महासत्तेच्या शर्यतीत असलेल्या चीनमधील त्रस्त नागरिकांनी श्‍वास घेण्यासाठी शुद्ध बाटलीबंद हवा विकत घेण्यास प्रारंभ केला आहे. इंग्लंड आणि कॅनडा येथून आयात केलेली शुद्ध बाटलीबंद हवा चीनमध्ये विकली जात आहे. मानवाने विज्ञानाच्या आधारे केलेल्या तथाकथित प्रगतीची (?) ही देणगी म्हणायची का ? आजपर्यंत मनुष्याच्या मुलभूत आवश्यकता निसर्गदेवतेकडून मुक्त हस्ताने, निःशुल्क आणि सहजरित्या सहस्रो वर्षांपासून प्राप्त होत आहेत. ज्याप्रमाणे सहजरित्या मिळत असलेल्या एखाद्या गोष्टीची किंमत रहात नाही आणि तिचा दुरुपयोग होतो. नंतर तीच गोष्ट त्यास दुर्लभ होते आणि कालांतराने पश्‍चातापाविना हाती काहीच उरत नाही. अगदी हेच सूत्र येथे तंतोतंत लागू पडते.

भारतमातेला वाचवण्यासाठी राष्ट्रद्रोहाचा कायदा अधिक कडक करण्याची आवश्यकता !

कॅप्टन एस्.बी. त्यागी
      देहलीतील जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) वसतीगृहाचे मासिक भाडे केवळ २० रुपये, तर वार्षिक शिक्षण शुल्क २२० रुपये आहे. एका विद्यार्थ्यामागे शासन प्रत्येक वर्षी ३ लक्ष ५० सहस्र रुपये अनुदान देते. एवढे पैसे वाया घालवून आम्ही निकृष्ट मानसिकता असणारी भावी पिढी निर्माण करत आहोत. 
१. राष्ट्रद्रोहाशी संबंधित कायद्यांची कठोर कार्यवाही करायला हवी !
     या देशात राष्ट्रद्रोहाचा कायदा अस्तित्वात ठेवण्याच्या पक्षाचा मी समर्थक आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रद्रोहाशी संबंधित कायदे अधिक कडक केले पाहिजेत, असे माझे मत आहे अथवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कार्यवाही तरी किमान कठोरपणे होणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रद्रोहाची व्याख्याही अधिक व्यापक झाली पाहिजे. त्यात देशविरोधी फितुरी, विश्‍वासघात इत्यादींचाही समावेश केला पाहिजे. देशाची अखंडता टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे. अनेक जण जाहीर सभांत देशविरोधी वक्तव्ये करतात. विविध राजकीय पक्षांचे नेतेही देशद्रोही कारवायांत सहभागी असतात.

राहुल गांधी यांची स्तुती आणि वस्तूस्थिती !

कु. प्राजक्ता धोतमल
     सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्या ५ वीसाठी शिफारस केलेल्या पुस्तकात राहुल गांधी यांचा पूजनीय, आकर्षक व्यक्तीमत्त्व असलेले आणि शक्तीशाली, असा उल्लेख केला आहे. त्यावर ओढलेले कोरडे !
१. विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांचा कोणता आदर्श घ्यावा ?
     काँग्रेसप्रेमी सीबीएस्ईने राहुल गांधी यांचा गौरव करून किशोरवयीन मुलांसमोर चुकीचा आदर्श ठेवण्याचा प्रमाद केला आहे. राहुल गांधी यांनी असे काय सत्कृत्य केले की, त्यांचा असा उदोउदो व्हावा ? आमचे आजचे किशोर ही राष्ट्राची भावी युवा पिढी आहे. त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा नेत्यांचे ज्यांनी स्वधर्म, स्वराष्ट्र यांसाठी केवळ प्राणांचीच नाही, तर सर्व भौतिक सुखांची आहुती यत्किंचितही गवगवा न करता दिली. कर्तव्य म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य देश आणि धर्मासाठी वाहिले. दुसरीकडे आपल्या आयुष्याचा अर्धा काळ सुखासीन जीवनात घालवणारे, राजकारण म्हणून धर्मांधांसाठी नक्राश्रू ढाळणारे, निर्णयक्षमतेपासून कित्येक कोस दूर, कर्तव्यपराङ्मुख, देशद्रोहाचे समर्थक अशा राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घ्यावा ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

महर्षींनी सर्वसामान्यांना अध्यात्म कळावे, यासाठी नाडीवाचनातून दैनंदिन जीवनातील काही प्रायोगिक उदाहरणे देऊन मानवाला देवाचे महत्त्व समजवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासंदर्भातील सूत्रे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षी ५७ क्रमांकाच्या नाडीवाचनात मनुष्याला उद्देशून म्हणतात 
केवळ देवच मनुष्याला गर्भात पाहू शकणे 
     अरे मनुष्या, तू गर्भात असतांना तुला पाहिले आहेस का ?; परंतु मोठे झाल्यावर मात्र तू तुला आरशात किंवा पाण्यात पाहिलेस. तू गर्भात असतांना देवानेच तुला पाहिले आहे ना, मग तू देवाचे नको का करायला ?
२. महर्षींनी नाडीवाचनातून अहंकारी मनुष्याला वृक्ष आधी का 
बीज आधी ?, याचे उत्तर बीजच आधी !, असे देणे 
     महर्षि म्हणतात, अरे मनुष्या, तुला किती प्रश्‍न आहेत ? त्यात काही अहंकाराचेही आहेत. वृक्ष अगोदर कि बीज ? ॐपासूनच प्रत्येकाची निर्मिती झाली आहे. ॐपासून नादाचीही उत्पत्ती झाली आहे. सर्व सृष्टी ॐकारमय आहे. (सर्व गोष्टींचे मूळ ॐकार आहे, असे यातून महर्षि समजावून सांगत आहेत. - (पू.) सौ. गाडगीळ) बीज असे असते की, ते कुठेही टाकले तरी उगवून येते; परंतु वृक्षाचे तसे नाही. वृक्ष उपटून कुठेही लावला, तर तो जगण्यासाठी त्याला पाणी घालावे लागते. शिवाय तो जगेलच याची खात्री नाही; म्हणून बीज हेच आधी आहे. बिजातच सर्व शक्ती सामावली आहे. (यावरून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण आली. ते अभंगात म्हणतात, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले । 
- (पू.) सौ. गाडगीळ)

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगात अन्य साधकांना झालेले त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

प.पू. पांडे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
१. वाईट गोष्टींना विरोध करून त्यांच्या परिणामांविषयी समाजात 
जागृती करणारा आणि योग्य गोष्टींचे मार्गदर्शन करणारा तो संकलक ! 
      व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जग यांच्याद्वारे ज्या काही वाईट गोष्टी घडतात, त्यांना विरोध करून त्यांचे परिणाम काय आहेत ?, याविषयी समाजात जो जागृती करतो, तसेच योग्य काय आहे ?, याचे मार्गदर्शन करतो, तोच संकलक असतो, तसेच जिथे चांगले असेल, उदा. ऋषिमुनींचे आणि इतरांचे लिखाण इत्यादी समाजात प्रसृत करतो, त्याला संकलक म्हणतात. तोच संपादक आहे. संकलक हा लेखकापेक्षा श्रेष्ठ आहे.

साधकांनो, अतिथी देवो भव । या उक्तीनुसार अतिथींचे आश्रमभेटीचे नियोजन परिपूर्ण होण्यासाठी सर्व कार्यपद्धतींचे तंतोतंत पालन करा !

१. धर्मप्रेमी देवद आश्रमात आश्रमभेटीसाठी जाणार असल्याचे 
आयत्या वेळी कळवल्याने झालेली गंभीर चूक ! 
     रायगड जिल्ह्यातील २५ धर्मप्रेमी देवद, पनवेल येथील आश्रम पहाण्यासाठी जाणार होतेे. सौ. मोहिनी मांंढरे यांनी त्यांचे आश्रमात जाण्याचे नियोजन झाल्यावर व्यवस्थापनाची सेवा करणार्‍या साधकांना कल्पना दिली नाही. धर्मप्रेमी आश्रमात जाण्याच्या २ दिवस अगोदर त्यांनी जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना त्या संदर्भात संगणकीय पत्राद्वारे माहिती पाठवली; परंतु ती लवकर पहाण्याविषयी कळवले नाही. परिणामी त्याविषयी व्यवस्थापन सेवा करणार्‍या विभागातील साधकांना आदल्या रात्री समजले. ते धर्मप्रेमी दुसर्‍या दिवशी आश्रमात जाणार असल्याने त्यांचे दिवसभराचे नियोजन करण्यासाठी साधकांची घाई झाली.

जलद गतीने ईश्‍वरप्राप्ती होण्याची दैवी गुरुकिल्ली : साधनेतील पंचसूत्री !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     काही साधक अनेक वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करत असूनही त्यांची अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती झाली नसल्याचे लक्षात येतेे, तसेच काही जणांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त करूनही त्यानंतर त्यांची साधनेत घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक साधक साधनेत प्रगती होण्यासाठी मी काय प्रयत्न करणे अपेक्षित आहे ? असे उत्तरदायी साधकांना सातत्याने विचारत असतात. 
     अशा साधकांनी त्यांच्या साधनाप्रवासामध्ये मन, बुद्धी आणि कृती यांच्या स्तरावरील विविध अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुढील पंचसूत्रीनुसार प्रयत्न करून जलद आध्यात्मिक उन्नती होत असल्याची अनुभूती घ्यावी.

साधक पत्नीने यजमानांना साधनेत साहाय्य करण्यासाठी घेतलेले श्रीकृष्णाचे साहाय्य

सौ. स्नेहल चव्हाण
    पती-पत्नींपैकी साधना करणार्‍याने साधना न करणार्‍यांना कसे समजावून सांगावे, याचे आदर्श उदाहरण सौ. स्नेहल चव्हाण हिने सर्वांसमोर मांडले आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. यजमानांना व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी ऐकण्यात स्वारस्य नसणे
    काही दिवसांपूर्वी माझी यजमानांकडून व्यष्टी साधना करण्याविषयी अपेक्षा व्हायची. त्या वेळी मी त्यांना व्यष्टी आणि भाव यांच्या संदर्भात प्रयत्न करण्यास सांगत असे. त्या वेळी ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसायचे. त्यामुळे मला त्यांच्याकडून त्यांनी माझे ऐकावे, अशी अपेक्षा व्हायची.
२. निरपेक्षता असते, तिथे देवाचे अस्तित्व असणे
    जेथे अपेक्षा आहे, तेथे आनंद आणि देवाचे अस्तित्व नाही. जेथे निरपेक्षता आहे, तेथे मी आहे, असा विचार देवाने दिला.  

आनंदी आणि सहनशील असणारा नवी मुंबई येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अद्वैत सागर चोपदार (वय २ वर्षे) !

चि. अद्वैत चोपदार
     माघ कृष्ण पक्ष दशमी (४.३.२०१६) या दिवशी नवी मुंबई येथील चि. अद्वैत सागर चोपदार याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

 चि. अद्वैत सागर चोपदार याला सनातन
परिवाराकडून द्वितीय वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
 
१. जन्माच्या वेळी
    अद्वैतच्या जन्माच्या वेळी आधुनिक वैद्यांनी तुमच्या बाळाला सुरक्षापेटीत ठेवावे लागेल, असे आम्हाला सांगितले होते; परंतु देवाच्या कृपेने त्याचा जन्म झाल्यावर त्यांनी बाळ व्यवस्थित आहे, असे सांगितले आणि ईश्‍वराच्या कृपेने त्याला सुरक्षापेटीत ठेवण्याची वेळ आली नाही.
२. १ ते ३ मास
२ अ. सहनशील
२ अ १. आई रुग्णाईत असतांना दुधाव्यतिरिक्त अन्य द्रव पदार्थ घेऊन शांत रहाणे :
अद्वैत सात मासांचा (महिन्यांचा) असतांना त्याची आई रुग्णाईत होती. तिला ताप आला होता. त्यामुळे तिला पाच दिवस रुग्णालयात ठेवावे लागले. तेव्हा अद्वैत आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही खात-पित नव्हता. आधुनिक वैद्यांनी आईचे दूध बंद करण्यास सांगितले. त्या वेळी तो तीन दिवस आईपासून दूर राहिला आणि दूध, पेज अन् डाळीचे पाणी, असे खाऊन राहिला. आधुनिक वैद्यांनी आता अद्वैतला आईचे दूध दिले, तरी चालेल, असे सांगितल्यावर तो पुन्हा आईचे दूध पिऊ लागला.

माझे माहेर रामनाथी ।

माझे माहेर रामनाथी । आहे सागराच्या काठी ।
माय आणि बाप । माझी गुरुमाऊली ॥ 
माझ्या बहिणी साधिका । न्हाऊ घाली प्रेम पाण्या ॥
माझे साधक बंधू । त्यांचे गुण किती सांगू ॥
मी निराधारी । करीते माहेरची आठवण ॥
- सौ. आशा सुरवसे, सेलू, परभणी (९.८.२०१५)

जलद उन्नतीसाठी साधकांना कोणीतरी पाठीराखा हवा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
      आपल्याला नेहमी कोणीतरी पाठीराखा हवा, तर आपली जलद आध्यात्मिक उन्नती होते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. कोणीतरी आपल्या पाठी आहे हे कळले, तर आपण जलद पुढे जातो. याचा अर्थ कोणीतरी आपला पाठपुरावा घेणारा आहे हे ठाऊक असले की, आपण गांभीर्याने प्रयत्न करतो. नाहीतर आपल्यात ढिलेपणा येतो. अंतःस्फूर्तीने प्रयत्न करणारे फार थोडे असतात. त्यांचा पाठपुरावा घ्यावा लागत नाही.
२. कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हे कळले की, आपण निर्धास्त होतो; कारण अडीअडचणीच्या वेळी तो आपल्याला साहाय्य करील, अशी आपली श्रद्धा असते. त्याचा आपल्याला आधार वाटतो. त्यामुळे आपण निर्धास्तपणे प्रयत्न करू शकतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते.

महाशिवरात्रीनिमित्त दैनिक सनातन प्रभातचा रंगीत शिवमहिमा विशेषांक

दिनांक : ७ मार्च २०१६
संख्या ८ पानी ४ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

उज्जैन कुंभमेळ्यासाठी टंकलेखन आणि एक्सेल संबंधित संगणकीय सेवा करू शकणार्‍या साधकांची तातडीने आवश्यकता !

     उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वातील पूर्वसिद्धतेच्या सेवांना आरंभ झाला आहे. मराठी आणि हिंदी भाषांत टंकलेखन, एक्सेल किंवा तत्सम संगणकीय सेवा करण्यासाठी ३१.५.२०१६ या दिवसापर्यंत साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी साधक लगेचच येऊ शकत असल्यास सेवा उपलब्ध आहे. ज्या साधकांकडे या सेवा करण्याचे कौशल्य आहे, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून गूगल स्प्रेडशीटमध्ये नावनोंदणी करावी आणि श्री. निषाद देशमुख यांना ९४०४९५६१९४ किंवा ९८२६७४२८३९ या क्रमांकावर कळवावे.
कुंभसेवेला जाण्याच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या सूचना
१. या सेवेसाठी तीव्र आध्यात्मिक त्रास असून त्रासाचे प्रकटीकरण होणार्‍या, तसेच शारीरिक आजार असणार्‍या साधकांना पाठवण्याचे नियोजन उत्तरदायी साधकांनी करू नये.
२. उज्जैन फार दूर असल्यास अल्प कालावधीसाठी सेवेत सहभागी होणार्‍या साधकांचा बराचसा वेळ प्रवासातच जातो. त्यामुळे साधकांनी न्यूनतम १५ दिवस सेवेला येण्याचे नियोजन करावे.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ :
गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
देश रसातळाला जाण्याचे कारण
     आधुनिक वैद्यच चांगला वैद्य कोण आहे, हे सांगू शकतात. अधिवक्तेच चांगला अधिवक्ता कोण आहे, हे सांगू शकतात. असे असतांना राजकारण, राष्ट्र आणि धर्म यांविषयी काहीच ज्ञान नसलेली जनता मतदान करून चांगले शासन कधी निवडू शकेल का ? यामुळेच देश रसातळाला गेला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

विचारपूर्वक कृती करणे आवश्यक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !

     १५ वर्षांपूर्वी लालूप्रसाद यांच्या राज्यात बिहारच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती इतकी वाईट होती की, देशात कोणत्याही राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची बिहारच्या दिशेने वाटचाल, असे म्हटले जायचे. लालूंच्या गुंडगिरीला कंटाळल्याने जनतेने भाजपला सत्तेचा वाटा दिला. त्यानंतर सुमारे १० वर्षे भाजप-संयुक्त जनता दल यांच्या राज्यात ही स्थिती बर्‍यापैकी पालटली होती. आता परत नितीश यांच्यातील अहंकार जागृत झाल्याने आणि मोदीद्वेषापोटी भाजप समवेतची युती तुटली आहे. नितीश यांच्या पक्षाने परत एकदा लालू यांच्या राजद पक्षासमवेत युती केली.

हिंसक आंदोलने आणि देशाची हानी !

      इंग्रज गेल्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली. या लोकशाहीने नागरिकांना, समाजाला त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन करण्याची अनुमती दिली आहे; मात्र गेल्या २५-३० वर्षांत कोणत्याही प्रश्‍नांवरून होणारी आंदोलने ही हिंसक आणि देशाच्या संपत्तीची अतोनात हानी करणारी होत असल्याचे पुढे येत आहे. सनदशीर मार्गाने न्याय मिळत नाही, यातून शासनाला कधीच जाग येत नाही त्यामुळे तो तोडफोड करूनच मिळवावा लागतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn