Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गदारोळामुळे संसद ठप्प !

रोहित वेमुला, कार्ती चिदंबरम्, रामशंकर कथेरिया यांच्यावरून गदारोळ !
शाळेत दंगा करणार्‍या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढले जाते,
शिक्षा केली जाते, तशी शिक्षा या खासदारांना का केली जात नाही ?
    नवी देहली - एअरसेल-मॅक्सिस या आस्थापनांतील कराराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम् यांचा मुलगा कार्ती चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अण्णा द्रमुक पक्षाच्या खासदारांनी १ मार्च या दिवशी संसदेत गदारोळ घातला. तसेच रोहित वेमुलाच्या संदर्भात मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या विधानावरून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचे कामकाज २ वेळा स्थगित करावे लागले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी आग्रा येथील विहिंप नेत्याच्या हत्येच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही विरोधकांनी संसद डोक्यावर घेतली. काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी कथेरिया यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली. बहुजन समाज पक्षाने स्मृती इराणी यांच्या विरोधात राज्यसभेत विशेषाधिकार हननाचा प्रस्ताव सादर केला आहे, तर काँग्रेसने कथेरिया यांच्या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्थगन प्रस्ताव सादर केले आहेत.

छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवादी ठार

नक्षलवादग्रस्त भारत !
    भाग्यनगर (हैदराबाद) - तेलंगण-छत्तीसगड सीमेवर असलेल्या छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षारक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहीम चालू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या शोधमोहिमेच्या वेळी ही चकमक झाली. या वेळी नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावर कर

    नवी देहली - १ एप्रिल २०१६ पर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफमध्ये) जमा झालेली मुद्दल आणि त्यावरील व्याज यांवर कोणताही कर लावण्यात येणार नाही. १ एप्रिल २०१६ नंतर जमा होणार्‍या मुद्दलावरील ६० टक्के व्याजच करपात्र असेल, असे केंद्रशासनाने स्पष्ट केले आहे. (काळ्या पैशावर नियंत्रण लावण्यावर अयशस्वी ठरतांना जनतेच्या पैशावर मिळणार्‍या व्याजावर कर लावणे, ही शासनाची लुटमारच नाही का ? - संपादक) तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ्) कोणताही कर लावण्यात आलेला नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील नॉलेज पार्क महाविद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा !

  • देशद्रोही वृत्तीच्या विद्यार्थ्यांनी पोखरलेली भारतातील विद्यापिठे !
  • देशद्रोही कृती करणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश देण्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केली पाहिजे !
    नोएडा (उत्तरप्रदेश) - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात पाकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याचे प्रकरण अद्याप थांबलेले नसतांनाच उत्तरप्रदेशातील नोएडा येथील नॉलेज पार्क महाविद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना समोर आली आहे. (भारतातील विद्यापिठात भारतियांच्या करातून मिळालेल्या अनुदानातून शिक्षण घेत असूनही काश्मिरी विद्यार्थी पाकिस्तानचा जयजयकार करतात, असे केवळ भारतातच घडू शकते. जेएन्यूमधील देशद्रोही विद्यार्थ्यांना काँग्रेस, आप आणि साम्यवादी यांनी पाठिंबा दिल्यामुळेच आता अन्य विद्यापिठांतील विद्यार्थ्यांना देशद्रोही घोषणा देण्यास प्रोत्साहन मिळत आहे. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढण्याचीच शिक्षा योग्य ठरेल ! - संपादक) 

चिदंबरम् यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहेत का, हे तपासा ! - डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मागणी

    नवी देहली - माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांचे लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी काही संबंध आहेत का, हे तपासणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहाँच्या संदर्भात केंद्रशासनाने वर्ष २००९ मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील पालट चिदंबरम् यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी नुकतीच दिली. या पार्श्‍वभूमीवर डॉ. स्वामी यांनी ही मागणी केली. ते पुढे म्हणाले, गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय काही धारिकांची सखोल चौकशी करत आहे. भारतीय दंड संहितेनुसार हा गंभीर गुन्हा असून खोटी माहिती दिल्याविषयी चिदंबरम् यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा.

भारत-पाक सामना धर्मशाळा येथे नको ! - हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह

स्वत:ला राष्ट्रप्रेमी अथवा पाकविरोधी दाखवण्याचा
काँग्रेसी मुख्यमंत्र्यांचा केविलवाणा खटाटोप आहे का ?
    शिमला (हिमाचल प्रदेश) - आगामी टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा सामना धर्मशाळा येथे नको, अशी मागणी हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ मार्चला धर्मशाळा येथे सामना होणार आहे. या सामन्याची जोरदार सिद्धता चालू असतांना मुख्यमंत्री सिंह यांनी हा सामना न घेण्याची मागणी केली.
१. जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून भारतीय हद्दीत प्रवेश करून जिहादी आतंकवादी सैनिकांवर आक्रमणे करत आहेत. पाकिस्तान आपल्या भारतविरोधी भूमिकेत पालट करत नाही. तसेच पाकशी झालेल्या युद्धात राज्यातील अनेक सैनिक हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा रोष पत्करून हा सामना खेळवणे योग्य वाटत नाही. अशा परिस्थितीत आम्हाला धर्मशाळा येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ द्यायचा नाही. देशातील इतर कोणत्याही शहरात हा सामना घेण्यास आमची आडकाठी नाही, असे वीरभद्र सिंह यांचे म्हणणे आहे.

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

आग्रा येथील विहिंपचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येचे प्रकरण
समाजवादी शासनाच्या पोलिसांकडून भाजपच्या
नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धता
     आग्रा (उत्तरप्रदेश) - येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया, भाजपचे खासदार बाबू लाल, विश्‍व हिंदू परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन, स्थानिक भाजपचे आमदार जगन प्रसाद गर्ग आदी नेत्यांकडून महौर यांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी धर्मांधांच्या विरोधात शेवटची (निर्णायक) लढाई करण्याची चेतावणी देण्यात आल्याचे वृत्त दैनिक जनसत्ताच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी समाजवादी पक्ष शासनाची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांनी या हिंदु नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धता केली आहे. महौर यांची काही दिवसांपूर्वी शाहरूख, इम्तियाज, आबिद आणि राजा यांच्याकडून हत्या करण्यात आली होती.

जर्मनीत येणार्‍या विस्थापितांची संख्या ११ लाखांच्या पुढे

जर्मनी विस्थापितांसाठी सीमा बंद करणार ?
      बर्लिन (जर्मनी) - इराक, सिरिया, अल्जेरिया, मोरोक्को आणि ट्युनिशिया या देशांमधून मोठ्या प्रमाणात मुसलमान विस्थापितांचे लोंढे युरोपकडे वळत आहेत. या लोंढ्यांना आवर घालण्यासाठी जर्मनी त्यांच्या देशाच्या सीमेवर काही करता येईल का, याची शक्यता पडताळून पहात आहे. ऑस्ट्रियाने यापूर्वीच त्यांच्या सीमेवर तारांचे कुंपण बसवून विस्थापितांच्या संख्येला थोडा फार आळा घालण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ केला आहे.
     युरोपच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने लोक विस्थापित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे विस्थापित आपापल्या देशांमधून अवैध बोटीतून प्रवास करून तुर्की आणि ग्रीस देशात पोचतात. तेथून ते प्रवास करून जर्मनीत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी जर्मनीने सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे युरोपातील कुठल्याही देशांपेक्षा जर्मनीत येणार्‍या विस्थापितांची संख्या सर्वाधिक म्हणजे ११ लाखांच्याही पुढे गेली आहे. दुसर्‍या महायुद्धात ज्यू धर्मीयसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर देश सोडून गेले नव्हते. युरोपमध्ये जातांना प्रवासात बोटी उलटून किंवा त्यातून समुद्रात पडून ठार झाले ल्या विस्थापितांची संख्याही सहस्रोंच्या घरात आहे.

जर्मनीत नागरिकांकडून विस्थापितांच्या निवासी छावणीला आग !

मानवता म्हणून आसरा देणार्‍या युरोपीय देशांविषयी कृतज्ञ न रहाता उलट 
त्यांनाच त्रास देणारे मुसलमान विस्थापितच यासाठी उत्तरदायी आहेत !
      बर्लिन - जर्मनीत आश्रय घेणार्‍या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला. ही आग स्थानिक नागरिकांनी लावल्याचा संशय पोलिसांना आहे.
      जर्मनीत ११ लक्ष विस्थापित आले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून आलेले विस्थापित जर्मनीच्या मुख्य प्रवाहात समरस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मूळ मुसलमान देशांच्या संस्कृतीलाच प्राधान्य देतात, तसेच या विस्थापितांनी चोर्‍या, मारामार्‍या, बलात्कार असे गुन्हे करून विस्थापितांविषयी सहानुभूती असणार्‍या जर्मन नागरिकांच्याही सदिच्छा गमावल्या आहेत.

युरोपातील बाल्कन देशांनी मुसलमान शरणार्थींच्या प्रवेशावर घातले कठोर निर्बंध

  • परिस्थितीची भयावहता वाढत चालल्याची भीती व्यक्त
  • युरोप भीषण आपत्काळाला तोंड देत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !
युरोपवर सर्वांत मोठे शरणार्थी संकट
रेल्वेने जर्मनीकडे चाललेला शरणार्थींचा लोंढा
     बर्लिन (जर्मनी) - स्लोवेनिया, क्रोएशिया, सर्बिया आणि मॅकेडोनिया या चार बाल्कन (दक्षिण पूर्व युरोपातील देशांचा समूह) देशांनी प्रतिदिन ५८० एवढ्याच संख्येत शरणार्थींना स्वीकारण्याचे धोरण अवलंबल्याने ग्रीस आणि मॅकेडोनिया यांच्या सीमेवर आलेल्या शरणार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुर्कीवरून ग्रीसमध्ये समुद्रमार्गे प्रवेश घेणार्‍या विस्थापितांना ग्रीस देशातच अडकून पडावे लागत आहे. 

बँकांची १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे थकवणार्‍यांच्या नावांची सूची शासनाने घोषित करावी !

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाची मागणी
    कोईम्बतूर (तमिळनाडू) - बँकांची १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे थकवणार्‍या कर्जदारांच्या नावांची सूची केंद्र शासनाने प्रसिद्ध करावी, अशी मागणी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (एआयबीईए) या बँक कर्मचार्‍यांच्या संघटनेने केली आहे. एआयबीईएचे सरचिटणीस सी.एच्. वेंकटाचलम् म्हणाले की, शासन उद्योगपतींनी थकवलेली सुमारे २ लाख कोटी रुपयांची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जे माफ करण्याच्या प्रयत्नात आहे. या कर्जबुडव्यांवर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

लुधियानामध्ये केजरीवाल यांच्या वाहनावर आक्रमण

    लुधियाना (पंजाब) - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर येथे आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. यात त्यांच्या वाहनाची समोरील काच फुटली. मात्र केजरीवाल बचावले. आम आदमी पार्टी या पक्षाने आरोप केला आहे की, हे आक्रमण सुनियोजित होते. केजरीवाल यांच्या गाडीला लोखंडी सळ्या आणि दगड यांद्वारे लक्ष्य करण्यात आल्यानंतरही पोलीस निष्क्रीय होते. पोलिसांनी सांगितले की, आक्रमण करणारे अकाली दल आणि दुसरी एक संघटना यांच्याशी संबंधित होते.

देशातील काही उच्च शिक्षणसंस्था बनल्या आहेत देशद्रोही कारवायांचे अड्डे ! - मुंबई आय.आय.टी.चे प्राध्यापक

  • काही दिवसांआधी जेएन्यूच्या राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांच्या विरोधात चेन्नई आय.आय.टी.नेही कारवाई करण्याची केली होती मागणी !
  • क्रीम ऑफ द कन्ट्री अर्थात देशाचे सर्वांत प्रतिभावंत विद्यार्थी असणार्‍या शिक्षणसंस्थांनी केलेले हे वक्तव्य देशाला अंतर्मुख करण्यासाठी पुरेसे आहे !
जेएन्यू प्रकरण
    मुंबई - मुंबई आय.आय.टी. या जगप्रसिद्ध भारतीय शिक्षणसंस्थेतील ६० प्राध्यापकांनी राष्ट्र्रपतींना पत्र पाठवून देशातील काही शिक्षणसंस्था देशद्रोही कारवायांचे अड्डे बनले आहेत, अशी चिंता व्यक्त केली आहे. (केंद्रशासनाने या पत्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा शिक्षणसंस्थांत चालू असलेला देशद्रोही कारवाया करणार्‍या घटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! यासाठी भारतभरातील राष्ट्रप्रेमी जनता शासनाच्या नक्कीच पाठीशी उभी राहील ! - संपादक) तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विचारसरणीचे लोक एकत्र येतात. त्यांच्यातील वैचारिक मतभेदांचे रूपांतर वैचारिक युद्धभूमीत होते. विद्यार्थ्यांनी अशा वैचारिक युद्धभूमीला बळी पडू नये, असा सल्लाही राष्ट्र्रपतींनी विद्यार्थ्यांना द्यावा, अशी विनंती केली आहे.

अ‍ॅम्बी व्हॅली रिसॉर्टला महसूल विभागाने ठोकलेले टाळे काही प्रमाणात कर भरल्यावर उघडले

     पुणे, १ मार्च - राज्य शासनाचा कर न भरल्यामुळे सहारा इंडिया समूहाच्या अ‍ॅम्बी व्हॅली रिसॉर्टचे प्रवेशद्वार आणि कार्यालय यांना महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी टाळे ठोकले होते. या कारवाईनंतर व्हॅली प्रशासनाने ४ कोटी रुपये कराच्या एक चतुर्थांश म्हणजे १ कोटी रुपये भरले. त्यामुळे महसूल प्रशासनाने अ‍ॅम्बी व्हॅली आणि त्याचे कार्यालय उघडून दिले. (४ कोटी रुपये देणे अपेक्षित असतांना केवळ १ कोटी रुपये भरल्यानंतरच प्रशासनाने अशी सवलत का दिली ? - संपादक)

(म्हणे) देशातील अल्पसंख्यांक मुसलमान धर्मियांची या देशावरील अभंग निष्ठा इसिसला यशस्वी होऊ देणार नाही !

राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकाचा पोकळ आशावाद !
     वाशी (नवी मुंबई) - देशातील अल्पसंख्यांक मुसलमान धर्मियांची या देशावरील अभंग निष्ठा इसिसला यशस्वी होऊ देणार नाही. इसिसच्या विश्‍वभरातील आतंकवादी कारवाया भारतावर प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे आतंकवादविरोधी पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी केले. (इसिसमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार्‍या देशातीलच मुसलमान धर्मियांना पोलिसांनी अटक केली आहे, याविषयी अप्पर पोलीस महासंचालकांना काय म्हणायचे आहे ? - संपादक)

धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याचा येवलेवाडी (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचा निर्धार !

आढावा बैठकीला उपस्थित धर्माभिमानी
    येवलेवाडी, १ मार्च (वार्ता.) - धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी कृतीशील होण्याचा, तसेच धर्मशिक्षणवर्ग घेण्याचा निर्धार येवलेवाडी, गावठाण येथील धर्माभिमानी ग्रामस्थांनी २९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी येवलेवाडी येथे धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्र आणि धर्म कार्य कार्यात कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद बंदिवानांकडून बनवून घेऊ नये ! - रूपाली पाटील, काँग्रेस

    कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसाद बंदिवानांकडून सिद्ध करून घेण्याच्या विषयासाठी सामान्य भक्तगण, कोल्हापूरवासीय आणि अन्य संघटना यांच्याकडून विरोध होत आहे. कारागृहातील वातावरण अस्वच्छ असते. भक्तगणांना लाडूचा प्रसादच हवा, असा आग्रह नाही. त्यांना बुंदीचा प्रसाद दिला तरी चालेल. त्याचप्रकारे लाडू सिद्ध करणारी व्यक्ती किती स्वच्छतेने ते सिद्ध करते हेही महत्त्वाचे आहे. कारागृहात हे अशक्य आहे. त्यामुळे लाडूचा प्रसादच द्यावयाचा झाल्यास तो सक्षम महिला बचत गट अथवा नेहमी हा जो व्यवसाय करतात त्यांच्याकडून बनवून घ्यावा, असे असे निवेदन काँग्रेसच्या कोल्हापूर शहरच्या सचिव (जनरल सेक्रेटरी) रूपाली पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी बर्गे यांना दिले आहे.

हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या ३५ वारकर्‍यांना १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा हिंदुद्वेष !
     कोपरखैरणे (नवी मुंबई) - येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले. (अन्य धर्मियांच्या लोकांना असा त्रास देण्याचे धाडस राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाले नसते, हे जाणून वारकर्‍यांनीही संघटित होण्याविना पर्याय नाही ! - संपादक) या वारकर्‍यांमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील वारकरी विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

राज्यात १० वीची परीक्षा चालू, परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण उपलब्ध होण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
     पुणे, १ मार्च - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या वतीने घेतली जाणारी १० वीची परीक्षा १ मार्चपासून चालू झाली. ही परीक्षा २९ मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये परीक्षेच्या दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

शाहरूख खान म्हणतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ शांत रहा !

    मुंबई - अभिनेता शाहरूख खान यांना एका कार्यक्रमात पत्रकारांनी असहिष्णुतेच्या सूत्रावर प्रश्‍न विचारले. त्यावर ते म्हणाले की, मी आय.पी.एल्.मधील मुंबई इंडियन्स आणि के.के.आर्. या संघांचा क्रिकेट सामना पहातो, तेव्हा शांत रहाण्याचे काम करतो. इतर गोष्टींत मी स्वत:ला अधिक गुंतवून घेत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ शांत रहाणे असादेखील आहे. म्हणून मी याविषयी शांत रहाणे पसंत करतो. (शाहरूख खान यांच्या दिलवाले चित्रपटाला जनतेने नाकारल्यामुळे त्यांना योग्य तो धडा मिळालेला असल्याने तेे शांत रहात आहेत; मात्र प्रत्यक्षात तेे शांत आहेत, असे म्हणता येणार नाही ! - संपादक)

गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसेल; तर आंदोलनाविना पर्याय नाही !

देहली येथील रामलीला मैदानावर गोभक्तांचे राष्ट्रव्यापी महा जनआंदोलन 
भारतात गोहत्या रोखण्यासाठी साधूसंतांना रस्त्यावर का उतरावे लागते ?
     देहली - फार पूर्वीपासून अहिंसेचा पुजारी असलेला भारत आज मांस-निर्यात करण्यात अग्रेसर असणारा देश म्हनून पुढे येत आहे. ८५ टक्के जनता हिंदू असूनही येथे मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. थोड्या पैशासाठी म्हातार्‍या गोधनाची विक्री करणारे शेतकरीही अप्रत्यक्षरित्या गोहत्येच्या पापात सहभागी होत आहेत. बहुतांश राज्यात गोहत्याबंदी असतांनाही शासनाजवळ गोहत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. अशा वेळी गोहत्येशी संबंधित धार्मिक भावना जनआंदोलनासाठी उद्युक्त करते. जेव्हा शासनच त्यांच्या कायद्याचे पालन करण्यास असमर्थ असेल, तर आंदोलन करण्याविना पर्याय शिल्लक रहात नाही, असे मत साधूसंतांनी व्यक्त केले.
    गायीला राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी भारतीय गौ क्रांतीमंचच्या वतीने २९ फेब्रुवारी या दिवशी येथील रामलीला मैदानावर गौ गंगा कृपाकांक्षि परम श्रद्धेेय पूज्यश्री गोपाल मणि महाराज यांच्या उपस्थितीत राष्ट्रव्यापी महा जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला साधूसंतांनी संबोधित केले. या वेळी देहली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधून सहस्रो गोभक्त सहभागी झाले होते.

अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या मठात चोरी

     कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) - कणेरी (ता. करवीर) येथील कणेरी मठाचे विद्यमान मठाधिपती पू. अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या मूळ निवासस्थानातून चोरट्यांनी २९ फेब्रुवारीच्या पहाटे ८ लक्ष ५४ सहस्र २३२ रुपयांची रोख रक्कम चोरली आहे. तसेच जुने दस्ताऐवज आणि मौल्यवान वस्तूही चोरून नेल्या आहेत. याविषयीची सेवेकरी भास्कर केसरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. मठाच्या इतिहासात प्रथमच चोरीची घटना घडली आहे. (साधू-संतांच्या घरी चोरी होणे, ही काळाची भयावहता स्पष्ट करते. संत हे हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याने पोलिसांनी या चोरीचा तपास लवकर लावणे अपेक्षित आहे ! - संपादक)

सोलापूर येथे धर्मांध पोलीस कर्मचार्‍याकडून महिला पोलिसाशी कुकृत्य

अशा वासनांध धर्मांध पोलीस कर्मचार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाईच व्हायला हवी !
     सोलापूर, १ मार्च - येथील पोलीस मुख्यालयात सेवेस असणारे धर्मांध पोलीस कर्मचारी तौसिफ इक्बाल शेख याने लग्नाचे आमिष दाखवून एका महिला पोलिसाशी कुकृत्य केले. हा प्रकार मार्च २०१४ पासून १९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी महिला पोलिसाने तक्रार प्रविष्ट केली; मात्र ती मागे घेण्यासाठी नागेश कोणदे आणि पोलीस कर्मचारी धनराज उपाख्य भैया गायकवाड यांनी दमदाटी केल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

(म्हणे) नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला आतंकवादी !

डॉ. श्रीपाल सबनीस यांची वैचारिक दिवाळखोरी
    पुणे, १ मार्च - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी ही सहिष्णुता म्हणता येणार नाही. त्याचसमवेत गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला आतंकवादी आहे, हेही नाकारता येत नाही. (आतंकवादी कोणाला म्हणावे, हेसुद्धा न समजणारे साहित्यिक (?) डॉ. सबनीस यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे. - संपादक) त्याच नथुरामाचे उदात्तीकरण करण्याचे काम चालू असून ते दुर्दैवी आहे, असे विखारी प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जागेला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध

५ सहस्र यांत्रिक बोटींचा मोर्चा काढून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याची घोषणा
     मुंबई - येथील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाल स्मारकाच्या जागेला मच्छीमारांनी विरोध केला आहे. आमचा शिवस्मारकास विरोध नसून त्यामुळे निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांना विरोध आहे. याविषयी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा जलभूमीपूजनाचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, तसेच या वेळी मुंबईतील ५ सहस्र यांत्रिक बोटींचा मोर्चा काढून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, अशी घोषणा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जागेला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध

५ सहस्र यांत्रिक बोटींचा मोर्चा काढून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याची घोषणा
     मुंबई - येथील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाल स्मारकाच्या जागेला मच्छीमारांनी विरोध केला आहे. आमचा शिवस्मारकास विरोध नसून त्यामुळे निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांना विरोध आहे. याविषयी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा जलभूमीपूजनाचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, तसेच या वेळी मुंबईतील ५ सहस्र यांत्रिक बोटींचा मोर्चा काढून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, अशी घोषणा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे.

(म्हणे) मोदी यांच्या सत्तेत मुसलमान सुरक्षित नाहीत ! - काँग्रेस नेते शाहिद रफी यांचा आरोप

मोदी यांच्या राज्यात त्यांच्यावर टीका करणारेही सुरक्षित आहेत, हे रफी का सांगत नाहीत ?
काँग्रेसच्या राज्यात काश्मीर, आसाम, बंगाल, केरळ येथील हिंदू असुरक्षित आहेत, 
त्याविषयी रफी कधी बोलले का नाहीत ?
     आग्रा - अल्पसंख्यांक आणि त्यातही मुसलमान समाज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सत्तेत असुरक्षित असल्याचे दिवंगत गायक महंमद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी म्हटले आहे. (ज्या एम्आयएम् पक्षाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, मग आम्हा २५ कोटी मुसलमानांची शक्ती १०० कोटी हिंदूंना दाखवून देऊ अशी उघड धमकी देतात, त्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या शाहिद रफी यांना मोदी यांच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे ? - संपादक) 
     ताज साहित्य संमेलनात बोलतांना शाहिद रफी यांनी हे मत व्यक्त केले. त्यांनी पुन्हा एकदा महंमद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. शाहीद रफी यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शाहीद रफी यांनी २०१४ मध्ये एम्आयएम् पक्षातर्फे मुंबादेवी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

काँग्रेसचे घोटाळेबहाद्दर नेते पी.के. थुंगॉन यांना आता आणखी एका प्रकरणात साडे तीन वर्षांची शिक्षा !

काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना आणखी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
     नवी देहली - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगॉन यांना साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वर्ष १९९३-९४ मध्ये शासकीय गाळ्यांच्या वितरणामध्ये केलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी ते दोषी ठरले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. वर्ष १९९८ मध्ये थुंगॉन यांनी नागालॅण्डमधील सिंचन प्रकल्पासाठी आलेल्या केंद्राच्या निधीचा अपवापर केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यासह अन्य तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी थुंगॉन यांना जुलै २०१५ मध्ये साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे थुंगॉन हे सध्या कारागृहातच आहेत.

अमरनाथ यात्रेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ

    जम्मू - बाबा अमरनाथच्या वार्षिक तीर्थयात्रेच्या नाव नोंदणी प्रक्रियेला २९ फेब्रुवारीपासून आरंभ झाला. देशातील जम्मू-कश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँक यांच्या ४३२ शाखांमधून हे नोंदणीकरण चालू झाले आहे. अमरनाथ यात्रा २ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. 
     श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या नियमानुसार १३ वर्षार्ंहून अल्प आणि ७५ वर्षांहून अधिक वयाच्या भाविकांची नोंदणी केली जात नाही. या नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक असते. नोंदणीच्या वेळी प्रत्येक भाविकाकडून ५० रुपये घेतले जातात. भोकरदन (जिल्हा संभाजीनगर) येथे किरकोळ कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

धर्मांधांची वाढती गुन्हेगारी ! धर्मांधांपासून
हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
     भोकरदन, १ मार्च - येथील सिपोरा बाजारात ३ धर्मांध पत्ते खेळत असतांना तेथे आलेल्या गजू मखवाने याला त्यांनी तू येथे का थांबलास ?, असे विचारत अरेरावी केली. धर्मांधांनी मखवाने याच्या घरी जाऊन त्याचा भाऊ आणि वहिनी यांनाही लाठ्या अन् कुर्‍हाड यांद्वारे मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला असून अकबर गुलामनवी, गुलामनवी आणि अन्वर गुलाम या धर्मांधांना अटक केली आहे. त्यांना भोकरदन येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सर्वांना जामीन संमत केला आहे. गजू मखवाने आणि इतर यांच्यावर संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

१६ गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या २ धर्मांधांना अटक

वारंवार होणार्‍या गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     पालघर - बोईसर येथे बेटेगाव पोलीस नाक्यावर ट्रकमधून १६ गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणारे चालक धर्मांध कमाल रहीम उद्दीन शेख (वय ५२ वर्षे) आणि साथीदार मोहम्मद रमजान (वय २५ वर्षे) यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांना हा ट्रक संशयास्पदरित्या थांबलेला आढळला. त्यात १३ म्हशी आणि ३ लहान रेडकू आढळून आले. या गोवंशियांना नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस चौकशीतून उघड झाली आहे.

दौंड (जिल्हा पुणे) येथे रेल्वेत महिला प्रवाशांवर चोरट्यांकडून आक्रमण

रेल्वेमध्ये महिला प्रवाशांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी 
रेल्वे प्रशासन कोणती उपाययोजना करणार आहे ?
     दौंड (पुणे), १ मार्च - येथील रेल्वे स्थानकाजवळ हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये २९ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ५.१५ वाजता चोरट्यांनी २ महिला प्रवाशांवर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले.
    गाडीतील चोरांनी दोन्ही महिलांवर पाळत ठेवली होती. त्यांच्यासमवेत कोणी नसल्याचे पाहून त्यांनी रेल्वे गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढली.

तीन वर्षांपूर्वीच्या धुळे येथील दंगलीच्या चौकशीसाठी समिती

    मुंबई - धुळ्यात तीन वर्षांपूर्वी उपाहारगृहाचे देयक देण्यावरून वाद झाला होता. त्याचे रूपांतर नंतर दंगलीत झाले. या दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी राज्यशासनाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. (तीन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी तेव्हाच्या शासनाने त्वरित समिती का नियुक्त केली नाही, हेसुद्धा जनतेला समजले पाहिजे. - संपादक)
    या समितीची कार्यकक्षा निश्‍चित करण्यात आली असून, चौकशीची मुदत ६ महिन्यांची राहील. दंगल घडण्यात कारणीभूत झालेली परिस्थिती, तिचा घटनाक्रम, दंगल घडवण्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या, व्यक्ती, व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होती का, दंगलीमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेली व्यवस्था पुरेशी होती का, पोलिसांचा गोळीबार समर्थनीय होता का इत्यादी गोष्टींची चौकशी ही समिती करणार आहे.

पाण्याच्या गळतीमुळे महिन्याला पावणेदोन लक्ष रुपयांचा फटका !

सोलापूर महापालिकेचा दायित्वशून्य कारभार !
    सोलापूर, १ मार्च (वार्ता.) - पाण्याची गळती आणि पाणीचोरी यांमुळे प्रतिदिन पाच ते सहा दशलक्ष लिटर पाण्याचा फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेला प्रतिदिन सहा सहस्र, महिन्याला एक लक्ष ८० सहस्र, तर वर्षाला २१ लक्ष ६० सहस्र रुपयांचा भुर्दंड बसत आहे. पाणीगळतीची अनेक कारणे आहेत. पाणीउपसा करण्यापासून ते जलशुद्धीकेंद्रापर्यंत आणतांना आणि शुद्ध पाणी ते नळापर्यंत जातांना अशा दोन्ही टप्प्यांत पाण्याची गळती होते.

पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि लादेन यांच्यात होते साटेलोटे ! - एका पुस्तकात आरोप

जिहादी आतंकवाद्याच्या भरवशावर पंतप्रधान बनलेल्या व्यक्तीकडून आतंकवादाच्याच 
विरोधात कारवाई करण्याची अपेक्षा भारताने करावी, हे हास्यास्पद !
नवाज शरीफ लादेनच्या पैशावर पाकचे पंतप्रधान बनले ?
     इस्लामाबाद - अल्-कायदा या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बीन लादेनच्या पैशावर पाकचे विद्यमान पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बेनझीर भुट्टो यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, असा आरोप पाकमध्ये प्रकाशित झालेल्या खालिद ख्वाजा: शहीद-ए-अमन या पुस्तकात करण्यात आला आहे. हे पुस्तक शमामा खालिद यांनी लिहले असून त्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे माजी अधिकारी खालिद ख्वाजा यांच्या पत्नी आहेत.

अ‍ॅम्नेस्टीच्या अहवालात भारतातील कथित वाढत्या असहिष्णुतेवर टीका !

आखाती देश, पाक, बांगलादेश, भारतातील काश्मीर, आसाम, बंगाल, केरळ येथे हिंदूंवर होत 
असलेल्या अत्याचारांविषयी कधीही न बोलणार्‍या पाश्‍चात्त्य मानवाधिकार संघटना अमानवीच होत ! 
     लंडन - अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने वर्ष २०१५-२०१६ चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात तिने भारतातील कथित वाढत्या असहिष्णुतेवर टीका केली आहे.
अ‍ॅम्नेस्टीच्या अहवालातील सूत्रे 
१. भारतातील प्रशासन धार्मिक हिंसेच्या घटना रोखण्यास अयशस्वी झाले आहे, तसेच अनेकदा ध्रुवीकरण करणार्‍या भाषणांद्वारे तणाव वाढण्याचा प्रयत्न झाला. (अकबरुद्दीन ओवैसी याने १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना ठार करण्याचे विधान केले होते, तेव्हा तणाव झाल्याचे कोणाला दिसले नव्हते ! - संपादक)

पंढरपुरात (जिल्हा सोलापूर) आज हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ  टिळक स्मारक मैदान, पंढरपूर
दिनांक  २ मार्च २०१६
वेळ - सायंकाळी ६ वाजता
 हिंदु धर्माभिमान्यांनी सभेला अधिकाधिक 
संख्येने उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे !

ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांचा सनातन संस्थेच्या वतीने सन्मान

ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक
     पुणे, १ मार्च (वार्ता.) - ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक श्री. वैभव मेढेकर आणि सौ. वैदेही मेढेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रीफळ देऊन पुष्पहार घातला. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी आशीर्वाद आहेत, असे सांगितले.

लातूरमधील पाणीप्रश्‍नासाठी दूरगामी प्रयत्नांची आवश्यकता ! - शिवराज पाटील चाकूरकर

   लातूर, १ मार्च - पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्‍न केवळ लातूर किंवा मराठवाडा यांपुरताच मर्यादित नसून देशातील अनेक राज्यांत, तसेच पाकिस्तानसह अनेक देशांतही आहे. काहीही केले, तरी लातूरचा पाण्याचा प्रश्‍न ३-४ वर्षांत सुटणारा नाही. त्यासाठी दूरगामी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व जनतेने मिळून हा प्रश्‍न सोडवण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळ निवारण अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

भिकारी आणि बेघर यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्रशासन आणणार नवीन विधेयक !

    नवी देहली - भिकारी, बेघर आदींना सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्रशासनाने भीक मागणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरू नये, यासाठी आवश्यक कायदा दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी द पर्सन्स इन डेस्टिट्युशन २०१५ हे नवे विधेयक बनवण्यात आले आहे. विधेयकानुसार या समस्येवर विचार आणि कृती करण्यासाठी शासन जिल्हा पातळीवर विशेष पथक नियुक्त करणार असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. भीक मागणे हा सध्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असून व्यक्तीला सध्या सुधारगृह किंवा खटल्याशिवाय थेट कारागृहात पाठवण्याची तरतूद आहे.

कर्करोग पीडितांसाठी अनाम प्रेम या संस्थेकडून स्वरशिंपण या कार्यक्रमाचे आयोजन

     पनवेल - अनाम प्रेम या संस्थेच्या आयोजनाच्या अंतर्गत कर्करोग पीडितांसाठी संगीताच्या माध्यमातून स्वरशिंपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात पार पडला. या वेळी १४० कर्करोग पीडित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पंडित श्री. मिलिंद रायकर यांच्याकडून केलेले स्वरशिंपण म्हणजे कुठलीही संगीत थेरपी नसून एका आत्म्याने दुसर्‍या आत्म्याशी केलेला संवाद आहे, असे निवेदकाने सांगितलेे.

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना पाकमध्ये हाकला !
    बांगलादेशात चालू असलेल्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याच्या वेळी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील नॉलेज पार्क महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांनी
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

मागील दीड मासात फोंडा तालुक्यातील ७ मंदिरांमध्ये चोरी !

मंदिरांच्या सुरक्षेचे दायित्व आता हिंदूंनीच पार पाडायला हवे !
    फोंडा, १ मार्च (वार्ता.) - मागील दीड महिन्यांच्या कालावधीत फोंडा तालुक्यातील ३ ठिकाणच्या ७ मंदिरांमध्ये चोरी झाली आहे. चोरांनी या मंदिरांपैकी ३ मंदिरांतील अर्पणपेट्यांतील निधी चोरून नेला आहे. सुदैवाने अन्य मंदिरांतील अर्पणपेटी त्यांना तोडता आली नाही.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Bharat-Pak Cricket match ke samay, UP ke ek college ke
Kashmiri vidyarthiyone Pakistan Zindabad ke nare lagaye.
- Desh ke aise gaddaronka dhikkar kare !
 जागो !
    भारत-पाक क्रिकेट मैच के समय उत्तरप्रदेश के एक कॉलेज के
कश्मिरी विद्यार्थियों ने पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाएं.
   - देश के ऐसे गद्दारों का धिक्कार करें !

मीरा रोड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

राज्यात घडणार्‍या तोडफोडीच्या वाढत्या घटना हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण !
     मुंबई - मीरा रोड येथील नया नगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. ही घटना क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यात दिसून आली. मनसे कार्यकर्त्यांचे अनधिकृत वाचनालय हटवल्याच्या कारणावरून त्यांनी बांधकाम व्यासायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. या कार्यकर्त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

कॅनडाची माध्यमिक शाळा मुलांना योगाचे धडे देणार !

मुलांना शाळेत योगाचे धडे देणार्‍या सातासमुद्रापलीकडील शाळेकडून भारतीय काही बोध घेतील का ?
* हिंदु धर्माची देणगी असलेल्या योगाविषयी भारतात एवढी उदासीनता का ?
* हिंदूंनो, भविष्यात हिंदु धर्मातील विविध शास्त्रांचा अभ्यास आपल्याला पाश्‍चात्त्यांकडून शिकावा लागेल,   अशी नामुष्की ओढवून घ्यायची आहे का ? अर्थात् हिंदूंना असे सांगावे लागते, हे लज्जास्पद होय !
     टोरांटो (कॅनडा) - येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे नाव देण्यात आले असून या विषयाचे शिक्षण एकूण १२० घंटे देण्यात येईल. यामध्ये योगाची तत्त्वे आणि अभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसूत्र, संस्कृत परिभाषा, ध्यानधारणेचे आध्यात्मिक लाभ, मंत्र पठण, योग सूत्रांचे पठण, आयुर्वेद इत्यादी विषय शिकवले जाणार आहेत. या अभ्यासक्रमात स्वयं-शोध आणि स्वत:ला प्रतिबिंबीत करण्याचे मार्ग यांचाही समावेश आहे. (विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासह योगाची जोड दिली जाण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यासाठी सेन्ट्रल ओकानागन शाळेचे अभिनंदन ! या उदाहरणातून तरी केंद्रशासनाने तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्वेषी विरोधकांच्या विरोधाला तुडवून मुलांना सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि त्यांच्या जीवनात अमुलाग्र पालट घडवून आणण्यास सक्षम असणार्‍या योगाचे शिक्षण भारतभरातील शाळा-महाविद्यालयांत अनिवार्य करावे, ही अपेक्षा ! - संपादक)

हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करणार ! - नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे, 
हे थापा आणि त्यांच्या मंत्र्यांना ज्या दिवशी लक्षात येईल, तो सुदिन !
हिंदूंच्या धर्मांतराविषयीही चिंता व्यक्त !
     काठमांडू (नेपाळ) - घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले. नेपाळमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांना आलेली मरगळ खेदजनक असून त्यावर उपाययोजना करण्यात येईल, असेही थापा म्हणाले.
श्री. थापा यांच्या भाषणातील निवडक सूत्रे - 
१. नेपाळमधील ९० टक्क्यांहून अधिक जनता हिंदु असली तरी तिचा आवाज योग्य रितीने ऐकला जात नाही. (उपपंतप्रधानांना उशिरा आलेली उपरती ! गेल्या वर्षी संविधान सभेने घेतलेल्या जनमतामध्ये ९५ टक्के जनतेने नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचा कौल दिला होता. त्यामुळे थापा आतातरी यावर विचार करतील, अशी आशा आहे. - संपादक) इतर धर्मियांनी एकमेकांच्या धर्मांचा आदर करून आयुष्यातील प्रत्येक मार्गावर सहजीवनाचा आदर्श निर्माण करावा.
२. नेपाळमध्ये विदेशी संस्कृती आणि धर्म यांच्या वाढीविषयी चिंता व्यक्त करून श्री. थापा म्हणाले, गरीब नेपाळी जनतेच्या गरिबीचा अपलाभ घेऊन त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भोळ्या जनतेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेणार्‍यांवर कारवाई केली जाईल. (भारतीय राज्यकर्ते यातून बोध घेतील का ? - संपादक)

सिरियात ५ वर्षांनंतर युद्धबंदीमुळे शांती !

    बैरूत - सिरियात युद्धबंदी लागू झाली आहे. त्यामुळे पश्‍चिम, तसेच उत्तरेकडील प्रांतातील युद्ध अखेर पाच वर्षांनंतर थंडावले. अमेरिका आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील कार्यगट युद्धबंदीवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. 
   सिरियातील युद्धात आतापर्यंत अडीच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. १ कोटी १० लाख लोक बेघर झाले. संयुक्त राष्ट्राने गेल्या पाच वर्षांपासून चालू असलेले युद्ध थंडावल्याने हे आशादायी चिन्ह असल्याचे म्हटले आहे. सिरिया शासन आणि बंडखोरांनी हा युद्धबंदीचे पालन केले जाईल, असे मान्य केले आहे; परंतु इसिस, नुसरा फ्रंट यांवर आक्रमण करण्यास या प्रस्तावातून सूट देण्यात आली आहे. नुसरा फ्रंटने राष्ट्राध्यक्ष असद शासनाच्या सैनिकांवर आक्रमण आणखी वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
    अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने इसिसचे आतंकवादी ज्या ठिकाणी दडून बसतात, त्या सिरियातील तळांना लक्ष्य केले.

गैर-आतंकवादी राष्ट्रद्रोह्यांच्या माध्यमातून पाकिस्तानची भारताविरुद्ध दुसरी आघाडी !

     श्री. माधव नलपत हे प्रख्यात भारतीय अभ्यासक आणि स्तंभलेखक असून सध्या संडे गार्डियन आणि आयटीव्ही समूहाचे संपादकीय संचालक आहेत. तसेच मणीपाल विश्‍वविद्यालयाच्या अनेक अभ्यासनांवर नियुक्त आहेत. जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात ९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या लेखाचा संक्षिप्त भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील घटना ही भारतात अस्थिरता पसरवण्याच्या 
पाकच्या सैन्य मुख्यालयाच्या कटाचाच एक भाग !
     पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयाने भारताला संपवण्यासाठी आतंकवादी आक्रमणासमवेतच ठिकठिकाणी सहस्रो बंडसदृश्य स्थिती निर्माण करण्याचा कट रचला आहे. त्यासाठी गैरआतंकवादी (आतंकवाद्यांशी थेट संबंध नसलेल्या) राष्ट्र्रद्रोह्यांना प्रवृत्त करून भारतातील शासन यंत्रणा खिळखिळी करणे आणि त्यायोगे भारताची आर्थिक स्थिती ढासळून शेवटी या देशाला संपवणे, असे या कटाचे उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात ९ फेब्रुवारी या दिवशी मूठभर विद्यार्थ्यांना हाताशी धरून भारताच्या विभाजनाच्या आणि काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा म्हणवून घेणे आणि त्याद्वारे भारतात अस्थिरता पसरवणे, हा त्याच कटाचा एक भाग आहे. वर्ष १९३० मध्येही अशीच परिस्थिती निर्माण करून नंतर पाकिस्तानची निर्मिती करण्यात मुसलमानांना यश आले. देहलीतील घटनेचा भारतीय जनमानसावर होणारा परिणाम मात्र काही अतीउत्साही राष्ट्रप्रेमींनी न्यायालय परिसरात राष्ट्रद्रोह्यांना केलेल्या मारहाणीमुळे मवाळ झाला.

देशद्रोही तेव्हाचे आणि आताचे !

कु. मधुरा गद्रे
     गेल्या काही दिवसांत ऐकतो आहोत, देशाच्या राजधानीतून देशाविरूद्ध दिल्या जाणार्‍या घोषणा आणि आंदोलनांच्या बातम्या. त्या ऐकून एक विचार आला. या घोषणा देणार्‍यांना देशद्रोही ठरवले आणि कायद्याने त्यांना शिक्षा होईलच; पण देशद्रोह करणार्‍यांवर वचक बसेल, असे काही शासन त्यांना करण्यास कोणी धजावेल का ?
देशप्रेम नसणारे विद्यार्थी
     आताच काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी झाली. ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा मिळालेले क्रांतीकारक. इंग्रज शासनानेही त्यांना देशद्रोहीच ठरवलेले होते. त्यांनी देशद्रोह म्हणजे एवढेच केले की, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यलढा चालू केला. पण देहलीत घोषणाबाजी करणारे आणि त्यांचे समर्थन करणारे यांच्याकडे यापैकी कोणतेच कारण नाही. देश आपलाच आहे आणि तो स्वतंत्र्यही आहेच. अर्थात् त्यांपैकी कोण या देशाला आपले मानत असेल तर ना..!

कचर्‍याचा प्रश्‍न !

     भविष्यातील कचर्‍याची समस्या लक्षात घेता, कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी जोपर्यंत अद्यावत यंत्रणेने सुसज्ज असा प्रकल्प चालू होणार नाही तोपर्यंत मुंबई आणि उपनगरातील सर्व नवी निवासी आणि व्यापारी बांधकामे होऊ देणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुस्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार ! नाक दाबल्याविना तोंड उघडत नाही तीच युक्ती न्यायालयास लढवावी लागली आहेे. न्यायालयाने त्यांच्या या आदेशातून सरकारी योजना असलेल्या प्रकल्पांसमवेत आरोग्य महाविद्यालये, शासकीय योजना असलेले पुनर्विकास प्रकल्प, म्हाडा, शिक्षण आणि आरोग्य संबंधी बांधकामांना अभय दिले आहे. कचर्‍यापासून वीजनिर्मिती, जळाऊ इंधन बनवणे शक्य आहे. त्याविषयी त्या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे हितावह होईल. या सूत्रास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यातील वीज, इंधनाची आवश्यकता भलेही सावकाशपणे पूर्ण होईल; पण टाकाऊपासून उपयुक्त गोष्टींच्या निर्मितीकडे आपण पाऊल टाकलेले असेल. त्यास बदलत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता येईल.

हे व्हायचेच होते !

श्री. भाऊ तोरसेकर
     १४ फेब्रुवारीला एका मित्राने मला तीन वर्षे जुना माझाच एक लेख आठवण म्हणून पाठवला. माझा तीन वर्षे जुना लेख चक्क राजकीय विश्‍लेषणाचा लेख आहे; पण योगायोगाने त्यात मी जो धोका सूचित केला होता, त्याची प्रचीती आता येते आहे. तो लेख मी महंमद अफझलच्या फाशीनंतरच्या एका घटनेवर लिहिला होता. त्यावर तेव्हा ज्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्याचा उहापोह करतांना काय भयंकर परिस्थिती येऊ शकेल, त्याविषयी विवरण केले होते. काय घटना होती ? अफझलच्या फाशीनंतर उत्तरप्रदेशच्या अलिगड मुस्लिम विद्यापिठात काही विद्यार्थ्यांनी आम्ही सारे अफझल गुरु, असे फलक झळकवत निदर्शने केली होती. त्याविषयी मुख्य प्रवाहातील माध्यमांनी पूर्ण मौन पाळले होते. किरकोळ वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या वगळता कुठल्या वाहिनीने त्याची दखलही घेणे आवश्यक मानले नव्हते. कोणी त्यावर कुठली कारवाई केली नव्हती कि त्यात कसला धोका असल्याची ओरड करण्याची कोणाला आवश्यकता वाटली नव्हती. आज तो व्हायरस देहलीच्या नेहरू विद्यापिठात येऊन पोचला आहे. तेव्हा अलिगडमध्ये बंदोबस्त केला नाही, म्हणूनच त्याची लागण अन्यत्र इतक्या झपाट्याने होऊ शकली ना ?

अर्थसंकल्पाचे तरी वाचन राष्ट्रीय भाषेतूनच व्हावे !

     मा. केंद्रीय अर्थमंत्री महोदयांनी २९ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला. शासनाने यंदा शेतकर्‍यांना भरभरून दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तथापि या अर्थसंकल्पात पुढील गोष्टी खटकल्या.
१. या अर्थसंकल्पाचे वाचन इंग्रजी भाषेतून करण्यात आले. तेव्हा मनात प्रश्‍न निर्माण झाला की, शेतकरी हा केंद्रबिंदू असलेला अर्थसंकल्प इंग्रजी भाषेतून कशासाठी मांडायचा ? तो राष्ट्रीय भाषेतून मांडता आला नसता का ? जेणेकरून साध्याभोळ्या शेतकर्‍यांना कळू शकला असता. निदान अर्थसंकल्पाचे तरी वाचन राष्ट्रीय भाषेतूनच व्हावे, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे.
२. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे; मात्र मंत्रीमहोदयांनी पावणेदोन घंटे अर्थसंकल्प मांडला आणि लगेचच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. आधीच विरोधकांच्या गदारोळामुळे अनेक विधेयके आणि महत्त्वाचे कामकाज प्रलंबित रहात असल्याचे शासनच सांगत आहे. असे असतांना अर्थसंकल्प मांडण्याच्या व्यतिरिक्त दिवसभर अन्य कामकाज करता आले नसते का ?
- एक वाचक

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! - श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

श्री. नितीन सहकारी यांना झालेल्या अपघाताच्या प्रसंगाचे प.पू. पांडे महाराज यांनी केलेले अध्यात्मशास्त्रीय विवरण

प.पू. पांडे महाराज
     सनातनचे साधक श्री. नितीन सहकारी यांना झालेल्या अपघाताविषयी दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई आवृत्तीमध्ये २२.१०.२०१५ या दिवशी माहिती प्रसिद्ध झाली होती. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे होती. 
१. श्री. नितीन सहकारी यांना झालेला अपघात आणि आलेल्या अनुभूती 
     श्री. नितीन सहकारी हे सनातन संस्थेचे साधक असून ते जहाजावर अधिकारी पदावर नोकरी करतात. त्यांच्या आस्थापनाचे (कंपनीचे) मुख्य कार्यालय सायप्रस या देशात आहे. ते तेथून २८.३.२०१५ या दिवशी जहाजातून तुर्कस्तानला निघाले असतांना वाटेत बैरुत या देशाच्या जवळ असतांना त्यांच्या जहाजात इंधन गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इंजिनचे एक्झॉस्ट तापमान ४५० ते ५०० अंश सेल्सियस होते. त्याच्या वाफा अत्युच्च तापमान दर्शवत होत्या. त्या खोलीत गळालेल्या इंधनाचा ८ ते १० इंच थर जमा झाला होता. अशा वेळी इंधनाचे एक्झॉस्ट बंद करणे आवश्यक होते, अन्यथा जहाजाच्या ठिकर्‍या उडून जहाज उद्ध्वस्त झाले असते. अशा स्थितीत श्री. नितीन सहकारी यांनी धाडस करून त्या तप्त इंधनाच्या थरातून चालत जाऊन तेथील कामगारांना इंजिन बंद करण्याची सूचना दिली. त्यांनी ते इंजिन बंद केल्याने पुढचा धोका टळला.

देवाच्या अवतार रहस्याविषयी महर्षींचे भाष्य

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. महर्षींनी एका नाडीवाचनात देवाच्या अवताराविषयी असलेल्या रहस्यासंदर्भात चार शब्द सांगणे 
     देवाच्या अवतार घेण्याविषयी महर्षि म्हणतात - देव अवतार घेतो, हे सर्वांना कळत नाही. तो सर्वकाही रहस्यमय ठेवतो. त्यातील रहस्य काही अंश जरी उलगडले, तरी त्यातून भक्तांना, देवतांना, ऋषीमुनींना आनंद होतो. देव असे का करतो ?, तर केवळ भक्तांना आनंद देण्यासाठी. त्याचे अवतारत्व हे तो रहस्य ठेवतो, तेही भक्तांना आनंद देण्यासाठी. अवतारत्वाचे रहस्य न उलगडण्यातच सर्वांचे भले आणि आनंद दडलेला असल्याने देव सर्वांना हवाहवासा वाटतो. यावरून पुढील सूत्रे लक्षात आली.

प.पू. डॉक्टरांना ओळखणे, हे साधकांचे दायित्व !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
       प.पू. डॉक्टरांनी ४.२.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला माझ्या संदर्भातील लेख वाचून आता कुठे पू. गाडगीळकाकांची ओळख व्हायला आरंभ झाला आहे, असे मला वाटले, असे म्हटले आहे. खरेतर प.पू. डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना ओळखल्यानेच आम्हाला त्यांच्या छत्रछायेखाली साधना करण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांनी आम्हाला ओळखणे म्हणजे आमच्यावर कृपा करणे. आता आम्हा साधकांचे दायित्व आहे की, आम्ही प.पू. डॉक्टरांना पूर्णतः ओळखून, ध्यानी-मनी-चित्ती त्यांना ठेवून आणि साधनेद्वारे त्यांना प्रसन्न करून त्यांची प्राप्ती करून घ्यावी. तसे व्हावे, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. 
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०१६)

संतांच्या प्रत्येक कृतीमागे काहीना काही कार्यकारणभाव असतो, या वाक्याची देवाने साधिकेला दिलेली प्रचीती !

पू. (कु.) स्वाती खाडये
१. वसंतपंचमीला पू. (कु.) स्वाती खाडये यांनी अल्पाहारासाठी शिरा 
बनवण्यास सांगणे आणि त्याच दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा 
प्रकटदिन असल्याने नंतर उर्वरित शिरा सर्व साधकांना प्रसाद म्हणून देणे 
     ११ आणि १२.२.२०१६ या दिवशी पुणे येथे २ दिवसांचे एक राज्यस्तरीय शिबीर होते. सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये या शिबिराला उपस्थित होत्या. वसंतपंचमी (१२.२.२०१६) या दिवशी त्यांनी त्यांच्यासाठी सकाळचा अल्पाहार म्हणून शिरा बनवण्यास सांगितले आणि त्यात केळी अन् दूध घालण्यासही अनुमती दिली. त्यांनी अल्पाहार केल्यानंतर उर्वरित शिरा सर्व शिबिरार्थी साधकांना सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने प्रसाद म्हणून दुपारच्या भोजनानंतर देण्यात आला. गोपींप्रमाणे सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणार्‍या सनातनच्या साधिका कु. दीपाली मतकर यांनी हा शिर्‍याचा प्रसाद बनवला होता. मला हा प्रसाद घेतांना यात श्रीकृष्णाप्रतीचा भाव ओतप्रोत भरला आहे आणि जणूकाही घरी सत्यनारायणाची पूजाच आहे, असे वाटत होते.

भगवान श्रीधरस्वामी महाराज यांनी १२ मास मौनव्रत करण्यासंबंधी प.पू. दास महाराजांना स्वप्नदृष्टान्ताद्वारे केलेले मार्गदर्शन आणि त्यानुसार मौनव्रत निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराजांनी सर्व देवता आणि संत यांना केलेली प्रार्थना !

प.पू. दास महाराज
    माझे पहिले गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज यांनी (रविवार, रथसप्तमी) १४.२.२०१६ या दिवशी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या कालावधीत स्वप्नात येऊन दर्शन दिले. आयुष्यात त्यांनी हा पहिल्यांदाच स्वप्नदृष्टांत दिला. त्या वेळी त्यांनी मला मौनव्रत करण्यासंबंधी केलेले मार्गदर्शन आणि ते व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी सर्व देवता आणि संत यांना मी केलेली प्रार्थना पुढे देत आहे.
१. भगवान श्रीधरस्वामी महाराज यांनी स्वप्नदृष्टान्ताद्वारे
दर्शन देणे आणि त्या प्रसंगी त्यांना प्रार्थना करून हिंदु राष्ट्राच्या
स्थापनेतील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी स्वतः काय करावे ?, असे विचारणे
    भगवान श्रीधरस्वामी महाराज यांनी दिलेला स्वप्नदृष्टांत असा होता, मी स्वामींची सेवा करत आहे. या वेळी स्वामींना माझ्याकडून नकळत प्रार्थना झाली, गुरुदेव, आदिनारायण भगवान श्रीहरि विष्णु हे परात्पर गुरु डॉ. आठवले या नावाने धर्मसंस्थापनेसाठी अवतरित झाले आहेत. त्यांनी रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प केला आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती स्थापन करून त्यांनी या कार्याला गती दिली आहे. वास्तवात त्यांच्या संकल्पातून अनंत कोटी ब्रह्मांडे उत्पन्न झाली आहेत. या लहानशा पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे काहीही अवघड नाही; पण या माध्यमातून साधकांचा उद्धार करायचा आहे. आपण अंतर्यामी आहात, सर्व जाणता. (हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती प.पू. दास महाराजांचा असलेला उत्कट भाव होय. - संपादक) भगवंताच्या या कार्यात असंख्य आसुरी शक्ती अडथळा आणत आहेत. अशा स्थितीत माझ्याकडून काय होणे अपेक्षित आहे ?, हे आपण सुचवा.

साधकांनो, विहंगम मार्गाने प्रगती करण्यासाठी साहाय्यक ठरणार्‍या आध्यात्मिक मैत्रीद्वारे मनमोकळेपणा वृद्धींगत करा आणि आनंदाचे डोही आनंद तरंग या उक्तीची अनुभूती घ्या !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
      संकल्प-विकल्प हे मनाचे कार्य असल्याने मनात योग्य-अयोग्य विचारांची शृंखला चालू असणे साहजिकच आहे. बर्‍याचदा मनात नकारात्मक, तसेच अन्य अयोग्य विचार आल्यास साधक त्यावर लगेचच मात करू शकतात; पण काही वेळा त्या विचारांची तीव्रता अधिक असल्याने त्यावर ते स्वतः मात करू शकत नाहीत. त्यामुळे त्या विचारांशी संघर्ष करण्यात त्यांच्या साधनेची ऊर्जा मोठ्या प्रमाणावर खर्च होते. परिणामी त्यांच्या व्यष्टी, तसेच समष्टी साधनेवर विपरित परिणाम होतो. अशा वेळी त्यांनी मनातील सर्व विचार योग्य साधकाशी वेळोवेळी मोकळेपणाने बोलून साधनेसाठी पुढील दिशा घेणे आवश्यक असते. या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.
१. आध्यात्मिक मैत्री म्हणजे काय ? 
     मनातील अयोग्य विचाररूपी अडथळ्यांची शुद्धीयज्ञात आहुती देऊन अंतरात साधनेच्या तळमळीची ज्योत प्रज्वलित करणे आणि सतत आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करून मनमंदिरात श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवणे, यांसाठी श्रीगुरूंनी दिलेले सर्वोत्तम साधन म्हणजे आध्यात्मिक मैत्री !

रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि कविता

सौ. मंजिरी आगवेकर
१. ध्यानमंदिरात पुष्कळ आर्ततेने देवाला
आळवणारी आणि देवाकडे त्यालाच मागणारी मंजिरीताई !
      साधारण २ - ३ दिवसांपूर्वी सौ. मंजिरीताई (सौ. मंजिरी आगवेकर) ध्यानमंदिरात बसली होती. तेव्हा ती पुष्कळ आर्ततेने देवाला आळवत आहे, असे जाणवत होते. तिची आध्यात्मिक पातळी ६१ प्रतिशत झाली, त्या आधीही असेच भाव तिच्या तोंडवळ्यावर असायचे. त्यामुळे आता पातळी वाढल्यावर तिच्या तोंडवळ्यावरील तेज आणि भाव पाहून मी गमतीने तिला विचारले, आता देवाकडे तू काय मागतेस ? त्यावर तिने लगेचच त्यालाच मागते, असे उत्तर दिले. तेव्हा देवालाच देवाकडे मागणार्‍या मंजिरीताईचा अव्यक्त स्वरूपातील भाव व्यक्त झाला आणि मला तो अनुभवता आला, याविषयी कृतज्ञता वाटली.

साधकांशी जवळीक साधणारे आणि परिपूर्ण सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रेमानंद नारुलकर !

श्री. प्रेमानंद नारुलकर
१. प्रेमळ आणि मनमिळाऊ
     प्रेमानंददादा नावाप्रमाणेच प्रेमळ आहेत. ते कोणत्याही वयाच्या व्यक्तींशी जुळवून घेतात आणि समरस होतात.
२. शांत स्वरात बोलणे
     त्यांना साधकांचे सेवेविषयी सतत भ्रमणभाष येत असतात; पण ते कधीही चिडून बोलत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांचा स्वर शांतच असतो.
३. जवळीक साधणे
     आश्रमातील सर्व साधकांना दादांविषयी जवळीक वाटते. त्यांना साधक अडचण आणि सेवा सहजपणे सांगू शकतात. दादाही येता-जाता भेटणार्‍या सर्वांची प्रेमाने चौकशी करतात.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली, यातील काही उर्वरित सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे निवेदन देण्यास किंवा निदर्शन करण्यातही सहभागी न होणारे हिंदू, तर कुठे जिहादसाठी प्राण अर्पण करण्यास सिद्ध असलेले मुसलमान !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मंत्रजपाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विकासाचा (अर्थ)संकल्प !

संपादकीय
     भष्टाचाराची बजबजपुरी आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत न पोहोचल्याने स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांत निसर्ग आणि मनुष्यबळ संपन्न भारताचा अपेक्षित आर्थिक विकास झाला नाही. काँग्रेस शासनाची गरिबी हटाओची घोषणा केवळ भाषणापुरती होती. भाजपची विचारधारा काँग्रेसच्या तुलनेत या मातीशी, संस्कृतीशी, राष्ट्रवादी प्रवाहाशी अधिक जुळलेली असल्यामुळे साहजिकच भाजप त्याची आर्थिक धोरणे राबवतांना त्याच्यावर त्याचा परिणाम होणे अपेक्षित आहे. हा परिणाम जेटलींच्या या तिसर्‍या अर्थसंकल्पातून जाणवत आहे. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn