माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांचा आणखी एक गौप्यस्फोट
हिंदूंना भगवे आतंकवादी ठरवून जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या
देशद्रोही काँग्रेसवर बंदी घाला आणि त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबा !
नवी देहली - आतंकवादी इशरत जहाँ चकमक प्रकरणी दोन दिवसांपूर्वी गौप्यस्फोट करणारे माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी आणखी एक दावा केला आहे. इशरत ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनातील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्रशासनाच्या प्रतिज्ञापत्रात पालट केले होते, असा गौप्यस्फोट पिल्लाई यांनी केला आहे. चिदंबरम् यांनी या विषयावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पिल्लाई यांनी याआधीही इशरतप्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे म्हटले होते.१. पिल्लाई एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरत आणि तिचे साथीदार लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे नमूद होते; परंतु त्यात पालट झाल्यानंतरच या प्रकरणाची धारिका (फाइल) माझ्याकडे आली.
२. याआधी पिल्लाई यांनी म्हटले होते की, इशरत लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याचे उघड व्हावे, असे काही जणांना वाटत नव्हते.
३. इशरत आणि तिच्या साथीदारांविषयीची माहिती मिळवून तिला शोधून काढणे, हे गुप्तचर यंत्रणेचे मोठे यश होते.