Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

स्वा. सावरकर पुण्यस्मरण (दिनांकानुसार)

भाडेवाढ न करणारा रेल्वे अर्थसंकल्प !

 •  चार नवीन गाड्यांची घोषणा
 •  पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर
 •  वैभववाडी-कोल्हापूर गाडीला मान्यता
 •  वर्ष २०२० पर्यंत वेळेत गाड्या चालवण्याची योजना
 •  तिकीट रहित करण्यासाठी १३९ क्रमांकाची सुविधा
 •  मुंबईतील पश्‍चिम आणि हार्बर रेल्वे उन्नत लोकल मार्ग होणार
    नवी देहली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी २५ फेब्रुवारीला प्रवासी आणि मालवाहतूक यांत कोणतीही भाडेवाढ न करणारा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. या आर्थिक वर्षात रेल्वे ८ सहस्र ७२० कोटी रुपयांची बचत करील, असाही तर्कही त्यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात अधिकाधिक पायाभूत सुविधा आणि विकास यांवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेतील स्वच्छता, अद्ययावत् तंत्रज्ञानाच्या वापरासह लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच विचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही सुरेश प्रभु यांनी कोणत्याही नव्या रेल्वेगाडीची घोषणा केलेली नव्हती आणि पायाभूत सुविधांवर भर दिला होता.

(म्हणे) महंमद अफझलचा संसदेवरील आक्रमणातील सहभाग निःसंदिग्ध नव्हता !

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्याकडून देशद्रोह्याची वकिली !
 • देशद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या काँग्रेसमुळेच देशात जिहादी आतंकवाद फोफावला असून तो नष्ट करण्यासाठी प्रथम काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवावे लागेल !
 • साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदी हिंदुत्ववादी निरपराध असतांना त्यांना जाणीवपूर्वक कारागृहात डांबणार्‍या काँग्रेसवाल्यांची देशभक्ती !
     नवी देहली - प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर महंमद अफझल याच्या वर्ष २००१ मधील संसदेवरील आक्रमणातील सहभागाविषयी खरोखर संशय होता, त्याचा सहभाग नि:संदिग्ध होता, असे म्हणता येणार नाही. शासनामध्ये असतांना असे म्हणता येत नाही; कारण शासन म्हणून तुम्हीच त्याच्यावर खटला भरलेला असतो. तथापि एक तटस्थ व्यक्ती या नात्याने या खटल्याचा निकाल योग्य नव्हता, असे मत बाळगता येते, असे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांचे मत एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

(म्हणे) मुसलमानांवर होत असलेली दादागिरी न रोखल्यास काश्मीर भारताच्या हातातून निसटेल !

फारुक अब्दुल्ला यांचे देशाचे तुकडे करण्यास प्रोत्साहन देणारे संतापजनक विधान !
देशाला अशी धमकी देणारे देशद्रोहीच होत ! त्यांना केंद्रशासनाने
त्यांची जागा दाखवून द्यावी, हीच जनतेची अपेक्षा !
    श्रीनगर - देशातील मुसलमान नागरिकांना संशयी नजरेने पहाणे न थांबवल्यास आणि बहुसंख्यांकांकडून अल्पसंख्यांकांवर होत असलेली दादागिरी न रोखल्यास काश्मीर भारताच्या हातातून निसटायला वेळ लागणार नाही, असे संतापजनक विधान माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केले आहे. (देशाचे आणखी तुकडे करण्याच्या दुष्ट हेतुने केलेले हे विधान केवळ देशविघातकच नव्हे, तर हिंदूंना अत्याचारी दाखवण्याचा प्रयत्न होय ! या घरभेद्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही का ? - संपादक) नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले.

हिंदुद्वेषी मुंबई मिरर दैनिकातून सनातन संस्थेच्या विरोधात धादांत खोटे वृत्त प्रसिद्ध !

वृत्तात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडी खोटी वाक्ये घालण्याचा संतापजनक प्रकार
अशी सुपारीबाज पत्रकारिता करण्याविरुद्ध प्रेस काऊन्सिल
ऑफ इंडिया स्वतःहून नोंद घेऊन (सुओमोटो) कारवाई करील का ?
     मुंबई, २५ फेब्रुवारी - मुंबई मिरर या हिंदुद्वेषी दैनिकाने २५.२.२०१६ या दिवशीच्या अंकात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अपकीर्ती करणारे धादांत खोटे वृत्त पहिल्या पृष्ठावर प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) एका अहवालाचा दाखला देत तीन हत्या झाल्या असून चौथ्या हत्येची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे धादांत खोटे विधान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडी घातले आहे. या वृत्ताच्या मथळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सनातन संस्थेचे टॉप बॉस अशा अश्‍लाघ्य शब्दांत उल्लेख करून अनादर केला आहे. (हिंदु संतांचा आदर करण्याचे कोणतेच सोयरसूतक नसलेल्या मुंबई मिररचा निषेध करावा तितका थोडाच ! - संपादक)

युवतीचे धर्मांतर करण्यासाठीच विवाहाचे षड्यंत्र ! - युवतीच्या नातेवाइकांचा आरोप

लव्ह जिहाद नंतर आता ख्रिस्त्यांचीही हिंदु मुलींकडे वक्रदृष्टी !
विवाहित ख्रिस्ती युवकाकडून हिंदु युवतीशी विवाह 
     लखनौ (लक्ष्मणपुरी) - गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. (लव्ह जिहाद नंतर आता ख्रिस्तीही हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करू लागल्यास हिंदूंना सावध होण्याची वेळ आली आहे ! - संपादक) 
     मुलीच्या भावाने सांगितले, २७ वर्षीय बहीण एका स्थानिक कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. १२ जानेवारीला ती शिकवणी वर्गाला गेली. तेव्हापासून ती परतली नाही. काही दिवसांनंतर आम्हाला कळले की, तिचा सहकारी शिक्षक आशिष जोजेफ याने तिच्याशी दुसरा विवाह करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले आहे. त्यानंतर आशिष जोजेफ याने धर्मांतर केले आणि आशिष आर्य बनून तिच्याशी लखनौच्या अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात विवाह केला, विवाह हे षड्यंत्र असून आशिष आणि त्याच्या सहकारी यांना युवतीचे धर्मांतर करायचे आहे, असा आरोपही युवतीच्या नातेवाइकांनी केला आहे.

मुंबई मिरर दैनिकात सनातन संस्थेच्या विरोधात प्रसिद्ध झालेले वृत्त धादांत खोटे ! - सनातन संस्था

सनातन संस्था मुंबई मिरर, अलका धूपकर आणि
धर्मेंद्र तिवारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार
    मुंबई - मुंबई मिरर या हिंदुद्वेषी दैनिकात सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेंद्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपकीर्ती करणारे वृत्त पहिल्या पानावर प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका अहवालाचा (खोटा) दाखला देत तीन हत्या झाल्या असून चौथी हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे धादांत खोटे विधान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडी घातले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे कोणतेही विधान केले नसल्याचा खुलासा सनातन संस्था करत आहे.
    आजपर्यंत सीबीआयचे अधिकारी ज्या-ज्या वेळी आश्रमात आले, त्या त्या वेळी त्यांनी जी माहिती मागितली आणि जे जे प्रश्‍न विचारले, त्यांची समाधानकारक उत्तरे संस्थेने दिलेली आहेत. असे असतांना आध्यात्मिक गुरूंच्या तोंडी तद्दन खोटे विधान घालून सनसनाटी निर्माण करण्याचा आणि गोंधळ माजवण्याचा प्रयत्न धूपकर आणि तिवारी या पत्रकारकंपूकडून केला जात आहे.

कोलकातामध्ये भुतांच्या शोधासाठी घोस्ट वॉक !

आता अंनिसवाले कुठे आहेत ? हिंदूंना प्रतिगामी आणि अंधश्रद्ध ठरवणारे आता विदेशींनीच 
घोस्ट वॉक केल्यावर त्यांनाही प्रतिगामी आणि बुरसटलेले म्हणणार का ?
     कोलकाता - विदेशातील इडनबर्ग, न्यू ऑरलेन्स आणि सिडनी यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घोस्ट वॉक मोठ्या प्रमाणावर होतात. आता कोलकातामध्येही असा प्रयत्न चालू झाले आहेत. स्कॉटलंड येथील अ‍ॅन्थनी अहॅचट्युरियन यांनी भुतांचा शोध घेण्याचा चंग बांधला आहे. हा प्रयत्न प्रथमच होत असून त्यासाठी त्यांनी भारतातील कोलकाता शहर निवडले आहे.
    अ‍ॅन्थनी अहॅचट्युरियन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काही जुन्या इमारतींमध्ये भुतांचा शोध घेत आहेत. अ‍ॅन्थनी हे जॉनेस कॅरापाईट गॅलस्टॉन यांचे वंशज आहेत. जॉनेस यांनी कोलकातामध्ये अनेक पुरातन (हेरिटेज) इमारती बांधल्या होत्या.

कृष्णमुरारी मिश्र यांची २० वर्षीय मुलगी ६ मासांपासून बेपत्ता

लोकराज्यात सर्वसामान्यांना न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. 
त्यामुळे आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

 • जमशेदपूर येथे मुलीच्या शोधासाठी पित्याचे धरणे
 • पोलिसांपासून राष्ट्रपतींपर्यंत साहाय्याची मागणी !
 • न्याय न मिळाल्यास मिश्र यांची आत्महत्येची चेतावणी
     जमशेदपूर (गुजरात) - बेपत्ता मुलीचा पोलिसांनी शोध घ्यावा, यासाठी आझादनगर येथील सनातन प्रभातचे वाचक श्री. कृष्णमुरारी मिश्र धरणे आंदोलन करत आहेत. त्यांची २० वर्षीय मुलगी निधी ६ मासांपासून बेपत्ता असून तिचे अपहरण झाल्याची शक्यता आहे.
   श्री. मिश्र यांनी मुलीच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांपासून राष्ट्रपतींपर्यंत सर्वांना विनंती केली; परंतु कोणाकडूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे मुलीचा शोध न लागल्यास मिश्र यांनी आत्महत्या करण्याची चेतावणी दिली आहे.

अभिनेता संजय दत्तची सुटका !

मी आतंकवादी नाही, देश सोडून कुठेही जाणार नाही ! - संजय दत्त
    मुंबई - अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारीला कारागृहातून सुटका झाली. पुण्याहून मुंबईत घरी आल्यावर दुपारी त्याने पत्रकार परिषद घेतली. या वेळी संजय दत्त म्हणाला की, माझे या देशावर प्रेम आहे. मी आतंकवादी नाही. मी माझा देश सोडून कुठेही जाणार नाही. तिरंगा माझा अभिमान आहे. त्यामुळेच मी माझी शिक्षा पूर्ण केली.
    सकाळी साडेआठच्या सुमारास संजय दत्त कारागृहाबाहेर आला. या वेळी प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्याशी काहीही न बोलता तो गाडीत बसून विमानतळाकडे निघाला. याच वेळी संजय दत्तच्या सुटकेचा निषेध करण्यासाठी काही लोक कारागृहाबाहेर जमले होते; मात्र निदर्शने आणि घोषणाबाजी चालू करताच पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे पुणे पोलीस ! - संपादक) संजयने ५ वर्षांच्या शिक्षेपैकी १८ मासांची शिक्षा अटकेत असतांना आधीच भोगली होती. उर्वरित साडेतीन वर्षांतील ८ मास शिल्लक असतांनाच त्याची कथित चांगल्या वागणुकीमुळे सुटका करण्यात आली. दुसरीकडे संजय दत्त याने नेमकी कोणती चांगली वर्तणूक केली याची माहिती मिळण्यासाठी मुंबईतील एका अधिवक्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हिंदु राष्ट्रातच अहिंदु सुखी रहातील ! - अभिनेता शरद पोंक्षे

श्री. शरद पोंक्षे
    संभाजीनगर, २५ फेब्रुवारी - जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच संस्कृत भाषा, भारतीय दिनदर्शिका आणि वन्दे मातरम् यांना डावलले गेले. त्यामुळे आतापर्यंत खोटा इतिहास शिकवला गेला. सद्यस्थितीत सर्व हिंदू एकत्र आल्याविना हिंदूंना जगता येणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
    हिंदु सभेचे जनुभाऊ रानडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रहित जनाधार विश्‍वस्त मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते राष्ट्रगीत या विषयावर बोलत होते. या वेळी विहिंपचे प्रांताध्यक्ष श्री. संजय बारगणे, मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी शेरकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हिंसाचारी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार्‍यांकडून हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना धक्काबुक्की !

जनतेच्या संपत्तीचे रक्षण करू न शकणार्‍या
राज्यकर्त्यांना जनतेने खडसवल्यास आश्‍चर्य ते काय !
    रोहतक (हरियाणा) - हरियाणातील जाट आंदोलनात हिंसाचारामुळे देशाची ३४ सहस्र कोटी रुपयांची हानी केली. राज्यात रोहतक जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली. यावर संतप्त झालेल्या नागरिकांनी २४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना काळे झेंडे दाखवले. तसेच स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री खट्टर यांना धक्काबुक्की केली. जाट समाजाचे प्राबल्य असलेल्या रोहतकमध्ये खट्टर यांच्या गाडीला स्थानिक नागरिकांनी घेराव घालत त्यांच्यावर प्रश्‍नांचा मारा केला. सार्वजनिक आणि खासगी संपत्तीची हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे खट्टर म्हणाले.
    या वेळी नागरिकांनी हरियाणा पोलीस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. आंदोलनाच्या वेळची हिंसक परिस्थिती हाताळण्यात हरियाणातील पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहरात ज्यांनी जाळपोळ करत कोट्यवधी रुपयांची हानी केली, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी या वेळी केली.

प्रयाग येथील अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांवर त्रिवेणी संगमात लघवी केल्याचा आरोप !

     प्रयाग (अलाहाबाद) - येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी ओ.पी. श्रीवास्तव यांनी येथील त्रिवेणी संगमावर (गंगा, यमुना आणि सरस्वती) लघवी केल्यामुळे नदीचे पाणी अपवित्र झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माध्यमांमधून चर्चा झाल्यावर अन्वेषणाचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीवास्तव त्रिवेणी महोत्सवाशी संबंधित एका पत्रकार परिषदेसाठी तेथे गेलेे होते. या संदर्भात श्रीवास्तव यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहे. संगमामध्ये केवळ हात धुतले आणि पॅन्ट नीट केली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

देहली येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने तणावमुक्तीसाठी प्रवचन

प्रवचन घेतांना संतकृपा प्रतिष्ठानच्या कु. कृतिका खत्री आणि उपस्थित शिक्षक
      देहली - संतकृपा प्रतिष्ठान या न्यासाच्या वतीने रंगपुरी येथील केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांसाठी तणावमुक्तीसाठी काय करायचे ?, या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ विद्यालयातील २५ शिक्षकांनी घेतला. यापुढेही अशी प्रवचने घेण्यात यावीत, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली.


देशातील ख्रिस्ती समुदाय सर्वाधिक बेरोजगार असल्याचा अहवाल

पैसा अथवा नोकरीचे प्रलोभन दाखवून भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर 
करणारे ख्रिस्ती स्वत:च बेरोजगार कसे ?
     नवी देहली - शासनाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, देशातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत ख्रिस्ती अन् मुसलमान सर्वाधिक बेरोजगार आहेत, तर हिंदू आणि शिख सर्वांत अल्प बेरोजगार आहेत. 
     जुलै २०११ ते जून २०१२ या कालावधीत राष्ट्रीय नमुना अहवाल संघटनेच्या ६८ व्या पहाणीवर आधारित आकडेवारी बाजूच्या सारणीत दिली आहे.
(ही आकडेवारी पहाता, जर एखाद्या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्याने ख्रिस्ती आणि मुसलमान यांसाठी नोकर्‍यांमध्ये आरक्षण मागायला आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक)

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त अमरावती येथे वाहनफेरीचे आयोजन

वाहनफेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी
२५० वाहनांचा सहभाग
   अमरावती - येथे २८ फेब्रुवारी या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २४ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता संत गाडगेबाबा मंदिराच्या समोरील मैदानातून वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत एकूण २५० वाहनांद्वारे धर्माभिमानी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री श्यामसुंदर निचीत महाराज आणि विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश चिकटे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. श्री योगेश महाराज जोशी यांनी मंत्रोच्चार करून पूजा सांगितली. अपोलो टायर्सचे मालक आणि हिंदुत्ववादी श्री. गोपाल महावीर पटेल यांनी फेरीचे स्वागत आणि ध्वजाचे पूजन केले. तसेच सरबत आणि पाणी व्यवस्थाही उपलब्ध करून दिली. गायत्री कृषी केंद्र आणि श्री. सोमण यांनीही ध्वजाचे पूजन केले. रोहित डेअरी यांनी पाणी विनामूल्य उपलब्ध करून दिले.

मौजे नारायण चिंचोली (पंढरपूर) येथे २७ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा !

    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २५ फेब्रुवारी (वार्ता.) - पंढरपूर येथे २ मार्च या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वप्रसारानिमित्त मौजे नारायण चिंचोली, तालुका पंढरपूर येथे २७ फेब्रुवारी या दिवशी येथील श्री हनुमान मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता लहान स्वरूपाच्या हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
   सनातनचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी १७ फेब्रुवारी या दिवशी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्याशी संपर्क करून लहान स्वरूपाच्या धर्मसभेचे आयोजन केले.

(म्हणे) शांतीचा पुरस्कार करणारे लोक आतंकवाद कसा पसरवणार ?

गोव्यातील सभेत हफीज मेमन यांचा दावा !
      ठिकठिकाणी फटाक्यांप्रमाणे बॉम्ब फोडणे, सामान्यांची गळा चिरून हत्या करणे, लोकांना जिवंत जाळणे, क्षुल्लक कारणावरून तलवारी, शस्त्रे घेऊन दहशत माजवणे, दंगली भडकवणे, याला इस्लामच्या भाषेत शांती म्हणतात का ?
       म्हापसा - इस्लाम म्हणजे शांती. शांतीचा पुरस्कार करणारे लोक आतंकवाद कसा पसरवणार ? जे लोक अल्लाला मानत नाहीत, तेच लोक आतंकवाद पसरवत असतात. खरे मुसलमान हे आतंकवादाच्या विरोधात असून त्यांना शांती हवी आहे, असे प्रतिपादन श्रीलंका येथून आतंकवादाचा विरोध करण्यासाठी गोव्यात आलेले हफीज इहसान इक्बाल काद्री मेनन यांनी केले आहे. (अल्लानेच काफिरांना ठार करा ही आज्ञा दिली आहे, असे जिहादी म्हणतात, ते खोटे आहे का ? जिहाद करतांना मेल्यास जन्नत मिळते, असे आतंकवादी म्हणतात, ते खोटे आहे का ? आतापर्यंतच इस्लामचा इतिहास पाहिल्यास शांतीचा आणि इस्लामचा दुरान्वयेही संबंध लागत नाही ! - संपादक) येथील टॅक्सीस्टँडवर अहाले सुन्नवाल-जमात-म्हापसा या संघटनेने ब्रीझ ऑफ ट्रूथ (सच्चाई की हवा) या मथळ्याखाली आयोजित केलेल्या सभेत इस्लामचा आतंकवादाला विरोध या विषयावर मेमन बोलत होते.

नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून श्री. वैभव राऊत, सौ. नयना भगत, श्री. अरविंद पानसरे,
श्री. जीतेंद्र पाटील, श्री. बबलू सिंग आणि श्री. गुड्डू सिंग
    नालासोपारा, २५ फेब्रुवारी (वार्ता.) - वसई तालुक्यातील युवा पिढीला व्यसनाधीन करून देशोधडीला लावण्याचे षड्यंत्र नायजेरियन लोकांकडून केले जात आहे. या समस्येच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन भाजपचे नालासोपारा शहर अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांनी केले. येथे होणार असलेल्या धर्मजागृती सभेनिमित्त येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला विश्‍व हिंदु परिषदेचे
श्री. बबलु सिंग, हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, भारतीय युवा शक्तीचे श्री. गुड्डुसिंग, सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.
    या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. बबलू सिंग म्हणाले, वसई तालुक्यातील धर्मांतराणाच्या संदर्भात केवळ लहान मासेच गळाला लागले आहेत. अजूनही मोठे मासे इस्पितळातच आहेत. त्यांना शासन होण्यासाठी आम्ही एक होणार आहोत.
इसिसच्या वाढत्या धोक्यापासून हिंदूंना सुरक्षित करण्यासाठी मार्गदर्शक 
असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! - अरविंद पानसरे
    श्री. अरविंद पानसरे म्हणाले, इसिस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतंकवादी संघटनेने वर्ष २०२० पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे घोषित केले आहे. याचा भारतातील संपर्क प्रमुख मुदब्बीर मुश्ताक शेख अनेक वर्षे नालासोपारा येथे रहात होता. त्याने २४ हून अधिक जणांना इसिसमध्ये सहभागी होण्यास सिद्ध केले असल्याचे मान्य केले आहे. नालासोपारा येथेच रहाणारा नफीस खान हाही इसिसमध्ये सहभागी होणार असून त्याने बाँब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. इसिसचा वाढता धोका पहाता हिंदूंना सुरक्षित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. जिज्ञासू आणि धर्माभिमानी जनतेने सभेला उपस्थित रहावे.
नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभा
स्थळ : एच्.डी.एफ्.सी. बँकेजवळ, पाटणकर पार्कसमोर, नालासोपारा (पश्‍चिम)
वार आणि दिनांक : रविवार, २८ फेब्रुवारी २०१६ वेळ : सायं. ५.३० वाजता
मान्यवर वक्ते : इंडिया अगेंस्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळाचे संपादक श्री. पारस राजपूत, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके

अभाविपच्या वतीने पंढरपूर येथे जेएन्यूमधील देशद्रोही कृत्यांच्या निषेधार्थ मोर्चा

    सोलापूर - अभाविपच्या वतीने पंढरपूर येथे जेएन्यूमधील देशद्रोही कृत्यांचा निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौक ते सावरकर चौकापर्यंत काढलेल्या या मोर्च्यामध्ये ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोर्च्यामध्ये शहरमंत्री श्री. योगेश्‍वर राजपुरोहित, जिल्हा संयोजक श्री. सुदर्शन यादव, तालुका प्रमुख श्री. गुरुप्रसाद उत्पात, सोलापूरचे विभाग संघटनमंत्री श्री. विलास बोरसे, तसेच सर्वश्री सुरज मस्के, आशुतोष कटारे, शुभम कदम, प्रविण चमकेरी आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शिवभक्त प्रतिष्ठानचे सर्वश्री प्रतापसिंह साळुंखे, सौरभ थिटे, पेशवा युवा मंचाचे श्री. गणेश लंके, अतुल कुलकर्णी हेसुद्धा सहभागी झाले होते.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या प्रेरणेतून दिंडी सोहळ्याचा आरंभ

शेवगाव ते गाणगापूर पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ
दिंडी सोहळ्यास प्रारंभ करतांना मध्यभागी शरदकाका वैशंपायन (वर्तुळात),
समवेत देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन फडके, अरुण लांडे आणि अन्य साधक (छायाचित्र : सचिन सातपुते)
   शेवगाव - योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या प्रेरणेतून श्री दत्त देवस्थानने आरंभलेल्या शेवगाव ते गाणगापूर पायी दिंडी सोहळ्याचे २२ फेब्रुवारीला प्रस्थान झाले. या वेळी शरदकाका वैशंपायन यांच्या हस्ते पादुकांचे पूजनही करण्यात आले. प्रथम नगराध्यक्षा विद्या लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन फडके आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात आले.

केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५ सहस्र ५०१ सहकारी संस्थांची नोंदणी रहित

सहकार म्हणजे स्वाहाकार, असे झालेले समीकरण राज्यशासनाने पालटावे, ही अपेक्षा !
    पुणे, २५ फेब्रुवारी - कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५१ सहस्र ७४ सहकारी संस्थांपैकी ५ सहस्र ५०१ संस्थांची नोंदणी सहकार खात्याने रहित केली आहे. नोंदणी रहित करण्यात आलेल्या संस्थांपैकी ११८ संस्था पुणे जिल्ह्यातील आहेत. एकूणच नोंदणी रहित झालेल्या संस्थांमध्ये गृहनिर्माण संस्था, नागरी ग्रामीण पतपुरवठा संस्था, नागरी बँका, नोकरदार पतपुरवठादार संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी पतसंस्था आदींचाही त्यात समावेश आहे.

पम्पोर येथे भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना ठार मारल्याच्या निषेधार्थ दक्षिण काश्मीर बंद !

शासनाने अशा देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! 
 काश्मीरमधील संतापजनक घटना
    श्रीनगर - पम्पोर येथे भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना ठार मारल्याच्या निषेधार्थ दक्षिण काश्मीरच्या विविध भागांमध्ये २४ फेब्रुवारी या दिवशी बंद पाळण्यात आला. (हा भारत आहे कि पाकिस्तान ! - संपादक) आतंकवाद्यांना ठार मारल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणार्‍या लोकांना पांगवण्यासाठी पम्पोर ते पाठी चौकापर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले होते. (आतंकवाद्यांच्या पाठिराख्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! - संपादक) या चकमकीत ५ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.
१. काश्मीर विद्यापिठाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने प्रार्थना आयोजित केली होती.
२. पुलवामा, तहाब, पकरपोरा येथे सुरक्षादल आणि आतंकवाद्यांचे समर्थक तरूण यांच्यात चकमकी उडाल्या. संतप्त तरुणांनी सुरक्षादलाच्या सैनिकांवर दगडफेक केली. (अशा देशद्रोही तरुणांवर कठोर कारवाई करा ! - संपादक)

म्हैशाळ योजनेचे थकित देयक शेतकर्‍यांनी न भरल्यास योजना चालू ठेवणे कठीण ! - उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

   सांगली, २५ फेब्रुवारी (वार्ता.) शासनाला वीज तयार करणे यांपासून ती वाहून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे यांसाठी सहा रुपये प्रति युनिट इतका व्यय येतो. असे असतांना केवळ शेतकर्‍यांसाठी विशेष गोष्ट म्हणून ही वीज १ रुपया २० पैसे इतक्या अल्प दरात देण्यात येते. म्हैशाळ योजनेची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. टेंभू-ताकारी या योजनेचे वीज देयक शेतकरी भरतात, त्याप्रमाणे म्हैशाळ योजनेचेही वीज देयक शेतकर्‍यांना भरावे लागेल. गतवेळेस पाच कोटी रुपये थकबाकीपैकी केवळ साडेतीन कोटी रुपयेच भरण्यात आले. हे ठाऊक असूनही काहीजण केवळ त्याचे राजकारण करत आहेत. त्यामुळे म्हैशाळ उपसासिंचन योजनेचे थकित देयक यापुढील काळात शेतकर्‍यांनी न भरल्यास योजना चालू ठेवणे कठीण आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी ते म्हणाले....
१. सांगली, विटा, आष्टा या शहरांसाठी भुयारी मार्गे वीजवाहिन्या टाकण्यासाठी केंद्र शासनाकडून ३२ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. लवकरच ही शहरे हवेतील वाहिन्यांपासून जंजाळमुक्त दिसतील.
२. सांगली जिल्ह्याची वीजगळती १६ प्रतिशत आहे. ही स्थिती अत्यंत चांगली असून ती १४ प्रतिशतपर्यंत आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

वन्दे मातरम् आणि जन गण मन न म्हणणार्‍यांनी स्वत:ला भारतीय समजू नये ! - सी.पी. सिंह, शहर विकासमंत्री, झारखंड.

जे.एन्.यू. प्रकरण
वन्दे मातरम् आणि जन गण मन न म्हणणे देशद्रोह ठरवून त्यांना हद्दपार 
करण्याची शासनाकडे मागणी करा !
     रांची - भारतात यापुढे महंमद अफझलचा जन्मच होऊ देणार नाही. जे लोक भारतात रहातात, त्यांनी वन्दे मातरम् आणि जन गण मन म्हटले पाहिजे, जे असे म्हणणार नाही, त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकारच नाही, असे विधान झारखंडचे शहर विकासमंत्री सी.पी. सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. जे या देशाचे अन्न खातात, येथे स्वतंत्रपणे जगतात, तेच या देशाला शिव्या कशा देऊ शकतात ? हा देशद्रोहच नव्हे का ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.

सहारनपूरमध्ये धर्मांधांकडून संत रोहिदास जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक

उत्तरप्रदेशात जेव्हापासून धर्मांधप्रेमी समाजवादी पक्षाचे शासन आले आहे, जिहाद्यांना वाटत 
आहे की, ते पाकिस्तानातच रहात आहेत ! अशा जिहादींना कठोर दंड देण्यासाठी हिंदु 
धर्मप्रेमींना सत्तेवर आणले पाहिजे !
१ हिंदु ठार, एका पोलिसासह अनेक घायाळ 
     सहारनपूर - सरकुडी खुमार या गावामध्ये संत रोहिदास जयंतीच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली. या आक्रमणात एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका पोलिसासह अनेक लोक घायाळ झाले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
    संत रोहिदास जयंतीच्या निमित्ताने भाविकांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा एका मशिदीजवळ पोचल्यावर धर्मांधांनी वाद्य वाजवण्यास मज्जाव केला; मात्र शोभायात्रेत सहभागी लोकांनी वाद्य थांबवण्यास नकार दिला. त्यामुळे धर्मांधांकडून शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत हरदेवा नावाच्या ६० वर्षीय हिंदूचा जागेवरच मृत्यू झाला, तर अनेक हिंदू घायाळ झाले.

महापालिका हद्दवाढीच्या विरोधात १५ गावांचा कडकडीत बंद !

प्रशासन आणि ग्रामस्थ संघर्ष चिघळणार !
    कोल्हापूर, २५ फेब्रुवारी (वार्ता.) - कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीच्या विरोधात २५ फेब्रुवारीला १५ गावांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. हद्दवाढ विरोधात हद्दवाढ विरोधी कृती समितीने २४ फेब्रुवारी या दिवशी बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे १५ गावांनी बंद पाळला. तसेच येत्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात साखळी उपोषण आणि राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
   येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हद्दवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शहरात समावेश झाल्यानंतर कराचा बोजा पडेल, या भीतीने प्रस्तावित गावांत हद्दवाढीसाठी विरोध होत आहे. करवीर तालुक्यातील मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबा, उंचगाव, वाडीपीर, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी या गावांत २५ फेब्रुवारीला सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आला. तसेच गावांत स्थानिक नेत्यांनी सभा घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

एकाही मुसलमान युवकाला आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली कारागृहात डांबलेले नाही ! - गृहराज्यमंत्री

    हिंदूंनो, निष्पाप मुसलमान युवकांना कारागृहात टाकत असल्याची ओरड करणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू अथवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधीच आवाज उठवत नाहीत, हे लक्षात घ्या !
     नवी देहली - आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली अनेक निष्पाप मुसलमान युवकांना कारागृहात टाकल्याचा विरोधकांचा आरोप शासनाने बुधवारी फेटाळून लावला. गृहराज्यमंत्री श्री. हरिभाई पारथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत याविषयीच्या एका प्रश्‍नावर उत्तर देतांना एकाही मुसलमान युवकाला आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली कारागृहात डांबले नसल्याचे स्पष्ट केले. (मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांना चपराक ! - संपादक)

भारतातील मुसलमान चांगल्या स्थितीत !

जिहादी आतंकवाद्याची भारतातील ढोंगी निधर्म्यांना चपराक !
     भाग्यनगर - जगभरातील मुसलमान नागरिकांची स्थिती पाहता भारतातील मुसलमान खूपच चांगल्या स्थितीत आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले आहेत, असे बर्‍याच वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशात बॉम्बस्फोटाचा कट रचणारा आतंकवादी अब्दुल अझीज ऊर्फ गिद्दाह याने म्हटले आहे. (दादरीवरून भारतात असहिष्णुता वाढल्याचे ढोल बडवणारे निधर्मीवादी आता तोंड उघडणार नाहीत ! - संपादक)
    अझीज सौदी अरेबियामध्ये १० वर्षांची शिक्षा भोगून या महिन्याच्या प्रारंभी भारतात परतला आहे. सौदी अरेबियातील पूर्व भागात स्फोट घडवून आणण्याच्या कटामध्ये तो काम करत होता. विविध आतंकवादी संघटनांमध्ये तो सहभागी होता. याविषयी त्याला २००५ मध्ये सौदी अरेबियात अटक करण्यात आली होती. 

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची निवड

    पुणे, २५ फेब्रुवारी - पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे यांची निवड झाली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत प्रशांत जगताप यांना ८४ मते पडली.

गुप्तचर संस्थांना संसदेच्या देखरेखीखाली आणता येत नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - आय.बी (इंटेलिजन्स ब्यूरो), रॉ (रीसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनॅलिसिस विंग) आणि एन्.टी.आर्.ओ. (नॅशनल टेक्निकल रीसर्च ऑर्गनायझेशन) या गुप्तचर संस्थांना संसदेच्या देखरेखीखाली आणावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुप्तचर क्षेत्रात शिरून असा काही आदेश देणे, म्हणजे देशाच्या सुरक्षेला बाधा आणण्यासारखे आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेशी संबंधित कुठल्याही विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या. दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंह यांनी स्पष्ट केले.
     सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थेने दाखल केलेल्या या याचिकेमध्ये रॉ, आय.बी. आणि नॅशनल टेक्निकल रीसर्च ऑर्गनायझेशन या संस्थांना पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे संसद आणि कॅगच्या देखरेखीखाली आणावे, अशी मागणी करण्यात आली होती. या संस्थांचा राजकीय कारणांसाठी अपवापर करण्यात येतो. त्यामुळे या संस्था संसदेस उत्तरदायी असल्या पाहिजे. याविषयी या गुप्तचर संस्थांच्या माजी प्रमुखांनी लिहलेल्या पुस्तकांमध्ये उल्लेख असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.

गोव्यात मौलवीने विनयभंग केलेल्या मुलीला साहाय्य करणार्‍या तारा केरकर यांना अटक आणि सुटका !

 • मौलवीच्या पत्नीशी गैरवर्तणूक केल्याचा मुसलमानांचा कांगावा
 • शेकडो मुसलमानांचा पोलिसांवर दबाव 
वास्को येथे मौलवीने विनयभंग केल्याचे प्रकरण
    जामिनावर मुक्तता झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तारा केरकर यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.
      वास्को - शहरात दोन दिवसांपूर्वी मौलवीने एका अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याचे प्रकरण गाजत असतांना या प्रकरणाला मंगळवार सायंकाळपासून वेगळे वळण लागले आहे. विनयभंग प्रकरणी मौलवीच्या विरोधात संबंधित पीडितांनी तक्रार करावी यासाठी पुढाकार घेतलेल्या सवेरा या अशासकीय संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांनी, तसेच सुशिल कुमार या व्यक्तीने मौलवीच्या पत्नीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत शेकडो मुसलमान मंगळवार सायंकाळपासून पोलीस ठाण्यासमोर जमले. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी भारतीय दंड संहितेच्या कलम १५१ अंतर्गत तारा केरकर आणि सुशिल कुमार यांना अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (मुसलमानांची कुकृत्ये उघड करणार्‍याला छळण्याची मुसलमानांची नीती ! पोलीसही अशा धर्मांधांच्या दबावाला बळी पडतात, यावरूनच किती दडपशाही केली जात आहे, हेच लक्षात येते ! - संपादक)

लोणावळा (जिल्हा पुणे) येथून वाहतूक पोलिसाला पळवणार्‍या तीन जणांना अटक

याचा अर्थ समाजामध्ये पोलिसांविषयी वाटणारा धाक संपला कि काय ?
    पुणे, २५ फेब्रुवारी - लोणावळा शहर वाहतूक विभागातील सामील प्रकाश या पोलिसाला घेऊन ४ जणांनी खाजगी वाहनातून पलायन केले. त्यांना खंडाळा महामार्ग पोलिसांनी खालापूर पथकर नाका येथे पाठलाग करत पकडले. सद्यस्थितीत तिघांना अटक करण्यात आली असून एकाने पलायन केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या तिघांना न्यायालयात उपस्थित केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोल्हापूर-कोकण रेल्वे प्रकल्प निधी मान्यतेची अपेक्षा ! - खासदार धनंजय महाडिक

    कोल्हापूर, २५ फेब्रुवारी (वार्ता.) - मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो सिटी वगळता तुटपुंजा निधी कोल्हापूरच्या वाट्याला येतो. १२५ वर्षे जुने असणारे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वेस्थानक एक रोल मॉडेल व्हावे, यासाठी येथील रेल्वे मंत्रालयाकडे मी वारंवार पाठपुरावा केला आहे. कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रस्तावाच्या कामाला यंदा अंदाजपत्रकामध्ये रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू हे निधीची घोषणा करतील, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच नव्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचीसुद्धा अनेक वर्षांची मागणी या निमित्ताने पूर्ण होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवादाला पोषक काँग्रेसची विचारसरणी !
    महंमद अफझल याच्या संसदेवरील आक्रमणातील सहभागाविषयी खरोखर संशय होता. एक तटस्थ व्यक्ती या नात्याने या खटल्याचा निकाल योग्य नव्हता, असे मत बाळगता येते - काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्

(म्हणे) प्रसिद्धीमाध्यमांकडून मुसलमानेतरांच्या आतंकवादाकडे दुर्लक्ष !

सर्वधर्मसमभावाच्या अतिरेकामुळे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर 
यांच्याकडून जिहाद्यांची पाठराखण
     रामनाथी (गोवा), २५ फेब्रुवारी (वार्ता.) - सध्या प्रसिद्धीमाध्यमे हिंदु, शिख आदी धर्मांच्या आतंकवादी घटनांकडे दुर्लक्ष करून मुसलमानांसबंधी आतंकवादी घटनांना ठळक प्रसिद्धी देत आहेत. मुस्लिम, तालिबानी, मुजाहिदीन असे शब्द लोकांच्या मनावर ठसवून आतंकवाद हा विशिष्ट धर्माशी जोडला आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे, अशी मुक्ताफळे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उधळली.
    रामनाथी, गोवा येथे २१ फेब्रुवारीला शारदीय चंद्रकळा या कार्यक्रमात पत्रकारिता या सत्रात केतकर यांचे भाषण झाले. या वेळी दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्रीराम पचिंद्रे, दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभु, दैनिक लोकमतचे गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक, दैनिक तरुण भारतचे वरिष्ठ प्रतिनिधी श्री. सागर जावडेकर उपस्थित होते. केतकर पुढे म्हणाले,
१. पाकिस्तानमध्ये अराजक आहे. तेथे बेनझिर भुत्तो आदी नेत्यांच्या हत्या झाल्या, असे आपण म्हणतो; मात्र पाकिस्तान नव्हे, तर भारतात गांधींच्या रूपाने पहिली राजकीय हत्या झाली, हे आम्ही विसरतो. भारतातील इंदिरा गांधी, राजीव गांधी या पंतप्रधानांची, तसेच पंजाबमधील मुख्यमंत्री, सेनेचे माजी अधिकारी अरुणकुमार वैद्य यांची हत्या झाल्याचे आपण विसरून जातो.

मलेशियामध्ये ७ सहस्र हिंदूंची मुसलमान म्हणून नोंद !

मुसलमानबहुल देशांची मानसिकता !
८ स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त पथकाच्या साहाय्यामुळे हिंदूंना दिलासा
     क्वालालंपूर - मुसलमानबहुल मलेशियातील ७ सहस्र हिंदूंची शासकीय दफ्तरी मुसलमान म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती मलेशिया हिंदू संगम या संघटनेचे अध्यक्ष मोहन शान यांनी द मलेशियन इनसायडरला दिली आहे. या हिंदूंच्या राष्ट्रीय ओळखपत्रावरही तसा उल्लेख करण्यात आल्यामुळे आता ही ओळख पालटण्यासाठी त्यांच्यावर न्यायालयामध्ये जाण्याची वेळ आली आहे. शान म्हणाले, मलेशियाच्या कायद्यानुसार त्या देशात मुसलमानेत्तर नागरिकांनी चुकून मुसलमान म्हणून नोंद झाल्यास त्यात सुधारणा करण्यासाठी संबंधित व्यक्तीला शरियत न्यायालयाची अनुमती आणणे बंधनकारक असते. अल्पसंख्यांकांसाठी कार्यरत ८ स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त पथकाने यासंदर्भात हिंदूंचे साहाय्य करणे चालू केले असून त्यांना औपचारिकता पार पडण्यासाठी साहाय्य दिले आहे.
-

स्वत:च्या मुलाला वीरमरण यावे अशी इच्छा असणारे पिता स्वा. सावरकर यांच्याकडून आम्ही काही शिकणार का ? - डॉ. अशोक मोडक, हिंदू महासभा

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दिनांकानुसार असलेल्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...
रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी 
सावरकर कुटुंबियांची देशभक्ती या विषयावर डॉ. अशोक मोडक यांनी केलेले भाषण
डॉ. अशोक मोडक
१. पुरोगाम्यांची अतीशहाणी आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबे
     सध्या विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शासन देहलीत विराजमान झाल्यानंतर स्वत:ला पुरोगामी आणि सर्वधर्मसमभावी म्हणवून घेणारे असे जे कोणी विचारवंत या देशात आहेत, त्यांच्याही घराचा पंचनामा या ठिकाणी केला पाहिजे. त्या सर्व पुरोगाम्यांना उद्देशून त्यांच्या घराण्याविषयी एक संस्कृत सुभाषित आहे. त्याच्या अर्थानुसार ज्या कुळात, ज्या घराण्यात सगळेच नेते असतात, सर्व जण स्वत:ला पंडित समजून घेतात आणि सर्वच जण महत्त्वाकांक्षी असतात, त्या कुळाचे दिवाळे निघते. तुमची नियतीच तशी आहे, त्याला आम्ही काय करणार ?; पण एवढेच कारण नाही. त्यांच्या कर्तृत्वाची फळे त्यांना आज ना उद्या भोगावीच लागणार आहेत. स्वा. सावरकरांचे कुटुंब या सर्वापासून निराळे आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Sansadpar hue akramanme Mohammad Afzalke lipt honepar sandeh tha.
- P. Chidambaram  Jihadiyonka sadaiv samarthan karnewali Congress !
जागो !
    संसद पर हुए आक्रमण में मंहमद अफझल के लिप्त होने पर संदेह था.
- पी. चिदंबरम् जिहादियों का सदैव समर्थन करनेवाली काँग्रेस !

आरक्षणाचे सूत्र निसर्गालाही अमान्य !

      हरियाणात आरक्षणाच्या संदर्भात जाट समाजाने केलेल्या हिंसक आंदोलनानंतर शासनाने या संदर्भातील मागण्या मान्य करण्याचे आणि तसे विधेयक पारित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. हरियाणातील आंदोलन शमते ना शमते, तोच महाराष्ट्रात छावा संघटनेने १ मे २०१६ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महाराष्ट्रातही उग्र निदर्शने करण्याची चेतावणी दिली आहे. गुजरातमध्ये काही मासांपूर्वी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले होते. तेव्हाही या आंदोलनांच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा चुराडा आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली होती.

शिवरायांच्या महाराष्ट्र राज्यात त्यांच्याच पुतळ्याचे धर्मांधांनी शिर तोडणे, इथपर्यंत स्थिती आणणारे शासन नको ! आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा आणि शिर तोडणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

    वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या इम्रान इलेव्हन या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शिर तोडून तो पुतळा शौचालयाजवळ ठेवला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     कोणत्याही गोष्टीचे फळ पूर्ण प्राप्त होण्यासाठीच गुरु सांगतील ते लगेच ऐकणे आणि वर्तमानात रहाणे आवश्यक !

सर्वधर्मसमभावचा खरा अर्थ काय ?

     सर्वधर्मसमभाव याचा अर्थ आपल्या धर्माविषयी उदासीनता बाळगणे, असा होत नाही. मध्यप्रदेशमधील भोजशाळेत, म्हणजे सरस्वती मंदिरात मुसलमान समाजाला प्रत्येक शुक्रवारी नमाज पढण्यासाठी अनुमती दिली गेली; मात्र हिंदूंच्या गणपतीच्या मिरवणुकीला मशिदीसमोरून जाण्यास अनुमती दिली जात नाही. 
- श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

मुलींना समजून घेण्यासाठी सकारात्मक असलेल्या आणि त्यांना सामान्य पद्धतीने मोठे होण्यासाठी साहाय्य करू शकणार्‍या एखाद्या महिलेची आवश्यकता असणे

     स्टीव यांच्या मते आपल्या मुलींना समजून घेण्यासाठी त्यांचे बालपण आपल्याप्रमाणे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आपले १८ वे वर्ष त्यांच्या १४ व्या वर्षांच्या बरोबरीचे आहे आणि आपले १४ वे वर्ष त्यांच्या १० व्या वर्षांच्या बरोबर आहे; म्हणूनच या मुलींसाठी एक सकारात्मक आदर्श व्यक्ती असेल आणि त्यांना सामान्य पद्धतीने मोठे होण्यासाठी साहाय्य करील, अशा एखाद्या महिलेची आवश्यकता आहे ! 
(संदर्भ : मासिक परोपकारी, सप्टेंबर (प्रथम) २०१३)

सनातन संस्थेच्या नावाने, म्हणजेच परम गुरुजींच्या नावाने ईश्‍वराने दानधर्मासाठी आधीच आरक्षित करून ठेवलेली दक्षिणाच आम्ही घेत आहोत. यात नवीन असे काही नाही, असे महर्षींनी एका नाडीवाचनातून सांगणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. नाडीत लिहिल्याप्रमाणे महर्षींनी त्या त्या वेळी त्या त्या 
स्थळी अमुक एक प्रकारची दक्षिणा देण्यास सांगणे 
    कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी आणि किती दक्षिणा आम्ही महर्षींना द्यायची आहे, हे महर्षींनी नाडीपट्टीमध्ये आधीच, म्हणजे सहस्रो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे. यासंदर्भात प्रत्यक्षात अक्षरांच्या रूपात नाडीपट्टीत केलेले विवेचन कधी कधी पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे आम्हाला दाखवतातही.
२. दान पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि या दानाचे फळ १०० टक्के मिळण्यासाठी त्यासंदर्भातील स्थळ आणि काळ यांचाही महर्षि पूर्णतः 
विचार करतात, असे जाणवणे 
    प्रतिमास किंवा कधी कधी आठवड्यातून एकदा, तर कधी लागोपाठही महर्षि नाडीवाचनातून दक्षिणेचा काही ठराविक निधी आम्हाला द्यायला सांगतात. दान पूर्णत्वाला जाण्यासाठी आणि या दानाचे फळ १०० टक्के मिळण्यासाठी त्या संदर्भातील स्थळ आणि काळ यांचाही महर्षि पूर्णतः विचार करतात आणि तेवढीच दक्षिणा त्याच काळात त्याच स्थळी आम्हाला देण्यास सांगतात.

दायित्वाची सेवा असल्याने सतत सेवेत व्यस्त असूनही स्वच्छतेच्या सेवेेला उत्साहाने होकार देणारे श्री. चेतन राजहंस !

१. स्वच्छतेच्या सेवेेला साहाय्य मागितल्यावर उत्साहाने होकार देणे : श्री. चेतनदादांकडे दायित्वाची सेवा असल्यामुळे त्यांना सतत तातडीच्या सेवा असतात. त्यांना पुष्कळदा रात्री जागूनही सेवा करावी लागते. त्यामुळे त्यांना शक्यतो स्वच्छतेच्या सेवेत सहभागी करून घेत नाहीत. गणेशचतुर्थी, दिवाळी या सणांच्या कालावधीत आश्रमातील काही साधक घरी गेल्यामुळे, तसेच काही वेळा साधक रुग्णाईत असल्यामुळे स्वच्छतेच्या सेवेेला साधक मिळायचे नाही; म्हणून मी त्यांच्याकडे साहाय्य मागायला जायचे. त्या वेळी दादा अगदी उत्साहाने होकार देऊन म्हणायचे, हो आपण करूया ना ! मला काही अडचण नाही. तुम्ही मला सांगाल, त्या वेळी मी स्वच्छतेची सेवा करीन. दादांचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला त्यांचा आधार वाटत असे.

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी जाणवलेली सूत्रे

१. श्री. चेतन यांनी ग्रंथ संकलनाची सेवा करतांना वेळोवेळी मध्येच थांबून अगदी सहजतेने तीन 
साधकांच्या प्रश्‍नांना त्या त्या विषयाशी एकरूप होऊन उत्तरे देणे आणि त्यांनी पुन्हा 
स्वतःकडील सेवा एकाग्रतेने चालू करणे 
     २२.१.२०१६ या दिवशी श्री. चेतन राजहंस हे ग्रंथ संकलनाची सेवा करतांना एका नियतकालिकाचे वाचन करत होते. तेव्हा प्रसारपत्रकासंबंधी सेवा करणारे एक साधक, प्रवक्त्यांना पाठवण्याची सूत्रे अंतिम करणारे एक साधक आणि एका लेखाविषयी मी, असे आम्ही तीन जण त्यांना वेळोवेळी काही सूत्रे विचारत होतो. त्या वेळी ते एका सेवेसंबंधी विचार करतांना मध्येच थांबत होते आणि दुसर्‍या साधकाकडील सेवेशी एकरूप होऊन श्रीगुरूंना अपेक्षित उत्तर अगदी सहजतेने त्या साधकाला सांगत होते. दुसर्‍या वेळी जेव्हा मी त्यांना एक सूत्र विचारून तेथून निघतांना सहज मागे वळून पाहिले, तेव्हा माझ्या प्रश्‍नाचे उत्तर दिल्यानंतर श्री. चेतन त्यांच्या सेवेशी सहजतेने एकरूप झाले आहेत, असे माझ्या लक्षात आले.

सनातन आश्रमातील सर्वगुणसंपन्न आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्त्व ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस !

श्री. चेतन राजहंस
१. हिंदुत्ववादी आणि पाहुणे यांच्याशी जवळीक साधणे 
अ. आश्रमात कोणी नवीन पाहुणे आल्यास श्री. चेतन स्वतःहून त्यांची ओळख करून घेतात. तसेच भोजन, चहा आदी प्रसंगी त्यांच्याशी अनौपचारीक चर्चा करतात. 
आ. आश्रमात हिंदुत्वाचे कार्य करणारे नेते आणि कार्यकर्ते यांचे नेहमी येणे-जाणे असते. हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना संघटनात्मक कार्य, कार्यातील अडचणी आणि उपाययोजना, हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य आदी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलल्यामुळे ते त्या हिंदुत्ववाद्यांशी अतिशय अल्प वेळात जवळीक साधतात.

नाद, ताल आणि लय यांच्याशी नामजप जोडणे

सौ. अपर्णा प्रभुदेसाई
     आवाजाशी माणसाचा जवळचा संबंध असतो; कारण सर्व सृष्टी आेंकारनादातून उत्पन्न झाली आहे. कुठलाही आवाज आल्यावर आपले लक्ष तेथे पटकन वेधले जाते. जर आपण नाद, ताल आणि लय यांना जप जोडण्याची सवय लावली, तर त्या नादावर जप आपोआप होतो. 
१. चालू असलेल्या तालाशी नामजप जोडण्याचा प्रयत्न करा ! 
    चालू असलेला ताल, उदा. घड्याळाची टिकटिक, अन्न चावत असतांना होणार्‍या चर्वणाचा आवाज, गाडीच्या वायपरचा आवाज, खडक फोडतांना येणारा आवर्तनात्मक आवाज, पक्ष्यांची शीळ, माणसांचा श्‍वास आणि काळजाचे ठोके ऐकून जप आपोआप व्हायला साहाय्य होते. आपण आपला जप त्या तालाशी जोडू शकतो.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

कु. नंदा नाईक यांना सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

कु. नंदा नाईक
     मी संतांच्या संदर्भातील सूत्रांच्या टंकलेखनाची सेवा करते. एकाग्रतेने ही सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. एकाग्रतेने सेवा करण्याचे लाभ
अ. सतत एकाग्रतेने सेवा केली, तर फलनिष्पत्ती चांगली होते.
आ. सेवा करतांना सतत वर्तमानस्थितीत रहायला होते.
इ. वर्तमानस्थितीत राहिल्यामुळे माझ्या सेवेची गती अधिक वाढली.
ई. पूर्वी मन भरकटत असायचेे. वर्तमानकाळात राहिल्यामुळे ते आता भरकटत नाही आणि सेवाही परिणामकारक होऊ लागली.
ई. अजून आपण चांगले काय करू शकतो ?, हे माझ्या लक्षात येऊ लागले.
उ. सेवा पूर्वीपेक्षा चांगली व्हायला लागली.

श्री. संजीव नाईक यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होण्यासंबंधी मिळालेली पूर्वसूचना

    १४.१.२०१६ या सकाळी मी केशकर्तन वहीत नावनोंदणी करायला गेलो. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, रामनाथी आश्रमातील संत आणि साधक यांचे केस कापण्याची सेवा करणारे साधक श्री. संजीव नाईक यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली असून त्यांच्याकडे केशकर्तन कसे करायचे ? त्यानंतर १६ जानेवारीला रात्री पू. पात्रीकरकाकांकडून मला समजले, श्री. संजीव नाईक यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. तेव्हा श्री. संजीवदादांची प्रगती झाल्यामुळे आणि दोन दिवसांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने मला तशी पूर्वसूचना दिल्याने माझ्याकडून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
- श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सेवेसाठी सदैव तत्पर असणारे गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संजीव नाईक !

श्री. संजीव नाईक
१. सेवेसाठी सदैव तत्पर असणे
    संजीवदादा कोणत्याही वेळी सेवेसाठी तत्पर असतात. आश्रमात जेव्हा सेवेसाठी साधकांची आवश्यकता असते, तेव्हा दादांना संपर्क केल्यावर ते सेवेला यायला लगेच सिद्ध असतात आणि अजूनही कुणी सेवेला यायला सिद्ध असेल, तर त्यांना तसा निरोपही देतात. तेव्हा अन्य साधकांनाही सेवेचा आणि आश्रमातील चैतन्याचा लाभ मिळावा, असा त्याचा भाव असतो.
२. दिवसभर नोकरी करून रात्रीही सेवा करण्यास सिद्ध असणे
    आश्रमातील उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी २०० नारळ सोलायचे होते. तेव्हा मी संजीवदादांना या सेवेविषयी सांगितले. त्या वेळी ते एका सत्संगात होते. तेव्हा रात्रीचे ९ वाजलेले असूनही काही वेळातच दादा नारळ सोलण्याचे यंत्र घेऊन सेवेला आले. दादा दिवसभर नोकरी करूनही न थकता रात्रीही सेवा करायला तत्पर असतात.

जीव तडफडतो कृष्णा, केवळ तुझ्यासाठी !

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ
     १४.१२.२०१४ या दिवशी सकाळी उपायांच्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना व्यष्टी आणि समष्टी साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतांना मला पुढील ओळी सुचल्या.
काय करू देवा आम्ही, व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी ।
जीव तडफडतो कृष्णा, तुझ्या अखंड स्मरणासाठी ॥ १ ॥
काय करू देवा आम्ही, भाव आणि साधकत्व यांच्या वृद्धीसाठी ।
जीव तडफडतो कृष्णा, तुझ्या अखंड आशीर्वादासाठी ॥ २ ॥
काय करू देवा आम्ही, स्वभावदोष आणि अहं-निर्मूलनासाठी ।
जीव तडफडतो कृष्णा, तुझ्यावरील भक्ती वृद्धींगत होण्यासाठी ॥ ३ ॥

व्हॉट्सअ‍ॅप आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

    सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर व्हॉट्सअ‍ॅप असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे
    प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक व्हॉट्सअ‍ॅपवर गट (ग्रुप) सिद्ध करतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी असे करणे योग्य आहे का ?, असे उत्तरदायी साधकांना विचारून घेत नाहीत.
    आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी दायित्व असणार्‍या साधकांना विचारून घ्यावे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा अभ्यास न केलेले जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी हिंदूंमध्ये जातींवरून आपसात फूट पाडतात. त्यामुळे हिंदूंना जगात काय, तर भारतातही किंमत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भांडे स्वच्छ हवे
     तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ : तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

खरा त्यागी कोण ?

      एखाद्याने आपल्या धनापैकी अल्पशा धनाचा त्याग करून एखाद्या संस्थेला १० लाख रूपयांची देणगी दिली, तर समाजाला तो मोठा दानी आहे, असे वाटते. प्रत्यक्षात तन-मन-धनाचा त्याग करून आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणारे त्याच्याहून श्रेष्ठ साधक होत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रद्धेचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संरक्षणखात्याचे सक्षमीकरण आणि अत्याधुनिकरण हवे !

संपादकीय 
      जगात सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणार्‍या देशांच्या सूचीत सध्या भारत पहिल्या क्रमांकावर पोेचला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटच्या ताज्या आकडेवारीनुसार वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत जगात एकूण आयात झालेल्या शस्त्रास्त्रांमध्ये एकट्या भारताचा हिस्सा १४ प्रतिशत आहे. भारताचा पारंपरिक शत्रू असलेला देश चीन, जो २० वर्षांपूर्वी शस्त्रास्त्रांचा सगळ्यांत मोठा खरेदीदार देश होता त्याने यात लक्षणीय सुधारणा करत स्वदेशातच शस्त्रास्त्रे निर्मिती करण्यात आघाडी घेतली आहे. एवढेच नाही, तर अमेरिका, रशिया यानंतर चीन जगातील तिसर्‍या क्रमांकाचा शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश बनला आहे. लवकरच देशाचे अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारताची संरक्षण खात्याची स्थिती पहाता संरक्षण खात्यासाठी अत्यंत भरीव तरतुदीची आवश्यकता आहे. सदैव सीमेवर युद्धासारखी स्थिती निर्माण करणारे शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन यांची वाढती आक्रमकता रोखण्यासाठी शासनाला धडाडीने पाऊले उचलावीच लागतील.

गोंधळ घालणार्‍या खासदारांचे दायित्व निश्‍चित करा !

संपादकीय 
     २४ फेब्रुवारीपासून लोकसभा आणि राज्यसभा यांचे अधिवेशन चालू झाले. हे अधिवेशन अर्थसंकल्पीय असल्याने त्याला देशातील अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. श्री. नरेंद्र मोदी यांचे शासन आल्यापासून तर राज्यसभा चालू न देण्याचा चंगच विरोधकांनी बांधला आहे. कालच्या पहिल्या दिवशीही विरोधकांनी नेहमीप्रमाणे गोंधळ घालून राज्यसभा बंद पाडली. राज्यसभा वारंवार बंद पडण्याचे गंभीर परिणाम अनेक विधेयके संमत न होण्यावर होत आहेत. गेला बराच काळ १२ विधेयके पटलावर येणे बाकी आहेत आणि ती संमत होणे बाकी आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn