Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

संत नरहरि महाराज यांची आज पुण्यतिथी

मुंबई जिल्ह्यातील सर्व साधकांना सूचना आणि धर्मप्रेमींना विनंती

हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या विरोधात आज मुंबईत निषेध आंदोलन
वेळ : दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वा.      
स्थळ : आझाद मैदान, मुंबई
मुंबई जिल्ह्यातील सर्व साधक, तसेच धर्मप्रेमी यांनी आंदोलनात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे !

महंमद अफझल हुतात्मा कि देशद्रोही, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे !

जेएन्यु प्रकरणी संसदेत भाजपकडून काँग्रेसची खरडपट्टी !
      नवी देहली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देहलीतील जेएन्यु विद्यापिठातील देशद्रोही घोषणाबाजीवरून २४ फेब्रुवारीला सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी उडाली. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशविरोधी घोषणांचा निषेध केला; परंतु 'केवळ घोषणा दिल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही', असे समर्थन करत भाजपवर टीका केली. यावर उत्तर देतांना भाजपचे खासदार अनुराग ठाकूर काँग्रेसला म्हणाले, "संसदेवर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलला तुम्ही हुतात्मा मानता कि देशद्रोही, याचे उत्तर द्या !"

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! - सुब्रह्मण्यम स्वामी

श्री. सुब्रह्मण्यम स्वामी
     चेन्नई - इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. हिंदु मुन्नानीचे संस्थापक निमंत्रक श्री. रामगोपालन् हे या ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशक आहेत. या ध्वनीचित्र-चकतीमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु नेत्यांच्या केलेल्या हत्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. 
श्री. स्वामी पुढे म्हणाले, 
१. जिहाद्यांचे ध्येय निश्‍चित आहे. ते राज्यात विविध शक्तींशी संधान साधून त्यांचा जिहादी कार्यक्रम पुढे नेत आहेत. हिंदूंची स्थिती मात्र महाभारतातील अर्जुनाप्रमाणे झाली आहे. त्यांच्या मनामध्ये नुसता गोंधळ माजलेला आहे. त्यामुळे देशात जिहाद्यांचे फावले आहे. ही गोंधळाची स्थिती दूर सारून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

सुलतानपूर (बंगाल) येथे युवकांच्या संघटनासाठी गंगाआरतीस प्रारंभ !

बांगलादेशातील हिंदूंसाठी रात्रंदिवस लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष यांचीही उपस्थिती !
उपस्थितांना संबोधित करतांना पू. स्वामी विद्यानंद,व्यासपिठावर
 (डावीकडून) सर्वश्री रवींद्र घोष, चित्तरंजन सुराल, उपानंद
ब्रह्मचारी  आणि हरिनाम सिंग
     सुलतानपूर (डायमंड हार्बर, बंगाल), २४ फेब्रुवारी (वार्ता.) - गंगाप्रदूषण आणि हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी युवकांचे संघटनाची आवश्यकता पाहून सुलतानपूर येथे २१ फेब्रुवारी या दिवशी गंगाआरती अन् जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. गंगा नदीच्या काठावर पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गंगा रक्षा समितीचे श्री. मिठुन पुरकायत आणि श्री. मोहितोश सरदार यांनी केले.

पेशावरमध्ये मॉल बनवण्यासाठी गुप्तपणे पाडले हिंदूंचे मंदिर !

  • भारतात अवैध मशीद, दर्गा पाडण्याचे धाडस प्रशासन दाखवू शकत नाही; मात्र पाकमध्ये सर्रास प्राचीन मंदिरेही पाडली जातात ! 
  • भारतात मुजोर आणि धर्मांध अल्पसंख्यांकांसाठी पुरो(अधो) गामी, निधर्मी लगेच धावून जातात; पाकमध्ये मात्र कथित पुरोगामी आणि निधर्मी हे अल्पसंख्य हिंदूंना साहाय्य करत नाहीत ! 
बाबरी मशीद पाडल्यानंतर ऊर बडवणारे भारतातील राजकीय पक्ष पाक आणि बांगलादेश येथे मंदिरे पाडली जात असतांना काहीच बोलत नाहीत ! 
     पेशावर - येथील एक प्राचीन मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आले आहे. या ठिकाणी मॉल बांधण्यात येणार आहे. जुन्या पेशावर शहरातील करीमपुरा भागात हे हिंदूंचे प्राचीन मंदिर होते. दहा दिवसांपूर्वी हे मंदिर पाडण्याचे काम चालू झाले. पुरातन वास्तू पाडणे, हा गुन्हा आहे. तरीही मंदिर पाडण्याच्या विरोधात एकाही शासकीय विभागाने हरकत घेतली नसल्याचे सांगण्यात आले. मंदिर पाडायचे काम चालू असतांना शासन काहीच कारवाई करत नसल्याविषयी नागरिकांकडून प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. मुसलमानेतरांच्या मालमत्तांच्या संरक्षणाचे दायित्व असलेले ईटीपीबी आणि पुरातत्व विभाग यांनी मंदिर पाडणार्‍यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

सामाजिक शांतता बिघडवणार्‍या भूमाता ब्रिगेडवर बंदी घाला ! - श्री. संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समिती

सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडवरील बंदीची मागणी करणार्‍या श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समितीचे अभिनंदन ! 
     नगर, २४ फेब्रुवारी - श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरील प्रवेशाचा विषय भूमाता ब्रिगेडला मिटवायचा नसून आपला अट्टाहास तसाच ठेवायचा आहे. यामुळे शनिभक्त, भाविक, शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि प्रशासन यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सामाजिक शांतताही बिघडत आहे. ती प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने भूमाता ब्रिगेडवर बंदी आणावी, अशी मागणी श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी दहातोंडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. 

छगन भुजबळ यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट !

     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. (असे नेते असलेल्या पक्षावर कुणी बंदीची मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ? - संपादक)

आंदोलनाच्या नावाखाली शासकीय संपत्तीची हानी करणार्‍यांनी भरपाई करावी ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - गुजरातमधील पाटीदारांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या याचिकेवर २४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी महाधिवक्त्यांनी म्हटले की, आरक्षणाच्या नावाखाली होणारी तोडफोड लज्जास्पद आहे". त्यावर न्यायालयाने म्हटले की, आंंदोलनाच्या नावाखाली शासकीय संपत्तीची हानी करणार्‍यांंना सोडता येऊ शकत नाही. ते त्यांच्या मागण्यांसाठी शासकीय संपत्तीची हानी करू शकत नाहीत. त्यांच्याकडून हानी भरपाई केली जावी.

(म्हणे) संघ आणि सनातनी शक्तींच्या विरोधात आक्रमकपणे लढून घटनेचे संरक्षण करा ! - प्रा. एन्.डी. पाटील

अंनिसचा वैचारिक आतंकवाद ! 
     कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - 'अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपमुळे हिंदु धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे. सांप्रदायिक, संघ, सनातनी, अविवेकी शक्तींच्या विरोधात आक्रमकपणे लढत राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे', असे वक्तव्य महाराष्ट्र राज्य (अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. एन्.डी. पाटील यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी केले. (अंनिसने लढण्याची भाषा करायची आणि हिंदुत्ववाद्यांनी वैध मार्गाने आवाज उठवला, तर त्याला आतंकवादी ठरवायचे, हा विद्रोही पुरोगाम्यांचा कांगावा आहे ! - संपादक) 

देशातील प्रत्येक गाव एक दिवस सिरिया होईल ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

विहिंपने जिहादी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     रामपूर (राजस्थान) - देशात पाय रोवू पहाणार्‍या इसिसच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा देशातील प्रत्येक गाव सिरिया होईल, अशी चेतावणी विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे दिली. जेएन्यूच्या प्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत देशद्रोह्यांचे उदात्तीकरण होणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिमला येथे विहिंपकडून गोरक्षकांचा सत्कार !

     शिमला (हिमाचल प्रदेश) - विश्‍व हिंदु परिषदेकडून येथे एका परिषदेत गोरक्षण करणार्‍यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांना खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर हा सत्कार करण्यात आला. यापुढे राज्यात गोहत्येची एक जरी घटना समोर आली, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा ठराव या वेळी संमत करण्यात आला.आरक्षणाविषयी बिगर राजकीय समितीने निर्णय घ्यावा ! - सरसंघचालक मोहन भागवत

आरक्षण म्हणजे लायकी नसणार्‍यांना संधी देणे होय ! आरक्षणविकृतीत गुणवत्ता असणार्‍यांवर 
अन्याय केला जात असल्याने देशाची स्थिती दयनीय होत चालली आहे !
     कोलकाता - अनेक नागरिक आरक्षणाची मागणी करत आहेत. माझ्या मते यावर एक बिगर राजकीय समिती स्थापन करून आरक्षणास पात्र असलेल्यांनाच आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. ही समिती बिगर राजकीय असावी, कारण यातून स्वार्थ साधला जाऊ नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकता येथे एका परिषदेत केलेे. यापूर्वी भागवत यांनी समाजात जोपर्यंत भेदभाव कायम आहे, तोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. हरियाणात जाट समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनानंतर भाजपने एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भागवत यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, समाजातील कोणत्या वर्गाला पुढे आणावे, त्यांना कधीपर्यंत आरक्षण दिले जावे, यासाठी एका योजना आखली पाहिजे. या समितीला आरक्षण देण्याचे निर्णय दिले पाहिजेत. आपल्यात सामाजिक भेदभाव आजही आहे. एखाद्या विशेष जातीत जन्म घेतल्याने त्याला आरक्षण मिळावे, असे होऊ नये. 

घरवापसी अभियान देशभर राबवणार ! - प्रबल प्रतापसिंह जुदेव

     रायपूर - घरवापसी अभियान आता अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असून धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याची मोहीम देशभर राबवण्यात येईल, असे प्रतिपादन प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. प्रबल प्रतापसिंह जुदेव हे घरवापसी अभियान राबवणारे दिलीपसिंह जुदेव यांचे पुत्र आहेत. मागील काही दिवसांमध्ये प्रबल प्रतापसिंह यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या साहाय्याने ओडिशाच्या आदिवासी क्षेत्रातील झारसुगुडा, राऊरकेला यांच्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये जनचेतना कार्यक्रमाच्या अंतर्गत ३६७ धर्मांतरितांची घरवापसी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदु स्वाभिमानी सूर्य पुरस्कार
     प्रबल प्रतापसिंह जुदेव यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांना हिंदु स्वाभिमानी सूर्य या उपाधीने गौरवण्यात आले. संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांच्याकडून हा सन्मान प्रदान करण्यात आला.जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर पाकच्या कह्यात

नुसते कह्यात घेऊन काय होणार, पाकिस्तान त्याला फासावर लटकवणार आहे का ?
     नवी देहली - पठाणकोट येथील भारतीय वायूदलाच्या तळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याला १४ जानेवारीपासून पाकिस्तानने कह्यात घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ही माहिती दिली. पाकिस्तानकडून प्रथमच अझरच्या अटकेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. पठाणकोट आक्रमणाच्या संदर्भात भारताने जे दूरभाष क्रमांक दिले ते बहावलपूरमधील जैश-ए-महंमदच्या मुख्यालयाशी संबंधित असल्याचेही अझीझ यांनी स्पष्ट केले.

आतंकवादी महंमद अफझलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची उमर खालिद आणि अनिबर्र्न भट्टाचार्य यांची स्वीकृती !

देशद्रोही घोषणा दिल्या नसल्याचे म्हणत या विद्यार्थ्यांचे समर्थन करणारे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी यांना चपराक ! 
नवी देहली - जेएन्यूतील देशद्रोही घोषणाबाजी प्रकरणी फरार विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य हे दोघे २३ फेब्रुवारीला रात्री उशिरा देहली पोलिसांपुढे शरण आले. उमर आणि अनिर्बन यांनी पोलिसांना शरण यावे, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला होता. अटक टाळण्याचा दुसरा पर्याय उरला नसल्याने या दोघांनी शरणागती पत्करली. चौकशीत त्यांनी अफझलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची स्वीकृती दिली आहे. पोलिसांनी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना आर्.के. पुरम पोलीस ठाण्यात नेले. येथे चौकशीत या दोघांनी ते फरार झाल्यानंतर कुठे लपले होते, याची माहिती दिली. ते चौकशीत सहयोग करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

अंधेरी (मुंबई) येथे 'इम्रान इलेव्हन' संघाने शिवरायांच्या पुतळ्याचे शीर तोडले !

हिंदूंनो, धर्मांधांची विकृत आणि हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !
 पोलिसांचा हिंदूंवरच लाठीमार ! 
     मुंबई - वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या 'इम्रान इलेव्हन' या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शीर तोडून तो पुतळा शौचालयाजवळ ठेवला. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा घोर अवमान झाल्याचे कळताच ५०० हून अधिक हिंदू एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. (धर्मांधांकडून सर्वत्र मार खाणारे पोलीस मात्र निरपराध हिंदूंवर अत्याचार करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केल्यास चूक ते काय ? - संपादक)  

(म्हणे) नथुराम गोडसेंचा उदोउदो करणार्‍यांना देशद्रोही का म्हणत नाही ?

संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी आणि देशप्रेमापोटी भावनाविवश होऊन नेत्याची हत्या 
करणारा देशप्रेमी यांच्यातील भेदही न कळणारे आमदार विष्णु वाघ यांची मुक्ताफळे !
      पणजी, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - आतंकवादी महंमद अफझलचे उदात्तीकरण करणार्‍यांना आतंकवादी म्हटले जाते; मात्र देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झालेल्या नथुराम गोडसेंचा उदोउदो करणार्‍यांना देशद्रोही का म्हटले जात नाही ?, अशी मुक्ताफळे भाजपचे आमदार विष्णु वाघ यांनी दैनिक नवप्रभा या दैनिकात २० फेब्रुवारी लिहिलेल्या लेखात उधळली आहेत. (मोहनदास गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती, ती देशाच्या फाळणीला गांधी उत्तरदायी आहेत असे समजून. यातून गोडसे यांचे देशाप्रतीचे प्रेमच दिसून येते. गोडसे यांना खुनी न मानता देशद्रोही मानायचे असेल, तर स्वामी श्रद्धानंद यांचा खुनी अब्दुल याला फाशी देऊ नये, अशी ब्रिटिशांकडे शिफारस करणारे मोहनदास गांधी यांनाही देशद्रोही मानावे लागेल. तसे मानायचे, तर एका देशद्रोह्याची हत्या केलेल्या देशप्रेमीला काँग्रेसने फाशी दिली असे होईल. - संपादक)

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे हत्या करण्यासाठी घेऊन जाणार्‍या गायीची सुटका

   मुंबई - येथील मदनपुरा भागात हत्या करण्यासाठी काही गायींची वाहतूक करण्यात येणार होती. त्या गायींच्या मांसाची शिवडी आणि मदनपुरा या भागांत विक्री करण्यात येणार होती. याविषयी गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांना कळल्यावर त्यांनी गायीची वाहतूक करण्यात येणारी गाडी अडवून गायीची सुटका केली आणि पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध तक्रार नोंद केली.
    आरोपी चंद कुरेशी, मिरांजी, मुहम्मद हुसेन, इस्माईल आणि शोएब अब्दुल रझाक पठाण हे हत्या करण्यासाठी एका गायीला घेऊन जात असतांना त्यांना गडकरी चौकात सकाळी ५.३० वाजता गोरक्षकांनी अडवले. या वेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

अशा वासनांध धर्मांधांवर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, यासाठी प्रयत्न करा !
    मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), २४ फेब्रुवारी दुचाकीवरून जाणार्‍या विवाहित महिलेला पथकर नाक्याच्या ठिकाणी अडवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी धर्मांध फय्यज इलाही शेख याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या वेळी त्याने तिला दमदाटीही केली.

हिंदूंनी भक्तीसमवेत शक्तीचाही आविष्कार दाखवण्याची वेळ ! - प्रमोद मुतालिक

श्री. प्रमोद मुतालिक यांचा सत्कार करतांना समितीचे कार्यकर्ते
  • तुळजापुरात शिवजयंतीनिमित्त हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन
  • १ सहस्र हिंदूंची उपस्थिती
    तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २४ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु धर्म हा भक्तीचे प्रतीक असून आजपर्यंत इतिहासामध्ये हिंदूंनी कोणत्याही धर्मावर आक्रमण केलेले नाही; मात्र हिंदु धर्मावरती आतापर्यंत अनेकांनी अनेक आक्रमणे केली आहेत. आता हिंदु धर्माच्या रक्षणासाठी भक्तीसमवेत हिंदूंच्या शक्तीचाही अविष्कार दाखवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रखर हिंदुत्ववादी आणि श्रीराम सेनेचेे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. २२ फेब्रुवारी या दिवशी तुळजापूर येथे शिवजयंतीनिमित्त शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने प्रखर हिंदुत्ववादी आणि श्रीराम सेनेचेे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

जेएन्यू प्रकरणातील आंदोलनकर्त्या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी ! - मुरलीधर जाधव

महसूल तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी
समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने महसूल तहसीलदारांना निवेदन
    कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - देहली येथील जेएन्यूमध्ये भारतविरोधी घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातल्यास देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी जेएनयूमधील देशद्रोह्यांवर केंद्रशासनाने कठोर कारवाई करणे, हे हिताचे ठरणार आहे, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांनी येथे केली. जेएन्यु प्रकरणातील दोषी आंदोलनकर्त्यांवर देशद्रोह्याचे गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने महसूल तहसीलदार शिवाजी नलवडे यांना देण्यात आले. त्या वेळी श्री. जाधव बोलत होते. भारतविरोधी घोषणा देणार्‍या जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करणारे भाजपचे खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसह देशद्रोही विद्यार्थ्यांची बाजू घेणार्‍या सर्व नेत्यांवर केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

महिला कैद्यांना प्रसादाचे दायित्व देण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या सदस्यांना अमान्य

     कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचे दायित्व कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे सोपवण्याचा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतलेला निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील काही सदस्यांना मान्य नाही. त्यामुळे देवस्थान समितीमधील सदस्य-पदाधिकारी यांचा निर्णयाला अंतर्गत विरोध आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणारा प्रसादाचा लाडू बनवण्याचे काम कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या विचाराधीन आहे. डॉ. सैनी यांनी महिला कैद्यांकडून प्रसाद करून घेण्याची संकल्पना देवस्थान समितीच्या सदस्यांसमोर सविस्तर मांडलेली नाही, तसेच कारागृहातील महिला कैद्यांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी डॉ. सैनी एकटेच गेले होते. त्यामुळे सदस्य-पदाधिकारी असंतुष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

(म्हणे) आज शिवाजी महाराज जिवंत असते, तर त्यांनी भगव्याऐवजी तिरंगा वापरला असता !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी भगव्या झेंड्याखाली हिंदवी स्वराज्य स्थापन केले; म्हणून आज 
हिंदूंचे अस्तित्व आहे. हे सत्य विसरून छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वधर्मसमभावाच्या 
चौकटीत अडकवू पहाणारे विष्णु वाघ ! 
     छत्रपती शिवाजी महाराज भगव्या ध्वजाचा वापर करत होते; कारण त्या वेळी भारतीय तिरंगा नव्हता. आज शिवाजी महाराज जिवंत असते, तर त्यांनी भगव्याऐवजी तिरंगा वापरला असता याची मला खात्री आहे, असे वाघ यांनी या लेखात म्हटले आहे. (छत्रपती जिवंत असते, तर त्यांनी तिरंगा वापरला असता का नसता, ही कपोलकल्पित गोष्ट झाली. त्यांनी आतंकवाद्यांचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढायचा असतो आणि हिंदु युवतींवर हात टाकणार्‍या वासनांधांचा चौरंगा करायचा असतो, ही शिकवण मात्र हिंदूंना दिली आहे, हे नक्की ! - संपादक)(म्हणे) देहलीतील विद्यार्थ्यांचे विचार कसे पालटतील, हे आपण पाहिले पाहिजे !

विद्यार्थ्यांनी देशद्रोही घोषणा दिल्या, हे अप्रत्यक्षरित्या मान्य करणारे आमदार विष्णु वाघ !
    विद्यार्थी दशेतील युवकांना प्रस्थापितांविरोधात लढणारे आपले आदर्श वाटतात. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो, तेव्हा आम्हाला नक्षलवादी जवळचे वाटायचे. नंतर आमचे हे विचार पालटले. देहलीतील जेएन्यू विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे विचार कसे पालटतील, याचा विचार आपण केला पाहिजे. संविधानाद्वारेच यावर तोडगा निघू शकतो. आरोप आणि प्रत्यारोप यांद्वारे नव्हे, असे आमदार विष्णु वाघ यांनी या लेखात म्हटले आहे.

यवतमाळ येथे गोवंशियांची तस्करी करणार्‍या ७ धर्मांधांना अटक

  • १ सहस्र ३७५ किलो गोमांस कह्यात
  • महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारची तस्करी केली जाणे, हे राज्यात कायदा नसल्याचेच द्योतक !
    यवतमाळ - येथे गोवंशियांची तस्करी करणार्‍या ७ धर्मांधांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ सहस्र ३७५ किलो गोमांस कह्यात घेण्यात आले आहे. चालक हमजा बीन हसन चाऊस (वय ४० वर्षे), आसीफ अब्दुल कादर कुरेशी (वय ३० वर्षे), अब्दुल समीर अब्दुल आसिफ कुरेशी (वय १९ वर्षे), मो साजिद मो. शमीम कुरेशी (वय २५ वर्षे), जिगर अली वहाब आली (वय १९ वर्षे), रज्जाक गुलाब कुरेशी (वय ३० वर्षे), शेख समीर शेख इर्शाद (वय १९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. (या धर्मांधांवर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा ! - संपादक)
    आर्टीओ कार्यालयाच्या मागे काही जण गोमांसाची तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकल्यावर त्यांनी पिकअप गाडीतील ११ ड्रममध्ये ठेवलेला २ लाख ७५ सहस्र रुपयांचे गोमांस कह्यात घेतले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. घटनास्थळावरून गोमांसासह त्यांच्याकडून पिकअप गाडी, एक चारचाकी, २ दुचाकी, ४ भ्रमणभाष असा एकूण ७ लाख ७५ सहस्र रुपयांचा ऐवज कह्यात घेतला आहे.

पडघा (ठाणे) येथे गोरक्षकांनी घातलेल्या धाडीत ४५० हून अधिक गोवंशियांचे चामडे कह्यात

    भिवंडी - येथील एका फार्म हाऊसच्या ठिकाणी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे श्री. चेतन शर्मा यांनी टाकलेल्या धाडीत ३०२ गायी आणि बैल यांचे चामडे कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी जतन कायद्याच्या संबंधित कलमांखाली पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या चौकशीच्या कालावधीत महापोली गावातून १५९ गोवंशियांचे चामडे आणि नुकतीच हत्या केलेल्या ५ गायी अन् बैल यांची शरीरे कह्यात घेण्यात आली. पडघा येथील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पुरी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

खारघर येथे १ सहस्र ८०० किलो गोमांस नेणारे ३ धर्मांध पोलिसांच्या कह्यात

गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राविना
पर्याय नाही ! आणखी अशा किती घटना उघड झाल्यावर
गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे ?
     खारघर (नवी मुंबई) - येथील टोलनाका परिसरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी २१ फेब्रुवारीच्या पहाटे गोमांसाची तीन टेम्पोंतून अवैध वाहतूक करणारे मोहम्मद रहीस कुरेशी, अन्वर जमालुद्दीन शेख, अब्दुल करीम शेख या धर्मांधांना पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणात विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या पदाधिकार्‍यांचेही सहकार्य लाभले. धर्मांधांकडील गोमांस १ सहस्र ८०० किलो इतके असून त्याची ६ लाख ७५ सहस्र रुपयांत पुण्याहून कुर्ला येथे विक्री केली जाणार होती. प्रारंभी धर्मांध कागदपत्राविषयी उडवाउडवीची उत्तरे देत होते, तसेच घटनास्थळाहून पळून जाण्याच्या सिद्धतेतही होते; मात्र पदाधिकार्‍यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. एका चारचाकीतील आसनासमोरही धर्मांधांनी गोमांस लपवले होते. धर्मांधांनी त्यांच्या गाड्यांवर हिंदु राष्ट्र सेना, जय महाराष्ट्र अशी नावे घातली होती. (हिंदूंनो, हिंदु धर्माचा अशा प्रकारे अपलाभ घेणार्‍यांना खडसवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक)

गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) येथील पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांकडून २२ गोवंशियांची सुटका

     गंगापूर, २४ फेब्रुवारी - येथील कुरेशी वसाहतीत अवैधरित्या गायींची हत्या करणार्‍या धर्मांधांच्या पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांनी २० फेब्रुवारी या दिवशी २२ गोवंशियांची सुटका केली. (गोरक्षणासाठी सतर्क असणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! - संपादक) त्यात ९ गायी आणि १३ वासरे यांचा समावेश होता. या वेळी मिळालेले २ क्विंटल गोमांसही शासनाधीन करण्यात आले. हे पशूवधगृह धर्मांध एजाज महंमद कुरेशी, हाजीगणी वाहब कुरेशी, गुलाम अयुब कुरेशी, जमीर महेमुद कुरेशी आणि हाशम हसन कुरेशी यांचे होते. गायींच्या अवैध हत्येची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. गोवंशियांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हे प्रविष्ट करून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. (या प्रकरणी संबंधितांना कठोर शासनही करावे, ही गोप्रेमींची अपेक्षा ! - संपादक)

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे पशूवधगृहाकडे नेण्यात येत असलेल्या गोवंशियांची शिवसैनिकांनी केली सुटका !

    सिल्लोड, २४ फेब्रुवारी - २२ फेब्रुवारीला येथील वडोद बाजारातून गोवंश घेऊन पशूवधगृहाकडे जात असलेला एक टेम्पो शिवसैनिकांनी हर्सूल पोलीस ठाण्याजवळ अडवला आणि त्यातील १९ गोवंशियांची सुटका केली. (तत्परतेने गोरक्षणाचे कार्य करणार्‍या शिवसैनिकांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामध्ये ३ गायी, ३ कालवडी, ४ वासरे आणि ९ बैल यांचा समावेश होता. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात इम्रान खान आयुब पठाण, अब्दुल मुतालिक अब्दुल वाहब कुरेशी आणि फारूक रहीम कुरेशी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यामधील अब्दुल मुतालिकला याच गोवंश नेण्याच्या प्रकरणी अटक केली होती.
      शेतकर्‍यांकडून अत्यल्प किमतीत विकत घेतलेले गोवंश धर्मांधांनी टेम्पोमध्ये कोंबून बसवले होते. शिवसैनिकांनी टेम्पो अडवल्यावर धर्मांधांनी टेम्पो घेऊन पलायन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शिवसैनिकांनी हर्सूल पोलीस ठाण्यात या घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो आणि धर्मांध यांना कह्यात घेतले. त्या गोवंशियांना चिकलठाणा येथील जैन गोशाळेत प्रविष्ट करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवरून मुंढे यांना बडतर्फ न केल्यास १ मार्चपासून बेमुदत उपोषण ! - देवव्रत महाराज वासकर

पालकमंत्र्यांना (मध्यभागी) निवेदन देतांना वारकरी
पालकमंत्र्यांना निवेदन सादर
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ फेब्रुवारी (वार्ता.) - माघी वारीत नित्योपचार चालू ठेवण्याविषयी मुख्यंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणार्‍या जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना मंदिर समितीच्या सभापती पदावरून तात्काळ बडतर्फ करावे, अन्यथा १ मार्चपासून वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी संघटना आणि पंढरपूर येथील नागरिक बेमुदत उपोषण करतील, असे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिले आहे, अशी माहिती वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत महाराज वासकर यांनी दिली.
वासकर महाराज पुढे म्हणाले...
१. मंंदिर समितीकडून माघी वारीच्या काळात मंदिर २४ घंटे उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे घोषित केल्यावर वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी त्वरित बैठक घेऊन पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथील श्री बालाजी मंदिरातून श्रीकृष्णाच्या मूर्तीची चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
     सिल्लोड, २४ फेब्रुवारी - येथील श्री बालाजी गल्लीतील श्री बालाजी मंदिराचे टाळे तोडून चोरांनी नटराज श्रीकृष्णाची पंचधातूंची ६ किलो वजनाची, १ फूट उंचीची प्राचीन मूर्ती चोरून नेली. ही घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली. ही मूर्ती अत्यंत प्राचीन असल्याने तेथील भाविक संतप्त झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणार पद्मभूषण पुरस्कार !

  • केंद्रशासनाने डॉ. प्रसाद यांचा सन्मान करून बहुसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • अशा लेखकांचा सन्मान नव्हे, तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना कारावास व्हायला हवा !
    देहली - यावर्षी देण्यात येणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील लेखक डॉ. यरलगद्दा लक्ष्मी प्रसाद यांना पद्मभूषण या देशातील तिसर्‍या सर्वाधिक प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१. डॉ. प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी द्रौपदी, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे द्रौपदी नावाचे तेलुगु पुस्तक लिहिले होते.

शासनाला अंतर्मुख करायला लावणारा हुतात्मा सैन्याधिकार्‍याच्या पित्याचा संतप्त प्रश्‍न !

केंद्रशासनाने आतातरी पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
आणखी किती वीर हुतात्मा होणार ?
     जम्मू - देशासाठी लढतांना माझा मुलगा हुतात्मा झाला. मला त्याचा अभिमान आहे; पण काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आपण पावले उचलणार आहोत कि नाही ? राजकारण्यांना तेथील वास्तवाचे भान आहे कि नाही ? आणखी किती वीर हुतात्मा होणार ?, असा संतप्त प्रश्‍न हुतात्मा कॅप्टन तुषार महाजन यांचे पिता देवराज यांनी शासनाला केला आहे. सैनिकांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ देऊ नका, अशी कळकळही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

येशू ख्रिस्त तमिळ हिंदु होते !

पुस्तक पुन्हा प्रकाशित होणार
  • गणेश दामोदर सावरकर यांनी वर्ष १९४६ मध्ये लिहिलेल्या ख्रिस्त परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व या पुस्तकात केला आहे दावा !
मुंबई - ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त तमिळ हिंदु होते, असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ख्रिस्त परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व या पुस्तकात करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर हे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असून संघाच्या संस्थापकांपैकी ते एक आहेत. गणेश दामोदर सावरकर यांनी वर्ष १९४६ मध्ये लिहिलेले हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक पुन्हा प्रकाशित करत आहे. या पुस्तकात पुढील सूत्रे आहेत.
१. येशू ख्रिस्त जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. तसेच ख्रिस्ती धर्म हा हिंदु धर्माचाच एक संप्रदाय आहे, ख्रिस्ती धर्म वेगळा धर्म नव्हता.
२. येशू ख्रिस्त तमिळ हिंदु असून त्यांच खरे नाव केशव कृष्ण होते. तामिळ त्यांची मातृभाषा होती आणि त्यांचा रंग तामिळ लोकांप्रमाणे सावळा होता.

मौजे धोंडेवाडी, ता. पंढरपूर येथे हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन

    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ फेब्रुवारी (वार्ता.) - आपण जात, पक्ष, संघटना, संप्रदाय विसरून एकत्र आल्यास श्रीकृष्णाच्या कृपेने हिंदु राष्ट्र सहजपणे निर्माण होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी व्यक्त केले. पंढरपूर येथे समितीच्या वतीने श्री. सांगोलकर यांनी येथे होणार असलेल्या सभेच्या पूर्वप्रसारासाठी मौजे धोंडेवाडी येथे २१ फेब्रुवारीला मार्गदर्शन केले. यात त्यांनी सभेला उपस्थित रहाण्याचेही आवाहन करण्यात आले. ८० धर्माभिमानी कार्यक्रमाला उपस्थित होते. धोंडेवाडी येथील सरपंच श्री. प्रकाश देठे, धर्माभिमानी पोपट देठे, अधिवक्ता श्री. पवार, ग्रामपंचायत लिपिक श्री. पांडुरंग कोळी, श्री. प्रवीण लिगंडे, शिवप्रभु संघटनेचे पदाधिकारी यांनी यासाठी परिश्रम घेतले.
क्षणचित्र - विषय आवडल्याने मान्यवरांनी भाळवणी येथेही प्रवचनासाठी मागणी केली.

शनी दर्शनाचा अट्टाहास कशासाठी ? - सिंधुताई सपकाळ, समाजसेविका

     जुन्नर, पुणे - शनीच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा अट्टाहास करण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला स्वयंसेविकांच्या पावित्र्याविषयी विचारले असता ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, शनि दर्शनाचा अट्टहास कशासाठी ? आताच हे काय ऐकायला मिळत आहे; पण तेे योग्य नाही. घरातील विवंचना दूर करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी स्त्रियांनी आग्रही राहिले पाहिजे. मी देवाची भक्त असेन, तर देवाने माझे ऐकले पाहिजे, ही भूमिका महत्त्वाची आहे; पण त्यासाठी हट्टाग्रह करणे योग्य नाही. येथे एका कामानिमित्त त्या आल्या असतांना बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, देशाचे तुकडे पाडू नका वैरभाव निर्माण करू नका. आता आरक्षणच बंद करा. देशात आता आरक्षणाचे होणारे प्रकार आता नकोच. महिलांनाही आरक्षण ठेवू नका. आरक्षणासारख्या तरतुदींमुळे देश पोकळ होत आहे. माणूस उभा करण्याचे काम शासनाने प्रथम करावे.

तमिळनाडूच्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी धर्मरक्षणासाठी संघटित होऊन कार्य करण्याचा केला निश्‍चय !

चेन्नईमध्ये हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक
     चेन्नई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील कालीगंबाल मंदिरात हिंदूंच्या हितासाठी लढणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. तमिळनाडू अधिवक्ता सेनेचे अध्यक्ष अधिवक्ता एझुमलाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बार कॉन्सिलचे उपाध्यक्ष आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक राज्याचे प्रतिनिधी अधिवक्ता अमृतेश एन्. पी., सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता, तसेच हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे विष्णु जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. २० अधिवक्त्यांसहित हिंदु महासभा आणि शिवसेनेचे एकूण ४० धर्माभिमानी या बैठकीला उपस्थित होते.

गोरक्षकांच्या प्रयत्नांमुळे हत्या करण्यासाठी नेण्यात येणार्‍या बैलाची सुटका

   पनवेल - एका चोरलेल्या बैलाची हत्या करून त्यांचे मांस एका अनधिकृत पशुवधगृहात देण्यात येणार आहे, असे गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांना समजले. तेव्हा श्री. शर्मा यांनी त्यांच्या अंगरक्षकांच्या साहाय्याने बैलाची वाहतूक करण्यात येत असलेल्या गाडीचा पाठलाग करत बैलाची सुटका केली आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवले.
    मुल्ला उपाख्य इंतजार मुद्दी अली शेख एक चोरलेल्या बैलाची हत्या करण्यासाठी त्याच्या लाल रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेत होता. या गाडीला श्री. शर्मा यांनी तळोजा येथे अडवले.

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंची दयनीय स्थिती लक्षात घ्या !
    पाकिस्तानच्या पेशावरचे एक प्राचीन मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आले आहे. मंदिर पाडायचे काम चालू असतांना शासनाने काहीच कारवाई केली नाही. या ठिकाणी मॉल बांधण्यात येणार आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mall bandhne hetu Pakistan sthit Peshawarke ek prachin mandirko marammatke naampar giraya gaya.
Pakistanke Hinduoki vyathake virodhme awaj uthao !
जागो ! : मॉल बांधने हेतु पाकिस्तान स्थित पेशावर के एक प्राचीन मंदिर को मरम्मत के नाम पर गिराया गया.
पाकिस्तान के हिन्दुआें की व्यथा के विरोध में आवाज उठाओ !

सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी ठामपणे उभ्या ! - श्री. विक्रम पावसकर, हिंदु एकता आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष

कराड येथे हिंदु धर्मजागृती सभा
    मलकापूर, कराड - सनातन संस्थेवर बंदी येऊच शकत नाही. हिंदू एकता, श्रीशिवप्रतिष्ठान, तसेच शिवसेना, भाजप अशा सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभ्या रहातील. संघटित हिंदूंना शत्रू नाहीत आणि संघटनेविना पर्याय नाही. त्यामुळे धर्मप्रसार, प्रचार, तसेच धर्मरक्षण यांसाठी युवा पिढीने सज्ज झाले पाहिजे. देशद्रोही घोषणा देणार्‍यांना पाठिंबा देणार्‍या राज्यकर्त्यांवरही देशद्रोहाचे खटले भरले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन २३ फेब्रुवारी या दिवशी येथील सोनाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत हिंदु एकता आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केले.
या सभेला हिंदुत्ववाद्यांची अधिक उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचा आरंभ करण्यात आला. श्री. राजू गिजरेगुरुजी आणि श्री. ऋषिकेस गिजरेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. समितीचे समन्वयक श्री. हेमंत सोनवणे यांनी समितीच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. सभेत सनातनच्या सौ. रूपाली महाडिक आणि समितीचे श्री. पराग गोखले यांनीही मार्गदर्शन केले.
   या वेळी उपस्थित असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, श्री. ओंकार माने, शिवसेनेचे श्री. शशिकांत करप, भाजपचे विष्णु पाटसकर आदी सभेला उपस्थित होते.
    क्षणचित्र - गोपनीय विभागातील पोलीस हिंदु धर्मजागृती सभेचे चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आल्यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले, हा खाजगी जागेतील कार्यक्रम असल्याने तुम्ही याचे चित्रीकरण करू शकत नाही. विरोध केल्यानंतर त्यांनी चित्रीकरण पुसून टाकले (डिलिट केले.) तेथून जातांना ते बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे क्रमांक लिहून घेत होते. (हिंदु धर्माभिमान्यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात वेळ घालवणारे पोलीस आतंकवाद्यांना शोधण्यासाठी आपला वेळ देतील का ? - संपादक)
आढावा बैठक !
स्थळ : सोनाई मंगल कार्यालय, मलकापूर
वेळ : सायंकाळी ७

पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त फ्लेक्स फलकाचे अनावरण

अनावरणाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि धर्माभिमानी
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ फेब्रुवारी (वार्ता.) - २ मार्च या दिवशी पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्स फलकाचे ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांच्या हस्ते नारळ वाढवून, तर वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री. देवव्रत (राणा) वासकर महाराज यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. या वेळी ह.भ.प. टेंभूकर महाराज, ह.भ.प. बागडे महाराज, ह.भ.प. कबीर महाराज, ह.भ.प. नामदास महाराज, शिवभक्त प्रतिष्ठानचे श्री. प्रतापसिंह साळुंखे, धाडस प्रतिष्ठानचे श्री. रोहित खडके, विशाल कुंभार, पत्रकार महेश खिस्ते, सौ. खिस्ते, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर, पेशवा युवा मंचाचे श्री. गणेश लंके, सनातन संस्थेच्या साधिका यांंसह अन्य कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. तनिष्का जगताप (वय १० वर्षे) !

कु. तनिष्का जगताप
पालकांनो, हे लक्षात घ्या !
    तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (प.पू.) डॉ. आठवले         
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. आश्रम जीवनाविषयी ओढ : तनिष्का नेहमी मला आता आश्रमातच रहायचे आहे, असे ती म्हणते. तिला प.पू. गुरुदेवांच्या भेटीची एवढी ओढ लागली होती की, तिला त्यांचीच आठवण यायची. त्यांची भेट झाल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला. आई, मला परत जायचे नाही, मला गुरुदेवाकडेच राहायचे आहे, असे ती म्हणत होती.

(म्हणे) गोव्यात शिवजयंती का साजरी केली जाते ?

हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्रातून पोर्तुगीजधार्जिणे मडगाव येथील डॉ. फाल्कांव यांचा प्रश्‍न !
राष्ट्राभिमानी युवक शशांक आर्सेकर यांच्याकडून सडेतोड उत्तर !
     पणजी - हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्रातील वाचकांचे विचार या सदरात २२ फेब्रुवारी या दिवशी मडगाव येथील डॉ. फाल्कांव यांनी गोव्यात शिवजयंती का साजरी केली जाते ? या आशयाचे गोव्यात शिवजयंती साजरी करण्यास विरोध करणारे पत्र लिहिले होते. (हाच का ख्रिस्त्यांचा सर्वधर्मसमभाव ? हळूहळू ख्रिस्तीही आपले खरे स्वरूप दाखवू लागले आहेत, असे समजायचे का ? - संपादक) या पत्राला राष्ट्राभिमानी नागरिक शशांक आर्सेकर यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या हेराल्ड या वृत्तपत्रामध्ये सडेतोड उत्तर देतांना म्हटले आहे की, शिवाजी महाराज नसते, तर संपूर्ण गोवा ख्रिस्तीमय झाला असता; म्हणून गोव्यात हिंदू शिवजयंती साजरी करतात.

नेपाळमध्ये लहान प्रवासी विमान कोसळले

दोन विदेशी पर्यटकांसह २३ जण मृत्यूमुखी
    काठमांडू - नेपाळच्या तारा एअरचे एक लहान प्रवासी विमान मैदादी येथील एका गावात कोसळल्याची दुदैवी घटना घडली. या दुर्घटनेत दोन विदेशी पर्यटकांसह २३ जण ठार झाले. या विमानाने नेपाळमधील प्रमुख शहर पोखरा येथून जोमसोमसाठी उड्डाण केले होते. त्यानंतर हिमालयावरून उड्डाण करत असतांना काही वेळातच विमानाशी असलेला संपर्क तुटला होता.-

भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांचे सामान आमदार निवासाबाहेर काढले !

सत्ता संपल्यावरही सत्तेच्या सुविधा उपभोगणारे नेते सुराज्य देतील का ?
     मुंबई - भाजपचे माजी आमदार आणि किसान मोच्यार्र्चे उपाध्यक्ष पाशा पटेल यांचे सामान मंगळवारी मनोरा आमदार निवासामधून बाहेर काढण्यात आले. विधान परिषद आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर पटेल हे खास बाब म्हणून आमदार निवासात बी ९७ या खोलीत रहात होते. (आमदारकीचा कार्यकाळ संपल्यावर अशा सवलती आमदार का घेतात ? त्यांना तशा सवलती देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी ! - संपादक)
    पटेलांची आमदारकी संपल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना पंकजा मुंडे यांच्या कह्यातील खोली दिली होती. पंकजा मुंडे यांकडे २ खोल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी १ खोली परत केली. त्याच वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या २ पैकी १ खोली पटेल यांना द्यावी, असे बांधकाम विभागाला कळवले होते. तत्कालीन सभापतींनी ही खास बाब म्हणून मान्य केली होती. या संदर्भात पटेल म्हणाले की, सामान काढण्यापूर्वी बांधकाम विभागाने शेलार यांना किंवा मला पूर्वसूचना द्यायला हवी होती. (पेटल आमदारकीचा कार्यकाळ संपल्यावर त्या संदर्भातील सुविधा का घेत होते, ते त्यांनी आधी सांगायला हवे. - संपादक)

बेळगाव तालुका पंचायत निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव

    बेळगाव - बेळगाव तालुका पंचायत निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. मराठी भाषिकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. ४५ सदस्य असलेल्या बेळगाव तालुका पंचायतीत काँग्रेसचे २२, समितीचे १४ आणि भाजपचे ९ उमेदवार निवडून आले. येळ्ळूर या समितीच्या बालेकिल्ल्यातील जिल्हा पंचायतचे उमेदवार अर्जुन गोरल हेही पराभूत झाले आहेत.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा जानेवारी २०१६ मधील आढावा

१. मुंबई जिल्हा
१ अ. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावर उद्घोषणा चालू होणे : राष्ट्रध्वजाचा मान राखा या चळवळींतर्गत मुंबईतील मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक डॉ. आलोक बडकुल यांना निवेदन दिल्यावर त्यांनी २३ ते २६ जानेवारीपर्यंत मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते खोपोली पर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर प्रबोधनात्मक उद्घोषणा चालू केल्या.
१ आ. महिलांसाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करणारे श्री. उमाजी मुळम ! : सांताक्रूझ, गोळीबार येथील भागात समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे श्री. उमाजी मुळम यांच्या पुढाकाराने महिलांसाठी धर्मशिक्षणवर्ग चालू झाला.

कामधेनू देऊन गाढव विकत घेणारी मानसिकता !

     भारतात गोहत्या बंदी कायदा काही राज्यांत पारित झाला, तर काही राज्ये अजूनही त्या संदर्भात संभ्रमावस्थेत आहेत. ज्या राज्यांमध्ये हा कायदा पारित झाला तेथे पोलिसांपेक्षा गोप्रेमी, ग्रामस्थ, सामान्य नागरिक हेच कार्यवाही होण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिदिन वर्तमानपत्रातील वृत्तांमधून समोर येते ! त्यामुळे राज्यांतील कायद्याविषयी पोलीस यंत्रणा किती सतर्क आणि सक्षम आहे, यासंदर्भात प्रश्‍नचिन्हच निर्माण झाले आहे. जगातल्या कुठल्याही देशाचे उदाहरण घेतल्यास देशहितास्तव आणि देशाच्या सांस्कृतिक सूत्राला धरून जर एखादा कायदा पारित केला, तर तो सर्व राज्ये आणि तेथे रहाणारा प्रत्येक नागरिक यांना लागू पडतो.

स्पर्धा वीज वाचवण्याची !

      मुलांना काय कळतय ? हा तमाम पालकांचा आवडता शेरा ! पण सातारा येथील गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असा शेरा मारू शकत नाहीत; कारण त्यांची मुलेच पालकांना सांगतात, बाबा दिवा बंद करा, आई पाणी वाया घालवू नको. पालकांना त्यांचे ऐकावेच लगते; कारण मुले स्वत: ते नियम आचरणात आणतात आणि सतत विजेचे देयक (बिल) अल्प कसे येईल आणि पाणी कसे वाचेल, याकडे लक्ष देतात. शाळेने त्यासाठी ठेवलेले बक्षीस आपल्याला कसे मिळेल, याचा ते सदैव विचार करतात. 
अनावश्यक वाया
जाणारी वीज वाचवा !
     सातारा शहरातील शाहूनगर भागातील गुरुकुल शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चोरगे यांना सहा वर्षांपूर्वी ही भन्नाट कल्पना सुचली. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी त्यांनी सर्व मुलांना एकत्र बोलावून सांगितले की, आपण सगळे मिळून वीज वाचवूया. आपण पाणी आणि वीज तयार करू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वाटेलतशा वापरण्याचा आपल्याला अधिकार नाही; पण दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध झाल्यामुळे त्याचे महत्त्व आपल्याला वाटत नाही. एक दिवस असा येईल की, वीज आणि पाणी यांच्याशिवाय आपल्याला जगावे लागेल. तो दिवस आपण सगळे मिळून लांबवूया. वीज आणि पाणी वाचवायला आपल्यापासून प्रारंभ करूया.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे कारस्थान करणार्‍यांना पुरोगामी म्हणतात ! - पू. राजेंद्र शिंदे

भारतीय नागरिकांनो, जपानच्या नागरिकांकडून शिका !

     जपानमधील होजी तकाअशी या ७१ वर्षांच्या प्रेक्षकाने त्यांच्या देशातील दूरचित्रवाणीवरील राष्ट्रीय प्रसारणावर नाराजी व्यक्त करीत या वाहिनीकडून होत असलेल्या इंग्रजीच्या अतीवापराच्या विरोधात खटला दाखल केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या काही समर्थकांसह जपानमधील वाढत्या इंग्रजीच्या वापराच्या विरोधातही निदर्शने केली.
(साप्ताहिक वीरवाणी, वर्ष ३७, अंक ८, ५ जुलै २०१३) घरातील सर्व कामे करतांना सेवाभाव असणारे, वेळोवेळी साहाय्य करणारे आणि शांत स्वभावाचे पू. शंकर गुंजेकर (बेेळगाव) !

पू. शंकर गुंजेकर
     रामनगर, बेळगाव येथील सनातनचे ५७ वे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याविषयी त्यांची बहीण, त्यांची पत्नी आणि साधिका यांनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
१. इतरांचा विचार करणे 
    एकदा घरच्या शेतात साहाय्यासाठी दादांना आमची दोघींचीही (मी आणि माझी मोठी बहीण) पुष्कळ आवश्यकता होती. आश्रमसेवा असल्यामुळे मी शेतातील भात कापण्यासाठी घरी जाऊ शकत नव्हते. आमच्या दोघींच्या सेवेत अडचण येऊ नये; म्हणून दादाने एकटीलाच बोलावले. 
२. घरातील सर्व कामे सेवा म्हणूनच करणे 
     दादा घरातील सर्व कामे सेवा म्हणूनच करतात आणि प्रत्येक वेळी प्रार्थना करूनच सेवेला आरंभ करतात. दादांच्या समवेत काम करतांना आतून आपोआप नामजप होतो.

मुलांच्या गळ्यातील पदकातील प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांमध्ये पालट होणे

      १९.९.२०१४ या दिवशी माझ्या दोन्ही मुलांच्या गळ्यात प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र असलेले पदक घातले. त्यानंतर जवळपास १५ दिवसांनी दोघांच्या गळ्यातील पदकामध्ये पुष्कळ पालट झाले होते. ४ वर्षे वयाच्या कु. योगिनीच्या गळ्यातील पदकामधील प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र गडद पिवळे दिसत होते. १ वर्षे वयाच्या चि. आदित्यच्या गळ्यातील पदकामधील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव आणि तेजस्वी दिसू लागले, तर प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र तेजस्वी अन् फिकट गुलाबी दिसत होते.

कृष्णासमवेत त्याच्याच वयाची होऊन खेळणारी आणि सतत त्याच्या अनुसंधानात रहाणारी साधिका !

सौ. क्षिप्रा देशमुख
१. कृष्णासमवेत लपंडाव खेळत असतांना कितीही शोधले, 
तरी तो न सापडणे 
    एक दिवस मी श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तो ५-६ वर्षांच्या बालकाप्रमाणे माझ्या समोर आला आणि म्हणाला, माझ्यासमवेत खेळतेस का ? मी हो म्हणाले. तो म्हणाला, काय खेळणार ? पुढे तो म्हणाला, तू खाली बैस. मी तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. त्याने माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि म्हणाला, आता तू मला पकड. मी चटकन उठून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो माझ्या हाती आला नाही. मी त्याला पकडण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. तेव्हा तो मागून आवाज द्यायचा, मी तर इकडे आहे. मी तिकडे गेल्यावर तो पुन्हा जवळ येऊन मी इथे आहे, असे म्हणायचा. तो कधी माझ्या हाताला स्पर्श करायचा, तर कधी कुठूनतरी डोक्याला स्पर्श करायचा; पण मला सापडायचा नाही.

निराशेने ग्रस्त झालेल्या समस्त शेतकर्‍यांपुढे साधना करून आनंदी होण्याचा मार्ग दाखवणारे संतपदी विराजमान झालेले रामनगर, बेळगाव येथील पू. शंकर गुंजेकरमामा !

     साधना या विषयावर प्रवचन ऐकत असतांना माझ्या मनात अकस्मात् हिंदु धर्माच्या श्रेष्ठतेचे विचार येऊ लागले आणि ऋषीमुनींनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव झाली. पावसाच्या पाण्यावर शेती करणारे, गरीब आणि अल्पभूधारक असणारे विदर्भातील शेतकरी यांना त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने बरेच शेतकरी आत्महत्या करतात, हा विचार माझ्या मनात आला. निराश झालेल्या शेतकर्‍यांना आत्महत्येच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा मिळेल ?, असा विचार माझ्या मनात घोळत असतांनाच देवाने पुढील उपाय सांगितला. त्या वेळी साधना म्हणून शेतीची कामे करत संतपदी पोचलेले पू. शंकर गुंजेकर यांची आठवण झाली. त्यानंतर जाणवले, देवाने निराशेने ग्रस्त झालेल्या समस्त शेतकर्‍यांपुढे पू. शंकर गुंजेकर यांचे उदाहरण मांडले आहे. पू. गुंजेकरमामा यांनी ज्याप्रमाणे प्रयत्न केले, तसे अन्य शेतकर्‍यांनीही केले, तर त्यांना देवाचे साहाय्य मिळेल आणि देवाच्या कृपेने त्यांच्या मनावर असणारा कर्जाचा ताण न्यून होऊन ते शेतीची कामे आनंदाने करू शकतील. सातत्याने साधना केली, तर मन आनंदी बनते आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य सामान्य व्यक्तीतही निर्माण होऊ शकते, याची ग्वाही पू. गुंजेकरमामांच्या उदाहरणातून मिळते. 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०१६)

जीवनाचे सार्थक होण्यासाठी निष्काम भावाने प्रयत्न करणे आवश्यक !

श्री. संदीप जगताप
१. शिवरायांच्या आज्ञेनुसार मावळ्यांनी निष्काम भावाने 
प्रयत्न केल्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना होणे 
     छत्रपती शिवरायांनी मावळ्यांसमोर हिंदवी स्वराज्याचे ध्येय ठेवले होते. मावळ्यांनी ते ध्येय प्राप्त होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार निष्काम प्रयत्न केलेे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ ठेवला नाही, तर सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता ठेवली; कारण त्यांची छत्रपती शिवरायांवर निष्ठा होती. त्यामुळे मावळ्यांच्या जीवनाचे सार्थक झाले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापनाही झाली.
२. राज्यकर्ते, प्रशासन, तसेच पोलीस यंत्रणा यांच्यात निष्कामता आणि त्याग यांचा लवलेशही नसल्यामुळे देशासमोरील समस्या सुटण्यापेक्षा त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असणे 
     सध्याचे राज्यकर्ते, प्रशासन, तसेच पोलीस यंत्रणा यांची राष्ट्राप्रती निष्ठा नाही, याची प्रचीती देशातील भयावह समस्या आणि विविध प्रकारची आक्रमणे पाहून आपणास येत आहे. कोणत्याही अधिकार्‍याची त्याच्या वरिष्ठांवर निष्ठा नाही. कोणत्याही अधिकार्‍याच्या वृत्तीत निष्कामतेचा लवलेशही नाही. त्यांच्याकडून केवळ स्वतःचा सर्व प्रकारचा स्वार्थ साध्य करण्यासाठी यशाशक्ती प्रयत्न केले जातात, तसेच त्यांच्यात त्यागाचा लवलेशही नाही; म्हणूनच या देशातील कोणतीही समस्या मुळापासून सुटत तर नाहीच, उलट समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे !

स्थिर आणि भोळ्या भावाने देवाला आळवणार्‍या चिपळूण येथील सौ. सरिता जाधव (वय ६५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. सरिता जाधव यांचा सत्कार करतांना कु. दीपाली मतकर
    चिपळूण, २४ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील सनातनच्या साधिका सौ. स्नेहल गुरव यांच्या मातोश्री आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मधुकर गुरव यांच्या सासूबाई सौ. सरिता भाऊ जाधव यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची आनंदवार्ता ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात दिली. या वेळी सौ. जाधवआजींना श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आनंदवार्ता ऐकल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सौ. जाधवआजी म्हणाल्या, स्वत:ची दोन्ही मुले गेली, तरी दुसरे काय म्हणतील याचा विचार न करता मी नामजप करत घराबाहेर पडले. लोक म्हणायचे, मुले गेली, तरी सनातनचे करतात तरीही मी सेवा करायचे. या वेळी उपस्थित नातेवाईक आणि साधक यांनी जाधवआजींची गुणवैशिष्ट्ये व्यक्त केली.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

भाववृद्धीसाठी प्रयत्न करतांना साधिकेने प.पू. डॉक्टरांना केलेले आत्मनिवेदन

सौ. सुजाता कुलकर्णी
     मी प.पू. डॉक्टरांना पत्र पाठवले होते. त्याचे उत्तर मिळाल्यानंतर मी भावावस्था अनुभवत होते. या सप्ताहात माझ्याकडून सतत त्या पत्राचे वाचन होत असे, तसेच कृतज्ञता व्यक्त होऊन पुनःपुन्हा भावजागृती होत होती. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
१. भावजागृती या ग्रंथातील प्रतिदिन ५ - ६ पाने वाचून त्यानुसार चिंतन होणे
    प.पू. डॉक्टर, मी प्रतिदिन भावजागृती या ग्रंथातील ५ - ६ पानांचे वाचन करून त्या संदर्भात चिंतनही करते. खरे तर वाचलेली सूत्रे इतकी अंतर्मनापर्यंत पोहोचतात की, त्यानुसार आपसूकच कृती झाल्याचे नंतर लक्षात येते. तेव्हा भाव तेथे देव याचा खरा अर्थ समजला आणि मला आनंद झाला.

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, १५.३.२०१६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
    संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १५.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी 
३. वर्ष २०१५ च्या गुजराती भाषेतील पंचांगांतील विज्ञापनांची येणे बाकी 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !
    धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ आहेत. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व

      पुढील सारणीवरून कलियुगातील सध्याच्या काळात समष्टी साधना महत्त्वाची का आहे, हे कळेल. 
टीप - सत्ययुगात सर्वांचाच स्तर अधिक असल्याने समष्टी साधनेची आवश्यकता नव्हती. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

प्रत्येक चुकीतून शिकावे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मानवी आयुष्यात कालक्रमणा करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुरोगाम्यांचा अहंकार !

    हलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) साम्यवादी आणि निधर्मी यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी घातलेले थैमान कुणाच्या विस्मरणात गेले नसेल. हे विद्यापीठ हिंदुविरोधी कारवायांसाठी (कु)प्रसिद्ध आहे, हे आजपर्यंतच्या अनुभवावरून म्हणता येते. या विद्यापिठात साम्यवाद्यांची निर्मिती झाली आणि विद्यापिठाने मागील साठ वर्षे साम्यवादी विचारवंत देशाला पुरवले, असे म्हटले जाते. केंद्रात मोदी शासन सत्तेत आल्यापासून या मंडळींनी डोके वर काढले आहे, या वाक्याचा अर्थ सोपा आहे. हिंदुत्वाला विरोध हाच या साम्यवाद्यांचा कार्यक्रम असून त्यांना त्यांच्या विचारप्रणालीसमोर जनता आणि देश या गोष्टी गौण वाटतात. या मंडळींनी राजधानी देहलीत उठवलेल्या देश आणि धर्म द्रोही वादळाप्रमाणेच काही दिवसांपूर्वी म्हणजे २६ जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या शनिशिंगणापूर या गावी पुरोगाम्यांनी धर्मद्रोही वादळ उठवले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn