Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पम्पोरमध्ये कारवाईच्या वेळी मशिदीतून दिल्या पाकच्या समर्थनार्थ घोषणा !

 • * हिंदूंनो, १९८९ मध्ये मशिदींमधून हिंदूंना काश्मीर सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात आल्यावर साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले होते, हे लक्षात घ्या !
 • * श्रीनगर येथील जामिया मशिदीतील प्रत्येक शुक्रवारच्या नमाजानंतर इसिस, पाकिस्तान आणि आतंकवादी संघटनांचे झेंडे फडवले जातात, हे लक्षात घ्या !
 • * हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींतून दगडफेक केली जाते, हे लक्षात घ्या !
 • * हिंदूंच्या मंदिरांतून कधीही देशद्रोही कृती होत नाही, हे लक्षात घ्या !
जेएन्यूतील देशद्रोह्यांचे समर्थन करणारे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल,
 सीताराम येच्युरी यांच्यासारखे नेते आता मशिदीतील देशद्रोह्यांचेही समर्थन करतील !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पाम्पोरमध्ये २० फेब्रुवारीला जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात चालू झालेली सैन्याची चकमक २२ फेब्रुवारीला संपली. यात २ कॅप्टनसह ५ सैनिक हुतात्मा झाले, तर ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले; मात्र जेव्हा सैनिक आतंकवाद्याशी लढत होते, तेव्हा येथील फरेस्टाबल, दरांगबल, कदलाबल आणि सेमपोरा मधील मशिदींमधून पाकच्या, तसेच काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात येत होत्या.
१. ध्वनीक्षेपकावरून घोषणाबाजी करत सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला जात होता.
२. सैन्याने कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले, तेव्हा घोषणाबाजी करण्यात येत होती.
३. जागो जागो सुबह हो गई पाकिस्तान !, हम क्या चाहते हैं - आजादी ! अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या.
४. चकमकीच्या वेळी पाम्पोरच्या आसपास रहाणारे शेकडो मुसलमान घटनास्थळाजवळ जमा झाले.

जेएन्यूमध्ये प्रतिदिन मिळतात वापरलेले ३ सहस्र निरोध ! - भाजप नेत्याचा आरोप

सनातनच्या आश्रमावर अशाच प्रकारचे आरोप करणारे काँग्रेसवाले
 आणि सनातनद्वेषी या आरोपावर काही बोलतील का ?
     जयपूर - जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केला आहे.
आहुजा पुढे म्हणाले की,
१. प्रतिदिन सिगारेटची १० सहस्र थोटके, हाडांचे ५० सहस्र तुकडे, दारूच्या २ सहस्र रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात आलेली ५०० इंजेक्शन मिळतात. (आहुजा यांना हे माहीत होते, तर त्यांनी ते आधीच का सांगितले नाही ? - संपादक) २. जेव्हा देशभर दुर्गाष्टमी साजरी केली जाते, तेव्हा जेएन्यूचे विद्यार्थी महिषासुराची जयंती साजरी करतात. (यावरून या विद्यार्थ्यांची आसुरी वृत्ती लक्षात येते ! - संपादक)
३. जेएन्यूचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नग्न नृत्य करत असतात.

जवळा पांचाळ (जिल्हा हिंगोली) येथे छत्रपती शिवाजी महाराज कमानीचा शुभारंभ करताच २०० धर्मांधांचे हिंदूंच्या घरांवर आक्रमण !

हिंदुसंघटन हाच यावरील उपाय !
     जवळा पांचाळ (जिल्हा हिंगोली) - येथे गावकर्‍यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज कमानीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. हे काम चालू असतांनाच धर्मांधाच्या टोळक्याने अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंच्या घरावर आक्रमण केले, तसेच घरात घुसून हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. (हिंदूंनो, प्रभावी हिंदूसंघटन किती आवश्यक आहे, हे जाणा ! - संपादक) त्यामुळे जवळा पांचाळ येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

अमळनेर येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत धर्मांधांकडून दंगल !

हिंदूंनो, आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत दंगल घडवणारे धर्मांध उद्या 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्यावरूनही दंगली घडवतील, हे जाणा !
     अमळनेर - येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे. (धर्मांधांनी दंगल चालू करायची आणि त्याला प्रत्युत्तर दिल्यावर हिंदूंवर गुन्हे नोंद करायचे, हे कधी थांबणार? - संपादक)
१५ ते २० हिंदूंनी शिवजयंतीची मिरवणूक काढली होती. कसाली मोहल्ला भागातून ही मिरवणूक जात असता धर्मांधांनी मिरवणुकीचा रस्ता अडवला. इकडून मिरवणूक कशी काय काढली ? असे म्हणून यावरून हुज्जत घालणे चालू केले. धर्मांधांनी मिरवणुकीतील जमावावर दगडफेक केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. जमावावर दगडफेक केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली.

हिंदू कधीही भारतात अल्पसंख्य होऊ शकत नाहीत ! - सरसंघचालक मोहन भागवत

     कोलकाता - १२० कोटी लोखसंख्या असणार्‍या या देशात हिंदू कधीही अल्पसंख्य होणार नाहीत. जे पूर्वी हिंदू होते त्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे त्यातील ५० टक्के तरी परत येतील. त्यांना बलपूर्वक किंवा आमिष दाखवून नव्हे, तर प्रेमाने परत आणले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका परिसंवादात ते बोलत होते.

जळगावमध्ये धर्मांधांचे हिंदु तरुणावर आक्रमण !

धर्मांधांची आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या !
     जळगाव - येथील काही धर्मांधांनी एका हिंदु तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळई घालून त्याचे डोके फोडले. यावरून वाद निर्माण होऊन शनिपेठेत दगडफेक करण्यात आली. पोलिसांची गाडी आणि पोलीस ठाणे यांवरही धर्मांधांच्या जमावाने दगडफेक केली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! अशा धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलतील का ? - संपादक) या प्रकरणी १२ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केरळमधील दिग्दर्शक सेक्सी दुर्गा नावाचा चित्रपट काढणार !

अन्य धर्मियांच्या देवतांची नावे अशा प्रकारे वापरण्यास सनलकुमार शशिधरन् धजावतील का ?
     तिरुवनंथपुरम् - केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे. लैंगिकता, खाजगी जीवन आणि महिला यांकडे केरळाचा समाज कशा पद्धतीने पहातो यासंदर्भात या चित्रपटात उहापोह करण्यात आला आहे. सेक्सी दुर्गा या नावामुळे या चित्रपटावर आक्षेप घेण्यात येईल, असे सनलकुमार यानंा विचारले असता, कलाकारांच्या कलास्वातंत्र्यावर कोणी गदा आणता कामा नये. चित्रपटाचे नाव पालटणे म्हणजे शरण जाण्यासारखे आहे आणि ते मी मान्य करणार नाही, असे मत हिंदुद्वेषी सनलकुमार यांनी व्यक्त केले. (या कलाकारांना त्यांचे स्वातंत्र्य केवळ हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतांनाच आठवते का ? - संपादक) या चित्रपटात राजश्री देशपांडे या प्रमुख भूमिका करणार आहेत, तर इतर कलाकारांत प्रदीप कुमार, अरुण नायर इत्यादींचा समावेश आहे. (हिंदूंच हिंदु धर्माचा अवमान करतात, असे कुणी म्हटल्यास त्यात गैर ते काय ? - संपादक)

मालगाडी जाळली, सोशल मीडियावर बंदी !

राजस्थानमधील जाट आरक्षणासाठीचे आंदोलन
 • कुठे केवळ स्वार्थाचा विचार करणारे जात्यंध, तर कुठे सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणारा धर्म ! : सर्वांचा विचार न करता केवळ आपल्या जातीसाठी आरक्षण मागणे, हा स्वार्थीपणा आहे आणि त्याला मान्यता देणे हा जनतेला न शिकवणार्‍या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय आहे ! याउलट धर्म सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देतो.
 • आंदोलनकर्त्यांनी हीच शक्ती अतिरेक्यांविरूद्ध वापरली असती, तर भारताचे काही जिल्हे आतंकवाद्यांपासून मुक्त झाले असते. 
    रोहतक - हरियाणातील जाट समाजाने केलेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना आरक्षण देण्याची मागणी भाजपने मान्य केल्यानंतर आंदोलन थंड होऊ लागले असतांना राजस्थानमध्ये हे आंदोलन जोर धरू लागले आहे. २३ फेब्रुवारीला भरतपूर येथील हेलक रेल्वे स्थानकात उभ्या असणार्‍या मालगाडीला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. जाटांचे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी राजस्थान शासनाने सोशल मीडियावर बंदी घातली आहे. तसेच इंटरनेट सेवा ही बंद केली आहे.

लष्करामुळेच टिकले आहे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य !

कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे देशप्रेमी ट्विट
    मुंबई - देशाच्या सीमांवर आपले लष्करी जवान देशरक्षणासाठी रक्त सांडत आहेत. त्यांच्या बलीदानामुळेच आम्ही देशवासी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा बेधडकपणे मारू शकतो. हिंदुस्थानी लष्कर आणि सुरक्षा दले जागरूक म्हणून तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात. लष्कराला दोष देऊ नका, त्यांचा सन्मान करा, असे देशप्रेमी ट्विट स्वत:च्या ट्विटर खात्यावरून करीत भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केले.
    श्री. धोनी पुढे लिहितात की,
१. सीमांचे रक्षण करणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांचे बलिदान विसरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी देशाचे तुकडे करण्याच्या देशद्रोही घोषणा देतात.
२. त्यांच्या समर्थनासाठी स्वार्थी राजकीय नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली शासनाला लक्ष्य करत आहेत, हा लाजिरवाणा प्रकार आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नव्हे; तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्यावा ! - हिंदु जनजागृती समिती

     मुंबई - चवीसाठी बनतो तो शिरा आणि भावापोटी बनतो तो प्रसाद, असे एक वाक्य प्रसिद्ध आहे. कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कारागृहातील महिला कैद्यांकडून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरासाठी लागणारे प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा निर्णय हा सर्वथा अयोग्य आहे. हे एखादे व्यावसायिक कंत्राट न समजता देवीसाठी सात्त्विक प्रसाद बनवण्याची सेवा आहे, असा सेवाभाव असणार्‍या भक्तांना ही सेवा द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

८ मार्चला आरोप निश्‍चित करून सुनावणीस प्रारंभ होणार !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
समीर गायकवाड यांना अंडासेलच्या बाहेर ३ घंटे फिरण्यास न्यायालयाची अनुमती !
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना सकाळी ६ ते ९ असे ३ घंटे अंडासेलमधून बाहेर फिरण्यास न्यायालयाने अनुमती द्यावी, अशी श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी केलेली मागणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी २३ फेब्रुवारीला मान्य केली. तसेच या खटल्यातील आरोप निश्‍चित करून हा खटला चालू करावा, अशी मागणीही अधिवक्ता श्री. पटवर्धन यांनी केली. या वेळी न्यायाधीश श्री. बिले यांनी उच्च न्यायालयाने या खटल्यास स्थगिती न दिल्यास सुनावणी ८ मार्चपासून चालू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हास्तरावर या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.

गोव्यात १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा मौलवी सर्फराज अहमदला अटक !

खोट्या आरोपावरून हिंदु संतांची अपर्कीती करणारी प्रसिद्धीमाध्यमे आता कुठे गेली ?
वासनांध मुसलमान !
     वास्को, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा वास्को येथील मशिदीचा मौलवी सर्फराज अहमद याला वास्को पोलिसांनी २२ फेब्रुवारीला अटक केली. सदर मौलवी पीडित मुलीच्या शेजारीच रहातो. पीडित मुलीच्या आईने मौलवीला जेवण पाठवून दिले होते. जेवणाची भांडी आणण्यासाठी दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी मौलवीच्या घरी गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या आईने मुसलमानांच्या विरोधाला न जुमानता वास्को पोलीस ठाण्यात तक्रार केली. सवेरा या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या तारा केरकर यांचे यासाठी सहकार्य मिळाले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५४ आणि ३५४ अ आणि गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत तक्रार नोंद करून या मौलवीला अटक केली.

सांगलीतील धार्मिक स्थळे आणि पालिकेची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

 • सांगली महानगरपालिकेला धमकीचे पत्र
 • लष्कर-ए-तोयबा आणि संभाजी ब्रिगेड यांचा पत्रामध्ये उल्लेख
आतंकवादग्रस्त भारत ! सातत्याने बॉम्बस्फोटाविषयी येणार्‍या धमक्या आणि
होणारे बॉम्बस्फोट यांपासून शासनाने जनतेला भयमुक्त करावे, ही अपेक्षा !
    सांगली, २३ फेब्रुवारी - सांगली महानगरपलिकेला बॉम्बस्फोटद्वारे शहरातील धार्मिक स्थळे आणि पालिकेची इमारत उडवून देण्याचे धमकीपत्र मिळाले आहे. एका पत्रामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि दुसर्‍या पत्रामध्ये संभाजी ब्रिगेड यांच्या नावाचा उल्लेख आहे. (या प्रकरणी पोलीस प्रशासनाने संबंधित संघटनेची चौकशी करून कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक) या पत्रामध्ये २७ आणि २८ फेब्रुवारी या दिवशी बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्राशी संघटनेचा कसलाही संबंध नाही. हा संघटनेच्या अपकीर्तीचा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - मुख्यमंत्री

     मुंबई - मराठी भाषा जगली पाहिजे. ती सर्वमान्य झाली पाहिजे. त्यासाठी पूरक कार्यवाही करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य मराठी विकास संस्थेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आदी उपस्थित होते.
    ठाणे - येथील वागळे इस्टेट परिसरातील १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवत गेल्या ६ मासांपासून बलात्कार करणारा धर्मांध मुबारक मोहम्मद अली चौधरी (वय २२ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर अशा वासनांध धर्मांधांचा त्यांनी चौरंगाच केला असता ! - संपादक)

हिंदुसंघटनाचा आविष्कार : विविध राज्यांतील हिंदु नेते चेन्नईत एकवटले !

 • शिवसेना तमिळनाडूकडून कार्यक्रमाचे आयोजन
 • १ सहस्रहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती
इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट (आय.ए.आय.एस्.) या संकेतस्थळाचे चेन्नईत उद्घाटन
डावीकडून सर्वश्री. टी.एन्. मुरारी, अनिल धीर, रमेश शिंदे, राधाकृष्णन्,
प्रमोद मुतालिक, पारस राजपूत, अर्जुन संपथ, राहुल कौल, अधिवक्ता
अमृतेश एन.पी. आणि अधिवक्ता विष्णू जैन
     चेन्नई, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांंच्या (दिनांकानुसार) जयंतीच्या निमित्ताने २० फेब्रुवारी या दिवशी येथील कोरुक्कुपेट भागात विविध राज्यांच्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांसह हिंदूंची एक विशाल सभा पार पडली. शिवसेना तमिळनाडूच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेत श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, यूथ फॉर पनून कश्मीरचे श्री. राहुल कौल, ओडिशा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल धीर, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट (आय.ए.आय.एस्.) या संकेतस्थळाचे संपादक श्री. पारस राजपूत, शिवसेनेचे सर्वश्री मुरारी, राधाकृष्णन्, स्टॅलिन, दर्शन नंधुरकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आदी हिंदुत्वनिष्ठ आणि १ सहस्रहून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विसर्जित करावे - डॉ. प्र.चिं. शेजवलकर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षांना असे वाटणे, हे साहित्यिक आणि
साहित्य महामंडळ यांना विचार करायला लावणारे आहे. शेजवलकर यांच्या
या वक्तव्याविषयी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला काय म्हणावयाचे आहे ?
    पुणे, २३ फेब्रुवारी - गेल्या ३ वर्षांपासून साहित्य महामंडळाचे कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे. त्यांच्याकडून देणगीदारांच्या निधीतून ग्रंथांना पारितोषिके देणे आणि अधूनमधून शोकसभा घेणे, या पलीकडे पूर्वी चालू असलेले अन्य उपक्रम घडलेच नाहीत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड आणि संमेलन स्थळाची निवड करून ते पार पाडणे, याखेरीज त्यांच्याकडून भरीव वाङ्मयीन कार्य घडत नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विसर्जित (बरखास्त) करावे, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र.चिं. शेजवलकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

योग विषयावर पुणे विद्यापिठात आंतरराष्ट्रीय परिषद

     पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात योग विज्ञान आणि कला : सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक भाग या विषयावर २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, संस्कृत-प्राकृत भाषा विभाग आणि लोणावळा येथील कैवल्यधाम योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार आहे. जपान, कोरिया, अमेरिका, यु.के. या देशांसह भारतभरातून १४० हून अधिक योगप्रेमी या परिषदेत सहभागी होत आहेत. २४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता विद्यापिठाच्या सी.ए.एस्.एस्. लॉनवर उद्घाटन समारंभ होणार आहे. चार दिवसांच्या या कार्यक्रमात योगासनांची प्रात्यक्षिके होणार असून संस्कृत लोकनाट्याचे सादरीकरण होणार आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी लोणावळा येथील कैवल्यधाम योग केंद्राला भेट देण्यात येणार असून २७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता समारोप समारंभ होईल.

सोलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम ठरली केवळ देखावा !

      सोलापूर - सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची मोहीम म्हणजे केवळ नाटकच ठरले आहे. राजकीय दबावापोटी कोणत्याही मोठ्या अनधिकृत धार्मिक स्थळांना हात न लावता त्यांना अभय देण्यात आले आहे. या मशिदी, प्रार्थनास्थळे, तसेच मदरसे यांचे कार्यालयांत, तसेच सभागृहात रूपांतर केले गेले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आणि पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी राबवलेली सोलापूर शहरातील मोहीम ही फसवी घोषणा ठरली आहे. (अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करतांना केवळ मंदिरांनाच लक्ष्य केल्याच्या घटना आहेत. अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांना यातून मोकळीक दिली आहे का ? - संपादक)

मेट्रोने कायद्याचा खोटा संदर्भ देऊन प्राचीन मंदिरे तोडली !

राजस्थानमध्ये मंदिरांवर संकट !
 • धार्मिक कायद्यात प्राचीन मंदिरे तोडण्याची तरतूद नाही !
 • या गुन्ह्याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा करा !
     जयपूर - धार्मिक कायदा १९५४ या कायद्यामध्ये नवीन प्रकल्पासाठी प्राचीन मंदिरांनाही हटवण्यासंदर्भात कुठेही उल्लेख नसतांना जयपूर मेट्रोच्या अधिकार्‍यांनी त्यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात या कायद्याचा खोटा संदर्भ दिला आणि नियमाच्या विरोधात जाऊन तेथील प्राचीन मंदिरे तोडण्याची कारवाई केली. त्यामुळे मेट्रोनंतरही अनेक विकास प्रकल्प येणार असल्यास त्या प्रकल्पांसाठी पुन्हा प्राचीन मंदिरे तोडणार का ? असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.

(म्हणे) हो, मी हिंदु आहे आणि देशद्रोहीसुद्धा आहे !

स्वत:ला देशद्रोही म्हणवून घेऊन बहुदा पहिल्यांदाच सत्य बोलणारे सरदेसाई !
पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे राष्ट्रद्रोही कृत्यांना अश्‍लाघ्य समर्थन
    देहली - वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी देशात चालू असलेल्या जेएन्यू प्रकरणावर राष्ट्रद्रोही वक्तव्य केले आहे. मी हिंदु आहे आणि देशद्रोहीसुद्धा आहेे, असे संतापजनक विधान त्यांनी केले आहे.
    काही वर्षांपूर्वी मला देशद्रोही म्हटले गेले, तेव्हा मला राग आला होता; परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पहाता जेथे देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्यात येत आहेत, तेथे मला किंचाळून सांगावेसे वाटते, गर्व से कहो, हम देशद्रोही हैं ! 
सरदेसाई पुढे म्हणाले की,
१. मी देशद्रोही आहे कारण, एकीकडे जेएन्यूत महंमद अफझलच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी मी अस्वस्थ झालो, परंतु हे कृत्य देशद्रोही नव्हते. (संसदेवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात फासावर लटकवलेला अफझल याचे समर्थन करणे, हे सरदेसाई यांना देशद्रोही वाटत नसेल, तर त्यांची कीव करावी तेवढी थोडीच ! उद्या इसिसच्या समर्थनार्थ कोणी घोषणा दिल्यास, सरदेसाई असेच बडबडतील ! - संपादक) जो वीडियो समोर आला, त्यात विद्यार्थ्यांना भारत की बरबादी आणि शहीद अफझलच्या समर्थनात घोषणा दिल्याचे दाखवण्यात आले असले, तरी ते खरंच विद्यार्थी आहेत का यात शंका आहे. (व्हिडिओमध्ये ओमर खलीद या घोषणा देतांना दिसत आहे, तरीही सरदेसाई असे वक्तव्य करतात, यातच सर्वकाही आले ! - संपादक)

जे राष्ट्र इतिहास विसरते, ते विश्‍वाच्या संघर्षात टिकत नाही !

भोर (जिल्हा पुणे) येथे धर्मवीर बलीदान
मासानिमित्त पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन !
    भोर, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - आज हिंदूंवर अनेक संकटे आली आहेत. आतंकवाद, अत्याचार, गोवंश हत्या, दंगली, धर्मांतर अशा छायेखाली हिंदू जगत आहेत. याचे कारण म्हणजे, आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाठ फिरवली आहे. आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरलो आहोत. जे राष्ट्र इतिहास विसरते, ते विश्‍वाच्या संघर्षात टिकत नाही, असे स्फूर्तीपर मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर बलीदान मासानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भोर आणि परिसरातील ३ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात त्यांच्या विरोधात घोषणा देणार्‍याला मारहाण

     वाराणसी - बनारस हिंदु विद्यापिठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्याला भाजप कार्यकर्त्यांनी चोप दिला. आशुतोष सिंह असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यापिठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांविषयी आशुतोषने घोषणा दिल्या. पोलिसांनी आशुतोषला कह्यात घेतले आहे. काही विद्यार्थ्यांनी आज काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात लखनऊमधील विद्यापिठात दोन विद्यार्थ्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

भारत आणि चीन अमेरिकेतील नोकर्‍या पळवतात ! - डोनाल्ड ट्रम्प

    वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, भारत आणि चीन अमेरिकेतील नोकर्‍या पळवून नेत आहेत. मी त्या परत आणेन, असे आश्‍वासनही त्यांनी अमेरिकन नागरिकांना दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएन्एन्ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.

धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्याकडून राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह ५ नेत्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

राष्ट्र आणि धर्मद्रोही नेत्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार्‍या अधिवक्ता त्रिपाठी यांचे अभिनंदन !
    वाराणसी - देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी, कॅम्युनिस्ट नेते सीताराम येंच्युरी, डी. राजा आणि जेडीयूचे के.सी. त्यागी यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेश त्रिपाठी यांनी एसीजेएम् षष्टमच्या न्यायालयामध्ये राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली. त्याच बरोबर देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हिंदुंच्या देवता हनुमानाला ट्विटरवर दंगलखोर आणि एका राक्षसाच्या स्वरूपात प्रस्तुत केले. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून केजरीवाल यांच्या विरोधातही अधिवक्ता त्रिपाठी यांनी तक्रार दाखल केली आहे. या नेत्यांनी जेएन्यूच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप त्रिपाठी यांनी या वेळी केला. न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी १२ मार्च या दिवशी निश्‍चित केली आहे.

पत्नीच्या मृत्योत्तर विधींऐवजी जिल्हा परिषद शाळेसाठी देणगी

मृत्योत्तर विधींना फाटा ही क्रांती नव्हे, अज्ञान !
    अकोला, २३ फेब्रुवारी - येथील पातूर तालुक्यातील तांदळी बुद्रुक या गावातील अविनाश नाकट यांनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर दशक्रिया, तसेच अन्य विधी न करता जिल्हा परिषद शाळेसाठी अर्थसाहाय्य करून ती शाळा डिजिटल केली. २२ फेब्रुवारीला या शाळेचे लोकार्पण करण्यात आले. नवा आदर्श, शाश्‍वत क्रांती, सामाजिक जाणीव, चुकीच्या रुढीपरंपरांना फाटा आदी शब्दांची उधळण करत या कृतीचे काही प्रसिद्धीमाध्यमांकडून, तसेच धर्मविरोधी मंडळींकडून कौतुक करण्यात आले; परंतु हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेले शास्त्र आणि नियम यांचा विचार केला, तर या कृतीला धर्मशास्त्रविषयक अज्ञानाचे प्रकटीकरण म्हणावे लागेल. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मात सांगितलेल्या विधींमागची आध्यात्मिक, कारणे आणि लाभ यांपासून बहुतांश हिंदु समाज वंचित आहे. अंत्यसंस्कार हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. निधन झालेल्या व्यक्तीचे वातावरणातील नकारात्मक शक्तींपासून रक्षण व्हावे आणि व्यक्तीला मृत्योत्तर चांगली गती मिळावी, या उद्देशाने हे विधी केले जातात. समाजकार्यासाठी निधी द्यायचा असेल, तर आवर्जून द्यावा; पण त्यासाठी धार्मिक विधी न करण्याचा पर्याय कशासाठी ? धर्मविरोधी मंडळींकडून होणार्‍या बुद्धीभेदाला बळी पडून हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक विधींच्या लाभांपासून आपण वंचित राहू नये, यासाठी स्वतःच धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. - संपादक)

(म्हणे) हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा हिंदूंच्या हिताचा नाही !

ज्येष्ठ विचारवंत (?) डॉ. राम पुनियानी यांना हिंदुत्ववादाचा पोटशूळ
    पुणे, २३ फेब्रुवारी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माच्या नावाखाली जुनी मूल्ये रुजवून सामान्यांना पुन्हा गुलामगिरीकडे नेत आहे. हिंदुत्ववादी राष्ट्रवाद हा हिंदूंच्या हिताचा नाही. त्यामुळे दलित, आदिवासी आणि स्त्रियांचे शोषण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद हा विषमतापूर्ण आणि सनातनी व्यवस्था आणणारा आहे, असे हिंदुद्वेषी प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी केले. (सनातन धर्म समृद्ध जीवनशैली देणारा आणि जीवनाची सर्वांगीण उन्नती करणारा आहे आणि त्यामुळेच लक्षावधी वर्षे तो टिकून आहे. ज्यांना हिंदुद्वेषाची कावीळ झाली आहे, त्यांना ही गोष्ट लक्षात काय येणार ? - संपादक) पुणे शहरातील विविध दलित, डाव्या आणि पुरोगामी संघटना यांनी एकत्र येऊन देशप्रेमी रोहित वेमुला विद्यार्थी युवा संमेलनाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते राष्ट्रवाद, देशभक्ती आणि आजची आव्हाने या विषयावर बोलत होते.

नांदेड येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाचा खून

    नांदेड - २० फेब्रुवारी या दिवशी नांदेड-हैदराबाद रस्त्यावर देगलूर नाका परिसरात गजानन गाडे या एका ३५ वर्षीय हिंदु युवकाचा खून अलीखान मुख्तारखान या २६ वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने खून केला. या घटनेनंतर रात्रभर जुन्या नांदेड भागात तणाव निर्माण झाला होता. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेपूर्वी या दोघांमध्ये काही वाद झाला, त्यानंतर अलीखानने गजाननच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलीस घटनास्थळी धावले आणि अलीखानला कह्यात घेतले. या घटनेचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी रात्रभर गस्त घातली. या प्रकरणी दोन युवक फरार झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आपली तळमळ वाढवूया ! - सुमित सागवेकर

     नेेरुळ (नवी मुंबई) - छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी आतंकवादापासून देव, देश आणि धर्म यांचे रक्षण केले. गोहत्या आणि धर्मांतर यांना आळा घातला. स्त्रीशीलरक्षण केले. यातूनच त्यांचे असामान्यत्व दिसून येते. आपण स्वतःला शिवभक्त म्हणवतांना त्यांच्या नावाचा अवमान होईल, अशी कोणतीही कृती करू नये. शिवाजी महाराज हे मूर्तीमंत धर्माचरणाचे प्रतीक होते. आपणही धर्माचरण आणि धर्मरक्षण करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आपली तळमळ वाढवूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. स्वराज्य प्रतिष्ठान, नेरूळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी २०० जण उपस्थित होते. स्वराज्य प्रतिष्ठानकडून श्री. सुमित सागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या मंदिरांतून कधीही देशद्रोही कृती होत नाहीत, हे लक्षात घ्या !
     पाम्पोर (काश्मीर)मध्ये आतंकवाद्यांशी चालू असलेल्या चकमकीच्या वेळी येथील फरेस्टाबल, दरांगबल, कदलाबल आणि सेमपोरामधील मशिदींमधून जागो जागो सुबह हो गई पाकिस्तान, इत्यादी पाकचे समर्थन करणार्‍या घोषणा देण्यात आल्या.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pamporeme atankiyonse chal rahi muthbhedke samay yahaki masjidose Pak samarthit ghoshnayein di gayi. - Kya sarkar in deshdrohiyonpar karyavahi karegi ?
जागो !
: पाम्पोर में आतंकियों से चल रही मुठभेड के समय यहां की मस्जिदों से पाक समर्थित घोषणाएं दी गईं ! - क्या सरकार इन देशद्रोहियों पर कार्यवाही करेगी ?

मंदिराला तोडून मशीद बांधणे इस्लामनुसार पाप ! - मुफ्ती अनफासुल हसन

भारतातील मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारणार्‍या आपल्या पूर्वजांचे पाप 
धुण्यासाठी मुसलमान तेथे पुन्हा मंदिरे बांधून देतील का ?
     हमीरपूर (उत्तरप्रदेश) - येथील राठ विभागात आयोजित एका कार्यक्रमात मुफ्ती अनाफसुल हसन यांनी म्हटले की, इस्लाममध्ये मंदिर तोडून तेथे मशीद बांधणे, हे पाप आहे. 
मुफ्ती अनाफसुल हसन यांनी केलेली विधाने 
१. आपला शेजारी कोणत्याही धर्माचा असला, तरी त्याच्या मुली, बहिणीचे रक्षण तसेच केले पाहिजे, जसे आपल्या बहिणी आणि मुलीचे केले जाते. इस्लाम शांतीचा संदेश देतो. 
२. इस्लाममध्ये चोरी करणार्‍याचे हात कापले जातात; कारण त्याने पुन्हा चोरी करू नये.
३. देशात योग्य न्याय मिळू लागला, तर वाद आपोआप समाप्त होतील. 
४. नेत्यांना सत्तेची चिंता आहे मनुष्याची नाही. 
५. आयएस्आय, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मुहम्मदचे आतंकवादी कधीही मुसलमान होऊ शकत नाहीत. 
६. इस्लाम हिंसाचाराची अनुमती देत नाही. 
(मुफ्ती अनाफसुल हसन यांनी म्हटल्याप्रमाणे इस्लाम असा आहे, तर आतंकवादी कारवायांमध्ये मुसलमान का सापडतात, याचे उत्तर ते देतील का ? - संपादक)

मध्यप्रदेशच्या उन्हेल येथे धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण, ४ हिंदू घायाळ

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी आता स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या आणि संघटित व्हा ! 
    उन्हेल (उज्जैन) - येथे शुल्लक कारणावरून धर्मांधांनी हिंदूंना मारहाण केली. यात नगर परिषदेच्या उपाध्यक्षांसह ४ हिंदू घायाळ झाले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषदेचे उपाध्यक्ष ईश्‍वर सोनी लाला त्यांच्या घरासमोर कार उभी करत असतांना तेथून दुचाकीने जाणार्‍या धर्मांध आजम अली आणि लाला कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन लाला यांच्यासह ४ हिंदू घायाळ झाले.

गोव्यात धर्मद्रोही नाटक सादर करणार्‍या नाट्यनिर्मात्याला धर्माभिमानी श्री. रेशक गांवकर यांनी खडसवले !

अन्य पंथियांनी कधी अल्लाची किंवा येशूची अशी खिल्ली उडवल्याचे ऐकिवात आहे का ?
श्री. रेशक गावकर
     फोंडा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - कलाचेतना वळवई या नाट्यसंस्थेच्या रासरंग या नाटकातून हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्यात आले आहे. गांजे येथील श्री गांजेश्‍वरी मंदिराच्या वर्धापनादिनाच्या निमित्ताने २० फेब्रुवारीला रात्री झालेल्या प्रयोगानंतर गांजे गावातील धर्माभिमानी नागरिक श्री. रेशक गावकर यांनी नाटकाचे निर्माते आणि अभिनेता राजदीप नाईक यांना खडसवले; मात्र राजदीप नाईक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नाटकामध्ये असलेल्या विडंबनाविषयी जाणीव करून देऊनही नाटकामध्ये काहीच विडंबन नाही, असे राजदीप नाईक म्हणाले. गावातील पुरोहित, धर्माभिमानी नागरिक यांना हे नाटक आवडले नाही.

देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा थयथयाट !

(म्हणे) मोदी शासनाकडून राष्ट्र्रभक्तीची नकली चर्चा !
     नवी देहली - मोदी शासन आर्थिक, सामाजिक आघाडीवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच मोदी शासनाने आता राष्ट्र्रभक्ती आणि राष्ट्र्रवादाची नकली चर्चा चालू केली आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. विरोधकांच्या दडपशाहीनंतर आता शासनाने विद्यापिठांकडे मोर्चा वळवला असेही त्या म्हणाल्या. अरुणाचल प्रदेशमधील शासन पालटल्याचा उल्ललेख करून सोनिया गांधी म्हणाल्या की, जनतेने निवडून दिलेली शासने विसर्जित केली जात आहेत; मात्र भाजपशासीत राज्यांमध्ये वारेमाप भ्रष्टाचार होऊनही तेथे काहीही कारवाई केली जात नाही. (बोफोर्स, कोळसा, खाण, २-जी स्पेक्ट्रम आदी घोटाळे होऊनही निष्क्रिय रहाणार्‍या सोनिया गांधी भ्रष्टाचारावर बोलतात हा विनोदच होय ! - संपादक)

नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात मराठी पुस्तक विक्रीच्या दुकानांची वानवा ! - सतीश तांबे

ही स्थिती पालटण्यासाठी मराठीप्रेमी काही प्रयत्न करतील का ?
     वाशी - सद्यस्थितीत मराठी वाचनालयांना मरगळ आली आहे. नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात मराठी पुस्तक विक्रीच्या दुकानांची वानवा आहे, अशी खंत साहित्यिक सतीश तांबे यांनी व्यक्त केली. मराठी भाषा दिनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई मनसेच्या वतीने मराठी राजभाषा सप्ताहाचे आणि मराठी पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन येथे करण्यात आलेहोते. या वेळी ते बोलत होते. येत्या काळात वाचक आणि वाचनालये यांच्यात सांगड घालून देणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.

पुणे येथे हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशांची सुटका; एका धर्मांधाला अटक

शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची
कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
     पुणे, २३ फेब्रुवारी - येथील वानवडी बाजारमधील मशिदीच्या मागील बाजूने धर्मांध मोनिस आझाद शेख हा एका टेम्पोतून गोवंशियांची हत्या करण्यासाठी घेऊन जात होता. वानवडी पोलिसांनी त्याला २१ फेब्रुवारी या दिवशी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ गायी, २ वासरे आणि टेम्पो कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गिरीगोसावी यांनी तक्रार दिली असून मोनिसला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलन होणार ?

आरक्षणाच्या भस्मासुराचे दुष्परिणाम
     पुणे, २३ फेब्रुवारी (वार्ता.) - हरियाणामध्ये जाट समाजाने आरक्षणासाठी हिंसक आंदोलन केल्यानंतर शासनाने आरक्षणाच्या संदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात मराठा संघटनांकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र शासनाने १ मे २०१६ पर्यंत हा निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातही अन्य संघटनांच्या साहाय्याने उग्र आंदोलने करण्याची चेतावणी छावा संघटनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (आरक्षणाचे सूत्र वेळीच निरस्त न केल्याचा हा दुष्परिणाम आहे. आतातरी शासनाने जागे होऊन आरक्षण हे सूत्र इतिहासजमा करून गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश आणि अन्य संधी द्याव्यात, ही अपेक्षा ! - संपादक)

महात्मा बसवेश्‍वर यांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी दगडफेक आणि पोलिसांकडून लाठीमार

नांदेड महानगरपालिका प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे मोर्च्याला हिंसक वळण !
    नांदेड, २३ फेब्रुवारी - महात्मा बसवेश्‍वर यांचा पुतळा नियोजित जागेवरच बसवावा, या मागणीसाठी वीरशैव आणि लिंगायत समाजाने मोर्चा काढला होता. या मोर्च्यामध्ये करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन महापौर किंवा आयुक्त यांनी स्वीकारले नाही. (महापौर आणि पालिका आयुक्त यांनी असा उद्दामपणा अल्पसंख्यांकांविषयी दाखवला असता का ? - संपादक) त्या वेळी या मोर्च्याला उपस्थित असलेल्या ४ आमदारांनीही महापौर आणि आयुक्त यांना विनंती केली. तरीसुद्धा आयुक्त आणि महापौर यांनी निवेदन स्वीकारण्याचे औदार्य दाखवले नाही. (असे महापौर आणि आयुक्त सर्वसामान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या मोर्चेकर्‍यांनी पालिका आणि पोलीस यांच्या दिशेने दगडफेक केली. तेव्हा पोलिसांनी मोर्चेकर्‍यांवर अमानुषपणे लाठीमार केला. (धर्मांधांकडून दगडफेक केली जाते, तेव्हा पोलिसांच्या या लाठ्या कोठे असतात ? - संपादक) लाठीमारात १२ जण जखमी झाले असून, त्यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या मोर्चाचा समारोप मोर्चेकर्‍यांनी गाढवाला निवेदन देऊन केला.

पुणे येथे मिनरल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या (एम्.पी.टी.च्या) जागतिक परिषदेत गेल्यावर सनातनचे साधक श्री. अरुण डोंगरे यांना आलेले अनुभव

श्री. अरुण डोंगरे
     श्री. अरुण डोंगरे यांनी एका जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी आणि तेथे गेल्यावर केवळ तंत्रज्ञानाच्या स्तरावर नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर विचार करून शिकण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्यांना आलेले अनुभव येथे देत आहोत. 
१. खनिज अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील मिनरल प्रोसेसिंग टे
क्नॉलॉजीच्या जागतिक परिषदेचे आयोजन ! 
     सर्व प्रकारच्या धातूंच्या खनिजांचे अध्ययन करणारी अभियांत्रिकीची शाखा म्हणजे खनिज अभियांत्रिकी (मिनरल इंजीनियरिंग) ! जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अरुण कुमार बिस्वास असून यांनी वर्ष १९६८ मध्ये अरुण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल इंजिनिअर्सची स्थापना केली होती. त्यांनी अनेक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना, तसेच पी.एच्.डी. करणार्‍यांना त्यांच्या प्रकल्पामध्ये मार्गदर्शन केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल इंजीनिअर्स (आय.आय.एम्.इ.) या संस्थेने वर्ष २००० पासून मिनरल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या जागतिक परिषदांचे वार्षिक नियोजन चालू केले. या वर्षी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस्.), आय.आय.टी. मुंबई आणि आय.आय.एम्.इ. मुंबई-पुणे शाखा यांच्या पुढाकाराने एम्.पी.टी. जागतिक परिषद हिंजवडी, पुणे येथे ५, ६ आणि ७ जानेवारी २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आली. एम्.पी.टी.चा उद्देश आंतरराष्ट्रीय पातळीच्या खनिज (मिनरल) शास्त्रज्ञांना एकत्र करून त्यांच्या चर्चेतून संबंधितांना या क्षेत्रात झालेल्या प्रगतीविषयी माहिती देणे, हा असतो.

सर्वधर्मसमभाव ?

      आपल्या देशातील सर्वधर्मसमभावाच्या सर्व व्याख्या आणि संकल्पना केवळ हिंदूंनाच आहेत कि काय, असा प्रश्‍न उपस्थित करणारी परिस्थिती उत्तरोत्तर या हिंदुबहुल देशात येते. नुकतीच समोर आलेली बातमी याचा नमुना आहे. धुळ्यातील यंग बॉईज एज्युकेशनल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल सर्कल्स इंग्लिश मिडियम इस्लामिक डे स्कूलमध्ये प्रतिदिन मुसलमान विद्यार्थ्यांसहित हिंदु विद्यार्थ्यांकडून कुराणाचे पठण करवून घेतले जात आहे. ज्या संस्कारक्षम वयात मुलांवर स्वधर्माभिमान रूजायला हवा. तेथे हिंदु विद्यार्थ्यांच्या अपरिहार्यतेचा लाभ घेऊन त्यांना कुराण शिकवून धर्मांतराचे बीज पेरले जात आहे. एकीकडे शाळांमधून गीता शिकवली जावी, या प्रस्तावाला मुसलमान कडाडून विरोध करतात आणि दुसरीकडे शाळांमधून कुराण शिकवले जात आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना उर्दू शिकणे अनिवार्य आहे. अन्य शाळा गावापासून दूर असल्याने नाईलाजाने विद्यार्थ्यांना उर्दू शिकावे लागते आहे.

अनादी असणारा हिंदु धर्म संपूर्ण विश्‍वाला आर्य (सुसंस्कृत) करू, हेच शिकवत असल्याने सर्व हिंदूंचे हेच ध्येय असणे

कु. प्राजक्ता धोतमल
१. हिंदु धर्माला हद्दपार करण्याच्या घोषणा करणार्‍या तौहिद 
जमातीचा थयथयाट आणि प्रशासनाकडून हिंदूंनाच कायद्याचा बडगा !
     काही दिवसांपूर्वी तमिळनाडू येथे शरिया कायद्याचे समर्थन करत तौहिद जमातीने हिंदु धर्माला भारतातून हद्दपार करण्याची घोषणा केली. या धर्मांधांना मूर्तीपूजा मान्य नाही. योग आणि ज्योतिषशास्त्र यांचा अंत करण्याचे उघड वक्तव्य या संमेलनात केले गेले. धर्मांधांचा हा उद्दामपणा निष्क्रीय प्रशासन आणि पोलीस यांनी निमूटपणे ऐकून घेतला आणि वैध मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदूंना अटक केली. 
२. हिंदु धर्मातील परंपरांवर सातत्याने तोंडसुख घेणारे पुरोगामी तौहिद जमातीच्या या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचे नियम धाब्यावर बसवणार्‍या भूमिकेसंदर्भात गप्प का ?
     तौहिद जमातीची ही भूमिका तथाकथित धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचे नियम धाब्यावर बसवणारी आणि असहिष्णुतेच्या भेकड गोष्टींना केराची टोपली दाखवणारी आहे. तथाकथित विचारवंतांनी सध्या सहिष्णुतेच्या नावाने थयथयाट चालू केला आहे. त्यांची या घटनेच्या विरोधात अवाक्षरही काढण्याची हिंमत नाही. त्यामुळे केवळ हिंदु धर्मातीलच रुढी आणि परंपरा यांचे तोंडसुख घेणार्‍या पुरोगाम्यांनी या गोष्टीच्या विरोधात बोलावे, ही अपेक्षा नाही; पण एक हिंदु म्हणून धर्मांधांच्या या आव्हानाला तितकेच ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक वाटते.

कट्टर पंथवाद हेच इस्लामचे खरे रूप !

     स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, आमचे कर्तव्य आहे की, आम्ही देशात रहाणारे हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती आणि शिख यांमध्ये आम्ही ही पवित्र भावना जागृत करू की, सर्वप्रथम आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि त्यानंतर अन्य कुणी. याउलट मुसलमान कोणत्याही क्षेत्रातील असो तो म्हणतो, आम्ही अगोदर इस्लामी आणि नंतर हिंदुस्थानी. याचा परिचय हल्लीच्या पिढीला व्हावा, या उद्देशाने ही काही सूत्रे - 
१. एका मुसलमान मुलीचे संस्कृत शिकवणार्‍या एका शिक्षकावर प्रेम होते. तिने लग्न करू का ?, असे तिच्या वडिलांना विचारले. ते म्हणाले, तो इस्लाम धर्म स्वीकारत असेल, तर कर. शेवटी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. तो शर्मा नंतर खान झाला. असे सल्ले देणारी व्यक्ती राष्ट्र्रपती झाली !
२. देशाची फाळणी झाल्यावर आसाम जाणार, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. तेथे काँग्रेसची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशातून आणि बिहारमधून मुसलमानांची आयात करून त्यांची संख्या वाढवली. हे मुख्यमंत्रीही राष्ट्र्रपती झाले !

अधिकोषांसाठी वेगळा दिवाळखोरी कायदा करणार का ?

      बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील, म्हणजेच शासकीय अधिकोषांची डिसेंबर २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीत (सप्टेंबर ते डिसेंबर) आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे त्या अधिकोषांच्या नफ्यात झालेला फरक लक्षणीय आहे. या तिमाहीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ११ महत्त्वाच्या आणि उच्च अधिकोषांचा एकत्रित तोटा १२ सहस्र ८६७ कोटी रुपये झाला आहे. त्या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या अधिकोष असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या तोट्यात पुष्कळच मोठी वाढ झाली आहे. बँक ऑफ बडोदा या अधिकोषाला ३ सहस्र ३४२ कोटी रुपयांचा सर्वाधिक तोटा झाला आहे. त्या पाठोपाठ अन्य अधिकोषांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्ष २०१५ मध्ये आस्थापनांना दिलेली ४० सहस्र कोटी रुपयांची कर्जे वसूल होत नाहीत, अशी खाती अधिकोषांनी खाते पुस्तकांतून काढली आहेत.

भक्तातील समाधान आणि निर्लोभीपणा यांमुळे प्रसन्न झालेला भगवंत !

     एकदा कौशांबी राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्यामुळे लोकांची अन्नान्न दशा झाली. दुष्काळग्रस्त माणसांना मृत्यू येऊ लागला. दुष्काळामुळे शहरे आणि खेडी ओस पडू लागली. याच नगरात चंपक नावाचा एक प्रामाणिक मजूर रहात होता. त्याची पत्नीही त्याच्यासारखीच धर्मपरायण होती. ते दोघेही दिवसभर कठोर परिश्रम करून सायंकाळी जे काही मिळेल, ते आपल्या मुलांना देत आणि त्यातून जे काही उरेल, ते स्वतः ग्रहण करत, अन्यथा उपाशीच झोपत. काही दिवसांतच त्यांना दुष्काळामुळे तेही मिळणे बंद झाले. त्यांची दोन्ही मुले दुष्काळामुळे मरून गेली.

पुरोगामी महिलांनो, देवाच्या नावावर सवंग प्रसिद्धी मिळवण्याचे (अती) शहाणपण (?) थांबवा !

श्री. शंकर नरुटे
१. पुरोगामी महिलांनो, शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून दर्शन घेणे, ही त्याची अवकृपा ओढवून घेणे आणि चौथर्‍यावर न चढणे, म्हणजेच शास्त्र पाळून कृपा संपादन करणे आहे, हे लक्षात घ्या.
२. महिलांनी चौथर्‍यावर न चढण्यामागे धर्मशास्त्र आहे. तुम्ही चौथर्‍यावर चढून त्याचे उल्लंघन करू नका. 
३. चौथर्‍यावर चढून प्रसिद्धी मिळवणे, ही अहंकारी वृत्ती आहे. तुम्ही किती दिवस अहंकाराने वागणार आहात ? आता हा अहंकार शनिदेवाच्या चरणी विसर्जित करा.
४. आज तुम्ही शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा किंवा श्री महालक्ष्मीदेवीच्या गाभार्‍यात जाण्याचा अधिकार मागत आहात. तुम्ही उद्या अजून काही मागणी कराल, उदा. आम्हाला चप्पल घालून किंवा चामड्याचा बटवा (पर्स) घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळावा आणि ही मागणी मान्य होण्यासाठी आंदोलनही कराल. तुम्ही असे करून स्वतःचे पाप कशाला वाढवत आहात ?

नवनव्या मुस्लिम राष्ट्रांची निर्मिती हाच आतंकवादाचा मूळ हेतू !

     आतंकवादामुळे काय लाभ होतो ?, हा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. याचे उत्तर असे द्यावे की, काही वर्षे धर्माच्या नावावर संघर्ष केल्यामुळे जर एखादा नवा देश आणि त्या देशाची सत्ता मिळत असेल, तर काय वाईट आहे ?
१. धर्माच्या नावावर देशांची फाळणी करून नवनवीन राष्टे्र 
निर्माण करण्याचे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे धोरण
    काही वर्षांपूर्वी सुदान हा आफ्रिकेतील एक देश होता; पण जेव्हा तेथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला, तेव्हा सुदानची फाळणी झाली. आता ख्रिस्तीबहुल सुदान; म्हणजे उत्तरी सुदान आणि मुसलमानबहुल सुदान; म्हणजे दक्षिण सुदान यांची मानचित्रे जगाच्या मानचित्रावर (नकाशावर) पहायला मिळत आहेत. सध्या कुठल्याही देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर होते, त्यामुळे इस्लामी अतिरेकी या उपायाचा उपयोग मुसलमानबहुल देश करण्यासाठी वापरतात. जेव्हा जगात उपनिवेशवादाचा प्रभाव होता, त्या वेळी मुसलमान राष्ट्रे ही युरोप आणि अमेरिका यांच्या दास्यत्वात होती. वेगवेगळ्या कारणांमुळे ती स्वतंत्र होऊ लागली; पण ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी आपल्या नावावर राज्य आणि राष्ट्रे निर्माण करण्याचे धोरण सोडले नाही. मुसलमान या संदर्भात २ पावले पुढेच राहिले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आवश्यक तेव्हढेच बोलणे योग्य !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    परमेश्‍वराने आपल्याला दोन कान आणि एक जीभ दिली आहे. ती यासाठी की, जेवढे ऐकाल, त्याच्या निम्मेच बोला. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
    आपण हिंदू एकत्र येतो; पण एक होत नाही. आतातरी एक होऊ या ! - श्री. आनंद मयेकर, अध्यक्ष, ब्रह्मानंद तरुणाई

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले.

मुलगा किंवा मुलगी जन्माला येण्याच्या संदर्भात स्त्रीला दोष देणे चुकीचे !

     वैज्ञानिक युगातसुद्धा आपल्याला हे माहीत नाही की, मुलगा किंवा मुली जन्माला येणे, हे पुरुषाच्या शुक्राणूवर अवलंबून असते, स्त्रियांच्या नव्हे. पुरुषाच्या वीर्यात असंख्य शुक्राणू असतात. ते दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारच्या शुक्राणूमध्ये सगळे एक्स क्रोमासोम असतात. दुसर्‍या प्रकारच्या शुक्राणूमध्ये वाय क्रोमासोम असतात. महिलांमध्ये स्त्रीबीज असते. सगळ्या स्त्रीबीजांमध्ये एक्स क्रोमोसोम असतात. पुरुषामधील एक्स क्रोमोसोमवाला शुक्राणू महिला बिजात मिळून मूल झाले, तर मुलगी जन्मते. नरामधील वाय क्रोमोसोमचा शुक्राणू महिला बिजात मिसळून मूल झाले, तर मुलगा होतो. मुलगा होणार कि मुलगी हे पुरुषाचे शुक्राणू ठरवतात. यात महिलेचा काही संबंध नसतो. गर्भलिंगचिकित्सा करून मुलगी असेल, तर काही जण गर्भपात करतात. हे महिलांसंदर्भात मोठे पाप आहे. - मेजर मनोहर लाल (से.नि.) (संदर्भ : योग संदेश, जून २०१०) 
     (मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे, हे मनुष्याच्या हातात नसून दैवाधिन आहे, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे त्यासंदर्भात महिलेला दोष किती चुकीचे आहे, हेही कळेल ! - संपादक)आंतरजातीय विवाहांमुळे ब्राह्मणांची घटलेली लोकसंख्या !

    आंतरजातीय विवाहांमुळे ब्राह्मणांचे आपल्या देशातील लोकसंख्येच्या एक टक्का प्रमाण शेष राहिले असून आणखी पंचवीस वर्षांनी ते लोकसंख्येच्या अर्धा टक्का होतील. - श्री. गोविंद ना. मराठे, तिस्क, उसगाव, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व

रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले 
स्वराचे, म्हणजे श्‍वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. विकार झाला असता स्वर (श्‍वास) पालटल्याने त्या विकाराला असणारी
शरिरातील पूरक स्थिती पालटून ती विरुद्ध झाल्याने विकार बरा होणे
     निरोगी मनुष्याच्या श्‍वासोच्छ्वासामध्ये दिवसभरातील २४ घंट्यांत एक घंटा सूर्यस्वर (उजव्या नाकपुडीने श्‍वासोच्छ्वास), त्यानंतर पुढील एक घंटा चंद्रस्वर (डाव्या नाकपुडीने श्‍वासोच्छ्वास) आणि त्यानंतर पुन्हा एक घंटा सूर्यस्वर असे चक्र चालू असते. जेव्हा सूर्यस्वराचा चंद्रस्वर होतो, तेव्हा तो पालट होत असतांना मधली २ - ४ मिनिटे सुषुम्ना स्वर, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांतून श्‍वासोच्छ्वास चालू असतो. या चक्रामध्ये पालट होऊन मनुष्याचा स्वर अयोग्य चालत असल्यास, म्हणजे सूर्यस्वराच्या ऐवजी चंद्रस्वर किंवा चंद्रस्वराच्या ऐवजी सूर्यस्वर चालत असल्यास त्याला विकार होतो, असे शिव-स्वरोदयशास्त्र (शिवाने सांगितलेले शास्त्र) सांगते. तेव्हा मनुष्याचा तो स्वर तो विकार होण्याला पूरक असतो.

घरी राहून सेवा करतांना कु. सुषमा पेडणेकर हिला जाणवलेली सूत्रे

कु. सुषमा पेडणेकर
     घरी राहून साधना करण्यापेक्षा आश्रमात राहून, म्हणजे मायेपासून दूर राहून साधना करणे सुलभ असते. असा सर्वांना अनुभव असला, तरी कु. सुषमा पेडणेकर हिने घरी राहूनही आश्रमात राहून करतो, तशी साधना करता येते हे सिद्ध केले आहे. त्यासाठी तिने काय प्रयत्न केले, हे या लेखात दिले आहे. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. घरातील कामे करतांना आश्रमातील सेवेचा आनंद अनुभवणे
१ अ. सेवा करतांना घरी असूनही आश्रमातच असल्याचे जाणवणे : मी रामनाथी आश्रमात सेवा करत होते. मे २०१४ पासून काही वैयक्तिक अडचणींमुळे मला घरी रहावे लागत आहेे. प्रारंभी मी आश्रमात नसून घरी रहाते, या गोष्टीचे मला दु:ख वाटायचे; परंतु श्रीकृष्णाने मी घरी असतांना घरातील कृती भाव ठेवून कशा करायच्या ? कृतीतून आनंद कसा मिळवायचा ? या गोष्टी शिकण्याची संधी दिली. त्यामुळे मला सेवा करतांना मी घरी असूनही आश्रमातच आहे, असे जाणवायचे. प्रत्येक वेळी देवानेच माझ्याकडून सेवा करवून घेतली आणि कर्तेपण देवाच्या चरणी अर्पण करून घेतले. सकाळी उठल्यावर मी नामजपाच्या खोलीतच झोपले असून आश्रमसेवा करत असल्याचे जाणवायचे. घरी प्रतिदिन मी आश्रमातील सहसाधकांसमवेत महाप्रसाद ग्रहण करत आहे, तसेच घरात वावरतांना आश्रमातच वावरत आहे, असे मला जाणवायचे.

पुरोगाम्यांचे खरे स्वरूप !

पू. राजेंद्र शिंदे
     युरोपमध्ये तेथील पुरोगाम्यांच्या दबावामुळे मुसलमान विस्थापितांवर कठोर कारवाई करायला अडचण येत आहे. यावरून सर्वत्रचे पुरोगामी म्हणजे देश, धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांना मानवता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि सहिष्णुता यांच्या गोंडस नावाखाली बुद्धीभ्रम करून नष्ट करणार्‍या टोळ्याच होत !
- (पू.) श्री. राजेंद्र शिंदे (३.२.२०१६)


युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण

     व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आकाश हे माझे व्यापक रूप आहे आणि आकाशाचे घनीभूत रूप मी आहे, असे सांगून श्रीकृष्णाने साधकाची आकाशदेवतेचा नामजप करण्याची सिद्धता करवून घेणे

श्री. सदाशिव तिवारी
     मध्यंतरी साधकांनी आकाशदेवतेचा नामजप करावा, अशी सूचना आली; पण माझ्याकडून तो जप होत नव्हता. श्रीकृष्ण, श्रीकृष्ण असाच होत होता. एक दिवस मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, आकाशदेवतेचा नामजप माझ्यासाठी आवश्यक असेल, तर तुम्ही तो जप चालू करून द्या. तरीपण कृष्णाचाच नामजप होत होता. त्यानंतर श्रीकृष्ण मला म्हणाला, घनीभूत आकाश म्हणजे श्रीकृष्ण आणि विरळ आकाश म्हणजे व्यापक श्रीकृष्ण. हे सूत्र स्पष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाला, तू माझ्या चित्राकडे बघ. माझा वर्ण निळा दिसतो आणि वर आकाशाकडे बघ, त्याचा वर्णही निळा दिसतो. म्हणजे आकाश हे माझे व्यापक रूप आहे आणि आकाशाचे घनीभूत रूप मी आहे. दोन्हींमध्ये तत्त्वतः भेद नाही. आकाशदेवतेचा नामजप केल्याने मी सतत तुझ्यासमवेत असल्याची अनुभूती येईल आणि चांगले वाटेल. हे विचार स्फुरून भाव जागृत झाला आणि आकाशदेवतेचा नामजप करायला मन सिद्ध झाले. आता वाटते, श्रीकृष्ण सतत माझ्यासमवेत आहे.

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती

१. नामजप ऐकत असतांना आकाशतत्त्वाची शक्ती त्या नामजपाद्वारे 
आकाशातून खेचून ग्रहण होत असल्याचे जाणवणे
     २५.१०.२०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता मी माझ्या भम्रणभाषवर ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा आवाजातील नामजप आमच्या घरी लावला होता. तो नामजप ऐकत असतांना माझ्या मनामध्ये आकाशासारखी पोकळी निर्माण होऊन आकाशतत्त्वाची शक्ती त्या नामजपाद्वारे आकाशातून खेचून ती माझ्या शरिरात येत आहे आणि नामजप ऐकतांना आकाशांतील देवी-देवता फुलांचा वर्षाव करत आहेत, असे जाणवत होते. नामजप ऐकतांना मी वेगळ्याच विश्‍वात होतेे आणि मला वेगळाच आनंद जाणवत होता. माझी अंतर्मुखता वाढली असून नामजप ऐकत रहावासा वाटत होता आणि मनातून शांत वाटत होते.
२. नामजप ऐकून मैत्रिणीच्या मुलाचे रडणे थांबून तो झोपणे
     ३१.१०.२०१५ या दिवशी मी कामानिमित्त माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिला ८ वर्षांचा मंद बुद्धी असलेला मुलगा आहे. तो शाळेतून आल्यावर काही कारण नसतांना अर्धा घंटा सतत रडत होता. त्या वेळी मी ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप भम्रणभाषवर लावला.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम म्हणजे अनेकविध फुलांनी नटलेली सुंदर रामबाग !

सौ. नीलिमा सप्तर्षि
     मी २१.९.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला एका साधिकेचा लेख वाचला. त्या साधिकेने उस्फूर्तपणे लिहिलेले लिखाण वाचून माझी भावजागृती झाली. त्या वेळी सुचलेले विचार पुढे देत आहे.
     रामनाथी आश्रम म्हणजे रामबाग आहे. ही बाग विविध फुलांनी नटलेली आहे. यांतील काही फुले (अनेक साधिका) पूर्ण उमलायची आहेत, तर काही फुले पूर्ण उमललेली आहेत. या फुलांचे विविध आकार, प्रकार, निराळे रंग आणि विविध सुगंध अनुभवतांना माझे मन आनंदसागरात न्हाऊन निघते. त्या वेळी मनात सहजच विचार आला, ही बाग पुष्कळ सुंदर आहे. इतकी सुंदर बाग घडवणे, हे एका चांगल्या माळ्याचेच कौशल्य आहे. माळी (टीप) शोधण्याकरता मी चहूबाजूंनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण शेवटपर्यंत माळी दिसलाच नाही ! ज्याने ही सुंदर बाग निर्माण केली, तो माळी असामान्यच असला पाहिजे. हा माळी अदृश्य रूपात बागेचे रक्षण आणि पोषण करतो. या सुंदर बागेत माझ्यासारखे कोमेजलेले फूलही आहे.

लहानपणापासूनच सात्त्विकतेची आवड असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सांगली येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. ईशान कडणे (वय १ वर्ष) !

चि. ईशान कडणे
     चि. ईशान महेश कडणे याचा प्रथम वाढदिवस माघ कृष्ण पक्ष द्वितीया (२४.२.२०१६) या दिवशी आहे. त्या निमित्त त्याची आई सौ. सरिता कडणे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. ईशान कडणे याला सनातन परिवाराच्या वतीने 
पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणात आलेल्या अडचणींत श्रीकृष्ण रक्षण करत असल्याचे जाणवणे : चि. ईशान गर्भात असतांना पुष्कळ अडचणी आल्या; पण श्रीकृष्ण आमचे सातत्याने रक्षण करत आहे, याची अनुभूती मी अनेक वेळा घेतली.
आ. मंदिरातील प्रसाद मिळाल्यावर पुष्कळ दिवसांनी भोजन करत असल्याचे जाणवणे : चि. ईशान गर्भात असतांना मला अन्न पचत नसे. एकदा आम्ही कोल्हापूरला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तिथे प्रसाद मिळाल्यावर पुष्कळ दिवसांनी भोजन करत आहे, असे मला जाणवले.
१ इ. संतांच्या सत्संगातील चैतन्याने नामजप आपोआप होणे : ईशान गर्भात असतांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्या वेळी मी माझ्या बहिणीकडे रहाण्यास गेले होते. तेथे पू. गडकरीकाका आले होते. त्यांचा सलग दोन दिवस सत्संग मिळल्याने त्या चैतन्याने माझा नामजप आपोआप होत होता.

वाद्यांचा भावपूर्ण संवाद !

बासरी म्हणाली तबल्याला,
तू किती मार खातोस बोटांचा ।
तबला म्हणाला बासरीला,
तो स्पर्श असतो श्रीकृष्णाचा ॥ १ ॥

बासरी म्हणाली ढोलाला,
काठीने बडवतात तुजला ।
ढोल म्हणाला बासरीला,
नामजप असतो तो श्रीकृष्णाचा ॥ २

दालचिनीताईने स्वयंपाकघरातील घडामोडी कळवण्यासाठी जायफळदादाला लिहिलेले पत्र !

कु. रोहिणी गुरव
प्र्रिय जायफळ,
     दालचिनीताईचा नमस्कार ! पत्र लिहिण्यास कारण की, बदामकाका सुखरूप आहेत. आनंदाची वार्ता म्हणजे जिरे यांच्या सुकन्येचा विवाह मिरे यांचे सुपुत्र लवंगकुमार यांच्याशी ठरला आहे.
     मोहरी अजून लहान आहे. मनुका आजारी आहे. शेजारी रहाणारे वैद्य बडीशोप आणि खसखस यांचे औषधोपचार चालू आहेत. रात्री चहापूड अन् साखर यांचे भांडण झाले. त्यामुळे साखरेने उकळत्या पाण्यात उडी मारली आणि ती मरण पावली. हे ऐकून बटाटेदादा विळीवर पडून मरण पावले. कांदादादा कोपर्‍यात बसून रडत होता आणि दुसर्‍यांनाही रडवत होता. काजू, पिस्ते, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि तीळ यांना गोड गोड पापा !
     आता पत्र पुरे करते. पत्रात काही चुका झाल्यास क्षमा करा

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

साधकांनो, नियमितपणे प्रगतीची स्वयंसूचना देऊन स्वतःविषयीची नकारात्मकता दूर लोटा आणि साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

      काही साधकांमध्ये नकारात्मकता, निराशा, न्यूनगंड, स्वतःला न्यून लेखणे आदी अहंचे पैलू तीव्र स्वरूपात असतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे साधनेचे प्रयत्न करत असूनही तिच्यातील आनंद घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी प्रामुख्याने पुढील प्रयत्न करावा.
१. प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्याने स्वतःविषयीची सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढणे
     साधकांनी नियमितपणे प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्यास त्यांच्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढतो अन् पुढील प्रयत्न करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते. निराशेचे प्रमाण अधिक असल्यास प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिवसातून ५ वेळा, तर प्रमाण अल्प असल्यास केवळ एकदाच द्यावी. प्रत्येक वेळी केवळ एकदाच सूचना म्हणणे अपेक्षित आहे.

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

कीटकनाशकांच्या स्प्रेमधील वायू ज्वालाग्राही असल्याने
 त्या संदर्भात पुढील दक्षता घेऊन संभाव्य हानी टाळा !
     बाजारात उपलब्ध असणार्‍या हिट, मॉर्टिन, बेगॉन यांसारख्या कीटकनाशकांच्या स्प्रेमध्ये वापरला जाणारा वायू ज्वालाग्राही असतो. तो उच्च दाबाखाली द्रवरूपात कॅनमध्ये साठवलेला असतो. या स्प्रेची फवारणी केली असता त्यातील द्रवाचे वायूत परिवर्तन होते. ही प्रक्रिया होतांना ते द्रव कित्येक पट प्रसरण पावते आणि वातावरणातील प्राणवायूशी मिसळून त्याचे अत्यंत ज्वालाग्राही मिश्रण बनू शकते. हे मिश्रण एखाद्या ठिणगीच्या संपर्कात आल्यास त्याचा लगेचच भडका उडून जिवीतहानीही होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात पुढील दक्षता घ्यावी.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

     
परात्पर गुरु डॉ. आठवले
पूर्वजांच्या धनाची उधळपट्टी करून ते संपवणार्‍या मुलाप्रमाणे भारताच्या आतापर्यंतच्या शासनांची स्थिती आहे. ते लवकरच गायी, खनिजे इत्यादी सर्व धन संपवतील, तसेच देशाला कर्जबाजारी आणि भुकेकंगाल करतील. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 


बंगालीस्तान ?

संपादकीय
    मतांसाठी राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी दाखवून दिले आहे. ममताबाईंनी परवाच बांगलादेशींना नागरिकत्व द्या, अशी निलाजरी मागणी करून मुसलमान लांगूलचालनाच्या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसचे मुसलमानप्रेम सर्वज्ञात आहे. या पक्षाची निर्मितीच जणू मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी झाली आहे, अशी त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे असतात. त्यामुळे ममताबाईंकडून ही मागणी एक ना एक दिवस होणारच होती. आता त्यांनी केवळ बंगालमधील आगामी निवडणुकीचा मुहूर्त साधला आहे इतकेच.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn