Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

निवृत्तीनाथ महाराज यांची आज जयंती

इसिसकडून बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍याची गळा चिरून हत्या !

  • बांगलादेशातील हिंदूंचा वंशसंहार होत असतांना निष्क्रीय रहाणारे केंद्रशासन आणि हिंदूंच्या संघटना !
  • इसिसकडून भारतातही अशा घटना घडू लागल्यावर तरी हिंदू जागे होणार आहेत का ?
     ढाका - बांगलादेशातील भारतीय सीमेला लागून असलेल्या पंचगढ जिल्ह्यातील देवगंज गावात इसिसच्या आतंकवाद्यांनी एका मंदिरावर आक्रमण केले. यात ५० वर्षीय पुजारी जनेश्‍वर रॉय (वय ५० वर्षे) यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन भाविकही घायाळ झाले, तसेच त्यांनी देशी बॉम्बही फेकले. पोलिसांनी सांगितले की, ३ आक्रमणकर्ते होते आणि ते दुचाकीवरून आले होते. आक्रमण केल्यावर ते फरार झाले. या आक्रमणाचे दायित्व इसिसने स्वीकारले आहे; मात्र बांगलादेश शासनाकडून त्यास अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही.

हरियाणात पुन्हा हिंसाचार

भारतातील हिंसाचार रोखू न शकणारे शासन पाकसारख्या
 शत्रूराष्ट्राकडून होणारी आक्रमणे कसे रोखणार ?
हिंसाचारात झालेली हानी दंगलखोरांकडून वसुल करा !
सैन्याच्या गोळीबारात २ जण ठार, १६ घायाळ
     चंदीगड - ७ दिवस हिंसक आंदोलनाद्वारे देशाची २० सहस्र कोटी रुपयांची हानी केल्यानंतर हरियाणातील जाट समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले. यानंतर आंदोलन समाप्त होऊन राज्यात शांती निर्माण होईल, अशी शक्यता चुकीची ठरली असून २२ फेब्रुवारीलाही आंदोलनकर्त्यांनी सोनीपतच्या नडौली येथे ६ गाड्यांना आग लावली. तसेच देहली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ आणि २ बंद केला. सोनीपत येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १ रोखून धरलेल्या आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जण ठार, तर १६ जण घायाळ झाले. रोहतकमध्येही हिंसाचार करण्यात आला. येथे एक मालगाडीला आग लावण्यात आली. तसेच झज्जर येथेही महामार्ग बंद करण्यात आला.
राजस्थानमध्येही आंदोलन
     हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही जाटांकडून आरक्षणासाठी आंदोलन चालू झाले आहे. २२ फेब्रुवारीला धौलपूर-भरतपूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आले. मथुरा मार्गावरील धौरमुई ऑईल डेपो आणि राजस्थान परिवहन मंडळाची बस यांना आग लावण्यात आली. जयपूर-आग्रा रेल्वेमार्गावर सिमेंटचे स्लीपर टाकून तो बंद करण्यात आला.

पाकिस्तानने केवळ गुन्हा नोंद करणे पुरेसे नाही ! - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

पठाणकोट आक्रमणाचे प्रकरण
पाकिस्तानकडून प्रतिदिन भारतीय सैनिक मारले 
जात असतांना भारताने पाकवर विश्‍वास का ठेवावा ?
     नवी देहली - पठाणकोटमध्ये झालेल्या जिहादी आक्रमणाच्या प्रकरणी पाकिस्तानने केवळ अपराध प्रविष्ट करणे पुरेसे नाही, असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २० फेब्रुवारी या दिवशी केले. भारताच्या समाधानासाठी पाकिस्तानने गांभिर्याने तपास करायला हवा. (पाकिस्तानचा इतिहास पहाता, तो कधीच आतंकवादाला आळा घालणार नाही. तसे असते तर त्याने दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, जकी-उर-रहमान लखवी यांसारख्या जिहाद्यांना भारताच्या हवाली केले असते. त्यामुळे केंद्रशासनाने कोणतीही दिवास्वप्ने न पहाता, पाकिस्तानवर कठोर कार्यवाही करण्याची सिद्धता करायला हवी, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)
     पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी मसूद अजहरचे नाव न लिहिता प्रथमदर्शी अहवाल लिहिला आहे. (अशी पोकळ कारवाई करणारा पाक कधीतरी जिहाद्यांवर कारवाई करील का ? - संपादक)

राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी डॉ. स्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

     नवी देहली - डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर २३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. याचिकेत डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, येथे राम मंदिर होते, हे पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे. बाबरी मशिदीपूर्वी तेथे मंदिर होते. त्यामुळे मशिदीला दुसर्‍या ठिकाणी हालवून राममंदिराची उभारणी करण्यात यावी. राम मंदिर अन्य कोणत्याही जागेवर बांधता येणार नाही; कारण तो विषय हिंदूंच्या परंपरा आणि श्रद्धा यांच्याशी जोडलेला आहे.

सोलापूर येथे पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांवर अमानुष लाठीमार

अन्य धर्मियांच्या मिरवणुकीत पोलिसांनी असे केले असते का ?
      सोलापूर - येथे शिवजयंतीनिमित्त डॉल्बी कंटेनर वापरणार्‍या मंडळातील हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अर्चना गीते, साहाय्यक पोलीस आयुक्त महिपती इंदलकर यांचा सहभाग होता. (निरपराध हिंदूंवर लाठीमार करणार्‍या या पोलिसांवर कठोरात कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक)
१. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी मिरवणुकीत कंटेनर आणि डॉल्बी वापरलेल्या शिवजयंती उत्सव मंडळांवर कारवाई करा, असा आदेश पोलीस आयुक्तालयात बसून रात्री ११.३० पासून देण्यास प्रारंभ केला. (असा आदेश अन्य धर्मियांच्या संदर्भातही पोलीस देतील का ? - संपादक) त्यानंतर फटाके फोडल्याचे निमित्त करून पोलीस अधिकार्‍यांनी व्यासपिठावर बसलेल्या शिवजन्मोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना पुष्कळ मारहाण केली.
२. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कंटेनरचालकांकडून चाव्या काढून घेतल्या. डॉल्बी यंत्रणा कह्यात घेतली. शिवाजी चौक परिसरात रात्री लाठीमार करावा, अशी परिस्थिती नसतांनाही पोलिसांनी बळाचा वापर केला.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश करण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही चेतावणीमुळे पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होणार

      नाशिक - महाशिवरात्री ७ मार्च या दिवशी आहे. त्यापूर्वी देवस्थान न्यासाने महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देण्यात यावा अन्यथा आम्हाला दर्शनासाठी प्रवेश करावा लागेल. ७ मार्चपर्यंत केव्हाही या रणरागिणी येथे येऊ शकतात, अशी चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्‍वर देवस्थान न्यासाला पत्राद्वारे दिली आहेे. भूमाता ब्रिगेडचे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सुरक्षेस्तव पोलीस यंत्रणेसह विविध शासन यंत्रणांना कळवण्यात आले आहे. यासंदर्भात धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यात यावा, असा मतप्रवाह व्यक्त होत आहे. त्यानुसार आखाडा परिषद, पुरोहित संघ आदी संस्थांना न्यासाच्या वतीने कळवण्यात आले आहे. (भारतात सर्वत्र आतंकवादी आक्रमणांचे संकट असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही भूमाता ब्रिगेडच्या महिलांना देशद्रोहाविषयी कारागृहात टाका ! - संपादक)      त्र्यंबकेश्‍वर मंदिरात गर्भगृहात पुरुषांना सोवळे नेसून सध्या ठराविक वेळेतच जाता येते. गाभार्‍यात वर्दळ वाढल्यास त्याचा परिणाम रांगेतून दर्शन घेणार्‍यांवर होतो. त्यांना दर्शनही मिळत नाही.

पम्पोरमधील चकमक समाप्त, २ आतंकवादी ठार

     श्रीनगर - २० फेब्रुवारीच्या रात्रीपासून जम्मू-कश्मीरच्या पम्पोरमध्ये जिहादी आतंकवाद्यांबरोबर सैन्य दलाची चालू असलेली चकमक २२ फेब्रुवारीला सायंकाळी संपली. यात २ आतंकवादी ठार झाले, तर ५ सैनिक हुतात्मा, आणि ९ सैनिक घायाळ झाले. येथील एका शासकीय इमारतीत आतंकवादी लपून बसले होते.

शनिशिंगणापूर येथे जाऊ पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पोलिसांच्या कह्यात !

धर्मशास्त्र न पाळणार्‍या नास्तिकतावाद्यांनी मंदिरात 
प्रवेश करणे, म्हणजे मंदिराचे पावित्र्य नष्ट करणे होय !
     अहमदनगर - शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्या, या मागणीसाठी शनिशिंगणापूरचे विश्‍वस्त आणि गावकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई २२ फेब्रुवारी या दिवशी जात होत्या. त्या वेळी नगर बायपास रस्त्यावर तृप्ती देसाई यांच्यासह काही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले. पोलीस त्यांना अज्ञात स्थळी घेऊन गेल्याचे वृत्त आहे. २६ जानेवारी या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी त्यांनी अयशस्वी आंदोलन केले होते.

भारत नागरी सुरक्षा परिषदेचा १२ मार्चला देहलीत परिसंवाद

     नवी देहली - भारत नागरी सुरक्षा परिषद (भारतीय सिटीझनस् सिक्युरिटी कौन्सिल) या संघटनेने १२ मार्च २०१६ या दिवशी नवी देहलीतील इंडियन इंटर नॅशनल सेंटर येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत देशातील कायदे आणि धार्मिक कट्टरवाद या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे. या परिषदेत राष्ट्र्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. सिरियाक जोसेफ, महाराष्ट्र्राचे माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एस्. विर्क, मेजर जनरल जी.डी. बक्षी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता डॉ. के.पी. कायलासनथ् हे मुख्य वक्ते रहाणार आहेत. या व्यतिरिक्त बंगाल उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. डी.एस्. तेवटीया आणि पंजाबचे माजी पोलीस प्रमुख के.पी.एस्. गिल हे परिषदेचा समारोप करतील. भारत नागरी सुरक्षा परिषदेचे राष्ट्र्रीय संयोजक श्री. विजयकुमार भारत यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, देशात इस्लामी कट्टरवाद वाढला आहे. त्यापासून आणि इसिससारख्या आतंकवादी शक्तींपासून देशाला वाचवायचे असेल, तर काही ठोस पाऊले उचलणे आवश्यक आहे. फुटीरतावादी गटाला देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी व्यक्तींचे समर्थन लाभत आहे. नुकतेच जवाहरलाल नेहरू विद्यापिठात घडलेले प्रकरण याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिथे देशाचे विभाजन करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या. या सर्व घटना बघता या परिषदेत पुढील काळासाठी काही निश्‍चित दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

४० वर्षांच्या लढाईनंतर माजी सैनिकाला मिळाले महिना ४० रुपये निवृत्ती वेतन !

असे केवळ भारतातच घडू शकते !
उशिरा मिळणारा न्याय हा नव्हे अन्याय !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मथुरा येथील माजी सैनिक सुनहरी लाल यांना महिन्याच्या ४० रुपये निवृत्ती वेतनासाठी तब्बल ४० वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली. त्यानंतर सशस्त्र दल लवादाच्या लखनौ खंडपिठाने निवृत्ती वेतनाचे शिल्लक ८ सहस्र ७३ रुपये लाल यांना देण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाला दिला. या प्रकरणी न्यायालयाने मंत्रालयाला फटकारले असून २५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला.
१. मथुरा येथे रहाणारे माजी सैनिक सुनहरी लाल वर्ष १९६५ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. ५ वर्षांनंतर वैद्यकीय आधारावर असक्षम असल्यावरून सेनेने त्यांची सेवा समाप्त केली.
२. सेवा समाप्तीनंतर वैद्यकीय मंडळाने २ वर्षांसाठी ३० टक्के अपंगता निवृत्ती वेतन देण्याची सूचना केली होती.

मी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात असतो, तर अफझलच्या घोषणा देणार्‍यांना मारले असते ! - हिंदुत्ववादी अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे येथील अखिल भारतीय नाट्यसंमेलनात 
प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी मुलाखत !
      हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी, ठाणे - या देशावर तुम्ही प्रेम केलेच पाहिजे, हा अलिखित नियमच आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात जे झाले, तशाप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली येथे दंगा करता येणार नाही. मी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात असतो, तर अफझलच्या नावाच्या घोषणा देणार्‍यांना मारले असते. नुसती मुस्कटात नाही, तर त्यापुढेही जाऊन कृती केली असती, अशी स्पष्ट भूमिका प्रसिद्ध हिंदुत्ववादी अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी घेतली. येथे आयोजित करण्यात आलेल्या नाट्यसंमेलनात झालेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी नथुरामविषयी आणखी १५ मिनिटे बोला, अशी मागणी केली. यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या उत्स्फूर्तपणे प्रश्‍नांना पोंक्षे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
या वेळी श्री. पोंक्षे म्हणाले,
१. नथुराम हा राष्ट्रवादी विचारांचा तरुण होता. हा दडपून टाकलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याची आवश्यकता आहे. मी गांधी हत्येचे समर्थन करत नाही; पण सध्याच्या काळात देशभक्ती शिकवण्याची आवश्यकता आहे.

पुणे येथे दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याच्या घटना

     पुण्यामध्ये पोलिसांवरील वाढती आक्रमणेे हे चिंताजनक असून कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे लक्षण आहे. याचाच अर्थ समाजामध्ये पोलिसांविषयी वाटणारा धाक अल्प झाला आहे, असे म्हटल्यास वावगे काय ? यावर गृह विभाग कोणती उपाययोजना करणार आहे ?
      पुणे - येथील खडक पोलीस ठाण्यात चौकशीच्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. त्याचसमवेत सहकारनगर भागात वाहतुकीचे नियम मोडून एकाच दुचाकीवर तीन तरुण जात होते. त्यांना अडवणार्‍या वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ करून धमकावल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना २० फेब्रुवारी या दिवशी घडल्या आहेत.
१. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बाळासाहेब बारवकर यांनी सचिन पाटोळे यांच्या विरोधात तक्रार नोंदवून अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट केला होता.

कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांना बनवण्यास देण्याचा प्रस्ताव !

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा आणि ही स्थिती 
पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याचा शासनाकडे आग्रह धरा !
     कोल्हापूर - येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्‍या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विचाराधीन आहे. (देवीच्या भक्तांनी प्रसाद बनवायला हवा, हेही न समजणारे प्रशासन आणि देवस्थान समिती ! भक्त ज्या भावाने प्रसाद बनवणार, त्या भावाने कैदी महिला कधीतरी प्रसाद बनवतील का ? आणि अशा प्रसादाचा भाविकांना लाभ कसा होणार ? - संपादक) कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी याविषयी कारागृह अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.

जेएन्यूमध्ये आश्‍चर्यकारकरित्या उपस्थित झाले फरार देशद्रोही विद्यार्थी !

विद्यापिठाची अनुमती नसल्याने अद्याप अटक नाही !
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात महंमद अफझलच्या स्मरणार्थ कार्यक्रम करून देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी फरार असणारे उमर खालिद, आशुतोष, अनंतप्रकाश नारायण, राम नागा आणि अनिर्बन भट्टाचार्य हे पाच जण २१ फेब्रुवारीच्या रात्री आश्‍चर्यकारकरित्या जेएनयूमध्ये उपस्थित झाले. पोलिसांचा ससेमिरा आणि विरोधकांकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणाला घाबरून आम्ही विद्यापिठातच लपून राहिलो होतो, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. देहली पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही. पोलीस जेएनयूच्या प्रवेशद्वारावर पोहोचले, मात्र आत जाऊन या ५ जणांना अटक करण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांना कह्यात देण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या हातात सोपण्यास नकार दिला आहे. जेएन्यूचे रजिस्ट्रार म्हणाले की, या विद्यार्थ्यांना आपल्या कह्यात द्यावे, अशी कुठलीही मागणी पोलिसांनी विद्यापिठाकडे केलेली नाही. कुलगुरु जगदीश कुमार यांनी म्हटले की, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांना विद्यापिठात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या संदर्भात नंतर निर्णय घेतला जाईल. फरार विद्यार्थ्यांच्या अचानक उपस्थित होण्यावरून पोलिसांच्या तपासावर शंका निर्माण झाली आहे. गेले काही दिवस देशातील १० राज्यांत ८० ठिकाणी छापे मारूनही पोलीस यांना पकडू शकले नव्हते.

काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन आता दुरूनच !

काशी विश्‍वेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना दर्शन घेण्यास अनुमती असल्याचे उदाहरण 
देऊन त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा, असे म्हणणार्‍या कथित 
पुरोगामी महिला आता काय म्हणणार ?
    वाराणसी - हिंदूंच्या प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात भाविकांच्या स्पर्शाने आणि विविध प्रकारच्या अभिषेकामुळे पिंडीवर विपरीत परिणाम होत असल्याने आता पिंडीला स्पर्श करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्‍वेश्‍वराचे दर्शन काही अंतर दुरूनच घ्यावे लागणार आहे.

आज तक वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची उत्तरप्रदेशच्या समितीची शिफारस

मुजफ्फरनगर दंगलीचे प्रकरण
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - मुजफ्फरनगर दंगलीच्या वेळी सामाजिक वातावरण बिघडवणे आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन दाखवणे, या प्रकरणी आज तक या वृत्तवाहिनीच्या संपादकांसह अनेक पदाधिकार्‍यांवर भादंविनुसार वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस उत्तरप्रदेश विधानसभेच्या ७ सदस्यीय समितीने केली आहे.
     या समितीचे अध्यक्ष एस्.के. निगम यांनी नुकताच ३५० पानी अहवाल विधीमंडळाला सादर केला आहे. या अहवालावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर आज तकवर कारवाई करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या अहवालामध्ये आज तकने दाखवलेल्या वृत्तांमुळे सांप्रदायिक वातावण बिघडल्याचे म्हटले आहे. याबरोबरच मंत्री आझम खान यांच्या विरोधात दाखवण्यात आलेले स्टिंग ऑपरेशन पूर्णत: खोटे असल्याचेही या समितीने केलेल्या तपासात म्हटले आहे. मुजफ्फरनगरची दंगल वर्ष २०१३ च्या ऑगस्ट मासात झाली होती.

जेएन्यू येथील देशद्रोह्यांच्या निषेधार्थ २५ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण आणि निषेध मोर्चा !

      नवी मुंबई - जेएन्यू येथील देशद्रोह्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र वितरक सेना यांच्या वतीने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शिवाजी चौक, वाशी येथे लाक्षणिक उपोषण आणि निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याला अधिकाधिक राष्ट्र आणि धर्म पे्रमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवी मुंबई येथे २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेच्या व्यासपिठावरून करण्यात आले.

एम्आयएम्कडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

लातूर येथे भगवा ध्वज फडकावण्यास विरोध केल्याने पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकरण
      लातूर - येथील पानगावात पोलिसांना झालेल्या मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न एम्आयएम्ने चालू केला आहे. एम्आयएम्चे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांच्या प्रक्षोभक ट्विट केले. यानंतर या दिवशी आमदार इम्तियाज जलील यांनी लातूरमध्ये मोर्चा काढला. शिवजयंतीच्या निमित्ताने १८ फेब्रुवारीला पानगावमधील उत्साही तरुणांनी आंबेडकर चौकात भगवे झेंडे लावले होते. पोलीस शिपाई युनूस शेख आणि आवसकर यांनी जमावाला झेंडे लावण्यास अटकाव करून झेंडे काढले. त्यामुळे हिंदूंनी थेट पोलिसांना मारहाण केली. यामध्ये दोन्ही पोलीस घायाळ झाले; मात्र इम्तियाज जलील आता या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.


बीड येथे वर्षभरात महिला अत्याचाराच्या ८५० तक्रारींची नोंद

महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना शासन कशा प्रकारे आळा घालणार ?
     बीड - महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी शासन स्तरावरून नव्या कायद्याची अंमलबजावणी होत असतांनाही अशा घटनांना प्रतिबंध करण्यात यंत्रणेला अजूनही यश आले नाही. खून, अपहरण, छळ आणि अत्याचार यांच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने महिलांच्या सुरक्षितेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात अत्याचाराचे प्रमाण वाढले असून वर्षभरात महिला अत्याचाराच्या ८५० तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.

उमर खालिद आतंकवादी आहे कि नाही हे स्पष्ट होईलच; मात्र देशद्रोह केल्याविषयी कारवाई झालीच पाहिजे ! - हिंदु जनजागृती समिती

     मुंबई - मुसलमान म्हणून सहानुभूती मिळवून स्वतःच्या देशद्रोही कृत्यांवर धार्मिक भेदभावाचा बुरखा चढवू पहाणार्‍या उमर खालिदला त्याच्या अन्य सहकार्‍यांसह त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
     १० दिवस फरार असणार्‍या देशद्रोही उमर खालिदने जेएन्यूत (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) परत आल्यावर आदिवासी असला की नक्षलवादी आणि मुसलमान असला की आतंकवादी असा शिक्का मारून एकाकी पाडले जाते, असे विखारी भाषण केले. एवढेच नाही, तर जेएन्यूच्या देशद्रोहाच्या प्रकरणाला धार्मिक भेदभावाचा रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. जर मुसलमान म्हणूनच कारवाई करायची होती, तर पोलिसांनी कन्हैयाकुमारला का अटक केली ? देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेल्या पाच फरारी आरोपींपैकी उमर खालिद सोडून आशुतोष, अनंतप्रकाश नारायण, राम नागा आणि अनिर्बन भट्टाचार्य या हिंदूंचा समावेश का आहे ? उमर खालिदला तो मुसलमान आहे, हे आता सांगायची वेळ का पडली ?

डी. राजा यांनी स्वतःच्या मुलीवर गोळ्या झाडून देशभक्ती दाखवून द्यावी ! - भाजपचे राष्ट्रीय सचिव एच्. राजा यांचे आवाहन

    नवी देहली - जेएन्यूमध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांमध्ये माकपचे खासदार डी. राजा यांची मुलगी अपराजिता ही सहभागी झाली होती. त्यावर भाजपचे तमिळनाडूतील राष्ट्रीय सचिव एच्. राजा यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, डी. राजा यांना त्यांची देशभक्ती सिद्ध करून दाखवण्यासाठी स्वतःच्या कॉम्रेड सहकार्‍यांना सांगून अपराजिता हिच्यावर गोळ्या झाडाव्यात. त्यांच्या जागी मी असतो, तर देशद्राहासाठी माझ्या मुलांना अशीची शिक्षा केली असती. एच्. राजा यांनी कोईम्बतूर येथे एका पत्रकार परिषदेत ही विधाने केली; मात्र नंतर त्यांनी माझ्या बोलण्याचा अर्थ कोणाची हत्या करण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले.

पुसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

शिवप्रेमींनो, केवळ बंद पाळून थांबू नका, तर पुतळा
हटवणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करा !
      खटाव (फलटण) - पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करून पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी हटवला. याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी पुसेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनुमती न घेता हा पुतळा उभारल्याचे कारण पुढे करून ग्रामपंचायत प्रशासनाने हा पुतळा हटवण्यास शिवप्रेमींना भाग पाडले. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी रस्ता बंद आंदोलन केले. त्यानंतर पुसेगाव बाजारपेठेत बंद पाळण्यात आला.

मुलुंड येथे विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने जेएन्यूच्या विरोधात निषेध मोर्चा आणि आंदोलन !

      मुंबई - जेएन्यूच्या भारत विरोधी तत्त्वांच्या विरोधात मुलुंड येथे विश्‍व हिंदू परिषद-बजरंग दल यांच्या वतीन निषेध मोर्चा आणि आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा पाच रस्ता ते मुलुंड स्थानक (प.) या मार्गाने काढण्यात आला आणि स्थानकाच्या येथे या मोर्च्याचे रूपांतर आंदोलनात झाले. सर्व आंदोलनकर्त्यांची मागणी होती की, जे दोषी आहेत, त्यांना फाशी देण्यात यावी. त्याचप्रमाणे राष्ट्रद्रोही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी बंद करण्यात यावी. या आंदोलनाला शंभराहून अधिक विश्‍व हिंदू परिषद-बजरंग दल यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मलकापूर येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद !

      मलकापूर - कराड तालुक्यातीलमलकापूर येथे हिंदु जनजागृती समितीने २३ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली आहे. या सभेची माहिती देण्यासाठी २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी श्री. हणमंत कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, जिल्ह्यातील समस्त धर्मप्रेमी, शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी उपस्थित राहून हिंदु ऐक्याची शक्ती दाखवावी. श्री. कदम पुढे म्हणाले की, हिंदू बहुसंख्य असले, तरी धर्माचे अधिष्ठान नसल्याने आणि राष्ट्र-धर्मासाठी त्याग करण्याची सिद्धता नसल्याने या देशात त्यांचे अस्तित्व मृतप्राय असल्याप्रमाणे झाले आहे. यासाठी हिंदूंमध्ये धर्मतेज निर्माण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील ही ३१ वी सभा होत आहे.


दाऊदचा पुतण्या सोहेलला अमेरिकेत अटक

     मुंबई - दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर याला आतंकवादाच्या आरोपाखाली अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. विदेशी आतंकवाद्यांना अवैधरित्या शस्त्रास्त्रे विकण्याचा आणि त्यांना साहाय्य करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. सोहेल आणि त्याच्या दोन पाकिस्तानी साथीदारांना अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ही अटक डिसेंबर २०१५ मध्येच झाली असून दाऊदने ही बातमी फुटू नये; म्हणून बरेच प्रयत्न केले होते, असे समजते. सोहेल हा दाऊदचा भाऊ नूराचा मुलगा आहे. सोहेल दोषी आढळला, तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

जिहादी आतंकवादाचा नायनाट करा अथवा आपला देश गमवा ! - डोनाल्ड ट्रंप

    दक्षिण कॅरोलिना (अमेरिका) - अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले डोनाल्ड ट्रंप हे त्यांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांसाठी सध्या चर्चेत आहेत. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे झालेल्या भाषणात वर्ष १९११ मध्ये फिलीपीन्समध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्याच्या घटनेचा निर्वाळा देत डोनाल्ड ट्रंप यांनी जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे दर्शवले. 
१. आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बोलतांना ट्रंप म्हणाले की, आपल्याला कठोर होऊन आणि अधिक सतर्क राहून आपल्या बुद्धीचा योग्य वापर करायला हवा. अथवा आपल्याला आपला देशच गमवावा लागेल.
२. पॅरिसमधील नोव्हेंबर २०१५ च्या जिहादी आक्रमणानंतर सर्वजण म्हणाले होते, आम्हाला ट्रंप हवे आहेत, याविषयी ट्रंप यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.

जर्मनीमध्ये मुसलमान शरणार्थींची बस अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी !

     वॉर्सा (पोलंड) - जर्मनीमध्ये उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी शरणार्थींची बस अडवली. तसेच शरणार्थींच्या विरोधात घोषणाही दिल्या. याविषयीचे चलचित्र प्रसिद्ध झाले आहे. या घटनेविषयी जर्मनीच्या शासकीय अधिकार्‍यांनी खंत व्यक्त केली आहे. या चलचित्रामध्ये जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यातील क्लासनिट्ज शहरात नागरिकांच्या एका गटाने शरणार्थींना घेऊन येणारी बस अडवल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच नागरिकांकडून वुई आर द पीपल, गो होम अशा घोषणा दिल्या जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. शरणार्थींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.
    जर्मनीमध्ये शरणार्थींच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. युरोपमधील इस्लामीकरणाला विरोध वाढत असून उजव्या विचारसरणीच्या लोकांचे या आंदोलनाला समर्थन लाभले आहे.

जिजाऊ सोहळ्यात अश्‍लील गाणी आणि नृत्ये

यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. राष्ट्रमाता 
जिजाऊंच्या सोहळ्यातील महिलांचा हा अवमान पुरोगाम्यांना दिसत नाही का ?
     जळगाव - शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव आणि शिवपुत्र शंभुराजे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अत्यंत अश्‍लील गाण्यांवर नृत्य करण्यात आले. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत, त्यांच्या आदर्शालाच धक्का पोहोचवणारा हा प्रकार असल्याची टीका होत आहे. या कार्यक्रमात आमदार, विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह महिला आणि लहान मुलांचीही उपस्थिती होती.


सिरियातील साखळी बॉम्बस्फोटात १४० जणांचा मृत्यू

      दमास्कस - सिरियातील दमास्कस आणि होम्स शहरांत २१ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत सुमारे १४० जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेटने (इसिसने) या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. शिया धर्मियांना लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. दमास्कसमधील सैयदा जैनब येथे चार ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आले. यात ८३ नागरिकांचा मृत्यू झाला. सैयदा जैनब हे शिया धर्मियांचे पवित्र स्थान मानले जाते. होम्स शहरात दोन ठिकाणी झालेल्या कार बॉम्बस्फोटांत ५७ नागरिकांचा मृत्यू झाला.

सनातनच्या साधिका आणि वैद्या सुजाता जाधव यांना आदर्श कन्सलटंट (सल्लागार) पुरस्कार प्रदान

डॉ. नितीन नायक यांच्या हस्ते वैद्या (कु.) सुजाता जाधव पुरस्कार स्वीकारतांना
      कोडोली (जिल्हा कोल्हापूर) - श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रतीवर्षी महाविद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि आमदार यशवंत पाटील (दादा) यांच्या सुविद्य दिवंगत वासंतीदेवी यशवंत पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पाटील कुटुंबियांकडून पुरस्कार देण्यात येतात. या अनुषंगाने बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग रुग्णालयात काम करणारे सर्व तज्ञ सल्लागार यांची कामकाज पद्धती आणि रुग्णसेवा तसेच विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन पद्धतीवरून विद्यार्थ्यांकडून मतनोंदणी घेऊन आदर्श सल्लागार पुरस्कार दिला जातो. या वर्षी वैद्या (कु.) सुजाता पोपटराव जाधव यांना आदर्श कन्सलटंट (सल्लागार) पुरस्कार येथील भारती विद्यापीठ संचलित एम्.बी.ए. महाविद्यालयाचे संचालक डॉ. नितीन नायक यांच्या हस्ते देण्यात आला.

स्त्रियांनी शृंगारापेक्षाही देवाधर्माचे करण्यासाठी वेळ द्यावा ! - बालव्यास सुश्री नमिता आसोपा

     नगर - कलियुगातील स्त्रिया स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मशास्त्रविरोधी कृती करतात आणि त्यातून संकटे ओढावून घेतात. तोकडे कपडे घालणे, उभ्याने जेवणे, फास्ट फूड खाणे आदींमुळे स्त्रियांवरच संकटे ओढावतात. स्त्रियांनी शृंगार करण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ देवाधर्माचे करण्यासाठी द्यावा. आपल्या परंपरा श्रद्धेने जपाव्यात, असे प्रतिपादन पश्‍चिम बंगाल येथील बालव्यास सुश्री नमिता आसोपा यांनी केले. मिस्किननगर येथे आयोजित शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.

नको आरक्षण, नको स्वातंत्र्य, मला हवी केवळ माझी रजई (गोधडी) !

कुठे देशासाठी प्राणत्याग करून निरपेक्ष राष्ट्रभक्तीचा आदर्श ठेवणारे कॅप्टन पवन कुमार, तर कुठे जातीसाठी आरक्षण मागणारे आणि राज्यासाठी स्वातंत्र्य मागणारे तथाकथित देशभक्त !
हुतात्मा कॅप्टन पवन कुमार यांची फेसबूकवरील अंतिम पोस्ट
    नवी देहली - जम्मू-कश्मीरच्या पंपोर येथे २० फेब्रुवारीपासून जिहादी आतंकवाद्यांबरोबर चालू असलेली चकमक २२ फेब्रुवारीलाही संपली. यात हुतात्मा झालेले कॅप्टन पवन कुमार याने त्यांच्या फेसबूक पानावर शेवटची केलेली पोस्ट समोर आली आहे. यात त्यांनी लिहिले होते, कोणाला आरक्षण हवे आहे आणि कोणाला स्वातंत्र्य, मला काहीच नको केवळ माझी रजई (गोधडी) हवी! 
   या पोस्टद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोह्यांना हव्या असलेल्या स्वातंत्र्यावर आणि हरियाणातील जाट समुदायाला हव्या असणार्‍या आरक्षणावर टीका केली आहे. स्वतः पवन कुमार हे हरियाणातील जींदचे आहेत. ते जाट असण्याबरोबर जेएन्यूचे विद्यार्थी होते, हे विशेष.

दी इस्लामिक रेप ऑफ युरोप या मुखपृष्ठावरील मथळ्याने पोलंडच्या साप्ताहिकाने प्रसिद्ध केला अंक !

मुसलमान शरणार्थींविषयी युरोपीय लोकांना वाटत असलेल्या भयाचे प्रातिनिधिक उदाहरण
     वॉरसॉ (पोलंड) - पोलंडमधील उजव्या विचारसरणीच्या व्हीसेसी या साप्ताहिकानेे दी इस्लामिक रेप ऑफ युरोप (युरोपचा इस्लामी बलात्कार) या मुखपृष्ठावरील मथळ्याने या वेळचा अंक प्रसिद्ध केला आहे. मुखपृष्ठावरील छायाचित्रामध्ये युरोपीय युनियनचा ध्वज पांघरलेली महिला दाखवली आहे. तिला काही केसाळ पुरुष वासना शमवण्यासाठी कुरवाळत असल्याने ती पूर्णपणे बिथरली असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

हज यात्रेत मरण पावलेल्यांचे नातेवाईक सौदी अरेबियाच्या विरोधात खटला दाखल करणार !

     बमाको - हज यात्रेमध्ये नातेवाइकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी आफ्रिकेच्या मालीतील मुसलमान आता माली आणि युरोपीय संघात सौदी अरेबिया शासनाच्या विरोधात खटला दाखल करण्याची सिद्धता करत आहेत. हज यात्रेच्या दुर्घटनेत त्यांच्या नातेवाइकांना गमावणारे हे लोक सौदी अरेबियाच्या वागणुकीवर अप्रसन्न आहेत. 
     मागील वर्षी २४ सप्टेंबर या दिवशी हज यात्रेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २ सहस्र ४२६ लोकांचा मृत्यू झाला होता. यांतील ३२० मालीचे नागरिक होते. पीडित नातेवाइकांचे प्रतिनिधी म्हणाले, माली शासन आणि प्रवासी संस्थांनी हज यात्रेची व्यवस्था केली होती; परंतु त्यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांची प्रमाणपत्रे मिळण्यासाठीही साहाय्य केले नाही.

पुणे येथे एका संगणक अभियंत्याकडून खंडणी उकळणारे पोलीस शिपाई गजाआड

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
     पुणे - संगणक अभियंत्याला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ७५ सहस्र रुपयांची खंडणी दोन पोलीस शिपायांनी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस असलेले राजेश गणपति नाईक आणि दीपक पांडुरंग रोमाडे या पोलीस शिपायांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. संगणक अभियंता सौरभ श्यामल राय यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सौरभ राय हे बंगळुरू येथील एका माहिती-तंत्रज्ञान आस्थापनेत चाकरी करतात. (अशा पोलिसांना पोलीस प्रशासनातून खड्यासारखे दूर करणे आवश्यक आहे. - संपादक)
१. राय हे १६ फेब्रुवारी या दिवशी मित्रांसमवेत एका उपाहारगृहात जेवण करून झाल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून घरी निघाले होते. त्या वेळी एका महिलेने त्यांना गाडी थांबून लष्कर परिसरातील इस्कॉन मंदिराजवळ सोडण्याची विनंती केली.
२. राय यांनी इस्कॉन मंदिराजवळ गाडी थांबवल्यावर त्या महिलेने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, तसेच पैसे न दिल्यास आरडाओरडा करण्याची धमकी राय यांना दिली.

पोलीस खात्यातील रोखपालाने केला १८ लक्षांहून अधिक रुपयांचा घोटाळा

असा चालतो पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार !
     पुणे - शहर पोलिसांचे वेतन, भविष्यनिर्वाह निधी आणि इतर देयके यांमध्ये १८ लक्ष ४० सहस्र रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी रोखपाल अशोक तुकाराम कुदळे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (भ्रष्टाचार्‍यांना कठोरात कठोर शासन आणि धर्मशिक्षण दिल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल. - संपादक) विशेष म्हणजे गेली ३ वर्षे या ठिकाणी पैशांचे व्यवहार करणार्‍या रोखपालाने कोणालाही कळू न देता हा अपहार केला आहे. सध्याच्या रोखपाल सुनीता खोचरे यांनी या संदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अवैध ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी पाकिस्तानात एका भारतियाला अटक

पाकिस्तानमध्ये ३३ वर्षांपासून रहाणार्‍या भारतियाला तेथील शासन अटक करते; मात्र भारतात 
अवैधपणे रहाणार्‍या सहस्रो पाकिस्तानी नागरिकांवर भारत काहीच कारवाई करत नाही !
     इस्लामाबाद - पाकिस्तानात वर्ष १९८२ पासून वास्तव्य करणार्‍या भारतीय व्यक्तीला अनधिकृतरित्या पाकिस्तानचे राष्ट्रीय ओळखपत्र धारण केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रुस्तम साधुआ असे संबंधित व्यक्तीचे नाव असून त्याला केंद्रीय अन्वेषण संस्थेने (एफआयए) नुकतीच अटक केली. रुस्तम यांच्याकडे पाकिस्तानचे राष्ट्रीय ओळखपत्र असल्याचे तपासात आढळून आले होते.
    पाकिस्तानातील प्रसिद्ध मद्य व्यापारी एम्.पी. भांद्रा यांच्या मुलीशी रुस्तम यांनी विवाह केला आहे. भांद्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या भांद्रा यांचे पुत्र आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध नेते असफंदियार आणि रुस्तम यांच्यात संपत्तीवरून संघर्ष चालू आहे. या संघर्षातून असफंदियार यांनी रुस्तम यांची भारतीय पार्श्‍वभूमी उजेडात आणली आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी रुस्तम यांनी अर्ज केला होता; मात्र जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कुटुंबियांना ठार करून इसिसने यझिदी युवतीला लैंगिक गुलाम बनवले !

इसिसच्या अमानवीय क्रूरतेमागे असलेली तिची मूळ विचारसरणी नष्ट करण्यासाठी 
जागतिक स्तरावर पावले का उचलली जात नाहीत ?
    लंडन - इसिसच्या जिहाद्यांंनी २१ वर्षीय नादिया मुराद या यझिदी युवतीच्या ६ भावांची आणि आईची निर्घृण हत्या करून तिला लैंगिक गुलाम म्हणून विकले, अशी माहिती इसिसपासून सुटका झालेल्या नादियाने लंडन येथे दिली. शहरातील ट्रेड युनियन काँग्रेस सभागृहात आयोजित एका बैठकीत ती बोलत होती. नादिया इसिसपासून पीडित झालेल्या लोकांना एकत्रित करून इसिसविरुद्ध लढा देण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर चॉकलेट्सची पुडी फेकून फेकणारा ओरडला बॉम्ब !

     बेंगळुरू - येथे एका कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असणारे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर बी.एस्. प्रसाद नावाच्या तरुणाने चॉकलेट असलेली कागदाचा पुडी फेकून तो बॉम्ब असा ओरडला. त्यामुळे येथे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुडी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही. सुरक्षारक्षकांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात चॉकलेट असल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षकांनी प्रसाद याला कह्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे. आपल्या समाजासाठी मुख्यमंत्री चांगले काम करत नसल्याने आपण असे केले, असे त्याने पोलिसांना सांगितले. (यावरून लोकांचा उद्रेक लक्षात येतो. राज्यकर्त्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे ! यापुढे जनतेची कामे केली नाहीत, तर जनता पुढे आणखी कठोर पावले उचलून त्यांना धडा शिकवेल, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : ISISke atankiyone Bangladesh sthit Panchgarh jileke ek mandir ke pujariki gala kaatkar hatya ki.
     Kya is se Bharatke Hindu jagrut honge ?
जागो !
: इसिस के आतंकियों ने बांग्लादेश स्थित पंचगढ जिले के एक मंदिर के पुजारी की गला काटकर हत्या की.
     क्या इस से भारत के हिन्दू जागृत होंगे ?

फलक प्रसिद्धीकरता

भारतातही अशा घटना घडू लागल्यावर हिंदू जागे होणार आहेत का ?
     इसिसच्या आतंकवाद्यांनी बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील एका मंदिराच्या पुजार्‍याची गळा चिरून हत्या केली. यासंदर्भात इसिस हिंदूंना बांगलादेशात राहू देणार नाही !, असे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या.

काश्मीरमध्ये राष्ट्र्रपती राजवट लागू करा ! - अमेरिकेतील हिंदू संघटनांची मागणी

     रोजबर्ग (ओरेगॉन, अमेरिका) - काश्मीर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील तिढा सोडवावा, अशी मागणी अमेरिकेतील हिंदु संघटनांनी केली आहे. या संघटनांत इंडिया हेरीटेज फाऊंडेशन, अमेरिकेतील हिंदू महासभा, हिंदू फ्रंट ऑफ अमेरिका, अमेरिकन-इंडियन बुद्धीवंत संघटना, डायव्हर्सिटी-युएस्ए, पनून काश्मीर युएस्ए, इंडो-अमेरिकन असोसिएशन, ओरेगॉन इत्यादी संघटनांचा समावेश आहे. काश्मीरमधील सध्याची बिकट अवस्था लक्षात घेता तेथे राष्ट्र्रपती राजवट लागू करून पीडीपीसारख्या भारतविरोधी पक्षाला सत्तेबाहेर ठेवावे. तेथील विधानसभाही विसर्जित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमधील विधानसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करून काश्मीरला कायमस्वरूपी इस्लामी राजवटीत ठेवण्याचा आधीच्या मुसलमान राज्यकर्त्यांचा कट हाणून पाडावा. त्याशिवाय काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेणे आत्मघातकी ठरेल.

चीनमधील विद्यार्थी मुलींप्रमाणे लाजाळू आणि भित्रे होत आहेत !

भारतात अहिंसा आणि सहिष्णुता यांच्या अती मार्गदर्शनामुळे भारतातील भावी पिढी षंढ होत चालली 
आहे. त्यामुळे त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचा इतिहास शिकवणे 
अगत्याचे झाले आहे !
     बीजिंग - चीनच्या शिक्षणक्षेत्राला अलीकडे एक वेगळीच चिंता भेडसावत आहे. तेथे पुरुष शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शाळेत महिला शिक्षकांची अधिकाअधिक नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे नवीन पिढीतील मुलांवर महिलांसारखे लाजाळू आणि काहीसे भित्रेपणाचे संस्कार होऊ लागले आहेत. यावर उपाय म्हणून फूजौ येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक लिन वाई यांनी त्यांच्या वर्गात प्रतिदिन धाडसी आणि युद्धभूमीच्या गोष्टी सांगण्यास प्रारंभ केला आहे. ते मुलांना साहसी होण्यासाठी, महिलांचे रक्षण आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शिक्षण देत आहेत. ते झेंग्झी येथील शाळेत मुलांकडून ते खर्‍या मनुष्यासारखे वागणार !, असे वचन घेत आहेत. त्याच बरोबर शांघायमध्ये शाळांतील मुख्याध्यापक मुलांसाठी अशा वर्गाचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामध्ये मुलांना मार्शल आर्ट, संगणक दुरुस्ती शिकवणे अनिवार्य असेल.

अमेरिकेतील जीबीएस्के आस्थापनाकडून हिंदु देवतांचे विडंबन : हिंदूंकडून निषेध

     न्यूयॉर्क - जीबीएस्के या ऑनलाईन आस्थापनाकडून हिंदु देवतांची चित्रे असलेले टी-शर्ट, टँक-टॉप्स (छोटे टॉप्स्) आणि आच्छादने यांची विक्री केली जात आहे. हिंदु देवतांच्या या विडंबनाच्या विरोधात फोरम फॉर हिंदु अवेकनिंगने या आस्थापनाला पत्र पाठवून निषेध केला आहे. हिंदु देवतांचा अवमान करणारी ही उत्पादने संकेतस्थळावरून हटवण्यात यावी आणि जीबीएस्केने हिंदूंची क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच या विडंबनाच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने निषेध करावा, असे आवाहन फोरम फॉर हिंदु अवेकनिंगने केले आहे. पत्रामध्ये, हिंदूंच्या देवतांचे स्थान हे देवघर किंवा मंदिर यांमध्ये असते. या देवतांची चित्रे टी-शर्ट, टँक-टॉप्स आणि आच्छादने यांवर छापल्याने हिंदूंच्या देवतांचा अनादर होतो आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. जीबीएस्के ने आपला व्यापार वाढवण्यासाठी हिंदु देवतांचा वापर करू नये, असे म्हटले आहे. 
धर्माभिमानी हिंदू पुढील मार्गिकेवरून या आस्थपानाचा निषेध नोंदवत आहेत. 
हिंदुत्ववाद्यांना विनंती ! 
हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा ! 
     हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

आरोपीचे वकीलपत्र स्वीकारण्यास अधिवक्त्यांचा नकार

हिंदु मुलीला फसवणार्‍या धर्मांध आरोपीचे वकीलपत्र स्वीकारण्यास 
नकार देणार्‍या स्वाभिमानी अधिवक्त्यांचे अभिनंदन ! 
जालना येथील लव्ह जिहाद प्रकरण 
     जालना - येथील एका हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या जाकीर हुसेनला पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले होते. तेव्हा संपूर्ण जिल्ह्यात ५५७ अधिवक्ते असतांना एकाही अधिवक्त्याने आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारता अघोषित बहिष्कार टाकला. अखेर न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता अरविंद मुरमे यांनी आरोपीच्या वतीने काम पाहिले. (अशी एकजूट सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी दाखवल्यास समाजातील लव्ह जिहाद संपायला वेळ लागणार नाही ! - संपादक)

सनातनचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांना बेंगळुरू आणि म्हैसूर येथील दौर्‍याच्या वेळी भेटलेले जिज्ञासू अन् धर्माभिमानी अधिवक्ते !

श्री. रामदास केसरकर
     सनातन संस्थेचे कायदेविषयक सल्लागार आणि साधक अधिवक्ते श्री. रामदास केसरकर यांची बेंगळुरु आणि म्हैसूर दौर्‍याच्या कालावधीत काही जिज्ञासू आणि धर्माभिमानी अधिवक्त्यांची भेट झाली. या भेटीतून ईश्‍वराचे कार्य तोच कसे करवून घेत आहे, याची त्यांना प्रचीतीही आली. २२ फेब्रुवारी या दिवशी आपण या लेखाचा पूर्वाध वाचला. आज उत्तरार्ध पाहूया.
८. अधिवक्ता पद्मनाभ होल्ला यांनी कुलदेवता आणि दत्तगुरु हे 
नामजप त्वरित चालू करणार असल्याचे सांगणे आणि 
साधनेच्या अधिक मार्गदर्शनासाठी भ्रमणभाषवर संपर्क करणे
    अधिवक्ता पद्नाभ होल्ला मला भेटण्यासाठी आश्रमात आले. आमचा परिचय झाल्यानंतर मी त्यांना संस्थेचे कार्य सांगून जीवनात साधनेचे महत्त्व काय आहे ?, हे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मला साधनेची आवड असून आपण मला सांगाल ती साधना करण्यास मी सिद्ध आहे. तेव्हा मी त्यांना गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यांनी आपण कुलदेवतेचा आणि दत्तगुरुंचा नामजप त्वरित चालू करतो, असे सांगितले आणि म्हणाले, मी आपल्याला साधनेच्या मार्गदर्शनासाठी भ्रमणभाषवर संपर्क करीन, त्याप्रमाणे ते माझ्याशी अद्याप संपर्क ठेवून आहेत.

इंटरनेट वापरणार्‍यांना दिलासा !

    ट्रायने (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) कोणतीही माहितीजाल (इंटरनेट) सेवा वापरासाठी समान वेग मिळणार, तसेच इंटरनेट वापरासाठीच्या दरांत भेद नसावा, असे घोषित करून इंटरनेट वापरणार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. इंटरनेट ही आजच्या प्रगतीशील विज्ञानयुगाची नितांत आवश्यकता आहे. तेच उपलब्ध होण्यास अनेक अडथळे असतील, तर विकासाची झेप घेण्यास नक्कीच अटकाव निर्माण होतो. इंटरनेटची सेवा देणारी आस्थापने इंटरनेटच्या वेगाप्रमाणे दर आकारत ग्राहकांची प्रचंड लुटमार करत असतात. शिवाय आपण ज्या वेगासाठी रिचार्ज करतो, तो वेग मिळण्याविषयी साशंकता असते. यासाठी ठोस असे उत्तर कोणत्याच दूरसंचार (टेलिकॉम) आस्थापनाकडे नाही. न पटणारी खोटी कारणे सांगून ग्राहकास ताण दिला जातो. ग्राहकाची ही परवड आतातरी थांबेल, अशी आशा आहे. आस्थापनाने सांगितल्याप्रमाणे वेग जरी मिळाला नाही, तरी महागडे रिचार्ज करून पैसे गमावल्याचे दु:ख तरी वाट्याला येणार नाही.

निर्दोष सुटलेल्या सनातनच्या कार्यकर्त्यांना शासनाने आर्थिक हानीभरपाई द्यावी !

     विविध कारणांमुळे आणि विविध पुरोगामी, सामाजिक, तसेच राजकीय व्यक्तीमत्त्वांच्या दबावामुळे प्राथमिक चौकशी न करता सनातनच्या कार्यकर्त्यांना पोलीस उचलून पोलीस कोठडीत ठेवतात आणि ते गुन्हेगारच आहेत, असे समजून तेथे त्यांचा छळ होतो. ३ ते ४ वर्षांनंतर ते गुन्हेगार नाहीत, असा न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांना सोडून दिले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत तो कार्यकर्ता स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करणारा एक सामाजिक घटक आहे, हे पोलीस विसरतात.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - देशद्रोह्यांचे अभयारण्य !

१. माजी पंतप्रधानांच्या नावे चालवल्या 
जाणार्‍या विद्यापिठात देशद्रोही निपजणे दुर्दैवी !
    सियाचीन येथे झालेल्या हिमस्खलनानंतर, ६ दिवस बर्फाखाली गाडले जाऊनही जिवंत राहिलेले जिगरबाज लान्सनायक के. हणमंतप्पा यांची मृत्यूशी चाललेली झुंज यशस्वी व्हावी, यासाठी जेव्हा सारा देश जगन्नियंत्याला साकडे घालत होता, त्याच वेळी देशाच्या राजधानीत जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संसदेवरील आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी महंमद अफझलचा स्मृतीदिन साजरा करण्यात मग्न होते. अतिशय संतापजनक, लोकशाहीतील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची विटंबना करणारी ही घटना ! यात सहभागी कोण झाले होते, तर तथाकथित बुद्धीमान समजले जाणारे, डाव्या आणि धर्मनिरपेक्ष विचारांनी ज्यांचा मेंदू पार पोखरून टाकला आहे, असे विद्यार्थी. जे विद्यापीठ चालू करण्यासाठी संसदेत विशेष कायदा संमत करण्यात आला होता, जे भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या नावाने चालवले जाते, असे विद्यापीठ ! अशा विद्यापिठात देशद्रोह्यांची मोठ्या संख्येने निपज व्हावी, हे या देशाचे दुर्दैव आहे !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

   भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल.

राजापूर येथील धर्माभिमानी श्री. विनोद गादीकर यांना आलेली अनुभूती

१. गावाच्या नवरात्र उत्सवाच्या बैठकीमध्ये विषय 
मांडण्यासाठी तात्काळ होकार मिळणे
     सोलगाव येथे पंचांगसेवेसाठी जाण्याचा विचार आला; म्हणून श्री. प्रसन्न गुरव यांना सेवेला येण्यासाठी संपर्क केला. तेव्हा देवळामध्ये गावाची नवरात्र उत्सवाची बैठक असल्याचे कळले. त्या वेळी गावप्रमुख श्री. विनायक पंडित यांना संपर्क करून तुमच्या बैठकीमध्ये १५ मिनिटे विषय मांडण्यासाठी वेळ मिळेल का ?, असे विचारल्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला.
२. सेवेला जातांना प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि जयघोष करत गेल्यामुळे 
अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळणे आणि आतून आनंद मिळणे
     सेवेला जातांना इतर साधक उपलब्ध नव्हते; म्हणून मी एकटाच २५ पंचांग घेऊन गेलो. जातांना प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि जयघोष करत जात होतो. तेव्हा भावजागृती होत होती. देवाला शरण गेलो आणि कृतज्ञताभावाने प्रार्थना केली. देवाला प्रार्थना करून विषय मांडला, तेव्हा श्री. पंडित यांनी सांगितले, आम्हाला २०० पंचांग द्या आणि रविवारी सकाळी ध्वनीचित्र-चकती दाखवण्याचे नियोजनही करूया. तेव्हा मला आतून पुष्कळ आनंद झाला.

देशभक्ती लुप्त होण्याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची शासने उत्तरदायी आहे. यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांकडून हिंदु राष्ट्रात कठोर साधना करवून घेण्यात येईल !

     देशात आज अराजक वाढत चालले आहे. लोकांमध्ये देशभक्ती लुप्त पावत चालली असल्याचे दिसून येते. अशा वेळी शिवरायांच्या देशभक्तीच्या शिकवणुकीची आज आवश्यकता आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

धर्मविरांची धर्मरूपी ईश्‍वराला प्रार्थना

कु. सुप्रिया नवरंगे
धर्मदीप उजळो भूमंडळी । धरूनी मनी ही एकच आस ॥
पथिक जाहलो तव मार्गीचा । तूच चालवी बालजिवास ॥ १ ॥

तुझे कार्य हे करिशीही तूची । आशिश दे माध्यम बनण्यास ॥
धर्मरवि, तव दिव्यशलाका । स्पर्शू दे मम जीवनास ॥ २ ॥

तव कार्याने उजळे जीवन । तव कार्यातच सार्थक मरण ॥
एक कार्य हे जिथे लाभते । देहदुःख परि मोद मनास ॥ ३ ॥

भक्ती, शक्ती, युक्ती दे भरण्या । आनंदे या त्रिभुवनास ॥
धर्मरवि, तव दिव्यशलाका । विराम देवोत घनतिमिरास ॥ ४

जन्मतःच सात्त्विक असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेला आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला पुणे येथील चि. यशगौडा मल्लगौडर (वय १ वर्ष) !

चि. यशगौडा मल्लगौडर
     चि. यशगौडा मल्लगौडर याचा तिथीनुसार माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२३ फेब्रुवारी २०१६) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील, आजी-आजोबा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. यशगौडा मल्लगौडर याला सनातन परिवाराच्या 
वतीने वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणी
१ अ. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारी दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये वाचून गरोदरपणात आपले बाळ हा ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळणे : मी पुण्यात आल्यावर नियमितपणे दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणारी दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये वाचू लागले. त्यामुळे मला गरोदरपणात आपले बाळ हा ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळाली. हे सर्व ईश्‍वराचे नियोजन असल्याचे जाणवले.
१ आ. बैठकीतील सूत्रे बाळाला समजू दे, असे सांगितल्यावर बैठक संपेपर्यंत पोटामध्ये बाळाची हालचाल जाणवणे : गरोदरपणी आपले बाळ हा ग्रंथ वाचून तशी कृती केल्यामुळे बाळावरही तसे संस्कार होत असल्याचे मला जाणवायचे. अनेक प्रसंगांत याची अनुभूती येत होती.

कलियुगातील राम-लक्ष्मण प.पू. डॉक्टर आठवले आणि प.पू. पांडे महाराज !

परात्पर गुरु डॉ. आठवले

प.पू. पांडे महाराज
     पृथ्वीलोकात जेव्हा असुरांचा अत्याचार शिगेला पोचतो, धर्माची घडी विस्कटते आणि अधर्म बोकाळतो, तेव्हा दुष्टांचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शेषशय्येवर योगनिद्रा घेणारे श्रीहरि विष्णु अवतार धारण करतात. या अवतारकार्यात त्यांची सेवा करण्यासाठी आणखी दोन अवतार सदैव तत्पर असतात, ते म्हणजे हनुमान आणि शेष. त्रेतायुगात लक्ष्मण बनून आणि द्वापरयुगात बलराम बनून शेषनागाने भगवंताची सेवा केली.
प.पू. दास महाराज
१. कोणतेही धर्मबंधन नसतांना लक्ष्मणाने सर्व सुखांचा
त्याग करून आणि १४ वर्षे निराहार राहून भगवंताची अखंड सेवा करणे
    श्रीराम-लक्ष्मण आणि श्रीकृष्ण-बलराम यांची जोडी अतूट आहे. पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या कैकयीने राजा दशरथाकडे रामरायांना वनवासात धाडण्याचे वचन घेतले. वडिलांच्या वचनपूर्तीसाठी श्रीराम वनवासात निघाले आणि त्यांच्यासमवेत अर्धांगिनी सीता अन् लक्ष्मणही वनवासात निघाले. लक्ष्मणाला त्यांच्यासमवेत जायलाच पाहिजे, असे काही बंधन नव्हते. तसे कुणी वचनही मागितले नव्हते. सीतेने रामासमवेत जाणे, हा तिचा धर्मच होता. सुखदुःखात पतीला साथ देणे, हे पतीव्रतेचे व्रतच आहे; पण लक्ष्मणावर कोणतेही धर्मबंधन नव्हते. त्याला आरामात राजसुखात रहाता आले असते. रानावनात, उन्हातान्हात, काटेकुटे तुडवत फिरण्याची काय आवश्यकता होती ? केवळ भगवंताची सेवा करण्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून लक्ष्मण त्यांच्यासमवेत गेला आणि १४ वर्षे निराहार राहून त्याने भगवंताची अखंड सेवा केली.

महर्षींची शिकवण आणि कार्य !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना उज्जैन येथील महाकालेश्‍वराच्या देवळात
प.पू. डॉक्टरांच्या वतीने पहाटेच्या वेळी एका महर्षींनी दीपाराधना आणि आरती
केल्याचे सांगणे, तसेच अशी अनुभूती कुणाला आली आहे का ?, याची चौकशी
करण्यास सांगणे अन् तसे केल्यावर त्या संदर्भात तशी माहिती खरोखरच प्राप्त होणे
     ईरोड या गावाजवळ असलेल्या भवानी या क्षेत्राला जाण्यासाठी आम्ही निघालो असता गाडीत बसल्यानंतर पू. डॉ. ॐ उलगनाथन् मला म्हणाले, काल रात्री महर्षींनी मला सांगितले की, उज्जैन येथील महाकालेश्‍वराच्या देवळात २.२.२०१६ किंवा ३.२.२०१६ या दिवशी एका महर्षींनी पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर दीपाराधना आणि आरती केली आहे. महर्षींनी ही पूजा केवळ प.पू. डॉक्टरांसाठी केली आहे. या वेळी देऊळ बंद होते. या वेळी केवळ आरती करणार्‍याचे हात दिसत होते. महर्षींनी हे सांगितल्याने या दोन दिवसांत दीपाराधना झाली असल्याची अनुभूती कुणाला आली आहे का ?, याची चौकशी करावी. (आरती करणारे महर्षी म्हणजे श्रीकृष्णाचे गुरु सांदिपनी असावेत, असे मला वाटले; कारण उज्जैन येथील सांदिपनी ऋषींच्या गुरुकुलातच भगवान श्रीकृष्ण शिकण्यासाठी होते. - सौ. गाडगीळ)

पाटीची गंमत !

    काही वेळा ईश्‍वराशी अनुसंधान चालू असतांना कुणाशी बोलू नये, ऐकू नये, शांतपणे स्मरणात रहावे, असे वाटते. हे एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, एक पाटी सिद्ध करायची, माझे अनुसंधान चालू आहे आणि ती जवळ ठेवायची, म्हणजे ते वाचून इतरांना कळेल ! - सौ. स्नेहा शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१५)

साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकरच न्यून होऊन त्यांना त्यांच्या साधनेप्रमाणे आध्यात्मिक शक्ती मिळणार असल्याचे हनुमानाने सांगणे

    मी सूक्ष्मातून हनुमानाला विचारले, भगवान, तुम्ही कुठे आहात ? येथे सर्व रामाचे भक्त असून सर्वांना साधना करून ईश्‍वरी राज्य आणायचे आहे. त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मी १५ ते २० मिनिटे शांतपणे नामजप केला; पण काहीच उत्तर मिळाले नाही.
    थोड्या वेळाने मला पुढील दृश्य दिसले. मी हिमालयात उंच टोकावरून एका गुहेत जात आहे. त्या वेळी सोनेरी प्रकाश दिसत होता. थंडी नव्हे, तर उष्णता जाणवत होती. नंतर समोर उंच गोरीला दिसत होता. तो छातीवर हात मारून जोरजोरात खिंकाळत असल्यामुळे मी घाबरले. तेव्हा हनुमान मूळ रूपात आला. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
हनुमान : असे घाबरून कसे चालेल ?

कोण कोणाचा विचार करते ?

- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मनाला एक दार असते, तर...

मनाला जर एक दार असते, तर ।
नको ते विचार बाहेर काढून ।
बंद करता आले असते ॥ १ ॥
मनाला एक दार असते, तर ।
तर उद्याच्या स्वप्नांना आत येऊ दिले नसते ॥ २ ॥

साधनेत मनापासून चुका स्वीकारण्याचे महत्त्व !

    पुणे येथील धर्मप्रेमी श्री. संदीप चोपदार मागील १ वर्षापासून हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील आहेत. समितीच्या वतीने घेतल्या जाणार्‍या धर्मप्रेमींच्या साप्ताहिक सत्संगाला ते उपस्थित असतात. एका सत्संगात ते म्हणाले, इतरांनी चूक लक्षात आणून दिल्यास मला ती स्वीकारता येत नाही. मी तर प्रयत्न केले होते, असे स्पष्टीकरणात्मक विचार मनात येतात. एका प्रसंगात चूक समजल्यावर मला कोणतीही शारीरिक व्याधी नसतांनाही माझ्या हृदयाचे ठोके अकस्मात् वाढले आणि शरीर पुष्कळ गरम झाले. त्यानंतर मी प्रार्थना करून मनापासून चूक स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शरिरात हळूहळू गारवा जाणवू लागला आणि हृदयाचे ठोके सर्वसाधारण (नॉर्मल) झाले.

साधकाला ईश्‍वराच्या खजिन्यातून स्थिरता, निरपेक्षता, प्रीती, असे अनेक दैवी मोती प्राप्त झाल्यावर तो मोक्षाधिकारी होणे

      साधक साधनेच्या एका टप्प्याला आला की, ईश्‍वराच्या खजिन्याचे द्वार त्याच्यासाठी उघडे होते. साधकाला त्या खजिन्यातून हळूहळू स्थिरता, निरपेक्षता, प्रीती, असे अनेक दैवी मोती प्राप्त होतात. या मोत्यांची माळ पूर्ण झाल्यावर साधक मोक्षाधिकारी बनलेला असतो. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०१६) 

हिंदु धर्मजागृती सभांच्या प्रसिद्धी फलकांवर वक्त्यांची छायाचित्रे छापण्याविषयी सूचना !

     सध्या ठिकठिकाणी चालू असलेल्या धर्मजागृती सभांच्या प्रसिद्धीसाठी काही हितचिंतक, हिंदुत्ववादी फलकांसाठी प्रायोजक बनतात. काही वेळा प्रायोजक फलकांवर सभेतील वक्त्यांची छायाचित्रे छापण्याविषयी सांगतात. फलकावर वक्त्याचे छायाचित्र छापल्यास त्याचा वापर एकाच सभेसाठी होतो; पण छायाचित्र न छापल्यास फलकावरील स्थळ, वार आणि वेळ पालटून त्या फलकाचा वापर अन्यत्रच्या धर्मजागृती सभेसाठीही होतो. असे केल्यामुळे धर्मकार्यासाठी समाजाने दिलेल्या दानाचा योग्य विनियोग होतो आणि आर्थिक बचतही होते. त्यामुळे फलकावर वक्त्यांचे छायाचित्र छापण्यास सांगणार्‍या प्रायोजकांना हा दृष्टीकोन सांगावा; मात्र छायाचित्र छापण्यासाठी ते आग्रही असल्यास छायाचित्रासह फलक छापावा.
- (पू.) कु. स्वाती खाडये, प्रसारसेविका, सनातन संस्था.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. खालील सर्व प्रकारच्या कलाकृतींसाठी प्रायोजक मिळवून त्याचे हिंदु नववर्ष साजरे करणारी मंडळे, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, रहिवासी संकुल आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात वितरण करावे, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
 १. ए-५ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक
२. ए-२ आकारातील भित्तीपत्रक (याची कलाकृती येथे दिली आहे. ती पाहून उत्तरदायी कार्यकर्त्यांनी भित्तीपत्रकाची मागणी नोंदवता येईल.)
३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी १० फूट X ८ फूट आकारातील होर्डिंग
४. ८ फूट X ४.५ फूट या आकारांतील शुभेच्छा देणारे फ्लेक्स फलक
५. फेरीच्या मार्गावर लावण्यासाठी ए-२ आकारातील फलक

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम
कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले 
पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आंधळ्याचे माझ्या पाठून या हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप बदलत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मौनाचे महत्त्व

     आतले शब्द संपले पाहिजेत. विचार नकोत. शब्द आले की, ईश्‍वराची सत्ता तुटते. शब्द परमेश्‍वराविषयी असतात. ते काही परमात्मा नाहीत. देव अनाम, अरूप आहे. देव शब्दांनी नाही, तर शब्द घालवूनच मिळतो. शब्द गेले की, समाधी !; पण केवळ शब्दशून्यता हीच समाधी नव्हे. मूर्च्छा, झोपेतही शब्द (संकल्प) नसतात. शब्द (संकल्प) जाऊनही जागृत, चेतन आणि प्रबुद्ध होऊन रहाणे समाधी आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामी (संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१२)

पाणी माफियांना आवरा !

संपादकीय
    काही दिवसांपूर्वी चीनशी निगडित एक बातमी प्रसारित झाली होती. त्यानुसार चीनमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे तेथील लोक त्रस्त झाले आहेत. त्याला वैतागून तेथील नागरिक इंग्लंडसारख्या देशांकडून शुद्ध हवा आयात करत आहेत. भारतात तरी अजून शुद्ध हवा आयात करण्याची वेळ आली नसली, तरी पाणी टंचाईमुळे पाण्याच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ भारतियांवर आली आहे. चीनमध्ये शुद्ध हवा पुरवण्याचा धंदा तेजीत असतांना तेथे त्याबाबतीत भ्रष्टाचार होतो कि नाही, हे ज्ञात नाही; मात्र सोलापूरसारख्या ठिकाणी अशा पाणीविक्रेत्यांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळवण्यास आरंभ केला आहे. सोलापूरमध्ये ३२ पाणीविक्रेत्यांकडे पाणी विकण्याचा परवाना आहे.

सैन्याचे आधुनिकीकरण हवे !

संपादकीय
      काश्मीरमधील पम्पोरमध्ये आतंकवाद्यांशी उडालेली चकमक ही तीन दिवस चालू होती. या चकमकीत आतापर्यंत ६ भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. ही आकडेवारी भारतियांच्या मनाला वेदना देणारी आहे. मागील काही आतंकवादी आक्रमणांचा अभ्यास करता आतंकवादी सार्वजनिक ठिकाणच्या इमारतींमध्ये घुसखोरी करून भारतीय सैन्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. अशा इमारतींची एकंदर रचना, त्यात अडकलेले नागरिक यांमुळे आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्यास अडचण येते. पम्पोरमध्येही तेच दिसून आले. भारतात सातत्याने होणारी आतंकवादी आक्रमणे आणि त्यांच्या आक्रमणाची व्याप्ती पाहून अशा मोहिमा अल्प वेळेत कशा यशस्वी करता येतील, याचे प्रशिक्षण सैन्याला देणे आवश्यक आहे. मोहिमेच्या वेळी किती सैनिक कामी आले, त्यावरून सैन्याचा दर्जा लक्षात येतो. या मोहिमेत हुतात्मा झालेल्या ६ सैनिकांमध्ये दोन सैन्याधिकारांचाही समावेश आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn