Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


संत रोहिदास यांची आज जयंती

येत्या विधानसभा अधिवेशनात हरियाणातील जाटांना आरक्षण देणार ! - भाजपची घोषणा

आंदोलनाची जनतेने चुकवलेली किंमत
  • ११ जण ठार, तर १५० घायाळ
  • देशाची २० सहस्र कोटी रुपयांची हानी 
  • १००० रेल्वेगाड्यांची सेवा विस्कळीत
  • तोडफोड, लुटमार आणि आग लावणे
  • देहलीत मोठ्या प्रमाणात पाणीसंकट 
  • आरक्षण द्यायचेच होते, तर ११ जणांचा मृत्यू आणि देशाची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होईपर्यंत का थांबण्यात आले ? 
  • आता प्रत्येक जातीने आरक्षणासाठी देशाची हानी करावी आणि आरक्षण मिळवावे, असा पायंडा पडणार नाही का ? 
  • देशाची हानी करून आरक्षणाचा लाभ मिळवणारे देशाचे भले करतील का ?
     नवी देहली - गेल्या ६ दिवसांपासून हरियाणात जाट समाजाच्या आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनात ११ जण ठार, तर १५० जण घायाळ झाल्यानंतर आणि देशाची २० सहस्र कोटी रुपयांची, तर रेल्वेची ३०० कोटी रुपयांची हानी झाल्यानंतर भाजपने जाटांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. (जनतेला वेठीस धरणार्‍या, जनतेच्या संपत्तीची हानी करणार्‍या आरक्षणवादी आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! - संपादक)
     भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांनी माहिती दिली की, हरियाणा राज्याच्या येत्या विधानसभा अधिवेशनात जाट समाजातील मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल. यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय समिती बनवण्यात येईल.

पम्पोर (काश्मीर) येथे एका कॅप्टनसह तीन सैनिक हुतात्मा

     सीमेवर प्रतिदिन आतंकवादी आक्रमणांत सैनिकांचे जीव जात असतांना देशाच्या सद्यस्थितीचे गांभीर्य नसलेले संवेदनाशून्य निधर्मी राजकारणी जेएन्यूमधील देशद्रोही विद्यार्थ्यांवरील कारवाई, शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावरून दर्शन यांसारख्या थेट राष्ट्रहिताशी संबंध नसलेल्या विषयांवर आंदोलने करतात. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रहितदक्ष पत्रकारितेचा वारसा लाभलेले भारतातील पत्रकारही अशांची तळी उचलून त्यांना प्रोत्साहन देतात, हे भारतीय लोकशाहीचे अपयश आहे ! - संपादक 
     श्रीनगर - काश्मीरमधील पम्पोर येथे २० फेब्रुवारीच्या रात्रीपासून आतंकवाद्यांशी चालू असलेली चकमक २१ फेब्रुवारीला रात्री उशिरापर्यंच संपली नव्हती. या चकमकीत कॅप्टन पवन कुमार (वय २२ वर्षे) यांच्यासह ३ सैनिक हुतात्मा झाले, तर एका नागरिकालाही प्राण गमवावे लागले. २० फेब्रुवारीला या आतंकवाद्यांनी प्रथम केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आक्रमण केले होते. त्यात ११ सैनिक घायाळ झाले. त्यात कॅप्टन पवन कुमार यांचाही समावेश होता.

जम्मू-काश्मीरचे आमदार राशीद इंजिनियर यांच्यावर आक्रमण !

राष्ट्र आणि हिंदु धर्मप्रेमींकडून मार खाऊनही परत परत राष्ट्र आणि हिंदु धर्माच्या 
विरोधात कृती करणार्‍या राशीद यांच्यावर शासन कठोर कारवाई करील का ?
     राजौरी - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे समर्थन करण्यासाठी मोर्चा काढल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीरचे अपक्ष आमदार राशीद इंजिनियर यांच्यावर येथे राष्ट्रप्रेमींकडून आक्रमण करण्यात आले. यापूर्वीही त्यांना गोमांस मेजवानी करण्याच्या प्रकरणावरून विधानसभेत मारहाण करण्यात आली होती, तर एकदा त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली होती. 
     राशीद जम्मू येथून कालाकोट येथे वाहनातून जात असतांना भामला येथे काही लोकांनी त्यांच्या गाडीवर घोषणाबाजी करत आक्रमण केले. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच राशीद यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. या वेळी पोलिसांनी राशीद यांचे रक्षण केले. येथे रस्ताबंद आंदोलन करण्यात आल्यावर पोलिसांनी लाठीमार केला. यात काही जण घायाळ झाले.

हिंदू सेनेचे नेते विष्णु गुप्ता यांना हद्दपारीची नोटीस

हद्दपारीची शिक्षा २ वर्षांसाठी ?
देहली पोलिसांची मोगलाई !
     नवी देहली - दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांना २ वर्षांसाठी देहलीतून हद्दपार करण्याच्या कारवाईला प्रारंभ झाला असून त्यांना २५ फेब्रुवारीला अतिरिक्त पोलीस उपायुक्तांसमोर म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (देशात मोठ्या प्रमाणात देशद्रोही समोर आले असतांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून राष्ट्रवादी हिंदु नेत्यांवर कारवाई करणारे पोलीस ! - संपादक)
     श्री. गुप्ता दक्षिण पूर्व जिल्ह्यातील सरिता विहार भागातील आली गावाचे निवासी असून त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये भादंवि, डीपी अ‍ॅक्ट, आर्पी अ‍ॅक्ट आणि पीआयएन्एच् अ‍ॅक्ट या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमेरिकेत आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात ६ जण ठार

     शिकागो - अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या कलामाझु काऊंटी भागामध्ये एका आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात ६ नागरिक ठार झाले, तर ३ जण घायाळ झाले. आक्रमणकर्त्याने चारचाकी गाडी चालवत नागरिकांवर गोळीबार केला. त्यानंतर तो पळून गेला. पोलीस या आक्रमणकर्त्याचा शोध घेत आहेत.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी संसदेत आवाज उठवणार ! - खासदार सीताराम येच्युरी, माकप

साम्यवाद्यांकडून केरळमध्ये संघस्वयंसेवकांच्या आजवर झालेल्या शेकडो 
हत्यांविषयी येच्युरी यांनी संसदेत कधी निषेध व्यक्त का केला नाही ?
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या अन्वेषणाविषयी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याचा जाब विचारू, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येच्युरी यांनी २० फेब्रुवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 
     सीताराम येच्युरी पुढे म्हणाले, जेएन्यूमधील कारवाईविषयी पुरावे आहेत काय ? बाहेरून आलेल्या काहींनी घोषणाबाजी केली. त्याची मोडतोड करत वेगळेच सादरीकरण करण्यात आले. हे सर्व कोणी केले ? तो गुन्हेगार पकडणार कि नाही, याचाही जाब विचारला जाईल.

(म्हणे) यापुढे आम्हीच रुद्र पाटीलचा शोध घेऊ !

डॉ. भारत पाटणकर यांचे पोलिसांना आव्हान
पोलिसांवर अविश्‍वास दर्शवणारे आणि पोलीस अन्वेषणात ढवळाढवळ
 करू पहाणारे डॉ. पाटणकर यांच्यावरच पोलिसांनी कारवाई करावी, 
अशी मागणी कोणी केल्यास चूक ते काय ? 
     कोल्हापूर - बॉम्बस्फोट आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील रुद्र पाटील हा संशयित अजूनही सापडत नाही, हे आश्‍चर्य आहे. पोलीस आणि शासन यांना आम्ही जानेवारी २०१६ पर्यंतची मुदत दिली होती. तरीही त्यांना ते शक्य झालेले नाही. त्यामुळे रुद्र पाटीलला शोधण्याचे काम घोषित केल्याप्रमाणे आम्ही करू, अशी चेतावणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे. कॉ. पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित जाहीर निर्धार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. पाटणकर यांचे हिंदुद्वेषी दबावतंत्र
(म्हणे) मोर्चे आणि आंदोलने यांद्वारे दबाव कायम ठेवला !
१. रुद्र पाटील याला शोधण्याचेे काम आम्ही चालूही केले आहे. मे महिन्यापर्यंत तो आमच्या हाती लागेल. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सोपवू. 
२. पानसरे यांच्या हत्येमागे कोण आहे, हे सांगण्याचे काम आम्ही वर्षभर सातत्याने केले. समविचारी पक्ष आणि संघटना यांना सोबत घेऊन पोलिसांना तपासाची दिशा देण्यासाठी साहाय्य केले. (धादांत खोटे आरोप करून पोलीस अन्वषणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करणे आणि पोलिसांवर दबाव आणणे, याला साहाय्य करणे, असे डॉ. पाटणकर यांना म्हणायचे आहे का ? - संपादक)

संतप्त गावकर्‍यांनी मुसलमान पोलिसाला भगवा ध्वज उभारण्यास भाग पाडलेे !

रेणापूर (जिल्हा लातूर) येथे भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी बंदी केल्याचे प्रकरण
हिंदुबहुल देशात भगवा ध्वज लावण्यासाठी हिंदूंना संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैवी !
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     रेणापूर (जिल्हा लातूर) - १९ फेब्रुवारी या दिवशी येथील कथित वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी बंदी केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीत घुसून दोन पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यानंतर चौकीतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या हातात भगवा ध्वज देऊन त्यांना वादग्रस्त जागेवर तो ध्वज उभारायलाही भाग पाडले. 
१. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पानगाव येथील आंबेडकर चौक ते रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुभाजकातील वादग्रस्त जागेवर येथील शिवभक्त भगवे ध्वज लावत असतांना पोलिसांनी त्यांना विरोध केला

गेल्या ३ वर्षांत पाकमधून भारतात ९८ सहस्र ७९६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मनिऑर्डर्स !

पाकमधून कोण आणि कशासाठी मनीऑर्डर पाठवतात, याची चौकशी शासनाने केली पाहिजे !
    नवी देहली - जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या ३ वर्षांत पाकमधून ९८ सहस्र ७९६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मनीऑर्डरर्स भारतात पाठवण्यात आल्या. बँकेने म्हटले आहे की, ही आकडेवारी अधिकृत नसून अनुमानावर आधारित आहे. पाकिस्तानमध्ये प्रवासी भारतियांची संख्या अधिक नाही की जे घरी पैसे पाठवू शकतील. जागतिक बँकेच्या या संदर्भातील वर्ष २०१६ च्या अहवालानुसार भारत वर्ष २०१५ मध्ये सर्वाधिक मनिऑर्डर मिळणार देश होता.

राज्यात भ्रष्टाचाराचे पूर्णपणे निर्मूलन करणे आणि नीतीमत्तेचे पालन करणे आवश्यक आहे, हे राज्यकर्त्यांनी सांगणे नाही, तर त्या संदर्भात कृती करणे अपेक्षित !

     छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यान्पिढ्यांसाठी एक आदर्श, अतुलनीय, अद्वितीय आणि अलौकीक असे राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, अफाट सामर्थ्य, मुत्सद्दीपणा आदी अनेक गुण होते अन् म्हणूनच अजूनही त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि आदर सर्वांना वाटतो. शिवजयंतीदिनी महाराजांकडून प्रत्येकाने एकतरी गुण अंगीकारण्याचा संकल्प केला पाहिजे आणि यामुळे राज्याचे हित साधले जाणार आहे, तसेच राज्यात भ्रष्टाचाराचे पूर्णपणे निर्मूलन करणे आणि नीतीमत्तेचे पालन करणे आवश्यक आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

देशाच्या राजधानीतील विश्‍वविद्यालयातील राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना ओळखता न येणारे शासन गावागावांतील राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना कधी पकडील का ? हिंदूंनो, तुम्हीच आता हे कार्य करण्यास आरंभ करा !

     नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) जिहादी आतंकवादी अफझलच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करून देशद्रोही घोषणा देणारा उमर खालिद सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस देशभरात छापे मारत आहेत. या संदर्भात उमरचे वडील सय्यद कासिन इलियास यांनी आरोप केला आहे की, उमर मुसलमान असल्याने त्याला लक्ष्य केले जात आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, न्यायालयाने या आरोपांवर निकाल द्यावा, मीडिया ट्रायल घेऊन सुनावणी करू नये. हरियाणात जाट आरक्षण आंदोलन चिघळल्यामुळे सैन्याला पाचारण !

आंदोलन रोखण्यात हरियाणा शासनाला अपयश
     रोहतक/पानीपत - हरियाणामध्ये जाट आंदोलन ७ दिवसांनंतरही न थांबता आणखीनच चिघळले आहे. या आंदोलनाच्या तिव्रतेचा अंदाज गुप्तचर यंत्रणांनाही आला नाही. हे आंदोलन रोखण्यास राज्यशासन पूर्णत: अपयशी ठरले असून अनियंत्रित जमावाला थांबवण्यासाठी सैन्याला पचारण करावे लागले आहे.
१. राज्यातील जाट समाजाला इतर मागासवर्गियांच्या कोट्यातून आरक्षण हवे आहे; परंतु हे राज्यशासनाला मान्य नाही. 
२. हरियाणाच्या खट्टर शासनाने आर्थिक दुर्बल घटकांचा कोटा १० टक्क्यांवरून वाढवून २० टक्के देण्याची घोषणा केली. जेणेकरून जाट समाजाला यात सामावून घेता येईल.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पनवेल (जिल्हा रायगड) येथे विविध ठिकाणी झालेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन

सनातन संस्था पुणे या न्यासाच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. चौगुले
     पनवेल - संस्कृती महिला बचत गट सेक्टर ९, कामोठे येथे मकरसंक्रांतिनिमित्त हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. येथे सनातन संस्थेच्या सौ. वंदना आपटे यांनी महिलांना हळदीकुंकवाचे महत्त्व आणि सात्त्विक वाण का द्यावे, तसेच महिलांनी सक्षम होण्यासाठी काळाची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे उपाय यांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचा १५० महिलांनी लाभ घेतला. या वेळी सनातनने प्रकाशित केलेले रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र हे लघुग्रंथ महिलांना वाण म्हणून देण्यात आले.
     शांतिसागर सोसायटी, सेक्टर ११ कामोठे, येथे हळदीकुंकवाचे महत्त्व आणि धार्मिक परंपरा पाळण्याचे महत्त्व विषद केले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. सावित्रीबाई फुले महिला मंडळ, कळंबोली येथे सद्यस्थितीमध्ये वातावरणाचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा ४५० महिलांनी लाभ घेतला.

नवी मुंबई येथील हिंदु धर्मजागृती सभेत संघटितपणे धर्मकार्य करण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार !

दीपप्रज्वलन करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि वक्ते
सभा स्थळी उपस्थित जनसमुदाय
      नवी मुंबई, २१ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कोपरखैरणे गावातील श्री. रांजणदेवी (गावदेवी) मंदिरात घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत उपस्थित धर्माभिमान्यांनी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार २१ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केला. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. मंगेश म्हात्रे, सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी संबोधित केले. या सभेला २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

जेएन्यूतील देशद्रोही विद्यार्थ्यांना गोव्यातील स्टुडंट इस्लामिक संघटनेचा अप्रत्यक्ष पाठिंबा !

देशद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या संघटनांवरही कारवाई होणे अपेक्षित !
     पणजी, २१ फेब्रुवारी (वार्ता.) - आतंकवादी महंमद अफझलचा उदोउदो करणार्‍या जेएन्यूतील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध करून स्टुडंट इस्लामिक संघटनेने (एस्आयओ) देशद्रोही विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. महंमद अफझलला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अफझलविषयीच्या विद्यार्थ्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही; मात्र लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास अडचण नाही. जेएन्यूमध्ये अनेक विवादास्पद विषयांवर यापूर्वी चर्चा झाली आहे. पूर्वीपासून मुक्त वातावरण असलेल्या जेएन्यूतील विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे, असे वक्तव्य स्टुडंट इस्लामिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल हुसेन यांनी पणजी पत्रकार परिषदेत केले. (लोकशाहीने स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ राष्ट्रावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही ! जेएन्यूतील वातावरण मुक्त नव्हे; तर फुटीरतावाद्यांसाठी रान मोकळे झाल्यामुळेच तेथील विद्यार्थ्यांमध्ये असा राष्ट्रद्वेष रुजत आहे ! अशा विद्यार्थ्यांना पाठिंबा देणार्‍या संघटनांचीही आता चौकशी करायला हवी ! - संपादक)

उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

राज्यात अराजक !
     उल्हासनगर - येथील महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी श्री. युवराज भदाणे यांच्या गाडीवर २० फेब्रुवारी या दिवशी अज्ञातांनी रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या वेळी श्री. भदाणे यांनी गाडीतून सुटका करून घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

आज माघी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंचे मलंगगडावर जागरण !

धर्मांधांनी आक्रमण केलेल्या 
मलंगगडावरील हिंदूंच्या लढ्याचा इतिहास !
       ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावरील नाथपंथियांचे श्रीमलंग मच्छींद्र मंदिर हे मूळचे हिंदूंचे देवस्थान आहे. १९५२ मध्ये तेथे धर्मांधांनी आक्रमण करून दर्गा उभारला. या ठिकाणी मुसलमानांनी त्यांची वस्ती वाढवली आणि न्यायालयात हे सर्व धर्मियांचे स्थान आहे, असे घोषित करून विश्‍वस्त नेमले. त्यामुळे या देवस्थानात होणारी पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी करण्यासाठी बंदी करण्यात आली. आजही हिंदूंवर दडपण आणून येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्यास प्रतिबंध केला जात आहे.

जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा देणारे आणि त्यांचे समर्थन करणारे यांना दंडित करा ! - सुनील घनवट

रत्नागिरी येथे हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्र धर्माभिमान्यांची उपस्थिती !
व्यासपिठावर डावीकडून श्री मिलिंद धर्माधिकारी,
पू.(कु.) स्वाती खाडये आणि श्री सुनील घनवट
      रत्नागिरी, २१ फेब्रुवारी (विशेष प्रतिनिधी) - जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा देणार्‍यांना, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांना दंडित करा, तरच या देशातील जिहादी आतंकवाद संपू शकतो, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. परशुरामाची पवित्र भूमी, अखंड हिंदु राष्ट्राची मागणी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्या जाज्वल्य विचारांनी प्रेरित झालेल्या रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील मारुति मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये २० फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ४ सहस्र हिंदु बांधवांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा वज्रनिर्धार केला.
     या वेळी व्यासपिठावर सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि हिंदु जनजागृती जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

पिंपरी (पुणे) येथे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकातील साहाय्यक लेखाधिकार्‍याला लाच घेतांना अटक

लाचखोरांना कठोरात कठोर शासन केल्यासच भ्रष्टाचाराला आळा बसेल !
      पिंपरी - येथील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकातील साहाय्यक लेखाधिकारी अजित दुर्गाडे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या भविष्य निर्वाह निधीमधून अग्रीम संमत करण्यासाठी दुर्गाडे यांनी लाचेची मागणी केली होती. याविषयी तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आवारातील दुर्गाडे यांच्या कार्यालयात त्यांना लाच स्वीकारतांना अटक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
     घर, संस्कृती आणि देवालय हे हिंदु समाजाचे केंद्रबिंदू आहेत. सद्यस्थितीत ही जीवनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यामुळे अराष्ट्रीयतेचे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. ते दूर करण्यासाठी धार्मिकता आणि राष्ट्रीयता यांची सांगड घालावी लागेल. तरच आपण हिंदु म्हणून जगू शकू ! - प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोवा हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त अमरावती येथे पत्रकार परिषद आणि हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीचे आयोजन

धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीचे आयोजन
      अमरावती - येेथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी १८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी उपस्थितांना राष्ट्र-धर्म कर्तव्य म्हणून सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन या वेळी केले.

फलक प्रसिद्धीकरता

आणखी किती सैनिकांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवणार ?
     पम्पोर (काश्मीर) येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ वर्षीय कॅप्टन पवन कुमारसह ३ सैनिक हुतात्मा झाले आणि एका नागरिकाचाही मृत्यू झाला, तर ११ सैनिक घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Pampore (Kashmir)me atankiyose hui muthbhedme Kaptan samet 3 sainik hutatma aur 11 sainik ghayal. Kya ab Bharat sarkar Pak ko sabak sikhayegi ?

जागो !
     पम्पोर (कश्मीर) में आतंकियों से हुई मुठभेड में कप्तान समेत ३ सैनिक हुतात्मा और ११ सैनिक घायल. 
क्या अब भारत सरकार पाक को सबक सिखाएगी ?

जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करा ! - हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिसांना निवेदन

जयसिंगपूर येथे पोलीस उपनिरीक्षक घुले (मध्यभागी) यांना
निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
       जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), २१ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवार, २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत कोकाटे यांचे राजर्षी शाहू नाट्यगृह येथे व्याख्यान आयोजित केले आहे. कोकाटे यांचा पूर्वइतिहास पहाता त्यांनी आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमांतून हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष, संत यांच्या विरोधात प्रत्येक कार्यक्रमांतून विद्वेष पसरवणारी आणि गरळ ओकणारी वक्तव्ये केली आहेत. धर्मप्रेमी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आधार नसलेली अनेक अयोग्य विधाने करून कोकाटे शिवद्रोहच करत आहेत. अशांच्या व्याख्यानांमुळे समाजात फूट पडत असून मोठ्या प्रमाणात धार्मिक तणाव निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित करावे, अशा मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जयसिंगपूर येथे पोलीस उपनिरीक्षक घुले यांना २१ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. (सातत्याने हिंदुत्वविरोधी आणि ब्राह्मण समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला विरोध करणार्‍या सर्वच हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! - संपादक)

केंद्रशासनाने धर्मांतरबंदी कायदा करावा ! - खासदार योगी आदित्यनाथ

    कोरबा - धर्मांतर हा चिंतेचा विषय आहे. यासाठी केंद्रशासनाने त्वरित धर्मांतरबंदीचा कायदा करावा, अशी मागणी भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी येथे केली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात भाग घेण्यासाठी आलेले योगी आदित्यनाथ पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, 
१. हिंदुत्व हा भारतियांचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय शरिराचे अस्तित्व नसते. हिंदुत्व ही आमची चळवळ आहे.
२. जेएन्यूतील घटना निंदनीय आहे. जेव्हा शिक्षण राष्ट्रीयता आणि नैतिक मूल्ये यांपासून फारकत घेते, तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणे देशद्रोहच आहे. जेएन्यू अशा प्रकारच्या घटनांचा अड्डाच बनला आहे. 
३. वर्ष २०११ च्या जणगणनेतील आकडे पहाता एका भीषण दुर्गतीकडे वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. या सूत्रावर संसदेसह सर्व राज्यांच्या विधानभांमध्येही चर्चा झाली पाहिजे.


जेएन्यु प्रकरणावर सोनिया गांधी गप्प का ? - साध्वी निरंजन ज्योतीजी

     मथुरा (उत्तरप्रदेश) - केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री साध्वी निरंजन ज्योतीजी यांनी जेएन्यू विवादावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रश्‍न केला आहे की, गांधी या प्रकरणावर गप्प का बसल्या आहेत ? साध्वीजी पुढे म्हणाल्या, गांधी यांच्या मौनावरून त्या कुठेतरी न्यून पडत आहेत, असे जाणवते. राहुल गांधी यांचे राष्ट्रद्रोही समूहास असलेले समर्थन लज्जास्पद आहे. (गांधी यांच्या मौनामुळे त्या त्यांच्या मुलाला समर्थन देत आहेत, असे समजायचे का ? - संपादक)
साध्वीजी पुढे म्हणाल्या की,
१. जेएन्यूत राष्ट्रविरोधी घोषणा करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला हवी.
२. काही लोक देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमावर काहीजण प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. संघाचे राष्ट्रप्रेम निर्विवाद आहे.
३. अलीगढ मुस्लिम विद्यापिठ आणि मदरशांच्या कार्यपद्धतींची चौकशी व्हायला हवी.

सहिष्णुता हिंदूंच्या रक्तात आहे ! - नितिन गडकरी

हिंदूंना असहिष्णु ठरवून जगभरात हिंदूंची नाचक्की करणार्‍यांच्या विरोधात 
केंद्रशासनाने कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     मथुरा (उत्तरप्रदेश) - सहिष्णुता हिंदूंच्या रक्तात आहे. हिंदूंनी कधीही अन्य धर्मियांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. मथुरेत एका धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करत असतांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वरील वक्तव्य केले. गडकरी पुढे म्हणाले की, काही जण हिंदु धर्माविषयी अपसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मांध लोक आणि आतंकवादी आमची मूळ संस्कृती नष्ट करू पहात आहेत. समाजातील विविध वर्गातील लोकांचे सहकार्य करणे आमच्या रक्तात आहे. (हिंदूंच्या सहिष्णुता या गुणाचा अतिरेक होऊन ते अतिसहिष्णु झाले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांवर हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. हे ज्या दिवशी हिंदूंना लक्षात येईल, तो सुदिन ! - संपादक)

रत्नागिरीतील हिंदु धर्मजागृती सभेत मान्यवरांनी मांडलेले उद्बोधक विचार !

पू. (कु.) स्वाती खाडये
अमीर आणि शाहरुख या खानांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! 
- सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये 
१. सनातन संस्था धर्मसत्संग, धर्मशिक्षणवर्ग घेते, हिंदूंना हिंदु धर्माची शिकवण देते म्हणून पुरोगामी सनातन संस्थेला आतंकवादी ठरवत आहेत; मात्र सनातन आतंकवादी असल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. आम्हाला कितीही विरोध झाला, तरी आम्ही हिंदु धर्माची पताका विश्‍वात फडकवू. 
२. धर्मद्रोही, पुरोगामी हिंदु धर्म संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धर्म जगला, तर राष्ट्र टिकेल. मी एकटा काय करणार याचा विचार करू नका. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे संघटित व्हा.

सनातनचे अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांना बेंगळुरू आणि म्हैसूर येथील दौर्‍याच्या वेळी भेटलेले जिज्ञासू आणि धर्माभिमानी अधिवक्ते !

अधिवक्ता रामदास
केसरकर
     सनातन संस्थेचे कायदेविषयक सल्लागार आणि साधक अधिवक्ते श्री. रामदास केसरकर यांची बेंगळुरु आणि म्हैसूर दौर्‍याच्या कालावधीत काही जिज्ञासू आणि धर्माभिमानी अधिवक्त्यांची भेट झाली. या भेटीतून ईश्‍वराचे कार्य तोच कसे करवून घेत आहे, याची त्यांना प्रचीतीही आली. 
१. प्रवासात सहप्रवाशांना साधना सांगण्याची संधी मिळणे
     २५.९.२०१५ या दिवशी मी हिंदुत्ववादी अधिवक्त्यांच्या संपर्कासाठी गोव्याहून बेंगळुरू येथे जाण्यासाठी निघालो. तेव्हा प्रवासात मला श्री. अनुप मलायुल अन् त्यांची धर्मपत्नी हे दोघे प्रवासी भेटले. ते गोव्याला फिरण्यासाठी आले होते. मी त्यांना माझी ओळख सांगितली. मी सनातन संस्थेचा साधक असून आध्यात्मिक प्रगतीसाठी साधना करतो, हे कळल्यावर त्यांनी संस्था आणि संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले अन् कोणती साधना करायची ?, याविषयी विचारणा केली. तेव्हा त्यांना प्रवासातच वैयक्तिक साधना सांगण्याची सेवा मला मिळाली.

देशद्रोहींचे समर्थन करणारेही देशद्रोहीच ! - खासदार अमर साबळे

पिंपरी (पुणे) येथे भाजपकडून राहुल 
गांधींच्या विरोधात बुरखा फाडो आंदोलन
       पिंपरी, २१ फेब्रुवारी - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएन्यु) विद्यार्थ्यांनी आतंकवादी अफजल गुरु आणि याकूब मेमन यांना हुतात्मा करण्याचा केलेला प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. आतंकवादी अफजल गुरु याने संसदेवर केलेले आक्रमण हे देेशाच्या सार्वभौमत्व आणि लोकशाही यांवर केलेले आक्रमणच आहे. याविषयी त्यांना देशद्रोहाची शिक्षा सुनावली गेली आहे. अशा देशद्रोहींचे समर्थन करणारेही देशद्रोहीच आहेत, असे प्रतिपादन खासदार श्री. अमर साबळे यांनी केले. जेएनयुतील विद्यार्थ्यांनी देशद्रोही याकूब मेमन आणि अफजल गुरु यांच्या समर्थनार्थ देहलीला घोषणाबाजी केली. यासंदर्भात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि डाव्या पक्षाचे नेते डी. राजा यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्या विरोधात येथील भाजप शाखेच्या वतीने नुकतेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली येथील आंबेडकर चौकामध्ये बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

अविश्‍वासू अमेरिका !

     अमेरिका हिंदुस्थानचा नाममात्र आणि पाकिस्तानचा सच्चा मित्र आहे. हे त्यांनी पाकला एफ्-१६ लढाऊ विमाने देण्यास अनुमती देत सिद्ध केले आहे. भविष्यात अमेरिकेची तीच विमाने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून हेरगिरी करतांना दिसल्यास नवल वाटायला नको. अमेरिकेतील लॉकहिड मार्टिन या आस्थापनाने पाकसोबत हा जवळपास ७०० दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. अमेरिकी सिनेटमधील सदस्यांनी या करारास तीव्र विरोध केला होता; तेव्हा तात्पुरते शांत रहात ओबामांनी आपले तेच खरे केले आहे. या लष्करी साहाय्यावर हिंदुस्थानने जरी आक्षेप घेतला असला, तरी त्या आक्षेपास अमेरिका कधीच जुमानणार नाही. अमेरिकेने पाकला लष्करी साहाय्य करत रहायचे आणि आपण आक्षेपांचे बाण त्यांच्यावर सोडत रहायचे, हे चक्र वर्षानुवर्षे अविरतपणे चालू आहे. त्या दोन देशांच्या मैत्रीत आपली जी घुसमट होत आहे, त्यातच त्यांना खरा आनंद वाटत असल्याने ते वेळोवेळी हिंदुस्थानची घुसमट अधिकाधिक वाढवण्यासाठी कार्यरत असतात. हिंदुस्थानच्या निषेधास कवडीचीही किंमत न देता त्यावरून पाणी फिरवत पाकचे हात बळकट करण्याच्या अमेरिकेच्या खेळीस कशा प्रकारे शह द्यायचा, याचा विचार आपण केला आहे का ?

पुन्हा धर्मद्रोही आंदोलन... !

कु. प्राजक्ता धोतमल
     शनिशिंगणापूरच्या अपयशानंतर तथाकथित स्त्रीमुक्तीवादी भूमाता ब्रिगेडने आता आपला मोर्चा त्र्यंबकेश्‍वर देवालयाकडे वळवला आहे. देवालयाच्या गर्भागृहात प्रवेश मिळावा, हा त्यांच्या स्टंटबाजीच्या विषयमालिकेतील एक विषय सध्या त्यांनी मांडला आहे. शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरासंदर्भात या महिलांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेचे समर्थन अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच काही लोकांनी केले. शिवाय या महिलांचा आततायीपणा पाहून त्यांच्यावर टीकेची जी झोड उठली, ती वेगळीच ! वस्तूत: पाहिले, तर सूज्ञ व्यक्ती नेहमी भूतकाळातून शिकत असतो; पण भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी मागील प्रसंगांतून किंचितही बोध घेतल्याचे दिसत नाही. आणि म्हणूनच पडलो तरी नाक वर या वृत्तीच्या या आधुनिक महिला पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी आंदोलनाला उभ्या राहिल्या. त्यांच्या या धैर्याचे (?) कौतुक करावे तेवढे थोडेच !

देशद्रोही घोषणांच्या विरोधात माजी सैनिकांचा देहलीत एकता मोर्चा !

       नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या विरोधात माजी सैनिकांनी २१ फेब्रुवारीला देहलीतील राजघाट ते जंतरमंतर अशा एकता मोर्चाचे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने सैन्याधिकारी, पत्रकार, साहित्यिक आदी राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते. यात निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी, मेजर जनरल ध्रुव कटोच, मेजर जनरल राज मल्होत्रा आदी सहभागी झाले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा जानेवारी २०१६ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
ही वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते. 

भूमातांनो, हे वागणे बरे नव्हे !

    २६ जानेवारी २०१६ या भारताच्या ६७ व्या प्रजासत्ताकदिनी पुरोगामी महिला अर्थात् स्वत:ला बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे समजणार्‍या महिलांनी शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथार्‍यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी केलेल्या धर्मद्रोही आंदोलनाची त्यांनी दिलेली कारणे आणि निवडलेला दिवस याची गंभीर नोंद घेऊन त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. 
१. कुठे वारकरी आणि कुठे भूमाता 
ब्रिगेडच्या महिला !
     महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय प्रसिद्ध आहे. पंढरपूरला पायी जाणार्‍या वारीचे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही. कोणत्याही कारणाने त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचे जवळून दर्शन घडलेले नाही; म्हणून त्यांनी आत्मसन्मानासाठी आंदोलन केल्याची नोंद आजपर्यंत नाही. गावोगावीच्या भक्तांनी आपापल्या इष्टदेवतेची मंदिरे निर्माण केलेली आहेत. देव, धर्म, रुढी, प्रथा-परंपरा डावलून या पुरोगामी महिला चौथर्‍यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेण्याचा ठाम निश्‍चय करतात. हे अयोग्य आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्ज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम : सावरकर एक सन्यस्त खङ्ग

       पुणे - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या क्रांतीकारकांचे मेरूमणी ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांना स्फुरलेल्या कविता, त्यांची रचलेले पोवाडे यांमधून स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचीती येते; पण दुर्दैवाने हिंदुत्वप्रेम आणि राष्ट्रभक्ती यांचे मूर्तीमंत प्रतिक असणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्योत्तर काळातही उपेक्षात पदरी पडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण व्हावे, त्यांचा वारसा पुढे चालू रहावा आणि त्यांना अपेक्षित असणारे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे सावरकर एक सन्यस्त खङ्ग. सावरकरभक्त आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी या दिवशी पंडित फार्म या ठिकाणी सावरकरप्रेमींच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. हिंदु हेल्पलाईनच्या वतीने सेतू प्रकल्पांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हितचिंतकांनी भेटण्याची अनुमती नाकारल्यावरही अट्टाहासाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा तीव्र संताप ओढवून घेणारे कार्यकर्ते !

१. हितचिंतकांना भेटण्यासाठी कार्यालयात गेल्यावर ते निवासस्थानी 
बैठकीत असल्याचे समजणे, तरीही त्यांना भेटावयास गेल्याने ते पुष्कळ रागावणे
      हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद पानसरे आणि श्री. शिवाजी वटकर यांनी एका हितचिंतकांना आम्ही तुम्हाला भेटायला येऊ का ? असे विचारले. तेव्हा त्यांनी दुसर्‍या दिवशी भेटायला येण्यास सांगितले. त्यांना भेटायला कार्यालयात गेल्यावर ते रुग्णाईत असल्याने निवासस्थानी गेल्याचे त्यांच्या स्वीय साहाय्यकाने (पी.ए.ने) सांगितले. काही वेळानंतर श्री. पानसरे आणि श्री. वटकर यांनी त्यांना संपर्क केला असता सध्या त्यांची बैठक (मिटींग) चालू आहे. त्यामुळे ते भेटू शकत नाहीत, असे कळले.
       ते बैठकीत असल्याचे समजूनही काही वेळाने श्री. पानसरे त्यांना भेटायला निवासस्थानी गेल्याने हितचिंतक पुष्कळ चिडले.
२. हितचिंतकांना कार्यापासून दुरावण्यास 
कारणीभूत होणार्‍या अशा अक्षम्य चुका टाळा !
       ते हितचिंतक प्रतिष्ठित असल्याने, तसेच ते रुग्णाईत झाल्याने श्री. पानसरे यांनी स्वतःच्या सेवेऐेवजी त्यांच्या वेळेला प्राधान्य देणे अपेक्षित होते. श्री. पानसरे यांनी भेटीचा अट्टाहास न करता त्यांच्या कलाने घेणे आवश्यक होते. तसे न झाल्याने ते समितीशी चांगल्या प्रकारे संलग्न असूनही दुरावले गेले.
       ऐकण्याची वृत्ती नसणे, इतरांचा विचार न करणे, स्वतःला प्राधान्य देणे आदी स्वभावदोषांमुळे झालेली वरील चूक अक्षम्य आहे. अशा प्रकारे अयोग्य वर्तन केल्यास कार्यकर्त्यांची साधनेत अधोगती होते.
      सर्वत्रच्या कार्यकर्त्यांनो, आपल्या जिल्ह्यात अशा अक्षम्य चुका होत असल्याचे लक्षात आल्यास त्या संदर्भात त्वरित उत्तरदायींना कळवून गुरुकार्य, तसेच स्वतःची साधना यांची अपरिमित हानी टाळा !
      शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !
- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

बालपणीच मुद्रा करून नामजप करण्याचा प्रयत्न करणारी देहली येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. कश्यपी मकरंद तांबे (वय ४ मास) !

चि. कश्यपी तांबे
१. गर्भारपणी आणि प्रसूतीच्या वेळी सौ. मुक्ती तांबे 
(चि. कश्यपीची आई) यांना जाणवलेली सूत्रे
१ अ. पहिला मास - साधना आणि सेवा यांविषयीच्या विचारात वाढ होणे : पहिल्या मासात (महिन्यात) माझ्या मनातील साधना आणि सेवा यांविषयीच्या विचारांत वाढ झाली. झोकून देऊन सेवा करावी, असे मला वाटू लागले. व्यष्टी साधनेचा आढावा स्वतःहून द्यावा. व्यष्टी साधनेत एकही दिवस खंड पडू नये, तसेच सेवाच करत रहावी, असे मला वाटू लागले.
१ आ. दुसरा मास - सात्त्विक अन्न खावे, पुष्कळ नामजप करावा आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे जास्तीतजास्त वेळ पहातच रहावे, असे वाटणे : दुसर्‍या मासात बाहेरचे काहीही न खाता सात्त्विक अन्नच घ्यावे, असे मला वाटू लागले. फळे आणि मठ्ठा (मसाला घातलेले ताक) घ्यावा, असे वाटायचे. पुष्कळ नामजप करायला हवा, असे विचार येऊन नामजप वाढला. श्रीकृष्णाच्या चित्राकडे जास्तीतजास्त वेळा लक्ष जाऊन त्याला पहातच रहावे आणि त्याच्याशी बोलत रहावे, असे वाटायचे.

सेवा परिपूर्ण करणे आणि इतरांचा विचार करणे, या गुणांच्या बळावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले रामनाथी आश्रमातील श्री. राजू सुतार !

श्री. राजू सुतार
१. सुंदर आणि परिपूर्ण सेवा करणे
       छायाचित्र काढणे, फलक लिहिणे, हातांचे ठसे काढणे, चित्रीकरणाच्या दृष्टीने कपाळावर टिळा लावणे, स्वच्छता करणे इत्यादींपैकी कोणतीही सेवा करायची असो, ती सुंदर आणि परिपूर्ण होऊन देवाला कशी आवडेल, अशी करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात.
२. प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव
       प.पू. डॉक्टरांच्या प्रती त्यांचा अतिशय भाव आहे. त्यांना वाटते, त्यांनीच मला साधनेत टिकवून ठेवले आहे आणि तेच सर्व करवून घेतात. तसेच पुष्कळ वेळा प.पू. डॉक्टरांविषयी बोलतांना त्यांचे डोळे भावाश्रूंमुळे पाणवतात.

साधकांनो, सनातन प्रभातचा वाचक किंवा सनातनचा हितचिंतक असल्याचे खोटे सांगून आश्रमात येऊ पहाणार्‍यांपासून किंवा सनातनविषयी माहिती जाणून घेणार्‍यांपासून सतर्क रहा !

     नुकताच एका व्यक्तीने सनातनच्या एका आश्रमात भ्रमणभाषवर संपर्क केला. आश्रमातील साधकाने त्यांना भ्रमणभाष क्रमांक कोणाकडून मिळाला ?, असे विचारले असता, त्या व्यक्तीने मी सनातन प्रभातचा वाचक आहे, तसेच तुमची प्रकाशनेही वाचतो. त्या प्रकाशनावर असलेल्या दूरभाष क्रमांकावर मी संपर्क केला असता त्यांनी मला तुमचा (आश्रमाचा) क्रमांक दिला. मला आश्रम पहायला यायचे आहे. ... येथून तिकडे (आश्रमात) कोणत्या मार्गे येता येईल, असे विचारले. साधकाने त्याला मला रस्ता व्यवस्थित माहीत नसल्याने मी सांगू शकत नाही. मी रस्ता माहीत असणार्‍यांना विचारून कळवतो, असे सांगितले. 
     संबंधित व्यक्ती आणि त्यांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी साधकाने त्यांना पुन्हा संपर्क केला, ते म्हणाले, मी ... येथे रहातो. साप्ताहिक सनातन प्रभातचा वाचक आहे. माझ्या वडिलांचे नाव... असून ते साधक होते आणि ८ महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले.

स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी संवेदनशील असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सोनाक्षी सागर चोपदार (वय ५ वर्षे) !

चि. सोनाक्षी चोपदार
      २१.२.२०१६ (माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी) या दिवशी नवी मुंबई येथील चि. सोनाक्षी सागर चोपदार हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
      गर्भारपणात सोनाक्षीची हालचाल फारच अल्प असायची; परंतु प्रार्थना आणि नामजप केल्यावर ती थोडीफार हालचाल करायची.
२. जन्मानंतर
२ अ. सोनाक्षी प्रत्येक गोष्ट सांगितलेल्या ठिकाणी ठेवते आणि इतरांनाही त्याची आठवण करून देते.

धर्मशिक्षणवर्ग घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली नावे कळवावीत !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि धर्मशिक्षणवर्गात 
नियमित येणार्‍या धर्मप्रेमींना नम्र विनंती !
     सद्यस्थितीत समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. विविध जिल्ह्यांत पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभांमधून अनेक जिज्ञासू आपल्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मोठ्या प्रमाणात मागणीही करत आहेत; परंतु वर्ग घेऊ शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत असल्याने बर्‍याच ठिकाणी अजूनपर्यंत वर्ग चालू झालेले नाहीत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोचता यावे, यासाठी वर्ग घेण्यास इच्छुक असलेल्या आणि नियमितपणे वर्गात उपस्थित असणार्‍या धर्मप्रेमींनी स्थानिक साधकांना, तर इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांना आपली नावे कळवावीत. 
      धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी नवीन साधक सिद्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हासेवकांनी इच्छुक साधक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी फेब्रुवारी मासात कार्यशाळा घेण्याचे आयोजन करावे. 
     स्वभाषा, संस्कृती आदींचा अभिमान वाढवणार्‍या धर्मशिक्षणामुळे राष्ट्र अन् धर्म अधिक बळकट होतात, हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग घेण्याच्या सेवेत सहभागी व्हा !

प.पू. डॉक्टरांनी केलेल्या प्रीतीच्या वर्षावाबद्दल पत्ररूपी कृतज्ञता व्यक्त करणारी कु. कौमुदी जेवळीकर !

कु. कौमुदी जेवळीकर
प.पू. गुरुमाऊली,
      आज तुमच्याच कृपेने मी हे पत्र लिहित आहे. पुष्कळ दिवसांपासून वाटत होते; पण आज कृती करत आहे. आजपर्यंत प्रत्येक क्षणी तुम्हीच मला सांभाळले. मायेतून अलगदपणे उचलून तुम्ही मला साधनेत आणलेत. व्यवस्थापनाची सेवा शिकण्याची संधी मिळाली. पू. बिंदाताईंचे मार्गदर्शन घेता आले, ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे ! जेव्हा मन निराशेत आणि नकारात्मकतेत जाते, तेव्हा प्रसंगांच्या अन् साधकांच्या माध्यमातून तुम्हीच त्याला उभारी देता.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

कार्यक्रमासाठी सभागृह ठरवण्यापूर्वी तेथे भ्रमणभाष सेवा 
पुरवणार्‍या आस्थापनांची रेंज येत असल्याची निश्‍चिती करावी ! 
     जिल्ह्यात हिंदूसंघटन मेळावा, अधिवेशन, वर्धापनदिन आदी कार्यक्रम आयोजित करतांना विविध निकषांचा अभ्यास करून सभागृह निश्‍चित केले जाते. त्या वेळी सभागृहात भ्रमणभाष सेवा पुरवणार्‍या बी.एस्.एन.एल्., एअरटेल, आयडिया आदी आस्थापनांची रेंज असते का, ते पाहिले जात नाही. परिणामी कार्यक्रमस्थळी उपस्थित साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक यांना एकमेकांशी समन्वय ठेवणे कठीण होऊन कार्यक्रमात अडचणी येतात. यापुढे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करतांना त्या सभागृहात भ्रमणभाष सेवा पुरवणार्‍या कोणत्या आस्थापनांची रेंज येते, याचा अवश्य अभ्यास करावा.

व्यष्टी आढाव्यामध्ये मनाची स्थिती मनमोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न केल्यामुळे देवाने आनंददायी अनुभूती देणे

       रात्री व्यष्टी आढावा टंकलिखित केला होता. त्यामध्ये मनाची स्थिती मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रसंगातून असे शिकायला मिळाले की, मन मोकळे करण्याचा थोडासा प्रयत्न केला, तर देवाने एवढा आनंद दिला. मनमोकळेपणाने बोलणे किती महत्त्वाचे आहे.
- सौ. मधुवंती पिंगळे (१०.६.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.२.२०१६) रात्री १०.३४ वाजता
समाप्ती - माघ पौर्णिमा (२२.२.२०१६) रात्री ११.५० वाजता
आज पौर्णिमा आहे.

दे चरणी विसावा सत्वरी ।

सौ. मधुवंती पिंगळे
भेटाया तुज मन आतुरले ।
कधी बोलावणार वाट पहाते ॥ १ ॥
समवेत जरी तू सतत असतो ।
तरी स्थुलातुनी भेट व्हावीशी वाटते ॥ २ ॥
सगुणापेक्षा निर्गुण जरी श्रेष्ठ असे ।
तुला भेटण्या मन व्याकुळते ॥ ३ ॥
बोलव ना रे लवकरी आता ।
चरणी तुझिया विलीन व्हाया ॥ ४ ॥

महर्षींनी ईरोड या गावाजवळ आयोजित केल्या गेलेल्या सहस्रचंडी यागाच्या ठिकाणी जाऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी प्रार्थना करण्यास सांगणे, तेथे चालू असलेले मंत्रपठण एकचित्ताने ऐकण्याची आज्ञा देणे आणि असे सांगण्यामागील महर्षींचा कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. सध्याच्या काळात याग करायचा म्हटला, तर पुष्कळच पैसे व्यय (खर्च) होत असणे आणि यागाचा हा प्रत्यक्ष खर्च वाचवण्यासाठी महर्षींनी आम्हाला एके ठिकाणी चालू असलेल्या सहस्रचंडी यागाच्या येथे जाऊन केवळ प्रार्थना करण्यास सांगणे अन् केवळ प्रार्थनेनेही या यागाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल, असे सूचित करणे : ईरोड, तमिळनाडू येथून १० कि.मी. अंतरावर असणार्‍या एका गावी एका संस्थेने लाखो रुपये व्यय (खर्च) करून देवीच्या सहस्रचंडी यागाचे आयोजन केले होते. या यागासाठी शृंगेरी, बेंगळुरू येथून जवळजवळ १०० वैदिक ब्राह्मण आले होते. आताच्या काळात एक याग करायचा म्हटला, तर पुष्कळच पैसे व्यय (खर्च) होतात. त्यात सहस्रचंडी याग करायचा म्हटला, तर विचारायलाच नको. महर्षींनी सांगितले, अनायसे येथे याग होतच आहे, तर तेथे जाऊन केवळ तुम्ही साधकांचे रक्षण, प.पू. डॉक्टरांचे दीर्घारोग्य आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी प्रार्थना करा. देवी आपल्याला या यागाचे पूर्ण फळ मिळवून देईल.
       बहुतेक दैवी बालके भक्तीमार्गाने साधना करणारी आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या संदर्भात हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले
      शिक्षक पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्याला जे शिकवतात, तेच आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्याला शिकवत नाहीत. त्याला पुढचे शिकवतात. त्याचप्रमाणे गुरुही साधकाच्या स्तरानुसार त्याला शिकवतात. गुरूंकडे प्रथमच आलेल्याला ते प्राथमिक स्तराची साधना सांगतात. समजा ती सांगितल्यानंतर गुरूंनी देहत्याग केला, तर शिष्याने आयुष्यभर तीच साधना न करता गुरुतत्त्व एकच असल्याने दुसर्‍या गुरूंना विचारून पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना केली, तरच तो साधनेत प्रगती करू शकतो, नाहीतर आयुष्यभर प्राथमिक शाळेतले धडे गिरवल्याप्रमाणे प्राथमिक स्तराची साधना करत रहातो आणि इतरांना गर्वाने सांगतो, गुरूंनी मला हीच साधना सांगितली आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान 
तीर्थयात्रा
पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; 
म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
   आरक्षणाची मागणी करणारे फक्त स्वतःपुरते पहाणारे स्वार्थी असतात. त्यांना कमी क्षमतेच्या व्यक्तींनी काम कसेही केले, तरी चालते; कारण त्यांना देशाशी काही देणे-घेणे नसते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा मित्र ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

तुम्ही कोणत्या जातीचे ?

संपादकीय
    भारतीय समाज जातीजातींत विखुरला गेला आहे. भारतीय राजकारणही जातीय अस्मितांवर फुंकर घालूनच केले गेले आहे. त्यामुळेच आपआपल्या समाजासाठी आरक्षण मागून घेणे, ही पद्धतच आता रूढ झाली आहे. तुम्ही किती कार्यकुशल आहात यापेक्षा तुम्ही कोणत्या जातीचे आहात ?, हे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. हरियाणातही सध्या जाट आंदोलनाने अक्षरशः हैदोस माजवला आहे. हरियाणात गेले काही दिवस जे चालू आहे, ते निश्‍चितच समर्थनीय नाही. जाट समाजाचा अन्य मागासवर्गियांत समावेश करून त्यांनाही आरक्षण द्यावे, यासाठी अत्यंत विघातक रितीने आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला गेले दोन दिवस हिंसक वळण लागले असून आतापर्यंत १० जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर १ सहस्र रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या आहेत. हरियाणातील ६० हून अधिक शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या जाळपोळीत २० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शासनालाही ही परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे. यावर तोडगा म्हणून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी पूर्वी असलेले १० टक्के आरक्षण आता २० टक्के करण्याची घोषणा केली आहे; मात्र जाट समाज इतर मागासवर्गियांचे २७ टक्के आरक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn