Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

धर्मसम्राट करपात्रस्वामी यांची आज पुण्यतिथी

हरियाणात जाट आरक्षणाच्या हिंसक आंदोलनात ७ जणांचा मृत्यू, सैन्याचे संचलन

६०० रेल्वेगाड्या रहित
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसाचार करणारे उद्या आरक्षणामुळे शासकीय नोकरी मिळाली, कधीतरी कायद्याने काम करतील का ?
  • रेल्वेस्थानक, बसगाड्या आणि तीन शाळा जाळल्या !
  • भाजप आमदाराचे घर जाळले आणि खासदाराच्या घरावर आक्रमण !
  • आंदोलनकर्त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश !
चंदीगड - हरियाणात जाट समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेले ५ दिवस चालू असलेले आंदोलन २० फेब्रुवारीलाही कायम होते. हिंसक आंदोलनकर्त्यांनी जिंद जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वेस्थानकच जाळून टाकले. रोहतक बस आगारातील गाड्यांना आग लावली. गोहना मार्गावरील तीन शाळांनाही आग लावण्यात आली. शासनाने आधीच महाविद्यालये आणि शाळा २२ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. तत्पूर्वी १९ फेब्रुवारीला हिंसक आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ७ जण ठार झाले, तर २५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. वाढत्या हिंसेमुळे राज्यातील रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत सैन्याला तैनात करण्यात आले असून त्यांनी शहराच्या ठिकाणी संचलनही केले. तसेच केंद्रीय निमलष्करी दलांच्या वीस कंपन्यांची (सुमारे दोन सहस्र सैनिक) मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. रोहतक आणि भिवानी या शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा !

पुलवामा, २० फेब्रुवारी - पंपोरनजीकच्या ईडीआई परिसरात घुसलेल्या आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले आहेत. त्यानंतर ३ आतंकवादी उद्योजक विद्यापिठात घुसले. त्यामुळे अनेक जण विद्यापिठात अडकले. (आतंकवादग्रस्त भारत ! - संपादक) विद्यापिठाच्या इमारतीत असलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. येथे अद्याप चकमक चालू आहे.

श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले इसिस आणि पाकिस्तान यांचे झेंडे !

श्रीनगर - शुक्रवार १९ फेब्रुवारी या दिवशी जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरच्या जामिया मशिदीत नमाजपठण केल्यावर धर्माधांनी पुन्हा एकदा पाकिस्तान, इसिस आणि अन्य जिहादी आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकवत आंदोलन केले. (विद्यापिठांच्या इमारतींवर भारताचा राष्ट्रध्वज लावण्याला विरोध करणारे कधी याचा विरोध करत नाहीत, हे जाणा ! - संपादक) या देशद्रोह्यांनी जेएन्यू आंदोलनाला समर्थन देणारे फलकही हातात धरले होते. त्यांनी अफझलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या वेळी त्यांनी हातात महंमद अफझलचे छायाचित्र घेऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षादलांनी त्यांना रोखले. त्यामुळे त्यांनी दगडफेक केली. सुरक्षादलांनी या धर्मांधांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. तसेच लाठीमारही केला.
राष्ट्रप्रेमींनो, गेले अनेक महिने कश्मीरमधील देशद्रोही धर्मांध नमाजपठणानंतर इसिस, पाक आणि अन्य आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकावून त्यांना समर्थन देत आहेत; मात्र याचा माकप, काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी स्वतःला देशभक्त म्हणवणार्‍या पक्षांनी आणि प्रसारमाध्यमांनी कधी विरोध केला नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) 'जिहादच्या नावाने 'इस्लामफोबिया' निर्माण करण्याचे कारस्थान !'

जमाते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष सय्यद सदातुल्ला हुसैनी यांचा कांगावा !
मडगाव (गोवा), २० फेब्रुवारी (वार्ता.) - आतंकवाद्यांच्या हिंसेला इस्लाम धर्मात स्थान नाही. आतंकवादाचे बळी हे मुसलमान आहेत. आतंकवाद, जिहाद या शब्दांचा विपार 'इस्लामफोबिया' (इस्लाम धर्माविषयी भीती) निर्माण करण्यास केला जात आहे. सध्या जिहादच्या नावाने इसिससारख्या संघटनांकडून जो आतंकवाद चालू आहे, तो जिहाद नसून इस्लामला आणि मुसलमानांना अपकीर्त करण्याचे अमेरिका आणि अन्य भांडवलशाही देशांचे कारस्थान आहे. या देशांनी मुसलमान युवकांना भडकवूून आतंकवादी कृत्ये घडवून आणली आणि आतंकवादविरोधी कारवाईच्या नावाखाली मुसलमानबहुल देशांतील मुसलमानांचा वंशसंहार केला आहे. जिहादच्या नावाद्वारे प्रसिद्धीमाध्यमांचा पद्धतशीर वापर करून मुसलमानांनाच अपकीर्त केले जात आहे, असा कांगावा जमाते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष सय्यद सदातुल्ला हुसैनी यांनी मडगाव येथे केला. जमाते इस्लामी हिंदच्या वतीने 'जिहाद अनव्हिलिंग ट्रूथ' या विषयावर सय्यद हुसैनी यांचे व्याख्यान झाले. इस्लाम धर्म कसा चांगला आहे. जिहाद म्हणजे पवित्र धर्मयुद्ध कसे, हे सांगण्याचा प्रयत्न हुसैनी यांनी केला. हुसैनी यांनी अमेरिकेवर इस्लामी राष्ट्रांना नष्ट करण्याचा कट रचण्याचा आरोप केला; मात्र जिहादच्या नावावर आतंकवाद करणार्‍यांचा निषेध ठोस शब्दात केला नाही. दुर्दैवाने मुसलमान चुकत आहेत त्यांनी हा मार्ग स्वीकारू नये, असे सौम्य शब्द त्यांनी वापरले.

आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र रचणार्‍या मौलवीला अटक

शासनाने देशातील इतर मौलवींची चौकशी करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     हरदोई (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी देशात आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र रचण्याच्या आरोपाखाली अब्दुल सामी कासमी या स्वयंघोषित मौलवीला हरदोई जिल्ह्यातून अटक केली आहे. ही अटक देशात आतंकवादी संघटना निर्माण करणे आणि आक्रमणांचे षड्यंत्र रचण्याच्या संदर्भात करण्यात आल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

भाजप आणि संघ मुसलमानांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील ! - इंद्रेश कुमार

भाजप आणि संघ यांनी हिंदूंच्या उन्नतीसाठीही प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     देशातील मुसलमानांची उन्नती आणि उत्कर्ष यांसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहेत. संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या विभागाच्या माध्यमामधून रोजगार, योग्य शिक्षण, घरे अशा विविध माध्यमांमधून मुसलमानांच्या उन्नतीसाठी काम केले जात आहे. मुसलमानांच्या गरिबीस विविध राजकीय पक्षांचे अनुनयाचे राजकारण कारणीभूत आहे. मुसलमानांसाठी भारत हा सर्वोत्तम देश असून येथे इतर समुदायांप्रमाणेच मुसलमानांचीही भरभराट होईल. - इंद्रेश कुमार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

ओसामा बिन लादेन जिवंत आहे ! - अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांचा दावा

      अल कायदाचा प्रमुख आणि कुख्यात जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन जिवंत आणि ठणठणीत आहे. त्याविषयी माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, असा दावा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांनी केला आहे. (अमेरिकेने ज्या पद्धतीने ओसामा बिन लादेन याला ठार करण्याची गोपनीय कारवाई केली आणि त्याचा मृतदेह खोल समुद्रात फेकल्याचे सांगितले, ते पहाता स्नोडेन याच्या माहितीत तथ्य आहे, असे कोणी म्हटल्यासे चुकीचे ठरू नये ! - संपादक)

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

शिवजयंती उत्सवात सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांचे प्रतिपादन
       पुणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) - छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण छत्रपती शिवरायांचे गुणगान करत असलो, तरी त्यांचे गुण मात्र कृतीत आणत नाही. शिवरायांच्या भारतात आज हिंदु धर्म संपवण्याची कटकारस्थाने चालू आहेत. हिंदूंना त्यांच्या धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुत्वावर प्रतिदिन आघात होत आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तीच खरी छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन ठिकठिकाणच्या शिवजयंती महोत्सवात वक्ता म्हणून सहभागी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. शिवजंतीच्या निमित्ताने पुणे, शनिशिंगणापूर आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यामध्ये हिंदु जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करून तरुणांमध्ये राष्ट्रतेज आणि धर्मतेज चेतवले.

बांगलादेशींना नागरिकत्व देण्याची ममता बॅनर्जी यांची मागणी

मतांच्या लांगूलचालनासाठी देशद्रोही मागण्या करणारे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करा !
कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच वर्षांहून अधिक काळ भारतामध्ये वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व दिले जावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. बंगालच्या १० जिल्ह्यांत बांगलादेशी नागरिकांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धाच्या वेळी मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते.
१. बंगालमधील जवळपास ६० मतदारसंघांमध्ये मुसलमानांचे वर्चस्व आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी या भागांतून तृणमूल काँग्रेसला अधिकाधिक मते मिळाली होती.
२. बांगलादेशींच्या घुसखोरीचे सूत्र पुढे करून भाजपने राज्यात ध्रुवीकरण घडवून आणायला आरंभ केला आहे, असा अहवाल राज्याच्या गुप्तचर खात्याने दिल्याने ममता बॅनर्जी यांनी ही मागणी केल्याचे म्हटले जात आहे.

शासनाने सुरक्षेची हमी दिल्यास भ्रष्टाचार संपवू !

सरकारी कर्मचारी संघटनेचे शासनाला उघड आव्हान
    पणजी, गोवा येथे भ्रष्टाचारात गुंतलेले थोडेच प्रशासकीय अधिकारी आढळतात. त्यामुळे राज्यशासनाकडून सुरक्षेची हमी मिळाल्यास अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना उघडे पाडू, असे उघड आव्हान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे. काँग्रेसच्या काळात ३४ लाख ५३ सहस्र १९० कोटी रुपयांचा काळा पैसा देशाबाहेर पाठवला गेला ! - अमेरिकेतील संस्थेची माहिती

देशाबाहेर गेलेल्या काळ्या पैशाविषयीची जी माहिती अमेरिकेच्या संस्थेला मिळते, 
ती भारत शासनाला का मिळत नाही ?
     वर्ष २००४ ते २०१३ या काँग्रेस शासनाच्या कालावधीत भारतातून काळ्या पैशाच्या रूपात ३४ लाख ५३ सहस्र १९० कोटी रुपये (५०५ अब्ज अमेरिकी डॉलर) देशाबाहेर पाठवण्यात आले, अशी माहिती अमेरिकेतील ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटी या नामांकित संस्थेने दिली आहे. इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती ! - हेडली

डेव्हीड हेडलीची भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना चपराक लगावणारी स्वीकृती !
     मुंबईतील विशेष न्यायालयात मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या आक्रमणाच्या सुनावणीत या खटल्यातील माफीचा साक्षीदार आणि अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला डेव्हीड हेडली याच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून साक्ष दिली जात आहे. 
   ११ फेब्रुवारी २०१६ या दिवशी दिलेल्या साक्षीत हेडलीने म्हटले आहे की, मुंब्रा येथे रहाणारी १९ वर्षीय इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती. अक्षरधाम मंदिर इशरत जहाँचे लक्ष्य होते. इशरत जहाँविषयी मला मुजम्मिल भट्ट याने माहिती दिली होती. भट्ट म्हणाला होता की, त्याला जकीउर रहमान लखवी याने माहिती दिली होती की, त्यांची एक महिला आतंकवादी चकमकीत मारली गेली आहे. गुजरात पोलिसांनी इशरत जहाँ हिला २००४ मध्ये चकमकीत ठार केले होते.


(म्हणे) पाकिस्तान झिंदाबाद ही घोषणा देणे देशद्रोह नाही !

काँग्रेसी राजवटीतील महाधिवक्ता सोली सोराबजी यांचे मत
     भारतात पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिली जाणे, हे दुर्भाग्यपूर्ण असले, तरी तो देशद्रोह होऊ शकत नाही, असे मत भारत शासनाचे माजी महाधिवक्ता सोली सोराबजी यांनी व्यक्त केले आहे. (ज्या देशात शत्रू राष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणा देणे राष्ट्रद्रोह होत नाही, त्या देशात देशद्रोह्यांचे पीक आल्यास नवल नाही ! - संपादक) माजी महाधिवक्ता सोराबजी म्हणाले, भारत एक हुकूमशाही देश आहे, अशी घोषणाबाजी करण्यात आली असती, तर तो देशद्रोहाचा गुन्हा ठरला असता. भादंवि कलम १२४ (अ) नुसार, देशद्रोह म्हणजे तुमच्या घोषणाबाजीने जेव्हा सार्वजनिक व्यवस्थेला बाधा येते किंवा हिंसेला प्रवृत्त केले जाते, तेव्हा तो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो, असे कायदा म्हणतो. देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात पाकिस्तान आणि आतंकवादी महंमद अफझल यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्यामुळे देशात वादंग निर्माण झाले आहे.

गुजरात पोलिसांचा नाहक बळी ! - डी.जी. वंजारा, गुजरातचे तत्कालीन पोलीस अधिकारी

     ८ फेब्रुवारी २००४ या दिवशी जिहादी आतंकवाद्यांबरोबर गुजरात पोलिसांची झालेली चकमक खोटी नव्हती. या चकमकीवरून राजकीय षड्यंत्र रचून गुजरात पोलिसांवर केलेले सर्व आरोप आणि खटले खोटे आहेत, हे हेडलीच्या साक्षीने सिद्ध झाले आहे. राजकीय षड्यंत्रामुळे गुजरात पोलिसांना विनाकारण लक्ष्य करण्यात आले असून त्यांचा नाहक बळी देण्यात आला आहे, असे प्रतिपादन इशरत जहाँला खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप असणारे गुजरात आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

(म्हणे) व्यक्तीस्वातंत्र्यावर निर्बंध आणणार्‍या शासनाला खाली खेचणार ! - प्रकाश आंबेडकर

रोहित वेमुलाप्रमाणे देशद्रोह्यांचे समर्थन करणे, शत्रूराष्ट्राच्या घोषणा देणे, 
हे व्यक्तीस्वातंत्र्य आहे का ?
     स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राष्ट्राला धर्म असणार नाही, हे स्वातंत्र्यकालीन पिढीने ठरवून दिल्याने गेल्या ६९ वर्षांत धर्माच्या नावाने युद्ध वा संघर्ष दिसला नाही. सध्या देशात धर्माचे नवे वादळ उभे रहात असल्याचे दिसते. संशोधनाची केंद्रे, महाविद्यालये, विद्यापिठे ही या वादळाची केंद्र आणि राज्यशासित केंद्रे आहेत. माणूस धर्मासाठी कि धर्म माणसासाठी हा वाद उफाळून येईल. लोकशाहीत माणसाला प्रगल्भ करण्याची आवश्यकता असतांना त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन आणि निर्बंध घालण्यास प्रारंभ झाला आहे. अधिकार गाजवणार्‍यांना पाच वर्षांनी खाली खेचल्याशिवाय रहाणार नाही, असे ठणकावून सांगा. - अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार, भारतीय बौद्ध महासभा.

बांगलादेशात हिंदूंच्या घरांवर धर्मांधांचे आक्रमण !

मुसलमानबहुल बांगलादेशात एकही पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी 
नसल्याने असाहाय्य झालेले अल्पसंख्यांक हिंदू !
  • हिंदूंची जागा बळकावण्याचा प्रयत्न 
  • राजकीय नेत्यांच्या भीतीमुळे गुन्हा प्रविष्ट नाही
     ढाका - ठाकुरगाव जिल्ह्यातील ठाकुरगाव सदर येथील बस स्थानकाजवळ असलेल्या श्री. जगदीश चंद्र यांच्या मालकीच्या घरांवर १८ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करून चालू असलेले बांधकाम पाडून टाकले. या घटनेमागे सत्तेत असलेल्या अवामी लीग पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हात होता. ही घटना गंभीर गुन्हा या सदरात मोडत असली, तरी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, अशी माहिती बांगलादेश मायनॉरीटी वाच या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी दिली. (बांगलादेशात अधिवक्ता रवींद्र घोष असल्याने येथे हिंदूंवर होत असलेल्या अन्यायांची माहिती जगाला मिळते. - संपादक) 

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

वाळुंज (संभाजीनगर) येथे भगवा ध्वज उभारण्यास झालेल्या विरोधानंतर हिंदुत्ववाद्यांनी ध्वज परत उभारला !

हिंदूंनो, भगवा ध्वज उभारण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावरून हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते !
संभाजीनगर - येथील शेंदुरवादा या गावातील बाजारपेठ भागातील भवानीमातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर येथील हिंदु युवकांनी १८ फेब्रुवारी या दिवशी उभारलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढून टाकला होता; मात्र शिवसैनिक आणि स्थानिक हिंदु युवक यांनी संघर्ष करून १९ फेब्रुवारी या दिवशी तो परत उभारला.
१. मंदिरासमोरील जागेत भगवा ध्वज उभारलेला पाहून मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली.
२. सकाळी ११ वाजता पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी हिंदु अन् मुसलमान यांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
३. त्यानंतर पोलिसांनी ते स्थळ अतिक्रमित ठरवून ध्वज काढून टाकला.
४. पोलिसांनी ध्वज लावण्यास अनुमती नाकारल्याने हिंदू संतप्त झाले. त्यानंतर ध्वज त्याच ठिकाणी लावला जाईल, अशी ठाम भूमिका युवकांनी घेतली.
५. त्यावर पोलिसांनी ४५ हिंदु युवकांना कह्यात घेतले.

हिंदु विवाह कायद्यातील आक्षेपार्ह कलम वगळण्याची पाकिस्तानातील हिंदु संघटनेची मागणी !

भारत शासनाने पाकमधील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
सदर कलमामुळे हिंदु महिलांच्या बळजोरीने करण्यात येणार्‍या 
धर्मांतरास प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त !
     कराची (पाकिस्तान) - पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या शासनाने संमत केलेल्या हिंदु विवाह कायद्यात असलेल्या एका वादग्रस्त कलमाला पाकिस्तानमधील एका प्रमुख हिंदु संघटनेने विरोध केला आहे. पाकिस्तान हिंदु परिषदेने हिंदु जोडप्यापैकी एकाने धर्म पालटल्यास विवाह रहित करण्याची तरतूद असलेले आक्षेपार्ह कलम १२ (३) हे सदर कायद्यातून वगळण्याची मागणी केली आहे. 
१. हिंदु मुलींच्या अपहरणानंतर न्यायालयात प्रमाणपत्र सादर करून तिने धर्मांतर आणि मुसलमान व्यक्तीशी विवाह केल्याचे सांगण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असे परिषदेचे प्रमुख संरक्षक आणि सत्ताधारी पीएम्एल्एन्चे खासदार रमेश वांकाणी यांनी म्हटले आहे. (एकीकडे अनेक दशकांपासून रखडलेला हिंदु विवाह कायदा संमत करून प्रशंसा ओढवू पहाणारे धूर्त आणि हिंदुद्वेषी सिंध शासन दुसरीकडे मात्र हिंदूंच्या धर्मांतरास प्रोत्साहन देत आहे, हे लक्षात घ्या ! - संपादक)
२. त्यामुळे वरील कलमामुळे अल्पसंख्यांक हिंदु महिलांचे बळजोरीने करण्यात आलेले धर्मांतराचे प्रकार वाढतील, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे.
३. जर एखाद्या विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून बळजोरीने तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्यास, कायद्याच्या या कलमानुसार, तिचा हिंदु पतीशी झालेला विवाह रहित ठरवण्यात होईल आणि तिच्याशी मुसलमान व्यक्ती विवाह करू शकेल. त्यामुळे हिंदु संघटनेकडून या तरतुदीला जोरदार विरोध करण्यात येत आहे.

कोलोन (जर्मनी) येथील शेकडो महिलांच्या लैंगिक छळांसाठी मुसलमान देशांतील शरणार्थी उत्तरदायी !

     कोलोन (जर्मनी) - जर्मनीच्या कोलोन शहरात गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री शेकडो जर्मन महिलांचा लैंगिक छळ करण्यामागे जर्मनीचा आश्रय घेण्यासाठी आलेल्या शरणार्थींचाच हात आहे, याला आता औपचारिक मान्यता मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५८ शरणार्थींना अटक केली असून त्यांपैकी २५ जण अल्जेरियाचे, २१ जण मोरोक्कोचे, तर ३ जण ट्युनिशियाचे नागरिक आहेत. आणखी अनेक आरोपींचा शोध घेणे चालू आहे. 
१. यासंदर्भात पोलिसांत १ सहस्र ५४ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या शरणार्थींना महिलांना अयोग्य जागी स्पर्श करणे, त्यांच्या वस्तू लुटणे, धमक्या देणे आणि मित्रांपासून वेगळे करण्यासह त्यांचा विनयभंग अन् बलात्कार करणे, यांप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दैनिक तापीकाठचे संपादक चंद्रशेखर बेहरे यांना हद्दपारीची नोटीस

वस्तूनिष्ठ वार्तांकन करून समाजाला दिशा 
देणार्‍या धर्म अन् राष्ट्र प्रेमी पत्रकाराची गळचेपी !
       पुणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) - नंदुरबार जिल्ह्यातील दैनिक तापीकाठचे संपादक श्री. चंद्रशेखर बेहरे यांना तेथील प्रांताधिकार्‍यांनी नंदुरबार जिल्हा हद्दपारीची नोटीस बजावून लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळीत करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात येथील श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बेहरे यांनी आवाज उठवून त्यांच्या संदर्भात प्रांताधिकार्‍यांनी दिलेला निर्णय अन्याय्यकारक आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे हनन करणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अन्याय्यकारक कारवाई करू पहाणार्‍या प्रांताधिकार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही श्री. बेहरे यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी केली. (अफझलला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात दैनिकात रकानेच्या रकाने लिहिणारे, तसेच देशद्रोही, नक्षलवादी यांच्याविषयी सहानुभूती दर्शवणारे लिखाण करणारे पत्रकार विचारवंत म्हणून गणले जातात, तर धर्म आणि राष्ट्र हितार्थ लेखणी चालवणारे पत्रकार हद्दपार केले जातात, याहून मोठे दुर्दैव ते कोणते ? - संपादक)

आता भारतीय भाषांमध्ये संशोधन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार ! - स्मृती इराणी

केंद्रशासनाचा स्तुत्य उपक्रम !
       पुणे, २० फेब्रुवारी - जागतिक स्तरावर संशोधनात आपण पुष्कळच मागे आहोत. याचे प्रमुख कारण भाषेचा अडथळा हे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्रजीमध्ये केलेले संशोधनच ग्राह्य धरण्यात येते. आपल्याकडे ग्रामीण आणि तळागाळातून आलेल्या हुशार मुलांना इंग्रजी भाषेचा हा अडथळा पार करता येत नाही. त्यामुळे आपण जागतिक स्तरावर संशोधनात पुढे जात नाही. हे चित्र पालटण्यासाठी आता भारतीय भाषांमध्ये संशोधन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी इंडियन रँकिंग फ्रेमवर्क सिद्ध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (गांधीनगर) यांनी एक पिअर असिस्टर लर्निंग हा उपक्रम चालू केला आहे. त्यामध्ये शिक्षक मुलांना त्यांच्या भाषेतून समजावण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.

डोनाल्ड ट्रम्प ख्रिस्ती नाहीत ! - पोप फ्रान्सिस

ट्रम्प यांचे प्रत्युत्तर - पोप यांचे वर्तन लज्जास्पद !
     न्यूयॉर्क - जी व्यक्ती दोन देशांमध्ये पूल उभे करण्याऐवजी भिंती बांधण्याच्या गोष्टी करू शकते, ती ख्रिस्ती असू शकत नाही, असे वक्तव्य ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात अग्रस्थानी असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून केले. पोप मेक्सिकोच्या दौर्‍यावर असतांना त्यांना पत्रकारांनी ट्रम्प यांच्याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी हे वक्तव्य दिले. 
१. याआधी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर असलेल्या मेक्सिको येथून अमेरिकेत होणार्‍या मादक पदार्थांची तस्करी आणि अवैध घुसखोरी रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये भिंत उभी करण्याची घोषणा केली होती. त्यावर पोप यांनी वरील विधान केले.
२. या आधीही, मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये, या ट्रम्प यांच्या मतावर पोप यांनी असहमती दर्शवली होती; मात्र अमेरिकी जनतेने कोणाला मतदान करावे, हे सांगण्यास पोप यांनी नकार दिला होता.

काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पुल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री !

भाजप आणि अपक्ष आमदारांच्या साहाय्याने बनवले शासन !
      इटानगर (अरुणाचल प्रदेश) - काँग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पुल यांनी अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के.पी. राजखोवा यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. भाजपचे ११ आणि २ अपक्ष आमदारांच्या पाठबळावर पुल यांनी शासन स्थापन केले आहे. यांतील बहुतेक जणांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते. राज्यात नव्याने निवडणूक घेण्यासाठी नव्या शासनाकडून विधानसभा विसर्जित होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पुल यांनी यापूर्वी राज्याचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

मतांसाठी राष्ट्रद्रोही मागणी करणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ५ वर्षांहून अधिक काळ भारतामध्ये वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व दिले जावे, अशी केंद्रशासनाकडे मागणी केली आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bharatme rehnewale Bangladeshiyonko Bharatiya nagrikta di jaye ! - Mamta Banerjee, CM, Bangal
Kya yah maang desh ki suraksha ke liye ghatak nahi ?

जागो !
भारत में रहनेवाले बांग्लादेशियों को भारतीय नागरिकता दी जाए ! - ममता बैनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल
क्या यह मांग देश की सुरक्षा के लिए घातक नहीं ?

ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी !

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. हर्षद खानविलकर
       मुंबई - छत्रपति शिवरायांचे चरित्र मुलांमध्ये आतापासून रुजावेत यासाठी १९ फेब्रुवारीला ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला कोपरखैरणे येथील मॉर्डन शाळेत शिकणारा इयत्ता १० वीतील विद्यार्थी कु. समाधान जाधव आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवराय आणि त्यांचे चरित्र या विषयावर संबोधित केले.

केंद्रशासनाने ट्विटरला खडसवले !

शासनाने केवळ जाब विचारून न थांबता योग्य ती कारवाईही करायला हवी !
ट्विटरने जम्मूला पाकिस्तानमध्ये दाखवल्याचे प्रकरण
     नवी देहली - ट्विटरवर जम्मूला पाकिस्तान आणि चीन या देशांमध्ये दाखवण्यात आल्यावर देशातील सामाजिक प्रसारमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. आता या संदर्भात केंद्रशासनानेही ट्विटरला विरोध केला असून संबंधित चुकीविषयी जाब विचारला आहे. जेव्हा आपण ट्विटरमध्ये लोकेशन सर्व्हिसच्या माध्यमातून जम्मू लिहितो, तेव्हा जम्मूचे लोकेशन पाकिस्तानच्या क्षेत्रात दाखवण्यात येते. एवढेच नाही, तर या सर्व्हिसमध्ये जम्मू-काश्मीर लिहिल्यावर हा भाग चीनमध्ये दर्शवण्यात येतो.

देशद्रोही कारवायांच्या विरोधात कठोर उपाययोजना करावी !

राष्ट्रीय सैनिक संस्थेकडून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन
जिल्हाधिकारी त्यागी यांना निवेदन
देतांना माजी सैनिक
     गाझियाबाद - देशात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या देशद्रोही कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर येथील राष्ट्रीय सैनिक संस्थेकडून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येथील जिल्हाधिकारी त्यागी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
    माजी सैनिकांच्या या संस्थेकडून गेल्या १५ वर्षांपासून देशभक्त आणि हुताम्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी कार्य करण्यात येते. या संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार अलीकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यू), प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि बंगालमधील जाधवपूर विद्यापीठ या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून देशविरोधी अन् पाकसमर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. एकीकडे भारतीय सैनिक देशासाठी सीमेवर प्राणार्पण करत असतांना दुसरीकडे देशामध्ये भारतविरोधी घोषणा दिल्या जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे या कारवायांच्या विरोधात खालील प्रमाणे त्वरीत उपाय योजावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 
निवेदनात पुढे म्हटले आहे की, 
१. देशविरोधी घोषणा देणे, राष्ट्रध्वज जाळणे किंवा त्याचा अवमान करणे यांना देशद्रोह समजण्यात यावा, तसेच या कृत्यांसाठी कोणतीही व्याख्या, चर्चा किंवा सर्वपक्षीय बैठक घेण्यात येऊ नये.
२. स्लीपिंग सेल्स लक्षात येण्यासाठी देशातील सर्व विद्यापिठांच्या वसतीगृहांचे स्कॅनिंग करण्यात यावे. 

घोगळ, गोवा येथील श्री घोगळेश्‍वर मंदिरात चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
     मडगाव - घोगळ, मडगाव येथील श्री घोगळेश्‍वर मंदिरात १८ फेब्रुवारीला रात्री चोरी झाली. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दोन अर्पणपेट्या तोडून पैसे चोरून नेले. पुरोहितांना बाहेर येता येऊ नये, यासाठी मंदिराच्या शेजारी रहाणार्‍या पुरोहिताच्या खोलीला बाहेरून कडी घालून चोर मंदिरात शिरले. घटनास्थळी पोलिसांना कुदळ आणि पिशवी सापडली आहे.

'पानसरे यांचे मारेकरी अजून मोकाट का ?' या विषयावर आयोजित चर्चासत्रातून सनातनविषयी द्वेष पसरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

आरोप सिद्ध होण्यापूर्वीच सनातनला दोषी ठरवण्याला शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी चर्चासत्रात केला विरोध !
एबीपी माझा वृत्तवाहिनीकडून कोल्हापुरात खुले चर्चासत्र
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला २० फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी माझा या वृत्तवाहिनीने 'पानसरे यांचे मारेकरी अजून मोकाट का ?' या नावाखाली खुली चर्चा आयोजित केली होती. या चर्चासत्रात शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, भाजपचे आमदार श्री. महेश जाधव, काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, लोकमतचे निवासी संपादक वसंत भोसले आणि कॉ. पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी सहभाग घेतला होता. चर्चासत्रात कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी स्मिता पानसरे, वसंत भोसले अन् सतेज पाटील यांनी सनातनवर बिनबुडाचे आरोप केले आणि या हत्यांचे खापर सनातनवर फोडण्याचा प्रयत्न केला. या चर्चासत्रात सहभागी झालेला प्रेक्षकवर्गही कॉ. पानसरे यांच्याच विचारांची पाठराखण करणारा होता, तर निवेदक अभिजित करंडे यांनीही सनातनला दोषी ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला. एकूणच या चर्चासत्रातून सनातनद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला (अशा वृत्तवाहिन्या समाजाला दिशा काय देणार ? - संपादक); मात्र आमदार श्री. क्षीरसागर आणि श्री. जाधव यांनी आरोप सिद्ध होण्यापूर्वीच सनातनला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे सांगत विरोधकांना खडसवले.

पोलिसांच्या दबावामुळे वरळी येथील मंदिर विश्‍वस्तांनी हिंदु धर्मजागृती सभेस अनुमती नाकारली !

       हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरळी येथे १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी एका मंदिराचे स्थळ निश्‍चित झाले होते; परंतु विश्‍वस्तांवर पोलिसांचा दबाव आल्याने त्यांनी सभेसाठी स्थळ देण्याची अनुमती नाकारली. या स्थळाच्या संदर्भात विश्‍वस्तांकडून जागेची रितसर अनुमती काढण्यात आली होती. विश्‍वस्तांनीही समितीचे कार्य पाहून अनुमती दिली होती. मंदिराच्या विश्‍वस्तांपैकी एका विश्‍वस्तांच्या घरीही जाऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांच्यावर समितीला सभेसाठी जागा मिळू नये, यासाठी दबाव टाकला. अखेर पोलिसांच्या दबावामुळे विश्‍वस्तांनी सभेसाठी जागेची अनुमती देऊ शकणार नाही, तुम्ही मंदिरात सभा करू नका, असे १२ फेब्रुवारी २०१६ ला सांगून सभा घेण्यासाठी मंदिराचे सभागृह देण्यास नकार दिला. पोलिसांच्या दबावामुळे मंदिर विश्‍वस्तांनी सभागृहाची अनुमती नाकारल्यामुळे हिंदु धर्मजागृती सभेचे स्थळ पालटण्यात आले.

जेएन्यूचा निषेध म्हणून काळाचौकीतील आंबेवाडी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्वाक्षरी चळवळ

चळवळीत सहभागी हिंदुत्ववादी
       मुंबई - दिनांकानुसार होणार्‍या शिवजयंतीचे औचित्य साधून काळाचौकीतील आंबेवाडी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून स्वाक्षर्‍यांची चळवळ राबवण्यात आली. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम राबवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवकही या वेळी सहभागी झाले होते. आमच्या देशात आम्ही अशा प्रकारच्या घटना सहन करणार नाही, अशी भावना प्रत्येेक कार्यकर्त्यांची होती. स्वाक्षर्‍यांचे हे निवेदन पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना देण्यात येणार आहे.
आज कोपरखैरणे येथे हिंदु धर्मजागृती सभा !
स्थळ : श्री रांजनदेवी (गावदेवी) मंदिर, एम्.एस्.ई.बी. तलाव रोड, सेक्टर १९, कोपरखैरणे गाव, नवी मुंबई.
वेळ : सायंकाळी ५.३०
संपर्क : ९९२०२०८९५८
हिंदूंनो, सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !

भारतात अन्य देशांचे गुणगान गायले जाणे खेदजनक ! - सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर

फर्मागुडी, गोवा येथे शिवजयंती साजरी !
श्री. सुदिन ढवळीकर
     फोंडा - अनेक वर्षांपासून येथे शिवजयंती साजरी केली जाते आणि निरनिराळ्या विचारवंतांनी येथे येऊन त्यांचे विचार मांडले आहेत, तरीही जेएन्यूमधील प्रकरणावरून असा विचार येतो की, या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती काय झाली ? शिवजयंतीसारखे महोत्सव आम्ही कुणासाठी करतो आणि कुणासाठी आम्ही हे केले पाहिजे ? आज भारताला स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली, तरी दुसर्‍या देशाचे गुणगान आपल्या देशात गायले जाणे हे खेदजनक आहे आणि हे रोखणे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आज सर्वांनी ठेवणे क्रमप्रात आहे, असे प्रतिपादन गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी फर्मागुडी येथे श्री गोपाळ गणपति मंदिराच्या प्रांगणात आयोजित राज्यस्तरीय शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलतांना केले.

ख्रिस्ती धर्मासाठी बलीदान दिलेल्या राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ जुने गोवे येथे संगीत समारंभ

ख्रिस्त्यांकडून धर्मप्रेम कसे जागृत ठेवावे, हे हिंदू शिकतील का ?
     पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) - सोळाव्या शतकात इराणच्या मुसलमान राजवटीविरुद्ध लढा देऊन ख्रिस्ती धर्मासाठी बलीदान दिलेल्या जॉर्जिया देशाची राणी केटवनच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी जुने गोवे येथे १९ फेब्रुवारी २०१६ पासून केटवन जागतिक पवित्र संगीत समारंभ साजरा केला जात आहे. या राणीला नंतर संतपद बहाल करण्यात आले आहे. या राणीच्या हाडांचे काही अवशेष आगुस्तीनपंथीय ख्रिस्त्यांकडून गोव्यात पुरले गेले आहेत, अशी आख्यायिका सांगितली जात आहे. जुने गोवे येथे ऑगस्टिन चॅपलमध्ये सापडलेली हाडे ही याच राणीची आहेत हे शोधण्यासाठी जॉर्जियातील पथकाकडून आणि भारतातील पुरातत्व खात्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आहेत; मात्र अद्याप ही हाडे याच राणीची आहेत हे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. गोव्यात होणार्‍या केटवन पवित्र संगीत समारंभात ख्रिस्ती, ज्यू, भारतीय, ऑथोडॉक्स आदी प्रकारचे संगीत विविध कलाकार सादर करणार आहेत. भारतातील राकेश चौरासिया, अर्जेन्टिनातील सांतिगो गिरेली, स्पेन येथील रोसियो डी फ्रूतोस, अर्जेन्टिनातील लियो रोसी आदी कलाकार यात सहभागी होणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी हे कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत.

(म्हणे) श्री दामोदर हा देव नाही, त्याला देव मानू नका, येशूला माना !

बिलिव्हर्सवाल्यांच्या हिंदुविरोधी प्रचारामुळे हिंदूंमध्ये संताप !
     मडगाव - येथील गजबजलेल्या गांधी मार्केटमधील पिंपळकट्टा-पेड येथील श्री दामोदर देवस्थानाजवळ बिलिव्हर्सच्या एका जोडप्याने १८ फेब्रुवारी या दिवशी श्री दामोदर हा देव नाही, त्याला देव मानू नका, येशूला माना असा प्रचार केला. तसेच भाविकांनी आक्षेप घेतला असता त्यांना उद्दामपणे उत्तरे दिल्याने तेथील श्री दामोदरभक्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला. पोलिसांनी वेळीच या जोडप्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेल्याने हा तणाव निवळू शकला.
१. गांधी मार्केटमधील पिंपळकट्टा-पेड येथील श्री दामोदर देवस्थान म्हणजे तेथील हिंदूंचे श्रद्धास्थान मानले जाते.
२. मडगाव येथे कोणताही मोठा उत्सव असल्यास श्री दामोदराला गार्‍हाणे घातले जाते.

आक्षेपार्ह मजकूर असल्याचे कारण पुढे करून हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधनपर फलक हटवले !

भारतात आता छत्रपतींचा सत्य इतिहास सांगणेही कठीण ! 
     गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्‍या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती मिळावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप आणि शिवरायांची शोभायात्रा यासंबंधी दोन फ्लेक्स फलक आयोजकांची अनुमती घेऊन लावले होते. या फलकावर पुढील माहिती हिंदी भाषेत लिहिली होती.
हिंदूंनो, हा इतिहास खोटा आणि चुकीचा आहे का ?
फलक क्र. १ - छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवा प्रताप ! - हिंदु राज्य स्थापनेच्या हेतूने ५ मुसलमान राज्यांशी लढून आतंकवाद मिटवला. आतंकवाद आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. 
फलक क्र. २ - शिवाजी महाराजांना अशी शोभायात्रा आवडणार का ? - शोभायात्रांमध्ये होणारे मद्यपान, अश्‍लील नृत्य, महिलांची छेडछाड आदींमुळे छत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण कधी तरी होऊ शकेल का ? शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या अनुचित कृत्यांचे मूकसंमतीदार असणार्‍या दर्शकांना त्याचे पाप लागते. 
    आयोजन करणार्‍या एका सदस्याने फलकावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याच्या कारण पुढे करून हे फलक कार्यक्रमस्थळी उलटे ठेवले.

जिल्हा आणि आश्रम यांमधील सर्व साधकांच्या रक्तगटाची संगणकीय सूची बनवण्याची सेवा १०.३.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

जिल्हासेवक आणि आश्रमसेवक यांना महत्त्वाची सूचना
१. आपत्कालीन स्थितीत किंवा अन्य वेळी साधक, धर्माभिमानी यांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व साधकांंना स्वतःचे रक्तगट ठाऊक असणे आवश्यक !
आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिदिन हिंदु धर्मियांना निरनिराळ्या आघातांचा सामना करावा लागत आहे. या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्व साधकांनी स्वतःत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ निर्माण करणे अपरिहार्य आहे.
आपत्कालीन स्थितीत किंवा अन्य वेळी एखाद्या साधकाला किंवा धर्माभिमानी हिंदूला रक्ताची आवश्यकता भासल्यास ते तात्काळ उपलब्ध करून द्यायला हवेे. त्यामुळे प्रत्येक साधकाला स्वतःचा रक्तगट ठाऊक असणे अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा किंवा आश्रम यांमधील ज्या साधकांना स्वतःचा रक्तगट ठाऊक नसेल, त्यांचे रक्तगट तपासण्याचे नियोजन उत्तरदायी साधकांनी लवकरात लवकर करावे.

मध्यमवयीन महिलांचा शबरीमाला देवस्थानातील प्रवेश धर्मसंमत आहे का ?

श्री. बी. रामभट पटवर्धन
१. धर्म किंवा कायदा विश्‍वशांतीसाठी आणि समाजाच्या रक्षणासाठी असतो, 
हे आताच्या युवावर्गाच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट !
      अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचेे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्‍वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धर्मशिक्षणापासून वंचित राहिलेल्यांनी धर्मपालन का करायचे ?, हे जिज्ञासेने जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती स्वागतार्ह गोष्ट म्हणावी लागेल; परंतु आपल्यालाच बुद्धी आहे आणि आपल्यालाच सर्व समजते, अशा अहंभावाने विरोधासाठी विरोध म्हणून लढा दिल्यास त्याला स्वेच्छाचार अथवा उद्धटपणा हे शब्दच चपखल बसतील.

अध्यात्मे घडतो उद्योगी आणि उद्योगे घडतो समाज !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई
       पिंताबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये केलेले मार्गदर्शन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये अध्यक्ष म्हणून उद्योजकांना मार्गदर्शन केले. उद्योग जगतात गरुडभरारी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, उद्योग आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालावी, स्वतःची मानसिकता पालटण्यासाठी उद्योजकांनी काय करावे, यांसारख्या अनेक गोष्टींचे कानमंत्र श्री. प्रभुदेसाई यांनी उद्योजकांना दिले. उद्योगजगताशी संबंधित त्यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे सविस्तर प्रसिद्ध करत आहोत.
१. ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्सचे महत्त्व
       ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून मला सन्मान दिल्याविषयी श्री. गोविंदराव हर्डीकर, श्री. संजय ओर्पे यांचा मी आभारी आहे. ओम प्रकाशन ब्राह्मण व्यवसाय पत्रिकेच्या माध्यमातून श्री. गोविंदराव हर्डीकर, श्री. संजय ओर्पे आणि त्यांचे सहकारी गेली ११ वर्षे ब्राह्मण समाजात उद्योजकता रुजावी आणि वाढावी; म्हणून कार्यरत आहेत. ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्रातून ६०० ब्राह्मण व्यवसायिकांना सहभागी करून घेणे, ही मोठी संधी आहे. या कॉन्फरन्सनिमित्त उपस्थित उद्योजकांमध्ये विचारमंथन घडून येणार आहे, माहिती आणि संपर्क यांचे जाळे (नेटवर्कींग) वाढणार आहे आणि त्याचा लाभ उपस्थितांच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे.

लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्या माहितीवर हेडलीचे शिक्कामोर्तब !

      महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि मुंबई पोलीस यांमधील दाऊद लॉबीने लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना मालेगाव स्फोटात अडकवून डेव्हीड हेडली आणि आयएसआय यांच्या मुंबई आक्रमणाच्या कारस्थानाला हातभार लावला काय, असा एक महत्त्वाचा प्रश्‍न सध्या अमेरिकेच्या कह्यात असलेला आतंकवादी डेव्हीड कोलमन हेडली याच्या साक्षीने उपस्थित केला आहे. हेडलीच्या साक्षीने अनेकांचे बुरखे फाडले गेले आहेत. पाकिस्तानचा बुरखा फाडला गेला आहे. इशरत जहाँ या मुसलमान युवतीचा निर्दोषत्वाचा बुरखा फाडला गेला आहे. तिच्या घरी एक लाख रुपयाचा धनादेश पोहोचवणार्‍या राष्ट्र्रवादी काँग्रेसचा बुरखा फाडला गेला आहे आणि अनेक वर्षे नरेंद्र मोदी यांना या चकमकीचा अपराधी ठरवणार्‍या काँग्रेसचा बुरखा फाडला गेला आहे.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

किरकोळ रकमेसाठीही लोक परस्परांच्या जिवावर उठणार असणे 
     कलौ काकिणिकेऽप्यर्थे विगृह्य त्यक्तसौहृदाः ।
     त्यक्ष्यन्ति च प्रियान्प्राणान् हनिष्यन्ति स्वकानपि ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्‍लोक ४१
अर्थ : कलियुगात लोक, काही कवड्यांसाठीसुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे, तर आपल्या सग्या-सोयर्‍यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील.

क्रांतीकारक, देशभक्त आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या मृत्यूचे गूढ कायम असलेला एकमेव देश भारत !

१. २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी जवाहरलाल नेहरूंनीच इंग्रजांना थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद हे कंपनी बाग येथे लपले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चंंद्रशेखर आझाद यांना इंग्रजांनी घेरले. परिणामी आझाद यांनी स्वतःच्या बंदुकीत राहिलेली शेवटची गोळी मारून घेत भारतमातेला स्वत:चे प्राण अर्पिले, असा खळबळजनक खुलासा उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथे आलेले चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करतांना केला. 
२. दुसर्‍या महायुद्धात भारताचे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा इतिहास शिकवला गेला असला, तरी त्यांच्या गूढ मृत्यूच्या मागे जवाहरलाला नेहरू यांचाच हात असल्याचा संशय अलीकडे उघड झालेल्या नेताजी बोस यांच्याविषयीच्या गुप्त धारिकांतून स्पष्ट होतो. 
३. भारत-पाक युद्ध १९६५ मध्ये चालू झाल्यावर ते थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याचे ठरवले. त्या संदर्भात ताश्कंद येथे चर्चा चालू असतांना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. या रहस्यामागेही जवाहरलाल नेहरू यांची कन्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे संशयाचे बोट दाखवले जात होते.
     हिंदूंनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन तेथील आनंद एकदातरी अनुभवला पाहिजे.
- श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदु महासभा, गोवा.

राजस्थानमध्ये भाजपच्या शासनाने गोहत्येवर बंदी आणावी, ही अपेक्षा !

     सिकर (राजस्थान) येथील नीमकाथानामध्ये ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी शिवसेनेने गोहत्याबंदीच्या मागणीसाठी वाहन फेरी काढली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र मोगा यांनी या वेळी सांगितले की, नीमकाथानाच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये गोहत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गोहत्याबंदी करण्याची आम्ही मागणी करत आहोत.

कुचकामी पोलीस यंत्रणा ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

     कोलकाता येथे १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी हिंदु संहति या संघटनेच्या ८ व्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने विराट सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी येणार्‍या हिंदु युवकांवर शियालदा, ऊलूबेडिया, मेचेदा या भागांमध्ये मुसलमानांनी आक्रमण केले. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

चि. सोनाक्षी सागर चोपदार हिला सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !

आज २१.२.२०१६ (माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी) या दिवशी नवी मुंबई येथील चि. सोनाक्षी सागर चोपदार (वय ५ वर्षे) हिचा वाढदिवस आहे.

चि. सोनाक्षी हिच्या आई-वडिलांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

पू. आसारामजी बापू यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या भक्तांच्या मतांची अपेक्षा करणार्‍या एकाही राजकारण्याने आणि प्रशासकीय अधिकार्‍याने पू. बापूजींना कारागृहातून सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत, हे लक्षात घ्या !

     कठीण समय येता कोण कामास येतो, हे वचन सार्थ करणार्‍या राजकारण्यांची आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे पुढे दिली आहेत. 
१. श्री. अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान, भारत शासन.
२. श्री. लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री, भारत शासन.
३. श्री. चंद्रशेखर, माजी पंतप्रधान, भारत शासन.
४. श्री. पी.एन्.के. छिब्बर, राज्यपाल, पंजाब.
५. श्री. सूरजभान, राज्यपाल, उत्तर प्रदेश.
६. श्री. केशुभाई पटेल, मुख्यमंत्री, गुजरात.
७. श्री. एच्.पी. कुमार, महानिर्देशक, मादक नियंत्रण ब्यूरो, भारत शासन.
     फ्रान्सिस झेवियर याने हिंदूंचे धर्मांतर केले आणि हिंदूंवर अत्याचार केले; मात्र आज धर्माभिमानशून्य हिंदू त्याच्या पायाकडे नवस करतांना दिसतात. - श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदु महासभा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात येते, यासंदर्भात ५० लक्ष स्वयंसेवक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाज उठवावा, ही हिंदूंची अपेक्षा !

     कन्नूर (केरळ) येथील पप्पीनिसेरी गावात १५ फेब्रुवारी २०१६ च्या रात्री २७ वर्षीय पी.व्ही. सुजीत या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच हत्या करण्यात आली. सुजीतला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या घरच्यांवरही आक्रमण करण्यात आले. या प्रकरणात माकप समर्थक असलेल्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेकडे कल व्हायचे कारण, म्हणजे कुणी त्यांना हिंदु धर्म आणि भारतीय भाषा यांचे महत्त्व समजावून सांगितले नाही !

     प्रादेशिक भाषांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे, असे वृत्त द गोवन् वार्ता या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

पूर्वी जगात केवळ हिंदूच होते. आता ८९ देश ख्रिस्ती आणि ८० देश मुसलमानांचे आहेत. आज या धरणीवर एकही 'हिंदु देश' नाही. (सावरकर टाइम्स, मे २०१०)


पूर्वी जगात केवळ हिंदूच होते. आता ८९ देश ख्रिस्ती आणि ८० देश मुसलमानांचे आहेत. आज या धरणीवर एकही 'हिंदु देश' नाही. (सावरकर टाइम्स, मे २०१०)


हाताच्या बोटांतून आणि डोळ्यांतून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्ये विविध रंग दिसणे

      देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही. या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात, असे नसते, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, याचा अर्थ तो नाही, असे नाही. आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते. त्याचप्रमाणे भूमंडलावरील अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूभोवती तिचे एक ऊर्जावलय असते. प्रत्येकाच्या कार्यानुरूप ते अल्प-अधिक प्रमाणात असते.

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना आवाहन !

सूक्ष्म-जगताचे स्थुलातील परिणाम दर्शवणार्‍या 
वस्तूंविषयीचे लिखाण पाठवतांना त्यांची छायाचित्रेही पाठवा !
        सध्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेल्या सूक्ष्मातील युद्धात वाईट शक्तींनी स्थूल वस्तूंवर, उदा. साधकांचे कपडे, भूमी, अन्नपदार्थ इत्यादींवर आक्रमण केल्याच्या काही घटना घडत आहेत, तसेच या युद्धात साधकांना साहाय्य करणार्‍या चांगल्या शक्तींमुळे लादी गुळगुळीत होणे, देवतांची चित्रे अन् गुरूंची छायाचित्रे यांत पालट होणे, दैवी कण दिसणे इत्यादी घटना घडत आहेत. याविषयी संशोधन चालू आहे. आम्ही त्यांतील काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करत आहोत. त्यामुळे याविषयीची माहिती लिहून पाठवतांना साधकांनी वरीलप्रमाणे पालट झालेल्या वस्तूंची छायाचित्रेही पाठवावी. लिखाणासोबत छायाचित्र प्रसिद्ध केल्याने समाजाला सूक्ष्मजगताविषयीचे ज्ञान होणे आणि विषय समजणे सोपे जाते. त्याचप्रमाणे अशा दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह करून तो ठेवा पुढील सहस्रो वर्षे मानवाला उपयोगी पडेल. अशा प्रकारे पालट होण्यामागील प्रक्रिया काय असते ? यामागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे काय आहेत ?, यांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
माहिती पाठवण्यासाठी इ-मेल पत्ता : sankalak.goa@gmail.com

केंद्रीय गृहमंत्र्यांचे हास्यास्पद आवाहन ! या आवाहनाने काय साध्य होणार ?

     भारतात इसिसच्या वाढत्या संकटाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २ फेब्रुवारीला त्यांच्या निवासस्थानी मुसलमान धर्मगुरूंची बैठक घेतली. या बैठकीत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

मे २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेच्या वेळी श्री. अतुल बाली, देहली यांना आलेल्या अनुभूती

१. आश्रमात पुष्कळ चैतन्य असून ते साधनेसाठी पूरक असल्याचे जाणवणे; पण उपायांच्या खोलीत नामजपासाठी बसल्यावर भूतकाळातील कटू आठवणी, तसेच दीर्घकाळापासून त्रास देणारे खोलवर रूजलेले स्वभावदोष उफाळून येणे आणि पू. योयाताई शेजारच्या आसंदीवर बसल्यावर सकारात्मक विचार येणे : अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी २२.५.२०१५ या दिवशी मी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात आलो. आश्रमात आल्यावर साधनेत मोठी झेप घेऊन जलद गतीने आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे, असे विचार माझ्या मनात येत होते. आश्रमात पुष्कळ चैतन्य असून ते साधनेसाठी अत्यंत पूरक असल्याने कार्यशाळेच्या पहिल्या दिवसापासून येणार्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केल्यास ती माझ्या साधनेला साहाय्यभूत ठरतील, असे मला जाणवले. 
   असे वाटत असूनही त्या दिवशी माझे मन असंख्य नकारात्मक विचारांनी भरले होते. आश्रमात आलेल्या दिवशी एकंदरीत माझ्या मनात ७० टक्के नकारात्मक आणि ३० टक्के सकारात्मक विचार येत होते. त्यामुळे भूतकाळातील कटू आठवणी, तसेच दीर्घकाळापासून मला त्रास देणारे खोलवर रूजलेले स्वभावदोष उफाळून येत होते. या विचारांच्या दुष्ट चक्रात अडकून मी घरी राहूनही साधना करू शकतो.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी 
या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
     सनातनच्या प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या नूतन ग्रंथाचा परिचय क्रमशः करून देत आहोत. ही उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. वाचकांनी आतापासूनच हे उपाय करून पहावेत. असे केल्याने या उपायपद्धतीचा सराव होईल, तसेच तिच्यातील बारकावेही कळतील. यामुळे प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. या ३ भागांतून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. तो ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा. 
२. उपाय करण्यासाठी आवश्यक मुद्रा आणि नामजप शोधणे
२ अ. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित देवता यांचे नामजप / पंचतत्त्वांशी संबंधित बीजमंत्र अन् मुद्रा
२ अ १. मुद्रा शोधण्याची पद्धत : कनिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचा त्रास असल्यास करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा कराव्या लागतात. सध्या वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे, म्हणजे वरिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींची आक्रमणे होत आहेत.

तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

१. देहाभोवती पांढरे कण अन् वलय दिसणे, हातांच्या अन् पायांच्या बोटांमधून धूर आणि प्रकाशाचे किरण बाहेर पडतांना दिसणे, यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. पांढरे कण, वलय आणि किरण केव्हा दिसू शकतात ? त्याची वैज्ञानिक किंवा रासायनिक प्रक्रिया काय असते?
३. या संदर्भात कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?,
४. तसेच या संदर्भात या पूर्वी कोणी वैज्ञानिक संशोधन केले असल्यास आम्हाला वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संपर्क : श्री. रूपेश रेडकर
ई-मेल : savv.research@gmail.com

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध 
असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७संप्रदायांची आताची विदारक स्थिती आणि त्याची कारणे, तसेच प.पू. डॉक्टरांनी साधकांना योग्य प्रकारे घडवल्याने साधक सांप्रदायिक बंधनाच्या पलीकडे जाणे, म्हणजेच ईश्‍वरापर्यंत जाण्याची प्रक्रिया

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. प.पू. डॉक्टरांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचा सुवर्णमध्य कसा 
साधायचा, हे शिकवल्याने सनातनचे कार्य विश्‍वव्यापक होतांना दिसून येणे 
     कार्याच्या संदर्भात स्थळ म्हणजे व्यष्टी आणि काळ म्हणजे समष्टी मानले, तर दोहोंचाही सुवर्णमध्य साधायला हवा, तरच कार्य पूर्णतः यशस्वी होते. हा सुवर्णमध्य नेमका कसा साधायचा, हे प.पू. डॉक्टरांनी साधकांना शिकवले आहे आणि म्हणूनच साधक कुठेही गेले, तरी यशस्वी होतांना दिसत आहेत आणि साधकांचे सर्वच स्तरांवर कौतुक होतांना दिसत आहे. 
२. प.पू. डॉक्टरांनी साधकांना अध्यात्म कसे जगायचे ?, हे शिकवल्याने साधक कुठेही
गेले, तरी त्यांची ओळख करून द्यावी न लागणे, तर ते त्यांच्या कर्तृत्वानेच उठून दिसणे 
     साधक कुठेही त्यांच्या कर्तृत्वानेच उठून दिसतात. त्यांना त्यांची अशी वेगळी ओळख करून द्यावी लागत नाही; कारण प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या रक्तातच अध्यात्म मुरवले आहे. ते त्यांच्या कृतीतूनच दिसते, उदा. कुठेही गेले तरी आपल्या चपला ओळीतच ठेवणे, कुणाशीही बोलतांना नम्रतेने बोलणे, कुठेही गेले तरी त्यांच्यातील एक होऊन सेवा करणे, म्हणजेच सांप्रदायिकत्व न जपणे, आपल्याविषयी अधिक न बोलता दुसर्‍याची मते जाणून घेऊन त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच कोणतेही विशिष्ट गुरु न मानता वर्तमानात आपण ज्यांच्याकडून शिकत आहोत, ते आपले गुरु, असा साधकांचा भाव असल्याने साधक आपोआपच व्यापक होत आहेत आणि सार्‍यांनाच आपले वाटत आहेत.
३. प्रत्येक कृतीतील मर्म ओळखून सेवा कशी करायची ?, याचाही धडा प.पू. डॉक्टरांनी
साधकांंना दिल्याने आता साधक प्रत्यक्ष तत्त्वाला धरूनच साधना करू लागणे
आणि म्हणून अनेक संप्रदायांच्या संतांनाही ते आपलेच वाटणे 
     साधकांनाही सर्व जण आपलेच आहेत, असे वाटू लागल्याने अवघे विश्‍वची माझे घर, या विश्‍वसंकल्पनेपर्यंत जाणे आता त्यांना शक्य होत आहे.

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली आणि ओडिया या भाषांत भाषांतर करण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती !

१. आपत्काळात ओढवणार्‍या आपत्तींना / विकारांना 
तोंड देण्याची पूर्वसिद्धता करण्याची आवश्यकता 
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. 
२. मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची नावे 
या मालिकेतील पुढील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. 
अ. अग्नीशमन प्रशिक्षण
आ. बिंदूदाबन (२ ग्रंथ) 
इ. रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन

वास्को, गोवा येथील सौ. सुशांती मडगावकर यांना भाच्याच्या दुर्धर आजारपणात, त्याच्या मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

      सप्टेंबर २०१५ मध्ये माझ्या बहिणीचा ३७ वर्षांचा मुलगा कर्करोगाने निधन पावला. त्या वेळी श्रीकृष्णाच्या कृपेने मला आणि त्याच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती मी लिहून देण्याचा प्रयत्न करत आहे.
      सौ. सुशांती मडगावकर यांनी ज्या तर्‍हेने मृत्यूसारख्या प्रसंगाचे आणि सामाजिक स्थितीचे शब्दांकन केले आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्यातून प्रत्येकाला बरेच काही शिकता येईल.
सौ. सुशांती मडगावकर
१. सात वर्षांपूर्वी बहिणीच्या मुलाला कर्करोग 
झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि आजारात 
भरपूर पैसे लागणार; म्हणून त्याने विदेशात नोकरी करणे
         ७ वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या मुलाला कर्करोग झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. तेव्हा सर्वांवर जणू आकाशच कोसळले. जे जे काही उपाय करायचे होते, ते सर्व त्यांनी केले. त्यामध्ये पुष्कळ पैसे व्यय झाले. मुलगा अभियंता असल्याने चांगल्या नोकरीला होता. मुलाच्या (रुग्णाच्या) लक्षात आले की, या आजारात भरपूर पैसे लागणार आहेत. येणारा व्यय (खर्च) कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे तो पैसे मिळवण्यासाठी विदेशात नोकरी करू लागला. साडेतीन वर्षे त्याने विदेशात नोकरी केली. त्या सुमारास भारतात येऊन त्याने दोन शस्त्रकर्मे करून घेतली. शेवटी आई-वडिलांनी त्याला भारतात बोलावून घेतले आणि येथेच उपचार चालू केले.

महाशिवरात्रीपर्यंत आपले ५ परिचित अथवा नातेवाईक यांना सनातन प्रभातचे वर्गणीदार बनण्यास प्रवृत्त करून राष्ट्र आणि धर्म कार्यात खारीचा वाटा उचला !

सनातन प्रभात नियतकालिकाच्या वाचकांना नम्र विनंती !
१. राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या सनातन प्रभात नियतकालिकाचे महत्त्व !
सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे. देवतांविषयी भक्तीभाव वाढवणारी, साधनेची अपरिहार्यता सांगणारी नानाविध सदरेही यामध्ये प्रसिद्ध केली जातात. सनातन प्रभात नियतकालिकांचे विविध जिल्ह्यांत शेकडो वाचक आहेत. सनातन प्रभातच्या वाचनाने अनेक जण धर्मजागृतीच्या कार्यामध्ये कृतीशील सहभाग घेत आहेत, तर काही जण साधनेविषयी जिज्ञासा वाटू लागल्याने साधनेतील पुढील प्रयत्न जाणून घेत आहेत. आतापर्यंत बर्‍याच वाचकांनी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.२.२०१६) रात्री १०.३४ वाजता
समाप्ती - माघ पौर्णिमा (२२.२.२०१६) रात्री ११.५० वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी त्याच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये व्यय करणारे दिशाहीन संप्रदाय !

समाज साधनेकडे वळावा, यासाठी विविध संप्रदायांकडून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांपैकी काही संप्रदाय हे कार्यक्रम भव्यदिव्य व्हावेत, यासाठी त्यांच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये खर्च करतात, असे आढळून येते. या कार्यक्रमाचे ३५०-४०० एकर जागेत आयोजन, व्यासपिठाची खर्चिक सजावट, प्रतिष्ठितांसाठी उंची बैठक व्यवस्था, सांस्कृतिक आणि गायन-वादनाचे कार्यक्रम यांसाठी कोट्यवधी रुपये व्यय केले जातात. अशा कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिकाही खूप महागडी म्हणजे साधारण २५-३० रुपयांची एक पत्रिका इतकी खर्चिक असते. अध्यात्म हे बहिर्मुखतेतून अंतर्मुखतेकडे नेणारे साधन आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन पहाता कार्यक्रमाला जाणारी व्यक्ती किती अंतर्मुख होते आणि त्याच्या व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नतीसाठी तो कार्यक्रम किती पूरक ठरतो, हा प्रश्‍नच आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज महाराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : 'लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील', यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.

'गुरु मिळाले' असे म्हणू नये. 'गुरु दिले गेले', असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.) 
चलनी नोटांद्वारे जनप्रबोधन करता येईल, याचे भान नसलेले भारत शासन

भारतात चलनी नोटांवर अत्यावश्यक माहिती देऊन उरलेल्या जागेत विविध प्राणी, पक्षी, नक्षी अशा गोष्टी छापल्या जातात. विविध किमतीच्या चलनी नोटांवर अशा अनावश्यक चित्रांचे स्वरूप कसे आहे, याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
अ. ५ रुपये : ट्रॅक्टरद्वारे शेताची नांगरणी
आ. १० रुपये : गेंडा, वाघ आणि हत्ती, तसेच नक्षी
इ. २० रुपये : समुद्र किनार्‍याचा निसर्ग आणि नारळाची झाडे
ई. ५० रुपये : संसदेची वास्तू आणि नक्षी
उ. १०० रुपये : हिमालयाच्या रांगा आणि नक्षी
ऊ. ५०० रुपये : गांधींची दांडीयात्रा
ए. १००० रुपये : संगणक वापरणारी व्यक्ती, उपग्रह, औद्योगिक चिन्हे आणि यांत्रिक शेती
अशी संदर्भहीन आणि कोणतेही प्रयोजन नसलेली चित्रे छापण्याऐवजी जनप्रबोधनासाठी उपयुक्त ठरतील, असे संदेश छापले जाऊ शकतात. स्वच्छता, भ्रष्टाचार निर्मूलन, ऊर्जा बचत यांविषयी लोकशिक्षण देणे आवश्यक आहे. असे अनेक विषय शासनाकडे आहेत आणि यांविषयी संदेश देण्यासाठीच्या विज्ञापनांवर शासन प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. असे असतांना चलनी नोटांवरील जागेचा वापर जनप्रबोधनासाठी केल्यास ते प्रभावी होईल आणि शासनाचा पैसाही वाचेल. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनांनी आणि जनतेनेही हा विचार का केला नाही ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतरांना मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
'मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
१. मानसिक स्तर : 'भुकेलेल्याला अन्न द्या', असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते 'भुकेलेला भुकेला का आहे ?', याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते.
२. आध्यात्मिक स्तर : 'साधना कर. देव अन्न देईल', असे म्हणणारे आध्यात्मिक स्तरावरचे असतात. ते 'भुकेलेला भुकेला का आहे ?', याचा विचार करतात आणि त्याला साधना करण्यास सांगतात. साधनेमुळे भुकेलेल्याचे प्रारब्ध पालटते. त्यामुळे कोणालातरी त्याला आयुष्यभर अन्न द्यावे लागत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधक
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    साधक जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो आणि निर्धाराला दृढतापूर्वक चिकटून रहातो, तेव्हा उद्दिष्टपूर्ती होणे लांब राहत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

जेएन्यु प्रकरणात विषयांतर नको !

संपादकीय
     देहलीतील जवाहरलाल नेहरू (जेएन्यु) विद्यापिठात दिल्या गेलेल्या देशद्रोही घोषणा हा सध्या देशातील लक्षवेधी विषय आहे. संसदेवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार महंमद अफझल याला फाशी देऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ९ फेब्रुवारी या दिवशी या विद्यापिठाच्या काही विद्यार्थ्यांनी त्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्या घोषणा देतांना त्यांनी शत्रूराष्ट्र पाकची भलामण करणार्‍या आणि घराघरात अफझल जन्माला येईल, अशा अर्थाच्या घोषणाही दिल्या. देशाच्या चक्क राजधानीत हा प्रकार घडणे, ही गोष्ट पूर्वनियोजित षड्यंत्राखेरीज शक्य नाही. या प्रकारानंतर हा देशद्रोह करणार्‍या विद्यार्थ्यांची धरपकड चालू झाली. विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला अटक झाली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn