Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


प.पू. महादेव हरि आपटे यांची पुण्यतिथीदिनविशेष

आज दासबोध जयंती

न्यायालयात अधिवक्त्यांनी भारतमाता की जय म्हणत साम्यवादी विद्यार्थ्याला चोपले !

नवी देहलीतील अधिवक्त्यांचे प्रखर देशप्रेम !
राष्ट्रप्रेमींनो, देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी,
आम आदमी पार्टी, आदी राजकीय पक्ष समर्थन करत आहेत, हे लक्षात घ्या !
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली होती. त्याला देण्यात आलेली पोलीस कोठडी १५ फेब्रुवारीला संपल्यावर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात आणण्यात आले. या वेळी त्याच्या समर्थनार्थ न्यायालय परिसरात जमा झालेले साम्यवादी विद्यार्थी आणि येथील अधिवक्ता यांच्यात हाणामारी झाली. अधिवक्त्यांनी या वेळी एका विद्यार्थ्याला बेदम चोप दिला. या वेळी अधिवक्ता भारतमाता की जय अशा घोषणा देत होते. हाणामारीत काही पत्रकारांना मारहाण करण्यात आली. पत्रकार देशद्रोह्यांच्या समर्थनार्थ वार्तांकन करत असल्याचा आरोप त्यांच्यावर या वेळी करण्यात आला.

आम आदमी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून देहलीतील माकपच्या मुख्यालयावर आक्रमण

     नवी देहली - आम आदमी सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी १४ फेब्रुवारीच्या रात्री माकपच्या मुख्यालयावर आक्रमण केले. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे, तर अन्य दोघांनी आत्मसमर्पण केले आहे. आक्रमण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. 
     जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील प्रकरणावरून हे आक्रमण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ युवकांनी माकप कार्यालयात घुसून येथील भिंतींवर काळे फासले. यातील एक सुशांत खोसला याला माकप कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, तर वेद प्रकाश आणि रॉकी यांनी आत्मसमर्पण केले.

धमकीचा दूरभाष आल्याचा सीताराम येच्युरी यांचा दावा !

देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांना कोणी धमकीचे दूरभाष करत असतील, 
तर ते त्यांचे राष्ट्रप्रेम व्यक्त करत आहेत, असे म्हणून त्याचे कोणी 
समर्थन केले, तर येच्युरी त्यांना देशद्रोही ठरवणार का ?
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाच्या आवारात देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करणार्‍या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी १४ फेब्रुवारीला रात्री अज्ञाताकडून धमकीचा दूरभाषा आल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. माकपच्या कार्यालयातही रात्री एक वाजेपर्यंत धमकीचे दूरभाष येत असल्याचाही दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. धमकी देणारा स्वतःला आम आदमी बलवीर सेनेचा सदस्य असल्याचे सांगत होता. कार्यालयातील स्वागतकक्षातील कार्यकर्ता दीपक कुमार यांनी सांगितले की, धमकी देणारा म्हणत होता की, येच्युरी यांनी जे काही केले आहे, ते चुकीचे केले आहे. त्यांनी आता देश सोडला पाहिजे.

...तर लोकशाहीची शंभरदा हत्या झाली तरी चालेल !

जेएन्यू प्रकरणी सामनातून देशद्रोही विद्यार्थ्यांवर ओढले आसूड !
     देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात विद्यार्थ्यांचा एक गट देशद्रोही कारवायांत गुंतला आहे. ज्यांनी अफझलचा स्मृतीदिन साजरा करून हिंदुस्थानविरोधात घोषणा दिल्या, त्या सगळ्यांंना तात्काळ अटक करून बेमुदत कारागृहात पाठवायला हवे आणि यामुळे लोकशाहीची हत्या होत आहे, असा कोणी गळा काढत असेल, तर त्यांचेही गळे दाबून लोकशाहीची हत्या शंभरदा केली तरी चालेल, असे शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे - 
१. देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हा देशद्रोही आणि माथेफिरू लोकांचा अड्डा झाल्याचे आतापर्यंत बोलले जात होते; पण ज्या प्रकारे अफझलची अनौरस पोरे तेथे भारतमातेच्या विरोधात धुडगूस घालत आहेत, ते पहाता हा केवळ देशद्रोह्यांचा अड्डाच नसून पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांचे एजंट तेथे सरकारी पैशानेच देशविरोधी कारवाया करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी अफझलला गुरुजी असे संबोधले !

आतंकवाद्यांना आदरार्थी जी लावण्याची काँग्रेसी परंपरा !
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोही साम्यवादी विचारसरणीचे विद्यार्थी जिहादी आतंकवादी महंमद अफझल याचा उदो उदो करत असतांना काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी याच विषयावरील पत्रकार परिषदेत त्याचा उल्लेख अफझल गुरुजी असा केला. ही चूक लक्षात येताच त्यांनी क्षमा मागितली. (अनेक वर्षे अफझलला फाशी न देणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळे काय होणार ? काँग्रेस नेत्याच्या या जीमध्ये काहीच नवीन नाही. ती त्यांची परंपरा असल्याने ते देशद्रोह्यांचे समर्थन करत आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ओसामाजी असे म्हटले होते; मात्र क्षमा मागितली नव्हती. - संपादक)

नवाटांड (धनबाद) येथे ५०० धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण, १० गंभीर घायाळ

धनबाद भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशात हिंदूंवर सातत्याने होत 
असलेल्या आक्रमणांच्या विरोधात शासन कारवाई करील, अशी आशा आहे !
गावात मंदिर बांधल्याचा सूड उगवला
  • धनबादमध्ये मालडाची पुनरावृत्ती 
  •  मंदिरातील मूर्तींची तोडफोड 
  •  हिंदूंच्या घरांवर आक्रमण 
  • महिला आणि मुले यांना मारहाण 
  •  महिलांचा विनयभंग 
  • घटनेकडे प्रसारमाध्यमांकडून अक्षम्य दुर्लक्ष 
     धनबाद (झारखंड) - देशात मुसलमानबहुल गावांमध्ये रहाणे हिंदूंना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. धनबाद जिल्ह्यातील नवाटांड या गावामध्ये ५०० हून अधिक धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केल्याचे नुकतेच समोर आले आहे. या आक्रमणात धर्मांधांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली, तसेच हिंदूंच्या घरांवरही आक्रमण केले आणि महिलांसह मुलांना मारहाण केली. जातांना त्यांनी २४ घंट्यांत गाव सोडा किंवा मरण्यास सिद्ध रहा, अशी धमकीही दिली. या आक्रमणात १० हिंदु गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

काश्मीरमध्ये पोलीस कारवाईच्या विरोधात हिंसाचार, ५ भागांत संचारबंदी

आतंकवाद्यांचे समर्थन करणारे नागरिक भारताचे कि पाकिस्तानचे ? फुटीरतावाद्यांना 
वेळीच रोखले असते, तर त्यांनी काश्मीरमध्ये पुनः पुन्हा हिंसाचार माजवला नसता !
     श्रीनगर - पुलवामा येथे सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत एक आतंकवादी ठार झाल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवतांना पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका विद्यार्थिनीसह २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीनगरच्या डाऊन टाऊन भागासह, पुलवामा, पांपोर आणि काकपोरा या भागांत निदर्शने करण्यात आली. सध्या येथे तणावाचे वातावरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव म्हणून पोलिसांनी इंजिनियर रशीद आणि यासिन मलिक या फुटीरतावाद्यांना स्थानबद्ध केले, तसेच या भागांत संचारबंदी लागू केली. 
१. लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे काही आतंकवादी पुलवामा जिल्ह्यातील ललहार गावात आले होते. 
२. भारतीय सैन्याने या आतंकवाद्यांना गराडा घातला. आतंकवाद्यांनी या गराड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत सैन्यावर गोळीबार केला.

देशद्रोही कन्हैया याला सोडण्यासाठी डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांची मुंबई विद्यापिठात निदर्शने !

      मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - देशद्रोही महंमद अफझल याच्या सन्मानार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. या प्रकरणी अटकेत असलेल्या जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याला सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी करत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेनी आज कालीना येथील मुंबई विद्यापिठात निदर्शने केली. यातून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचे देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याचे धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे.

पांडू पिंडारा (हरियाणा) आणि उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने फलक प्रदर्शन !

    सोमवती अमावास्येच्या निमित्ताने हरियाणातील पांडू पिंडारा आणि उज्जैन येथील रामघाट परिसर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षण यांविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 
पांडू पिंडारा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचे आयोजन
जिज्ञासूंना माहिती सांगतांना
श्री. विनय पानवळकर (डावीकडे)
   हरियाणा - पांडू पिंडारा (जिन्द) येथे प्रत्येक सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंड दान करण्यासाठी लक्षावधी भाविक येतात. या निमित्ताने ८ फेब्रुवारी या दिवशी पांडू पिंडारा येथील रतिराम आश्रमाचे व्यवस्थापक महंत केशवानंद महाराज यांनी त्यांच्या आश्रमात सनातनचे ग्रंथ आणि फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना निमंत्रित केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.
     या आश्रमाच्या वतीने श्री रतिराम संस्कृत महाविद्यालयही चालवण्यात येते. येथे अनेक आश्रम बनवण्यात आले आहेत.

सांगली शिक्षण संस्थेच्या एक कोटी सूर्यनमस्काराची संकल्पपूर्ती !

      सांगली, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - सांगली शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी २०१५ या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्याच दिवशी तरुण भारतच्या व्यायाम मंडळावर एक कोटी सूर्यनमस्काराचा संकल्प केला होता. १२ जानेवारी २०१६ या दिवशी एक कोटी सूर्यनमस्कार पूर्ण झाले होते. विद्यार्थ्यांना नियमितपणे व्यायामाची सवय लागावी, त्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास व्हावा, त्यांच्यातील सांघिक वृत्ती वाढवी, या उद्देशाने संस्थेने एक कोटी सूर्यनमस्काराचा संकल्प केला होता. याची संकल्पपूर्ती १४ जानेवारी २०१६ या दिवशी कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलावर करण्यात आली. यात ४ सहस्र २०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, सांगली महानगरपालिका आयुक्त अजिज कारचे, उद्योजक रामभाऊ वेलणकर हेही यात सहभागी झाले होते. (एक कोटी सूर्यनमस्कार घालून सांगली शिक्षण संस्थेने इतरांसमोर आदर्शच उभा केला आहे ! - संपादक)

हिंदु संहति धर्मासाठी लढण्यास सिद्ध असणार्‍यांच्या पाठीशी ! - तपन घोष

हिंदु संहतीच्या ८ व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य जनसभा !
  • सभेसाठी येणार्‍या युवकांवर मुसलमानांचे आक्रमण 
  • पोलिसांची बघ्याची भूमिका !
     कोलकाता, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - सध्या कोणताही पक्ष किंवा राजनेता हिंदूंना वाचवेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे हिंदूंनी स्वत:चे रक्षण स्वत: करायला हवे. शिशुपालवधातून भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या अपमानाचा स्वतः प्रतिशोध घेतला. याच श्रीकृष्णाने महाभारत युद्धात हातात शस्त्र न घेता अर्जुनाला धनुष्य हातात घ्यायला सांगितले. आजच्या हिंदु तरुणांनी अर्जुन बनून स्वतःचे आणि देशाचे रक्षण करायला हवे. जर हिंदूंनी सर्वस्वाचा त्याग केला, तर देश वाचेल. जे हिंदू धर्मासाठी लढायला सिद्ध आहेत, त्यांनी स्वतःची आणि परिवाराची चिंता हिंदु संहतीवर सोडावी, असे प्रतिपादन हिंदु संहतीचे (हिंदू एकतेचे) अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी केले.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

कर्णावती (अहमदाबाद) येथे मातृ पितृ पूजन दिवसासमवेतच अब्बा अम्मी इबादत (पूजा) दिवस ही साजरा !

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचे प्रतीक असलेला व्हॅलेंटाईन डे 
साजरा करणारे हिंदू यातून बोध घेतील का ?
    कर्णावती (अहमदाबाद), गुजरात - येथील एक आश्रमाने घेतलेल्या पुढाकारामुळेे शहरातील विविध शाळांमध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. शहरातील जुहापुरा मुसलमानबहुल क्षेत्रातील मुसलमान मुलांनी अब्बा अम्मी इबादत (पूजा) दिवस नावाने आई-वडिलांची पूजा करून या मोहिमेत त्यांचा सहभाग नोंदवला.
१. इस्लामच्या शिकवणीनुसार इस्लामध्ये मूर्तीपूजेवर बंदी आहे. तसेच अल्लाह वगळता, अन्य कोणाची पूजा करणे निषिद्ध आहे. 
२. जुहापुरामध्ये असलेल्या न्यू एज हायस्कूलमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला.
३. इस्लाममध्ये आई-वडिलांची पूजा करणे जरी निषिद्ध असले, तरी आपल्या आई-वडिलांचा सन्मान कशाप्रकारे करायला हवा, हे शाळेतील १२०० विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याची माहिती शाळेचे प्राचार्य अकबर उमारिया यांनी दिली.
४. न्यू एज हायस्कूलबरोबरच रघुनाथ हिंदी हायस्कूल आणि अन्य अनेक शाळांनी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा केला. विद्यार्थी आपल्या आई-वडिलांच्या पाया पडले, तसेच त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले.

१० वर्षे मंदिरांतील दागिन्यांची चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद

      पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - गेल्या दहा वर्षांपासून मंदिरातील मूर्ती, पादुका, मुकूट, पंचारती, समया आदींची चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या सोन्या-चांदीच्या वस्तू चोरटे उत्तरप्रदेश येथील सोनारास विकत असत. ५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सापळा रचून बालेवाडी स्टेडियमजवळ चोरट्यांना अटक करण्यात आली. दीपक पवार, प्रकाश पवार, महेंद्रसिंग राठोड, रवी जटासिंग सोनी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून आतापर्यंत ३ लक्ष ९६ सहस्र ३०८ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सापळा रचून आरोपींना कह्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे श्री पार्श्‍वनाथ महाराजांची चांदीची मूर्ती, तसेच पत्रे कापण्याच्या २ कात्र्या, पक्कड, हातोडी आदी वस्तू आढळून आल्या. ही मूर्ती त्यांनी मुंबई-अहमदाबाद रस्त्यालगत असणारे शिरसाट (जिल्हा पालघर) या गावातील जैन मंदिरातून चोरून आणली असल्याचे सांगितले.

पुणे येथे व्हॅलेंटाईन डेनिमित्तच्या मेजवानीत धर्मांधाकडून हिंदु युवतीवर बलात्कार

हिंदूंनो, व्हॅलेंटाईन डेचे दुष्परिणाम जाणा 
आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे जोखड झुगारून द्या !
      पुणे, १५ फेब्रुवारी - मगरपट्टा भागातील एका मॉलमध्ये साहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करणार्‍या एका तरुणीवर व्हॅलेंटाईन डेनिमित्त आयोजित केलेल्या मेजवानीत एका धर्मांधाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. फिरोज शेख असे या धर्मांधाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (आधीच लव्ह जिहाद करण्यासाठी आसुसलेल्या धर्मांधांना हिंदु मुलींना फसवण्यासाठी व्हॅलेंटाईन डेचे निमित्त मिळाले आहे. लव्ह जिहाद आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारी फसवणूक अशा दुहेरी संकटांचा सामना करण्यासाठी धर्मशिक्षण घेण्याला आणि देण्याला पर्याय नाही ! - संपादक)

तंत्रज्ञान-विज्ञानाच्या युगात गुरुकुलमसारख्या शिक्षणपद्धतीची आवश्यकता ! - मोहन भागवत

सरसंघचालकांच्या विधानाप्रमाणे भाजप शासनाने 
गुरुकुलमसारख्या शिक्षणपद्धत राबवण्यासाठी कृतीशील व्हावे, ही अपेक्षा !
      पिंपरी (पुणे), १५ फेब्रुवारी - जीवनाच्या संघर्षात आत्मविश्‍वासाने पुढे जाणारा माणूस घडवायचा असल्यास त्यासाठी प्रायोगिक शिक्षणपद्धती विकसित करावी लागेल. आजच्या तंत्रज्ञान-विज्ञानाच्या युगात कालसुसंगत आणि मूल्याधारित अशा गुरुकुलमसारख्या शिक्षणपद्धतीची आवश्यकता आहे. त्याला विरोध करणार्‍यांना आपले अस्तित्व संपण्याची भीती वाटते. विरोध करणार्‍यांनी आधी विज्ञान वाचावे; कारण विज्ञानाचा शेवट हिंदु संस्कृतीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रमशाळेच्या दशकपूर्तीनिमित्त १५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवात ते बोलत होते.

नेपाळमधील शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकवण्याची सिद्धता !

भारत शासनानेही ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा विरोध झुगारून 
देववाणी संस्कृत शिकवणे अनिवार्य करायला हवे !
    काठमांडू (नेपाळ) - नेपाळची राजधानी काठमांडू आणि इतर भागांतील खाजगी शाळांनी जगातील प्राचीन अन् समृद्ध अशी संस्कृत भाषा शिकवण्याची सिद्धता केली आहे.
१. जयतु संस्कृतम्, सत्मार्ग अभियान, जियर शैक्षणिक ट्रस्ट आणि नेपाळ विकास तरंगिणी या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावत शाळांत संस्कृत शिकवण्यासाठी आवश्यक अशी क्रमिक पाठ्यपुस्तके सिद्ध केली आहेत, अशी माहिती जियर फाऊन्डेशनचे श्री. वामन प्रसाद न्युपाने यांनी दिली आहे. 
२. शालेय स्तरावर संस्कृत भाषा शिकवण्यासाठी नेपाळमधील रूपक मेमोरियल शाळा, बागमती शाळा, डी.ए.व्ही. शाळा यांच्यासह ११ शाळांनी सिद्धता दर्शवली आहे, अशी माहिती जियर शैक्षणिक ट्रस्टचे उपाध्यक्ष कुमार अधिकारी यांनी दिली. 
३. रूपक मेमोरियल शाळेच्या प्राचार्या हेलन शर्मा म्हणाल्या की, अमेरिका आणि युरोप येथील शाळांनी संस्कृत शिकवण्यात रस दाखवला आहे; म्हणून आम्हीही तशी सिद्धता केली आहे. (यावरून संस्कृतचे अद्वितीयत्व सिद्ध होते ! - संपादक)
४. वर्ष १९९५ च्या पूर्वी नेपाळमधील सर्व खाजगी आणि शासकीय शाळांत संस्कृत भाषा शिकवणे अनिवार्य होते.

प्रत्येक स्त्री जिजाबाई झाल्यासच प्रत्येक घरी शिवबा जन्म घेईल ! - श्री योगेश महाराज साळेगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार

योग वेदांत सेवा समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटना
यांच्या संयुक्त विद्यमाने मातृ-पितृ दिवस साजरा
डावीकडून सौ. ज्योती इंगळे, श्री योगेश महाराज साळेगावकर, श्री. श्रीकांत पिसोळकर
     अमरावती - धर्माने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे, हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे. प्रत्येक स्त्रीने प्रथम स्वतः जिजाबाई बनण्याचा प्रयत्न करावा. तसे झाल्यासच प्रत्येक घरी शिवबाचा जन्म होईल. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी समाजाची भयावह स्थिती लक्षात घेऊन गेल्या दहा वर्षांपूर्वीच मातृ-पितृ पूजन दिवसाला प्रारंभ केला. आजच्या मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परभणी येथील राष्ट्रीय कीर्तनकार श्री योगेश महाराज साळेगावकर यांनी केले. योग वेदांत सेवा समिती, भगवा सेना, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या सर्व संघटना मिळून १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत स्थानिक ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मातृ-पितृ दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 
     या कार्यक्रमात ५ ते ७ माननीय वक्त्यांंचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर एक घंटा अनेकांनी आई-वडिलांचे पूजन केले.

(म्हणे) व्हॅलेंटाइन डे हा लव्ह जिहाद दिवस म्हणून साजरा करा ! - स्वामी अग्नीवेश यांचे धर्मद्रोही आवाहन

हिंदूंच्या महिलांचे शीलभंग करणार्‍या लव्ह जिहादचे उदात्तीकरण 
करणारे स्वामी अग्नीवेश यांचा वैचारिक आतंकवाद !
     मुंबई - देशात सध्या कुठल्याही प्रकारचा जिहाद अस्तित्वात नाही. हिंदुत्ववाद्यांना जिहादच्या विरोधात लढायची इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी स्त्री भ्रूणहत्या प्रथेच्या विरोधात लढावे. देशातील युवकांनी व्हॅलेंटाइन दिवस जात आणि धर्म यांचा भेद बाजूला सारत लव्ह जिहाद दिवस म्हणून साजरा करावा, असे विधान स्वामी अग्नीवेश यांनी केले. (लव्ह जिहाद अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे आहेत. असे असतांनाही त्याला विरोध करणे तर दूरच त्याला प्रोत्साहन देणारे स्वामी अग्नीवेश ! भगवे वस्त्र परिधान करून हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसणारे स्वामी अग्नीवेश यांच्यासारखे लोक हिंदूंसाठी अधिक धोकादायक आहेत. समस्त हिंदूंनी त्यांना बहिष्कृत करून त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक ! - संपादक) राष्ट्र्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांच्या ऑल इंडिया कौमी तंजिम संघटनेच्या वतीने मुंबईत जिहाद विरुद्ध आतंकवाद या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वामी अग्नीवेश बोलत होते. (मुसलमानांच्या कार्यक्रमात जाऊन हिंदूंनाच दूषणे देणारे स्वामी अग्नीवेश ! - संपादक)

आध्यात्मिकतेद्वारेच राष्ट्रनिर्माण होईल ! - डॉ. संबित पात्रा, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप

     म्हापसा - भारत म्हणजे सूर्य आहे. ज्ञानाने ओतप्रोत भरलेली भूमी आहे. जगाला दिशादर्शन करण्याची क्षमता भारतात आहे. राष्ट्रनिर्माण म्हणजे काही नवीन निर्मिती नाही. ऋषीमुनींच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिकता जगणारे नागरिक निर्माण झाले, तर राष्ट्रनिर्माण आपोआप होईल. भौतिक विकास नव्हे, तर आध्यात्मिक शक्तीने शुद्ध झालेल्या नागरिकांच्या मनतरंगांनीच खर्‍या अर्थाने राष्ट्रनिर्माण होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. संबित पात्रा यांनी गोव्यातील म्हापसा येथे राष्ट्रनिर्माणात आमचे दायित्व या विषयावर मंथन व्याख्यानमालेत बोलतांना केले.

गुरगाव (हरियाणा) येथे बहिणीसमवेत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार्‍या तरुणाला भावाने इमारतीवरून फेकून दिल्याने तरुणाचा मृत्यू !

हे आहेत पाश्‍चात्त्य डेज्च्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम !
      नवी देहली - व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी पोहोचलेल्या ईश्‍वर नामक तरुणाला मैत्रिणीच्या रमेश नावाच्या भावाने स्वतःचा वाहन चालक अनिलच्या साहाय्याने इमारतीच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. यात घायाळ झालेल्या ईश्‍वर याचा नंतर मृत्यु झाला. १४ फेब्रुवारीला रात्री हरियाणाच्या गुरगाव येथे ही घटना घडली. २७ वर्षीय ईश्‍वर मूळचा देहलीचा आहे. इमारतीतून खाली फेकल्यावर रमेश आणि अनिल यांनी ईश्‍वर याला गाडीत टाकून खांडसा मार्गावर नेले आणि रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे प्रकरण दाखल व्हावे, यासाठी त्याला रस्त्यावर फेकले.

लाच स्वीकारणार्‍या पलूस येथील दोन पोलिसांना एक दिवस पोलीस कोठडी !

     सांगली, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - पलूस येथे मद्याच्या एका दुकानाच्या व्यवसायासाठी त्रास द्यायचा नाही, तसेच कारवाई करायची नाही या कारणासाठी ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना साहाय्यक फौजदार भगवान मोरे, अणि हेड कॉन्स्टेबल मोहन चव्हाण या दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून अटक केली होती. या दोघांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी लाचेची रक्कम घेऊन पळून जाणार्‍या महेश भिलवडे (वाळवा) या पोलिसावरही गुन्हा दाखल असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असे विभागाचे उपअधक्षीक प्रदीप आफळे यांनी सांगितले.

शिवजयंती निमित्त वाघोली (जिल्हा धाराशिव) येथे पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचे हरिकिर्तन

      धाराशिव, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - जगदंब शिवजन्मोत्सव सार्वजनिक समिती वाघोली, जिल्हा धाराशिव येथे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते-पाटील यांचे ११ फेब्रुवारी या दिवशी हरिकीर्तन झाले. हे हरिकीर्तन
राजा छत्रपती ऐकावे वचना रामदास मन लावी वेगी ॥
तुला म्हणे राजा तुज असो कल्याणा सद्गुरु शरण रहि बापा ॥
या तुकोबांच्या अभंगावरती झाले.
      या वेळी पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांची भेट, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासांना शरण जाण्याचा उपदेश, संभाजी ब्रिगेडच्या खोट्या इतिहासाचे खंडण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा पुरावा देऊन केले.

नगर जिल्ह्यात वाळूतस्करी प्रकरणी गेल्या १० मासांत प्रशासनाकडून ७८३ वाहनांवर कारवाई

      नगर - येथील महसूल प्रशासनाने गेल्या १० मासांत वाळूतस्करी प्रकरणी ७८३ वाहनांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने ३ कोटी ७३ लक्ष २७ सहस्र रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. अवैधरित्या चालू असलेली वाळूवाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने पथके स्थापन केली; परंतु वाळूतस्करी थांबलेली नाही. वाळूतस्करी प्रकरणी संगमनेर उपविभागामध्ये सर्वांत अधिक कारवाई झाली असून जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांत ही कारवाई अत्यल्प झाली आहे. वाळूतस्करांकडून शासकीय कर्मचार्‍यांवर होणार्‍या आक्रमणांमुळे वाळूवाहतूक वाहनांवर कारवाई करण्यास कर्मचारी धजावत नाहीत. (वाळूतस्करी प्रकरणी मोठ्या कारवाया होत असूनही तस्करीचे प्रमाण अल्प न होणे, हे कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे लक्षण आहे. कायदा-सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासन प्रयत्न करेल का ? - संपादक)

संस्कृतीचे आचरण हेच समाजसुधारणेसाठी कारणीभूत ठरते - सौ. रूपा महाडिक

     सातारा - हिंदु संस्कृती महान आहे; परंतु सद्यस्थितीला समाजाकडून संस्कृती जतन करण्याऐवजी संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात हनन होत असल्याचे चित्र दिसत आहे. इतर धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते; मात्र हिंदूंना कुठेही धर्मशिक्षणाची व्यवस्था नाही. हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यानेच महान भारतीय संस्कृतीचे जतन होणार आहे. संस्कृतीचे आचरण हेच समाजसुधारणेसाठी कारणीभूत ठरते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. 
     विश्‍व हिंदू परिषदेच्या सातारा शहर शाखेच्या वतीने राजवाडा येथील समर्थसदनमध्ये हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर विश्‍व हिंदू परिषदेच्या सौ. पौर्णिमा जितेंद्र वाडेकर, सौ. शमिता शरद कुदळे, सनातन संस्थेच्या सौ. लिला अरुण निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

(म्हणे) हिंदु राष्ट्रासाठी शासन पाडण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञा, लेफ्ट. कर्नल पुरोहित

निरपराध्यांना मुक्त करण्याऐवजी त्यांना कारावासात 
अधिकाधिक ठेवण्याचा प्रयत्न करणारे केंद्रशासन ! 
आदींना पुन्हा लागू शकतो मकोका ! - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता अविनाश रसाळ
       नवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए)चे अधिवक्ता अविनाश रसाळ यांच्या म्हणण्यानुसार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्यासह १० जणांवर पुन्हा मकोका कायदा लावण्यात येऊ शकतो. आरोपी हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून होते आणि ते केंद्रशासनाला पाडू इच्छित होते. याच कारणाने त्यांच्यावर मकोका लावला जाऊ शकतो. या कारणामुळेच सप्टेंबर २०१५ पासून या वर्षीच्या जानेवारीपर्यंत या सर्व आरोपींच्या जामिनाचे २४ अर्ज फेटाळले गेले आहेत. एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या रसाळ यांच्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटले आहे. रसाळ यांनी हेही स्पष्ट केले की, या आरोपींवरील गुन्हे हटवण्याच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने रसाळ यांच्या या विधानांवर अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष अटळ आहे ! - पू. ब्रह्मानंदस्वामी

पू. ब्रह्मानंदस्वामी यांना समितीच्या कार्याची
माहिती सांगतांना श्री. राहुल कोल्हापुरे
     सातारा, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - देव, देश आणि धर्म यांची सद्यस्थिती अत्यंत वाईट असून स्वार्थी राजकारणामुळे समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु युवक पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाकडे झुकला आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हे ध्येय ठेवून हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे; मात्र हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष अटळ आहे, असे उद्गार श्री क्षेत्र कणूर (तालुका वाई) येथील मठाचे मठपती पू. ब्रह्मानंदस्वामी यांनी काढले. 
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. ब्रह्मानंदस्वामी यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हणमंत कदम, राहुल कोल्हापुरे आणि सौ. स्मिता भोज हेही उपस्थित होते.

खंडणी मागणार्‍या शिवाजीनगर पोलिसांवर गुन्हे नोंद करा ! - गृहराज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार

    इजलकरंजी, १५ फेब्रुवारी - पुतण्या आणि त्याचा मित्र यांना चोरीच्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन ५० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांवर गुन्हे दाखल करा, असे निवेदन श्री. अमर मोरे यांनी गृहराज्यमंत्री रणजित शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. 
    श्री. अमर मोरे यांनी गृहराज्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझा पुतण्या राहुल मोरे आणि त्याचा मित्र संकेत होगाडे यांना एका व्यायामशाळेत चोरी केल्याचे सांगून पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले. त्या व्यायामशाळेमधील सी.सी.टी.व्ही.मधील चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसून येत नसतांनाही दोघांना पोलिसांनी कह्यात घेऊन गुन्ह्याची स्वीकृती देण्यासाठी जबर मारहाण केली. यातून सोडवण्यासाठी ५० सहस्र रुपयांची मागणी केली. या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यास मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येईल.

संत तुकाराम महाराज, सप्तश्रृंगी, विठोबा आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आगीपासून सुखरूप

महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या व्यासपिठाला आग लागल्याचे प्रकरण 
      मुंबई - मेक इन इंडिया सप्ताहाच्या अंतर्गत १४ फेब्रुवारी या दिवशी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाचे संपूर्ण व्यासपीठ आगीत जळून खाक झाले; मात्र व्यासपिठाच्या समोरील बाजूला असणार्‍या संत तुकाराम महाराज, सप्तश्रृंगी, विठोबा आणि महालक्ष्मी यांच्या मूर्तींना आगीची जराही झळ पोहोचली नाही. त्यामुळे मूर्ती जशा आहेत, तशाच राहिल्या.

(म्हणे) नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे देशाच्या अखंडतेचा विश्‍वासघात ! - श्रीपाल सबनीस

बार्शीतील (जिल्हा सोलापूर) कर्मवीर व्याख्यानमालेत सबनिसांची मुक्ताफळे
     बार्शी (जिल्हा सोलापूर), १५ फेब्रुवारी - धर्माच्या नावाखाली अधर्म, सत्याच्या नावाखाली असत्य, समतेऐवजी विषमतेची पेरणी करू पहाणारी सनातनी शक्ती आज नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करू पहात आहे. देशात नथुराम गोडसेचे पुतळे किंवा मंदिर उभारले, तर तो देशाच्या अखंडतेचा सर्वात मोठा विश्‍वासघात होईल, अशी मुक्ताफळे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उधळली. बार्शी येथील शिवशक्ती बँकेच्या वतीने आयोजित कर्मवीर व्याख्यानमालेत ते बोलत होते. मानवतावादी प्रबोधन आणि परिवर्तनाची भूमिका या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय यादव, तहसीलदार बालाजी सोमवंशी आदी उपस्थित होते.

प्रखर हिंदुत्ववादानेच देशद्रोही घटना रोखणे शक्य ! - वैभव नाईक, आमदार, शिवसेना

कणकवली येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्री. वैभव नाईक, आमदार, शिवसेना
      कणकवली, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - कालपरवा देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या. प्रखर हिंदुत्वाचे आणि हिंदुजागृतीचे काम झाले, तरच अशा घटना रोखता येतील अन्यथा अशा घटना कणकवलीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही; म्हणून सर्वांनी अशा धर्मजागृती सभांना यायला हवे, असे आवाहन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. वैभव नाईक यांनी केले. कणकवली, सिंधुदुर्ग येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेस ते संबोधित करत होते. या धर्मजागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली होती. १४ फेब्रुवारी या दिवशी कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणात ही सभा झाली. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक आणि इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या संकेतस्थळाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिजीत देशमुख आणि सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर यांची उपस्थिती होती.

फलक प्रसिद्धीकरता

धनबाद (झारखंड) भारतात आहे कि पाकिस्तानात ?
     धनबाद जिल्ह्यातील नवाटांड गावात ५०० धर्मांधांनी हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर आक्रमण केले. तसेच मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या वेळी त्यांनी २४ घंट्यात गाव सोडा किंवा मरण्यास सिद्ध रहा अशी धमकी दिली. १० हिंदू गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Navatand (Dhanbad) me mandir bananeke karan, 500 dharmandhonka Hinduopar akraman. 10 Hindu ghayal.
Dadariko bada bananewali media ab chup kyon ?
जागो ! : नवाटांड (धनबाद) में मंदिर बनाने के कारण, ५०० धर्मांधों का हिन्दुआें पर आक्रमण. १० हिन्दू घायल.
दादरी को बडा बनानेवाली मीडिया अब चुप क्यों ?

प्रशासन, पोलीस आणि शिक्षण क्षेत्रात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदने

     शिराळा (जिल्हा सांगली), १५ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार श्री. उदय पवार, पोलीस निरीक्षक श्री. अनिल गुजर, गटशिक्षणाधिकारी श्री. मंद्रुपकर, तसेच महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदारांनी विषय चांगला असल्याचे सांगितले, तर पोलीस निरीक्षकांनी तुमच्या अभियानास आमचा पाठिंबा असून आम्ही तीन जणांवर कारवाई केली आहे, असे सांगितले. 
    या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. निखिल घोघावकर, हिंदु धर्माभिमानी श्री. अशोक मस्कर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजाराम मोरे, संतोष कुंभार उपस्थित होते.


मुंबईतील हुतात्मा स्मारक फोडले, तेव्हा पुरस्कार का परत केले नाहीत ? - अभिनेते शरद पोंक्षे

असहिष्णुतेचा डांगोरा पिटणारे या प्रश्‍नाचे उत्तर देतील का ? 
     पुणे, १५ फेब्रुवारी - असहिष्णुता वगैरे काही नसते. स्वागत आणि विरोध या दोन्ही प्रक्रिया घडत असतात. मुंबईतील हुतात्मा स्मारक फोडले, तेव्हा पुरस्कार का परत केले नाहीत ? मुळात पुरस्कार परत करून काही होत नसते. समाजात जे चुकीचे आहे, त्याविरुद्ध लेखणी चालवून निषेध करायला हवा. या देशात ८० प्रतिशत हिंदु आहेत, तरी हे हिंदु राष्ट्र नाही ? जगात सर्व धर्मांनी आपापल्या नावाचे राष्ट्र वाटून घेतले आहे. हे मी जाहीरपणे बोलत राहीन. त्यामुळे माझी हानी झाली, तरी चालेल, असे प्रतिपादन अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले.

श्री योग वेदांत सेवा समितीचा मातृ-पितृ पूजन दिवस भावपूर्ण वातारणात पार पडला

श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने शहरातून 
काढण्यात आलेली संकीर्तन यात्रा 
    सातारा, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेतून श्री योग वेदांत सेवा समितीच्या सातारा शाखेच्या वतीने १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी मातृ-पितृ पूजन दिवस भावपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील श्री योग वेदांत सेवा समितीचे साधक बहुसंख्येने उपस्थित होते. 
    कोरेगाव रस्त्यावर असणार्‍या श्री नटराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता श्री आनंदवाडी दत्त मंदिरापासून संकीर्तन यात्रेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. फोडजाई मंदिराजवळ संकीर्तन यात्रेचा समारोप झाला. श्री नटराज मंदिरामध्ये भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी श्री आशारामायणपाठ आणि आरतीचा कार्यक्रम पार पडला. आरतीनंतर प.पू. आसारामजी बापू यांचा व्हिडीओ सत्संग आणि श्री योग वेदांत सेवा समितीच्या सेवाकार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नंतर मातृ-पितृ पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पालखीतळ विकासासाठी ३५ कोटींचा निधी संमत

     पंढरपूर (जिल्हा सोलापूर) - तीर्थक्षेत्र देहू, आळंदी, भंडारदरा आणि श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळ विकासासाठी शासनाने १ सहस्र ९५ कोटींचा आराखडा संमत केला. यासाठी वर्ष २०१५-१६ अर्थसंकल्पात मूलभूत सुविधेसाठी ३५ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. विविध यात्रांच्या वेळी काढण्यात येणार्‍या पालखी सोहळ्यात वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी केलेल्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिल्याने भाविक समाधानी आहेत.

अमरावती येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने
आयोजित सभेच्या प्रसारानिमित्त रिक्शावर लावलेला फलक
     अमरावती - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार वेगात चालू आहे. सभेच्या प्रसाराचा प्रारंभ अमरावती येथील ग्रामदेवता श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी यांची ओटी भरून करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यात लहान-मोठ्या आकाराची होर्डिंग लावणे, हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठका घेणे, घरोघरी निमंत्रण देणे या माध्यमातून प्रसार केला जात आहे. सभेच्या अनुषंगाने शहरात २५ फेब्रुवारी या दिवशी भव्य वाहन फेरी काढण्यात येणार आहे.
अमरावती येथे हिंदु धर्मजागृती सभा
दिनांक : २८ फेब्रुवारी २०१६
स्थळ : श्री गाडगेबाबा मंदिराच्या समोरील मैदान, गाडगेनगर, अमरावती.
वेळ : सायंकाळी ५.३०

पत्रकारितेचे क्षेत्र स्वच्छ करणार का ?

      राज्याचे महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी जळगावमधील एका भाषणात जाहीरपणे सांगितले की, आज वृत्त छापून येण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पैशांची पाकिटे देऊन खूश केल्याशिवाय वृत्तपत्रांत वृत्त छापली जात नाहीत आणि मी स्वत: अनेकदा अशी पाकिटे पत्रकारांना दिली आहेत. असे सांगून खडसे यांनी सध्याच्या पत्रकारांचे जाहीर धिंडवडे काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा कोणीही साधा निषेध केला नाही कि त्याविरुद्ध ब्र काढला नाही; कारण खडसे हे खरेच बोलत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

हिंदुस्थानवरील मुसलमान आक्रमक आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले हिंदू राजे अन् राजकन्या

१. मोगल काळात हिंदूंवर झोलेले नृशंस अत्याचार !
     सहस्रो वर्षे ज्या भूमीकडे वाकड्या दृष्टीने कुणी पाहू शकले नव्हते, त्या भूमीवर वर्ष ७११ मध्ये सिंध प्रांतात जे आक्रमण झाले, ते महाभयंकर होते. त्या वेळी दाहीर राजा सिंध देशाचा अधिपती होता. राजा मारला गेला. राणीने जोहार केला. राजवाडा उद्ध्वस्त झाला. येणारे लोक आमच्यापेक्षा शूर होते असे नाही. त्यांची शस्त्रे आमच्यापेक्षा श्रेष्ठ असतीलही कदाचित; पण त्यांनी जी दहशत निर्माण केली, तिला तोड नव्हती. सहस्रावधी सशस्त्र लोक गावागावांतून शिरले. पूर्वी युद्धे रणांगणांवर होते. सशस्त्र लोक सशस्त्रांशी लढत. या आक्रमक, क्रूर, नृशंस लोकांनी स्त्रिया, मुले, वृद्ध यांनाही रहात्या घरात सपासफ कापून काढले. देवळे तोडली. मूर्ती फोडल्या. वेदशाळा उद्ध्वस्त केल्या. तरुण स्त्रियांवर बलात्कार केले. महाभीषण अत्याचार केले. माणूस इतका क्रूर असू शकतो, हे भारतीय संस्कृतीला ठाऊक नव्हते. या राक्षसी आक्रमणाने सारा समाज भयकंपित झाला. त्यामुळे आक्रमकांना सारे रान मोकळे मिळाले.
     त्यातच बौद्ध मताच्या अहिंसा विचाराचा अतिरेक झाल्याने सैन्यसुद्धा युद्ध करण्यात कच खाऊ लागले. सिंध पराभूत झाले. रक्तपिपासू नरराक्षसांचा नंगानाच रक्तबंबाळ भूमीवर थयथयाट करत होता. भारताच्या पश्‍चिम क्षितिजावर अमंगल हिंदुद्वेषी यवनांचा अशा प्रकारे प्रवेश झाला. आमचे सद्गुणच आमचे दुर्गुण ठरले.
- प्रा. सु.ग. शेवडे

इशरतचे नाव असलेल्या रुग्णवाहिन्या जाळण्याची चेतावणी ! - मनसे

रुग्णवाहिकांना आतंकवाद्यांचे नाव दिले जाणे, असे केवळ भारतातच होऊ शकते ! 
अशा भारतियांची आतंकवादाला तोंड देण्याची मानसिकता कधी तरी सिद्ध होईल का ?
      ठाणे - इशरत जहाँच्या नावाने ठाण्यात फिरणारी रुग्णवाहिका दिसेल तिथे जाळण्यात येईल, अशी चेतावणी मनसेने दिली आहे. ठाण्यात मुंब्रा फाऊंडेशनच्या वतीने इशरतच्या जहाँच्या नावाने रुग्णालय सेवा चालू आहे. मनसेने त्याला आता विरोध केला आहे. ठाणे मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही चेतावणी दिली आहे.

जलतज्ञ मुकुंद धाराशिवकर यांचे हृदयविकाराने निधन

     धुळे - प्रसिद्ध जलतज्ञ, साहित्यिक त्याचप्रमाणे अभ्यासू अभियंता मुकुंद धाराशिवकर यांचे १३ फेब्रुवारीला पहाटे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६९ वर्षांचे होते. पाणी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. जल विज्ञान आणि स्थापत्य या विषयांचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखनामुळे त्यांना शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे सनातनच्या कार्याला सहकार्य लाभले. त्यांच्या पश्‍चात्त पत्नी मीरा धाराशिवकर, मुलगा गंधार आणि मुलगी गांधाली असा परिवार आहे. सनातन परिवार धाराशिवकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

(म्हणे) मी कोणाचेही समर्थन केलेले नाही ! - आतंकवादी हाफीज सईदचा दावा

      नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोही घोषणाबाजीला हाफीज सईद याचे समर्थन होते, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. त्यावर हाफीज सईद याने एक चलचित्र प्रसारित करून दावा केला आहे की, मी या प्रकरणात ट्वीटच्या माध्यमातून काहीही म्हटलेले नाही. (मुंबई आणि पठाणकोट येथील आक्रमण केल्याचेे फेटाळणारा आतंकवादी कधीतरी खरे बोलेल का ? - संपादक)

हरिपूर-कोथळी पुलासाठी नाबार्डमधून १४.९८ कोटी रुपयांची तरतूद - आमदार गाडगीळ

      सांगली, १५ फेब्रुवारी (वार्ता.) - हरिपूर-कोथळी पुलाची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. यासाठी नाबार्डकडून १४.९८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. येत्या अर्थसंकल्पातही याची तरतूद केली जाईल. या पुलामुळे सांगली-कोल्हापूरचे अंतर दहा किलोमीटरने अल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे हरिपूर तीर्थक्षेत्र विकासात मोलाचे साहाय्य होईल, अशी माहिती भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी दिली.
      या संदर्भात आमदार श्री. गाडगीळ म्हणाले, हा पूल होण्यासाठी ३५ वर्षांपासून मागणी होती. अनेकांनी पाठपुरावा करूनही प्रश्‍न मार्गी लागला नाही. ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केल्यावर मी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पुढील काम चालू झाले. जूनच्या कालावधीत बांधकामास प्रारंभ होईल आणि दोन वर्षांत काम पूर्ण होईल. या पुलामुळे कोल्हापूर येथील अंतर अल्प होण्यासमवेत शेतीपूरक व्यवसायास चालना मिळेल.

गडचिरोली येथे व्हॅलेंटाइन डेच्या अपप्रकारांविरुद्ध महाविद्यालयांत निवेदन !

     गडचिरोली - येथे व्हॅलेंटाइन डेला होणार्‍या अपप्रकारांविरुद्ध निवेदन देण्यात आले. व्हॅलेंटाईन डेला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत संस्कृतीरक्षणाचे उपक्रम राबवण्यात यावेत यासाठी हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील शाळा-महाविद्यालयांत निवेदन दिले. या वेळी सौ. प्रगती मामीडवार, सर्वश्री विजय मडावी, गुड्डू कासर्लावर, राकेश नैताम, समर हाजरा आणि सौ. तिलोत्तमा हाजरा उपस्थित होते. शिवकृपा महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, महिला महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन देण्यात करण्यात आले.

सनातनचे पू. गुरुनाथ दाभोलकरकाका (वय ७५ वर्षे) यांचा हिंदु बांधवांसाठी प्रेरणादायी संदेश !

१. केवळ हिंदु बांधवांची स्मृती चाळवण्यासाठी पुढील वृत्ते देऊन भारताच्या कानाकोपर्‍यांतील 
धर्मांधांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणावरून प्राणघातक आक्रमणे होत असल्याने सद्यस्थिती 
लक्षात आणून देणे 
पू. गुरुनाथ दाभोलकर
अ. १ जून २०१५ - नांदेड येथे दंगलखोर धर्मांधांचे पोलिसांवरच आक्रमण. पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलीस घायाळ. धर्मांधांनी दुकाने लुटली. ए.टी.एम्. कक्ष फोडला. लक्षावधींची हानी. किरकोळ कारणांवरून दंगल.
आ. ६ जून २०१५ - कोलकाता, येथील बर्धमान (बंगाल) येथे सहस्रावधी धमार्र्ंधांकडून हिंदूंवर आक्रमण. हिंदूंची घरे पेटवली. हिंदूंची वहाने चोरली. दुकानांची लूट. धमार्र्ंधांनी एका दुकानातून खरेदी केलेल्या साहित्याचे मूल्य दुकानदाराने मागितल्यावर लुटालूट आणि जाळपोळ. ३० घरे पेटवली.
इ. ३० जून २०१५ - धरणगाव (जळगाव) येथे हिंदूंच्या नामफेरीवर धर्मांधांचे आक्रमण ! महिलांसह तरुणांना अमानुष मारहाण !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याशी संबंधित 
वृत्ते आणि लेख प्रसिद्ध झालेली नियतकालिके संग्रहासाठी पाठवण्याची कार्यपद्धत !
       सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याशी संबंधित वृत्ते आणि लेख नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होतात. संस्था आणि समिती यांच्या प्रसारकार्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुढील प्रसार, संग्रह आणि लेखा पडताळणीसाठी ही वृत्ते स्थानिक स्तरावर आणि मुख्य कार्यालयात कशा प्रकारे जतन करावीत, याचा तपशील पुढील सारणीमध्ये दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या प्रसिद्धीसेवकांनी या सेवेचे नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात प्रसिद्धीसेवक नाहीत, तेथे ही सेवा करण्यासाठी जिल्हासेवकांनी उत्तरदायी साधकाची निवड करावी.
        जिल्हासेवकांनी आपल्या जिल्ह्यात पुढील तपशीलानुसार नियोजन होते आहे ना, याचा आढावा घ्यावा.
नियतकालिके जतन करण्याची आणि 
मुख्य कार्यालयात पाठवण्याची कार्यपद्धत !
१. ही नियतकालिके साधक, वर्गणीदार अथवा हितचिंतक यांच्याकडे सहज उपलब्ध होत असल्यास त्यांच्या वापरातून घेण्यास प्राधान्य द्यावे.
२. अशा प्रकारे अंक उपलब्ध होत असल्यास त्याच दिवशी घेण्याची घाई न करता दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडून घ्यावा.
३. महत्त्वाच्या आवश्यक परिस्थितीमध्ये अंक त्याच दिवशी विकत घेऊ शकतो.
४. बातमी स्कॅन करून पाठवण्यास अडचण असल्यास नियतकालिकाच्या संगणकीय आवृत्तीवरून बातमीची फोटो इमेज अथवा पीडीएफ धारिका पाठवता येईल.
५. वरील नियतकालिके / कात्रणे पुढील पत्त्यावर साधकांसमवेत अथवा अन्य पाकिटांसह पाठवावीत. वेगळे टपाल किंवा कुरीअर यांच्याकरता व्यय (खर्च) करू नये.
      श्री. शिवाजी वटकर यांच्या नावे सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद पोस्ट ओएन्जीसी, ता. पनवेल, जि. रायगड - पिन ४१०२२१
संपर्क क्रमांक : ९४०४९५६१११ (बीएस्एन्एल गट) किंवा ०८४५१००६१११ (एअरटेल गट)
संगणकीय पत्ता : hjs.karya@gmail.com
६. यापुढे पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार सदर नियतकालिके अथवा बातम्या श्री. यज्ञेश सावंत, देवद अथवा श्री. भानु पुराणिक, रामनाथी यांच्या नावे पाठवू नयेत.
७. या सेेवेसंदर्भात काही अडचण असल्यास अथवा अधिक माहितीसाठी श्री. शिवाजी वटकर यांच्याशी संपर्क साधावा.

पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांना व्यष्टी साधनेचा आढावा देतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. पू. दाभोलकरकाकांच्या सांगण्यात सहजता, तळमळ, चैतन्य आणि 
भाव असल्यामुळे सकारात्मकता वाढून स्फूर्ती मिळणे
     मागील सहा मासांपासून (महिन्यांपासून) मला पू. दाभोलकरकाकांना व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची संधी मिळत आहे. ते आम्ही सांगितलेले सर्वकाही शांतपणे ऐकून घेतात. मला जे आवश्यक आहे, ते मोजक्या शब्दांत मार्गदर्शन करून माझ्या चुका आणि स्वभावदोष निदर्शनास आणून देतात. त्यांच्या सांगण्यात सहजता, तळमळ, चैतन्य आणि भाव असतो. त्यामुळे माझी सकारात्मकता वाढून मला स्फूर्ती मिळते. 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालसाधकांमध्ये झालेले पालट आणि छायाचित्रे प्रत्येक २ वर्षांनी संकलन विभागाला पाठवा !

     उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ज्या बालसाधकांची आध्यात्मिक पातळी यापूर्वी काढलेली आहे, त्यांच्या पालकांनी त्याचे वय २० वर्षे होईपर्यंत प्रत्येक २ वर्षांनी त्याच्या गुण-दोषांमध्ये झालेले, तसेच इतर पालट sadhak.pragati@gmail.com या पत्त्यावर किंवा पोस्टाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवावेत.
      हे लिखाण बालसाधकांच्या वयानुसार असावे. त्यासमवेत त्या काळातील छायाचित्रही पाठवावे, जेणेकरून बालसाधकात वयपरत्वे होणार्‍या पालटांचा अभ्यास करता येईल.
ज्या साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे, असे वाटते, त्या साधकांची 
आणि बालसाधकांची छायाचित्रे २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत संकलन विभागाला पाठवा !
      दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी बालसाधकांची अथवा ज्या साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे, असे वाटते, त्यांच्याविषयीचे लिखाण संकलन विभागाला पाठवले जाते. काही साधकांची/बालसाधकांची छायाचित्रे छापण्यायोग्य नसल्याने जिल्हासेवकांना संपर्क करून त्या साधकांची/बालसाधकांची चांगली छायाचित्रे पुन्हा पाठवण्याच्या संदर्भात संकलन विभागातील साधकांना अनेक वेळा पाठपुरावा करावा लागतो. ज्या साधकांची आणि बालसाधकांची छायाचित्रे पाठवायची राहिली असतील, त्यांनी ती २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत संकलन विभागाला पाठवावीत. तोपर्यंत छायाचित्रे न मिळाल्यास ते लिखाण दैनिकात प्रसिद्ध केले जाणार नाही.
पोस्टाचा पत्ता : श्री. अमोल बधाले सनातन आश्रम, २४ / बी, रामनाथी बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१
ई-मेल : sankalak.goa@gmail.com

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली फोंडा, गोवा येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ईश्‍वरी हजारे (वय ६ वर्षे) !

कु. ईश्‍वरी हजारे
      माघ शुक्ल पक्ष नवमी (१६.२.२०१६) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. ईश्‍वरी हजारे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
कु. ईश्‍वरी हिला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
१. उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
१ अ. यज्ञवेदीतून ५ देवता बाहेर येत आहेत, अशा आशयाचे चित्र रेखाटून त्या साधकांना आशीर्वाद द्यायला आल्या आहेत, असे सांगणे : रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ झाला. तेव्हा यज्ञाच्या दुसर्‍या दिवशी ईश्‍वरी तिच्या वडिलांसमवेत आश्रमात गेली होती. त्या वेळी थोडा वेळच यज्ञाच्या ठिकाणी जाऊन आली आणि घरी आल्यावर तिने यज्ञाच्या ठिकाणचे वर्णन करणारे चित्र काढले. त्यात तिने यज्ञवेदीतून ५ देवता बाहेर येत आहेत, असे दाखवले होते. त्या देवता साधकांना आशीर्वाद द्यायला आल्या आहेत, असे तिने सांगितले.

स्वतः धर्माचरण करून इतरांना धर्माचरण करण्यास शिकवणारी यवतमाळ येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अनुष्का जयंत करोडदेव (वय १० वर्षे) !

कु. अनुष्का करोडदेव
     माघ शुक्ल पक्ष सप्तमी (१४.२.२०१६) या दिवशी यवतमाळ येथील कु. अनुष्का जयंत करोडदेव हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि मावशी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणात संतांचा सत्संग मिळणे आणि सत्मध्ये रहाणे : कु. अनुष्काच्या वेळी गर्भारपणात ८ व्या मासात मला तीन दिवसीय कार्यशाळेत पू. देशपांडेकाकांच्या सत्संगाचा लाभ मिळाला, तसेच प्रसूती होईपर्यंत माझी सेवा चालू होती. माझा नामजप, प्रार्थना आणि ग्रंथवाचन नियमितपणे होत असे. तेव्हा सतत प्रार्थना व्हायच्या, चांगले बाळ जन्माला येऊ दे. माझी प्रसूती नैसर्गिकरित्या झाली. 
- सौ. सोनल जयंत करोडदेव (कु. अनुष्काची आई), यवतमाळ

मनमिळाऊ, कष्टाळू आणि परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या सौ. राधा आणि शांत, स्थिर आणि अनासक्त असलेले श्री. रवींद्र साळोखे !

     रथसप्तमी म्हणजेच, माघ शुक्ल सप्तमी (१४.२.२०१६) या दिवशी श्री. रवींद्र आणि सौ. राधा साळोखे यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. त्या निमित्ताने श्री. रवींद्र यांना सौ. राधा यांची, तर सौ. राधा यांना श्री. रवींद्र यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
सौ. राधा साळोखे
१. परिस्थितीला धिराने सामोरे जाणे
     राधाची आई वर्ष २००८ मध्ये, तर वडील वर्ष २०१० मध्ये वारले. तेव्हापासून काही कारणास्तव ती एकटीच शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत होती. या काळात तिची आर्थिक स्थिती चांगली नव्हती; पण या स्थितीलाही ती एकटी धैर्याने सामोरी गेली. कौटुंबिक पाठबळ नसतांनाही ती त्या परिस्थितीशी सकारात्मकतेने लढली.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी आश्रमावर सर्वांत उंच ठिकाणी कळसाची स्थापना करण्यापूर्वी केलेल्या शिखर कळसपूजन विधीचे सूक्ष्म परीक्षण

कु. संध्या माळी
१. शिवतत्त्वाच्या मारक कणांमुळे वातावरणातील रज-तम अल्प होऊन जिवाच्या शरिरातील सात्त्विकतेचे प्रमाण वाढणे : कळस पूजनाच्या प्रारंभी वातावरणात राखाडी रंगाचे शिवतत्त्वाचे मारक कण पसरले. त्यामुळे वातावरणातील रज-तम अल्प झाले. त्यानंतर राखाडी रंगाचे शिवतत्त्वाचे मारक कण जिवाच्या श्‍वासावाटे त्यांच्या शरिरात जात असल्याचे जाणवले. त्यामुळे जिवाच्या शरिरातील सात्त्विकतेचे प्रमाण वाढत असल्याचे जाणवले. त्या वेळी माझ्या डोक्याभोवती निळ्या रंगाच्या शिवतत्त्वाच्या मारक लहरी गोल फिरत असल्याचे दिसले. त्या वेळी मला शांत वाटून ध्यान लावावेसे वाटले. 

साधकांनो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ वितरणावर अधिकाधिक भर देऊन धर्मप्रसाराच्या अमूल्य संधीचा लाभ घ्या !

७.३.२०१६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे देत आहे. 
१. साधकांनो, ग्रंथविक्रीसाठी तळमळीने प्रयत्न करून 
सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !
     अखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा असणार आहे. 
     महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक ग्रंथविक्री करण्यासाठी साधकांनी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी जास्तीतजास्त ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे उत्तरदायी साधकांनी पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनावर ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा वेगळा डिस्प्ले करू शकतो

धर्मशिक्षणवर्ग घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांंनी आपली नावे कळवावीत !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि धर्मशिक्षणवर्गात नियमित येणार्‍या धर्मप्रेमींना नम्र विनंती !
     सद्यस्थितीत समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे बीज पेरण्यासाठी ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. विविध जिल्ह्यांत पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभांमधून अनेक जिज्ञासू आपल्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मोठ्या प्रमाणात मागणीही करत आहेत; परंतु वर्ग घेऊ शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत असल्याने बर्‍याच ठिकाणी अजूनपर्यंत वर्ग चालू झालेले नाहीत. राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत लवकरात लवकर पोचता यावे, यासाठी वर्ग घेण्यास इच्छुक असलेल्या आणि नियमितपणे वर्गात उपस्थित असणार्‍या धर्मप्रेमींनी स्थानिक साधकांना, तर इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांना आपली नावे कळवावीत. 
     धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी नवीन साधक सिद्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हासेवकांनी इच्छुक साधक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी फेब्रुवारी मासात कार्यशाळा घेण्याचे आयोजन करावे. 
     स्वभाषा, संस्कृती आदींचा अभिमान वाढवणार्‍या धर्मशिक्षणामुळे राष्ट्र अन् धर्म अधिक बळकट होतात, हे लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग घेण्याच्या सेवेत सहभागी व्हा !

आश्रमाला कळस लावल्याने मंदिराचे स्वरूप येऊन ते जागृत देवस्थान होईल आणि ते भगवान विष्णूचे वैकुंठधाम झाले असल्याचे आईने सांगणे

सौ. विमल माळी
     महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कळसांचे पूजन झाल्यावर मी माझी आई सौ. विमल माळी (चाळीसगाव, जि. जळगाव) यांना भ्रमणभाषवरून विचारले, आश्रमाच्या वर कळसाची स्थापना का करणार ? त्या वेळी आईने सांगितले, आश्रमावर कळसाची स्थापना केल्यामुळे आश्रमाला पूर्णत्व प्राप्त होऊन आश्रम म्हणजे मंदिर होईल, असे महर्षीना सांगायचे असेल. प.पू. गुरुदेव ईश्‍वराचे अंशावतार आहेत; म्हणून सनातनच्या आश्रमाला मंदिराचे स्वरूप येऊन ते आता जागृत देवस्थान होईल. सनातनच्या रामनाथी आश्रमात देव (प.पू. गुरुदेव) सगुण रूपाने रहात आहे. त्यामुळे आश्रम आता भगवान विष्णूचे वैकुंठधाम झाले. शरीर असूनही आणि जिवंत असूनही साधकांना वैकुुंठप्राप्ती झाली आहे. त्यासाठी श्रीविष्णूरूपी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता व्यक्त करूया.
- कु. संध्या माळी, सनातन, आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं देखता । गरीबका साथ नहीं देता । 
लखपतीके घर नहीं जाता । धनवानके घर रहता हूं ।
भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करीत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

पतंजलीचा आदर्श प्रवास !

संपादकीय 
   मुंबईत मेक इन इंडियाचा गजर चालू आहे. भारताने उद्योगाविषयी स्वयंपूर्ण बनावे, ही पंतप्रधांनांची इच्छा असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचे हे स्वप्न योगऋषी रामदेवबाबा पतंजलीच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत ! १५० वर्षांपूर्वी इस्ट इंडिया कंपनी आली आणि तिने भारताला लुटले, तर आज ५ सहस्रांहून अधिक विदेशी आस्थापने भारताला लुटत आहेत. याला प्रतिबंध बसावा आणि देशातील पैसा देशकार्यासाठीच वापरला जावा, या उद्देशाने रामदेवबाबांनी पतंजलीच्या माध्यमातून विविध उत्पादने आणली.

आपची वर्षपूर्ती : अपरिपक्वतेचा प्रवास !

संपादकीय
    न भूतो न भविष्यती, असे ज्या विजयाचे वर्णन केले जाते त्या देहलीत अरविंद केजरीवाल यांच्या आपची सत्ता येऊन एक वर्ष झाले. ज्या मोठ्या अपेक्षेने आप आपल्या समस्या सोडवेल, अशा अपेक्षांनी देहलीकरांनी आपच्या पारड्यात ७० पैकी ६७ जागा टाकल्या, त्याकडे लक्ष दिल्यास वर्षभरात विशेष काही लाभ झाला असे आपकडे सांगण्यासारखे काहीच नाही. हिंदुत्वाला विरोध हा एकच ध्यास त्यांनी वर्षभर या ना त्या निमित्ताने ठेवला आणि सगळी सत्ताकेंद्रे स्वत:च्या हातात हवीत, या अट्टाहासापोटी-हव्यासापोटी देहलीच्या राज्यपालांसमेवत सातत्याने संघर्ष केला. त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही ! वर्षभरात देहलीतील अधिकार्‍यांच्या नियुक्त्यांचे प्रकरण असो, देहलीतील स्वच्छता कर्मचार्‍यांचा संप असो, मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या कार्यालयावर सीबीआयच्या धाडीचे प्रकरण असो अथवा अधिकार्‍यांना वाढीव अधिकार देण्याचे प्रकरण असो. प्रत्येक वेळी देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अपरिपक्वता आणि आततायीपणाच समोर आला !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn