Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 
 सनातनचे पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांचा आज वाढदिवस

आजचे दिनविशेष


  • रथसप्तमी
  • सूर्यनमस्कारदिन
पूज्यपाद संतश्री आसारामजी
बापू प्रणीत मातृ-पितृ पूजनदिन
या दिनविशेषांविषयीची माहिती वाचा


देशविरोधी घोषणा देणार्‍यांमध्ये भाकपचे नेते डी. राजा यांची मुलगी !

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांना अटक
साम्यवाद्यांचा देशद्रोह !
नवी देहली - भारताविरुद्ध घोषणाबाजी करणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला अटक केल्याच्या निषेधार्थ इंदिरा गांधी कला केंद्र येथे आंदोलन करणार्‍या सात विद्यार्थ्यांना १३ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे.
९ फेब्रुवारीला देशद्रोही घोषणाबाजी करणार्‍या २० विद्यार्थ्यांची सूची देहली पोलिसांनी घोषित केली आहे. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांच्या मुलीचाही समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाकपचे नेते सीताराम येच्युरी यांच्याशी चर्चा केली आहे. भारतविरोधी घोषणा देणार्‍या आणि देशाची एकता अन् अखंडता यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍यांना क्षमा केली जाणार नाही, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

मालीमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

बमाको - उत्तर मालीतील एका अशांत भागात धर्मांधांच्या आक्रमणात संयुक्त राष्ट्रांच्या ६ शांती सैनिकांसह ९ सैनिक ठार, तर ३० जण घायाळ झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी माली शासनाला समर्थन असल्याचे घोषित केले.


काँग्रेस शासनाने इशरत आतंकवादी असल्याची माहिती लपवली !

गुप्तचर विभागाच्या माजी संचालकांचा गौप्यस्फोट
नवी देहली - इशरत जहाँ ही आतंकवादी असल्याची माहिती काँग्रेस शासनाने लपवली होती, असा गौप्यस्फोट गुप्तचर विभागाचे माजी संचालक राजेंद्रकुमार यांनी एका इंग्रजी दैनिकात दिलेल्या मुलाखतीत केला. (साध्वी प्रज्ञासिंह यांना आतंकवादी ठरवणारी काँग्रेस जिहादी आतंकवाद्यांना मात्र निरपराध ठरवते ! राजेंद्रकुमार यांच्या या गौप्यस्फोटावरून भाजप शासनाने संबंधितांवर कारवाई करावी ! - संपादक)
मोदी शासनाला लक्ष्य करण्यासाठीच ही माहिती दडपण्यात आली होती, तसेच हे प्रकरण हाताळणारे सहसंचालक लोकनाथ बेहरा यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रामाणिक अधिकार्‍याला त्रास देण्यासाठी त्यांना केरळमध्ये पाठवण्यात आले. गुजरातमधील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून तसे करण्यात आले होते; मात्र मी त्याचे नाव सांगणार नाही, असेही राजेंद्रकुमार यांनी सांगितले.

देहलीतील राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालय आतंकवाद्यांचे लक्ष्य होते ! - हेडली

मुंबई - पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय आणि लष्कर-ए-तोयबा यांच्याप्रमाणे अल् कायदा या आतंकवादी संघटनेलाही भारतात घातपाती कारवाया करायच्या होत्या, तसेच भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची एक फळीच नष्ट करण्याच्या हेतूने देहलीतील राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालयाला या आक्रमणासाठी लक्ष्य करण्यात आले होते, अशी माहिती २६/११ च्या आक्रमणाचा सूत्रधार डेव्हिड हेडली याने १३ फेब्रुवारीला विशेष न्यायालयासमोर दिली. हे आक्रमण केले, तर भारत-पाक युद्धापेक्षाही अनेक पटींनी सैनिकी अधिकार्‍यांची जीवितहानी घडवता येईल, हा त्यामागचा हेतू होता, असेही हेडलीने सांगितले. त्याने पुण्यातील लष्करी तळाची रेकी केली होती. तो म्हणाला, "अल् कायदाचा अफगाणिस्तानातील प्रमुख इलियास काश्मिरी याने भारतात जाऊन काही ठिकाणांची पाहणी करण्यास मला सांगितले होते. देहलीतील राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालय, पुष्कर, गोवा आणि पुण्यातील छाबाड हाऊस आदी ठिकाणांचा त्यात समावेश होता."

काश्मीरमधील चकमकीत २ सैनिक हुतात्मा, तर ५ आतंकवादी ठार !

जिहादी आतंकवादापासून भारत केव्हा मुक्त होणार ?
श्रीनगर - कुपवाडा जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला सकाळी सैनिक आणि जिहादी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले, तर ४ सैनिक घायाळ झाले आहेत. सैनिकांनी ५ आतंकवाद्यांना ठार केले आहे. घायाळ झालेल्या सैनिकांमध्ये एका सैन्याधिकार्‍याचाही समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील मरसारी गावात आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सैनिकांनी शोधमोहीम चालू केली होती. राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दल, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांना कळवण्यात येईल ! - जिल्हाधिकारी

व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात घोषणा देतांना धर्माभिमानी
बेळगाव, १३ फेब्रुवारी (वार्ता.) - 'व्हॅलेंटाईन डे'च्या नावाखाली तरुण तरुणी अपप्रकार करू लागले आहेत. हे अपप्रकार रोखण्यात यावेत. तसेच 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये मातृ-पितृ दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे १२ फेब्रुवारीला करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. एन्. जयराम यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत त्यांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कुठेही अपप्रकार होत असतील, तर पोलिसांना कळवून अपप्रकार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करायला सांगितले जाईल, असे आश्‍वासन दिले.
या वेळी धर्माभिमानी सर्वश्री व्यंकटेश शिंदे, सदानंद मातेकर, गोपीनाथ महांगावकर, दशरथ पालेकर, चैतन्य नंदगडकर, कर्तव्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. आक्काताई सुतार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री गिरीश कुलकर्णी, सुधीर हेरेकर, सनातन संस्थेचे सर्वश्री अक्षय भंडारी, बापू सावंत आदी उपस्थित होते.

धारमध्ये अप्रसन्न हिंदूंकडून रा.स्व. संघाच्या कार्यालयावर दगडफेक !

धार (मध्यप्रदेश) - शुक्रवार, १२ फेब्रुवारीला भोजशाळेत हिंदूंना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देण्यात आली नाही. त्यामुळे हिंदूंना भोजशाळेबाहेर होमहवन आणि पूजा करावी लागली. यासाठी काही हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी ठरवत संघाच्या येथील कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना १३ फेब्रुवारीला घडली आहे. या दगडफेकीत कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, तसेच धारचे भाजपचे माजी आमदार जसवंत राठोड यांच्या काशी बाग संकुलातील त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली.

देशात पूर्णत: कडेकोट सुरक्षा असून कोणत्याही प्रकारच्या आतंकवादाचा धोका नाही. - केंद्रीय गृहंमत्री राजनाथ सिंह

केंद्रीय गृहमंत्र्यांचा निरर्थक आशावाद !
     देशात अधिकांश आतंकवादी आक्रमणे पाकिस्तानी सीमेतून होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने जर आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली, तर दोन्ही देशांसह संपूर्ण दक्षिण आशियात शांतता नांदेल. भारत आतंकवाद्यांच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करील. सर्वांचा विकास करणे, ही भारताची संरक्षणनीती आहे. कोणत्याही निरपराध्यावर अन्याय होऊ नये आणि कोणताही गुन्हेगार सुटू नये, असे आम्हाला वाटते. आतंकवादाला कोणताही धर्म नसतो.
    जिहादी आतंकवाद्यांना जगात इस्लामी राजवट आणायची आहे, हे जगजाहीर झाले असतांना आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो, यावर कुणी विश्‍वास ठेवील का ?

इंग्लंडमध्ये सश्रद्ध हिंदू आहेत सर्वाधिक सुखी लोक !

देवाला रिटायर करा ! अशी बाष्कळ बडबड करणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
ऊठसूट हिंदु धर्मावर टीका-टिप्पणी करणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे ? 
     २ फेब्रुवारी २०१६ या दिवशी इंग्लंडमधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
१. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, आस्तिक लोक हे नास्तिकांपेक्षा अधिक सुखी आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
२. विविध धर्मीय लोकांचा विचार केल्यास, हिंदू सर्वाधिक सुखी आहेत. सुखाच्या उतरत्या क्रमाने हिंदूंनंतर ख्रिस्ती, शीख, बौद्ध, ज्यू आणि शेवटी मुसलमान लोकांचा क्रमांक लागतो, तर नास्तिकांचा क्रमांक यानंतर लागतो.
३. हे सर्वेक्षण इंग्लंडमधील तीन लाख लोकांचे विचार लक्षात घेऊन केले गेले. वर्ष २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालखंडात हे सर्वेक्षण करण्यात आले.
४. हे सर्वेक्षण सुख, जीवनाविषयी समाधान (लाइफ सॅटिस्फॅक्शन), केलेली कृती चांगली झाल्याविषयीची भावना (वर्थव्हाइल) आणि काळजी या चार निकषांच्या आधारे करण्यात आले.

अमरनाथ यात्रेचा अल्प केलेला कालावधी म्हणजे हिंदूंवरील अन्यायच ! - ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

आंदोलनाला संबोधित करतांना ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज
     सातारा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) - काश्मीरमध्ये श्री अमरनाथ गुहेत निर्माण होणार्‍या स्वयंभू शिवलिंगाचेे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशांतील लाखो हिंदू प्रतिकूल वातावरणात खडतर प्रवास करून तेथे जातात. ही यात्रा म्हणजे काश्मीरला संपूर्ण भारताशी जोडणारा एक दुवा आहे. त्यामुळे काश्मिरी फुटीरतावादी सातत्याने यात्रेचा कालावधी अल्प करण्यासाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने यंदा २ जुलैपासून चालू होणार्‍या या यात्रेचा ५९ दिवसांचा कालावधी श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने कोणतेही कारण न देता ११ दिवस अल्प करून केवळ ४८ दिवस केला आहे. अमरनाथ यात्रेचा कमी केलेला कालावधी म्हणजे समस्त हिंदूंवरील अन्यायच होय, असे मत वारकरी सांप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी व्यक्त केले.

(म्हणे) उपवासामुळे महिलांना रक्तक्षयाची लागण !

संभाजी यादव यांची मडगाव (गोवा) येथील व्याख्यानमालेत मुक्ताफळे !
     परमेश्‍वरावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भारतातील अनेक महिला उपवास करतात. जितका उपवास कडक, तितकी श्रद्धा अधिक, असे त्या मात्रेचे प्रमाण असते; मात्र उपवासामुळे महिलांना रक्तक्षयाची (अ‍ॅनिमिया) लागण होते आणि त्या आजारी पडतात, अशी मुक्ताफळे संभाजी यादव यांनी उधळली. मडगावच्या रवींद्र भवन येथे संघर्ष सन्मान या व्याख्यानमालेत यादव यांचे हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हे व्याख्यान झाले. (आयुर्वेदातही प्रकृतीस्वास्थ्यासाठी उपवास करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या उपवासांमुळे भक्ताला आध्यात्मिक आणि शारीरिकही लाभ होतात. असे असतांना संभाजी यादव यांचे हे अज्ञानमूलक वक्तव्य संतापजनकच आहे ! असे सुधारक अन्य पंथियांच्या कडक रोजाविषयी काहीच का बोलत नाहीत ? - संपादक)

मशिदी आणि मदरसे येथे प्रवचने !

आतंकवादविरोधी पथकाची हास्यास्पद उपाययोजना
     मुसलमान तरुणांनी इसिसच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी आतंकवादविरोधी पथकाने मशिदी, मदरसे, शाळा, तसेच महाविद्यालये येथे तकरीब म्हणजे प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करणे चालू केले आहे. भिवंडीत १४७ मशिदींमधील मौलानांची आणि २० मदरशांमधील इमामांची भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. (आतंकवादविरोधी पथकाची हास्यास्पद उपाययोजना ! प्रवचनाने धर्मांधांची मने पालटत असती, तर इस्लामी आक्रमकांपासून हिंदूंचे रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व राजा-महाराजांना लढाया कराव्या लागल्या नसत्या. आतंकवाद संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती आवश्यक आहे, हे शासनाने जाणावे ! - संपादक)

सनातन संस्था आता बुद्धीप्रामाण्यवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही यांच्या बरोबर इसिसच्याही रडारवर !

     गोवा येथील वास्को रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असतांना इस्लामिक स्टेट (इसिस)या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला ४४ वर्षीय समीर सरदाना निवृत्त मेजर जनरलचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. गोव्यातील रामनाथी येथे सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था हिंदुत्ववादी असल्याने ती जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य आहे. या अनुषंगाने आश्रमावर आक्रमण करण्याच्या संदर्भात सरदाना काही सिद्धता करत होता का, या दिशेनेही केंद्रीय गुप्तचर संस्था त्याची चौकशी करत असल्याचे दैनिक गोमंतकने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

(म्हणे) ख्रिस्ती पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक शोषण करणे हा गुन्हा ठरतो, हे मला माहीत नव्हते ! - आर्चबिशप रॉबर्ट कार्लसन

     अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात सेंट लुईस चर्चचे आर्चबिशप रॉबर्ट कार्लसन यांनी न्यायालयासमोर त्यांचे म्हणणे मांडले आहे. ते स्वत:चा बचाव करतांना म्हणाले, ख्रिस्ती पाद्रींनी अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणे हा गुन्हा ठरतो याची मला अजिबात माहीती नव्हती.(ख्रिस्ती पाद्य्रांच्या कुकृत्यांचे अश्‍लाघ्य समर्थन करणारे आर्चबिशप ! हे म्हणे प्रेम आणि शांती यांचे पुजारी ! - संपादक)

गेल्या ३ मासांपासून राज्यातील २२ सहस्र शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचारी यांचे वेतन थकीत

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ! राज्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर करून शासनाने चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा !
मुंबई, १३ फेब्रुवारी - वर्ष २०१५-१६ साठी अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीचे वाटप वेळेवर न झाल्याने राज्यातील २२ सहस्र शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचारी यांचे गेल्या ३ मासांपासून वेतन थकले असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दर मासाच्या पहिल्या दिवशी वेतन देण्याचा आणि ते न देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला होता. असे असले तरी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनाविषयी सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. (या प्रकरणी शिक्षण विभाग संबंधितांची चौकशी करून कारवाई करेल का ? - संपादक)
याविषयी परिषदेने राज्याच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिवांकडेही शाळांचे वेतन देण्याची मागणी केली आहे. तरी शालेय शिक्षण विभागानेही जातीने लक्ष घालून वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे.

संघाच्या नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले माकपचे नेते न्यायालयाला आले शरण !

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हिंदुद्वेष्ट्यांना कठोर शिक्षा होणे, हिंदूंना अपेक्षित आहे !
     थालासेरी (केरळ) - चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले. न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जयराजन यांच्या अधिवक्त्याने जयराजन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांना चिकित्सालयातच राहू देण्याची मागणी केली होती, ज्यास न्यायालयाने नकार दिला. कारागृह अधीक्षकाने सांगितलेल्या चिकित्सालयातच ते भरती होऊ शकतात, असा आदेश या वेळी न्यायालयाने दिला.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तुकाराम गडाख यांना कारावास

समाजद्रोही, गुंड आणि गुन्हेगार यांचा भरणा 
असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीची मागणी का करू नये ? 
शासकीय कामात अडथळा आणणारा पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?
     नगर, १३ फेब्रुवारी - शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तुकाराम गडाख आणि त्यांचा मुलगा रविराज यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. नोव्हेंबर २०१० मधील या प्रकरणावर न्यायालयाने त्या दोघांना १२ फेब्रुवारी या दिवशी प्रत्येकी १ मास कारावास आणि १ सहस्र रुपये दंड दिला आहे. (इतक्या जुन्या प्रकरणाचा आता लागलेला निकाल हा अन्यायच म्हणावा लागेल. या प्रकरणी आणखी कठोर शिक्षा झाली असती, तर कोणीही पुन्हा शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला नसता. - संपादक)

(म्हणे) अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी केंद्रशासनाकडून मुसलमान तरुणांना लक्ष्य केले जात आहे !

इसिसशी संबंधित मुसलमान तरुणांसोबत त्यांचे समर्थन करणार्‍या 
धर्मांध नेत्यांनाही कारागृहात डांबायला हवे !
तृणमूल काँग्रेसचे नेते सुलतान अहमद यांचा केंद्रशासनावर आरोप !
     नवी देहली - अपयशावरून जनेतेचे लक्ष हटवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांना लक्ष्य बनवले जात आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सुलतान अहमद यांनी केंद्रशासनावर केला आहे. (आतंकवादाचा निषेध करणे दूरच उलट आतंकवाद्यांना पाठीशी घालणारे असे राष्ट्रद्रोही धर्मांध इसिसने भारतावर आक्रमण केल्यास इसिसलाच साहाय्य करतील यात शंका नाही. - संपादक)

हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीसाठी मंदिर उपलब्ध करून न देण्याविषयी मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी !

एका शहरातील पोलिसांची मोगलाई ! अन्य धर्मियांच्या कार्यक्रमाविषयी 
अशी भूमिका पोलीस कधी घेतात का ? 
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्‍यांना दिशा मिळावी, यासाठी एका मंदिरामध्ये धर्माभिमानी हिंदूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी शहर पोलिसांच्या मोगलाईचा प्रत्यय आला. बैठक चालू असतांना शहरातील एका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या साध्या वेशातील दोन पोलिसांनी मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी करून समितीच्या कार्यासाठी मंदिर उपलब्ध करून न देण्याविषयी खडसवले. एवढेच नाही, तर आढावा बैठकीची छायाचित्रे काढून बैठकीची सर्व सूत्रेही लिहून घेतली.

योगवेदांत सेवा समिती कल्याणच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ पूजन दिन

ठाणे, १३ फेब्रुवारी (वार्ता.) - पश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आज तरुण पिढी व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. तरुणांनी या पश्‍चात्य संस्कृतीच्या विळख्यातून बाहेर पडून हिंदु संस्कृतीची जोपासना करावी या व्यापक उद्देशाने प.पू. आसारामजीबापू यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन योगवेदांत सेवा समिती कल्याणच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक तरुण पिढीने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन योगवेदांत सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ - लालचौकी, सुभाष नगर, फडके मैदान, कल्याण (प.)
दिनांक - रविवार, १४ फेब्रुवारी २०१६
वेळ - सायंकाळी ५.०० ते ८.००
संपर्क - ७५०६२२११९८/९८३३३१५४५८/९३२१२४४९१७

भारतीय चित्रपट नीरजावर पाकिस्तानात बंदी !

पाकच्या कलाकारांना भारतात पायघड्या घालणारे पाकचा भारतद्वेष जाणतील तो सुदिन !
     कराची (पाकिस्तान) - येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अ‍ॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. अभिनेत्री सोनम कपूर यांची भूमिका असलेल्या या चित्रपटात पाकिस्तानविषयी विपर्यस्त चित्रण असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. (धूर्त पाकिस्तानकडून भारत काही शिकेल का ? - संपादक)
१. पाकिस्तानातील प्रमाणपत्र मंडळाकडे चित्रपट सादर करण्यापूर्वीच चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
२. पॅन-अ‍ॅमच्या विमानातील कर्मचारी नीरजा भानोत यांनी प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता आतंकवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले होते. त्यावर या चित्रपटाचे कथानक बसवलेले आहे.
३. काही पाक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या विज्ञापनांमध्ये पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे; परंतु पाकच्या वाणिज्य मंत्रालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास आधी अनुमती दिली होती आणि त्यानंतर निर्णय फिरवला, असे स्पष्ट झाले आहे.


माजी खासदारांकडे शासकीय निवासांच्या भाड्यापोटी लक्षावधी रुपये थकित !

शासकीय रक्कम थकवणारे नाही, तर जनतेला आदर्श वर्तन करणारे 
लोकप्रतिनिधी लोकराज्यासाठी लायक आहेत !
     नवी देहली - कार्यकाळ संपल्यावरही काही माजी खासदारांनी शासकीय निवासस्थाने कह्यात ठेवून भाड्यापोटी ९३ लाख रुपयांहून अधिक रक्कम थकवली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी शासनाकडे माहिती मागितली होती. या माहितीनुसार माजी खासदारांमध्ये एकूण ५६ खासदारांची नावे आहेत, ज्यांच्याकडे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत १ सहस्र ९६९ रुपयांपासून २३ लाख रुपयांपर्यंत रक्कम थकित आहे. यात माजी खासदार यशवंत सिन्हा, रमाकांत यादव, दिवंगत दिलीपसिंह जूदेव, महंमद अझहरूद्दीन इत्यादींची नावे आहेत. राज्यसभेचे माजी खासदार गिरीशकुमार सांघी यांच्यावर २३ लाख रुपयांहून अधिक रक्कम थकित आहे. सांघी यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सांघी यांच्या मते, वर्ष २०१० मध्ये त्यांनी शासकीय बंगला खाली केला होता. त्यानंतर त्यांचा बंगला दुसर्‍याच्या कह्यात असतांना त्याचे भाडे सांघी यांच्या नावावर दाखवण्यात आले आहे. शासकीय निवासांचे थकित भाडे खासदारांच्या निवृत्तीवेतनातून वजा करण्यात यावे, तसेच जोपर्यंत ही रक्कम वसूल केली जात नाही, तोपर्यंत त्यांना निवडणूक लढण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असे अग्रवाल यांनी सांगितले.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने महाविद्यालयांमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'च्या विरोधात निवेदन

श्रीरामपूर (जिल्हा नगर), १३ फेब्रुवारी (वार्ता.) - १४ फेब्रुवारी या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या व्हॅलेंटाईन डे या पाश्‍चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण करणार्‍या आणि विकृती वाढवणार्‍या प्रकारांमुळे तरुण पिढीचे अधःपतन होत असून, ती देशापुढील एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. त्याला विरोध करण्यासाठी येथील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी एकत्रितरित्या रा.ब.न. बोरावके महाविद्यालय आणि सी. डी. जैन महाविद्यालय यांच्या प्राचार्यांना निवेदन दिले.
त्या निवेदनात दिले आहे की, अलीकडच्या काही वर्षांत महाविद्यालयांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांना त्रास देणे, असे अनेक अपप्रकार केले जाते. त्या दिवसाचा आणि भारताचा काही एक संबंध नसतांना पाश्‍चात्त्य संस्कृती जाणीवपूर्वक भारतात रुजू घातली जात आहे. तरी महाविद्यालयाच्या परिसरात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावे आणि ते होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत.
निवेदन देतांना विश्‍व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री श्री. विजय जयस्वाल, शहर मंत्री श्री. विशाल गायधनेम, बजरंग दलाचे श्री. सचिन बाळलीवाल, तालुका संयोजक श्री. रुपेश हरकत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत सदस्य श्री. शुभम अग्रवाल आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रशांत मोढे उपस्थित होते.

'इसिस'मध्ये सहभागी तरुण आणि त्यांचे समर्थक यांच्यावर देशद्रोहाचे खटले भरा !

सर्वपक्षीय हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना यांची धुळे येथे भव्य मोर्च्याद्वारे एकमुखी मागणी

  • हिंदु विद्यार्थ्यांचे धार्मिक स्वातंत्र्य नाकारणार्‍या धुळ्यातील शाळांवर कठोर कारवाई करा !
  • धुळे येथील 'इसिस'चे हस्तक शोधण्यासाठी 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवा !

धुळे, १३ फेब्रुवारी - संपूर्ण जगाला इस्लामी राष्ट्र (इस्लामिक स्टेट) बनवण्यासाठी 'इसिस' (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया) ही आतंकवादी संघटना प्रयत्नशील आहे. या संघटनेने इस्लामी राष्ट्रांचा नकाशा बनवून त्यास 'खुरासान' असे नाव देऊन त्यात भारताचाही समावेश केला आहे. असे असतांना इसिसमध्येे भरती होण्यास जाण्यापूर्वी पकडलेल्या १०० हस्तकांना गृहमंत्रालयाने समुपदेशन करून सोडून दिले आहे. एकंदरीतच देशभरात पकडलेल्या धर्मांधांची विषारी विचारसरणी आणि हस्तकांचा बुद्धीभेद करण्याची पद्धत पहाता इसिससारख्या जिहादी विचारांनी पछाडलेल्या धर्मांधांचे कितीही प्रबोधन केले, तरी ते पुन्हा आतंकवादाकडे वळणार नाहीत, याची खात्री देता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही ते घातक असून त्या धर्मांध तरुणांवर देशद्रोह केल्याच्या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी. देशभरात 'इसिस'चे आतंकवादी शोधण्यासाठी ज्या प्रकारे 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले, त्याच प्रकारे धुळे येथेही इसिसचे हस्तक शोधण्यासाठी 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि त्याची पाळेमुळे खणून काढण्यात यावीत, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय हिंदू आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी येथे आयोजित केलेल्या मोच्यार्र्द्वारे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर मैनुद्दिन बागवान यांचे सदस्यत्व रहित !

  • अनियमितता आणि गैरकारभार यांच्या विळख्यात सांगली महापालिका !
  • निवडणुकीच्या काळात खोटी माहिती दिल्याचे प्रकरण !
      सांगली, १३ फेब्रुवारी (वार्ता.) - वर्ष २००३ च्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षेविषयी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर मैनुद्दिन बागवान यांचे सदस्यत्व रहित केले आहे. हा निकाल वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश डी.एस्. देशमुख यांनी दिला. याविषयी पराभूत उमेदवार अय्याज नायकवडी यांनी तक्रार केली होती. गत महिन्यातही काँग्रेसच्या एका नगरसेविकेचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने रहित केले होते. त्यामुळे त्यांनी त्यागपत्र दिले आहे. त्यामुळे एकूणच सांगली महापालिका अनियमितता आणि गैरकारभार यांच्या विळख्यात सापडल्याचे पुढे येत आहे.

इसिसच्या ४ वर्षांच्या मुलाने मोटारीचा स्फोट घडवला !

     लंडन - चार वर्षांचा ब्रिटीश मुलगा मोटारीतील तीन जणांना उडवत असल्याचा व्हिडिओ इसिस या आतंकवादी संघटनेने नुकताच प्रसारित केला आहे. इसा डेअर असे स्फोट घडवून आणणार्‍या मुलाचे नाव आहे. वर्ष २०१२ मध्ये त्याच्या कुंटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. (शांतीचा धर्म म्हणवणार्‍या धर्मात प्रवेश केल्यावर चार वर्षांचा मुलगा अशा घटना करू शकत असेल, तर ते जगासाठी घातक आहे ! - संपादक) एका मोटारीमध्ये बसलेल्या इसिसच्या गुन्हेगारांना इसा उडवत आहे. त्याने इसिसचे कपडे घातले आहेत. एक ब्रिटीश नागरिक चेहरा झाकून त्याच्याजवळ उभा आहे. तिघांना मोटारीमध्ये बांधून ठेवण्यात आले आहे. इसाने जवळ जाऊन मोटार उडवून दिली. हा व्हिडिओ एक मासापूर्वीचा आहे.
व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्‍चात्त्य कुप्रथांवर आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळ राज्यांत जनजागृती मोहीम !

     कोची - प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही व्हॅलेंटाईन डे या पाश्‍चात्त्य कुप्रथेच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कर्नाटकात या निमित्ताने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले, तर केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील शाळांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

'व्हॅलेंटाईन डे' ऐवजी हिंदु धर्मातील सण आणि उत्सव साजरे केल्यास जीवनाचे सार्थक होईल ! - आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे

'व्हॅलेंटाईन डे' च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन
कागल (जिल्हा कोल्हापूर), १३ फेब्रुवारी (वार्ता.) - 'व्हॅलेंटाईन डे'मुळे तरुणांमध्ये विकृती बोकाळली आहे. स्वैराचार आणि अनैतिकता वाढली आहे. आपले आई, वडील, बहिण, भाऊ यांच्यावर आपण वर्षांचे ३६५ दिवस प्रेम करत असतो. त्यामुळे वर्षातून एकदा येणारे 'फादर्स डे', 'मदर्स डे', 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणे हे चुकीचे आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणे बंद होत असतांना भारतात मात्र हा 'डे' फोफावत आहे. आपल्या हिंदु धर्मातील अनेक सण आणि उत्सव असून त्यांचे शास्त्रांनुसार पालन केल्यास आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी केले. येथील श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर महाविद्यालय येथे व्हॅलेंटाईन डे विरोधात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतांना ते बोलत होते.
इयत्ता ११ वीच्या २ वर्गांमध्ये हा विषय मांडण्यात आला. या वेळी एकूण १२५ विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी श्री. शिंदे यांनी व्यक्तीमत्व आदर्श आणि नैतिकता निर्माण होण्यासाठी धर्माचरणाच्या जोडीला स्वतःमधील दोष घालवून गुण कसे वाढवावेत, याचीही माहिती दिली.


उमाजी केळुसकर यांना 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार

रामनाथ (अलिबाग) - महाराष्ट्र शासनाचा 'राजमाता स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार साप्ताहिक कोकणनामाचे संपादक उमाजी केळुसकर यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस-२०१६ च्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मुख्य सचिव व्ही. गिरीराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

विध्वंसक विकास नको ! - शिवसेना

मुंबई - जैतापूरसारखे विध्वंसक आणि विषारी प्रकल्प भविष्यात सहस्रो शेतकर्‍यांचे रोजगार अन् आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेत. या विध्वंसक विकासाला जनतेचा विरोध असेल, तर राज्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकरी यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या विकासाचा हट्ट करू नये. आम्ही स्वत: विकासाच्या आणि आधुनिक प्रगतीच्या बाजूचे आहोत. 'मेक इन इंडिया'चे स्वागत महाराष्ट्रात करत आहोत; पण विकासामुळे ज्यांच्या पोटावर मारले जाणार आहे, त्यांचे शापही घेऊ नका, असे मुंबईत चालू होत असलेल्या 'मेक इन इंडिया' सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रेलखात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की,
१. आज मालक आणि कामगार सुखी आहे काय ? यावर एखादा रोखठोक परिसंवाद 'मेक इन इंडिया'त व्हायला हरकत नाही.

मोदींच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचा शुभारंभ

      मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया सप्ताहाचा १३ फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील पटांगणावर शुभारंभ झाला. परदेशी गुतंवणूकदारांना महाराष्ट्रात आणि देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणे, असा या योजनेचा हेतू आहे. हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी मुंबईच्या बीकेसी पटांगणावर २ लाख चौरस फुटांवर विविध दालने यासाठी सिद्ध केली आहेत. ६८ देशांतील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. आठवड्याभरात महाराष्ट्रात ४ लाख कोटीची गुंतवणूक व्हावी, यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. यातून १२ लाख रोजगारनिर्मिती होईल, असा अंदाज आहे.

धुळे येथील इसिसविरोधातील मोर्च्यामध्ये सहभागी मान्यवरांचे विचार

सावन राठोड यांची हिंदू म्हणून हत्या करणार्‍यांवर 
शासनाने कठोर कारवाई करावी - पू. नंदकुमार जाधव
      तू हिंदू आहेस का ?, असे विचारून इब्राहिम शेख, जुबेर तांबोळी, इम्रान तांबोळी या धर्मांधांनी सावन राठोड यांना १३ जानेवारी या दिवशी पेट्रोल टाकून जाळले होते. धर्मांधांची ही कृती इसिसकडून प्रेरणा घेऊनच करण्यात आली आहे. सावन राठोड यांची हिंदू म्हणून हत्या करणार्‍यांवर शासनाने कठोर कारवाई करावी. येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चावरा इंग्लिश स्कूल, सेंट इेवियर कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल यांसह कमलाबाई कन्या विद्यालय या आणि अन्य शाळांमधे हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, मेंदी आणि कुंकू लावणे इत्यादी धार्मिक आचरणावर बंदी घातली जात आहे.

आंध्रप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात शाळा-महाविद्यालयांत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन !

     इंदूर (तेलंगण) - व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे एका प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत नालंदा महिला महाविद्यालय, श्री साई कॉलेज ऑफ एज्यूकेशन, बी.इ.डी., टी.वी.आर्. इन्फोटेक इन्स्टिट्यूट इत्यादी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या कु. सुगुणा गुज्जेटी आणि अन्य कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगून धर्मशिक्षणाच्या आवश्यकतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. 
२. नालंदा महिला महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाचा लाभ १६६ विद्यार्थी आणि ७ शिक्षक यांनी घेतला.

व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यास प्रोत्साहन देण्याची मागणी !

कर्नाटकमधील कारवारमध्ये जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर !
     कारवार (उत्तर कन्नड, कर्नाटक), १३ फेब्रुवारी - १४ फेबु्रवारी या दिवशी असणार्‍या व्हॅलेंटाईन डेच्या नावाने तरुणांकडून अनेक अपप्रकार होतांना पहावयास मिळतात. या दिवशी भोगवादी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणाच्या नावाखाली अनैतिक घटनांना ऊत आलेला असतो. यावर आळा घालणे, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी येथील हिंदुत्वनिष्ठांनी उत्तर कन्नडच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी शाळा-महाविद्यालयांतून मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यास प्रोत्साहनक देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. 
   या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. बी.जी. मोहन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर कुद्रेकर, धर्माभिमानी प्रशांत पेडणेकर इत्यादी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

भारत आणि बांगलादेश या देशांमध्ये उत्तम संबंध !

बांगलादेशाशी सहकार्य करण्यापूर्वी भारताने बांगलादेशाकडून तेथील हिंदूंच्या सुरक्षेची हमी घ्यावी ! 
बांगलादेशाचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झम अली यांचे प्रतिपादन
     मुंबई - भारत आणि बांगलादेश या देशांमध्ये असलेले सध्याचे संबंध हे आतापर्यंतच्या काळातील उत्तम संबंध असून या दोन्ही देशांनी विकासामध्ये, तसेच यशातही भागीदार झाले पाहिजे, असे प्रतिपादन बांगलादेशाचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झम अली यांनी केले. अली मेक इन इंडिया सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेतली असता ते बोलत होते. या वेळी उच्चायुक्त अली म्हणाले, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे आतंकवादाच्या विरोधात नेहमीच कठोर धोरण राहिले आहे. त्यामुळे आमच्या भूमीतून आतंकवादाला कधीही पाठिंबा मिळणार नाही. बांगलादेशाकडे जहाजबांधणी उद्योग उभा करण्याची क्षमता आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असलेले भूक्षेत्र अतिशय अल्प आहे. या संदर्भात भारताने सहकार्य केल्यास या दोन्ही देशांना लाभदायक ठरेल. या वेळी अली यांनी देशातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राने बांगलादेशाशी सर्वच क्षेत्रात सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, 'व्हॅलेंटाईन डे'च्या रूपात पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !
१४ फेब्रुवारीला प्रेमाचा तथाकथित दिवस म्हणून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. या दिवशी अनैतिक प्रकारांना ऊत आलेला असतो. अशा वेळी प्रतिदिन प्राणीमात्रावर प्रेम करण्याची शिकवण देणार्‍या महान भारतीय संस्कृतीचे महत्त्व जाणून धर्माचरण करा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Valentine Day Paschyatton ke andhanukaran ka dusra nam hai. Iski apeksha Vasudhaiv Kutumbkam ki vyapak shiksha denewale Hindu Dharm ka achran kare.

जागो ! : 'वैलेंटाईन डे' पाश्‍चात्त्यों के अंधानुकरण का दूसरा नाम है. इसकी अपेक्षा 'वसुधैव कुटुम्बकम्'१ की व्यापक शिक्षा देनेवाले हिन्दू धर्म का आचरण करें.

हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी संघटित कृती करणे, हाच उपाय ! - रूपा महाडिक

कोरेगाव (कार्वे) येथे हिंदु धर्मजागृती सभा
      कोरेगाव (कार्वे, जिल्हा सातारा), १३ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदूंवर होणार्‍या संकटांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कालपर्यंत इस्लामी राष्ट्रांत घडणार्‍या धर्मद्रोहाच्या घटना हिंदुस्थानात गावागावांत राजरोसपणे घडत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखण्यासाठी संघटित कृती करणे, हाच एकमात्र उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले.

हिंदूंच्या धार्मिक परंपरांविषयी निकाल देतांना न्यायालयाने त्यामागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने दहनसंस्कार न करता सीएन्जी किंवा विद्युत शवदाहिनीचा वापर करण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हिंदू मागील लाखो वर्षांपासून लाकडाने दहनसंस्कार करतात; पण प्रदूषणाची समस्या यापूर्वी कधीही निर्माण झाली नाही. ती मागील १०० वर्षांत निर्माण झाली, म्हणजे या समस्येचे मूळ लाकडाने दहनसंस्कार करणार्‍या हिंदूंच्या धर्माचरणात नसून विज्ञानाच्या अतिरेकी वापरात आहे. हिंदु धर्मातील दहनसंस्काराचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास लाकडाच्या चितेवरील दहनसंस्कारावर नव्हे, तर इतर घटकांमुळे (औद्योगिक प्रदूषण, सांडपाणी आदी) होणार्‍या प्रदूषणाला आळा घालणे आवश्यक ठरते. असे झाल्यास हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरा पाळणे सुलभ होईल.

पर्जन्यवृष्टी विपुल प्रमाणात होण्यासाठी गंधोरा (जिल्हा धाराशिव) येथे श्री गणेशयाग

     तुळजापूर (जि. धाराशिव), १३ फेब्रुवारी (वार्ता.) - गंधोरा, तालुका तुळजापूर येथे पर्जन्यवृष्टी विपुल प्रमाणात होण्यासाठी श्री योगी अरविंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ करण्यात आला. तसेच श्री योगी अरविंद यांनी एक कोटी दैवी आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती लावण्याचा संकल्प केला. या वेळी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नैसर्गिक शेती करून पुन्हा शेतकर्‍यांचे वैभव प्राप्त होऊ शकते आणि गावातील शेतकर्‍यांना विनामूल्य औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. या यज्ञासाठी श्री. उदय कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

इशरत जहाँसे अच्छा, हिंदुस्थान हमारा !

श्री. भाऊ तोरसेकर
     माफीचा साक्षीदार होऊन डेव्हिड कोलमन हेडली काय सांगणार, त्याविषयी कुणाला फारशी उत्सुकता नव्हती; कारण जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. प्रामुख्याने त्यात इशरत जहाँ या आत्मघातकी मुलीविषयीची माहिती नवी नाही; कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली आणि तेथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्‍यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत आत्मघातकी असल्याचे त्याने मान्य केल्याची माहिती उजेडात आलेली होती; मात्र त्याविषयी येथीलच तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी शासन गोपनीयता पाळत होते. इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असतांना, तेव्हाचे मनमोहन शासन आणि तत्कालीन गृहमंत्री लपवाछपवी का करत होते ?

भाविकांचा ब्रह्मचर्य भाव टिकून रहाण्यासाठीच शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेशास बंदी !

मा. संपादक, सनातन प्रभात
    आपल्या दैनिकाच्या १.१२.२०१५ या दिवशीच्या अंकात (आणि इंग्रजी पाक्षिक सनातन प्रभातच्या १ ते १५ जानेवारी अंकात) शबरीमाला देवस्थानात महिलांना प्रवेश बंदी योग्य कि अयोग्य या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या लेखाच्या संदर्भात हे माहितीवजा पत्र पाठवत आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून तिची सुनावणी लवकरच होणार आहे. 
    शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना प्रवेशबंदीची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामागे मूळ कारण पुढीलप्रमाणे आहे. केरळ राज्यात पुढील ५ मंदिरे शास्ता मंदिरे म्हणून ओळखली जातात. त्यातील प्रत्येक मंदिरामध्ये देवतेला विशिष्ट भावाने पूजले जाते.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांंवर देशद्रोहाचा खटला भरा ! - अभाविप

      पिंपरी (पुणे), १३ फेब्रुवारी - देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएन्यू) संसद आक्रमणातील दोषी अफजलच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी या दिवशी फेरी (रॅली) काढण्यात आली होती. त्यात इंडिया गो बॅक, पाकिस्तान झिंदाबाद अशा देशद्रोही घोषणाही दिल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या उमर खालीद, त्याचे सर्व सहकारी आणि अन्य विद्यार्थी यांवर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा, अशी मागणी पुणे शहराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली. या वेळी पदाधिकारी प्रा. राजेश व्हटकर, वैभव कासांडे, जन्मेजय राठोड हे उपस्थित होते.

इशरत जहाँचे उदात्तीकरण करणारे आव्हाड आतंकवाद्यांचे समर्थक - प्रकाश जावडेकर

     पुणे, १३ फेब्रुवारी - इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेची आत्मघातकी बॉम्बर होती, ही गोष्ट हेडलीच्या वक्तव्याने पुन्हा सिद्ध झाली. त्यामुळे इशरत जहाँचे उदात्तीकरण करणारे आव्हाड हे आतंकवाद्यांचेच समर्थन करत होते, हे या निमित्ताने सिद्ध झाले. काँग्रेसनेही या प्रकरणात मोदी आणि शहा यांना लक्ष्य करण्यासाठी केवळ राजकारण केले आणि त्यासाठी आतंकवादी असलेल्या इशरतला हुतात्मा ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी केला.

तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची गणेशभक्तांची मागणी

श्री मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य 
विश्‍वस्त सुरेंद्र महाराज देव यांच्या आत्महत्येचे प्रकरण
      चिंचवड (जिल्हा पुणे), १३ फेब्रुवारी - येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुरेंद्र महाराज धरणीधर देव महाराज यांनी १७ जानेवारी या दिवशी मंगलमूर्ती वाड्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी मोरगांव, थेऊर, सिद्धटेक येथील मंदिरे आणि चिंचवड गावातील महान साधू मोरया गोसावी यांचे मंदिर ही ज्या देवस्थानच्या अधिपत्याखाली येतात, त्या देवस्थानच्या अखत्यारीत वेगवेगळ्या भागात सहस्रो एकर भूमीसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येप्रकरणी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. गूढ आत्महत्येच्या योग्य तपासासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी अनेक गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

मुंबई येथे आज हिंदु धर्मजागृती सभा

दिनांक : रविवार, १४ फेब्रुवारी २०१६,
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : प्रभादेवी महानगर पालिका शाळा क्र. २ चे सभागृह, गॅमन हाउसच्यासमोर, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई.
हिंदूंनो, मोठ्या संख्येने या सभेत सहभागी व्हा !

डायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा !

दिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६
वेळ : सायंकाळी ४ वाजता
स्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे.
संपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६
आयोजक : डायघर ग्रामस्थ मंडळ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती आणि हिंदु जनजागृती समिती

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या समितीमध्ये कधी हिंदु सदस्य असतात का ?

     तिरुवनंतपुरम् येथील पुतेनाडमध्ये असणार्‍या शिव मंदिराच्या कार्यकारी समितीचा २३ वर्षीय सदस्य शब्बीर याचा ३१ जानेवारीला ४ जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानिमित्त दुःख म्हणून शिवमंदिरात २ दिवस पूजा न करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. आरोपी आणि शब्बीर यांच्यात गेल्या वर्षी एका कार्यक्रमाच्या वेळी हत्तीच्या संदर्भातून वाद झाला होता. त्यातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उत्तरप्रदेशात दरोडेखोराचे नातेवाईक लोकप्रतिनिधी !

     लखनऊ येथील फतेहपूर जिल्ह्यातील कबरहा या गावात ४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी दरोडेखोर ददुआ उर्फ शिवकुमार पटेल याने बांधलेल्या हनुमान मंदिराच्या १० दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आलेे. वर्ष २००७ मध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ददुआ ठार झाला होता. ददुआने बीहड येथे तीन दशके दरोडेखोरी केली होती. आता या मंदिर परिसरात ददुआ याची मूर्ती उभारण्यात येणार आहे. या १० दिवसीय उत्सवाचा कार्यभार ददुआचे भाऊ आणि माजी खासदार बालकुमार पटेल सांभाळणार आहेत. ददुआचा मुलगा वीर सिंह हा कर्वी मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा आमदार आहे.
    या देशात दलित, मागासवर्गीय आणि मुसलमान यांवर अन्याय किंवा अत्याचार झाला, तर तो घोर अपराध आणि हिंदूंवर अत्याचार झाला, तर त्याचा साधा निषेधही नाही. हा कसला पुरोगामीपणा ?
- श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सनातन संस्थेचे कार्य श्री शंकराचार्यांसारखे आहे ! - श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज

     सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून संस्था करत असलेले कार्य उत्कृष्टच आहे, हे पटले. सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील प्रकाशित ग्रंथांतील महत्त्वाचा भाग आमच्या व्याख्यानांतून मांडून मी लोकांचे प्रबोधन करीन. सनातन संस्थेचे विविध उपक्रम आणि कार्य यांची व्याप्ती पहाता सनातन संस्थेचे कार्य श्री शंकराचार्यांसारखे आहे. - श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज, मुंबई.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

धर्माच्या क्षेत्रातही कुप्रवृत्तींचा वावर वाढणार असणे
     शूद्राः प्रतिग्रहीष्यन्ति तपोवेषोपजीविनः ।
     धर्मं वक्ष्यन्त्यधर्मज्ञा अधिरुह्योत्तमासनम् ॥
           - श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्‍लोक ३८ 
अर्थ : शुद्र (अल्पज्ञानी) तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील. आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील.
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री कृष्णावेणी उत्सव रविवार, १४ फेब्रुवारी ते मंगळवार, २३ फेब्रुवारीपर्यंत १० दिवस साजरा होत आहे. तरी उत्सवाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कृष्णावेणी उत्सव समितीने केले आहे.

ख्रिस्ती धर्मियांची वाढ होणार्‍या देशांत नेपाळ पहिल्या क्रमांकावर !

     नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढणार्‍या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ख्रिस्ती धर्माविषयी अभ्यास करणार्‍या एका संस्थेच्या अहवालानुसार समोर आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणार्‍या समाजवादी पक्षावर बंदी घालण्याची मागणी कोणताही पुरोगामी समाजवादी का करत नाही ?

     शामली, उत्तरप्रदेश येथील कैराना गावात नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार नफीसा विजयी झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केला. यात एक ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अमेठी ते शामली येथे विजयानंतर अशाच प्रकारे बंदुकीतून गोळीबार करत आनंद साजरा करण्यात आला.

उघड गुन्ह्यात गुन्हेगाराला शिक्षा सुनावण्यास ८ वर्षे घेणारी व्यवस्था !

या दाव्यात दुसर्‍याच दिवशी शिक्षा करणे अपेक्षित होते. 
     म्हापसा, गोवा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने धनादेश न वटल्याच्या आरोपाखाली बागा येथील सुनीत शेट्टी या व्यावसायिकाला २ वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. व्यावसायिक शेट्टी यांनी काणका येथील नरेश गुप्ता यांना १ नोव्हेंबर २००८ या दिवशी दिलेला ५ लक्ष रुपयांचा धनादेश न वटल्यामुळे गुप्ता यांनी शेट्टी यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता.

आधीच्या राज्यपालांना चुकीच्या निर्णयासंदर्भात शिक्षा करा !

     आदर्श सोसायटीच्या घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यास अन् खटला चालवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अनुमती दिली आहे.

कुचकामी पोलीस यंत्रणा ! गुंडांच्या कारवायाही रोखू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना कसे रोखणार ?

     वाराणसी येथील विश्‍वनाथ मंदिराजवळील त्रिपुरा भैरवी यलो भागात ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी रात्री झालेल्या गोळीबारात एक जण घायाळ झाला. या वेळी ६ गोळ्या झाडण्यात आल्या. घायाळ झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. विश्‍वनाथ मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर ही घटना घडली. येथे कडक बंदोबस्त असतो, तरीही ही घटना घडली. गुंड ज्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते, त्याला गोळी न लागता अन्य एका व्यक्तीला गोळी लागली.


रथसप्तमीच्या निमित्ताने...

रथसप्तमीचे माहात्म्य
१. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो.
२. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे.
३. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.
(संदर्भ : श्रीधर संदेश, जानेवारी २०१४)
४. सूर्यनारायणाची पूजा
रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात.

युवा पिढी व्हॅलेंटाईन डेसारख्या फालतू गोष्टींत वेळ वाया न घालवता राष्ट्रासमोरील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल तो सुदिन !

कु. प्राजक्ता धोतमल
१. तरुण पिढीने कोण्या प्रेमविराच्या भाकड कथा ऐकून व्हॅलेंटाईन डेसारख्या
कुप्रथेचे अंधानुकरण करणे आणि पुढे एकतर्फी प्रेम, प्रेमभंगाच्या
वैफल्यातून हत्या, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होणे
     फेब्रुवारी मास (महिना) म्हटला की, आजच्या तरुण पिढीला व्हॅलेंटाईन डे एवढेच ठाऊक असते. या दिवसांत विद्यार्जन, सृजनशीलता आणि उद्योगशीलता यांना ग्रहण लागते. जो तो आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काय करायचे ? या नसत्या उद्योगात रममाण झालेला असतो. व्हॅलेंटाईन डेची ही कुप्रथा मुळात आपली नाहीच. ही कुप्रथा पाश्‍चिमात्य देशांकडून आली आणि दुर्दैवाने भारतातील तरुण पिढी कोण्या प्रेमविराच्या भाकड कथा ऐकून या कुप्रथेचे अंधानुकरण करू लागली. पाश्‍चात्त्यांकडून या नको त्या गोष्टी घेतल्याने आपल्या देशातील तरुण पिढी उथळ माथ्याची होत चालली आहे. यातूनच मग एकतर्फी प्रेम, प्रेमभंगाच्या वैफल्यातून हत्या, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.
२. एक दिवस प्रेमाचे उदात्तीकरण करणे म्हणजे खरे प्रेम नव्हे, तर परमार्थाकडे 
जाण्यास जे पूरक ठरते, ते खरे प्रेम, ही हिंदु धर्माची शिकवण असणे
     केवळ एक दिवस प्रेमाचे उदात्तीकरण करणे म्हणजे खरे प्रेम, हे प्रेमाचे अयोग्य समीकरण आहे. आपली हिंदु संस्कृती संयत आणि नैतिक प्रेम शिकवते.

देहाभोवती पांढरे कण अन् वलय दिसणे, हातांच्या अन् पायांच्या बोटांमधून धूर आणि प्रकाशाचे किरण बाहेर पडतांना दिसणे, या संदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण

     देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञान अद्याप शोधू शकले नाही. या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत. याचा अर्थ ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात, असे होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही. याचा अर्थ तो नाही, असे नाही. आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते.
१. गडद पार्श्‍वभूमीवर हात धरल्यावर हाताभोवती पांढरे वलय दिसणे 
आणि हाताच्या बोटांतून पांढरा प्रकाश दूरवर प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे
     भूमंडलावर अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूभोवती ऊर्जावलय असते. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे ते अल्प-अधिक प्रमाणात असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०.१२.२०१५ या दिवशी गडद पार्श्‍वभूमीवर किंवा अल्प प्रकाश असलेल्या भिंतीच्या पार्श्‍वभूमीवर हात धरल्यावर त्यांच्या हाताभोवती पांढरे वलय दिसले आणि हाताच्या बोटांतून पांढरा प्रकाश दूरवर प्रक्षेपित होत असल्याचे दिसले. उजव्या हाताची पाचही बोटे जुळवून पाहिल्यावर प्रकाश अधिक प्रमाणात बाहेर पडत असल्याचे दिसले.

तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

१. देहाभोवती पांढरे कण अन् वलय दिसणे, हातांच्या अन् पायांच्या बोटांमधून धूर आणि प्रकाशाचे किरण बाहेर पडतांना दिसणे, यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. पांढरे कण, वलय आणि किरण केव्हा दिसू शकतात ? त्याची वैज्ञानिक किंवा रासायनिक प्रक्रिया काय असते?
३. या संदर्भात कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?,
४. तसेच या संदर्भात या पूर्वी कोणी वैज्ञानिक संशोधन केले असल्यास आम्हाला वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : savv.research@gmail.com)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
   मागील अडीच मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

साधकांनो, सनातन संस्थेत सहभागी होण्याच्या हेतूने संपर्क करणार्‍या व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

     नुकतीच एका शहरात रहाणार्‍या सनातन संस्थेच्या साधिकेच्या घराबाहेरील आकाशकंदिल पाहून एक व्यक्ती त्या साधिकेच्या घरी गेली. मला सनातनमध्ये सहभागी व्हायचे आहे, असे सांगून व्यक्तीने सनातनच्या मुख्यालयाचा संपर्क क्रमांक मागितला. त्या वेळी त्या व्यक्तीचे साधिकेसोबत झालेले संभाषण येथे देत आहोत.
व्यक्ती (दरवाजाच्या बाहेर उभी राहून) : ते (यजमान) कुठे आहेत ? त्यांचा भ्रमणभाष क्रमांक देता का ?
साधिका : कामावर गेले आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी भ्रमणभाष वापरण्याची अनुमती नाही. मी त्यांचा संपर्क क्रमांक देऊ शकत नाही.
व्यक्ती : मला त्यांचा (यजमानांचा) नको. (आकाशकंदिलाकडे बोट दाखवून) यांच्या मुख्य कार्यालयाचा संपर्क क्रमांक द्या.
साधिका : संस्थेचे मुख्य कार्यालय नाही. आपले नाव काय ? (व्यक्तीने नाव सांगितले.)
व्यक्ती : मला सनातन जॉईन करायचे आहे. मी ... यांना ओळखतो. त्यांचा संपर्क क्रमांक द्या.
साधिका : माझ्याकडे त्यांचा संपर्क क्रमांक नाही.
व्यक्ती : ठीक आहे. मी इंटरनेटवरून शोधून काढतो. येथे रहाण्यास घर आहे का ? मी कालच येथे आलो आहे. साधिका : मला ठाऊक नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालूच !

     एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याची विशेष अन्वेषण पथकाच्या एका महिला अधिकार्‍यांकडून १५ दिवसांच्या कालावधीत ४ वेळा भ्रमणभाषवर चौकशी करण्यात आली.
१. पहिल्या वेळी भ्रमणभाष आला, त्या वेळी महिला अधिकार्‍याने उज्जैनला होणार्‍या कुंभमेळ्यामध्ये किती जण सहभागी होणार आहेत ?, शहरातून किती जण जाणार आहेत ?, त्या ठिकाणी स्टॉल (ग्रंथप्रदर्शन) लावणार आहात का ?, सनातन संस्थेचे शहरातील कार्य कोण पहाते ? याविषयी विचारणा केली.
२. दुसर्‍या वेळी भ्रमणभाष आला, त्या वेळी शनिशिंगणापूर येथे किती जण आणि कोण कोण जाणार आहेत ? तिथे काय करणार आहात ?, असे प्रश्‍न विचारले.
३. तिसर्‍यांदा भ्रमणभाष करून विचारले, ... या (धर्मद्रोही) संघटनेला किती संघटनांचा पाठिंबा आहे ?, शहरातून अंदाजे किती जण शनिशिंगणापूरला जाणार आहेत ? संख्या कळली, तर मॉनिटर करायला सोपे जाते ?

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी 
या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या नूतन ग्रंथाचा परिचय क्रमशः ३ भागांद्वारे करून देत आहोत.
     ही उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. वाचकांनी आतापासूनच हे उपाय करून पहावेत. असे केल्याने या उपायपद्धतीचा सराव होईल, तसेच तिच्यातील बारकावेही कळतील.

अभ्यास, जिज्ञासा आणि साधना नसलेले अन् त्यामुळे हिंदूंच्या मनात विकल्प निर्माण करणारे एक पुरोहित !

      पुरोहितांनी मोक्ष ही संकल्पना सध्या अस्तित्वात नसल्याचे सांगून विवाहविधीत त्याचा उल्लेख न करणे : मी डिसेंबर २०१५ मध्ये माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी कल्याण येथे गेले होते. विवाहाच्या दिवशी लग्न लावणार्‍या पुरोहितांनी एका विधीमध्ये वराला यापुढे तू तुझ्या पत्नीला धर्म, अर्थ आणि काम यांमध्ये सहभागी करून घ्यायचे. धर्म म्हणजे देवपूजा आणि इतर धार्मिक कार्ये करतांना पत्नीचाही त्यात सहभाग हवा. अर्थ आणि काम यांतही पत्नीची संमती हवी. मोक्ष केवळ पूर्वीच्या युगांमध्येच मिळत होता. आजकालच्या युगात मोक्ष ही संकल्पना नसल्याने मी त्याचा उल्लेख करत नाही, असे सांगितले. तेव्हा मनात विचार आला, आजकालचे पुरोहित केवळ पोटार्थी झाल्यामुळे साधना करत नाहीत. त्यामुळे त्यांना या काळातही योग्य मार्गाने साधना केल्यास मोक्ष मिळू शकतो, हे ज्ञात नसल्यामुळे समाजालाही चुकीचे मार्गदर्शन करतात. 
- कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०१६)
     असे पुरोहित आपल्याला आढळल्यास त्यांचे नाव, वय, पत्ता, दूरभाष क्रमांक, संक्षिप्त परिचय इत्यादी माहिती सनातन प्रभातला खालील पत्त्यावर कळवा !
संपादक, दै. सनातन प्रभात कार्यालय
पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा - ४०३ ४०१
फॅक्स : ०८३२ - २३१८१०८
ई-मेल : dspgoa1@gmail.com

आयुर्वेदिक वैद्यांनी सात्त्विक उटणे शारीरिक विकारांवर चांगले असल्याचा निर्वाळा देणे आणि ते स्वत:च्या रुग्णांना देणार असल्याचे सांगणे

     आयुर्वेदिक वैद्य अभिजीत देव यांच्याकडे संपर्कासाठी गेल्यावर त्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितले. त्यानंतर त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने दाखवल्यावर त्यांनी उदबत्ती, उटणे आणि अष्टगंध घेतले. दोन दिवसांनी त्यांनी स्वतःहून सांगितले, तुमचे उटणे पुष्कळ चांगले आहे. त्यात अनेक आयुर्वेदिय घटक आहेत. त्याने शारीरिक विकारांवर चांगलाच परिणाम होतो. मी स्वतः ते वापरले. आता येथून पुढे माझ्या रुग्णांनाही ते देणार आहे.
- सौ. पूजा सातपुते, कोल्हापूर


आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     व्यक्तीला होणार्‍या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. देवतांचा एक-आड-एक नामजप, रिकाम्या खोक्यांचे उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या सहस्रो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. यांतीलच एक पद्धत म्हणजे, प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय. वर्ष २०१० पासून सहस्रो साधकांनी या उपायांचा प्रयोग करून त्यांना लाभ झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर या उपायपद्धतीविषयी हा ग्रंथ संकलित केला आहे.

गुरुधन आणि व्यावहारिक अधिकोषात संचय केलेले धन यांतील भेद आणि परिणाम !

श्री. अविनाश जाधव
     एकदा माझ्या मनात संकुचित विचार येऊन धनसंचय करण्याविषयी लोभी विचार आला होता. त्या वेळी देवाने ही चूक लक्षात आणून दिली आणि गुरुधनाच्या महानतेची जाणीव करून दिली. देवा, तुला ही जाणीव करून द्यावी लागली, यासाठी क्षमस्व !
१. गुरुधन असेल, तर जगही पादाक्रांत करता येते. अधिकोषातील, म्हणजे व्यावहारिक धन हे कुटुंबापुरतेच मर्यादित असते.
२. गुरुधन जन्मोजन्मी आपल्यापाशी रहाते. अधिकोषातील धनाचा मृत्यूनंतर काय लाभ ?
३. गुरुधनासमोर जगातीलच नव्हे, तर तिन्ही लोकांतील सर्वच गोष्टी थिट्या आहेत. व्यावहारिक धन हे पृथ्वीवरच काही काळापर्यंतच वापरता येते.

प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत हिंदु धर्मातील ज्ञानावर आधारित उपायपद्धत !

     प्राणशक्ती (चेतना) ही मनुष्यासाठी जीवनदायिनी शक्ती आहे. मनुष्याचे विकार बरे करण्यासाठी पिरॅमिड उपाय, रेकी उपाय यांसारख्या प्रचलित उपायपद्धतींमध्येही प्राणशक्तीचा उपयोग केला जातो. या ग्रंथातही प्राणशक्तीचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून विकार बरे करता येण्यामागील शास्त्र सांगितले आहे. या उपायपद्धतीमध्ये हाताच्या बोटांच्या मुद्रा आणि नामजप करणे, हे महत्त्वाचे घटक आहेत.
      मानवाच्या हाताची पाच बोटे ही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बोट आणि त्याच्याशी संबंधित पंचतत्त्व ही या ग्रंथात दिलेली माहिती शारदातिलक (अध्याय २३, श्‍लोक १०६ वरील टीका) आणि स्वरविज्ञान या ग्रंथांत दिलेल्या माहिती प्रमाणेच आहे.
     मुद्रा करून तिचा शरिराच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी किंवा विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करणे, हा प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धतीचा एक भाग आहे. प्राचीन काळापासून मंत्रयोगात मातृकान्यास करण्यास सांगितले आहे. त्यातही पाच बोटे आणि तळवा यांनी शरिराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितले आहे. (संदर्भग्रंथ : भारतीय संस्कृति कोश, खंड ४ आणि ७)
     अध्यात्म हे कृतीच्या स्तराचे शास्त्र आहे. त्यामध्ये प्रयोगशीलता आणि सृजनशीलता आहे. हिंदु धर्मातील ज्ञानाचा उपयोग करतांनाच आम्ही जिज्ञासु वृत्तीने अभ्यास केला. प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे शोधण्याची पद्धत, तसेच विविध मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि अनुभव घेतला. अनेक साधकांनीही या उपायपद्धतीने प्रयोग केले. या उपायपद्धतीचे लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत करत आहोत. वाचकांनीही या उपायपद्धतीच्या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभवायला आल्यास कळवावे. ईश्‍वरानेच हे कार्य करवून घेतले, याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या दृष्टीकोनातून विचार करणारा बालसाधक कु. सर्गेय (वय ४ वर्षे)!

चि. सर्गेय
      १६.१२.२०१५ या दिवशी आम्ही सेवेसाठी बसतो, त्या कक्षाची सामूहिक स्वच्छता होती. या सेवेत चि. सर्गेय विविध सेवांत साहाय्य करत होता. या सेवा तो प्रार्थना आणि नामजप यांसह अतिशय मन लावून करत होता. स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या एका साधिकेची सर्गेयशी जवळीक असून ती नेहमी त्याच्या समवेत खेळत असते, तसेच त्याची थट्टामस्करी करत असते. आज ती कक्षाजवळून जात असतांना तिने सेवा करत असलेल्या सर्गेयला गुदगुल्या केल्या. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या सहसाधकांना त्याने तिचे वागणे अयोग्य असल्याचे सांगितले. त्याच्या मते सेवा करतांना तो नामजप करत असल्याने तिने नामजपात व्यत्यय आणला होता.

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध
असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७
Sanatan Shop.com

महर्षींनी वसंतपंचमीच्या दिवशी केलेल्या कळसपूजेनंतर सत्यनारायणाच्या प्रसादासारखा शिर्‍याचा प्रसाद करून तो रामनाथी आश्रमातील साधकांना देण्यास सांगणे आणि सनातनच्या दृष्टीने वसंतपंचमी या दिवसाचे महत्त्व

१. परम गुरुजींचे गुरु प.पू. भक्तराज 
महाराज हे सत्यनारायण आहेत, असे महर्षींनी सांगणे
      ईरोड येथे नाडीवाचन करतांना महर्षींनी कळसांची पूजा वसंतपंचमी या दिवशी करायची आहे, असे सांगितले. यावर पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, वसंतपंचमीच्या दिवशी पूजा का करायला सांगितली आहे, हे मला कळत नव्हते. नंतर साधकांकडून कळले की, हा दिवस म्हणजे परम गुरुजींचेही (प.पू. डॉक्टरांचेही) गुरु, म्हणजे प.पू. भक्तराज महाराज (बाबा) प्रकट होण्याचा दिवस आहे. महर्षींनी सांगितले, अरे, हे गुरूंचेही गुरु आहेत. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे सत्यनारायण आहेत; म्हणून वसंतपंचमीच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी आपण जसा शिर्‍याचा नैवेद्य देवाला दाखवतो, तसा प्रसाद करून साधकांना द्यायला हवा. (या घटनेमागील योगायोग कसा असतो तो पहा - याच दिवशी प्रथम प.पू. बाबांना त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश हे मध्य प्रदेशातील पालीवाल धर्मशाळेत भेटले होते. याच दिवशी प.पू. बाबांनी सत्यनारायणाची पूजाही केली होती; परंतु या पूजेचा प्रसाद अनंतानंद साईशांना देण्यासाठी ते या धर्मशाळेत आले होते. याच दिवशी प.पू. बाबांचा नव्याने जन्म झाला; कारण याच दिवशी त्यांच्या जीवनात गुरु आले आणि त्यांनी प.पू. बाबांचे नामकरण भक्तराज, असे केले; म्हणून वसंतपंचमीचा दिवस प.पू. बाबांचा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो आणि बरोबर महर्षींनीही या दिवशी सत्यनारायणासारखाच शिर्‍याचा प्रसाद करण्यास साधकांना सांगितले आणि तुमच्या गुरूंचे गुरु, म्हणजेच प.पू. बाबा सत्यनारायण आहेत, असे सांगितले. यावरूनच महर्षींची सर्वज्ञता लक्षात येते. - सौ. गाडगीळ)

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.

तीन कळसांची पूजा ध्यानमंदिरात होत असतांना गारवा ध्यानमंदिराच्या दारातून आत येऊ लागणे, त्या वेळी ध्यान लागत असणे आणि निर्गुण लहरी कळसांकडे आकर्षित होत आहेत, असे वाटणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
    महर्षींनी रामनाथी आश्रमावर बसवण्यासाठी तांब्याचे कळस मंत्रशक्तीने भारीत करून दिले आहेत. १२.२.२०१६ या दिवशी वसंतपंचमीच्या शुभमुहुर्तावर त्यांची आश्रमाच्या ध्यानमंदिरात पूजा करण्यात आली. ही पूजा चालू असतांना मी तेथे उपस्थित होतो. तेव्हा साधारण ७५ टक्के पूजा होत आल्यानंतर मला अचानक गारवा जाणवू लागला. तेव्हा लक्षात आले की, तो गारवा ध्यानमंदिराच्या दारातून आत येत आहे. त्या दारासमोर खिडकी इत्यादी काही नसूनही आणि चित्रीकरणासाठी हॅलोजनचे दिवे चालू असूनही अगदी पंखा लावावा, असा गारवा त्या दारातून सतत आत येत होता आणि तो पूजा पूर्ण झाल्यानंतरही काही वेळ जाणवत होता. गारवा जाणवत असतांना पुष्कळ शांत वाटत होते आणि ध्यान लागत होते. मंदिराच्या कळसाकडे ईश्‍वरी तत्त्व आकर्षित होते, तसे शांतीच्या, म्हणजे निर्गुण लहरी कळसाकडे आकर्षित होत आहेत, असे वाटले.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

महर्षींनी मंत्रशक्तीने भारीत करून पाठवलेल्या तीन कळसांची पूजा वसंतपंचमीच्या दिवशी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात करण्यास सांगणे आणि नंतर हे कळस अक्षय्यतृतीयेच्या दिवशी रामनाथी आश्रमाच्या वर बसवण्यास सांगणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी रामनाथी आश्रमावर बसवण्यासाठी 
तांब्याचे कळस मंत्रशक्तीने भारीत करून देण्याची कारणे
१ अ. कळसाच्या माध्यमातून सनातनच्या कार्याची प्रसिद्धी सर्व विश्‍वभर व्हावी.
१ आ. कळसात घातलेल्या करुंगाळी वृक्षाच्या लाकडामुळे आश्रमाचे वीज पडण्यापासून रक्षण व्हावे.
१ इ. कळस हे मंत्रशक्तीने भारीत करून दिलेले असल्याने वातावरणातील नकारात्मक स्पंदने दूर ढकलली जावीत.
१ ई. विश्‍वमंडलात भ्रमण करणार्‍या सकारात्मक लहरी आणि देवतांची स्पंदने आश्रमात यावीत.
१ उ. रामनाथी आश्रमात सर्व देवदेवता येऊन रहाण्यासाठी आणि रामनाथी आश्रमाची ख्याती अध्यात्माचा विश्‍वदीप म्हणून सार्‍या विश्‍वात व्हावी. (प.पू. भक्तराज महाराज यांनी गोव्यात विश्‍वदीप होईल, असे मला सांगितले होते. - डॉ. आठवले)

छोट्या प्रसंगातूनही आदर्श निर्माण करणारे सनातनचे संत

    ११.९.२०१५ या दिवशी सकाळी अल्पाहार करतांना पू. गाडगीळकाकांच्या हातून कशाय असलेला पेला पडला. त्यामुळे कशाय जमिनीवर सांडले. मी आता काय करू ? असा विचार करण्यापूर्वीच पू. गाडगीळकाका थोडेही विचलित न होता लादी पुसण्याचे कापड घेऊन आले आणि त्यांनी सांडलेले कशाय पुसून घेतले.
    स्वत:चे काम स्वत: करणे आणि ते तत्परतेने करणे हा आदर्श सनातनचेच संत या जगात ठेवू शकतात. प.पू गुरुदेवांनीच अशा संतांना निर्माण केले आहे. गुरुदेवांच्या चरणकमली कोटी कोटी नमस्कार.
- श्री व्यंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१५)

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात कळसांची पूजा आणि स्थापना करण्यामागील उलगडलेले कारण

कळसाची पूजा आणि स्थापना केल्याने ब्रह्मांडातील सर्व प्रकारच्या ईश्‍वरी 
लहरी कळसामध्ये प्रवेश करत असल्याने साधकांना सर्व देवतांचे आशीर्वाद मिळणार असणे 
कळसावर गंधपुष्प वाहतांना परात्पर गुरु डॉ. आठवले
       १०.२.२०१६ या दिवशी महर्षींनी दोन तांब्याचे आणि एक पितळ्याचा, अशा तीन कळसांची पूजा वसंतपंचमीच्या दिवशी करायला सांगितली आहे. वसंतपंचमीपासून अक्षय्यतृतीयेपर्यंत या कळसांची पूजा करून अक्षय्यतृतीयेला एक कळस रामनाथी आश्रमावर सर्वांत उंच ठिकाणी बसवायला सांगितले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर बसवण्यात येणार्‍या कळसांचे वसंतपंचमीच्या शुभमुहुर्तावर केले विधीवत् पूजन !

कळसांचे पूजन करतांना साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर
      रामनाथी (गोवा), १३ फेब्रुवारी - येेणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि ब्रह्मांडातून येणारी देवतांची स्पंदने साधकांना मिळून चैतन्याचा लाभ व्हावा, यांसाठी महर्षींनी मंत्रशक्तीने भारीत करून पाठवलेल्या तीन कळसांचे वसंतपंचमीच्या शुभमुहुर्तावर, १२ फेब्रुवारी या दिवशी येथील सनातन आश्रमात विधीवत् पूजन करण्यात आले. आश्रमातील ध्यानमंदिरात करण्यात आलेल्या या पूजनाचे पौरोहित्य सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी आणि पूजन साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले. याप्रसंगी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी या कळसांना गंधपुष्प वाहून दर्शन घेतले. अक्षय्यतृतीयेला हे कळस रामनाथी आश्रमावर (सर्वांत उंच ठिकाणी) बसवण्यात येणार आहेत. अक्षय्यतृतीयेपर्यंत या कळसांवर विधीवत् मंत्रजप करून संस्कार करण्यात येणार आहेत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
व्यावहारिक प्रश्‍न आणि संत
संत उत्स्फूर्तपणे बोलतात ते खरे. एखाद्याच्या प्रश्‍नाला लगेच उत्तर दिले तर ते खरे समजायचे, थोड्या वेळाने दिले तर ते खोटे असू शकते. एखाद्याने प्रश्‍न विचारल्यावर संत उत्तर देतात, ते बहुधा त्याला बरे वाटावे असे असते. (हे उत्तर बिंब- प्रतिबिंब या न्यायाने असते; म्हणजे त्याला जे उत्तर हवे असते (बिंब), त्याचे प्रतिबिंब संतांच्या मनात पडून ते त्याप्रमाणे सांगतात.) संतांना व्यवहारातील प्रश्‍नांविषयी, म्हणजे मायेविषयी, काहीही सांगायला आवडत नाही. संत अध्यात्मविषयक प्रश्‍नांची उत्तरे आवडीने सांगतात आणि ती कधीच चुकीची असत नाहीत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण')

निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !

परात्पर गुरु डॉ. आठवले
काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी 'मतदारांनी आपल्याला निवडावे', अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून जनतेची कल्पनातीत सेवा होऊ शकेल. देवावर श्रद्धा नसणारे पुजारी आणि महंत हिंदु धर्माला लांछनास्पद आहेत !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, असे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

साम्यवाद्यांचा देशद्रोह !

संपादकीय 
   देहलीचे जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय देशद्रोह्यांचा अड्डा झाल्याच्या आरोपाने देशातील राजकारण आणि वातावरण ढवळून निघू लागले आहे. नेहरू आणि देशद्रोह यांचा परस्परांशी जुनाच संबंध आहे, असेही राष्ट्रप्रेमी नागरिकांना वाटू लागले आहे. भारतात देशद्रोह्यांना शिक्षा करण्यात येत नसल्याने, केल्यास त्याला विरोध होत असल्याने आणि शिक्षा केल्यानंतरही त्यांचे गुणगान होत असल्याने नेहरू विश्‍वविद्यालय देशद्रोह्यांचा अड्डा झाला काय आणि न झाला काय, याकडे सामान्य जनता दुर्लक्षच करील, अशी स्थिती आजही आहे; मात्र जे राष्ट्रप्रेमी आहेत, ते याविरोधात संतप्त झाले आहेत. यातूनच विश्‍वविद्यालयातील देशद्रोह्यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. याच विश्‍वविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी सैनिकांनीही विरोध चालू केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn