Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे पू. नारायण (तात्या) निकम (अपशिंगे, सातारा) यांची आज पुण्यतिथी

भोजशाळेतील पूजेवर हिंदूंचा बहिष्कार !

भोजशाळेच्या बाहेर पूजा करतांना शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती आणि धर्माभिमानी हिंदू
हिंदूंकडून भोजशाळेबाहेर होम-हवन आणि पूजा
हिंदुबहुल देशात हिंदूंच्या प्राचीन मंदिरात त्यांनाच पूर्ण दिवस 
पूजा करण्यास नाकारले जाणे हिंदूंसाठी लज्जास्पद !
      भोजशाला (धार, मध्यप्रदेश) - भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू पूजासाहित्य घेऊन भोजशाळेकडे येत होते; परंतु पूजासाहित्य घेऊन भोजशाळेत जाण्यास प्रतिबंध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे भोज उत्सव समिती, हिंदू जागरण मंच इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरस्वतीमातेची पूजा-अर्चा आणि होम-हवन भोजशाळेच्या बाहेरच करण्याचा निर्णय घेतला. असे प्रथमच झाले की, भोजशाळेच्या बाहेर पूजा करण्यात आली. भोज उत्सव समितीचे सदस्य अशोक जैन यांनी भोजशाळेतून बाहेर येऊन सांगितले, भोजशाळा परिसराला छावणीचे रूप देण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लक्ष्य होते ! - हेडलीची स्वीकृती

हिंदूंच्या मूळावर उठलेला जिहादी आतंकवाद ! हिंदूंची मंदिरे, त्यांचे नेते आदींना 
लक्ष्य करू पहाणार्‍या जिहादी आतंकवादाचा सामना हिंदू कसा करणार आहेत ?
     मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली याने दिली. अमेरिकेतील कारागृहात जेरबंद असलेल्या हेडलीची सध्या मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवणे चालू आहे. साक्ष नोंदवण्याचा १२ फेब्रुवारी हा ५ वा दिवस होता. त्या वेळी त्याने वरील माहिती दिली. तो म्हणाला, शिवसेना भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मी राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीशी चांगली मैत्री केली. रेगे यांना मी शिवसेना भवनात भेटलो होतो. मी शिवसेना भवनाची रेकी केली होती.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अंनिसचे आर्थिक गैरव्यवहार आणि तिचे नक्षलवाद्यांशी संबंध यांची चौकशी करा !

जंतरमंतर येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
देहलीच्या जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अंनिसकडूनही करण्यात आलेल्या आंदोलनाला तुरळक उपस्थिती !
      नवी देहली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि परिवर्तन ट्रस्ट यांमधील आर्थिक गैरव्यवहार, तसेच त्यांचे असलेले नक्षलवाद्यांशी संबंध यांत पाळेमुळे लपली आहेत का, हे पडताळायला हवे. त्याचबरोबर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विदेशातून अनेक मार्गाने पैसे येत होते, ते कशासाठी आणि त्याचा उपयोग धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी होत होता का, याचीही सखोल चौकशी शासनाने करावी, या मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला देहलीच्या जंतरमंतर येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. वैदिक उपासना पीठ, हिंदू सेना, हिंदु डिफेंस लीग, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना यात सहभागी झाल्या होत्या. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. या आंदोलनापासून जवळच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनही आंदोलन करण्यात आले; मात्र तेथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते होते

पोलिसांच्या दबावामुळे वरळी येथील मंदिर विश्‍वस्तांनी हिंदु धर्मजागृती सभेस अनुमती नाकारली !

      मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरळी येथे येत्या रविवारी, १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेसाठी एका मंदिराचे स्थळ निश्‍चित झाले होते; परंतु विश्‍वस्तांवर पोलिसांचा दबाव आल्याने त्यांनी सभेसाठी स्थळ देण्याची अनुमती नाकारली आहे.
     या स्थळाच्या संदर्भात विश्‍वस्तांकडून जागेची रितसर अनुमती काढण्यात आली होती. विश्‍वस्तांनीही समितीचे कार्य पाहून अनुमती दिली होती. मंदिराच्या विश्‍वस्तांपैकी एका विश्‍वस्तांच्या घरीही जाऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांच्यावर समितीला सभेसाठी जागा मिळू नये, यासाठी दबाव टाकला. अखेर पोलिसांच्या दबावामुळे विश्‍वस्तांनी सभेसाठी जागेची अनुमती देऊ शकणार नाही, तुम्ही मंदिरात सभा करू नका, असे १२ फेब्रुवारीला सांगून सभा घेण्यासाठी मंदिराचे सभागृह देण्यास नकार दिला.

सनातनच्या २ साधकांची पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचा न्यायालयात अर्ज

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
      पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. हेमंत शिंदे आणि श्री. नीलेश शिंदे यांची पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही साधकांच्या भ्रमणभाषचे टॉवर लोकेशन आणि त्यांनी दिलेली माहिती यात तफावत असल्याने ही चाचणी करणार असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणणे आहे. दैनिक सनातन प्रभातचे वितरण करत असतांना त्यांच्या भ्रमणभाषचे लोकेशन हे डॉ. दाभोलकारांची हत्या झालेल्या ठिकाणांच्या आसपास असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणणे आहे. सनातन संस्थेने या संदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे दोघेही निर्दोष असल्याचे या पूर्वीच सांगितले आहे.
निरपराध्यांना दोषी ठरवण्याच्या अन्वेषण यंत्रणांच्या
मानसिकतेमुळे अविश्‍वासार्ह ठरलेली ब्रेन मॅपिंग चाचणी !
      एखाद्या गुन्ह्यात निरपराध व्यक्तीला अन्वेषण यंत्रणांनी नाहक आरोपी केल्याच्या अनेक घटना भारतात घडल्या आहेत. त्यासाठी चुकीचे पुरावे निर्माण करणे, खोटे साक्षीदार उभे करणे, अशी अनेक अवैध कृत्ये अन्वेषण यंत्रणा करतात, हे विविध प्रकरणांतून उघड झाले आहे.

धारवाडमध्ये हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या बैठकीतून धर्माभिमान्यांनी घेतली प्रेरणा !

धर्मप्रसाराच्या कार्यात कृतीशील होण्याचा केला निर्धार !
बैठकीत सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदु
     धारवाड (कर्नाटक) - हिंदु जनजागृती समितीने हिंदुजागृती डॉट ऑर्ग या समितीच्या संकेतस्थळाच्या धर्माभिमानी वाचकांसाठी येथे ७ फेब्रुवारीला एका बैठकीचे आयोजन केले होते.
१. कार्यक्रमाच्या आरंभी धर्मशिक्षणपर ध्वनीचित्रचकती (व्हिडिओ सीडी) दाखवण्यात आली. यानंतर समितीच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची ओळख करून दिली, तसेच समितीच्या कार्याला आतापर्यंत मिळालेल्या यशाविषयीही माहितीही दिली. 
२. यानंतर समितीचे श्री. अशोक भोज यांनी उपस्थितांना धर्माचरणाचे महत्त्व सांगितले.
३. नंतर गटचर्चा घेण्यात आली. या वेळी उपस्थित धर्माभिमानी धर्मकार्यात कसे सहभागी होऊ शकतात, याविषयी चर्चा करून नियोजन करण्यात आले.बिहारमध्ये मुसलमान मुली घेत आहेत संस्कृतचे शिक्षण !

संस्कृतचे महत्त्व मुसलमान मुलींना समजते, तर हिंदूंना का समजत नाही ?
     गोपालगंज (बिहार) - बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात असलेल्या कुचैकोते या गावातील श्री राधाकृष्ण संस्कृत माध्यमिक शाळेतील १२५ विद्यार्थिनींपैकी ८५ विद्यार्थिनी मुसलमान असून त्या सर्व संस्कृत भाषा शिकत आहेत. उर्वरित ५० विद्यार्थी मुले आहेत.
       या शाळेत ६ वी ते १० वी पर्यंत शिक्षण दिले जाते. संस्कृत विषयाचे १०० गुणांचे ३ पेपर असतात. इतर विषयांमध्ये इंग्रजी, विज्ञान आणि भूगोल या विषयांचा अंतर्भाव आहे. मुसलमान मुलींनी संस्कृत विषयात चांगलीच प्रगती केली आहे. त्या अस्खलित संस्कृत बोलू शकतात. यावर्षी ४० मुली १० वीची परीक्षा देणार आहेत.

मुसलमान मुलींचे विवाहासाठीचे किमान वय २१ वर्षे असावे ! - ८८ टक्के मुसलमान महिलांचे मत

  • स्त्रीमुक्तीवाले आणि पुरो(अधो)गामी याविषयी आता गप्प का ?
  • मुसलमान महिलांना न्याय देण्यासाठी केंद्रशासन समान नागरी कायदा लागू करील का ?
     भोपाळ (मध्यप्रदेश) - मुसलमानांमध्ये आजही बालविवाहाची कुप्रथा चालू आहे. ५५ टक्के मुसलमान मुलींचा विवाह १८ वर्षांपेक्षा कमी वयात होऊन जातो. आता याविरोधात मुसलमान महिला संघटनांकडूनच आवाज उठू लागला आहे.
१. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुसलमान मुलींचे विवाहासाठीचे किमान वय २१ वर्षे असावे, असे ८८ टक्के मुसलमान महिलांचे मत आहे.
२. ९२ टक्के महिलांनी तीन वेळा तोंडी देण्यात येणार्‍या तलाक या प्रथेला विरोध दर्शवला आहे.
३. ९१ टक्के मुसलमान महिला त्यांच्या पतीने दुसरा विवाह करू नये, या मताच्या आहेत. 
४. या संघटनेने सर्वेक्षणांतर्गत देशभरातील ५ सहस्र मुसलमान महिलांचे मत घेतले. 
५. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ही संघटना देशभरातील १६ पेक्षा अधिक राज्यांमध्ये मुसलमान महिलांच्या हितासाठी कार्यरत आहे.

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

इसिसमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या 
धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी 
       जळगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या वतीने ११ फेब्रुवारी या दिवशी महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी व्हॅलेंटाईन डे बंद करा आणि भारतीय संस्कृतीचे आचरण करा ! इसिसमध्ये सहभागी होणार्‍या देशद्रोह्यांचा धिक्कार असो ! अशा घोषणा देण्यात आल्या.

व्हॅलेन्टाईन डे विरोधात नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून केला निषेध 
जोडेमारा आंदोलनात सहभागी हिंदू
       नंदुरबार - व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याला विरोध म्हणून हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून आज १२ फेब्रुवारी २०१६ या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत येथील नेहरू चौकात जोडेमारा आंदोलन करण्यात आले. तसेच इसिस आणि अमरनाथ यात्रेच्या संदर्भातील मागण्यांसाठी निदर्शनेसुद्धा करण्यात आली. आज नंदुरबार येथील नेहरु चौकात सकाळी १० वाजता ही निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

भाजपला गेल्या २ वर्षांमध्ये सर्वाधिक ६०८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त, तर आपच्या निधीमध्ये २७५ टक्क्यांची वाढ !

      नवी देहली - भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वाधिक ६०८ कोटी २१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर्) या संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. आम आदमी पक्षाच्या पक्षनिधीमध्येही सर्वाधिक २७५ टक्क्यांची वाढ झाली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
१. या अहवालानुसार केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला वर्ष २०१३-१४ मध्ये १७० कोटी ८६ लाख रुपये, तर वर्ष २०१४-१५ मध्ये ४३७ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
२. आम आदमी पक्षाला वर्ष २०१३-१४ मध्ये ९ कोटी ४२ लाख रुपये प्राप्त झाले होते; परंतु वर्ष २०१४-१५ मध्ये यात २७५ टक्के एवढी प्रचंड वाढ होऊन त्यांना ३५ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
३. काँग्रेसला वर्ष २०१४-१५ मध्ये १४१ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
४. देशातील ५ प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा एकूण निधी वर्ष २०१३-१४ मध्ये २४७ कोटी ७७ लाख रुपये होता. त्यात २०१४-१५ मध्ये ६२२ कोटी २८ लाख रुपये एवढी वाढ झाली असून ती १५१ टक्के आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org
English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/

बांगलादेशमध्ये तरुण दत्ता या हिंदु व्यापार्‍याचे शीर कापून करण्यात आली निर्घृण हत्या !

इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या धर्मांधांचा जिहादी दिनक्रम चालूच !
बांगलादेश शासन हिंदूंची बिकट स्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना करत नाही आणि 
भारत शासनही यावर बांगलादेशला काही जाब विचारत नाही !
     ढाका (बांगलादेश) - ८ फेब्रुवारी या दिवशी गईबंधा जिल्ह्यातील बर्धनकुटी क्षेत्रात पोलिसांना एक कापलेले शीर सापडले आणि धड वेगळ्या ठिकाणी पडल्याचे आढळून आले. याचे अन्वेषण केल्यावर तरुण दत्ता नावाच्या ४५ वर्षीय हिंदु व्यापार्‍याचे ते असल्याचे निष्पन्न आले.
     गोविंदगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अमिनुल इस्लाम यांनी या माहितीला दुजोरा दिला असून काही धर्मांधांना खंडणी देण्यास नाकारल्यामुळे तरुण दत्ता यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाजही इस्लाम यांनी व्यक्त केला आहे.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सेवेची तळमळ असल्याने ती करता येत नाही, यामुळे खंतावणार्‍या आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असलेल्या चिपळूण येथील श्रीमती अनुपमा कुलकर्णी (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
पुणे येथील श्रीमती अनुपमा कुलकर्णी यांनी गाठला ६३ प्रतिशत आध्यात्मिक पातळी
      पुणे - येथील साधिका श्रीमती अनुपमा कुलकर्णी या ६३ प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त करून जीवनमरणाच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याची आनंददायी घोषणा पू. (कु.) स्वाती खाडये यांनी एका अनौपचारिक सोहळ्यात केली. या वेळी श्रीमती कुलकर्णी यांचा पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
     श्रीमती कुलकर्णी काकू त्यांना सत्संग मिळावा, यासाठी पुष्कळ तळमळत होत्या. त्यांच्या मुलीलाही त्यांनी मला कुठे तरी सत्संगात घेऊन चल, असे बोलून दाखवले आणि त्याच दिवशी सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांचे त्यांच्या घरी जाणे झाले. त्या वेळी देवाच्या कृपेनेच संतच प्रत्यक्ष घरी आले, याविषयी कुलकर्णी काकूंना कृतज्ञता वाटत होती. प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यासाठी बाहेर पडून वेळ देणे त्यांना शक्य नसले, तरी त्यांनी आंतरिक साधनेच्या बळावर अध्यात्मात गरुडझेप घेतली.

तुर्कस्थानने दिली सिरियाच्या मुसलमान शरणार्थ्यांना युरोपमध्ये पाठवण्याची धमकी !

     अंकारा (तुर्की) - सिरियातील अधिकाधिक नागरिकांना तुर्कस्थानमध्ये आश्रय द्यावा, असे संयुक्त राष्ट्र संघ, युरोपीय युनियन आणि अन्य अंतरराष्ट्रीय संघटन यांनी तुर्कस्थानला आवाहन केले आहे. यावर तुर्कस्थानचे राष्ट्रपती तय्यीप एरदोगन यांनी धमकी देत म्हटले आहे की, आमचे शेजारी राष्ट्र असलेल्या सिरियातून येणार्‍या लाखो शरणार्थींना आम्ही एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतो. आमची सहनशक्ती संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सिरियातून आलेले लोंढे आम्ही थेट युरोपला पाठवू. 
१. इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी आक्रमणांमुळे आधीच जर्जर झालेल्या सिरियात आता सिरियाचे राष्ट्रपती बशर अल्-असद आणि विद्रोही यांच्यात चालू असलेल्या युद्धाला रशियामुळे गती प्राप्त झाली आहे. 

शाश्‍वत सिंचन व्यवस्थाच शेतीतून परिवर्तनीय विकास घडवेल ! - मुख्यमंत्री

      अकोला, १२ फेबु्रवारी (वार्ता.) - सतत होणारी नापिकी, दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि अनियमित पडणारा पाऊस यांवर रामबाण उपाय म्हणजे, जलयुक्त शिवार योजना असून महाराष्ट्रात जलयुक्त शिवाय योजनेतून चांगले विकास कार्य घडून येत आहे. कोणतीही योजना ही केवळ शासकीय योजना नसावी, तर ती लोक चळवळ म्हणून प्रगतीस हातभार लावणारी असावी. जलयुक्त शिवार योजना ही चळवळ झाल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील विविध शासकीय इमारतींच्या लोकार्पण सोहळा आणि भूमीपूजन कार्यक्रमात बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील होते.
      मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शाश्‍वत सिंचन योजना शेतकर्‍यांना सुख आणि समृद्धी देऊ शकते; म्हणून जलसिंचनासाठी १४०० कोटी रुपयांची योजना शासनाने हाती घेतली आहे. मागेल त्याला शेत तळे दिले जाऊन शेतकर्‍यांच्या विकासासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे भारती जय जननी! दुष्ट आणि देशद्रोही नेते आणि अधिकारी यांच्यापासून भारताला वाचवण्यासाठी आज पुन्हा प्रत्येक घरात एकेक मदनलाल धिंग्रा जन्माला घाल ! (सावरकर टाइम्स, एप्रिल २०१०)

    

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करा ! - धर्माभिमानी हिंदूंची मागणी

भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
      ठाणे, १२ फेब्रुवारी (वार्ता.) - भिवंडी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करावी, धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत हिंदूंना सरस्वतीपूजन करण्यास अनुमती मिळावी, अमरनाथ यात्रेवरील अन्यायकारक निर्णय शासनाने मागे घ्यावेत, तसेच व्हॅलेंटाइन डे सारख्या कुप्रथा रोखाव्यात, असे आवाहन भिवंडी येथील आंदोलनात करण्यात आलेे. या प्रसंगी वक्त्यांनी पुढील मार्गदर्शन केले.

विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड !

      संभाजीनगर - भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि संभाजीनगर येथील माजी महापौर विजया रहाटकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी अथवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या कार्यरत असतील. मुंबईतून वृंदा किर्तीकर, अधिवक्त्या आशाताई लांडगे, नागपूरच्या नीता ठाकरे, जळगावच्या देवयानी ठाकरे, लातूरच्या शोभा बेंझर्गे, बीडच्या गयाताई कराड यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.
     आज हिंदु धर्म नष्ट होऊन सर्वत्र भोगसंस्कृती येईल कि काय, ही माझी शंका हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या कार्यामुळे मिटली आहे !
- ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

१०० वर्षांपूर्वी आइनस्टाईन यांनी सांगितलेल्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध !

कुशाग्र भारतीय शास्त्रज्ञांचे शोधात अमूल्य योगदान !
गेल्या १०० वर्षांतील सर्वांत मोठा शोध !
     वॉशिंग्टन - सापेक्षतावादाचा (थीअरी ऑफ रिलेटिविटी) सिद्धांत मांडून वैज्ञानिक जगताची समीकरणे पालटणारे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी शतकभरापूर्वी वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. अवकाश (स्पेस) आणि काळ (टाइम) यांच्या पटलावरून तरंगाप्रमाणे किंवा लाटांप्रमाणे प्रवास करणार्‍या गुरुत्वीय लहरींचा शोध अखेर शास्त्रज्ञांनी लावला आहे. या १०० वर्षांच्या कालावधीत लावण्यात आलेला हा महाशोधच आहे, अशी आनंदाची भावना शास्त्रज्ञांच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.

चीनमध्ये प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांकडून शुद्ध बाटलीबंद हवा विकत घेण्यास प्रारंभ !

  • विनाशाकडे नेणार्‍या कथित विकासामुळे चीनप्रमाणे भारतातही ही स्थिती आल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • हिंदूंनो, साधनेमुळेच वातावरणाची शुद्धी होऊन प्रदूषणासारख्या समस्येवर मात करता येते, हे जाणा !
    बीजिंग - विज्ञानामुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या विळख्यात चीनमधील प्रमुख शहरे सापडली आहेत. प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी श्‍वास घेण्यासाठी शुद्ध बाटलीबंद हवा विकत घ्यायला प्रारंभ कला आहे. इंग्लंड आणि कॅनडा येथून आयात केलेली शुद्ध बाटलीबंद हवा चीनमध्ये विकली जात आहे. 
१. इंग्लंडमधील एक आस्थापन ५८० ग्रॅम शुद्ध बाटलीबंद हवा ७ सहस्र ८०० रुपयांत विकत आहे. 
२. इंग्लंडमधील सर्वाधिक शुद्ध हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या गावांमधूनच ही हवा गोळा केली जाते.

आज धुळे येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्च्या

       धुळे - येथे शनिवार, १३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीराम पेट्रोलपंप येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पाच कंदील, पारवा रोड, धुळे महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्च्याची समाप्ती होईल. तरी या मोर्च्यात अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटना पुढील मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशमधील हिंदूंची दु:स्थिती जाणा !
     बांगलादेशच्या गईबंधा जिल्ह्यातील गोविंदगंज शहरात खंडणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून धर्मांधांनी ४५ वर्षीय तरुण दत्ता या हिंदु व्यापार्‍याची शिर कापून हत्या केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshme dharmandhone ek Hindu vyapariki sir kaatkar ki hatya.
Kya Bharat sarkar aise atyacharo ke virodhme Bangladeshko fatkaar lagayegi ?

जागो ! : बांगलादेश में धर्मांधों ने हिन्दू व्यापारी की सिर काटकर की हत्या.
क्या भारत सरकार ऐसे अत्याचारों के विरोध में बांगलादेश को फटकार लगाएगी ?


काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन केल्यामुळेच बांगलादेशमधून आसाममध्ये घुसखोरी ! - अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

आसाम निवडणुकांसाठी भाजपने बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटशी केली युती !
     कोक्राझार (आसाम) - १४ व्या बोडोलॅण्ड दिवसाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोक्राझार येथे आयोजित जनसभेला संबोधित केले. ते म्हणाले, काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनामुळेच बांगलादेशमधून आसाममध्ये घुसखोरी झाली. आजही संपूर्ण राज्यात बांगलादेशातून घुसखोरी होत आहे. घुसखोर आता देशभर झाले असून त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. (केंद्रात भाजप सत्तेत असतांना केंद्रशासनाने देशभरातील घुसखोरांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! - संपादक)

नापास करण्याची धमकी देत नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार !

नैतिकता घसरल्याचे द्योतक !
    रायपूर (छत्तीसगड) - परीक्षेत नापास करण्याची धमकी देत छत्तीसगडमधील एका विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात ही घडली असून प्रवीण बंजारे असे या शिक्षकाचे नाव आहे.
१. पीडित विद्यार्थिनी ही तेथील शासकीय शाळेत शिकत होती. तेथेच प्रवीण हा शिक्षक होता. 
२. तेथेच शिकणार्‍या विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यासाठी बंजारे त्यांच्या घरी जात असत.
३. एके दिवशी ती घरात एकटीच होती. याचा अपलाभ घेत प्रवीणने तिला नापास करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. 
४. मुलीच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शिक्षक प्रवीण याच्या मुसक्या आवळल्या.

(म्हणे) शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे ! - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे मत

मशिदीत महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, अशी मागणी शशी थरूर कधी करू धजावतील का ?
     थिरुवनंतपुरम् - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, शबरीमाला मंदिरात कुठल्याही वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. थरूर यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांचे हे वैयक्तिक मत आहे. थरूर यांनी असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात राज्यात सत्तेवर असणार्‍या काँग्रेस शासनाने यापूर्वीच तसे करण्याची मागणी फेटाळली आहे. काँग्रेस शासनानुसार धार्मिक प्रकरणात पुजार्‍यांचे मत अंतिम मानले पाहिजे.


भाजप अयोध्येत राममंदिर बनवू शकत नसेल, तर शिवसेना स्वबळावर मंदिर बनवील ! - संजय राऊत

शिवसेनेच्या प्रखर हिंदु धर्माभिमानामुळेच ती हिंदूंना जवळची वाटते !
    मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या सूत्रामुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकला; पण भाजप शासन राममंदिर बनवू शकत नसेल, तर त्याने सत्ता सोडून द्यावी. भाजपने हिंदुत्वाच्या सूत्रावरून कोलांटीउडी मारली आहे. त्यामुळेच तो राममंदिरावर स्वतःचे मत व्यक्त करत नाही.
राऊत पुढे म्हणाले की,
१. २०१७ च्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत शिवसेना सर्व ३५० जागांवर निवडणूक लढवील.
२. जर शिवसेनेचे २० उमेदवारही निवडून आले तरी त्यांना हाताशी धरून राममंदिराची उभारणी करण्यात येईल. हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना सदैव जनतेबरोबर राहिली आहे.
३. राऊत यांनी उत्तरप्रदेशच्या सत्ताधारी समाजवादी पक्षावर आक्रमण करीत तिला पाकप्रेमी संबोधित करत म्हटले, पाकिस्तान भारताचा सर्वांत मोठा शत्रू असतांना पाकिस्तानी गायकांना बोलावून उत्तरप्रदेश शासन गुलाम अलीसारख्या लोकांना सन्मानित करते.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले ४ लक्ष तरुण संघटित करण्यासाठी एखादा साधक किंवा संत यांच्यातील दैवी शक्ती प्रगट करण्याविषयी एका साधकाने केलेली पत्ररूपी प्रार्थना !

श्री. राम होनप
प.पू. डॉक्टर यांस,
     ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या वडिलांना मनातील सांगते, त्याप्रमाणे मी माझ्या मनातील विचार आपल्याला सांगत आहे.
  आद्यशंकराचार्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली धर्मसंस्थापना त्यांच्यातील दैवी प्रगट शक्तीमुळे साध्य झाली. आता आपल्याला समर्पित भावाचे ४ लक्ष देशभक्त तरुण हवे आहेत. हे कार्य मानवी क्षमतेपलीकडे असून त्यासाठी प्रगट दैवी शक्तीची आवश्यकता आहे.
    आश्रमात नोव्हेंबर २०१३ मध्ये पुरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती आले होते. त्या वेळी त्यांना आपण विचारले, असे एखादे नाव सांगा की, ज्याच्यामुळे लक्षावधी देशभक्त तरुण धर्मकार्यासाठी गोळा होतील. त्या वेळी शंकराचार्य म्हणाले, असे एकही नाव नाही. आपल्यामधीलच एखाद्याचे ईश्‍वर माध्यम बनवेल.

नेहरू विश्‍वविद्यालयात आतंकवादी महंमद अफझलचा स्मरण दिवस साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

  • अशा देशद्रोह्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली, तरच इतरांना वचक बसेल !
  • विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार अटकेत !
      नवी देहली - साम्यवादी विचारसरणीच्या डेमोक्रेटिक स्टुडंट युनियन या विद्यार्थी संघटनेकडून ९ फेब्रुवारीला देहलीच्या जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात संसदेवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी फाशी देण्यात आलेला महंमद अफझल आणि जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक आतंकवादी मकबूल भट यांचा स्मरण दिवस आयोजित करण्यात आला होता. अनुमती नसतांना साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पाकिस्तान झिंदाबाद, अशा देशद्रोही घोषणाही देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. या संदर्भात देहली पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली आहे. (या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामागे नक्कीच साम्यवादी आणि निधर्मी यांचा हात असणार. त्यामुळे पडद्यामागील या सूत्रधारांचाही पोलिसांनी शोध घ्यावा ! - संपादक)

व्हॅलेंटाईन डेच्या फसव्या प्रेमाला बळी पडल्यामुळे युवतींची होणारी कुचंबणा

   १४ फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे जगभर साजरा करण्यात येतोे. पाश्‍चात्त्यांच्या या डेचे तरुण-तरुणींमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणावर अंधानुकरण केले जाते. मन व्यापून टाकणारी एखादी कल्पना मनात आल्यावर तिचा अतिरेक झाल्यास मनोविकार जडू शकतो, असे फ्रॉईड या प्रसिद्ध मनोवैज्ञानिकाने सांगितले आहे. याचाच परिपाक या डेच्या निमित्ताने देशात दिसून येत आहे. व्हॅलेंटाईन डेेमुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे तरुण पिढीचे अधःपतन होत असून, ही देशापुढील एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. यासंदर्भात एका मानसोपचार तज्ञांचे अनुभव आणि त्यांचे विचार येथे देत आहोत.

श्री शनैश्‍वर देवस्थान बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्री शनिशिंगणापूर प्रकरण
      नगर, १२ फेब्रुवारी - श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे. त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी काही नास्तिकवादी महिलांनी धर्मपरंपरा मोडण्यासाठी अयशस्वी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात त्याविषयी एका बैठकीचे आयोजन केले होते; परंतु ही बैठक निष्फळ ठरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी इशरत जहाँची पाठराखण केल्याच्या प्रकरणी चौकशी करा ! - भाजप

आतंकवाद्यांची उघडपणे पाठराखण करणार्‍या 
अशा राजकीय पक्षांमुळेच लोकराज्य निरर्थक ठरले आहे !
     मुंबई - आतंकवादी इशरत जहाँ हिची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पाठराखण हे केवळ अल्पसंख्य समुदायाच्या अनुनयाचे राजकारण होते कि त्यामागे आणखी काही धागेदोरे होते, याचा शासनाने तपास करून कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता माधव भांडारी यांनी केली आहे.

सहस्र वर्षांपूर्वीच्या कालखंडातही आजच्या तुलनेत अत्यंत प्रगत असलेले भोज राजाचे अष्टांग स्थापत्यशास्त्र !

१. आजच्या काळातील सर्व विषय राजा भोजने ग्रंथांत ७ सहस्र श्‍लोकांत मांडणे
     वास्तूशास्त्र आणि तंत्रज्ञान यांवर आधारलेला समरांगण सूत्रधार हा ग्रंथ, म्हणजे एक अद्भुत खजिना आहे. विमानशास्त्र, जलशास्त्र, यंत्रशास्त्र असे आजच्या काळातील सर्व विषय भोज राजाने त्यातील ७ सहस्र श्‍लोकांत मांडले आहेत. डोंगरावरचे पाणी खाली आणून त्या शक्तीवर पॉवर हाऊस उभारण्याचे तंत्र त्यात आहे.
२. शहर आराखड्यात विचार केलेले अनेक बारकावे
     शहर आराखडा असा एक अध्याय आहे. त्यात अमुक-अमुक लोकसंख्या असलेल्या गावांना जोडणारा रस्ता किती रुंदीचा असावा, तेही नमूद केले आहे. राजपथ किती रुंद असावा, याविषयी राजा भोज लिहितात, इतका प्रशस्त की, चतुरंग दल एकमेकांना न घासता जाऊ शकेल.

घोर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शरिरासोबत मनही सक्षम बनवणे, ही साधनाच असणे

श्री. अविनाश जाधव
     २७.१.२०१६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या राष्ट्र आणि धर्म संदर्भातील लेखामध्ये देशासाठी लढता लढता हुतात्मा होणार्‍या सैनिकांनो, तुम्हाला आजचे स्वार्थी आणि देशद्रोही नेते न्याय देऊ शकत नाहीत ! या मथळ्याखाली पठाणकोटमध्ये झालेल्या आक्रमणाचे वृत्त पाहून मन अशांत झाले आहे. धैर्य संपत चालले आहे. मनामध्ये अनेक प्रश्‍न उद्भवून मन अस्थिर झाले आहे. पठाणकोटमध्ये ५ अतिरेकी येतात काय आणि आपल्या ७ सैनिकांना मारण्याचे धाडस दाखवतात काय ?, अशा स्वरूपाचा मजकूर नुकताच दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या घटनेचा संबंधिताच्या मनावर परिणाम झाल्याचे लेखाचा प्रारंभीच्या या मजकुरावरून लक्षात येते.
     बाह्य जगतात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाकडे पहाण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन निरनिराळा असू शकतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी साधना करणार्‍या जिवाचा दृष्टीकोन कसा असायला हवा, हे देवानेच हा मजकूर वाचल्यानंतर सुचवले, ते येथे देत आहोत.

तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे एका कड्यावर असलेला २५० टनाचा दगड (श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा) १२०० वर्षांपासून नाही घरंगळला !

प्रत्येक सूत्राला बुद्धीच्या कसोटीवर तपासणारे बुद्धीप्रामाण्यावादी अशा 
वृत्तांवर कधी बोलत नाहीत हे लक्षात घ्या !
महाबलीपूरम येथील २५० टन
वजनाचा दगड
     महाबलीपूरम (तामिळनाडू) - चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र असा गोल दगड आहे. यालाच श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा या नावाने ओळखले जाते. हा दगड सुमारे १ सहस्र २०० वर्षांपासून तेथे असल्याचे समजले जाते. 
१. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला हा दगड केवळ ४ फूट परिसराच्या जागेवर टेकडीच्या कडावर स्थिरावला आहे. 
२. एवढ्या वर्षांत त्याची झीज झाली नाही कि तो खाली घरंगळला नाही.
३. हा दगड कसा उभा आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या एक आश्‍चर्यच समजले जाते. २५० टन वजनाचा दगड केवळ ४ फूट आकाराच्या पायावर कसा काय उभा राहू शकतो, याविषयी सर्वांना कुतुहूल आहे.
४. वर्ष १९०८ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे राज्यपाल (गव्हर्नर) आर्थर लॉली यांनी ७ हत्ती वापरून हा दगड हलवण्याचे असफल प्रयत्न केले होते. 
५. असाच प्रयत्न पल्लव वंशातील नरसिंह वर्मन राजानेही केला होता; मात्र त्याचा उद्देश या दगडाला शिल्पकारांनी हात लावू नये, असा होता. 

वाचाळ आझम खान !

    उत्तरप्रदेशचे नगरविकास मंत्री आझम खान नेहमीच सामाजिक शांती भंग करणारी वक्तव्ये करत असतात. विशेष म्हणजे त्यास जातीय-धार्मिक तेढ वाढवणार्‍या विचारांची किनार असते. असे सतत होत असूनही त्यांच्यावर तेथील राज्यशासनाकडून काहीच कारवाई का होत नाही ? याचा अर्थ असा घ्यायचा का, की समाजवादी पक्षाला जे बोलायचे आहे, ते आझम खान यांच्या माध्यमातून बोलले जात आहे.

हिंदू मतदारांमध्ये फूट पाडून मुसलमानांच्या मतांचे महत्त्व वाढवण्याची उत्तरप्रदेशातील राजकारण्यांची कुटील नीती !

     २९ जुलै १९१४ या दिवशी सहारनपूर येथे शीख आणि मुसलमान यांच्यात दंगल घडली. वर्ष १९९२ मध्येही असेच दंगे घडले होते. त्यानंतर १५ वर्षे शांतता होती. शिखांना गुरुद्वारा बांधायचा आहे. ती भूमी शिखांची आहे. त्या भूमीवर जिल्हाधिकार्‍याच्या स्वाक्षरीने बांधकाम करण्याची अनुज्ञप्ती मिळालेली आहे; पण मुसलमानांना तेथे गुरुद्वारा नको होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मसूद नावाचा उमेदवार आणि समाजवादी पप्पू यादव यांनी हेतुपुरस्पर ती जातीय दंगल घडवली; पण अन्य उमेदवार लखनपाल यांनी मसूदला ६५ सहस्र मतांनी हरवले. सहारनपूरमध्ये प्रत्येक मताचे मूल्य मोठे असते. येथे मुसलमान ४० प्रतिशत आहेत. हिंदू मतदारांमध्ये भांडण लावून त्यांच्या मतांचे विभाजन केले की, येथे मुसलमान उमेदवार निवडून येतोच.
- दादूमिया (धर्मभास्कर, ऑक्टोबर २०१४)

शासकीय निधीतून राज्यकर्त्यांनी शिताफीने केलेली देशाची लूट !

१. देहलीच्या तत्कालिन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी 
करण्यात आलेला अनावश्यक खर्च
     देहली सलतनत आणि मोगल काळातील राज्यकर्त्यांचे लुटोचे धोरण आपण समजू शकतो. ते हिंदू प्रजेला काफिर म्हणत. इंग्रजांनाही आपण निसर्ग वाटत होतो. त्यामुळे त्यांचे भारत देश अधिकाधिक लुटण्याचे हे धोरण आपण समजून घेऊ शकतो; पण त्याच रोगाने आमचे काँग्रेसवाले जेव्हा पछाडले जातात, तेव्हा मन फार दुःखी-कष्टी होते. देहलीच्या भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दीक्षित त्यांच्या जाहीर भाषणात देहलीवासियांना सांगत, वीजेची बचत करणे अती आवश्यक आहे; पण त्यांच्या शासकीय बंगल्यात त्या वीजेची उधळपट्टी कशी करतात, ते माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमुळे कळले. 
    शीला दीक्षितांच्या शासकीय बंगल्यात ३१ वातानुकूलन यंत्रे (एअर कंडीशनर्स), १५ वायुशीतक (डेझर्ट कुलर्स) आणि २५ हिटर लावलेले होते. त्याशिवाय १२ गिझरसुद्धा लावले होते. त्यातील ५ गिझरची ५० लिटर पाण्याची अन् ७ गिझरची २५ लिटर पाण्याची क्षमता होती.
      पुणे, १२ फेब्रुवारी - विद्यार्थ्यांना अपघात होतील, असे समुद्रकिनारे, पर्वत, नद्या, तलाव, विहिरी, उंच टेकड्या या ठिकाणी शैक्षणिक सहलींना बंदी घालणारे परिपत्रक पुणे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मागे घेतले. सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर या परिपत्रकातील जाचक अटी रहित करण्यात आल्या आहेत. (शासनाच्या वतीने परिपत्रक बनवतांनाच अभ्यासपूर्ण का बनवले नाही ? यामुळे पुन्हा बैठका घेणे आणि नवीन आदेश काढणे यासाठी व्यय झालेला वेळ आणि पैसा याला उत्तरदायी कोण ? याविषयी शिक्षण विभाग उत्तर देईल का ? - संपादक) नवीन आदेशामध्ये मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे दायित्व शाळांचेच असून यापुढे सहलीच्या आयोजनासाठी शाळेत सहल समिती नेमणे आणि त्यांचा विमा काढणे, अशा नव्या सूचना जाधव यांनी दिल्या आहेत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

स्त्रीमुक्तीचे फाजिल स्तोम माजवल्याचे दुष्परिणाम !

विवाहितेचा अपघाती मृत्यू झाला किंवा तिने आत्महत्या केली, तरी तो हुंडाबळी ठरणे
     कोणत्याही विवाहित तरुण स्त्रीचा अपघाती मृत्यू झाला किंवा तिने आत्महत्या केली, तरी समाजसेविका तिला हुंडाबळी ठरवून मोकळ्या होतात; कारण त्यांनी विवेकाशी संबंध तोडून हा सिद्धांत हृदयाशी कवटाळलेला असतो. या प्रवाहपतित, प्रसिद्धीलोलुप, मध्यमवर्गीय, पोशाखी समाजसेविकांनी निर्माण केलेल्या हवेमुळे लोकापवाद नको; म्हणून पोलीस खातेसुद्धा ती विवाहित स्त्री अपघाताने मेली किंवा तिने आत्महत्या केली, तरी सासरच्या लोकांनी तिला ठार मारले किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, या आरोपाखाली तिचा नवरा, सासू, सासरा, नणंद, दीर आणि जावा यांना अटक करून फौजदारी खटला भरून मोकळे होते.- श्री. ग.य. धारप 
(संदर्भ : मासिक प्रज्वलंत, मे १९९९)

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

उज्जैन कुंभमेळ्यासाठी पुढील साहित्याची विनामूल्य 
उपलब्धता करून देऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात हातभार लावा !
      २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ पर्व असणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसारासाठी कुंभस्थळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षण देण्यासाठी विविध प्रदर्शनकक्ष लावण्यात येणार आहेत. त्याकरता तंबू उभारण्यासाठी हिरव्या रंगाच्या २,४०० फूट जाळीदार कापडाची (नेटलॉनची) आवश्यकता आहे.

उतारवयातही तळमळीने साधना करणार्‍या, प्रेमळ आणि उत्साही असलेल्या चाकण, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रयागबाई देशपांडे (वय ८९ वर्षे) !

श्रीमती प्रयागबाई देशपांडे
     ३१.१.२०१६ या दिवशी चाकण, पुणे येथील श्रीमती प्रयागबाई देशपांडे (वय ८९ वर्षे) यांचे निधन झाले. सनातनच्या साधिका सौ. रमणी ऋषिकेश कुलकर्णी यांच्या त्या आजेसासूबाई (सासूबाईंच्या आई) होत्या. १३.२.२०१६ या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा चौदावा दिवस आहे. त्यानिमित्त सौ. रमणी, तसेच आजींचे अन्य कुटुंबीय यांना आजी आणि त्यांनी केलेली साधना यांविषयी अन् सौ. रमणी यांना आजींच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. हसतमुख : आजींचा तोंडवळा नेहमी हसतमुख असायचा. त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण नसायचा किंवा मला अमुक आजार आहे, असे भाव नसायचे.
१ आ. उतारवयातही स्वावलंबी असणे : आजींचे वय ८९ वर्षे होते; परंतु त्यांच्या एकूण हालचाली आणि त्यांची या वयातील शारीरिक ठेवण यांवरून त्या वृद्ध आहेत, असे वाटत नव्हते. या वयातही त्या सहजपणे पाच-पाच मजले चढून जायच्या. शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचे जेवण बनवणे, कपडे धुणे ही कामे स्वतःच केली.

जळगाव येथील रवींद्र बडगुजर यांच्या देहावसानापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे

श्रीमती उषा बडगुजर
     जळगाव येथील रवींद्र बडगुजर यांचे १९.९.२०१५ या दिवशी सकाळी ११ वाजता देहावसान झाले. १३.२.२०१६ या दिवशी त्यांचे पाचवे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. मृत्यूपूर्वी केलेल्या सेवा
अ. श्री. रवींद्र यांनी मृत्यूपूर्वी ३ आठवडे गणेशमूर्तींच्या वितरणाची सेवा भावपूर्ण केली. त्यांच्या हाताचा अस्थिभंग झाला असूनही त्यांनी आनंदाने ही सेवा केली.
आ. १६.९.२०१५ या दिवशी त्यांनी हिंदी मासिक सनातन प्रभातची अहवालाची राहिलेली सेवा पूर्ण केली.
इ. १७.९.२०१५ या दिवशी दुपारी साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरणही केले. नंतर घरात श्री गणेशाची स्थापना केली.
ई. १८.९.२०१५ या दिवशी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करायचे होते. त्यांनी गणपतीचे पूजन केले. आरती केली. त्यानंतर ते गणपतीसमोर बसून रडले. (ते का रडले ?, ते कळलेच नाही.)

साधकांनो, नियमितपणे प्रगतीची सूचना देऊन स्वतःविषयीची नकारात्मकता दूर लोटा आणि साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

     काही साधकांमध्ये नकारात्मकता, निराशा, न्यूनगंड, स्वतःला न्यून लेखणे आदी अहंचे पैलू तीव्र स्वरूपात असतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे साधनेचे प्रयत्न करत असूनही तिच्यातील आनंद घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी प्रामुख्याने पुढील प्रयत्न करावा.
१. प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्याने 
स्वतःविषयीची सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढणे
   साधकांनी नियमितपणे प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्यास त्यांच्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढतो अन् पुढील प्रयत्न करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते. निराशेचे प्रमाण अधिक असल्यास प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिवसातून ५ वेळा, तर प्रमाण अल्प असल्यास केवळ एकदाच द्यावी. प्रत्येक वेळी केवळ एकदाच सूचना म्हणणे अपेक्षित आहे.

अमेरिकेतील सौ. शरण्या देसाई यांना गरोदरपणी आलेल्या अनुभूती आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ध्रुव याच्या जन्मानंतर त्याच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्ये

१. गरोदरपणी (चौथा मास)
 चि. ध्रुव देसाई
अ. आध्यात्मिक त्रासामुळे अधून मधून माझ्या मनात या बाळाला जन्मच देऊ नये असे विचार यायचे.
आ. गरोदर असतांना चौथ्या मासापासून (महिन्यापासून) माझी सेवा करण्याची आणि ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढली. त्यामुळे प्रार्थना आणि कृतज्ञता यांच्यात वृद्धी झाली.
इ. एरव्ही आध्यात्मिक त्रासामुळे मला यजमानांविषयी मनात असंख्य नकारात्मक विचार येत अन् प्रतिक्रिया उमटत असे; मात्र या काळात त्यांचे प्रमाण अल्प होऊन प्रेमभावात वृद्धी झाली. त्यामुळे त्यांच्यासमवेतचे संबंध सुधारून स्वीकारण्याचा भागही वाढला.
ई. एकंदरित मला होणार्‍या त्रासांचे प्रमाण अल्प झाले; परंतु मला त्रास देणारी मोठी वाईट शक्ती जेवणाच्या माध्यमातून पोटातील बाळावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मला जाणवत होते; कारण माझी विकतचे खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा वाढली. पोटातील बाळाला घरात बनवलेले ताजे अन्न आवडते, असे मला वाटायचे; परंतु प्रत्यक्षात मी पाव, सॅलड आणि विकतचे खाद्यपदार्थ खायचे.

साधकांनो, आध्यात्मिक पातळी हा प्रगतीचा मापदंड नाही, तर प्रत्येक कृती करतांना स्वतःमध्ये ईश्‍वरी गुणांची वृद्धी होणे, हा प्रगतीचा खरा मापदंड आहे, हे लक्षात घ्या !

     
पू. संदीप आळशी
अनेक साधकांच्या मनात मी इतकी वर्षे साधनारत असूनही अजून माझी पातळी का वाढत नाही ?, असा विचार परत परत येतो. काही साधक या विचाराने निराशही होतात. आपल्याला प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे, आध्यात्मिक उन्नती प्रारब्धावरही अवलंबून असते. प्रारब्ध वाईट असेल, तर उन्नतीला वेळ लागतो; पण ती निश्‍चित होते. हे सूत्र सतत लक्षात ठेवायला हवे. त्यासह आध्यात्मिक पातळीचा चढ-उतार हा स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू, स्वतःच्या साधनेविषयी अंतर्मुखता, भाव, साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य इत्यादी साधनेतील अनेक घटकांवर अवलंबून असतो. या घटकांकडे लक्ष न दिल्यास अगदी ६९ टक्के पातळी झालेल्या साधकाचीही अधोगती होऊ शकते. त्यामुळे आध्यात्मिक पातळी हा साधनेतील प्रगतीचा मापदंड ठेवण्यापेक्षा प्रत्येक कृती करतांना स्वतःमध्ये ईश्‍वरी गुणांची वृद्धी होत आहे ना, हा मापदंड ठेवायला हवा.

लहान वयातच संत व्हायचे आहे, असे मोठे ध्येय ठेवणारी पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची अवघी ५ वर्षे वयाची कु. प्रार्थना पाठक !

कु. प्रार्थना पाठक
     अलीकडे लहान मुलांना कार्टूनमधील पात्रेच खरी वाटतात. त्यांच्यासारखी वेशभूषा, केशभूषा करण्याचा ते प्रयत्न करतात. सनातनच्या बालसाधकांना मात्र लहान वयातच संतांचे महत्त्व समजते आणि ते संतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. येथेही सनातनचे पुणे येथील साधक दांपत्य ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेश पाठक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांची महर्लोकातून आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कन्या कु. प्रार्थना पाठक (वय ५ वर्षे) हिने प.पू. डॉक्टरांना लिहिलेले पत्र येथे दिले आहे. त्या पत्रात कु. प्रार्थनाने मला पू. स्वातीताईंसारखे (सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांच्यासारखे) संत व्हायचे आहे, असे ध्येय सांगितले आहे. तसेच थोडेसे लवकर संत व्हायचे आहे, असा लडीवाळ हट्टही केला आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक उन्नती केलेल्या पालकांनी कु. प्रार्थनावर केलेले संस्कार तिच्या पत्रातून प्रतिबिंबित होतात.
कु. प्रार्थना हिने प.पू. डॉक्टरांना लिहिलेले पत्र
      या बालवयात खाऊ, खेळणी यांसाठी हट्ट न करता संत होण्याचा हा हट्ट भगवंतही का नाही पूर्ण करणार ? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे वयाच्या पाचव्या वर्षीच संत होण्याचे ध्येय ठेवणार्‍या अशा मुक्ताईच पुढे हिंदु राष्ट्र चालवण्याचे शिवधनुष्य पेलतील, यात शंकाच नाही !
    
परात्पर गुरु डॉ. आठवले
सर्वसाधारण व्यक्ती स्वतःचेच खरे समजते, तर साधक जिज्ञासू वृत्तीने दुसरा काय म्हणतो ? का म्हणतो ? इत्यादी गोष्टींकडे लक्ष देतो. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
     आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कोणी दारू आणि सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     दैवी कृपेने प्राप्त झालेला आयुष्यातील काळ ऐषारामात न घालविता सतत साधनारत रहाणे, परमेश्‍वरी चिंतनात रहाणे आणि प्राप्त कर्तव्य करणे, हीच जिवंतपणाची लक्षणे होत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

हेडलीची साक्ष !

संपादकीय
     गेल्या ५ दिवसांपासून मुंबईतील विशेष न्यायालयात मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या आक्रमणातील सूत्रधारांपैकी एक असणारा दाऊद गिलानी उपाख्य डेव्हीड हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यात येत आहे. हेडली याला या आक्रमणासाठी अमेरिकेतील न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली असून तो तेथील कारागृहात ही शिक्षा भोगत आहे. भारतात चालू असलेल्या या आक्रमणाच्या खटल्यात हेडलीला माफीचा साक्षीदार बनवण्यात आल्याने तो पोपटाप्रमाणे सर्व माहिती देत आहे. यातील काही माहिती यापूर्वीही त्याच्या जबानीतून समोर आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn