Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


प.पू. भक्तराज महाराज यांचा आज प्रकटदिन 

उगवली वसंतपंचमी ।
श्रीगुरुचरणा ध्यानी ठसवूनी ।
मिळविली भक्तीची देण मी ॥

गहूचण्याच्या गालिच्यांनी ।
पृथ्वी कशी नटली ।
श्रीगुरूची ही मूर्ती मनोहर ।
नेत्री सदा ठसली ॥
- संत भक्तराज महाराज

कोटी कोटी प्रणाम !

आज संत तुकाराम महाराज यांची जयंती


इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती ! - हेडली

डेव्हीड हेडलीची भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना चपराक लगावणारी स्वीकृती !
  • आतंकवादी इशरत जहाँच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांचे साहाय्य करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी होईल का ? 
  • आतंकवादी इशरत जहाँला बिहारची लेक संबोधणारे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर कारवाई होईल का ?
      मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील विशेष न्यायालयात मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या आक्रमणाची सुनावणी चालू आहे. या खटल्यातील माफीचा साक्षीदार आणि अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला डेव्हीड हेडली याच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून साक्ष दिली जात आहे. ११ फेब्रुवारीला दिलेल्या साक्षीत हेडलीने म्हटले आहे की, मुंब्रा येथे रहाणारी १९ वर्षीय इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती. अक्षरधाम मंदिर इशरत जहाँचे लक्ष्य होते. इशरत जहाँविषयी मला मुजम्मलि भट्ट याने माहिती दिली होती. भट्ट म्हणाला होता की, त्याला जकीउर रहमान लखवी याने माहिती दिली होती की, त्यांची एक महिला आतंकवादी चकमकीत मारली गेली आहे. गुजरात पोलिसांनी इशरत जहाँ हिला २००४ मध्ये चकमकीत ठार केले होते.

गुजरात पोलिसांचा नाहक बळी ! - डी.जी. वंजारा, गुजरातचे तत्कालीन पोलीस अधिकारी

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, डी.जी. वंजारा, अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर
      मुंबई - ८ फेब्रुवारी २००४ मध्ये जिहादी आतंकवाद्यांबरोबर गुजरात पोलिसांची झालेली चकमक खोटी नव्हती. या चकमकीवरून राजकीय षड्यंत्र रचून गुजरात पोलिसांवर केलेले सर्व आरोप आणि खटले खोटे आहेत, हे हेडलीच्या साक्षीने सिद्ध झाले आहे. राजकीय षड्यंत्रामुळे गुजरात पोलिसांना विनाकारण लक्ष्य करण्यात आले असून त्यांचा नाहक बळी देण्यात आला आहे, असे प्रतिपादन इशरत जहाँला खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप असणारे गुजरात आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दाऊद गिलानी ऊर्फ हेडली याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ते श्री. संजीव पुनाळेकर, तसेच अध्यक्ष श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. या वेळी १२५ हून अधिक पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित होते.

शंकराचार्यांनी केलेले आरोप खोटे ! - इस्कॉनच्या खुलासा

      लक्ष्मणपुरी (लखनऊ) - ज्योतिष आणि द्वारका पिठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी इस्कॉनवर केलेल्या आरोपांवरून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात इस्कॉनचे म्हणणे आहे की, शंकराचार्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. इस्कॉनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच ते टीका करत आहेत.

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात महंमद अफझलचा स्मरणदिवस साजरा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी !

अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद !
     नवी देहली - फाशी देण्यात आलेला जिहादी आतंकवादी महंमद अफझलचा ९ फेब्रुवारीला येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांकडून स्मरणदिवस साजरा करण्यात आला. या संदर्भात भाजपचे खासदार महेश गिरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून असे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या संदर्भात कुलगुरूंना निर्देश देण्याची विनंती केली आहे. तसेच आयोजकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली. (या विश्‍वविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणारे हे देशद्रोही विद्यार्थी पुढे प्रशासनात सेवा करू लागल्यास महंमद अफझल यांच्यासारख्या आतंकवाद्यांना मोकळे रानच मिळेल, यात शंकाच नाही. - संपादक)
१. डेमोक्रॅटिक स्टुडंट युनियन नावाच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (या संघटनेने त्यांच्या नावातील डेमोक्रॅटिक शब्द पालटून टेररिस्ट शब्द घातल्यास तो त्यांना शोभेल ! - संपादक)
२. यात महंमद अफझल आणि जम्मू अ‍ॅण्ड कश्मीर लिबरेशन फ्रंट या जिहादी संघटनेचा संस्थापक मकबूल भट यांचा स्मरणदिवस साजरा करण्यात आला.

लांस नायक हनुमंताप्पा कोप्पड हुतात्मा !

      नवी देहली - सियाचीनमधील हिमवादळामुळे ६ दिवस बर्फाखाली अडकल्यानंतरही जिवंत सापडलेले लांस नायक हनुमंताप्पा कोप्पड यांचे ११ फेब्रुवारीला येथील सैनिकी रुग्णालयात उपचाराच्या वेळी निधन झाले. सैन्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणे बारा वाजता हनुमंताप्पा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचारांसाठी जगातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात येत होता. देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. हनुमंतप्पा यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

(म्हणे) अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी केंद्रशासनाकडून मुसलमान तरुणांना लक्ष्य केले जात आहे !

इसिसशी संबंधित मुसलमान तरुणांसोबत त्यांचे समर्थन 
करणार्‍या धर्मांध नेत्यांनाही कारागृहात डांबायला हवे !
तृणमूल काँग्रेसचे नेते सुलतान अहमद यांचा केंद्रशासनावर आरोप !
      नवी देहली - अपयशावरून जनेतेचे लक्ष हटवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांना लक्ष्य बनवले जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सुलतान अहमद यांनी केंद्रशासनावर केला आहे. (आतंकवादाचा निषेध करणे दूरच, उलट आतंकवाद्यांना पाठीशी घालणारे असे राष्ट्रद्रोही धर्मांध नेते इसिसने भारतावर आक्रमण केल्यास इसिसलाच साहाय्य करतील, यात शंका नाही. - संपादक) अशा प्रकारे इसिसशी संबंध असल्यावरून मुसलमान तरुणांना कह्यात घेणे चालू राहिले, तर लोक मुसलमानांकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पहातील आणि संपूर्ण देशातील वातावरण खराब होईल. (इसिसशी संबंध असल्यावरून मुसलमान तरुणांना कह्यात घेतल्यास नव्हे, तर सुलतान अहमद यांच्या समर्थनामुळे लोक मुसलमानांकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पहात आहेत. देशातील वातावरण खराब होऊ नये यासाठीच इसिसशी संबधित मुसलमानांना पकडायला हवे ! - संपादक) त्यामुळे केंद्रशासनाने हे अटकसत्र त्वरित थांबवले पाहिजे, असेही अहमद म्हणाले.

मध्यप्रदेशातील भोजशाळेला पोलीस छावणीचे स्वरूप !

हिंदु भाविकांची मागणी दडपण्याचा शासनाचा प्रयत्न ! 
हिंदु राष्ट्रातच हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल !
     नवी देहली/भोपाळ - मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असणार्‍या भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
१. येथे दुपारी १ ते ३ या कालावधीत मुसलमानांना नमाज पढण्यास प्रशासनाने दिलेल्या अनुमतीचा हिंदूंकडून आणि त्यांच्या संघटनांकडून विरोध केला जात आहे. हिंदूंची मागणी आहे की, त्यांना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे.
२. येथे मुसलमानांनी नमाज पढण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू भोजशाळेत जाऊन पूजा न करता बाहेरच पूजा करतील, अशी चेतावणी धर्मजागरण मंचकडून देण्यात आली आहे. (हिंदूंनी स्वतः भोजशाळेबाहेर पूजा करणे दुर्दैवी ! हिंदूंनो, धर्मांधांना भोजशाळेतून बाहेर काढण्यासाठी शिकस्त करा ! - संपादक)
३. मागच्या शुक्रवारी मुसलमानांनी नमाजाच्या वेळी सहस्रोंच्या संख्येने गर्दी केली होती. ते मुसलमानांचे शक्तीप्रदर्शन होते. उद्याही त्यांच्याकडून अशीच उपस्थिती रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४. या पार्श्‍वभूमीवर येथे प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी
इंग्रजी हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

अन्न आणि नागरी पुरवठा विभागात अनेक माफिया आणि त्यांच्या टोळ्या कार्यरत - गिरीश बापट यांची स्पष्टोक्ती

     या प्रकरणी गिरीश बापट यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यांची नावे तात्काळ जाहीर करावीत. त्याचसमवेत शासनाने त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करून विभागातील माफियाराज संपवावे आणि स्वच्छ प्रशासन द्यावे, ही अपेक्षा !
      पुणे, ११ फेब्रुवारी - अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या पुरवठा खात्यात अनेक माफिया आणि त्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे अधिकार्‍यांशी थेट संबंध आहेत, अशी १० प्रकरणे आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राज्यातील पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना ऐकवले. त्याचसमवेत खात्यात काय चालले आहे, मला कळत नाही, असे समजू नका. आपण वेतन घेतो, कायद्याने आपल्यावर दायित्व आहे, तेवढे तरी काम करा, असेही अधिकार्‍यांना बजावले.

पुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे लिव्ह इन रिलेशनशिपच्या २६० तक्रारी प्रविष्ट

तथाकथित भोगवादी संस्कृतीविषयी बोलणार्‍यांना याविषयी आता काय म्हणायचे आहे ? 
भारतीयांनो, आपल्या महान संस्कृतीचे महत्त्व जाणून त्याप्रमाणे तिचे आचरण करा ! 
     पुणे, ११ फेब्रुवारी - लग्नाचे बंधन आणि कोणाची जबरदस्ती नको. स्वच्छंदी जीवन जगता यावे, यासाठी सध्याच्या तरुण-तरुणींकडून लिव्ह इन रिलेशनशिपचा पुरस्कार केला जात आहे. काही वर्षे दोघे एकत्र राहिल्यानंतर त्यांना एकमेकांचा सहवास नको वाटतो. अशा प्रकारच्या लिव्ह इन रिलेशनशिपविषयीच्या तक्रारी गेल्या वर्षात पुणे पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे आल्या आहेत. वर्ष २०१५ मध्ये महिला साहाय्यता कक्षाकडे २६० तक्रारी आल्याची माहिती महिला साहाय्यता कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.

(म्हणे) मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करणार !

ज्यांच्या निष्ठा भारताशी नाही, तर इंग्लंडशी जोडलेल्या आहेत, 
त्यांनी मुंबईला बॉम्बे म्हटल्यास आश्‍चर्य नाही !
द इंडिपेन्डंट या वृत्तपत्राचे संपादक अमोल राजन यांचा हिंदु राष्ट्रवादाला विरोध
      लंडन - द इंडिपेन्डंट या वृत्तपत्राचे संपादक अमोल राजन यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करणार, असे स्पष्ट केले. हा निर्णय म्हणजे संकुचित विचार करणार्‍या हिंदु राष्ट्रवादाच्या विरोधात उचलले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मूळ कोलकातामध्ये जन्मलेले आणि लंडनमध्ये वाढलेले राजन म्हणाले, बॉम्बेची ओळख ही एक खुले शहर आणि भारताचे प्रवेशद्वार अशी आहे, ज्याचे दारे संपूर्ण जगासाठी उघडे आहेत. जर तुम्ही त्या शहराचा उल्लेख मुंबई असा केला, तर ते हिंदु राष्ट्रवादाच्या हिताचेच आहे. फार पूर्वीपासून या शहराचे बॉम्बे असे नाव रूढ झाले होते. बॉम्बे या नावाला शिवसेनेने अनेक वर्षे केलेल्या प्रखर विरोधानंतर वर्ष १९९५ ला तात्कालीन केंद्रशासनाने बॉम्बेचे मुंबई असे नामकरण केले होते. तेव्हापासून या महानगराला मुंबई असे म्हटल्या जाऊ लागले आहे. मुंबई हे नाव तेथील मुंबादेवी या देवीच्या नावावरून पडले आहे.


बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : महिलांवर लैंगिक अत्याचार !

अशा असंवेदनशील आणि हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांचा जितका निषेध करावा, तितका थोडाच !
हिंदूंनो, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अथवा दादरी हत्याकांडावरून पूर्ण देश ढवळून काढणार्‍या धर्मनिरपेक्षतावादी प्रसारमाध्यमे बांगलादेशी हिंदूंच्या प्रतिदिन होणार्‍या हालअपेष्टांकडे कानाडोळा करतात, हे लक्षात घ्या !
  • ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूर तालुक्यातील घटना !
  • १५ हिंदु घायाळ, ३ घरांचीही मोडतोड !
     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या ब्राह्मणबारिया जिल्ह्यामधील बंचरामपूरच्या पुरबाहाटी दासपारा गावामध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून घरांची मोडतोड केली. महिलांवर लैंगिक अत्याचारही केले. या आक्रमणात लहान मुले आणि महिला यांच्यासह १५ जण गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. घायाळ्यांना ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. 
विस्तृत माहिती अशी.
१. काही दिवसांपूर्वी मंहमद झिहाद नावाच्या व्यक्तीने गावातील हिंदु दुकानदार श्री. कालीदास यांच्याकडे उधारीवर सिगारेट देण्याची मागणी केली. श्री. दास यांनी त्यास नकार दर्शवला.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

इशरत जहाँला हुतात्मा म्हणणार्‍यांनी आता क्षमा मागावी ! - भाजप

     नवी देहली - सुरक्षेच्या कारणावरून जे राजकारण करत होते, त्यांनी आता क्षमा मागायला हवी. इशरत जहाँला हुतात्मा ठरवणार्‍यांनी तर नक्कीच क्षमा मागावी. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही देशाची आणि भाजपची क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.
पाकिस्तानची हस्तक असल्याप्रमाणे बोलणारी काँग्रेस !
हेडली साक्षीत काय म्हणणार, हे आधीच ठरले होते ! - काँग्रेस
     हेडली साक्षीत काय बोलणार आहे, हे आधीच काही लोकांनी मला सांगितले होते. त्यांना ते कसे कळले, याचे आश्‍चर्य वाटते. हेडलीने साक्षीत इशरतचे नाव घेण्यासाठी एक करार झाला आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. मला यात काहीतरी काळेबेरे वाटते. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी केली आहे.

(म्हणे) हेडली भारतीय गुप्तचर संस्थेचा हस्तक !

पाकिस्तानचा कांगावा !
     इस्लामाबाद - २६/११च्या मुंबई आक्रमणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आतंकवादी डेव्हिड हेडली याने दिलेली साक्ष निखालस खोटी आहे. त्याच्याकडून हवी तशी साक्ष मिळवून पाकिस्तानची कुप्रसिद्धी करण्याचा भारताचा डाव आहे, असा आरोप पाकचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर हेडली हा भारताची गुप्तचर संस्था रॉचा हस्तक असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. (अमेरिकेच्या कारागृहात असलेल्या आतंकवाद्याकडून भारत शासन त्यांना हवी तशी साक्ष कशी काय मिळवू शकेल ? तसे शक्य होते, तर पाकने तसे का केले नाही ? पाकचा खरा चेहरा हेडलीने उघड केल्यामुळेच असे बिनबुडाचे आरोप पाक करत आहे. असे आरोप करून पाक अमेरिकेविषयीही शंका उपस्थित करत आहे. - संपादक)

धुळे येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या भव्य मोर्च्यानिमित्त पत्रकार परिषद

डावीकडून पत्रकार संघाचे श्री. सुनील पाटील, पू. जाधवकाका,
श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल

हिंदूंनो, या मोर्च्यात सहभागी व्हा ! 
दिनांक : १३ फेब्रुवारी
वेळ : सकाळी १०.३०
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीराम पेट्रोलपंपाजवळ, आग्रा रोड, धुळे.
सविस्तर वृत्त उद्या वाचा...

हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात !

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे आघात चालूच !
दादरी हत्याकांडानंतर हिंदु असहिष्णु आहेत अशी ओरड करणारे अशा 
घटनावंर काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
      ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील खान्समा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर आक्रमण केले. या वेळी ५ निष्पाप हिंदु महिला आणि मुले यांना अमानुष मारहाण करण्यात आली. (हिंदुबहुल भारतात अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमण झाले, तरीही एकजात धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंवर तुटून पडतात; मात्र बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर स्वातंत्र्यकाळापासून आक्रमणे होत असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी तेथे एकही धर्मनिरपेक्षतावादी नाही; कारण मुसलमानबहुल देशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसतो, हे लक्षात घ्या ! - संपादक)

इशरत जहाँ निर्दोष ! - इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँ

      मुंबई - माझी बहीण इशरत जहाँ निर्दोष होती आणि एक न एक दिवशी सत्य सर्वांसमोर येईल. हेडली काय म्हणत आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. हेडली हा एक आतंकवादी होता. आम्ही कायदेशीर मार्गानेच लढाई लढू. भारतातील तपास यंत्रणांनी ती चकमक बनावट असल्याचे सिद्ध केलेले आहे. या प्रकरणावर राजकारण करण्यात येत आहे, असे इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँ हिने म्हटले आहे.
(म्हणे) हेडलीला विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांमध्ये राजकारण
करण्यात येत आहे ! - इशरतच्या अधिवक्त्या वृंदा ग्रोव्हर
     इशरतच्या अधिवक्त्या वृंदा ग्रोव्हर म्हणाल्या की, इशरतचे जगातील कोणत्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नव्हते. हेडलीला विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांमध्ये राजकारण करण्यात येत आहे. विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्याकडून विचारण्यात येणारे प्रश्‍न बेकायदेशीर आहेत.

(म्हणे) इशरत जहाँ प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल !

इशरत जहाँच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करणारे 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सारवासारव !
     ठाणे - हेडली नेमका काय म्हणाला, हे अद्याप माहिती नसून, ते जाणून घ्यावे लागेल. त्यानंतर इशरत प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल, असा बचावात्मक पवित्रा इशरत जहाँला निर्दोष ठरवून तिच्या कुटुंबियांना पाठिंबा देणारे आणि त्यांना आर्थिक साहाय्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेडलीच्या साक्षीनंतर घेतला आहे.
     इशरत जहाँ चकमकीत मारली गेली, तेव्हा हेडली हा अमली पदार्थांची तस्करी करत होता. तोपर्यंत त्याचा लष्कर ए तोयबाशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे हेडलीची माहिती किती खरी आहे, त्याच्यावर कितपत विश्‍वास ठेवायचा हे आधी पहावे लागेल. भाजपने राजकारणासाठी इशरतला गोवले, असेही आव्हाड म्हणाले.


पुणे येथील साधक श्री. मिलिंद धर्माधिकारी यांना ३१ जानेवारी या दिवशी पुण्यातील कात्रज येथे हिंदु धर्मजागृती सभा झाल्यानंतर स्फुरलेले काव्य...

धर्मसभांचे हे सत्र फुंकणार हिंदु राष्ट्र स्थापनेचे रणशिंग ।
या माध्यमे मिळणार प्रत्येक हिंदूला पूजनीय संतांचा सत्संग ॥

सभेत सहभागी होणार आता सर्वच धर्मभक्त ।
सळसळणार आता या प्रत्येकाचेच रक्त ॥

आता शब्द म्हणजे असणार जणू धारदार तलवार ।
प्रत्येक वक्ता धारिती आता रुद्रावतार ॥

पुरोगामी करिती षड्यंत्र संपवण्यास हिंदु धर्म ।
नरकात नेणार त्यांना त्यांचेच हे कर्म

भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

भिवंडी येथील आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
सविस्तर वृत्त उद्या वाचा...

शहरातील गुंडांची दहशत मोडून न काढल्यास पोलीस मुख्यालयावर मोर्चा ! - महिलांची चेतावणी

तरुणींनो, गुंडांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
      इचलकरंजी, ११ फेब्रुवारी (वार्ता.) - शहर आणि परिसरातील गुंडांकडून होणारा अन्याय, अत्याचार आणि दहशत, तसेच महिला आणि मुली यांना होत असलेल्या त्रासाची नोंद घेऊन गुंडांवर हद्दपारीची कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रा. वैशाली नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना १० फेब्रुवारीला सादर केले. याकडे दुर्लक्ष केल्यास पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढू, अशी चेतावणी या वेळी त्यांनी दिली. (शहरातील गुंडगिरी मोडून काढून गुंडांना कारागृहाची शिक्षा करण्याचे काम पोलिसांनी करायचे असते. असे असतांना शहरातील गुंडांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांना बडतर्फ करायला हवे. पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ महिलांच्यावर कशासाठी येते ? महिलांचे संरक्षण करण्यात कुचराई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर प्रथम पोलीस अधीक्षकांनी कारवाई करायला हवी. - संपादक)

पठाणकोट आक्रमणाचा सूत्रधार मौलाना मसूद अझहर पाकमधून फरार

पाकशी मैत्री करणार्‍या केंद्रशासनाला पुन्हा एकदा चपराक !
     नवी देहली - जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि पठाणकोट येथील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मौलाना मसूद अझहर पाकिस्तानमधून फरार झाला असून तो अफगाणिस्तानात लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अझहर बहावलपूर येथील मदरशांमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथील ठिकाण्यावर पोलिसांनी छापेमारी केली; मात्र तो तिथे सापडला नाही. 
       पठाणकोट आक्रमणानंतर भारताने पुरावे दिल्यावर पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करावी लागली होती. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी स्वत: याबाबत पुढाकार घेतला होतो. अझहरला त्याच्या घरात नजरकैद करण्यात आल्याचे म्हटले जात होते.

(म्हणे) देशातील काही जण आतंकवाद्यांना फितूर होते !

संरक्षणमंत्री असतांना देशातील फितुरांवर कारवाई 
न करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
     सोलापूर - मुंबईवरील २६/११ च्या आंतकवादी आक्रमणाच्या प्रकरणी मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याने धक्कादायक कबुली दिली असली, तरी केंद्रशासनाकडे याची माहिती होती; मात्र आपल्याच देशातील काही जण आतंकवाद्यांना फितूर होते. ते केवळ उत्तरप्रदेश, काश्मीरचे नव्हेत, तर कर्नाटकपर्यंत त्यांचे जाळे परसले आहे, अशी माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली.


नगर येथील क्लेरा ब्रूस मैदानावर दंगलखोरांचा धुमाकूळ, दंगेखोरांकडून पोलिसांना मारहाण

पोलीसच जर मार खात असतील, तर जनतेचे रक्षण कोण करणार ?
असे पोलीस आतंकवाद्यांशी कसे लढतील, याचा विचारच न केलेला बरा !
      नगर, ११ फेब्रुवारी - येथील क्लेरा ब्रूस मैदानाच्या जागेवरून एक उद्योजक न्यासामध्ये न्यायालयीन वाद चालू आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावरील क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानाचा हा वाद १० फेब्रुवारी या दिवशी चांगलाच चिघळला. रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंतीवर लावलेले पत्रे १५० हून अधिक जणांच्या टोळक्याने जमीनदोस्त करत जाळपोळही केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दंगलखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण टोळक्याने त्यांनाच मारहाण केली. त्यामुळे पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली. तोपर्यंत तोडफोड चालूच होती. त्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर हे अन्य पोलिसांसमवेत घटनास्थळी आले. त्यांनाही दंगलखोरांनी लाकडी दांडके आणि दगड या साहाय्याने मारहाण केली. 

बंदी घालण्यात आलेल्या सिमीच्या सदस्याकडून ३०० जणांची भरती !

३०० युवकांची भरती होईपर्यंत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? 
अशा यंत्रणांकडून देशाचे रक्षण काय होणार ?
     बहराइच (उत्तरप्रदेश) - काही वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आलेल्या सिमी या आतंकवादी संघटनेमध्ये ३०० मुसलमान युवकांची भरती करण्यात आल्याची माहिती येथील पोलिसांकडून उघडकीस आणण्यात आली आहे. बहराईचमधील महसी येथे एका चिकित्सालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून डॉ. एम्.एम्. शेख हा युवक तरुणांची सिमीमध्ये भरती करत होता. वर्षभरात ३०० तरुण यात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केल्यावर डॉ. शेख फरार झाला आहे. भरती करण्यात आलेल्या तरुणांकडून त्याने ५०० ते १ सहस्र रुपये घेतल्याचे समोर आले आहे. ज्या तरुणांना भरती करण्यात आले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

माजी न्यायाधीश राजेंद्र सच्चर म्हणतात, मुसलमानांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होण्याला मोदी शासन उत्तरदायी !

काश्मीर, आसाम, बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदूंमध्ये निर्माण झालेली भीती दूर 
करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत असतांना प्रयत्न केले नाहीत, त्याविषयी सच्चर का बोलत नाहीत ?
     देहली - मुसलमानांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होण्यासाठी मोदी शासन उत्तरदायी आहे, असा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि सच्चर आयोगाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सच्चर यांनी केला आहे. 
सच्चर पुढे म्हणाले की, 
१. मोदी शासनाच्या २० मासांच्या कार्यकाळात मुसलमान भयग्रस्त आहेत. मुसलमानांचा विकास करण्याऐवजी त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. (पोलिसांना बाजूला केल्यास १५ मिनिटांत ८५ कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्या विधानावरून कोण कसे आहेत, हे लक्षात येते. त्यामुळे सच्चर यांनी केलेला आरोप तथ्यहीन आहे. - संपादक)

प.पू. सत्यसाईबाबा यांच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्त श्रीमती शैलजा फडके यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती शैलजा फडके यांचा सत्कार करतांना
सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     रामनाथी (गोवा), ११ फेब्रुवारी (वार्ता.) - प.पू. सत्यसाईबाबा यांच्या मूळच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्त श्रीमती शैलजा फडके (वय ८१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांचा १० फेब्रुवारी या दिवशी सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या या सत्काराच्या वेळी त्यांचे पुतणे श्री. केदार फडके उपस्थित होते. श्रीमती फडके या पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या आत्या आहेत. श्रीमती फडके पुण्यामध्ये वास्तव्यास असतात.

फलक प्रसिद्धीकरता

इशरत जहाँला हुतात्मा ठरवणार्‍या ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना डेव्हीड हेडलीची चपराक !
     इशरत लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित आत्मघाती आतंकवादी होती आणि अक्षरधाम मंदिर उडवण्याचे तिचे लक्ष्य होते, अशी साक्ष २६/११ आक्रमणाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि माफीचा साक्षीदार आतंकवादी डेव्हीड हेडलीने विशेष न्यायालयास दिली.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ishrat Jahan Lashkar-e-toiba ki atmaghati atankwadi thi. - David Headley
Kya Ishrat ka samarthan karnewalo par sarkar deshdroh ki karvai karegi ?

जागो ! : इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबा की आत्मघाती आतंकवादी थी । - डेव्हीड हेडली
क्या इशरत का समर्थन करनेवालों पर सरकार देशद्रोह की कारवाई करेगी ?

लघुसिंचन प्रकल्पांच्या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची चौकशी

घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांचा पक्ष झालेल्या 
राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी केल्यास आश्‍चर्य ते काय !
     संभाजीनगर, ११ फेब्रुवारी - किकवी लघु प्रकल्प आणि कंचनपूर बृहत् लघु प्रकल्प निविदा निश्‍चितीमध्ये काही अनियमितता झाली आहे का, याविषयी प्राथमिक चौकशी करून ३ मासांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होणार आहे.

पुणे महानगरपालिका आयोजित युवा महोत्सवावर ३ दिवसांत १ कोटी रुपयांची उधळपट्टी

  • राज्यात दुष्काळाची स्थिती असतांना युवा महोत्सवावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करणे, हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे पालिकेच्या या निर्णयाविषयी शरद पवार काही बोलतील कि त्यांचीही मान्यता आहे, असे समजायचे ?
  • जनहो, उधळपट्टी करणार्‍या अशा पक्षांना पालिकेच्या येत्या निवडणुकीत धडा शिकवा !
    पुणे, ११ फेब्रुवारी - महानगरपालिकेच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने भरवण्यात येणार असलेल्या युवा महोत्सवावर ३ दिवसांत १ कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असून त्याची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. या उधळपट्टीला काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी विरोध केला आहे. असे असले तरी काही वेगळ्या युक्त्या योजून हा महोत्सव मोठा गाजावाजा करत साजरा करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने घातला आहे. प्रत्यक्षात या महोत्सवावर १५ लक्ष रुपये व्यय करावेत, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे; परंतु अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार १ कोटी रुपयांचा व्यय करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे.

युनायटेड हिंदू फ्रंट देहलीत उभारणार अयोध्येत राम मंदिरासाठी प्राणत्याग करणार्‍यांचे स्मारक !

     नवी देहली - अयोध्येत श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी लाखो लोकांनी प्राणत्याग केला आहे; मात्र त्यांच्या स्मृतींसाठी देशात कोठेही स्मारक नाही. यासाठी युनायटेड हिंदू फ्रंट देहलीत त्यांच्यासाठी स्मारक उभारणार आहे. फ्रंटचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जयभगवान गोयल यांनी देहलीतील हिंदू महासभा भवन येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून बनवण्यात येणार्‍या या स्मारकाचा शिलान्यास १३ फेब्रुवारीला साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली वीर हकीकत राय यांच्या बलीदान दिनी हिंदू महासभा भवन परिसरात करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या ठिकाणी २४ घंटे ज्योती प्रज्वलित रहाणार आहे.

श्रीलंकेकडून ११ भारतीय मच्छीमारांना अटक

     कोलंबो - श्रीलंकेच्या नौदलाने मन्नारच्या खाडीत सागरी सीमेचे उल्लंघनाच्या आरोपावरून ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. (गेली अनेक वर्षे पाक आणि श्रीलंका यांच्याकडून भारतीय मच्छीमारांना अशा कारणामुळे अटक होत असतांनाही शासन भारतीय मच्छीमारांना भारताची सागरी सीमा कुठे समाप्त होते, याची माहिती का करून देत नाही ? - संपादक) त्यांच्या दोन नौकांनाही जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यातही श्रीलंकेने १२ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.

(म्हणे) पंतप्रधान मोदी यांनी हिंदु आणि मुसलमान यांच्यात फूट पाडली !

भारताची फाळणी करणार्‍या आणि फोडा आणि राज्य करा, या कूटनीतीचा लाभ उठवत सर्वाधिक 
काळ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप
     थिरुवनंतपुरम् - वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेमध्ये क्षोभ निर्माण करून सत्ता स्थापन केली. त्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पाडली, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी उद्योगपतींबरोबर छायाचित्र आणि सेल्फी काढतात; मात्र त्यांनी आतापर्यंत शेतकर्‍यांबरोबर कधी छायाचित्र काढल्याचे दिसून आले नाही. तुम्ही त्यांना शेतकर्‍याचा हात पकडून त्यांच्याशी बोलतांनाही पाहू शकणार नाही. शेतकर्‍यांना त्यांचे भविष्य दिसत नाही, ते आत्महत्या करत आहेत. शासन त्यांना काही साहाय्य करत नाही आहे. पंतप्रधान मोदी यांनी मोठमोठी आश्‍वासने दिली; मात्र आता ते सर्व विसरून गेले आहेत.

लालबहादूर शास्त्री यांची विष देऊन हत्या ! - शास्त्री यांच्या धाकट्या सूनेचा आरोप

काँग्रेसला ठरवले उत्तरदायी !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर भारताचे तात्कालीन लोकप्रिय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचेही प्रकरण संशयास्पद बनले आहे. शास्त्री यांच्या धाकट्या सून नीरा शास्त्री यांनी आता शास्त्री यांच्या मृत्यूविषयी सूत्र उपस्थित केले आहे. शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा आरोप नीरा शास्त्री यांनी केला आहे. 
१. नीरा शास्त्री या शास्त्री यांचे धाकटे पुत्र अशोक यांच्या पत्नी आहेत. नीरा शास्त्री यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य लपवून ठेवण्यासाठी काँग्रेसला उत्तरदायी ठरवले. 
२. नीरा शास्त्री म्हणाल्या, शास्त्री यांना दूधातून विष दिले गेले असावे, अशी शक्यता माझ्या सासू ललिता शास्त्री यांनी व्यक्त केली होती. या संदर्भातील सर्व सत्यस्थिती त्यांनी त्यांच्या चष्म्याच्या पेटीत लिहून ठेवली होती; मात्र काँग्रेसचे तात्कालीन शासन शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलू शकले नाही. 
३. नीरा शास्त्री पुढे म्हणाल्या, शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते, ज्याला चंदनामध्ये लपेटून जनतेपासून लपवण्यात आले होते. त्यांच्या शरीरावर दोन ठिकाणी मारल्याच्या खुणा होत्या. काँग्रेसचे तात्कालीन शासन सांगू शकली नाही की शास्त्री यांचा मृत्यू का आणि कसा झाला ?

उत्तर कोरियाच्या हुकुमशाहने सैन्यदल प्रमुखाला फासावर लटकवले !

हुकुमशाहीचा दुष्परिणाम !
     प्योगाँग - उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने देशाचे सैन्यदल प्रमुख री योंग गिल यांना फाशी दिली आहे. री योंग गिल यांना भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपाखाली याच महिन्यात फाशी देण्यात आली. जवळपास ७० अधिकार्‍यांना आतापर्यंत मत्यूदंड देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (हुकुमशाहीमुळे न्याय मिळतोे, असे होत नाही. तीच स्थिती भारतातील लोकशाहीतही दिसून येते. लोकशाहीत न्याय लगेच आणि तो मिळतोच असेही नाही. त्यामुळे धर्माधिष्ठित पितृशाहीच श्रेष्ठ ठरते ! - संपादक)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

धार (मध्यप्रदेश) येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) पुनर्वैभवाच्या प्रतिक्षेत !

भोजशाळेत साजर्‍या होणार्‍या वसंतपंचमी उत्सवाच्या निमित्ताने...
हिंदु राष्ट्रात भोजशाळेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यात येईल !
श्री सरस्वती देवीची आराधना
करतांना राजा भोज
      भोजशाळा (धार, मध्यप्रदेश) म्हणजे साक्षात् विद्येची देवता सरस्वतीचे प्रकटस्थळ ! अनेकविध विद्यांचे माहेरघर असलेले भारतातील एकेकाळचे विश्‍वविद्यालय ! महापराक्रमी राजा भोज याची तपोभूमी ! इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान, काशीतील काशीविश्‍वशर जसे बळाने हस्तगत करून त्या ठिकाणी मशिदी असल्याचा दावा करून हिंदूंचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न धार येथील भोजशाळेविषयी चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भोजशाळेसाठी चालू असलेला संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपून भोजशाळा स्वतःच्या कह्यात येईल, असे हिंदूंना वाटले होते; मात्र मुसलमानांच्या मतपेटीपुढे लाचार झालेल्या राजकीय पक्षांनी ते होऊ दिले नाही. मंदिर असल्याचे सर्व पुरावे उघड्या डोळ्यांनी दिसत असतांनाही सध्या प्रत्येक शुक्रवारी या सरस्वतीमातेच्या मंदिरात नमाज अदा केला जात आहे. गतवर्षी वसंतपंचमीच्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी शुक्रवार होता. या दिवशी मुसलमानांना नमाज पठण करू न देता पूर्ण दिवस हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदूंना संघर्ष करावा लागला आणि हिंदुद्रोही भाजप शासनाचा अत्याचार सहन करावा लागला.

पुण्यामध्ये एका वर्षात बेशिस्त वाहनचालकांचे १ सहस्र वाहन परवाने (अनुज्ञप्ती) रहित

     पुणे, ११ फेब्रुवारी - गेल्या ३ वर्षांत मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे, हे वाहतुकीचे नियम डावलणार्‍या ३ सहस्र बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या वाहनचालकांचे वाहन परवाने (अनुज्ञप्ती) ६ मासांसाठी रहित करण्यात येतात.

गडहिंग्लज येथे व्हॅलेंटाईन डे अपप्रकाराविषयी निवेदन

     गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ११ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. खेमणार यांनी, हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. मी नक्की शिक्षणाधिकारी आणि पोलीस ठाणे यांना याविषयी सूचना करतो, असे सांगितले.

प्रेमातील व्यापकता

संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
     संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस ऊसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ? ते म्हणाले, बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तूपण.. हा, तू घे... हा, तू घे. असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते.

असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला ।

१. भोजशाळेत हिंदूंचेच मंदिर असतांना तेथे वसंतपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी
त्यांना अनुमती घ्यावी लागते, हे हिंदूंचे दुर्दैव ! 
      १२ फेब्रुवारीला असलेल्या वसंतपंचमी सोहळ्यात हिंदूंना भोजशाळेत पूजेची अनुमती मिळावी; म्हणून गेल्या ८ दिवसांपासून हिंदू प्रतिदिन पोलिसांकडून अनुमती मागत आहेत; पण त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण दिवस पूजेची अनुमती मिळवण्यात अपयश आले आहे. हे सर्व वाचत असतांना मला एका नाट्यपदाचे स्मरण झाले, असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला । खरेच आताच्या कालात हिंदूंना चोर म्हणावे लागेल; कारण भोजशाळेत हिंदूंचेच मंदिर असून आणि तसे अनेक पुरावे असूनही ते आमचेच आहे, असे म्हणण्याचे आकाडतांडव धर्मद्रोही करत आहेत. मंदिर हिंदूंचेच; पण त्या मंदिरात वसंतपंचमी या सोहळ्याची पूजा करण्यास हिंदूंनाच अनुमती लागते. धार, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या आदल्या शुक्रवारी धर्मांधांनी सहस्रो लोकांना जमा करून आपले शक्तीप्रदर्शनच दाखवले.

आजतागायत एकही चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण न करणार्‍या शासनाची, केवळ मंदिरांवरच टाच का ?

     महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर मंदिर, केरळमधील शबरीमाला अयप्पा मंदिर, विंध्याचलमधील विंध्यवासिनी आणि वृंदावनमधील बांकेबिहारी ही मंदिरे कह्यात घेण्याचे षड्यंत्र राज्यशासनांकडून रचण्यात येत आहे. हे षड्यंत्र थांबवावे, तसेच मंदिरांच्या अधिग्रहणावर बंदी आणून अयोध्या, काशी, मथुरा आदी ठिकाणची मंदिरे हिंदूंच्या कह्यात देण्यात यावीत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यशासनांकडून मंदिरे कह्यात घेण्याचे करण्यात येत असलेले प्रयत्न हिंदु आणि धर्मनिरपेक्षता यांच्या विरोधी आहेत; तसेच ते घटनेकडून नागरिकांना मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे हनन आहे. देशात आजतागायत शासनाकडून कोणत्याही चर्चचे किंवा मशिदीचे अधिग्रहण करण्यात आलेले नाही; मात्र काशी, मथुरा, अयोध्या यांसारख्या कित्येक मंदिरांचे अधिग्रहण करण्यात आले. जर अहिंदूंना त्यांच्या प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापन पहाण्याचा अधिकार आहे, तर हिंदूंनाही हा अधिकार का असू नये ? अधिग्रहित मंदिराचा पैसा हिंदु धर्माच्या विकासासाठी व्यय न होता, तो मदरसे, चर्च, मशिदी यांच्या विकासावर व्यय करण्यात येतो. हा व्यय थांबवून अधिग्रहित मंदिरातून मिळालेल्या धनाचा विनियोग हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदूंच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी करण्यात यावा. (३१.१.२०१६)

सत्त्व हरवलेली निधर्मी बनलेली पत्रकारिता !

    २६ जानेवारीला तथाकथित पुरोगामी महिलांनी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी केलेले आंदोलन शनिभक्त आणि हिंदुत्ववादी यांच्या प्रयत्नांमुळे अयशस्वी झाले. या घटनेचे पडसाद भारतभर उमटले. धार्मिक ज्ञान आणि अधिकार असो वा नसो, अशा व्यक्तींनी त्यांची मते प्रसारित करून सवंग प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. इसिसचे हस्तक भारतातील सर्वच राज्यांमधून पकडले जात असतांना प्रसारमाध्यमांना तर हे सूत्र त्यापेक्षाही भयंकर वाटले. त्या बातमीपत्रांचे स्वरूप एकांगी, हेकेखोर आणि धर्मशास्त्रविरोधी असेच होते.

व्हॅलेंटाईन डे नको, तर वसंतपंचमी साजरी करा !

     फेब्रुवारी महिना चालू झाला की, व्हॅलेंटाईन डेचे कवित्व चालू होते. प्रिय व्यक्तीस छान संदेश, शुभेच्छा पत्र अथवा सुंदरशी भेट देता येईल का ? याचा शोध चालू होतो. व्हॅलेंटाईन डेच्या आकर्षक भेटवस्तूंनी दुकाने सजतात. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अनुकरणातून हे सारे घडते.
     भारतीय संस्कृतीतही प्रेमदिनाचे खूपच रोमांचक मुहूर्त आहेत. आपल्याकडे त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. हे विश्‍वची माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम् असे म्हणणारी भारतीय संस्कृती जगभरातल्या सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, असा संदेश देते. स्त्री-पुरुष मिलनाची देवताही भारतीय संस्कृतीत असून परस्परांसाठी समर्पणाच्या सुरेख, रोमांचक आणि सत्त्व, तत्त्व, ममत्व सिद्ध करणार्‍या पौराणिक कथाही आहेत. या कथांमधील संदेश स्त्री-पुरुषांनी नीट समजावून घेतला, तर व्हॅलेंटाईन डे आणि वसंतपंचमी यांतील भेद आणि महत्त्व लक्षात येईल.

एका अनावृत्त पत्रातून केरळच्या महिलेने याचिकाकर्ता नौशाद अहमद खान यांच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन !

शबरीमाला मंदिराविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या धर्मद्रोही याचिकेचे प्रकरण
पत्रातून हिंदु धर्माचे महात्म्य आणि अद्वितीयत्वाची येते प्रचीती !
शबरीमाला मंदिर
    नवी देहली - केरळमधील शबरीमाला मंदिरात असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदी विरुद्ध यंग लॉयर्स संघटनेच्या नौशाद अहमद खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी चालू आहे.
    केरळ राज्यातील एका महिलेने नौशाद अहमद खान यांनी त्यांच्या धर्मात महिलांवर होणारे अत्याचार आधी थांबवावे आणि नंतरच इतर धर्मांच्या कार्यात हस्तक्षेप करावा, अशी तंबी देणारे एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. (केरळी महिलेचे अभिनंदन ! अशा धर्माभिमानी महिलाच हिंदु धर्माच्या खर्‍या शक्ती होत ! - संपादक)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

हुंडाबळींच्या बहुसंख्य खटल्यांमागे लपलेले ढोंगी स्त्रीवादाचे दर्शन घडवणारे सत्य

     सुदैवाने न्यायाधिशांनी अजूनही समाजसेविकांप्रमाणे विवेकाशी नाळ न तोडल्यामुळे हुंडाबळींच्या बहुसंख्य खटल्यांमधील आरोपी निर्दोष सुटतात. हुंडाबळीच्या विक्षिप्त सिद्धांतामुळे असा समज होतो की, भारतात पैसे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गरीब बिचार्‍या विवाहित युवतींना जाळणे, ठार करणे किंवा त्यांचा छळ करून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणे ! या ठिकाणी विवेकी माणसाच्या डोक्यात असा विचार येतो की, पैसे, मौल्यवान वस्तू किंवा हुंडा या गोष्टी तिला ठार करून मिळतात का ? नाही. उलट पोलिसांचा, कोर्ट-कचेर्‍यांचा ताप आणि या तापातून सुटका करून घेण्यासाठी पैसे मिळवण्यापेक्षा पैसे व्यय करण्याचा भुर्दंड पडतो. तेव्हा पैसे मिळवण्यासाठी असला आचरटपणा कोण करील का ? पण एवढा विवेक दाखवतील त्या समाजसेविका कसल्या ?
- श्री. ग.य. धारप (संदर्भ : मासिक प्रज्वलंत, मे १९९९) 
(आपल्या समाजात हुंडाबळीचे काही प्रसंग घडतातही; मात्र सरसकट प्रत्येक ठिकाणी तसेच होते, असे समजून सासरच्या मंडळींच्या माथी खापर फोडणे योग्य होत नाही. तथाकथित स्त्रीमुक्तीवाले मात्र परिस्थितीचा अभ्यास न करता काही ठिकाणी निर्दोष सासरच्या मंडळींवरही खटले घालतात ! - संपादक)

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा - सांगली येथे निवेदन

     सांगली, ११ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत आणि हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथील प्रांताधिकारी श्री. सुभाष बोरकर यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार श्रीमती धनश्री भांबुरे यांना निवेदन देण्यात आले. ईश्‍वरपूर येथे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना, तसेच ६ शाळा-महाविद्यालये येथेही निवेदन देण्यात आले. महाविद्यालयात ५० हस्तपत्रकांचे वाटपही करण्यात आले. ईश्‍वरपूर येथे श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अशोक वीरकर, हिंदु धर्माभिमानी श्री. भरत जैन, सूरज पेठकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज येथे निवेदन देतांना शिवसेना उद्योग आघाडीचे श्री. पंडीत(तात्या) कराडे, सर्वश्री गजानन मोरे, विवेक शिंदे, दिलीप नाईक, रामा कुरणे, सतीश नाईक, चंद्रकांत मैगुरे, भाजपचे सर्वश्री गणेश चौगुले, अजिंक्य हंबर, सुमेध ठाणेदार, भाजप युवा मोर्च्याचे सर्वश्री जयगोंड कोरे, अविनाश पाटील, हिंदु धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीष कुलकर्णी उपस्थित होते.

पितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याविषयीच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराज यांनी त्यांना दिलेले आशीर्वचन !

प.पू. परशराम पांडे
       पितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची रौप्यमहोत्सवी उद्योजकीय यशोगाथा असलेल्या मी कोण ? या पुस्तकाचे प्रकाशन ७.२.२०१६ या दिवशी एका सोहळ्यात करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराज यांनी श्री. प्रभुदेसाई यांचे अभिनंदन करणारे आणि त्यांच्या पुढील उन्नतीसाठी आशीर्वादपर पत्र दिले, ते येथे देत आहोत. 
प्रति, 
    सन्माननीय उद्योजक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना नमस्कार,
आपल्या पितांबरी प्रॉडक्ट्सच्या रौप्यमहोत्सवी समारंभानिमित्त मी कोण या लेखनातून आपली उद्योजकीय यशोगाथा वर्णन करणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ७ फेब्रुवारी २०१६ ला असल्याची निमंत्रण पत्रिका ४ फेब्रुवारी २०१६ ला प्राप्त झाली. पत्रिका वाचल्यावर आनंद झाला.

शांत, आनंदी आणि बालपणापासूनच संतसहवासाची आवड असलेला वर्धा येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अन् ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १ वर्ष) !

१. जन्मापूर्वी
चि. श्रीरंग क्षीरसागर
१ अ. आधुनिक वैद्यांनी गरोदर नसल्याचे सांगूनही गरोदर असल्याचे जाणवणे आणि दुसर्‍यांदा तपासणी केल्यावर त्यांनी गरोदर असल्याचे सांगणे : ८.३.२०१४ या दिवशी रुग्णालयात तपासणीला गेले असतांना आधुनिक वैद्यांनी मी गरोदर नसल्याचे सांगितले, तरीही मला सतत गरोदर असल्याची जाणीव होत होती. मी पुन्हा १९.३.२०१४ या दिवशी रुग्णालयात गेले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मी गरोदर असल्याचे सांगितले. त्या वेळी आधुनिक वैद्यकशास्त्रापेक्षा प.पू. गुरुदेवांनी शिकवलेले अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे, अशी अनुभूती आली; कारण त्यामुळेच मला गरोदर असल्याची जाणीव झाली, असे वाटले.
१ आ. साधिकेच्या आईची आध्यात्मिक उन्नती झाल्याचा सोहळा ऐकत असतांना गर्भाची हालचाल होत असल्याचे जाणवणे : मला चौथा मास (महिने) चालू असतांना माझ्या आईचा आध्यात्मिक स्तर ६३ टक्के झाला आहे, असे पू. स्वातीताईंनी सत्संगाच्या माध्यमातून सांगितले. मी तो सोहळा ऐकत असतांना गर्भाची हालचाल होत आहे, असे जाणवले. जणूकाही बाळालाही पुष्कळ आनंद झाल्याचे जाणवले.

श्रीकृष्णकृपेमुळे अनेकदा जीवनदान मिळाल्याने सौ. शालिनी मराठे यांनी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा आणि कोटी कोटी कृतज्ञतेची त्यांना शब्दशः आलेली अनोखी अनुभूती

सौ. शालिनी मराठे
     गुरुच जगताचे रक्षण करतात. त्यांच्याच कृपेने जग जगते. गुरूंनी वेळोवेळी माझे रक्षण केले आहे. त्यांच्या कृपेनेच मी आज जिवंत आहे, नाहीतर मृत्यूने कधीच माझ्यावर झडप घालून मला नेलेे असते. काळ आला; पण वेळ आली नव्हती, हे सार्थ ठरवणारे अनेक प्रसंग माझ्यावर ओढवले; पण प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने काळाच्या विशाल जबड्यातून माझी सुटका केली. गजेंद्राच्या आकांतासी । जैसा धावला ऋषिकेशी ॥ तसा माझ्यासाठीही तोच ऋषिकेशी धावत आला आणि त्याने मला वाचवले. एकदा-दोनदा नव्हे, तर १० वेळा ! श्रीकृष्णा, तुझ्या चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे. अंतर्मनात कृतज्ञता उत्पन्न करणार्‍या या प्रसंगांपैकी विस्तारभयास्तव केवळ ४ प्रसंगच मी येथे थोडक्यात देत आहे. त्यामुळे साधकांना त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांची आठवण होईल आणि त्यांचा ईश्‍वराप्रती भक्तीभाव अन् कृतज्ञताभाव वाढण्यास साहाय्य होईल.

स्वप्नामध्ये प.पू. भक्तराज महाराज हत्तीवर बसलेले दिसणे, भक्तांनी त्यांना अंघोळ घालणे आणि भक्तसमुदाय जयघोष करतांना दिसणे

    ४.५.२०१५ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. समुद्राकाठी एक घर होते. मी त्या घराच्या दारात बसले होते. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) एका हत्तीवर अंबारीत बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर छत्र आहे. प.पू. भक्तराज महाराज मध्यम वयातील दिसले. त्यांच्या पाठीमागे पुष्कळ मोठा भक्तसमुदाय होता. तो हत्ती चालत चालत समुद्रामध्ये काही अंतरावर बाबांसमवेत गेल्यावर भक्तांनी त्यांना अंघोळ घातली अन् सर्व समुदाय जयघोष करत होता. त्यानंतर प.पू. बाबा मी बसले होते, त्या घरामधे आले आणि एका खोलीत गेले. त्या खोलीत एक सुखासन होते अन् त्यावर पू. उमेश शेणै बसलेले होते. काही वेळाने प.पू. बाबांनी पू. उमेशअण्णांना बोलावले आणि ते आत खोलीत गेले. ते आत खोलीमधे गेल्याचे दिसले. त्यानंतर मला जाग आली.

साधिकेच्या भ्रमणसंगणकाच्या स्पेसबारवर ॐ उमटणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवलेल्या खोलीतील फरशी गुळगुळीत होणे

    १०.०७.२०१५ या दिवशी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स्टेशन केंद्राच्या केंद्रसेविका आणि ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या सौ. संजीवनी विश्‍वास कोळेश्‍वर यांना त्यांच्या भ्रमणसंगणकाच्या स्पेसबारवर ॐ उमटलेला दिसला. त्यांच्या मुलीने त्यांना शिकवलेल्या भागाचा सराव त्या भ्रमणसंगणकावर करत असतांना त्यांना ॐ उमटलेला दिसला. ॐ पाहून सर्वांची भावजागृती झाली आणि सर्वांनी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
    त्यांच्या खोलीत प.पू. बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज) छायाचित्र ठेवले आहे. तेथील फरशी (टाईल्स) पुष्कळ गुळगुळीत झाली असल्याचे त्यांनी दाखविले.
- श्री. सुधीर बोर्डे, संभाजीनगर.
     (भाव तेथे देव या उक्तीनुसार आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

पू. नंदकुमार जाधवकाका आश्रमात आल्यावर त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेव विशाल रूपामध्ये दिसणे आणि आकाशदेव म्हणजे आणखीन कोणी नसून प.पू. गुरुदेवच आहेत, असे जाणवणे

      ५.९.२०१५ या दिवशी सकाळी मी स्वागत कक्षामधे जात होते. तेवढ्यात एक चारचाकी वाहन समोर थांबले आणि त्यातून पू. नंदकुमार जाधवकाका खाली उतरले. ते आश्रमाकडे चालत येत असतांना मला त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेव विशाल रूपामधे दिसले. त्यांच्याकडे पहातांना त्यांचे रूप माझ्या दृष्टीत मावत नव्हते. एवढे ते विशाल होते. त्यांना पाहून माझी भावजागृती झाली आणि आकाशदेव आणखीन कोणी नसून प.पू. गुरुदेवच आहेत, असे मला जाणवले. - सौ. मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, गोवा. (२५.९.२०१५) (सध्या साधक आकाशदेवतेचा नामजप करत आहेत. - संकलक)
     (भाव तेथे देव या उक्तीनुसार आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

गुरुपौर्णिमा महोत्सवास जाऊ शकत नसल्याने प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर साधिकेला आलेल्या भावानुभूती

१. गुरुपौर्णिमा महोत्सवास जाता येत नसल्याची खंत वाटून प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करणे आणि त्यांना नमस्कार करतांना त्यांनी तीन वेळा पाठीवरून हात फिरवल्याचे जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या आठ दिवस आधी माझा बरगडीचा अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला. त्यामुळे आता मी गुरुपौर्णिमा उत्सवास जाऊ शकणार नाही, अशी मला खंत वाटू लागली. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी मी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना उद्या गुरुपौर्णिमेची मानस पाद्यपूजा तुम्हीच करून घ्या, अशी प्रार्थना केली आणि सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांनी तीन वेळा माझ्या पाठीवरून हात फिरवल्याचे मला जाणवले. तेव्हापासून माझी सातत्याने भावजागृती होऊ लागली.

प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना समष्टी साधना करण्यास शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
     मी गुरुकृपायोगानुसार साधना करतांना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत जाऊन साधकांना समाजात सत्संग घेऊन साधनेचा प्रसार करायला सांगायचो. तेव्हा मला वाटायचे इतर संत व्यष्टी साधना सांगतात, तर मी साधकांकडून समष्टी साधना करवून घेतो ! आज मला आठवले की, प.पू. भक्तराज महाराज यांनी मला १९९२ या वर्षी आता महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करा आणि १९९३ या वर्षी आता भारतभर धर्माचा प्रसार करा, असे सांगितले होते. तेव्हा माझी गाडी जुनी झाल्याने त्यांनी मला प्रसारासाठी त्यांची गाडी दिली आणि माझ्याकडे पेट्रोलला पैसे नसल्याने पैसेही दिले. अशा तर्‍हेने त्यांनीच मला समष्टी साधना करण्यास शिकवले. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
प्राधान्य न कळणारे धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी !
     लव्ह जिहाद, महिलांची असुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गुन्हेगारी, जिहादींची आक्रमणे, गंगाप्रदूषण इत्यादी अनेक ज्वलंत प्रश्‍न देशापुढे उभे असतांना बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रियांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      उत्तम चरित्र म्हणजे कधीही दुराचाराचा विचारही मनात न आणणे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

विद्रोही विद्यार्थ्यांचा अनुनय... !

संपादकीय 
    देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमात देशद्रोही अफझल गुरूची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सहसंस्थापक मकबूल भट याच्या स्मृतीप्रीत्यर्थही हा कार्यक्रम होता. या वेळी अफझल हुतात्मा झाल्याचे त्यांनी म्हटले. भारताचे दहा तुकडे करून काश्मीर स्वतंत्र करण्याविषयीही या वेळी सांगण्यात आले. विद्यापिठात अफझलचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. हे विद्यार्थी (?) हातात अफझलची चित्रे असलेली भित्तीपत्रके हातात घेऊन उभे होते. तुम कितने याकूब मारोगे, घर घर से याकूब नीकलेगा, कश्मीर की आजादी तक, भारत की बरबादी तक जंग रहेगी जंग रहेगी, पाकिस्तान झिंदाबाद, लाल सलाम अशा देशद्रोही घोषणा या विद्यार्थ्यांनी दिल्या. हे विद्यार्थी डाव्या विचारसरणीचे होते असे सांगितले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या देशद्रोही विद्यार्थ्यांना विरोध करण्यासाठी त्याच वेळी निषेधाचे आंदोलन केले आणि त्या वेळी त्यांच्याशी काही झटापटही झाल्याचे वृत्त आहे. विद्यापिठातील आतंकी आणि नक्षलवादी चळवळी बाहेर फेकल्या पाहिजेत, असे अभाविपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn