Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज श्री गणेश जयंती
आज मार्कंडेय जयंती

(म्हणे) इसिसशी संबंध जोडून मुसलमान तरुणांना अटक करण्यामागे षड्यंत्र !

इसिसशी संबंधित काही संशयित मुसलमान तरुणांना अटक केल्यावर 
केंद्रशासनावर दबाव निर्माण करणार्‍या मुसलमान संघटनांच्या उलट्या बोंबा !
     नवी देहली - मुसलमान युवकांचा संबंध इसिसया आतंकवादी संघटनेशी जोडून त्यांना नियोजनबद्धपणे अटक करण्यामागे षड्यंत्र आहे, असा आरोप देशातील मुसलमान संघटनांनी केंद्रशासनावर केला आहे.
     एकीकडे मुसलमान युवकांना अटक आणि दुसरीकडे हिंदु आतंकवादाशी संबंधित प्रकरणांतील आरोपींना मुक्त करण्याचा कार्यक्रम शासनाने चालू केला आहे, असा कांगावा जमात ए इस्लामी हिंद, जमियत उलेमा ए हिंद, अहले हदीस, ऑल इंडिया मजलिस ए मशवरात, मिली काऊन्सिल आणि वेलफेअर पार्टी या संघटनांनी केला आहे. वर्ष २०१४ मध्ये समाजविघातक कारवाया कायद्याखाली अटक केलेल्या १४१ तरुणांपैकी केवळ १८ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले; मात्र इतर १२३ निर्दोष सिद्ध झाले होते, असा दावाही या संघटनांनी केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि वेलफेअर पार्टीचे इलियास म्हणाले, भारतात इसिसचे अस्तित्व नसल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते; मग अचानक एका वर्षात इतके सुशिक्षित मुसलमान तरुण संशयित कसे झाले ? देहलीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेऊन मुसलमान तरुणांच्या अटकेविषयी पारदर्शकता असावी, अशी मागणी केली होती.

गोमांस खायचे असेल, तर हरियाणात येऊ नका ! - आरोग्यमंत्री अनिल वीज, भाजप शासन

हरियाणाप्रमाणेच संपूर्ण भारतातही गोरक्षणासाठी शासनाने
कठोर पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     अंबाला (हरियाणा) - हरियाणा राज्यात गोरक्षण कायद्याची कडक कार्यवाही होत असल्याने या राज्यात गोमांस खाण्यास सक्त मनाई आहे. जे लोक गोमांस खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत, अशांनी हरियाणात येण्याची आवश्यकताच नाही, असा सल्ला हरियाणा राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिला आहे.
     हरियाणात येणार्‍या विदेशी पर्यटकांना शासनाकडून गोमांस खाण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) उपलब्ध करून देण्याची शासनाची योजना आहे का, असा प्रश्‍न वीज यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रश्‍नावर स्पष्टीकरण दिले असून राज्यात गोमांस खाण्यास विदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारे अनुज्ञप्ती (लायसन्स) देण्यास याआधीच नकार दिला आहे. अनिल वीज यांच्या या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, वीज यांनी वक्तव्य करण्यापूर्वी गोमांसाची व्याख्या ठरवावी. (ऊठसूट कुठल्याही गोष्टीत राजकारण करू पहाणारे काँग्रेसी नेते ! - संपादक)

भोजशाळेत मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेल्या अनुमतीस हिंदूंकडून विरोध : १३ वर्षांत प्रथमच केली मंदिराबाहेर पूजा !

भोजशाळेत पूजेसाठी अनुमती मिळण्याचे प्रकरण
     धार (मध्यप्रदेश) - १२ फेब्रुवारीला असणार्‍या वसंतपंचमीच्या ३ दिवस आधी हिंदूंनी येथील कमाल मौला मशिदीच्या बाहेर पूजा केली. वर्ष २००३ नंतर प्रथमच हिंदूंनी मंगळवार, ९ फेब्रुवारीला भोजशाळेच्या बाहेर पूजा केली. प्रशासनाकडून सुरक्षेत सूट न दिल्याचा विरोध करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे धर्मजागरण मंचकडून सांगण्यात आले. धर्मजागरण मंचाचे संयोजक गोपाल शर्मा म्हणाले, प्रशासनाने आमची मागणी मान्य न केल्याने आम्ही १३ वर्षांत प्रथमच भोजशाळेच्या बाहेर पूजा केली. प्रशासनाने जर १२ फेब्रुवालीला मुसलमानांना नमाजपठणासाठी अनुमती दिली, तर आम्ही पूजेसाठी भोजशाळेत प्रवेश करणार नाही. प्रशासनाने हिंदूंना प्रत्येक मंगळवारी पूजा करण्याची अनुमती दिली आहे. वसंतपंचमीच्या पूजेवरून हिंदु मंगळवारी येथे सत्याग्रह आंदोलन करत आहेत.

सियाचिनमध्ये सैनिक लांस नायक हनुमंताप्पा हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचे कारण आहे त्यांनी केलेला योगाभ्यास !

लांस नायक हनुमंताप्पा
योगाभ्यास हा हिंदु धर्माशी संबंधित असल्याचे सांगून त्यास
हिणवणारे धर्मनिरपेक्षतावादी आता काही बोलतील का ?
हिंदु धर्माचे अद्वितीयत्व पुन: एकदा सिद्ध !
     सियाचीन - शून्य डीग्रीच्या खाली तापमान गेल्यावर जगणे अवघड होते; परंतु शून्याच्या खाली ४५ डिग्री तापमान असलेल्या सियाचीनमध्ये सलग ५ दिवसांहून अधिक वेळ आणि ३५ फूट बर्फाच्या खाली लांस नायक हनुमंताप्पा हे सैनिक श्‍वास रोखून बसले होते. हा एक चमत्कारच आहे, असे लोक म्हणत आहेत. यामागे त्यांचे धैर्य, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जगण्याची सिद्धता आणि त्यांचा योगाभ्यास या गोष्टी असल्याचे समोर आले आहे.
१. १३ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत असलेले हनुमंताप्पा एक धार्मिक सैनिक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते नियमितपणे योगाभ्यास करत असत. (नास्तिकतावादी अंनिस आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आता यावर काही बोलण्याचे धाडस दाखवतील का ? - संपादक)
२. सैन्याच्या आरोग्य सेवेचे माजी प्रमुख निर्देशक आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल वेद चतुर्वेदी यासंदर्भात म्हणाले की, उच्च दाब असणार्‍या ठिकाणी योग श्‍वास रोखून धरण्यात खूप साहाय्यभूत ठरतो, तसेच अशा परिस्थितीत सैनिकाचे मानसिक आणि धार्मिक दृष्टीकोनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

तांत्रिक कारणामुळे हेडलीची १० फेब्रुवारीची सुनावणी स्थगित

     मुंबई - २६/११ च्या आक्रमणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक डेव्हिड हेडली याची मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी चालू आहे; मात्र १० फेब्रुवारीला ही सुनावणी काही तांत्रिक अडचणींमुळे स्थगित करावी लागली. ११ फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. गेल्या दोन दिवसांतील सुनावणीत हेडलीने पाकच्या विरोधात साक्ष दिली आहे. आता तिसर्‍या दिवशी तो काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुतण्याकडून पोलीस अधिकार्‍याला मारहाण, ९ जण अटकेत

पोलीसच मार खात असतील, तर जनतेचे रक्षण कोण करणार ?
गुंडांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीची मागणी का करू नये ?
      अकलूज (जिल्हा सोलापूर) - माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते-पाटील आणि त्याचे मित्र यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके आणि इतर २ पोलीस कर्मचारी यांना मारहाण केली. ही घटना ९ फेब्रुवारीला रात्री घडली आहे. पोलिसांनी सत्यशील यांच्यासह ९ जणांना १० फेब्रुवारीला अटक केली आहे. सत्यशील मोहिते-पाटील हा विजयसिंह यांचे मोठे बंधू राजसिंह मोहिते-पाटील यांचा धाकटा मुलगा आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरके हे २ कर्मचार्‍यांसह अकलूज शहराच्या परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी सत्यशील यांची गाडी आणि पोलिसांची गाडी एकमेकांना घासून गेली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सत्यशील आणि त्यांच्या ८ मित्रांनी पोलिसांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.

विकृत देशद्रोही चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन रहित करा ! - हिंदुत्ववादी संघटना

ठाणे आर्ट फेस्टिव्हल २०१६मध्ये म.फि. हुसेन 
यांनी रेखाटलेल्या बीभत्स चित्रांचे प्रदर्शन ! 
डावीकडून वारकरी संप्रदायाचे डॉ. जयकृष्ण शिंदे, राष्ट्रीय एकात्मता
रक्षा मंचाचे श्री. दिलीप अलोणी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता
वैद्य उदय धुरी, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत
     ठाणे - कतारचे नागरिकत्व स्वीकारणारे विकृत राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन (एम्.एफ्. हुसेन) यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ठाणे आर्ट फेस्टिव्हल २०१६मधील चित्रप्रदर्शनातून काढून टाकण्यात यावे, तसेच पाकिस्तानी गायक गुलाम अली आणि म.फि. हुसेन यांचे उदात्तीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकार परिषदेत केली.
      ठाण्यातील ज्ञानराज सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय एकात्मता रक्षा मंचाचे श्री. दिलीप अलोणी, वारकरी संप्रदायाचे डॉ. जयकृष्ण शिंदे, हिंदु राष्ट्रसेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य उदय धुरी हे उपस्थित होते

(म्हणे) समानतेच्या हक्काच्या आड धार्मिक प्रथा-परंपरा येता कामा नयेत !

 • घटना ही अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे, तर प्रथा-परंपरा या पूर्वापार चालत आल्या आहेत. धर्मशास्त्र प्राचीन काळी ऋषिमुनींनी लिहिले आहे, हे लक्षात घ्यायला हवे !
 • महाधिवक्ता श्रीहरि अणे यांचे धर्मविरोधी वक्तव्य
      मुंबई - नागरिकांच्या समानतेच्या आणि अन्य मूलभूत हक्कांच्या आड धार्मिक प्रथा-परंपरा येता कामा नयेत. प्रार्थनास्थळांमध्ये कोणालाही प्रार्थना करण्यापासून अटकाव कसा काय करता येईल, अशी भूमिका ९ फेब्रुवारी या दिवशी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी उच्च न्यायालयात हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशबंदीच्या संदर्भात मांडली. (घटनेने धार्मिक प्रथा-परंपरा, उपासना यांच्या पालनेचे अधिकारही दिले आहेत. त्याच्या आडही कोणी यायला नको. शनिशिंगणापूर किंवा हजी अली येथे प्रार्थना करण्यास अटकाव नाहीच ! - संपादक) महाधिवक्त्यांनी ही भूमिका हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याशी संबंधित प्रकरणी मांडली. अणे यांनी भूमिका मांडल्यावर न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपिठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हाजी अली दर्ग्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला.

तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकाने स्वतःच्याच पक्षाच्या महिला नगरसेविकेला मारहाण केली

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बॉम्बस्फोट करणे, 
हाणामारी करणे, भ्रष्टाचार करणे आदी गुन्हेगारी कारवाया होत 
असतांना या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का होत नाही ?
     पानागड (बंगाल) - बर्धमान जिल्ह्यातील घुसकरा नगरपालिकेत एका विषयावर चाललेल्या बैठकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक नित्यानंद चटर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेविका मल्लिका चौडदार यांना मारहाण केली. यानंतर येथे झालेल्या गोंधळानंतर बैठक स्थगित करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यावर महिला नगरसेविकेच्या समर्थकांनी नित्यानंद चटर्जी यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. नगरसेविका चौडदार यांनी मारहाणीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

शिरस्त्राण असेल, तरच प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये होणार दुचाकीची नोंदणी

     नुसते शिरस्त्राण घातल्याने अपघात होण्याचे प्रमाण अल्प होणार आहे का ? त्यासाठी नागरिकांमध्ये वाहतुकीची शिस्त निर्माण होण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक विभाग यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
       पुणे, १० फेब्रुवारी -
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन दुचाकी वाहनाची नोंदणी करण्यासाठी २ शिरस्त्राणे असणे अनिवार्य झाले आहे. शिरस्त्राण असेल, तरच परिवहन कार्यालयामध्ये नवीन वाहनाची नोंदणी होेणार आहे. अन्यथा संबंधित वाहनाची नोंदणी केली जाणार नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये शिरस्त्राण सक्तीला विरोध होत असला, तरी शासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरस्त्राणाशिवाय वाहनांची नोंदणी करू नये, असा आदेश दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

मध्यप्रदेशातील धारमध्ये ३५ सहस्र हिंदु धर्माभिमान्यांनी काढली वाहनफेरी !

 • सहस्रो हिंदूंचा रेटा पहाता मध्यप्रदेशातील भाजप शासन हिंदूंना भोजशाळेत पूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देईल का ?
 • हिंदूबहुल भारतात हिंदूंना न्याय्यहक्कांसाठी असे लढावे लागते, हे अत्यंत दुर्दैवी होय ! हिंदु राष्ट्रातच हिंदूंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल ! 
 • धार शहर झाले भगवेमय ! 
 • हिंदुत्वनिष्ठांनी केले फेरीचे शिस्तबद्ध संचालन !
 • जय श्री रामच्या जयघोषाने दणाणला आसमंत ! 
 • वसंतपंचमीच्या दिवशी भोजशाळेला जाण्याचे हिंदूंना करण्यात आले आवाहन !
     धार (मध्यप्रदेश) - १२ फेब्रुवारीला वसंतपंचमी आहे. यादिवशी सूर्योदयापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३.३० नंतर हिंदू भोजशाळेत पूजा करू शकतात, तर दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाज पठणासाठी भोजशाळा खुली करण्यात येईल. त्यावेळी हिंदूंना भोजशाळेत जाण्यास अनुमती नसेल, असा आदेश भारतीय पुरातत्व खात्याने दिला आहे. याचा विरोध करण्यासाठी आणि संपूर्ण दिवस केवळ हिंदूंनाच भोजशाळेत जाण्याची अनुमती देण्यात यावी, या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारीला धारच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वाहनफेरी काढून हिंदूंमध्ये जागृती निर्माण केली.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

कोण म्हणते देशात असहिष्णुता आहे ? - पंडित हरिप्रसाद चौरासिया

असहिष्णुतेच्या सूत्रावरून पुरस्कार वापसी करणारे तथाकथित 
साहित्यिक आणि कलावंत यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     पुणे - कोण म्हणते आपल्या देशात असहिष्णुता आहे ? मला तरी असे काही वाटत नाही. ज्यांना हा देश असहिष्णु आहे, असे वाटत असेल, त्यांना वाटू दे. एवढ्या वर्षांत मला कधीही तसा अनुभव आलेला नाही. मी माझे आयुष्य खूप आनंदात जगत आहे, ते याच देशात. आपल्या देशातील लोक आणि वातावरण चांगलेच आहे; पण आपल्यातीलच काही जण जाणूनबुजून वाईट शोधत असतात. त्यातूनच सध्या असहिष्णुतेची चर्चा चालू झाली आहे. आज आपण ज्यांच्याकडे बोट दाखवत आहोत, तसेच ज्यांना असहिष्णुतेच्या मुद्यावरून धारेवर धरत आहोत, ते आपल्या विचारांचे नाहीत म्हणून. ते आपल्या घरातले कुणी असते, तर आपण असेच वागलो असतो का, अशा शब्दांत ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी देशामध्ये असहिष्णुता वाढत असल्याचे सूत्र खोडून काढले. येथे चालू असलेल्या गानसरस्वती महोत्सवात चौरासिया यांना ज्येष्ठ गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या हस्ते गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दोषांचा नाश आणि गुणांचा विकास हाच व्यक्तीमत्त्व विकास ! - यशवंत कणगलेकर

शिरवळ (जिल्हा सातारा) येथे धर्मसभा न्यासाच्या वतीने शिक्षकांसाठी मार्गदर्शन
     सातारा - पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धतीमध्ये ६४ कला आणि १४ विद्या शिकवल्या जायच्या. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासातील अन्य पैलूंसमवेतच आध्यात्मिक विकासही साधला जायचा. आध्यात्मिक विकासामध्ये दोष नष्ट करून गुणांचा विकास केला जातो आणि त्यातून आत्मज्ञान प्राप्त होते. ज्ञानातूनच व्यक्तीचा विकास घडतो; परंतु दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीत गुणसंवर्धन होत नाही. कारण सध्याच्या शिक्षणपद्धतीत केवळ काहीच कला शिकवल्या जातात. दोष नष्ट करून गुणांचा विकास कसा करायचा आणि चारित्र्यसंपन्न कसे व्हायचे, हे शिकवले जात नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे साधक श्री. यशवंत कणगलेकर यांनी केले.
     शिरवळ (जिल्हा सातारा) येथील ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. पारस राजपूत
     जर इसिसच्या हिटलिस्टवर भारत असेल, तर त्यांनीही हे लक्षात घ्यावे की, ते आमच्या हिटलिस्टवर आहेत. आम्ही त्यांना आमची शक्ती दाखवून देऊ. कुठल्याही परिस्थितीत आम्ही भारतभूमी इस्लामिक राजवटीखाली येऊ देणार नाही. - श्री. पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळ


मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करणे कठीण आहे; कारण त्यांच्यात व्यक्तीगत आणि सांघिक या दोन्ही स्तरांवर अहंकार आहे ! - एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, वॉशिंग्टनमंदिरात निरोधवर चर्चा करण्याच्या प्रसंगामुळे मस्तीजादे चित्रपटातील कलाकारांच्या विरोधात तक्रार दाखल !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कठोर 
कारवाई करणारा कायदा केंद्रशासन करील का ?
      नवी देहली - अश्‍लील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री सनी लिऑन, वीर दास, तृषार कपूर आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या विरोधात येथील आदर्श नगर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदी चित्रपट मस्तीजादेमधील एका प्रसंगात ते मंदिरात निरोधवर चर्चा करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही तक्रार दाखल झाली आहे; मात्र तक्रार करणार्‍याचे नाव समजू शकले नाही.

नेझमा नावाच्या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या विनय महातो नावाच्या विद्यार्थ्याची हत्या केली

लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना धर्मार्ंध ठरवणारे 
धर्मनिरेपक्षतावादी या घटनेविषयी तोंड उघडतील का ?
     रांची (झारखंड) - येथील सफीरे आंतरराष्ट्रीय शाळेतील नेझमा खातून या हिंदी विषय शिकवणार्‍या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या ७ वीत शिकणार्‍या विनय महातो या विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वसतीगृहात रहाणार्‍या विनय महातोचे खातून यांंच्या ११ वर्षांच्या मुलीवर प्रेम होते. यामुळे चिडलेल्या खातून यांनी विनयला मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. गंभीर घायाळ झालेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. खातूनला अटक करण्यात आली आहे.

पाकमध्ये हिंदु विवाह कायद्याला संसदीय मंडळाची मान्यता

पाकमधील हिंदूंना केवळ एका विवाह कायद्यासाठी अनेक दशके 
संघर्ष करावा लागतो, तर भारतात मागणी न करताही राज्यकर्त्यांकडून
मुसलमानांवर सलवलतींची खैरात केली जाते, हे लक्षात घ्या !
अनेक वर्षांची पाकमधील हिंदूंची मागणी पूर्ण होणार
     इस्लामाबाद - अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पाकिस्तानच्या एका संसदीय मंडळाने हिंदु विवाह कायद्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये रहात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंसाठी विवाह कायदा बनण्यातील एक प्रमुख अडसर दूर झाला असून लवकरच हा कायदा अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मंडळाच्या संमतीनंतर हे विधेयक पाकच्या संसदेत ठेवण्यात येणार आहे. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे या विधेयकाला समर्थन असल्यामुळे पाकच्या संसदेतही हे विधेयक संमत होण्याची पूर्ण निश्‍चिती आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनची हिंदूंची महत्त्वाची मागणी पूर्ण होणार आहे.
     लॉ अ‍ॅन्ड जस्टिस साठी गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय संसद स्थायी समितीने ८ फेब्रुवारी या दिवशी हिंदु विवाह कायदा २०१५चे प्रारूप अंतिम केले. यासाठी विशेषत्वाने ५ हिंदु कायदा निर्मात्यांना आमंत्रित करण्यात आले होते. एका पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार सातत्याने होत असलेल्या विलंबामुळे समितीने या विधेयकाला सर्वानुमते मान्यता दिली आहे.

(म्हणे) परिपूर्ण विकासासाठी महाराष्ट्राचे ३ तुकडे करावेत !

अतिरिक्त सचिव पी.व्ही.आर्.के. प्रसाद यांचा चुकीच्या विकाससंकल्पना
      संभाजीनगर, १० फेब्रुवारी - प्रत्येक राज्यात स्थानिक प्रश्‍न असतात. मोठ्या राज्यात विकास असमतोल असतो आणि आपल्या भागात निधी वळवण्यासाठी नेत्यांची स्पर्धा असते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यांत प्रत्येक जिल्ह्यात जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळही नसतो. उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन लहान राज्यांची निर्मिती शक्य आहे. विकासाच्या सूत्रावरच आंध्रप्रदेशमधून तेलंगणा स्वतंत्र राज्य झाले. लहान राज्यात निश्‍चित विकास सोपा असल्याने महाराष्ट्रातही मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशी ३ राज्ये करण्याची संधी आहे, असे मत माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव यांचे माहिती सल्लागार आणि अतिरिक्त सचिव पी.व्ही.आर.के. प्रसाद यांनी व्यक्त केले. (आज देशामध्ये एकात्मकता आवश्यक असतांना राज्ये वेगळी करून प्रांतवाद उभा रहात आहे. तसेच आजपर्यंत वेगळी राज्ये निर्माण करून त्या ठिकाणी शाश्‍वत विकास साध्य झाल्याचे एकतरी उदाहरण पी.व्ही.आर.के. प्रसाद दाखवतील का ? - संपादक)

(म्हणे) गांधी यांच्या हत्येमागे विनायक सावरकर यांचे आशीर्वाद !

सवंग लोकप्रियतेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप करणारे तुषार गांधी ! क्रांतीकारकांवर 
आरोप करणे, हा त्यांनी देशासाठी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागाचा अवमानच आहे !
म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा आरोप
      नागपूर - म. गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या मागे विनायक सावरकर यांचा आशीर्वाद होता. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पाठबळ असल्यामुळेच गोडसे गांधींची हत्या करू शकले, असा आरोप म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला. या हत्येमागे केवळ गांधीद्वेष असतांना त्याला ५५ कोटींचा बळी (आताचे ३० सहस्र कोटी) असे खोटे समर्थन करण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असेही तुषार गांधी म्हणाले. (केवळ ५५ कोटींचा बळीच नाही, तर फाळणीच्या वेळी मुसलमानांकडून लक्षावधी हिंदूंची कत्तल करण्यात आली, तसेच सहस्रो महिलांवर बलात्कार करण्यात आले. हिंदूंचा हा नरसंहार म. गांधी थांबवू शकले असते; मात्र मुसलमान प्रेमापोटी त्यांनी तो थांबवला नाही. त्यामुळे गांधी या घटनेचेही बळी ठरले असावे, असेही म्हणता येईल ! - संपादक)

बाळ महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यास जशास तसे उत्तर देऊ ! - महेश उरसाल, बजरंग दल

     कोल्हापूर - देशद्रोही विधान करणारा एम्आयएम् आणि अन्य काही संघटना पाच दिवसांपूर्वी भगवा ध्वज हटवण्यावरून झालेल्या दंगलीच्या संदर्भात शिवभक्त आणि राष्ट्रप्रेमी बाळ महाराज यांना अटक करा, असे म्हणत आहेत. अशा धर्मविरोधी घटकांना आम्ही आव्हान देतो की, बाळ महाराज उपाख्य संतोष कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवाच आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असे प्रसिद्धीपत्रक बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी दिले आहे.
     त्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, वारंवार काही अधिकारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अकारण गुन्हे दाखल करत आहेत. यापुढे पोलीस प्रशासन असा प्रकार करणार असतील, तर आम्ही असहकार्याची भूमिका घेऊ. गेल्या आठवड्यात लव्ह जिहाद प्रकरणात एक मुलीच्या आईने बाळ महाराजांना विनंती करून तिला वाचवण्यास सांगितले.

परभणीत काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी

काँग्रेसी नेत्यांचे खरे स्वरूप !
     परभणी - येथील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मुलाच्या लग्नात कोट्यवधींची उधळपट्टी करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांच्या मुलाचा नुकताच तिरूपती येथे शाही थाटात विवाह सोहळा पार पडला. तिरूपतीला जाणार्‍या वर्‍हाडी मंडळींसाठी परभणीहून २३ डब्यांच्या वातानुकूलित रेल्वेचे आरक्षण करण्यात आले होते. उंची मद्य देण्यासाठी महिलांची व्यवस्था होती. तिरुपतीत २ दिवस पंचतारांकित सोयीसुविधांसह मुक्काम झाला. मंदिर देवस्थानला मोठी देणगी दिली. परत आल्यावर परभणीकरांसाठी स्वागत समारंभ झाला. लावणीसम्राज्ञींवर पैशांची उधळण झाली. खाण्यापिण्यावर आणि सजावटीवर झालेल्या खर्चाची तर मोजदादही नाही. देशमुखांच्या शाही विवाह सोहळ्यावर मराठवाड्यातील शेतकर्‍यांकडून संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

लव्ह जिहाद करा अन् ७ लाख रुपयांचे बक्षीस मिळवा !

गुजरातमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसार !
      बडोदा - मुसलमान तरुणांनी अन्य धर्मातील तरुणींसोबत विवाह केल्यास त्यांना ७ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा संदेश गुजरातमधील बडोदा शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित होत आहे. यावरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.

पोलीस, शाळा आणि महाविद्यालय येथे पत्र पाठवून प्रबोधन करणार ! - तहसीलदार शांताराम सांगडे

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार 
रोखण्यासाठी तहसीलदार, शाळा आणि महाविद्यालय येथे निवेदन 
तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदुत्ववादी
    कागल (जिल्हा कोल्हापूर), १० फेब्रुवारी (वार्ता.) - १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पाश्‍चात्त्य संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अंधानुकरण होते. या दिवशी संस्कृती आणि धर्मविरोधी अनैतिक प्रकारांना ऊत येतो. हे अपप्रकार रोखण्यासाठी येथील हिंदुत्ववाद्यांनी तहसीलदार, श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर महाविद्यालय आणि डी.आर्. माने महाविद्यालय येथे निवेदन दिले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी भोकरे, उपतालुका प्रमुख शिवगोंडा पाटील, श्रीशिवप्रतिष्ठानचे कागल तालुकाप्रमुख श्री. विजय आरेकर, शिवसैनिक सर्वश्री सुरेश वैद्य, आनंदा पाटील, रंगराव पाटील, अमोल बारड, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, प्रीतम पवार, दीपक भोपळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांचा वारसा पुढे चालवला पाहिजे ! हिंदु जनजागृती समिती

      केडगाव, १० फेब्रुवारी (वार्ता.) १९ व्या शतकात स्वामी विवेकानंदांनी जगभरात हिंदु धर्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य केले. हिंदु धर्म प्रसारक म्हणून कार्य करतांना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी अव्याहतपणे हिंदुत्वाच्या प्रसाराचे कार्य चालूच ठेवले. तोच वारसा आपणही पुढे चालवला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचच्या वतीने केडगाव येथे ३१ जानेवारी या दिवशी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अन्न आणि औषध प्रशासन खात्यात ३५ टक्के पदे रिक्त असल्यामुळे दूध भेसळ रोखण्यात अपयश !

      मुंबई - दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा, गोडेतेल यांपासून पाण्यापर्यंत भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. राज्यातील दूध भेसळीने गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे दूध भेसळ रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करणार याची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असले, तरी अन्न आणि औषध प्रशासन विभागात अधिकारी, तसेच कर्मचारी यांची वानवा असल्यामुळे भेसळ रोखणार कशी, असा प्रश्‍न एफ्डीएपुढे निर्माण झाला आहे. या विभागात प्रथम श्रेणी अधिकार्‍यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांपर्यंतची ३५ टक्के पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांमध्ये जमेल तशी कारवाई करत असल्याचे एफ्डीएच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

अनिल शेटे यांची संजय गांधी योजनेवर सदस्य म्हणून निवड !

     सांगली - शिवसेनेत गेली वीस वर्षे कार्यरत असलेले शिवसेनेचे सांगली उपतालुकाप्रमुख श्री. अनिल शेटे यांची संजय गांधी योजना/इंदिरा गांधी योजना/श्रावण बाळ योजना/वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अशा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून ही निवड करण्यात आली आहे. याच समवेत सर्वश्री प्रकाश बिरजे, शेखर मोहिते, सौ. हेमलता मोरे, श्री. विशाल मोरे, श्री. अंकुश जाधव यांचीही सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

श्री शंभू महादेव ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

     मुंबई - साप्ताहिक विवेकंच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या श्री शंभू महादेव या ग्रंथाचे प्रकाशन १० फेब्रुवारीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षात करण्यात आले. या वेळी ऊर्जा मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, साप्ताहिक विवेकचे संपादक श्री. दिलीप करंबेळकर, राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचे प्रमुख श्री. प्रभाकर देशमुख, तसेच साप्ताहिक विवेकचा संपूर्ण चमू उपस्थित होता.

बनावट जात प्रमाणपत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पद रहित !

खोटी प्रमाणपत्रे सादर करणारे कार्यकर्ते असणारी राष्ट्रवादी काँग्रेस !
     नवी मुंबई, १० फेब्रुवारी - महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता यादव यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचे उघड झाले आहे. यामुळे निवडणूक विभागाने त्यांचे पद रहित केले आहे.

विक्रम पावसकर यांची भाजप सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड

     कराड, १० फेब्रुवारी (वार्ता) - श्री. विक्रम पावसकर भाजप सातारा जिल्हा अध्यक्ष झाल्याविषयी शनिवारी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. मदन सावंत यांच्या हस्ते त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. विक्रम पावसकर हे प्रखर हिंदुत्ववादी असून ते हिंदु एकताचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत.
       हिंदुत्वावर होणार्‍या आघातांच्या विरोधात ते नेहमीच कार्यरत असतात आणि हिंदूंना तत्परतेने मदत करतात. उंब्रज गोहत्या प्रकरणात त्यांनी प्रामुख्याने गोरक्ष दलाला मदत पुरवली. तसेच त्यांच्या मदतीसाठी ते स्वत: धावून गेले. कराड येथे भव्य हिंदु मेळावा घेऊन शहराच्या आजुबाजूंच्या हिंदूंची जागृती केली. त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

पुणे येथील कलाक्षेत्रम् दुकानात हळदीकुंकू समारंभ

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम 
महिलांना वाण देतांना समितीच्या कार्यकर्त्या
    पुणे, ९ फेब्रुवारी (वार्ता.) - कलाक्षेत्रम् या साड्यांच्या सुप्रसिद्ध दुकानात नुकताच कलाक्षेत्रम् आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ पार पडला. हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांना वाण म्हणून सनातननिर्मित लघुग्रंथ देण्यात आले. दुकानात खरेदीसाठी येणार्‍या महिलांना हळदीकुंकू समारंभात सहभागी करून घेतले जात होते. या उपक्रमामध्ये कलाक्षेत्रम्चे मालक श्री. सागर पासकंठी यांचे सहकार्य लाभले. श्री. पासकंठी हे सनातन प्रभातचे विज्ञापनदाते असून त्यांचा धर्मकार्यात नेहमीच सहभाग असतो. या समारंभासाठी त्यांनी दुकानासमोर रांगोळी काढण्यापासून दुकानाच्या बाहेर हळदकुंकू समारंभाचा निमंत्रणाचा फलक लावण्यापर्यंतची सर्व सिद्धता केली होती.

तिलारी धरण कालव्याला पुन्हा दोन ठिकाणी भगदाड : मासातील ७ वी घटना

 • निकृष्ट कामामुळे भविष्यात मोठा धोका 
 • गोवा राज्याचे पाणी बंद करण्याची वेळ
      दोडामार्ग - तिलारी प्रकल्पाच्या संपूर्ण कालव्याची अवस्था दयनीय असून तिलारीला कालवाफुटीचे ग्रहण लागले आहे. काही दिवसांपूर्वी फुटलेले कालवे दुरुस्त केले, तोवर ४ फेब्रुवारीला पुन्हा दोन ठिकाणी डाव्या कालव्याला भगदाड पडले. कालव्याला सातत्याने पडणारी भगदाडे आणि प्रकल्पाकडून केली जाणारी तात्पुरती मलमपट्टी भविष्यातील मोठ्या धोक्याची चेतावणी देणारी आहे. या पार्श्‍वभूमीवर साटेली-भेडशी ते झरेबांबर काजूळवाडीदरम्यान भगदाडे पडलेल्या कालव्याने हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

गोवा शासनाने सुरक्षेची हमी दिल्यास भ्रष्टाचार संपवू !

सरकारी कर्मचारी संघटनेचे शासनाला उघड आव्हान
     पणजी - प्रशासनात भ्रष्टाचारात गुंतलेले थोडेच लोक आढळतात. त्यामुळे राज्यशासनाकडून सुरक्षेची हमी मिळाल्यास अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना उघडे पाडू, असे उघड आव्हान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.
    या निवेदनामध्ये संघटनेला भेडसावणार्‍या २२ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. संघटनेने म्हटले आहे की, जनतेला भ्रष्टाचारविरहित आणि प्रामाणिक सेवा देण्यास संघटना बांधील आहे; परंतु शासकीय कर्मचार्‍यांना त्यांचे न्याय, हक्क आणि इतर सुविधा विनाविलंब मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. वास्तविक संघटनेने ऑक्टोबर २०१५मध्ये आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते; मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आता या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्या आहेत.

कोहिनूर हिर्‍यावर आता पाकचाही दावा !

केवळ भारताची भूमीच नव्हे, तर त्याच्या अस्मितेशी निगडित वस्तूंवर 
दावा सांगणारे भारतद्वेष्टे पाक नागरिक !
     लाहोर - वर्ष १९५३ मध्ये झालेल्या राज्यारोहण समारंभात १०५ कॅरट वजनाचा कोहिनूर हिरा एलिझाबेथच्या मुकुटात विराजमान झाला होता. हा कोहिनूर हिरा भारतात आणण्याची गेले अनेक वर्षे मागणी होत आहे. या हिर्‍यावर आता पाकही त्याचा दावा सांगण्याचा प्रयत्न करू लागला आहे. या हिर्‍याला पाकमध्ये आणण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी महाराणी एलिझाबेथसह पाकिस्तानमधील ब्रिटीश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले आहे. पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांचे नातू दलिपसिंह यांच्याकडून बळजोरीने हा हिरा बळकावण्यात आला आहे. तो परत मिळावा. कारण कोहिनूर हा पंजाब प्रांताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. हा प्रांत पाकिस्तानचा असल्याने आता त्याची मालकी पाकिस्तानकडेच असायला हवी, अशी मागणी जाफरी यांनी आपल्या याचिकेत केली आहे. 
     ब्रिटनच्या राणीविरोधातील प्रकरणाची सुनावणी घेणे न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत निबंधकांनी त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता; परंतु न्यायमूर्ती खालीद महमूद खान यांनी याचिका प्रविष्ट करून घेण्याचे आदेश दिले.


फलक प्रसिद्धीकरता

लव्ह जिहाद अस्तित्वात नाही, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     मुसलमान तरुणांनी अन्य धर्मातील तरुणींशी विवाह केल्यास त्यांना ७ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा संदेश इंग्रजी आणि उर्दूमधून बडोदा (गुजरात) मध्ये व्हॉट्स अ‍ॅपद्वारे प्रसारित करण्यात येत आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Love Jihad karo aur 7 lakh rupayoka enam pao !, aisa sandesh Gujaratme Whatsapp dwara prasarit ho raha hai.
Hinduo, Love jihadke sankatse savdhan !

जागो ! : लव्ह जिहाद करो और ७ लाख रुपयों का इनाम पाओ !, ऐसा संदेश गुजरात में व्हॉट्स अ‍ॅपद्वारा प्रसारित हो रहा है ।
हिन्दुओ, लव जिहाद के संकट से सावधान !

शिर्डी येथील विमानतळासाठी श्री साईबाबा मंदिर संस्थानकडून निधी ?

      मुंबई, १० फेब्रुवारी - श्री साईबाबा यांचे शताब्दी वर्ष चालू होण्यापूर्वीच शिर्डी येथील विमानतळ कार्यान्वित करण्याचा राज्यशासनाचा विचार आहे. त्यासाठी काकडी (जिल्हा नगर) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास आस्थापनाच्या माध्यमातून (एम्एडीसी) करण्याचा निर्णय ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्यशासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या माध्यमातून आतापर्यंत देण्यात आलेल्या २२० कोटींच्या निधीमधून सुमारे २०० कोटी रुपयांचा व्यय आस्थापनाने केला आहे. (आतापर्यंत कोणती मशीद अथवा चर्च यांनी शासनाच्या कोणत्याही उपक्रमासाठी निधी दिल्याचे ऐकले आहे का ? विमानतळ उभारणे, हे शासनाचे काम असतांना त्यासाठी भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा का वापरायचा ? खरेतर हा पैसा मंदिर, भक्त आणि धर्मकार्य यांसाठीच व्यय व्हायला हवा ! - संपादक) उर्वरित २० कोटी रुपये सध्या चालू असलेल्या कामांवर व्यय होणार आहेत, तसेच इतर कामांसाठी १०० कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. विमानतळासाठी एकूण ३६४ कोटी रुपयांच्या सुधारित व्ययास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यताही या बैठकीत देण्यात आली. (हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा आणि मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी प्रयत्न करा ! - संपादक)

राज्यातील असुरक्षित मंदिरे !

 • मंदिरातील दानपेटी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, ते पोलीस प्रशासन स्पष्ट करेल का ?
 • राज्यात मंदिरांमधून होणार्‍या चोर्‍यांचे वाढते प्रमाण हे कायदा सुव्यवस्था संपल्याचे लक्षण आहे !
आव्हाणे बुद्रूक (जिल्हा नगर) येथील स्वयंभू 
निद्रिस्त श्री गणेश मंदिरातून भरदिवसा दानपेटीची चोरी
गावकर्‍यांनी गावात पाळला कडकडीत बंद
      शेवगाव (जिल्हा नगर), १० फेब्रुवारी - तालुक्यातील आव्हाणे बुद्रूक गावातील स्वयंभू निद्रिस्त श्री गणेश मंदिर गाभार्‍यातील दानपेटी ६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी चोरीस गेली. त्याच्या निषेधार्थ गावकर्‍यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी ग्रामसभा घेऊन गावात कडकडीत बंद पाळला.

सिंधुदुर्गात अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याप्रकरणी संशयित आरोपीला पोलीस कोठडी !

धर्मशिक्षणाअभावी नैतिक अधःपतन झालेला हिंदु समाज ! 
अशा बलात्कार्‍यांना फाशीच द्यायला हवे ! 
     कुडाळ - अल्पवयीन मुलीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवून मातृत्व लादल्या प्रकरणी संशयित आरोपी विशाल सत्यवान वराडकर (वय २८ वर्षे, रहाणार, सरंबळ) याला विशेष न्यायाधीश डी.डब्ल्यू. मोडक यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
     विशाल वराडकर याने एका अल्पवयीन मुलीच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर सदर अल्पवयीन मुलीने १२ जानेवारी २०१६ या दिवशी एका मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे विशाल याच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या बहिणीने १२ जानेवारी या दिवशी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु सदर आरोपी फरार असल्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता. ६ फेब्रुवारीला पोलिसांनी सापळा रचून विशाल याला दुपारी १ वाजता अटक केली. न्यायालयात उपस्थित केले असता त्याला न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

(म्हणे) गोव्यात दुहेरी नागरिकत्व प्रकरणी गुन्हा नोंद करणे चुकीचे !

ज्यांनी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे, त्या देशाभिमानशून्य नागरिकांनी 
पोर्तुगालमध्ये जाऊन रहावे, हाच या समस्येवर तोडगा आहे !
दुहेरी नागरिकत्वाचे काँग्रेसचे शांताराम नाईक यांच्याकडून समर्थन
     मडगाव - पोर्तुगाल येथे जन्मनोंदणी केल्याने दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्‍न उद्भवत आहे. यामुळे प्रतिष्ठित नागरिकांवर या जन्म नोंदणीप्रकरणी गुन्हेगार ठरवून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. हा प्रश्‍न केंद्रशासनाकडे भिजत पडलेला असल्याने या प्रकरणी कोणावरही गुन्हा नोंदवणे चुकीचे आहे, असे मत राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक यांनी व्यक्त केले आहे. (काँग्रेसवाल्यांच्या निष्ठा मुळातच इतर देशांशी वाहिल्यामुळे त्यांना या विषयी काहीच वाटत नाही ! अपत्याला विदेशी नागरिकत्व मिळावे, म्हणून जाणीवपूर्वक विदेशातच प्रसुतीसाठी रहाणार्‍यांच्या निष्ठा कधी भारताशी जोडल्या जातील का ? तांत्रिक कारणे काहीही असली, तरी अशा पोर्तुगीजधार्जिण्यांच्या राष्ट्रीय भावना भारतनिष्ठ कशा असतील ? - संपादक)

आफ्रिकेतील सियरा लियोन देशातील शेकडो थडग्यांमध्ये चोरी !

मानवतेला काळिमा फासणारे उदाहरण !
चोरांनी शवांचे कपडे आणि अलंकार लुटून नेले !
     सियरा लियोन - पश्‍चिम आफ्रिकेतील सियरा लियोनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये चोरांनी कुदळी आणि हातोडा यांच्या साहाय्याने शहरातील विविध कब्रस्तानांत चोर्‍या केल्या. थडगी खोदून शवांचे कपडे आणि अलंकार चोरण्याचा हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
    फ्रीटाऊन नगर परिषदेने ५ फेब्रुवारीला याविषयी अधिक माहिती देत म्हटले की, फ्रीटाऊनच्या सात पैकी तीन कब्रस्तानांमध्ये गेल्या दोन मासांत २५० थडगी खोदण्यात आली. यांपैकी एका कब्रस्तानात पुरलेल्या शवांपैकी ६० टक्के शव हे इबोला आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगावरील साहित्य त्याच्यासह पुरण्यात आले होते. इबोला नावाच्या संसर्गजन्य आजाराने गेल्या ३ वर्षांत पश्‍चिम आफ्रिकेतील काही देशांत सहस्रो लोकांचा बळी घेतला आहे. यातून सतर्क झालेल्या पोलिसांनी स्मशानभूमींची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे. २४ घंटे सशस्त्र पोलिसांना स्मशानभूमींच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहे.

मेक्सिको येथे पगडी घातलेल्या शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखले !

     मेक्सिको सिटी - भारतीय वंशाचे अभिनेते वारिस अहलूवालिया यांनी पगडी घालेली असल्याने त्यांना येथील विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. ते न्यूयॉर्क येथे जात होते. या संदर्भात विमान आस्थापनाने म्हटले आहे की, सुरक्षेच्या संदर्भातील नियमानुसार प्रत्येक प्रवाशाची चौकशी केली जाते. जर त्यामुळे कोणाला त्रास झाला असेल, तर आम्ही खेद व्यक्त करतो. परदेशात शिखांना त्यांच्या पगडीमुळे जिहादी समजले जात असल्याने त्यांना अशा प्रकारच्या त्रासांना आणि कधीकधी आक्रमणांनाही सामोरे जावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

धर्मद्वेषातून हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी !

शिवसैनिकांची निवेदनाद्वारे मागणी
     पाथर्डी (जिल्हा नगर), १० फेब्रुवारी (वार्ता.) - काही दिवसांपूर्वी पुण्यातील सावन राठोड या हिंदु युवकाची हिंदु असल्याच्या कारणावरून धर्मांध मुसलमानांनी निर्घृण हत्या केली होती. याशिवाय श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर (जिल्हा नगर) येथील रामेश्‍वर महाले याचीही धर्मांधांनी क्रूर हत्या केली होती. या प्रकरणांची सखोल चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशा आशयाचे निवेदन पाथर्डी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हेवरकर यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे सर्वश्री अशोक (पप्पूशेठ) बनसोड, अक्षय गर्जे, विशाल देखणे, सचिन गर्जे, दीपक पाचारणे, अविनाश बनसोड, युवा सेनेचे पवन डाळिंबकर, रोहित रणखांब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीकारक सावरकरांचे समाजसुधारक हे दुसरे रूप होय ! - सौ. अश्‍विनी मयेकर

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात भारतातील सामाजिक 
क्रांती आणि सावरकरांचे योगदान या चर्चासत्रात साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादिका 
सौ. अश्‍विनी मयेकर यांनी मांडलेले विचार
स्वातंत्र्यवीर सावरकर
१. सावरकरांचे विचार म्हणजे एक धगधगते अग्नीकुंड !
     हिंदु समाजात उत्सवांत झालेले जे परिवर्तन आहे, ते होण्यासाठी अनेक विचारवंतांनी योगदान दिले आहे. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर हे महत्त्वाचे नाव आहे. सावरकरांचे विचार मग ते राजकीय असो किंवा सामाजिक असो. हे विचार म्हणजे एक धगधगते अग्नीकुंंड आहे. हे विचार कधी एकमेकांस पूरक आहेत, तर कधी एकमेकांस समांतर जाणारे आहेत; पण त्याहूनही अधिक परखड त्यांचे द्रष्टेपण आहे.
२. हिंदु समाजाला राजकीय क्रांतीपेक्षा सामाजिक 
क्रांतीची आवश्यकता !
     काळाचा विचार करतांना आज वर्ष २०१६ मध्येही सावरकर आपल्यापेक्षाही किती योजने पुढे आहेत, याची जाणीव त्यांचे साहित्य चरित्र वाचतांना होते. अनेक तरुण देशभक्तांच्या मनात मातृभूच्या पायातील दास्यत्वाच्या शृंखला तोडण्यासाठी क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवणारे क्रांतीवीर वि.दा. सावरकर होते. सावरकरांचे एक रूप अंदमानात जाण्याअगोदर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवण्यात आले, ते होते. तेथे सामाजिक सुधारणांचे हाती घेतलेले कार्य हे त्यांचेच दुसरे रूप होते. हे रूप त्यांच्यातील कृतीशील विचारवंताचे होते. राजकीय क्रांतीपेक्षा हिंदु समाजाला सामाजिक क्रांतीची आवश्यकता आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि सुधारणा समांतर गतीने झाल्या, तर मिळालेले स्वातंत्र्य राखता येईल, अशी त्यांची निश्‍चिती होती आणि म्हणूनच स्वातंत्र्याची पहाट होेण्याची वाट न पहाता त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कामाला प्रारंभ केला.

हेडली आणि हिंदु आतंकवाद

श्री. भाऊ तोरसेकर
       शिकागो येथील कारागृहात खितपत पडलेला डेव्हीड कोलमन हेडली याच्या साक्षीने भारतीय माध्यमे कमालीची फ़ुशारली आहेत. त्याच्या साक्षीतून पाकिस्तानचा मुंबई आक्रमणात असलेला हात अगदी स्पष्ट होत असल्याने आता पाकिस्तानला जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही, अशीच काहीशी समजूत भारतीय पत्रकार वा शहाण्यांनी करून घेतल्याचा तो परिणाम आहे; पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. कारण हे आपलेच पाप आहे, हे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पाक सेनेला पक्के ठाऊक आहे. तथापि सराईत गुन्हेगाराने पोलिसांनाच पुरावे दाखवा म्हणावे, तशा निलाजरेपणाने पाकिस्तान वागत आहे. म्हणूनच हेडलीच्या साक्षीने उत्साहित वा उन्मादित होण्याला अर्थ नाही; कारण आता पाकिस्तानला अपकीर्त करण्यापेक्षा त्या साक्षीला फारसा अर्थ नाही.

पुरोगाम्यांची बेताल बडबड आणि सूत्रसंचालकांचा त्रयस्थपणा !

       पूर्ण भारतातून शनिशिंगणापूर येथे भक्त येत असल्याने ते खाजगी असू शकत नाही आणि त्यामुळे तेथे घटनेच्या कलम २५-अ नुसार स्त्री-पुरुष असा भेदाभेद न मानता सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश द्यावा, असे अज्ञानमूलक विधान भूमाता बिग्रेडच्या प्रियांका जगताप यांनी एका चर्चासत्रात केले. चर्चेच्या सूत्रसंचालकानेही हे सूत्र अयोग्य असल्याचे सांगितले नाही; उलट जगताप यांचे अज्ञान उघड पडत असल्याचे पाहून धर्मद्रोह्यांची बाजू मांडण्याचे कंत्राट स्वत:कडेच घेण्याचा उपद्व्याप केला. सूत्रसंचालकाने त्रयस्थपणे दोन्ही बाजू समजून घ्याव्यात, कोणाचीही बाजू उचलून स्वत:चा पक्षपातीपणा निदान कार्यक्रमात तरी उघड करू नये, याचाही या संपादक महाशयांना विसर पडलेला दिसला. नावाजलेल्या वृत्तवाहिनीच्या संपादकांचीच जर ही अवस्था असेल, तर यांचे पत्रकार किती निष्पक्ष पत्रकारिता करत असतील याचा विचारच न केलेला बरा !

स्वतःचे दायित्व सांभाळून पर्यटनाचा आनंद घ्यावा !

     मुरुड येथील एकदरा समुद्रकिनार्‍यावर सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांचा १ फेब्रुवारीला समुद्रात बुडून अपघाती मृत्यू झाला. तसेच मागील १० वर्षांत लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेल्या १४५ पर्यटकांचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला, अशीही नोंद आहे. मुरुड येथील अपघातास कुणी शासनाला, कुणी महाविद्यालयाला, तर कुणी विद्यार्थ्यांना दोष दिला. त्यामुळे शासनाला जाग कधी येणार म्हणून आक्रोश करण्यात आला. प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या अपघाताचे उत्तरदायित्व एकट्या शासनाचेच नसून, प्रत्येक पर्यटकाचेही तेवढेच आहे, हेही जाणणे महत्त्वाचे आहे.

पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात सराफ व्यापार्‍यांचा बंद !

      कोल्हापूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) - केंद्र शासनाने २ लक्ष रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती आणि अन्य काही जाचक नियम लागू केले आहेत. त्याविरोधात देशभरात हा बंद करण्यात आला होता. कोल्हापूर शहरातील सराफ व्यापार्‍यांनी १० फेब्रुवारीला बंद पाळला. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या नेतृत्वाखाली सहभागी सदस्य यांनी केंद्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील ५ सहस्रांहून अधिक सराफ व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. या बंदमुळे जवळजवळ १० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. या वेळी रहित करा, रहित करा, पॅनकार्ड सक्ती रहित करा, ग्राहकाकडे पॅनकार्ड नसणे, ही आमची चूक कशी ? पॅनकार्डची मर्यादा १० लक्ष रुपयांपर्यंत वाढवा, असे आशयाचे फलक सदस्यांनी हाती घेतले होते. या आंदोलनात सराफ संघाचे उपाध्यक्ष सर्वश्री राजेश राणे, कुलदीप गायकवाडे आदी सदस्य उपस्थित होते.

पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवण्याच्या हेक्यामुळे सुशिक्षित ब्राह्मण स्त्रीचे झालेले अधःपतन !

१. सुशिक्षित म्हणवणार्‍या ब्राह्मण स्त्रीला आधुनिकतावादाने भलतेच पछाडलेले असणे
     सुशिक्षित ब्राह्मण स्त्रीला आधुनिक विचारसरणीने (मॉडर्निझमने) भलतेच पछाडलेले दिसते. शुद्ध इंग्रजीत दोन वाक्येही बोलता किंवा लिहिता न आली तरी पप्पा, मम्मी, डॅडी, अंकल, आंटी अशा शब्दांचा वापर करून, सॉरी म्हणून, पायघोळ झगे किंवा गाऊन घालून मॉडर्न होता येते ? मॉडर्न होणे, ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यालासुद्धा तपश्‍चर्या लागते; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ पहाणार्‍यांना सांगणार कोण ? दुर्दैवाने सुशिक्षित ब्राह्मण स्त्रीने भारतीय संस्कृतीतील जे जे त्यागायला नको, ते ते त्यागले आहे आणि पाश्‍चात्त्यांचे जे जे घ्यायला नको, ते ते स्वीकारले आहे. त्यांचे आरोग्य, निर्जंतुकपणा, स्वच्छता, पाकशास्त्र, पुरोगामित्व यांविषयीच्या कल्पनांवर पुष्कळ सोदाहरण लिहिता येण्यासारखे आहे; परंतु सुशिक्षित म्हणवणार्‍या ब्राह्मण स्त्री संबंधाने पुढील पाच प्रातिनिधीक श्‍लोक देतो.

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातील कुटुंबव्यवस्थेवर आलेली अवकळा !

१. आजच्या स्त्रीची स्थिती धड पाश्‍चात्य नाही आणि धड भारतीयही नाही, अशी झालेली असणे
     हल्लीच्या शिक्षणामुळे सुशिक्षित स्त्रियांमध्ये प्रगल्भता येण्याऐवजी अतिशय आत्मकेंद्रित असलेली अहंमान्यता येत आहे. शालीनता हा स्त्रीचा सर्वांत मोठा अलंकार आहे; परंतु बहुसंख्य सुशिक्षित स्त्रियांनी या अलंकाराचा त्याग केलेला दिसतो. या अलंकाराने त्यांच्या आधुनिक विचारसरणीला गौणत्व येईल, असा त्यांचा समज असल्यास न कळे. पाश्‍चात्यांच्या अंधानुकरणामुळे आजची स्त्री ही धड पाश्‍चात्त्य होऊ शकत नाही आणि भारतीयही राहू शकत नाही. धोबी का कुत्ता न घरका न घाटका, अशी तिची अवस्था झालेली आहे. स्त्रीने पाश्‍चात्य संस्कृतीतील नको ते उचलले आहे आणि भारतीय संस्कृतीतील जे सोडायला नको, ते सोडले आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

भिवंडी येथे आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनाचे विषय
 • आय्.एस्.आय.एस्.शी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार्‍या तरुणांवर तात्काळ कठोर कारवाई करावी !
 • व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालय स्तरावर मातृ-पितृदिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे !
 • अमरनाथ यात्रेचा कालावधी किमान ५९ दिवसांचा करण्यात यावा !
 • १२ फेब्रुवारी या दिवशी भोजशाळेत (मध्यप्रदेश) पूर्णवेळ सरस्वतीपूजनासाठी अनुमती देण्यात यावी !
स्थळ : सह्याद्री नागरिक बँकेसमोर, कल्याण मार्ग, पाईपलाइन नाका, टेमघर, भिवंडी.
वेळ : सकाळी १० ते दुपारी १
भ्रमणभाष क्रमांक : ९८६७१९०५४३
हिंदूंनो, मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा !

स्वयंपाकघरातील सर्व साधकांच्या साधनेचे दायित्व घेणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. रेखा काणकोणकर आणि प्रेमभाव अन् शिस्त यांचा सुरेख संगम असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर !

१. कु. रेखा काणकोणकर
कु. रेखा काणकोणकर
१ अ. नेतृत्वगुण : रेखाताईमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता अफाट आहे. प्रतिदिन सुमारे ३०० जणांचा महाप्रसाद बनवणे, त्यात एकही दिवस खंड नसणे आणि प्रतिदिन अगदी तेवढ्याच प्रतीचा (quality) स्वयंपाक करणे आणि तो वेळेत होणे, हे त्यांच्यातील नेतृत्वगुणानेच शक्य आहे.
१ आ. अष्टावधानी : कोणत्या साधकाला साहाय्य लागणार आहे ? कुणाची सेवा पूर्ण होत आली आहे ? कुणाला नामजपाला पाठवायचे ? कुणाला भाजी चिरणे, भांडी घासणे, भांडी लावणे, केर काढणे अशा सेवा सांगायच्या ?, यांकडे त्यांचे पूर्ण लक्ष असते. स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या एकाही साधकाचा एक क्षणही वाया जाऊ नये, यासाठी त्या दक्ष असतात.

प्रेमभाव, इतरांचा विचार आणि साधनेची तळमळ असलेले पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेश अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

      मी (वर्ष २००७ ते २०११) शिक्षणासाठी ४ वर्षे पुण्यात रहायला होते. तेव्हा देवाने पुण्यातल्या सर्व साधकांच्या माध्यमातून मला पुष्कळ प्रेम दिले. सनातनचा साधक या नात्याने देवाने सर्व साधकांना जोडले आहे, या नात्यातच शुद्ध प्रेम आहे, हे अनुभवायला दिले. प्रेमभाव, इतरांचा विचार आणि साधनेची तळमळ हे गुण श्री. महेश आणि सौ. मनीषा पाठक या दोघांमध्येही आहेत. मला ते जेव्हा जेव्हा भेटायचेे, तेव्हा कितीही व्यस्त असले, तरी २ शब्द तरी बोलणार आणि विचारपूस करणार. त्यांची पुष्कळ साधकांशी जवळीक आहे.
     ते ज्या भागात रहायचे, तिकडे जवळ धर्मजागृती सभा आणि कार्यशाळा (शिबीर) असले की, निवासव्यवस्था किंवा इतर सिद्धता यांसाठी काही साहित्य लागत असले, तर लगेच ते आमच्याकडून घेऊया, असे म्हणून सांगायचे. साधकांना काहीही साहाय्य लागले, तरी ते करण्याची त्यांची सिद्धता असायची. त्या कालावधीत श्री. महेश आणि सौ. मनीषा पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. मॅथ्यू फोफी, अमेरिका
      गेले १ - २ मास माझी प्राणशक्ती अल्प झाली होती. यज्ञाला आरंभ झाल्यापासून मला शक्ती मिळत आहे.
२. सौ. रिशिता गडोया, कॅनडा
     दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. रामभाऊस्वामी यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांतून सर्वांप्रती प्रीती प्रक्षेपित होत आहे, असे वाटले. त्यांच्यातील प्रीती इकडे कॅनडातील साधकांपर्यंतही पोचत आहे, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्याकडे पहातच रहावेसे वाटत होते.
३. सौ. ज्योती सोर्ते, ओहायओ
३ अ. यज्ञ चालू होण्याच्या आधीपासून देवघरातील गणपतीच्या चित्राकडे मी आकर्षित होणे : १०.१.२०१६ पासून आमच्या देवघरातील गणपतीच्या चित्राकडे मी आकर्षित होत असल्याचे मला जाणवत होते. माझ्याकडून नकळतपणे गणपतीच्या चित्राकडे पाहिले जात असे आणि मला आतून पुष्कळ शांत वाटत असे. मला तो बालकाच्या रूपात असून अगदी निरागस आणि शांत वाटत होता. माझ्याच बाबतीत असे का होत आहे, याचे मला आश्‍चर्य वाटत होते. या कालावधीत माझ्या यजमानांनीही गणपतीशी संबंधित भक्तीगीते लावली होती.
३ आ. देवघरातील गणपतीच्या चित्राकडे पाहिल्यावर त्या ठिकाणी प.पू. रामभाऊस्वामी दिसणे : यज्ञ चालू असतांना त्या कालावधीत मी ज्या ज्या वेळी देवघरातील गणपतीच्या चित्राकडे पहात असे, त्या त्या वेळी त्याच्या ठिकाणी प.पू. रामभाऊस्वामी दिसत असत आणि ज्या वेळी दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. रामभाऊस्वामी यांचे छायाचित्र पहात असे, तेव्हा त्यांच्या ठिकाणी मला गणपति दिसत असे. असे बर्‍याच वेळा झाले.
३ इ. शिकायला मिळालेली सूत्रे : या अनुभूतींवरून मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
१. यज्ञाच्या कालावधीत गणेशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे कोणतेही बंधन न येता साधकांना चैतन्याची अनुभूती येत आहे. (अमेरिका आणि भारत येथील वेळा भिन्न असूनही मी गणपतीचे अस्तित्व अनुभवत होते.)
२. गणपति आणि प.पू. रामभाऊस्वामी यांच्यात मला अद्वैत असल्याचे जाणवले.
३. संतांमध्ये किती प्रीती असते, हे मला अनुभवायला मिळाले. यज्ञ भारतात होत असूनही विदेशातील साधकांना त्याचा आध्यात्मिक लाभ होत होता. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
४. श्रीकृष्ण आणि संत यांंच्या कृपेमुळेच हे होऊ शकते. श्रीकृष्ण आणि संत विदेशातील साधकांसाठीही किती करत आहेत, याची जाणीव झाली. श्रीकृष्ण जगातील सर्वच लोकांना संतांचे आशीर्वाद अगदी व्यापक स्वरूपात देत आहे. याच्यापुढे कृतज्ञता हा शब्दही थिटा आहे.
     प.पू. गुरुदेव, मी अतिशय अज्ञानी आहे, मला अध्यात्माविषयीची काहीच समज नाही; परंतु तुमच्या आणि प.पू. रामभाऊस्वामी यांच्या कृपेने हा यज्ञ म्हणजे सर्व साधकांच्या साधनेला कलाटणी देणारा असेल, याची मला जाणीव झाली. वरील अनुभूतींसाठी मी कृतज्ञ आहे.
श्री. देयान ग्लेश्‍चिच, युरोप यांना आलेल्या अनुभूती
श्री. देयान ग्लेश्‍चिच
१. वाईट शक्तीला यज्ञातील शक्ती सहन न होणे आणि मनात अनेक नकारात्मक विचार येणे : मी यज्ञस्थळी बसलो असतांना आरंभी मला पुष्कळ उष्णता जाणवली. यज्ञवेदीपासून मी १० मीटर अंतरावर आणि साधकांच्या दोन रांगांच्या नंतर बसलो असतांनाही माझ्या सूक्ष्मदेहाला इतकी उष्णता जाणवत होती की, जणू काही मी यज्ञाजवळच बसलो आहे. यज्ञातील उष्णता पहाण्यासाठी माझा हात ज्वाळांच्या दिशेला धरला, तेव्हा माझ्या हाताला फारशी उष्णता जाणवली नाही; परंतु सूक्ष्मातून मात्र माझ्या देहात आणि देहाभोवती पुष्कळ उष्णता जाणवत होती. मला त्रास देणारी मोठी वाईट शक्ती पुष्कळ चिडली होती आणि ती माझ्या मनात मी (उष्णतारूपी शक्ती) आता सहन करू शकत नाही आणि यज्ञापासून दूर जावे, असे विचार घालत होती. मनात येत असलेल्या अनेक नकारात्मक विचारांमुळे मला नामस्मरण करणे कठीण होत होते. सुमारे दीड घंट्यानंतर माझ्या मनाची नकारात्मक स्थिती न्यून झाली आणि माझी भावजागृती होऊन अंतर्मनातून नामस्मरण आपोआप चालू झाले. (काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे जाणवते. - संकलक)
२. श्रीरामाप्रती पुष्कळ भाव जागृत होऊन ईश्‍वरी राज्यात असल्याप्रमाणे वाटणे : यज्ञ चालू असतांना एका क्षणी माझा श्रीरामाप्रती पुष्कळ भाव जागृत झाला. त्या वेळी यज्ञामुळे ईश्‍वरी राज्याची स्थापना होणार आहे, नव्हे ती अगोदरच झाली आहे, असे वाटले. यज्ञवेदीच्या भोवती बसलेले सर्व साधक आणि प.पू. रामभाऊस्वामी यांच्या समवेत आलेले त्यांचे शिष्य आणि साधक, तसेच पौरोहित्य करणारे पुरोहित यांच्याशी मी पूर्णपणे एकरूप झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी मला आम्ही सर्वजण आणि यज्ञ एकच आहोत, यज्ञ सोहळ्याचाच एक भाग आहोत, असे वाटले.
     त्यानंतर मी डोळे मिटून नमस्काराची मुद्रा केली. त्या वेळी मी भावावस्थेत गेलो आणि माझे मनही निर्विचार अवस्थेत होते. माझे ईश्‍वराशी इतके अनुसंधान साधले गेले की, मी ईश्‍वराच्या भक्तीत पूर्ण हरवून गेलो. मला सभोवतालच्या गोष्टींची काहीच जाणीव नव्हती. माझे शरीरही स्थिर होते आणि मला आतून आनंद जाणवत होता. मला याच स्थितीत रहावेसे वाटत होते. किती वेळ निघून गेला, हे मला कळलेच नाही. सहसाधकाने मला हलवून दुसर्‍या साधकांना यज्ञाजवळ बसायचे आहे, असे सांगितले, तेव्हा मी त्या स्थितीतून बाहेर आलो.
३. यज्ञाच्या ठिकाणी तीन घंटे बसूनही केवळ २० मिनिटेच बसल्याप्रमाणे वाटणे आणि कालगणनेचे हे वेगळे मोजमाप प्रथमच अनुभवायला मिळणे : मी भानावर आलो, तेव्हा मला मी तेथे केवळ २० मिनिटेच बसलो होतो, असे वाटले. आश्रमात येऊन घड्याळ पाहिले, तर चार वाजून वीस मिनिटे झाली होती. मी तीन घंटे यज्ञाच्या ठिकाणी बसलो असतांनाही मला केवळ २० मिनिटांचाच कालावधी गेल्याप्रमाणे वाटले. असे कसे होऊ शकते, हेच मला कळत नव्हते. त्याचप्रमाणे मी २० मिनिटांपूर्वीच जेवलो आहे, असे वाटून मला भूकही लागली नाही. कालगणनेचे हे वेगळे मोजमाप मला यापूर्वी कधीच अनुभवायला मिळाले नव्हते. त्या वेळी मला एका गोष्टीची आठवण झाली. रेवती ब्रह्माला थोड्या वेळासाठी भेटायला जाऊन परत आली; परंतु तेव्हा प्रत्यक्षात चार युगे उलटून गेली होती. या यज्ञाच्या अनुभूतीतून मला या गोष्टीतील अल्पसा भाग अनुभवता आला.
४. यज्ञाच्या वेळी सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये
४ अ. यज्ञातील ज्वाळांवर अग्नीदेवता उभी असलेली दिसणे : ईश्‍वराकडून यज्ञाकडे शक्ती प्रवाहित होत असून यज्ञातील शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे दिसले. यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीच्या स्रोताच्या वर एक देवता उभी असलेली दिसली, ती अग्नी देवता असावी, असे वाटले.
४ आ. एका दृश्यात मला गणपति माझ्याकडे तोंड करून नृत्य करत असल्याचे दिसले.
४ इ. गणपतीचे विशाल रूप दिसून तो पुष्कळ आनंदी असल्याचे जाणवणे : दुसर्‍या एका दृश्यात गणपतीचे विशाल रूप दिसून तो यज्ञासमोर प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडे तोंड करून बसलेला दिसला. बसलेल्या स्थितीतच त्याची उंची जवळजवळ ७ मीटर होती. उजवा हात वर करून तो आशीर्वाद देत होता. त्याच्या तोंडवळ्यावर स्मित असून तो पुष्कळ आनंदी होता. त्याची त्वचा फिकट राखाडी रंगाची आणि गुळगळीत होती. गणपतीला पाहून माझा भाव जागृत झाला आणि मी ध्यानावस्थेत अन् आनंदावस्थेत गेलो.
- श्री. देयान ग्लेश्‍चिच, युरोप (१६.१.२०१६)

आज श्री गणेश जयंती त्यानिमित्ताने...

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या प्रारंभी प्रार्थना करतांना डावीकडून
पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. डॉ. मुकुल गाडगीळ,
श्री. विनायक शानबाग, प.पू. रामभाऊस्वामी आणि श्री. गणेश गोस्वामी
     रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ ते १७ जानेवारी या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ संपन्न झाला. यज्ञाचे यजमानपद सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भूषविले. या यज्ञाच्या कालावधीत आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

बर्‍याच वेळा प्रयत्न करूनही प.पू. रामभाऊस्वामींच्या बोटांना लावलेल्या पल्स ऑक्सिमीटरमध्ये डिस्प्ले येऊनसुद्धा रीडींग न येणे आणि नंतर प.पू. स्वामींना प्रार्थना केल्यानंतर ते येणे

प.पू. रामभाऊस्वामी
     १८.१.२०१६ या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास मी प.पू. रामभाऊस्वामी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर हे यंत्र त्यांच्या हाताच्या एका बोटाला लावले. ते चालू केले. ते चालू होऊन डिस्प्ले आला; परंतु त्यात काही रीडिंग येईना. मी दोनदा प्रयत्न केला. प.पू. स्वामीजींच्या दुसर्‍या बाजूला आधुनिक वैद्य मराठे होते. ते म्हणाले, काही वेळापूर्वी मी ते नीट चालते का ?, हे पाहिले. तेव्हा ते व्यवस्थित चालू होते. मी त्यांच्याकडे यंत्र दिले. त्यांनी प.पू. स्वामींच्या दुसर्‍या हाताच्या बोटांना ते दोनदा लावून पाहिले, तरी यंत्र चालू होऊन डिस्प्ले येऊनसुद्धा रीडिंग काही आले नाही. नंतर तेथेच त्यांनी स्वतःच्या बोटाला लावून परीक्षण केले. तेव्हा रीडींग आले. त्यांनी परत प.पू. रामभाऊस्वामींच्या बोटाला यंत्र लावून पाहिले, तरी परत पूर्वीसारखेच होऊन रीडिंग आले नाही. मी मनातल्या मनात प्रार्थना केली, स्वामीजी, आमचे काही चुकत असेल, तर क्षमा करा. तुमच्या बोटाचे रीडिंग घेण्यास अनुमती मिळावी, यासाठी विनंतीरूप ही प्रार्थना आहे. आपणच काय ते करा. त्यानंतर ते यंत्र माझ्याकडे घेेऊन त्यांच्या माझ्या बाजूच्या हाताच्या बोटाला लावले. या खेपेला डिस्प्लेही आला आणि त्यापाठोपाठ आकडेही सर्वसाधारणपणे येतात, तसे दिसू लागले. नंतर प.पू. स्वामींजींना मी हे सर्व सांगून असे कसे झाले ?, असा प्रश्‍न विचारला. ते म्हणाले, तुम्ही मला तपासतांना मी प्रार्थना करत होतो की, डॉक्टर प्रार्थना करील, त्याप्रमाणे होऊ देत ! त्याचे काय असते की, निगेटिव्ह आणि पॉझिटीव्ह दोन्ही शक्ती असतात. प्रार्थनेने ते नीट झाले ! - आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०१६)

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी आहुती देत असतांना ५ - १० मिनिटे सलग धूर सहन करू शकणे आणि धूर सहन करण्यासाठी शिवस्वरोदयशास्त्रानुसार देवानेच चंद्रस्वर (डावी, म्हणजे शीतल नाडी) चालू ठेवणे

    
पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१५ ते १७ जानेवारी २०१६ या तीन दिवशी रामनाथी आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ झाला. मी आणि माझी पत्नी पू. (सौ.) अंजली हे या यज्ञाचे यजमान दांपत्य होतो. त्यामुळे बहुतांश वेळा यज्ञात द्यायची आहुती मी यज्ञाचे आचार्य प.पू. रामभाऊस्वामी यांच्या हातात देत होतो आणि ते ती आहुती यज्ञात देत होते. त्यामुळे मला यज्ञकुंडाजवळ उभे रहावे लागत होते आणि धुराला सामोरे जावे लागत होते. मधे मधे बर्‍याच प्रमाणात धूर निघत असल्याने आहुतीत खंड पडायला नको म्हणून मी तो धूर सहन करण्यासाठी प्रार्थना करायचो. तेव्हा लक्षात आले की, धूर आला, तरी तोंड उघडायचे नाही. नाकानेच श्‍वास घ्यायचा. म्हणजे धुराचा त्रास होत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात आली की, धूर येत असतांना माझा चंद्रस्वर कार्यरत असायचा. म्हणजे माझा श्‍वास डाव्या नाकपुडीने चालू असायचा. त्यामुळेही मी तो धूर सहन करू शकत होतो. याचे वैशिष्ट्य शिवस्वरोदयशास्त्रात (स्वराच्या, म्हणजे श्‍वासाच्या नियंत्रणाविषयीच्या शास्त्रात) याप्रमाणे दिले आहे. चंद्रस्वर हा शीतल आहे आणि तो हवेतील कर्बयुक्त वायूसाठी पूरक आहे. त्याचा शीतल गुण कर्बयुक्त वायूत मिसळतो. याउलट सूर्यस्वर (उजव्या नाकपुडीने घेतलेला श्‍वास) हा उष्ण आहे आणि त्याचा तो गुण प्राणवायूला मिळतो. धूर हा कर्बयुक्त असल्याने तो नाकावाटे आत घेऊ शकण्यासाठी, म्हणजे सहन करण्यासाठी आपला चंद्रस्वर पूरक आहे. त्यामुळेच मी यज्ञकुंडाजवळ असतांना देवानेच माझा चंद्रस्वर चालू ठेवला आणि माझी काळजी घेतली; म्हणून मी धुरामध्ये ५ - १० मिनिटे सलग उभा राहू शकत होतो.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील ?, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तर मानसिक शांतीचा लाभ होईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अपयशावर शिक्कामोर्तब !

संपादकीय
     पाकने जीवघेणी आक्रमणे करायची आणि भारताने जिवाचे रान करून पुरावे गोळा करायचे, हा आत्मघातकी सहिष्णुतेचा खेळ थांबायचे नाव घेत नाही. मग ते मुंबईवरील २६/११चे आक्रमण असो, वा पठाणकोटवरील आक्रमण असो. यास अनेक घटक कारणीभूत असले, तरी मूळात गुप्तचर यंत्रणा हाताशी असतांना अशी आक्रमणे होतातच कशी ? हा खरा भेडसावणारा प्रश्‍न आहे. किंबहुना आतंकवादी आक्रमणे होणे, हे गुप्तचर यंत्रणांचे ठळक अपयशच मानले जाते. डेव्हिड हेडली याने नुकत्याच केेलेल्या खुलाशावरून यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले इतकेच.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn