Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


वीर उमाजी नाईक
यांचा आज बलीदानदिन (तिथीनुसार)

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरही लक्ष्य होते ! - डेव्हीड हेडलीने दुसर्‍या दिवशी दिलेली माहिती

हिंदूंनो, मुंबईत अन्य धर्मियांचीही प्रसिद्ध प्रार्थनास्थळे आहेत; मात्र
त्यांच्याऐवजी केवळ हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
म्हणजेच आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच पुन्हा एकदा स्पष्ट होते !
     मुंबई - मुंबईवरील २६/११ च्या आक्रणातील सूत्रधारांपैकी एक डेव्हीड हेडली याची सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेतील कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे साक्ष नोंदवली गेली. विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम विशेष न्यायाधीश जी.ए. सानप यांच्यासमोर ही साक्ष नोंदवत आहेत. या साक्षीत हेडलीने आय.एस्.आय.ने लष्कर-ए-तोयबाच्या साहाय्याने हे आक्रमण केल्याचे सांगितले, तसेच आय.एस्.आय.साठी हेरगिरी करतील, अशी माणसे भारतीय सैन्यात भरती करण्याचे दायित्व त्याच्यावर सोपवण्यात आल्याचेही या वेळी त्याने उघड केले. (गेल्या काही दिवसांपासून सैन्यातील लोकांना पाकसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. याचाच अर्थ पाकिस्तान त्यांच्या षड्यंत्रात यशस्वी होत आहे. - संपादक) आक्रमणाच्या वेळी नौदल, वायूदल आणि पोलीस मुख्यालय यांसोबतच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही लक्ष्य होते, असे हेडलीने सांगितले. अधिवक्ता निकम यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर हेडलीने उत्तरे दिली.

भोजशाळेत वसंतपंचमीच्या दिवशी हिंदूंना पूर्ण दिवस पूजेची अनुमती नाहीच !

     धार (मध्यप्रदेश) - वसंतपंचमीच्या दिवशी भोजशाळेत हिंदूंना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी हिंदूंच्या संघटनांनी केलेली मागणी मध्यप्रदेश शासनाने फेटाळून लावली आहे. (काँग्रेसच्या सत्ताकाळातही हिंदूंना शुक्रवारी येणार्‍या वसंत पंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस पूजा करण्यास अनुमती नव्हती. आताच्या शासनाकडूनही तसेच होत असेल, तर हिंदूंना आधार कुणाचा ? - संपादक) शासनाच्या या आदेशामुळे भोज उत्सव समिती आणि हिंदु जागरण मंच यांनी १२ फेब्रुवारीच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेची घोषणा केली आहे.

उत्तरप्रदेशातील महंत बाबा यति नरसिंहानंद सरस्वती गोळीबारातून वाचले !

     गाझियाबाद - भारतीय संत समाजाचे समन्वयक आणि येथील डासनादेवी मंदिराचे महंत बाबा यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर ९ फेब्रुवारीला पहाटे गोळीबार करण्यात आला. यात ते वाचले. (उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा ! गोळीबार करण्यासाठी सर्वसामान्यांना बंदूक उपलब्ध होते, हे लक्षात घ्या ! - संपादक) त्यांच्याकडे गेल्या ५-६ मासांपासून सेवेला असणार्‍या २५ वर्षांच्या हिमांशू नावाच्या सेवेकर्‍याने महंत नरसिंहानंद झोपलेले असतांना एक गोळी झाडली. सुदैवाने ती त्यांना लागली नाही. अन्य सेवेकर्‍यांनी हिमांशू याला पोलिसांच्या कह्यात दिले. ८ फेब्रुवारीला महंतांनी हिमांशू याला एका प्रकारणाविषयी फटकारले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य केले.

महान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे !

श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी 
यांची सनातनच्या देवद आश्रमास भेट
श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी
यांचे आशीर्वाद घेतांना श्री. नंदू मुळ्ये
(म्हणे) किरीट सोमय्या यांनी पराचा कावळा केला !

अटकेचा फास आवळला जात असतांना राष्ट्रवादी 
काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा थयथयाट
     मुंबई - देहलीतील महाराष्ट्र सदन किंवा मुंबईतील कलिना येथील भूखंडप्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पराचा कावळा केला आहे. आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला पूर्ण सहकार्य करत आहोत; मात्र तरीही आम्ही सहकार्य करत नसल्याचा दावा करून अटकेचा फार्स का केला जात आहे, असा प्रश्‍न राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. (साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासारख्या निरपराध्यांना कोणताही पुरावा नसतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात टाकतांना, त्यांचा छळ करतांना छगन भुजबळ यांनी सत्तेत असतांना कधी विरोध केला होता का ? - संपादक) मुंबईतील राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळ कुटुंबियांवरील सर्व आरोप फेटाळून लावले. भुजबळ पुढे म्हणाले की, या प्रकरणांत जे निर्णय घेतले, ते एकट्या भुजबळांचे नव्हते, त्याला मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्री यांची अनुमती होती.

इसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही ! - संयुक्त अरब अमिराती

इसिसचा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही, असे 
सांगणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     अबुधाबी (संयुक्त अरब अमिराती) - इसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही, अशी चेतावणी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ. अन्वर महंमद गर्गश यांनी दिली आहे. (हिंदूंना असहिष्णु ठरवणारे सर्वधर्मसमभाववाले आता गप्प का ? - संपादक) संयुक्त अरब अमिरातीने आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या १२ भारतियांना अटक केली आहे. या सर्वांना भारताकडे प्रत्यार्पित करत त्यांनी वरील चेतावणी दिली आहे.
डॉ. अन्वर महंमद गर्गश पुढे म्हणाले,
१. आपल्या सर्वांनाच इसिसच्या धोक्याचा सामना करण्याची आवश्यकता असून त्यापासून कुणाचीही सुटका नाही.
२. प्रत्येक देशाला इसिसचा धोका आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करावी लागेल. जो देश इसिसच्या धोक्यापासून मुक्त असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करील, त्याला त्याचा फटका बसेल

बिहारमध्ये मंदिर हटवण्यासाठी श्री हनुमानाच्या नावाने नोटीस !

बिहार प्रशासनाचा हास्यास्पद कारभार !
     बेगूसराय (बिहार) - लोहिया नगरामध्ये मंदिर हटवण्यासाठी जिल्हा विभागीय कार्यालयाने श्री हनुमानाच्या नावाने नोटीस पाठवली आहे. हे मंदिर अतिक्रमण असल्याचा दावा प्रशासनाने केला. या घटनेनंतर स्थानिक लोक संतप्त झाले आहेत. या मंदिराप्रती लोकांची श्रद्धा आहे; त्यामुळे हे मंदिर हटवले जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. नोटीस पाठवल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ पोहचलेल्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून विरोध करण्यास प्रारंभ केला. शेवटी या सर्व प्रकरणात प्रशासनाने आपली चूक मान्य केली आहे. बिहारमध्ये यापूर्वीही सितामढी येथील एका अधिवक्त्याने प्रभु श्रीरामाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. (अशा प्रकारे देवतांच्या नावे नोटीस पाठवून शासकीय वेळेचा आणि पैशांचा अपव्यय करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! - संपादक)

मोदींचे पंतप्रधान बनणे हिंदुत्वासाठी अभिमानाची गोष्ट !

भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात,
     राममंदिर बांधणे, ३७० कलम रहित करणे, समान नागरी कायदा लागू करणे, गोहत्याबंदी कायदा करणे आदी आश्‍वासने पाळून पंतप्रधान मोदी यांनी शहा यांच्या अभिप्रायाची प्रचीती द्यावी, अशी जनतेची इच्छा आहे !
     वृंदावन (उत्तरप्रदेश) - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधान होताच काशीच्या गंगा घाटावर जाऊन गंगेची आरती केली. या माध्यमातून मोदींनी लाखो लोकांच्या मनात आशा पल्लवित केल्या आहेत की, त्यांचे शासन संस्कृती रक्षणाचे कार्य करील. (देशभरातील अनेक मंदिरांचे झालेले सरकारीकरण रहित करून मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती देऊन मोदी शासनाने भारतीय प्रथा-परंपरांचेही रक्षण करावे, अशी कोट्यवधी हिंदु भाविकांची अपेक्षा आहे ! - संपादक) अमित शहा ८ फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमधील वृंदावनमध्ये आले होते. येथील शांती सेवाधाममध्ये असलेल्या कांतजू मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

हरियाणातील भाजप शासनाने मुस्तफाबादचे नामकरण सरस्वतीनगर केले !

हरियाणाने घालून दिलेल्या पायंड्याचे अन्य भाजपशासित राज्ये अनुकरण करतील का ?
      यमुनानगर (हरियाणा) - हरियाणाच्या भाजप शासनाने राज्यातील यमुनानगर जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावाचे नामकरण सरस्वतीनगर केले आहे. राज्यशासनाच्या महसूल खात्याने या संदर्भात २ फेब्रुवारीला अधिसूचना काढली. याला नंतर केंद्रीय गृह खात्याने संमती दिली. (या निर्णयाविषयी हरियाणा शासनाचे अभिनंदन ! आता देशभरातील अन्य भाजपशासित राज्यांनीही याप्रमाणे कृती करावी. - संपादक) महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार लुप्त झालेल्या सरस्वती नदीचे पात्र येथून वहात असल्याचे दस्तावेज, खात्याकडे उपलब्ध आहेत.

देहलीमधील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

* श्री अमरनाथ यात्रेचा अल्प केलेला कालावधी ५९ दिवसांचा करण्यात यावा !
* मध्यप्रदेशमधील भोजशाळेत केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा !
* व्हॅलेंटाईन डे मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करावा !
देहलीमधील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू
आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी
    नवी देहली - कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी पुन्हा ५९ दिवसांचा करण्यात यावा, तसेच मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा, व्हॅलेंटाईन डेच्या नावावर होणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयाच्या स्तरावर मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करावा, यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैदिक उपासना पीठ, सनातन संस्था, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आश्रम आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला मेरठ येथील हिंदू स्वाभिमानचे अधिवक्ता चेतन शर्मा, पूज्यपाद संतश्री आसाराम बापू आश्रमच्या प्रवक्त्या सुश्री नीलम दुबे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी संबोधित केले.

शिये आणि शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्माभिमानी ३० वर्षांचे पूर्ववैमनस्य विसरून धर्मासाठी झाले संघटित !

हिंदु धर्मजागृती सभेनंतरची आढावा बैठक 
हिंदु धर्मजागृती सभेच्या आढावा बैठकीत उपस्थित धर्माभिमानी
      कोल्हापूर, ९ फेब्रुवारी (वार्ता.) - शिये आणि शिरोली या गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी ३० वर्षांचे पूर्ववैमनस्य विसरून धर्मासाठी संघटित होण्याचे ठरवले आहे. याचसमवेत या दोन्ही गावात हिंदु धर्मजागृती सभा घेण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ४ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला हिंदुत्ववादी आणि धर्माभिमानी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या सभेनंतर धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ६ फेब्रुवारी या दिवशी राजारामपुरीतील ओम गणेश मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५.३० वाजता धर्माभिमान्यांची बैठक पार पडली.

झारखंडमधील देवघर येथे संस्कृत विश्‍वविद्यालयाच्या स्थापनेला केंद्रशासनाची संमती

अन्य राज्यांनीही संस्कृत विश्‍वविद्यालयांच्या स्थापनेसाठी पावले 
उचलल्यास संस्कृतला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल !
      नवी देहली - केंद्रातील मोदी शासनाने झारखंडमधील देवघर येथे संस्कृत विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी राज्यशासनाच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती ईराणी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यात देहली येथे झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यात शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी साहाय्य होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. या बरोबरच राज्यात आय.एस्.एम्. (भारतीय खाण महाविद्यालय) धनबादमध्ये आगामी सत्रात आय.आय.टी.चे शिक्षण चालू करण्यासंदर्भातही केंद्राने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे.कैलास मानससरोवरजवळील ॐ पर्वत संकटात !

जागतिक तापमानवाढीचा असाही एक परिणाम ! 
     नवी देहली -जागतिक तापमानवाढीमुळे पूर्ण जगच त्रासले आहे. याचाच परिणाम आता तिबेटस्थित कैलास मानससरोवराजवळील ॐ पर्वतावरही होत आहे. ॐ पर्वत छोट्या कैलास पर्वतावर असलेल्या ज्योलिंगकांगच्या जवळ आहे. समुद्रसपाटीच्या ६,१९१ मीटर उंचीवर असलेल्या या ॐ पर्वतावर ॐ अक्षर नैसर्गिक रूपाने आले आहे. अधिक बर्फवृष्टी झाली तर पर्वतावरील ॐ हे अक्षर स्पष्ट रूपाने चमकत असल्याचे दिसते. परंतु या वर्षी फेब्रुवारीचा पहिला आठवडा गेला, तरी येथे बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे पर्वतावर असलेल्या ॐ चे स्पष्ट दर्शन यावर्षी होईल की नाही, अशी शंका आहे. जर येणार्‍या मासांमध्ये अपेक्षित बर्फवृष्टी झाली नाही, तर यात्रेकरू या पर्वताचे मूळ स्वरूप पहाण्यापासून वंचित रहातील.समीर सरदाना याच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ

चौकशीसाठी मुंबई आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्य घेणार
     पणजी - इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून गोव्यात वास्को रेल्वेस्थानकावर अटक केलेला संशयित समीर सरदाना याच्या पोलीस कोठडीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अजून ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
     समीर सरदाना याची पोलीस कोठडी ८ फेब्रुवारीला संपल्याने त्याला वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवस अतिरिक्त रिमांड दिला. समीर गेले सात दिवस पोलिसांच्या कह्यात असून त्याची विविध अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी करण्यात येऊनही समीरने तपासकार्याला कोणतेही सहकार्य केले नाही. आतंकवादाच्या संशयाखाली अटक करण्यात येऊनही समीर निर्दोषत्वाचे पुरावे वारंवार देत आहे. आतंकवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार समीरकडून ३७ भ्रमणभाष नंबर मिळाले आहेत, तसेच समीरच्या भ्रमणसंगणकामध्ये देशात साखळी बाँबस्फोट करण्याचा उल्लेख होता.

आसामच्या हिंदुद्रोही काँग्रेस शासनाकडून शक्तीपीठ असलेल्या जगप्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या सरकारीकरणाचा डाव !

 • गेल्या ६९ वर्षांत केलेला धर्मद्रोह अल्प की काय, काँग्रेसच्या हिंदुविरोधी राक्षसी कारवाया चालूच !
 • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ! 
 • आसाम गण परिषदेचा रास्त प्रश्‍न : हिंदु मंदिरांचे सरकारीकरण करू पहाणारे काँग्रेस शासन राज्यातील मुसलमान आणि ख्रिस्ती प्रार्थनास्थळांना कह्यात घेण्याचे धाडस का दाखवीत नाही ?
     गौहत्ती (आसाम) - येथील जगप्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या सरकारीकरणाचा डाव आखला जात आहे. आसाम श्री श्री मां कामाख्या देवालय व्यवस्थापन विधेयक नावाने सिद्ध केलेले विधेयक राज्यशासनाने नुकतेच विधानसभेत मांडले. या विधेयकानुसार मंदिराच्या नव्याने स्थापित होणार्‍या व्यवस्थापन समितीत निवृत्त प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्याचे प्रशासकीय प्रतिनिधी, तसेच अर्थ आणि महसूल खात्यातील अधिकार्‍यांसमवेत सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिर व्यवस्थापनातील सदस्य असतील; परंतु भाजप आणि आसाम गण परिषद या पक्षांच्या धर्माभिमानी आमदारांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे, त्यामुळे शासनाने हे विधेयक मागे घेतले आहे; मात्र शासन पुन्हा ते विधेयक आणणार आहे. (भाजप आणि आसाम गण परिषद पक्ष यांच्या आमदारांचे अभिनंदन ! - संपादक)

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

महान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे ! - श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी

श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी 
यांचे सनातनच्या देवद आश्रमामध्ये आगमन
      पनवेल - इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे. लॉर्ड मेकॉले याने भारताचा आणि भारतियांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास करून ती मानसिकता मोडून काढण्यासाठी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे शिक्षणप्रणाली बनवली. इंग्रजांच्या शिक्षणप्रणालीचे आचरण करत असल्यामुळे समृद्ध भारत विनाशाकडे जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या महान भारतीय संस्कृतीचे आचरण करायला हवे, असे मत श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांनी मांडले. ते पनवेल येथील सनातनच्या आश्रमात साधकांना उद्बोधन करतांना बोलत होते. ८ फेेेेब्रुवारीला त्यांनी सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि साधकांना आशीर्वाद दिला.
     सनातनचे साधक श्री. शशांक जोशी यांनी श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी यांचे पाद्यपूजन केले. श्री. आेंकार कापशीकर यांनी त्यांना आश्रम दाखवला. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य श्री. रघुनाथ शर्मा हेही होते.
श्री. पारस राजपूत
     धर्मकार्य करत असतांना येणार्‍या संकटांवरूनच आपण आपला मार्ग योग्य असल्याचे जाणावे. इसिसच्या विरोधात लढणे म्हणजे मानवता आणि विश्‍वकल्याणाची बाजू घेणे, असेच आहे.- श्री. पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळ

समीर गायकवाड यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्यांना कारागृहातील अंडासेलमध्ये न ठेवण्यासाठी न्यायालयात अर्ज प्रविष्ट !

 • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
 • पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला
     कोल्हापूर, ९ फेब्रुवारी (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कळंबा कारागृहातील अंडासेलमध्ये ठेवल्याने त्यांच्यावर दबाव येऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांना अंडासेलमध्ये न ठेवता इतर बंदीवान असलेल्या खोलीमध्ये ठेवावे, अशा मागणीचा अर्ज श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ९ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात प्रविष्ट केला. श्री. समीर यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट झाले आहे. त्यामुळे चार्जशीट फ्रेम करून या खटल्याची सुनावणी चालू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रविष्ट केलेल्या अर्जावर आता २३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या वेळी श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे आणि श्री. आनंद देशपांडे उपस्थित होते.

धर्मांधाकडून ११ वर्षाच्या हिंदु मुलाशी कुकृत्य आणि हत्या

धर्मांधांची वासनांध आणि राक्षसी वृत्ती !
ही हिंदूशी असहिष्णूता नाही का ? आता प्रसारमाध्यमे 
आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी चूप का ?
      मुजफ्फरनगर - येथील शिवपुरी भागात इब्राहिम या धर्मांधाने ११ वर्षाच्या हिंदु मुलाशी कुकृत्य करून त्याची हत्या केली. याप्रकरणी २२ वर्षीय इब्राहिमला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या नातेवाईकांना हानीभरपाई मिळावी आणि इब्राहिमच्या सहकार्‍यालाही अटक करावी, यासाठी स्थानिक लोकांनी निदर्शने केली, तसेच पोलीस अन् प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक सहाव्या इयत्तेचा विद्यार्थी होता. तो घराच्या शेजारी रेल्वे रुळाजवळ खेळत होता. सायंकाळी तो घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता एका व्यक्तीने त्याला आरोपी इब्राहिमसह पाहिल्याचे सांगितले. त्यानंर स्थानिक लोकांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

शिरस्त्राण परिधान न केलेल्या पुण्यातील १०१ पोलिसांवर कारवाई

कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे पालन करणार नसतील, 
तर ते जनतेला कायद्याचे महत्त्व काय पटवून देणार ?
     पुणे - शहर वाहतूक शाखेने गेल्या काही दिवसांपूर्वी शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध मोहीम तीव्र केली होती. ६ फेब्रुवारी या दिवशी शिरस्त्राण परिधान न केलेल्या १ सहस्र ५०० दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १ लक्ष ६० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आणि शिरस्त्राण परिधान न केल्याप्रकरणी १०१ पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई केली होती. त्या पोलीस कर्मचार्‍यांकडून प्रत्येकी १०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. ३ दिवसांत सुमारे १२ सहस्र शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

श्री महालक्ष्मी देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मार्चपूर्वी संमती ! - मुख्यमंत्री

     कोल्हापूर - श्री महालक्ष्मी देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मार्चपूर्वी संमती देऊन येत्या अर्थसंकल्पात या आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. कोल्हापूर पथकरमुक्त केल्याविषयी आयोजित विजयोत्सवात मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर शहर आणि जिल्हा सर्वपक्षीय पथकरविरोधी कृती समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. समितीचे श्रीमंत शाहू महाराज, दै. पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रा.एन्.डी. पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला. या वेळी व्यासपिठावर विविध मान्यवर उपस्थित होते.

हिंदूंच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमावर धर्मांधांनी केले आक्रमण !

 • महिला आणि मुलांना मारहाण, तर काही महिलांचा विनयभंग !
 • बांगलादेशमध्ये हिंदुविरोधी जिहाद चालूच !
     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशमधील कुरीग्राम जिल्ह्यातील भातीर्भिता या गावात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंची भूमी बळकावण्याच्या हेतूने ८-१० धर्मांधांनी एका वृद्ध हिंदु महिलेच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उधळून लावला. धर्मांधांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या हिंदु महिला आणि मुलांना मारहाण केली, तसेच अनेक महिलांचा विनयभंगही केला. 
अधिक माहिती पुढीलप्रमाणे - 
१. स्थानिक हिंदु दिलीप चंद्र सेन यांच्या आईच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावर हे आक्रमण झाले.
२. या आक्रमणानंतर आरोपी आणि त्यांचे सूत्रधार फरार झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. महंमद इब्राहिम, अब्दुल मलेक, अब्दुल करीम, मैदुल इस्लाम, मलेका बेगम, हमीदा बेगम, अलेना बेगम आणि शरीफा बेगम अशी आरोपींची नावे आहेत. (धर्मांधांच्या खांद्यांना खांदा लावून लढणार्‍या त्यांच्या महिलांची चाल ओळखा ! - संपादक)

आता जर्मनीत अधिक शरणार्थी नकोत ! - जर्मनीतील कॅथलिक चर्चच्या बिशप्सची एकमुखी मागणी

    बर्लिन (जर्मनी) - गेल्या वर्षी जर्मनीने ११ लाख शरणार्थींना देशात आश्रय दिला. यांतील बहुतेक लोक सिरियातील मुसलमान आहेत. जर्मनीच्या या निर्णयाला अनेक नागरिकांनी आणि संघटनांनी आधीपासून विरोध केला होता. आता जर्मनीतील कॅथलिक चर्चमधील बिशप्स यांनी ही एका संमेलनातून शरणार्थींच्या संदर्भातील जर्मनीच्या धोरणाचा विरोध केला आहे.
१. संमेलनानंतर वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत बिशप्स संमेलनाचे अध्यक्ष कार्डीनल रेन्हार्ड मार्क्स यांनी सांगितले की, जगातील सर्व गरजू लोकांना जर्मनी सामावून घेऊ शकत नाही. जर्मनीत येणार्‍या शरणार्थ्यांवर बंधन आणणे आवश्यक आहे.
२. गेल्या मासातच पोप फ्रांसिस यांनी विस्थापितांच्या प्रश्‍नावर विस्थापित आणि शरणार्थी दिवस साजरा केला होता आणि विस्थापितांना चर्चमध्ये आश्रय देण्याचे आवाहन केले होते.
३. विस्थापितांच्या प्रश्‍नावर दया दाखवणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यामुळे जर्मनीतील कॅथलिक चर्चचे वक्तव्य पोपविरोधी असल्याचे म्हटले जात आहे.

सियाचिन येथे बर्फाखाली दबलेल्या एका सैनिकाला ६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढले !

या चमत्काराविषयी अंनिसवाल्यांना काय म्हणायचे आहे ? अंनिसने हा चमत्कार 
नसून थोतांड आहे, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
    श्रीनगर - सियाचिन येथे हिमस्खलनामुळे बर्फाखाली दबलेल्या दहा सैनिकांपैकी एका सैनिकाला सहा दिवसांनी म्हणजे ८ फेब्रुवारीला रात्री जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. लान्सनाईक हनमानथप्पा कोप्पड असे या सैनिकाचे नाव आहे. 
१. सियाचिन हिमनदीमध्ये ३ फेब्रुवारीला सकाळी झालेल्या हिमस्खलनाचा १९ सहस्त्र ६०० फूट उंचीवरील सैन्याच्या एका चौकीला फटका बसला आणि मद्रास बटालियनचे दहा सैनिक बर्फाखाली दबले गेले होते. 
२. या सैनिकांचा शोध घेण्यासाठी सैन्य आणि वायूदल यांच्याकडून गेल्या सहा दिवसांपासून संयुक्तपणे शोधमोहीम चालू होती.
     हे हिंदुराष्ट्र घोषित करा अन्यथा सर्व देशभक्त हिंदूंना कापून टाका त्यामुळे एकतर अखंड हिंदुस्थान निर्माण होईल अन्यथा अखंड पाकिस्तान निर्माण होईल ! - श्रीमती हिमानी सावरकर, अध्यक्षा, अभिनव भारत.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद्यांना धर्म नसतो असे म्हणणारे धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?
      २६/११ आक्रमणाच्या वेळी नौदल, वायूदल आणि पोलीस मुख्यालय यांसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरही जिहाद्यांचे लक्ष्य होते अशी साक्ष या आक्रमणाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि माफीचा साक्षीदार आतंकवादी डेव्हीड हेडलीने विशेष न्यायालयास दिली.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Atankiyonka koi dharma nahi hota, aisa kehnevale ab chup kyon ?
26/11 akramanke samay Mumbaika Siddhivinayak mandir tha lakshya - Atanki David Headley

जागो ! : आतंकियों का कोई धर्म नहीं होता, ऐसा कहनेवाले अब चुप क्यों ?
२६/११ आक्रमण के समय मुंबई का सिद्धिविनायक मंदिर था लक्ष्य - आतंकी डेव्हीड हेडली

संगमनेर (जिल्हा नगर) येथील पशुवधगृहांतील १७ सहस्र किलोहून अधिक गोमांस जप्त !

 • नगर पोलिसांची पशुवधगृहांच्या विरोधात कारवाई !
 • ५७ गोवंश कह्यात
     संगमनेर, ९ फेब्रुवारी - नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील पशुवधगृहांत सलग २ दिवस छापे टाकले. या वेळी पहिल्या छाप्यात, म्हणजेच ५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी १० सहस्र किलो गोमांस शासनाधीन करून नष्ट केले. सदर कारवाईच्या वेळी पोलिसांनी ३४ जनावरांना जीवदान दिले होते. त्यानंतर ६ फेब्रुवारी या दिवशी मदिनानगर परिसरातील गौसिया मशिदीमागे मैदानात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या करण्यासाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गाय, बैल आणि वासरांसह २३ जनावरे मिळाली. त्यासह ७ सहस्र ३०० किलो गोमांस नष्ट केले. या वेळी आरोपी तेथून पसार झाले. (संगमनेर येथे गोवंश हत्या करण्यासंबंधीच्या घटना सातत्याने उघड होत आहेत. याचा अर्थ धर्मांधांना गोवंशहत्या बंदी कायदा आणि पोलीस प्रशासन यांचा धाक वाटत नाही कि काय ? यासाठी शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करावी, ही अपेक्षा ! - संपादक) या संदर्भात संगमनेर शहर पोलिसांत पोलीस कर्मचारी धनंजय हासे यांच्या तक्रारीवरून गुफरान नसीर कुरेशी आणि दिशान हाजी कुरेशी या दोघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. यापूर्वीही पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि सध्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी वारंवार पशुवधगृहांवर छापे टाकले; मात्र या कारवाईत गोवंश हत्या करणारा मुख्य सूत्रधार पोलिसांना कधीच सापडत नाही, अशी चर्चा गोरक्षकांमध्ये चालू आहे.

तमिळनाडूमध्ये भगवान अरुणाचलेश्‍वर मंदिराच्या जलकुंडात चेंगराचेंगरी, ४ जणांचा बुडून मृत्यू

 • गर्दी करून नव्हे, तर रांगेत दर्शन घेतल्यास ते देवाला अधिक आवडेल, हे भाविकांनी जाणावे, म्हणजे गर्दीमुळे होणार्‍या दुर्घटना टळतील !
 • मंदिराच्या तिजोरीवर डोळा ठेवणारे; मात्र गर्दीचे सुनियोजन करण्यात कुचराई करणारे शासनच अशा दुर्घटनांसाठी उत्तरदायी आहे !
     तिरुवन्नमलाई (तमिळनाडू) - महोदय अमावास्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी येथील भगवान अरुणाचलेश्‍वर मंदिरातील जलकुंडात केलेल्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ४ जणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी जलकुंडाचे प्रवेशद्वार बंद केले असून चेंगराचेंगरीत सापडलेल्या जवळपास ५० जणांची सुटका केली आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच त्रिशूळाची पूजा चालू झाली होती. त्याच्या दुसर्‍या दिवशी पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. मंदिरातील पुरोहित पवित्र त्रिशूळासह अय्यन तीर्थवरी कुलम् जलकुंडात स्नानासाठी उतरले. त्याच वेळी अनुमाने २ सहस्र भाविकांनीही त्यांच्या समवेत स्नानाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ही दुर्घटना घडली. मृत्यू पावलेले चारही जण मंदिराच्या मुख्य पुरोहितांचे साहाय्यक होते. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. अग्नीशमन दल आणि साहाय्यकार्य करणार्‍या पथकातील कर्मचारी अद्यापही काही जणांचा शोध घेत आहेत.

देशासाठी वीरमरण पत्करणार्‍या हुतात्म्याच्या मुलाने पैशांअभावी १० वी नंतरचे शिक्षण सोडले !

कुठे एका विद्यार्थीनीसाठी एक रेल्वेस्थानक चालू राहू देणारा जपान, तर कुठे देशासाठी 
हौतात्म्य पत्करणार्‍या व्यक्तीच्या मुलाला शिक्षण सोडण्याची पाळी येऊ देणारा भारत !
     श्रीनगर - ज्याने देशासाठी जीवन समर्पित केले, त्याच्या मुलाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे १० वी नंतरचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ठार झालेल्या ग्राम सुरक्षा समितीचे सदस्य गोपाल सिंह यांचा मुलगा सुनाक सिंह याने १०वीत ९२ टक्के गुण प्राप्त केले आहे; परंतु त्याच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे त्याच्यावर पुढचे शिक्षण सोडण्याची पाळी आली आहे.

गंगा नदी कोरडी पडत असतांना विद्युतनिर्मिती केंद्रे उभारण्याचा विचार तरी कसा होतो ?

गंगा नदीवर विद्युतनिर्मिती केंद्र बनवण्यासाठी देण्यात येणार्‍या 
अनुमतीविषयी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाला फटकारले ! 
     नवी देहली - गंगा नदीवर विद्युतनिर्मिती केंद्र बनवण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुमती देतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातून पीएच्डी प्राप्त केलेले डॉ. भरत झुनझुनवाला आणि अन्य दोघांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्रशासनाला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पिठाने म्हटले की, गंगा नदी ठिकठिकाणी कोरडी पडत असतांना विद्युतनिर्मिती केंद्रावर विचार कसा केला जात आहे ? गंगा नदीचा प्रवाह सलग नाही. ती खंडीत होऊन वहात आहे. अशा वेळेस त्यावर विद्युत केंद्रे कशी होऊ शकतात. अशा योजना वादाचा विषय आहेत. (याला उत्तरदायी असलेल्यांना न्यायालयाने शिक्षा करावी, अशी जनतेची मागणी आहे ! - संपादक)व्हॅलेंटाईन डेला होणार्‍या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी भाग्यनगरच्या हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

साहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
देतांना हिंदुत्वनिष्ठ
     भाग्यनगर (तेलंगण), ९ फेब्रुवारी (वार्ता.) - १४ फेब्रुवारीला असलेल्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त पाश्‍चात्त्य संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अंधानुकरण होतांना दिसते. या दिवशी संस्कृती आणि धर्म विरोधी अनैतिक प्रकारांना ऊत आलेला पहावयास मिळतो. या पार्श्‍वभूमीवर येथील हिंदुत्वनिष्ठांनी अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी करणारे निवेदन ८ फेब्रुवारीला भाग्यनगरचे (हैद्राबादचे) साहाय्यक जिल्हाधिकारी भारती होल्लीकेरी यांना दिले. याबरोबरच पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंनी आरंभलेल्या मातृ-पितृ पूजन दिवसास प्रोत्साहन दिले जावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
     या वेळी पूज्यपाद संतश्री आसारामबापू आश्रमाचे श्री. नागपाल, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण राज्य समन्वयक श्री. चंद्रु मोगेर, श्री. धीरज सिन्हा, श्री. प्रवीण आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

जयपूरमध्ये दोन मुसलमान महिला काझी बनल्याने राज्याच्या मुख्य काजीकडून विरोध !

हिंदु महिलांना समानतेचा अधिकार देण्यासाठी आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडसारख्या 
संघटना अशा घटनांच्या वेळी कुठल्या भूमीत गडप होतात ?
     जयपूर - राजस्थान मधील जहां आरा आणि अफरोज बेगम या दोन ४० वर्षीय महिलांना दोन वर्षांच्या शिक्षणानंतर काझी म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आता त्या काझी म्हणून विवाह लावण्याचे आणि अन्य कामे करू शकतात; मात्र राज्यातील काझींचे प्रमुख, तसेच उलेम आणि मुफ्ती हे या महिलांच्या काझी होण्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 
    काही दिवसांपूर्वी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे एका महिला काझीने विवाह लावून दिल्यावर त्याला विरोध झाला होता. शिया महिला काझीने एक सुन्नी वधू-वरांचा विवाह केल्याने त्याला विरोध करण्यात आला होता. शियांपेक्षा सुन्नींनीं याला प्रखर विरोध केला होता. महिला काझीने विवाह लावणे हे शरीयतच्या विरोधात असून ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

राज्यकर्त्यांची वेतनवाढ म्हणजे देशातील गोर-गरीबांची क्रूर चेष्टाच !

श्री. प्रतीक जाधव
१. राज्यकर्त्यांची वेतनवाढ जनतेला अचंबित करणारी असणे
     देशातील राज्यकर्त्यांच्या वेतन वाढीविषयी जोरदार चर्चा चालू आहे. दिल्लीच्या केजरीवाल शासनाने शासकीय कर्मचार्‍यांचे दारिद्य्र आणि बेकारी दूर करण्यासाठी नवीन योजना लागू केली. त्यात खासदारांचे वेतन २ लक्ष ८० सहस्र व्हावे, असा ठराव मांडून सर्वांनी संगनमताने हा विचार मान्य करून त्याची तात्काळ कार्यवाही चालू केली. त्यांंचे पूर्वीचे वेतन १ लक्ष ४० सहस्र एवढे होते. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली. खासदारांनी दिल्लीत असे कोणते शुभकार्य केले की ज्यामुळे त्यांना अकस्मात् ही सुविधा मिळाली ? यावर जनता अजूनही अचंबित होऊन पहात आहे. असो. शेवटी हे शासन केजरीवालांसारख्या अतीहुशार लोकांचे आहे.

थकित कर्जापोटी बँकांना देण्यात आलेले शासनाचे १.१४ लक्ष कोटी रुपये बुडीत !

      देहली, ९ फेब्रुवारी - शासनाने बँकांनी दिलेल्या; पण वसूल न होणार्‍या कर्जापोटी देण्यात आलेली १.१४ लक्ष कोटी रुपये इतकी रक्कम गोल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम गेल्या तीन वर्षांत विविध बँकांकडून कर्जापोटी विविध खातेदारांना देण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसने आर्बीआयकडे माहिती अधिकाराच्या माहितीखाली विचालेल्या एका प्रश्‍नात ही माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम गेल्या ९ वर्षांत २९ राज्यांच्या बँकेच्या थकित रकमेपेक्षा अधिक आहे. १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असे कर्ज माफ केलेले लोक कोण आहेत, याची माहिती विचारली असता ती माहिती नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. (कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ते थकित ठेवणार्‍यांचे कर्ज माफ करण्याचे धोरण राबवल्यास लवकरच बँका देशोधडीला लागतील. अशा कर्जदारांना क्षमा नाही, तर कठोर कारवाई करण्याचे धोरण राबवले पाहिजे ! - संपादक)

कुठे अमर्याद वेतनवाढ घेणारे राज्यकर्ते आणि कुठे कोणतेही मानधन न घेता निस्वार्थपणे राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी अविरत झगडणार्‍या हिंदु संघटना !

श्री. अमोल बधाले
१. खासदारांचे वेतन वाढले या गोष्टीला सामान्य 
जनतेने अच्छे दिन म्हणायचे का ?
    राजकारण्यांच्या उलट सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य कोणतेही मानधन न घेता अविरतपणे करत आहेत, तसेच ते या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतात. त्यांना पैशांपेक्षा राष्ट्र आणि धर्म मोठा वाटतो. ते या राष्ट्र आणि धर्म यांच्या कायार्र्साठी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खिशातील पैसेही व्यय करतात. 
    सामान्य जनतेने खासदारांचे वेतन वाढले या गोष्टीला अच्छे दिन म्हणायचे का ?; म्हणूनच स्वतःचे पोट भरणारे राज्यकर्ते हे कधीच अच्छे दिन, म्हणजेच हिंदु राष्ट्र आणू शकत नाहीत.

भूमाता ब्रिगेडमध्ये फूट

     ही भूमाता ब्रिगेडवर झालेली श्री शनिदेवाची अवकृपा आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? आतातरी तृप्ती देसाई या श्री शनिदेवाचे माहात्म्य जाणून श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना चढू देण्यासाठी करत असलेले आंदोलन मागे घेतील कि आपले कथित स्त्री समानतेचे तुणतुणे वाजवत रहातील ?
     नगर, ९ फेब्रुवारी - येथील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडकडून अयशस्वी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई यांची या भूमाता ब्रिगेड संघटनेत फूट पडल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या वर्चस्व वादातून भूमाता ब्रिगेडमध्ये फूट पडली असून संघटनेच्या ७ पैकी ३ प्रमुख महिला कार्यकर्त्यांनी संघटनेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. त्यामध्ये उपाध्यक्षा पुष्पक केवाडकर, प्रवक्त्या प्रियांका जगताप आणि दुर्वा शुक्रे यांचा समावेश आहे. या तीनही महिला स्वतःची नवीन संस्था स्थापन करणार आहेत.

पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील भ्रष्ट मंत्र्यांची १५ वर्षांतील संपत्ती थक्क करणारी ! - मुख्यमंत्री

     पालघर, ९ फेब्रुवारी (वार्ता.) - आमचा कुणाविषयी राजकीय आकस नाही; मात्र जनतेच्या तिजोरीतून लुटलेला पैसा परत जनतेच्या तिजोरीत टाकू. गेल्या १५ वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांची संपत्ती थक्क करणारी आहे. अजून अनेक प्रकरणांचा खुलासा आणि पर्दाफाश होणार आहे. काही जण बाहेर आहेत, तेदेखील आता अधिक काळ बाहेर रहाणार नाहीत, अशी चेतावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वाश्रमीच्या सत्ताधारी काँग्रेस आघाडीतील भ्रष्ट मंत्र्यांना दिली आहे. पालघर पोटनिवडणुकीतील युतीचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते.

पतीच्या लिखाणात व्यत्यय नको; म्हणून त्याची १८ वर्षे निरपेक्षपणे सेवा करणारी तपस्वी भामती !

       स्त्री ही श्रद्धा, भक्ती आहे. तितिक्षा म्हणजे स्त्री ! सेवा, धैर्य आणि धीरतेची प्रतिमा सती आहे. केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजाला नव्हे, विश्‍वाला पावन करणार्‍या स्त्री जीवनातले किती प्रसंग सांगू ? विश्‍वाने आजही तिच्या चरणांवर डोके ठेवावे, अशी भामती ! वाचस्पती मिश्र तरुण असतात. त्यांचे प्रपंचाकडे लक्ष नसते. वडील एक दिवशी विचारतात, विवाह करशील का रे ? तो आपल्याच धुंदीत असतांना मान डोलवत हो म्हणतो. वडील लग्नाच्या वेळी वराला घोड्यावर बसायला सांगतात. लग्न होते. वधू घरी येते. तिचे नाव भामती! वाचस्पती मिश्रांनी त्याच सुमारास ब्रह्मसूत्र शांकरभाष्यावर ग्रंथ लिहायला घेतलेला असतो. पहाटेपासून ते प्रारंभ करतात, ते रात्री शरीर कोलमडून पडेपर्यंत लिहितच असतात.

ठिकठिकाणची छोटी पाकिस्तान केव्हा नष्ट करणार ?

     संशयित आतंकवादी मुदत्बीर शेख याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) इसिसचा भारतातील हस्तक म्हणून अटक केली आहे. शेख हा मुंब्रामधील असून तो संगणक अभियंता आहे. तो संगणकाच्या माध्यमातून इसिसच्या कारवाया करत होता. सध्या शेख हा अन्वेषण यंत्रणेच्या कह्यात असून त्याची चौकशी चालू आहे. त्याच्याकडून इसिसशी होत असलेला संपर्क, त्याचे भारतातील जाळे आणि तत्सम माहिती काळाच्या ओघात उघड होईलच.

क्रांतीचे बीज पेरणारे आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक

वीर उमाजी नाईक यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने...
१. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी
    भारतीय समाजात रामोशांसारख्या जमातीत जन्मलेल्या एका माणसाने आम्ही चोर नाही, बंडखोर आहोेत, असा खणखणीत निरोप इंग्रजांना पाठवावा आणि एका देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पहावे अन् त्यासाठी आमरण झटावे, ही या देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातसुद्धा एक हुरहूर लावणारी घटना घडून गेली, असे जाणवल्याशिवाय रहात नाही.

७० टक्के गोवंश निरुपयोगी ठरवण्याच्या पाश्‍चात्त्य विचाराचा त्याग करा !

     भारतात ७० टक्के जनावरे निरुपयोगी समजली जातात. त्यामुळे त्यांची हत्या करून त्यांच्यावर होणारा व्यय (खर्च) उर्वरित ३० टक्के जनावरांवर व्हावा, असा युक्तीवाद आजकाल काहीजण करतात. यात बहुतांश पाश्‍चात्त्य विचारसणीच्या अर्थतज्ञांचा समावेश आहे. ही मंडळी कायम वरवरचे लाभ पहातात; पण धार्मिक दृष्टीकोनातून पहात नाहीत. वरील युक्तीवादाचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यातील पुढील फोलपणा स्पष्ट होईल.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व उपाययोजना कराव्यात ! - निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या पोलिसांना सूचना

निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली, ९ फेब्रुवारी (वार्ता.) - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर पहारा वाढवणे, अपप्रकार दिसल्यास योग्य ती कारवाई करणे यांसह सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांनी पोलिसांना दिल्या. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलावीत, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. त्या वेळी श्री. कुलकर्णी यांनी पोलिसांना तात्काळ दूरभाष करून या सूचना दिल्या. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री हरिदास कालिदास, सचिन पवार, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर उपस्थित होते. या वेळी मध्यप्रदेश शासनाने श्री सरस्वती मंदिरात (भोजशाळेत) वसंत पंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) पूर्ण दिवस, तसेच यापुढे कायमस्वरूपी केवळ हिंदूंनाच पूजा करण्यास अधिकार द्यावेत, अशा मागणीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. महेश शर्मा यांच्या नावे असलेले निवेदनही देण्यात आले.

शत्रूवर सैनिकी आक्रमण करणे, हेच राष्ट्र्रीय शस्त्रबळाचे मुख्य ध्येय आहे !

     आक्रमण करा म्हणून सावरकर म्हणतात, राष्ट्र्राचे सैन्य शस्त्रास्त्रसज्ज पाहिजे. ते म्हणतात, शत्रूवर सैनिक आक्रमण करणे, हेच राष्ट्र्रीय शस्त्रबळाचे मुख्य ध्येय मुख्य धर्म आहे. राष्ट्र्राच्या केवळ संरक्षणापुरते शस्त्रबळ जे राष्ट्र्र बाळगते; पण आक्रमणक्षम होईल इतके वाढवीत नाही. तसे करणे अधर्म समजते, त्या राष्ट्र्राची ती निष्ठा एक तर भ्रांत असते, नाहीतर आतून भेकड असते. हा अंतर्गत भेकडपणा लपविण्यासाठी केलेली ती एक वल्गना असते. ज्या राष्ट्र्राचे सैन्यबळ उघडउघडपणे आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते, त्या राष्ट्र्रास संरक्षणक्षमता असतेच असते. (स्वातंत्र्यवीर सावरकर, वर्ष १९३७)
     आज आपल्या सैन्यात नवीन शस्त्रे येत आहेत. अणुबॉम्ब बनविले जात आहेत. सैनिक दल आधुनिक बनविले जात आहे. हा सावरकरांच्या तत्त्वांचाच विजय आहे. गांधीवादाचा हा पराभव आहे. 
- वा.ना. उत्पात, (स्वातंत्र्यवीर दीपावली विशेषांक नोव्हेंबर- डिसेंबर २००७, पृष्ठ ४९-५१)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

सोनपेठ (जिल्हा परभणी) येथील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीची तोडफोड : २ धर्मांधांना अटक

धार्मिक गुन्हेगारीत अग्रेसर असलेले अल्पसंख्यांक समाजातील धर्मांध !
     सोनपेठ, ९ फेब्रुवारी - येथील सोनखेड भागातील प्राचीन श्री हनुमानाचे मंदिरातील मूर्तीच्या तोडफोडीची घटना ७ फेब्रुवारी या दिवशी घडली. सदर घटनेच्या निषेधार्थ ८ फेब्रुवारी या दिवशी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. त्यानंतर येथील श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या २ धर्मांधांना पोलिसांनी ८ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. यासह उस्मानबाबा कुरेशी हा धर्मांध नगरसेवक, तसेच त्याचा अन्य एक साथीदार अशा दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. (हिंदुबहुल देशात धर्मांध हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडफोड करतात आणि त्यांना अटक करण्यासाठी आंदोलन करावे लागते, ही स्थिती भीषण आहे. ग्रामस्थांनी आंदोलन केले नसते, तर त्या धर्मांधांना पोलिसांनी अटक केलीच नसती, असे म्हटल्यास वावगे काय ? - संपादक)
     रामनाथी (गोवा), ९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार स्वारीला ३५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पुण्यातील १५० युवक २ फेब्रुवारीपासून दुचाकीवरून गुजरात ते कर्नाटकपर्यंत ३ सहस्र ४१८ किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. हे युवक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या ३ राज्यांतील १७ जिल्ह्यांमधील ३१ जलदुर्ग, १० गिरीदुर्ग, १० भुईकोट यांना भेट देणार आहेत. या मोहिमेच्या काळात सभांच्या माध्यमांतून जलसीमा सुरक्षा, इतिहास आदी संदर्भात माहिती दिली जात आहे. या मोहिमेची १७ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर सांगता होणार आहे. ८ फेब्रुवारी या दिवशी या युवकांचे मालवण येथून गोव्यातील तेरेखोल किल्ला येथे आगमन झाले.

हिंदु जनजागृती समितीशी संपर्क झाल्यानंतर व्यष्टी आणि समष्टी साधनेला आरंभ करणारे अन् साधना परिणामकारक व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे श्री. प्रशांत पाठक !

वाराणसी येथील श्री. प्रशांत पाठक यांना हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यानंतर 
स्वतःत जाणवलेले पालट आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत. 
१. हिंदु जनजागृती समितीशी संपर्क
१ अ. व्यष्टी साधनेसाठी होत असलेले प्रयत्न : नामजप वाढवणे, प्रार्थना आणि कृतज्ञता यांत नियमितता आणणे, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकण्याचा प्रयत्न करणे, सर्व आध्यात्मिक उपाय करणे आणि शिकण्याची वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे.
१ आ. समष्टी साधनेचे (सेवेचे) प्रयत्न : धर्मशिक्षणविषयक लघुसंदेश पाठवणे, धर्माभिमान्यांना संपर्क साधणे. 
१ इ. समितीच्या संपर्कात आल्यानंतर साधनेमुळे झालेले पालट : माझ्या मनात धर्माविषयीचा अभिमान वाढला, तसेच धर्माप्रती जाणून घेण्याची जिज्ञासाही वाढली. कपाळावर टिळा लावण्याची कृती आता नियमितपणे होते, तसेच प्रत्येक कृती करतांना आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून विचार होऊ लागला आहे, उदा. कपडे कसे असावेत ?

शांत, मनमिळाऊ आणि संतांच्या भेटीसाठी आतुर झालेली चि. प्रार्थना पाठक (वय ५ वर्षे) !

१. चि. प्रार्थना पुष्कळ शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे.
२. ती सतत नामजप करत असल्याचे जाणवते.
३. समाजातील लोक आपोआप आकृष्ट होणे :
प्रार्थना आमच्या घरी आली असतांना आजूबाजूचे लोक तिच्याकडे बघून ही किती गोड आहे ! तिच्याकडे बघतच रहावेसे वाटते, असे म्हणत होते. 

प.पू. रामभाऊस्वामींचे मिरज आश्रमात झालेले आगमन म्हणजे आनंदाची डोही आनंद तरंग या वचनाची अनुभूती देणारा भावसोहळाच !

     १५ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली उच्छिष्ट गणपति यज्ञ पार पडला. त्यानंतर १९.१.२०१६ या दिवशी त्यांचे मिरज आश्रमात शुभागमन झाले. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि प.पू. स्वामींकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. प.पू. स्वामींचे आश्रमात आगमन होण्यापूर्वी
१ अ. स्वामी आश्रमात येणार, असे कळल्यावर
१. त्यांच्या आगमनाविषयी समजल्यावरच मला पुष्कळ आनंद वाटत होता. आनंदाच्या भरात नाचूया, असे वाटत होते. - श्री. आशिष जोशी आणि श्रीमती शीतल जोशी

साधकांना सूचना


पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

होळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना
     या वर्षी २३ मार्च या दिवशी होळी आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होळी साजरी करण्याविषयी तसेच होळीतील अपप्रकार रोखण्याविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य बनवले आहे. या प्रसारसहित्याच्या पुढील धारिका नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
१. होळी धर्मशास्त्रानुसार साजरी करा ! हे ए ५ या आकारातील ४ पानी हस्तपत्रक. (ज्यांना ४ पानांचे पत्रक छापणे शक्य नसेल, ते केवळ २ पानांचे पत्रक छापू शकतात.)
२. २.२५ x ३.५ फूट आकारातील २ फलक
वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा

वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. प्रार्थना पाठक (वय ५ वर्षे) हिची एस्.एस्.आर्.एफ्.चे संत आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. प्रार्थना पाठक
१. पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली, सनातन 
आश्रम, रामनाथी, गोवा (२.२.२०१६)
१ अ. झोपेतही नामजप करणे : वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला आम्ही साधक सौ. शिल्पा कुडतरकर यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी आम्ही काही जण ध्यानमंदिरात उपायांसाठी बसलो होतो. सौ. मनीषा पाठक कु. प्रार्थना हिला घेऊन तेथे आल्या आणि त्यांनी तिला येथे बसून अर्धा घंटा नामजप कर, असे सांगितले. कु. प्रार्थना तेथे बसून मनापासून वैखरीतून नामजप करू लागली. काही वेळात तिला झोप लागली आणि झोपेतही बराच वेळ ती वैखरीतून नामजप करत होती. यावरून तिच्यातील आज्ञापालन आणि नामजप करण्याचे गांभीर्य हे गुण लक्षात आले.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनच्या प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे 
होणार्‍या विकारांवरील उपाय या ग्रंथात पुढील सुधारणा करा !
     प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (आवृत्ती पहिली, २४.१२.२०१५) या ग्रंथात पृ. ८० वरील सारणीच्या खाली करावयाच्या सुधारणेविषयी कालच्या (९.२.२०१६ या दिवशीच्या) दैनिक सनातन प्रभातच्या पान २ वर साधकांना सूचना प्रसिद्ध झाली आहे. ही सुधारणा प्रस्तुत ग्रंथ खरेदी केलेल्या साधकांनी आणि वाचकांनी पेनने ग्रंथात करून घ्यावी.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प.पू. रामभाऊ स्वामी यांनी केलेल्याउच्छिष्ट गणपती यज्ञाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

श्री. निमिष म्हात्रे
उच्छिष्ट गणपती यज्ञाच्या काळात 
श्री. निमिष म्हात्रे यांना आलेल्या अनुभूती
१. त्रास उणावणे
अ. गेले काही दिवस मला सकाळी प्रातःकर्मे करायला त्रास होत होता. त्यामुळे सेवेला जायला पुष्कळ उशीर व्हायचा. यज्ञाच्या दिवशी मात्र मला ताजेतवाने वाटत होते आणि अल्प वेळेतच माझे सर्व आवरून झाले.
आ. यज्ञातील शक्ती तसेच मंत्रोच्चारातील सामर्थ्य यांमुळे उपाय होऊन त्रास होणे; मात्र स्वतः ईश्‍वराच्या नियंत्रणात असल्याचे जाणवणे, तसेच पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी यज्ञाची शक्ती अधिक जाणवणे : मी यज्ञस्थळी बसल्यावर माझ्यावर पुष्कळ उपाय होत होतेे. मला पुष्कळ ढेकरा आणि जांभया येत होत्या. मला त्रास होऊ लागला; पण हे सर्व घडत असतांना मी ईश्‍वराच्या नियंत्रणातच आहे आणि माझा त्रास न्यून होत आहे, असेही जाणवले. सायंकाळी प.पू. स्वामींच्या अग्नीप्रवेशाच्या वेळी मी खोलीत विश्रांती घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा माझ्या कानावर केवळ मंत्रोच्चार पडूनही मला त्रास होत होता. इतके त्या मंत्रांचे सामर्थ्य होते. मला पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी यज्ञाची शक्ती अधिक जाणवली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते आणि मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.
भावार्थ : येथे प्रेम हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


परात्पर गुरु डॉ. आठवले
विविध पंथियांचे कार्य
१. इच्छाशक्ती : इस्लाम पंथियांचे कार्य इच्छाशक्तीच्या बळावर चालते. सर्वत्र इस्लामचे राज्य यावे, अशी त्यांची इच्छा असते. या इच्छाशक्तीच्या बळावर, म्हणजे मनाच्या स्तरावर शारीरिक बळाचा वापर करून त्यांचे कार्य चालते.
२. क्रियाशक्ती : यात बुद्धीच्या स्तरावर कार्य चालते, उदा. इतरांना फसवून ख्रिस्ती कसे करायचे ? ख्रिस्ती पंथीय क्रियाशक्तीच्या बळावर कार्य करतात.
३. ज्ञानशक्ती : साधनेने जी निर्माण होते, ती ज्ञानशक्ती. हिंदूंचे कार्य ज्ञानशक्तीच्या बळावर होते. फुलाकडे मधमाशा जशा आकर्षित होतात, त्याप्रमाणे ज्ञानशक्तीमुळे इतर धर्मीयही हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षिले जातात. हिंदूंना ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याप्रमाणे हिंदु धर्माकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसून व्यक्तीचे आचार, विचार आणि वागणे यालाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

वसंतपंचमीला पूर्ण दिवस हिंदूंना पूजेचा अधिकार मिळणार का ?

संपादकीय 
     हिंदुबहुल देशात बहुसंख्य हिंदूंचीच फरफट होणे, हा आता नित्याचा विषय झाला आहे. कोणतेही शासन असले, तरी बहुसंख्यांकांच्या भावना डावलून अल्पसंख्यांकांच्या भावनांनाच शासन दरबारी महत्त्व दिले जाते. १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेत हिंदूंना पूर्ण दिवस पूजा करण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. धार येथील श्री सरस्वती मंदिर (भोजशाळा) हिंदूंचे प्राचीन मंदिर/विद्यालय आहे. ते बळकावून त्याला मशीद घोषित करण्याचे षड्यंत्र चालू आहे. भोजशाळा हिंदु मंदिर असल्याचे उत्खननात सापडलेले अनेक पुरावे आजही तेथे ठेवलेलेे आहेत. इतके सर्व असतांनाही मुसलमान तेथे त्यांचा अधिकार सांगत आहेत आणि १२ फेब्रुवारी या दिवशी मुसलमानांना दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजपठणाची अनुमतीही देण्यात आली आहे.

सामान्यांच्या पैशाची लूट !

संपादकीय
     देशातील २९ शासकीय अधिकोषांनी दिलेल्या कर्जाची आकडेवारी आरबीआयने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने) घोषित केली आहे. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. वर्ष २०१३ ते वर्ष २०१५ या आर्थिक वर्षांमध्ये १.१४ लक्ष कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. याची वसुली होणे जवळजवळ आता अशक्य असल्यासारखी स्थिती आहे. वर्ष २०१२ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा परतावा होऊ शकणार नाही, अशी रक्कम १५ सहस्र ५५१ कोटी रुपये होती. मार्च २०१५ मध्ये हा आकडा तिप्पट वाढून ५२ सहस्र ५४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. याचा अर्थ वर्ष २०१२ मध्ये इतका मोठा आकडा असतांनाही त्यातून काहीच न शिकता शासकीय अधिकोषांकडून परत एकदा श्रीमंतांना कर्जे देण्यात आली, असे आहे. देशातील सामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असतांना देशाची तिजोरी रिकामी करणार्‍यांना मात्र मोकळीक दिली जाते, ही अत्यंत चिड आणणारी गोष्ट आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn