Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री अनंतानंद साईश प्रकटदिन (दिनांकानुसार)

कोटी कोटी प्रणाम !

पू. कलावतीआई यांची आज पुण्यतिथी

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणामागे पाकच ! - आतंकवादी हेडलीची स्वीकृती

 • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष
 • पाकिस्तानी सैन्याचे आतंकवाद्यांना साहाय्य
 • दोन वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला !
 • आक्रमणानंतरही एकदा भारतात येऊन गेल्याची माहिती
कोणी कितीही साक्ष दिली, तरी पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही आणि
 तो जिहादी आतंकवाद्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही ! विषय विस्मरणात 
जाईपर्यंत पुरावे शोधण्याच्या धोरणावर केंद्रशासनाने फेरविचार करावा !
     मुंबई - मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याची ८ फेब्रुवारीपासून मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष चालू झाली आहे. या वेळी या आक्रमणातील पाकिस्तानच्या सहभागाबाबत हेडलीने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आक्रमणातील आतंकवाद्यांना पाकिस्तानातच प्रशिक्षण मिळाले होते, तसेच लष्कर-ए-तोयबाच्या साजिद मीर याने भारतीय पारपत्र मिळवून दिले होते, अशी स्वीकृती हेडली याने दिली आहे. त्याच्या या स्वीकृतीमुळे या आक्रमणामागे पाकचा हात अधिक स्पष्ट झाला आहे.

इसिसचे आतंकवादी ठरवून होणार्‍या अटकसत्रांत पारदर्शकता असावी ! - बुखारी

इसिसच्या विरोधात कधी पंतप्रधानांची भेट घ्यावी, असे बुखारी यांना
 का वाटले नाही ? इसिसचे हे अप्रत्यक्ष समर्थनच नव्हे का ?
पंतप्रधानांची भेट घेऊन मागणी
      नवी देहली - देहलीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी ८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर बुखारी म्हणाले की, मी तीन सूत्रांसाठी भेट घेतली. जामिया मिलिया इस्लामिया, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि नुकतीच झालेली मुसलमान युवकांची अटक ही तीन सुत्रे होती. त्यांनी लवकरच जामिया आणि अलीगड याविषयांवर नंतर चर्चा करू, असे म्हटले. जामा मशिदीकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इसिसशी संबंध असल्यावरून होणार्‍या अटकसत्रांविषयी पारदर्शकता असावी, अशी मोदी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये यादवांचे इस्लामिक स्टेट ! - शिवसेना

उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेचा विरोध झुगारून राज्यशासनाकडून गुलाम अलींचा कार्यक्रम सादर
     मुंबई / लक्ष्मणपुरी - ७ फेब्रुवारी या दिवशी उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या शासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला होता. राज्याचे शिवसेनेचे प्रमुख अनिल सिंह यांना पोलिसांनी एक दिवस आधीच घरातच नजरबंद केले होते. या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला नव्हता. समाजवादी पक्षाच्या शासनाच्या मोगलाईवर शिवसेनेने त्याच्या मुखपत्र सामनातून टीका केली आहे.
     यादवांचे इस्लामिक स्टेट या मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, सध्या इसिस म्हणजे इस्लामिक स्टेटवाल्या आतंकवाद्यांनी भारत शासनाची झोप उडवून दिली आहे; पण उत्तरप्रदेशातील यादवांनी त्यांच्या राज्याचे इस्लामिक स्टेट करून गुलाम अलीचे स्वागत केले आहे. येथे पाकड्यांना पायघड्या घातल्या की उत्तरप्रदेश, बंगाल, आसाम येथील मुसलमान हर्षभरीत होतो.
   आता उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकांची बांग ऐकू येत असल्याने मुसलमानी मतांच्या लांगूलचालनासाठीच यादव सरकारचे हे देशद्रोही उद्योग चालू झाले आहेत.

पुरोगाम्यांच्या फुसक्या आणि मानसिक धमक्यांना सनातन भीक घालत नाही ! पू. (कु.) स्वातीताई खाडये

 • धर्मसभेतून प्रेरणा घेऊन वैराग येथील धर्माभिमान्यांनी केले २० एप्रिलला धर्मसभेचे आयोजन
 • बार्शी धर्मसभेला २ सहस्र हिंदूंची उपस्थिती
     बार्शी (जिल्हा सोलापूर), ८ फेब्रुवारी (वार्ता.) - सनातन संस्था खर्‍या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहे. भोंदु बाबा कसे ओळखावे, याविषयी जागृती व्हावी म्हणून ग्रंथ प्रकाशित केला आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यांमध्ये त्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. सनातन संस्था नुसती श्रद्धा शिकवत नाही, तर ती आम्ही जगून दाखवतो. आम्हाला माहीत आहे की, अंधश्रद्धा काय आहेत. त्या आम्हाला कोणी शिकवू नये. सनातन संस्थेवर सातत्याने बंदीची मागणी केली जाते. संस्थेवर बंदी घातली, तरी कार्य बंद पडेल, आश्रम बंद पडतील; मात्र एवढी वर्षे साधना करून आध्यात्मिक बळ प्राप्त केले, ईश्‍वरी साक्षात्काराच्या अनुभूती घेतल्या आहेत, त्या तुम्ही हिरावून घेऊ शकणार आहात का ? म्हणून आम्ही अशा फुसक्या आणि मानसिक धमक्यांना भीक घालत नाही, असे परखड मत सनातनच्या संत पू. (कु.) स्वातीताई खाडये यांनी व्यक्त केले.

भाजप आणि संघ मुसलमानांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील ! - इंद्रेश कुमार

भाजप आणि संघ यांनी हिंदूंच्या उन्नतीसाठीही प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     जम्मू - देशातील मुसलमानांची उन्नती आणि उत्कर्ष यांसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहेत, असे प्रतिपादन संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
     इंद्रेश कुमार म्हणाले की, संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या विभागाच्या माध्यमामधून रोजगार, योग्य शिक्षण, घरे अशा विविध माध्यमांमधून मुसलमानांच्या उन्नतीसाठी काम केले जात आहे. मुसलमानांच्या गरिबीस विविध राजकीय पक्षांचे अनुनयाचे राजकारण कारणीभूत आहे. मुसलमानांसाठी भारत हा सर्वोत्तम देश असून येथे इतर समुदायांप्रमाणेच मुसलमानांचीही भरभराट होईल. (असे हिंदूंसाठी जगातील एखाद्या देशाच्या संदर्भात कधी ऐकायला येते का ? - संपादक)

दादरी प्रकरणाला अवास्तव प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे गोरक्षक प्रशांत पुजारीच्या हत्येच्या वेळी कोठे होती ? - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

नगर येथील सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ 
महाराष्ट्रच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम
दीपप्रज्वलन करतांना श्री. अभय वर्तक
     श्रीरामपूर (नगर) - आज हिंदुत्व हा विषय आला की, लगेच प्रतिगामी म्हटले जाते. हिंदुत्वावर टीका केली की, लगेच त्याला पुरोगामी म्हटले जाते. भाग्यनगर येथे रोहित वेमुला याने आत्महत्या केली, तर तो दलित आहे; म्हणून देशभरात आंदोलने केली जात आहेत; मात्र त्याच्या आदल्या दिवशी पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ धर्मांधांनी सावन राठोड याला हिंदु आहे, म्हणून जाळले. दादरीमध्ये एका मुसलमानाची हत्या झाल्यावर निधर्मीवादी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी अवास्तव महत्त्व दिले; पण त्याच वेळेला कर्नाटकातील गोरक्षक प्रशांत पुजारी यांची निर्घृण हत्या झाली, तेव्हा ही प्रसिद्धीमाध्यमे कोठे होती ?

मराठी उद्योजकांनी अर्थसामर्थ्याची साधना करावी ! - रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई 
यांच्या मी कोण या पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन
मी कोण ? पुस्तकाचे प्रकाशन करतांना (डावीकडून) श्री. श्रीनिवास गोंधळेकर, डॉ. गो.बं. देगलूकर,
उत्सवमूर्ती श्री. रविंद्र प्रभुदेसाई, श्री. माधवराव भिडे, सौ. श्‍वेता गानू, श्री. शंतनू भडकमकर आणि श्री. अजय जोशी
     ठाणे - समाजाच्या आत्मनिर्भरतेसाठी समाज आर्थिक सामर्थ्यवान असणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी तरुणांनी, तसेच उद्योजकांनी अर्थसामर्थ्याची साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी येथे केले.

नथुराम गोडसे यांची मंदिरे निर्माण केल्यास ती मंदिरे तरुण उद्ध्वस्त करतील ! - आमदार अमरींदसिंग राजा ब्रार यांची धमकी

     कोल्हापूर - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी यांसह अन्य नेत्यांवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण, अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) माध्यमातून कारवाई चालू आहे. भाजप सत्तेच्या माध्यमातून रा.स्व. संघाची विचारप्रणाली लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संघ मोहनदास गांधी यांना देशाबाहेर हाकलून देण्याची रणनीती अवलंबत आहेत. आता नथुराम गोडसे यांचे मंदिर उभारण्याचा डाव आखला आहे. गोडसे यांची मंदिरे निर्माण केल्यास ती उद्ध्वस्त करण्याचे काम तरुण करतील, अशी धमकी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदसिंग राजा ब्रार यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपशासित हरियाणात आता विदेशी पाहुण्यांना गोमांस भक्षणासाठी विशेष परवाना मिळणार !

गोहत्याबंदी कायदा करणार्‍या हरियाणाच्या खट्टर शासनाचे एकाएकी घुमजाव !
     नवी देहली - मागील वर्षी गोवंश रक्षणासाठी कठोर कायदा करणार्‍या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या मूळ भूमिकेत एकाएकी घुमजाव केला असून गोमांस भक्षणासाठी विदेशी पाहुण्यांना विशेष परवाना देण्याची सिद्धता दर्शवली आहे.
१. मुसलमानांना देशात रहायचे असेल, तर त्यांनी गोमांस खाणे सोडले पाहिजे, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री खट्टर यांनी राज्यात गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक कायदा पारित केला होता.
२. या कायद्याच्या अंतर्गत राज्यात गोवंशाची हत्या केल्यास ३ ते १० वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपये दंड, पशूवधगृहांसाठी गायींची निर्यात करणार्‍याला ३ ते ७ वर्षे कारावास आणि ३० ते ७० सहस्र रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाची हिंदुत्वादी संघटनांनी प्रशंसाही केली होती, तर काही मुसलमानांच्या संघटनांनीही याचे स्वागत केले होते.

(म्हणे) उपवासामुळे महिलांना रक्तक्षयाची लागण !

संभाजी यादव यांची मडगाव (गोवा) येथील व्याख्यानमालेत मुक्ताफळे
     मडगाव, ८ फेब्रुवारी (वार्ता.) - परमेश्‍वरावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भारतातील अनेक महिला उपवास करतात. जितका उपवास कडक, तितकी श्रद्धा अधिक, असे त्या मात्रेचे प्रमाण असते; मात्र उपवासामुळे महिलांना रक्तक्षयाची (ऍनिमिया) लागण होते आणि त्या आजारी पडतात, अशी मुक्ताफळे संभाजी यादव यांनी उधळली. मडगावच्या रवींद्र भवन येथे संघर्ष सन्मान या व्याख्यानमालेत यादव यांचे हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हे व्याख्यान झाले. (आयुर्वेदातही प्रकृतीस्वास्थ्यासाठी उपवास करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या उपवासांमुळे भक्ताला आध्यात्मिक आणि शारीरिकही लाभ होतात. असे असतांना संभाजी यादव यांचे हे अज्ञानमूलक वक्तव्य संतापजनकच आहे ! असे सुधारक अन्य पंथियांच्या कडक रोजाविषयी काहीच का बोलत नाहीत ? - संपादक) 

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

राजकीय अनास्थेमुळे मराठीची कोंडी - मधु मंगेश कर्णिक यांची खंत

मराठी भाषा केंद्राचा प्रस्ताव सहा वर्षांपासून धूळ खात !
     मुंबई - मराठीच्या जतन-संवर्धनासाठी सहा वर्षांपूर्वी मराठी भाषा केंद्राचा ३०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र याविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या राजकीय अनास्थेमुळे मराठीची कोंडी झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     देशातील प्रत्येक राज्यांत भाषांची अस्मिता जोपासणारी भाषा केंद्रे आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रात असे केंद्र नाही, हे लाजिरवाणे आहेे. मराठीच्या संवर्धनासाठी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात मराठी भाषा केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रशस्त केंद्रात मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी, तसेच राज्याच्या कानाकोपर्‍यातील बोलीभाषांचे जतन करण्यासाठी उपक्रम राबवण्यास सुचवण्यात आले होते.

नैतिक दायित्व पार पाडा !


श्री. पारस राजपूत
     केवळ सैन्य आणि पोलीस रक्षणासाठी आहेत, असे म्हणून चालणार नाही; कारण जेव्हा काश्मिरमध्ये हिंदूंचे हत्याकांड झाले, बांगलादेशात लक्षावधी हिंदू मारले गेले, त्या वेळीही सैन्य आणि पोलीस होतेच. त्यामुळे आपण भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून आपले नैतिक दायित्व पार पाडायला हवे.- श्री. पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळसंत तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट करण्याच्या नावाखाली अनुदान लाटणार्‍यास अटक

संतांच्या नावाखाली अनुदान लाटणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
     मुंबई - चित्रपटाच्या नावाखाली शासनाचे १० लक्ष रुपयांचे अनुदान लाटणार्‍या अजित सारंग याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. संत तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट तयार करण्यासाठी शासनाकडून त्यांच्या संस्थेला पहिल्या टप्प्यात १० लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
१. अजित सारंग प्रॉडक्शनने वर्ष २००५ मध्ये संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ५० लक्ष रुपयांचे अनुदान संमत करून घेतले.
२. त्यापैकी १० लक्ष रुपयांचा पहिला हप्ता त्यांना शासनाकडून देण्यात आला. ३ वर्षे उलटूनही चित्रपटाच्या संदर्भात काहीच हालचाली दिसत नसल्याने अनुदान म्हणून दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले.
३. वर्ष २०१० साली लवाद स्थापन करून या प्रॉडक्शनच्या अजित सारंग यांना नोटीस बजावण्यात आली

रोहतक (हरियाणा) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले !

 • ३ मांस बंदी बनवले 
 • धर्मांतर आणि विवाह करण्याचा प्रयत्न
    रोहतक (हरियाणा) - येथे नवीद अहमद या धर्मांधाने एका हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले. तिला ३ मास बंदी बनवले आणि धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला. यासाठी नकार दिल्यावर तिला अमानुष यातना देण्यात आल्या. पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून नवीनच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे; मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
१. येथील आर्यनगरमध्ये रहाणारा नवीद अहमद अनेक दिवसांपासून पीडितेला त्रास देत होता. 
२. गेल्या मार्चमध्ये त्याने फूस लावून तिला नांगलोई येथे नेले. तेथे तिच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या घेतल्या. 

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या रिक्शा आणि पुणे महानगर परिवहन यांचे १ कोटी ८० लक्ष रुपये थकवले

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचा ढिसाळ कारभार !
      पुणे - महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी आणि गुणी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. मंडळाच्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत आणि परत घरापर्यंतच्या प्रवासासाठी पुणे महानगर परिवहनच्या बसेस, तर काही शाळांमध्ये रिक्शा यांची व्यवस्था केली आहे. ही सुविधा पुरवणारे परिवहन प्रशासन आणि रिक्शाचालक या दोघांचे मिळून १ कोटी ८० लक्ष रुपये शिक्षण मंडळाने थकवले आहेत. ही थकबाकी शहरातील ११ क्षेत्रीय कार्यालयांची आहे. हा निधी मिळत नसल्यामुळे रिक्शाचालकांमध्ये अस्वस्थता असून थकीत रक्कम मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

गोहत्येवर बंदी आणण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे राजस्थानमध्ये विरोध प्रदर्शन !

राज्यात भाजपचे शासन असतांना गोहत्येवर बंदी का आणली जात नाही ?
     सिकर (राजस्थान) - सिकर जिल्ह्यातील नीमकाथानामध्ये ६ फेब्रुवारीला शिवसेनेने गोहत्याबंदीच्या मागणीसाठी वाहन फेरी काढली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र मोगा यांनी या वेळी सांगितले की, नीमकाथानाच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये गोहत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गोहत्याबंदी करण्याची आम्ही मागणी करत आहोत. तसेच भूमाफियांनी येथील शासकीय मंदिराची भूमी लाटली असून ती विकण्याचा घाट घातला जात आहे. राजकीय संरक्षणामुळे या क्षेत्रात भूमाफियांना मोकळे रान मिळाले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
     या वेळी राज्यपालांच्या नावे उपजिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसेनेने चेतावणी दिली की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.

महाराष्ट्राला बाजीराव पेशवे यांच्यासारख्या अपराजित योद्धयाचे महत्त्व नाही ! - अधिवक्ता विक्रम एडके यांची खंत

     सांगली, ८ फेब्रुवारी (वार्ता.) - जगातील १० प्रथम लढायांपैकी बाजीराव पेशवे यांनी निजामासमवेत पालखेड येथे केलेल्या लढाईचा समावेश आहे. बाजीराव पेशवे यांच्यावर परदेशात अभ्यासक्रम आहे, तसेच पुस्तकेही निघाली आहेत. त्यांच्यावर इंग्रजीत चरित्र आहे. त्यांच्या लढायांना इंग्रज अधिकारी ग्रँट डफ यांनी मास्टरपीस, अशी उपाधी दिली आहे. बाजीराव पेशवे यांची युद्धनीती अजोड होती. अशा पराक्रमी बाजीराव पेशव्यांचे चरित्र आम्ही दुर्दैवाने मस्तानीपुरते सीमित केले. त्यामुळे बाजीरावांसारख्या अद्वितीय आणि अपराजित योद्धाचे महत्त्व महाराष्ट्राला नाही, अशी खंत महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे इतिहास तज्ञ समितीचे सदस्य अधिवक्ता विक्रम एडके यांनी व्यक्त केली. ते ब्राह्मण सभा सांगली आणि लोकमान्य टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मस्तानी पल्याडचे बाजीराव या विषयावर बोलत होते. हे व्याख्यान लोकमान्य टिळक स्मारक येथे पार पडले.
     काश्मीरमधील हिंदूंचा निर्वंश झाला, तरी झोपून राहिलेल्या सर्वत्रच्या हिंदूंवर मुंबईसारखीच स्थिती सर्वत्र येईल. काश्मीरमधील हिंदूंचा निर्वंश होतांना बघ्याची भूमिका घेऊन पाप केल्याची ही हिंदूंना शिक्षाच आहे !

श्रीरामपूरच्या (जिल्हा नगर) मोटार वाहन निरीक्षकांवर वाळू तस्करांकडून जीवघेणा हल्ला

वाळू तस्करांच्या मुसक्या शासन केव्हा आवळणार ?
      राहुरी (नगर) - श्रीरामपूरचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत थोरात हे ६ फेब्रुवारी या दिवशी राहुरी खुर्द येथील मुळा नदीपात्रात छापा टाकण्यासाठी गेले होते. त्या वेळी वाळू तस्करांनी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कंबरेचा खुबा आणि उजव्या हाताच्या खांद्याचे हाड मोडले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
१. प्रशांत थोरात हे आपले सहकारी अधिकारी शिवानी सोमवंशी यांच्या समवेत मुळा नदीपात्रात कारवाई करण्यासाठी गेले होते.
२. या वेळी थोरात यांनी वाळू भरलेली वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाळू भरलेले वाहन घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोरात हे वाळूच्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले.

वयाच्या ७६ वर्षे शरद फडके यांची जीर्ण झालेला भगवा ध्वज पालटण्याची तळमळ !

असे धर्माभिमानी सर्वत्र हवेत !
      सांगली, ७ फेब्रुवारी (वार्ता.) - राजवाडा चौक येथे दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर एक भगवा ध्वज आहे. गेले अनेक मास हा ध्वज न पालटल्यामुळे जीर्ण झाला होता. ही गोष्ट या परिसरात रहाणारे फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद रामचंद्र फडके यांच्या लक्षात आली. प्रारंभी अनेकांनी त्यांना या संदर्भात दाद दिली नाही. अखेर शिवसेनेचे नगरसेवक श्री. गौतम पवार यांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन हा झेंडा पालटला. (जीर्ण झालेला भगवा ध्वज पालटण्यासाठी वयाच्या ७६ व्या वर्षीही प्रयत्न करणारे श्री. शरद फडके हे आजच्या तरुणांसाठी आदर्शच आहेत. विषय समजल्यावर यावर तात्काळ कृती करणार्‍या श्री. गौतम पवार यांचेही अभिनंदन ! - संपादक)

उत्तरप्रदेशात नेत्याच्या विजयाच्या प्रीत्यर्थ समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवेत केलेल्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू !

 • दादरी प्रकरणात हिंदूंना आतंकवादी, असहिष्णु ठरवणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी आता कुठल्या बिळात लपले आहेत ? 
 • केंद्रशासनाने उत्तरप्रदेशचे शासन विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !
 • कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणार्‍या समाजवादी पक्षावर बंदी घालण्याची मागणी कोणताही पुरोगामी समाजवादी का करत नाही ?
     शामली - येथील कैराना गावात नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार नफीसा विजयी झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केला; मात्र यात एक ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अमेठी ते शामली येथे विजयानंतर अशाच प्रकारे बंदुकीतून गोळीबार करत आनंद साजरा करण्यात आला. मुजफ्फरनगरच्या कैरानामध्ये पक्षाचे नेते गयूर अहमद यांच्या विजयानंतरही हवेत गोळीबार करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा गोळीबार केला जात होता आणि पोलीस केवळ मूकदर्शक बनले होते. (राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता आल्यानंतर राज्यकर्त्यांच्या घरगड्याप्रमाणे वागणारे पोलीस कधीतरी कारवाई करतील का ? अशा पक्षांचे नेते दुसरीकडे स्वतःला लोकशाहीचे रक्षणकर्ते असल्याचा आव आणत असतात ! - संपादक)

आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे पाकिस्तानच ! - न्यूयॉर्क टाइम्स

पाकचे जिहादी अमेरिकेच्याच पैशांवर पोसले गेले आहेत आणि या जिहाद्यांवर अमेरिकेने कधीही 
कारवाई केली नाही आणि कारवाईसाठी पाकवर दबाव आणला नाही, हेही न्यूयॉर्क टाइम्सने 
सांगितले पाहिजे ! 
पाकशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चपराक !
      न्यूयॉर्क - आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे केवळ पाकिस्तानच असून या देशाची गुप्तचर संस्था आयएस्आय ही सर्व जिहादींची व्यवस्थापक म्हणून काम करत असते. इसिससारख्या जहाल आतंकवादी संघटनेला मोठे करण्यातही आयएस्आयचाच हात असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, असे वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या न्यूयॉर्क टाइम्स दैनिकाने ७ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित केले आहे.

पुरस्कार परत करणे म्हणजे पुरस्कार देणार्‍यांचा अपमान ! - सौ. अमृता देवेंद्र फडणवीस

पुरस्कार वापसी करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     पुणे, ८ फेब्रुवारी - पुरस्कार हे त्या व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेेखनीय कामगिरीसाठी दिले जातात. त्यामुळे ते परत करणे, म्हणजे प्रसाद परत करण्यासारखे आहे. प्रसाद हा आपण कधीच परत करत नसतो. त्याचबरोबर एखाद्या घटनेला विरोध म्हणून पुरस्कार परत करणे योग्य नाही. पुरस्कार परत करणे, म्हणजे ज्यांनी तो पुरस्कार दिला आहे, त्यांचा अपमान आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सौ. अमृता फडणवीस यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

कडक सुरक्षाव्यवस्था असणार्‍या काशी विश्‍वनाथ मंदिराजवळ झालेल्या गोळीबारात एक जण घायाळ

कुचकामी पोलीस यंत्रणा ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
     वाराणसी - येथील विश्‍वनाथ मंदिराजवळील त्रिपुरा भैरवी यलो भागात ७ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या गोळीबारात एक जण घायाळ झाला. या वेळी ६ गोळ्या झाडण्यात आल्या. घायाळ झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. विश्‍वनाथ मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर ही घटना घडली. येथे कडक बंदोबस्त असतो, तरीही ही घटना घडली. गुंड ज्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते, त्याला गोळी न लागता अन्य एका व्यक्तीला गोळी लागली. ही घटना वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. (गुंडांच्या कारवायाही रोखू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना कसे रोखणार ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

आता मोदी शासनाने पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी भारतियांची अपेक्षा आहे !
     २६/११ ला मुंबई येथे झालेल्या जिहादी आक्रमणातील आतंकवाद्यांना पाकिस्तानातच प्रशिक्षण मिळाले होते, असे या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याने विशेष न्यायालयासमोर सांगितले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 26/11 ke Mumbai akramanke atankiyonko Pak me hi prashikshan mila tha.- David Hadley
Kya ab to Modi sarkar Pak par kathor karyavahi karegi ? 

जागो ! : २६/११ के मुंबई आक्रमण के आतंकियों को पाक में ही प्रशिक्षण मिला था.- डेविड हेडली
क्या अब तो मोदी सरकार पाक पर कठोर कार्यवाही करेगी ?

(म्हणे) भाजप राजकीय स्वार्थासाठी हिंदु धर्म आणि धर्मांधता यांची सरमिसळ करत आहे ! - माकप

साम्यवादी पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी किती हिंदुत्ववाद्यांना ठार केले, हे त्यांच्याच नेत्याने 
यापूर्वी सांगितले आहे, याविषयी माकपवाल्यांना काय म्हणायचे आहे ? 
     रोहतक (हरियाणा) - येथे एका कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी म्हणाले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःच्या तुच्छ राजकीय लाभासाठी हिंदु धर्म अन् धर्मांधता यांची सरमिसळ करत आहेत. हे समाजासाठी घातक आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाने धर्मांधता आणि संघाची विचारधारा यांवर मात केली होती. यामुळेच धर्मांध नथुराम गोडसेने गांधी यांची हत्या केली. आजही संघ आणि त्यांचे सहकारी गोडसे यांना आदर्शाच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न करतात, हे देशासाठी दुर्दैवी आहे. (रशिया आणि चीन येथील क्रूर साम्यवादी नेत्यांचा आदर्श ठेवणार्‍यांनी हिंदूंनी कोणता आदर्श ठेवावा, हे सांगू नये ! - संपादक)

शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभरात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू ! - अमेरिकेच्या विश्‍वविद्यालयांचे संशोधन

लोकहो, अशा शीतपेयांवर बंदी घालण्याची केंद्रशासनाकडे मागणी करा !
    वॉशिंग्टन - हॉवर्ड विश्‍वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनातून शीतपेयांच्या व्यसनामुळे जगभात प्रतिदिन ५०४ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. 
१. शीतपेय, डबाबंद फळांचा रस (ज्यूस) आणि आरोग्यवर्धक पेय (हेल्थ ड्रिंक) पिण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याबरोबरच इंसुलिनचा परिणाम अल्प होतो, तसेच व्यक्तीला मधुमेह आणि हृदयाशी निगडित आजार होतात. 
२. अमेरिकेच्या टफ्ट्स विश्‍वविद्यालयाने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून शीतपेयांच्या व्यसनामुळे मधुमेह झाल्याने प्रतिवर्षी १ लक्ष ३३ सहस्त्र लोकांचा मृत्यू होतो, असे लक्षात आले आहे.

पुण्यात धर्मांध प्रियकराच्या साथीने आईकडून मुलाची हत्या

     पुणे, ८ फेब्रुवारी - अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आईने धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने स्वत:च्या १५ वर्षांच्या निकोलस उपाख्य निकू जोसेफ या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे ७ फेब्रुवारी या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणी वरिता उपाख्य ऋति जोसेफ आणि युनूस रहेमत अली (मुंबई) यांच्याविरोधात हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हे दोघेही पसार झाले असून त्यांचा तपास चालू असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.

जुन्या विमानांच्या वापरामुळे अपघातांना निमंत्रण ! - एअर इंडियाचे वैमानिक

     नवी देहली - एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार २५ वर्षांहून जुन्या झालेल्या मात्र सध्या वापरात असणार्‍या एअरबस ३२० जातीच्या विमानांच्या वापराच्या संदर्भात एअर इंडियाच्या वैमानिकांनी चेतावणी दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या विमानांचा उपयोग अपघातांना कधीही निमंत्रण देणारा ठरू शकतो. दुसरीकडे एअर इंडियाचे म्हणणे आहे की, ही विमाने आताही सुस्थितीत आहेत. पुढील २-३ वर्षे ती वापरण्यायोग्य आहेत. (मिगसारख्या भारतीय लढाऊ विमानांप्रमाणे एअर इंडियाची प्रवाशांची वाहतूक करणारी विमानेही उडत्या शवेपट्या होऊ नयेत, अशीच जनतेची आणि वैमानिकांची इच्छा आहे ! त्यामुळे एअर इंडियाने याकडे लक्ष दिले पाहिजे ! - संपादक)गोव्यातील वान्शी बेटावरील भूमीची विक्री करून चर्चसंस्थेने घोटाळा केल्याचा स्थानिक ख्रिस्त्यांचा आरोप

स्थानिकांची फसवणूक करून त्यांची भूमी विकणारी लुटारू चर्चसंस्था !
     पणजी - दिवार बेटाजवळील वान्शी बेटाच्या भूमीची चर्चने विक्री केली असून, या विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप वान्शी बेटावरील स्थानिक ख्रिस्त्यांनी केला आहे. चर्चसंस्थेने विश्‍वासघात केल्याचा आरोप वान्शी बेटावरील ख्रिस्ती करत आहेत.
     स्थानिक नागरिक जॉन फर्नांडिस यांच्या मते वान्शी हे एक सुंदर बेट असून त्या ठिकाणी काही हिंदू आणि ख्रिस्ती लोक रहात आहेत. याठिकाणी २०० वर्षे जुनी घरे आहेत, तसेच तेथे आता सहाव्या पिढीतील लोक रहात आहेत. वान्शी बेटातील बंधारे मोडून टाकल्याने स्थानिकांना बेटावर आता काहीही पिकवता येत नसून त्यांना आता दिवाडी गावावर अवलंबून रहावे लागत आहे. तरीही वान्शी बेटावर वास्तव्यास असलेले लोक तेथेच रहाणे पसंत करत आहेत. चर्चने वान्शीवासियांचा विश्‍वासघात केला आहे.

ओसामा बिन लादेन जिवंत आहे ! - अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांचा दावा

     नवी देहली - अल कायदाचा प्रमुख आणि कुख्यात जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन जिवंत आणि ठणठणीत आहे. त्याविषयी माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, असा दावा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांनी केला आहे. (अमेरिकेने ज्या पद्धतीने ओसामा बिन लादेन याला ठार करण्याची गोपनीय कारवाई केली आणि त्याचा मृतदेह खोल समुद्रात फेकल्याचे सांगितले, ते पहाता स्नोडेन याच्या माहितीत तथ्य आहे, असे कोणी म्हटल्यासे चुकीचे ठरू नये ! - संपादक)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले परिवर्तन (क्रांती) आपल्याला समाजात आणायचे आहे ! - श्री. दत्ता नाईक, गोवा

२८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी भारतातील सामाजिक क्रांती 
आणि सावरकरांचे योगदान या विषयावरील चर्चासत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय 
सदस्य श्री. दत्ता नाईक यांनी मांडलेले विचार
श्री. दत्ता नाईक
     आजचा सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान, हा आतापर्यंत झालेल्या विषयांपेक्षा थोडा वेगळा विषय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारक होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट माझ्यासमोर पालटली (बदलली) पाहिजे. मी असतांना पालटली पाहिजे. मुष्टीप्रहाराने पालटली, तर मुष्टीप्रहाराने, लत्ताप्रहाराने पालटली, तर लत्ताप्रहाराने, शस्त्राने पालटली, तर शस्त्राने; पण ती पालटली पाहिजे, असे त्यांना वाटे. अशी माणसे खूप मोठी असतात. ती आपल्या पचनी पडत नाहीत. एखाद्या वेळी राजकीय क्रांतीच्या बाबतीत हे मान्य होऊ शकते; पण सामाजिक क्रांती हा फार कठीण विषय आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरात लाडू प्रसादाचे नव्याने निविदा काढण्याचा निर्णय !

     कोल्हापूर, ८ फेब्रुवारी (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानाच्या वतीने प्रसादाच्या लाडूसंदर्भात नव्याने निविदा काढण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडे लाडू पुरवठा करण्याचा ठेका आहे. त्यांच्याकडून दर्जाहिन आणि क्षमतेपेक्षा अपुरा लाडूपुरवठा होत असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांनी सांगितले. (लाडूच्या प्रसादाविषयी भाविकांच्या अनेक वेळा तक्रारी आल्यानंतर देवस्थान समितीने त्वरित बैठक घेऊन ही निविदा का रहित केली नाही ? आतापर्यंत भाविकांना दिलेल्या निकृष्ट लाडूच्या प्रसादाला ठेकेदार आणि देवस्थान समितीचे संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी उत्तरदायी असल्याने त्यांच्यावर प्रथम कारवाई व्हायला हवी. - संपादक) या आठवड्यात निविदा प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. १५ ऑक्टोबर २०१५ पासून सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडे लाडू पुरवठा करण्याचा ठेका होता; मात्र गेल्या साडेतीन मासांत लाडूचा दर्जा आणि पुरवठा यांविषयी भाविकांच्या तक्रारी वाढल्या. नियमानुसार दीड मासांनी ठेकेदाराला देवस्थानाच्या वतीने नोटीस देण्यात आली; मात्र त्यानंतरही सुधारणा न दिसल्याने नव्याने निविदा काढण्याविषयी बैठकीत निर्णय घेण्यात आला. (पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला उशिरा सुचलेले शहाणपण ! - संपादक)

२०२१ पूर्वी आसाम आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी बांगलादेशी बसल्याचे पहाण्याची दुर्दैवी वेळ येईल !

बांगलादेशी घुसखोरी हा भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका
१. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आसाम आणि बंगालसह ईशान्य भारत पाकचा भाग
बनवण्याचा तत्कालीन मुसलमान नेत्यांचा प्रयत्न !
      वर्ष १९४४ मध्ये भारताचे राज्यपाल जनरल लॉर्ड वेव्हेलनी त्यांच्या व्हॉइसराईज जरनल या पुस्तकात लिहिले होते की, आसामचे मुख्यमंत्री महंमद सदाउल्ला खान हे मोठ्या प्रमाणात बंगालींची घुसखोरी आसाममध्ये करण्याचा आणि पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत होते. वायव्य भारतात मुसलमान बहुसंख्य राज्य असावे, ही कल्पना मुस्लिम लीगचे अध्यक्ष महंमद इक्बाल यांनी १९३० मध्ये मांडली. जानेवारी १९४० पासून जिना यांनी हिंदु आणि मुसलमान यांना दोन राष्ट्रे म्हणूनच ओळखण्यास प्रारंभ केला. पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो मिथ ऑफ इंडिपेन्डन्स या पुस्तकात म्हणतात, आसाम (येथे आसाम म्हणजे ईशान्य भारत आणि पश्‍चिम बंगाल) हा पाकिस्तानचा भाग व्हायला पाहिजे.

शिवरायांचे मावळे बनून आम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना अवश्य करू ! - पू. नंदकुमार जाधव

अकोला येथील हिंदु धर्मजागृती सभेत तीन सहस्रांहून अधिक हिंदूंची एकजूट
 पू. नंदकुमार जाधव
     अकोला, ८ फेब्रुवारी (वार्ता.) - आय्.एस्.आय्.एस्. म्हणजेच इसिसचा जिहादी आतंकवाद एकीकडे अनुभवत असतांनाच हिंदूंना भारतात प्रतिदिन पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाचा अनुभव घ्यावा लागत आहे, ही फार गंभीर गोष्ट आज आपल्या देशामध्ये घडत आहे. त्याला सर्व हिंदूंनी संघटित होऊन उत्तर द्यायला हवे, असे मत सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी अकोला येथील धर्मजागृती सभेमध्ये व्यक्त केले. तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होते.

राजकारण्यांनाच शिरस्त्राणाची आवश्यकता !

     परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार संभाजीनगर पाठोपाठ पुणे, कोल्हापूर याठिकाणीही शिरस्त्राण (हेल्मेट) सक्ती करण्यात आली़ आहे. या सक्तीला दोन्ही शहरांमधून विरोध चालू झाला आहे़. अनेक नागरिक आणि सर्वपक्षीय राजकारणी या सक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. 
     शिरस्त्राण सक्तीबरोबरच पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी काम करायला हवे, मद्यपान करून गाडी चालवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे हे थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना राबवायला हवी. शासनाने चांगले रस्ते बनवावेत, अशी प्रतिक्रियाही अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि राजकीय पुढारी यांच्याकडून येत आहेत. काही जणांनी तर शिरस्त्राण सक्तीला विरोध करण्यासाठी हास्यास्पद विधाने केली आहेत. अपघात झाल्यावर डोक्यावरील शिरस्त्राण मुंडके कापून काढायचे का ? शिरस्त्राण सक्तीमुळे चोर्‍या आणि हत्या करण्याचे प्रमाण वाढेल. कारण चोराचा चेहरा ओळखताच येणार नाही, अशाही हास्यास्पद प्रतिक्रिया वाचायला आणि ऐकायला मिळाल्या. एकूणच या सर्व प्रतिक्रियांवरून लक्षात येईल की, निवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे.

हिंदु राष्ट्र घातक, तर देशाला पोषक काय ?

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे, तो देशाला घातक आहे, असे विधान केले. त्यामुळे हिंदु विरोधकांना हिंदूंवर पर्यायाने सनातन संस्थेवर टीका करण्याचे अजून एक कोलीत मिळाले. काहींना शरद पवार आवडो किंवा न आवडो; परंतु त्यांनी केलेले विधान आवडल्याचे ते सांगत आहेत. तथाकथित विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी या संदर्भात केलेली टिप्पणी बरेच काही सांगून जाते. ते म्हणतात शरद पवारांचे प्रथम अभिनंदन करतो, कारण ते आज खरे बोलले आहेत. कुमार सप्तर्षींना पवारांचे विधान आवडणार यात तीळमात्र शंका नाही. कारण सप्तर्षींचा इतिहास पाहिला, तर हिंदु धर्मावर एकांगी टीका करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भेद इतकाच आहे की, पवारांच्या तोंडून सप्तर्षींची मन की बात बोलली गेली. सप्तर्षींनी पवारांचे कितीही अभिनंदन केले, तरी देशातील जनताच काय पण खुद्द शरद पवारसुद्धा त्याची नोंद घेणार नाहीत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
      राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

शिवसंहितेचे पान पहातांना आणि पानाची प्राणप्रतिष्ठा करतांना आलेली अनुभूती

१. शिव-पार्वती यांचा संवाद आठवून भावजागृती होणे
     शिवसंहितेचे पान पहातांना अंगावर रोमांच आले आणि मनाला पुष्कळ आनंद होत होता. त्यावर लिहिलेली परमपूज्य, प्रभात हे शब्द वाचून पू. (डॉ.) उलगनाथन् यांनी जीवनाडी वाचनाच्या वेळी शिव-पार्वती यांच्याविषयी सांगितलेला संवाद आठवला आणि भाव जागृत झाला.
२. कैलास पर्वतावर शिव-पार्वती यांच्या 
चरणी फूल आणि अक्षता वाहत असल्याचे जाणवणे
      शिवसंहितेच्या पानाची प्राणप्रतिष्ठा रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात २०.७.२०१५ या दिवशी चालू होती. त्या वेळी मी तेथून जात असतांना क्षणभर ध्यानमंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या वेळी पुरोहितांनी फूल आणि अक्षता वाहण्यासाठी दिल्या. फूल आणि अक्षता वाहतांना मी त्या शिवाच्या चरणी वाहत आहे, असे दिसले. तसेच प्रार्थना करत असतांना मी ध्यानमंदिरात नसून कैलास पर्वतावर आहे आणि तेथे सर्व बर्फाच्छादित अन् एकदम शांत आहे, असे दिसले. आतून पुष्कळ शांत वाटत होते. हा सुवर्णयोगही भगवान शिवाच्या कृपेनेच मला लाभला.

विविध जिल्ह्यातील साधकांकडून दत्तजयंतीच्या प्रदर्शनसेवेत झालेल्या चुका

      २४.१२.२०१५ या दिवशी दत्तजयंतीनिमित्त विविध जिल्ह्यांत सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने, ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्या सेवेत साधकांकडून झालेल्या चुका पुढे देत आहोत.
१. पूर्वनियोजनातील चुका
१ अ. अतिरिक्त विशेषांकांची मागणी न करणे : नांदेड येथील श्री. उत्तम मॅनमवार यांच्याकडे दत्तजयंतीच्या प्रदर्शनाची सेवा होती. त्यांनी यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे कक्षावर वितरित करण्यासाठी विशेषांक मागवले नाहीत. त्यामुळे त्या माध्यमातून जिज्ञासूंपर्यंत पोचता आले नाही. (कक्षावर १०० विशेषांक वितरित होऊ शकले असते.)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

कु. सर्वमंगला मेदी

उतारवयातही समष्टी साधना करण्याची तीव्र तळमळ असणारे श्री. हनुमंत शिंदे !

सौ. जान्हवी रमेश शिंदे
     श्री. हनुमंत शिंदे हे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचे वडील आणि सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. जान्हवी शिंदे यांचे सासरे आहेत. सौ. जान्हवी शिंदे यांना त्यांच्या सासर्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या सहवासात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
     मागील दहा वर्षांच्या तुलनेत गेल्या काही मासांत बाबांमध्ये (सासर्‍यांमध्ये) मला आमूलाग्र पालट जाणवला. त्यांना पूर्वीपासूनच तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत असे. या त्रासातही त्यांनी चिकाटीने साधना केली. एका संतांना त्यांचे छायाचित्र दाखवले असता त्यांनी बाबांचा त्रास अल्प झाल्याचे सांगितले. त्यांच्या स्वभावातही पुष्कळ पालट झाला आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.


श्रीकृष्णाच्या अखंड नामजपाने आणि संतांच्या कृपेने मृत्यूच्या दाढेतून परत आलेले पनवेल येथील श्री. हनुमंत शिंदे !

१. मोठी शस्त्रक्रिया होऊनही सेवा 
मिळाल्यावर तहान-भूक विसरून सेवा करणे 
श्री. हनुमंत शिंदे आणि सौ. कमल हनुमंत शिंदे
      श्री. हनुमंत शिंदे (वय ७३ वर्षे) (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचे वडील) हे पनवेल येथे रहात असून ते देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात नियमित सेवेसाठी जात असत. तेथे ते एकही क्षण वाया न घालवता विभागात अगदी मनापासून सेवा करत असत. २ वर्षांपूर्वी गावी गेलेले असतांना वाहनास अपघात होऊन त्यांच्या कमरेची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर त्यांना वॉकर घेऊन चालणे अनिवार्य झाले. त्यामुळे आश्रमात जाऊन सेवा करणे शक्य होईना. उत्पादन विभागात तातडीची सेवा असते, तेव्हा त्यांना घरी सेवा आणून दिली जात असे. त्या वेळी अगदी तहान-भूक विसरून ती सेवा पूर्ण होईपर्यंत दुसरे काहीही करत नसत. ही सेवा सातत्याने मिळत नसल्याने ते उर्वरित वेळेत नामजप करत असत. आधी वहीत लिहून अन् नंतर नामजप यंत्राने त्यांचा सतत नामजप चालू असे. यामुळे त्यांच्या खोलीतील त्रासदायक स्पंदने उणावून चांगली स्पंदने जाणवू लागली. काही साधकांनीही घरी आल्यावर सांगितले, त्यांच्या खोलीत चांगले वाटते.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या ग्रंथामध्ये पुढील सुधारणा करा !

साधकांना सूचना
     प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (आवृत्ती पहिली, २४.१२.२०१५) या ग्रंथात पृ. ८० वरील सारणीच्या खाली पुढील वाक्य छापून आले आहे.
१. पंचमहाभूतांचे नामजप : पंचमहाभूतांनी शरीर बनलेले असते. या महाभूतांच्या कार्यांत असंतुलन निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. असंतुलित झालेल्या महाभूताचा नामजप केल्यास ते महाभूत शरिरात संतुलित होण्यास साहाय्य होते.
      हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचावे.
१. पंचमहाभूतांचे नामजप : महाभूताच्या कार्यात घट झाल्याने निर्माण होणार्‍या विकारांत त्या महाभूताचा नामजप लाभदायक ठरतो; मात्र महाभूताच्या कार्यात विकृत वाढ झाल्याने निर्माण होणार्‍या विकारांत त्याच महाभूताचा नामजप केल्यास विकार वाढू शकतो.
     या सुधारणेचे स्टिकर लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानुसार साधकांनी वितरित करण्याच्या ग्रंथांमध्ये सुधारणा करावी.

केवळ त्यांच्याप्रती कृतज्ञ रहायचे आहे ।

डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे
साधनेच्या वाटेवर कधीच थांबायचे नाही ।
ध्येयाने प्रेरित होऊन तुला सतत पुढेच जायचे आहे ॥ १ ॥
कितीही अडथळे आले, तरी मात त्यावर करायची आहे ।
गुरुचरणांपर्यंत पोचण्यासाठी सतत तुला धडपडायचे आहे ॥ २ ॥
दोष आणि अहंभाव सोडून स्व तुला अर्पायचा आहे ।
समर्पित भावाने गुरुचरणी तुला विलीन व्हायचे आहे ॥ ३ ॥
हिंदु राष्ट्राची स्थापना अंतरात तुझ्या करायची आहे ।
समष्टीमधे निर्माण करण्यासही सतत तुला तळमळायचे आहे ॥ ४ ॥ 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खाजगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥


संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
प्रकृती आणि पुरुष
१ प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे.
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हा घ्या पुरावा !

संपादकीय 
     डेव्हिड हेडलीने २६/११ प्रकरणात पाकचाच हात असल्याची स्वीकृती ८ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात दिली आहे. त्याबरोबरच त्याने अनेकदा भारतात येऊन राहिल्याचेही सांगितले आहे. २६/११ प्रकरणानंतर भारताने अनेकदा पाकला पुरावे देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती; मात्र पाकने प्रत्येक वेळी काहीतरी थातुरमातुर कारणे सांगत कारवाई करणे टाळले होते. आता स्वतः हेडलीने स्वीकृती दिल्यामुळे पाकचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. त्यामुळेच आतातरी पाक आतंकवाद्यांवर कारवाई करणार का, हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित झाला आहे. खरे तर हा प्रश्‍न वारंवार चर्चेत येतो आणि कालपरत्वे विरून जातो.

हिंदु राष्ट्राची फरफट !

संपादकीय
     एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळची वेगाने ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल होत असल्याचे एका संस्थेच्या अहवालामुळे समोर आले आहे. वर्ष १९५१ मध्ये एकही ख्रिस्ती नसलेल्या या देशात आता ३ लक्ष ७५ सहस्र ख्रिस्ती वास्तव्य करत आहेत. वर्ष २००८ मध्ये जनतेचा प्रचंड विरोध असूनही तेथील माओवादी राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्यघटना लागू केली. राजेशाही नष्ट झाल्यानंतर आलेल्या राजकारण्यांमधील राष्ट्रीयत्वही लोप पावू लागले. पर्यटनाच्या नावाखाली विदेशींना देशात शिरकाव करू देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच परिपाक म्हणून जागतिकीकरणाच्या गतीशी जुळवून घेता घेता आता नेपाळचे हे अधःपतन चालू झाले आहे. साम्यवादाच्या गर्तेत अडकल्यानंतर नेपाळच्या राज्यव्यवस्थेने कधी डोके वर काढले नाही. तेथील पालटती राजकीय समीकरणे तेथील जनतेस उठाव करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळेच आता नेपाळ सातत्याने चर्चेत रहात आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn