Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शनिचौथर्‍याचे सर्वांनीच खालून दर्शन घ्यावे ! - श्री श्री रविशंकर

पुरुषांनाही शनिचौथर्‍यावर प्रवेश करण्यास बंदी
शनिशिंगणापूर येथे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत देवस्थान 
समितीचे विश्‍वस्त, ग्रामस्थ आणि भूमाता ब्रिगेड यांची संयुक्त बैठक
     पुणे - शनिचौथर्‍यावर आता केवळ पुजार्‍यांनीच पूजा करावी आणि अन्य सर्वांनी खालूनच दर्शन घ्यावे, अशी भूमिका आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मांडली आहे. या संदर्भात श्री श्री रविशंकर यांनी शनिशिंगणापूर देवस्थान समितीचे विश्‍वस्त, ग्रामस्थ, तसेच भूमाता ब्रिगेड यांच्याशी चर्चा केली. शनिशिंगणापूर ग्रामस्थ, शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्‍वस्त, सरपंच आदी सर्वांनीच या भूमिकेचे स्वागत केले आहे.
     प्रसिद्धीलोलुपतेपोटी भूमाता ब्रिगेडच्या हटवादी माहिलांनी शनिचौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळण्याच्या संदर्भात आंदोलन चालू केले होते. देवस्थान समितीने कोणत्याही परिस्थितीत मंदिराच्या प्रथा-परंपरा पाळण्याची ठाम भूमिका घेतली होती. शनिशिंगणापूर येथे आता बालाजी पॅटर्नप्रमाणे दर्शन म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनीही खालूनच दर्शन घ्यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामंदिराविषयी मन की बात का करत नाहीत ?

प्रयाग येथे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यासह
 १२०० साधू-संतांच्या उपस्थितीत धर्मसंसदेत विचारण्यात आला एकमुखी प्रश्‍न !
पंतप्रधानांनी एकवेळ हिंदूंची, जनतेची इच्छा पूर्ण केली नाही, 
तरी चालेल; परंतु साधू-संतांची इच्छा पूर्ण करावी !
राममंदिराची उभारणी झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्याची चेतावणी !
     प्रयाग - २०१३ मध्ये प्रयाग येथील धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथे झालेल्या धर्मसंसदेत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना राममंदिरावरून प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीविषयी मौन बाळगल्यामुळे रागावलेल्या साधू-संतांनी मोदी यांना राममंदिराविषयी मन की बात का करत नाहीत ?,

पाककडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

     कर्णावती (अहमदाबाद) - पाकने गुजरातनजिक असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेजवळून १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. त्यांच्या २ नौकाही जप्त केल्या असून त्यांना कराचीला नेण्यात आले आहे. या घटनेच्या एक दिवसापूर्वीच भारताच्या तटरक्षक दलाने कच्छच्या जखाऊ तट येथून पाकच्या ११ मच्छिमारांना अटक केली होती. या कारवाईचा सूड म्हणून पाकने भारतीय मच्छिमारांना अटक केल्याचे समजले जाते. सध्या ४४० भारतीय मच्छिमार पाकच्या विविध करागृहांमध्ये बंद आहेत. त्याचबरोबर अनुमाने ८६० नौकासुद्धा पाकच्या कह्यात आहेत.

काँग्रेसच्या गाजियाबाद जिल्हाध्यक्षाने दलित पदाधिकार्‍याचा केला जातीवाचक अपमान !

दलितांचा कैवारी असल्याचे ढोंग करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप !
  • जिल्हाध्यक्षाने म्हटले, तुझे स्थान आमच्या पायांखाली आहे !
  • दलित पदाधिकार्‍याने दिली आत्महत्येची धमकी !
रोहित वेमुला प्रकरणाचे राजकारण करणारे राहुल गांधी याविषयी काही बोलतील का ?
     गाजियाबाद (उत्तरप्रदेश) - येथील काँग्रेसचे अनुसूचित जाती शाखेचे अध्यक्ष जितेंद्र गौर यांच्या विरोधात ते दलित असल्याने काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांचा अपमान केला. स्थानिक जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश शर्मा यांनी गौर यांना उद्देशून केवळ जातीवाचक शब्दच वापरले नाहीत, तर ते दलित असल्याने त्यांना बैठकीतूनही बाहेर काढले.

केंद्रीयमंत्री कलराज मिश्र म्हणतात, राममंदिर महत्त्वाचे सूत्र; परंतु उत्तरप्रदेशमध्ये भाजप विकासाच्या सूत्रावरच निवडणूक लढवील !

     कानपूर (उत्तरप्रदेश) - ६ फेब्रुवारीला केंद्रीयमंत्री कलराज मिश्र कानपूरच्या दौर्‍यावर होते. या वेळी एका कार्यक्रमात ते म्हणाले की, अयोध्येतील राममंदिर भाजपसाठी आरंभापासूनच महत्त्वाचे सूत्र राहिले आहे; परंतु भाजप विकास आणि लोकांच्या समस्या घेऊनच उत्तरप्रदेशच्या २०१७ च्या विधानसभा निवडणुका लढवील. निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील हे पक्ष नेतृत्व ठरवील.
     राममंदिर उभारणीच्या संदर्भात मिश्र पुढे म्हणाले, भाजपचे धोरण आहे की, मंदिराची उभारणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर अथवा लोकांच्या सर्वसंमतीने अथवा संसदेतील दोन तृतियांश बहुमतांच्या आधारे व्हावी.
     या वेळी मिश्र यांना विचारण्यात आले की, साधू-संतांनी राममंदिर उभारणीचा दिनांक घोषित करण्याची मागणी केली आहे. याचे उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, साधू-संत आपल्या समाजासाठी श्रद्धेस पात्र आहेत. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो.

ख्रिस्ती धर्मियांची वाढ होणार्‍या देशांत नेपाळ पहिल्या क्रमांकावर !

नेपाळची वेगाने ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !
     काठमांडू - नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढ होणार्‍या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ख्रिस्ती धर्माविषयी अभ्यास करणार्‍या एका संस्थेच्या अहवालानुसार समोर आली आहे.
१. नेपाळमध्ये वर्ष १९५१ मध्ये एकही ख्रिस्ती नव्हता. त्यानंतर वर्ष १९६१ मध्ये ख्रिस्त्यांची संख्या ४५८ एवढी झाली. वर्ष २००१ पर्यंत ही संख्या १ लक्ष २ सहस्र एवढी होती. आता १० वर्षांनंतर ही संख्या तिपटीने वाढली आहे. सध्या नेपाळमध्ये ३ लक्ष ७५ सहस्र ख्रिस्ती आहेत.

भारत असहिष्णू देश नाही ! - बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

     कोझीकोड - भारत असहिष्णू देश नाही, असे प्रतिपादन बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले. भारतात धर्मनिरपेक्षतावादी केवळ हिंदुत्ववाद्यांनाच प्रश्‍न विचारतात आणि मुसलमान कट्टरतावाद्यांना का सोडतात ? असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. केरळ साहित्योत्सवात तस्लीमा म्हणाल्या, भारत असहिष्णू देश असल्याचे मला वाटत नाही. बहुतांश लोक एकमेकांच्या श्रद्धांविषयी सहनशील असतात, असे मला वाटते. भारतात निर्वासित म्हणून रहाणार्‍या तस्लिमा असहिष्णूता या विषयावरील चर्चेत भाग घेतांना म्हणाल्या, या देशाचा कायदा असहिष्णुतेचे समर्थन करत नाही; मात्र देशात असहिष्णू लोक आहेत. भारतात संघर्ष धर्मनिरपेक्षतावादी आणि धर्मांध, नवीन विचार आणि परंपरा, तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व समजणारे अन् न समजणारे यांच्यात आहे. खोट्या धर्मनिरपेक्षतेवर आधारित लोकशाही कधीही खरी लोकशाही असू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.


केरळच्या स्वामी चिदानंदपुरीजी महाराजांवर माकपप्रणीत संघटनेच्या ५० गुंडांनी आक्रमण केले !

केरळच्या काँग्रेसी राजवटीत शत्रूराष्ट्र पाकिस्तानचे गायक गुलाम अली 
यांचा उदोउदो होतो, तर हिंदूंच्या संतांवर आक्रमण केले जाते, हे लक्षात घ्या !
     आलापुझा (केरळ) - आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात सपर्या धर्म सेवा समितीच्या वतीने हैंदैवम् २०१६ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारीला राज्यातील कोलाथूरच्या अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरीजी महाराज प्रवचनातून हिंदूंना मार्गदर्शन करत होते. या वेळी डीवायएफ्आय(भारतीय लोकतांत्रिक नवयुवक सभा) या माकपप्रणीत संघटनेच्या ५० गुंड कार्यकर्त्यांनी स्वामीजींवर अचानक आक्रमण केले.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे २ सहस्र उपस्थितीत हिंदु धर्मजागृती सभा पार पडली !

व्यासपिठावर डावीकडून श्री. मिलिंद धर्माधिकारी,
पू. (कु.) स्वाती खाडये आणि श्री. अभिजीत देशमुख
धर्मजागृती सभेचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

व्हॅलेंटाईन दिवसाच्या विरोधात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने चालू असलेले योग वेदांत सेवा समितीचे संस्कृती संवर्धनाचे अभियान : मातृ-पितृ दिन !

शनिवारवाड्यावर मातृ-पितृ दिन मंगलमय वातावरणात साजरा ! 
      पुणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) - पाश्‍चात्त्य विकृतीच्या विळख्यातून भारताची युवा पिढी, तसेच भावी पिढी यांची सुटका व्हावी, या उद्देशाने योग वेदांत समितीच्या वतीने प्रतिवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात देशभर व्यापक स्तरावर मातृपितृ दिन साजरा करण्यात येतो. ६ फेब्रुवारी या दिवशी ऐतिहासिक शनिवारवाड्यावर आई-वडिलांची पूजा करून मंगलमय वातावरणात मातृ-पितृ दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी चिकाटीने आणि नेमाने संस्कृती संवर्धनाचे प्रयत्न करण्याचा, तसेच भारताला विश्‍वगुरु बनवण्यासाठी अविरत कार्यरत रहाण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे, समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, तसेच श्री. गुरुमुख नारंग, भागवत कथाकार ज्योतीताई इंगळे, श्री योग वेदांत सेवा समितीचे कार्याध्यक्ष श्री. चेतन चरवड आदी मान्यवर उपस्थित होते.

युनायटेड किंगडममध्ये सश्रद्ध हिंदू आहेत सर्वाधिक सुखी लोक !

  • देवाला रिटायर करा अशी बाष्कळ बडबड करणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !
  • ऊठसूट हिंदु धर्मावर टीका-टिप्पणी करणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे ?
     लंडन - २ फेब्रुवारीला युनायटेड किंगडममधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
१. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, आस्तिक लोक हे नास्तिकांपेक्षा अधिक सुखी आहेत हे स्पष्ट झाले आहे.
२. विविध धर्मीय लोकांचा विचार केल्यास, हिंदु सर्वाधिक सुखी आहेत. सुखाच्या उतरत्या क्रमाने हिंदूंनंतर ख्रिस्ती, शीख, बौद्ध, ज्यू आणि शेवटी मुसलमान लोकांचा क्रमांक लागतो, तर नास्तिकांचा क्रमांक यानंतर लागतो. 
३. हे सर्वेक्षण युनायटेड किंगडममधील तीन लाख लोकांचे विचार ध्यानात घेऊन केले गेले. वर्ष २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालखंडात हे सर्वेक्षण करण्यात आले.
४. हे सर्वेक्षण सुख, जीवनाविषयी समाधान (लाइफ सॅटिस्फॅक्शन), केलेली कृती चांगली झाल्याविषयीची भावना (वर्थव्हाइल) आणि काळजी या चार निकषांच्या आधारे करण्यात आले.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

जळगाव येथील संत बाबा जुड्याराम मंदिराच्या ४ दानपेट्या चोरांनी फोडल्या

असुरक्षित मंदिरे ! मशीद अथवा चर्च या ठिकाणी चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का ?
      जळगाव - चोरट्यांनी येथील सिंधी वसाहतीतील कंवरनगरातील संत बाबा जुड्याराम साहेब मंदिराच्या ४ दानपेट्या फोडून त्यातील ५ सहस्र रुपये लंपास केले. ५ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ही घटना घडली.
१. संत बाबा जुड्याराम साहेब मंदिर दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. त्यांनी संत बाबा जुड्याराम साहेब यांच्या मूर्तीजवळील संगमरवरी दगडामध्ये असलेल्या २ लाकडी दानपेट्या आणि समाधीच्या खालच्या बाजूने असलेल्या २ दानपेट्या फोडल्या.
२. मंदिराचे सेवाधारी रावलमल बालाणी हे ५ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ५.१५ वाजता मंदिरात आले. त्या वेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने विश्‍वस्त मंडळाला याविषयी माहिती दिली.
३. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहरात यापूर्वी २ ठिकाणी चोरट्यांनी मंदिराच्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला होता. (मंदिर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे ? - संपादक)

स्वच्छ भारत करायचा असेल, तर सर्वप्रथम मशिदी आणि मदरसे स्वच्छ करावे लागतील ! - पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळ

श्री. पारस राजपूत
      देशभरातील मशिदी, मदरसे यांच्यामधून भारतविरोधी जिहाद पुकारला जातो. काश्मिरमध्ये इसिसचे झेंडे फडकवले जातात, तर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जातात. जोपर्यंत अशा मशिदी आणि मदरसे भारतात अस्तित्वात आहेत, तोपर्यंत स्वच्छ भारत होऊ शकत नाही. केंद्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला आहे. त्यामुळे स्वच्छ भारत करायचा असेल, तर सर्वप्रथम अशा मशिदी आणि मदरसे स्वच्छ करावे लागतील.


लव्ह जिहाद : केरळमधील मानवतस्करीचे जिहादी जाळे उद्ध्वस्त !

हिंदूंनो, या जिहादपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का ?
     कोची (केरळ) - केंद्रीय अन्वेषण विभागाने हल्लीच येथील मानवतस्करीचे एक जाळे उद्ध्वस्त केल्याची माहिती हाती आली आहे. या माध्यमातून राज्यातील हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले गेले आणि त्यांना अनधिकृतरित्या आखाती देशांत देहव्यापारासाठी पाठवण्यात आले. (यालाच लव्ह जिहाद म्हणतात; पण धर्मनिरपेक्षवाले तो मान्य करायलाच सिद्ध नाही ! - संपादक)
१. केंद्रीय अन्वेषण विभागानेे यासंदर्भात आरोपपत्रही दाखल केले आहे. यांत केरळ पोलिसातील उपनिरीक्षक अब्दुल जब्बार सजीर, अबकारी विभागातील त्याचा भाऊ सजीर आणि त्रिचूर येथील ट्रॅव्हल एजंसी डीअर ट्रॅव्हलचे मालक पी.ए. नियाज आणि पी.के. शहाजहान यांच्या नावांचा उल्लेख आहे. (पोलीस आणि अबकारी विभागातील अधिकारी असलेले धर्मांधही या गैरकृत्यात सहभागी होतात, त्यामुळे हे किती नियोजनबद्ध षड्यंत्र आहे, ते लक्षात येते ! - संपादक)

पंजाबमधील भारत-पाक सीमेजवळ ४ तस्कर ठार

सीमा सुरक्षा दलाची कारवाई
     चंदिगड - पंजाबमधील खेमकरण सेक्टरमध्ये मेहंदीपूर गावाजवळ भारत-पाकिस्तान सीमेवरून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ४ तस्करांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळीबारात ठार मारले आहे. या तस्करांजवळून हेरॉईनची १० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. या हेरॉईनचे मूल्य कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. या चौघांपैकी दोघे जण पाकिस्तानी नागरिक असून दोघे भारतीय नागरिक आहेत. त्यांची ओळख पटवण्यात येत आहे. पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आतंकवादी आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर या भागात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

मासेमारीसाठी अत्याधुनिक नौकांना (पर्ससीन) अनुज्ञाप्ती बंद

राज्यातील दोन लाख पारंपरिक मच्छिमारांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
राज्यातील किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव क्षेत्र
     मुंबई - सागरी किनारपट्टी क्षेत्रात यांत्रिक नौका (पर्ससीन) पद्धतीने मासेमारी करण्यास मर्यादा घालण्यात आल्या असून यापुढे या पद्धतीने करण्यात येणार्‍या मासेमारीसाठी अनुज्ञाप्ती देण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने काढले आहेत. या बरोबरच मत्स्यव्यवसायाचे जतन करण्यासाठी सागरी किनार्‍याची रचना आणि खंडांतर्गत उतार विचारात घेऊन पर्ससीन मासेमारीचे नियमन झाई ते बांदा (सिंधुदुर्ग) दरम्यानच्या चार क्षेत्रांत विविध अंतरासाठी करण्यात आले आहे. यामध्ये जयगड ते बांदा (सिंधुदुर्ग) किनार्‍यापासून २५ मीटर (१२.५ वाव) खोलीपर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापुढील क्षेत्र पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास खुले करण्यात आले आहे.

पद छोटे असले, तरी कर्म मोठे करायला हवे ! - सुश्री रेखा दीदी

डोंबिवली येथे श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने गीता भागवत सत्संगाचे आयोजन !
     डोंबिवली - जसे शबरी लहान होती, पण तिच्या भक्तीमुळे साक्षात भगवान श्रीरामाला तिच्या द्वारी यावे लागले. याप्रमाणे माणसाचे पद छोटे असले, तरी कर्म विशाल करायला हवे, असे मार्गदर्शन प.पू. आसारामजी बापूजींच्या शिष्या सुश्री रेखा दीदी यांनी केले. डोंबिवली पश्‍चिम येथील अरुणोदय शाळेच्या मैदानावर श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने गीता भागवत सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी बसपाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री. दयानन्द किरतकर, भाजपच्या नगरसेविका सौ. विद्या राजेश म्हात्रे आणि शेकडो भक्त उपस्थित होते. सत्संगाच्या अंती सर्वांसाठी महाभंडार्‍याचे आयोजनही करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री योग वेदांत सेवा समितीचे डोंबिवली शहराध्यक्ष श्री. हरीश यादव, इंद्रभान श्रीसागर, तसेच डोंबिवली हिंदी भाषिक परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्‍वनाथ दुबे यांनी योगदान दिले.व्हॅलेंटाईन डे विरोधात विसपुते महाविद्यालय आणि चांगू काना ठाकूर विद्यालय यांना निवेदन

प्राचार्य श्री. विसपुते यांना निवेदन देताना
सौ. गरूड, सौ. सुर्वे आणि सौ. आष्टीकर
     नवीन पनवेल - व्हॅलेंटाईन डेची पाश्‍चात्य कुप्रथा टाळून महान भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन तरूणांनी करावे, यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकुर विद्यालय, तसेच विसपुते महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. चांगू काना ठाकुर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सोनावणे गुरुजी यांनी, तसेच विसपुते महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनराज विसपुते यांनी निवेदन स्वीकारले. अशा प्रकारच्या कुप्रथा थांबायलाच हव्यात, असे मत प्राचार्य श्री. विसपुते यांनी व्यक्त केले. या वेळी समितीच्या सौ. गरूड, सौ. सुर्वे, सौ. आष्टेकर, सौ. पाटील, सौ. परब आणि सौ. बुगडे उपस्थित होत्या.


सनातन संस्थेच्या वतीने बारामती येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !

     बारामती (जिल्हा पुणे) - येथील ईशान गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंदिरात धर्मशिक्षण देणारे फलक आणि सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी उपस्थित महिलांना संक्रांतीच्या काळात सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास १२७ महिला उपस्थित होत्या. सौ. मंगल जगदाळे यांनी कार्यक्रमासाठी मंदिर उपलब्ध करून दिले.

(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्वप्न भंगणारे ठरेल !

  • तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारसणीचा बळी ठरलेले श्रीपाल सबनीस !
  • वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार हे अनेक संतांनीच सांगितलेले असल्यामुळे संतांच्या संकल्पाने ते स्थापन होणारच आहे, हे सबनीस यांनी जाणावे !
     पुणे - आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करण्याचे स्वप्न कुणी पहात असेल, तर ते भंगणारे स्वप्न ठरेल. हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील. धर्म, जात, लिंगभेद, तसेच भाकरीचे प्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न केले, तरच आपण मिळवलेल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ गवसेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे मांडले. (हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असल्याने ते मूलतःच भेद न मानणारे असते. तिथे प्रत्येकाला योग्य तो न्याय मिळतो. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ गवसायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! - संपादक) काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने अनंत गाडगीळ यांच्या हस्ते सबनीस यांना काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार ६ फेब्रुवारीला देण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

उत्तर कोरियाने प्रतिबंधांचे उल्लंघन करून केली क्षेपणास्त्राची चाचणी !

     सेउल - उत्तर कोरियाने ७ फेबु्रवारी या दिवशी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. प्रतिबंधित क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या नियमांचे उल्लंघन करत उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची टीका केली जात आहे. हे क्षेपणास्त्र उत्तर पश्‍चिमी तळावरून सोडण्यात आल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. हे जपानच्या दक्षिण ओकिनावा द्वीप येथून गेले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले की, हे संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन आहे.बेल्जियममध्ये इराकी शरणार्थींनी एका अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार !

शास्त्राचा आधार असलेल्या शबरीमाला आणि शनिशिंगणापूर येथील धार्मिक परंपरा या स्त्री 
स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचे टाहो फोडून सांगणार्‍या संघटना, युरोपात सहस्रो 
शरणार्थींकडून महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
अमानवीय अत्याचाराचा धक्कादायक व्हिडियो प्रसारित !
     बेल्जियम - येथील एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पलंगावर बेशुद्धावस्थेतील मुलीला ठेवण्यात आल्याचे दाखवले आहे. तिच्याभोवताली सात तरुण नृत्य करतांना आणि अरबी भाषेत गातांना दिसत आहेत. नंतर तिला विवस्त्र करून एकानंतर एक अशा पद्धतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा अमानवीय प्रकार दाखवण्यात आला आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नियमांत पालट न करण्याच्या जमियत-उलेमा-ए-हिंदच्या भूमिकेमुळे मुसलमान महिला संघटना संतप्त !

     अलीगड (उत्तरप्रदेश) - जमियत-उलेमा-ए-हिंदच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमध्ये पालट करण्याच्या प्रकरणात देण्यात आलेल्या उत्तरामुळे मुसलमान महिलांच्या संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी याचा विरोध केला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे नियम कुराणाच्या आधारावर असल्याने त्यात न्यायालयाला पालट करता येणार नाही, असे जमियतने न्यायालयात म्हटले होते. 
    जमियतच्या उत्तराचा विरोध करतांना भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या जाकिया सोमान म्हणाल्या की, वास्तविक लैंगिक समानतेच्या प्रकरणात कुराण आणि राज्यघटना यांच्या भाषेत काहीच अंतर नाही; परंतु समाजातील काही लोक याला चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत.

सनातनचे हितचिंतक श्री. निमिष शहा यांची शिवसेनेच्या सातारा उपतालुका प्रमुखपदी निवड

उजवीकडून चौथे श्री. निमिष शहा यांना श्री. नितीन बानुगडे-पाटील निवडीचे पत्र देतांना
     सातारा - शिवसेनेचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. निमिष रमेशकुमार शहा यांची शिवसेना सातारा उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
     शिवसेनेचे निष्ठावान आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्री. निमिष शहा यांची ख्याती आहे. त्यांचा मित्र आणि समर्थक परिवार मोठा असून तेही प्रखर धर्माभिमानी आहेत. हिंदुत्त्वाविषयी असलेली त्यांची तळमळ, सततचा समाजकार्याचा ध्यास, हि त्यांची खास गुणवैशिष्ट्येे. हिंदु जनजागृती समितीलाही मोलाचे सहकार्य करणारे श्री. निमिष शहा प्रत्यक्ष कृतीलाही नेहमी पुढेच असतात.
     हरदोई (उत्तरप्रदेश) - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी देशात आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र रचण्याच्या आरोपाखाली अब्दुल सामी कासमी या स्वयंघोषित मौलवीला हरदोई जिल्ह्यातून अटक केली आहे. ही अटक देशात आतंकवादी संघटना निर्माण करणे आणि आक्रमणांचे षड्यंत्र रचण्याच्या संदर्भात करण्यात आल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
     या वेळी संबंधित अधिकारी म्हणाले, कासमी खिलापतच्या समर्थनार्थ लोकांना भडकवणारी भाषणे द्यायचा. त्याने काही संकेतस्थळे चालू केली असून त्यावर तो स्वतःची भाषणे ठेवायचा. या माध्यमातून तो तरुणांना राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी भडकवत आला आहे. अब्दुल सामीला अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेश आतंकवाद विरोधी पथकाच्या साहाय्याने अटक केली. कासमी मदरसे चालवायचा. एका विशेष न्यायालयाने यापूर्वी त्याच्या विरोधत अजामीनपात्र वारंट काढले होते.

(म्हणे), सनातनकडून केली जाणारी हिंदु राष्ट्राची मागणी घटनाबाह्य ! - भाकप

राज्यघटनेचा अभ्यास नसणार्‍यांचे बोबडेबोल !
     कोल्हापूर, ७ फेब्रुवारी (वार्ता.) - भारतीय घटना धर्मनिरपेक्ष आहे. असे असतांनाही सनातनकडून हिंदु राष्ट्राची घटनाबाह्य मागणी होत आहे. (घटनेने प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे सनातनकडून केली जाणारी हिंदु राष्ट्राची मागणी चुकीची ठरत नाही. - संपादक) वादग्रस्त वक्तव्य करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा बंदोबस्त करावा, तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आणि सनातनवर बंदीसंदर्भातील मागणीचे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पक्षाकडून वेगळा विचार केला जाईल, अशी चेतावणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सतीशचंद्र कांबळे आणि कॉ. दिलीप पवार यांनी ६ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. (राष्ट्रप्रेमी सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या भाकपने कधी जिहादी आतंकवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे का ? १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करणार्‍या ओवेसीच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आहे का ? - संपादक)

भारत अत्यंत सहनशील आणि विशेष देश आहे ! - अभिनेत्री कतरिना कैफ

      देहली - येथे पत्रकारांशी संवाद साधतांना अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली की, असहिष्णुतेच्या वादाची मला कल्पना आहे; पण मला वाटते की, भारत अत्यंत सहनशील आणि विशेष देश आहे. जेव्हा मी प्रथमच भारतात आले, तेव्हा मला वाटले की, मी माझ्या घरी परतले आहे. इथे जे लोकांचे प्रेम मिळते ते कुठेच मिळू शकत नाही. मला आयुष्यभर भारतात रहायचे आहे.

रशिया पुढील ६० घंट्यांत पूर्व युरोपच्या दोन देशांवर नियंत्रण मिळवू शकतो ! - रेंड फाऊंडेशनचा दावा

     नवी देहली - रशिया पुढील ६० घंट्यांत पूर्व युरोपच्या दोन देशांवर नियंत्रण मिळवू शकतो, असा दावा अमेरिकन तज्ञांच्या रेंड फाऊंडेशन या संस्थेने केला आहे. एस्टोनिया आणि लातवियाला नाटो योग्य प्रकारे सुरक्षा देऊ शकत नाही. सध्या क्रिमिया शहरावर रशियाने नियंत्रण मिळवले आहे. 
     डेली मेल वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रेंड फाउंडेशनने तिच्या अहवालात दावा केला की, रशिया लातवियाच्या सीमेवर दोन्ही बाजूंनी मोठे प्रमाणात सैन्य पाठवू शकते, तर दुसरी तुकडी (बटालियन) एस्टोनियाची राजधानी ताल्लिनवर नियंत्रण मिळवू शकते. लातविया किंवा नाटो यांचे सैनिक रशियाच्या सैन्याचा सामना करू शकत नाही. रशियाकडे सध्या मोठ्या प्रमाणात रणगाडे आहेत. दुसरीकडे नाटोच्या सैन्याला युद्धाचा अभ्यास करण्यास जागा नाही. १९९० मध्ये सोव्हिएत रशियाचे विभाजन झाले होते. त्या वेळी एस्टोनिया, लातविया आणि लिथुआनियासह अनेक देश युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाले होते. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन लोक रहातात. रशियाने आता आपल्या विभाजित भागांवर नियंत्रण मिळवण्यास प्रारंभ केला आहे. (कुठे आपल्या विभाजित भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार रशिया, तर कुठे शत्रूने गिळंकृत केलेल्या भागावरही पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा विचार न करणारा भारत ! - संपादक)

बोहरा समाजातील महिलांच्या सुंता प्रथेला महिला पत्रकाराचा विरोध !

अशा प्रथांच्या विरोधात पुरोगामी का बोलत नाहीत ? भूमाता ब्रिगेडसारख्या संघटनांना 
महिलांवरील असे अत्याचार आणि अन्याय दिसत नाही का ?
     मुंबई - मुसलमानांच्या बोहरा समाजातील महिलांच्या सुंता प्रथेच्या विरोधात याच समाजातील आरिफा जौहरी या महिला पत्रकाराने दंड थोपटले. या प्रथेला कोणतेही वैज्ञानिक प्रमाण नसल्याने ही प्रक्रिया का केली जाते, असा प्रश्‍न पत्रकार जौहरी यांनी उपस्थित केला आहे. 
१. बोहरा समाजाच्या म्हणण्यानुसार सुंता करतांना त्वचेचा एक भाग कापण्यात येतो. या प्रथेला त्यांच्या समाजातील प्रत्येकच मुलीला सामोरे जावे लागते. याच्या स्वतः जौहरीही अपवाद नाहीत.

भाग्यनगरमध्ये ३ नायजेरियन व्यक्तींवर आक्रमण !

     भाग्यनगर - बेंगळुरू येथे टांझानियाच्या महिलेला झालेल्या मारहाणीनंतर आता भाग्यनगर येथे ३ नाजयेरियन व्यक्तींवर वंशभेदावरून स्थानिक लोकांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. भाग्यनगर पोलिसांनी मात्र एक नायजेरियन आणि एक स्थानिक युवक यांच्यात झालेल्या क्षुल्लक घटना असल्याचे म्हटले आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, नायजेरियाच्या एका विद्यार्थ्याने प्रथम आक्रमण केले होते. या घटनेनंतर शहरात रहाणार्‍या नायजेरियन लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन शासनाची स्थापना धूसर !

पीडीपीच्या राष्ट्रद्रोही मागण्या सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये नवीन शासनाची स्थापना धूसर होत चालली आहे. सुरक्षादलांच्या विरोधात आंदोलनात दगडफेक करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या लोकांची सुटका, मानवाधिकार आयोगाला सबळ करणे आणि सैन्याला दिलेल्या अफस्पा या विशेषाधिकाराला अपेक्षित शांत क्षेत्रातून हटवणे अशी सूत्रे पीडीपीच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहेत. ही सूत्रे स्वीकारणे भाजपला अशक्य आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर सत्तास्थापनेतील ओढाताण सध्या काही दिवस चालू रहाण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी भाजपकडेही अद्याप पर्याय नाही. त्यामुळे येथे पुन्हा राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

केरळच्या काँग्रेसी राजवटीत पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा
उदोउदो होतो, तर हिंदु संतांवर आक्रमणे होतात, हे लक्षात घ्या !
     केरळमधील आलापुझा जिल्ह्यातील आरूर शहरात अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरीजी महाराज मार्गदर्शन करत असतांना त्यांच्यावर एका मार्क्सवादी संघटनेच्या ५० गुंड कार्यकर्त्यांनी आक्रमण केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Keralke Aroorme Swami Chidanandpuriji Maharaj par Marxwadi Sanghatanke 50 Gundodwara akraman ! - Kya yah Hindu Santoke saath Asahishnuta nahi ?
जागो ! : केरल के आरूर में स्वामी चिदानंदपुरीजी महाराज पर मार्क्सवादी संगठन के ५० गुंडोंद्वारा आक्रमण ! - क्या यह हिन्दू संतों के साथ असहिष्णुता नहीं ?

महाराष्ट्र शासन संचालित राजाराम महाविद्यालयातील पूर्वी चालू असलेला संस्कृत विभाग पुनरुज्जीवित करा ! - मुख्यमंत्र्यांना श्रीशिवप्रतिष्ठानचे निवेदन

देवभाषा असलेल्या संस्कृतच्या पुनरुत्थानासाठी 
प्रयत्नरत श्रीशिवप्रतिष्ठानचे अभिनंदन !
     कोल्हापूर, ७ फेब्रुवारी (वार्ता.) - कोल्हापूर आणि परिसरात गुणवत्तेविषयी प्रसिद्ध असणार्‍या राजाराम शासकीय विद्यालयात संस्कृत हा विषय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शिकवला जात होता. गेल्या काही वर्षांपासून हा विषय महाविद्यालयात शिकवला जात नाही. संस्कृतसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे अध्यापन बंद होणे हे कोल्हापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन संचलित राजाराम महाविद्यायातील पूर्वी चालू असलेला संस्कृत विभाग पुनरुज्वीवित करा, असे निवेदन श्रीशिवप्रतिष्ठानचे सांगली कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी योग्य ते आदेश दिले. या वेळी सर्वश्री विठ्ठलराव पाटील (शिरोली), सुरेशराव यादव, शीतल नागे, विजयराव गुळवे, तसेच श्रीशिवप्रतिष्ठानचे अन्य धारकरी उपस्थित होते.

महिला जिल्हाधिकार्‍यांच्या संमतीविना त्यांच्यासोबत सेल्फी काढल्याने फराज नामक युवकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी

चंगळवादाच्या आहारी जाऊन नैतिक मर्यादांचे भान न राहिलेली तरुण पिढी !
     लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - मेरठच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला नुकत्याच बुलंदशहर येथील एका गावात नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी सरपंचासोबत आलेल्या फराज नामक युवकाने त्यांच्यासोबत सेल्फी (भ्रमणभाषद्वारे स्वतःहून स्वतःसहित छायाचित्र काढणे) काढला. याला चंद्रकला यांनी विरोध केला. त्यांच्या खासगी सचिवाने फराजला समजावले आणि सेल्फी काढून टाकायला (डिलिट) सांगितला; मात्र फराजने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. या संदर्भात पोलिसांना कळवल्यावर त्याला अटक करण्यात आली असून त्याला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. चंद्रकला म्हणाल्या की, मी त्याला क्षमा केली आहे; मात्र मी अधिकारी असले, तरी महिलाही आहे. माझ्यासोबत छायाचित्र काढायचे असेल, तर संमती घ्यायलाच हवी, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.

उत्तरप्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने इमाम बुखारी यांच्या पक्षातून लढवली होती विधानसभेची निवडणूक !

     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी उत्तरप्रदेशच्या हरदोई येथून अटक केलेला इसिसचा आतंकवादी अब्दुल समी कासमी उपाख्य शमीउल्ला याने २००७ मध्ये राज्याच्या रामपूर येथील स्वार टांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, असे समोर आले आहे. शाही इमाम सैय्यद अहमद बुखारीच्या उत्तरप्रदेश युनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाच्या तिकिटावर त्याने ही निवडणूक लढवली होती. मात्र यात त्याचा पराभव झाला होता.

राजस्थानमध्ये भाजपाला मत दिल्यामुळे मुसलमान पंचायतीने ४ नगरसेवकांना जातीतून केले बहिष्कृत !

तथाकथित पुरोगामी या घटनेवर काही बोलतील का ? कि केवळ हिंदूंच्या 
जातीपरंपरांवर टीका करण्यातच धन्यता मानत रहाणार ?
     जयपूर - राजस्थानच्या टोंक स्थित मालपुरा नगरपालिकेतील चार मुसलमान नगरसेवकांनी आरोप केला आहे की, येथे नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्या वेळी नगराध्यक्षाच्या निवडीच्या वेळी काँग्रेसला मत न दिल्याने पंचायतीमधील काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला जातीतून बहिष्कृत केले आहे. तसेच १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अक्रम खान, नजमा बानो, अलमाउल हक आणि मोहम्मद शकीर या चारही नगरसेवकांनी जिल्हाप्रशासनाकडे याविषयी तक्रार केली असून आपल्या परिवारासाठी सुरक्षा देण्याचीही मागणी केली आहे. जिल्हाधिकारी रेखा गुप्ता यांनी या तक्रारीवर चौकशी चालू असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि शरीफ यांच्या पाकिस्तानातील बैठकीच्या वेळी दाऊद इब्राहिम उपस्थित होता, हा आझम खान यांचा दावा केंद्रशासनाने फेटाळला !

     गाजीपूर (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशचे मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन: एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्या बैठकीच्या वेळी त्या खोलीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम उपस्थित होता. आझम खान एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, माझ्याकडे याचे पक्के पुरावेही आहेत. (आझम खान यांच्याकडे पुरावे आहेत, तर ते सर्वांसमोर उघड का करत नाहीत ? जर ते उघड करणार नसतील, तर जनतेने त्यांच्यावर या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे. - संपादक) आझम खान यांचा हा दावा केंद्रशासनाने फेटाळून लावला आहे.

सोलापूरचे साधक श्री. आनंद गांगजी यांनी गाठला ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर !

श्री. आनंद गांगजी यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
     सोलापूर - अपार श्रद्धा, अल्प अहं आणि दास्यभावाच्या बळावर सोलापूर येथील साधक श्री. आनंद गांगजी यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठल्याचे येथे सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आले. बार्शी येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख यांनी ही आनंदवार्ता सांगितली. श्री. गांगजी यांच्या संपर्कात असलेल्या साधकांनी त्यांच्याविषयीचे अनुभव सांगितले. श्री. गांगजी हे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मासापासून म्हणजे केवळ सहा महिन्यांपूर्वीच प्रत्यक्ष सेवेत सहभागी झाले आहेत.

राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे परराष्ट्र धोरण ! - प्रा. रमेश सोनवडकर

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण या परिसंवादात प्रा. रमेश सोनवडकर 
यांनी मांडलेले विचार
     आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण या परिसंवादातील प्रा. रमेश सोनवडकर यांनी मांडलेले विचार आपण शनिवार, ६ फेब्रुवारी या दिवशी पाहिले. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत, सावरकरांचा विश्‍व एक राष्ट्र हवे ! हा विचार, नेहरूंनी पंचशील धोरणानुसार स्वीकारलेले परराष्ट्र धोरण, या धोरणाची गृहीतके, नेहरूंची फसलेली धोरणे आणि देशाला शस्त्रसज्ज केले पाहिजे, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केेलेल्या सूचनेकडे नेहरूंनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष हे भाग पाहिले. आज सावरकरांचे वैशिष्ट्यपूर्ण अशा परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेऊया !

श्रीशिवप्रतिष्ठानची सिटी हायस्कूल येथे आज प्रगट सभा !

     सांगली, ७ फेब्रुवारी (वार्ता.) - या वर्षी गडकोट मोहिमेच्या समारोपाच्या प्रसंगी शासनाकडे श्रीशिवप्रतिष्ठानने शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या संदर्भात महिलांवर बलात्कार करणार्‍यांना काय शिक्षा द्यायची, याचे प्रतिक असलेल्या रांझ्यांच्या पाटलला ठोठावलेल्या शिक्षेचे स्मारक लाल महालाबाहेर उभे करावे; एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मद्याची बाटली आडवी करावी कि नाही, यासाठी एकाच वेळेस मतदान होऊन मद्यबंदीचा कौल घ्यावा, असे आंदोलन व्हावे; धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज बलीदानमास यांसह अन्य विषयांवर सखोल विचार करण्यासाठी सोमवार, ८ फेब्रुवारी या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने सिटी हायस्कूल येथे सायंकाळी ७ वाजता प्रगट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी त्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. अविनाशबापू सावंत यांनी केले आहे.

हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा हिंदूंना संदेश

१. एक मुसलमान काय करू शकतो ? असफअलीने अमेरिकेत राजदूत असतांना काय केले ? चुकीचा पत्ता लिहून शस्त्रास्त्राने भरलेले जहाज कराचीला पाठवले ! राजदूत आमचा, पैसे आमचे आणि जहाज पोचले कराचीला, हा धर्माचा परिणाम आहे ! जिनांचे आजोबा हिंदु होते. धर्म पालटल्यावर दोन पिढ्यांत जिनांनी पापस्तान निर्माण केले. 
२. जगायचे असेल, तर फाजिल उदारता सोडा. रामकृष्ण मिशनचा पैसा केवळ हिंदूंचा आणि त्याचा विनियोग; मात्र सर्वार्ंंसाठी, ही उदारता मी बघतो आहे. ती सोडली, तरच तरणोपाय आहे.
३. हिंदु-मुसलमान भांडतील या भीतीने हिंदु मुलांना मुसलमानांची अत्याचारी कृत्ये सांगावयाची नाहीत, अशी एक नवी पद्धत निर्माण झाली आहे. त्यामुळे इतिहासावर मोठा घाला येणार आहे. त्याविरुद्ध मोठी चळवळ करावी लागेल. (आताच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याचे चित्र लावण्यास अनेक ठिकाणी बंदी आहे ! यावरूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या वेळी काढलेले उद्गार आताच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतात, हे लक्षात येते ! - संपादक)
(संदर्भ : प्रज्वलंत, २६ जानेवारी विशेषांक २००२)

साखळी बाँबस्फोट करण्याच्या सिद्धतेत होता समीर सरदाना ! - गोवा पोलीस महासंचालक टी.एन्. मोहन यांची माहिती

    पणजी - गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकावर संशयास्पदरितीने वावरतांना अटक करण्यात आलेला समीर सरदाना याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक टी.एन्. मोहन यांनी सांगिले की, समीर देशात साखळी बाँबस्फोट करण्याची सिद्धता करत होता. मात्र हे बाँबस्फोट कुठे करण्यात येणार होते, हे स्पष्ट झालेले नाहीत.

प्रत्याक्रमण करून भारताची भूमी बळकावणार्‍या लुटारूंना अद्दल घडवणारे आणि गमावलेला भूप्रदेश पुन्हा जिंकून घेणारे पराक्रमी हिंदु राजे !

अशा पराक्रमी हिंदु राजांचा आदर्श ठेवून भारतीय राज्यकर्ते पाक, बांगलादेश, 
चीन यांच्यासारख्या शत्रूराष्ट्राविषयी अशी भूमिका घेतील का ?
१ अ. तह आणि संधी तोडण्यासाठीच केल्या जातात, असे नीतीशास्त्राने सांगणे : आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्‍यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत. राज्याच्या सीमारेषा मानचिन्हावर तलवारीचे टोक ठेवून आखल्या जातात. त्या स्थायी, सेटल्ड फॅक्ट किंवा शाश्‍वत नसतात. तलवारीच्या टोकाने काढलेल्या राज्याच्या सीमारेषा या राष्ट्रभक्तांद्वारे तलवारीच्या धारेनेच पुसल्या जातात, हे इतिहासाने अनेकदा पाहिले आहे. युद्धात बळकावलेल्या भूमीला युद्ध करूनच मुक्त करण्यात आले, केले आहे आणि यापुढेही केले जाईल. तह आणि संधी यांचे बंधन विजेता किंवा बलवान यांनी पराजित किंवा दुर्बल यांवर थोपलेले असते. अनुकूल संधी मिळताच दुर्बलातील दुर्बल राष्ट्रही ही बंधने तोडण्यास कचरत नाही. नीतीशास्त्रही हेच सांगते की, तह आणि संधी तोडण्यासाठीच केल्या जातात. इतिहासात याची उदाहरणे आहेत.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील वाढता धोका !

    समाजमनाचा आरसा म्हणजे पत्रकारिता ! समाजात घटणार्‍या घटनांची माहिती लोकांना देणे, समाजघातकी घटनांविषयी लोकांमध्ये जागृती करणे, चौथा स्तंभ या नात्याने लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, प्रशासनावर अंकुश ठेवणे आदी कामे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या करत असतात. अनेकदा पत्रकार त्यांचा जीव धोक्यात घालून समाजातील घटनांचे वृत्तसंकलन करून त्या घटना लोकांपर्यंत पोहोचवतात. गुन्हेगारीशी संबंधित घटनांचे वृत्तांकन करतांना पत्रकारांना मोठी जोखीम उचलावी लागते. कधी कधी तर त्यांच्या जिवावरही बेतते; मात्र तरीही ते आपल्या जिवाची पर्वा न करता समाजहिताचा विचार करून त्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कर्तव्य बजावत असतात. अशा प्रकारे कर्तव्य बजावतांना आपल्या देशात अनेक पत्रकारांनी जीवही गमावला आहे.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा नोव्हेंबर २०१५ मधील आढावा

    स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर.एफ्.)च्या प्रसारकार्याचा नोव्हेंबर २०१५ च्या आढावातील काही सूत्रे शनिवार, ६ फेब्रुवारीच्या अंकात पाहिली. आता आपण आढाव्यातील उर्वरित भाग पाहूया. 
४ आ. गूगल प्लसद्वारे झालेला प्रसार
४ आ १. एस्.एस्.आर्.एफ्. गूगल प्लसच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ६ जिज्ञासूंनी नामजपाला आरंभ केला आहे. 
४ आ २. गूगल प्लसवरील यशस्वी पोस्ट्सचा संख्यात्मक आढावा 

सैनिकीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सियाचिनमध्ये नैसर्गिक प्रतिकूलतेवर मात करत सीमेचे रक्षण करणारे भारतीय सैनिक !

     नवी देहली - दोन दिवसांपूर्वी सियाचिनमध्ये हिमशिखर कोसळल्याने भारताचे १० सैनिक हुतात्मा झाले आणि पुन्हा एकदा सियाचिनमधील नैसर्गिक प्रतिकुलतेचा विषय समोर आला. 
अ. हवामानाची स्थिती
१. थंडीमध्ये सियाचिनचे तापमान ५० डिग्रीच्याही खाली जाते. येथे टूथपेस्टही गोठते. स्पष्ट बोलण्यातही अडचण असते. थंडीमुळे शरीर गारठण्यासारख्या समस्या येथे नेहमीच्याच आहेत. याव्यतिरिक्त येथे ऑक्सीजनचे प्रमाणही अल्प असते. सैनिक येथील विशेषपद्धतीच्या इग्लू या कपड्यांचा वापर करतात. यावरून सैनिकांना येथे रहाणे किती कठीण जात असेल याची कल्पना करता येईल.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

ज्ञान प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत एकाग्रतेचे महत्त्व

श्री. राम होनप
    ज्ञान प्राप्त करतांना संबंधित विषयाचे ध्यान केले की, ज्ञान प्राप्त होते. ध्यान म्हणजे मन संबंधित विषयावर एकाग्र करणे. जितकी एकाग्रता अधिक तितके ज्ञान सूक्ष्म स्तराचे आणि सखोल प्राप्त होते. यालाच ज्ञानाशी तात्कालिक तादात्म्य पावणे किंवा एकरूप होणे, असे म्हणतात. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०१५)

सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सौ. कस्तुरी चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांच्यात साधनेमुळे झालेले पालट आणि त्यांना देवाच्या कृपेमुळे मिळालेले साहाय्य

सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी
    २४.१०.२०१५ या दिवशी सांगली येथील सनातनच्या साधिका सौ. कस्तुरी चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांचा ६१ टक्के आध्यात्मिक स्तर घोषित करण्यात आला. त्यांना साधनेच्या प्रवासात आलेले अनुभव, तसेच कठीण प्रसंगात साधकांनी, तसेच ईश्‍वराने प्रत्येक वेळी कशा प्रकारे साहाय्य केले, हे येथे देत आहोत.
१. साधनेला आरंभ
     पूर्वी मी पूजाअर्चा आणि व्रतवैकल्ये करत असे, तसेच कलावतीआईंच्या भजनाला नियमित जात असे. वर्ष २००३ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. यानंतर मी सत्संगात जाऊ लागले. मी हळूहळू प्रसारात सेवा करू लागले. मला सेवेतून आनंद मिळू लागला. मला सेवा करतांना साधक माझे दोष लक्षात आणून देत आणि स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न कसे करायचे ?, तेही सांगत असत.

सुप्त गुणांनी युक्त अशा खोलीतील साधिकांकडून श्रीमती वसुधा देशपांडे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्रीमती वसुधा देशपांडे
    प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला गुणवान साधिकांच्या खोलीत रहायला मिळाले. सर्वच साधिका प्रेमळ, एकमेकींना सांभाळून घेणार्‍या आणि प्रामुख्याने इतरांचा विचार करणार्‍या आहेत. त्या एकत्र क्वचितच भेटतात, तरी त्यांचे गुणच आपल्या सभोवती रहातात. अशा साधिकांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. मूर्ती लहान; पण गुणांनी महान अशा ६४ 
टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती गलांडेकाकू !
१ अ. काटकसरीपणा : डोक्याचे तेल उशीला लागू नये, म्हणून उशीवर अंथरायचे कापड एकीकडून फाटले, तरी त्या दुसरीकडून वापरतात. त्या आवश्यकतेेपेक्षा अधिक वस्तूंचा वापर करत नाहीत; कारण त्यात वेळ वाया जातो. तसेच आपत्काळ असल्याने तो वेळ साधनेसाठी द्यायचा, असा त्यांचा विचार असतो. त्या साधनेसाठी अल्प वेळ आहे, याची जाणीव लहान-लहान गोष्टींतही ठेवतात; पण इतरांनी तसा विचार न करता वस्तू वापरल्या, तरी त्यांना प्रेमाने चांगलेच म्हणतात.

भ्रमणसंगणकावर सेवा करतांना त्यावर दैवी कण दिसणे आणि त्यातील मोरपिशी रंगाचा दैवी कण पाहून पुष्कळ आनंद जाणवणे

     मी जानेवारी २०१५ मध्ये नवीन भ्रमणसंगणक घेतला. मला प्रारंभीच संगणकाच्या पडद्यावर एक चंदेरी दैवी कण दिसला; परंतु त्याविषयी निश्‍चिती नसल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. ४.२.२०१५ या दिवशी सेवेसाठी संगणक चालू केला. तेव्हा एका मोरपिशी रंगाच्या कणाने माझे लक्ष वेधून घेतले. हा दैवी कणच आहे, असे मला आतून वाटले. यासंदर्भात लिहून देतांना मोरपिशी रंगाचा आणखी एक कण दिसला. तो कण माझ्याकडे पहात आहे, असे मला जाणवले. मलाही त्याकडे पाहून पुष्कळ आनंद होत होता. जणू आम्ही दोघे एकमेकांना भेटत आहोत आणि पहात आहोत, असे वाटले. - कु. वसुधा कुलकर्णी, पुणे (४.२.२०१५)
     (भाव तेथे देव या आलेल्या अनुभूती या वैयक्तिक आहे. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com
प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे
३. मंदिरातील आणि परिसरातील देवतांची पूजा करणे
४. आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची देखभाल करणे
५. आश्रमात एक गाय पाळण्यात येणार आहे. तिची देखभाल करणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
प.पू. डॉक्टरांचे चरण शेषावर योगनिद्रेत झोपलेल्या श्रीविष्णूच्या चरणांप्रमाणे जाणवणे आणि यातूनच त्यांच्या निर्गुण स्तरावर चाललेल्या कार्याचा उलगडा होणे : यापूर्वी कधीही प्रार्थना केली, तरी प.पू. डॉक्टरांचे चरण नेहमी भूमीवर ठेवलेल्या चरणांप्रमाणे जाणवायचे; परंतु गेले १५ दिवस मात्र प.पू. डॉक्टर झोपल्यानंतर जशी त्यांच्या चरणांची स्थिती होते, तसे ते जाणवतात. यातून त्यांच्या कार्याचा उलगडा झाला. पूर्वी भूमीवर ठेवलेल्या चरणांची अनुभूती यायची. म्हणजेच ही अनुभूती सगुणरूपी पृथ्वीतत्त्वाची होती; परंतु आता मात्र झोपलेल्या स्थितीतील चरण दिसतात, म्हणजेच शेषावर झोपलेला श्रीविष्णु जसा योगनिद्रेत केवळ अस्तित्वाने कार्य करत आहे, अगदी त्याच पद्धतीने प.पू. डॉक्टरांचे कार्य योगनिद्रेच्या स्थितीत, म्हणजेच निर्गुण दशेत चालू असल्याचीच ही अनुभूती आहे, असे जाणवले. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी (७.२.२०१६) रात्री १०.२० वाजता
समाप्ती - पौष अमावास्या (८.२.२०१६) रात्री ८.०९ वाजता
आज अमावास्या आहे.

शिष्याच्या जीवनातील सद्गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व !

प.पू. दास महाराज
१. ८४ लक्ष योनी फिरून नरदेह 
लाभल्याचा लाभ जन्म-मृत्यूच्या 
चक्रातून सुटण्यासाठी करून घेणे आवश्यक !
      जिवाला ८४ लक्ष योनी फिरून नरदेह लाभतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची संधी लाभते. ही संधी साधून घेतली नाही, तर दुर्लभ मनुष्यजन्म वाया जातो. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर जीव मायाजाळात अडकतो. नको त्या इच्छा आणि अपेक्षा करत रहातो. त्या कधीच पूर्ण होत नाहीत. मृत्यूसमयी इच्छा अतृप्त रहातात आणि जीव पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत गटांगळ्या खात रहातो. नरदेहाचे सार्थक करायचे असल्यास सद्गुरुवाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे । हे लक्षात घ्यावे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर जिवाच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात आणि मोक्षही प्रदान करतात; म्हणूनच लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात, असे सद्गुरूंच्या आरतीत म्हटले आहे, तसेच सद्गुरुचरणांकडे जायचे असेल, तर अहंकार सोडावा लागतो. सद्गुरूंची कृपा झाल्यावर जिवाची कोणतीच इच्छा शेष रहात नाही, याची प्रचीती प.पू. गुरुदेवांनी दिली. ती त्यांच्या चरणी निवेदन करत आहे.

श्रीकृष्णाच्या एका मूर्तीचे दर्शन घेतांना विविध अनुभूती एकाच वेळी येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
     श्रीकृष्णाच्या एका मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा त्याच्या देहातील विविध स्थानांकडे पहातांना पुढील अनुभूती आल्या. डोळे मिटल्यावर पाचही अनुभूती एकाच वेळी आल्या. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः
     दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
  शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, वैद्य इत्यादी केवळ व्यवसाय करतात, तर मनापासून पौरोहित्य केल्यास व्यष्टी आणि समष्टी साधना होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भोजशाळा हिंदूंना मिळणार ?

    वसंतपंचमी म्हणजे १२ फेब्रुवारीला भोजशाळेत काय होणार, हे आताच सांगणे कठीण आहे. ही हिंदूंची पवित्र धार्मिक वास्तू आहे. ही वास्तू पुन्हा हिंदूंना मिळावी, यासाठी हिंदूंनी बराच काळ संयमाने आणि वैध मार्गाने लढा दिला आहे. म्हणून की काय हिंदूंचीच वास्तू असणार्‍या या भोजशाळेत वसंतपंचमीला दिवसभर पूजा करायला मिळावी, यासाठी हिंदूंना शासन, प्रशासन, पोलीस यांच्याकडे पदर पसरावा लागत आहे. वसंतपंचमीला दिवसभर पूजा करण्याची अनुमती मागणे म्हणजे पोलिसांचे दंडुके खाण्याची सिद्धता ठेवण्यासारखे आहे. इतिहासही हेच सांगतो. वर्ष २००६ आणि २०१३ मध्ये वसंतपंचमी शुक्रवारी आल्यामुळे या दोन्ही वेळी मुसलमानांच्या आडमुठेपणामुळे तेथे हिंसाचार झाला होता. मुसलमान प्रत्येक शुक्रवारी तेथे नमाजपठण करतात. त्या वेळी त्यांची संख्या नगण्य असते; मात्र वसंतपंचमी शुक्रवारी असल्याचे त्यांना कळल्यावर त्यांच्या धर्मप्रेमाला भरते येते. या वेळीही असेच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. १२ फेब्रुवारीच्या आदल्या शुक्रवारी म्हणजे ५ फेब्रुवारीला सहस्रावधी मुसलमान तेथे नमाजपठणासाठी जमले. हे एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच होते, त्याबरोबरच हिंदू आणि प्रशासन यांना गर्भित चेतावणी होती.

तिसरे महायुद्ध होणार ?

     एका माथेफिरू माणसाच्या हाती देशाची सूत्रे दिल्यास काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून उत्तर कोरियाकडे पाहिले पाहिजे. किम जोंग हे या देशाचे हुकूमशहा ! स्वतःच्या विरोधकांना क्रूरपणे मारण्यास त्यांचा हातखंडा आहे. तेथील लोकांना व्यक्तीस्वातंत्र्य नाही. जोंग यांच्या विरोधात बोलण्याचे, लिहिण्याचे कोणी धारिष्ट्य दाखवल्यास त्या व्यक्तीला जीव गमवावा लागणार, हे निश्‍चित. अशा या हुकूमशहाच्या राजवटीत उत्तर कोरियात अराजक माजले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn