Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भोजशाळेत सहस्रावधी मुसलमानांचे शक्तीप्रदर्शन !

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी हिंदुद्रोही पक्षांच्या राज्यात हिंदूंची आणि त्यांच्या संघटनांची मुस्कटदाबी करण्यात येते, तर भाजपशासित राज्यांत धर्मांधांना सर्वप्रकारची मोकळीक असते, हे लक्षात घ्या !
धार (मध्यप्रदेश) - वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण करण्यापूर्वी मुसलमानांनी भोजशाळेत ५ फेब्रुवारी या दिवशी शक्तीप्रदर्शन केले. भोजशाळेत १२ फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती असली, तरी मुसलमानांना दुपारी १ ते ३ या वेळेत नमाजपठण करण्याचीही अनुमती देण्यात आली आहे. याचा हिंदुत्ववादी विरोध करत आहेत. हिंदूंच्या या विरोधाला आता मुसलमानांनीही विरोध करणे चालू केले आहे.
१. शुक्रवार, ५ फेब्रुवारीला भोजशाळेतील कमाल मौलाना मशिदीजवळ सहस्रावधी मुसलमान संघटित झाले होते. (किती हिंदु आरतीसाठी अशा प्रकारे मोठ्या संख्येने मंदिरात संघटित होतात ? - संपादक)

ट्विटरकडून आतंकवादाशी संबंधित १ लाख २५ सहस्र खाती बंद

सॅन फ्रान्सिस्को - आता ट्विटरनेही आतंकवादाच्या विरोधात पाऊल उचलले असून गेल्या ७ मासांपासून आतंकवादाला प्रोत्साहन देणारी १ लाख २५ सहस्रांहून अधिक खाती बंद केली आहेत. ट्विटरच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी चमूने ही माहिती दिली. इसिस सारख्या आतंकवादी संघटना सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवकांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचे काम करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक राष्ट्रांनी ही मागणी केली होती.


पंकज भुजबळ यांचे पारपत्र जप्त; चौकशीसाठी समन्स

महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे प्रकरण

मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावर कारवाई केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने आता त्यांचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याकडे वळवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंकज भुजबळ यांचे पारपत्र जप्त केले असून चौकशीसाठी त्यांना समन्सही बजावण्यात आले आहे. छगन भुजबळ मात्र अद्यापही अमेरिकेतच आहेत. ते रविवारपर्यंत भारतात परतणार असून त्या वेळी त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालयानाने अटक केली आहे.

लक्ष्मणपुरी (लखनौ) आणि देहली येथे पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांचे आयोजन

पाक भारतात आतंकवाद पसरवून देशाला अस्थिर करत असतांना त्याच्या कलाकारांना पायघड्या घालणे, हा देशद्रोहच !
शिवसेनेचे उत्तरप्रदेशचे राज्यप्रमुख अनिल सिंह स्थानबद्ध
लक्ष्मणपुरी (लखनौ) - लक्ष्मणपुरी आणि देहली येथे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मणपुरी येथील कार्यक्रमात कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी पोलिसांनी शिवसेनेचे उत्तरप्रदेशचे राज्यप्रमुख अनिल सिंह यांना त्यांच्या घरी स्थानबद्ध केले आहे. जानेवारी २०१६ मध्ये गुलाम अलींचा मुंबईत होणारा घर वापसी चित्रपटाच्या संगीताच्या प्रसिद्धीचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रहित झाला होता. घर वापसी या चित्रपटाचे दिग्दर्शक सुहैब इलियासी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आता ५ मार्चला देहलीत होणार आहे.
भारतात होणार्‍या पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा नेहमीच विरोध असतो. 'जोपर्यंत देशातील पाकपुरस्कृत आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला येथे कार्यक्रम सादर करू देणार नाही', अशी चेतावणी शिवसेनेने या कार्यक्रमाच्या विरोधात नुकतीच दिली होती. या धर्तीवर येथील प्रशासनाने सिंह यांच्यावर कारवाही केली. यापूर्वी शिवसेनेच्या विरोधामुळे गायक अली यांचे मुंबई आणि पुणे येथील कार्यक्रम रहित करणे आयोजकांना भाग पडले होते.

बेगूसराय येेथील प्राचीन मंदिरातून अष्टधातूच्या ३ मूर्तींची चोरी

 मंदिरांवर सातत्याने होणारी आक्रमणे आणि चोर्‍या रोखण्यासाठी शासन काही करणार आहे का ?

बिहारमध्ये मंदिरेही असुरक्षित !

बेगुसराय (बिहार) - वीरगावातील ठाकूरवाडी येथील एका प्राचीन मंदिरातून ४ फेब्रुवारीला प्रभु श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या अष्टधातूच्या मूर्तींची चोरी झाली आहे. याशिवाय मंदिराजवळच शंभू पासवान या अपंग मुलाचा मृृतदेहही मिळाला आहे. त्यामुळे चोरांनीच या मुलाची हत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या मूर्तींचे वजन अनुमाने ७ किलो आहे. मंदिरातील पुजारी नेहमीप्रमाणे सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मूर्ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. यापूर्वीही जमुई येथून भगवान महावीर यांची २ सहस्र ६०० वर्षांची जुनी ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेली होती; मात्र नंतर ती रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळून आली.
काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे मोडतात ? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

अल्पसंख्यांक दर्जाविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तुत केलेला प्रश्‍न भारतीय राज्यकर्त्यांच्या 
लक्षात का आला नाही ? का लक्षात येऊनही ते लांगूलचालनासाठी आणि राजकीय लाभ 
उठवण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ?
      शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ? अल्पसंख्यांकाचा दर्जा हा राज्यातील त्या समाजाच्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर देण्यात यावा, असे आम्हाला वाटते. त्यासाठी संपूर्ण देशातील लोकसंख्येचा विचार केला जाऊ नये, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने मांडले.

(म्हणे) भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करणार !

देशात असहिष्णुता वाढत असल्याची ओरड करणारे आता कुठे गेले ? धर्मांधांचा उघड हैदोस म्हणजे सहिष्णुता आणि हिंदूंची न्याय्य मागणीसाठीची चळवळ म्हणजे असहिष्णुता, 
असे समीकरण आहे कि काय ?
 तमिळनाडू तौहिद जमात संघटनेचे फुत्कार ! 
      तमिळनाडू तौहिद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे ३१ जानेवारी २०१६ या दिवशी एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (म्हणजे मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला लाखो धर्मांध उपस्थित होते. या कार्यक्रमात भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करण्याची जिहादी घोषणाही करण्यात आली.
१. कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनेने मूर्तीपूजा, ज्योतिषशास्त्र, योग आणि हिंदूंच्या धार्मिक कृत्यांना इस्लामविरोधी मानून त्यांचा अंत करण्याची शपथ घेतली.

(म्हणे) 'शाळांमध्ये संस्कृत भाषेला अनिवार्य करण्याची आवश्यकता नाही !'

केंद्रशासनाने समितीची ही शिफारस फेटाळून देशातील सर्व शाळांमध्ये संस्कृत अनिवार्य करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
देवभाषेला नाकारणारी केंद्रशासनाची समिती
नवी देहली - संस्कृत भाषेच्या पुनरुत्थानासाठी निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त एन्. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रशासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून एका ७ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने तिच्या अहवालात म्हटले आहे की, शाळांमध्ये संस्कृत भाषेला अनिवार्य विषय म्हणून शिकवण्याची आवश्यकता नाही. 
१. समितीने पुढे म्हटले आहे की, त्रिभाषा सूत्रानुसार शाळांनी केवळ ज्यांना या विषयाची आवड आहे, त्यांना शिक्षण द्यावे. समितीने तशी शिफारसही केली आहे.
२. सर्व संस्कृत विद्यालये आणि वैदिक शाळांना सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानाप्रमाणे शिक्षण मंडळाच्या रूपात मान्यता द्यावी.

शासनाने आश्रम कह्यात घेतले, पण आश्रमवासियांना वार्‍यावर सोडले ! - महंत चिंतामणी पर्वत महाराज, साधु-संत समाजाचे सभापती, गोठद, ओडिशा.

      पुरी येथील अनेक मठ, आश्रम आदी शासनाने कह्यात घेतले आहेत; मात्र तेथे रहाणार्‍या संन्याश्यांचे दायित्व शासन घेत नाही. आम्ही लहानपणापासून आश्रमात आहोत आणि आश्रमानेच आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही संपूर्ण आयुष्य आश्रमासाठी वाहून धर्माचा प्रसार केला, आश्रमाचा विस्तार केला आणि आश्रम टिकवून ठेवला. असे असतांना आजारी पडल्यानंतर तुमच्या औषधपाण्याचा खर्च तुम्ही करा, असे शासन सांगते. एकीकडे शासन आश्रमातील धनावर अधिकार सांगते, तर दुसरीकडे इतकी वर्षे ज्यांनी आश्रम संभाळला त्यांना वार्‍यावर सोडते. 
- महंत चिंतामणी पर्वत महाराज, साधु-संत समाजाचे सभापती, गोठद, ओडिशा.

भारतात २६ वर्षांत १३६ आतंकवादी आक्रमणे !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
शासनाने आतंकवादी आक्रमणाची केवळ आकडेवारी देणे नव्हे, तर आतंकवादी 
आक्रमणे होणारच नाहीत, अशी उपाययोजना करणे अपेक्षित !
     पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ५ आतंकवाद्यांकडून भारताचे ७ सुरक्षा कर्मचारी मारले गेले. अशा प्रकारे मागील २६ वर्षांत संपूर्ण भारतात १३६ आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. या आक्रमणांवरून भारतीय सुरक्षादल आतंकवाद्यांशी लढण्यास सक्षम नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती एन्एस्जीच्या प्रमुखांनी गृहराज्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे दिली होती. 

बदायू (उत्तरप्रदेश) येथे प्राचीन मंदिराचे सहा घुमट तोडल्याचे उघडकीस !

     बदायू येथील खुनक या गावामध्ये १५ जानेवारी या दिवशी १५० वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन मंदिराच्या १२ घुमटांपैकी ६ घुमट तोडल्याचे निदर्शनास आले. हे पाहून संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर बर्‍याच कालावधीने बिनाबर ठाण्याचे पोलीस अधिकारी घुमटांचे पाडलेले अवशेष हटवण्यासठी काही मजुरांना घेऊन पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. थोड्या वेळाने प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी लिखित तक्रार देऊनही पोलिसांनी अद्यापही गुन्हा प्रविष्ट केलेला नाही.

पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात सडेतोड उत्तर द्या ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा वज्राघात

हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापुरात येऊन पुरोगाम्यांचे आव्हान स्वीकारले !

 • ५ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांच्या उपस्थितीने हिंदुविरोधी आणि पुरोगामी यांच्या उरात धडकी !
 • कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभा
हिंदूंच्या मनात राष्ट्र आणि धर्म तेजाचे स्फुल्लिंग चेतवतांना पू. (कु.) स्वाती खाडये !
कोल्हापूर, ६ फेब्रुवारी (वार्ता.) - पुरोगाम्यांनी हिंदुत्ववाद्यांना कोल्हापुरात येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर देण्यासाठीच मी येथे आलो आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरात अनेक वेळा निवडणूक लढवली आणि ते प्रत्येक वेळी हरले आहेत. त्यामुळे हे शिवरायांचे कोल्हापूर आहे; कॉ. पानसरे यांचे नाही, हेच स्पष्ट होते. येनकेनप्रकारेण पुरोगामी हिंदुत्ववाद्यांचा अपमान करत आहेत. हिंदुविरोधी मोहिमांचे आयोजन करत आहेत. त्यामुळे पुरोगाम्यांच्या अशा वैचारिक आतंकवादाच्या विरोधात गप्प न रहाता सडेतोड उत्तर द्यावे, असे आव्हान हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केले. राजारामपुरीतील लकी बजारशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते. आरंभी सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशबंदीला केरळ शासनाचे समर्थन !

जे केरळ शासन करू शकते, ते महाराष्ट्र शासन का करू शकत नाही ? शनिशिंगणापूर
प्रकरणी महाराष्ट्र शासनानेही धर्माची बाजू घ्यावी, ही समस्त हिंदूंची अपेक्षा आहे !
शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी कायम !
नवी देहली - केरळ शासनाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशबंदीला योग्य ठरवत त्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यघटनेनुसार मंदिरात अनुष्ठान, समारंभ आणि पूजा करण्याचा विधी पूर्णत: धर्माचा भाग असल्याचे म्हटले आहे.
१. 'यंग लॉयर्स असोसिएशन' या संघटनेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. या याचिकेत शबरीमाला मंदिरात मासिक पाळी चालू असलेल्या मुलींना प्रवेशबंदी असण्यावर आक्षेप घेतला आहे.
२. यावर शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यात म्हटले आहे की, घटनेतील अनुच्छेद २५ आणि २६ नुसार सर्व व्यक्ती अन् समाज ते त्यांना योग्य वाटेल त्या धर्माचे पालन करू शकतात, तसेच ते त्यांच्या धर्माचा प्रसार-प्रचारही करू शकतात.

(म्हणे) शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा !

काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे-पाटील यांचे विधान 
अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी विखे-पाटील काही बोलतील का ?
      रहाता (जिल्हा नगर) - शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदीची परंपरा स्थानिक ग्रामस्थांनी पाळली आहे. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. महिलेला एकीकडे माता समजले जाते, दुसरीकडे देवाच्या दर्शनासाठी मात्र मज्जाव केला जातो. त्यांना दर्शनापासून रोखले जाते. (धर्मशास्त्र आणि परंपरा या भावनांवर चालत नाहीत. त्याचसमवेत महिलांना मंदिरामध्ये प्रवेश असून चौथर्‍यावर जाण्यास बंदी आहे, हेही विखे-पाटील यांनी जाणून घ्यावे. - संपादक) महिला ही माता आणि अर्धांगिनी आहे. महिलेच्या पोटी जन्म घेऊनही महिलांमुळे देव बाटत असेल, तर ही निवळ अंधश्रद्धा आहे, असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी लोणीत पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. (धर्मपरंपरा पाळणे, ही श्रद्धा असून ते धर्माचरण आहे, अंधश्रद्धा नव्हे ! - संपादक)

शिवसेनेच्या विरोधामुळे ठाणे महोत्सवात गुलाम अली गाणार नाहीत !

पाकिस्तान्यांना विरोध करणार्‍या प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनेचे अभिनंदन !
      मुंबई - ठाणे महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गाणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने पाकिस्तानी कलावंतांना केलेल्या प्रखर विरोधामुळे आव्हाड यांना ही भूमिका घ्यावी लागली. गुलाम अली यांना ठाणे महोत्सवात गाण्याचे निमंत्रण देत आव्हाड यांनी वाद निर्माण केला होता. शिवसेनेने गुलाम अली यांना जोरदार विरोध केल्यामुळे त्यांचे मुंबईतील कार्यक्रम रहित करावे लागले होते; मात्र आव्हाड यांनी गुलाम अली यांच्या कार्यक्रमाविषयी आपला हेका चालूच ठेवला होता; परंतु शिवसेनाही भूमिकेवर ठाम राहिल्याने शेवटी आव्हाड यांना माघार घ्यावी लागली. महोत्सवात कोणतीही गडबड नको यासाठी तूर्तास गुलाम अली यांचा कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतल्याचे आव्हाड यांनी वृत्तसंस्थांशी बोलतांना सांगितले.

भारत-पाक चर्चा लवकरच पुढे जाईल ! - नवाज शरीफ यांची आशा

चर्चा करून भारत काहीही साध्य करू शकत नाही आणि पाकिस्तान 
भारताला चर्चेत गुंतवून आतंकवादी कारवाया पार पाडतो !
     इस्लामाबाद - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधानसभेत बोलतांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समग्र द्विपक्षीय चर्चा लवकर पुढे जाईल, अशी आशा व्यक्त केली. काश्मीरसहित सर्व महत्त्वाची सूत्रे चर्चेद्वारा सोडवली जाऊ शकतात. त्यांनी पाकिस्तान आतंकवादासहित प्रत्येक प्रकरणात भारताला साहाय्य करण्यास तत्पर असल्याचे म्हटले. भारत-पाक विदेश सचिव स्तरीय चर्चा १५ जानेवारीला होणार होती; परंतु पठाणकोट येथील आक्रमणानंतर ती पुढे ढकलण्यात आली.

नेहरूंकडून आझाद हिंद सेनेने जमा केलेले धन चोरण्याचा संशय असणारे अय्यर यांचा उच्चपद देऊन गौरव !

नेताजींचा कमालीचा द्वेष करणार्‍या नेहरूंकडून आणखी वेगळी अपेक्षा काय करणार ?
नेताजींशी संबंधित दस्तावेजांमधून माहिती उघड
     नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांकडून धन जमा केले होते. ते सैन्य उभारणीसाठी वापरण्यात येत होते. नेताजींच्या पश्‍चात हे धन चोरीला गेले. या चोरीचा संशय असलेले एस्.ए. अय्यर यांना तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून वर्ष १९५३ च्या पंचवार्षिक योजना कार्यक्रमाचे प्रसिद्धी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, असे नुकतेच सार्वजनिक करण्यात आलेल्या नेताजींशी संबंधित दस्तावेजांमधून समोर आले आहे.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

नांदेडमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून दोघांना अटक

      नांदेड - भारतीय हत्यार कायदा आरोपाखाली पसार झालेल्या इम्तियाजखान सरदार खान (वय २२ वर्षे) याच्यासह दोघांना येथील आतंकवाद विरोधी पथकाने (एटीएस्) ४ फेब्रुवारीच्या रात्री अटक केली. या दोघांना पुसद पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी तीन तरुणांना अटक झाली होती. त्यांच्याकडून पोलिसांना जिवंत काडतुसे, गन पावडर आणि शस्त्रासंबंधी साहित्य मिळाले होते. ज्या तीन तरुणांना अटक झाली होती, त्यांनी ही शस्त्रे इम्तियाजखान सरदार खान (पुसद, जिल्हा यवतमाळ) याच्या सांगण्यावरून आणल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे दोन महिन्यांपासून पोलीस इम्तियाजचा शोध घेत होते. इम्तियाजचे वडील सरदार खान अमीर खान यांना एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! - संपादक)

पुणे शहरात शिरस्त्राण सक्तीच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन

      पुणे - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुण्यासह महाराष्ट्रात लवकरच शिरस्त्राण सक्ती करण्याविषयीची घोषणा ३ फेब्रुवारी या दिवशी केली होती. त्यानंतर ४ फेब्रुवारीपासून शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात शिरस्त्राण सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा, मंडई येथे सर्वपक्षीय निषेध सभा आणि निदर्शने करण्यात आली. या वेळी झालेल्या निषेध सभेत शिरस्त्राण सक्तीपेक्षा ते वापरण्याविषयी लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असे सूत्र मांडण्यात आले. या वेळी अनेक नागरिकांनीही सहभाग नोंदवला.
दुचाकीवर मागे बसणार्‍यासही शिरस्त्राण सक्ती लागू
     अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींना शिरस्त्राण सक्ती लागू करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी त्या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

भारत असहिष्णु नाही, सहिष्णुता आमच्या डिएन्एमध्येच आहे ! - श्री श्री रविशंकर

     नवी देहली - आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे की, देशात चालू असलेल्या असहिष्णुतेवरील चर्चेशी मी सहमत नाही. देशात काही लोक असहिष्णु असले, तरी तुम्ही देशातील संपूर्ण जनता असहिष्णु झाली, असे म्हणू शकत नाही. जनता सहिष्णु आहे, कारण देशाच्या डिएन्एमध्येच सहिष्णुता आहे. त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकत नाही की, देश अचानक असहिष्णू झाला. त्यांनी हेही स्पष्ट केले की, पुरस्कार परत करण्याची मोहीम योग्य नव्हती. मी त्या सर्वांचा सम्मान करतो ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत.
     श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले की, समस्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडित आहे आणि ती अनेक वर्षांपासून आहे. सवाशे कोटी लोकसंख्येच्या देशात गुन्हेगारी असू शकते.

मराठी टायगर्सच्या खेळाला सीमाभागातील गावात प्रचंड गर्दी

शिवसेनेच्या चेतावणीनंतर जिल्हा प्रशासनाने चित्रपटावरील बंदी हटवली !
     कोल्हापूर - सीमावासियांच्या भावना मांडणारा मराठी टायगर्स हा मराठी चित्रपट शिनोळी (जि. कोल्हापूर) येथे दाखवण्यास कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. शिवसैनिक आणि येथील मराठी बांधव यांच्या रोषामुळे प्रशासनाला रातोरात या चित्रपटावरील बंदी मागे घ्यावी लागली. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषात मिरवणूक काढून तंबूत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या वेळी कर्नाटक पोलिसांकडून सीमाभागातून येणार्‍या वाहनांची कसून चौकशी करून वाहनांच्या क्रमांकांची नोंदणी करण्यात येत होती.
     मराठी टायगर्स चित्रपटाला कर्नाटक उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवूनही बेळगावच्या स्थानिक प्रशासनाने चित्रपटगृह चालकांवर हा चित्रपट दाखवू नये, यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे बेळगावला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात तंबू ठोकून हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वायूप्रदूषणामुळे दहनसंस्कार करतांना लाकडाचा वापर नको ! - सर्वोच्च न्यायालय

हिंदूंच्या धार्मिक परंपरांविषयी निकाल देतांना न्यायालयाने त्यामागील 
धर्मशास्त्र जाणून घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     देहली - पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने दहनसंस्कार न करता सीएन्जी किंवा विद्युत शवदाहिनीचा वापर करण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आग्रा येथील विश्‍वप्रसिद्ध ताजमहालाच्या सभोवतालचे पर्यावरण सुधारण्याच्या प्रकरणी सुनावणी करतांना न्यायालयाने सांगितले की, केवळ ताजमहालाशेजारील स्मशानभूमीचेच नाही तर देशातील स्मशानभूमीद्वारा होणारे प्रदूषण अल्प करायला हवे. यासाठी अन्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे. लाकूड जाळल्याने प्रदूषणामध्ये होणारी वाढ थांबवता येऊ शकते. मागील सुनावणीच्या वेळीही न्यायालयाने विद्युत शवदाहिनीच्या आधारे शवांचे दहन करण्यासंदर्भात विचार करून ते निःशुल्क करण्यास सांगितले होते.

पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारा प्रादेशिक 
परिवहन विभाग सर्वसामान्य लोकांच्या समस्यांकडे कशा
प्रकारे लक्ष देत असेल, याचा विचारच न केलेला बरा !
     पुणे - येथील प्रादेशिक परिवहन विभागातील (आर्टीओ) निरीक्षकांकडून कोणत्याही वाहनाची पडताळणी करण्यात येत नाही. अशा परिस्थितीत पडताळणीविनाच त्यांना योग्यता प्रमाणपत्रे (फिटनेस सर्टिफिकेट) दिली जात असल्याचे उघडकीस आले होते. (असा चालतो प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार ! - संपादक) या प्रकरणी येथील श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. (समाजहितासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार उघड करणार्‍या श्रीकांत कर्वे यांचे अभिनंदन ! - संपादक) या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे झाली. त्यावर उच्च न्यायालयाने परिवहन विभागाला पुढील ३ मासांत संबंधित ३० निरीक्षकांवर कारवाई करून निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता; परंतु या आदेशाला ८ मास झाले, तरी परिवहन विभागाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे कर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी शनिमंदिरासंदर्भातील भूमिका पुरोगाम्यांच्या दबावाने नको, शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाने घ्यावी ! - हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसची दुटप्पी भूमिका - केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना
प्रवेश न देण्याविषयी ठाम, तर महाराष्ट्रात प्रवेशाची मागणी ?
     मुंबई - शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचा निष्कारण वाद चालू असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी, शनिशिंगणापूर मंदिर विश्‍वस्त आणि आंदोलक संघटना यांची बैठक निष्फळ ठरल्याने आता हा विषय मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे सांगितले जात आहे. हा विषय स्त्री-मुक्तीचा नसून पूर्णत: धार्मिक असल्याने याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी धार्मिक क्षेत्रातील तज्ञांकडून (चार पीठांचे शंकराचार्य, धर्माचार्य, काशी विद्वत परिषद यांच्याकडून) याविषयी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
     केरळ येथील शबरीमला देवस्थानात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सध्या चालू असलेल्या याचिकेविषयी न्यायालयाने तेथील राज्य सरकारला भूमिका विचारली असता, तेथील काँगेस शासनाने १० ते ५० वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेश नसावा, ही परंपरा चालूच रहावी, असे स्पष्ट प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे.

भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तेलंगण राष्ट्र्र समितीला स्पष्ट बहुमत !

एम्.आय.एम्. सत्तेवरून पायउतार, तर काँग्रेस, तेलुगू देसम आणि भाजप यांचा दारूण पराभव !
     भाग्यनगर - भाग्यनगर महानगरपालिकेच्या २ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या निवडणुकीचा निकाल ५ फेब्रुवारीला घोषित झाला. या निवडणुकीत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने एकूण १५० जागांपैकी तब्बल १०२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तेलंगण हे वेगळे राज्य स्थापन झाल्यापासून तेलंगण राष्ट्र समितीने यंदा प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक लढवली.

(म्हणे) मला गोमांस खाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही !

 • ओवैसींची ही सहिष्णुता आहे का ? 
 • एका ओवैसीला रोखू न शकणारे प्रशासन जिहादी आतंकवाद्यांना कसे रोखणार ?
 • एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसीचे विषारी फुत्कार
     नवी देहली - एम्.आय.एम्.चे नेते आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवाण्याचा प्रयत्न केला आहे. ओवैसी यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यात मी गोमांस खातो आणि खाईन,... काय करणार सांगा?, मुसलमान चार-चार मुलांना जन्म देत आहेत. तुम्ही आठ-आठ मुले जन्माला घाला. मुसलमानांना चार-चार बायका आहेत. तुम्हाला कोणी अडवले ?, असे विषारी फुत्कार ओवैसी यांनी हिंदूंना उद्देशून काढले आहेत. भाग्यनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित एका प्रचारसभेत बोलतांना ओवैसी यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवरही हीन पातळीवर टीका केली. ओवैसी तेलंगण विधानसभेतील आमदार आहेत. यापूर्वी विषारी भाषण देण्यावरून त्यांच्यावर खटले चालू आहेत.

ब्राह्मण समाजाला संघर्ष करण्याची वेळ आलीच, तर मी आपल्या पाच पावले पुढे राहीन ! - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

अखिल भारतीय ब्राह्मण संमेलन !
ब्राह्मण समाजाच्या विरोधात सातत्याने गरळओक करणार्‍या ब्राह्मणद्वेषी
संघटनांवर कारवाई होण्यासाठी धनंजय मुंडे काही प्रयत्न करतील का ?
     लातूर - स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रउभारणीसाठी मोठे योगदान देणार्‍या ब्राह्मण समाजावर संघर्ष उभारण्याची वेळ येणार नाही. कदाचित ती आली तर मी आपल्यासाठी पाच पावले पुढे राहीन, अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. येथील पेशवा संघटनेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय ब्राह्मण महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुरुवर्य यज्ञेश्‍वरशास्त्री सेलुकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह अन्य धर्माचार्यांची या वेळी उपस्थिती होती. श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
     मुंडे पुढे म्हणाले की, ब्राह्मण समाजाचे राष्ट्राच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. आज २१ व्या शतकात राष्ट्रपुरुषांना जातीच्या मापदंडात मोजले जात आहे. माझ्यासारख्या भटक्या विमुक्त जातीतील व्यक्तीला ब्राह्मण महासंमेलनास बोलावले, हा माझा बहुमान समजतो.

जुन्नर (जिल्हा पुणे) येथील श्री रंगदास स्वामी मंदिरातील रक्कम चोरीस

      जुन्नर - येथील अणे गावातील श्री रंगदास स्वामी मंदिरातील महोत्सव प्रसिद्ध आहे. या मंदिरातील दानपेटी चोरांनी फोडून रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचे पुजारी सुधीर आंबेकर हे ५ फेब्रुवारी या दिवशी पूजा करण्यासाठी मंदिरात आले, तेव्हा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरी झाल्याचे दिसले. या पेटीतील नेमकी किती रक्कम चोरी झाली, ते कळू शकलेले नाही. मंदिराच्या बाहेर असलेल्या क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये चोरांची प्रतिमा मुद्रित झाली असून त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

सियाचीन दुर्घटनेत सातारा येथील सैनिक सुनील सूर्यवंशी हुतात्मा

     सातारा - सियाचीनमध्ये हिमकडा कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दहा भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या दहा भारतीय सैनिकांपैकी एक सैनिक हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. सुनील विठ्ठल सूर्यवंशी असे या सैनिकाचे नाव आहे. सुनील हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुकुडवाड जवळील मस्करवाडी गावचा आहे. या घटनेची माहिती गावात समजताच गावात शोककळा पसरली आहे.

मैत्रेय ग्रुपच्या वर्षा सत्पाळकरांना कोठडी

      नाशिक - राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रेय ग्रुपच्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वर्षा सत्पाळकर आणि जनार्दन परुळेकर यांच्यावर सरकारवाडा पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये (एम्पीआयडी) गुन्हा नोंद केला आहे. त्यापैकी सत्पाळकर यांना मुंबईहून अटक केल्यानंतर ५ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेच्या विरोधात मैत्रेयच्या दलालांनी जिल्हा न्यायालयात गोंधळ घातला होता.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

रोहित वेमुला एम्.आय.एम्.चा कार्यकर्ता होता ! - अभाविप नेत्याचा आरोप

      मुंबई - हैदराबाद विश्‍वविद्यालयातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते सुशीलकुमार यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केला की, आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला दलित नसून ओबीसी होता. तो आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनचा सदस्य होता. तसेच ओवैसी बंधूंच्या एम्.आय.एम्. या पक्षाशी तो घनिष्ठ संबंध ठेवून होता. त्याच्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सुशीलकुमार यांनी केली. आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनने जिहादी आतंकवादी याकूब मेननच्या फाशीच्या विरोधात हैदराबाद विश्‍वविद्यालयातील परिसरात निदर्शने केली होती. त्याला अभाविपने विरोध केला. त्यामधून आमच्या दोन्ही संघटनांत वादाची ठिगणी पडल्याचे सुशीलकुमार यांनी सांगितले.

जर्मनीनंतर आता रशियामध्येही सिरियाच्या ५१ शरणार्थींनी केली महिलांची छेडछाड !

     रशिया - ३१ डिसेंबरच्या रात्री जर्मनीच्या कोलॉन, हैम्बर्ग इत्यादी शहरांमध्ये सहस्रो सिरियन शरणार्थींनी शेकडो महिलांची छेडछाड आणि बलात्कार केले होते. आता हीच अवस्था रशियाची होते की काय असे चित्र आहे. हल्लीच ५१ शरणार्थींच्या एका गटाने रशियातील मुरमान्स्क शहरातील एका नाईट क्लबमध्ये महिलांची छेडछाड करण्याची घटना घडली. 
      हे कळताच स्थानिक रशियन नागरिकांनी शरणार्थींच्या गटावर आक्रमण करत त्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ३३ शरणार्थींना अटक केली, तर अन्य १८ जणांना थेट चिकित्सालयात भरती करावे लागले. 
     मिळालेल्या माहितीनुसार वाईट वर्तनामुळे या शरणार्थींची याआधी युरोपीय देश नॉर्वेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. डेली कॉलर नावाच्या विदेशी संकेतस्थळानुसार महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात रशियन नागरिक हे युरोपीय नागरिकांपेक्षा अधिक असहनशील असतात.

हिंदुत्ववादी संघटना हिंदु संहतीच्या ८ व्या स्थापना दिवसानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन !

      कोलकाता - बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु संहति या हिंदुत्ववादी संघटनेचा ८ वा स्थापना दिवस १४ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाची सिद्धता जोरात चालू आहे. 
१. यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए हे कार्यक्रमाला मुख्य अतिथीच्या रूपात उपस्थित रहाणार आहेत.
२. भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंदजी महाराज आणि भोलागिरी आश्रमाचे उपाध्यक्ष स्वामी तेजसानंद गिरीजी महाराज यांची कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.
३. याबरोबरच झारखंडच्या तरुण हिंदु संघटनेचे अध्यक्ष श्री. नील माधव दास आणि प्रसिद्ध कवी आणि व्हिडियो ब्लॉगर सरदार रविज्योत सिंह हेसुद्धा कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. 
४. १४ फेब्रुवारीला दुपारी १ पासून कोलकात्यातील एस्प्लेनेड येथील राणी राशमोनी मार्गावर हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुडगाव (हरियाणा) येथे गोपॅथी निवासी शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

       गुडगाव (हरियाणा) - येथील महमदपूर झाडसा या गावात ३० आणि ३१ जानेवारी या दिवशी किसान धाम श्री लाडवा गोशाळेचे श्री. नरेश कौशिक यांनी गोपॅथी (गोउत्पादनाद्वारे करण्यात येणारे उपचार) निवासी शिबिराचे आयोजन केले होते. हरियाणामधील अनेक जिल्ह्यांतून ३०-४० युवक या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरात प्रामुख्याने गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र यांपासून उत्पादने बनवणे यावर भर दिला गेला. सर्व शिबिरार्थींना उत्पादने बनवायच्या पद्धतीसह त्यासाठी लागणार्‍या प्रमाणाची छापिल प्रत देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विनय पानवळकर यांनी गायीचे आध्यात्मिक महत्त्व, धर्मशिक्षण आणि धर्मरक्षण यांचे महत्त्व सांगितले. या निमित्ताने सनातनची सात्त्विक उत्पादने, ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago : Shabarimala mandirme mahilayonki praveshbandi ko Keral sarkar ka samarthan. - Kya Shanishinganapur vishay mein bhi Maharashtra sarkar dharmka saath degi ?

जागो ! : शबरीमाला मंदिर में महिलाआें की प्रवेशबंदी को केरल सरकार का समर्थन. - क्या शनिशिंगणापूर विषय में भी महाराष्ट्र सरकार धर्म का साथ देगी ?

फलक प्रसिद्धीकरता

शनिशिंगणापूर प्रकरणीही महाराष्ट्र शासनाने केरळसारखी धर्माची बाजू घ्यावी, ही हिंदूंची अपेक्षा !

केरळ शासनाने शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीला योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यात राज्यघटनेनुसार मंदिरात अनुष्ठान, समारंभ आणि पूजा करण्याचा विधी पूर्णत: धर्माचा भाग असल्याचे म्हटले आहे.


शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाविषयीची बैठक निर्णयाविना समाप्त !

धार्मिक प्रथांविषयी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ धर्माचार्यांना असतांना पुरोगामी आणि शासकीय अधिकारी यांना त्यात लुडबुड करण्याचा काय अधिकार !
नगर, ६ फेब्रुवारी - शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरील महिलांना प्रवेश देण्यात यावा कि नाही, यासाठी नगरचे जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. अनिता शेटे, जिल्हा पोलीस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. बैठकीत श्री शनिदेवाच्या मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंद असल्याच्या प्रकरणी देवस्थानचे विश्‍वस्त आणि तृप्ती देसाई या दोघांनी त्यांची भूमिका मांडली. या प्रकरणी तूर्तास तोडगा निघणार नसून त्याविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सूत्रांकडून समजते.

विक्रोळीत २ सिलेंडरचा स्फोट, २ मुलांसह ३ ठार

     मुंबई - विक्रोळीत पार्कसाइट परिसरातील गादीच्या दुकानात शॉर्टसर्किट झाल्यानंतर ठिणगी उडून २ सिलेंडरचा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. या दुर्घटनेत २ मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला. आगीत गंभीर जखमी झालेली २ मुले आणि महिला यांना राजावाडी रुग्णालयामध्ये नेले होते. तिथेच उपचाराच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती झोन ७चे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.

माहितीपेक्षा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक ! - विनोद तावडे

     नवी मुंबई - पुढील ३ वर्षांत शिक्षकांना चांगले दिवस येणार आहेत. मी ७० टक्के शिक्षणाचे आणि ३० टक्के शिक्षकांचे काम करणार आहे. शिक्षकांच्या आरोग्यासाठी कॅशलेस विमा योजना लवकरच लागू होणार आहे. माहितीपेक्षा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. मराठी माध्यमही सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिक्षकांनी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे. शिक्षकांच्या भरतीवरील बंदी सरकारने उठवली असून आंतरजिल्हा बदलीची मागणीही काही महिन्यात पूर्ण होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ऐरोली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
म्हणे, माध्यमांनी शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करू नये ! - शरद पवार
     या वेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, या अधिवेशनासाठी शिक्षकांना दिलेल्या ६ दिवस सुटीचा माध्यमांनी बाऊ करणे अयोग्य आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिक्षकांना नवी मुंबईत पोहोचायला वेळ लागत असल्याने तीन वर्षांतून एकदा होणार्‍या अधिवेशनास रजा घेतली आहे. येतांना वाटेत त्यांनी एखादे ठिकाण पाहिल्यास त्यात काय हरकत आहे ? (६ दिवस विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी कोण भरून काढणार ? अशी विचारसरणी असल्यामुळेच काँग्रेसच्या काळात शिक्षण खात्याचा भोंगळ कारभार चालू राहिला होता ! - संपादक)

नेदरलँडच्या अ‍ॅमस्टरडॅम विमानतळावर प्रवाशांसाठी उपलब्ध होणार हिंदु धर्मग्रंथ !

केंद्रशासन भारतातील विमानतळांवर अशी सुविधा कधी उपलब्ध करून देणार ?
     अ‍ॅमस्टरडॅम - येथील शिफोल विमानतळ प्रशासन प्रवाशांसाठी हिंदु धर्मग्रंथ वेद, उपनिषद, भगवद्गीता आदि ग्रंथ उपलब्ध करणार आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वारराजवळाच प्रार्थना आणि ध्यान केंद्र बनवण्यात आले आहे. तेथे हे धर्मग्रंथ उपलब्ध असणार आहेत.

दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू हाशिम आमलाने निवेदिकेला तोकडे कपडे पालटण्यास भाग पाडले !

कुठे स्त्रीला झाकून ठेवण्याची इस्लामची शिकवण आहे ! धर्माचरण करणारा मुसलमान 
क्रिकेटपटू त्याविषयी सतर्क असतो ! किती हिंदु क्रिकेटपटू धर्मपालन करतात ?
     केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हाशिम आमला याने त्याची मुलाखत घेणार्‍या एका भारतीय टीव्ही निवेदिकेला तिने घातलेले तोकडे कपडे पालटायला भाग पाडले. 
       एबीपी लाईव्ह या संकेतस्थळानुसार ३२ वर्षीय आमलाची एक भारतीय निवेदिका मुलाखत घेणार होती. या वेळी तिने अत्यंत तोकडे कपडे परिधान केले होते. यावर नाराज झालेल्या हाशिम आमलाने निवेदिकेचा पोशाख योग्य नसल्याचे सांगत मुलाखत देण्यास नकार दिला आणि स्वत:च्या काही अटी आयोजकांसमोर मांडल्या. यानंतर संबंधित निवेदिकेला कपडे बदलून येण्यास आयोजकांकडून सांगण्यात आले.
        मुसलमान धर्माचा कट्टर अनुयायी असलेल्या हाशिम आमलाने याआधीही त्याच्या जर्सीवर कास्टल बीअरचे विज्ञापन झळकावण्यास नकार दिला होता. यासाठी तो ५०० डॉलर्स अर्थात ३४ सहस्र रुपयांचा दंड भरायलाही सिद्ध झाला होता. नवसारी (गुजरात) येथे बस नदीत कोसळून ४२ ठार

     नवसारी - गुजरातमधील नवसारीजवळ ५ जानेवारी या दिवशी बस नदीत कोसळल्याने ४२ जणांचा मृत्यू झाला तर, २४ जण घायाळ झाले आहेत. घायाळांमधील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सहा प्रवाशांचा समावेश आहे. गुजरात परिवहन मंडळाची बस उकईहून नवसारीकडे जात होती. सुपा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून जातांना समोरून येणार्‍या वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि २० फूट उंचीवरून बस नदीत कोसळली. चेन्नईच्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात हिंदु जनजागृती समितीकडून पालकांचे प्रबोधन

     चेन्नई, ४ फेबु्रवारी (वार्ता.) - येथील कोलाथूर भागात असलेल्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात विळक्कु पुजै अर्थात् दीपपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना पूजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या व्यवस्थापनाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पालकांचे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते. 
      या वेळी समितीच्या सौ. सुगंथी जयकुमार यांनी मुलांना घडवण्यासाठी पालकांच्या दायित्वासंदर्भात दिशादर्शन केले. राजमाता जिजाबाई यांनी छत्रपतींना कसे घडवले, याविषयी माहिती देऊन सौ. सुगंथी यांनी छोट्या-छोट्या कृतींच्या माध्यमातून मुलांना राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे बाळकडू कसे देऊ शकतो, याविषयी उपस्थित पालकांना सांगितले. या वेळी ५० पालक उपस्थित होते.
      विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजाराम आणि उपप्राचार्य श्रीमती तमिळ सेल्वी हे मुलांमध्ये राष्ट्र-धर्माविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांचे वरचेवर आयोजन करत असतात. (विविध उपक्रामांच्या माध्यमातून मुलांमध्ये राष्ट्र-धर्मप्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे प्राचार्य श्री. राजाराम आणि उपप्राचार्य श्रीमती तमिळ सेल्वी यांचे अभिनंदन ! देशातील अन्य शाळा-महाविद्यालयांनीही या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत ! - संपादक)

ऑस्ट्रेलिया बनवणार शरणार्थींच्या विरोधात कठोर नियम !

केवळ ३ आतंकवादी कारवायांनंतर शहाणा झालेल्या ऑस्ट्रेलियाकडून शेकडो 
जिहादी घटनांना तोंड देणारा अतिसहिष्णु भारत कधी शिकणार ?
     ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात एबीसी या संकेतस्थळानुसार, ऑस्ट्रेलियाची गुप्त कागदपत्रे प्रसारमाध्यमांच्या हाती आली आहेत. यांतून ऑस्ट्रेलिया जिहादी आतंकवादाच्या विरोधात अतिशय सतर्क असून धर्मांधांना देशापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
     मिळालेल्या कागदपत्रांत, केंद्रीय मंत्री पीटर डट्टन यांना काही महत्त्वपूर्ण सूचना सुचवण्यात आल्या आहेत. डट्टरन ही सूत्रे मंत्रीमंडळाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीसमोर मांडणार आहेत. याद्वारे देशाच्या मानवतावादी पुनर्वसन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पालट होणार असल्याचे दिसते. यामुळे देशात कायमस्वरूपी रहाण्यासाठीचे नियम कठोर करण्यात येतील, तसेच ऑस्ट्रेलियात येणार्‍या शरणार्थींवर, ते ऑस्ट्रेलियाचे नागरिक झाल्यावरही बारीक लक्ष ठेवण्यात येईल. (भारतात रहाणार्‍या कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सर्वपक्षीय राज्यकर्ते निष्क्रीय का रहातात ? यामुळे भारत स्वच्छता अभियानाबरोबरच देशातील या बांगलादेशींना हाकलून देश स्वच्छ करण्याची राष्ट्रप्रेमींची अपेक्षा किमान मोदी शासन तरी पूर्ण करील का ? - संपादक)
     ऑस्टे्रलियाच्या भूमीवर गेल्या काही काळात झालेल्या तीन जिहादी आतंकवादी आक्रमणांच्या घटनांमध्ये शरणार्थींचा हात असल्याचेच स्पष्ट झाले होते. त्यामुळे १२ सहस्र सिरियन लोकांना देशात आश्रय दिला जाईल या केंद्रशासनाच्या आश्‍वासनावरही काळजी व्यक्त करण्यात आली आहे.

समाजातील दोष दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ! - प्रा. दुर्गेश परुळकर

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या 
दिवशी भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान या परिसंवादात 
प्रा. दुर्गेश परुळकर यांनी मांडलेले विचार 
प्रा. दुर्गेश परुळकर
      स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पद्धतीने आपल्या समाजातील दोष दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तो पुढाकार घेतांना सावरकरांच्या मनात सर्वांत प्रथम हा विचार आला होता की, वर्षांनुवर्षे एखादा विचार, एखादी जीवनपद्धती, एखादी चालीरिती माणसाच्या रक्तात भिनलेल्या असतात, त्याच्यात दोष आहे. तो दोष राष्ट्रहिताला बाधक आहे. यासाठी आपल्याला तो दोष मुळासकट काढून टाकायला हवा. हे ज्या वेळी मी समाजाला सांगीन, त्या वेळी समाज माझ्या पाठीशी उभा न रहाता मला विरोध करील, हे सावरकरांना निश्‍चित ठाऊक होते.

तथाकथित साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीविषयी सुचलेले विचार

पुरस्कार परत करणार्‍यांनी पुरस्कार घेण्याची आपली पात्रताच नाही, हेच एक प्रकारे सिद्ध केले असणे
     सध्या ज्यांची पात्रता नाही अशा व्यक्तींनाही पुरस्कार दिले जातात. खरेतर असे करणे, म्हणजे त्या पुरस्कारांचा अपमान केल्यासारखे आहे. पुरस्कार परत करणार्‍यांनी ते परत करून पुरस्कार घेण्याची आपली पात्रताच नाही, हेच एक प्रकारे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना फार डोक्यावर न घेता त्यांनी जे केले ते चांगलेच केले, हे त्यांना सांगायला हवे. आता सर्वजण त्यांचे फार लाड करत असल्याने आणि त्यांना किंमत देत असल्यानेच ते फार शेफारले आहेत. त्यामुळे अशांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे डोके आणि पर्यायाने डोक्यातील सडके विचार ठिकाणावर येतील.
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१५) हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात रान उठवणार्‍या वृत्तवाहिन्या या वृत्ताविषयी गप्प का ?

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
     नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून अमानुष मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत. 
      मुलांना एका मासात केवळ १५ मिनिटे पालकांना भेटण्याची अनुमती मिळत असे त्यांना बायबलमधील उतारे पाठ करण्याशिवाय इतर काहीच शिकवण्यात येत नव्हते. 
(संदर्भ : इंडिया टुडे)

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी इंग्रजी शाळांना अनुदान देणे, हा मुलांच्या भवितव्याशी आणि गोव्याच्या सांस्कृतिक भवितव्याशी खेळ नाही का ?

    इंग्रजी शाळांना अनुदान देण्यासंदर्भात भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि फोर्स या संघटनांनी परस्परविरोधी आंदोलन उभारले आहे. या संघटनांनी विद्यार्थी, शाळा आणि शिक्षणसंस्था यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

मुसलमानांच्या सभेत जायचे सामर्थ्य एकातरी हिंदूंत आहे का, एखादा गेला, तर तो जिवंत परत येईल का ?

      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कात्रज, पुणे येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या पटांगणात ३१ जानेवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी एक बुरखाधारी महिला सभास्थळी प्रवेश करू पहात होती. धर्मजागृती सभा केवळ हिंदूंसाठी असल्याचे सांगितल्यावरही आतमध्ये प्रवेश करण्याचा तिचा हेका कायम होता. कार्यकर्त्यांनी तिला बाहेर काढले. दोन मुसलमान तरुणांनीही सभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

गुन्हेगार महिलांचे प्रमाण वाढणार असणे
     ह्रस्वकाया महाहारा भूर्यपत्या गतह्रियः ।
     शश्‍वत्कटुकभाषिण्यश्‍चौर्यमायोरुसाहसाः ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्‍लोक ३४
अर्थ : स्त्रियांची शरिरे लहान असली तरी त्यांचा आहार अधिक असेल. त्यांना संतती पुष्कळ होईल. त्या निर्लज्ज, नेहमी कर्कश बोलणार्‍या आणि चोरी आणि कपट करण्यात मोठ्या धाडसी होतील. हिंदु धर्मजागृती सभा पाहून प्रभावित झालेल्या युवकांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया

      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कात्रज, पुणे येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या पटांगणात ३१ जानेवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी सभा पाहून प्रभावित झालेल्या युवकांनी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिक्रिया येथे देत आहोत.
१. हिंदुत्वाची ठिणगी एक दिवस मशाल बनून हिंदु राष्ट्राची स्थापना करेल, यात शंका नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू ! - श्री. सागर पाटील, बनपुरी, कात्रज, पुणे.
२. धर्मसभेसंदर्भातील अभिप्राय शब्दात सांगता येणार नाही. या धर्मसभेमुळे धर्मासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे धाडस निर्माण झाले. - श्री. अनिकेत शिंदे, कात्रज, पुणे.


सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांनाही न जुमानण्याइतके उद्दाम झालेले पोलीस !

     हिंदूंसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाची अनुमती मागण्यासाठी हिंदुत्ववादी एका पोलीस ठाण्यात गेले; मात्र पोलिसांनी त्या कार्यक्रमाला मान्यता दिली नाही. कार्यक्रमाला पोलिसांनी मान्यता द्यावी, यासाठी ते हिंदुत्ववादी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांना भेटले. त्याविषयी आमदारांनी पोलीस अधिकार्‍यांना दूरभाष केला; पण अधिकार्‍यांनी आमदारांचा दूरभाष उचलण्याचेही सौजन्य दाखवले नाही.


भूमाता ब्रिगेडच्या महिलांनो, देवाला स्टंट करून नव्हे, तर भावभक्तीने आपलेसे करता येते, हे लक्षात घ्या !

कु. रजनी कुर्‍हे
     २६.१.२०१६ या दिवशी भूमाता ब्रिगेड या संघटनेच्या महिलांनी शनिशिंगणापूर येथील शनिदेवांच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळवण्याचा अट्टाहास केला. शेवटी ग्रामस्थ आणि संघटित हिंदुत्ववादी यांच्या संघटनशक्तीचा विजय होऊन कथित स्त्रीमुक्तीवाद्यांना चपराक बसली. याचा भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी अंतर्मुख होऊन विचार करावा.
१. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये तुलना होऊच शकत नाही !
     स्त्री-पुरुष समानता असायला हवी, असे भूमाताच्या (अधो)पुरोगामी स्त्रियांना वाटते आणि त्या आधारावर त्यांनी शनिशिंंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळवण्याचा अट्टहास केला होता. त्यांनी लक्षात घ्यावे की, स्त्रियांच्या हक्कांचा विचार करतांना स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये खरेच तुलना होऊ शकते का ?
२. धर्माचे ज्ञान नसलेल्या स्त्रिया मुलांना सुसंस्कृत करू शकतील का ?
     निसर्गानेच स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक स्तरावर भेद निर्माण केला आहे. याचा संपूर्ण मानवजातीने स्वीकार केलेलाच आहे. स्त्रीला निसर्गाने मूल जन्माला घालण्याचा हक्क दिला आहे. तो हक्क असूनही ती मंदिरात जातांना, पूजा करतांना, विधी करतांना सोयर-सुतक, तसेच मासिक धर्माचेही पालन करतेच. मग यात स्त्रियांचा हक्क हिरावून घेतला गेला, असे आहे का ?

तथाकथित साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीविषयी सुचलेले विचार

पुरस्कार परत करणार्‍यांनी पुरस्कार घेण्याची आपली पात्रताच नाही, हेच एक प्रकारे सिद्ध केले असणे
     सध्या ज्यांची पात्रता नाही अशा व्यक्तींनाही पुरस्कार दिले जातात. खरेतर असे करणे, म्हणजे त्या पुरस्कारांचा अपमान केल्यासारखे आहे. पुरस्कार परत करणार्‍यांनी ते परत करून पुरस्कार घेण्याची आपली पात्रताच नाही, हेच एक प्रकारे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना फार डोक्यावर न घेता त्यांनी जे केले ते चांगलेच केले, हे त्यांना सांगायला हवे. आता सर्वजण त्यांचे फार लाड करत असल्याने आणि त्यांना किंमत देत असल्यानेच ते फार शेफारले आहेत. त्यामुळे अशांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे डोके आणि पर्यायाने डोक्यातील सडके विचार ठिकाणावर येतील.
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१५)

     भारतात शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांत मतदान जास्त असते. शहरामध्ये मतदान म्हणजे सुटीचा दिवस मानला जातो. ही लोकशाहीसाठी घातक स्थिती आहे.
श्रीमती मृदुला सिन्हा, राज्यपाल, गोवा. (२८.१.२०१६)     रावणाच्या वधाशिवाय रामाचे राज्य येऊ शकत नाही, असे स्वा. सावरकर यांनी लंडन येथे गांधींना सांगितले होते; मात्र गांधी यांनी ते मान्य केले नाही. - श्री. संजय वैशंपायन, माजी अध्यक्ष, हिंदू महासभा, पुणे. (३१.१.२०१६)

अमेरिका सिरियातील आतंकवाद्यांना ठार मारते, तर भारत शासन भारतातील आतंकवाद्यांनाही ठार मारू शकत नाही !

      अनेकांचा अतिशय क्रूरपणे शिरच्छेद करणारा इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेचा जिहादी जॉन हा क्रूरकर्मा आतंकवादी हवाई आक्रमणात ठार झाला आहे. ब्रिटीश नागरिक असलेला महंमद एमवाझी हा जिहादी जॉन या नावाने ओळखला जात होता. इसिसचा प्रभाव असलेल्या सिरियातील राक्का शहरात चारचाकीतून प्रवास करत असतांना जिहादी जॉनच्या मोटारीवर अमेरिकेच्या ड्रोन विमानाद्वारे आक्रमण करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर २०१५ला झालेल्या आक्रमणात जॉनची मोटार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या आक्रमणात गंभीर घायाळ झालेला जिहादी जॉन ठार झाला, असे वृत्त दाबिक या ऑनलाईन नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हिंदूंनो, सनातनवर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

सनातनला आतंकवादी संघटना घोषित करून तिच्यावर बंदी घालण्याची गोवा 
काँग्रेसची मागणी केंद्रशासनाने फेटाळली !
     गोव्यातील एका जाहीर कार्यक्रमात आलेल्या तालिबान या जिहादी आतंकवादी संघटनेच्या प्रवक्त्याला विरोध न करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस धर्मप्रेमी सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करते, हे लक्षात घ्या ! 


वर्ष २०१२ मध्ये गुन्हा उघडकीस आल्यावर शासनाने स्वत:हून कृती का केली नाही ? हिंदु विधीज्ञ परिषदेला जनहित याचिका का दाखल करावी लागते ?

     राजकीय व्यक्तींना शासकीय भूमी नाममात्र मूल्यात देऊन शासनाची हानी केल्याविषयी वर्ष २०१२ मध्ये महालेखापालांनी आक्षेप नोंदवत अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. वर्ष २०१२ मध्येच या विषयावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी शासनाच्या महसूल आणि वन विभागाने त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्या वतीने केली.

हिंदूंना हिंदु स्वाभिमान सेना स्थापन करावी लागते, हे कोणताही राजकीय पक्ष हिंदूंचे रक्षण करणार नाही, याची हिंदूंना खात्री झाल्याचे द्योतक आहे, तरी एकाही राजकीय पक्षाला त्याची लाज वाटत नाही !

      इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेचा वाढता धोका लक्षात घेता या संकटाचा सामना करण्यासाठी येथील हिंदु स्वाभिमान सेनेची १५ सहस्र सैनिकांची धर्मसेना सज्ज आहे. हे सैनिक धर्मरक्षणासाठी बलीदान देण्यास सिद्ध आहेत. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश ते उत्तराखंडपर्यंत या संघटनेचा मोठा प्रभाव असून संघटनेने तब्बल ५० प्रशिक्षण तळ उभारले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका चमूने हिंदु स्वाभिमानी सेनेच्या ४ प्रशिक्षण तळांना भेट दिल्यानंतर ही माहिती समजली. 

उद्या घरीही कॅमेरे बसवा, असे शासनाने सांगितल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार आवळेगांव पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील सर्व मंदिरांमध्ये असे कॅमेरे बसवावेत, असे आवाहन आवळेगांव पोलीस दूरक्षेत्राद्वारे करण्यात आले आहे. 

लोकजनशक्ती पक्षाचे नेते बृजनाथी सिंह यांची हत्या

पाटणा - फतुहा येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात लोकजनशक्ती पक्षाचे नेते बृजनाथी सिंह ठार झाले असून त्यांचे धाकटे बंधू बद्रीनाथ सिंह आणि त्यांची पत्नी पूजादेवी गंभीर घायाळ झाले आहेत. बृजनाथी सिंह यांची पत्नी वीरादेवी आणि त्यांचा पुतण्या रोशन कुमार थोडक्यात बचावले. त्यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (बिहारमध्ये शासन आहे का ? - संपादक)

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीतून प्रवासानुभव !

श्री. चेतन राजहंस
     डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर, रायपूर, देहली आणि मुंबई या भारतातील चार महानगरांमध्ये प्रवास करण्याचा योग आला. या प्रवासाच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने आलेले अनुभव सांगणारे हे सदर...
भाग ४
आपण हिंदू आहोत; म्हणून आपल्यावरच 
अन्याय होतो, हे सांगणारे एक दूरचे नातेवाईक !
     नागपूर येथे आतेभावाच्या विवाहानिमित्त गेल्यानंतर अनेक नातेवाइकांना भेटण्याचा योग आला. वृत्तवाहिन्यांवर दिसणार्‍या सनातनविरोधी बातम्यांमुळे त्यांची मने कलुषित झाली असावीत, असा माझ्या मनातील समज त्यांनी खोटा ठरवला. भेटलेल्या अनेक नातेवाइकांपैकी काहींनी सनातन संस्थेचे कार्य माझ्याकडून स्वतःहून समजून घेतले. काहींनी आम्ही सनातनच्या बाजूने असल्याचे निसंदिग्धपणे सांगितले. काहींनी दूरचित्रवाहिनीवरील तुझा कार्यक्रम (चर्चासत्र) पाहिल्याचे आवर्जून सांगतांना सनातन संस्थेविषयी आस्था प्रगट केली. काहींनी आम्हाला त्यांच्या घरी आमंत्रित केले; पण वेळ अल्प असल्याने त्यांच्याकडे जाणे शक्य झाले नाही. काहींनी आमचे भ्रमणभाष क्रमांक मागितले. काहींनी साधना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे दूरचे नाते असलेले एक शिक्षक भेटले.

धर्मप्रसाराची सेवा करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आलेले अनुभव

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
राजपुरा, पंजाब येथील गोशाळेत आलेल्या अनुभूती
१. संत आणि साधक यांनी प्रार्थना करून गूळ 
खायला घातल्यावर गायीने तो लगेच स्वीकारणे
     पंजाबचा दौरा संपण्यापूर्वी चंदीगडहून २० कि.मी. दूर असलेल्या राजपुरा येथे गोरक्षक श्री. सतीश प्रधानजी यांना भेटून पुढे जायचे होते. गोशाळा पहाता येईल, तसेच श्री. सतीश प्रधान यांची ओळखही होईल, याकारणास्तव श्री. गौरव आणि सौ. अनन्या सेठी, तसेच सौ. सुखमणी गुप्ता हे साधक समवेत आले होते. श्री. सतीश प्रधान यांनी सर्वांना गोशाळा दाखवली आणि शेवटी माहिती देतांना गोशाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या सात कपिला गायी आहेत, असे सांगितले. त्या वेळी मी कपिला गायींना मानस नमस्कार करून गुरुकार्यासाठी आशीर्वाद मागितला होता. समवेत आलेले श्री. गौरव सेठी यांनी श्री. प्रधान यांना कपिला गायीला प्रदक्षिणा घालून हिंदु राष्ट्र्रासाठी प्रार्थना करता येईल का ?, असे विचारले. तेव्हा श्री. प्रधान यांनी ७ कपिला गायींपैकी काळ्या कपिला गायीला आणून एके ठिकाणी बांधले. तिच्याविषयी माहिती देतांना सांगितले, या कपिला गायीला बरेच जण गूळ खायला देतात; परंतु तिची इच्छा नसेल, तर ती कुणाकडूनही स्वीकारत नाही. १०० पैकी एखाद्याच्याच हाताने ती गूळ खाते.

पोलिसांचे हिंदुविरोधी वर्तन दैनिक सनातन प्रभात मधून वाचून त्यांच्याविषयी भीती आणि चीड निर्माण होणे अन् त्या संदर्भात स्वप्नांच्या माध्यमातून देवाने करवून घेतलेली विचारप्रक्रिया

कु. स्वाती गायकवाड
      हिंदूंच्या संदर्भात पोलिसांचे वर्तन कसे हिंदुविरोधी असते, हे दैनिक सनातन प्रभात वाचून लक्षात येते आणि आपोआप त्यांच्याविषयी भीती अन् चीड निर्माण होते. याविषयी पडलेल्या दोन स्वप्नांच्या माध्यमांतून देवाने करवून घेतलेली माझी विचारप्रक्रिया पुढे देत आहे. 
१. स्वप्नात पोलीस हातात दंडुके घेऊन मारण्यासाठी धावत 
येतांना दिसल्यावर घाबरून पळू लागणे, तेव्हा संतांचे वाक्य ऐकू येणे, 
त्या वेळी आत्मविश्‍वासाने पोलिसांकडे जाऊन त्यांना खडसवणे
     पहिल्या स्वप्नात काही हिंदु मुले, माणसे एका ठिकाणी उभी राहून काहीतरी करत होती. इतक्यात काही पोलीस हातात दंडुके घेऊन त्यांना मारण्यासाठी धावत येतांना दिसत होते. त्यांना येतांना पाहून सर्व जण घाबरून सैरावैरा पळू लागले. त्यांच्यात मीसुद्धा होते आणि मीही पळू लागले. तेवढ्यात मला एका संतांचा आवाज ऐकू आला. ते मला सांगत होते, तू काहीच चूक केली नाहीस, तर का पळतेस ? तू त्यांना सामोरे जा.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
    यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१. 
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !

रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)
 • रिफ्लेक्सॉलॉजीतील अनेक पाठभेदांतून तज्ञांनी निश्‍चित केलेले बिंदू !
 • चित्रांच्या साहाय्याने नेमकेपणाने बिंदू शोधण्याविषयी मार्गदर्शन !
 • लहान-थोर कोणालाही, कधीही, कुठेही करता येण्याजोगे उपाय !
 • दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार !
हा ग्रंथ वाचून स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करा आणि निरोगी रहा !

करोडपती नेत्यांनी राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्य मागणे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणे

     भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्याची मागणी करणारे हे करोडपती स्वतः किती साहाय्य करतात, हा चिंतनाचा विषय आहे. - एक साधक (१०.१२.२०१३)
     (निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मतांची भीक मागणारे हे नेते निवडणुकीनंतर मात्र जनतेकडे ढुंकूनही पहात नाहीत. जनतेचा पैसा लुटून श्रीमंत झालेल्या या नेत्यांना राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी मात्र आपद्ग्रस्तांना साहाय्य करावेसे वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे - संकलक)

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

SanatanShop.com
 • सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
 • विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७

पालकांनो, लव्ह जिहादची भीषणता लक्षात घेऊन आपल्या मुलींना वाचवण्यासाठी हिंदुत्ववाद्यांचे साहाय्य घ्या !

पू. नंदकुमार जाधव
     एका संवेदनशील जिल्ह्यात हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला आरंभ होण्यापूर्वी ज्यांच्याकडे अल्पाहाराचे नियोजन होते, त्या वसाहतीत बहुतेक सर्व कुटुंबे एकाच समाजाची आहेत. सभेतील भाषणाचा विषय निघाल्यावर ते म्हणाले, लव्ह जिहाद हा विषय भाषणात घेऊया. या वसाहतीतील काही मुली लव्ह जिहादमध्ये अडकल्या आहेत. यावर सभेत एकच विषय घेता येणार नाही, असे सांगितल्यानंतर ते म्हणाले, नंतर सर्व मुली आणि महिला यांना एकत्र करून विषय सांगूया. त्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांनी सिद्धता दर्शवली. तेव्हा त्यांनी पुढे सांगितले, आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये; म्हणून काही जण मुलगी लव्ह जिहादमध्ये अडकली आहे किंवा तिची फसवणूक झाली आहे, याबद्दल वाच्यताही करत नाहीत. याविषयी पुढे अशी माहिती मिळाली की, त्या वसाहतीतील बर्‍याच जणांच्या गाडीचे चालक मुसलमान आहेत.

एका सहकारी अधिकोषात (बँकेत) आलेला कटू अनुभव

      डिसेंबर २०१० पासून सप्टेंबर २०१४ पर्यंत मी पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात नोकरी करत होतो. सप्टेंबर २०१३ मध्ये रुग्णालयाने आम्हा सर्व कर्मचार्‍यांना सांगितले की, पुढील मासापासून आमचे वेतन नेहमी होत असलेल्या अधिकोषामध्ये जमा न होता दुसर्‍या अधिकोषात जमा होईल. त्यासाठी त्यांनी आम्हा सर्वांना त्या सहकारी अधिकोषाचे अकाऊंट ओपनिंग फॉर्म (खाते उघडण्यासाठी) भरायला सांगितले. आम्ही सर्वांनी तसे केले आणि त्यांनी सांगितलेल्या नवीन अधिकोषामध्ये खाते उघडले.
     सप्टेंबर २०१४ मध्ये मी त्या रुग्णालयातील चाकरी सोडली आणि दुसर्‍या ठिकाणी चाकरी चालू केली. त्यामुळे मला आता त्या अधिकोषातील खात्याची आवश्यकता नव्हती आणि मी तिकडचे खाते बंद करायचे ठरवले; परंतु अधिकोष माझ्या घरापासून २० ते २५ कि.मी. दूर असल्यामुळे मी लगेच ते खाते बंद करू शकलो नाही. शेवटी १७.८.२०१५ या दिवशी मी वेळ काढून त्या अधिकोषात गेलो. मला ते खाते बंद करून त्यात जमा असलेले माझे १२ सहस्र रुपये परत घ्यायचे होते. त्यासाठी मी तेथे गेल्यावर मला आलेले वाईट अनुभव पुढे देत आहे. यावरून आपल्या देशात प्रत्येकच क्षेत्रात कशी लूट चालू आहे, हे लक्षात येईल.

गुरुधनाची हानी टाळण्यासाठी कब्रस्तानाच्या शेजारी टेम्पोत झोपता येणे !

श्री. तुकाराम लोंढे
१. नाक्यावरील भ्रष्ट अधिकार्‍यांनी गाडी अडवल्याने भंगारवाल्याकडे पोहोचण्यास रात्रीचे ९ वाजणे आणि भंगारवाल्याने भंगार न घेता वजन करण्यासाठी गाडी ठेवून परत जा, असे सांगणे : लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियम या धातूंचे भंगार विकायचे होते. त्यामुळे कुर्ला (मुंबई) येथील भंगारवाल्याने त्याचा टेम्पो पनवेल आश्रमात पाठवला होता. भंगार भरून मी दुपारी ४ वाजता त्या गाडीसमवेत गेलो. जकात नाक्यावर गाडी अडवल्यामुळे पुष्कळ वेळ गेला. नाक्यावरील भ्रष्ट अधिकारी सांगत असलेले मी ऐकत नव्हतो; म्हणून ते माझी अडवणूक करत होते. त्यामुळे मला भंगारवाल्याकडे पोहोचण्यास रात्रीचे ९ वाजले. रात्र झाल्यामुळे त्याचे कामगार घरी गेले; म्हणून भंगारवाला साहित्याचे वजन करून माल घेण्यास सिद्ध नव्हता. तो मला आता परत जा आणि सकाळी लवकर या, असे सांगत होता.

वडिलांच्या मृत्यूनंतरचे विधी करतांना पुरोहितांविषयी आलेले अनुभव

१. मराठी भाषाभिमान नसलेले आंग्लाळलेले पुरोहित !
      एका सभागृहात माझ्या वडिलांचा दशक्रियाविधी चालू होता. तेथे विधी करणार्‍या पुजार्‍यांनी मला सांगितले, भांड्यात पाणी घाला. त्यानंतर ते मला म्हणाले, फूल घाला. मी त्याप्रमाणे शेजारी असलेल्या फुलांतील एक फूल पात्रात घातले. त्यावर ते पटकन म्हणाले, अहो, ते फूल नाही. पाणी फूल (भरून) घाला. विधीच्या वेळी ते करतांना आणि त्याची माहिती देतांना ते इंग्रजी शब्दांचा उपयोग करत होते.

सनातन प्रभातच्या वार्ताहर सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना सूचना

गेल्या १६ वर्षांपासून धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत असलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. प्रारंभी दैनिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या ४ होती. आता ही पृष्ठसंख्या प्रतिदिन ८ आणि रविवार १० अशी झाली आहे. आगामी काळात ही पृष्ठसंख्या आणखी वाढणार आहे. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांचे प्रमाण सर्वत्रच दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व वार्ता वेळोवेळी सनातन प्रभात नियतकालिकांमधून प्रसिद्ध होण्यासाठी वार्ताहर साधकांची आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडी आपल्या भागात घडत असतील, तर त्या घडामोडींचे वृत्त दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखित स्वरूपात पाठवणे, ही आपली साधना आहे. जे साधक वार्ताहर सेवा शिकण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपली नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून नजिकच्या दैनिक कार्यालयात पाठवावीत. साधकांची नावे प्राप्त झाल्यानंतर वार्ताहर सेवेविषयीचे प्रशिक्षण देण्याविषयी कळवण्यात येईल.
स्थानिक संपर्क : ९४०४९५६०८७
इ-मेल
: panveldainik@gmail.com

कोणत्या तरी कारणाने देवद येथील सनातन आश्रमात येऊ इच्छिणारे एक हिंदु भंगारवाले !

१. एक हिंदु भंगारवाल्याला साधनेविषयी सांगूनही प्रथम त्याने दत्त आणि कुलदेवतेचा नामजप न करणे अन् पुढे त्याने दत्ताचा नामजप चालू केल्यावर टप्प्याटप्प्याने त्याच्या कौटुंबिक अडचणी सुटणे : काही वर्षांपासून मी एका हिंदु भंगारवाल्याला आश्रमातील साहित्य विकत आहे. त्यांना मी साधना कशी करायची, ते सांगितले आहे. ते सनातन प्रभातचे वाचक असून सनातनची सात्त्विक उत्पादनेही विकत घेतात. पूर्वी मला ते दत्ताचा नामजप करण्याचे टाळत आहेत, असे वाटत असे. त्यांच्या दोन्ही पत्नी वारल्यानंतर ते दत्ताचा नामजप करू लागले. पूर्वी ते दिवसातून तीन वेळा मांसाहार करत; पण दत्ताचा नामजप करू लागल्यानंतर त्यांचे मांसाहार करणे बंद झाले.

नसता उपद्व्याप !

प.पू. आबा उपाध्ये
     प.पू. डॉ. आठवले यांचे वास्तव्य असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात झालेला उच्छिष्ट गणपति यज्ञ सोहळा निश्‍चितच योग्य आणि कौतुकास्पद आहे. असे असतांना काही विघ्नसंतोषी माणसे सनातनला उगीचच त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वसंस्कारांनुसार चालत आलेल्या आपल्या संस्कृतीला जागृत ठेवून ती पुढे चालू ठेवणार्‍या सनातन संस्थेला निष्कारण त्रास देण्याचाच हा प्रयत्न आहे. यामागे अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचा हात असावा, असे आम्हाला वाटते. अंधश्रद्धा म्हणजे निश्‍चित काय, हे त्यांना (अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना) तरी ठाऊक आहे का ? येडगावाहून पेडगावला जाण्यासाठी, तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. रस्त्यातून जातांना लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण हातावर चालण्याचा उद्योग केला, तर निश्‍चित ते आपल्याकडे आकर्षित होतील. त्यातीलच हा एक प्रकार नाही का ?, असे विनोदाने म्हणावेसे वाटते.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्या आणि कोर्याm कागदांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५१००६२०५ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

विभागाच्या खिडकीत ३ - ४ दिवसांपासून असलेले चॉकलेट अनेक साधक येऊनही कोणीही न घेणे त्यावरूनच रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्र असल्याचे वाटणे

श्रीमती गीता प्रभू
     धान्य विभागाच्या खिडकीत ३ - ४ दिवसांपासून एक चॉकलेट होते. दिवसातून ४ वेळा साधक तेथे बसून प्रसाद-महाप्रसाद ग्रहण करतात, तरीही एकाही साधकाने ते चॉकलेट घेतले नाही. एकदा एका बालसाधिकेने तेे घेतले. तेथे असलेल्या साधिकेने तिला ते चॉकलेट तुझे आहे का ?, असे विचारल्यावर ती नाही म्हणाली. बालसाधिकेला त्या साधिकेने तुझे नाही..., असे म्हणेपर्यंत तिने ते चॉकलेट लगेच खिडकीत ठेवून दिले.
     हे सर्व पाहून माझ्या मनात ईश्‍वरामुळे रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्र आले आहे, असा विचार आला. त्यासाठी ईश्‍वराच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्व विश्‍वात हिंदु राष्ट्र शीघ्रातीशीघ्र येऊ दे, अशी शरणागत भावाने प्रार्थना करते.
- श्रीमती गीता प्रभू, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१५)

विविध विकारांच्या निर्मूलनासाठीची स्तोत्रे असणारा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ : स्तोत्र सिन्धु !

श्री. भालचंद्र जोशी
     नुकतेच मुंबई येथे श्री. भालचंद्र जोशी यांनी संपादित केलेल्या स्तोत्र सिन्धु या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथामध्ये मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील १४३ दुर्मिळ स्तोत्रे मराठी भाषांतरासह दिली आहेत. ग्रंथाचे संपादक श्री. भालचंद्र जोशी हे संस्कृत, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी दैवज्ञभूषण आणि ज्योतिषरत्न या सन्माननीय पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी ७ वर्षे धर्मसिंधु या धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला आहे. स्तोत्र सिन्धुु हा ग्रंथ त्यांच्या १० वर्षांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. विविध विकारांच्या निर्मूलनासाठीची स्तोत्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील काही अंश वाचकांसाठी देत आहोत.
१. स्वरांच्या योग्य उच्चाराने सृष्टीवर विजय मिळवणे शक्य 
     स्तोत्रे म्हणजे शब्दब्रह्म. प्राचीन ऋषींनी निसर्ग आणि मनुष्य यांमधील दृढ समभावनेवर आधारलेले संगीताचे स्वर शोधून काढले. निसर्ग हे ॐ या आदी स्वराचे, स्पंदनशीलतेचे व्यक्त आणि मूर्त स्वरूप आहे. स्वरांचा उच्चार करून सृष्टीवर विजय मिळवू शकतो, यावर वैदिकांचा विश्‍वास होता. मनुष्य हा स्वतःच सृजनशक्तीचा आविष्कार असल्याने ध्वनी त्याच्यावर फार प्रभावी परिणाम घडवून आणतो.

सनातनच्या विविध आश्रमांसाठी स्वयंपाकोपयोगी भांडी उपलब्ध करून देऊन अथवा त्याकरिता धनरूपात साहाय्य करून राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! 
सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देऊन सेवा करण्यास इच्छुक साधकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील भांड्यांची तातडीने आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील प्रकारची भांडी उपलब्ध करून देऊ शकतात अथवा त्याकरता धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
देवद आश्रमातील चैतन्याचा प्रभाव सिद्ध करणारा प्रसंग !

१. पुष्कळ जुनी ओळख असणार्‍या मुंबईतील एका दाढीवाल्या व्यापार्‍याने आरंभी साहित्य घेऊन जाणारच असे सांगणे; पण त्याच्यासह पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर मला आश्रमातील साहित्य नको, असे म्हणून तो माघारी निघू लागणे : देवद आश्रमातील जुने साहित्य विकायचे होते; पण भंगारवाले आश्रमात यायला सिद्ध नव्हते. मी मुंबई येथील चोर बाजारात गेलो आणि एका दाढीवाल्या व्यापार्‍याला आगगाडीने पनवेल येथे घेऊन आलो. त्याची माझी पुष्कळ जुनी ओळख होती. आरंभी तो म्हणाला, साहित्य घेऊन जाणारच. नंतर पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाटावर उतरल्यावर तो म्हणू लागला, मला आश्रमातील साहित्य नको. मी परत जातो.

सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक साधकांना वेगळ्या लोकात असल्याप्रमाणे जाणवणे

भूलोकातच अनुभवत आहेत साधक उच्चलोकीचा परामानंद ! 
कु. प्रियांका लोटलीकर
     सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्‍या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते. आश्रमातील साधकांना आज कोणती दिनांक किंवा वार आहे, तसेच वाजले किती याचेही भान नसते. साधकांना आश्रमात रहातांना काळाच्या पलिकडील अनुभूती येते. स्वर्गातील गंधर्वलोकात ज्याप्रमाणे विविध नाद ऐकू येतात किंवा विविध सुगंध येतात, त्याप्रमाणे साधकांना विविध वाद्यांचे म्हणजे सनई, तबला आणि अन्य वाद्यांचेही नाद ऐकू येत असतात. हे नाद अतिसूक्ष्म असतात. त्याचप्रमाणे विविध सुगंधही येत असतात.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना
प्रारंभ - पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी (७.२.२०१६) रात्री १०.२० वाजता
समाप्ती - पौष अमावास्या (८.२.२०१६) रात्री ८.०९ वाजता
उद्या अमावास्या आहे.
श्रीविष्णूचा नववा अवतार भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध यांतील भेद

१. बुद्ध
     यज्ञादी श्रौत-स्मार्त कर्मे अनधिकारी दानवांच्या हाती गेल्याने अनाचार माजला. त्या वेळी भगवान बुद्धांनी अवतार घेऊन दानवांशी वादविवाद करून, त्यांना मोहीत करून त्यांना यज्ञापासून परावृत्त केले.
एवं बुध्यत बुध्यध्वं बुध्यतैवमितीरयन् ।
मायामोहः स दैत्येयान् धर्ममत्याजयन्निजम् ॥ 
 - विष्णुपुराण, अंश ३, अध्याय १८, श्‍लोक २०
अर्थ : बुध्यत (जाणा), बुध्यध्वम् (समजून घ्या), बुध्यत (लक्ष द्या) आदी शब्दांनी मायामोहाने (भगवान बुद्धांनी) दैत्यांना (यज्ञाच्या अनधिकार्‍यांना) उपदेश करून त्यांच्या तावडीतून धर्माची सुटका केली.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आपले जीवन गुरुकार्यासाठी समर्पित केलेले असल्याने ते इतर नाडीवाचकांपेक्षा निराळे असणे आणि त्याविषयीची सूत्रे

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. बर्‍याच ठिकाणी असलेल्या नाडीपट्ट्
यांमध्ये प.पू. डॉक्टरांचे जीवन, तसेच कार्य आणि 
हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयीची सूत्रे आढळून येणे
     आम्ही भारतात बर्‍याच ठिकाणी असलेल्या नाडीवाचकांना भेटलो. त्यांच्याकडून नाडीवाचनासंदर्भात अनेक गोष्टी जाणून घेतल्या. त्यांच्याशी त्यासंदर्भात वार्तालापही केला. अनेक नाडीपट्ट्यांमध्ये प.पू. डॉक्टरांच्या जीवनाविषयी, तसेच कार्याविषयी महर्षींनी सांगितलेली अमूल्य माहिती मिळाली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयीचे काही महत्त्वाचे उल्लेखही मिळाले.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी रस्त्यावर प्रेम करतो. रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही; कारण आमची माघार नाही; म्हणून मी हरलो.
भावार्थ : 'मी रस्त्यावर प्रेम करतो' म्हणजे साधनेवर प्रेम करतो. 'रस्त्यात भेटणार्‍यावर प्रेम करीत नाही' म्हणजे साधनेत येणार्‍या अडचणी, सिद्धी आदींकडेे दुर्लक्ष करतो. 'कारण आमची माघार नाही' म्हणजे मोक्षाला जाऊन, नामाशी एकरूप झाल्यावर आम्हाला तेथून परत यावयाचे नाही. 'म्हणून मी हरलो' यातील मी म्हणजे मीपणा, अहंभाव हरलो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)परात्पर गुरु डॉ. आठवले
'शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मद्रोही वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)धमक्याच धमक्या !

     सध्या धमक्यांना ऊत आला आहे. सार्वजनिक सभांमधून धमक्या देणे आणि पत्र पाठवून धमक्या देणे, असे हे षड्यंत्र आहे. पत्र पाठवणारी व्यक्ती कधी इसिसच्या नावाने, तर कधी सर्वसामान्यांचा कैवार घेतल्याच्या तोर्‍यात पत्र पाठवते. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांना उद्देशून लिहिलेले पत्र अलीकडेच गोवा राज्यशासनाला मिळाले. गोमांस खायला देत नाही; म्हणून हे पत्र लिहिले असल्याचे त्यातून उघड होते. पत्र लिहिणार्‍या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn