Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्यासाठीच गांधी परिवाराकडून संसदेच्या कामात अडथळा ! - पंतप्रधान

      आसाम- गांधी परिवार लोकसभा निवडणुकीत झालेला मानहानीकारक पराभव अद्याप पचवू शकला नाही. हा परिवार संसदेचे कामकाज रोखून या पराभवाचा सूड उगवत आहे, अशी टीका पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केली. आसाममधील मोरान येथील एका सभेत ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले, एक परिवार गरीब आणि श्रमिक यांच्याशी संबंधित निर्णय होऊ देत नाही. विरोधी पक्षातील अनेक नेते मला विरोध करतात; परंतु त्यांना संसदेचे कामकाज होऊ द्यायचे असते; तथापि एक परिवार अडून बसला आहे. तो राज्यसभेचेही कामकाज रोखून धरतो. आसाममध्ये गरिबांसाठी जगणारे, तसेच श्रमिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे शासन हवे. येथील लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आसामची धुरा सर्वानंद सोनवाल यांच्या खांद्यावर देण्याची आवश्यकता आहे. आसामच्या विकासासाठी येथील जनतेने भाजपला पाठिंबा द्यावा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ६५ जणांना सहकार विभागाकडून नोटीस

सहकारी बँकांमध्ये मनमानी कारभार केल्याचे प्रकरण
     मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. शासनाने सहकार कायद्यात पालट केला असून त्याची कार्यवाही चालू केली आहे. सहकार क्षेत्रावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांच्या वर्चस्वाला यामुळे धक्का बसणार आहे.
     शासनाने सहकार कायद्यात केलेल्या पालटानुसार ज्या संचालकांच्या मनमानी कारभारामुळे सहकारी अधिकोष (बँका) अडचणीत येतील, त्यांना पुढील दहा वर्षे सहकारात कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. त्यानुसार राज्यातील विविध सहकारी अधिकोषांतील ६५ संचालकांना सहकार विभागाने पुढील दहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. अधिकोष अडचणीत आणणारे संचालक वारंवार अधिकोषांवर निवडून येत असल्याने त्यांचा कारभार आणखी बिघडतो, तसेच कर्जवाटप आणि वसुली यांत हेच संचालक हस्तक्षेप करतात. त्यामुळे अधिकोष डबघाईला येतात. त्यामुळे वरील पालट करण्यात येत आहे. यात हसन मुश्रीफ, विनय कोरे, दिलीप देशमुख, विजयसिंह मोहिते-पाटील आदींचाही समावेश आहे.

(म्हणे) या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे !

शरद पवार यांचे विधान !
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतिहासतज्ञांची बैठक
     मुंबई - या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश निधर्मी आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे हिंदुद्वेषी वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे इतिहासतज्ञांची एक बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोलवण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. पवार पुढे म्हणाले, काही वर्गाकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. (इतिहास पालटण्याचा नव्हे, तर हिंदुत्ववादी विकृत आणि हिंदुद्वेषी इतिहास सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. - संपादक) यातून काही घटकांविषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे (हिंदूंचा सत्य इतिहास सांगणे म्हणजे द्वेष पसरवणे कसे ? - संपादक); म्हणून या विषयावर इतिहासतज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली पाहिजे. सातत्याने भेटले पाहिजे. इतिहासाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात लिखाण केले पाहिजे.

सियाचिन येथील हिमस्खलनात १० सैनिक हुतात्मा : पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

     जम्मू - सियाचिन भागात हिमकडे कोसळल्यामुळे १० सैनिक हुतात्मा झाले. सैनिक १९ सहस्र फूट उंचीवर असतांना त्यांच्यावर हिमकडे कोसळले. यानंतर सैन्याने अडकलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना अपयश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उत्तरप्रदेशातील सगामई गावातील मंदिरात तोडफोड

समाजवादी पक्षाच्या राजवटीत हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
प्राचीन शिवलिंग आणि दानपेटी यांची चोरी
     अजीतगंज (मैनपुरी, उत्तरप्रदेश) - खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि दानपेटी यांची चोरी करण्यात आली. गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या सतर्कतेमुळे तेथील वातावरण शांत ठेवण्यात यश मिळाले.
     ४ फेबु्रवारी या दिवशी सकाळी काही ग्रामस्थ पूजाअर्चेसाठी मंदिरात गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि तणाव निर्माण झाला; मात्र गावातील काही जागरूक नागरिकांमुळे ग्रामस्थ शांत झाले. या वेळी ग्रामस्थांनी शिवलिंग कह्यात घेण्याची आणि मूर्तींची परत स्थापना करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून तोडफोड करणार्‍यांचा तपास करण्यात येत आहे.

(म्हणे) पंतप्रधान मोदी, काँग्रेस आणि गांधी परिवार यांना नष्ट करीन !

हिंदु महासभेचे कमलेश तिवारी यांच्यावर कारवाई केली, तशी 
अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई का केली जात नाही ?
अकबरुद्दीन ओवैसींची गरळओक
     भाग्यनगर (हैदराबाद) - पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस आणि गांधी परिवाराला मी नेस्तनाबूत करून टाकीन, अशी दर्पोक्ती एम्आयएम्चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी येथे केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ३० जानेवारीला बाबानगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत ते बोलत होते. या भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. मी आता त्यांना सोडणार नाही, पूर्ण भारतभर त्यांचा पिच्छा करीन. नरेंद्र मोदींसह या काँग्रेसचा जनाजाही उचलेन, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात अंगणवाडीपासूनच आता रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी शिकवणार !

राज्यशासनाचा अभिनंदनीय निर्णय ! विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी
 भाजप शासनाने अधिकाधिक उपक्रम राबवावेत, ही अपेक्षा !
     संभाजीनगर - राज्यात आता धार्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून म्हणजेच अंगणवाडीपासून दिले जाणार आहेत. त्यासाठीचा पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्यशासनाने सिद्ध केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील १ सहस्र अंगणवाड्यांमध्ये चित्रांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारत यांच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी ४ फेब्रुवारीला येथे आयोजित विभागीय बैठकीत दिली. राज्यातील अंगणवाडी आणि बालवाडी यांमध्ये दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा अभ्यासक्रम आखून दिलेला नव्हता. परिणामी ज्याला जे वाटेल, तसे शिक्षण दिले जात होते. (शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ! - संपादक) या अनुषंगाने लातूरच्या जगन्नाथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे.

येशूच्या चमत्काराच्या नावे फसवणूक आणि धर्मांतर करणारी केंद्रे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी ! - हिंदु जनजागृती समिती

चमत्काराने रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारे फादर सॅबेस्टीन स्वत: मात्र रुग्णालयात दाखल !
     वसई - येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक करून धर्मांतर करत आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. नागरिकांमधील वाढता संताप पहाता हे केंद्र बंद करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला पोलिसांनी आरंभ करताच यातून पळ काढण्यासाठीच ते इलाजाच्या नावाखाली ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत. इतरांना केवळ हात लावून प्रार्थनेने बरे करणारे फादर स्वतः मात्र रुग्णालयात उपचार करून घेत असल्याने त्यांची भोंदूगिरी उघड झाली आहे. पोलिसांनी या त्यांच्या नाटकी डावपेचांना बळी न पडता त्वरित त्यांना अटक करावी, तसेच अशा प्रकारे फसवणूक आणि धर्मांतर करणार्‍या फादरना कायद्याचा बडगा दाखवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा ! - रामविलास पासवान

आरक्षणाचा भस्मासूर
     कोलकाता - खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, अशी मागणी बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. पासवान यांचा पक्ष बंगालमधील आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. ते पुढे म्हणाले,
१. मागासलेल्या जातींचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने एक कायदा करून त्यांना खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे विशिष्ट प्रमाण ठरवून द्यावे. (आरक्षण म्हणजे पात्र व्यक्तीला डावलून अपात्र व्यक्तीला संधी देणे होय. आज समाज कधी नव्हे इतका एकसंध राखण्याची आवश्यकता असतांना आरक्षणाद्वारे समाजात फूट पाडू पहाणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? - संपादक)
 २. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही दलितांची स्थिती दयनीय आहे. (केंद्रात अनेकदा मंत्री असणारे पासवान यांनी ही स्थिती पालटण्यासाठी काय केले, हे जनतेला प्रथम सांगावे ! - संपादक)
३. केंद्रशासनाने देशभरात निवासी शाळा उभाराव्यात आणि त्यात ७५ टक्के दलित विद्यार्थ्यांचा समावेश करावा. (लोकप्रतिनिधींकडून समाजातील सर्वच घटकांचा विचार होणे अपेक्षित आहे ! - संपादक)

सहलीच्या कालावधीत शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास प्राचार्य आणि शिक्षक उत्तरदायी !

    पुणे, ५ फेब्रुवारी - शाळा वा कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन केले जाते. त्या सहलीच्या कालावधीत शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास त्यास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य किंवा मुख्याध्यापक आणि सहलीस समवेत असणारे शिक्षक यांना उत्तरदायी धरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या वतीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे परिपत्रक शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी काढले आहे.

वाशिममध्ये रेती माफियाचा नायब तहसीलदारांना उडवण्याचा प्रयत्न

    वाशिम - वाशिममध्ये रेती माफियांनी नायब तहसीलदार श्री. राहुल वानखेडे यांना चक्क ट्रकने उडवण्याचा प्रयत्न केला. तसेच कह्यात घेतलेला रेतीचा ट्रकही पळवला. ४ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.
    अनधिकृत रेती उपसाप्रकरणी वाशिममध्ये धडक मोहीम चालू आहे. या कारवाईअंतर्गत काल दुपारी सचिन सुभाष श्रीनिवार यांचा ट्रक कह्यात घेण्यात आला होता. मात्र श्रीनिवार यांनी कोणालाही न जुमानता थेट तहसील कार्यालयाबाहेरून ट्रक पळवून नेला. या कालावधीत तहसीलदारांनी त्यांचा पाठलाग केला, त्या वेळी तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण तहसीलदारांनी ट्रकचा पाठलाग करून तो कह्यात घेतला; मात्र ट्रकचालक आणि रेती माफिया पसार झाले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार !

    
बैठकीमध्ये उपस्थित धर्माभिमानी हिंदू
      पुणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कात्रज येथे ३१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मजागृती सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सभेनंतर धर्म अन् राष्ट्र कार्य करू इच्छिणार्‍यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीतही धर्माभिमान्यांचा तोच उत्साह आणि सकारात्मकता पहायला मिळाली. या बैठकीच्या निमित्ताने धर्मरक्षणाचे विविध उपक्रम राबवण्याच्या जोडीलाच उपस्थित धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेतील ५ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांच्या उपस्थितीने हिंदुविरोधी आणि पुरोगामी यांच्या उरात धडकी !

     कोल्हापूर - हिंदुत्ववाद्यांना आव्हान देणारे पुरोगामी, नास्तिक आणि हिंदुविरोधी यांच्या विरोधाला न जुमानता कोल्हापूर येथे गुरुवार, ४ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ५ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली. ही सभा हिंदुद्रोह्यांच्या उरात धडकी भरवणारी ठरली.
     या सभेतील मान्यवरांचे क्षात्रतेजवर्धक विचार, छायाचित्रे आणि अन्य विशेष लिखाण रविवार, ७ फेब्रुवारी या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचा !

(म्हणे) मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घ्यावे !

प्रकाश आंबेडकर अन्य पंथियांविषयी असे बोलण्याचे धाडस दाखवतील का ?
हिंदु धर्माचा अभ्यास नसलेले प्रकाश आंबेडकर यांचे विधान
     पुणे - हिंदु व्यक्तींच्या अनेक प्रश्‍नांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदु परिषदचे कार्यकर्ते लगेचच आंदोलने, वक्तव्ये आणि चिंता व्यक्त करतात. श्री शनिशिंगणापूरला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर दर्शन घेण्याचा अधिकार महिलांना मिळावा, यासाठी हिंदु समाजातील महिला आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला आठवडा उलटून गेला, तरी या दोन्ही संस्थांकडून कुठल्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे या संस्थांनी तातडीने या प्रकरणाविषयी भूमिका स्पष्ट करावी. (हा धार्मिक प्रश्‍न असल्याने धर्मातील अधिकारी व्यक्तींनी या विषयीची धर्मशास्त्रीय भूमिका स्पष्ट केली आहे ! - संपादक) मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी केवळ घोषणाबाजी न करता त्यांनी सपत्नीक श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घ्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली. श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, या महिलांच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केरळमधील अधिकाधिक हिंदुत्ववादी संघटनांना भाजपशी जोडा ! - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा पक्षनेत्यांना आदेश

केरळमधील हिंदू हे डावे आणि धर्मांध यांच्या जाचाला कंटाळले आहेत. भाजप त्यांच्या 
मागे खंबीरपणे उभा राहिल्यास त्याला हिंदूंची एकगठ्ठा मते मिळतील, हे निश्‍चित !
     थिरुवनंतपुरम् - केरळ विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अधिकाधिक हिंदुत्ववादी संघटनांना भाजपशी जोडा, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आलुवा येथे झालेल्या पक्ष बैठकीत भाजपच्या नेत्यांना दिला. केरळमध्ये सध्या अनुमाने ७० हिंदुत्ववादी संघटना कार्य करत आहेत. छोट्यातल्या छोट्या संघटना, भलेही त्यांच्याकडे १०० मते असली, तरी त्या आणि त्यांचे नेते यांना पक्षाशी जोडण्याचा आदेश नेत्यांना देण्यात आला आहे. (साखरेला मुंग्या आपोआप चिकटतात, या म्हणीप्रमाणे भाजपने हिंदुत्वाची कास धरली, तर या संघटना आपोआच त्याच्याकडे वळतील. पक्षश्रेष्ठींना असा आदेश देण्याची वेळच येणार नाही ! - संपादक)

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या विरोधात अवैध फलक लावल्याप्रकरणी गुन्हा नोंद

जागृत नागरिक आणि हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. शैलेंद्र दीक्षित यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद
पुणे, ५ फेब्रुवारी (वार्ता.) - सार्वजनिक ठिकाणी अवैध फलक लावल्याप्रकरणी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पदाधिकारी श्री. शैलेंद्र दीक्षित यांनी या प्रकरणी बिबवेवाडी आणि धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयांच्या साहाय्यक आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. (नियमांना हरताळ फासणारे असे लोकप्रतिनिधी समाजाला काय दिशा देणार ? नियमांचे सर्रास उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधी, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे पोलीस अधिकारी, नागरिकांची उदासीनता यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात गुन्हे फोफावत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी श्री. शैलेंद्र दीक्षित यांच्याप्रमाणे पुढाकार घेऊन कृती करणे अपेक्षित आहे. - संपादक)

पुणे येथे शिरस्राण (हेल्मेट) सक्ती मोहिमेत पोलिसांनी केला ४ लक्षांहून अधिक रुपयांचा दंड वसूल

    पुणे, ५ फेब्रुवारी - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुण्यासह महाराष्ट्रात लवकरच शिरस्राण सक्ती राबवणार, अशी घोषणा ३ फेब्रुवारी या दिवशी केली होती. त्यानंतर लगेचच येथील वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकांवर शिरस्राण परिधान न केल्याकारणाने दंड आकारण्यास आरंभ केला. वाहतूक पोलिसांनी ४ फेब्रुवारी या दिवशी ४ सहस्र ७१७ दुचाकी चालकांवर कारवाई करत ४ लक्ष ७६ सहस्र ९०० रुपयांचा दंड वसूल केला. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होत होते. वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले की, ही कारवाई यापुढेही आणखी तीव्र करणार आहोत.

वाहन फेरीने बार्शीवासियांचे धर्माप्रती स्फुल्लिंग चेतवले !

फेरीत सहभागी हिंदु बांधव
बार्शी (जिल्हा सोलापूर), ५ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहन फेरी काढण्यात आली. या फेरीत दुचाकी, चारचाकीसह पंचक्रोशीतील बहुसंख्य धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित रहाण्याविषयी हिंदूंना आवाहन केले. योग वेदांत सेवा समितीचे श्री. विजय कोरे म्हणाले, आपण कुप्रचाराला बळी न पडता हिंदु धर्मासाठी एकत्र यायला हवे ! या फेरीची सांगता महाद्वार चौकात कोपरा सभेत झाली. वाहन फेरीचा प्रारंभ अकलूज येथील श्री. शिवाजी पवार यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून कथले सभागृहापासून झाला. पुरोहित श्री. रोहित परांजपे यांनी पूजा सांगितली. श्री. मंदार धर्माधिकारी आणि श्री. अमोल जोशी यांनी पुरोहितांसमवेत मंत्रोपचार केले. वाहन फेरी पुढे तानाजी चौकात आल्यावर सौ. अलका देशमुख, सुकेशिनी देशमुख यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.

भोसरी (पुणे) येथे २०० महिलांनी केले अवैध मद्यविक्रीचे धंदे बंद !

मद्यबंदीसाठी पुढाकार घेऊन आंदोलन करणार्‍या शिवसेनेच्या 
नगरसेविका सीमा सावळे आणि महिला यांचे अभिनंदन !
शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची धडक कृती
    पुणे, ५ फेब्रुवारी - येथील भोसरी भागातील बालाजीनगर परिसरात अवैध मद्यविक्री सर्रास चालू होती. त्याविषयी सातत्याने तक्रार देऊनही ते बंद झाले नाहीत. त्यामुळे येथील शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली २०० महिलांनी ४ फेब्रुवारी या दिवशी ४ घंटे आंदोलन करून सर्व मद्यविक्रीचे धंदे बंद पाडले. (पोलिसांनी स्वत:हून या ठिकाणची अवैध मद्यविक्री बंद होण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, याविषयीची भूमिका पोलीस प्रशासन स्पष्ट करेल का ? - संपादक) यापुढे हा परिसर मद्यमुक्त ठेवण्याचा निर्धार आंदोलक महिलांनी केला.
१. बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात चालू असलेल्या अवैध मद्यविक्रीमुळे परिसरातील नागरिक विशेषत: महिलांना पुष्कळ त्रास होत होता.
२. हे धंदे बंद करण्याची मागणी सातत्याने करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. या धंदेवाल्यांकडून पोलिसांना हप्ते मिळत होते आणि त्यांना राजकीय नेत्यांचे समर्थन होते. त्यामुळे नागरिकांना ते जुमानत नव्हते. (या प्रकरणी आलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई का केली नाही, याविषयी पोलीस प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करेल का ? त्याचसमवेत हप्ते घेणार्‍या पोलिसांची चौकशी पोलीस प्रशासनाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

बेळगावात शिवसेना करणार मराठी टायगर्स प्रदर्शित

    बेळगाव - मराठी टायगर्स या चित्रपटावरून बेळगावमध्ये अद्यापही वाद चालू आहे. हा चित्रपट प्रदर्शित करायला बेळगावमधल्या चित्रपटगृह मालक आणि वितरक यांनी नकार दिला. त्यामुळे आता शिवसेना पुढाकार घेऊन हा चित्रपट दाखवणार आहे.
   चंदगडच्या शिवसैनिकांनी हा चित्रपट शिनोळीमध्ये प्रदर्शित करायचा निर्धार केला आहे. शिवसैनिकांनी शिनोळीमध्ये तंबू उभारला आहे. या तंबूमध्येच चित्रपट दाखवू, अशी चेतावणी शिवसेनेने दिली आहे. या तंबूमध्ये पाचशे खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत.

पुण्यातील बालन्यायालयात २ सहस्र २०० खटले प्रलंबित, आणखी एक बालन्यायालय प्रस्तावित

कूर्मगतीने चालणारी न्यायप्रणाली गतिमान करण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
   पुणे, ५ फेब्रुवारी - गेल्या काही वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. विशेषत: टोळीयुद्धात अल्पवयीन मुलांचा वापर गुंडांकडून होत असल्याचेही पोलिसांचे निरीक्षण आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग ही चिंतेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे त्याचा ताण बालन्यायालयावर येत असून गेल्या काही वर्षांत पुण्यातील बालन्यायालयात दाखल झालेले २ सहस्र २०० खटले प्रलंबित आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात आणखी एक बालन्यायालय चालू करण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. त्याविषयीचा अहवाल जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून राज्य शासनाकडे सादर केला आहे.

संभाजीनगर येथे लग्नाचे आमिष दाखवून महिला आधुनिक वैद्यावर सहकारी आधुनिक वैद्याकडून बलात्कार

उच्च शिक्षणापेक्षाही धर्मशिक्षण आणि कठोर शिक्षा असल्याच अशा घटनांना आळा बसू शकतो !
   संभाजीनगर, ५ फेब्रुवारी - येथील एका महिला आधुनिक वैद्याने सहकारी आधुनिक वैद्य डॉ. विवेक पाटील यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. (अशा नराधमांना कठोर शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. - संपादक) महिला आधुनिक वैद्याने पोलिसांकडे प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉ. पाटील यांनी लग्नाचे आमिष दाखवून २ वर्षे माझ्यावर बलात्कार केला. जातीच्या सूत्रावरून डॉ. विनोद यांनी लग्नाला नकार दिला आहे. या प्रकरणी डॉ. विवेक पाटील यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कन्यागत महापर्वसाठी शासनाकडून १२१ कोटी रुपयांचा निधी संमत !

     कोल्हापूर - कन्यागत महापर्वच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून शिरोळ तालुक्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या विकास आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून त्यासाठी १२१ कोटी ७८ लक्ष रुपयांचा निधी संमत झाला आहे. यात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी आणि शिरोळ तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे, अशी माहिती सांगली येथील भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, आमदार श्री. अमल महाडिक आणि शिरोळचे शिवसेनेचे आमदार श्री. उल्हास पाटील यांनी दिली. नाशिक कुंभमेळ्याप्रमाणे प्रत्येक १२ वर्षांतून येणार्‍या या महोत्सवास विशेष महत्त्व आहे.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे सनातन संस्थेच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आणि तीळगूळ वाटप !

सहभागी महिलांकडून सनातनच्या कार्यक्रमाचे कौतुक
प्रदर्शनाविषयी माहिती सांगताना सनातनच्या सौ. प्रमिला ननवरे
     अकलूज (जिल्हा सोलापूर) - सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमात संबंधित गोष्टींचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व अधोरेखित होते, अशा शब्दांत येथील महिलांनी सनातनच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. येथील देशमुख गल्ली परिसरात हळदीकुंकू आणि तीळगूळ समारंभ घेण्यात आला. या वेळी २०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. सनातनच्या सौ. नंदा माने आणि सौ. प्रमिला ननवरे यांनी सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमस्थळी धर्मशिक्षणाच्या फ्लेक्स फलकाचे प्रदर्शन, तसेच सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

राममंदिर उभारूनच पुढील निवडणूक लढवणार ! - भाजपचे खासदार साक्षी महाराज

     जयपूर (राजस्थान) - भारतीय जनता पक्षाने राममंदिर उभारण्याच्या सूत्रावर मला सहकार्य केल्यानेच मी त्यांच्यासमवेत आहे. अयोध्येत राममंदिर उभारण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नसून मंदिरउभारणी करूनच आम्ही २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवू, असा विश्‍वास भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केला. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मुसलमानांनी मनाचा मोठेपणा दाखवून मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणे, लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडणे किंवा सोमनाथ मंदिराप्रमाणे राममंदिराची उभारणी करणे, असे चार मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. खातीपुरा येथे एका खाजगी दौर्‍यानिमित्त साक्षी महाराज आले होते. त्या वेळी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत देतांना ते बोलत होते. उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीविषयी बोलतांना ते म्हणाले, तेथे कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, जातीयवाद आणि वंशवाद यांवर नियंत्रण ठेवणे आदी प्रमुख सूत्रे आहेत. यात राममंदिर उभारणे हेही एक सूत्र असेल; मात्र राममंदिर उभारण्याची निश्‍चिती द्यावी लागेल.

हत्येच्या प्रकरणी सुधारगृहात शिक्षा भोगून सुटलेल्या अल्पवयीन मुलाने पुन्हा केली हत्या !

     नवी देहली - एका मुलाचे ६० सहस्र रुपयांसाठी अपहरण करून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणी २०१५ मध्ये अल्पवयीन मुलाला अटक करून बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. नुकतीच त्याची चांगल्या वर्तणुकीमुळे सुटका करण्यात आली होती. १७ वर्षांच्या या मुलाने सुटका झाल्यानंतर पुन्हा एक हत्या केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने दक्षिण देहलीतील बी.के. दत्ता कॉलनीमध्ये एका ६५ वर्षांच्या वृद्धेची चोरीच्या उद्देशाने गळा दाबून हत्या केली आणि तिच्याकडील सोने, भ्रमणभाष संच आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले. खाजगी दूरदर्शन वाहिनीवरील नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो पैसे जमवत होता. त्यासाठी त्याने या हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (मुलांवर लहानपणीच साधनेचे संस्कार झाल्यास ते अशा प्रकारच्या मायेतील आकर्षणाकडे कधीही आकृष्ट होऊन गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत. हे राज्यकर्त्यांना समजेल तो सुदिन ! - संपादक)

सिंहस्थातील स्नान शाही नसून अमृत स्नान !

किन्नर आखाड्याचा शाहीस्नान शब्दावर आक्षेप 
     उज्जैन - किन्नर आखाड्याने सिंहस्थमध्ये होणार्‍या शाहीस्नान या शब्दावर आक्षेप घेतला आहे. सिंहस्थ हा सनातन धर्माचा मेळा असून शाही हा शब्द मोगलकाळातील असल्याचे अखिल भारतीय किन्नर आखाड्याचे संरक्षक ऋषी अजयदास यांनी म्हटले आहे. कोणत्याही पुरातन किंवा सनातन ग्रंथामध्ये शाही या शब्दाचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे सिंहस्थातील स्थान आमच्यासाठी अमृत स्नानच आहे. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कुंभ निघाला होता आणि त्यातील काही थेंब ज्या चार ठिकाणी पडले होते, तेथे सिंहस्थकुंभ आयोजित केले जातात, असेही अजयदास म्हणाले.
पहिल्या शतकापासून शाही शब्द प्रचलित आहे ! - योगगुरु स्वामी आनंदगिरि महाराज
    शाही याचा अर्थ राजेशाही थाट असा होतो. स्नान हे शाहीच असते. पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतसमान आहे. सध्या शाही हा शब्द प्रासंगिक आहे, त्यात मोडतोड करण्याची आवश्यकता नाही. इतिहास उघडून पाहिल्यास पहिल्या शतकापासून शाही शब्द प्रचलित असल्याचे दिसून येते.

हाफीज सईदच्या मुसक्या आवळा ! - भारताने पाकला खडसवले

हाफीज सईदवर पाक कारवाई करील, अशा भ्रमात न रहाता भारताने पाकमध्ये 
घुसून हाफीज सईदच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !
     नवी देहली - भारतात पठाणकोटसारखी आणखी आक्रमणे होतील, अशी गरळ ओकणारा जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या मुसक्या आवळा, अशा शब्दांत भारताने पाकला खडसवले. अनेक आतंकवादी कारवायांमागे सईद याचा हात असतांना तो मोकाट कसा ?, असा प्रश्‍नही भारताने उपस्थित केला आहे. सईदने पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांसमोर वरील भारतविरोधी वक्तव्य केले. भारताने सईदच्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप म्हणाले, आतंकवादी हाफीज सईद पाकमध्ये मोकाट फिरत आहे. त्याच्या अनेक आतंकवादी संघटना आहेत; मात्र तो स्वत: समाजकार्य करत असल्याचे भासवतो. तो आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठाही करतो. त्यामुळे पाक शासनाने तातडीने सईदच्या मुसक्या आवळाव्यात.

पत्रकारांसाठी धोकादायक असणार्‍या देशांमध्ये भारत ७ व्या क्रमांकावर !

जेथे लोकशाहीचा चौथा स्तंभच असुरक्षित आहे, तेथे सामान्य जनता किती असुरक्षित असेल, याची 
कल्पना येते ! अशा स्थितीत भारत जागतिक महासत्ता कसा बनेल ? ही स्थिती पालटण्यासाठी 
हिंदु राष्ट्रच हवे !
     नवी देहली - इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पत्रकारांसाठी इराक हा सर्वांत धोकादायक देश असून पाकिस्तान चौथ्या क्रमांकाचा, तर भारत सातव्या क्रमांकाचा धोकादायक देश असल्याची माहिती समोर आली आहे.
१. या अहवालात म्हटले आहे की, गेल्या २५ वर्षांत जगात पत्रकारांसह माध्यमक्षेत्रात काम करणार्‍या २ सहस्र २९७ व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. 
२. मागील वर्षभरात ११२ माध्यम क्षेत्रांतील व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. 
३. वर्ष २००६ या एकाच वर्षात सर्वाधिक १५५ जणांची हत्या करण्यात आली आहे. 
४. अपहरण, स्फोट, गोळीबार आदीप्रकारे या पत्रकारांची हत्या करण्यात आल्या आहेत.
५. संघटित गुन्हेगार आणि भ्रष्ट अधिकारी यांनीच आतापर्यंत बहुतेक पत्रकारांची हत्या केली आहे, अशी माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टचे सचिव अ‍ॅन्थोनी बेलांगर यांनी म्हटले आहे. 

पुरुषांवर खोटे गुन्हे प्रविष्ट करणार्‍या महिलांच्या विरोधात आंदोलन करणार का ?

पुरुष हक्क संरक्षण समितीचा भूमाता ब्रिगेडला प्रश्‍न
     पुणे - सद्य परिस्थितीत समाजात स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा दुरुपयोग करून महिलांकडून पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश मिळावा; म्हणून मोठा गाजावाजा करून आंदोलन करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या महिला हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, विनयभंग, पोटगी अशा स्वरूपाचे खोटे खटले नोंदवून पुरुषांवर अन्याय करणार्‍या महिलांच्या विरोधात आंदोलन करणार का, असा प्रश्‍न नगर जिल्हा पुरुष हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता शिवाजी अण्णा कराळे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
     अधिवक्ता पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या स्त्रियांना संरक्षणासाठी बहाल केलेल्या कायद्याचा सर्रास दुरुपयोग होतांना दिसून येत आहे. कौटुंबिक व्यवस्था बिघडत चालली आहे. भूमाता ब्रिगेडने अशा सामाजिक प्रश्‍नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर भूमाता ब्रिगेडने यासंदर्भात आवाज उठवला नाही, तर ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आंदोलन छेडण्यात येईल.

संभाजीनगरमधील दलित विद्यार्थ्याची आत्महत्या आणि त्यामागील सत्य !

   
 
     सर्वोच न्यायालयाने याकूब मेननच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आणि आणि त्याची अखेर होणार, हे नक्की झाले; पण हैद्राबाद विद्यापिठातील आंबेडकर विध्यार्थी संघटना (आविसं) नावाच्या संघटनेतील विध्यार्थ्यांना ते मान्य नव्हते. डॉ. आंबेडकरांचे नाव लावणार्‍या या विद्यार्थी संघटनेला त्यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे देशद्रोह्याला दिली जाणारी सजा मान्य नव्हती. त्यांनी त्याविरुद्ध निषेध आणि प्रार्थना सभा आयोजित केली आणि प्रत्येक घरी याकूब मेनन असे पोस्टर्स लावले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या विद्यापीठ शाखेचा अध्यक्ष सुशील कुमार याने त्यांच्याविरुद्ध फेसबूकवर पोस्ट टाकली होती. म्हणून रात्री एक वाजल्यानंतर ३० हून अधिक आविसंचे विद्यार्थी त्याच्या वसतीगृहातील खोलीत घुसले आणि त्याला मारहाण केली.

शिवजयंतीच्या दिवशी मद्यविक्री बंद करावी !

बार्शीतील जय शिवराय प्रतिष्ठानची महसूलमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे स्तुत्य मागणी !
     बार्शी (जिल्हा सोलापूर) - येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी राज्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री आणि संबधित मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. याविषयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांनी सर्वांना निवेदन दिले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. राज्यात शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. अशा प्रजाहितदक्ष राजाचे स्मरण करतांना मद्यविक्रीसारखी समाजविघातक गोष्ट त्या दिवशी चालू असता कामा नये, अशी भावना त्या मागणीमागे आहे. गेल्या वर्षापासून प्रतिष्ठानच्या वतीने या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

काश्मीरमधील चकमकीत सैन्याकडून लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार

     श्रीनगर - बांदीपुरा येथे सुरक्षा सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सैनिकांनी तिन्ही आतंकवाद्यांचा खात्मा केला. हे तिन्ही आतंकवादी लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. सैन्याला ३ फेब्रुवारी या दिवशी रिहायशी या भागात ३ आतंकवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्याने येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई चालू केली. ४ फेब्रुवारीला रात्रीपर्यंत सैनिकांनी तिन्ही आतंकवाद्यांना ठार केले.

झिकाला रोखण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी बनवली लस !

     भाग्यनगर - झिका या विषाणूमुळे येणार्‍या तापामुळे सध्या अमेरिका खंडात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अयशस्वी आणि हतबल झाले असतांनाच भाग्यनगरमधील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या शास्त्रज्ञांनी झिकाला रोखण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा केला आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले की, आम्ही नऊ महिन्यांपूर्वीच झिकावरील लसीचे पेटंट घेतले आहे. या विषाणूंचा भारतात शिरकाव होऊ नये, यासाठी भारत सरकारने त्याच्या नियंत्रणासाठी एका विशेष गटाची स्थापना केली आहे. युगांडामधील वनांच्या प्रदेशावरून या विषाणूंना झिका हे नाव देण्यात आले. याचेे विषाणू एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरवले जातात. त्यामुळे या डास चावलेल्या व्यक्तींच्या शरिरात हे विषाणू जाऊन त्यांना ताप, डोळे येणे, सांधे दुखणे तसेच भुरळ येणे अशा तक्रारी संभवतात. झिकाचा सर्वांत मोठा धोका हा गर्भवतींना आहे.

आमीर खान यांच्याशी असलेल्या कराराच्या मुदतीत वाढ करण्यास स्नॅपडीलचा नकार !

     नवी देहली - आमीर खान यांच्याशी असलेल्या कराराच्या मुदतीत वाढ करण्यास स्नॅपडील या आस्थापनेने नकार दिला आहे. स्नॅपडील हे आस्थापन विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनांपैकी एक आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी खान यांची अतुल्य भारत मोहीम, रस्ता सुरक्षा मोहीम आणि टाटा स्कायच्या ब्रॅण्ड अम्बेसिडरपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या वृत्तानुसार,
१. आमीर खान यांचा स्नॅपडील समवेतचा एक वर्षाचा करार या मासाच्या शेवटी सपुंष्टात येणार आहे; मात्र या करारास आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळणार होती. तथापि स्नॅपडीलने त्यास नकार दिला आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

केरळमध्ये एका शिवमंदिर समितीच्या मुसलमान सदस्याच्या हत्येनंतर दोन मंदिरांतील पूजा बंद करण्याचा निर्णय

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारी मंदिर समिती !
     तिरुवनंतपुरम् - पुतेनाडमध्ये असणार्‍या शिव मंदिराच्या कार्यकारी समितीचा २३ वर्षीय सदस्य शब्बीर याचा ३१ जानेवारीला ४ जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. (अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या समितीमध्ये कधी हिंदु सदस्य असतात का ? - संपादक) त्यानिमित्त दुःख म्हणून शिवमंदिरात २ दिवस पूजा न करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. आरोपी आणि शब्बीर यांच्यात गेल्या वर्षी एका कार्यक्रमाच्या वेळी हत्तीच्या संदर्भातून वाद झाला होता. त्यातून ही हत्या झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कॅनडातील संसदेत विरोधकांची शीख संरक्षणमंत्री सज्जन यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी !

विदेशात भारतियांना वर्णद्वेषी टिप्पणीला वारंवार सामोरे जावे लागते ! विदेशातील 
भारतियांना आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी भारत शासनाने प्रयत्न करणे आवश्यक ! 
     टोरंटो (कॅनडा) - कॅनडाचे शीख संरक्षणमंत्री हरजीत सज्जन यांना पुन्हा एकदा वंशभेदी टिप्पणीला सामोरे जावे लागले आहे. इस्लामिक स्टेटच्या विरोधात सैन्याच्या चालू असलेल्या मोहिमेबद्दल हरजीत सज्जन संसदेत उत्तर देत असतांनाच विरोधी पक्षातील खासदार जेसन केन्ने यांनी त्यांच्याविरोधात टिप्पणी केली.

इस्लामचा स्वीकार न करणार्‍या पॅलेस्टाईन कवीला ८ वर्षांचा कारावास आणि ८०० आसूड मारण्याची शिक्षा !

कुठे इस्लामचा स्वीकार न करण्यावरून शिक्षा करणारा इस्लामी देश सौदी अरेबिया, 
तर कुठे घरवापसीलाही विरोध करणारा भारत ! 
     नवी देहली - सौदी अरेबियातील एका न्यायालयाने पॅलेस्टाईनच्या अशरफ फयाज या कवीला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रहित करून ८ वर्षे कारावास, ८०० आसुड मारणेे आणि कविता न लिहिण्याची शिक्षा देण्यात आली आहे. कवी अशरफ फयाजने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने आणि कवितेच्या माध्यमातून ईश निंदा आणि नास्तिकतेचा प्रसार केला होता, असा आरोप लावण्यात आला होता. अशरफ फयाज हे पॅलेस्टाईन शरणार्थी परिवारामधील एक आहेत.

घटनेमध्ये पालट केल्यास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करू ! - आनंदराज आंबेडकर

आनंदराज आंबेडकर यांचे हे वक्तव्य म्हणजे असहिष्णुता नव्हे का ?
आतापर्यंत घटनेत अनेकदा पालट झाला आहे, हे आंबेडकर यांना माहीत नाही का ?
   पुणे, ५ फेब्रुवारी - रोहित वेमूलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी देशभरात आंदोलने होत आहेत. अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पोलीस यांच्याकडून या आंदोलकांना मारहाण होत आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मानणारे आहोत. ठोकशाही आम्हालाही कळते. (आनंदराज आंबेडकर यांची वैचारिक दिवाळखोरी ! भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार्‍या आनंदराज आंबेडकर यांना ठोकशाहीची भाषा करणे शोभते का ? - संपादक) सत्ता आली म्हणून हवेत जाऊ नका. भारतीय राज्यघटना पालटण्याच्या गोष्टी सध्या चालू आहेत. इतकी वर्षे ज्यांना आपल्या पोशाखात पालट करता आला नाही, ते घटना काय पालटणार ? (अशी भाषा वापरून आंबेडकर यांनी आपला संघद्वेषच प्रकट केला आहे. - संपादक) संपूर्ण जगाने भारताच्या राज्यघटनेची प्रशंसा केली आहे. घटना पालटण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही. घटनेमध्ये पालट केल्यास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करू, अशी चेतावणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

बाबरी ढाचा तोडणे, हे मंदिर आणि मशीद दोन्ही तोडण्यासारखे ! - हिंदू महासभा

हिंदू महासभा अडवाणी यांच्यावर खटला भरणार ?
बाबरी मशीद पाडल्याचे प्रकरण
    अयोध्या - अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या २३ वर्षांनंतर राममंदिर पाडल्याप्रकरणी हिंदू महासभा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात खटला भरण्याची सिद्धता करत आहे. महासभेच्या मते बाबरी मशिदीच्या घुमटाखाली रामलल्लाची मूर्ती होती. त्यामुळे तो ढाचा तोडणे, हे मंदिर आणि मशीद दोन्ही तोडण्यासारखे होते. महासभेकडून राममंदिर आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर नेत्यांच्याही विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी (पुणे) येथे मद्यपी चालकाने वाहतूक पोलिसाचा चावा घेतला

पोलिसांविषयी वाटणारा धाक संपत चालला कि काय ?
पिंपरी, ५ फेब्रुवारी - मद्यपी अवस्थेत वाहन चालवल्याने कारवाई केल्याप्रकरणी दुचाकीचालक आणि त्याचा साथीदार यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी वाहतूक पोलीस शाम साळुंखे आणि त्यांचे साहाय्यक स्वप्नील ओव्हाळ यांचा (वॉर्डन) चावा घेतला. यामध्ये ओव्हाळ याच्या करंगळीचा अस्थिभंग झाला आहे. या प्रकरणी रश्मिन गोडबोले याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत असतांना आरोपी रश्मिन आणि त्याचा साथीदार मद्यपान केलेल्या स्थितीत दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्या विरोधात नोटीस बजावली.

फलक प्रसिद्धीकरता

समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
     उत्तरप्रदेशमध्ये मैनपुरी जिल्ह्यातील सगामई गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वतीदेवी आणि श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि दानपेटी यांची चोरीही करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : UP ke Sagamai gaonke mandirme Devataonki murtiya todi gayi. Shivling aur daanpeti ki bhi hui chori. - Hinduo, Dharmaraksha hetu ab to sanghatit ho jao !
जागो ! : यूपी के सगामई गांव के मंदिर में देवताआें की मूर्तियां तोडी गईं. शिवलिंग और दानपेटी की भी हुई चोरी. - हिन्दुओ, धर्मरक्षा हेतु अब तो संगठित हो जाओ !

अण्णादुराई यांच्या स्मृतीदिनी शासनाच्या अधिपत्याखालील मंदिरांतून अन्नदान : हिंदू मक्कल कत्छीकडून निषेध व्यक्त

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! 
हिंदूंनो, तुमची मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी करा !
    चेन्नई - तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळगम या पक्षाचे संस्थापक सी.एन्. अण्णादुराई यांचा ३ फेब्रुवारी या दिवशी स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त प्रत्येक वर्षी राज्यशासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदु मंदिरांमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या पैशांतून विनामूल्य अन्नदान केले जाते. 

नोएडा येथे संतश्री पू. आसारामजी बापू संप्रदायाकडून आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याविषयी प्रबोधन !

     नोएडा (उत्तरप्रदेश) - नोएडाच्या सेक्टर १५मधील सामुदायिक केंद्र सभागृहात संतश्री पू. आसारामजी बापू संप्रदायाच्या वतीने एका भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्हॅलेंटाईन डेच्याऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करण्याची आवश्यकता या विषयावर श्री. विनय पानवळकर यांनी व्हॅलेंटाईन डे या कुप्रथेचे तोटे सांगून धर्मशिक्षण आणि धर्माचरणाचे महत्त्व सांगितले. संतश्री पू. आसारामजी बापू यांच्या संप्रदायाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बालसंस्कार वर्गातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला संतश्री पू. बापूजी यांचे १०० हून अधिक भक्त उपस्थित होते.


इस्लामी राष्ट्र इंडोनेशियामध्ये बाल लैंगिक शोषण करणार्‍या अपराध्याला बनवले जाईल नपुंसक !

सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये असा कायदा लागू होतो, 
तर धर्मनिरपेक्ष भारताने असा कायदा का करू नये ?
     इंडोनेशिया - इंडोनेशियामध्ये सध्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे पहाता येथील बाल सुरक्षा आयोगाने ४ फेब्रुवारीला सांगितले की, देशात बाल लैंगिक शोषणाच्या अपराध्यांना नपुंसक बनवले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
    आयोगाचे प्रमुख एरिस मर्डेकाने यासंदर्भात म्हटले की, राष्ट्रपती जोको विडोडो यांनी अपराध्यांना रासायनिक पद्धतीने नपुंसक बनवण्याचे कलम असलेल्या या नव्या कायद्याला आपली संमती दिली आहे. मुलांच्या लैंगिक शोषणाच्या असामान्य अपराधाच्या श्रेणीत या नव्या कायद्याला ठेवण्यात आले आहे.
     दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश आहे, जेथे २०११ मध्ये दोषींना नपुंसक बनवण्याचा कायदा लागू करण्यात आला होता. भारतातील लहान मुलांचे लैंगिक शोषण, अश्‍लीलता आणि छेडछाडीपासून संरक्षण होण्यासाठी सध्या पॉस्को कायदा अस्तित्वात आहे.सावरकरांचे परराष्ट्राविषयीचे धोरण हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी अनुरूप ! - प्रा. रमेश सोनवडकर

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण या परिसंवादात प्रा. रमेश सोनवडकर 
यांनी मांडलेले विचार
        थोर देशभक्त, महाकवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बुद्धीवादी विचारांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो ! या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी या सभागृहामध्ये जमलेले आपण सर्व जण, सावरकरांचे भक्त, सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक आपणा सर्वांनाच विनम्र अभिवादन करून माझ्या विवेचनाला प्रारंभ करतो.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा नोव्हेंबर २०१५ मधील आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

स्वतःच्या मायभूमीतून विस्थापित व्हावे लागलेल्या आणि अखंड हिंदुस्थानच्या विभाजनामुळे व्यथित झालेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन !

तस्लिमा नसरीन
१. तस्लिमा नसरीन म्हणजे वैद्यकीय विश्‍वाचे भूषण
    लज्जा कादंबरी लिहिणार्‍या तस्लिमा नसरीन यांना स्वदेशात रहाण्याचे भाग्य लाभले नाही. त्यांना बांगलादेशाने नागरिक म्हणून स्वीकारले नाही. तस्लिमा म्हणजे आमच्या वैद्यकीय विश्‍वाचे भूषण आहे; कारण त्या डॉक्टर आणि रवी बापट, पुरंदरे, गांधी, लिमये, ओक आणि दादूमिया पठडीतील लेखिकाही आहेत. कोलकात्यात जेव्हा आपण आश्रय दिला, त्याच वेळी त्यांना ठार मारणार्‍याला पुरस्कार घोषित झाला होता.
२. तस्लिमा नसरीन यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा
    त्यांनी लिहिलेल्या द्विखंडितो या कादंबरीवर बंदी घातली गेली होती. भारतात त्या सुरक्षित रहातील कि नाही ?, यावर वादविवाद चालू होता. त्यांना कोलकात्यात ठेवून घेऊ नये, यासाठी मुसलमान अतिरेक्यांनी साम्यवादी शासनावर दबाव आणला होता. मग त्या बर्लिनला गेल्या. तेथे गेल्यावर तिच्यामुळे आपल्या देशात आतंकवाद आयात होईल आणि आपल्या देशाची शांती भंग पावेल, असे जर्मनांना वाटले आणि त्यांनी नसरीन यांना पुन्हा कोलकात्याला पाठवले. त्यांच्या मुंबईपासून ते बंगळुरूपर्यंतच्या कार्यक्रमात अडथळे आणले गेले.

जगणे असाहाय्य झाले, तरी बेशिस्त सुटत नाही !

    देवनार (मुंबई) येथील क्षेपणभूमी (डंपिंग ग्राउंड)वरील आगीविषयी पुष्कळ खल झाला; कारण त्या आगीच्या धुराच्या लपेटांनी अरबी समुद्र, रायगडच्या किनारपट्टीपर्यंत मजल मारत त्याची दाहकता प्रकट केली आणि सर्वांच्या उरात धडकीच भरली. आधीच मोकळी हवा दुर्लभ असलेल्या या मुंबापुरीत त्या जीवघेण्या धुराची भर पडल्याने धुराचे लोट पसरलेल्या भागातील सर्वांनाच त्याचा थेट फटका बसला आणि श्‍वसनाच्या कोंडमार्‍यामुळे जीवाची घालमेल झाली. तीन दिवस धुमसत रहाणार्‍या त्या आगीच्या प्रसंगातून बोध घेतला असेल, तरच यातून आपण काही तरी शिकलो, असे म्हणता येईल. अन्यथा भविष्यात पुन्हा कधीतरी येरे माझ्या मागल्या होईल. अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या उपग्रहाने कचर्‍याच्या धुरात लुप्त झालेल्या मुंबईची छायाचित्रे टिपली खरी; पण त्याविषयी आपल्याकडे गांभीर्याने विचार होईल, याची शक्यता वाटत नाही; कारण पर्यावरण, स्वच्छता यांविषयी आपल्या जाणिवा अत्यंत बोथट आहेत. देशभरात सर्वत्र अशीच स्थिती आहे. देशाची अब्रूच देवनारच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. बघा, भारतीय किती अस्वच्छ रहातात, याचे जगाला तीन दिवस जे दर्शन घडले, ते नक्कीच लांच्छनास्पद आहे. मुंबई हे जागतिक स्तरावरचे महत्त्वाचे शहर आहे. या शहरातील क्षेपणभूमीवर जमा होणार्‍या कचर्‍याच्या विल्हेवाटाची बकाल स्थिती सुधारण्यास किती अभ्यासपूर्ण मेहनत घ्यावी लागणार आहे, हे लक्षात येते. यावरून स्मार्ट सिटीचा मार्ग किती खडतर असणार आहे, याचा अंदाज येतो.

राष्ट्रहिताच्या घटनांकडे राजकीय दृष्टीकोनातून पहाणारी राष्ट्रघातकी काँग्रेस !

१. काँग्रेसने घडवलेल्या चकमकी चांगल्या अन् पवित्र; मात्र 
गुजरातेत मोदींच्या राज्यात घडलेली मात्र दंडनीय !
     गुप्तचरांच्या बनावट चकमकीची प्रकरणे सर्व राज्यांत पूर्वी होत होती, आजही होतात आणि भविष्यातही होत रहातील. पाकिस्तानी आतंकवाद्यांना मारायचे नाही, तर मग काय त्यांची पूजा करायची ? या चकमकींसाठी पोलिसांना सुवर्णपदके आणि मानसन्मान मिळालेले आहेत. काँग्रेसने घडवलेल्या चकमकी चांगल्या अन् पवित्र; मात्र गुजरातेत मोदींच्या राज्यात घडली, तर मात्र ती दंडनीय !

देशाला पोटासारखा कायदा आवश्यक !

    
श्री. पारस राजपूत
वर्ष २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आतंकवादविरोधी पोटा कायदा रहित केला. त्या वेळी भाजपने त्या विरोधात रान उठवले होते. आता भाजपला पूर्ण बहुमत आहे. असे असतांनाही भाजप पोटासारखा कायदा का करत नाही ? भारताला पोटासारख्या आतंकवादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे. - श्री. पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळ

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार सनातनच्या गोव्यातील रामनाथी आश्रमाला भेट देतात; पण गोव्यातील आमदारांना वेळ नाही !

     उत्तरप्रदेशातील कानपूर येथील भाजपचे आमदार श्री. सतीश महाना यांनी २८ जानेवारी २०१६ या दिवशी सनातनच्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ. अनीता महाना याही होत्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

     सनातनच्या विविध आश्रमांसाठी स्वयंपाकोपयोगी भांडी उपलब्ध करून देऊन अथवा त्याकरिता धनरूपात साहाय्य करून राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !
     सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देऊन सेवा करण्यास इच्छुक साधकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील भांड्यांची तातडीने आवश्यकता आहे. 
     जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील प्रकारची भांडी उपलब्ध करून देऊ शकतात अथवा त्याकरता धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

साधकाला रात्री झोपेत विविध त्रास होणे आणि अंतर्मनातून स्वयंसूचना सत्रे चालू होऊन शांत झोप लागणे

अधिवक्ता
योगेश जलतारे
१. रात्री अव्याहतपणे धावत असल्याचे स्वप्न पडणे, स्वप्नातच अंतर्मनातून स्वयंसूचना चालू होऊन धावायचे थांबणे अन् शांत झोप लागणे : मार्च २०१५ मधे एका रात्री स्वप्नात मी अव्याहतपणे धावत होतो. सर्व साधक मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मी त्यांच्या हाती लागत नव्हतो. धावता धावता मी पुष्कळ दमलो. माझ्या छातीत दुखू लागले, तरीही मी थांबत नव्हतो. मी निष्कारण धावत आहे, हे लक्षात येऊनही मला स्वतःवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. तेव्हा अचानक अंतर्मनातून स्वयंसूचना चालू झाली, जेव्हा मी निरर्थक धावत असेन, तेव्हा मी माझ्या शक्तीचा अपव्यय करीत आहे, याची मला जाणीव होईल अन् मी एका जागी बसून शांतपणे नामजप करीन. सूचनासत्र जेमतेम पूर्ण होत नाही, तोच मला शांत झोप लागली.

सनातनचे विकलांग अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी (वय १९ वर्षे) यांच्याशी खेळायला-बोलायला श्रीकृष्ण येत असल्याचे सूक्ष्मातून दिसणे

      एप्रिल २०१४ मध्ये एकदा सनातनचे विकलांग अवस्थेतील संत आणि सौ. प्राजक्ता जोशी यांचे चिरंजीव पू. सौरभ जोशी (पू. दादा) हे त्यांच्या खोलीत पहुडले होते. तेव्हा सौ. जोशीकाकू अन्यत्र जात असल्याने मला काही वेळ पू. दादांजवळ बसण्याची सेवा मिळाली. त्या वेळी मला पू. दादा आनंदाने कुणाशी तरी बोलत आहेत, असे जाणवले. नंतर मला सूक्ष्मातून दिसले, त्यांच्या डाव्या बाजूला श्रीकृष्ण पहुडले आहेत, ते पू. दादांशी खेळत आहेत अन् त्यांना प्रतिसाद देऊन बोलतही आहेत. तेव्हा निरागस लहान मुलांशी खेळायला देव येतो, त्याप्रमाणे पू. दादांशी खेळायला किंवा बोलायला श्रीकृष्णच तेथे येतो, असे माझ्या लक्षात आले.

नामजप करतांना श्‍वासाकडे लक्ष, अस्तित्वाची जाणीव आणि पुढे अस्तित्वही न रहाणे अशी प्रत्येक टप्प्याची अनुभूती ईश्‍वराने देणे

श्री. दिनेश शिंदे
१. नामजप करत असतांना नामजप बंद पडून श्‍वासावर लक्ष केंद्रित होणे : १०.१.२०१६ या दिवशी सकाळी १० वाजता मी नामजप करत असतांना काही वेळाने हळूहळू माझा नामजप बंद पडला आणि श्‍वासाकडे लक्ष देण्याची क्रिया आपोआप चालू झाली.
२. देहाची जाणीव नष्ट होऊन केवळ अस्तित्व जाणवणे आणि शांत वाटणे : हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्‍वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला. पुढच्या क्षणी माझ्या देहाची जाणीव नाहीशी झाली आणि तेथे केवळ अस्तित्व होते आणि शांत वाटत होते. या स्थितीत मी नामजप करायचा आणि श्‍वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला, तर या दोन्हीपैकी काहीही न होता मला केवळ अस्तित्व जाणवत होते आणि याच स्थितीत रहावेसे वाटत होते.

देहली येथील सौ. मंजू गुप्ता यांना आलेली अनुभूती

१. ग्रंथप्रदर्शन स्थळाहून घरी परतण्याचा मार्ग चुकणे आणि नियोजित वेळेपेक्षा १ घंटा उशिरा घरी पोचणे : १४.२.२०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता विश्‍व पुस्तक मेळाव्यामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावले होते. ती सेवा झाल्यावर आम्ही साधारणतः रात्री ९.३० वाजता घरी पोचायला हवे होते; पण चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे आम्ही रात्री १०.३० वाजता घरी पोचलो.

नामजप करत असतांना साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. सत्यकाम कणगलेकर
१. नामजप करत असतांना ब्रह्मांडपोकळीत प्रचंड वेगाने पुढे जात असून सर्व तारे मागे जात असल्याचे दिसणे आणि ही आनंददायी स्थिती एक ते दीड मिनिट राहून हलकेपणा जाणवणे : ५.१.२०१६ या दिवशी आम्ही ५ साधक पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत कर्नाटक राज्यातील बेलूर या स्थानी चित्रीकरणाच्या सेवेसाठी जात होतो. संध्याकाळी ७ - ७.३० च्या सुमाराची वेळ असावी. मी डोळे मिटून नामजप आणि आत्मनिवेदन करत होतो. या वेळी मी ब्रह्मांडपोकळीत प्रचंड वेगाने पुढे जात असून सर्व तारे मागे जात असल्याचे दिसले. एखाद्या चुंबकाकडे वेगाने खेचले जावे, तसे काहीसे हे होते; मात्र समोर चुंबकीय वस्तू असे काहीच नव्हते. ही स्थिती साधारण एक ते दीड मिनिट होती. मला या स्थितीत हलकेपणा जाणवून या वेगवान प्रवासात पुष्कळ आनंद होत होता. याविषयी मी पू. (सौ.) गाडगीळकाकूंना सांगितल्यावर त्यांनी देवाने तुला कृष्णविवर दाखवले. चांगली अनुभूती आहे. लिहून ठेव, असे सांगितले.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे पू. डॉ. ॐ उलगनाथन् प.पू. डॉक्टरांची प्रसिद्धी करत असणे, पुढे सार्‍या विश्‍वात त्यांचा जयजयकार होणार असणे अन् नाडीपट्ट्यांवरही आधीचे नाडीभविष्य पुसले जाऊन राष्ट्रविषयक, तसेच प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्यविषयक नवीन भविष्य उमटत असणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या घरी असलेल्या ध्यानमंदिरातील गोदरेजच्या कपाटात सार्‍या नाडीपट्ट्या साधकांकडून एकत्रित ठेवून घेणे; कारण त्यांना या पट्ट्यांना केवळ साधकांनीच स्पर्श करावा, असा महर्षींचा आदेश असणे : याच दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यांच्या घरी असलेल्या ध्यानमंदिरात चार गोदरेजच्या कपाटांमध्ये सार्‍या नाडीपट्ट्याही साधकांकडून, तसेच नाडीभक्तांकडून ठेवून घेतल्या. या नाडीपट्ट्यांना केवळ साधकांनीच स्पर्श करावा, असा महर्षींचा आदेश असल्याने मी तसे करत आहे आणि महर्षि सांगतील त्या वेळी या सर्व नाडीपट्ट्यांचे आपल्याला विधीवत् पूजन करायचे आहे, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी (७.२.२०१६) रात्री १०.२० वाजता
समाप्ती - पौष अमावास्या (८.२.२०१६) रात्री ८.०९ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

कर्करोगाने आजारी असणार्‍या यजमानांच्या आजारपणात आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

श्रीमती सुरेखा सरसर
१. यजमानांचे कर्करोगाचे शस्त्रकर्म झाल्यावर खोक्याचे उपाय, कापूर उपाय, नामजप चालू ठेवल्यामुळे जखम लवकर भरून येणे : २०१३ मध्ये माझ्या यजमानांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. सर्व कुटुंबावर अक्षरशः आकाश कोसळले. माझी मोठी मुलगी (सौ. मनीषा महेश पाठक) पुण्याला असल्याने त्यांचे शस्त्रकर्म पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झाले. त्या वेळी जावई महेश पाठक यांनी मुलाप्रमाणे त्यांची सेवा केली. प्रतिदिन खोक्याचे उपाय, कापूर उपाय, नामजप चालू असल्यामुळे त्यांची जखम लवकर भरून आली आणि आम्ही लवकरच नांदेडला परत आलो.

साधकांनो, मनात स्वतःच्या प्रगतीचा विचार येत असल्यास ती स्वेच्छा असल्याचे लक्षात घेऊन त्या संदर्भात स्वयंसूचना द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले
    काही साधकांच्या मनात स्वतःच्या प्रगतीचा विचार येतो. हा विचार एक अडथळा बनून जातो. स्वतःच्या प्रगतीचा विचार, ही स्वतःकडून असणारी अपेक्षा म्हणजेच स्वेच्छा आहे. साधना निष्काम असते आणि ती निष्काम झाल्यासच प्रगती होते. त्यामुळे यासंदर्भात स्वतःला सूचना द्यायला हवी. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
दिशा
माझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
पाश्‍चात्त्यांकडून शिकलेल्या वापरा आणि टाकून द्या या वृत्तीमुळे आता हिंदूही नोकरी लागेपर्यंत आई-वडिलांचा वापर (लाभ) करून घेतात आणि नोकरी लागल्यावर त्यांना टाकून देतात, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावरील श्रद्धा !
दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वरावरील श्रद्धा म्हणते, हे कार्य देवच करू शकतो. त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, देव हे करीलच !; पण परमेश्‍वरावरील परमश्रद्धा म्हणते, हे काम झालेच आहे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भारतियांनो, जागे रहा !

    देश आणि धर्म यांना केंद्रस्थानी धरून टीका करण्याचे काम चालू असल्याचे लक्षात येते. बिहारमधील अधिवक्ता चंदन सिंह यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीराम यांच्या संदर्भात दाखल केलेली याचिका, मध्यप्रदेशमधील माजी आमदार फूलसिंह यांनी रणरागिणी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी काढलेले अनुद्गार आणि मोदी शासन भारतियांवर हिंदुत्व लादत आहे, असा आरोप करणार्‍या मुसलमान संघटना इत्यादी प्रसंग एकत्र पाहिले असता देशात काहीतरी जाणीवपूर्वक केले जात आहे, असे जाणवते. मागील दीड वर्षापासून म्हणजे मोदी शासन सत्तेत आल्यापासून देशाला परिवर्तनाची आवश्यकता आहे, या सूत्राची जाणीव जनतेला होऊ लागली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn