Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. गगनगिरी महाराज पुण्यतिथी

गोव्यातील सनातनचा आश्रम इसिसच्या रडारवर !

इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून समीर 
सरदाना यास गोव्यात अटक : एन्.आय.ए.कडून कसून चौकशी !
    पणजी - वॉस्को रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असतांना इस्लामिक स्टेट (इसिस)च्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला ४४ वर्षीय समीर सरदाना निवृत्त मेजर जनरलचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. समीर हिंदु असून तो इस्लाम धर्माला मानतो, असे सांगितले जात आहे. गोवा आतंकवादविरोधी पथक गेल्या तीन दिवसांपासून त्याची चौकशी करत आहे. त्याच्याकडे काही संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडून लॅपटॉप, पाच पारपत्रे आणि चार भ्रमणभाष (मोबाइल) जप्त करण्यात आले आहेत. समीरच्या भ्रमणसंगणकाचा (लॅपटॉप) पासवर्ड शोधून काढण्यात यश आले असून त्यातून काही महत्त्वाचे ई-मेल हाती लागले आहेत. या ई-मेलमध्ये देशाच्या अनेक भागांत झालेल्या बॉम्बस्फोटांचा उल्लेख आणि अन्य तपशील आढळून आला आहे. गोव्यातील रामनाथी येथे सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था हिंदुत्ववादी असल्याने ती जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य आहे. या अनुषंगाने आश्रमावर आक्रमण करण्याच्या संदर्भात सरदाना काही सिद्धता करत होता का, या दिशेनेही केंद्रीय गुप्तचर संस्था त्याची चौकशी करत असल्याचे दैनिक गोमंतकने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान ४ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय्.ए) सरदाना याची चौकशी करण्यात आली.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची अनुमती !

जनतेने काँग्रेसवर बंदी आणण्याची मागणी जनतेने केल्यास चूक ते काय ? 
   मुंबई - आदर्श वसाहतीच्या घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्यास अन् खटला चालवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अनुमती दिली आहे. या प्रकरणी नेमलेल्या न्यायमूर्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाच्या अहवालानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने ८ ऑक्टोबर २०१५ ला राज्यपालांना पत्र लिहून चव्हाण यांच्या विरोधात कारवाईसाठी अनुमती मागितली होती. त्यानंतर राज्यपालांनी मंत्रीमंडळाचा विचार मागितला होता. त्यावर मंत्रिमंडळाने राज्यपालांना होकर दर्शवला होता.

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेत 
अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांचा सत्कार !   
धर्माभिमानी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांचा
सत्कार करतांना सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये
डावीकडून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, हातात तलवार घेतलेले हिंदु विधीज्ञ 
परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजिव पुनाळेकर, सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती
खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी धर्मद्रोही आणि पुरोगामी यांच्या धमकीला न जुमानता सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सनातन संस्थेला मोलाचे सहकार्य करणारे सांगली येथील हिंदु धर्माभिमानी आणि झुंजार अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्यासह अन्य अधिवक्त्यांचा जाहीर सत्कार कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेत करण्यात आला. या सभेस ३ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तलवार भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न !

धर्मांधांना शांत करण्यासाठी अधीक्षकाने मागितली क्षमा !
      नेल्लोर - ३० जानेवारीला येथील धर्मांध जिहादी एकत्र येऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
१. एका राजकीय पक्षाच्या धर्मांध नेत्याने एका हिंदु पोलीस अधिकार्‍याने बुरख्यावर आक्षेपार्ह टिपणी केली, अशी अफवा पसरवली.
२. याचे निमित्त करून धर्मांध मोठ्या संख्येत एकत्र आले आणि त्यांनी वन टाऊन पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. (कुठे अफवेवरून हिंसा करणारे धर्मांध, तर कुठे प्रत्यक्षात धर्माचा अवमान होऊनही त्याचा वैध मार्गानेही विरोध न करणारे हिंदू ! - संपादक)

हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणी ५० वर्षीय धर्मांध मुसलमानाच्या विरोधात तक्रार

पुणे येथे 'लव्ह जिहाद'ची आणखी एक घटना उघडकीस ! 
 मुलीसमान तरुणीला पळवून नेणारे वासनांध धर्मांध ! 
     पुणे, ४ फेब्रुवारी - एका २२ वर्षीय हिंदु युवतीला स्वतःची मुलगी मानत असल्याचे सांगून हाजी महंमद शेख या ५० वर्षीय धर्मांधाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंदु युवतीच्या आईने धर्मांधाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी या शेख याला बोलावून घेतले. त्याने प्रारंभी पोलिसांना उडवीउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मुलीला पोलीस ठाण्यात उपस्थित केले. त्या वेळी हिंदु मुलगी पूर्णपणे मुसलमान वेशात होती. (यावरून हिंदु युवतींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! 'लव्ह जिहाद'चे वाढते लोण रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीला पर्याय नाही. - संपादक) 

उत्तरप्रदेशात महंत आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदु मुख्यमंत्र्याची आवश्यकता ! - सहस्र संतांची एकमुखी मागणी

महंत आदित्यनाथ
      गोरखपूर - येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्‍वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्‍वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात म्हटले होते की, राम मंदिराच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेशात एक सशक्त हिंदु मुख्यमंत्री असणे अत्यंत आवश्यक आहे. जो मुख्यमंत्री राममंदिरासाठी सर्व प्रकारच्या त्यागासाठी सिद्ध असेल. प्रस्तावाला अनुमोदन देतांना साधू-संतांनी भाजपाचे खासदार गोरक्षपिठाधीश्‍वर महंत योगी आदित्यनाथ यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. येथे आयोजित करण्यात आलेल्या या संत सभा-चिंतन बैठकीत रामजन्मभूमीवर राममंदिरचे निर्माण, धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवणे, समान नागरीक संहिता लागू करणे, गोहत्येवर संपूर्ण प्रतिबंध लावणे आणि गंगा नदीची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सोलापूर येथे प्रशासनाकडून राष्ट्र्रध्वजाचा मान राखा चळवळीचे कौतुक !

 • शासन, तसेच प्रशासन यांना ३३ निवेदने
 • ९०० प्रबोधन हस्तपत्रकांचे वितरण
    सोलापूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) - राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासन, तसेच प्रशासन यांना ३३ निवेदने देण्यात आली, तसेच ९०० प्रबोधन हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. या प्रबोधन चळवळीचे येथील प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कौतुक करण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून ही प्रबोधन चळवळ सांगोला, पंढरपूर, बार्शी, अकलूज, सोलापूर, मंगळवेढा येथे राबवण्यात आली. एकूण ३३ निवेदनांपैकी २ पोलीस आयुक्त, १ तहसीलदार, २१ शाळा, ७ महाविद्यालय, १ शिक्षणाधिकारी, १ जिल्हाधिकारी अशी निवेदन देण्यात आली. या चळवळीच्या अंतर्गत ११० भित्तीपत्रके लावण्यात आली. ३३ वैयक्तिक संपर्क करण्यात आले. ५१ ठिकाणी फलकप्रसिद्धीद्वारे जनजागृती करण्यात आली.

धमकी देणार्‍यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा प्रथम विचार करावा ! सुमित साळुंखे

सोलापुरात अधिकार्‍यांना आतंकवादी संघटनांनी धमकी दिल्याचे प्रकरण ! 
सोलापुरात युवा सेना देणार अधिकार्‍यांना संरक्षण ! 
     सोलापूर, ४ फेब्रुवारी शिवरायांच्या विचारांचे हे राज्य असून, अशा प्रकारच्या धमक्या देण्यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा त्यांनी विचार करावा आणि मगच आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा सचिव सुमित साळुंखे यांनी दिले. 'अल-कायदा' आणि इसिस यांच्या नावाने निनावी पत्राद्वारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त विजयकुमार कळम-पाटील, दैनिक सुराज्यचे संपादक यांच्यासह अधिकार्‍यांना धमकी देणार्‍यांच्या विरोधात मंगळवारी युवा सेनेने आक्रमक पाऊल उचलत इसिसचा निषेध नोदवला आणि 'युवा सेना अधिकार्‍यांना संरक्षण देईल', असे सांगितले. (आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी पुढे आलेल्या युवा सेनेचे अभिनंदन ! अन्य राष्ट्राभिमान्यांनीही त्यांच्याकडून बोध घ्यावा. - संपादक) 

कोल्हापुरातील सर्व पथकर नाके बंद

     मुंबई - राज्यातील काही पथकर नाके बंद करण्यात आले आहेत. हे पथकर नाके कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते ३ फेब्रुवारीपासून कायमचे बंद करण्यात आले आहेत. राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. या सर्व पथकर नाक्यांची मुदत संपली होती. त्यामुळे हे पथकर नाके बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने घेतला होता. कोल्हापूरातील पथकर नाके बंद करण्यासाठी जनतेचा २ वर्षापासून संघर्ष चालू होता. पुढील पथकर नाके बंद झाले आहेत. - कळंबा, बार्शी, कोल्हापूर राधानगर, फुलेवाडी, रसनोबतवाडी, आर् के नगर, शिये नाका, शिलोरी नाका, उचगाव नाका, शाहू नाका.

बांगलादेशला हिंदूंच्या मानवाधिकारासाठीचा लढा चालूच ठेवावा लागेल ! - अमेरिकेचे पत्रकार आणि लेखक डॉ. रिचर्ड बेन्किन

डॉ. रिचडर्र् बेन्किन
      मूळचे अमेरिकी आणि धर्माने ज्यू असलेले डॉ. रिचडर्र् बेन्किन हे बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात सध्या लढत आहेत. ते लेखक, पत्रकार, तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. एक ज्यू मानवाधिकार कार्यकर्ते बांगलादेशातील हिंदूंसाठी लढतात; मात्र भारतीय राज्यकर्ते त्यांच्यासाठी काहीही करत नाहीत, हे दुर्दैवी !
    न्यूयॉर्क - मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणार्‍या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत. डॉ. बेन्किन यांचा एका संकेतस्थळावरून नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला. यांत ते म्हणतात, सध्या सत्तेवर असलेली अवामी लीग बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही, असे म्हणत आली आहे; परंतु याआधी सत्तेवर असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी) पार्टीच्या कार्यकाळापेक्षा आता हिंदूंवरील अत्याचार अधिक वाढले आहेत, तसेच मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील आक्रमणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही त्यांच्यावर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

केंद्रशासनाकडून अद्याप एक रुपयाही उपलब्ध झालेला नाही !

 • शासनाने हिंदूंच्या सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
 • उज्जैन सिंहस्थपर्व 
 • केंद्रशासनाकडून सिंहस्थपर्वासाठी १०० कोटी रुपये इतकी तुटपुंजी रक्कम घोषित; मात्र ती अजूनही कागदावरच ! 
 • काँग्रेसच्या कार्यकाळात निधी उपलब्ध झाला; मात्र भाजपच्या काळात न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त ! 
 •  निधी मिळण्याविषयी राज्यशासन साशंक !
     उज्जैन - येथील सिंहस्थपर्वासाठी केंद्रशासनाकडून आतापर्यंत एकही पैसा उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कुंभपर्वाचा सर्व भार राज्यशासनावर आला आहे. वर्ष २०१३ मध्ये प्रयाग (अलाहाबाद) येथील सिंहस्थपर्वासाठी तत्कालीन काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शासनाने १ सहस्र २०० कोटी रुपये दिले होते; मात्र केंद्रातील विद्यमान शासनाकडून उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वासाठी केवळ १०० कोटी रुपयांचा निधी घोषित झाला आहे; यापैकी राज्याला अजून एक रुपयाही उपलब्ध झालेला नाही. केंद्राकडून या पर्वासाठी लवकरच तरतूद केली जाईल, अशी आशा राज्यशासनाने व्यक्त केली आहे.

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधानंतरही वाई येथे गणपतीबाप्पा हाजीर हो या विडंबनात्मक बालनाटिकेचे दुसर्‍यांदा आयोजन

हिंदुत्ववाद्यांनो, आयोजकांच्या आश्‍वासनावर विसंबून न रहाता 
नाटिका रहित होईपर्यंत वैध मार्गाने विरोध चालूच ठेवा !
आयोजकांकडून हिंदुत्ववाद्यांना दिलेल्या आश्‍वासनाला केराची टोपली 
     वाई (जिल्हा सातारा), ४ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील भीमकुंड आळीच्या कृष्णोत्सवात ११ फेब्रुवारी या दिवशी गणपतीबाप्पा हाजीर हो बालनाटिका सादर करण्यात येणार आहे. याआधीही एकदा येथे सादर केलेल्या याच बालनाटिकेच्या नावातून श्री गणेशाचे विडंबन होत असल्याने हिंदुत्ववाद्यांनी विरोध दर्शवला होता. हिंदुत्ववाद्यांनी विरोधामागील भूमिका स्पष्टपणे समजावून सांगितल्यावर आयोजकांनी नमते घेतले आणि नाटिकेचे नाव पालटून, तसेच त्यात योग्य ते पालट करून नाटिका सादर करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. यापुढे नाटिकेतून श्री गणेशाचे विडंबन होणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी हिंदुत्ववाद्यांना दिले; मात्र आश्‍वासन न पाळता गणपतीबाप्पा हाजीर हो या बालनाटिकेचे पुन्हा आयोजन केले आहे.

मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने लव्ह जिहाद या विषयावर विद्यार्थिनींचे प्रबोधन

     बुलढाणा - ता. मलकापूर येथील लिलाधर भोजराज चांडक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी लव्ह जिहाद या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. श्रुती भट यांनी हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून धर्मांधांकडून त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार, वशीकरण प्रयोग आणि त्या संदर्भातील उपाययोजना यांच्या संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. २७५ विद्यार्थिनींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

हिंदु संस्कृतीचा संस्कार हा सहिष्णुताप्रधान असल्याने समस्त हिंदु सहिष्णुतेने वागतात ! - जवाहर छाबडा

      ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), ४ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु संस्कृतीचा संस्कार हा सहिष्णुताप्रधान असल्याने समस्त हिंदु सहिष्णुतेने वागतात. यामुळे भारतातील लोकशाही ही जगातील अन्य देशातील लोकशाहीपेक्षा प्रगल्भ, लोकहितकारी आणि श्रेष्ठतम आहे. याची प्रचीती जगातील सर्व लोकशाही देश घेत आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे कोल्हापूर विभाग संघटनमंत्री श्री. जवाहर छाबडा यांनी काढले. येथील वाळवा तालुका बजरंग दलाच्या नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

७ फेब्रुवारीला अधिवक्ता विक्रम एडके यांचे मस्तानी पल्याडचे बाजीराव या विषयावर व्याख्यान !

     सांगली, ४ फेब्रुवारी (वार्ता.) - ब्राह्मण सभा सांगली आणि लोकमान्य टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रातीच्या उत्सवाच्या निमित्ताने रविवार, ७ फेब्रुवारी या दिवशी नगर येथील अधिवक्ता विक्रम एडके यांचे मस्तानी पल्याडचे बाजीराव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ उपस्थित रहाणार आहेत. व्याख्यानास लोकमान्य टिळक स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल. इतिहासातील युद्धात अजिंक्य ठरलेल्या बाजीराव पेशव्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेणार्‍या या व्याख्यानासाठी आपण मित्रमंडळींसमवेत उपस्थित रहावे, असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. केदार खाडिलकर यांनी केले आहे.

असहिष्णुतेविषयी बोलणार्‍यांकडून देशाची अपकीर्ती ! - किरेन रिजिजू

असहिष्णुतेविषयी कांगावा करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
     पुणे, ४ फेब्रुवारी - भारत हा जगातील सर्वाधिक सहिष्णू देश आहे. इतर देशांमध्ये शासनाच्या विरोधात बोलले अथवा टीका केली, तर शिक्षा होते. आपल्या देशात मोदी शासन सत्तेत आल्यापासून सामाजिक संकेतस्थळासह अनेक माध्यमांतून शासनावर टीका होत आहे. तरीही एकाही व्यक्तीवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे देशाच्या असहिष्णुतेविषयी बोलणारे देशाचीच अपकीर्ती करत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. 

सोलापूर येथे ७२ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडणार

     सोलापूर, ४ फेब्रुवारी - येथील सार्वजनिक आणि शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला असून तसे आदेश प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या ७ फेब्रुवारीनंतर शहरातील अनधिकृत ७२ धार्मिक स्थळे पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी शहरातील काही धार्मिक स्थळांची पाहणी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

छगन भुजबळ यांच्या चौकशीचे प्रकरण 
     मुंबई, ४ फेब्रुवारी - माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांची चौकशी करून म्हणणे नोंदवले आहे. काकडे यांच्या 'काकडे इन्फ्रास्ट्रक्चर' या आस्थापनाने भुजबळ यांच्या आस्थापनामध्ये १० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संचालनालयाने काकडे यांची चौकशी केली. संजय काकडे हे भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. 

शनीच्या चौथर्‍यावर चढण्याऐवजी स्त्रीची विटंबना करणार्‍यांना रोखा ! - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद 
ह.भ.प. चारुदत्त आफळे
      चिपळूण, ४ फेब्रुवारी (वार्ता.) - शनीची स्पंदने स्त्री प्रकृतीला घातक ठरू शकतात. धर्मशास्त्रात विचारपूर्वक आणि सुरक्षेसाठीच हे नियम केले आहेत. हल्ली अनेक शास्त्रज्ञांनी काही स्पंदने प्रकृतीला घातक ठरत असल्याबद्दलचे मत मांडले आहे. शनिशिंगणापूर आंदोलनामागे आध्यात्मिक दृष्टीकोन नव्हता. तेथील प्रथा-परंपरा ही स्त्रियांवरील अन्यायाची गोष्ट नाही. जेथे स्त्रियांवर अन्याय होतो, तेथे लढा द्यायला हवा. चित्रपटांमध्ये स्त्रीदेहाचे आेंगळवाणे प्रदर्शन होते, ही स्त्रीची खरी विटंबना आहे. शनीच्या चौथर्‍यावर चढण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा ही विटंबना करणार्‍यांच्या उरावर चढून ती पिडा दूर करण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

फ्रान्समध्ये पगडी परिधान करण्यास बंदी नाही ! - फ्रान्सचा निर्वाळा

     पॅरिस - आपल्या अधिकारांसाठी शिखांच्या एका संघटनेकडून करण्यात आलेल्या निदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर शिखांना सार्वजनिक ठिकाणी पगडी परिधान करण्यास फ्रान्समध्ये बंदी नाही, असे फ्रान्सच्या दूतावासाकडून जाहीर करण्यात आले आहे. दूतावासाकडून सांगण्यात आले आहे की, काही धर्मांधांचा विरोध असला, तरी शासकीय शाळेच्या परिसराबाहेर आणि सार्वजनिक ठिकाणी शिखांना पगडी परिधान करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. फ्रान्समध्ये रस्त्यावर पगडी परिधान करणार्‍या शिखांना कुठल्याही प्रकारच्या गैरकृत्याला सामोरे जावे लागत नाही आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही असा प्रकार घडलेला नाही.

गेल्या वर्षात पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात ३ सहस्र ४०० दावे विभक्त होण्यासाठी प्रविष्ट

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराची ओळख विभक्तांचे 
शहर अशी झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
     पुणे, ४ फेब्रुवारी - व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक ही सामाजिक संकेतस्थळे वापरणार्‍या पती-पत्नी यांचा संसार परस्परांतील वादामुळे अवघ्या वर्षभरात तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षभरात पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात विभक्त होण्यासाठी ३ सहस्र ४०० दावे प्रविष्ट झाले आहेत. त्या दाव्यांपैकी ३० प्रतिशतहून अधिक दावे हे सामाजिक संकेतस्थळाशी निगडित आहेत. त्यांच्या अतिरेकी वापरामुळे एकमेकांवर संशय घेऊन काडीमोड घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण कुटुंब न्यायालयातील अधिवक्त्यांनीही नोंदवले आहे.

मद्यबंदीसाठी निघोज (जिल्हा नगर) ग्रामस्थ आणि महिला यांचे रस्ता बंद आणि गाव बंद आंदोलन !

मद्यबंदीसाठी पुढाकार घेऊन आंदोलन करणारे ग्रामस्थ आणि महिला यांचे अभिनंदन !
    निघोज, ४ फेब्रुवारी - येथील महिला मद्यबंदी करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या मागणीनुसार या विषयावर नुकतेच मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यास प्रशासनाला अपयश आल्याचे महिला आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे. मतदारसूचीत महिलांची नावे नसणे, मतदानासाठी आलेल्या महिलांना अधिकार्‍यांकडून झालेली धक्काबुक्की आणि मद्यविक्रेत्यांच्या बाजूने घेतलेले धोरण यांमुळे निकाल वादाच्या भोवर्‍यात सापडला. (या प्रकरणी शासन त्या अधिकार्‍यांची चौकशी करून कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) या मद्यबंदी खात्याच्या अधिकार्‍यांचा निषेध आणि मद्यबंदीसाठी फेरमतदानाची मागणी यासाठी निघोजच्या ग्रामस्थ अन् महिला यांनी १ फेब्रुवारी या दिवशी रस्ता बंद आणि गाव बंद आंदोलन केले. विविध संघटना आणि व्यावसायिक यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुण्यामध्ये चोरी झालेल्या ४१६ कोटी रुपयांच्या मुद्देमालापैकी पोलिसांकडून ३६ कोटी रुपये हस्तगत

पोलिसांचे अपयश !
     चोरीच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्यासाठी पुणे पोलीस प्रशासन कठोर उपाययोजना करणार का ? यावरून पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडल्यास वावगे वाटायला नको !
     पुणे, ४ फेब्रुवारी - गेल्या २ वर्षांत शहरात चोरी आणि घरफोडी करून पसार केलेल्या ४१६ कोटी रुपयांच्या मुद्देमालापैकी केवळ ३६ कोटी रुपयांचाच मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करता आला. गेल्या २ वर्षांत सोनसाखळी चोरी हिसकावण्याच्या ८६४ घटना घडल्या असून त्यापैकी ४४३ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. उर्वरित सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास अजूनही चालू आहे. यामुळे पोलिसांच्या अपयशाची कारणे कोणती, याचा शोध घेण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाशिक येथील आश्रमशाळेत धर्मांतर होत असल्याचा संशय !

प्रशासन याची चौकशी करून सत्य बाहेर काढणार का ? 
     नाशिक - दिंडोरी येथील ज्ञानज्योती कन्या आश्रम शाळा तिल्लोळी या शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मानसिक छळ केला जात आहे. या विरोधात त्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन चालू केले आहे. यामध्ये शिक्षकांची होणारी वेतनकपात, त्यांना शासकीय सुविधांपासून वंचित ठेवणे, मानसिक छळ करणे यांसारखी सूत्रे प्रशासनासमोर मंाडण्यात आली. मात्र यासमवेत शाळेत येशूच्या प्रार्थना करायला लावून धर्मांतराचे प्रयत्नही चालू असल्याचे समजते. याविषयी पुढील सूत्रे लक्षात आली. 

मुसलमानांनी आतंकवादाच्या विरोधात उभे रहावे ! - बराक ओबामा

     बाल्टीमोर (अमेरिका) - मुसलमानांनी कट्टरपंथी आणि आतंकवाद यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी येथे केले. एका मशिदीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ओबामा यांच्या त्यांच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या कार्यकाळात मशिदीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे राष्ट्रध्यक्षपदाचे हे शेवटचे वर्ष आहे. ओबामा पुढे म्हणाले, अमेरिकेत धार्मिक स्वातंत्र्य आहे. तरीही येथे मुसलमानांमध्ये भीती आणि चिंता आहे. अमेरिका सर्व धर्माच्या लोकांच्या सुरक्षेची काळजी घेते. जर एखादा धर्म मानणार्‍याच्या धार्मिक भावनांवर आक्रमण होत असेल, तर ते येथील सर्वच धर्मांवर आणि त्यांच्या भावनांवर केलेले आक्रमण असते. मुसलमान हे अमेरिकेच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या जनतेने आम्ही इस्लामला नाकारत नाही, तर इस्लामच्या नावाने पसरवला जाणारा खोटारेडेपणा नाकारत आहोत, हे दाखवून द्यावे. या वेळी ओबामा यांनी त्यांच्या भाषणात कुराणातील काही शिकवणींचाही दाखला दिला.

सहलींसाठी लागणार्‍या अनुमतीच्या नियमाविषयी मुख्याध्यापकच अंधारात

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ! 
     पुणे - सहलीला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी शाळांकडून पुरेशा प्रमाणात दक्षता घेण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या दुर्घटना होण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे शिक्षण विभागाच्या पूर्वानुमतीने आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीला न्यावे, असा नियम वर्ष २००६ मध्ये करण्यात आला. बहुतांश मुख्याध्यापकांना या नियमाविषयी माहिती नसल्याचे समोर आले आहे. गेल्या ३ मासांत केवळ २ कनिष्ठ महाविद्यालयांनीच सहलीसाठी शिक्षण विभागाची अनुमती घेतली आहे. (याविषयी शिक्षण विभाग संबंधित शाळा आणि विभागाचे अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) 

अमेरिकेतील सनफ्रॉग आस्थापनाकडून श्री गणेश, ॐ आणि योगा यांचे घोर विडंबन !

 • अमेरिकेतील फोरम फॉर हिंदु अवेकनिंग संघटनेने केला विरोध !
 • जगभरातील धर्माभिमानी हिंदूंकडून निषेध व्यक्त !
     न्यूयॉर्क - अमेरिकेतील सनफ्रॉग आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे आणि ॐ चे घोर विडंबन केले आहे. तसेच तिने निर्मिती केलेल्या टी-शटर्सवर योगाषियी आक्षेपार्ह मजकूर छापून योगासनांची खिल्ली उडवली आहे. हे सर्व टी-शर्ट्स www.sunfrog.com या संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याची माहिती मिळताच जागृत हिंदूंनी फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनेला कळवले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने याविरोधात सनफ्रॉग आस्थापनाला इ-मेल करून याचा निषेध नोंदवला. आस्थापनाच्या या धर्मद्रोही कृत्याच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या गेल्या हे सांगून संघटनेने यासंदर्भातील अध्यात्मशास्त्रही पत्राद्वारे विषद केले. तसेच सदर सर्व टी-शर्ट्स संकेतस्थळावरून काढून टाकण्याची आणि हिंदूंची जाहीर क्षमा मागण्याची मागणीही केली; परंतु आस्थापनाकडून यासंदर्भात काही उत्तर मिळालेले नाही. 

शाळांच्या आवारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री; पुणे विभागात १२१ जणांवर कारवाई

     शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असतांना त्यांची होणारी विक्री ही कायद्याचा धाक राहिला नसल्याचेच लक्षण आहे. त्या पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासमवेत शासन तंबाखूच्या उत्पादनावर बंदी आणेल का ? 
     पुणे, ४ फेब्रुवारी - शाळा आणि महाविद्यालये यांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. असे असतांनाही पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या जवळ त्या पदार्थांची सर्रास विक्री चालू असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये १२१ विक्रेत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १६ सहस्र ४०० रुपयांचा ऐवजही शासनाधीन करण्यात आला आहे. (अशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासमवेतच त्यांचा व्यवसाय अनुज्ञप्ती कायमची रहित करायला हवी. - संपादक) त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या ६८० जणांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांनी दिली. 

ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर देहलीतील ब्रिटीश शाळा बंद

आतंकवादग्रस्त भारत !
     नवी देहली - राजधानी देहलीत ब्रिटीश शाळेतील सर्वांना ठार मारण्याची चेतावणी देणारा दूरभाष आल्यानंतर ही शाळा त्वरित बंद करण्यात आली. हा दूरभाष पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून दुपारी १ वाजता आला होता. त्यानंतर ही शाळा त्वरित बंद करण्यात आली.

हिंदूंनो, जिहादी इसिसला सामोरे जाण्यासाठी संघटित व्हा !

फलक प्रसिद्धीकरता
     इस्लामिक स्टेट इसिस सनातन संस्थेच्या गोवा येथील मुख्य आश्रमावर आक्रमण करण्याच्या संदर्भात काही सिद्धता करत आहे का, या दिशेने केंद्रीय गुप्तचर संस्था शोध घेत असल्याचे गोव्यातील दैनिक गोमंतकने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे.हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
 ISIS ki Sanatanke Goa ashrampar aakramanki siddhata ? kendriya guptachar sanstha dwara janch shuru ! - Hinduo, ISIS ke virudha ab to sanghatit ho jao ! 
जागो ! :
इसिसकी सनातनके गोवा आश्रमपर आक्रमणकी सिद्धता ? केंद्रीय गुप्तचर संस्थाद्वारा जाँच शुरू । - हिंदुओ, इसिसके विरूद्ध अब तो संघटीत हो जाओ !

गोव्यात वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणात वापर !

 • देशात सर्वत्रच बांगलादेशी घुसखोरांची समस्या गंभीर बनत चालली असतांना गोव्यात अशा व्यवसायासाठी त्यांचा वापर होणे घातक !
 • बांगलादेशी घुसखोरांना भारतीय रहिवासी दाखला कोण देतो, त्यांना शोधून काढून देशद्रोही म्हणून शिक्षा केली पाहिजे !
 • वेश्याव्यवसायाच्या विरोधातच कठोर कारवाई केली, तर त्याला संलग्न गुन्हेगारी आपोआप रोखली जाईल !
     पणजी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) - वेश्याव्यवसाय दलालांच्या टोळ्यांकडून गोव्यात वेश्याव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी युवतींचा वापर केला जात आहे. या युवतींना दलालांकडून भारतीय रहिवासी दाखला बनवून दिला जातो, तसेच त्या बांगलादेशी आहेत, हे कुठल्याही परिस्थितीत न सांगण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्या बांगलादेशी असल्याचे शोधून काढणे कठीण बनले आहे. अन्यायरहित जिंदगी या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासातून हे दिसून आले आहे.

उत्तरप्रदेशातील हनुमान मंदिरात दरोडेखोराच्या मूर्तीचीही पूजा होणार !

     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - फतेहपूर जिल्ह्यातील कबरहा या गावात ४ फेब्रुवारी या दिवशी दरोडेखोर ददुआ उर्फ शिवकुमार पटेल याने बांधलेल्या हनुमान मंदिराच्या १० दिवसीय वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष २००७ मध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ददुआ ठार झाला होता. ददुआने बीहड येथे तीन दशके दरोडेखोरी केली होती. आता या मंदिर परिसरात ददुआ याची मूर्ती उभारण्यात येणार आहे. या वार्षिक उत्सवाच्या वेळी ददुआसहित त्याचे आई-वडील आणि पत्नी यांच्या मूर्तीही उभारण्याची सिद्धता करण्यात येत आहे. या मूर्तींची पूजा करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. या १० दिवसीय उत्सवाचा कार्यभार ददुआचे भाऊ आणि माजी खासदार बालकुमार पटेल सांभाळणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव यांच्यासहित १ लक्ष लोकांना आमंत्रण दिले आहे. ददुआचा मुलगा वीर सिंह हा कर्वी मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा आमदार आहे. (मंदिरांमध्ये केवळ देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते. मंदिरामध्ये व्यक्तीच्या मूर्तीची पूजा करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. धर्माभिमानी हिंदूंना दरोडेखोरांच्या आणि सत्ताधारी समाजवादी पार्टीच्या दहशतीमुळे उपरोक्त घटनांना विरोध करणे जमत नसल्यास हिंदूंनी संघटित होऊन अशा घटना थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. - संपादक)

भारतावर आणखी आक्रमणे करून भारत-पाकमधील शांतता चर्चा उधळून लावू ! - जिहादी आतंकवादी हाफीज सईदची पुन्हा धमकी

हाफीज सईदवरही कारवाई न करू शकणार्‍या पाकसमवेत शांतता 
चर्चा करून भारत काय साध्य करणार आहे ?
     मुझफ्फराबाद (पाकिस्तान) - जमात-उद-दवाचा प्रमुख आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक जिहादी आतंकवादी हाफीज सईद याने पठाणकोट येथील भारतीय वायूदलाच्या तळावर झालेल्या आक्रमणाप्रमाणे आणखी आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. याद्वारे भारत-पाकिस्तानमध्ये चालू असलेली शांतता चर्चा उधळून लावण्याचेही त्याने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका सभेत तो बोलत होता. 
    हाफीज सईद म्हणाला की, आठ लाख भारतीय सैनिक काश्मीरमध्ये काश्मिरी जनतेचा आवाज दडपून टाकत आहेत. मग त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी पठाणकोटसारखी आक्रमणे केली, तर त्यांची काय चूक ?

बेंगळुरू येथे टांझानियाच्या तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांना अटक !

केंद्रशासनाकडून घटनेची नोंद
     बेंगळुरू/नवी देहली - बेंगळुरूमध्ये एका अपघातानंतर जमावाने टांझानियाच्या विद्यार्थीनीला मारहाण केली आणि भर रस्त्यात तिचे कपडे फाडले. टांझानियाने हे प्रकरण भारत शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेला दुर्दैवी ठरवत या लाजिरवाण्या घटनेने अतिशय दुःख होत आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. तसेच अपघाताच्या प्रकरणी सुदानचा विद्यार्थी महंमद अहदल यालाही अटक केली आहे. सुदानच्या एका विद्यार्थ्याच्या गाडीने दिलेल्या धडकेत सबीन ताज नावाच्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला, तर तिचा पती सनुल्लाह घायाळ झाला होता. या घटनेनंतर जमावाने गाडीचा चालक असलेला सुदानचा विद्यार्थी आणि त्याच्यासोबत असलेली टांझानियाची २१ वर्षांची विद्यार्थीनी यांना गाडीतून खाली उतरवले आणि कार पेटवून दिली. भाजपचे केंद्रातील मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या प्रकरणावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, देशात घडणार्‍या कोणत्याही घटनेवर आंदोलन करणार्‍या राहुल गांधी यांनी काँग्रेस शासन असणार्‍या कर्नाटकमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल मात्र मौन बाळगले आहे. या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही राहुल गांधी यांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

योग वेदांत सेवा समितीकडून १४ फेब्रुवारीला 'मातृ-पितृ पूजना'चा सोहळा

आयोजनामध्ये शहरातील विविध संघटनांचा सहभाग 
     अमरावती - 'व्हॅलेंटाईन डे'च्या पाश्‍चात्त्य कुप्रथेला बळी पडून व्यभिचारी आणि व्यसनी बनत चाललेल्या युवा पिढीला प.पू. संत श्री आसारामजी बापू यांनी दहा वर्षांपूर्वी 'मातृ-पितृ पूजन' दिनाच्या रूपात एक मंगलमय पर्याय दिला. आता देश-विदेशात प्रतिवर्षी १४ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात 'मातृ-पितृ पूजन' दिवस साजरा केला जातो. अमरावती येथे होणार्‍या या सोहळ्याच्या निमित्त २ फेब्रुवारी या दिवशी अमरावती शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

पाकने आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी ! - राजनाथ सिंह

आतंकवादाला पोसणारा पाक आतंकवाद्यांच्या विरोधात कधीतरी कारवाई करील का ? 
     जयपूर - देशात पूर्णत: कडेकोट सुरक्षा असून कोणत्याही प्रकारच्या आतंकवादाचा धोका नाही. देशात अधिकांश आतंकवादी आक्रमणे पाकिस्तानी सीमेतून होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानने जर आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली, तर दोन्ही देशांसह संपूर्ण दक्षिण आशियात शांतता नांदेल, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे व्यक्त केला. ते येथील पर्यटन परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. (गेल्या ६८ वर्षांतील अनुभवावरून भारतीय राज्यकर्त्यांनी कोणताही बोध घेतला नसल्याचेच यावरून दिसून येते ! - संपादक) सिंह म्हणाले, "भारत आतंकवाद्यांच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करील. सर्वांचा विकास करणे, ही भारताची संरक्षणनीती आहे. कोणत्याही निरपराध्यावर अन्याय होऊ नये आणि कोणताही गुन्हेगार सुटू नये, असे आम्हाला वाटते. आतंकवादाला कोणताही धर्म नसतो."  (जिहादी आतंकवाद्यांना जगात इस्लामी राजवट आणायची आहे, हे जगजाहीर झाले असतांना 'आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो', यावर कुणी विश्‍वास ठेवील का ? - संपादक)

पिंपरी गावात ६७५ अवैध वीजजोडण्या उघडकीस; ३० लक्ष रुपयांची वीजचोरी

अशा वीज चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर शासन करणे आवश्यक ! 
     पिंपरी, ४ फेब्रुवारी - पिंपरी विभागामध्ये विविध ठिकाणी विभाग स्तरावरून वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात आली. पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सांगवी, ताथवडे, चिंचवड, दापोडी, हिंजवडी आदी भागांमध्ये महावितरण आस्थापनाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३० लक्ष ५० सहस्र रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. पिंपरी गावातील दुसर्‍या एका मोहिमेत ६७५ अवैध वीजजोडण्या सापडल्या आहेत. त्या वीजजोडण्या पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आल्या. 

हिंदु राष्ट्र ही केवळ कल्पना नव्हे, तर विचार ! - डॉ. श्रीरंग गोडबोले, सावरकर साहित्याचे अभ्यासक

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 
सावरकरांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र या परिसंवादात डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी मांडलेले विचार
डॉ. श्रीरंग गोडबोले
     सावरकरांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र यापेक्षा सावरकरांचा हिंदु राष्ट्र हा विचार आहे. ती कल्पना नाही. हिंदु राष्ट्र विचाराच्या विकासात रत्नागिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे कारण हिंदुत्वाविषयी मनन आणि चिंतन सावरकरांनी अंदमानात केले. सावरकरांच्या विचारांवर जे आक्षेप घेतले जातात, त्याच्या विषयीची वस्तूस्थिती येथे मांडायची आहे. कालच्या भागात आपण द्विराष्ट्रवादासंदर्भात सावरकरांवर जे आरोप केले जातात, त्याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील भाग पाहूया.
३. आक्षेप आणि विचार
३ ई. आक्षेप : सावरकरांची राष्ट्रकल्पना ही संकुचित, प्रतिक्रियावादी किंवा निगेटिव्ह आहे.
विचार : काही जण म्हणतात हिंदूंची व्याख्या करून सावरकरांनी हिंदु लवचिक परंपरा बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला. असेही म्हणतात की, सावरकर आणि जीना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा सावरकरांचे हिंदु राष्ट्र म्हणजे पाकिस्तानचे हिंदु प्रतिरूप आहे, असाही आरोप केला जातो. त्याला उत्तर सावरकरच देतात.

पंजाबमध्ये शिवसेना नेते अमित अरोरा गोळीबारात गंभीररित्या घायाळ

हिंदुत्ववादी नेत्यांवरील वाढती आक्रमणे चिंताजनक !
      लुधियाना (पंजाब) - येथील बस्ती जोधेवाल चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या काही आक्रमकांनी शिवसेना नेते अमित अरोरा यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर घायाळ झालेले अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शने केली. या आक्रमणाप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हिंदूंनो, जागे व्हा ! तुम्हाला (भारताला) धर्मांधरूपी सापाने विळखा घातला आहे !

पू. दिव्य जीवनदास
महाराज
     एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.
पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !

आणखी किती सावन राठोड मरणार ?

   पुण्यातील कसबा पेठेत विद्युतघटिका (बॅटरी) चोरल्याच्या संशयावरून सावन राठोड या हिंदूला पेटवले असल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यामध्ये राठोड हा ७० प्रतिशत भाजला. सावन राठोड याचा मृत्यू १५ जानेवारी या दिवशी सकाळी उपचारादरम्यान ससून रुग्णालयात झाला. त्याला जाळणारे तिघे जण धर्मांध होते. राठोड याने उपचाराच्या वेळी स्थानिक पोलीस आणि अधिवक्ता यांना एक जबाब दिला. त्या जबाबाचे ध्वनीचित्रण हे अनेक जणांच्या भ्रमणभाषवर फिरले. राठोड याने पोलिसांना सांगितले, मला नाव विचारून आणि मी हिंदु असल्याचे समजताच अंगावर पेट्रोल ओतून मला पेटवून देण्यात आले आहे. या प्रसंगावरून पोलिसांनी सांगितले की, सावन जिवंत नसल्याने ध्वनीचित्रीकरणामधील जबाब हे गौण सूत्र आहे. एकूणच या प्रकरणाला पोलीस कोणते वळण देणार, हेच यातून स्पष्ट होते. आरोपींवर खुनाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. त्याला का मारले, हे पोलीस चौकशीतून समोर आणले जाईल. या सर्व प्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध मोर्चा काढणे आणि निवेदन देणे आदी माध्यमातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सनातन प्रभातचे महत्त्व अचूकतेने ओळखून त्याच्या प्रसारासाठी यत्न करणारे आणि त्याद्वारे हिंदूसंघटन व्हावे, अशी तळमळ असलेले चंदीगढ येथील धर्मप्रेमी श्री. कृष्ण गोपाल गोस्वामीजी (वय ८७ वर्षे) !

१. परिचय 
     श्री. कृष्ण गोपाल गोस्वामी (वय ८७ वर्षे) हिंदी सनातन प्रभातचे वाचक असून ते चंदीगढ येथील हिंदू पर्व महासभा या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत.
२. संस्थेशी संपर्क
     २ वर्षांपूर्वी गोस्वामीजी यांनी त्यांच्याकडील जुन्या सनातन पंचांगावरील संपर्क क्रमांक पाहून देवद आश्रमात संपर्क केला. तेथून त्यांना सौ. अनन्या सेठी यांचा संपर्क क्रमांक मिळाल्यावर त्यांनी सनातन पंचांगासाठी विचारणा केली. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर ते हिंदी मासिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. त्यानंतर ते सतत साधकांच्या संपर्कात असून अधिकाधिक लोकांपर्यंत मासिक सनातन प्रभात कसे पोहोचेल ? हिंदू संघटित कसे होतील ? यासाठी प्रयत्नरत आहेत. (हिंदी मासिक सनातन प्रभात आता पाक्षिक झाले आहे. - संपादक)

हिंदू विधीज्ञ परिषदेच्या कार्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१८ नोव्हेंबर : न्यूज एक्स या वाहिनीवर आयोजित चर्चेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सहभाग घेतला. अशोक सिंघल यांच्या निधनानंतर त्यांना संसदेने श्रद्धांजली वहावी कि नाही ?, या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 
२५ नोव्हेंबर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने मी उपस्थित होतो. देवस्थानातील घोटाळे आणि त्यांच्या चौकशीतील ढिसाळपणा यांविषयी मी पत्रकारांना संबोधित केले.
२६ नोव्हेंबर : सनातन संस्थेच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. सनातनच्या साधकांना दाभोलकर-पानसरे हत्येत गोवण्याचा केला जाणार्‍या प्रयत्नाचा निषेध करण्यासाठी आणि संस्थेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर उपस्थित होते.
२९ नोव्हेंबर : शनिवारवाडा, पुणे येथे हिंदु जनजागृती समितीतर्फे हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.

सर्वत्र गांधी-नेहरूंची नावे लावून देशात काँग्रेसविना कुणीच नाही असा आभास निर्माण करणारे व्यक्तीनिष्ठ काँग्रेसवाले !

१. काँग्रेसने इतिहासाचे पुनर्लेखन करणे : गेल्या दोन दशकात काँग्रेसने इतिहासाचे पुनर्लेखन केले आणि भारतियांना चुकीच्या मार्गाने नेले. नेहरू-गांधींविना भारतात कोणी झालेच नाही, असा आभास त्या घराण्याने ठेवलेल्या इतिहासकारांकडून लिहून घेतला. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि विमानतळ झाले, ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ! मुंबईच्या सागरी सेतूला राजीव गांधींचे नाव ? त्यांच्याकडे सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, काका गाडगीळ, लालबहाद्दूर शास्त्री ही नावे नव्हती का ? सर्वांत मोठा हमरस्ता म्हणजे गांधी मार्ग ? भाग्यनगरच्या (हैदराबादच्या) क्रिकेटच्या मैदानालाही राजीव गांधींचे नाव ! तेथील नरसिंहरावांचे का नाही ? किंवा एम्. चेन्ना रेड्डी अथवा एन्.टी. रामारावांचे का नाही ? चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असतांना त्यांनी जुन्या विमानतळाला रामाराव यांचे नाव दिले; पण नव्या विमानतळाचे नाव पुन्हा राजीव गांधी विमानतळ ! बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हटला की, तो कुठला तरी खानच असायचा. तसेच वास्तू, सेतू, विमानतळ म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचीच नावे त्यांना पाहिजेत ! या घराण्याने किती हुशारीने एकप्रकारचे मानसिक वातावरण निर्माण केले आहे, याचा विचार करा. त्यामुळे काँग्रेसने इतिहासाचे पुनर्लेखन केले, असे मी जे म्हणतो, ते आपल्या ध्यानात येईल.

भारतीय संस्कृती आणि नारायणतत्त्वाची अनुभूती यांचा परस्पर संबंध !

१. भारतीय
     निरुक्ताची रचना करणार्‍या यास्कमुनींनी या देशाची व्याख्या करतांना भरतः आदित्यः । तस्य भा भारती । हे वचन लिहिले आहे. त्याचा अर्थ आहे, भरत म्हणजे आदित्य किंवा सूर्य आणि त्यापासून जन्मलेली प्रकाशरूपी संतती म्हणजे भारतीय समाज वा जनता ! 
१ अ. भरत : वेदांमध्येही भरत या शब्दाचा अर्थ सूर्य असा दिला आहे. भारतीय ही संकल्पना प्रकाश, द्युती आणि तेज यांच्याशी संबंधित आहे. 
१ आ. भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि आदर्श चैतन्यातून साकार झालेले असणे : भारतियांनी वरील मूळ संकल्पनेतून अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा विकास केला आहे. प्रत्येक संतांच्या काव्यातून अंतर्बाह्य दीप्तीचा अनुभव व्यक्त झाला आहे. या चैतन्याच्या विश्‍वासातून भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि आदर्श साकार झाले आहेत.

परीक्षेतील यशासमवेत विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणांची जोपासना होणे आवश्यक

     परीक्षेतील यश म्हणजे मेंदूचा केवळ एक टक्का विकास असून बाकीच्या ९९ टक्के विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. परीक्षेतील यशासमवेत, चांगले शरीर, चांगले वागणे, नेतृत्वगुण, क्रीडा कौशल्य, कला, नैपुण्य, देशप्रेम, मानवताप्रेम, कृतज्ञताबुद्धी, व्यवहारचातुर्य, शांतीप्रेम, निर्भय धाडस हे बारा गुण मुलांमध्ये विकसित करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. या गुणांच्या माध्यमातून, मुलांचा बौद्धिक, तसेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासही साधता येतो.
(मासिक मनशक्ती, सप्टेंबर २००५)

भारताला लुटणारे राजकीय पक्ष आणि त्यांच्या दावणीला बांधलेली प्रसारमाध्यमे !

१. राजकीय पक्षांच्या धनशक्तीसमोर थंड पडणारी प्रसारमाध्यमे : माध्यमे आणि गुप्तचर संस्था यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य असते; कारण गुप्तचर संस्थांजवळ कोणता संपादक पूर्वी कसा होता ? आणि आता तो कसा महागड्या युएस्व्ही गाडीतून हिंडतो अन् त्याच्या या समृद्धीचे कारण काय ? ही त्याची सगळी कुंडली सिद्ध असते. वेळ येताच दोघे एकमेकांना एक्स्पोज करतात; पण ही टीका एका विशिष्ट मर्यादेपर्यंत केली जाते. त्यांनी डोळे वटारताच सगळे कसे शांत शांत ! माध्यमांजवळ एवढी सामुग्री आहे की, त्यांनी मनात आणले तर, प्रमुख राजकीय पक्षांचा एकसुद्धा नेता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून येणार नाही. राष्ट्रवादीच्या धनशक्ती समोर माध्यमांचे सगळे ताबूत थंड पडतात. इशरतजहां प्रकरणावरून टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस, हिंदू इत्यादी सर्व इंग्रजी वृत्तपत्रांनी मोदींना छळले. एक्स्प्रेसचे शेखर गुप्ता यांनी (६ जुलै २०१३ या दिवशी) लिहिले, ही गुप्तचर विभाग आणि गुजरातचे पोलीस यांची संयुक्त मोहीम होती ! या दोघांनी बिचार्‍या इशरतला सापळ्यात पकडले आणि मारून टाकले ! मात्र ही इशरत दोन पाकिस्तानी आतंकवाद्यांसमवेत रात्री बाहेर फिरतेच कशी ? तिच्या कर्मठ मुसलमान आई-वडिलांना ते चाललेच कसे ?, असा बावळट प्रश्‍न या देशात माध्यमांना कुणीच विचारला नाही.

इसिस जगभरात कुठेही आक्रमणाची धमकी देते, तर भारतात सर्व राजकारणी आतंकवाद्यांविरुद्ध एक शब्दही बोलायला घाबरतात !

       गेल्या महिन्यात ब्रिटीश संसदेने इसिसला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा निर्धार करत सीरियावर हवाई हल्ले करण्याचा ठराव संमत केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या इसिसने ब्रिटनला धमकी दिली आहे. इसिसच्या अल नबा (द न्यूज) या दैनिकातील या धमकीत म्हटले आहे की, मुसलमानांविरुद्ध युद्ध छेडण्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. ब्रिटनवर पॅरिसपेक्षाही महाभयंकर आक्रमणे करू. ही आक्रमणे इतकी भयानक असतील की, तुमच्या मुलांबाळांचे केससुद्धा पांढरेफटक पडतील. पॅरिसमध्ये आम्ही १३० जणांना ठार केले; पण ब्रिटनवर असे आक्रमण करू की, तो त्यांच्या विनाशाचा दिवस असेल. ब्रिटनमध्ये रक्तामासाचे सडे पडतील. सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     कोणताही ख्रिस्ती असा नाही की, ज्याने बायबल वाचले नसेल. कोणताही मुसलमान असा नाही की, ज्याने कुराण वाचले नसेल आणि एकही हिंदु असा नाही की, ज्याने गीता वाचली असेल ! 
- चिन्मय मिशनच्या स्वामिनी विमलानंदजी, म्हापसा, गोवा.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

    आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर बलात्कार ओळखीच्या माध्यमातूनच होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य
२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री
३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांसाठी स्वयंपाकोपयोगी 
भांडी उपलब्ध करून देऊन अथवा त्याकरिता धनरूपात 
साहाय्य करून राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !
      सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देऊन सेवा करण्यास इच्छुक साधकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील भांड्यांची तातडीने आवश्यकता आहे.
 

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्व प.पू. डॉक्टरांनीही निराळ्या शब्दांत सांगणे

    एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले, भगवंताची लाकूड, तसेच विविध धातूंपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत यांपैकी सर्वांत श्रेष्ठ मूर्ती कोणती ? श्रीकृष्णाने उत्तर दिले हृदयमूर्ती; म्हणजे भक्ताने हृदयात साठवलेली भगवंताची मूर्ती. प.पू. डॉक्टरांनीही सनातनच्या स्थापनेपासून स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ, हे तत्त्व सांगितले आहे. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांची सांगण्याची पद्धत भिन्न असली, तरीही त्यामागील तत्त्व एकच आहे, हे या सूत्रावरून लक्षात येते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०१६)

अध्यात्मप्रसाराची तळमळ असलेल्या आणि साधना म्हणून घरकाम करणार्‍या सौ. राधिका आणि सौ. रितू !

सौ. राधिका
     बेळगाव येथील सौ. वंदना चंदगडकर यांना शारीरिक त्रासामुळे बाहेर जाणे जमत नसल्याने त्या घरी आलेले नातेवाईक आणि ओळखीचे यांना साधना सांगतात. त्यांच्याकडे घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी येणार्‍या दोन स्त्रिया सौ. राधिका आणि सौ. रितू यांनाही त्यांनी साधनेचे महत्त्व सांगितले. त्यांनीही आता साधनेला प्रारंभ केला आहे. सौ. चंदगडकर यांना त्या दोघींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सौ. राधिका
१ अ. सत्संगातील सूत्र 
सांगितल्यावर लगेच कृतीला प्रारंभ करणे
     सौ. राधिका ही आमच्याकडे गेल्या १२ - १३ वर्षांपासून घरकाम करण्यासाठी येते. ती शांत स्वभावाची, प्रामाणिक आणि वक्तशीर आहे. राधिकाला सत्संग, तसेच मार्गदर्शनाला यायला मिळत नसे. चार घरची कामे करून जवळच्या गावी (पिरनवाडीला) तिला जावे लागायचे. मी सत्संगातील महत्त्वाचा भाग तिला समजेल असा सांगितल्यावर ती लगेच कृतीला प्रारंभ करत असे. ती नामजप आणि प्रार्थना करायची.

जन्मतःच देवाविषयी ओढ असलेला पंढरपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. कृष्ण अलोक बट्टेवार (वय ३ वर्षे ४ मास) !

चि. कृष्ण बट्टेवार
१. जन्मापूर्वी
१ अ. गरोदर असतांना नियमितपणे हनुमानचालीसा म्हणणे आणि आध्यात्मिक उपाय करणे, यांमुळे त्रास अल्प जाणवणे : माझी पूर्वीपासूनच हनुमानावर श्रद्धा आहे. गरोदरपणात मी नियमित हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानचालीसा म्हणत असे. मी सर्व उपाय, नामजप आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले होते, तसेच पोटावर हात ठेवून नामजप करत असे अन् बाळाशी देवाविषयी बोलत असे. त्यामुळे मला त्रास अल्प जाणवला.
१ आ. विष्णूच्या मूर्तीतून बाळकृष्ण बाहेर येऊन स्वतःच्या उदरात जात असल्याचे जाणवणे : मी गरोदर असतांना हुन्नावर, कर्नाटक येथील विष्णु मंदिरात गेले होते. मी दर्शन घेऊन तेथेच बसले असतांना विष्णूच्या मूर्तीतून बाळकृष्ण बाहेर आला आहे आणि तो माझ्या उदरात जात आहे, असे दिसले.
- सौ. वासवी बट्टेवार (चि. कृष्णची आई)

श्री चंडीकवच ऐकतांना श्रीमती मनीषा केळकर यांना आलेल्या अनुभूती

      मी सनातनचे साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे गुरुजी यांच्या स्वरातील श्री चंडीकवच भ्रमणभाषवर ऐकत होते. त्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. श्री चंडीकवच एकाग्रतेने ऐकतांना श्री चंडीकवचाच्या पठणातून स्पंदने बाहेर पडून माझ्या उजव्या कानावर बाहेरच्या बाजूने आदळत आहेत आणि पठण ऐकण्याचे थांबवताच ती स्पंदने थांबत आहेत, असे मला २२ आणि २३.१२.२०१५ या दिवशी जाणवले.

रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञानंतर महर्षींनी नाडीवाचनात सांगितल्याप्रमाणे साधकांना यज्ञाचे पूर्ण फळ म्हणून वरुणराजाचा कृपाशीर्वाद मिळवून देणे

    
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१५ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात तंजावर, तमिळनाडू येथील समर्थ रामदासस्वामींच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी उच्छिष्ट गणपति यज्ञ केला. या यज्ञाला आशीर्वाद देतांना १५ दिवसांपूर्वी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी सांगितले होते, यज्ञ परिपूर्ण झाल्याची साक्ष म्हणून गोव्याला रामनाथी आश्रमाच्या परिसरात आम्ही वरुणराजाला घेऊन येऊ. यामुळे साधकांना या यज्ञाचे पूर्ण फळ मिळेल.
१. खरोखरच यज्ञ झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळी आश्रमाच्या परिसरात पावसाचे शिंतोडे पडणे : यज्ञ झाल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी, म्हणजे १९.१.२०१६ या दिवशी सकाळच्या वेळी आश्रमाच्या परिसरात एक मिनिटभर पावसाचे शिंतोडे पडले. कुणीतरी आकाशातून आश्रमावर पाणी प्रोक्षण करावे, असेच ते पावसाचे शिंतोडे होते. यामुळे मन प्रसन्न झाले.

निरपेक्ष वृत्ती अन् संयम असलेले आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाणारे रामनगर (बेळगाव) येथील पू. शंकर गुंजेकर !

पू. शंकर गुंजेकर
१. प्रेमभाव
      सनातन संस्थेत आल्यापासून मामांनी प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले. प्रारंभी रामनगरमध्ये मामांच्या घरी साधक येऊन त्यांनी मामांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या घरी सत्संग चालू झाला. तेव्हापासून त्यांचे घर हे सेवाकेंद्रासारखे झाले आहे. मामांच्या प्रेमभावामुळे कधीही कोणीही त्यांच्या घरी ऐनवेळी हक्काने येऊन रहायचे.
२. कधीच कोणावर न रागावणे
      घरात कोणी त्यांचे ऐकले नाही, तरी पू. मामा रागवत नाहीत. तिथेही साधना म्हणून स्वीकारतात. भले त्यांची चूक नाही तरीही आणि कोणी त्यांना १० वेळा त्यांची चूक म्हणून सांगितले, तरी ते न रागावता, प्रत्युत्तर न देता, न चिडता आनंदाने चूक स्वीकारतात. त्यासंदर्भात ते सांगतात, समोरच्याने जरी तुम्ही चुकता, असे मला सांगितले, तरी कोण चुकतो आणि कोण नाही, हे देवाला कळत नाही का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा अभ्यास न केलेले जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी हिंदूंमध्ये जातींवरून आपसात फूट पाडतात. त्यामुळे हिंदूंना जगात काय, तर भारतातही किंमत नाही ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे
श्रद्धास्थान
घरघर नसणे एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की 
घरोघर होतो आणि घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; 
म्हणून त्याला घरघर नाही.
     भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो ... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरी संपत्ती !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     वेळ म्हणजे खरी संपत्ती ! ती एकदा गेली की, परत येत नाही; म्हणूनच प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. कधीही वेळ वाया घालवू नका ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

विकृतीची ओढ विनाशाकडेच !

संपादकीय
     राज्यघटनेतील ३७७ या कलमाने समलिंगी संबंध हा गुन्हा ठरवलेला आहे. या गुन्ह्यासाठी जन्मठेप, सक्तमजुरी आणि दंड अशा शिक्षा आहेत. यामुळे कुणावर असा विकृत अत्याचार होत असेल, त्यालाही आळा बसण्याची सोयही यात आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील कायदा १८६० मध्ये ब्रिटीश शासनाने पारीत केलेला होता. अन्य सर्व कायद्यांप्रमाणे स्वातंत्र्यानंतर हा कायदा जशाच्या तसा स्वीकारण्यास ६० वर्षांपूर्वी कुणालाही काही अडचण वाटली नव्हती. मधल्या काळातील भारतातील औद्योगिकीकरण, खाजगीकरण, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण, चित्रपटसृष्टीमुळे बोकाळलेली लैंगिकता यामुळे आज स्थिती एवढी पालटली की, समलिंगी संबंधांमध्ये अनैसर्गिक असे काही न वाटता काही जणांची ती आवश्यकता झाली. कपडे, दागिने, केशरचना, नेहमीच्या वापरातील वस्तू, रंग, राहणीमान, खाणे-पिणे, संगीत, चित्रकला, नृत्य अशा सर्वच संदर्भात जेवढे म्हणून वाकडेतिकडे, बेसूर, बेताल, विकृत आणि अनैसर्गिक करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न सर्वत्र वाढला; किंबहुना काही गोष्टी भेसूर आणि अघोरी स्वरूपात पुढे येऊ लागल्या. गेल्या दहा वर्षांत त्याचा परिपोष झाला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn